मराठी बृहद्कोश

कोशांविषयी

१. मोल्स्वर्थ शब्दकोश

Image removed.

  कोशाचे नाव : A dictionary, Marathi and English. 2d edition, revised and enlarged 

कोशकार : James Thomas Molesworth, George Candy, Thomas Candy

प्रकाशक : Printed for government at the Bombay Education Society's press, Bombay (1857)

This work is licensed under a Creative Commons License.

जेम्स थॉमस मोल्स्वर्थ हे मराठीच्या आद्य कोशकारांपैकी एक आहेत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीत असताना मोल्स्वर्थ मराठी शिकले. थॉमस कँडी या आपल्या सहकाऱ्यासह मराठी शब्दसंग्रह करून त्याचे इंग्रजी अर्थ द्यायच्या उपक्रमाला त्यांनी १८१८मध्ये सुरुवात केली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं आर्थिक पाठबळ लाभून कामाला १८२५मध्ये प्रारंभ झाला. या कामात जॉर्ज आणि थॉमस कँडी यांच्याबरोबरच मराठी भाषा जाणणारे जगन्नाथशास्त्री क्रमवंत, जगन्नाथशास्त्री क्रमवंत, बाळशास्त्री घगवे, गंगाधरशास्त्री फडके, सखारामशास्त्री जोशी, दाजीशास्त्री शुक्ल आणि परशुरामपंत गोडबोले हे सहा शास्त्रीही सहभागी होते. 

शास्त्रीमंडळाने संपादित केलेला सुमारे २५,००० मराठी शब्दांचा मराठीत अर्थ देणारा (मराठी-मराठी) कोश १८२९ साली प्रकाशित झाला. मराठी शब्दांचा इंग्रजीत अर्थ देणारा (मराठी-इंग्रजी) कोश प्रकाशित व्हायला १८३१ उजाडलं, पण या काळात मोल्स्वर्थ यांनी शब्दसंख्या ४०,००० वर नेली. 

मोल्स्वर्थ १८३६ साली इंग्लंडला परतले, परंतु १८५१ साली त्यांना आपल्या शब्दकोशाची सुधारित आवृत्ती काढण्यासाठी पुन्हा पाचारण करण्यात आलं. एकूण ६०,००० शब्द असलेला हा कोश १८५७ साली प्रकाशित झाला. हीच आवृत्ती बृहद्कोश प्रकल्पात समाविष्ट करण्यात आली आहे.

मोल्स्वर्थ यांचा मृत्यू १८७१ साली झाला. 

स्कॅन केलेली पीडीएफ इथे उपलब्ध आहे :

https://books.google.co.uk/books?id=u-JGAAAAcAAJ&pg=PR1#v=onepage&q&f=false

 

२. वझे शब्दकोश 

Image removed.

  कोशाचे नाव : The Aryabhusan school dictionary, Marathi-English

कोशकार : Shridhar Ganesh Vaze

प्रकाशक : Arya-Bhushan Press, Poona (1911)

This work is licensed under a Creative Commons License.

वझे शब्दकोशाच्या पहिल्याच पानावर “Specially intended for the use of Students in High Schools” असा उल्लेख आहे. आर्यभूषण छापखान्याचे प्रकाशक नटेश आप्पाजी द्रविड लिहितात की नजीकच्या भूतकाळात (म्हणजे १९११ पूर्वीच्या भूतकाळात) शाळांत देशी भाषांच्या अधिक वापराकडे कल वाढतो आहे, आणि त्यामुळे मराठीतून इंग्रजीच्या भाषांतराचं महत्त्व वाढत आहे. म्हणून शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी हा कोश तयार केला आहे. या कोशात मराठी भाषेतल्या नव्या शब्दांचा अंतर्भाव केल्याचंही प्रकाशक नोंदवतात. 

कोशकार श्रीधर गणेश वझे हे भारत सेवक समाजाचे (सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी) सदस्य होते. 

स्कॅन केलेली पीडीएफ इथे उपलब्ध आहे :

https://archive.org/details/in.ernet.dli.2015.69858/mode/1up

 

३. दाते-कर्वे शब्दकोश 

Image removed.

  कोशाचे नाव : महाराष्ट्र शब्दकोश

कोशकार : यशवंत रामचंद्र दाते आणि चिंतामण गणेश कर्वे

प्रकाशक : महाराष्ट्र कोशमंडळ लिमिटेड, पुणें

This work is licensed under a Creative Commons License.

यशवंत रामचंद्र दाते आणि चिंतामण गणेश कर्वे यांनी कोशनिर्मितीसाठी ‘महाराष्ट्र कोशमंडळ’ ही संस्था स्थापन केली. आज दाते-कर्वे कोश या नावाने ओळखला जाणारा 'महाराष्ट्र शब्दकोश' १९३२ ते १९३८ या काळात एकूण सात खंडांत प्रसिद्ध झाला, आणि पुरवणी खंड १९५० मध्ये प्रकाशित झाला. 

'महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश' हा म्हणींचा कोश, आणि 'शास्त्रीय परिभाषा कोश'ही दाते-कर्वे यांनी संपादित केला आहे.

___

The searchable data of the above dictionaries has been sourced from Digital Dictionaries of South Asia (DDSA). We are thankful to DDSA, and their benefactors, namely U.S. Department of Education and other government agencies and foundations.