आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
संबंधित शब्द
तावणें
तावणें tāvaṇēṃ v c (ताव) To heat to a red heat (metals &c.) 2 To heat (milk, ghee, water). 3 (Usually ताव देणें) To scold and rate vehemently and coarsely; to set down; to blow up. तावलेला सुलाखलेला One tried and tested, experienced and proved. तावून सुलाखून After experiment and trial; after testing and proving: also, as used with such verbs as काढणें, निघणें, जाणें, after or out of many trials and troubles, many difficulties and adversities--rescuing, extricating, escaping, emerging &c. तावून सुलाखून घेणें To receive after rigid assay and examination (metals or coins).
उक्रि. १ (सोनें इ॰ घातु) लाल होईपर्यंत तापविणें. २ (दुध, तूप, पाणी इ॰) तापविणें; गरम करणें. ३ (एखाद्यास रागानें, आवेशानें) ताव देणें; खणकरणें; दपटणें; खरडपट्टी काढणें. ४ (ल.) अजमावणें; तपासणें, 'जें अहभावाचें वोझें सांडुनी । विकल्पाचिया झुळका चुकाउनी । अनुरागाचा निरु ताउनी । पाणि- ढाळु ।' -ज्ञा ७.९९. [सं. ताप; प्रा. ताव; फा. ताब्; हिं. तावना] तावलेला सुलाखलेला- वि. सोनें पारखण्याकरितां प्रथम तपवितात व नंतर त्यास एक छिद्र पडून तें सर्व एकजिन्नसी आहें किंवा नाहीं हें पाहतात त्यावरून. कसोटी लावून पारख लेला; पूर्णपणें कसोटीस उरलेला; अनुभवानें योग्य ठरलेला; तावून सुलाखून-क्रिवि. १ अनुभव व परीक्षा पहिल्यानंतर; कसोटीस लावून योग्य ठरल्यावर. २ अडचणींतून; संकटातून; दिव्यांतून; विपित्तींतून (पार पडणें, सोडविणें, मुक्त करणें). (क्रि॰ काढणें; निघणें; जाणें). तावून सुलाखून घेणें-(सोनें, नाणें.इ॰) सक्तपणें कसोटीस लावून व काळजीपूर्वक ताडून-पार- खून घेणें. -आक्रि. (अकर्तृत्व) उकडणें; गदगदणें; गदमदणें; उष्मा होणें. -आक्रि. १ (ऊन, सूर्य यांनी) प्रखरणें; तापणें; तळपत असणें. 'तो तावूनि प्रतापतरणी । दत्तमित्र पाडिला रणीं ।' -मुआदी ३३. २३. २ (ल.) (राग इ॰ कांनी) संतप्त होणें; क्रोधाविष्ट होणें; संतापानें लाल होणें.
काईल
स्त्री. काहिली; उसाचा रस कढवण्याचे पसरट तोंडाचे भांडे; मोठी कढई. (वा.) काईलीतला खडा - तावून सुलाखून निघालेला, कसोटीला उतरलेला (माणूस.). [सं. काइल = विस्तृत]
काइलींतला खडा
१ उंसाच्या रसाच्या काहिलींतील खडा. २ (ल.) तावून सुलाखून निघालेला, कसोटीस उतरलेला माणूस.
कडसणे
उक्रि. १. कस लावणे; तावून सुलाखून घेणे. निक्षून करणे : ‘श्रीगुरू कडसूनि गोष्टी पुसतां ऐसी । शिष्य अंतरीं चमकलां ॥’ – स्वानु ११·३·२६. २. घुसळणे.
कडसणें
उक्रि. १ कढविणें; अग्निशोधन करणें; तावून सुलाखून घेणें, कसास लावणें. 'मग ज्ञानाग्निसंपर्के । कडसिलें विवेकें ।' -ज्ञा १.५२. २ (ल.) निवडणें; शुद्ध करणें. 'ज्ञाना- ग्निहताशीं कडशिलें वोजा । आत्मसिध्दी काजा लागूनियां ।' -तुगा ३९५८. [सं. क्कथ्; प्रा. कड; का. कडसु = कढविणें]
पारखणें सुलाखणें
पारखणें सुलाखणें pārakhaṇē ṃsulākhaṇēṃ v c To examine and assay; to test and try; to judge and prove. A comprehensive formation to express General inspection, scrutiny, and consideration. The common form of use is the ऊन form (पारखून सुलाखून) preceding another verb (-पाहणें-ठेवणें-घेणें-देणें-आणणें &c.)
पारख
स्त्री. १ परीक्षा; तपासणी; चांचणी. 'पहिल्याच भेटीबरोबर पारख केली म्हणायची.' -नाकु ३.११. २ नाणें, हिरा, मोती, माणिक इ॰ची किंमत ठरविणें; दर्जा, भाव ठरविण्याचें ज्ञान. 'स्तुति करायला गुणांची पारख पाहिजे.' -गर्वनिर्वाण ८८. ३ किंमत; योग्यता; दर्जा. 'मी तों नसें रे तुज पारखीसी । पदोपदीं कां मज पारखीसी ।' -स ४.१४. -पु. १ पोतदार; पैसा पारखून घेणारा अधिकारी. २ सावकार. 'त्याचा पारख त्याला कर्ज देईनासा झाला.' -धर्माजी ८. [सं. परीक्ष् प्रा. परिक्खा; गुज. सिं. पारख] पारखाणावळ, पारखाई-स्त्री. नाणें, हिरा, मोती इ॰चा दर्जा, कस, किंमत इ॰ची परीक्षा करण्याबद्दल दिलेली मजुरी; पारखण्याची मजुरी; सराफी. [पारख] पारखणी-स्त्री. (नाणें इ॰ची) पारख करणें; परीक्षा; तपासणी. [पारखणें] पारखणें-क्रि. १ परीक्षा करणें; तपासणें. २ (नाणें इ॰ची) किंमत, दर्जा इ॰ ठरविणें. 'म्हणोनि फुडे । पारखावें खरें कुडें ।' -ज्ञा ८.२४२. ४ (गो.) अजमास करणें. [सं. परीक्ष् (परीक्षा करणें)] ॰सुलाखणें-उक्रि. परीक्षा करून खात्री करून घेणें; प्रचीति पाहून अनुभव घेणें; सारासार विचार, न्याय करून ठरविणें. (सोनें पारखतांना तें एक जिन्नसी आहे किंवा नाहीं तें पाहण्याकरितां त्यास सुराख म्हणजे छिद्र पाडतात त्यावरून; तावून सुलावून पहा) पारखून सुलाखून- असा प्रयोग रूढ आहे. (क्रि॰ पाहणें-ठेवणें-देणें-घेणें-आणणें). म्ह॰ पारखून केला पति आन् त्याला भरली रक्तपिती.॰पारख- नीस-पु. पारख करणारा अधिकारी; पोतदार. पारखावण- स्त्री. परीक्षा करण्याबद्दलची मजुरी; पारखाई; पारखाणावळ. पारखी-पु. १ (गो.) ज्योतिषी; भूतभविष्य सांगणारा. २ पोतदार; नाणीं पारखून घेणारा माणूस, अधिकारी. ३ सराफ; निधिधारक सावकार इ॰ यावरून आडनांवहि पडलें आहे. -वि. १ पारख करणारा; परीक्षक; तपासणारा; मर्मज्ञ. 'ऐसेनि कार्या- कार्यविवेकी जे प्रवृत्तिनिवृत्ति मापकी । खरा कुडापारखी । जियापरी ।' -ज्ञा १८.७१६. २ निवाडा करणारा.