आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
अक्षौहिणी
अक्षौहिणी akṣauhiṇī f S A hundred trillions. 2 An army having its complement of foot, horse, chariots, and elephants.
अक्षौहिणी f A hundred trillions. An army consisting of foot, horse, chariots, and elephants.
(सं) स्त्री० सैन्यसंख्या वि०.
अक्षौणी, अक्षौहिणी
स्त्री. १ गज २१८७०, रथ २१८७०, घोडे ६५६१०, पायदळ १०९३५० इतकें मिळून होणारें सैन्य. 'आंगवणा करावेआं खोंचणी । वेठीलिआं बत्तीस अक्षौणी ।' -शिशु १०३५. 'तीन कोटि म्लेंछ त्याचे । तेवीस अक्षौहिणी दळ मागधांचें ।' -ह २२.१४७. २ एकावर एकवीस शून्यें दिलीं असतां जी संख्या होते ती. [सं.]
अक्षौणी, अक्षौहिणी
स्त्री. १. गज २१८७०; रथ २१८७०; घोडे ६५६१०; पायदळ १०९३५० इतके मिळून होणारे सैन्य : ‘आंगवणा करावेआं खोंचणी । वेठिलिआं बत्तीस अक्षौणी ।’ – शिव १०३५.
संबंधित शब्द
आरण, आरणी
स्त्री. अरणी पहा. १ युद्धभूमि. 'जया जिया अक्षौहिणी । तेणें तिया आरणीं । वरगण कवण कवणी । महा- रथीया ।' -ज्ञा १.१२२. -एभा २२.२९५. २ युद्धाची उठा- वणी; युद्धविषयक हुकूम. 'आणि धुरे नाहीं रणीं । तरी कोणें द्यावी आरणी ।' -कथा ३.११.१८०. ३ शस्त्र. -नागा २१०८. (-शर) [सं. आ + रण]
आरण, आरणी
स्त्री. १. युद्धभूमी : ‘जया जिया अक्षौहिणी । तेणें तिया आरणीं । वरगण कवण कवणी । महारथीया ।’ − ज्ञा १·१२२. २. युद्धाची उठावणी; युद्धविषयक हुकुम : ‘आणि धुरे नाहीं रणीं । तरी कोणें द्यावी आरणी ।’ − कथा ३·११·१८०. ३. शस्त्र. ४. सैन्य ‘दोन्ही आरणीं मिळालीया असेति ।’ − गोप्रच २१. [सं. आ+रण]
वेद
पुअव. १ भारतीयांचे पवित्र आद्य धर्मग्रंथ; श्रुति; जगां- तील अत्यंत प्राचीन वाङ्मय. वेद चार आहेत. ऋग्वेद, यजुर्वेंद, सामवेद व अथर्ववेद. यांतील मूळचे तीन हे मुख्य वेद होत आणि इतिहास व पुराणें यांना पांचवा वेद म्हणण्यांत येतें'. २ ज्ञान. ३ (महारांत) मंगलाष्टकें. -बदलापूर १६९. -वि. चार ही संख्या. 'दोन अक्षौहिणी पांडवदळ । वेदइक्षौहिणी हें त्याचें बळ ।' -जै ८३.२७. [सं. वेद; विद्-जाणणें] एखाद्याचे वेद हरणें-सर्व युक्त्त्या, बेत इ॰ फसून कर्तव्यमूढ होणें; कांहीं एक मार्ग न सुचणें; तंत्रमंत्र हरणें. ॰त्रय-न. ऋग्वेद, यजु- र्वेद व सामवेद. -ज्ञा ७.८४. ॰त्रयी-स्त्री. १ धर्म, अर्थ व काम ह्यांचा समुच्यय. २ संहिता, ब्राह्मण व आरण्यकें मिळून होणारे ग्रंथ. ३ ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद हे तीन वेद. ॰निंदक-पु. वेदांची निंदा करणारा; बौद्ध, जैन इ॰ अन्य धर्मीय मनुष्य. ॰पद्यन. वेदवाक्य; वेदांतील ऋचा. 'घुमघुमिती घोषा । वेदपद्यांचा ।' -ज्ञा १५.१८८. ॰पुरुष-पु. वेदरूपी पुरुष; वेद. 'वेदपुरुष तरि नेती कां वचन । निवडूनि भिन्न दाख- विलें ।' -तुगा १६५३. ॰प्रतिपाद्य-वि. वेदाच्या प्रतिपाद- नाचा असणारा (विषय). 'ॐ नमो जी आद्या । वेदप्रति- पाद्या ।' -ज्ञा १.१ ॰मुख-वि. वेद तोंडपाठ येत असलेला; चांगले वेदपठण केलेला. ॰मूर्ति-स्त्री. (मूर्तिमंत वेद) वेदविद्या- संपन्न, विद्वान् भिक्षुक, शास्त्री इ॰ च्या नांवामागें लावण्याची सन्मानदर्शक पदवी. ॰रक्षण-न. वेदांचा प्रतिपाळ. हा ब्राह्मणांचा आचार मानला आहे. ॰लोक-कु-पु. वेद आणि जग किंवा वेद हेंच जग; श्रुतिशास्त्र. 'तो गा मी निरुपाधिक । क्षराक्षरोत्तमु एकु । म्हणोनि म्हणे वेदलोकु । पुरुषोत्तमु ।' -ज्ञा १५.५५७. ॰वती-स्त्री. पृथ्वी; वेद (अन्न) युक्त पृथ्वी. 'जयाचेनि सौरभ्ये जीवित जोडे । वेदवतीये ।' -ज्ञा ११.२२४. ॰वाक्य-न. १ वेदश्रुतिसंहिता; वेदांतील वचन. 'वेदवाक्यांतून आगगाडी, तारा- यंत्र काढण्याचा प्रयत्न जितका असमंजस...' -टिले ४.५२. २ ज्याच्या प्रामाण्याला निराळा आधार लागत नाहीं असें वेदांतील वाक्य. ३ (ल.) प्रमाण वचन. ॰वादरत-वि. वेदांतील अर्थ- वादांमध्यें मग्न असलेला. 'म्हणोनि हे पार्था । दुर्बुद्धि देख सर्वथा । तयां वेदवादरतां । मनीं वसे ।' -ज्ञा २.२५५. ॰विद्-वि. वेद जाणणारा; विद्वान्. -ज्ञा ८१०३. [सं.] ॰शास्त्रसंपन्न-वि. वेदमूर्ति. शास्त्रपुराणादि जाणणार्या प्रतिष्ठित ब्राह्मणाच्या नावापूर्वी कागदोपत्रीं लिहावयाची पदवी. याचा संक्षेप वे॰ शा॰ सं॰ असा करतात. ॰सार-नपु. वेदांचें सार किंवा रहस्य; वेदांचें सार असलेली देवता. 'जयजय जगद्वंद्या वेदसारा ।' वेदांगें-नअव. वेदानुषंगी शास्त्र; वेदांचाच भाग म्हणून गणलेलें शास्त्र; उपवेद. हीं अंगें सहा आहेत. शिक्षा, कल्प, व्याकरण, छंद, ज्योतिष व निरुक्त. षडंगें पहा. [वेद + अंग] वेदांत-पु. (वेदांच्या अंतीं असलेला) वेदांचें सार. १ ब्रह्मज्ञान सांगणारा वेदानंतरचा भाग; उपनिषदें; उत्तरमीमांसा; षड्दर्शनांतील सहावें दर्शन; उपनिषदां- तील तत्तवज्ञान. 'वेदांतु तो महारसु । मीदकु भिरवे ।' -ज्ञा १.११. -एभा १७.४०. २ प्रपंचाचें ऐहिक सुखदुःखांचें मिथ्यात्व आणि ब्रह्माचें सत्यत्व प्रतिपादिणारी साधुसंत, हरिदास इ॰ सांगतात ती गोष्ट; उपदेश; ब्रह्मज्ञान. ३ ब्रह्म हेंच सत्य आहे; बाकी जगःनिथ्या आहे असें सांगून ईश्वराच्या सच्चिदानंद स्वरूपाचें निरूपण कर- णारें मत; जीवात्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य दाखविणारे अद्वैतमत. वेदांताचे द्वैत, अद्वैत व विशिष्टद्वैत असे मुख्य तीन पंथ आहेत. [वेद + अंत] वेदांती-वि. १ उपनिषदांतील ब्रह्मज्ञान अभ्यासणारा किंवा त्याप्रमाणें वागणारा; ब्रह्मज्ञानी; वेदांतमताचा. २ ज्ञानमार्गी; ज्ञानकांडप्रतिपादक. याच्या उलट पादांती. -गीर २८७. म्ह॰ वेदांत्यापेक्षां धादांती बरा. वेदाध्ययन-न. वेद पठण; वेद शिकणें. पंचमहायज्ञांतील एक यज्ञ. -गीर २८८. [वेद + अध्ययन] वेदाभ्यास-पु. १ वेदांचें अध्ययन; वेदपठन. २ ॐ काराचा जप. [वेह + अभ्यास] वेदाज्ञा-स्त्री. वेदानें सांगितलेलें कर्तव्य; वेदाची आज्ञा; वेदवचन. [वेद + आज्ञा] वेदोक्त-वि. १ वेदांत कर्तव्य म्हणून सांगितलेलें. २ वेदमंत्रोच्चारपूर्वक. ३ (ल.) वेदमंत्रोच्चारपूर्वक करावयाचा (धर्मविधि). याच्या उलट पुराणोक्त. 'बगंभट, तुला काय काय वेदोक्त करतां येतें ?' -तोबं ६१. वेदोक्तकर्म-न. वेदोक्त; वेदोक्त मंत्रानें करावयाचा गृह्यसंस्कार. जुन्या शास्त्रांप्रमाणें हा अधिकार फक्त त्रैवर्णिकांना असे. 'अली- कडे इंग्रजीविद्येनें व पाश्चिमाच्य शिक्षणानें संस्कृत झालेल्या मराठे मंडळीच्या मनांत जीं कांहीं खुळें शिरलीं आहेत त्यांपैकींच वदो- क्तकर्माचें खूळ एक होय.' -टिले ४.३१६. वेदोदित-वि. वेदोक्त पहा. [वेद + उदित] वेदोनारायण-पु १ वेदस्वरूपी परमेश्वर. वेदविद्यासंपन्न ब्राह्मणाला सन्मानद्योतक लावावयाची पदवी. [सं.]