आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
अट्टाहास
अट्टाहास aṭṭāhāsa m & अट्टाहास्य n (Corr. from अट्टहास S) Vehement action; exceeding effort or exertion. 2 Toil, pains, ado, laborious efforts.
पु० अटापीट.
पु. अतिश्रम; श्रमांची पराकष्टा; मेहनतीची शिकस्त [सं.]
अट्टहास, अट्टाहास
पु. १. जोराने मोठ्याने हसणे; विकटहास्य. २. मोठ्या आवाजात केलेला आक्रोश, मोठा आवाज : ‘अचेतन पडिले शरीर प्रेत । जवळी स्त्री आली धावत । अट्टाहासे शोक करीत ।’ – हरि ३३·२०८. ३. हट्ट; आग्रह. पहा : अटास [सं.] (वा.) अट्टहास धरणे – १. महत्त्वाकांक्षा बाळगणे : ‘मराठेशाही बुडविण्याचा अट्टाहास धरून आपल्या अफाट सेनेसह...’ – स्वप १३३. २. हट्ट धरणे; आग्रह धरणे; हटून बसणे.
संबंधित शब्द
आक्रोश
पु. १ मोठ्यानें रडणें; हंबरडा फोडणें; विलाप करणें; आक्रंदन; आकांत; कल्लोळ; चरफड. ‘वोळख तूं निरुतें । आक्रोशेंवीण जेथें । क्षमा असे ।।’ -ज्ञा १३.३३९. २ निंदा; ओरड; बडबड. ३ आवेश; अट्टाहास. ‘तेवींचि आक्रोशबळें । व्यापारें कोणे एके वेळें । निगालें तरी आंधळें । रोषे जैसें ।।’ –ज्ञा. १४.१८९. [सं. आ + क्रुश्]
आक्रोश
पु. १. मोठ्याने रडणे; हंबरडा फोडणे; विलाप करणे; आक्रंदन; आकातं; कल्लोळ; चरफड : ‘वोळख तूं निरुतें । आक्रोशेंवीण जेथें । क्षमा असे’− ज्ञा १३·३४०. २. निंदा; बडबड; ओरड. ३. आवेश; अट्टाहास : ‘तेवींचि आक्रोशबळें । व्यापारें कोणे एके वेळें । निगालें तरी आंधळें । रोषें जैसें ॥’ − ज्ञा १४·१८९. [सं.] ४. त्रास; कष्ट : ‘आक्रोशेंविण जेथें । क्षमा आथि’ − ज्ञा १३·३३९.
आटास
अट्टाहास : ‘हाक फुटली आटासे’ − उषा १४१९ आटासाटा
आटास
अट्टाहास पहा. 'हाक फुटली आटासे' -उषा १४१९ [सं. अट्टाहस]
अटास
(प्र.) अट्टाहास; अट्टहास; प्रचंड उद्योग; अत्यंत परि- श्रम, मेहनत, कष्ट; अटाआट. [सं. अट्ट = मोठे, फार + आयास = कष्ट]
अटासु
पु. (महानु.) अट्टाहास; कष्ट. ‘हा केसरसातीही ग्रहीं अटासु दीधला ’ –उ २.५८.[सं.अट्टहास-अट्टहासु- अटासु]
अट्ट(ट्टा)हास
पु. १ जोरानें, मोठ्यानें हसणें. २ मोठा आवाज, स्वर; आक्रोश. 'करि रुदन अट्टहासें ।' -एभा ३०.२३१. 'अचेतन पडिलें शरीर प्रेत । जवळी स्त्री आली धावंत । अट्टहासें शोक करित ।' -ह ३३.२०८. [सं. अट्ट = मजला + हास]. अटास पहा. ॰धरणें-महात्त्वाकांक्षा बाळगणें; हट्ट धरणें. 'मराठेशाही बुडविण्याचा अट्टाहास धरून आपल्या अफाट सेनेसह महाराष्ट्रांत तळ देऊन बसलेला बादशहा यावेळीं कोणती गोष्ट करीत होता?' -स्वप १३३.
अट्टाहास्य
मोठा प्रयत्न; अट्टहास पहा. 'चोरासाठीं रद- बदल अट्टाहास । जळो जिणें दास्य बहुतांचे ।।' -तुगा १८९४.
अथर्गण
न. १. रानटीपणाची, आडदांड वागणूक; आरडाओरडा; अट्टाहास; आदळआपट, शिवीगाळ, उतावीळपणा; घाई किंवा आग्रह; २. स्वार्थ साधण्यासाठी रडणे, उर्मटपणे बोलणे इ. (कों)
अथर्गण
न. (कों.) रानटीपणाची, आडदांड वागणूक; आरडा- ओरड; अट्टाहास; आदळ आपट; शिवी-गाळ; उतावीळपणा; घाई किंवा आग्रह; तारांगण. [सं. अथर्वण]
चोळण
स्त्री. १. (गुरांच्या वर्दळीने होणारी शेताची, पिकाची) तुडवातुडव; चोळ; चोळाचोळ; वर्दळीमुळे, रहदारीमुळे (शेत इ.स) होणारा उपद्रव. २. चिंधीचोळा; नाश : ‘कुलाबासंस्थान आपलेच आहे. स्वार व गाडदी जावयाचा इतका अट्टाहास कशास पाहिजे? रयतेची चोळण होईल.’ − ऐको ३८८.
गावा
पु. (कों.) पुन्हां पुन्हां बोलून दाखविलेली इच्छा, ध्यास; एकाच गोष्टीची जपमाळ; अट्टाहास; घोष. 'घर बांधीन बांधीन म्हणून चार वर्षार्नीं गावा लागला.' (क्रि॰ गाणें; लागणें; (संपला असल्यास) मोडणें; सरणें; संपणें; आटोपणें). [गावणें; सं. गै; प्रा. गाव]
गावा
पु. पुन्हा पुन्हा बोलून दाखविलेली इच्छा, ध्यास; एकाच गोष्टीची जपमाळ; अट्टाहास; घोष. (क्रि. गाणे, लागणे, (संपला असल्यास) मोडणे, सरणे, संपणे, आटोपणे.) (को.) [सं. गै]