मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

आडच्च, आडजुना, आडणा, आडणी, आडत, आडत्या, आडदांड, आडधरणी, आडनाडनीड, आडपंचा, आडपेंठ, आडबंक

आडच्च, आडजुना, आडणा, आडणी, आडत, आडत्या, आडदांड, आडधरणी, आडनाडनीड, आडपंचा, आडपेंठ, आडबंक See under अ.

वझे शब्दकोश

अडणी

स्त्री. १ दिवा, भांडी वगैरे जिन्नस ठेवण्याकरिता तिवई, चौरंग. 'अडणीवरि सोन्याचें ताट ।।' -सुदा ३४. २ शंखाची बैठक तिवई. ३ अडसर. ४ लांकडी पाटास खालून लावलेले दोन लांकडी खूर. ५ (कों) दाराची कडी. ६ टेंका; आधार. 'घायाळा घालोनि वोडणी । धनुष्यदंडाच्या अडणीं । उचलोनि दोघीं दोघीं जणीं । वीर श्रेणी आणिल्या ।।' -एरुस्व १२.२६. ७ सुपाची पुढील कामटी; अडणपहा. ८ मर्यादा; सीमा; रंगण. 'इंद्रधनुष्याचिये अडणी -। माजीं मेघ गगनरंगणीं । तैसें आवरिलें शाङ्र्गपाणी वैजयंतिया ।' -ज्ञा ११.६०३. [का.अड्डणिगे = तिपाई]. ॰वरचा (शंख) पु. १ शंख; (ल.) मूर्ख; अशिक्षित माणूस. 'अशा तऱ्हेचे उद्गार अहो- रात्र त्याच्या कानींकपाळीं पडल्यामुळें म्हणा पण शिकण्यासवरण्यात तो अडणीवरचाच झाला.' -यशख. २ उच्च स्थानावर-अधिकारवर असलेला बेअकली माणूस.

दाते शब्दकोश

अडणी aḍaṇī f A (metal or wooden) three-legged stand;--for the शंख, eating-vessels &c. 2 The slip of bamboo described under अडण. 3 The bolt of a door. 4 A common term for the two cross pieces of wood supporting a low पाट or stool.

मोल्सवर्थ शब्दकोश

अडणी f A three-legged stand or a stool; a bolt.

वझे शब्दकोश

स्त्री० तिवई.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

आडणी      

अडचणीची वेळ. (कु.) आडणी सावकार      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आडणी

(कु.) अडणी पहा.

दाते शब्दकोश

स्त्री० शंख ठेवण्याची बैठक, तिवई.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

अडणी      

स्त्री.       अडचण; संकट : ‘पडिलेयां संसारीचीए अडणी : जो पुरवी ब्रह्मविद्येची तवनी’ – उगी ४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आडच्च, आडजुना, आडणा, आडणी, आडत, आडत्या, आडदांड, आडदाळ, आड धोतर, आडनळ, आडपंचा, आडपेठ, आडबंक, आडबांक, आडनाड, आडनीट, आडनीड, आडनेड, आडपन्हळ, आडफळें

अ मध्यें पहा.

दाते शब्दकोश

अडणी, अढणी      

स्त्री.       १. दिवा, भांडी वगैरे ठेवण्याकरता तिवई, चौरंग : ‘अडणीवरि सोन्याचे ताट ॥’ – सुदा ३४; बैठक; स्थान. २. शंखाची बैठक; तिवई. ३. अडसर. ४. लाकडी पाटास खालून लावलेल्या दोन लाकडी कातीव पट्ट्या. ५. दाराची लाकडी कडी. (कों.) ६. टेका; आधार : ‘घायाळा घालोनि वोडणी । धनुष्यदंडाच्या अडणीं । उचलोनि दोघीं दोघीजणी । वीर श्रेणी आणिल्या ॥’ – एरुस्व १२·२६. ७. सुपाची पुढील कामटी. ८. मर्यादा; सीमा; रंगण : ‘इंद्रधनुष्याचिये अडणीं । माजी मेघ गगनरंगणी । तैसे आवरिले शारङ्‌गपाणी वैजयंतिया ।’ – ज्ञा ११·६०३. [का. अड्डणी] (वा.) अडणीवरचा (शंख) – १. शंख. २. (ल.) मूर्ख; अशिक्षित माणूस. ३. उच्च स्थानावर-अधिकारावर असलेला बेअकली माणूस; ‘पण शिकण्यासवरण्यात तो अडणीवरचाच झाला.’ – यख ४४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आडणी सावकार      

किरकोळ, लहान सावकार. आडत      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

आडणीसावकार

पु. किरकोळ, लहान सावकार. 'व्याजाच्या आशेनें लहान रकमा कर्जाऊ देतात. जमीनी गहाण घेतल्या त्या गहाणदारांना किंवा इतरांना वटाईनें, खंडानें लावतात. त्रागा, शिव्याशाप देऊन कर्ज वसूल करण्याचा यत्न करतात. पण कुणबी शेतमाल त्यांच्या हातीं लांगू देत नाहींत कांहीं दिवस अंदरबट्टा सोसून बहुधां मुद्दल रुपयांचे सहा ते बारा आण्यांवर आपले रोखे वाण्यांना बेचन करतात.' -गांगा १६१. [आडणी किंवा अडाणी + सावकार]

दाते शब्दकोश

आधार

टेकू, अडणी, अटकणी, पाया, टेकावा, नेटावा, टेकूचें, पावठणी, पायंडा, नेटा, आधारस्तंभ, पायाचा दगड, चौथरा, चबुत्रा, ज्यावर विसंबावें असें, सपोर्ट.

शब्दकौमुदी

आढणी      

स्त्री.       तिवई. पहा : अडणी. ‘रत्नजडित दीप ठेविले जवळी । जडित आढण्या त्या तळीं ।’ − हरि २४·११९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आढणी

स्त्री. तिवई. अडणी पहा. 'रत्नजडित दीप ठेविले जवळी । जडित आढण्या त्या तळीं ।' -ह २४.११९.

दाते शब्दकोश

अन्नई      

स्त्री.       ताट ठेवण्याची लोखंडी अगर पितळी तिवई; अडणी. (व.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

बस

पु. १ दृढता; निश्चितपणा; कायमपणा. २ स्थिस्र्था वरतेची स्थिति; जम; वजन; छाप; पगडा. (व.) बसोटी. (क्रि॰ बसणें). 'ज्या व्यवहारांत ज्याचा बस बसला तो त्यास सुकर.' [बसणें] बसक-स्त्री. १ आसन; आस्तरण; बैठक; बिछाईत (जाजम, खुर्ची इ॰). २ बैठक; खुर्ची; तळखडा; (सामा.) आधार. ३ बसकी; तळ; बूड; पाय; बुंधा; अडणी. 'या दऊ- तिची बसक लहान म्हणून आपटते.' ४ बसकी; बाजारांत घातलेल्या दुकानावरील कर, पट्टी. ५ बसकीची जमीन; सपाट, सखल जमीन; दरी; बदखल. ६ जमीनीचा खोलगट भाग; लवण. ७ जमीनीवर ठाम बसून राहणें (थकव्यामुळें, हट्टानें-मनुष्यानें, पशूनें). (क्रि॰ घेणें; मारणें). बसक-वि. सखल; खोलगट (जमीन). बसकट-स्त्री. दमल्यामुळें, हट्टानें, (तगादेवाल्यानें ऋणकोला) रोखण्याकरितां जमीनीवर थबकल घालून बसणें; हातपाय मोकळें सोडून बसण्याची क्रिया; बैठक. (क्रि॰ घेणें; मारणें). 'ही म्हैस उभी आहे तों दूध काढा. एकदां बसकट मारली म्हणजें उठणार नाहीं.' -वि. १ सखल; थपकट; चपटें; सपाटसर; याच्या उलट उभट, उभार. २ बसकें; फेंदरें; नकटें (नाक). बसकट नाक्या-वि. फेंदरा; नकटा. बसकण-न. १ आस्तरण; बैठक. बसक (-स्त्री) पहा. २ बसकट, थबकल (-स्त्री) पहा. ॰कण-घेणें-मारणें-सिद्धीच्या निराशेनें हातीं घेतलेलें काम सोडून देणें. ॰क(का)र-कूर, बस्क- (स्कार)र-स्त्रीन. हांतरी; चटई; जाजम; घडवंची; मुलांनीं शाळेंत बसावयास आणलेलें गोणपाट इ॰ आसनाप्रमाणें पसरलेली, ठेव- लेली कोणतीहि वस्तू. (हेट.) बस्टुक. [सं. विष्टर] ॰कल-स्त्रीन. बसण्यास फुरसत; वेळ; सवड; संधि (बहुधा नकारार्थीं प्रयोग). 'तो सारा दिवस फिरतो त्यास क्षणभर बसकल सांपडत नाहीं.' -वि. १ कमी उंचीचें; आखूड व पसरट; नीच व सपाट. २ बसकें; फेंदरें; नकटें (नाक). ३ खोलगट; खालपट (जमीन). ॰का-स्त्री. १ (राजा.) बैठक; आसन; खुर्ची. २ तळ; पाया (वस्तूचा). -वि. १ बेताच्या उताराचा; आडव्या घाटाचा; याच्या उलट पाणढाळ; खर. २ सपाट; थबकट. ॰की-स्त्री. १ विटीदांडूच्या खेळांतील एक शब्द. २ बसका अर्थ १ व २ पहा. ३ चुंबळ. -वि चुंबळीसारखें बसकट (पागोटें). 'तिवट बस्की साधें.' -समारो १.२०१. ॰कीचा-वि. १ तळ, पाया, बैठक, असलेला. २ बसण्यालायक (घोडा, बैल, गाढव). ॰कूर-स्त्रीन. बसकर पहा. बसकेचा-वि. तळ, पाया, बैठक, आधार असलेला. ॰कोळी-स्त्री. बसकट मातीची घागर. 'यथाविधीनें त्या येरी । बसकोळ्या घागरी ।' -तुगा २८०. बसण-स्त्री. (कर.) बसण्यास घेतलेली लाकडी वस्तु बसणी-स्त्री. १ बसणें; बैठक; मांडी ठोकून बसणें. 'एका बसणीस म्यां शंभर बंद लिहिलें.' २ बूड; आसन. ३ (कों.) लहान पाट. ॰फुगडी-स्त्री. बसून घालाव- याच्या फुगडीचा खेळ. 'बस फुगडी बसुंगा । चतुर भुंगा लालुंगा । एक पाय खोलीतो । सीताराम बोलीतो ।' -मसाप २.२३४.

दाते शब्दकोश

बसक / का

स्त्री० बैठक, आडणी, पडघी.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

घडवशी, घडवंची      

स्त्री.       १. मृदंग ठेवण्याची घडवंची; घोडी. २. लाकडी पाय असलेली बैठक, चौकी. ३. घडोंची; तिवई; लाकडाच्या फळीला तीन किंवा चार पाय बसवून केलेली बैठक, चौकट (घागरी, भांडी, पेट्या इ. सामान ठेवण्याकरिता केलेली); लाकडी चार पायी चौकट; चौकी; शिडी. ४. (भात इ. झोडण्याची) घोडी. (को.) ५. अडणी. [सं. घट+उच्च (?)]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खि(ळि)ळी

स्त्री. १ (विणकाम) हत्येच्या चौकटीच्या दोन्ही बाजूंच्या दोन खुंट्या; (सामा.) दाराचा अडसर, खिळा, मेख. २ खीळ पहा. (खिळी हा शब्द खीळ शब्दाबद्दल कोंकणांत वापरतात). ३ (गो.) दाराची कडी. (कु.) खिटी; आडणी. 'खिळि लाऊनि धरला वाडा ।' -आप ८६. [सं. कीलक]

दाते शब्दकोश

खिळी      

स्त्री.       १. (विणकाम) हत्येच्या चौकटीच्या दोन्ही बाजूंच्या दोन खुंट्या; (सामा.) दाराचा अडसर, खिळा, मेख. २. पहा : खीळ (खिळी हा शब्द खीळ या शब्दाबद्दल कोकणात वापरतात.) ३. दाराची कडी. (गो.) ४. खिटी; आडणी (कु.) : ‘खिळि लाउनि धरला वाडा ।’ - आप ८६. [सं. कीलक]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

मांचळी

स्त्री. अडणी; तिवई (जेवण्याचें ताट ठेवण्याची) 'आसन सोरठा उर्णपटीं । पुढां मांचळी चौंपटीं ।' -ऋ ८०. [सं. मंच]

दाते शब्दकोश

शाळंका-खा, शाळुंका-खा, शाळोका-खा

स्त्री. महादेवाचें लिंग बसविण्यासाठीं केलेली पाषाणादिकांचा बैठक; लिंगाची अडणी; योनि.

दाते शब्दकोश