मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

अडाण

न. १ शेती नसलेले किंवा न करणारे गांवकरी; शेतकऱ्यांउलट; बलुतेदारांपेक्षां हे निराळे. [सं. अज्ञान. का. अडने] ॰कबाड-न. अडाण; खेड्यांतील कारागीर, व्यापारी, मजूर, कामकरी, इ॰ (शेतकरी नव्हे ते). (अडणारा; शेतकऱ्यांवर अवलं- बून रहाणारा तो अडाणी-गांगा ८). [अडाण + काबाडी] ॰चोंटवि. अडाणी; मंदबुद्धीचा; घोडचुक्या करणारा; मठ्ठ. ॰जात-स्त्री. अशि- क्षित, रानवट, जंगली लोक; रीतभात माहीत नसणारे. ॰पट्टी-स्त्री. शेतकरी व बलुतेदार या लोंकाखेरीज बाकीच्या सर्व धंद्यांच्या व उदमी (अडाण) लोकांवर बसविलेला कर. अडाण-बाकी-वसुली वगैरे असे सामासिक शब्द अनेक होतात. ॰मत-न. खेडवळ, विल- क्षण, भलतेच विचार-समजूत-कल्पना वगैरे; हटवादीपणाचें मत; दांडकमत. ॰वस्ती-स्त्री. बलुतेदार व शेतकरी यांवांचून बाकीच्या (अडाण) लोकांची खेड्यांतील अगर त्याच्या एकाद्या भागांतील वस्ती.

दाते शब्दकोश

अडाण n People not employed in cultivation. Udder.

वझे शब्दकोश

अडाण aḍāṇa n The people of a village not employed in cultivation; as contrad. from शेतकरी A field-man. 2 Udder.

मोल्सवर्थ शब्दकोश

न. पाटबंधारा; बंधारा (डॅम). [अडण-णा]

दाते शब्दकोश

न. कास; ओटी; अडण पहा. [सं. ऊधास्-न्; ग्री. औथर; ज. युटेर; इं. अडर.]

दाते शब्दकोश

स्त्री. (माळवी) कुवा असलेली जमीन. याच्या उलट विराण म्हणजे वैराण, रुक्ष, पाणी किंवा बिहीर नसलेली जमोन. [म. आड = विहीर + रान-वन = जमीन]

दाते शब्दकोश

आदान

आदान ādāna n An ill betokening conjunction or aspect. 2 (आधण) Applied to a desperate sickness, an alarming danger, any awful accident or perilous circumstances from which, contrarily to expectation, the subject recovers or escapes. v ये, जा, चुक, टळ, वार, निवार.

मोल्सवर्थ शब्दकोश

आदान n Taking from; seizing, accepting. An alarming danger from which the subject almost luckily escapes.

वझे शब्दकोश

आदान ādāna n S Taking from; seizing, accepting, receiving.

मोल्सवर्थ शब्दकोश

(सं) न० घेणें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

न. घेणें; स्वीकारणें; बळेच घेणें-मिळविणें; अंगि- कारणें. [सं. आ + दा]

दाते शब्दकोश

न. १ कुयोग; अशुभ सूचक प्रसंग. २ (ल.) ज्यांतून निभावणें-जगणें कठिण असा आजार किंवा अपघात; पुनर्जन्म देणारें संकट. 'म्यां भोगिलीं आदानें । गर्भवासी अपार ।' -मुरंशु ४३५. (क्रि॰ येणें; जाणें; चुकणें; टळणें; करणें; [सं. आ + धान]

दाते शब्दकोश

आदाण

न. (कु.) आधण पहा.

दाते शब्दकोश

अडाण      

न.       शेती नसलेले किंवा न करणारे गावकरी; बलुतेदारांपेक्षा हे निराळे. [सं. अज्ञान]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

न.       १. दुभत्या जनावराची कास; ओटी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

स्त्री.       पाणभरित जमीन.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

न.       पाटबंधारा; बंधारा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आदान      

न.       घेणे; स्वीकारणे; बळेच देणे; मिळवणे. [सं. आ+दा]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

न.       १. कुयोग; अशुभसूचक प्रसंग. २. (ल.) ज्यातून निभावणे−जगणे कठीण असा आजार किंवा अपघात; पुनर्जन्म देणारे संकट : ‘म्यां भोगिलीं आदानें । गर्भवासी अपार ।’ − मुरंशु ४२५. (क्रि. येणे, जाणे, चुकणे, टळणे, करणे.) [सं. आ+धान]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

एदेन, आदान(बाग)

पु. (ख्रि.) पवित्र शास्त्रांत वर्णिल्या- प्रमाणें मानवांचे मूळ पूर्वज आदाम व हव्वा यांस ज्या बागांत ठेविलें होतें त्या बागेचें नांव; आनंदोद्यान; नंदनवन. '...परमेश्वर देवानें त्यांस एदेन बागांतून काढून लाविलें.' -उत्प २.२३. [हिब्रू एदेम = आनंद किंवा सुख; इं. ईडन]

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

अडाणी      

वि.       १. अकुशल; अनिपुण; अनभ्यस्त; कलाहीन (माणूस); रानटी; असंस्कृत; रांगडा; गावंढळ; ग्राम्य; जंगली; असभ्य; अशिष्ट; उद्धट. २. खेडवळ (भाषा, रीतभात). ३. ओबडधोबड, वेडीवाकडी (वस्तू पदार्थ). ४. अज्ञानी; न शिकलेला; विद्याहीन. ५. बिगर शेतकरी; अडाण : ‘थोड्याशा भांडवलावर व्याजबट्टा करणारे अडाणी त्यांचे दस्तैवज प्रपंच खर्चासाठी होतात.’ – गांगा १६०. (वा.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अडाणी

वि. १ अकुशल; अनिपुण; अनभ्यस्त; कलाहीन (माणूस); रानटी; ग्राम्य; जंगली; असभ्य; अशिष्ट; उद्धट; खेड- वळ (भाषा,रीतभात); ओबडधोबड; वेडीवांकडी (वस्तु,पदार्थ). २ अज्ञानी; न शिकलेला; विद्याहीन. ३ बिगर शेतकरी; अडाण. 'थोड्याशा भांडवलावर व्याजबट्टा करणारे अडाणी त्यांचे दस्तै- वज प्रपंचखर्चासाठीं होतात.' -गांगा १६०. म्ह॰-१ अडाणी कुणबी दुप्पट (दुणा) राबे. २ अडाण्याचा आला गाडा, वाटे- वरच्या वेशी मोडा. ॰कबाडी-पु. अव. १ अडाणकबाड पहा. २ (व.) पांढरपेशे; मजूर; काबाडकष्ट करणारे. ३ गांवढळ; टोणपे; वेडगळ. ॰गांठ-चुकीची निरगांठ; सहज सुटणारी चाडेगांठ. ॰जात- स्त्री. रानटी, अर्बुज जात (पठाण वगैरे). [सं. अज्ञानी]

दाते शब्दकोश

अडाणकबाड      

पु.       अडाण; खेड्यातील कारागीर, व्यापारी, मजूर, कामकरीइ. (शेतकरी नव्हेत ते). सुतार

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आदन

न. (गो.) आधण; भात इ॰ शिजवण्यास लाग- णारें, उकळी आलेलें पाणी. [आधण अप; प्रा. आदाण; सं. आदहन]

दाते शब्दकोश

अडण

न. १ गाई-म्हशीची ओटी; कास; अडाण पहा. [तुल॰ इं. अडर]

दाते शब्दकोश

आधान

आदान पहा.

दाते शब्दकोश

आधान ādhāna n S Fixing, establishing, placing. 2 The first ceremony in Agnihotra,--the excitation of fire by attrition of the wood of Premna spinosa. 3 Abridged from गर्भाधान. 4 See आदान Sig. III.

मोल्सवर्थ शब्दकोश

आधण

न. १ विस्तवावर तापविल्यामुळें कढत होऊन उकळूं लागलेलें पाणी; उकळण्यासाठीं विस्तवावर ठेवलेलें पाणी. 'जरि अमृत घालुं आंधणा । कापुरु मेळउ इंधना ।' -ऋ ५१. २ त्या- प्रकारची पाण्याची अवस्था; उकळी; कढ. (क्रि॰ येणें). ३ गूळ, काकवी, वगैरे करण्यासाठीं काहिलींत कढण्यासाठीं घातलेला उंसाचा रस. ४ (ल.) राज्य, एखादा कारभार, संसार इत्यादि व्यवस्थित चालविण्याविषयींची जबाबदारी किंवा भरंवसा (सामा.) ओझें; भार; जबाबदारी. (क्रि॰ ठेवणें). ५ अपमृत्यु; आधाण पहा. [सं. आदहन; प्रा. आदाण; तुल॰ गो. आधन] जिवावरचें आधण उत रणें-आलेलें मोठें संकट आपोआप नाहींसें होणें, टळणें. ॰निव- विणें-मकरसंक्रांतीच्या दिवशीं सुवासिनी स्त्रीनें ब्राह्मणाच्या घरीं जाऊन त्याच्या चुलीवर ठेवलेल्या आधणांत (भाताच्या भांड्यांत) तांदुळांत सोन्यारुप्याचा तुकडा घालून ते वैरणें. म्ह॰ आधणांतले रडतात आणि सुपांतले हांसतात (सुपांतल्या तांदुळावरहि आधणांत पडून रडण्याचा प्रसंग येतो) = आज जे सुखांत आहेत त्यांना भावी दुःखाची कल्पना नसली तरी तें प्राप्त होतेंच, तें सृष्टिनियमाला अनुसरून आहे.

दाते शब्दकोश

पीरान

वि. वैराण जमीन; जिराईत जमीन; ज्या जमि- नींत विहीर नाहीं अशी जमीन. अडाण पहा. 'त्या काळीं पीरान जमिनीचा एक ते दीड व अडाणाचा चार ते पांच असा दर होता.' -देवी अहिल्याबाई (संक्षिप्त चरित्र) १८ . (पीरान हें वीरानबद्दल चुकीचें वाचन असावें?)

दाते शब्दकोश

ऋणादान

न. १ सावकारीचा धंदा; पैसे उसने देण्याचा व्यवसाय. २ कर्जवसुली; उग्राणी. ३ कर्जफेड. [सं.ऋण + आदान]

दाते शब्दकोश