आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
अनवट
अनवट anavaṭa m A ring furnished with silver balls, worn on the great toe.
अणवट
पु. एक तऱ्हेचा रुप्याचा दागिना (पायांतील); पायाच्या आंगठ्यांत घालावायाचें जोडवें 'चटपट अणवट जोडव्याची झटपट, दाहीं बोटीं मेंदी रंगली ।' -राला ६०. [वैदिक सं. अण्वी = बोट + वृत्त. किंवा अण् = शब्द करणें. का. आणीं = वाटोळेपणा + वृत-वेढे? गु. अणवट].
अनवट, अनवठ
पु. १. पायाच्या अंगठ्यात घालावयाचा रुप्याचा दागिना. पहा : अणवट : ‘अनवट निटत्या ही जोड त्या जोडव्यांची ।’ – सारुह ६·३१; ‘जोडवी अनवठ मासोळ्या ॥’ – स्त्रीगीत ६५. २. (संगीत.) अपरिचित राग; फारसा प्रचारात नसलेला राग.
अणवट
पु. एक तऱ्हेचा रुप्याचा दागिना (पायातील); पायाच्या आंगठ्यात घालावयाचे जोडवे : ‘चटपट अणवट जोडव्याची झटपट । दाहीं बोटीं मेंदी रंगली ।’ – राला ६०. [गुज.]
स्त्री. हनुवटी; खालच्या ओठाखालचा निमुळता भाग.
संबंधित शब्द
अनवट-ठ
पु. पायाच्या अंगठयांत घालवायचा रुप्याचा दागिना; 'अणवट' पहा. 'अनवट निटल्या ही जोड त्या जोड- व्यांचा ।' -सारुह ६.३१; 'जोडवी अनवठ मासोळ्या ।।' -स्त्रीगीत ६५.
हनवट
पु. स्त्रियांचा पायाच्या बोटांत घालावयाचा एक दागिना. अणवट, अनवट पहा.
जोडवें
पु. आंगठ्याजवळच्या किंवा मधल्या (पायाच्या किंवा हाताच्या) बोटांचा घालावयाचें एक जाड व मोठें वळें (चांदीचें किंवा सोन्याचें). 'जोडावी अनवट मासोळ्या ।' -स्त्रीगीत ६५.
निटली
स्त्री. एक पायांतील दागिना. 'अनवट निटल्याही जोड त्या जोडव्यांचा ।' -सारुह ६.३१.
निटली
स्त्री. पायातील एक दागिना : ‘अनवट निटल्याही जोड त्या जोडव्यांचा ।’ – सारुह ६·३१.
पोल्हार-रा
नपु. पायाच्या अंगठ्यांत घालण्याचें बाय- काचें एक चांदीचें भूषण. 'अनवट जोडवीं पोल्हारें । कानीं बांधली एकसरे ।' -ह १९.६७.]