मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

अनार

न. १ डाळिंबाचें झाड; फळ. 'विलायती अनारें या दिवसांत तेथवर गर्मीमुळें न पावतील;' -दिमरा १.३३. २ (साधारणत: डाळिंबाच्या आकाराचा) दारूचा नळा; हिंगणबेट. याचे प्रकार: - मोतिया, चमेली, सुरु, शेवंती, बैठकी आणि साधा अनार; हे जेवतांना पंगतींत लावतात. 'हवया भुनळे चंद्रजोती जळती । अनारे जातणी या जागोजागीं लाविती ।' -स्त्रीगीत ३७. [फा.]. ॰दाणा-पु. डाळिंबाच्या बियांप्रमाणें दिसणारें एक धान्य. -मुंव्या ११०. [फा. अनार + दान]. ॰दाणा-वि. डाळिंबाच्या रंगाप्रमाणें किंवा दाण्यासारखें (ठिपके) विणकरीनें ज्यावर बूट केलें आहे असें (पागोटें, शेला, दुपेटा वगैरे). -मराठी तिसरें पुस्तक (१८७३) ६४.

दाते शब्दकोश

अनार anāra n m ( H) The pomegranate-tree, Punica granatum. 2 n The fruit. 3 A grenade.

मोल्सवर्थ शब्दकोश

अनार n m A grenade; the pomegranate-tree.

वझे शब्दकोश

(पु.) हिंदी अर्थ : अनार. मराठी अर्थ : डाळिंब.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

(फा) न० डाळिंब.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

अनार

(न.) [फा. अनार] डाळीम्ब. “विलायती अनारें या दिवसांत तेथवर गर्मीमुळें न पावतील" (दिमरा १।३३).

फारसी-मराठी शब्दकोश

आनार      

न.       डाळिंब.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनार      

न.       १. डाळिंबाचे झाड; फळ : ‘विलायती अनारे या दिवसांत तेथवर गर्मीमुळे न पावतील.’ – दिमरा १·३३. २. (साधारणतः डाळिंबाच्या आकाराचा) दारूचा नळा; हिंगणबेट : ‘हवया भुनळे चंद्रज्योती जळती । अनारे जातणी या जागोजागीं लाविती ।’ –स्त्रीगीत ३७. [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आनार, आनाचार, आनास्था

अ मध्यें पहा.

दाते शब्दकोश

खट्टा अनार      

एका जातीचे डाळिंब. हे औषधी आहे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

अनारदाणी or नी

अनारदाणी or नी anāradāṇī or nī a (अनार & दाणा A grain.) Marked or spotted as with seeds of the pomegranate--cloth. 2 Of the color of the pomegranate pulp or juice.

मोल्सवर्थ शब्दकोश

अनर      

न.       १. रामफळ. २. (दारुकाम) अनारनळा. (कों.) [हिं. अनार]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनर

स्त्री. न. (कों.) १ रामफळ. [हिं. एनोना; बं. नोना; लॅ. अनोना रेटिक्युलाटा]. २ (दारूकाम) अनारनळ; हिंगणबेट. [फा. हिं. अनार]

दाते शब्दकोश

अनरसा

पु. एक प्रकारचें कापड. [फा. अनार]

दाते शब्दकोश

अन्यारदान

न. (व.) भुइनळे. [फा. अनार + दान]

दाते शब्दकोश

डाळिंब

(सं) न० दाडिम, अनार.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

स्त्रीन. एक झाड व फळ; दाडिम; अनार. [सं. दाडिम; प्रा. दालिम; हिं. बं. दालिम; ऑस्ट्रिक दालिम यावरून सं. दाडिम शब्द बनला. हें फळ इंडो-आर्यन नव्हे. तेव्हां शब्दहि आर्य भाषेंतला नाहीं] ॰पाक-पु डाळिंबाच्या रसांत केशर, वेल- दोडे इ॰ व कांहीं औषधें घालून केलेला पाक. ॰वान-न. डाळिंबी रंगाचें लुगडें. 'डाळिंबवानें जासवानें ।' -वेसीस्व ९. १५०. [डाळिंब + वाण] डाळिंबी-वि. डाळिंबाच्या दाण्याच्या रंगा-आकाराप्रमाणें (चीट). [डाळिंब] डाळिंबी वाळ्या- स्त्रीअव. एक दागिना; एक प्रकारच्या बाळ्या. 'मोतीबाळ्या डाळिंबीबाळ्या त्या गंभीर.'

दाते शब्दकोश

दाळिंब

(सं) न० अनार, दाडिम.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

डाळिंब      

स्त्री. न.       १. डाळिंबाचे झाड; अनार. २. त्याचे फळ. [सं. दाडिम]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुल

पु. १ फूल. २ दिव्याची काजळी; कीट. ३ आग- काडीला लावलेलें फास्फरस व गंधक यांचें पूट. ४ हुक्क्यांतील कोळशाचा गोळा, विस्तव. [फा. गुल्] सामाशब्द-गुल(ला) अनार-पु. १ डाळिंबीचें फूल; अनारकली. 'सखे गुलाअनार गुलचमन निशिचा रमण तसा गोजिरा तुझा मुखवटा ।' -होला १०४. २ डाळिंबी रंग. ३ एक झाड; गुलनार पहा. -वि. डाळिंबी रंगाची (शालजोडी, वस्त्र इ॰). [फा. गुल् + अनार् = डाळिंब] ॰कंद-पु. एक लेह; गुलाबाचा फुलांच्या पाकळ्या व खडी- साखर यांचें मिश्रण; गुलाबाचा मुरब्बा. ॰काडी-स्त्री. आग- काडी. ॰केश-पु. कोंबड्याच्या शेंडी-तुर्‍याप्रमाणें असलेलें फूल. ॰गुलाब-पु. गुलाबाचें फूल; गुलाब. ॰गेंद-पु. फुलाचा गुच्छ. 'संगीन कुच भरदार, सजिव सजदार, गुलगेंद उसासले ।' -प्रला ११३. ॰चनी-चिनी, गुलाचीन-स्त्री. फुलाची एक जात; गुलदावरी. ॰चांदणी-स्त्री. एक फूल. ॰चिमणी-स्त्री. पिंवळ्या पोटाची चिमणी (पक्षी). ॰छबू-ब्बू-पु. निशीगंध; हें झाड कंदापासून होतें. फुलें विशेषतः सांयकाळीं उमलतात, त्यांस फार मधुर वास येतो. फूल लांबट असून सफेत रंगाचें असतें व देंठ थोडासा वक्र असतो. -वि. मोहक चेहेरा असलेला (माणूस). [फा. गुलिशब्बो] ॰छडी-जाफिरी-स्त्री. एक प्रकारचें फूल. [फा. गुलिजाफरी] ॰जार-वि. १ नाजूक; सुंदर; मोहक; रमणीय. २ टवटवीत; प्रफुल्ल. ३ संपन्न; ऐश्वर्ययुक्त. 'बाच्छाई तक्त गुलजार दिसे रंगबहार पुण्याची वस्ती ।' -होला १७८. ४ आबाद. 'महाल उंडणगांव वगैरे महाल गुलजार दिले.' -रा ८.२१२. [फा. गुल्झार् = गुलाबांची बाग] ॰टोप-पु. १ एक फूलझाड; व त्याचें फूल. 'पर्यातक गुलटोप गुलगुलित जळीं कमळणवावरी ।' -प्रला १५५. २ कबूतराची जात. ॰तुरा- पु. १ (व.) शंखासुर नांवाचें फूलझाड. २ गुलमोहोर; यास पिवळ्या व तांबड्या रंगाचीं झुपकेदार फुलें येतात. फुलास वास नसतो. याचें मूळ काढ्यांत घालतात, लांकूड बळकट असल्यामुळें खुंटे करतात. 'डवना मरवा गुलतुरा । वाळागीर पडदे आणवा ।' -पला ४.२२. ॰दान-न. १ फुलें ठेवण्याचें पात्र. २ पेटलेला तोडा न विझतां ठेवण्याची लोखंडी पेटी. ३ कात्रीनें दिव्याची कोजळी काढण्याचें पात्र. 'गुलदानें रुप्याचीं' -पया २८७. 'गुल- दानांनीं गूल काढावे.' -पया २८७. ॰दावदी-री-ली-स्त्री. एक फूल व झाड. 'शरिर सुकुमार कीं गुलदावरी ।' -प्रला ११०. ॰नार-१ डाळिंबीचें फूल; गुलअनार. २ डाळिंबाची एक जात; हीस फक्त फुलें येतात, फळ धरत नाहीं. -कृषि ७०१. ॰फूल-न. गोजिव्हा; गुलेगोजबान. -मुंव्या १४०. ॰बदन-वि. गुलाबाच्या फुलासारखा सुंदर देह असणारी (स्त्री). -पु. १ तापत्यांतील (रेशमी वस्त्र) एक भेद, प्रकार; एक प्रकारचें कापड. 'दाविली कंचुकी गुलबदनी ।' -प्रला १४९. 'गुलबदनें रेशमी' -ऐटि ५.२३. २ एक रंग. ॰बस-बाशी, गुलबाक्षी-स्त्री. सांयकाळी फुलणारें एक फुलझाड. याचीं फुलें पांढरी, तांबडीं, जांभळीं वगैरे अनेक प्रकारचीं असतात. 'छतें आरशांचीं बशिवलीं रंग गुल- बासी ।' -प्रला ९२. -न. या झाडाचें फूल. -वि. या फुलाच्या रंगाचें. [फा. गुलि-अब्बास] ॰मखमल-पुस्त्री. एक फूलझाड व त्याचें फूल; गेंद; छेंडू. ॰मस-पु. रानटी पांढरें फूल व त्याचें झाड. ॰मेधी-मेहंधी-स्त्री. मेंदीचा एक प्रकार व त्याचें फूल ॰मोहोर-पु. १ एक फुलझाड. २ (शोभेची दारू) दारूच्या झाडाचा एक प्रकार. एका बांबूस १६ लोखंडी तारा बांधतात, शेंड्याला फुलबाजी व इतरत्र रंगीबेरंगी ज्योती बांधतात, (जळता) भुई नळा दाखविल्याबरोबर ४ मिनिटांत फटफट आवाज होऊन तारा पडतात.

दाते शब्दकोश

गुल्नार; गुले-अनार

(न.) [फा. गुल्नार्-गुलि अनार्] डाळिम्बाचें फूल.

फारसी-मराठी शब्दकोश

नार

(स्त्री.) हिंदी अर्थ : आग, अनार. मराठी अर्थ : अग्नी, डाळिंब.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)