आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
अपरंपार
अपरंपार a Endless, numberless, infinite.
अपरंपार aparampāra a (S) Endless, boundless, numberless; infinite, illimitable. अपरंपारगुण-बुद्धि-शक्ति-पराक्रम- महत्व-सामर्थ्य-प्रताप Countless or immeasurable excellencies, power, might, majesty &c.
वि. अनंत; अमर्याद; असंख्य; अफाट; अगणित (शक्ति. गुण, बुद्धि, पराक्रम. महत्व वगैरे). [सं. अ + पर + पार]
(सं) वि० अनंत, असंख्य.
अपरंपार
वि. अनंत; अमर्याद; असंख्य; अफाट; अगणित (शक्ती, गुण, बुद्धी, पराक्रम, महत्त्व वगैरे); सर्वातीत : ‘विठ्ठल अपरंपार न कळे’ – ज्ञागा १८५. [सं. अ+पर+पार]
अतिशय; पहा : अपरंपार (ग्रा.)
अपरा वि.
संबंधित शब्द
अधार
(सं) वि० (अपरंपार पहा.)
अखंडित
वि. १. अत्रुटित; अविभक्त; अविच्छिन्न; न थांबलेला; चालू राहिलेला; बिनतुकड्याचा. २. (ल.) पुष्कळ; अपरंपार; अगाध; अतिशय; अमर्याद. ३. अपराजित; खोडून न टाकलेला; खोटा न ठरलेला; रद्द न केलेला. [सं.]
अखंडित
वि. १ अत्रुटित; अविभक्त; बिनतुकडयाचा. २ (ल.) पुष्कळ; अपरंपार; अगाध; अतिशय; अमर्याद. २ अपराजित; खोडून न टाकलेला; खोटा न ठरलेला; रद्द न केलेला. -क्रिवि. अप्रतिबद्ध; निरंतर; सतत. [सं. अ + खंडित] ॰आचार-धर्म पराक्रम-बुद्धि-लक्ष्मी-सपंत्ति-ज्ञानइ ॰ ४ ॰लक्ष्मी आलं- कृत-मोठमोठया सत्ताधीश, धनिक लोकांना लिहावयाचा जुन्या पत्रांतील आरंभींचा मायना. [सं. अखंडित + लक्ष्मी + अलंकृत = अपार संपत्तीनें युक्त]
अलोट
वि. १. मागे न परतणारा, पडणारा; फरक न पडणारा; न बदलणारा–उलटणारा–फिरणारा; दुर्निवार; अनिवार्य : ‘आतां घेई शाप दुर्गम । जो कां अलोट हरिहरां ।’ –मुआदि १९·६८. २. अनिर्वचनीय; अचाट; अपरंपार; अतिशय : ‘किं गगन चक्र उठावलें अलोट । काळरात्रीचे ।’ – शिव ९३१. ३. अचूक; खरे. ४. निश्चित; दृढ : ‘जेणें चैतन्य ईश्वरा ब्रह्मा । देहचि केलें परमसीमा । तया आत्मा कर्ता हे प्रमा । अलोट उपजे ॥’– ज्ञा १८·३८२. ५. अनुल्लंघनीय; दूर टाकून देता न येणारे; अतिरस्करणीय : ‘त्या आज्ञा अलोट माते.’ ६. प्रचंड. [सं. अ + लुट = लोटणे]
अनिर्वचनीय
अत्युत्कट, ज्याला पार नाही असा अपरंपार (आनंद). अनिर्वाच्य
अप्राट
वि. (काथवडी) अपरंपार. 'अप्राट त्यानें पुण्य केला.' -मसाप ३२०. [सं. अपार?]
अप्राट
वि. अपरंपार : ‘अप्राट त्यानें पुण्य केला’ – मसाप ३२०. (काथ.) [सं. अपार]
अपरंपूर
वि. अतिशय; पहा : अपरंपार (ग्रा.)
अपरंपूर
वि. (कु.) अतिशय. अपरंपार पहा.
अतिशय
किती तरी, फारच, पराकाष्ठेचा, मोठ्या संख्येनें, खूपच, उत्साहाला उधाण, सढळ मदत, घवघवीत यश, जबरें व्याज, खूप खूप लाजली, कुबेराचें भांडार जरी स्वाधीन केलें, मोठी आकर्षक, ही झुंबड, देणीं तुंबून राहिलीं, तें कांहीं विचारूं नका ! जो उठला तो म्हणतो, फार म्हणजे काय फारच ! अपरंपार, ढगाएवढें, पोटभर.
लावण्य
न. १ सौंदर्य; रूप. ज्ञा १.४. २ शोभा; दिमाख. ३ खारटपणा; क्षारता. [सं.] ॰खाणी-स्त्री. (सौंदर्याची खाण) बायकांच्या अंगची सुंदरता व मोहकपणा या गुणांना उद्देशून हा शब्द योजतात. (सामा.) सुंदरी. 'लावण्यखाणी । हस्तिनी- वरुन उतरे ते क्षणीं ।' अत्यंत, अपरंपार सौन्दर्य असणाऱ्या व्यक्तीला म्हणतात.
पुष्कळ
मुबलक, खूप, बख्खळ, भरपूर, ग्हणाल तेवढें, हवे तेवढें, रेट, यथास्थित, वाट्टेल तितके, रग्गड, चेपून, दाबून, चिकार, पाणी भरतें आहे, विपुल, चापून, घ्याल तेवढे, पोटभर, मनमुराद, मन चाहेल तितकें, हजारों, लक्षावधि, शेकडों, कोट्यावधि, अगणित, अमूप, अनेक, मोजदादीच्या पलीकडे, किती म्हणून सांगू ? मोजून मोजून थकलों, अगण्य, असंख्य, बहुत, फार म्हणजे फारच ! थवाच्या थवा, रांगाच रांगा, तरी, बरेंच, पैशास पांसरी, अजीर्ण होईल इतकें, वारेमाप, ढेकर येईल इतकें, खंडोगणती, ढीग पडले आहेत ! पाऊस पडतो आहे ! छप्पन्नशें, शेपन्नास, डझनावारी, गठ्ठेेच्या गठ्ठे, हे थोरले, चांगले ओ येईतों, अतोनात, मुंग्यांप्रमाणें, एक ना दोन किती म्हणून सांगावें ? बचकभर, खंडीभर-ने समृद्ध, गांवोगांवीं, सुकाळ झाला, गल्लोगल्लीं झालीं, टोपलीभर, पहावें तिकडे, तेच, असे छप्पन्न, त्याला काल तोटा ? अपरंपार, दरशदिशा व्यापून राहिलें, ग्रोसा - डझनावारी, शेकड्यांनीं आढळतील, मोठ्या संख्येनें, कीटश्च कोटायते ! नुसता पूर आलाय, भूछत्रां- इतके मुबलक, नटीच्या साड्यांइतके.
उद्योगी
दीर्घोद्योगी, परिश्रम-देव, उद्योगांत खळ नाहीं, श्रमसातत्याने वर चढेल, अपरंपार चिकाटीचे कष्ट, कष्टाळू, हात कामांत सदा गुंतलेले, हात कधी रिकामे नाहीत, रिकामटेकडेपणा आढळणार नाही, उद्योग पुरुष-लक्षणं याप्रमाणे चालणारे, सतत झटणारे, दिवसाचे २४ तासहि यांना कमी पडतात, यत्न तोचि यांना देव.