मराठी बृहद्कोश

नऊ मराठी शब्दकोशांमधील २,६२,७३६ शब्दांचा एकत्रित संग्रह

शब्दार्थ

अफलातून      

वि.       १. इतरांपेक्षा निराळा; ज्याच्या वागण्यात, बोलण्यात काही विशेष आहे असा : ‘रघुनाथपंत हणमंते तशीच अफलातून असामी आहे.’ – श्रीयोभा २·२९२. २. विलक्षण; अप्रतिम; आश्चर्यकारक. ३. अरबी भाषेतील ‘प्लेटो’चे नाव. [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अफ्लातून

पु. प्लेटो. प्लेटो याचा अरबी अपभ्रंश. [अर.]

दाते शब्दकोश

अफ्तर, अफ्तरी, अफ्तागीर, अफ्तागिऱ्या, अफ्ताब, अफ्लातून, अफ्लाद, अफ्वा, अफ्वार्इ      

पहा : अफतर - अफवा इ.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

फलाँतू

(पु.) हिंदी व मराठी अर्थ : अफलातून या ल्पेटो नामक विद्वान.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)