मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

अफलाद

अफलाद aphalāda f (Formed out of A and used in contradistinction to it. See अवलाद) Descendents or lineage of the female branch. 2 Applied also to the descendents of an adopted son; to offspring through a kept mistress, or female slave, or woman in her second marriage.

मोल्सवर्थ शब्दकोश

अवलाद, अफ्‌लाद      

स्त्री.       वंशपरंपरा; पुस्तदरपुस्त : ‘लेकराचे लेकरी अवलाद अफ्लाद तुवां खाणें’ – मइसा ८·२८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अफलाद, अफवाद, अहफाद      

स्त्री.       १. मुलीचा वंश : ‘अव्लादअफ्वाद (वंशपरंपरा) देविले असे.’ – मइसा १५·१५९; ‘ओलाद व अहफाद चालविजे’ – मइसा २०·१४१. २. दत्तक पुत्राचा वंश. ३. रखेलीची, पाटाच्या बायकोची, दासीची संतती. [फा. अहफाद्‌]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अफ्लाद; अफ्वाद; अहफाद

मुलीची प्रजा. “अव्लाद-अफ्वाद (=वंशपरम्परा) देविले असे" (राजवाडे १५।१५९). “ब-औलाद व अहफाद चालविजे" (राजवाडे २०।१४१).

फारसी-मराठी शब्दकोश

अफ्तर, अफ्तरी, अफ्तागीर, अफ्तागिऱ्या, अफ्ताब, अफ्लातून, अफ्लाद, अफ्वा, अफ्वार्इ      

पहा : अफतर - अफवा इ.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

अवलाद

स्त्री. १ पुत्रपौत्रादि संतति; वंश; कुळी; प्रजा. 'राम अवलाद कुशपत्नी धामा । अवलाद देह असे हा ।।' -नव ८.८१. हा शब्द विशेषतः मुलाच्या वंशाला लावितात. अफलाद पहा. २ (उप.) व्रात्य; खोडसाळ. [अर. औलाद्; वलद् अव.] ॰अफलाद खाणें-वंशपरंपरा उपभोग घेणें.

दाते शब्दकोश

अवलाद avalāda f ( A) Lineage, race; esp. understood of the male descendants. See अफलाद.

मोल्सवर्थ शब्दकोश

अहफाद

मुलीची संतति; अफलाद पहा. 'ब-औलाद व अह- फाद चालविजे'-रा. २०.१४१;१५.३६४. [अर.हफद = कन्या; हाफिद = जांवई, कन्यावंश, अव.]

दाते शब्दकोश

अपलाद

अपलाद apalāda f See अफलाद.

मोल्सवर्थ शब्दकोश

अफलाद पहा.

दाते शब्दकोश

अफाद

अफ्लाद पहा. “बादऊ अव्लाद व अफ़ाद त्यांसी रवा (=चालू) करणे” (राजवाडे १५/३६).

फारसी-मराठी शब्दकोश

दाई(इ)ज

वि. १ एका कुळांत जन्मल्यामुळें वडिलोपार्जित मिळकतीचा बनलेला भागीदार; हिस्सेदार; दायाद; भाऊबंद. 'अवलाद अफलाद दाइज अगदीं नाहीं.' -वाडबाबा २.३६. २ सगोत्र नात्यामुळें सुतक सोयरे-बाळगणारा; अशौचसंबंधी आप्त; (पुरुष, स्त्री इ॰). ३ (ल.) हितशत्रु; मत्सर, द्वेष करणारा; अशुभचिंतक. [सं. दायाद] ॰गोत्रज-पुअव. एकगोत्रोत्पन्न आप्त; नातलग; भाऊबंद. [दाईज + सं. गोत्रज = गोत्रांत जन्मलेला] ॰जण, दाईजण-पुअव. १ (समुच्चयार्थीं) वंशपरंपरागत मिळकतींतील वारसदार; भाऊबंद. दायाद. (दाईजण हें रूप चुकीनें वापरण्यांत येतें). २ (समुच्चयार्थीं.) (सरकारी कागदपत्रांत) वंशपरंपरा अधि- कार असलेले (सरकारी) गांवकामगार; या अर्थीं 'समस्त दाईजण' असाहि शब्द रूढ आहे. [दाईज + जण = व्यक्ति]

दाते शब्दकोश

दाईज      

वि.       १. एका कुळात जन्मल्यामुळे वडिलोपार्जित मिळकतीचे बनलेले भागीदार; हिस्सेदार; दायाद; भाऊबंद : ‘अवलाद अफलाद दाइज अगदीं नाहीं.’ - वाडबाबा २·३६. २. सगोत्र नात्यामुळे सुतक - सोयेर बाळगणारा. ३. (ल.) हितशत्रू; मत्सर, द्वेष करणारा. [सं. दायाद]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)