मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

अमला

पु. कारकून; अधिकारी; अंमलदार. 'तालुक्यास अमला योजून बंदोबस्त करावा.' -रा ७.४५. [अर. अमला; आमिल्चें अव]. ॰फैला-पु. १ अमल; अधिकार; ताबा. 'त्या देशावर अ॰ चांगला बसला.' २ कारकून; पांढरपेशा; इतर लोक; प्रजा. 'दिल्लींतहि अमलाफैका पळावयाचा इरादा करीत आहेत.' -रा १०.३४७. -क्रिवि. पूर्णपणें; एकंदर; निखालस (विक्री; देव- घेव इ. व्यापाराच्या कामांत).

दाते शब्दकोश

पु. सोन्याचा डूल (कानांतील); लोलक; आंबला. [सं. आमलक]

दाते शब्दकोश

अमला

[अ. अमला अनेक व. आमिल् चें] कार्कून. “तालुक्यांस अमला योजून बन्दोबस्त पक्का करावा” (राजवाडे ७।४५).

फारसी-मराठी शब्दकोश

आमला

पु. कारकून, अमलदार. अमला पहा.

दाते शब्दकोश

अमला      

पु.       कारकून; अधिकारीवर्ग; अंमलदार : ‘तालुक्यास अमला योजून बंदोबस्त करावा.’ – मइसा ७·४५. [फा. आमिला]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       सोन्याचा डूल; लोलक; आंबला. [सं. आमलक]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आमला      

पु.       कारकून वर्ग; अमलदार.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

आंबला

पु. (गो.) कर्णलोलक; डूल. अमला पहा.

दाते शब्दकोश

अंबलें

न. १ काकडीसारखें एक कडू फळ. २ मुलांच्या कानांतील डूल. अमला; आंबला. [सं. आम्र]

दाते शब्दकोश

अंबुला

पु. कानांतील आंब्याच्या आकाराचा डूल. आंबला, आमला अमल पहा. 'कुमारांचे आंबुले कडकदोरी । मजपाशीं आणिजे ।।' -ख्रिपु १.१९. ३९. [सं. आम्र, आमलक]

दाते शब्दकोश

अंबुला, अंबुले      

पु.       आंब्याच्या आकाराचा कानातील डूल.पहा : आंबला, आमला : ‘कुमारांचे आंबुले कडदोरी । मजपाशीं आणिजे ॥’ − क्रिपु १·१९·३९. [सं. आम्र, आमलक]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आंबुले

पुअव. डूल; आंबले; आमले; अमला पहा. 'कुमा- रांचे आंबुले, कडदोरी । मजपाशीं आणिजे' -खिपु १; १९; ३९. [सं. आभ्र किंवा आमलक]

दाते शब्दकोश

आंबुले      

पु.       डूल; आंबले; आमले; पहा : आमला : ‘कुमारांचे आंबुले कडदोरी । मजपाशीं आणिजे’ − क्रिपु १·१९·३९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अवळा

पु. १ आवळा; एक तुरट फळ. २ समईच्या उभ्या दांड्याला असणारे वाटोळे वेढे. -ळ्याची मोट स्त्री. तात्कालिक फायद्याकरितां एकत्र जमलेल्या लोकांचा समुदाय, गट. टोळी. म्ह॰ १ अवळा पिकायचा नाहीं, समुद्र सुकायचा नाहीं. = घडण्यास अशक्य अशा गोष्टीबद्दल म्हणतात. २ अवळ्याची मोट बांधणें = (आवळे) एकत्र बांधतां, जुळविंता येत नाहींत, ते निसटून जातात, यावरून) अशक्य गोष्ट करूं पाहणें. ३ अवळा देऊन कोहळा (किंवा बेल) काढणें = थोडयाचा बराच फायदा मिळविणें; आपण थोडें देऊन दुसर्‍याकडून अधिक घेणें; थोडया मोबदल्यावर पुष्कळाची आशा करणें. (चे)अवळे उघडणें मोठा राग काढणें; अपशब्दांचा भडिमार करणें; ठोकणें; बुकलणें; फाडून खाणें (अवळकाठी कर- तांना अवळे उकलतात त्याप्रमाणें). अवळ्या एवढें पूज्य न. पूर्ण अभाव; शून्य. अवळे शिजणें (कर.) पाचावर धारण बसणें; घाबरणें. [सं. आमलक; प्रा. आमल-ग-य; हिं. आमला; आंवला; बं. आम्ल; गुज. आंवळां; फा. आम्लझ; अर. अमलज्; पंजा. आवला; लॅ. फिलेन्थस् अंब्लिका.]

दाते शब्दकोश

दुमाला

वि. १ दोन मालक असणारा गांव, वतन. २ जमीन- महसुलासंबंधी सरकारच्या हक्कापुरता कोणा मनुष्यास सर्वांशीं अगर अंशतः दिलेला हक्क. 'पुणें तालुक्यांत दुमालेगांव पंचवीस आणि खालसा पौंणशे.' ३ सरकारखालसातीकडे नसून लोकांकडे पर- भारें माफीनें चालणारा गांव, जमीन इ॰. याचे इनाम, सरंजाम, इसाफत, अग्रहार, पासोडी, हाडवळा, खैरात, बालपरवर्षी, नान- परवर्षी, सरदेशमुखी, चौथाई, जाहागिर, मोकसा, साहोत्रा, वेचणी, गिराणी, पसाइत, चाकराइत, वजीफा, गिरास, सौदिया, वांटा इ॰ बावीस प्रकार आहेत. -इनाम २५. ४ स्वाधीन; हस्तगत. 'मौजे मजकूर हा गांव यांचे दुमाला करून... ...' -वाडसमा २९५. ५ पूर्वींच्या मालकाचा निर्वंश झाल्यावर सर- कारजमा होणारें (इनाम) [दु = दोन + माल = मत्ता; फा. दुबाल्] दुमाला, दुबाला, दुमाळा-ळे-क्रिवि. ताब्यांत. 'पैकीं नीम चावर आपले दुमाला केले आहे.' -शिवचरित्र साहित्य २.१६३. 'कुलबाब, कुलकानू दुबाला असे' -शिवचरित्र साहित्य २.१६३. दुमाल अम्मल-पु. दोन सरकारांचा अम्मल; सरकारी व जहा- गिरी असे दोन अम्मल; दोन मालकांचा ताबा. [दुमाला + अम्मल] दुमाल झाडा-पु. १ दुमाले गांवांची यादी. २ दुमाल जमिनींच्या मालकीसंबंधीं सरकारी चौकशी. दुमाल- दार-पु. दुमाले गांवाच्या (दोन) मालकांपैकीं प्रत्येक; इनाम- दार. 'माजगांव तर्फ सातारा हा गांव दुमालदारखेरीजकरून बाकी सुभाकडील अम्मल बेगमीबद्दल पेस्तर सालापासून लावून दिला.' -वाडसमा १.३६. दुमाल पत्र-न. नवीन अम्मलदार आला असतां इनामदारास जुन्या अंमलदारापासून आपल्या इनामांचें इनाम पत्र लिहून दाखल्यादाखल आणावें लागत असे तें. -भाअ १८३२. दुमाले(ल)गांव-पुन. १ दोन मालकांच्या अमला- खालचा गांव. २ पुढें सरकारजमा होणारा गांव; (सामा.) खालसा गांव. [दुमाला + गांव] दुमाले(ल)पत्र-न. हुंडी बरो- बर खुलाशाबाबत दिलेलें पत्र; जोडलेलें पत्र. [दुमाला + पत्र]

दाते शब्दकोश