तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह
शब्दार्थ
अर्पण
अर्पण arpaṇa n (S) Offering or presenting. 2 Giving or bestowing.
अर्पण n Presenting, giving. अर्पणें, अर्पिणें v t Give, offer.
न. १ देणें; समर्पिणें २ वाहणें; बक्षीस देणें; बहाल करणें; दान. [सं. ॠ = जाणें प्रयोजक] ॰पत्रिका-स्त्री. ग्रंथ ज्यास अर्पण करावयाचा त्यासंबंधीं मजकूर लिहितात तें पुंस्तकांतील पहिलें पान.
(सं) न० दान, बक्षीस.
अर्पण
न. १. देणे; समर्पिणे. २. (देवाला फुले, अलंकार) वाहणे; बक्षीस देणे; बहाल करणे; दान. [सं.]
अर्पण करणे
क्रि. श्रद्धापूर्वक देणे; प्रेमाने देणे; वाहणे; दान करणे.
संबंधित शब्द
बलि-ळी
पु. १ देव, पिशाच यांना अर्पण करावयाचें अन्न, पशु, पक्षी इ॰ (क्रि॰ देणें). २ बलिदानाचे वेळचें देवपूजेचें साहित्य (पुष्पादिक). ३ बलि नामक राजा; दैत्य; महाबलि पहा. -वि. बळकट; सशक्त. [सं.] ॰दान-प्रदान-न. १ बली अर्पण करणें; दान; शांति इ॰ कांत उडीद मिसळलेल्या भातावर किंवा कोहळ्यावर गुलाल टाकून त्यावर जळता कांकडा लावून तो शिप्त- रीत ठेवून तो मनुष्यादिकावरून ओवाळून देवतांस अर्पण करि- तात तें भक्ष्य. 'पीडा निवारूं बळिदान देणें ।' -दावि १७२. २ नजराणा. 'कांहीं बळिदान अंगीकारा माझें ।' -एभा ४.१००. [सं.] ॰प्रतिपदा-स्त्री. कार्तिक शुद्ध प्रतिपदा. [सं.] ॰हरण- न. भूतयज्ञ.
नैवेद्य
नपु. १ निवेद्य पहा. देवास अर्पण करावयाचा पदार्थ, द्रव्य. (क्रि॰ दाखविणें; अर्पणें; समर्पणें). २ समर्पण; अर्पण. ३ (ल.) जेवण; भोजन. (क्रि॰ करणें). 'आज नैवेद्यास आमचे घरींच या.' -वि. देवाला अर्पण करावयाचा (पदार्थ). [सं.] म्ह॰घरचे देवास नैवेद्य (नको). ॰वैश्वदेव-पु. १ देवाचा नैवेद्य व अग्नींत करावयाचा नित्याचा चरु होम. २ (ल.) लांच.
नवस
पु. १ इच्छित कार्य सिद्धीस जावें म्हणून देवाची प्रार्थना करून कार्यसिद्धि झाल्यास देवास (एखादी) वस्तु अर्पण करण्याची प्रतिज्ञा. 'दूर प्रिय जन वसती । देखाया करिति नित्य नवस नव सती ।' -मोकृष्ण ४७.७७. २ त्या प्रतिज्ञेंतील अर्पणविषयभूत पदार्थ. [सं. नमसित; प्रा. णमसिअ; णवसिअ. (सं. नमस = अनुकूल; कृपादृष्टियुक्त)] म्ह॰ (व.)नवसाचा भोपळा चारीवाटा मोकळा = नवस करून झालेल्या मुलाच्या दुर्वर्तनाबद्दल म्हणतात. २ 'जरी नवसें पुत्र होती । तरी कां करावा लागे पती ।' -तुगा. (वाप्र.) (एखादी गोष्ट इ॰काविषयीं-बद्दल-करितां-साठीं- स्तव, एखाद्या गोष्टीचा) नवस करणें-एखादी गोष्ट सिद्धीस नेण्याबद्दल ईश्वरास प्रार्थणें व कांहीं वस्तु अर्पण करण्याचा संकल्प करणें. २ (ल.) (एखाद्या गोष्टीबद्दल) मोठ्या ऊत्कंठेनें याचना करणें; ती गोष्ट अत्यंत उत्सुकतेनें इच्छिणें. ॰देणें-(व.) मार देणें. ॰पुरणें-(एखाद्याचें) इष्ट कार्य (नवस केल्यामुळें) सिद्धीस जाणें. ॰फळास येणें-इष्ट मनोरथ सिद्धीस जाणें. 'आजि पुरले नवस ।' -तुगा. ॰फेडणें-नवस फळाला आल्यावर, पूर्ण झाल्यावर देवास वस्तु इ॰ अर्पण करण्याची जी प्रतिज्ञा केली असेल ती पार पाडणें. -साचा-वि. नवसानें प्राप्त झालेला. -साचा नाऱ्या-पु. (व.) (उप.) नवस करून झालेला मुलगा (हा पुढें वाईट निघाल्यास त्याला उद्देशून योजण्याचा वाक्प्रचार). -सास पावणें- (नवस केलेल्या देवतेनें नवस करणाराचे) मनोरथ पूर्ण करणें. नवसें मागितलें, मुळावर आलें-(मुलगा व्हावा म्हणून नवस केला त्याप्रमाणें मुलगा झाला पण तो आईबापांच्या मुळावर आला या अर्थीं) अतिशय उत्सुकतेनें इच्छिलेली वस्तु नुकसानकारक झाल्यास हा वाक्प्रचार योजतात; (व.) नवसाचा नाऱ्या. सामाशब्द- ॰देव-पु. ज्यास नवस केला असेल तो देव; नवसाला पावलेला देव. ' वृद्धाचारीचे पूजिले देव । नवसदेवाहि दिधलें गौरव । ' -दावि ३३. ॰नवसणें-नवस करणें पहा. 'कवण नवस नवसूं आतां । कृष्ण नाथ प्राप्तीसी । ' -एरुस्व २.४२. ॰सायास-पु. (एखाद्या कार्याच्या सिद्धीकरितां करावा लागणारा) नवस; ईश्वराराधना व शारीरिक कष्ट इ॰; दुःखकष्ट; हाल- अपेष्टा; प्रयत्न इ॰. [नवस + आयास]
बळी-ळि
पुस्त्री. १ बलि पहा. देवतेस अर्पण करावयाची वस्तु (पशु इ॰). (क्रि॰ देणें). बळी नेदूनि आम्हासी । हे जाऊं पाहती पूर्ण पदासी ।' -एभा ४.१५४. २ (ल.) आहुति; होम. 'जीववधें साधूनि बळी । भूत प्रेत कुळें मैळीं ।' -ज्ञा १७.८०. ३ -पु. कर; पट्टी. 'इतरांची काय कथा ? जे देणार त्रिखर्व बळि बा गा ।' -मोसभा ३.३१. [सं. बलि] ॰देणें-भक्ष म्हणून अर्पण करणें. 'तुका म्हणे बळी । जीव दिला पायांतीळीं ।' -तुगा ९९१. ॰पडणें-क्रि. भक्ष्यस्थानीं पडणें; नाश पावणें; मरणें. ॰चा बकरा-वि. (कर.) मुर्दाड. ॰दान-प्रतिपदा-बलिदान. बलि- प्रतिपदा पहा. ॰राणापु. (बायकी) प्रस्तूतीच्या अकराव्या दिवशीं विटाळा फिटल्यावर पाटावर काढलेल्या तांदुळाच्या दोन बाहुल्यांची पूजा करून ती सुवासिनीच्या ओटींत घालण्याचा विधि. ॰हरण-न. १ भूतयज्ञ; देवतांस रोज दिलेल्या भाताच्या मंडलाकार आहुती (वैश्वदेवाच्या आहुती कुंडांतील अग्नींत टाकतात व या भुईवर विशिष्ट क्रमानें घालतात). २ (ल.) पोथीच्या समासाभोंवती टिप्पणीवजा किंवा चुकांच्या शुद्धीकरणार्थ लिहून सर्व पोथी चिताड करणें. (क्रि॰ घालणें). [सं. बलिहरण] ॰घालणें-क्रि. पोथी, पुस्तक चिताड करून ठेवणें.
कर्मार्पण
न. स्वतःची धार्मिक कृत्यें किंवा अनुष्ठानें पर- मेश्वरास किंवा इष्ट देवतेस अर्पण करणें. 'कर्मार्पणाचा क्रम सांग झाला ।' [सं. कर्म + अर्पण]
नैवेद्य
पु. १. देवाला अर्पण करण्याचा खाद्यपदार्थ. २. समर्पण; अर्पण. ३. (ल.) जेवण; भोजन. (क्रि. करणे). [सं.]
निवेदणें
सक्रि. १ सांगणें; बोलणें; कळविणें; भाषण करणें; कथन करणें. 'म्हणोनि काय काय आतां । निवेदिजेल अनंता ।' -ज्ञा ११.५५५. -मुआदि ४.४९. २ अर्पण करणें; ओपणें; देणें. [सं. निवेदन] निवेदक-वि. सांगणारा; निवेदन करणारा. निवेदन-न. १ सांगणें; कळविणें; कथन (वरिष्ठ, वडील माणसांस). २ अर्पणें; ओपणें; देणें; वाहणें.; 'करी बळी स्वात्म निवेदनातें । ' -वामन, वामनचरित्र १.४०. [सं.] निवेदनीय-वि. १ निवेदन, कथन करण्यास योग्य. २ अर्पण करण्यास योग्य. निवेदित-वि. १ सांगितलेलें; कळविलेलें. २ अर्पिलेलें; दिलेलें. निवेद्य-वि. निवे- दनीय पहा.
नवस
पु. १. इच्छित कार्य सिद्धीला जावे म्हणून देवाची प्रार्थना करून कार्यसिद्धी झाल्यावर देवाला (एखादी) वस्तू अर्पण करण्याची प्रतिज्ञा. २. त्या प्रतिज्ञेतील देवाला अर्पिण्याची वस्तू. [सं. नमस्] (वा.) नवस देणे–मार देणे. (व.) नवस पुरणे, फळास येणे – (एखाद्याचे) इष्ट कार्य (नवस केल्यामुळे) सिद्धीला जाणे. नवस फेडणे–नवस फळाला आल्यावर, पूर्ण झाल्यावर देवाला वस्तू इ. अर्पण करण्याची केलेली प्रतिज्ञा पार पाडणे. नवसाला पावणे– (नवस केलेल्या देवतेने तो करणाऱ्याचे) मनोरथ पूर्ण करणे. नवसाचा नाऱ्या– नवस करून झालेला मुलगा. (व.)
ओपणे
उक्रि. १. एखाद्याच्या हवाली करणे, हाती देणे; सोपविणे : ‘नृपें तयाच्या करी ओपिला निज कन्येचा कर।’- विक३७. २. (सामा.) देणे; अर्पण करणे; नजर करणे; वाढणे; घालणे : ‘जें जयासी पाहिजे अन्न। तें तें तयांसी ओपित।’- हरि २४·५८. ३. विकणे; विकत घेणे. [क. ओपितु] [सं. अर्पण] (वा.) ओपून घेणे- कबूल करून घेणे.
ओपणें
उक्रि. १ एखाद्याच्या हवालीं करणें, हातीं देणें; सोंपविणें. 'नृपें तयाच्या करीं ओपिला निज कन्येचा कर ।' -विक २७. 'प्रधानास कारभार ओपून आपण अनेक देशाटन करीत असावें.' -सिंब २६. २ (सामा.) देणें; अर्पण करणें; नजर करणें वाढणें; घालणें. 'जें जयासी पाहिजे अन्न । तें तें तयांसी ओपित ।' -ह ३४.५८. ३ (कुण. गो.) विकणें; विकत देणें. [सं. अर्पण; प्रा. ओप्पणं; का. ओप्पिसु = देणें]
(सं) उ० वि० विकणें, २ उन्हांत बाळत घालणें. ३ अर्पण करणें.
ओपणें ōpaṇēṃ v c (अर्पण S) To commit to the conduct or care of; to deliver over or intrust with: also (facetiously or freely) to give; to make over to; to present with. Ex. रावणाचे पृष्ठावर देख ॥ हनुमंतें मुष्टि ओपिली ॥ 2 (Vulgar.) To sell.
समर्पण
न. देणें; बक्षीस करणें; अर्पण; वाहणें. [सं. सम् + अर्प्] समर्प(र्पि)णें-उक्रि. १ देणें; दान करणें; बक्षीस देणें; अर्पण करणें; वाहणें. 'आतां ओंकारें आदरिलें । तत्कारें समर्पिलें ।' -ज्ञा १७.३७३.'समर्पूं शरीरें स्वहस्तें ।'. २ देऊन टाकणें; सढळपणें देणे; ओपणें. 'हृदयीं समर्पिती वज्रमुष्टी ।' समर्पित-धावि. वाहिलेला; दत्त; अर्पिलेला; देऊन टाकलेला.
तन
न. शरीर; देह. तनू पहा.' सहज सुंदर नीळ तन ।' -वेसीस्व ९.११. [सं. तनु; तन्] (वाप्र.) ॰देणें-न. शरीर समपर्ण करणें; छाती पुढें करून तोंड देणें; पुढें पडणें. 'इंग्रजीपाशीं तोफांचा मार फार; तेव्हां लोकांनी तन न दिलें.' -ख १०२४. ॰मन-न. शरीर व आत्मा (मन); सर्व शरीर, ॰लागणें- एखाद्या विषयाकडे अंतःकरणवृत्ति सर्वात्मना गुंतली जाणें. ॰मन- धन- न. १ शरीर, मन व संपत्ति. २ (ल.) सर्वस्व; सर्व; सर्व चीज- वस्त 'तनमनधन माझें राघवा रूप तुझें ।' -रामदास-करुणाष्टक 'तनमनधन कर देवाला अर्पण ।' [तन + मन + धन] ॰मनधन- समर्पण-न. शरीर, मन व संपत्ति अर्पण करणें; सर्वस्व वाहणें; सर्वावर पाणी सोडणें. [तन + मन + धन + समर्पण]
त्रिवार
क्रिवि. तीन वेळां; तीनदां. हा शब्द निश्चय, संकल्प, वचन, अपराध, दंड, धर्म, शिक्षा, बोध, उच्चरण इ॰ शब्दांसह समासांत खचित, निश्चित, निःसंदेह, ठाम, सक्त, जोराचा, नेटाचा इ॰ अर्थानें योजतात. [सं. त्रि + म. वार] ॰पुण्य-न. 'मी देतों, अर्पण करितों' अशा अर्थाचे शब्द गंभीरपणें तीन वेळां उच्चारून दिलेलें; अर्पण केलेलें पुण्य. [त्रिवार + पुण्य]
उत्सर्ग
पु. १. बाहेर टाकणे; टाकून देणे; त्याग; दान; अर्पण. सामा. शब्द -मलात्सर्ग, मूत्रोत्सर्ग, वृषोत्सर्ग वगैरे : ‘संक्रमण उत्सर्ग । विण्मूत्राचा ॥’ -ज्ञा १३·११९. २. नियम; विधी; रीत. उदा. उत्सर्गशास्त्र. ३. धर्म करणे; विहीर, धर्मशाळा इ. देवाला अर्पण करणे. [सं. उत् + सृज्=टाकणे]
वोपणें
उक्रि. १ देणें; अर्पण करणें. 'ऐसें युक्तिचेनि हातें । जै इंद्रियां वोपिजे भातें ।' -ज्ञा ६.३५२. २ हाणणें; मारणें. 'शाल्व रथीं जंव चढे । तंव मुसळ वोपिलें रोकडें ।' -एरुस्व १०.७२. ३ विकणें. 'पै सर्वभावेंसि उखितें । जें वोपिलें मज चित्तें ।' -ज्ञा ९.३३५. -न. दान; अर्पण. 'मग देति ज्ञानाचें वोपणें ।' -भाए ६२८. ओपणें पहा. वोपविणें-१ विकविणें. 'पुत्रपत्नी जीव । डोंबाघरीं वोपविलीं ।' -तुगा १२५१. २ देव- विणें; देणें.
पिंड
पु. १ गोळा; पुंज; समुदाय; ढीग. 'का कवणें एके पिंडें । वेंचितां अवतरे भांडें । मग भवंडीजे दंडें । भ्रमें चक्र ।' -ज्ञा १८.३१०. २ मृत पितरांना जवळच्या नातेवाइकानें श्राद्बाचे वेळीं अर्पण करावयाचा भाताचा गोळा. ३ शरीर; देह. 'पिंड पोसावे हें अधमाचें ज्ञान । तुगा ३३५६. 'जंव यशोदा करी न्याहाळ । तंव जवळी न दिसे बाळ । मग पिंड पडिला विकळ । यशोदेचा ।' -कथा ४.३.८३. ४ गोल; कोणताही वाटोळा पदार्थ. 'उदा॰ मांसपिंड इ॰; ग्रंथी. ५ (भूमिति) घनतेचें माप. ६ नुकताच घरलेला गर्भ; भ्रूण. ७ (गणित) त्रिज्येचा एकचोविसांश. ८ एक प्रकारचें रान. ९ जीव. 'पदपिंडाची गांठी ।' -ज्ञा ३.२७२. [सं.] (वाप्र.) पिंडास खिळणें-जडणें-बसणें-लागणें-जडलेला, खिळलेला, चिकटलेला असणें (खोड, आजार, उपद्रव इ॰ ). म्ह॰ १ जें पिंडीं तें ब्रह्मांडीं = आपणावरून जग ओळखावें किंवा माणूस हा एक लहानसें ब्रह्मांडच आहे याअर्थीं. २ पिंडे पिंडे मतिर्भिन्ना = व्यक्ती तितक्या प्रकृती. सामाशब्द- ॰जन-पु. जीवसृष्टि; देहधारी लोक. 'तैसें होय शरीर । तैं तें म्हणिजे खेचर । हें पद होता चमत्कार । पिंडजनीं ।' -ज्ञा ६.२९६. पिंडदंड-वि. आडदांड. 'चेल्यांचा सुकाळ । पिंडदंड भगपाळ ।' -तुगा २८.१९. ॰दान-प्रदान-न. मृतांना श्राद्बांत भाताचे पिंड अर्पण करणें. ॰पितृयज्ञ-पु. पितरास उद्देशून अमावास्येस करावयाचें पिंडदान. ॰ब्रह्मांडरचना-स्त्री. मानवी देहाची जी रचना तीच अखिल विश्वाची घटना (माणसाचे डोळे, रक्तवाहिन्या, केंस इ॰च्या ठाईं चंद्रसूर्य, नद्या, झाडें इ॰ कल्पिणें) असें समजणें; अशी समजूत. ॰रोगी-वि. जन्मापासूनचा आजारी; गर्भावस्थेपासूनचा आजारी; जन्मरोगी. ॰ज्ञान-न. शरीर- रचनाशास्त्र. ॰ज्ञानी-पु. शरीररचनाशास्त्रज्ञ. पिंडोदक-न. मृतास उत्तम गति मिळण्यासाठीं त्यास पिंड (भाताचा गोळा) व उदक (पाणी) देण्याचा धार्मिक विधि.[सं.]
प्राण
पु. १ देहांतील पांच वायु; प्राण, अपान, व्यान, उदान व समान. २ शरीरांतील पांच वायूंपैकीं पहिला; हृदयांतील वायु. 'तैसी प्राणजयें कर्मेंद्रिया । खुंटे गती ।' -ज्ञा १६.१८३. ३ एक बेचव, रंगहीन व वासरहित वायु. ह्याचें अस्तित्व हवेंत, पाण्यांत कित्येक खनिज पदार्थांत व सेंद्रिय वस्तूंत असते. हा वायु सर्व प्राण्यांस व वनस्पतींस अत्यावश्यक आहे. -ज्ञाको (प) २५५. (इं.) ऑक्सिजन. ४. श्वास; फुफ्फुसांत घेतलेली किंवा सोडलेली हवा; उच्छवास. 'प्राण म्हणजे पुढें जाणारा म्हणजे उच्छवास- वायु. -गीर ६७८. ५ वायु; वारा. ६ जीव. ७ (ल.) अत्यंत प्रिय वस्तु. 'महाराजांचा प्राण तर आपण.' -रत्न २.१. अधिक लाक्षणिक अर्थांसाठीं जीव शब्द पहा. ८ (संगीत) तालास लागणारी आवश्यक आणि महत्त्वाची गोष्ट. हे प्राण दहा आहेत-काल, मार्ग, क्रिया, अंग, ग्रह, जाति, कला, लय, यति व प्रस्तार. [सं.] (वाप्र.) ॰असणें-अत्यंत प्रिय असणें. 'दुर्गादेवीची तर ती खरोखर प्राणच होती.' -बिवि ८.१.६. ॰उरणें-केवळ जगणें; कसें तरी जगणें. ॰ओकणें-१ अत्यंत दुःख करणें. २ एखाद्या गोष्टीचा अतिशय छंद असणें. ॰ओवाळून टाकणें-सर्वस्व अर्पण करणें 'चारुदत्ता, या तुझ्या गुणावरून प्राण ओवाळून टाकावे असें वाटतें.' -मृ ४७. ॰काढून ठेवणें-परोपरीनें विनविणें; हट्ट घेणें. 'करंजा घाल म्हणून प्राण काढून ठेविला पण नाहीं हो ऐकिलें.' -कफा ३. ॰खाणें-अतिशय त्रास देणें; त्रासून सोडणें. 'तू... आमचा दोघांचा प्राण खाल्लास.' -नामना १२३. ॰जाणें-मरणें. ॰ठेवणें-एखाद्या गोष्टीवर अंतःकरणपूर्वक प्रेम करणें; जीव कीं प्राण असणें. ॰डोळ्यांत उतरणें-प्राण जाण्याचा प्रसंग येऊन ठेवणें. 'तरु- णाचे प्राण शेवटीं डोळ्यांत उतरण्याचा प्रसंग येतो.' -भावबंधन पृ. २२. ॰देणें-प्राणत्याग करणें; मरणें. ॰न ठेवणें-प्राण देणें; मरणें. 'मी प्राण ठेवणार नाहीं.' ॰फुटणें-अतिशय उत्कंठा असणें; तीव्र इच्छा होणें. 'तैसें देखावें वाटे पाहावया प्राण फटे ।' दावि १५५. ॰वाहणें-एखाद्यासाठीं सर्वस्व अर्पण करणें. 'प्राण वाहिला पायावरी ।' ॰सोखणें-१ तहानेनें व्याकुळ होणें; तहा- नेनें जीव कासावीस होणें. २ एखाद्या गोष्टीचा ध्यास, रुखरुख लागणें; एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा धरणें. ॰सोडणें-प्राण देणें; मरणें. प्राणाचा वाली-जीविताचा मालक; प्राणनाथ; नवरा. प्राणापेक्षां कठीण-मरणापेक्षांहि वाईट. प्राणाशीं गांठ-प्राण धोक्यांत पडणें; प्राणसंकट. (क्रि॰ घालणें; पडणें; होणें). म्ह॰ असंगाशीं संग प्राणाशीं गांठ. प्राणाशीं जाणें- (आकस्मिक घाला आल्यामुळें) प्राणास मुकणें. प्राणें उत्तीर्ण होणें-मरणें. 'तेथ उत्तीर्ण होईल प्राणें । परी तें कमळदळ चिरूं नेणें ।' -ज्ञा १.२०२. प्राणें जाणें-प्राण देणें. 'आतां मी जाईन प्राणें । पुत्रविण व्यर्थ जिणें ।' -कथा १.४.१०१. उघड्या डोळ्यानें प्राण न जाणें-आपल्या डोळ्यांसमोर एखाद्या अन्याय होत असतां स्वस्थ न बसवणें. सामाशब्द- ॰खाऊ- वि. (प्राण खाणारा) प्राणावर बेतणारा; प्राण धोक्यांत येईल इतका कष्टप्रद किंवा त्रासदायक; जीवघेणा; प्राणघेणा. [प्राण + खाणें] ॰घात-पु. १ ठार मारणें; प्राणहत्या; हिंसा. २ (ल.) नाश; विध्वंस. ॰घातक-की-वि. जीवनाचा नाश करणारा; जिवावर बेतणारा; जीव धोक्यांत आणणारा; प्राणघेणा. ॰घेणा- वि. १ प्राण घेणारा; जीव घेणारा. २ (ल.) अतिशय लोचट; अतिशय कष्टप्रद (काम, भिकारी इ॰). 'असली प्राणघेणी लढाई कोठें बोलली आहे काय?' -नि ९१३. [प्राण + घेणें] ॰घोष-पु. (कान बंद केले असतां) कानांत होणारा मोठा आवाज. ॰जय- पु. वायूचा निरोध. 'तैसी प्राणजयें कर्मेंद्रियां । कुंठे गति ।' -माज्ञा १६.१८३. ॰जीवन-न. १ जीवनाचा आधार. २ चरितार्थाचें साधन. ३ पति; प्रियकर; जार. ॰तर्पण-न. प्राणांचें समाधान; भुकेची शांति. 'गुरुआज्ञा जें दीधलें अन्न । तेणें प्राणतर्पण करावें ।' -एभा १७.३०८. ॰त्याग-पु. १ प्राण सोडणें; मरणें. २ प्राण देणें; आपल्या प्राणाचें बलिदान करणें. ॰दान-न. एखाद्याला जिवावरच्या संकटांतून सोडविणें. ॰द्यूत-न. (ल.) भयंकर किंवा कजाखीची लढाई. ॰धर्म-पु. भूक व तहान. -हंको. ॰धारण- धारणा-नस्त्री. १ जिवंत राहणें; जगणें. 'आम्ही कंदमूल खाऊन कसें तरी प्राणधारण करितों.' २ (योग.) श्वासाचा निरोध करणें. ३ जीवन. ॰नाथ-पति-प्रिय-प्यारा-पु. पति; नवरा. 'प्राणनाथाचिया आधीं । विरहणींतें जिणेंही बाधी ।' -ज्ञा १८.९२०. २ जार. ॰नाहो-पु. नवरा; पति. 'होवोनि माझा प्राणनाहो ।' -मुआदि १७.१३६. ॰पंचक-न. प्राण, अपान, व्यान, उदान, समान यांचा समुदाय. ॰पूजा-स्त्री. (ल.) जेवण; भोजन. ॰प्रतिष्ठा-स्त्री. १ दक्षिणाचार विधीच्या प्रसंगीं मंत्रादिकांनीं धातु, काष्ठ, पाषाण इत्यादिकांच्या देवतेच्या मूर्तींत प्राणांची स्थापना करण्याचा विधि. हा चक्षुरुन्मीलन विधीबरोबर करितात. २ स्थापना. 'दक्षिणेंत शिवाजीनें मराठी राज्याची प्राणप्रतिष्ठा केली.' ॰मय-वि. पंचप्राणयुक्त; सजीव. ॰मय- कोश-पु. आत्म्याच्या पंचकोशांपैकीं दुसरा कोश. पंचकोश पहा. ॰मित्र-पु. १ नवरा; पति; जार. २ जिवलग मित्र. 'उत्तरेसि वैश्रवण । प्राणमित्र शिवाचा ।' ॰यात्रा-स्त्री. चरितार्थ; उपजीविका. ॰याम-पु. (प्र.) प्राणायाम पहा. ॰रक्षण-न. जीवितरक्षण; जगणें; प्राणधारणा. ॰लिंग-न. गळ्यांत असलेलें महादेवाचें लिंग. -ख्रिपु. ॰वायु-पु. पंचप्राणांपैकीं पहिला वायु; प्राण पहा. ॰वियोग-पु. मरणसमयीं शरीरापासून झालेला प्राणाचा वियोग ॰विसावा-पु. अत्यंत आवडता मनुष्य (पति, जार, मित्र इ॰). 'प्राणाविसाव्याची भेट इच्छितसें ।' -रत्न ४.३. २ प्राणांचें विश्रांतिस्थान. ॰संकट-पु. प्राणघातक; दारुण, संकट; बिकट परिस्थिति. जिवावरची गोष्ट. ॰सखा-पु. प्राणविसावा. ॰संदेह- पु. दारुण परिस्थिति; प्राण जाईल किंवा राहील अशा तर्हेची संशयास्पद स्थिति; प्राणांतिक संकट. ॰सा-वि. (प्राणाप्रमाणें) अत्यंत आवडता. [प्राण + सा = सादृश्यदर्शक प्रत्यय] ॰सांडण- स्त्री. प्राणाची ओवाळणी. 'ऐसीयावरून प्राणसांडण करूं ।' -दावि १०७. [प्राण + सांडणें] प्राणाचा गिर्हाईक-पु. प्राणघातक शत्रू; हाडवैरी. प्राणांत-पु. १ आयुष्याची अखेर. शेवटची अवस्था; आयुष्याचा अखेरचा काल. २ अत्यंत भयंकर संकट. 'लढाईत जाणें हा केवळ प्राणांत आहे.' ३ (समासांत) प्राणांत-जेवण-यातना-व्यथा-समय. ४ जिवावरची गोष्ट प्राणांशीं गांठ. 'थोर प्राणांत वोढवला ।' ५ आयुष्याचा किंवा प्राणाचा शेवट; मृत्यु; मरण. 'मच्छ तळमळति तुटतां जीवन । प्राणांत वोडवे त्यालागोन ।' [प्राण + अंत = शेवट] प्राणांतदंड-पु. देहात- शासन; फांशीची शिक्षा. प्राणांतबुद्धि-स्त्री. धोक्याचा किंवा घातुक सल्ला. (क्रि॰ सांगणें; सुचविणें) प्राणांति(ती)क-न. जीविताचा शेवट; मरणकाल. -वि. घातक; भयप्रद; प्राण घेणारें; अति संकटमय (अजारीपण, संकट इ॰). [प्राणांत] प्राणांतिक अवस्था-स्त्री. मरण येतें कीं काय अशी स्थिति; प्राणसंकट; जिवावरची गोष्ट. प्राणात्यय-पु. १ (प्र.) प्राणनाश. २ (विरू.) प्राणत्याग. प्राणापदी-स्त्री. (महानु.) प्राणसंकट. 'श्रीकृष्णा सांडिता प्राणापदी जाली । ते सांघों नेणिजे ।' -शिशु २३१. [प्राण + आपदा] प्राणायाम-पु. (योग) भूः, भुवः इ॰ सात व्याहृती म्हणून उजव्या नाकपुडीनें श्वास आंत घेणें, पुनः त्या सात व्याहृती म्हणून श्वास कोंडून धरणें व पुनः त्या व्याहृती म्हणून डाव्या नाकपुडीनें श्वास बाहेर सोडणें. या तीन क्रियांस कुंभक, पूरक व रेचक असें म्हणतात; श्वासाच्या गतीचा निरोध. 'येई प्राणायामाचेनि आडकंठें । वरौता गा ।' -ज्ञा ६.५५. (द्राविडी)प्राणायाम-पु. प्राणायाम करतांना उजव्या हातानें नाकपुडी धरावयाची असते. त्यासाठीं सरळ, समोरून हात न घेतां डोक्याच्या मागच्या बाजूनें हात नेऊन तो पुढें आणून नाकपुडी धरणें. यावरून (ल.) त्रासयुक्त, आडमार्गानें केलेली कोणतीहि गोष्ट. 'वेताळ पंचविशी हा ग्रंथ मूळचा संस्कृत, त्या भाषेंतून याचा तर्जुमा फारसी भाषें झाला, तींतून इंग्रजींत, इंग्रजीतून मराठींत. केवढा द्राविडी प्राणायाम!' -नि. प्राणायामी-वि. प्राणा- याम करणारा. 'एक अपानु प्राणीं अर्पिती । एक दोहोंतेही निरुं- धिती । ते प्राणायामी म्हणिपती । पंडुकुमरा ।' -ज्ञा ४.१४६. प्राणासन-न. (योग.) उजवी मांडी मोडून व डावा पाय जमिनीवर टेकवून बसणें. उजव्या पायाचीं बोटें डाव्या जांघेंत भरून दावा पाय डाव्या हाताच्या खांद्यावरून काढून तो पाय जमिनीवर टेकणें व हात जमिनीवर टेकणें. -संयोग ३३१. [प्राण + आसन] प्राणाहुति-ती-स्त्री. भोजनाच्या आरंभीं पांच प्राणांना देतात ते पांच किंवा सहा घांस. 'तत्प्राण जाण हरिले निजविक्रमानें । प्राणाहुती मागत पांच अनुक्रमानें ।' -आपू ४०. [प्राण + आहुति] प्राणेश, प्राणेश्वर-पु. १ पति; नवरा. वोखटें मरणाऐसें । तेंही आलें अग्निप्रवेशें । परी प्राणेश्वरोद्देशें ।न गणीची सती ।' -ज्ञा १६.१८७. २ जार; उपपति; प्रियकर. ३ प्रभु; स्वामी; मालक. 'आतां मज जाणें प्राणेश्वरासवें । मी माझिया भावें अनुसरलों ।' -तुगा ६८५. [प्राण + ईश, ईश्वर] प्राणेश्वरी-स्त्री. १ प्रकृति. 'जो प्रियूचि प्राणेश्वरी । उलथे आवडीचिये सरोभरीं ।' अमृ १.२. २ बायको. [प्राण + ईश्वरी] प्राणोत्क्रमण-न. प्राण निघून जाणें; मरण; मृत्यु. [प्राण + उत्क्रमण] प्राणोपासना-स्त्री. उपासनेचा एक प्रकार. 'पुरुष विद्या, पर्यकविद्या, प्राणोपासना इ॰ प्रकारची उपासना उपनिष- दांत वर्णिली आहे.' -गीर २०७. [प्राण + उपासना]
ऐपत
स्त्री. संपन्नता; आर्थिक सामर्थ्य, शक्ती, योग्यता, साधन; मालमत्ता; पैसाअडका : ‘जो तो आपल्या ऐपतीप्रमाणे काहीतरी (देवाला) अर्पण करीत असतो.’ − एल्गार ८. [फा. आफियत]
अप्रत्यर्पण
न. अर्पण न करणे; स्वाधीन न करणे, होणे; ताब्यात न देणे; हवाली न होणे, करणे. [सं.]
आराइणे
अक्रि. १. अर्पण करणे; अनुकूल असणे : ‘परी सर्व प्राणें मजचिलागीं । आराइले असती ।’ − ज्ञा १·११०. २. उत्पन्न होणे : ‘किंबहुना तृषितालागीं । पाणी आरायिलें असे जगीं ।’ − ज्ञा १६·१६१. [सं. आ + ऋ किंवा आराध्]
आराइणें
अक्रि. अर्पण करणें; अनुकूल असणें. 'परी सर्व प्राणें मजचिलागी । आराइले असती । -ज्ञा १.११०. २ उत्पन्न होणें. 'किंबहुना तृषितालागीं । पाणी आरायिलें असे जगीं ।' -ज्ञा १६.१६१. [सं. आ + ऋ किंवा आराध्]
आरातणे
क्रि. १. जवळ येणे; उत्पन्न होणे. २. अर्पण करणे; अनुकूल असणे : ‘कांई लावकैआं केउतें । आरातीचि ना ।’ − शिव ११६. [सं. आ+ऋ; आरात्]
अर्ध्य
न. १ ओंजळींत किंवा लहान पात्रांत पाणी घेऊन त्यांत गंधाक्षता-फुलादि घालून देवादिकांस, ब्राह्मणांस पूजासमयीं जें अर्पण करतात ते. 'भरूनिया पुष्पांजळी । अर्ध्यु देवों ।।' -ज्ञा १५.२. २ संध्यावंदनादि कर्मांत सूर्यास उद्देशून जें ओंजळींतून उदक सोडतात ते. -वि. १ पूज्य; पूजनीय; दर्शनीय; सन्मान- नीय. २ मूल्यवान. [सं.] ०देणें वरप्रमाणें पाणी वगैरे देणें. (ल.) उदक सोडणें; नाश करणें; इजा करणें; सत्यानाश घडवून आणणें. ०घेणें,०घेऊन उभा-तयार राहणें-असणें नाश करण्यासाठीं तयार असणें, टपून बसणें.
अर्पित
वि. १. उपायन, वायन दिलेले; दान केलेले; बक्षीस दिलेले. २. दिलेला; अर्पण केलेला; वाहिलेला. [सं.]
अर्पित
वि. १ उपायन-वायन दिलेलें; दान केलेलें; बक्षीस दिलेलें. २ दिलेला; अर्पण केलेला; वाहिलेला. [सं.]
अर्पणे, अर्पिणे
उक्रि. १. बक्षीस देणे; इनाम देणे; दान करणे : ‘योगी विषय जे त्यागिती । ते भक्त अर्पिती भगवंती ॥’ – एभा २·२८९. २. ओपणे; वाहणे; भक्तिपूर्वक देणे : ‘कर्मफल ईश्वरी अर्पे । तत्प्रसादें बोधु उद्दीपे ।’ – ज्ञा १८·२६६. पहा : अर्पण [सं. अर्प्]
अर्पणें or अर्पिणें
अर्पणें or अर्पिणें arpaṇē or ṃarpiṇēṃ v c (अर्पण S) To offer or present. 2 To give or bestow.
अर्पणें, अर्पिणें
उक्रि. १ बक्षीस देणें; इनाम देणें; दान करणें. ‘योगी वीषय जे त्यागिती । ते भक्त अर्पिती भगवतीं ।।’ -एमा २.२८९. २ ओपणें; देणें; वाहणें. अर्पण पहा. [सं.ऋ = जाणें प्रयोजक ]
अर्पणीय
वि. बक्षीस, भेट देण्यायोग्य; अर्पण करण्यास योग्य; देय. [सं.]
अर्पणपत्रिका
स्त्री. ग्रंथ ज्यास अर्पण करावयाचा त्या संबंधीचा मजकूर असलेले प्रारंभीचे पृष्ठ.
आतणे
क्रि. १. होणे, पावणे : ‘असो जळीं लवण विरोनि गेलें । परि क्षारतेसीं होतें उरलें । तेंहि हळुहळु मधुरता आतलें । या नांव विज्ञान स्थिती ।’ − स्वानु ११·१·८५. २. दडपणे : ‘परि कैसा भारें आतला पिकें । दैवाचेनि ।’ − ज्ञा ६·१४५. ३. देणे; अर्पण करणे : ‘प्रसन्न होउनि वरदानास । सावरी विद्या आतुली ।’ − नव ७·३. ४. व्यापणे : ‘विचित्रता भूताचिया । आपण आंतोनि ठिकारिया ।’ − ज्ञा १८·५३९. ५. स्पर्शणे; शिवणे. पहा : आतळणे. ६. आटणे; सुकणे : ‘तें बरव देखोंनि उचश्रवा आतला पाणी ।’ − रुस्वन ९०३. [सं.]
आतणें
क्रि. १ होणें; पावणें. 'बकाच्या ऐसे आतलें धवळ ।' -मुआदि १९.७७. 'असो जळीं लवण विरोनि गेलें । परि क्षारतेसीं होतें उरलें । तेहिं हळु हळु मधुरता आतलें । या नांव विज्ञान स्थिति ।' -स्वानु ११.१.८५. २ दडपणें. 'परि कैसा भारें आतला पिकें । दैवाचेनि ।' -ज्ञा ६.१४५. ३ देणें; अर्पण करणें. 'प्रसन्न होऊनि वरदानास । साबरी विद्या आतुली ।' -नव ७.३. ४ व्यापणें. 'विचित्रता भूतांचियां । आपण आंतोनि ठिकरिया ।' -ज्ञा १८.५३९. ५ स्पर्शणें; शिवणें. आतळणें पहा. [सं. आप् = मिळणें]
अवांझ वाण
न. अनेक मुले असलेल्या बाईला मूल नसलेल्या बाईने द्यावयाचे वाण : ‘एका बाईने मुद्दाम येऊन बायाला अवांझ वाण अर्पण केले.’ –माजी ८.
बेमारी; बिमारी
(स्त्री.) आज़ार; आज़ारपण.
बलिदान
प्राणाची-सर्वस्वाची आहुति, प्राणार्पण, सर्वस्वावर तिलां- जलि, स्वार्थाचा होम, प्राण वेंचले, शिर उतरून दिलें, त्यागाच्या होमकुंडात स्वतःला फेकलें, सर्वस्व बिनतक्रार अर्पिलें, स्वतःचे घर स्वतःच्या हातांनीं पेटविलें, तनमनधन अर्पण केलें, आत्मसमर्पण, मृत्यूच्या जबड्यांत जाणून-बुजून मान दिली, सतीचें वाण बुद्ध्या हातीं घेतलें, जिवावर उदार होऊन पुढें झाला, स्वार्थांची चिता स्वतःच्या हातानें पेटवून दिली, स्वतःस जाळून उदबत्तीप्रमाणें इतरांस सुवास दिला, कोईप्रमाणे स्वतःला पुरून घेऊन जगाला गोड आंबे दिले.
बोलाईची सागुती,-चें मांस
स्त्रीन. १ बोलाईस अर्पण केलेली सागुती, मांस. २ फक्त बोकडाची सागुती, मांस. [बकरीचें मांस निषिद्ध मानतात म्हणून फक्त बोकडाचेंच मांस विकण्याचीं स्वतंत्र दुकानें असतात.]
भाग
पु. देवास अर्पण करावयाची वस्तु; देवतेचा अंश. 'तिनें हातांतल्या बांगडया देखील भाग म्हणून काढून ठेविल्या.' -विविध १६.८.३६.
भोग
पु. देवतेस अर्पण करावयाचा नैवेद्य, बळी. 'लग्नांत पाताणे कुलस्वामिनीस बकर्याचा भोग देतात.' -ज्ञाको (१७) २४८.
भोगी
स्त्री. देवाचा भोग; देवतेस अर्पण करा- वयाच्या वस्तु. 'आम्ही किनईस जाऊन श्रीस भोगी करून आलों. औंधासहि श्रीमृळपीठ श्रीयमाईस भोग्या केल्या.' -प्रति आत्मच ३०१. [सं. भोंग]
भोगविणें
सक्रि. देबास अर्पण करणें; देवाच्या अंगास लावणें; देवास वाहणें. 'त्याची सेवा करूं लागला. शेंदूर भोगविला. चार पांच वरसें तेथेंच पूजा करीत होता.' -रा ६, पृ ४३. [भोगणें प्रायोजक]
चढणे
अक्रि. (देवादिकांना) वाहिले जाणे; अर्पण केले जाणे.
चिंधा(ध्या)देवी
स्त्री. १ जिला रस्त्यानें जाणारे लोक चिंध्या अर्पण करितात अशी एक रस्त्यावरील देवता (या चिंध्या रस्त्याच्या बाजूस असलेल्या झाडास बांधितात). २ (ल.) चिंध्या गाळणारी, नेभळी शामळसटीण. ३ एका काठीला चिंध्या गुंडाळून केलेली मुलींच्या खेळांतील देवी.
चिंधादेवी, चिंध्यादेवी
स्त्री. १. जिला रस्त्याने जाणारे लोक चिंध्या अर्पण करतात अशी रस्त्यावरील देवता (या चिंध्या रस्त्याच्या बाजूस असलेल्या झाडास बांधतात). २. (ल.) चिंध्या गाळणारी, नेभळट. ३. एका काठीला चिंध्या गुंडाळून केलेली मुलींच्या खेळातील देवी.
चिराखी
स्त्री. १. (मुसलमानांच्या) पिराजवळ दिवाबत्ती लावणे, पिरास फुलांचे हार व इतर वस्तू अर्पण करणे इत्यादी कार्य. २. वरील कामाबद्दल मिळणारे सरकारी वेतन, वर्षासन. ३. वरील काम करण्याची नोकरी, कामगिरी. ४. फकिरास संध्याकाळी द्यायची भिक्षा. [फा. चिराग]
चिराखी
स्त्री. १ (मुसलमानांच्या) पिराजवळ दिवा- बत्ती लावणें, पिरास फुलांचे हार इ॰ वस्तु अर्पण करणें इत्यादि कार्य. २ वरील कामाबद्दल मिळणारें सरकारी वेतन, वर्षासन. ३ वरील काम करण्याची नोकरी, कामगिरी. ४ फकीरास संध्या- काळीं द्यावयाची भिक्षा. [फा. चिराग् = दिवा]
चंडीष
बि. चंडीस, देवतेस अर्पण केलेलें सबब निषिद्ध. ईश्वरार्पण; कृष्णार्पण; देवतेचें; परमेश्वरस्व. 'गोपाळ पंडितो! हें द्रव्य घेऊनि जाः तंव आनोबासिं म्हणितलें: हें मज आतां चंडीष कीं: म्हणौनि नेघतीचि:' -वृद्धाचार ७. [चण्डी + स्व]
चंडीष, चंडीस
वि. चंडीला, देवतेला अर्पण केलेले सबब निषिद्ध. ईश्वरार्पण; कृष्णार्पण; देवतेचे : ‘हे मज आतां चंडीष की : म्हणोनि नेघतीचि :’ – वृद्धाचार ७.
चरु
पु. १ शिजवलेले तांदुळ; भात. 'कीं होमशाळेंतून श्वान । जाय चरूपात्र घेऊन ।' २ (गो.) पिशाच्यास अर्पण कर- ण्यासाठीं शिजविलेला भात. ३ पिंड (भाताचे). ४ (खा.) तांब्या. [सं. चरु; हिं. चरुआ] चरुस्थाली स्त्री. १ भात ठेवण्याचें भांडें; हवि ठेवण्याचें पात्र. २ स्वयंपाक; पाकनिष्पत्ति; पाकक्रिया. [सं. चरु + स्थाली = भांडें]
चरु, चरू
पु. १. शिजवलेले तांदूळ; भात २. पिशाच्च्याला अर्पण करण्यासाठी शिजवलेला भात. (गो.) ३. पिंड (भाताचे) : ‘मंत्राच्या योगाने चरू सिद्ध केला.’ – लोसंक्षि. ३९. [सं.]
देणे
सक्रि. १. स्वाधीन, हवाली करणे. २. देणगी देणे; बहाल, अर्पण करणे. ३. एकाकडून दुसऱ्याकडे जाणे; सोपविणे. ४. मान्य, कबूल करणे. ५. पुढे करणे, ठेवणे. ६. उभारणे.
देओमूली
वि. देवाच्या नावाचे अर्पण केलेली भूमी : ‘ईए भूमी कणैरेश्वर देओमूली’ – नेवासे शिलालेख १·६. [सं. देव + मूलिका]
देवधान्य
न. १. ज्याचा नैवेद्य देवाला अर्पण करावयाचा आहे असे धान्य (तांदूळ, गहू इ.). २. रानात आपोआप उगवणारे देवभातासारखे धान्य.
देवस्थान
न. १. पुण्यभूमी. २. देवाला अर्पण केलेली जमीन किंवा उत्पन्न. ३. देवाचे संस्थान.
धरमकाडी
स्त्री. पेटत्या चितेवर प्रत्येकाने एक–एक काडी अर्पण करण्याचा विधी. (झाडी)
घालणे
सक्रि. (भोजन, समाराधना, ब्राह्मण, मित्र इत्यादिकांना) अर्पण करणे, देणे.
घुळी
पु. देवाला अर्पण केलेला बैल; पोळ; सांड (हा नेहमीं मोकळा फिरत असून ह्याजकडून कोणतेंहि काम करून घेत नाहींत). (क्रि॰ सोडणें). 'तारुण्याच्या मदें न मानी कोणासी । सदा मुसमुसी घुळी जैसा ।।' -तुगा ३१७४. २ (ल.) रिकामा, धष्टपुष्ट माणूस; पोळ. [का. गूळी]
हव्य
न. १ तूप, भात इ॰ हवन करावयास योग्य पदार्थः हवि २ यज्ञयागादि कर्म. [सं.] ॰कव्य-न. (देवांसाठीं तें हव्य व पितरांसाठीं ते कव्य) देव व पितर यांना हविर्भाग अर्पण करावयाचा विधि, होमहवन, व्रत; पूजा, श्राद्धपक्ष इ॰. 'त्याचे घरीं कांहीं हव्यकव्य झालें असतां मलां बोलावतात.' ॰पाक-पु. देवतांसाठीं तयार केलेलें अन्न इ॰; होमान्न. ॰वाट्- पु. अग्नि.
ईश्वरार्पण
न. परमेश्वराला अर्पण करणें; परमेश्वरास वाहि- लेली वस्तु. [सं.]
ईश्वरार्पण
न. परमेश्वराला अर्पण करणे; देवाला वाहिलेली वस्तू.
कर्मार्पण
न. स्वतःची धार्मिक कृत्ये किंवा अनुष्ठाने परमेश्वराला किंवा इष्ट देवतेला अर्पण करणे.
कव्व्य
न. पितरांना अर्पण करायची वस्तू, अन्न वगैरे. [सं.]
कव्य
न. पितरास अर्पण करावयाची वस्तु, अन्न वगैरे. [सं.]
कव्य
न. पितरांना अर्पण करायचे अन्न.
खिसका
पु. उटणे : ‘तेथे, खिसका, पंचखाजे, पानाचे विडे अर्पण करून...’ - जोफु.
खोल
न. केळीचा गाभा : ‘खोल विकणारे श्रीधरांनीही कोठूनसे पोहे आणून प्रभूंना भेट अर्पण केले.’ - गोप्रचउ २४.
खोल
न. काले; केळीचा गाभा. 'खोल विकणारे श्रीधरांनीहि कोठूनसे पोहे आणून प्रभूना भेट अर्पण केले. -गौ प्रचउ २४ [?]
खरबूज
स्त्री. खरबुजीचा वेल व त्याचें फळ. कलिंगडा- प्रमाणें याचा वेल वाढतो, व त्याचें फळ वाटोळें, तांबूस रंगावर असतें. ज्या खरबुजाचा आंतीला भाग हिरवट असतो त्यास तरटी म्हणतात. फळाची भाजी, रायतें, कोशिंबीर वगैरे करतात. याच्या ८ जाती आहेत व सामाशी, अकरमाशी, बारमाशी असे काहीं प्रकार आहेत. ‘तयापाशीं होतीं खरबुजें दोन । ती केलीं गुरूसी अर्पण ।’ –शनि २८०. [फा.]
खरबूज
न. खरबुजाची वेल व त्याचे फळ. कलिंगडाप्रमाणे याचा वेल वाढतो. याचे फळ वाटोळे, तांबूस रंगावर असते. ‘तयापाशीं होतीं खरबुजे दोन । ती केलीं गुरूसी अर्पण ।’ - शनि २८०. [फा.]
खस्ती
स्त्री. किश्ती; पोशाख वगैरे ज्यातून अर्पण करायचा ते सूप किंवा बुट्टी : ‘....उभयतां बायांस ५ हत्ती, जवाहीर पोषाख याप्रमाणें दोन खस्ती पोषाख दिला.’ - ऐलेसं ७७४८.
मांडव, मांडौ
पु. १ (लग्न, मुंज इ॰ शुभकार्याकरितां घातलेला) मंडप; आच्छादिलेली जागा; शमीआना. २ द्राक्षी इ॰ वेल चढून फैलावण्याकरितां केलेला कमानदार रस्ता. ३ देवास अर्पण केलेला इमला. ४ (खा.) झाल; ऐरणीदान करण्याचें वंशपत्र. [सं. मंडप] म्ह॰ चुटक्याचें मांडव = पोकळ प्रतिष्ठेचें बोलणें. 'मियासाहेबांनी चुटक्याचें मांडव यथास्थित रचून...' -नि. ॰खंडणी-खण्णी-स्त्री. शूद्र लोकांत होणाऱ्या लग्न व इतर विशिष्ट धार्मिक प्रसंगीं जोशी, उपाध्याय यांचा दक्षिणेचा हक्क. ॰डाहाळे-पुअव. मांडवावर पसरण्याचे, लावण्याचे वृक्षाचे डहाळें. -ऐरापु ६३. ॰देवता-प्रतिष्ठा-शोभा-(प्र.) मंडप- देवता इ॰ पहा. ॰परतणी-णें-स्त्रीन. लग्नसमाप्तीनंतर वधूपक्षानें वरपक्षास दिलेली मेजवानी, जेवणावळ. [मांजव + परतनी] ॰मेड-ढ-स्त्री. मांडवाची पहिल्यानें पुरलेली, मुख्य मेढ; सामा- न्यातः मेढ. ॰मेड(ढ) रोवणें-(ल.) मनापासून काम करा- वयास लागणें, आरंभिणें. मांडवस, मांडव आवस-स्त्री. १ फाल्गुन वद्य अमावास्या. या दिवशी शेतकरी लोक सालदार ठेवतात. मांडवी-स्त्री. १ देवावर टांगावयाची लांकडी जाळीदार चौकट; मंडपी; भाळी. २ (राजा.) देवळातील मूर्ति जेथें स्थापन केलेली असतें तो गाभारा. ३ लहान मांडव. 'हे कामाची मांडवी ।' -ज्ञा १३.९९१. ४ बंदरांतील आयात निर्गत मालाकरितां केलेली वखार, कोठी, दकातघर. बाजार उभारण्यासाठीम जागा. -वसईची मोहीम. ५ (ना.) विड्याच्या पानांची एक जात. [मांडव]
नारळी पुनव, नारळी पौर्णिमा
श्रावणी पौर्णिमा. या दिवशी पावसाळा संपला असे मानून समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. नारळी भात
निवेदन
न. १. सांगण्याची, कळवण्याची क्रिया. २. अर्पण करण्याची, देण्याची, वाहण्याची क्रिया : ‘करी बळी स्वात्म निवेदनातें ।’ - वामन वामनचरित्र १·४०. [सं.]
निवेदणे
सक्रि. १. सांगणे; बोलणे; कळवणे; भाषण, कथन करणे. २. अर्पण करणे; ओपणे; देणे. [सं.निवेदन]
नवेद्य
पु. देवास अर्पण करतात तें अन्न. (प्र.) नैवेद्य; नैवेद्य पहा. [नैवेद्य अप.]
ओळगवणे
अक्रि. १. आश्रय देणे; मुक्काम करणे: ‘ऐसें पेणें ओळगवती ।’ - स्थान १२. २. सक्रि. देणे; अर्पण करणे : ‘हा धुवा .. सर्वज्ञासि ओळगविला.’ - जती ३.
पाद्य
न. पाय धुण्याचें पाणी किंवा पाण्यानें पाय धुण्याची क्रिया. 'नवरा नेईल नोवरी घरां । पूजन वरा पाद्याचें ।' -तुगा ३०९५. देवास स्नानाचे वेळीं गंध, अक्षता, फुलें, पाणी वगैरे अर्पण घालणें-करणें-(उप.) यथेच्छ लाथा मारणें. पाद्यार्ध्य-न. (ब्राह्मण, अतिथि इ॰स) पाय धुण्यास दिलेलें पाणी इ॰; पूजा, सत्कार. [पाद्य + अर्ध्य]
पेश
वि. वजनदार; दरबार वगैरे मध्यें मान-मान्यता अस- लेला; सन्माननीय (माणूस इ॰ ). 'राजकरणांत बहुत पेश.' -पेद २१.९१. [फा. पेश्] ॰करणें-पुढें ठेवणें; सादर करणें (अर्ज इ॰ ); अर्पण करणें. 'बंदगीस पेश केली.' -इमं ६५. ॰कदमी- स्त्री. १ पुढें पाऊल टाकणें; प्रगति. 'दिवसेंदिवस त्याचे फौजेची पेशकदमी आहे.' -रा ६.४३७. २ पहिली हालचाल; युद्धाची हालचाल. 'जितका मुलूख आपले काबूंत येईल तितका पूर्तेपणें बंदोबस्त करून मग पुढें पेश-कदमी करणें ठीक आहे.' -दिमरा १.१८०. ३ आगळीक. 'आम्हांकडून अंतर नसतां तिकडून पेश- कदमी झाली तेव्हां इकडून पेशकदमीची तर्तूद करणें प्राप्त झालें.' -ख ८.४०२८. [फा] ॰कार-पु. १ मदतनीस; नायब; मुतालीक; अर्ज पेश करणारा; व्यवस्थापक; प्रधान; मुनीम. २ (व.) फडणीस; अवल कारकून; नायब तहशीलदार. [फा.] ॰कारी- स्त्री. नायबी; मुतालिकी. 'यास्तव कालिकादासास सफ्शिकन् खानाची पेशकारी सांगितली.' -रा १.५४. ॰दस्ती-स्त्री. १ व्यवस्था; पैरवी. 'मोहिबांकडून असें अमलांत येत असतां सरकार तर्फेनें पेशदस्ती होत नाहीं.' -रा १०.१२८. २ चाल. पेशन्देश- पु. दूरद्दष्टि; पूर्ण विचार. पेशामद-स्त्री. प्रगति; बढती. 'काम मोठें हौसला थोडा, कसेंही करून पेशामद करावी म्हणून बोला- वयास जातात.' -रा ५.११. [फा. पेश् + आमद्]
पोवतें-ती
नस्त्री. १ श्रावणी पौर्णिमेस (व इतर दुसर्या महिन्यांत) देवास अर्पण केलेला (चार अथवा पांच कापसाच्या धाग्यांचा) दोरा; या महिन्यांत घालावयाचें नवें जानवें; उत्स- वाच्या किंवा व्रतांच्या प्रसंगीं ब्राह्मणांनीं आणि इतरांनीं गळ्यांत; हातांत, मनगटांत, घातलेले पवित्र दोरे. २ स्त्रियांचा पोतीचा, मोत्यांचा गळ्यांतील एक दागिना. ३ लग्नांत शूद्रांनीं गळ्यांत घालावयाचे पिवळे दोरे; गंडा. [सं. पवित्र] पोवती पूर्णिमा- पुनव-स्त्री. श्रावणी पौर्णिमा. या दिवशीं पोवतें घालतात.
प्राजापत्य
न. १ एक प्रकारचें प्रायश्चित्त. २ एक विशिष्ट यज्ञ, होम. ३पापाचें परिमार्जन व्हावें म्हणून ब्राह्मणास दिलेलें गोप्र- दान. ४ (भिक्षुकी सांकेतिक) चार ही संख्या (प्रजापती(ब्रह्मा)ला चार तोंडें आहेत यावरून). -पु. विवाहाच्या आठ प्रकारांपैकीं एक. -वि. प्रजापतीसंबंधीं. [सं.] ॰विवाह-पु. विवाहाच्या आठ प्रकारांपैकीं एक. ह्यांत ह्या कन्येशीं धर्माचें आचरण कर किंवा प्रजोत्पादनार्थ कन्यार्पण असें म्हणून मुलीचा बाप वरास कन्या अर्पण करितो. अष्टविवाह पहा.
फरमाश(स), फर्मास
पु. १ (राजादिकांची) आज्ञा; हुकूम; फर्मान. २ वरिष्ठांना अर्पण केलेली वस्तु; नजराणा. ३ -पुस्त्री. (गो.) कुळाकडून येणारा हक्काचा नजराणा. ४ -स्त्री. हुकमी वस्तु; पाठविण्यास आज्ञा केलेली जिन्नस; मागणी. 'श्रीमंत स्वामीची फर्मास दिल्लीहून आणिली... पांच पोरी उत्तम आणविली.' -रा ३. १५०. -वि. अत्युत्कृष्ट; इर्साल फरमाशी पहा. 'काशीचा गुलाब साखरकंदाची गैरजरुराती. उत्तम फर्मास जरून रवाना करणें.' -रा १.२४८. [फा. फर्माइश्] फरमाशी-सी फर्माशी-यसी- स्त्री. १ नजर; अधिकार्यास दिलेली देणगी; फर्मास पहा. २ मागणी. 'गांवगन्ना स्वार वसुलास गेले त्यांचा खर्च रोज व खुराकी किरकोळी फर्मासी वगैरे पांच हजार. ' -रा ११.५९१४. ३ एक तर्हेचा कर, पट्टा. 'वेठ-बेगारी फर्मायसी देखील ठाणेपट्टी.' -ख १५.१३५. -वि. १ हुकूम देऊन, सांगून करविलेला (जिन्नस); मुद्दाम काढलेलें, बनविलेलें (वस्त्र इ॰); सांगीचा; काढील. २ (ल.) अति उत्कृष्ट; इरसाल; पहिल्या प्रतीचा. [फा. फर्माइशी] ॰चोप- मार-पु. खर्पूस मार; जोराचा मार; हग्यामार.
राखण
स्त्रीन. (कों.) १ राखणें; ठेवणें; रक्षण करणें. २ रक्षक म्हणुन ठेवलेला मनुष्य; रखावाली. 'राखण वायसें राह- वेना ।' -एभा १३.४७४. ३ रक्षकाचें, रखवालदाराचें वेतन. ४ पिशाचादि उपद्रवापासून आपलें रक्षण व्हावें म्हणुन ग्रामदेवतेस प्रतिमासीं किंवा प्रतिवर्षी अर्पण केलेला नारळ; बळी. ५ भुतें, उंदीर, टोळ इ॰ कांच्या उपद्रवापासून मनुष्यें, प्राणी, शेतें इ॰ कांना मंत्र, तंत्र, मानता इ॰ उपायांनीं मुक्त करून सुरक्षित ठेवण्याची क्रिया; भूतादिकांचा बंदोबस्त करणें. (क्रि॰ लावणें; करणें; लागणें). ६ (क्व.) पूर्ण अभाव होऊं नये म्हणून घरांत राखून ठेवलेलें अल्प- स्वल्प धान्यादि खाद्य पदार्थाचें परिमाण; घर म्हणून ठेवलेला पदार्थ. 'सगळे दाणे खर्चूं नका, घरांत राखण म्हणून दोन पायली तरी राखून ठेवा.' ७ (माळवाप्रांत) अतिशय कुरूपतेमुळें व अक्राळविक्राळपणामुळें घराचें व त्यांतील स्त्रियांचें चेटकापासून रक्षण करण्यास समर्थ म्हणून मानलेली स्त्री. -न. ब्राह्मणांत प्रसूती- नंतर तिसर्या दिवशीं, सुईण बाळंतिणीच्या खोलींतील एक कोनाडा सारवून, रांगोळी काढून, त्यांत वर गंधाचीं बोटें ओढलेलें व आंत पैसा, सुपारी टाकलेलें जें मडकें ठेवते तें; किंवा बाळं- तिणीच्या दहा दिवसांत तिच्या जेवणाच्या वेळीं तिच्या खोलींत, निखारा व त्यावर थोडा भात टाकून ठेवलेलें मडकें. याच मड- क्यांत प्रत्येक जेवणाच्या वेळीं असा निखारा व भात टाकतात. [सं. रक्षण] (वाप्र.) ॰लागणें-उपद्रव न होईल असा बंदो- बस्त करणें. 'या खिस्तीचे एकदां रुपये भरले म्हणजे चार महि- न्यांची राखण लागली.' सामाशब्द- ॰करी-दार, राखणा, राखणाई(इ)त, राखणार-पु. १ रखावालदार; पहारेकरी. २ गुराखी. 'जरी राखणाइत सहपरीवारी ।' -विउ ९.७६. 'माली- काच मी तो राखणार ।' -दावि ४५९. म्ह॰ राखण्यानें गुरें टाकलीं म्हणून धनी टाकील काय ? राखणावळ-स्त्री. १ गुरा- ख्याची मजुरी, वेतन. २ राखणें; रक्षण करणें; काळजी घेणें. [राखणें] राखणी-स्त्री. राखणे; संभाळणें; ठेवणें; बाळगणें इ॰ [राखणें] राखणें-सक्ति. १ रक्षणें; रक्षण करणें; रखवाली करणें; खबरदारी घेणें; अपकारापासून वांचविण्याकरितां आपल्या ताब्यांत घेणें. 'काढूनि राखे प्राणु ।' -ज्ञा १६.१४३. २ ठेवणें; उरविणें; पुढच्या काळाकरितां किंवा कांहों उद्देशानें ठेवून देणें. 'त्या रानां- तील गवत यंदा राखलें आहे.' ३ खर्चल्याशिवाय ठेवणें (सामर्थ्य, जोर). 'जोर-हात राखला.' 'टोला-घाव-मार-राखला.' ४ चोरून ठेवणें; पोटांत किंवा मनांत ठेवणें. 'तुझ्या मनांत असेल तें सारें बोल. कांहीं राखूं नको.' ५ एखाद्या पदार्थावर ओघानें एखादी क्रिया करणें प्राप्त झालें असतां ती न करितां, तो पदार्थ तसाच ठेवणें; आहे त्या स्थितींत राहूं देणें. 'कोनाडयाची जागा तेवढी राख आणि अवघी भिंत सारीव.' ६ करणें; ठेवणें; एखादा पदार्थ स्थित्यंतर न पावूं देतां ठेवणें; बनविणें व कायम करणें. 'ही भिंत फार रुंद राखली म्हणून जागा अडली.' 'हा अंगरखा त्वां आंखूड राखलास म्हणून शोभत नाहीं.' ७ स्त्रीनें पुरुषास किंवा पुरु- षानें स्त्रीस उपभोगार्थ बाळगणें; ठेवणें. ८ ठेंवणें; धरणें; पाळणें; हेळसांड, अवज्ञा न करणें; एका बाजूस पडूं न देणें. ९ व्यवस्थित, योग्य स्थितींत ठेवणें. १० पालन करणें; न ढळणें (वचन; आज्ञा; प्रतिज्ञा). [सं. रक्षण; रक्ष्; प्रा. रक्ख; पं. रक्खण; सिं. रखणु; हिं. रखना, राखना; गुज. राखवुं; बं. राखिवा; फ्रेजि. रख; पोर्तुजि. अरखना = रक्षक] म्ह॰ राखील त्याचें घर, खणेल त्याचें शेत. राख- णेकरी-पु. राखणदार; राखणकरी पहा. राखण्या-पु. (राजा.) गुरें राखणारा; गुराखी. राखले-स्त्री. हुंडी विकत घेणाराची स्थिति, पेशा, अधिकार, पत दर्शक योजाक्याचा शब्द. 'त्या हूंडीमध्यें माझी राखले घातली होती.' [राखणें (गुजराथींतून आलेला शब्द)] राखवळ-स्त्री. (प्र.) राखणावळ; राखण्या- बद्दल मजूरी, वेतन.
ऋचा
स्त्री. १. ऋग्वेदसूक्तातील एक मंत्र, श्लोक : ‘बोलती निषेधनियमे जिया ऋचा यजुःसामें ।’ − ज्ञा १५. १६६. २. वेदांतील मंत्र : ‘ऋचा श्रुति स्मृति । अधेय स्वर्ग स्तबक जाती।’ − दास १२·५·४. ३. (संगीत.) यज्ञसमारंभप्रसंगी निमंत्रित देवता − इंद्र, वरुण, अग्नी वगैरेंना यज्ञाचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्यांचे मनोरंजन करण्यासाठी गाऊन म्हणता याव्यात अशा रचना. [सं.]
साडा
पु. लग्नामध्यें साडे म्हणून जो सोहळा होतो त्यावेळीं वधूस द्यावयाची साडी. साडी-स्त्री. १ लहान लुगडें २ (ना.) भारी वस्त्र; पैठणी. 'शेले शालू साड्या क्षीरोदक लांबरुंद पाटावें ।' -मो सभा ५.८३. [सं. शाटी; प्रा. साडी; हिं. गु. साडी] साडे-पु. अव. १ लग्नानंतर चवथ्या दिवशीं ऐरणीपूजनाच्या प्रसंगीं वधूवरास वस्त्रें अर्पण करावयाचा सोहळा 'मुहूर्त पाहुनि लाविलें साडे झाले चौदिवशीं ।' -अमृत पुरवणी २.२ या प्रसंगी देतात तीं वस्त्रें. 'साडे आतां जानकीसी । सम- र्पिले पाहिजे ।' -वेसास्व १३.१. ३ (ल.) समाप्ति; शेवट. 'तो हा अमृत इच्छितो संसाराचे साडे ।' -अमृत ११६. साडे करणें-१ खलास करणें; खातें बंद करणें. २ (ल.) काढून लावणें; गचांडी देणें. ३ खरडपट्टी काढणें. साडे चालणें- हाल होणें. 'महाराजांच्या हुकुमानें त्याच्या मुलाचे साडे चालले आहेत.' -विक्षिप्त २.१०९.
संप्रदान
न. १ अर्पण करणें; प्रीत्यर्थ करणें; स्वाधीन करणें. २ कर्ता स्वनिष्ठ क्रियेच्या कर्मानें किंवा स्वनिष्ठ क्रियेनें ज्या कारकरूप अर्थातें अभिसंबंध करतो असें जें कारण तें; चतुर्थी विभक्तीचा अर्थ. 'ब्राह्मणास गाय दिली, मुलासाठीं रडतो.' येथें ब्राह्मण व मूल हीं संप्रदानें. [सं. सम् + प्र + दा = देणें]
श्रावण
पु. चैत्रापासून पांचवा महिना. हिंदु पंचांगांतील एक महिना. ॰कांकडी-स्त्री. श्रावणांत लागलेली कांकडी. ही अपूर्व म्हणून प्रथम देवब्राह्मणांस अर्पण करून मग खातात. ॰घेवडा-पु. एक घेवड्याची जात; अडीचमासा. ॰पाटी- स्त्री. विवाहानंतरच्या पहिल्या श्रावण महिन्यांत वराकडून वधू. कडे जी खेळ वगैरे भरून पाठवितात ती पाटी. -ऐरापुप्र १७८. ॰मासदक्षिणा-स्त्री. शिवाजी महाराजांनीं श्रावण महि न्यांत ब्राह्मणांस दक्षिणा वांटण्याची पद्धति सुरू केली. ती पुढें सेनापति दाभाडे व त्यानंतर पेशव्यांनीं चालविली. यांतून पुढें दक्षिणा प्रैझ कमिटी स्थापन झाली. ॰सण-पु. १ विवाहानंतर वधूसाठीं पहिल्या श्रावण महिन्यांत करावयाचा समारंभ. २ श्रावण- पाटी. ॰सर-सरी-पावळी-स्त्री. १ श्रावण महिन्यांत एका पाठोपाठ येणाऱ्या पावसाच्या सरी; झाडीचा पाऊस; थांबून थांबून सारखा पडणारा पाऊस. २ (ल.) मधूनमधून वरचेवर सारखें होणारें भांडण, कज्ज्जा, तंटा. श्रावणा-णी-वि. श्रावण महिन्यांतील किंवा श्रावण महिन्यासंबंधीं. श्रावणी-स्त्री. १ श्रावण महिन्यांत प्रतिवर्षी ब्राह्मण जें उत्सर्जन, उपाकर्म, यज्ञोप- वीत धारणकर्म करतात तें. २ श्रावणांतील पूर्णीमा.
श्रीफल-ळ
न. १ नारळ; प्रसाद म्हणून दिलेला किंवा देवतेस अर्पण केलेला नारळ. ' जेथें जंबूफळांचे समुदय पिकले घोसही श्रीफळांचे' -र गजद्रेंमोक्ष १२. २ एक विशिष्ट बंगाली फळ. [सं. श्री + फल; शिरःफल] श्रीफळ देणें-निरोप देणें; नोकरीवरून दूर करणें. 'सीमारामभाऊ व त्यांचे बंधु तात्या यांनांही श्रीफळ दिलें' -विक्षिप्त ९.४४.
सतका, सत्का, सदका
पु. ओंवाळून टाकलेली वस्तु; कुंरवंडी करून टाकलेली वस्तु, द्रव्य. 'जिवाचा सतका माल व इजतीचा सतका जीव यैसे आहे.' -पेद ३.१३५. 'सतका रुपये पांच केला.' -पेद १८.३३. 'कित्येक तेथें सतखे करीती ।' -सारुह ७.५५. [अर, सद्का = अर्पण केलेली वस्तु] ॰मतका-पु. अमावस्येस अनिष्ट निवारणार्य उडदाची डाळ, पीठ, मीठ, तेल, मिरच्या वगैरे जिन्नस मांगास देतात तें.
सु(सू)त
न. १ दोरा. धागा; सूत्र. २ नाकांत (नथ- घालण्यापूर्वीं भोंक रहावें म्हणून) घालावयाचा दोरा, धागा (त्या- वरून). ३ -वि. सुताप्रमाणें सरळ, नीट. [सं. सूत्र] सुतानें चंद्राला ओंवाळणें-शुद्ध द्वितीयेच्या संध्याकाळीं भाविक लोक आपल्या वस्त्राचें सूत (दशा) काढून तें चंद्राला अर्पण करतात आणि तूं जसा पुन्हां नवा झालास तशीं आमचीं वस्त्रें नवीं होऊं दे अशी प्रार्थना करतात त्यावरून. सुतानें सुत लागणें-एका गोष्टीच्या योगानें दुसरी गोष्ट समजणें. (गो.) सुतान डोंगर खेडावप-डोंगराला सूत वेढणें. सुतानें स्वर्गास गाठंणें- जाणें-चढणें-एखाद्या गोष्टीचा यत्किंचित् अंश समजल्यानें बुद्धिप्रभावानें ती गोष्ट पूर्णपणें तर्कानें जाणणें. सुतास लागणें- सुरळीतपणें चालू लागणें. सुतासाठीं मणि फोडणें बरो- बर नाहीं-क्षुल्लक वस्तु बचावण्यासाठीं मूल्यवान वस्तूचा नाश करणें योग्य नाहीं. सुतासुतानें-लहरीनें; कलानें. ॰काडी- स्त्री. (कोष्टी) सूत गुंडाळावयाची काडी. ॰कुडें-न. (गो.) सुताचें गुडाळें. सुतड गोतड जुळणें-असणें-एकमेकांचें गुह्य जमणें; (लांबचा) संबंध असणें. ॰णें-अक्रि. १ (व.) एखाद्या वस्तूभोंवतीं सूत गुंडाळणें. २ (ल.) मारणें; ठोकणें. ॰पुती-पुतळी-स्त्री. (कर.) १ कापसाचा (जखमेवर लावा- वयाचा) मणी. २ स्त्रिया मंगलगौर, शिवामूठ इ॰ पूजेमध्यें वस्त्राकरितां विशिष्ट आकृतीचा कापूस करून वाहतात ती. ॰पोत- न. कापडाची वीण, पोत. सुतर फेणी-स्त्री. एक गुजराथी खाद्य पदार्थ. सुतरा-वि. शहाणा; धूर्त, तीक्ष्ण. सुतव(वि) णें-अक्रि. १ सुतांत गुफंणें, ओवणें; गोवणें. २ भोवतीं सूत गुंडाळणें (संक्रातीचीं सुगडे, वधुवर, पिंपळ इ॰ च्या). 'विप्रीं त्या सुतवूनियां निज करीं ते कंकणें बांधिती ।' -अकक २ सी. स्व. १०२. लग्नांतील तेलफळ, रुखवतांतील लाडू इ॰ स सूत गुंडाळणें. सुतळी(ळ)-स्त्री. सुताची जाड दोरी. ॰ळ्या लागाम-पु. एक प्रकारचा लगाम. सुताचा तोडा-पु. १ सुताचा तोडलेला तुकडा, दोर्याचा तुकडा. २ (ल.) कःपदार्थ; अत्यंत हलक्या किंमतीची वस्तु. सुताड पुनव-स्त्री. (गो.) श्रावणी पौर्णिमा. सुताडा-पु. कापसाच्या सुताचें विणलेलें जाड वस्त्र (लुगडें इ॰), झोर्या, बोर्या. सुताडें-न. १ (निंदार्थी) सुताडा. २ फार दूरचें नातेंगोतें, आप्तसंबंध; नात्यागोत्याचें जाळें; घरोबा; निकटचा संबंध. सुताडेंगुताडें-गोताडें- गाताडें, सुताडगुताड-१ सुताडें अर्थ २ पहा. २ दूरचे व्यापारी संबंध; एकमेकांचे गुंतागुंतीचे व्यवहार किंवा संबंध. ३ सुतांची गुंतागुंत. [सूत + गुतणें, किंवा गोत] सुतार बांधणें- (कर.) पतंगास दोरा बांधण्यासाठीं फांसी करणें. सुतारा-पु. (कोष्टी) मागाचा एक भाग; गुलड्याशीं समांतर असलेली काठी. सुती-स्त्री. १ प्रवेश, विस्तार-शर. २ (व.) एखाद्यावर दाब, वजान पाडणें; एखाद्याच्या धाकानें निमूटपणें वागणें, ऐकणें. -वि. १ कापसाच्या सुताचें केलेलें, तत्संबंधीं. २ (ल.) सरळ; नीट; बिनचूक; पद्धतशीर; चोख. ३ ओळीनें, सम पातळींत असलेलें, कुशलतेनें मांडणी केलेलें; आवांक्यांतील. ४ (संख्यावाचक शब्द जोडून समासांत) कापडाचा पोत, वीण, तलमपणा दाखविणें. जसें-एकमुती, दोन सुती, जाड सुती, बारीक सुती. सुतीव-वि. वरील अर्थ २,३, पहा. सुतेरा-पु. कोळी नांवाचा किडा व त्याचे गुदापासून उत्पन्न होणारा तंतु, दोरा.
स्वधा
उद्गा. पितरांना उपचार अर्पण करतांना अथवा अन्न- दान, पिंडदान करतांना म्हणावयाचा मंत्र. [सं.]
ताजीम
स्त्री. (एखाद्याच्या सन्मानार्थ) उभें राहणें; उत्था- पन. अभ्युत्थान; सलामी. (क्रि॰ देणें; घेणें). 'राजा भीमसेन यास सरकारांत ताजीमवगैरे होती.' -वाडबाबा १.६१. [अर. तअझीम्] सामाशब्द- ॰तवाजू-स्त्री. ताजीम; बहुमान; आदरसत्कार; मानपान; मानाचीं वस्त्रें अर्पण करणें इ॰. 'त्यांस उभयंता रावसाहेबांनीं ताजीमतवाजू देऊन मानपान केले होते.' -रा १०.२१३. [ताजीम + तवाजू]
ताजीम-तवाजू
(स्त्री.) [मराठी समास] बहुमान व आदरसत्कार व वस्त्रें वगैरे अर्पण करणें. “त्यांस उभयतां रावसाहेबांनीं ताजीम-तवाजू देऊन मान पान केले होते” (राजवाडे १०|२१३).
तां(ता)तू
पु. १ धागा; दोरा; तंतु; तार; सूत. 'जैसा फुलाचेनि सांगातें । तांतु तुरंबिजे श्रीमंतें ।' -ज्ञा १८.८२२. २ पिंजलेल्या कापसाचा तार. ३ (बायकी) मुळांसकट उपटलेली व सोळापेक्षां कमी कांडीं नसलेली हरळी गवताची काडी. लग्ना- नंतर पांच वर्षें मुली ह्याची नवरात्रांत अष्टमीच्या दिवशीं पूजा करितात व हा देवीस अर्पण करितात. ३ (बायकी) एक एक हात लांबीचा रेशमी दोरा. लग्नानंतर नवपरिणीत वधूनें त्याची महालक्ष्मीव्रत म्हणून पांच वर्षे पूजा करावयाची असते. ही पूजा प्रतिवर्षी आश्विन शु. १४, वद्य ८ व १४ या दिवशीं करितात व शेवटल्या दिवशीं हा दोरा बोळवितात. मुलीनें ह्या दोर्यास आपल्या लग्नाचें जितकें वर्ष असेल तितक्या गांठी द्यावयाच्या असतात. [सं. तंतु]
तातू, तांतू
पु. १. धागा; दोरा; तंतू; तार; सूत : ‘जैसा फुलाचे नि सांगातें । तांतु तुरंबिजे श्रीमंतें ।’ – ज्ञा १८·८२२. २. पिंजलेल्या कापसाचा तार. ३. (बायकी) मुळासकट उपटलेली व सोळापेक्षा कमी कांडी नसलेली हरळी गवताची काडी. लग्नानंतर पाच वर्षे मुली ह्याची नवरात्रात अष्टमीच्या दिवशी पूजा करतात व देवीला अर्पण करतात. ४. (बायकी) एक हात लांबीचा रेशमी दोरा. नवपरिणीत वधूने त्याची महालक्ष्मी व्रत म्हणून पाच वर्षे पूजा करायची असते. आपल्या लग्नाच्या वर्षाइतक्या गाठी त्या दोऱ्याला द्यायच्या असतात. (वा.) तातू करणे –आहेर करणे. [सं. तंतु]
तन, तनका
न. पु. शरीर; देह. पहा : तनू : ‘सहज सुंदर नीळ तन ।’ – वेसीस्व ९·११.[सं. तनु; फा. तन्] (वा.) तन देणे, तनका देणे – छाती पुढे करून तोंड देणे; पुढे पडणे. तन लागणे, तनका लागणे – एखाद्या विषयाकडे मन पूर्णपणे गुंतणे. तनमनधन अर्पिणे – सर्वस्व अर्पण करणे.
तनमन
तनमन tanamana n (तनु & मनस् S) Body and soul; heart and spirit; the whole man. तनमनधनसमर्पण n (S) Presenting (to the Deity &c.) one's body and spirit and substance; consecration of all we are and have. Ex. तनमनधन कर देवाला अर्पण ॥; also तनमनधन दिल्हें पांडुरंगा ॥ आतां नाहीं सांगायासी कांहीं ॥.
उचित्त
न. सन्मान. पहा : उचित : ‘मग राजा याणी (राजानें) आपले हातीं सर्वांस भूषणें वस्त्रें वाहिलीं (दिली, अर्पण केलीं) मग भोजने झालीं. मग उचित्तें व वृत्ति दिधली ऐसी वाणीं दिधली.’− बिंब ३.
उदक
न. पाणी; जळ; नीर; अंबू : ‘करूं जातां उदकपान । घोटासवें आठवे कृष्ण ।’ -एरुस्व ५·६२. [सं. उद्=वर येणे, ओले करणे] (वा.) उदक येणे - (डोळ्यात, नेत्रांत, नयनांत) दुःख होणे; वाईट वाटून रडणे; अश्रू येणे. उदक सोडणे, उदक घेणे- १. मालकी सोडणे; त्याग करणे; सोडून देणे; टाकून देणे : ‘गोप्रदानांबद्दल सोळा रुपयांच्या रकमेचे उदक सोडले जाईल.’ -गोप्रदानाचे नियम (बडोदे) २. कोणत्याही गोष्टीचा संकल्प केल्याचे द्योतक म्हणून मंत्रपूर्वक पाणी सोडणे; संकल्प करणे. ३. संकल्पाचे उदक सोडून जेवण्यास आरंभ करणे. उदक हातावर घालणे- एखाद्याला दान करणे; अर्पण करणे; दुसऱ्याला देऊन टाकणे. उदकापाण्याने करून टाकणे- एखादे कार्य, समारंभ, उत्तरक्रिया अतिशय थोड्या खर्चात व गाजावाजा न करता फक्त विधीस बाध येऊ न देता उरकून टाकणे.
उगाणणे
सक्रि. उपटून नेणे; लुटणे; अर्पण करणे; लांबविणे; नागविणे; प्रकट होणे : ‘सभेसि राजा उगाणवी । तै मृत्यूची पदवी मस्तका आली ।’ − एभा १. २११. [सं. उद् + ग्रहण]
सक्रि. १. हिशेब देणे; झाडा देणे : ‘परी परमात्मया चक्रवर्ती उगाणिती जंव हातीं ।’ −ज्ञा १८·७४३. २. अर्पण करणे; आणून देणे; हवाली करणे : ‘ती गोपवत्सें उगाणलीं । गोपनाथासीं ।’ − कथा ४·३·२६५. ३. मुक्त करणे; सोडविणे (पाप इत्यादिकांपासून) : ‘उगाणिलीं जन्ममरणें’ [सं. उद् + ग्रहण]
उगाणणें
क्रि. १ हिशेब देणें. झाडा देणें 'परी परमात्मया चक्रवर्ती । उगाणिती जंव हातीं ।'-ज्ञा १८.७४३. ३ अर्पण करणें; हवालीं करणें. 'तीं गोपवत्सें उगाणलीं । गोपनाथासीं ।' -कथा ४.३.२६५. ४ मुक्त करणें; सोडविणें (पाप इ॰ कां पासून); 'उगाणिलीं जन्ममरणें.' ४ लुटणें. 'सभेसि राजा उगाणवी । तै मृत्यूची पदवी मस्तका आली ।' -एभा १.२११. ५ शुन्य होणें. 'तेथ उगाणलें क्रियाकर्म । लाजा विराले धर्माधर्म ।' -एभा २३. ७००. [सं. उद्ग + ग्रहण; प्रा. उग्गाहण]
उगणणे
सक्रि. हिशेब देणे; झाडा देणे; अर्पण करणे : ‘तें उगणिलें मज कर्म ।’ − ज्ञा ९·४००.
उपार
पु. उपाहार; उतारा; देवादिकांना किंवा भूतपिशाचादिकांना तांदूळ, साखर वगैरे अर्पण केलेले पदार्थ. [सं. उप + आहार]
उपार
पु. उपहार; उतारा; देवांदिकांस किंवा भूतपिशा- चादिकांस तांदूळ, साखर वगैरे अर्पण केलेले पदार्थ. [सं. उप + आहार]
उपधान
न. १ अर्पण करणें; देणें; पोंचविणें; नेणें (गुणधर्म स्वभाव इ.) 'साधुसमागम अंतःकरणांत विनयांचें उपधान करितो.' २ (सामा.) उपाधि, सान्निध्य यायोगें एका व्यक्तीचे गुणधर्म दुसर्या व्यक्तीस प्राप्त होणें; गुणधर्माची देवघेव; एखा- द्याचे स्वभावगुणधर्म यांची छाया दुसर्यावर पडणें; गुणपरावर्तन. [सं. उप = जवळ; धा = ठेवणें]
उपधान
न. १. अर्पण करणे; देणे; नेणे. २. (सामा.) उपाधी, सान्निध्य यायोगे एका व्यक्तीचे गुणधर्म दुसऱ्या व्यक्तीला प्राप्त होणे; गुणधर्मांची देवघेव; एखाद्याचे स्वभावगुणधर्म यांची छाया दुसऱ्यावर पडणे; गुणपरावर्तन. [सं. उप + धा]
उपहारणे
उक्रि. अर्पण करणे; देणे : ‘तेंचि भस्म ईश्वरासि । उपहारावे तुम्ही हर्षी ।’ –गुच ४०·८१.
उपहारणें
उक्रि. अर्पण करणें; देणें. 'तेंचि भस्म ईश्वरासि । उपहारावें तुम्ही हर्षीं ।' -गुच ४०.८१. [सं. उप + आ + हृ]
उत्क्रांति
स्त्री. १ ऊर्ध्वगति; मरण. २ (चुकीनें सध्यां रूढ) विकास; उन्नति (इं) इव्होल्यूशन. [सं.] ॰धेनु-स्त्री. मरणसमयीं सुखानें मृत्यु यावा व पापक्षालन व्हावें म्हणून ब्राम्हणास अर्पण केलेली गाय. [सं.] ॰वाद-पु. विकासवाद; मूळ द्रव्यांतील शक्तीची क्रमाक्रमानें वाढ झालेली आहे व हा पूर्वापरक्रम किंवा सरणी सोडून मध्येंच उपटसुळासारखें कांहीं निर्माण झालें नाहीं असें मत-गीर १६८. [सं. उत् + क्रम्-क्रान्ति]
उत्क्रांतिधेनु, उत्क्रांतिधेनू
स्त्री. मरणसमयी सुखाने मृत्यू यावा, पापक्षालन व्हावे म्हणून ब्राह्मणाला अर्पण केलेली गाय. [सं.]
उत्सर्ग
पु. १ बाहेर टाकणें; टाकून देणें; त्याग; दान; अर्पण. सामाशब्द-मलोत्सर्ग; मुत्रात्सर्ग; मूत्रोत्सग; वृषोत्सर्ग वगैरे. 'संक्रमण उत्सर्ग । विण्मूत्राचा ।' -ज्ञा १३.११९. २ नियम; विधि; रीत. उ॰ उत्सर्ग. शास्त्र; 'मनुष्यानें सत्य बोलावें या उत्सर्गाचा कोणेकाचा प्राणरक्षणार्थ अस्त्यहि बोलावें या विशेष वचनानें बाध होतो.' ३ धर्म करणें विहीर, धर्मशाळा इ॰ देवास अपर्ण करणें. [सं. उत् + सृज् = टाकणें]
उत्सृष्ट
वि. टाकलेलें; सोडून दिलेलें; त्यक्त; उत्सर्जन केलेलें. ॰पशु-पु देवतेप्रीत्यर्थ सोडलेला, अर्पण केलेला बैल. [स. उत् + सृज्]
उत्सृष्टपशु, उत्सृष्टपशू
पु. देवतेसाठी सोडलेला, अर्पण केलेला बैल, पशू. [सं.]
वाहणें
उक्रि. १ उचलून नेणें; एका जागेवरून उचलून दुसऱ्याजागीं नेऊन ठेवणें. 'वाहतिये वेळें जड । शिदोरी जैसी ।' -ज्ञा १८.१८५. -एभा ३.८७. 'शीतलजल कलश शीघ्र वाहोन ।' -मोभीष्म १२.४. २ भार सहन करणें, सोसणें; आधार देणें; आश्रय देणें. 'गेल्या पळोनि गायी पृष्ठावरि पुच्छभार वाहोनी ।' -मोविराट ४.८८. ३ मनांत बाळगणें; धरणें. 'परी ते चाड एकी जरी वाहे ।' -ज्ञा ४.१९५. 'वाहतसे हृदयाब्जीं अत्युत्सुक मीं' -मोसंभा २.३२. 'मरे येक त्याचा दुजा शोक वाहे ।' -राम १७. ४ चालू ठेवणें; पुढें चालविणें (व्यवहार, धंदा वगैरे). ५ अर्पण करणें; पूजेमध्यें देणें ठेवणें. 'उडवी किरीट विधिनें जें निर्मुनि यासी वाहिलें होतें ।' -मोकर्ण ४७.७६. 'वाहुनि मस्तक चतणीं ।' -मोअनु ४.५५. ६ (शपथ) घेणें. ७ देऊन टाकणें; स्वत्वनिवृत्ति करणें; टाकून देणें; सोडून देणें; त्याग करणें. ८ काढून देणें; पुढें करणें; स्वतःजवळचे देणें. 'जामीन रहा आणि गाठेचें वाहा.' ९ चढविणें; बसविणें; सज्ज करणें (धनुष्यास गुण वगैरे). 'कैकेयांचीं चापें खंडूनी...अन्य धनुष्यें वाहुनीं ते ।' -मोकर्ण ९.८. 'जो या धनुष्या वाहील गुण ।' -रावि ७.५४. १० (जमीन) कसणें; लागवडीस आणणें; पेरणें; मशागत करणें. 'काय जाहालें न वाहता भुई पेरिजे ।' -ज्ञा ११.१६२. ११ धारण करणें; नेसणें; वापरणें. 'वाहे वल्कल जटा ।' -मोरामायणें २३. 'हे विपरिताक्षित असतीसी नवनवा गुणा वाहे ।' -मोमंभा १.७३. १२ चालविणें; उपयोग करणें. 'जेती घाणे वाहती ।' -पाटण शिलालेख. १३ हल्ला करणें; चाल करणें. 'मग तेणे विक्रमसेनु प्रौढवर्धनावरि सबळु वाहौनु आला ।' -पंच १.३२. चिंता वाहणें-काळजी वाहणें; अस्वस्थता बाळगणें. वाहणें- अक्रि. १ वारा, पाणी हलणें; एका जागेवरून दुसऱ्या जागीं जाणें; सरकणें; पुढें जाणें; गतिमान असणें (सैन्य, पशूंची, गाड्यांची रांग वगैरे). 'वाहे हिममंद सुगंध पवन.' -मोभीष्म ११.८७. २ (नाक, व्रण, गळतें भांडें यांतून) पाणी, पू वगैरे बाहेर बाहेर येणें; स्त्रवणें; पाझरणें; गळणें; ठिबकणें. ३ एका दिशेनें जाणें; लांबवर पसरणें; रांगेनें असणें (रस्ता, किनारा, डोंगराची रांग). 'परमार्गु वाहाती सदैवें । जेआंलागीं ।' -ऋ १००.४ चालू असणें; गति- मान असणें; कार्य करीत राहणें (यंत्र, हत्यार; साधन). ५ तीक्ष्ण असणें; उपयोग होण्याच्या स्थितींत असणें; धार असणें (शस्त्र, हत्यार वगैरे). ६ प्राप्त होणें; चालू असणें. 'रुपयाचें दीड शेर पाणी अशी कठिण वेळा वाहली' -ऐपो २२५. [सं. वह्] वाहता झरा-री-पुस्त्री. जिवंत झरा; ज्यांतून नेहमीं पाणी वाहात असतें असा झरा, प्रवाह. २ चालू प्रवाह, वर्षाव (देणगी, खर्च वगैरेचा); चांलू पुरवठा; रेलचेल; चंगाळी. वाहतवणा-पु. रानांतून चालणारा; प्रवासी. 'आणि जन्मशतांचा वाहतवणा ।' -ज्ञा ७.१२९. वाहत वाटोळें-न. १ जुजवी किंवा तात्पुरती व्यवस्था, दुरुस्ती, उपाययोजना; मिटवामिटव (वाद, भांडण, रोग यासंबंधी कामचलाऊ योजना). २ आरंभ; सुरुवात; चालू हो्ण्याची क्रिया (काम, धंदा वगैरेची). ३ सत्यानाश; पूर्ण नाश; फन्ना; वाटोळें (धंदा, कार्य, व्यवहार, सल्ला वगैरेचा). वाहता- वि. १ मोकळेपणानें वावरणारे, हलणारें, फिरणारें, वागणारें; तीक्ष्ण धारेचें; कुशाग्र (शस्त्र, बुद्धि वगैरे). उदा॰ वाहती कुऱ्हाड. २ चालू; कार्य करीत असलेलें; चालतें; सुरू (काम, धंदा, व्यवहार, कारखाना वगैरे). वाहती घाणा-पु. चालू असलेला, उपयोगांत असलेला तेलाचा घाणा. वाहता झरा, वाहती झरी-वाहत- झरा पहा. वाहता रस्ता-पु. रहदारीचा रस्ता. वाहती- स्त्री. १ प्रारंभ: सुरुवात. २ चाल; वहिवाट; शिरस्ता; प्रघात. वाहतीकूस-स्त्री. गर्भधारणा करण्यास योग्य अशी स्त्रीची अवस्था; मुलें व्हावयास लागण्याची अवस्था. 'एकदां वाहती- कूस झाली म्हणजे वाटेल तितकीं मुलें होतील.' 'पावसाची वाह- तीकूस झाली.' = पावसाळा सुरू झाला. वाहतीगंगा-स्त्री. अनुकूल परिस्थिति; चालू काम; भरभराटलेला धंदा; सुकाळ; चंगळ; संपन्नता. (क्रि॰ चालणें; होणें.) वाहत्यागंगेंत हात धुवून घेणें- अनुकूल काल असेल तों आपलें कार्य साधून घेणें. वाहती धारा- १ तीक्ष्ण पाजळलेली धार (हत्याराची); याच्याउलट पडती धार. २ वाहत असलेला, चालू असलेला पाण्याचा प्रवाह (नदी, ओढा वगैरेचा); पाणी, रस वगैरेचा पडता प्रवाह, झोत. ३ (ल.) धंद्याची, कामाची चलती, भरभराट, घाई, धुमश्चक्री. उदा॰ लढाईची-धर्माची-वादाची-वाहती धार. वाहती वाट-स्त्री. १ रहदारीचा रस्ता; मेकळा, बंद न केलेला रस्ता; चालू रस्ता. २ मुलें होत असलेला स्त्रीचा गर्भाशय, कूस. ३ (ल.) सुरवात; आरंभ; ओनामा (धंदा, व्यवहार इत्यादीचा). वाहतु(तू)क- स्त्री. रहदारी; येजा; वापर; नेआण. -पु. वाहणारा; लाकडाची नेआण करणारा. -नस्त्री. वाहतुकीची मजुरी. वाहतुरा-वि. वाहती; तीक्ष्ण (शस्त्राची धार). वाहतें-वि. चालू; तीक्ष्ण; धारेचें; उपयोगांत असलेलें (शस्त्र वगैरे). वाहतें नांव-न. चालू, व्यावहारिक नांव.
वाइ(ई)णें
सक्रि. १ वाहणें; धारण करणें; चढविणें. 'धनुष्यें वाइलीं हातीं । ' -ज्ञा ११.६८२. -एरुस्व १०.२४. २ देणें; अर्पण करणें. 'तेणें रीतुरायें वाईंलें ।' -भाए ४२८.१३३. 'महा- तपाचा पाउड वाइजेंच । ' -शिशु ११३. 'प्रवृत्तीवरी निगड वाउनि ' -ज्ञा ८.२४. [सं. वह्]
वाणें
क्रि. वाहणें; अर्पण करणें. 'महातपाचा पाउड वाइजे ।' -शिशु ११३. 'मग-मृगी सुताचे जुझार । वाति कामिनी । -भाए ४३८. 'सवर्गा वाती वांकुलिया ।' -ज्ञा ७.१९०. [वाहणें]
वे (वें)च
पु. १ खर्च; व्यय. (खर्च शब्दाशीं युक्त होऊन प्रयोग); खर्चवेच. 'परि न योग्य हा असा वेच ।' -मोउद्योग ८.१४; -ज्ञा १५.५५५. 'वेचास रुपये वीस देविले ते आज्ञे- प्रमाणें पावविले ।' -पेद ८.२७. २ क्षय; नाश. 'तरी तें पद गा नाहीं । वेचु जया' -ज्ञा १५.३०६. [सं. व्यय प्रा. विच्च; का. वेच्च ] ॰खर्च-पु. खर्च; खर्चवेच पहा. ॰क-वि. खर्चिक; सढळ हातानें खर्च करणारा; दिलदार; उदार. वेचणें-उक्रि. १ खर्चणें; खर्च करणें, होणें. 'फुकाचे मुखी बोलतां काय वेंचे ।' -राम. २ नाहींसा होणें; संपणें; कमी होणें; क्षीण होणें. 'साहित्य- स्वारस्य समस्त वेंचे ।' -सारुह १.४६. 'आपुलें पाप आप- णासी । ग्राह्य नव्हे पुत्रशिष्यासी । न भोगतां स्वदेहासी । न वेंचे पाप परियेसा ।' -गुच २.१७८. ३ अर्पण करणें; पाणी सोडणें; गमावणें; कामीं लावणें. 'वेचुनि सर्वस्वातें, युष्मत्प्रियहित करीन बहुधा मी ।' -मोभीष्म ३.१५. ४ खर्च करणें; देणें; योजणें; योग्य कारणीं उपयोग करणें. 'तोंडीचें गांठीचें । माता बाळकालागीं वेंचे । तेवीं भाविकालागीं आमुचें । सर्वस्व साचें मी वेंचीं ।' -एभा ११.११५९. ५ विकणें. 'वृथा आसक्ती केले अभाग्य । शिश्नोदरा सांग वेचले ।' -एभा ७.६३८. [सं. व्यय = खर्च; प्रा. विच्च; का. वेच्च] वेंचता-वि. (काव्य) क्षीण होणारा. 'लिंगदेह कमळाचा । पोटीं वेंचतया चित्भ्रम- राचा ।' -ज्ञा १६.४. वेचिक-वि. (गो.) खर्चिक. वेचु- करी-वि. १ (महानु.) खर्चिक. २ व्ययाधिकारी. 'सेनवै दिन- करू । वेचुकरी सुधाकरु ।' -शिशु ५२. वेंचू-पु. १ खर्च; वेच पहा. 'अधिक वेंचूं कोण सोशी ।' -एभा २३.९६. २ नाश. 'कापुरीं आगी प्रवेश । कीं अग्नी घातला पोतास । तैसा नव्हे सौरस । वेंचू जाला ।' -अमृ ७.१७७.
वहाणें
(सं) प्रवाहरूपानें जाणें. २ प्रवाहाबरोबर जाणें. ३ जमिनीची वहिवाट करणें. ४ (ओझें) नेणें. ५ देवादिकांस अर्पण करणें.
वक्कल
अर्पण पत्रक.
वोळग
स्त्री. १ सेवा; उळिग पहा. 'होईन पुरेपण । वोळ- गेचें ।' -ज्ञा १३.४२४. -एभा १४०. २ आश्रय; ओळग. 'चंद्रसतार वोळग घाली । नखप्रभेमाजी ।' -पूजावसर ११. वोळगण, वोळगी-सेवा; वोळग. 'बहिणी म्हणे पूर्ण विरक्ति आनसीं । ज्ञान हें तयासीं वोळहण ।' -ब १६०. 'जंव देह हें असेल । तव वोळगी ऐसी कीजेल ।' -ज्ञा १३.६३०. वोळं- गणा-वि. सेवक; उपासक. 'स्वधर्म पंथीं वर्तता जाण । सिद्धी होती वोळगण्या ।' -मुआदि ८.८०. वोळगणें, वोळंगणें- क्रि. १ सेवा करणें; आश्रय करून राहणें. 'अष्टसिद्धि याचे द्वारीं । वोळंगत राहतील निरंतर ।' -गुच ११.१८. -मुआदि १८.२०. २ बिलगणें; लोंबणें. 'वोळगे फळभार । लावण्येसी ।' -ज्ञा ३.१००. ३ जवळ जाणें; भेटणें. 'नगरा येका जाउनि रायाते वोळगे ।' -पंच ४. ४. वोळगविणें-(महानु.) सेवे प्रीत्यर्थ अर्पण करणें. 'वाईसी कापुरे वीडा वोळगवीला ।' -पूजावसर ३३.
यज्ञ
पु. १ याग; होम. २ बलिदान; एखादी वस्तु देव- तेस अर्पण करण्याची क्रिया; त्याग. ३ धर्मकृत्य; ईश्वरविषयक कर्म. [सं. यज् = पूजा करणें] ॰कंकण-न. यज्ञाच्या वेळीं यजमानानें हातांत बांधावयाचें कंकण. 'तें यज्ञकंकण करां- बुजिं राघवातें ।' -लवकुशाख्यान. ॰कुंड-न. यज्ञाच्या वेळीं होमांत आहुति टाकण्यासाठीं केलेली जागा; होमकुंड; वेदी. ॰दीक्षा-स्त्री. यज्ञ करण्याचें व्रत; हें व्रत घेतांना कांहीं तरी खूण व्रत घेतल्याचा दाखला म्हणून घ्यावयाची असते. यावरून यज्ञदीक्षा म्हणजे ती खूण असाहि अर्थ होतो. उदा॰ यज्ञकंकण. ॰नारायण-पु. अग्निदेवता. ॰पशु-पु. यज्ञांत बळी देण्यास योग्य अगर बळी देण्याचा पशु. ॰पुरुष-पु. विष्णु; यज्ञदेवता. 'तूं यज्ञपुरुष नारायण ।' -एरुस्व ३.३१. ॰मुख- पु. अग्नि. 'यज्ञमुखें काढीतसे खोडी । तो भिल्लिणीची देखोनी आवडी । '॰याग-पु. यज्ञ, होम इ॰. यज्ञ वगैरे. [एकाच अर्थाचे दोन्ही शब्द] ॰वृक्ष-पु. यज्ञाला ज्याचें लांकूड उपयोगी पडतें असे वृक्ष. हे-पिंपळ, पळस, औदुंबर, रुई, शमी, खैर व आघाडा. निघंटूमध्यें वेहेकळ व नदीवड किंवा खुजावड यांनांहि यज्ञवृक्ष म्हटलें आहे. ॰शाला-स्त्री. यज्ञाची जागा; होमशाळा. [सं.] ॰सूकर-पु. वराहातार. यज्ञांग-न. १ यज्ञाचा भाग. २ -पु. ज्याचे सर्व अवयव यज्ञरूप आहेत असा श्रीकृष्ण; यज्ञमूर्ति कृष्ण. 'तया नांव त्यागु । म्हणे तो यज्ञांगु । हें मानूनि सुभगु । पार्थु पुसे । ' -ज्ञा १६.१३५. [यज्ञ + अंग] यज्ञिय-वि. यज्ञासंबंधीं; बली देण्यास योग्य. [सं.] यज्ञेश-पु. यज्ञांतील मुख्य देवता; यज्ञपुरुष; यज्ञफलदाता (विष्णु). [यज्ञ + ईश] यज्ञोपवीत-न. जानवें (हल्लीं हें सूताचें नऊ पदरी तीन फेरे असलेलें झालें. प्राचीन काळीं तें उपवीत म्हणजे विणलेलें वस्त्र होतें.) [सं. वे = विणणें]
गंगा
स्त्री. १. गंगा (भागीरथी) नदी; तिचा दैवी अवतार (देवी); नदी देवता. २. गोदावरी नदी : ‘गंगातीरास येऊन रहावे.’ - ऐलेसं २६२३. ३. (सामा.) पवित्र नदी : ‘भवताली एक गंगा झुळझुळ वाहे ।’ - देप ९८. ४. पवित्र कार्याकरिता घेतलेले पवित्र नदी, झरा, कुंड यातील पाणी. [सं.] (वा.) गंगा घेणे, गंगा उचलणे - गंगेची शपथ घेणे. गंगा मनाला घालणे - मन निर्मळ करणे; रुखरुख घालवून टाकणे; केलेला अपराध कबूल करून विवेकाची टोचणी बंद करणे. गंगा यमुना वाहणे - रडे येणे; डोळ्यातून पाणी येणे. (दोन्ही डोळ्यातील अश्रुधारा वाहून गंगायमुना नद्यांप्रमाणे एकत्र मिळतात यावरून). आळशावर गंगा लोटणे, आळशावर गंगा येणे - आपोआप फायदा होण्याची संधी येणे. वाहत्या गंगेत हात धुणे - दुसरा मनुष्य एखादे पुण्यकृत्य करीत असताना त्याला थोडासा हातभार लावून त्याच्या पुण्यात वाटेकरी होणे; कोणाचे नुकसान न करता सहजगत्या होण्यासारखा आपला फायदा करून घेणे; संधीचा फायदा घेणे. गंगेतील पाणी गंगेत सोडणे - ज्या ठिकाणाहून घ्यायचे त्याच ठिकाणाला नम्रभावाने अर्पण करणे. उपकार फेडताना हा वाक्प्रचार योजतात. गंगेस घोडे नाहणे, गंगेत घोडे नाहणे - आरंभलेले महत्कृत्य शेवटास जाणे; भगीरथ प्रयत्न करून कृतकृत्य होणे (महाराष्ट्रातील घोड्यांना पेशव्यांनी गंगेच्या म्हणजे भागीरथीच्या आसपासचा प्रांत जिंकून तिचे पाणी पाजले व मराठी साम्राज्य स्थापिले यावरून) : ‘एकदाचा हा कोश संपविला म्हणजे गंगेस घोडे न्हायले.’ - शास्त्रीको.
भेट
स्त्री. १ गांठ; माणसांचा संयोग; मुलाखत. २ परस्प- रांची गांठ घेतांना दिलेलें आलिंगन; मिठी. ३ मोठ्या मनुष्यास भेटावयास गेलें असतां द्रव्य, वस्त्र, फळें इ॰चा दिलेला नजराणा. ४ श्रेष्ठास किंवा इष्टमित्रास दिलेली देणगी, उपायन; बक्षीस. [देप्रा. भिट्टन; हिं.] ॰बकरा-पु. १ (ल.) कोणी सरकारी अंमल- दार, देशमुख आपल्या गांवीं आला असतां त्याला गांवकामगार, गांवकरी देतात ती भेट, देणगी. २ लग्नांत वधूची आई, वराच्या आईला लग्नास नेतांना किंवा रासनहाणाच्या वेळीं देते तो नज- राण्याचा मान. (वरील प्रसंगीं प्राचीन काळीं प्रत्यक्ष बकराच देत). [भेट + बकरा] ॰भलाई-स्त्री. (ना.) भेटीगांठी; बोलणें इ॰ भेटणें-अक्रि. १ एखाद्याकडे मुद्दाम कांहीं कारणासाठीं जाणें; मुलाखत करणें; गांठ घेणें. २ आलिंगणें; कवटाळणें. ३ यदृच्छेनें कोणी कोणाला दिसणें; गांठ पडणें. ४ (खा. व.) मिळणें; पावणें. 'मला अमुक पैसे भेटले.' भेटतखेंवो-क्रिवि. भेटतां- क्षणीच. 'जीवीं बांधें उदका । भेटतखेवो ।' -ज्ञा १४.९५. भेटविणें-सक्रि. १ गांठ घालून देणें; संयोग करून देणें. २ कव- टाळविणें. ३ अर्पण करणें. 'बोधोनि पांचाळ नरेश्वर । भेटवी उपायनें अपार ।' -मुआदि ४५.६६. भेटाभेट-स्त्री. परस्परां- तील भेट; आलिंगन इ॰ [भेट द्वि.] भेटि-टी-स्त्री. १ (काव्य) भेट; मुलाखत; गांठ. 'भेटी लागी पंढरीनाथा । मनालागी तळमळ वेथा ।' २ नजराणा; देणगी 'गोडी याची मज बहु भेटि उदरा! तुला गमे थोडी ।' -मोकृष्ण ८१.१६.
नजर
स्त्री. १ वरिष्ठाची कृपा संपादन करण्यासाठीं त्यास भेट म्हणून दिलेली वस्तु; उपायन. (क्रि॰ करणें). २ बडे लोक मुलाखतीच्या वेळीं परस्परांस भेट म्हणून देतात त्या वस्तूंपैकीं प्रत्येक; नजराणा. (क्रि॰ करणें). ३ बापाच्या गादीवर, हुद्यावर बसतेसमयीं मुलानें सरकारास अगर सरकारच्या प्रतिनिधीस द्याव- याची जुन्या राजवटींतील खंडणी. मराठी अमलांत ही खंडणी फक्त जहागिरदार अगर इतर सरकारी नोकर यांच्याकडून घेतली जात असे. दत्तकाच्या बाबतींत मात्र ती सर्वांकडून घेतली जात असे. ४ (ल.) भेट; मुलाखत. ५ (सामा.) भेटीची वस्तु; अहेर; नजराणा. नजराणा पहा. [अर. नझ्र] सामाशब्द- ॰कारखाना-पु. घाटाजवळ राजापुर तालुक्यांत जंगलांतील लांकडें तोडण्याचा दिलेला मक्ता. -मोल. ॰खोलाई-स्त्री. शेतां- तील पीक कापण्याची परवानगी मिळण्याकरितां खेड्यांनीं, गांवांनीं द्यावयाचा कर. ॰गलबत-जहाज-न. गलबतांवरील कर. [नजर + गलबत] ॰घी-न. सरकारी नोकरांच्या बरदास्तीकरितां गांवकर्यांनां द्यावें लागणारें तूप. [नजर + हिं. गुज. घी = तूप] ॰तोफेजात-स्त्री. नजराणा. 'इंड्ग्रेज नजर-तोहफेजातशिवाय सव्वीस लक्ष रुपये दर्साल हुजरांत देत होते.' -ऐटि १८. ॰नज राणा-पु. (व्यापक) कनिष्टांनीं वरिष्टांना सादर, अर्पण केलेल्या वस्तु इ॰; बड्या लोकांनीं भेटीच्या वेळीं परस्परांस नजर केलेल्या वस्तु; नजर अर्थ १,२ पहा. [नजर + नजराणा] ॰नियाज-न्याय- पु. नजराणा. 'हल्लीं तुम्हाशी भेटीचा पैगाम करितील व नजर- निजाय कबुल करितील.' -पया ८१. 'खुर्शीवर शहाजादेस बसवून तमाम सर्दारांनीं नजर-न्याय केले.' -ख ८.४२२५. [नजर + फा. नियाझ्] ॰पट्टी-स्त्री. १ धान्याचा प्रत्येक खंडी- मागें द्यावा लागणारा कर. २ नजर म्हणून द्यावयाची रकम जम- विण्यासाठीं बसविलेली पट्टी, वर्गणी, कर. [नजर + पट्टी] ॰पागा- स्त्री. नजर देण्याकरितां ठेवलेल्या घोड्यांची पागा. 'एक घोडा त्यांस द्यावयाचा तो नजरपागेपैकीं देणें.' -वाडसमा १. १५८. [नजर + पागा] ॰भेट-स्त्री १ सरकारी अंमलदारास प्रथम भेटीच्या वेळीं दिलेला नजराणा. २ जमाबंदीच्या वेळीं प्रत्येक पाटलानें सरकारास द्यावयाची एक रूपयाची नजर. [नजर + भेट] ॰मुबारक-ख-स्त्री. भेटीचा नजराणा; मंगल अभिनंदनपर भेट 'ह्याचपासून नजर-मुबारखी घेऊन पुढें मुलुकास कौल सादर केला.' -इस १ चांदबिबी १०. [नजर + अर. मुबारक् = शुभ; मंगल] ॰स्वारी-स्त्री. पिकांवरून घोडदळ, पायदळ, इ॰ कांची स्वारी नेऊं नये म्हणून शेतकर्यांनीं स्वारीवाल्यांस द्यावयाची खंडणी. [नजर + स्वारी]
रुद्र
पु. १ शंकराचा एक अवतार; शंकर. २ ब्रह्मदेवाच्या कपाळापासून उत्पन्न झालेला देव; देवताविशेष. हे रुद्र अकरा आहेत. अकरा रुद्र पहा. (यावरून ल.) ३ अकरांचा समुदाय; अकरा ही संख्या. ४ रुद्रताल; शिवस्तोत्र; ह्या तालांत अकरा मात्रा व पांच विभाग असतात. ५ अकरावा रुद्र; मारुती; हनुमान. 'चूडा- मणिसह देवी प्रभु आणाया निरोप दे रुद्रा ।' -मोरामायणें १.१८७. -वि. भयंकर; रडविणारा. [सं. रुद = रडणें] ॰काठी-वि. तीन धागे काळे व एक पांढरा, नंतर एक काळा व एक पांढरा असें उभार व आडवणहि त्याच प्रकारचें, किनार कोणतीहि असें (लुगडें). ॰कोप-पु. भयंकर प्रसंग; भयंकर संकट. 'क्षुद्र इतर जे शुद्रचे तयांवरि रुद्रकोप या क्षणीं ।' -ऐपो ३७०. ॰गांठ-स्त्री. कापड विणतांना त्यांत चौकटीसारखें उठविलेलें चिन्ह. ॰गांठी-वि. रुद्र- गांठी असलेलें (लुगडें, वस्त्र इ॰) ॰ताल-पु तालाचा एक प्रकार. रुद्र अर्थ ४ पहा. 'मंगलाचरणाचा एक जिवाचा एक ताल आणि भरतवाक्याला रुद्रताल हा टेवलेलाघ.' -भा ३८. ॰पिशाच-पु.न. १ काशींत केलेल्या पापाचें क्षालन होईपर्यंत (काशींत मेल्यानंतरहि) पिशाच योनींत राहिलेला जीव. २ (ल.) शीघ्रकोपी, अविचारी, रागीट मनुष्य. ॰बलि-पु. रुद्र देव- तांना अर्पण केलेला मांसाचा बली. ॰भूमि-स्त्री. स्मशान; मसणवटी. ॰मळी-स्त्री. (व.) अंधारी; झांपड. 'असा नास चाललेला पाहिला कीं आमच्या डोळ्यांना रुद्रमळी येते.' ॰योनि- स्त्री. १ काशी येथील विश्वेश्वराच्या देवळाबाहेरील खडकांतून गेलेले भुयारासारखा प्रदक्षिणेचा मार्ग ह्या मार्गात मनुष्य मेल्यास तो रुद्रापिशाच होतो. हा मार्गं उतरता आहे व ब्रह्मयोनीचा मार्ग चढावाचा आहे. यावरून ब्रह्मयोनि आणि रुद्रयोनि हे शब्द ज्या घराचे भाग उंचसखल असतात त्याला लावतात. २ लांब व अरुंद गल्ली; बोळवंडी. ब्रह्मयोनि पहा. ॰वात-स्त्री. चार बोटें लांबीची अकरा सुतांची वात. अशा वातींचा लक्ष लावतात. ॰वि(वी)णा-पु. वीण्याचा एक प्रकार. ह्याचा आकार तंबोर्या- सारखा असतो. दांडीचें टोक वळवून पाठीकडे नेलेलें असतें. दांडीच्या मागें शेवटाला एक गोल भोपळा बसविलेला असतो. दांडीवर मेणांत चोविस पडदे पक्के बसविलेले असतात. ह्याला चार तारा असून त्या सा, प, सा, म, ह्या स्वरांत. व आणखी तीन तारा प, सा व तार सा मध्यें लवितात. वाजविण्याचा सर्व प्रकार बीनाप्रमाणें असतो. ॰विंशति-स्त्री. प्रलयकाळ (माधवग्रं- थांत हाच शब्द रुद्रवंश, रुद्रवंशी असा आला आहे.) 'भयानका क्षिति झाली घर-घाली रुद्रविंशति जगिं फांकली ।' -ऐपो ३६८. [साठ संवत्सरांतले शेवटचे वीस संवत्सर रुद्र देव- तेचे म्हणजे संहार देवतेचे असल्यामुळें ते अनिष्ट मानतात.] ॰संख्या-वि. अकरा. 'कृष्णावाळुवंटीं ब्रह्मचारी पूजिले । रुद्र- संख्या नाभिपर्यंत पुरिले ।' -सप्र ३.३७. ॰सावर्णि-चवदा मनु पहा. -गीर ७५२. रुद्राचल-पु. रुद्र नांवाचा पर्वत. [रुद्र + अचल] रुद्राणी-स्त्री. पार्वती. 'शिव भवानी रुद्राणी । कां पां न पावतीच कोणी ।' -एरुस्व ५.७४. रुद्रावतार-पु. १ शिवाचा अवतार; शिवाचें उग्रस्वरूप. २ (ल.) तापट किंवा रागीट मनुष्य; तामसी व्यक्ति. [रुद्र + अवतार] ॰धा ण करणें- संतापणें; अतिशय संतप्त होणों; अति क्रोध येणें. रुद्राक्ष-पु. १ एक वृक्षविशेष आणि त्याचें फळ. याचे मोठे मोठे वृक्ष होतात. पानें गंगेरीसारखीं असतात. हीं झाडें कोंकणांत थोडीं व म्हैसुर- कडे फार आहेत. या झाडाच्या फळांतील बिया तेच रुद्राक्षमणी. याची माळ करून शिवभक्त गळ्यांत धारण करितात. रुद्राक्षाला एक ते सहा मुखें असतात. याच्या आणखी जाती गौरीशंख व रुद्राक्षल अशा आहेत. २ शंकराचा डोळा; शिननेत्र. 'कल्या- णाचे बाण निर्वाण मारा । रुद्राक्षींच्या पावकातुल्य धारा ।' -मुरामायणें बालकांड ११०. [सं. रुद्र = शंकर + अक्षत् = डोळा]
वेणी
स्त्री. १ डोक्याचे केंस, वाख इ॰ चे तीन किंवा अधिक पेड एकांत एक विशिष्टप्रकारें गुंतवून सर्पाकार केलेला आकार; अशा प्रकारची रचना, बांधणी. (क्रि॰ घाळणें). 'देव्ह- ढियां वेणियां खोविलियां' -शिशु ६५४. २ गुंतागुंत. 'तिहीं पुसली योगाची वाहाणी । ताता हें गुण चीत्ताची वेणी ।' -भाए ६७०. ३ पाण्याचा अरुंद ओहळ; प्रवाह. ४ नद्यांचा संगम; त्रिवेणी संगम. ५ पंक्ति; रांग. ६ फुलें वेणीप्रमाणें दोर्यांत गुंफून केलेला (बायकांनीं खोपा-अंबाडा या भोंवतीं घालण्याचा) गजरा. ७ वेणीफणी पहा. 'शाळा तुझी सकाळीं । वेणी नाहीं झालेली ।' -अभिनयगीत. ८ करवतीची वेणीसारखी दिसणारी धार. [विणणें] ॰करणें-करविणें-वेणी घालणें. 'तों गुरुपत्नी न्हावुनि वेणी करवीत बैसली होती ।' -मोआदि २.११८. ॰दंड-पु. (काव्य) वेणीचा पट्टा, शेपटा. 'वेणीदंड काढिला । गळफांस वेगीं घातला ।'. ॰दान-न. प्रयागक्षेत्रांत सुवासिनीनीं आपल्या वेणीचीं दोन बोटें लांबाचीं अग्रें कापून त्रिवेणीस केलेलें दान; किंवा या दानाचा विधि (सर्वास या क्षेत्रीं मुंडन सांगींतलें आहे पण सुवासिनीनीं फक्त दोन बोटें लांबीची वेणी कापून गंगेला अर्पण करावयाची असते. -तीप्र ९३.) ॰दार-वि. वेणीच्या आकाराचा. 'एका लाकडाचे फळीस वेणीदार खिळे मारून सुरा करतात.' -विक्षिप्त १.८३. ॰फणी-स्त्री. केसांना तेल लावणें, ते विंचरणें, त्यांची वेणी घालणें, कुंकू लावणें, डोळ्यांत काजळ घालणें इ॰ स्त्रियांचा प्रसाधनविधि. (क्रि॰ करणें; होणें). (सामा.) स्त्रियांचा सकाळचा शरीरमंडनविधि. 'तुझी वेणीफणी सुद्धां अजून झाली नाहीं.' अमात्यमाधव. [वेणी + फणी; तुल॰ सं.वेणी- प्रवेणी]
संकल्प
पु. १ मनोदय; हेतु; मनांतील विचार, इच्छा; 'सत्य संकल्पाचा दाता भगवान' -तुगा. २ निश्चय; निर्धार; अमुक गोष्ट करीनच करीन असा कायम बेत; प्रतिज्ञा. 'मारितो अरीला... प्रभुजी संकल्प हा मनें वरिला ।' -मोकर्ण ४३.४२. ३ एखादें व्रत, संस्कार, विधि इ॰ आरंभितांना अमुक एक फल मिळावें म्हणून मी हें कर्म करतों अशा प्रकारें त्या कर्माचा उच्चार करून हातांत पाणी घेऊन तें सोडण्याची क्रिया; एखाद्या तीर्थाच्या ठिकाणीं स्नान करतांना, किंवा एखादी वस्तु दान कर- तांना, तसेंच ब्राह्मणभोजंनारंभीहि असें उदक सोडतात. 'सागुनि संकल्प सोडवी पाणी ।' -मोवन ८.२९. 'यजमान धर्मसंस्का- राला सिद्ध झाला पण सकल्पाचा उच्चार करीत नाहीं ' -केसरी १२.७.३०. ४ मानसिक कर्मप्रवृत्ति; मनोविकार; वासना. 'घेऊनि विद्याशस्त्र लखलखित । संकल्पपशूचा करूनि घात । ' -एभा १९.७६. ५ अंत:स्फूतिं; स्फुरण. 'मूळ माया जाणीवेची । मूळींच्या मूळ संकल्पाची ।' -दा १५.७२. ६ (चुकीनें) विकल्प; संशय.' हें देखोनि संकल्पीं पडियला ।' दावि ७.२.२८. संक- ल्पिणें-१ बेत करणें; ठरविणें; निश्चित करणें. २ (एखादें काम इ॰ एखाद्यावर) सोंपविणें; हवाली करणें. माथीं मारणें. ३ योजणें; कामीं लावणें; अर्पण करणें. 'जीवित संकल्पिलें तुझ्या- ठायीं ' -मोकर्ण ४२.३६. ॰बद्ध-वि. कोणतेंहि कर्म करण्याचा संकल्प केल्यामुळें तत्परतंत्र झालेला. ॰विकल्प-पुअव. कल्पना व संशय; डळमळित स्थिति; शंकाकुशंका. 'संकल्प विकल्प निमाला । मनेंसी बुडाला मनोरथु ।' -एभा ९.४२७. ॰विहंग- पु. मनोरूप पक्षी; मनोरथ; मनांतील हेतु. संकल्पित-धावि. १ योजिलेलें; निश्चित; ठरविलेलें; ठराविक. २ विधिनियत; ब्रह्मघटित. 'जें संकल्पित घडेल सत्वर तें ।' -मोउद्योग (नवनीत पृ. ३११).
चढणें
अक्रि. १ वर जाणें; ऊर्ध्व गमन करणें. आरूढणें; वर बसणें (डोंगर, टेंकडी, घोडा, झाड इ॰ च्या). २ उंच जाणें, होणें; वाढणें; खूप उंच असणें (इमारत, तारा). ३ वृद्धि पावणें; वाढणें; जास्त होणें; अधिक होणें; फुगणें; मोठा आकार होणें; विस्तृत होणें. (समुद्र, संपत्ति, ज्वर). 'त्या विहिरीस पाणी चढलें' 'कालच्या उपासानें आज पित्त चढलें.' ४ महाग होणें (किंमत, धारण). 'सोन्याचा भाव चढला आहे.' ५ कडक होणें; जलाल होणें; तीव्र होणें (भांग). 'भांग जसजशी छिनावी तसतशी चढती.' ६ अम्मल चढणें; मद चढणें; निशा येणें; उन्माद चढून गिरकी येणें; कैफ येणें (विष, मादक औषधि द्रव्य, विखार, उवाखा इ॰ नीं). 'मला घोटा कधीं चढत नाहीं.' ७ शिरणें; जाणें; शरीर त्यांत जाणें (चोळी, आंगरखा इ॰ अंगांत). (बंदुकींत बाग नटें, संगीन). 'आंगरखा चांगला चढतो पण जोडा चढत नाहीं.' आंत जाणें (खुंटी, खिळा, खीळ). 'ही खुंटी छिद्रांत चडत नाहीं अंमळ तास.' ८ सांचणें; तुंबणें; थकणें; चढत राहणें; हळू- हळू वाढत जाणें (ऋण, शंका, प्रश्न, इ॰). 'माझे वीस दिवस चढले त्यांचा पैसा द्या.' 'माझे पाचशें रुपये त्याजवर चढले.' ९ गर्वानें ताठणें, फुगणें; उन्मत्त होणें. 'एकदां कोठें लढाईंत यश आलें तर ते गृहस्थ अलीकडे चढले आहेत.' १० आच्छादणें; आव रण होणें; वर पसरणें; आक्रमणें (धूळ, काजळ, जंग, वुरसा, शेवाळ). ११ (देवादिकांना) वाहिलें जाणें; अर्पण केलें जाणें. 'झेंडूची फुलें देवास चढत नाहींत.' १२ सूर मोठा होणें, वाढणें, उंच होणें (गाताना आवाज, वाद्य इ॰). १३ फिरणें; वर जाणें; उलटणें (अम्मल चढला असतां, अथवा प्राणोत्क्रमण समयीं डोळे). १४ बसणें; लागणें; लावला जाणें (गिलावा, रंग, लेप, तेल, हात). 'ह्या भिंतीवर शेंदरी रंग चडला म्हणजे चांगली दिसेल.' १५ खुलणें; चकचकीत दिसणें; पूर्णत्वास पोंचणें (रंग किंवा रंगविलेला पदार्थ, वस्तु). 'हिंगुळामध्यें निंबूचा रस पिळला म्हणजे रंग चांगला चढतो.' १६ ताणला जाणें (पखवाज, मृदंग). १७ (धनुष्यास) गुण लावणें; सज्ज करणें. १८ प्राप्त होणें; येणें; लाभणें. 'जेणें करितां महिमा चडे । विरक्तांसी ।' -दा २.९.२. [सं. उच्चलन-प्रा. उच्चडन; चड्ढन; सिं. चड्हणु] म्ह॰ चढेल तो पडेल पोहेल तो बुडेल. चढे, चढ्या, चढत्या घोड्यानिशीं-क्रिवि. (घोड्यावर बसला असतांनाच, एक वेळहि खालीं न उतरतां) एका तडाख्यानें; एका दौडींत; न थांबतां; मोठ्या आवेशानें. 'शत्रु जो आला तो लागलाच चढे घोड्यानिशीं किल्ल्यावर गेला.' 'नादिरशहा याची फौज चढत्या घोड्यानिशीं दिल्लीस पोहोंचली.' -भाव २३.
आत्मा
पु. १ जड सृष्टीपेक्षां अत्यंत भिन्न असें आदितत्त्व; जीवाचें मूलबिंब; निराकार, अमर्त्य, परमात्मा; परब्रह्म. २ प्रत्येक देहमात्राच्या ठिकाणीं त्या त्या देहाची अभिमानी असलेली जाणीव; चैतन्य; प्राण; जीव. ३ मी, आपण, स्वतः एतद्वाचक शब्द. ४ अंतःकरण; स्वभाव; प्रकृति. ५ देह. ६ बुद्धि; समज. ७ (ख्रि.) ज्याला विचार, भावना, इच्छाशक्ति आहेत असें आध्यात्मिक व्यक्तित्व -योहा ३.५.८; ४.२४. 'माझा आत्मा जसा आरसा । पाहो जन त्यामाजि तुला ।' -उसं २८१. [सं. अत् = निरंतर चालणें] ८ (पिंजारी) कापूस पिंजण्याच्या कमानीच्या पंख्याच्या कडेवर एक चामड्याची पट्टी असते. तिच्या आंत वसवलेली घोडी- वजा एक कातड्याची, घडी केलेली पट्टी. हिनें कमानीस असलेली तात ताणून अधिक आवाज निघतो. ॰नंद-पु. विषयसुखापासू नचित आवरून परमात्म्याचें ध्यान केल्यानें होणारें समाधान. ब्रह्मज्ञाना- पासून होणारा आनंद; आत्म्याची जाणीव झाल्यामुळें लाभणारें सुख. भारतीय तत्वज्ञानांत आनंद हा आत्म्याचा एक घटक मानिला आहे. आनंद पहा. [आत्मा + आनंद] ॰नात्मविचार-विवेक- पु. देहाच्या ठायीं शुद्ध निर्विषय जो ज्ञानांश तो मात्र मी, इतर देहा- दिक तें अनात्मा होय म्हणजे मी नव्हे असा विचार; आत्मा आणि अनात्मा यांसंबंधीं विचार. [सं. आत्मा + अनात्मा + विचार, विवेक] ॰नुभव-पु. आत्म्याचा परिचय; आत्मज्ञान; ब्रह्मज्ञान. 'तेथें आत्मानुभव बोलिजे कैसा कवण परि ।' [सं. आत्मा + अनुभव] आत्मानुसंधान-न. १ परमार्थविषयक सत्याकडे, आत्माज्ञानाकडे लागलेलें लक्ष. २ (ल.) अप्पलपोटेपणा. [सं. आत्मा + अनुसंधान] ॰राम-पु १ आत्मा; जीव; अंतःकरण. 'तुम्ही जेवून आत्मा- राम थंड करून घेतलात, मी मात्र उपाशी मेलों' २ विषय- पराङ्मुख व ईश्वराराधनेविषयीं तत्पर; ब्रह्मनिष्ठ; आत्मानंद लाभ- लेला; स्वसंतुष्ट. ३ परमेश्वर; परब्रह्म.'आत्मारामाचेनि विरहें । जेयां जीवीतु न साहे 'ऋ ६. 'जयदेव,जयहेव जय आत्मा, रामा । परमार्थें आरती तुज पूर्णकामा ।।' [आत्मा + राम] आत्मा- र्पण-न. स्वतःला ईश्वरास वाहून घेणें. 'आत्मार्पणाविण हरी वळतो कसा रे ।' [आत्मा + अर्पण] श्रयदोष-पु. (तर्क.) स्वाश्रयावर अवलंबून-विसंबून असणें हा दोष; अन्योन्याश्रय दोष. उ॰ घट हा घटजन्य ज्ञानास कारण होय. [आत्मा + आश्रम + दोष] त्मोन्नति-स्त्री. स्वतःचा उत्कर्ष. 'आधीं आत्मोन्नति, मग देशोन्नति' -त्मोपासना-स्त्री. ध्यान करून परमेश्वराची उपा- सना करणें. कर्मोपासना, ज्ञानोपासना पहा. -त्मौपम्य-न.१ पर- ब्रह्मस्वरूपाशीं एकरूपता. २ आत्म्याशीं आपल्याशीं ऐक्य. आप- परभाव नसणें. ' आत्मौपम्यानें सर्व जग पहावें. -त्मौपम्यबुद्धि- स्त्री. सर्वत्र आपल्यासारखी बुद्धि. 'सर्वाभूतीं एक आत्मा किंवा आत्मौपम्यबुद्धि या तत्त्वानें व्यावहारिक नीतिधर्माची जशी उपपत्ति लागते, तशी दुसर्या कोणत्याच तत्त्वानें लागत नाहीं.' -गीर ३८२.
पाल
न. १ एखाद्या जाड कापडास दोन बाजूंस उतार देऊन पुढील व मागील भाग उघडा ठेवितां येईल अशा तऱ्हेनें तंबूप्रमाणें उभारलेलें लांबरुंद कापड; उघड्या जागेंत दुकानें मांड- ल्यास त्यांवर आच्छादनासाठीं केलेलें तरट; गोणपाट किंवा जाड कापड. २ पांच-दहा सुताडे एकत्र जोडून-बैठक घालणें, छाया करणें इ॰ करितां केलेलें मोठें वस्त्र; जाजमाचा एक प्रकार. ३ पहिल्या प्रकारचा लहानसा तंबू; राहुटी. 'देवोनियां पाल राहिले तेथेंचि ।' -रामदासी २.७५. ४ -पु. लढाऊ गलबताचा एक प्रकार. 'इंग्रजाचे पाल आहेत त्यांजवर बेजरब घालून पाल शिकस्त केले तर...' -समारो २.२१. ५ शीड; कनात; पडम. ६ (ल.) दुकान 'यात्रेंत ठिकठिकाणचे दुकानदार पाल लावतात.' -मसाप २.३८. ७ कराची सूट; माफी. 'तरी आकार होईल त्यापैकीं चौथाई याशीं पाल देणें.' -वाजबाबा २.११२. 'देशपांडे कुळकर्णी यांची दुकानें असल्यास पाल द्यावयाची चाल आहे.' -मसाप २.१८३. ८ (कों.) मासे पकडण्याचें एक जाळें. ९ रताळ्यावरील एक प्रकारची कीड. -कृषि ५५१. १० झाडाचीं कोंवळी पानें; अंकुर. (क्रि॰ फुटणें; निघणें; येणें; होणें). [सं. पल्लव] ॰घालणें-मांडणें-(ल.) स्त्रीनें. उघडपणें व्यभि- चारावर पैसा मिळविणें. ॰करी-पु. पाल उभारून त्यांत आपला माल मांडणारा वाणी किंवा त्यांत राहणारा मनष्य. ॰कोण्ती- स्त्री. जहाजावरील तांडेलाचा टहाळ तोडण्याचा लहान कोयता; सावंतवाडीकडे याचा शस्त्रासारखा उपयोग करीत. त्याचा दांडा लांब असतो. [पाला + कोयती] ॰घर-न. कर माफ असलेलें घर. -बदलापूर ३६१. [पाल + घर] ॰छत्र-न. मराठ्यांत लग्नप्रसंगीं काठीच्या टोंकास मोकळें व लोबतें पागोटें बांधून गुढीसारखें जें नवरदेवापुढें धरतात तें. [पाल + छत्र] ॰जत्रा-स्त्री. कापणी व मळणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनीं शेतांत एकत्र जमून केलेली मेज- वानी; डवरा. ह्यावेळीं शेताच्या संरक्षक देवतेस कोंबडी, बकरा इ॰ अर्पण करितात. ही देशांतील चाल झाली. कोंकणांत, छपरावर घालण्यासाठीं किंवा भाजावळीकरितां झाडाच्या लहान फांद्या किंवा पाला इ॰ टहाळ आणण्यासाठीं लोक जंगलांत जातात त्यावेळीं वनदेवतेची आराधना करण्यासाठीं केलेला जमाव, पालेजत्रा. [पाला + जत्रा] ॰पट्टी-स्त्री. १ प्रवासांत लहान राहुटीसाठीं किंवा बैठकीसाठीं वापरावयाचें जाडेंभरडें कापड. २ लहान पाल; अगदीं लहान तंबू. [पाल + पट्टी] ॰पडदळ-न. पाल व तदनुषंगिक इतर वस्तू यांचा समुदाय; पाल वगैरे. [पाल + पडदळ]
फूल
न. १ पुष्प; मोहोर. २ ठिणगी (विशे. लोखंडाची); फुलासारखा अग्नीचा आकार (शोभेचे दारूकामांतील). ३ कपडावरील बारीक लव; केंस, तंतु; ज्या कापडांना फूल आहे अशीं कापडें बहु- तेक डबल पन्ह्यांचीं असतात. ४ (अव. प्रयोग) (गाय, घोडा, इ॰ च्या अंगावरील) पांढरे ठिपके. ५ पावसाळ्यांत दगडावर, लांकडावर उगवणारी छत्रीसारख एक वनस्पति. ६ बुबुळावर दिसणारा पांढरा ठिपका; शुक्ल हा एक नेत्ररोग आहे. ७ एक विशिष्ट रानवनस्पति. ८ उदाचें धुरकट; उदाचा जमलेला धूर. ९ जस्ताची लाही. १० सुपारीची चांगली कातरण; चांगली कातरलेली सुपारी. ११ बिबा पेटवून त्याच्या तेलाचा पाडलेला थेंब. १२ ओव्यापासून बनविलेलें एक औषध. १३ अंडाशय; ज्यांत गर्भ तयार होतो तो पोटाचा भाग. (सामा.) गर्भाशय. (क्रि॰ वांकडें पडणें). १४ (कों.) घाण पाण्यांत झालेले चक्राकार किडे. १५ स्फटिक. -शर. १६ (खा.) देशी दारू. १७ घन स्वरूपांतून द्रव रूपांत न जातां वायुरूपांत गेलेला पदार्थ. १८ सोनें, रूपें इ॰ धातूचीं किंवा हस्तिदंत, कापड लाकूड, कागद इ॰ कांची शोभेकरितां केलेली पुष्पा- कृति; फुलासारखी वस्तु, दागिना. [सं.; प्रा. फुल्लें; फूल] म्ह॰ आकाशीचें फूल त्याचें कुणाएवढें खूळ. ॰चल(ळ)णें-योनि, गर्भाशय स्थानभ्रष्ट होणें. ॰झडून जाणें-१ फुलवरा गळणें. २ गालिचा इ॰ ची लव निघून जाणें. (दिव्याला.) ॰देणें-दिवा माल- विणें. (दिवा मालविण्यासाठीं त्यावर फूल टाकीत असें संस्कृत काव्यावरून दिसतें). ॰नाहीं फुलाची पाकळी देणें-आपल्या ऐपतीप्रमाणें यथाशक्ति देणें; (भरपूर योग्य रक्कम, मोबदला देण्याची ऐपत नसल्यामुळें कांहीं थोडा भाग देतांना प्रयोग). ॰बाहेर पडणें-निघणें-(गुप्त गोष्ट) बाहेर फुटणें; जाहीर होणें. ॰येणें- (वांई) उन्हानें तापून जमीन सकस होणें. ॰वाहणें-लग्नांत मुलगी वरास अर्पण करणें; कन्यादान करणें. फुलांत घालून ठेवणें-राखणें-जपणें-अत्यंत काळजीपूर्वक व दक्षतेनें ठेवणें; नेणें. फुलार्यास येणें-फूल येणें. फुलें चढविणें-मुंडावळ बांधणें. -बदलापूर १४७ फुलें देणें-(ल.) बाह्यात्कारें मान्यता देणें; सन्मान करणें. 'मसलत ठीक केली, आणि उगेच फुलें द्यावी म्हणोन शिंदे होळकर व सुरजमल जाट यांस विचारणा केली.' -भाब ११६. फुलें माळणें-१ (कु.) पहिल्या गरोदरपणांत स्त्रीची पांचव्या महिन्यांत ओटी भरणें. २ फुलांची माळ करणें. फुलें विकलीं(वेंचलीं) तेथें गोवर्या विकणें-जेथें पूर्वीं वैभवानें दिवस घालविले तेथें द्ररिद्री स्थितींत राहणें; वैभवाचा काळ जाऊन दारिद्र्य येणें. सामाशब्द- फूलक(का)री-पु. माळी. ॰कारी-स्त्री. प्रत्येक अक्षरापूर्वीं फूल शब्द जोडून बोलण्याची, लिहिण्याची सांकेतिक भाषा. -वि. ज्यावर फुलाच्या आकृती आहेत असें (कापड, कागद इ॰). ॰कोबी-स्त्री. एक प्रकारची भाजी; कोबीचा एक प्रकार. (इं.) कॉली फ्लॉवर. ॰गुडे-पु. (गो.) हळदीकुंकू, फळफळावळ देण्याचा एक सौभाग्यचिन्हाचा प्रकार; फुलविडे. ॰गोटा-पु. एक प्रकारची रवाळ पिठीसाखर. ॰चोचे- पुअव. तुंबडी लावण्याच्या जागेवर फासण्या मारतात त्या. (क्रि॰ घेणें; देणें; मारणें). ॰छडी-स्त्री. फुलांनीं गुंफिलेली छडी, काठी; फुलांचा छडीदार गुच्छ. फूलजी-पु. गर्वानें ताठलेला, अहंमन्य माणूस (फुलाप्रमाणें फुगणारा, ताठणारा व दिमाख दाखविणारा मनुष्य). फूलझगरें-न. १ गोंवर्यांचा विस्तव. २ जळते निखारे. ॰झडी-फूलबाजी; एक प्रकारचें शोभेचें दारूकाम. (ल.) नाजुक स्त्री. 'कंठामध्यें पिक दिसे अशिग तूं रूपसुंदर फुलझडी ।' -होला १०४. [फूल + झडणें (पडणें)] ॰झाड-१ फुलें येणारें झाड; ज्याचें फूल हेंच मुख्य आहे असें (कण्हेर, जास्वंद, मोगरा इ॰) झाड; याच्या उलट फळझाड. २ एक प्रकारचें शोभेचें दारूकाम. [फूल + झाड] ॰धर-पु. माळी. -शर ॰दान-दाणी- नस्त्री. फुलें ठेवावयाचें भांडें. (इं.) फ्लॉंवर पॉट. [फूल + फा. दान्] ॰दावरी-स्त्री. एक फूलझाड व त्याचें फूल. ॰पगडी-स्त्री. १ लहान, सुंदर व भारी किंमतीचें पागोटें. २ (ल.) हलकी, क्षुद्र वस्तु. ॰पगर-न. डोक्यांत घालण्याचा फुलाच्या आकाराचा दागिना. ॰पत्री-स्त्री. (व्यापका) देवाला वाहण्याच्या उपयोगी फुलें, पानें इ॰. ॰पांखरूं-न. चित्रविचित्र पंखाचा फुलांवर उडत असणारा बारीक प्राणी; पतंग याच्या चार अवस्था असतात:-१ अंडें, २ अळी किंवा सुरवंट, ३ कोश, ४ फुलपांखरूं. ह्याच्या पुष्कळ जाती आहेत. ॰पात्र-न. पाणी पिण्याचें भांडें; रामपात्र (हें पितळी असून याचा आकार साधारणतः फुलासारखा असतो). ॰फासणी-ण्या-फूलचोचे पहा. ॰बडवा-पु. (महानु.) फुलें पुरविणारा. 'फुलबडवा ऋतिपति ।' -शिशु ५१. [फूल + सं. बटुक; प्रा. बटुअ; म. बडवा] ॰बरडा-बर्डा-पु. झाडावरून कच्ची काढून शिजवून वाळविलेली एक प्रकारची सुपारी. बरडा पहा. ॰बाग-पुस्त्री. फुलांसाठीं केलेला बाग. [फूल + बाग] ॰बाजी-स्त्री. १ कागदाच्या नळींत शोभेची दारू भरून तयार केलेला दारूकामांतील एक प्रकार. ही पेटविली असतां फुलें गळताना दिसतात. २ (थट्टेनें) तंबाखूची विडी. ॰बाडी-स्त्री. फुलबाग 'करीं धरून सुहृज्जन फुलबाडीमधें शिरली ।' -राला ५५. [फूल + बा-वाडी. सं. पुष्पवाटिका] ॰बासन-वासन-न. उंची जिन्नस कापड मळूं नये म्हणून त्याला गुंडाळलेलें साधें कापड; बासन. ॰बाळ्या-स्त्रीअव. बाळ्यांचा प्रकार ।' -अफला ५५. ॰बिसणा- णी-नी-वि. १ अतिशय नाजुक, कोमल. २ पोशाखी; नुसता ऐट मारणारा; मिजासी; अक्कडबाज; छेलछबेला. 'त्याच्यानें श्रमाचें काम होत नाहीं तो फूलबिसनी आहे.' [फूल + हिं. बिसणी = नाजूक, छबेला] ॰माळी-पु. फुलारी; माळी. ॰मेंगा- पु. षंढ; नपुंसक; हिजडा. ॰वात-स्त्री. फुलाच्या आकाराची कापसाची वात. ही निरांजनांत लावतात. ॰विडे-पुअव. (गो.) हळदीकुंकवाचा समारंभ फुलगुडे पहा.॰सर-पु. फुलांचा हार 'फुलां फुलासरां लेख चढे । द्रुतीं दुजी अंगुळी न पडे ।' -ज्ञा १८.५७. फुलांची जाळी-स्त्री. फुलें गुंफून केलेली डोक्यावर बांधावयाची जाळी. फुलार माळी-पु. माळ्यांची पोटजात; फूलमाळी पहा. फुलारी-पु. माळी, फुलमाळी. 'तों फुलारी आला ते वेळां । तेणें हरिकंठीं घातल्या माळा ।' -ह १९.५९. -स्त्री. १ फुलकरी भाषा, फुलकारी पहा. २ (व.) फुलांची परडी. फुललें-वि. (प्रा.) फुलाचें. फुलोडी-स्त्री. फुलाप्रमाणें नाजूक स्त्री. फूलझडी पहा. 'चाले ठुमकत ती मादवान फुलोडी ।' -प्रला ९३. फुलसाखर-स्त्री. उंसाचा रस आटवून थोडा पातळ राहिला असतां मडक्यांत भरून घडवंचीवर ठेवल्यावर आंतील काकवी गळून वरील भागांत जी पांढरी साखर होते ती. -कृषि ४८२.
शिव
पु. १ त्रिमूर्तींतील एक देव; संहारकर्त्री देवता; शंकर; महादेव; महेश्वर. २ चैतन्यच आत्मा; जीवापासून निराळें चित्तत्त्व. ३ सत्तावीस योगांपैकीं एकविसावा योग. ४ मोक्ष. ५ (द्विरुक्तीनें शिवशिव) तिरस्कार, नापसंति, खेद, उद्वेगवाचक उद्गार. 'ऐकोनि कृष्ण शिव, शिव ऐसें आधीं म्हणोगि मग हांसे ।' -मोकर्ण ४६. २५. -न. मंगल; कल्याण. -वि. मंगलकारक; कल्याणदायक; सुखदायक. शिवशिव करणें, शिवाशिवा-तिरस्कार, उद्वेग दाखविणें. (क्रि॰ करणें; म्हणणें). शिवावरचा बेल उचलणें- काढणें-घेणें-एक प्रकारचा शपथविधि; शपथ घेणें. शिवा- वरचा बेल चुकेल पण हें चुकणार नाहीं-एखादी न टळणारी गोष्ट दर्शविण्यास योजतात. ॰कळ-स्त्री. (कर.) संचार; अंगांत येणें. ॰कळा-स्त्री. (कर.) राग. ॰चतुर्दशी-स्त्री. माघवद्य चतुर्दशी; महाशिवरात्र. ॰दिनी-स्त्री. एकादशी; शिवरात्र. ॰दीक्षा-स्त्री. (थट्टेनें) अंगाला राख फांसणें, रुद्राक्ष घालणें वगैरे शिवोपासोनेचा व तपस्येचा अंगीकार करणें. (क्रि॰ घेणें). ॰धातु-पु. गोमेद. ॰नद-पु. एका नदीचें नांव. निर्माल्य-नपु. १ शिवदेवतेस वाहिलेलीं फुलें वगैरे. २ शिवस्त; स्वतः न वापरावयाची, घ्यावयाची, उपभोगावयाची दुसऱ्याची वस्तु. याचा शपथेसारखा प्रयोग होतो. ॰पंचाक्षरी मंत्र-पु. ॐ नमः शिवाय हा मंत्र. ॰पदी-स्त्री. १ ज्यामध्यें कल्याणमय शब्द आहेत असें वाङ्मय. २ शंकराच्या स्तुतीपर पवें. ३ शिवाजी महाराजांवर रचलेलीं पदें. ॰पुरी-स्त्री. १ वाराणशी; बनारस; काशी. ॰भैरव-पु. (राग) एक राग. यांत षड्ज, कोमल ऋषभ, तीव्र गांधार, कोमल मध्यम, पंचम, कोमल धैवत, तीव्र निषाद हे स्वर लागतात. पण अवरोहांत निषाद व गांधार हे कोमल देण्याचा प्रघात आहे. जाति संपूर्ण-संपूर्ण, वादी धैवत. संवादी ऋषभ. गानसमय प्रातःकाल. ॰मुहूर्त-पु. सूर्योदयाबरोबरचा पहिला मुहूर्त, साडेतीन घटकांचा काल. ॰योग-पु. सत्तावीस योगांपैकीं एकविसावा योग. ॰रात्र-रात्रि-स्त्री. प्रत्येक महि- न्याची वद्य चतुर्दशी. विशेषेंकरून माघ वद्य चतुर्दशी. ॰रात्र वात-स्त्री. कापसाच्या सुताची १८७।। फेरे अथवा ३७५ पदरांची वात. ही दर शिवरात्रीस लावतात. ॰लग्न-न. (शुभ मुहूर्त) दसरा. [सीमोल्लंघन अप.] ॰लिंग-न. शंकराचें, महा- देवाचें लिंग, पिंडी, प्रतिमा. ॰शक्ति-स्त्री. पुरुषप्रकृति. 'तेवी शिवशक्ति विवंचना तुज मी सांगेन संपूर्ण ।' -एभा २४. ६९. ॰शरणार्थ-पु. लिंगायत लोक नमस्कार शब्दाऐवजीं याचा उपयोग करितात. ॰स्व-न. शिवास अर्पण केलेलें; ज्याचा अपहार करणें पातक होय असें द्रव्य वगैरे. शिवा-स्त्री. १ पार्वती. 'शिवा भवानी रुद्राणी । कां न पावतीच कोणी ।' -एरुस्व ५.७४. २ कोल्ही. शिवात्मा-पु. परमात्मा; जीवा- त्म्याहून निराळा जो आत्मा तो. शिवापुढचा-वि. १ नंदी; नंदीबैल; बैल. २ (ल.) निर्बुद्ध; दगड; मठ्ठ. शिवामूठ-स्त्री. १ विवाह झाल्यापासून पांच वर्षेपर्यंत श्रावणांतील दर सोमवारीं नववधूनें महादेवास अनुक्रमें तीळ, तांदुळ, सातु, मुगाची डाळ व गहूं यांची मूठ वहावयाची असते ती. २ शिवामूठ वहावयाचा विधि, व्रत. शिवालय-न. १ महादेवाचें मंदिर, देवालय. २ स्मशान.
बाळ, बाळक
न. १ बालक; लहान मूल. २ -पु. मुलगा; शिशु. 'जसा वारावा चपळ बाळ बापानें ।' -मोभीष्म ११.६९. -वि. १ लहान; अल्पवयी. २ मूर्ख. 'पंडित न गमसि जरि बहु पांडित्यहि करिसि दिससि बाळ मला ।' -मोकर्ण ४१.१८ ३ अजाण. 'नुमजे बाळासि किमपि...।' -मोमौसल १.१. [सं. बाल = मूल; बाल + क = बालक] म्ह॰ असतील बाळ तर फेडतील काळ. ॰आंबा-पु. कच्चा किंवा हिरवा आंबा. ॰कडू-डूं- न. १ लहान मुलांना किराईत वगैरे कित्येक कडू औषधें (विशे- षतः सकाळीं) उगाळून पाजतात तें; घुटी. २ (ल.) लहानपणीं मिळालेलें शिक्षण किंवा वळण. बाळकडू असणें-उपजत प्रवृत्ति किंवा गुण असणें; गोडी असणें. 'कोळ्याच्या मुलांना पोहोण्याचें बाळकडूच असतें.' बाळका-पु. गोसाव्याचा शिष्य. [बालक] ॰क्रीडा-स्त्री. लहानपणीचें लहान मुलांचे खेळ. [सं. बालकीडा] ॰खुंट-पु. केळीच्या खुंटास नवीन फुटणारा कोंभ; मोना. ॰गळा-पु. लहान मुलाचा बारीक आवाज; न फुटलेला आवाज. ॰गुंडा-पु. बालगुंडा पहा. ॰गोपाळ-पुअव. १ (कृष्णाचे खेळ- गडी, गवळ्यांचीं पोरें यावरून). लहान मुलें; लहानमोठीं एकत्र जमलेलीं मुलें. २ एकत्र जमलेलीं गांवांतील लहानथोर माणसें. 'महाराज, हे सर्व बाळगोपाळ मिळाले आहेत. त्यांजवर आपण दया करावी.' [बाळ + गोपाल = गवळी] ॰चरित-त्र-न. लहान- पणचें चरित्र; बालक्रीडा. [सं.] ॰छंद-पु. लहान मुलानें घेत- लेला चाळा; हट्ट. [सं.] ॰टोळ-पु. लहान व हिरवा टोळ. ॰टोंक-ढोंक-पु. बगळा. ॰ताड-पु. नर जातीचा ताड. यास फळें येत नाहींत. ॰दशा-स्त्री. बाल्य; बालपण; बाल्यावस्था. 'लोपली उघडे बाळदशा ।' -ज्ञा ६.२६०. [सं.] ॰दांत- पुअव. लहानपणचे किंवा पहिले दांत; दुधाचे दांत. ॰दृष्टि-स्त्री. तारुण्यांतील बारीक व लांबची वस्तु जिनें दिसते अशी दृष्टि; जोमदार दृष्टि. [सं.] ॰पणचें लोणी-न. पहिल्यानें व्यालेल्या वशी-परवर्षी-स्त्री. बालपरवेशी पहा. ॰पाठ-पु. लहानपणीं शिकलेली विद्या. लहानपणींची शिकवण. [सं.] ॰फूट-न. १ बाळआंबा. २ रुपया इ॰ कांस असलेली बारीक चीर. ॰फोक-पु. (नाजुक किंवा कोंवळी फांदी यावरून) तरुण; तरणाबांड; आडबाप्या. ॰बद-बोध-वि. बालबोध पहा. ॰बंद-न. बाळबोध, देवनागरी लिपी. ॰बोध कित्ता-पु. (ल.) उदार धोरण. 'मी मुंबई इलाख्याचा कारभार चालवितांना... एल्फिन्स्टन यांनीं घालून दिलेला बाळबोध कित्ता वळवीन.' -टिले १.४३६. ॰बोध वळण-न. साधी रीत; जुनी, सनातनधर्माची रीत. ॰बुद्धि- स्त्री. मुलाची बुद्धि. -वि. पोरकट समजुतीचा; अज्ञानी; पोरबुद्धि; लेकुरबुद्धि. ॰बेल-न. बेलाचें कोंवळें फळ. ॰ब्रह्मचारी- भाषा-मित्र-इ॰ बालमध्यें पहा. ॰भिकारी-पु. जन्मापासून भिकारी. याच्या उलट गर्भश्रीमंत. ॰भूक-स्त्री. (मुलाची भूक यावरून) वरचेवर, घटकेघटकेला लागणारी भूक. ॰भोंक- न. १ बगळा; बाळढोंक. २ (ल.) लांब मानेचा इसम; लांब- मान्या. ॰भोग-पु. १ प्रातःकाळची पूजा झाल्यानंतर देवाला अर्पण केलेला उपहार. २ (यावरून ल.) लहान मुलांचा सकाळचा फराळ. ३ अशा नैवेद्याचे किंवा फराळाचे पदार्थ. (क्रि॰ देणें; करणें). ४ (सामान्यतः) हिस्सा; वांटा; भाग. (क्रि॰ करणें). ॰मति-स्त्री. अज्ञान. 'रत्ने म्हणोनि भरि इंगळ जेंवि खोळे । घे काळ बाळमति पाहति लोक भोळे ।' -आपू २९. ॰मयाणी- स्त्री. गाडीच्या चाकाच्या आंतील बाजूचा वसू; आंतील वसवी; कणा आखरींत भक्कम करण्याची लोखंडी चाकी (माण) बाळमाइनी ॰मुकी-स्त्री. १ मेजवानीच्या किंवा फराळाच्या वेळीं गुपचूप वानगी म्हणून राखून ठेवलेला एखाद्या जिन्नस किंवा घास. २ असा राखून ठेवलेला नसेल त्यास दंड द्यावा लागणें किंवा दिलेला दंड. (क्रि॰ लागणें). ॰मुंज्या-पु. लहानपणापासून मुंज्या; मोठा झाला असला तरी अविवाहित किंवा ब्रह्मचारी असलेला मनुष्य. ॰रंडा-रांड- विधवा-स्त्री. बालरंडा पहा. ॰राजा-पु. पुंड, धीट किंवा दांडग्या मुलाला लाडिकपणें लावण्यांत येणारा शब्द. [सं.] ॰लेणें- ल्याणें-न. लहान मुलाच्या अंगावर घालावयाचे बिंदली इ॰ दागिने. 'विषयाचें बाळलेणें ।' -शिशु ९२. ॰वाटी-स्त्री. १ सकाळचा अल्पोहार; न्याहारी; बाळभोग. (क्रि॰ झोकणें; चढविणें; करणें; खाणें; होणें). २ वाटा; भाग; हिस्सा. ॰वैद्य- पु. लहान मुलांचा वैद्य. ॰शब्द-पु. लहान मुलांसारखें बोलणें, आवाज, उच्चार. 'बाळशब्दें खेळवील तनुजाला ।' ॰शिरें- न. (कों.) बाळतिणीला तिच्या मुलाकरितां धर्मार्थ दिलेलें दूध भांडीं व इतर आवश्यक वस्तू इ॰ [सं. बाल + क्षीर] ॰सर- स्वती-स्त्री. बालसरस्वती पहा. ॰सवत-स्त्री. (बायकी) लहानपणापासूनची सवत. [बाल + सं. सपत्नी] ॰स्वार-वि. १ लहानपणापासून घोड्यावर बसणारा. २ (ल.) लहानपणापासून एखाद्या शास्त्रांत किंवा उद्योगधंद्यांत प्रवीण असलेला; जन्माभ्यास असलेला. ॰हिरडा-हरडा-डी-हर्तकी-पुस्त्री. बालहरीतकी; कोवळा वाळविलेला हर्डा; हें एक औषधी फळ आहे. चांभारी- हिरडा पहा. [सं. बालहरितकी] बाळांबा-पु. बाळआंबा पहा. बाळाभ्यास, बाळाभ्यासी-बालाभ्यास, बालाभ्यासी पहा. बाळामराई-स्त्री. आंब्याच्या लहान झाडांची बाग. [बाळ + आमराई] बाळायती-वि. बाळ; लहान. 'त्या बाळायती गोपीतें । हरिलें दैत्य वेषें तेथें ।' -रास २.३६०. बाळेभोंक- न. बाळभोंक; बगळा. बाळेभोळे-वि. अज्ञ आणि भोळसर. 'माया दुस्तर शास्त्रप्रसिद्धी । तेथें बाळेभोळे स्थूळ बुद्धी ।' -एभा ३.२२४. बाळोपचार, बाळोपचारी-बालोपचार-री पहा.
घालणें
सक्रि. १ ठेवणें; राखणें; स्थित करणें. 'भंवती अस्त्रीयांची राषणे । तेथें घातली ते राजकुमारी ।' -उषा २१. २४. 'सर्व माल आधीं घरांत घाल.' २ सोडणें; टाकणें; फेकणें; टाकून देणें; फेकून देणें. 'उडी घालतो संकटीं स्वामि तैसा ।' -राम ३७. 'घोडा घालण्याची सोय नसेल अशा खड- काळ व डोंगराळ मुलखांत डुकराची शिकार गोळीनेंच करावी लागते.' -डुकराची शिकार (बडोदें) १. 'त्याला काठीवर भार घालून चालावें लागे.' -कोरकि ३२. ३ उडी टाकणें. 'वणवा मियां आघवा । पांखेंचि पुसोनि घेयावा । पतंगु या हांवा । घाली जेवीं ।' -ज्ञा १४.१९१. 'रागें उमा घातलें आगीं । यालागीं याज्ञिकाचें शिर भंगी ।' -एभा ५.१७७. ४ जडविणें; लावणें; तल्लीन करणें. 'स्वरूपीं घातलें मना । यातनेसि केली यातना ।' -दा ५.९.५४. ५ मारणें; फेकणें; प्रक्षेपणें; फेंकून मारणें. 'अभिमंत्रुनी पंनकासस्त्रें । बाणु घातला ईश्वरें ।' -उषा १६९४. 'इंद्राच्या या कपटी वारांगनेच्या डोक्यांत विश्वामित्रानें जर कमंडलु घातला असता तरच असल्या स्त्रीजातीचा योग्य सन्मान झाला असता.' -नाकु ३.९१. ६ ओतणें. 'दुधांत पाणी घालणे.' ७ पसरणें; बाहेर मांडणें; मांडून ठेवणें; रचणें ठेवणें. 'आकाशीं घातीला मंडप ।' -मसाप २.२६. ८ (आंत) खुपसणें; भोंसकणें. 'घे सुरी घाल उरीं.' ९ (एखाद्या पदार्थांत दुसरा पदार्थ) शिरकावणें, प्रविष्ट करणें; 'पिशवींत पैसे घाल.' १० (एखाद्या कामाला मनुष्य, जनावर) लावणें; जुपणें; नेमणें; योजणें. 'मुलगा पढावयास घातला.' 'तो गडी भात कांडाव- यास घाला.' ११ (दुकान,शाळा, बाजार इ॰) मांडणें; स्थापन- करणें; सुरु करणें. १२ (अंगावर धारण करण्याच्या विवक्षित वस्तु) धारण करणें; परिधान करणें; चढविणें. 'अंगात अंगरखा, डोकींत पागोटें, पायांत जोडा घातला.' 'नाकांत नथ व बोटांत आंगठी घाल.' १३ (अन्न, खाद्यपदार्थ इ॰) वाढणें. मला भात घाल.' १४ एखाद्यावर अनिष्ट संकट आणणें; गोत्यांत आणणें; (एखाद्याच्या) नुकसानीस कारण होणें; गंडा घालणें; (एखाद्यास) बुडविणें.' त्यानें मला दहा रुपयांस घातलें.' १५ (मुल) प्रसवणें; (अंडीं) टाकणें; गाळणें. १६ (प्रश्न, उदा- हरण. कोडें इ॰) सोडवावयास देणें, सांगणें; हिशेब सांगणें. १७ एखाद्यास एखादी गोष्ट करण्यास अथवा न करण्यास शपथ इ॰ देणें; शपथ इ॰ कांचा जोर. आग्रह करणें; शपथ घालणें. १८ बाहेर टाकणें; काढणें; काढून देणें; घालविणें. 'या चोरास प्रथम घराबाहेर घाल.' १९ (दरार,धाक, भीति,भूल इ॰) उत्पन्न करणें; उपस्थित करणें; उठवणें; उद्दीपित करणें. २० (बाद, गोंधळ इ॰) करणें; माजविणें. २१ (भिंत, कूड इ॰) बांधणें; उभारणें; रचणें. २२ (भोजन, समाराधना, ब्राह्मण, मित्र इ॰ कांस) अर्पण करणें; देणें. २३ (एखादें काम) सुरु करणें; आरंभणें. 'तिनें गहूं दळावयास घातले.' 'त्यानें घर बांधावयास घातलें.' २४ (चाल, संप्रदाय) प्रचलित करणें; रूढ करणें. २५ (सणाच्या दिवशीं पुरण इ॰ खाद्यपदार्थ) खावयास, नैवेद्यास सिद्ध करणें. मंगलप्रसंगीं ब्राह्मण जेवावयास घालणें. घालणें हा धातु कांहीं नामास जोडूनहि वापरतात. उदा॰ (गोष्ट) कानावर घालणें; (मुलाला) कित्त्यावर घालणें इ॰ या धातूचे अर्थ अनेक आहेत, पण त्या सर्वांचा भावार्थ ठेवणें; स्थापणें; मांडणें; लावणें असा आहे. [प्रा. घल्ल; जु. का. घल्लणें भांडण, युद्ध, मारामारी; हिं. घालना] (वाप्र.) घालून घेणें-(हट्टानें, जोरानें, वेगासरशीं) स्वतःचें शरीर, अंग खालीं वरून आंत टाकणें, फेकणें; एकदम अंग टाकणें. 'त्याला फेंफरें आलें म्हणजे तो आगींत घालून घेतो.' 'नदी भरतां भरतां घालुनिया घेती ।' -रामदास-रामदासी भा. १५. पृ. २६४. 'भूतळीं भरत घालुनि घे हो । त्या स्थळींहुनि न चित्त निघेहो ।' -वामन भरतभाव ५१. 'हें वर्तमान मल्हारराव यांनीं ऐकतांक्षणींच अंबारींत घालून घेतलें.' -भाब ७४. घालून पाडून बोलणें-वक्रोत्त्कीनें उपरोधिक भाषेंत निंदा करणें, दोष देणें; टोमणा मारणें; खोचून बोलणें. 'टोंचून, घालून. पाडून बोलण्याच्या कामांत बायका पटाईत असतात.' -संगीत मेनका ११. एखाद्यावर घालणें-एखाद्यास दोष देणें, लावणें. 'कष्टी होऊनियां लेखीं । प्रारब्धावरी घालिती ।' -दा १२.२ ५. ह्या धातूचें समासांत घाल असें रूप होतें. घाल- घालणें या क्रियापदाचें समासांत योजावयाचें रूप. यावरून पुढील सामासिक शब्द बनले आहेत. ॰काढ-स्त्री. (कांहीं जिन्नस, सामान इ॰ विशिष्ट ठिकाणीं) पुन्हां पुन्हां घालण्याची व तेथून काढण्याची क्रिया, व्यापार; उपसाउपस; (जिन- सांची) उगीच्या उगीच हालवाहलव करण्याचा व्यापार; चाल- ढकल पहा. [घालणें + पाडणें] ॰घसर-स्त्री. १ लांबणीवर टाकणें; टंगळमंगळ; दिरंगाई; चालढकल. 'आज पाहूं उद्या पाहूं अशी घालघसर केली तर ऐनवेळीं कांहींच करतां यावयांच नाहीं.' -हिंदु(गोवें) १३.८.१९२९. २ रपाटणें; खच्चून भरणें; कोंबणें; ठासणें; कोंदून भरणें. ३ अनास्था; आळसामुळें दुर्लक्ष. 'अध्य- यनाविषयीं घालसघर करशील तर फसला जाशील.' ४ घाल- घुसड शब्दाच्या कांहीं अर्थींहि या शब्दाचा उपयोग करतात. घालघुसड पहा. [घालणें + घसरणें] ॰घसरपणा-पु. चुका करण्याचा स्वभाव; वेंधळेपणा. [घालघसर] ॰घसर्या-वि. दिरं- गाई, टंगळमंगळ; चालढकल करणारा. [घालघसर] ॰घुसड-स्त्री. १ (एखादें काम, धंदा इ॰) स्वैरपणानें, मनसोक्तपणें, दपटणें; पुढें चालवणें, ढकलणें २ (एखादें काम) दडपण्याची, लाट- ण्याची, लोटण्याची क्रिया; वेठ वारून, बिगार काढून, गडबड- गुंडा करून (एखादें काम करण्याची क्रिया. ३ जमाखर्च इ॰ कांत) अव्यवस्थितपणें, लबाडीनें बाबी, रकमा घुसडणें ४ मूळ- ग्रंथांत पदरचा भाग) लबाडीनें दडपून देणें; घुसडणें. ५ गोंधळ; घोटाळा इ॰ नीं युक्त भाषण, व्यवहार; लबाडीचा व्यवहार; लपं- डाव. 'मी वचन मोडून कांहीं घालघुसड केली तर मग त्याला काय समजणार आहे?' -बाल २.१८८. [घालणे + घुसडणें] घालपांड्या-पु. १ बिनदिक्कत (दुसर्याचा) घात, नाश करणारा, कळलाव्या, आगलाव्या, घातकी मनुष्य. २ वरून मात्र बावळा, वेडा दिसणारा पण आंतून कावेबाज असलेला मनुष्य; वेड पांघरणारा मनुष्य; घालवेडा पहा. [घालणें = बुडविणें, नुकसानींत आणणें + पांड्या] घालपिसा-वि. वेडेपणाचें, बावळटपणाचें सोंग, ढोंग करणारा; वेड पांघरणारा; घालवेडा, [घालणें + पिसा = वेडा] घालपिसें-न. वेडाचें ढोंग; बाह्यात्कारी धारण केलेला वेडेपणा, खुळेपणा, बावळेपणा. [घालणें + पिसें] घालफेड-डी-स्त्री. घालफेल; तळमळ; काहिली; (ताप इ॰ नें) जीव कासावीस होऊन शरीराची होणारी चळवळ; घालमेल अर्थ ७ पहा. 'नवकिसलयतल्पीं तीजला नीजवीती । घडिघडि करिते हे भीमकी घालफेडी ।' -सारुह ३.६५. [घालणें + फेडणें] घालफेल-स्त्री. (कों.) (आजारी मनुष्याची होणारी) तळमळ; तगमग; कासाविसी; काहिली; तापाच्या काहिलीमुळें आजारी माणसानें इतस्ततः केलेलें शरीराचें चलन वलन घालमेल-ली-स्त्री. १ (वस्तूंचा, हिशेबाचा, कामांचा) घोंटाळा; अस्ताव्यस्तपणा; अव्यवस्थितपणा; गोंधळ. २ धांदल; गडबड; गर्दी; धामधूम; धुमाळी. ३ सरमिसळ; सर्व एकांत एक मिसळणें; उलथापालथ. ४ (ल.) एकसारखी मसलत, हिकमत, युक्ति, बेत करणें; डावपेंच खेळणें; साहसाच्या धाडसाच्या कामांत स्वतःस गुंतवणें; (उपजीविकेसाठीं) अनेक उलाढाली करणें; मामलत इ॰ व्यवहारांची अदलाबदल, घटवाटना. ५ (एखादें कार्य जुळवून, घडवून आणण्याची अनेक प्रकारची) खटपट; मसलत; गडबड; धांदल. 'तो सध्यां लग्नाच्या घालमेलींत आहे.' ६ सुरळीतपणें चाललेल्या व्यापारांत, क्रमांत झालेला अडथळा, भंग, खळ. 'पथ्यामध्यें घालमेल न झाल्यास गुण येईल.' ७ (ताप इ॰ कांचा योगानें होणारी शरीराची) तग- मग; तळमळ; कासाविसी; काहिली. 'नारायण नांदे जयाचिये ठायीं । सहज तेथें नाहीं घालमेली ।।' -तुगा २९. घालफेल पहा. ८ तगमगीमुळें (आजारी माणसानें चालवलेली शरीराची) चळवळ; चुळबुळ. 'तिचा जीव घालमेल घालूं लागला' -चंद्र १४०. ९ पोटांतील क्षुब्धता, कालवाकालव. १० (पित्तक्षोभामुळें) उसासणें; उसासा येणें; (उकाड्यासुळें, उबार्यामुळें शरी- राचा होणारा) गदका; गदगदणें; चबढब पहा. १२ (व्यवहारांतील, हिशेबांतील) अफरातफर, डावपेंच; घोंटाळा; गोंधळ; छक्केपंजे; लपंडाव; लुच्चेगिरी. १३ (गो.) भानगड. [घालणें + मेळ; हिं. घालमेल; गु. घालमेल] घालमेलणें- घालमेल करणें; उलथापालथ, गोंधळ, घोंटाळा करणें. [घालमेल] घालमेली-स्त्रीअव. (गो.) हेलपाटे; येरझारा; त्यापासून होणारा त्रास. [घालमेल] घालमेल्या-ली-वि. १ घालमेल, चबढब, अव्यवस्था करण्याचा स्वभाव असणारा. २ चळवळ्या; खट- पटी, नाना युक्ती, हिकमती काढणारा, योजणार; उलाढाली; कारस्थानी. [वालमेल] घालवेड-न. वेडाचें सोंग; बाह्या- त्कारीं धारण केलेलें वेडेपण; खुळेपणा; घालपिसें. [घालणें + वेड] घालवेडा-वि. वेडाची बतावणी करणारा; बाहेरून वेड पांघरणारा परंतु आंतून धूर्त, लुच्च्या असलेला. [घालवेड] घाला- घाली-स्त्री. (कामांचा) गोंधळ; धुडगूस; घालमेल. 'घाला- घाली घालिती नित्य सासा । टांकू बाई नेदिती हा उसासा ।।' -सारुह ७.१०६. [घालणें द्वि.] घालामेल-स्त्री. (गो.) व्याकुळता; घालमेल अर्थ ७ पहा. घालामेलचें-अक्रि. (गो.) कासावीस होणें; तगमगणें; व्याकुळ होणें. [घालमेल]
देव
पु. १ ईश्वर; देवता. २ परब्रह्म; परमेश्वर; आदितत्त्व; शिव; जगन्नियंता. ३ मूर्ति; लांकूड दगड, धातु इ॰ कांची मूर्ति; जींत विधिपूर्वक देवत्वाची प्रतिष्ठापना केलेली असते अशी मूर्ति. ४ स्वर्गांत राहणारी इंद्रादि दिव्य पुरुष. ५ (नाटक, काव्य) राजा; श्रेष्ठ. 'तो सहदेवहि देवा ! येतां त्वत्सूनुच्या कृपाणातें । क्षितिवरि पाडी..' -मोकर्ण १४.२८. ६ यक्ष, किन्नर इ॰ उपदेव. अंगांत येणारें वारें. [सं. दिव् = प्रकाशणें; झें. दिव्, दएव = देव; ग्री. झ्यूस, थिऑस्; लॅ, जोव्हिस्; प्रा. आइस्लंडीक. तीवर = देव; प्रा. ज. झिओ; लिथु. देवस्; स्ला. दीना = दिवस] (वाप्र.) ॰देव करितां- क्रिवि. पुष्कळ प्रयत्न, हांजीहांजी, प्रार्थना करून. ॰दिसणें- (व.) हाल होणें. 'बायको मेल्यावर देव दिसतील.' ॰देव्हा- र्यांत नसणें-मालक(मन) ठिकाणावर नसणें. ॰नवसाला पावणें-इच्छित फळ मिळणें. 'भूप म्हणे कर्णा हा जरि अर्जुन देव पावला नवसा ।' -मोविराट ३.८८. ॰पावणें-मनाजोगी गोष्ट घडणें. ॰बाप्पा करणें-(बालभाषा) नमस्कार करणें. 'तो देवबाप्पा कर म्हणाला त्याबरोबर तिनें हात जोडून नमस्कार केला.' -सुदे ५ ॰होऊं लागणें-अरेराव, दंडेल होऊं लागणें, होणें. वरचढपणा गाजविणें. देवाकडे जाणें-मरणें. देवाचें नांव घेणें-कार्याला प्रारंभ करणें. देवाची(चे) आण, देवाचेण- स्त्री. देवाची शपथ. देवाच्यान-देवाची आण, शपथ. देवानें ड वी देणें-नकार मिळणें (उजवी = रुकार); मनांत कांहीं हेतु धरून मूर्तीच्या डाव्या-उजव्या अंगास फुलें किंवा अक्षता चिकट- वितात. त्या वरील प्रमाणें पडल्या असतांना समजावयाचा प्रकार. देवानें भरणें, धरणें-भरणें मध्यें पहा. देवानें मारणें-देवाची अवकृपा होणें. देवावरची तुळस, फूल, बेल काढणें- उचलणें-१ देवावरील निर्माल्य काढणें. २ शपथ घेण्याचा एक प्रकार. देवावर हवाला घालणें-देणें-देवावर विश्वास टाकणें, भरंवसा ठेवणें; सर्वस्वी अवलंबून असणें. देवावर हात ठेवणें- शपथ घेणें देवाशीं बसविणें-(गो.) अंगांत वारें, देव आण- ण्यास सांगणें. देवास-ला करणें-देवाची करणी. देवाची इच्छा याअर्थीं एखादें अघटित कार्य घडून आलें असतां तोंडांतून निघणारा उद्गार. देवास पेंचणें-शत्रूवर संकट आणण्यासाठीं देवाला बांधणें. देवासारखा बसणें-चुपचाप बसणें. न देवाय न धर्माय-कोणत्याच चांगल्या कार्याकरितां (पैसा, श्रम) उपयोगी न पडणें. देवास शिताळ देणें-देवाला स्नान घालणें. म्ह॰ १ मानला तर देव नाहीं तर धोंडा. २ (बायकी) देव नाहीं देव्हारीं, धुपाटणेवाला उड्या मारी. ३ देव देतो आन् कर्म नेतं. ४ देवाचें नांव आणि आपला गांव = दुसर्याच्या नांवावर स्वतःचा फायदा करणें. सामाशब्द- ॰ऋण-न. देवाचें कर्ज. हें यज्ञयागादिकांनीं फेडतात व त्यामुळें मनुष्यास सुखप्राप्ति होते. या- प्रमाणें दुसरीं ऋषिऋण व पितृऋण हीं अनुक्रमें अध्ययन व तर्पण यांनीं फेडावयाचीं असतात. ॰ऋषि-पु. देवर्षि; नारद. [अप.] ॰कला-ळा-स्त्री. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर तींत येणारें तेज, वैभव, शक्ति इ॰. देवासारखें ओज, कांति. [सं.] म्ह॰ टाकीचे घाव सोसावे तव्हां देवकळ पावावी. ॰कांचन-न. कांचन फूलझाडांतील एक जात किंवा त्याचें फूल. ॰कापशी- कापशीण-स्त्री. कापसाच्या झाडांतील एक प्रकार. याचें फूल जांभळें असतें, याच्या कापसास देवकापूस म्हणतात. याच्या बोंडांत वेणीसारखी एक मोठी बी असते. -कृषि ३८३. ॰कार्य- न. १ देवाची पूजा. २ कुळधर्मानुसार कुळदेवटेची पूजा, अनुष्ठान, जेवण इ॰देवकी-स्त्री. देवस्की पहा. -वि. देव किंवा पिशाच्च यांच्यापासून घडणारी पीडा, बाधा, उपद्रव, भाकीत, शकुन इ॰ देवकी चमत्कार-पुअव. देव पिशाच्च यांचा चमत्कार. याच्या उलट (किंवा याला जोडून) राजकी. अस्मानीसुलतानी याप्रमाणें. ॰कुंडी-स्त्री. (व.) लग्नाचे अगोदरचे दिवशीं बोहल्याच्या जवळ शास्त्रोक्त रीतीनें ठेवावयाचीं मडकीं. ॰कुंभा-पु. (कों.) कुंभा किंवा दुधाणी नांवाचें फूलझाड. ॰कृति-कृत्य-स्त्रीन. १ ईश्वरी करणी; दैविक घटना. २ धार्मिक कृत्य, विधि. ॰केळी-स्त्री. सामान्य कर्दळी नांवाचें फूलझाड. ॰खर्च-पु. देवपूजेचा खर्च किंवा या खर्चाकरितां बसविलेला कर. ॰खळ-अव. (ना.) (तिर- स्कारार्थीं) घरांतील देवाच्या मूर्ती. ॰खोली-स्त्री. देवघर. ॰गण- पु. जन्मनक्षत्रावरून मनुष्याचे देव, मनुष्य व राक्षस असे तीन वर्ग करतात त्यांपैकीं प्रथम. मनुष्यगण पहा. ॰गणपत-न. (सोंग- ट्यांचा खेळ) देवाला द्यावयाचा पहिला हात, दान. ॰गत-ति- स्त्री. १ नशीबाचा फेरा; दैवयोगानें प्राप्त होणारी दशा, स्थिति. २ (ल.) मृत्यु. ३ (गो.) विटाळशी असतांना मेलेल्या स्त्रीचें पिशाच्च. -वि. दैवी (कृत्य, नाश इ॰). ॰गाय-स्त्री. मखमली किडा; गोसाई. मृगाच्या पावसांत यांची उप्तत्ति होते. ॰गांधार-पु. एक राग. यांत षड्ज, तीव्र ऋषभ, कोमल गांधार, कोमल मध्यम, पंचम, कोमल धैवत, कोमल निषाद हे स्वर लागतात. आरोहांत ऋषभ व धैवत वर्ज्य. जाति औडव-संपूर्ण. वादि षड्ज, संवादी पंचम. वेळ दिवसाचा दुसरा प्रहर. ॰गिरी-पु. १ एक राग यांत षड्ज, तीव्र ऋषभ, तीव्र गांधार, कोमल मध्यम, पंचम, तीव्र धैवत, तीव्र निषाद हे स्वर लागतात. जाति संपूर्ण-संपूर्ण. वादी षड्ज. संवादी पंचम, गानसमय दिवसाचा पहिला प्रहर. हा बिलावल रागाचा एक प्रकार आहे. २ दौलताबादचें जुनें नांव. ॰गुरु-पु. बृहस्पति. ॰गृह-घर-न. १ देव ठेवण्याची खोली. २ मंदिर. ॰घाई-स्त्री. देवापुढें ढोल वाजविण्याची विशिष्ट गति, प्रकार.॰घाट-पु. देवळास जाण्यासाठीं बांधलेली वाट-रस्ता. ॰चार-पु. ग्रामदेवीचें दूतरूपी पिशाच्च; पिशाच्चगण. [सं. देव + चार; देवाप्सरस] ॰जन-पु. देवळांतील चाकरनोकर. ॰जी-जी धसाडा-पु. १ माक- डाच्या खेळांतील पुरुषाचे कपडे घातलेला माकड. यांतील माकडीणीला रत्नी म्हणतात. २ (ल.) अडाणी, कुरूप माणूस; विद्रूप मनुष्य. म्ह॰ (व.) देवजीधसाड्या पुंजाइ पाद्री-नवरा हाण. मार करणारा व बायको गरीब असें जोडपें. ॰झाड-न. (कों.) देवानें किंवा पिशाच्चानें झपाटलेला मनुष्य.॰ठिकें-न. गांवांच्या सीमांचा तंटा देवापुढें दिव्य करून तोडल्यामुळें महाराला (इनाम) मिळालेली बिन सार्याची जमीन. ॰डांगर-पु. काळा भोंपळा; चाकी. हें फळ दुध्या, मुगा अथवा मुगवा, काशीफळ यांच्याहून निराळें आहें.॰डांगरी-स्त्री. १ देवडांगराचा वेल. २ घोसाळीचा वेल. ३ देवताड. ॰त-न १ देव. २ (ल.) लाडका; आवडता. [सं. दैवत] ॰तरु-पु १ पिंपळ, मंदार, पारिजातक, संतान, कल्पवृक्ष, हरिचंदन यांना उद्देशून लावतात. २ जुनें व पवित्र असें कोणतेहिं झाड. ॰तवार-पु. (रा.) कुळदेवतेच्या पूजेचा दिवस. [देव + सं. तिथिवर-त्योहार-तेहवार-तवार] ॰ताळा-वि. फाजील कर्मठ; देवदेव करणारा.॰ताळें-न फाजील कर्मठपणा. ॰ती/?/-न. तीर्थ पात्र ॰त्तर-त्रा-स्व-न. (कायदा) देवाला दिलेली मिळकत, देणगी.॰त्रयी-स्त्री. ब्रह्मा, विष्णु, महेश. 'जयातें देवत्रयी कहीं नायके ।' -ज्ञा ११.१४७. ॰त्व-न. देव- पण; देवाची स्थिति; अवस्था.॰त्त-पु. १ पांच उपप्राणांपैकीं एक. 'ज्याकरितां जांभया येती । तो म्हणावा देवदत्त ।' -यथादी १८.१००४. २ अर्जुनाचा शंव. 'जाता कुरुकटकावरि वाजविला दिव्य देवदत्त दर ।' -मोविराट ४.२. ३ एक विशेषनाम; बुद्धाचा मेहुणा. -वि. १ देवानें दिलेलें. २ कोणीएक; कोणी तरी उदाहर- णार्थ घेतलेली व्यक्ति. 'देवदत्त लठ्ठ न दिवसा खात नाहीं' ॰दया-स्त्री. १ परमेश्वरी कृपा. २ (ल.) देवाच्या दयेनें प्राप्त झालेली संपत्ति; गुरेंढोरें, मालमत्ता, मुलेंबाळें इ॰. ॰दरबार- न. १ देऊळ. २ सभामंडप. याच्या उलट राजदरबार. 'देवदरबारीं खोटें बोलूं नये.' ॰दर्शन-न. १ देवाचें दर्शन. २ विवाहानंतर सपत्नीक देवाच्या भेटीस जाणें; लग्नानंतरची ओव्हर-वधूवरयात्रा. ॰दार-दारू-पु. हिमालय इ॰ ठिकाणीं उप्तन्न होणारा वृक्ष हा फार उंच व दिसण्यांत सुंदर असतो. हा शें-दोनशें वर्षें वांचतो. जस- जसे हे वृक्ष जून होतात तसतसे बळकट होऊन उपयुक्त होतात. याचें इमारतीलांकूड होतें. यापासून टर्पिनतेल काढतात. लाल, तेल्या, काष्ट इ॰ याचे प्रकार आहेत.॰दारी-वि. देवदाराच्या. लांकडाचें केलेलें; देवदारासंबंधी. ॰दाली-स्त्री. देवडांगरी. ॰दासी-स्त्री. मुरळी; भावीण; दक्षिणेंत देवास वाहिलेली कुमारिका असा अर्थ रूढ आहे. हिचा धंदा देवाची सेवा व नृत्य- गायन करणें. ॰दूत-पु. (ख्रि.) १ देवाचा दूत-निरोप्या जासूद. २ देवाची सेवा करून त्याचा हुकूम बजावणारा स्वर्गीय बुद्धि- विशिष्ट आत्मा; (इं.) एंजल याचा पर्याय. 'जेव्हां मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवानें येईल व त्याजबरोबर सर्व देवदूत येतील तेव्हां तो आपल्या वैभवी राजासनावर बसेल.' -मत्त २५.३१. ॰देव-पु. १ देवपूजा; धार्मिक विधि, आचार किंवा पूजाअर्चा. (क्रि॰ करणें). २ देवांचा देव; विष्णु. महादेव.॰देव करणें- पूजाअर्चा करणें; कळकळीनें प्रार्थना करणें; अतिशय श्रम करणें. ॰देवक-न.देवक पहा. ॰देवतार्चन-न. देवतार्चन पहा. ॰देव्हारा-पु. पुष्कळ देवता, सिद्धपुरुष, साधु यांची भक्ति, प्रार्थना इ॰ करणें (दुखणें वगैरे संकटाच्या निवारणाकरितां). 'देवदेव्हारे केले बहुत । औषधासी नाहीं गणित ।' ॰द्वार-न. १ मंदिराचें दार. २ मंदिर; देवस्थान; पवित्र जागा; धार्मिक कृत्यें करण्याची जागा. ॰धर्म-पु. १ देवदेव; देवपूजा वगैरे. २ कांहीं इष्ट सिद्धीविषयीं किंवा अनिष्ट निरसानार्थ कुलग्रामदेवतादिकांस नवस करणें, कौल लावणें इत्यादि. ३ नैमित्तिक धार्मिक कृत्य याच्या उलट नित्यधर्म. ॰उठविणें-दुसर्यानें पिशाचादि क्षुद्र- देवतांमार्फत उत्पन्न केलेली पीडा वगैरे दूर होण्याकरितां शांति वगैरे सारखीं कृत्यें करणें. देवाधर्माचा-वि. देव, पिशाच यांच्यापासून उप्तन्न झालेला (रोग इ॰). याच्या उलट अंग- रोग. देवाधर्मानें टाकलेला-वि. जातिबहिष्कृत; धर्मबाह्य. ॰धान्य-न. १ ज्याचा नैवेद्य देवास अर्पण करावयाचा असें धान्य (तांदूळ, गहूं इ॰). २ रानांत आपोआप उगवणारें देव- भात वगैरे धान्य. ॰धूप-पु. देवापुढें लावावयाचा सुवासिक धूप- ॰नदी-स्त्री. १ (काव्य) गंगा; भागीरथी नदी. 'धर्म म्हणे धर्मा ज्या देवनदी प्रसवली महाभागा ।' -मोशांति ६.३०. २ आकाश- गंगा. ॰न(ना)ळ-पु बोरूची एक जात. 'मीं जाण देवनळही स्वकरीं धराया ।' -र २७. ॰नागरी-स्त्री. बालबोधी (संस्कृत) लिपी; संस्कृत भाषेची व ग्रंथांची लिपि. [देवनगर ] ॰निंदक-वि. देवांची निंदा करणारा; नास्तिक. ॰निंदा-स्त्री. देवांची निंदा. ॰पण-पणा-पुन. १ देवधर्म अर्थ २ पहा. २ देवलाळा. ३ (गो.) अंगांत येऊन प्रश्नांचीं उत्तरें देणें.॰पळही-ळहें-स्त्रीन कापसाची एक जात; देवकापशी; देवकापूस. -ऋ ६८. (टीप)॰पाट-पु. देवाचा व पूजा करण्याकरितां बसण्याचा पाट. ॰पाण-न. (कु.) नैमित्तिक देवस्की; देवपणा. ॰पिसा-वि.देवासाठीं वेडा झालेला. ॰पिसें-पिसा-शी-नस्त्री. फाजील धर्मनिष्टपणा. ॰पूजास्त्री. देवतार्चन पहा.॰पूजा वाढणें-(ल.) मगरूर होणें; थोडीशी प्रतिष्ठा वाढल्यामुळें फुगणें. 'गांड भरे आणि देवपूजा वाढे.' ॰पुरी- स्त्री. १ वाटेल त्या येणार्याजाणार्यास मोकळीक असलेलें घर. २ (ल.) धर्मशाळा.॰प्रतिष्टा-स्त्री. १ मंदिरांत केलेली नव्या मुर्तींची स्थापना. २ विवाहादि संस्कारांच्या आरंभीं करावयाची देवतांची स्थापना; देवक बसविणें. ॰प्रश्न-पु. १ देवाला कौल लावणें. २ (फलज्योतिष) ग्रह पाहणें. (क्रि॰ करणें; पाहणें; येणें; उतरणें). ॰बाभ(भृ)ळ-स्त्री. कंकर; कंकरी; काळी बाभूळ. सामान्य बाभळीसारखा हिचा वृक्ष मोठा होत नाहीं. फुलें पिवळीं असतात या झाडास लाख येते. पिसाळलेल्या कुत्राच्या कोल्ह्याच्या विषावर उपयोगी आहे. देवबाभळीचें मूळ थंड पाण्यांत १ ते ४ तोळेपर्यंत उगाळून त्यांत पाणी घालून पाजावें. हें प्रत्यहीं दोनदां याप्रमाणें ७ दिवस द्यावें. पथ्य करावें -वगु ४.३०. ॰बुद्धि-स्त्री. १ देवाविषयीं आस्तिक्यबुद्धि. २ चराचर विश्व देवमय पाहण्याची दृष्टि. याच्या उलट पाषण-पर्वतबुद्धि ॰ब्राह्मण-पु. १ यात्रेच्या सांगतेप्रीत्यर्थ ब्राह्मणभोजन घालणें. २ यात्रेच्या ठिकाणीं देवाची पूजा व ब्राह्मणभोजन करणें. ३ लग्न- मुंजीचेपूर्वी प्रथम जेवण करतात तें. ॰भक्ति-स्त्री. १ देवाची सेवा २ (कों.) पिशाच्चउपद्रव नाहींसा करण्यासाठीं अंगारा लावणें; आपल्या अंगीं पिशाच्चाचा संचार करून घेणें इ॰ ॰भक्त्या-वि. पंचाक्षरी; मांत्रिक; देवऋषी. ॰भात-न. आपोआप उगवणारें भात; एक उपधान्य. हें डोंगरांत पाणथळ जागीं पिकतें. उपवासाच्या दिवशीं खातात. ॰भाषा-स्त्री.स/?/त भाषा. ॰भूमि-स्त्री. १ पवित्र भूमि. २ यज्ञयाग करावयाची किंवा जीमध्यें नद्या, मंदिरें वगैरे आहेत अशी पवित्र जागा, प्रांत. ॰भोळा-वि. साधासुधा; निरंतर देवसेवेंत निमग्न असल्यामुळें जगांतील उलाढालीशीं संपर्क नसलेला; सात्त्विक (माणूस). ॰मंगळ-वि. ज्याच्या कटीवर, उरावर. शिरावर व कपाळावर मिळून चार पांच भोवरें असतात असा (घोडा) -अश्वप १.९०.॰मण-मणि-वि ज्याचें ऊर सोडून वरीलभागीं कंठाचें खाली भोंवरा आहे असा (घोडा). हा शुभलक्षणी होय. -अश्वप १९२. 'बाहात्तर खोडी परी देवमण कंटी ।' -तुगा १६७५.॰मात-वि. देवाकडे सर्वस्वीं लक्ष असलेला; धार्मिक. ॰मय-वि. देवरूप बनलेला. ॰माणूस-पु. निरूपद्रवी, विश्वासु, निष्कपटी माणूस. ॰मातृक-वि. पावसाच्या पाण्यानें जेथें पीक होतें असा (देश). याच्या उलट नदी-जलमातृक. ॰मासा-पु. एक प्रकारचा मासा; याची लांबी ४५ ते ८० फूट असून हा मांसाहारी आहे. जबड्याची उंची माणूस उभा राहील इतकी असते. हा शेपटीनें मोठ्या नांवा फोडतो. याचें तेल व जबड्याचें हाड उपयुक्त व किंमतवान असते. ॰मुलुक-पु.नर्म- देच्या उत्तरेकडील हिंदुस्थान देश याच्या उलट राक्षसी मुलुक = दक्षिणहिंदुस्थान. ॰यज्ञ-न. जेवणाच्या पूर्वीं करावयाचा एक यज्ञ; वैश्वदेव; पंचमहायज्ञ पहा. ॰यात्रा-स्त्री. देवाची मिरवणूक. ॰यान-न. देवाकडे नेणारा मार्ग; उत्तरायण. ॰योनि-स्त्री. उपदेव; विद्याधर, अप्सरा, यक्ष, राक्षस, गंधर्व, किन्नर, पिशाच, गुह्यक, सिद्ध, भूत इ॰ ॰रसपण-न. देवऋषी, मांत्रिकपणाचें काम, धंदा. ॰राज-पु. इंद्र. ॰रुखा-पु. ब्राह्मणांतील एक पोटजात. ॰रुखी-स्त्री. १ मंदिरांतील गाभारा. २ (कु.) (देवळांतील देव ठेवण्याचा) कोनाडा. ॰रुषी-शी-लशी-पु. देवभक्त्या पहा. ॰लशी-पु. अंगांतील भूत काढणारा मांत्रिक. ॰रुसकी-रसकी-लसकी-स्त्री. देवरसपण पहा. ॰रूपी- वि. देवाच्या रूपासारखा; देवाच्या रूपांतील देवर्षि-पु. स्वर्गांतील ऋषी. यांत नारद, अत्रि, मरीची, भरद्वाज, तुंबुरु इ॰ चा समावेश होतो. 'शक म्हणे कर हरिहर-विजयांचें आशु गान देवर्षे ।' -मोविराट ६.२४. देवल-लक-पु. १ देवापुढें ठेवलेली दक्षिणा इ॰ वर उदरनिर्वाह करणारा ब्राह्मण. २ दक्षिणा घेऊन धर्मकृत्यें करणारा; भिक्षुक. ३ गुरव. 'कुंभार देवळक तथा धनगर ।' -स्वादि ६. ५.३५. ॰लंड-वि. १ देवास तुच्छ मानणारा. २ नास्तिक. ॰लोक-पु. स्वर्ग. ॰वाणी-स्त्री. १ संकृत भाषा. 'देववाणी गीर्वाण संस्कृत ।' -दावि वेळ. ३८९. २ आकाशवाणी. ॰वेळ-स्त्री. सकाळची वेळ ॰वृक्ष-पु. देवतरु पहा. ॰व्रत-पु. भीष्माचार्य. 'अंतुळें पितृप्रसादें मंडित देवव्रता असामान्य ।' -मोकर्ण ५०.७४. ८.४८. ॰शिल्प-न. मूर्ति, रथ, यज्ञकुंड वगैरे संबंधाचें शिल्प. ॰सभा-स्त्री. इंद्रसभा. ॰साख-पु. एक राग. यांत षड्ज, तीव्र ऋषभ, कोमल गांधार, कोमल, मध्यम, पंचम, कोमल धैवत, कोमल निषाद हे स्वर लागतात. जाति संपूर्ण-संपूर्ण. वादी षड्ज. संवादी मध्यम. गानसमय दिवसाचा पहिला प्रहर. हा एक कानड्या रागाचा प्रकार आहे. ॰साजुज्य-न. देवांत लय होणें; विलीन होणें. ॰साळी-स्त्री. (व) देवभात; न पेरतां उगवलेल्या साळी. ऋषिपंचमीला याचे तांदूळ खातात. देवसू-वि. (राजा. कु.) देवाला दिलेली, वाहिलेली (जमीन, उप्तन्न इ॰) देवस्की- स्त्री. १ देवभक्ति पहा. २ गांवदेवतेचा वार्षिक उत्सव. ३ देवाला कौल लावणें. ॰स्थळ पु. पुण्यभूमि. ॰स्थानन. १ पुण्यभूमि. २ देवाला अर्पण केलेली जमीन किंवा उप्तन्न. ३ देवाचें संस्थान. ॰स्थापन-ना-नस्त्री. देवप्रतिष्ठा पहा. देवस्व-सू-न. देवस्थान अर्थ २ पहा. देवळ-न. देऊळ; मंदिर. [सं. देवालय] देवळची घांट-स्त्री. देऊळघांट पहा. देवळी-स्त्री. १ देवरुखी पहा. २ लहान देऊळ. देवळी-पु. भावीण; तिची संतति. यांच्याकडे दिवें लावणें, वाद्यें वाजविणें इ॰ कामें पिढीजात असतात. यांची स्वतंत्र जात मानितात. देवाईल-न. देऊळ. 'बरें जालें तुझें केलें देवाईल । लेकरें बाईल उपेक्षिली ।' -तुगा ६५५. देवांगण-न. १ देवळांतील अंगण. २ त्या अंगणांत उभे राहून घ्यावयाची शपथ. 'शून्याचीं देवांगणें । प्रमाणासी ।' -अमृ ७.१०२. ३ गंधर्व नगर. ४ मिथ्या कल्पना. देवांगना-स्त्री. १ स्वर्गांतील अप्सरा. २ भावीण; देवळी; देवदासी. देवागार-न. (काव्य.) देवघर. देवांगें-न. (महानु.) पीतांबर. 'काढिलीं देवांगें चांग रत्नें कनक भरिएले परिएळा ।' -धवळे पूर्वार्ध ३९. देवाधर्माचा-वि. देवाधर्मासंबंधीं; पवित्र; धार्मिक (काम, वस्तु, व्यक्ति). देवा- धिदेव-पु. १ देवदेव अर्थ २ पहा. २ विष्णु, महादेव. देवाना प्रियः-१ देवाचा लाडका. २ संन्यासी. ३ (ल.) मूर्ख. देवान्न-न. १ देवभात पहा. २ पक्वान्न इ॰ उत्तम अन्न. 'निंदिती कदान्न इच्छिती देवान्न । पाहाताती मान आदराचा ।' -तुगा २८२७. देवापगा-स्त्री. देवनदी; भागीरथी; गंगा. [सं. देव + आपगा] देवापुढचा(पुढें)देव-पु. १ महादेवापुढचा नंदी. २ (ल.) मूर्खशिरोमणी. देवार्चन, देवावाहन, देवोत्थापन्- देवता खालीं पहा. 'जनार्दनस्वामी करिती देवार्चन ।' -रामदासि २.७२. देवालय-न. देऊळ; मंदिर. देवाज्ञा-स्त्री. (ल.) मृत्यु. (क्रि॰ होणें; येणें). देवींधर्मीं-क्रिवि. १ देवधर्मामध्यें. 'पाटाची बायको देवींधर्मीं उपयोगी पडत नाहीं.' २ देवधर्माला, व्रत वैकल्यें किंवा धार्मिक आचारविचार, धार्मिक उपाय, उपचार करून; प्रश्न पाहून. (क्रि॰ पाहणें, विचारणें). 'हें संकट टळावें म्हणून देवींधर्मीं विचारून पहा.' देवोत्थान-न. चातुर्मास संपल्यावर कार्तिक शुक्ल एकादशीस विष्णूचें जागें होणें आणि उठणें. या एकादशीस प्रबोधिनी एकादशी म्हणतात. [सं.]
नव
वि. नऊ. नऊ संख्या. 'हे नवरत्नमाळा गोमटी । जो घाली सद्गुरुच्या कंठीं ।' -एभा १०.२३८. [सं. नव; गुज. नव; झें. नवन्; ग्री. एन्नेअ; लॅ. नोव्हेम्; गॉ. निउन; अँसॅ. निगन्, प्राज. निउन; अज. नेउन; प्राप्र. नेविन्त्स; स्लॅ. देवन्ति; लिथु-देव्यन्ति; हिब्र्यू; नओइ; कँब्रि-नव्] ॰कुलपांचें तारूं- न. लढाऊ गलबत. 'विलायत जंजिरा नवकुलपांचें तारूं ।' -विवि ८.३. ५४. ॰तुकड्यांची चोळी-स्त्री. नऊ तुकडे जोडून केलेली चोळी; इच्या उलट अखंड चोळी, तीन तुकड्यांची चोळी. म्ह॰ नवव्या दिवशीं नवी विद्या. सामाशब्द- ॰कोट (टी)नारायण-पु. १ कोट्याधीश; अतिशय श्रीमंत मनुष्य. 'पण हे विचारांचे नवकोटनारायण आचाराच्या बाबतींत मात्र सुदाम्यापेक्षां दरिद्री आसतात.' -प्रेम २१. २ (विपरीत लक्ष- णेनें) अतिशय दरिद्री; कंगाल मनुष्य. -शास्त्रीको. [नव + कोट नारायण] ॰कोटी कात्यायनी(येणी)-चामुंडा-स्त्रीअव. नऊ कोट देवी, कात्यायनी, चामुंडा. 'नवकोटी कात्यायेणीचा विचार । पिंडीं कोठें ।' -दा ९.५. ३१. 'पहावया श्रीकृष्णाचें लग्न । सकळ दैवतें निघालीं सांवरोन । नवकोटी चामुंडा संपूर्ण । चालती वेगें तेधवां ।' -ह २४.१०५. [नव + कोटी + कात्यायनी, चामुंडा] ॰कोण-पु. (भूमिति) नऊ कोपरे असलेली व नऊ बाजूंनीं मर्या- दित आकृति. -वि. नऊ कोन असलेली. [नव + सं. कोण] ॰खंड- खंडें-नअव. १ पृथ्वीच्या नऊ खंडांचा समुदाय. इलावृत्त, भद्राश्व, हरिवर्ष, किंपुरुष, केतुमाल, रम्यक, भरत, हिरण्मय व उत्तरकुरू हीं नवखंडें होत. दुसरेहि पाठभेद आहेत. (अ) भरत, वर्त्त?, राम?, द्रामाळा (द्रमिल, द्रामिल?), केतुमाल, हिरे (हीरक?), विधि- वस?, महि आणि सुवर्ण. (आ) इंद्र, कशेरु, ताम्र, गभस्ति, नाग, वारुण, सौम्य, ब्रह्म, भरत हे नऊ भाग. -हंको. 'नवखंडें सप्तद्वीपें । छपन्नदेशींच्या रायांचीं स्वरूपें ।' -ह २८.६४. [नव + सं. खंड = तुकडा, पृथ्वीचा भाग] ॰खंड पृथ्वी-स्त्री. जींत नऊ खंडें आहेत अशी पृथ्वी. 'नवखंड पृथ्वी व दहावें खंड काशी.' 'नवखंड पृथ्वीचें दान.' ॰खणी-वि. नऊ खणांची. 'दुखणी काय नवखणी माडी नलगे धरा नखेंदु खणी ।' -मोकृष्ण ८३.१३. 'लावण्याची सकळ संपदा सहज उभी नवखणी ।' -पला ४.३४. [नव + खण] ॰गजी-पुस्त्री. १ (नऊ गजी) नऊ गज लांबीचा सोपा. राजदरबारचा भव्य दिवाणखाना; कचेरी; सदर. 'राजा नवगजींत बैसला ।' -ऐपो १७.२ तंबू; डेरा. 'बाडें सुंदर खाबगे नवगज्या सिद्धाच होत्या घरीं ।' -सारुह ३.४५. 'तमाम येऊनु नऊ गजी आसपास येऊनु उतरीले' -इमं ७. नवगोजी पहा. [नव + गज = एक परिमाण] ॰गुणपुअव. बुद्धि, सुख, दुःख, प्रयत्न, इच्छा द्वेष, संस्कार, पुण्य व पाप असे न्यायशास्त्रांत सांगितलेले नऊ गुण. 'बुद्धि सुख दुःख प्रयत्न । इच्छा द्वेष संस्कारण । पुण्य पाप नवगुण । बोलिजेती ।' -विउ ३.४. -वि. नऊपट. ॰गुण-वि. नऊ दोर्यांचें (यज्ञोपवीत इ॰). नऊ फेर्यांचें. 'नवगुण तव कंठी ब्रह्मसूत्र प्रभा जे ।' -मुरा बालकांड ११३. [नव + सं. गुण = दोरा] ॰गोजी-पु. डेरा. शामियाना. 'उतर तर्फेसी नवगोजी देऊनु उतरिले.' -इमं ७. ॰ग्रह-पुअव. १ सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू, व केतु हे नऊ ग्रह. २ (उप. निंदार्थी) जूट; टोळकें; टोळी; कंपू. ३ -न. मंगलकार्यारंभीं करतात ती नऊ ग्रहांची पूजा; ग्रहमख. 'दोन्हीं घरीं नवग्रहें झालीं । देवदेवकें पूजिलीं । -कालिका १६.४१. [नव + ग्रह] ॰चंडी-स्त्री. १ देवीची आराधना (विशेषतः तिच्या स्तोत्राचें, सप्तशतीचें नऊ वेळां पठण करून केलेली). 'जर मला पुत्र- प्राप्ति झाली तर देवीची नवचंडी करीन.' -रत्न १.३. २ नवरात्र; नवरात्र पहा. [नव + सं. चंडी = देवी] ॰छिद्रें-नअव. नवद्वारें पहा. ॰जणी-स्त्रीअव. १ नऊ स्त्रिया. २ (ल.) नवविधाभक्ति. 'अत्यंत शहाण्या सुवासिनी । आणिक आल्या नवजणी । कृष्णाची खुतखावणी । त्या जाणोनी वर्तती ।' -एरुस्व १६.४३ ॰ज्वर- पु. दूषित तापाचा एक अतिशय तीव्र प्रकार; हा ताप नऊ दिवसांच्या मुदतीचा व प्रायः घातुक असतो. [नव + सं. ज्वर = ताप] ॰टकें- न. शेराच्या अष्टमांशाचें, (कैली) अर्ध्या पावशेराचें माप. [नऊ + टांक] ॰टांक-न. अदपावाचें वजन. नवटकें पहा. [नव + टांक; गुज. नवटांक; गो नवटांग] ॰द्वारें-नअव. दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, तोंड, गुदद्वार व मूत्रद्वार अशीं मानवी शरीराचीं नऊ द्वारें, छिद्रें. 'नवद्वारें देहीं । तो असतुचि परि नाहीं ।' -ज्ञा ५.७५. ॰नाग-पुअव. १ पुराणांतरीं वर्णिलेले अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक व कालीय ह्या नांवांचे नऊ नाग, सर्प. २ नऊ हत्ती. [नव + सं. नाग = सर्प, हत्ती] ॰नाग- सहस्त्रबळी-वि. नऊ हजार हत्तींचें बळ असलेला. [नव + सं. नाग = हत्ती + बळी = बलवान] ॰नागसहस्त्रशक्ती-स्त्री. नऊ हजार हत्तींचें बळ. 'अंगीं जियेस नवनागषस्त्रशक्ति ।' -आपू ३९ [नव + सं. नाग = हत्ती + सं. सहस्त्र = हजार + सं. शक्ति = बळ] ॰नागोर्या-पु. (ना.) चेंडूलगोर्यांचा खेळ. ॰नाथ-पुअव. मच्छिंद्र, गोरक्ष, जालिंदर, कानीफा, चरपटी, नागेश, भरत, रेवण व गीहिनी हे नवनारायणाचे अवतार मानतात. प्रकाश, विमर्श, आनंद, ज्ञान, सत्यानंद, पूर्णानंद, स्वभावानंद, प्रतिभावानंद, व सुभगानंद असहि पाठभेद आहे. -नव १.३९. ते ४३. -ज्ञाको (न) ३७ ॰नारायण-कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पला- यन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस, व करभाजन. -नव १.२९ ते ३०. ॰नारीकुंजर-पु. नऊ स्त्रियांनीं आपल्या शरीरन्स निरनिराळ्या प्रकारें पीळ व मुरड देऊन (कृष्णाच्या पुयोगसाठीं) बनवि- लेली हत्तीची आकृती. [नव + सं. नारी = स्त्री + सं. कुंजर = हत्ती] ॰निधि-धी-पुअव. कुबेराचे नऊ खजिने. त्याचीं नावें:-महा- पद्म, पद्म, शंख, मकर, कच्छप, मुकुंद, कुंद, नील, आणि खर्व. 'मोल तुमचिया या श्रीचरणरजाचे न होय निधिनवही ।' -मोमंभा १.११२. [नव + सं. निधी = खजिना, सांठा] ॰महाद्वारे-नअव. नवद्वारें पहा. ॰महारोग-पुअव. राजयक्ष्मा, कुष्ट, रक्तपिती, उन्माद, श्वास, मधुमेह, भगंदर, उदर व मुतखडा हे नऊ दुर्धर व भयंकर रोग. [नव + सं. महायोग = मोठा, भयंकर रोग] ॰रंगी-वि. नऊ रंगांनी युक्त (पदार्थ.) ॰रत्नराजमृगांक-पु. (वैद्यक) एक औषधीं रसायन. [नव + रत्न + राजन् + मृग = हरिण + अंक = चिन्ह] ॰रत्नें-नअव. हिरा, माणिक, मोतीं, गोमेद, इंद्रनील, पाच, प्रवाळ, पुष्कराज, वैडूर्य किंवा तोर्लल्ली हिं नऊ प्रकारचीं रत्नें 'नवरत्नांची आंगठी.' ॰रत्नांचा हार-पु. स्त्रियांचा गळ्यांत घालण्याचा एक बहुमोल हार. ॰रस-पुअव. (साहित्य) साहित्य- शास्त्रांत वर्णिलेले शृंगार, विर, करूण, अद्भुत, हास्य, भया- नक, बीभत्स, रौद्र आणि शांत या नांवांचें नऊ रस. जी दैविकीं उदार वाचा । जैं उद्देशु दे नाभिकाराचा । तैं नवरससुधाब्धीचा । थावो लाभे ।' -ज्ञा १०.७. ज्ञाता जो सरसावला, नवरसां-माझिरि शृंगारसा ।' -रा ५ [नव + सं. रस] ॰रसिका-वि. चलाख; त्र- तरीत; आवेशयुक्त; नऊ रसांनीं भरलेलें, पूर्ण (गान, कवन, कथा, वर्णन, ग्रंथ, श्लोक, गवई, कवि, वक्ता इ॰). [नवरस] ॰रात्र-न. १ (सामा.) नऊ अहोरात्रांचा समुदाय. २ (विशेशार्थाणें) चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचा काल (रामाचें नवरात्र); तसेंच अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचा नऊ दिवसांचा काल. (देवीचें नव- रात्र) यास प्रतिपदेपासून चंपाषष्ठीपर्यंत सहा दिवस खंडोबाचें नवरात्र असतें. ३ वरील कालांत करतात तो देवाचा, देवीचा उत्सव, पूजा. [नव + सं. रात्रि = रात्र] ॰लख-वि. (काव्य) नऊ लक्ष. 'आकाशांत नवलख तारे आहेत.' [नव + लक्ष = शंभर हजार] ॰लक्षणें-नअव. आचार, विनय, विद्या, प्रतिष्ठा, तीर्थदर्शन, निष्ठा वेदपठन, तपस्या व दान हिं ब्रह्मणाचीं नऊ लक्षणें. -शर. ॰लाखा-ख्या-वि. ज्याच्याजवळ नऊ लक्ष रुपये आहेत असा; लक्षाधीश; अतिशय श्रीमंत. 'अपुल्या पुम्ही घरचें नवलाखे मिजाजी ।' -प्रला १७५ [नव + लाख = शंभर हजार] ॰विध- वि. नऊ प्रकारचें. [वन + सं. विधा = प्रकार, भेद] ॰विधभजन- न. नवविधा भक्ति पहा. 'नवविधभजन घडो । तुझिये स्वरूपें प्रीति जडो ।' ॰विध रत्नें-नअव. नवरत्ने पाह. ॰विधा भक्ति-स्त्री. श्रवण = ईश्वराचें गुणवर्णन, चरित्रें इ॰ ऐकणें; कीर्तन = ईश्वराचें चरित्र वर्णन करणें, वाचणें; स्मरण = ईश्वराचे गुण, चरित्र इ॰ आठवणें; पादसेवन = ईश्वराचे पाय धुणें, चेपणें इ॰ सेवा; अर्चन = पूजा करणें; वंदन = नमस्कार करणें; दास्य = चाकरी करणें; सख्य = ईश्वराशीं सलगी करणें; आत्मनिवेदन = ममत्व सोडून ईश्वरास सर्वस्व, स्वतःला अर्पण करणें. या नऊ प्रकारानीं करावयाची ईश्वराची भक्ति, सेवा. 'श्रवण कीर्तन स्मरण । पाद- सेवन अर्चन वंदन । दास्य सख्य आत्मनिवेदन । हे भक्ति नव- विधा पै ।' -विपू ५.२३. -दा १.१. ३. [सं. नवविधा = नऊ प्रकारची + भक्ति = सेवा] ॰सर-वि. नऊ सरांचा (हार इ॰). नव + सर] ॰सुती-स्त्री. जानवें करण्यासाठीं नऊ पदरी वळून केलेला दोरा. [नव + सुत = दोरा] ॰नवांकित-वि. पुठ्ठ्यावर नवाच्या आंकड्यानें चिन्हित (घोडा). [नव + सं. अंकित = चिन्हानें युक्त] नवास्त्र-वि. नवकोण पहा. [नव + सं. अस्त्र = कोण, कोपरा]
मन
न. १ चित्त; चित्शक्ति; बुद्धि, विचार, तर्क, स्मृति इ॰ चें अधिष्ठान; अंतःकरणचतुष्टय आणि अंतःकरण पंचक पहा. २ अंतःकरण; हृदय; भाव, रस, विकार इ॰ चें अधिष्ठान; सुखदुः खादिकांचें ज्ञान करून देणारें इंद्रिय. ३ सदसद्विवेकबुद्धि; बरें- वाईट समजण्याची शक्ति; अंतर्याम. 'ज्यांचे मन त्यास ग्वाही देतें.' ४ जाणीव; आत्मबोध; भान; सावधपणा; शुद्धि. ५ संकल्पवि- कल्पात्मक अंतःकरणवृत्ति; इच्छा; निश्चयाशक्ति. 'संकल्प विकल्प तेंचि मन ।' -दा १७.८.६. ६ आवड; अंतःकरणाची ओढ, प्रवृत्ति; खुषी; मर्जी. ७ माया ८ प्रेम; लक्ष. [सं.] 'तुजवरिमन ईंचे यापरी कां इयेला ।' -र ४२. ९. ध्यान. म्ह॰ १ मनीं वसें तें स्वप्नीं दिसे. २ मन राजा, मन प्रजा. ३ मनांत एक, जनांत एक. ४ मनांत मांडे, पदरांत धोंडे. ५ मनीं नाहीं भाव, देवा मला पाव. ६ मनीं वसे तें स्वप्नीं दिसें. ७ मान जना, अपमान मना. ८ मन जाणे पापा माय जाणे मुलाचे बापा. ९ मनास मानेल तो सौदा. (वाप्र.) ॰उठणें-उडणें-आवडेनासा होणें; कंटाळा, तिटकारा, वीट येणें. 'ह्या सखलादी अंगरख्यावरून अलीकडे माझें मन उडालें आहे.' ॰कांपणें-दुःख होणें; भीति वाटणें. 'व्यूढोरस्कादिक नव मेले, मन कांपतें कथायाला ।' -मोभीष्म ९.६२. ॰खचणें- कचरणें-हिंमत सुटणें; हातपाय गळाठणें. ॰खाणें-आपण केलेल्या वाईट कृत्याबद्दल स्वतःलाच वाईट वाटणें; टोंचणी लागणें; पश्चात्ताप होणें. ॰गडबडणें-भीतीनें भरणें; गांगारणें; घाबरणें 'गडबडतें मन वेडें, माणुस मीं मीं म्हणोनि बडबडतें ।' -मोशल्य ४.४९. ॰घालणें-देणें-लावणें-मन एकाग्र करणें; लक्ष लावणें. ॰जाणें-इच्छा होणें. ॰तुटणें-मनांत कंटाळा, अप्रीति उत्पन्न होणें; मन पराङ्मुख होणें. म्ह॰ तुटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं. ॰थोड्यासाठीं निसरडें करणें-क्षुल्लक फायद्या- साठीं निश्चयापासून पराङ्मुख होणें. ॰दुग्ध्यांत पडणें-संशयांत पडणें; गोंधळणें. 'आतां माझें मन दुग्ध्यांत पडलें.' -बाळ २.१९५. ॰धरणें-१ एखाद्याच्या मनाप्रमाणें वागणें. २ हांजी हांजी करणें. 'आदर देखोनि मन धरी । कीर्तीविण स्तुती करी ।' -दा २. १०.२५. ॰पाहणें-मनाची परिक्षा करणें; (एखाद्याच्या) मनाचा कल अजमावणें; एखाद्याचे विचार त्याचें भाषण, वागणूक इ॰ वरून ठरविणें. ॰बसणें-लागणें-(कांहीं गोष्ट करावयास) अनु- कूल होणें; अतिशय आवडणें; आसक्त होणें; प्रिय वाटूं लागणें. 'नको कचा मज टाकुनि जाऊं, तुजवरि मन हें बसलें रे ।' ॰मनाविणें-मन वळविणें; मर्जी संपादणें; अनुकूल करून घेणें. ॰मानेल तसें करणें-इच्छेस येईल तसें करणें; स्वैर वर्तन करणें; स्वच्छंदानें वागणें. ॰मारणें-इच्छा मारणें; इच्छा दाबून ठेवणें. ॰मिळणें-उभयतांच्या आवडीनिवडी सारख्या असणें. 'स्त्री- पुरुषांचीं मनें मिळालीं नाहींत तर त्यांचा संसार सुखावह होऊं । शकत नाहीं.' ॰मुंडणें-इच्छा नाहींशी करणें. 'आधीं मन मुंडा व्यर्थ मुंडितां मुंडा ।' -मृ ६५. ॰मोठें करणें-उदारपणा दाखविणें; थोरपणानें वागणें. ॰मोडणें-एखाद्याची आशा विफल करणें; एखाद्याच्या इच्छेविरुद्ध वागणें; दुःख देणें. 'जयाचेनि शब्दें मन मोडे । तो एक पढतमूर्ख ।' -दा २.१०.६. ॰विटणें-कंटाळा, वीट येणें. 'बहुवीरक्षय घडला, तेणें बहुजीवितास मन विटलें ।' -मोभीष्म ११.७४. मनांत आणणें-संकल्प, निश्चय करणें; मना- वर घेणें. मनांत (मनीं) कढविणें-मनांतल्या मनांत रागानें चूर करणें. जळफळावयास लावणें. 'निजतेजें भानुला मनीं कढवी ।' -मोविराट ३.१२०. मनांत (मनीं) कालवणें-अंतःकरणांत अति शय कष्टी होणें; अतिशय दुःख होणें. 'बहुत दुःख मनीं जरिं कालवें । भिउनि ह्यास तयास न बोलवे ।' मनांत गांठ ठेवणें-मनांत वैरभाव, द्वेषबुद्धि, सूड घेण्याची इच्छा जागृत ठेवणें; अढी धरणें. मनांत गांठ बांधणें-घालणें-नीट ध्यानांत धरून ठेवणें; मनांत गोष्ट पक्की ठेवणें. मनांत चरचरणें-मनास काळजी, भीति वाटणें; दुःख होणें. मनांत ठेवणें-एखादी गोष्ट गुप्त राखणें; वाच्यता न करणें. मनांत नवमण जळणें-मनांतल्या मनांत संतापणें; मनांत द्वेष, सूड घेण्याची इच्छा जागृत ठेवणें. मनांत भरणें-पसंत पडणें; आवडणें. मनांत (मनीं) मांडे खाणें- व्यर्थ मनोरथ करणें; मनोराज्य करणें. मनांत (मनीं) म्हणणें-स्वगत बोलणें; स्वतःशीं पुटपुटणें. मनांतल्या मनांत जळणें-आंतल्या आंत जळफळणें; रागानें धुसमत राहणें. मनांतून उतरणें-आवडेनासा होणें; कंटाळा, वीट येणें. मनानें करणें- (कोणाची सल्ला न घेतां) स्वतःच्या विचारानें करणें. मनानें घेणें-मनाचा ग्रह होणें; मत बनणें. मनाला द्रव येणें-मनांत दया, प्रेम इ॰ कोमल भावना उत्पन्न होणें. मनाला लावून घेणें-अतिशय दुःख वाटणें. 'कल्पनेला सुचतील त्या गोष्टी मनाला लावून घेत बसले म्हणजे खाल्लेलं अन्न सुद्धां अंगीं लागा- यचं नाहीं.' -एक ४३. मनावर घेणें-धरणें-एखादी गोष्ट पत्करणें; तींत मन घालणें; सिद्धिस नेण्यास झटणें. 'झटता तुझा सखा तरि होतें हित, परि न हा मनावरि घे ।' -मोभीष्म ३.३. मनावर लिहून ठेवणें-कायमची आठवण ठेवणें; स्मृति- पटलावर कोरून ठेवणें. मनास (मनां) आणणें-१ लक्ष देणें; मानून घेणें. 'आम्ही वेडें बगडें गातों मनाशीं आणा ।' -ऐपो १४२. २ समजून घेणें. 'म्हणे पैल ते कोण ललना । कां तप करिते आणीं मना ।' -ह २६.२९. ३ मनावर घेणें; महत्त्वाचें मानणें; 'मी रागाच्या वेळीं बोललों तें मनास आणूं नका.' मनास येणें-वाटणें-आवडणें; पसंत पडणें. 'वारूबाई! पाहिलीस कां भावजय? येते का मनास?' -पकोघे. मनीं ठेवणें-गुप्त ठेवणें. 'चाल पुरा, हें मनींच ठेवून ।' -मोविराट ६.५२. मनीं जाण होणें-ओळखणें; जाणणें. मनीं धरणें-वागविणें-लक्ष्यांत असूं देणें. 'ह्यालागीं तुम्हाशीं बोधिलें । मनीं धराल म्हणोनिया ।' मनींमानसीं-मनोमानसीं-मनोमनी नसणें-(एखादी गोष्ट) अगदी मनांत देखील आलेली नसणें; स्वप्नींहि नसणें. मनो मन(य) साक्ष-१ मन मनाची साक्ष देतें. ज्यांना परस्परांविषयीं तिटकारा किंवा प्रेम वाटतें अशा मनुष्यास उद्देशून योजतात; एखाद्या गोष्टीबद्दल एकमेकांचे विचार एकमेकांना अंतर्मनाने कळतात या अर्थीं. २ मन स्वतःसाक्षी आहे; स्वतःच्या मनांतील अभिप्राय, उद्देश, भाव इच्छा इ॰ स्वतःस माहीत असतात. साधित शब्द.- मनाचा-वि. मनासंबंधीं; अंतःकरणाचा. मनाची आशा- ओढ-धांव-स्त्री. मनाचा कल, रोंख. सामाशब्द- ॰उथळा- वि. मोकळ्या मनाचा, साधा; छक्केपंजे न जाणणारा. ॰ओळख- स्त्री. एखाद्याच्या मनाची परीक्षा; स्वभावाविषयीं बनविलेलें मत. 'कोणाशीं वाईट बोलूं नये. कां? तर मनओळख होते.' ॰कपटी- वि. दुष्ट अंतःकरणाचा; लबाड. मनःकल्पित-वि. कल्पनेनें, तर्कानें केलेलें; काल्पनिक. मनकवडा-पु. दुसऱ्याचें मन वेधून घेण्याची शक्ति. 'मन माझें मोहिलेंस नकळे आहे तुझ्यापशीं मन- कवडा ।' -प्रला १६१. -वि. दुसऱ्याच्या मनांतील विचार ओळखणारा. ॰कामना-स्त्री. अंतःकरणांतील इच्छा. [मन + कामना] ॰कुजका-वि. हलक्या मनाचा; दुष्ट; विश्वासघातकी. मनःकृत- करणाचा. मनखोडी-स्त्री. मनोविकार. 'देवनाथ तुज हात जोडि मनखोडी सकळ सांडी ।' -देप ६३. मनच्या मनीं-क्रिवि. मनांतल्या मनांत; आपलें म्हणणें काय आहे हें न सांगतां. ॰गाडून-क्रिवि. मन लावून; अंतःकरणपूर्वक; एकाग्रतेनें. ॰देवता-स्त्री. अंतःकरणांतील देवता. १ मन; अंतःकरणांतील तर्क, आशा इ॰ ची प्रेरक शक्ति (क्रि॰ लवणें; वाहणें). 'यंदा सस्ताई होईल कीं महागाई? तुमची मनदेवता कशी लवते?' २ सदसद्विवेकबुद्धि; न्यायबुद्धि. ॰धरणी-स्त्री. मर्जी संपादन करणें; आर्जव; खुशामत. (क्रि॰ करणें) ॰धरणीचा-वि. दुस- ऱ्याचीं आर्जवें, खुशामत करण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा; मर्जी संपादणारा. ॰पाकुळका, मनाची पाकुळका, मन- पिंगळा-ळी-स्त्री. बऱ्यावाईट गोष्टी करण्याची प्रेरणा करणारी मनांतील देवता; मनोदेवता. मनःपीडा-स्त्री. मानसिक त्रास; दुःख, काळजी इ॰. मनःपूत-क्रिवि. (मनाला जें पवित्र, शुद्ध वाटतें त्याप्रमाणें) मनास येईल तसें; वाटेल तसें. 'कोणी वाटेल तें भलभलतें करूं लागला म्हणजे तो मनःपूत वागतो असें आपण म्हणतों.' -गीर १२५. म्ह॰ मनःपूतं समाचरेत् । मनःपूर्वक- क्रिवि. १ मनापासून २ जाणून बुजून; मुद्दाम. मनःप्रिय-वि. मनाला आनंद देणारें; समाधानकारक. मनभाव-पु. उत्सुकता; श्रद्धा; भक्ति; मनोभाव. 'मनभाव असल्यावांचून कार्य सिद्धिस जात नाहीं.' [सं. मनोभाव] ॰भूक-स्त्री. काल्पनिक, खोटी भूक; नेहमीच्या सरावामुळें वाटणारी भूक. ॰भोळा-वि. साधा; गरीब; निष्कपटी. ॰मन-स्त्री. (व) मनधरणी; खुशामत; आर्जव. ॰मानेसें-क्रिवि. मनास वाटेल तसें; मनःपूत. 'वर्तति मनमानेसें सुरतपदा अपतिका स्त्रिया बटकी ।' -मोसभा ६.२०. ॰मान्य- वि. स्वेच्छाचारी; स्वच्छंदी; बेताल. ॰मिळाऊ-वि. सर्वांशीं मिळून मिसळून राहणारा; गोड स्वभावाचा. ॰मुक्त-क्रिवि. यथेच्छ; अमर्यादपणें; मनमुराद; मनाची इच्छा पूर्ण होईपर्यंत. ॰मुराद- वि. १ मनोहर; आल्हादकारक; आनंददायक. २ विपुल; यथेच्छ; मनसोक्त; मनाची तृप्ति होईल इतकें (जेवणांतील पक्वान्न) [अर. मुराद = ईप्सित] ॰मेळ-वि. १ आवडतें; प्रिय; मनोहर. २ शास्त्र इ॰ चा फारसा विचार न करतां दोन्ही पक्षांच्या संमतीनें झालेलें (लग्न). ॰मोकळ-वि. खुल्या दिलाचा; सरळ; निष्कपट. ॰मोकळें करून-क्रिवि. खुल्या अंतःकरणानें; संकोच, भीति, लाज इ॰ सोडून. ॰मोठा-वि. १ उदार अंतःकरणाचा. २ उदार; सढळ; मोकळ्या हाताचा. ॰मोड-स्त्री. हिरमोड; निराशा. 'नको करूं मनमोड ।' -पला २२.४. ॰मोहतिर-न. मनाचा, मनानें ठरविलेला मुहूर्त; ॰मोहन-वि. मनाला खुष करणारा; रमणीय; आवडता; प्रिय. 'मनमोहन यादवराणा । कोणी जाउनि आणा ।' ॰मौज-स्त्री. १ गमतीचा विचार, कल्पना. २ लहर; नाद; छंद. ॰मौजा-करणें-स्वःच्या (रंगेल, अनिर्बंध) इच्छा तृप्त करणें. ॰मौजी-ज्या-वि. १. लहरी; छांदिष्ट; चंचलबुद्धि. २. मिजास- खोर; दिमाखी. ॰लज्जा-स्त्री. स्वाभविक, नैसर्गिक लाज; मनो- देवतेची टोंचणी; भीति; शरम; शिष्टाचार; संभावितपणा. 'तुला मनलज्जा नाहीं जनलज्जा तर धर.' ॰वळख-स्त्री. मनओळख पहा. ॰मनश्शांति-स्त्री. मनाची शांतता. ॰मनःसंतोष-पु. मनाचें समाधान; मनास होणारा आनंद. मनसमजावणी-समजा वशी-स्त्री. रागावलेल्या, दुःखी, सचित माणसाचें सांत्वन, समा- धान करणें. ॰समजूत-स्त्री. ग्रह; मत; समज; भावना. 'सर्व मनुष्यांची मनसमजूत एकसारखी असत नाहीं.' ॰समर्पण-न. (काव्य) मन अर्पण करणें. मनसाराम-पु. (विनोदानें) मन. 'मनसारामाचे स्वाधीन सर्व इंद्रियें आहेत.' ॰सुटका-स्त्री. मन एखाद्या गोष्टीपासून परावृत्त होणें. ॰सूत्र-न. इच्छानुरूप सत्ता चालविणारें, वागणारें, मन. ॰सोक्त-क्रिवि. यथेच्छ; स्वैर; स्वच्छंद. मनःपूत पहा. 'पशुपक्षी यांचा मनसोक्त व्यवहार आहे.' ॰सोद्दिष्ट-वि. मनांत योजिलेलें, ठरविलेलें, निश्चित केलेलें. मनस्तप्त-वि. १ दुःखदायक. २ अनुतापी; दुःखपीडित. मन- स्ताप-पु. (मनाला होणारा त्रास) दुःख; शोक; पश्चात्ताप; हुर- हुर; खिन्नता इ॰ मन(नः)स्थिति-स्त्री. १ मनाची स्थिति; मान- सिक अवस्था, भावना. २ मन. 'माझी मनस्थिति चंचल आहे.' ॰हलका-वि. दुर्बल; क्षुद्र मनाचा. ॰मनाकळित-वि. मनानें आकलन केलेलें. मनाजीपंत-पु. (विनोदानें) मन. मनाजोगा-वि. जसा हवा तसा; मनासारखा. मनापासून- क्रिवि. खरोखरी; बेंबीच्या देंठापासून; अतिशय; फार. मनापून- क्रिवि. खरोखरीं. मनायोग-ग्य-वि. क्रिवि. स्वेच्छेनें; मर्जीप्रमाणें. मना- सारखा-वि. इच्छेसारखा; आवडीचा; जसा पाहिजे तसा. मनुबाई-स्त्री. मन. मनेच्छ-च्छां-क्रिवि. मनसोक्त; यथेच्छ; मनाचें समाधान होईपर्यंत. 'नदी पुलिनी गंगातिरीं । क्रिडा करिती मनेच्छां ।' [मन + इच्छा] मनेच्छा-स्त्री. मनाची इच्छा; प्रवृत्ति, कल मनेप्सित-न. मनोवांछा; मनाची इच्छा. -. -वि. मनानें इच्छिलेलें; मनोवांछित. [मन + ईप्सित्] मनोगत-न. मनीषा; हेतु; उद्देश; विचार; इच्छा. 'श्रीकृष्णवासातें वांछिती । जाणे श्रीपती मनोगत ।' -एरुस्व १५.१३८. -वि. मनांत असलेलें; ठरविलेलें. 'कुंभाराचा मनोगत जो आकार असतो तो घटावर उत्पन्न होत असतो.' मनोगति-स्त्री. १ मनाची वृत्ति, क्रिया, विचार. २ मनाचा, विचाराचा प्रवेश, पोंच; मनाची धांव; आक- लन. ३ इच्छेचा कल, प्रवृत्ति. 'हा आपल्या मनोगतीनें चालतो- वागतो-करतो.' -वि. मनाप्रमाणें वागणारा, चालणारा; विचारा- प्रमाणें चंचल. -क्रिवि. मनाच्या गतीप्रमाणें; अतिशय, कल्पना- तीत वेगानें. 'आला गेला मनोगती ।' -मारुतिस्तोत्र. मनोगम्य- वि. मनाला जाणतां येण्यासारखें; मनानें आकलन होण्या- सारखें. मनोज-पु. मदन; काम. 'मनोज मध्यस्थ करूं निघाला । ' -सारूह २.६०. मनोजय-पु. मनाचा जय; आत्मनिग्रह; मनो- निग्रह. 'तैसा मनोजयें प्रचारु । बुद्धीद्रियांचा ।' -ज्ञा १६.१८४. मनोजव-वि. मनाच्या गतीनें जाणारा; फार त्वरेनें जाणारा. मनोत्साह-पु. मानसिक उत्साह; आनंद; आवड. 'ज्याचा जसा मनोत्साह तसें तो करितो.' मनोदय-पु. १ हेतु; विचार; आशय. २ इच्छा कल, प्रवृत्ति. मनोद्देश-पु. मनांतील योजना, हेतु, बेत, विचार. मनोधर्म-पु. १ (प्रेम, द्वेष, काम, क्रोध, मत्सर इ॰) अंतःकरणाची भावना, विकार. 'न निघे मनोधर्मीं । अरोचक ।' -ज्ञा १८.६५७. २ मनाची शक्ति (विचार, कल्पना, सदसद्विवेकबुद्धी इ॰). ३ (सामा.) चित्तवृत्ति; मनोगुण. 'आहार मिळाल्या उत्तम । हरिखेजेना मनोधर्म ।' -एभा १८.२३६. ४ मनाचा चंचलता. 'तंव आंतु त्राय मोडे । मनोधर्माची ।' -ज्ञा ६.२११. ५ हेतु; बेत; विचार -वि. मनोगतीप्रमाणें वागणारा. 'सहचरु मनोधर्मु । देवाचा जो ।' -ज्ञा १७.३३. मनोधारण- णा-नस्त्री, मन राखणें; मनधरणी. मनोनिग्रह-पु. मनाला ताब्यांत ठेवणें; मनोजय; संयमन. मनोनीत-वि. मनानें पसंत केलेलें, स्वीकारिलेलें. मनोनुकूल-वि. एखाद्याच्या मनाप्रमाणें; मनाला पसंत पडण्यासारखें. मनोनुभूत-वि. मनानें अनुभविलेलें, सहन केलेलें, उपभोगिलेलें मनोभंग-पु. इच्छा बेत, आशा इ॰ फलद्रूप न होणें; निराशा. मनोभव-पु. १ मदन; काम. २ कामेच्छा; विषयेच्छा. मनोभाव-पु. १ हेतु; विचार. २ भक्ति; श्रद्धा. ३ प्रीति. मनोभावें, मनोभावें करून, मनोभावा- पासून, मनोभावानें-क्रिवि. अंतःकरणपूर्वक; मनापासून; श्रद्धेनें. 'मनोभावें ईश्वराची सेवा करावी.' मनोभिराम-वि. मनाला तुष्ट करणारा; आनंददायक; मोहक; चित्ताकर्षक. 'तेव्हां तरी तारकशक्ति राम । देईल आम्हासि मनोभिराम ।' मनोमय-वि. मनःकल्पित; काल्पनिक; अंतःकरणांतील; मानसिक. मनोमय- कोश-पु. चैतन्याच्या पांच (अन्न-प्राण-मन-विज्ञान-आनंद) कोशांपैकीं तिसरा. पंचकोश पहा. मनोमयसत्यवाद-पु. एकाच वस्तूविषयीं निरनिराळ्या लोकांच्या मनांत सारख्याच कल्पना असतात असें मत; सादृश्यवाद. (इं.) कन्सेप्च्युअ/?/लिझम्. -नीति ४०६. मनोयोग-पु. मन लागणें; लक्ष्य; अवधान. मनोयोग्य- वि. मनपसंत; समाधानकारक; संतोषकारक. मनोरंजक-वि. मनाला रमविणारें; करमणूक करणारें; चित्ताकर्षक. मनोरंजन- न. १ करमणूक; गंमत; मौज. २ मनास वाटणारा आनंद, उल्हास. मनोरथ-पु. इच्छा; बेत; हेतु; उद्देश; योजना. 'तोषूनियां वैकुंठनायक । मनोरथ पूर्ण करील ।' -व्यं ५. मनोरथ-सृष्टी- स्त्री. मनोराज्य; काल्पनिक सृष्टि. मनोरम-वि. १ मनाला रम- विणारें; मोहक. २ आनंददायक; संतोषकारक; मनोरमा-स्त्री. १ सुंदर स्त्री. २ (संकेतानें) बायको; पत्नी. मनोराज्य-न. भावी उत्कर्षाविषयींचे कल्पनातरंग; हवेंतील मनोरे. मनोविकार, मनोविकृति-पुस्त्री. मनांत उद्भवणारे कामक्रोधादि विकार प्रत्येकीं; भावना; मनोवृत्ति. मनोवृत्ति-स्त्री. १ मनाची स्थिति; चित्तवृत्ति; स्वभाव. २ मनाचा व्यापार; विचार, भावना, विकार इ॰ 'ह्या मनोवृत्ति देवपरायण झाल्या.' मनोवेग-पु. मनाची गति; अत्यंत जलद गति. मनोगति पहा. 'मनोवेगें तात्कालीं । पातले विश्वेश्वराजवळी ।' -गुच ४१.१५७ मनोवेद्य-वि. मनानें, अंतःकरणानें जाणतां येण्याजोगें. मनोव्यापार-पु. मानसिक संकल्पादि व्यवहार; विकार, विचार इ॰ मनोहत-वि. निराश; हताश. मनोहर-पु. व्यंकोबाचा प्रसाद (नैवेद्य) -तीप्र २५२. -वि. मोहक; आल्हादकारक; रमणीय; सुंदर. मनोहारी, मनोज्ञ-वि. चित्ताकर्षक; रमणीय; सुंदर; मोहक. मनौनि-क्रिवि. मनापासून; मनांतून 'तैसें मनौनि धनवरी । विद्यमानें आल्या अवसरी ।' -ज्ञा १६.८७. मनौरें-रा-न.पु. मनाची इच्छा. 'कां जे लळेयाचे लळे सरती । मनोरथांचे मनौरे पुरती ।' -ज्ञा ९ ३. बरव्या मनानें-क्रिवि. शुद्ध मनानें; चांगल्या, प्रामाणिक हेतूनें. 'सीता स्वयंवर असें बरव्या मनानें अवलक्षुनि शास्त्र अव- लोकिलें.' मोकळ्या मनानें-क्रिवि. खुल्या दिलानें; स्वतःचें मन, हेतु, भावना इ॰ स्पष्ट रीतीनें सांगून; मन मोकळें करून.
महत्
वि. १ मोठा; बडा; विस्तृत. २ (ल.) थोर; वरच्या दर्जाचा; उत्कृष्ट; कोणत्याहि गुणांत श्रेष्ठ. जसें-महाबुद्धिमान्, महालबाड; महासोदा. महत् हा शब्द कर्मधारय आणि बहुव्रीहि समासांत महा असा होतो आणि तत्पुरुष समासांत तसाच राहतो. जसें-महादेव, महाबाहु व महत्पूजा; महत्सेवा. ३ अतिशय; फार; अत्यंत. जसें-महाप्रचंड; महातीक्ष्ण इ॰ [सं.] महतामहत्-वि. (व.) मोठ्यांतला मोठा; सर्वांत मोठा. महत्तत्व-न. सत्व, रज, तम या तीन गुणांची साम्यावस्था; मूळमाया; गुणसाम्य. 'सत्त्वगुणापासून महत्तत्व उत्पन्न झालें.' -टिले ४.३६१. महत्तमसाधारण भाजकपु. दिलेल्या सर्व संख्यांना पूर्ण भाग जाईल अशी सर्वांत मोठी संख्या. महदंतर-न. फार मोठें अंतर, तफावत; वेगळेपणा. महदहंबुद्धि-स्त्री. महत्तत्त्व; अहंकार- बुद्धि. 'एवं महदहंबुद्धि । मनें महाभूत समृद्धि ।' -माज्ञा १५.१०५. महदादिदेहांत-क्रिवि. महत्तत्त्वापासून स्थूलदेहापर्यंत. 'महदादि देहांतें । इयें आशेषेंही भूतें ।' -ज्ञा ९.६७. महद्ब्रह्म-न. मूळ ब्रह्म. 'तया महद्ब्रह्मातें व्याली । दैविकी इच्छा ।' -ज्ञा ११.५११. महद्भूत-वि. विलक्षण; असामान्य; चमत्कारिक. महद्वर्त्त-न. गोलाचें वर्तुळ; खगोलीय वृत्त. महती-स्त्री. मोठेपणा; महत्त्व. 'त्याचेनि माझी त्रैलोकीं ख्याती । मज महती त्याचेनी ।' -एभा १४.२६९. महतीवीणा-स्त्री. नारदाच्या वीणेचें नांव. महत्त्व-न. मोठेपणा; योग्यता; लौकिक; प्रतिष्ठा; किंमत. महती पहा. 'रायाजी पाटिल महत्त्व रक्षी ।' ऐपो ३२. उतरणें- योग्यता; प्रतिष्ठा; कमी होणें. ॰वाढविणेंफुशारकी, बढाई मारणें. ॰दर्शक-वि. पदार्थाचें माप, लांबी, रुंदी इ॰ दाखवि- णारें (परिमाण). ॰मापन-न. गणितशास्त्राचा एक विभाग; आकारमान मोजण्याची विद्या; मापनशास्त्र. महत्त्वकांक्षा- -स्त्री. मोठेपणाची इच्छा, हांव; जिगीषा. 'कर्तबगार लोकांच्या वेडाला महत्त्वाकांक्षा म्हणतात.' -विधिलिखित २१. महा-वि. १ महत् पहा. २ थोर; बडा. 'हे एक महा आहेत.' 'तो काय एक महा आहे.' ॰अर्बुद-न. एक हजार दशकोटि ही संख्या. ॰ऊर-पु. (अप.) महापूर; अतिशय मोठा पूर. ॰एकादशी- स्त्री. आषाढशुद्ध व कार्तिक शुद्ध एकादशी. ॰कंद-पु. १ मोठ्या जातीचा कंद. २ लसूण. ॰कल्प-पु. ब्रह्मदेवाच्या शंभर वर्षांचा काल; ब्रह्मदेवाचें आयुष्य; महाप्रलय; कल्प पहा. ॰काल-ळ- पु. १ प्रलय काळचा शंकराचा अवतार. 'महाकाळ उभा चिरीन बाणीं ।' २ बारा ज्योतिर्लिंगांपैकीं एक (उज्जनी येथील). ॰काली-स्त्री. १ पार्वती. २ प्रचंड तोफ; महाकाळी. -शर. ॰काव्य-न. वीररसप्रधान, मोठें, अभिजात, रामायण-महा- भारताप्रमाणें काव्य; (इं.) एपिक. 'आर्ष महाकाव्यांत कोण- कोणते गुण असावे याबद्दल पुढें विवेचन येईलच.' ॰काश-न. अवकाश; अफाट पोकळी. याच्या उलट घटाकाश, मठाकाश. [महा + आकाश] ॰कुल-कुलीन-वि. थोर, उच्च कुलांतील; कुलीन. ॰खळें-न. मोठें अंगण. ॰गाणी-नी-वि. गानकुशल. 'उत्तर देशींच्या महागणी । गुर्जरिणी अतिगौरा ।' -मुरुंशु १२२. ॰गिरी-पु. मोठा पर्वत; हिमालय. 'किं मक्षिकाचेनि थडकें । महागिरी पडों शकें ।' -एकनाथ-आनंदलहरी ४२. -स्त्री. १ तीनशें खंडीपर्यंत वजन नेणारें जहाज, गलबत; मालाचें तारूं; 'सबब त्यांजकडे दोन महागिऱ्या भरून गवत व एक महागिरी- भर लांकडे देविलीं असें,' -समारो ३.१६. २ मोठें तारूं; शिबाड; बतेला. ॰ग्रह-ग्राह-पु. मोठी सुसर; मोठा मगर. 'गज करवडी महाग्राह ।' -एरुस्व १०.८० -एभा २०.३५०. ॰जन- पु. १ काही गुण, विद्या इ॰ मुळें थोर, श्रेष्ठ माणूस. 'परंतु हृदयीं महाजन भयास मी मानितों ।' -भक्तमयूरकेका ७५. ३ व्यापारी; उदमी; सावकार. ३ गाव, कसबा इ॰ तील व्यापाराला नियम, शिस्त घालून देणारा, त्यावर देखरेख करणारा व कर वसूल करणारा सरकारी अधिकारी. ह्या अर्थीं महाजनी असाहि शब्द आहे. ४ पंच ॰जनकी-स्त्री. महाजनांचे काम, अधिकार. ॰डोळा-पु. एक मासा. -प्रणिमो ८१. ॰तल-न. सप्तपातालांपैकीं एक; नाग व असुर यांचें स्थान. ॰ताप-पु. (तंजा.) शोभेच्या दारूचा एक प्रकार; चंद्रज्योति. महताब पहा. ॰तेज-न. १ ब्रह्म २ सूर्य. 'हें अपार कैसेनि कवळावें । महातेज कवणें धवळावें.' -ज्ञा १.७४ महात्मा-पु. १ महानुभव पंथांतील व्यक्ति. ३ मोटा धैर्यवान, पराक्रमी मनुष्य. 'तैसें महात्मा वृक्षमुळीं । असावें खांड देउळीं ।' -भाए ४९३. गौतमबुद्ध, गांधी यांस संबोधितात. -वि. १ थोर मनाचा; उदार; महानुभाव. 'परते धर्म महात्मा, स्तविला बहु नारदादि साधूंनीं ।' -मोभीष्म १.९९. [महा + आत्मा] ॰दंदी- वि. महामत्सरी; कट्टर द्वेष्टा. 'छंदी फंदि महादंदि । रावण पडिला तुझ्या बंदि ।' -ज्ञानप्रदीप २६६. [सं. महाद्वंद्वी] ॰दशा-स्त्री. (ज्योतिष) कुंडलीतींल मुख्य ग्रहाची बाधा अंतर्दशा पहा. ॰दान- न. (मोठें दान) हत्ती इ॰ षोडशदानांपैकीं एक; षोडशमहादानें पहा. ॰देव-पु. १ शंकर; शिव. 'महादेव म्हणावया कारण । ब्रह्मयासि. जाण या हेतू ।' -एभा १३.२७९. २ (विणकाम) हातमागाच्या फणीचा मरचा अवयव, दांडा फळी. हा आणि तळाचा दांडा किंवा पार्वती मिळून फणीची चौकट होते या फणीच्या चौकटीस महादेवपार्वती किंवा हात्यादांडी असेंहि म्हणतात. ॰देवाचें देणें- न. कंटाळवाणें व दीर्घकाल टिकणारें काम. ॰देवापुढचा-वि. (शब्दशः) नंदी; (ल.) मूर्ख; निर्बुद्ध. ॰देवी-स्त्री. १ पार्वती; दुर्गा. २ एक प्रकारची वनस्पति. हिचें बीं महादेवाच्या पिंडीच्या आकाराप्रमाणें असतें. ॰देवी सहादेवी-स्त्री. (माण.) चैत्री पौर्णिमेस तिन्हीसांजचे वेळीं एखाद्या भिंतीवर जीं महादेवी सहादेवी म्हणून दोन गंधाचीं बाहुलीं काढून त्यांची पूजा कर- तात तीं. -मसाप ४.४.२५९. ॰दैव-(माण.) सर्व जातींचे लोक. ॰द्वार-न. (मंदिराचा किंवा राजवाड्याचा) बाहेरचा किंवा मुख्य दरवाजा. 'भक्त गर्जती महाद्वारीं । त्यांसी द्यावे दर्शन ।' -भूपाळी विठ्ठलाची पृ २२. ॰द्वीप-न. (मोठें बेट) खंड. 'तयाफळाचे हें महाद्वीप । पातली प्रभु ।' -ज्ञा १६.३२. ॰नदी-स्त्री. मोठी नदी; उगमापासून शंभर योजनांवर वाहात जाणारी नदी. ॰न मी-स्त्री. १ आश्विन शुद्ध नवमी; नवरात्राचा शेवटचा दिवस. २ रामनवमी. -शास्त्रीको ॰नवरात्र-न. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंतचा काल. ॰नस- पु. स्वयंपाकघर. ॰नक्षत्र-न. सूर्यनक्षत्र ॰नाड-पु. महाजना- सारखा एक वतनदार. 'महाजन व महानाड पेठ मजकूर याचें नांवें सनद कीं,' -थोमारो १.५४. [महा + नाड-डु] ॰निंब-पु. एक प्रकारचें झाड. ॰निद्रा-स्त्री. मरण; मृत्यु. 'तिसरें प्रमाण महा- निद्रा म्हणजे मृत्यु हें होय?' -टि ४.४८१. महानुभाव-पु. श्रीचक्रधरानें स्थापिलेला एक द्वैतवादी पंथ. या पंथात श्रीकृष्ण- भक्ति प्रमुख आहे. [महा + अनुभाव] -वि. १ ज्यानें कामक्रोधादि विकार जिंकले आहेत असा; महात्मा. २ उदार, थोर पुरुष. एवं पिंडारकीं ऋषि सर्व । शापानुग्रही महानुभाव ।' -एभा १.३३६. ३ प्रशस्त अनुभवाचा; ब्रह्मानुभवी. 'ऐसे जे महानुभाव । जे दैविये प्रकृतीचें दैव ।' -ज्ञा ९ १९४. ४ विद्या, बुद्धि, पराक्रम इ॰ गुणांनीं श्रेष्ठ मनुष्य; महाप्रतापी. ॰नेटका-वि. परिपूर्ण; पूर्णपणे; व्यवस्थित. 'यज्ञ मुनिचा राखे महानेटका ।' -मोरामायणें त्रिःसप्तमंत्रमय रामा- यण ३. ॰नैवेद्य-पुन. पंचपक्वान्नमय अन्नाचें ताट वाढून देवाला दाखवितात तो नैवेद्य (साखर, दूध इ॰चा छोटा नैवेद्य होतो). ॰न्यास-पु. पूजा करतांना शरीराच्या विवक्षित भागांना स्पर्श करून करावयास न्यास. याचाच दुसरा प्रकार लघुन्यास. ॰पड-पु. (महानु.) महापट; ध्वज. 'आहो जी देवा । पैलु देखिला महा- पडांचा मेळावा ।' -शिशु १०३३. [महापट] ॰प(पं)थ-पु. १ मृत्यु; मरण; मृत्यूची वाट. 'न देशील सत्यवंत । तरी करीन हाचि महापंथ ।' -वसा ६.८. २ निर्याणाचा मार्ग. 'लागले महापंथी तत्काळाची ।' -एभा ३१.२९८. ॰पद-न. ब्रह्मपद. 'कीं श्रुति हे महापदीं । पैठी जाहली ।' -ज्ञा १३.३७१. ॰पद्म-पु. १ एकं, दहं, शतं ह्या श्रेणींतील तेराव्या स्थानची संख्या (एकावर बारा शून्यें इतका आकडा) २ कुबेराच्या नवनिधींपैकीं एक निधि. नवविधी पहा. ॰पातक-न. ब्रह्महत्या, दारू पिणें, सुवर्णाची चोरी, गुरूच्या पत्नीबरोबर किंवा स्वतःच्या मातेबरोबर संभोग आणि यापैकीं एखादें पातक करणाराशीं मैत्री, अशा पांच मोठ्या पातकांपैकीं प्रत्येक. ॰पातकी-वि. १ ज्याच्या हातून महापातक घडलें आहे असा. २ अत्यंत पापी; दुराचारी. म्ह॰ अवसानघातकी महापातकी. ॰पाप-पी-महापातक-की पहा. ॰पीठ-न. विष्णूच्या चक्रानें झालेले शक्ती-पार्वतीच्या शरीराचे तुकडे ज्या ठिकाणीं पडले असें मानतात त्या अत्यंत पवित्र स्थानापैकीं प्रत्येक. अशीं स्थानें साडेतीन आहेत. तुळजापूर, मातापूर आणि कोल्हापूर, हीं तीन व अर्धे सप्तशृंग. औट पीठ पहा. ॰पुरुष-पु. १ ईश्वर. २ साधु- पुरुष; सत्पुरुष; ब्रह्मनिष्ठ मनुष्य. 'महापुरुषाचें चित्त । जालिया वस्तुगत ।' -ज्ञा १३. ७८९. ३ मेलेल्या ब्राह्मणाचें पिशाच्च. ॰पू(पु)जा-स्त्री. व्रतसमाप्ति इत्यादि विवक्षित प्रसंगास अनुसरून करतात ती मोठी पूजा. ॰पूर-पु. नदीस येणारा मोठा पूर, लोंढा. 'महापूरें झाडें जाती । तेथे लव्हाळे राहती ।' -तुगा १०४३. ॰प्रयास-पु. मोठे परिश्रम, कष्ट, प्रयत्न, खटाटोप. ॰प्रलयपु. १ प्रत्येक ४३२००००००० वर्षांनीं होणारा सर्व जगाचा नाश. २ ब्रह्मदेवाच्या शंभर वर्षांनीं होणारा सर्व (देव, ब्राह्मण, साधू, ब्रह्मा यासह) विश्वाचा नाश. 'जो ब्रह्याच्या स्थूळ देहाचें मरण । तो महाप्रलय जाण ।' महाकल्प पहा. ॰प्रयासपुअव. फार मोठे कष्ट, श्रम, प्रयत्न. ॰प्रसादपु. १ धार्मिक किंवा देवाच्या उत्सवा- नंतर वाटतात तो फुलें, मिठाई, जेवण इ॰ रूप प्रसाद. २ देव, गुरु इ॰पासून मिळालेली प्रसादाची वस्तु (कृपा, अनुग्रह म्हणून). ३ (शब्दशः व ल.) मोठी कृपा, अनुग्रह 'महाप्रसादाचेनि हरिखें । सप्रेम सुखें डुल्लती ।' ॰प्रस्थानन. (मोठा प्रवास) १ यथार्थ ब्रह्मज्ञानानंतर येणारा मृत्यु. २ (ल) मरण; मृत्यु ॰प्राणपु. १ मोठ्या जोरानें व प्रयासानें केलेला उच्चार: हकारयुक्त उच्चार २ जोरानें आणि प्रयासानें उच्चारण्याचा वर्ण. जसें-ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, भ, आणि ह अल्पप्राण आणि बाह्य प्रयत्न पहा. ॰फणी-पु. मोठा साप. ॰फल-ळ-न. मोठे, उत्कृष्ट फळ; नारळ. फणस इ॰ ॰बलि-ळी-पु. पिशाच्चादिकांस संतुष्ट कर- ण्यासाठीं मांस, अन्न इ॰ चा बलि, अर्पण करावयाचा पदार्थ ॰बळी-वि. अत्यंत प्रबळ, सामर्थ्यवान्. 'महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।' -मारुतिस्तोत्र. ॰बळी बुटी-स्त्री. रुंदट पानाचें आलें. ॰भाग-वि. १ अतिशय भाग्यवान् 'नित्य निष्काम अतिप्रीतीं । मज भजती महाभाग ।' -एभा २४ ३३५. २ सद्गुणी; सद्वर्तनी. ॰भारत-न. व्यासप्रणीत कौरव-पांडवाच्या युद्धाचें भारतीयांचे पवित्र असें एक महाकाव्य; महापुराण ॰भूत-न. पृथ्वी, आप तेज, वायु आणि आकाश ह्या पंचमहाभूतांपैकीं प्रत्येक. 'तरी होसी गा तूं परब्रह्म । जें या महाभूता विसंवतें धाम ।' -ज्ञा १०. १४९. ॰भेड-वि. अत्यंत भितराः भेकड. 'मग विरा- टाचेनि महाभडें उत्तरें ।' -ज्ञा ११ ४६९. ॰मणि-पु. मौल्यवान् रत्न; हिरा, माणिक इ॰ 'कांचोटी आणि महामणी । मेरू मषक सम नव्हे ।' -ह १ ८४. ॰मति-मना-वि. थोर अंतःकरणाचा; उदार मनाचा; महात्मा. ॰मंत्र-पु. निरनिराळ्या देवतांचा मुख्य मंत्र. जसें-गायत्री हा ब्राह्मणाचा महामंत्र. 'महामंत्र आत्मप्रा- प्तीची खाणी ।' ॰मंत्री-पु. मुख्यप्रधान; मुख्य मंत्री सल्लागार. ॰महोपाध्याय-पु. मोठ्या शास्त्राला देतात ती एक सन्मानाची सरकारी पदवी. ॰म/?/त्र-पु. हत्ती हांकणारा; महात. 'मुरडावया मत्त हस्ती । महामात्र दोन्हीं हस्तीं । अंकुश हाणी तैसा श्रीपती । मर्मोद्धाटनें करितसे ।' -यथादी २.१६. ॰माया-स्त्री. १ पार्वती; दुर्गा. २ जगदुत्पादक शक्ति; सर्व संसाराला, प्रपंचाला कारणीभूत अशी देवता; आदिमाया; मूलप्रकृति ३ जहांबाज कजाग बायको. ॰मार-पु. मोठा मार, फटका. 'शुक्रबाणाचा महामारु ।' -मुवन ३.३८. ॰मारी-स्त्री. १ महामृत्यु. 'तेथ अचेतना झुंजारीं । न मरत्या महामारीं ।' -एभा २८.२५०. २ (ल.) प्राणसंकट. 'तिचेनि योगें महामारी पातली हे जाणिजे ।' -मुवन ७.१८७. ३ पटकी या सांथीचा रोग. ४ या रोगाची अधिष्ठात्री, दुर्गादेवी. ५ जिवापाड श्रम; शिकस्तीचा प्रयत्न. ६ हाणाहाणी; मारामारी; मोठें युद्ध. 'दोघे झुंजतां महा- मारी' -मुवन ३.३६. 'तैसी मांडिली महामारी ।' -कथा २.२.६०. ॰मृत्यू-पु. मरण; मृत्यू (अपमृत्युविषयीं बोलतांना उपयोग) जसें- 'अपमृत्यूचा महामृत्यु झाला.' ॰मृत्युंजय- (वैद्यक) एक औषध. ॰यंत्र-न. तोफ. ॰यज्ञ-याग-पु. मोठा यज्ञ; पंच महायज्ञांपैकीं प्रत्येक; पंचमहायज्ञ पहा. 'तरी महायाग- प्रमुखें । कर्मे निफज नाही अचुकें ।' -ज्ञा १८. १६६. ॰यात्रा- स्त्री. १ काशीयात्रा. २ (ल.) मरण; मृत्यु. 'आधीं पेशवाई सकट सगळ्यांना महायात्रेला धाडीन.' -अस्तंभा १६२. महा- प्रस्थान पहा. ॰रथ-रथी-पु. १ शस्त्रास्त्रांत प्रवीण असून दहा हजार धनुर्धारी योद्ध्यांबरोबर एकटाच लढणारा योद्धा. 'महारथी श्रेष्ठ । द्रुपद वीरु ।' -ज्ञा १.९८. २ (ल.) अत्यंत शूर, कर्तब- गार पुरुष किंवा मोठा वक्ता. ॰रस-न. १ ब्रह्म. २ पक्वान. -मनको. ॰राज-पु. १ सार्वभौम राजा; सम्राट. २ (आदरार्थी) श्रेष्ठ माणूस. ३ जैन, गुजराथी वैष्णव लोकांचा गुरु. ॰रात्रि- स्त्री. महाशिवरात्र माघ वद्य चतुर्दशी. ॰राष्ट्र-नपु. मराठे लोकाचा देश; उत्तरेस नर्मदानदी, दक्षिणेस कर्नाटक, पूर्वेस तैलंगण आणि पश्चिमेस समुद्र यांनीं मर्यादित असलेला प्रदेश; मुंबई इलाख्यां- तील एक विभीग. ॰राष्ट्र-राष्ट्रीय-वि. महाराष्ट्रदेशासंबंधाचे (लोक, भाषा, रिवाज इ॰). ॰राष्ट्र-भाषा-स्त्री. मराठी भाषा; संस्कृत-प्राकृत भाषेपासून झालेली एक देशी भाषा. ॰राष्ट्री- एक जुनी प्राकृत भाषा. ॰रुख-पु. एक प्रकारचे झाड; महावृक्ष. 'कर्वत लागला महारुखा । म्हणे पुढती न दिसे निका ।' -मुआदि ३३.२९. ॰रुद्र-पु. १ रुद्राभिषेकाचा एक प्रकार; अकरा लघुरुद्र; लघुरुद्राच्या उलट शब्द महारुद्र. २ मारुती. 'महारुद्र आज्ञेप्रमाणें निघाला ।' -राक १.१. ॰रुद्रो-पु. (गु.) बाजरीची मोठी जात हिचें काड फार उंच होतें -कृषि २७७. ॰रोग-पु. १ अत्यंत दुःखदायक असा रोग. याचे आठ प्रकार आहेत-वात- व्याधि, अश्मरी, कृछ्र, मेह, उदर, भगंदर. अर्श आणि संग्रहणी. कांहींच्या मतें हे नऊ आहेत; त्यांत राजयक्ष्मा हा एक जास्त असून कृछ्राऐवजीं कुष्ठ व संग्रहणीच्या ऐवजीं ग्रहणी अशीं नांवें आहेत. २ रक्तपिती; गलित कुष्ठ. महार्घ-वि. १ महाग; दुष्प्राप्य. 'महार्घ येथें परमार्थ जाला ।' -सारुह १.२१. २ मौल्यवान् [सं. महा + अर्घ] महार्णव-पु. मोठा समुद्र; महासागर. 'वनीं रणीं शत्रु-जलाग्निसंकटी । महार्णवीं पर्वत-वास दुर्घटीं ।' -वामन स्फुट श्लोक ३५. (नवनीत पृ. १३७.) -न. १ (ल.) मोंठें, दीर्घकाल चाललेलें भांडण; युद्ध; लढाई. 'दोघां मांडलें महार्णव । दाविती बळ प्रौढीगौरव ।' -निगा २४. २ प्रसिद्धि; डांगोरा; जघन्यत्व. ३ लहान काम, प्रकरण, गोष्ट इ॰ ला मोठें रूप देऊन सांगणें; राईचा पर्वत करणें. 'एवढ्याशा गोष्टीचें त्वां लागलेंच महार्णव केलेंस.' [सं. महा + अर्णव] ॰लय-पु. १ आश्रयस्थान; आश्रम; धर्मशाळा. २ देऊळ. ३ परमात्मा. ४ भाद्रपद वद्यपक्षां- तील पितरांप्रीत्यर्थ केलेलें श्राद्ध; पक्ष; मृतपितृकानें भाद्रपद शुद्ध पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत दररोज करावयाचें श्राद्ध. हें रोज करणें अशक्य असल्यास १५ दिवसांतून एका उक्त दिवशीं करावें. [महा + आलय] ॰लक्ष्मी-स्त्री. १ विष्णुपत्नी २ अश्विन शुद्ध अष्टमीस पूजावयाची एक देवता, त्या देवतेचे व्रत. ३ भग- वती; कोल्हापूरची देवी. ४ (ना.) ज्येष्ठागौरी; भाद्रपद शुद्ध नव- मीस पूजा करावयाच्या देवता. ॰लिंग-न. बारा ज्योतिर्लिंगांपैकीं प्रत्येक. ॰वटी, माहावटी-स्त्री. राजमार्ग. 'हे कपटाची कस(व)टी । अनृत्याची माहावटी ।' -भाए ७५५. ॰वस्त्र-न. उंची, सुंदर वस्त्र; प्रतिष्ठित वस्त्र; शालजोडी इ॰ ॰वाक्य-न. वेदांतील जीवब्रह्माचें ऐक्य दाखविणारें तत्त्वमसि आदि वाक्य हीं चार वेदांची चार आहेत. 'तो महावाक्याचेनि नांवें । गुरुकृपे- चेनि थांवें ।' -ज्ञा १८.४०४. २ गायत्री मंत्र. ॰वात-पु. (तासीं ८० मैल वेगाचा) सोसाट्याचा वारा; झंझावत; तुफान. 'महावात सूटला म्हणुनि का कंप येत भूघरा ।' -सौभद्र. ॰विषुव-न. मेष संपात; हरिपद. ॰वृत्त-न. ज्या वृत्ताची पातळी गोलाच्या मध्य बिंदूतून जाते तें वृत्त; मोठें वर्तुळ. ॰वोजा-वि. मोठ्या थाटांची; तेजस्वी. 'संतोषोनी महाराजा । सभा रचित महवोजा ।' -गुच ३४. ९७. [महा + ओजस्] ॰व्याधि-पु. महारोग; रक्तपिती. ॰शब्द- पु. बोंब; शंखध्वनि. ॰शय-पु. १ थोर पुरुष; महात्मा, २ मोठ्या माणसांस महाराज रावसाहेब याप्रमाणे संबोधावयाचा शब्द. [सं. महा + आशय; बं. मॉशे; फ्रें मुस्ये (माँसिय)] ॰शिवरात्र-त्रि-स्त्री. माघ वद्य चतुर्दशी. ॰शून्य-न. जें कांहींच नाहीं असें जें शून्यास अधिष्ठानरूप ब्रह्म तें; परब्रह्म. 'आतां महा- शून्याचिया डोहीं । जेथ गगनासीचि ठावो नाहीं ।' -ज्ञा ६. ३१५. ॰महाष्टमी-स्त्री. अश्विन शुद्ध अष्टमी. ॰सरणी-स्त्री. स्वर्गमार्ग. ' होउनि सुयोधनाचा शोकार्त वरो पिता महास- रणी ।' -मोभीष्म ११.१५. ॰सागर-पु. पृथीवरील पाण्याचा सागराहून मोठा सांठा; मोठासमुद्र. उदा॰ हिंदी महासागर. ॰सिद्धांत-पु. एकमेवाद्वितीयं ब्रह्म हा मुख्य सिद्धांत. 'आणि महासिद्धांतापासीं । श्रुति हारपती शब्देंसीं ।' -ज्ञा १५.४३४. ॰सिद्धि-स्त्री. अष्टमहासिद्धी पहा. 'जेथ महासिद्धींचीं भांडारें । अमृताचीं कोठारें ।' -ज्ञा ६.३२१. ॰सुख-न. ब्रह्मसुख; ब्रह्म साक्षात्कार. 'जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ।' -ज्ञा १.१४. ॰स्म(श्म)शान-न. काशीक्षेत्र. 'सदाशिव बैसता निजासनीं । महाश्मशानीं निजवस्ती ।' -एभा २.३१. ॰क्षेत्र-न. काशी- क्षेत्र. -रा ३.४७६. ॰महेंद्र-पु. १ हिंदुस्थानांतील पर्वताच्या सात रांगांपैकीं एक. २ इंद्राचें नांव. 'हें महेंद्रपदही पाविजेल । परि मोह हा न फिटेल ।' -ज्ञा २.६५. [महा + इंद्र] महेश, महेश्वर-पु. शिव; शंकर. [महा + ईश्वर] महेश्वरी पातळ-न. महेश्वर नांवाच्या गांवी (इंदूर संस्थान) तयार झालेलें वस्त्र, पातळ. 'आधींच कंबर बारिक त्यावर महेश्वरी पातळ कसलें ।' -होला ८९. महोत्सव, महोत्साह-पु. मोठा उत्सव; आनंद- दायक प्रसंग. [महा + उत्सव] महोदधि-पु. १ महासागर; मोठा समुद्र. ' महोदधीं कां भिनले । स्त्रोत जैसे ।' -ज्ञा १५.३१७. २ हिंदीमहासागर [महा + उदधि] महोदय-पु. माघ किंवा पौष महिन्यांत सोमवारी सूर्योदयीं अमावस्यारंभ श्रवण नक्ष- त्राचा मध्य आणि व्यतिपाताचा शेवट यांचा योग; एक मोठें पर्व. [महा + उदय] महौजा-वि. तेजस्वी; ज्याचें तेज मोठें आहे असा; सामर्थ्यवान् 'पुरुष श्याम महौजा ओढित होता बळेंचि मजला जो ।' -मोवन १३.८८. [महा + ओज] महान्-वि. १ मोठा; विस्तृत; थोर. २ उशीरा पिकणारें (धान्य, पीक); गरवें ३ दोन किंवा अनेक वर्षें टिकणारें (झाड, मिरची, कापूस, पांढरी तूर इ॰).