तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह
शब्दार्थ
अवनि, अवनी
स्त्री. पृथ्वी; धरित्री; धरणी : ‘येरें वायव्यास्त्र लाविलें गुणीं । झंझामारुत सुटला रणीं । वाऱ्यानें जाऊं पाहे अवनी ।’ – एरुस्व १२·१०५. [सं.]
अवण, अवणी, अवण, अवणें
अवण, अवणी, अवण, अवणें avaṇa, avaṇī, avaṇa, avaṇēṃ These, as Konkaní words, are better written with आ.
अवनि
स्त्री. पृथ्वी; धरित्री; धरणी. ‘ येरें वायव्यास्त्र लाविलें गुणीं । झंझामारुत सुटला राणीं । वारयानें जाऊं पाहे अवनी ।’ -एरुस्व १२.१०५. [सं.]
अवनि avani f S The terraqueous globe.
अवनि f The earth.
अवनी
(सं) स्त्री० पृथ्वी, दुनया.
आवणी
स्त्री. १. लावणी; खाचरातील भाताचे रोप उपटून दुसरीकडे लावणे. २. भाताची रोपे तयार करतात ती जमीन. ३. भाताचे रोप उपटून ज्या जमिनीत लावतात अशी जमीन.
आवणी, आंवणी
स्त्री. १. लावणी; दाढींतील भाताचें रोप उपटून दुसरीकडे लावणें. २ जींत भाताचीं रोपें लावतात ती जमीन. आवण पहा
संबंधित शब्द
आंवणू
न. (कों.) १ आंवणीसाठीं काढलेलीं रोपें लावण्या- करितां तयार केलेली जमीन; जींत आवणी करावी लागते ती (जमीन, शेत,).२ पुन्हां लावणी केलेलीं आवणांतील भाताचीं रोपें वगैरे; आवणी करून झालेलें भात. [आवण]
अवनस, अवनास
पहा : अननस (कों.) अवनि, अवनी
आवणू
न. १. आवणीसाठी काढलेली रोपे लावण्याकरिता तयार केलेली जमीन; आवणी करावी लागते ती (जमीन, शेत). २. पुन्हा लावणी केलेली आवणातील भाताची रोपे वगैरे; आवणी करून झालेले भात. (को.)
अचकी
वि. सर्व; संपूर्ण; असगी. 'ठेवलीस (अवनी) अचकी रदनाग्रीं ।' -गगवि ४६. [सं. आसाग्र; म. असगा-गी]
अचकी, आचकी
वि. सर्व; संपूर्ण; असगी : ‘ठेवलीस (अवनी) अचकी रदनाग्रीं ।’ – गगवि ४६.
अहाळणे
अक्रि. १. सूर्याच्या, अग्नीच्या झळीने भाजणे, पोळणे, होरपळणे. २. नाश पावणे : ‘सेजार अहाळ अहाळलें दिव्य भोगांचे ।’ – भाए ८९. ३. अतिशय दुःखित होणे– पीडणे : ‘अहाळिली अवनी क्षत्रियांची ।’ –एभा ४·२४३.
अहाळणें
अक्रि. १ सूर्याच्या, अग्नीच्या झळीनें भाजणें- पोळणें-होरपळणें. २ नाश पावणें. 'सेजार अहाळ अहाळलें दिव्य भोगांचें ।'-भाए ८९. 'कामानळें जीव महा अहाळे।' -सारुह १.६. ३ अतिशय दुःखित होणें-पीडणें. 'अहाळिली अवनी क्षत्रियांची ।' -एभा ४.२४३. [म. अहार का. होळकु-पु = तेज प्रा. अहिऊल = जाळणें. का. हाळु = नाश]
आविंज, आविंझ
स्त्री. आवणी; भाताची पुन्हा लावणी; आवाणातून काढून आवणूत रोपे लावणे; आवणे. (कों.) [सं. आ+विन्द्]
आवण
न. (को.) १ भाताचें उभें शेत; रोपे. 'आमच्या शेताला १० मणाचें आवण लागतें. ' २ वांगीं, नाचणी, वरी मिरची यांचें दुसर्या ठिकाणीं लावण्याकरिता तयार केलेलें रोप; नारळी, पोफळी यांचे रोप. ३ ज्यांत प्रथम रोपें लावतात ती जमीन; जींत बीं पेरून रोपें तयार करतात ती जमीन. ४ (उत्तर भाग) भाताचीं रोपें पहिल्या ठिकाणावरून उपटून ज्या दुसर्या जमीनींत लावतात ती जमीन. ५ (सामा. कांहीं प्रांतांत) धान्य, भाजीपाला यांचीं रोपें लावतात ती जमीन; आवणी वी जमीन. [सं. आ + वप्-आवापन-आवण]
आवंजणे, आवंजे
पहा : आवणे, आवणी : ‘माझें आवंजें (भाताची लावणी) उद्या होणार आहे.’ आवंटन
आवंजणें, आवंजे
आंवणें, आवणी पहा. 'माझें आवंजें (भाताची लावणी) उद्या होणार आहे.'
धुनी
स्त्री. १ क्षालन; नाश. 'गंगाचरणीं करी पातकांची धुनी । पाउलें तीं मनीं चिंतिलियां ।' -तुगा ३५७. 'जन्मली उद्धरावया अवनी । महादोषांची करीत धुनी । चालली पूर्व समुद्रा ।' -निगा १११. २ पाणी देणें (शस्त्राला). 'जयाचेआं खांडे करावे यां धुनी । न पुरें प्रलय मेघांचें पाणी ।' -शिशु १०७९. [धुणें]
गोपी
स्त्री. एक पक्षी : ‘नाचण, बाणघोषा … गोपी यांच्या करमणुकीच्या कार्यक्रमात आवणी आटोपली.’– आआशे ३६५.
घाव
पु. १. शस्त्र, हत्यार इ. कांनी केलेला प्रहार; वार; तडाखा; आघात : ‘म्हणौनी नीसाना घावो दीधला ।’ – उषा ८१७. २. (शस्त्र, हत्यार इ. कांच्या प्रहाराने झालेली) जखम; व्रण; घाय; क्षत. ३. (ल.) (व्यापारात झालेले) नुकसान, तोटा, बूड; (धंद्यात बसलेला) धक्का; ठोकर. (क्रि. बसणे, लागणे, पडणे, भरणे.) [सं. घात] (वा.) घाव लावणे – (बायकी) (एखाद्या पदार्थाला, धान्याला) उखळीत घालून हळूहळू कांडणे. निशाणी घाव घालणे – १. युद्धारंभनिदर्शक दुंदुभी वाजवणे; शत्रूवर चढाई करून जाणे : ‘घाव तेव्हां घातला निशाणीं । तेणें दुमदुमली अवनी ।’ – ह २२·२४. २. (कपडे धुताना) आपटणे, चोपणे, धुणे : ‘पडदाणीचा घातला घाव ।’ – मसाप २·२२.
घाव
पु. घाय. १ शस्त्र, हत्यार, इ॰ कानी केलेला प्रहार; वार; तडाखा; आघात. 'म्हणौनी नीसाना घावो दिधला ।' -उषा ८१७. 'अशा तुळतुळीत आणि तेजस्वी शरीरावर घाव करण्यास आपला कांहीं हात वाहयाचा नाहीं.' -नि १७०. २ (शस्त्र, हत्यार इ॰ कांच्या प्रहारानें झालेली) जखम; व्रण; घाय; क्षत. ३ (व्यापारांत झालेलें) नुकसान; तोटा; बूड; (धंद्यांत बस- लेला) धक्का; ठोकर. (क्रि॰ बसणें; लागणें; पडणें; भरणें). [सं. घात; प्रा. घाय; सिं.घाड] (वाप्र.) घाव लावणें- (बायकी) (एखाद्या पदार्थाला, धान्याला) उखळींत घालून हळू हळू कांडणें. (निशाणीं) घाव घालणें- १ युद्धारंभनिदर्शक दुंदुभि वाजविणें; शत्रूवर चढाई करून जाणें. 'घाव तेव्हां घातला निशाणीं । तेणें दुमदुमली अवनी ।' -ह २२.२४. २ (कपडे धूतांना) आपटणें; चोपणें; धुणें. 'पडदाणीचा घातला घाव ।' -मसाप २.२२. म्ह॰ १ एक घाव दोन तुकडे = एखाद्या वाद- ग्रस्त प्रकरणाचा एका झटक्यासरशीं-तडाख्यासरशीं निकाल लावणें. 'काय? एक घाव दोन तुकडे करा !' -धनुर्भंग ९८. २ टांकीचे घाव सोसल्यावांचून देवपण येत नाहीं = दगडाला टाकीनें घडून देवाच्या मूर्तीचा आकार आणतात, यावरून अनेक अडचणी, कष्ट, संकटें सोसल्याशिवाय वैभव प्राप्त होत नाहीं.
पृथ्वी
धरा, धरणी, जग, अवनि, मेदिनी, भू , वसुंधरा, भूतल, अवनितल, भूलोक, इहलोक, धरणीमाता, भूमाता.
टाळी
पु १ एका तळहातावर दुसरा तळहात मारणें; तसें मारल्यानें होणारा आवाज. (क्रि॰ वाजविणें; वाजणें; पिटणें; मारणें). २ (गायन) गातांना हातानें ताल धरणें. (पिटणें). 'मुखीं नाम हातीं टाळी ।' -दा २.७.४१. ३ हात वाजविणें (फजीती, आनंद दर्शविण्यासाठीं, संकेत करतांना); (क्रि॰ पिटणें; वाजविणें) ४ हातावर हात मारणें; वचन देणें (सौदा ठरवितांना). (क्रि॰ मारणें). ५ उपेक्षा; रेंगाळणें. (क्रि॰ लावणें; देणें). ६ लय; ध्यान; समाधि. ब्रह्मटाळी पहा. (क्रि॰ लावणें). 'पंचविषय एकवटुनि । लाविली टाळी ।' -ख्रिपु २.३१.४१. ७ कानठाळी; दडा. 'वार्यानें जाऊं पाहे अवनी । टाळी कानीं बैसली ।' -एरुस्व १२.१०५. (वाप्र.) [सं. ताल] टाळीस टाळी देणें-वरि- ष्टाच्या म्हणण्यास मान तुकविणें; हांजी हांजी करणें. ॰वाजणें- लग्न लागणें. ॰देणें-१ कोणत्याहि खेळास प्रारंभ करणें. २ कोण- तीहि दुसर्यानें सांगितलेली गोष्ट पटली असें दाखविणें. म्ह॰ १ एका हातानें टाळी वाजत नाहीं. २ ज्याची पोळी त्याची वाजवावी टाळी (अन्नदात्याची स्तुती करावी लागते).
टाळी
स्त्री. १. कानठळी; दडा : ‘वाऱ्यानें जाऊं पाहे अवनी । टाळी कानीं बैसली ।’ – एरुस्व १२·१०५. २. चुनेगच्ची जमीन. [सं. ताल]
तोरप, तोराप
न. नेहमीप्रमाणे आवणी न करता भाताचे पीक घेता यावे म्हणून भाजून तयार केलेली जमीन; असल्या जमिनीत उभे असलेले पीक. (कु.)
तोरप, तोराप
न. (कु.) (नेहमींच्या पद्धतीप्रमाणें) आवणी न करितां भाताचें पीक घेतां यावें म्हणून भाजून तयार केलेली जमीन; असल्या जमीनींत उभें असलेलें पीक.
उजवा-वी-वें
वि. १ दक्षिणचा; उजवीकडचा; डावा याच्या उलट; दक्षिण. २ सरस. 'मुलापेक्षां, म्हणे मुलगी उजवी.' ३ सरळ. [सं.ऋजु] ॰हात-पु. ज्यावर अवलंबून आहे असा, पूर्ण विश्र्वासांतला मनुष्य; अव्वल मदतनीस; निकट सहकारी. 'इतकें झाल्यावर सोकरजी ऑलबॉश साहेबांचा अगदीं उजवा हात बनला.' -भयंकर दिव्य. उजवी गुढी देणें-संमति देणें; कबुल करणें; परवा- नगी देणें. गुढी पहा. ॰घालणें उजवीकडे राहील अशा तर्हेनें भोंवती फिरणें; प्रदक्षिणा करणें. 'विनयें पुसोनि उजवें घालुनि तैं त्या सुरापगातनया ।' -मोशांति ७.८१. 'उजवा घालितां अवनि देश.' -मोस्त्री ६.३७. 'देवाला उजवें घालून येतें.' 'गाईला उजवी घाल.' ॰बाजू-स्त्री. १ राजसभेंत उजव्या बाजूस बसलेली मंडळी; मोठे मानकरी लोक. २ विश्वासूक, अतिशय उपयुक्त असा राजेलोकांचा उजवा हात असलेला माणूस. उजवी डावी देणें- होय-नाहीं स्पष्ट म्हणणें; होकार किंवा नकार देणें. उजवी देणें- १ उजव्या बाजूकडे जाऊं देणें. २ मूर्तीच्या अंगाला लावलेले तांदूळ, फुलें वगैरेपैकीं उजव्या बाजूकडील खालीं पडणें: कौल देणें. ३ संमति देणें; होकार देणें. ॰जाणें-उजवीकडून जाणें.