मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

अवरोध      

पु.       १. अडथळा; हरकत; अटकाव; आडकाठी; प्रतिबंध; कुंठितावस्था : ‘कृष्ण प्राप्तीशी अवरोधु । सबळ क्रोधु उपजेल ॥’ – एरुस्व २·४८. २. नातलगाच्या मृत्यूच्या श्रवणाने येणारी अशुद्धता; सुतक; मृताशौच. ३. अंतःपुर; जनानखाना; राणीवसा : ‘तदुपरि अवरोधद्वार किंचिद्विलंबे । यदुपति मग पावे पार्थ हस्तावलंबे ॥’ – सारुह ५·४३. ४. (भाषा.) श्वासनलिकेतून बाहेर पडणाऱ्या हवेला उच्चारण अवयवामुळे होणारा संपूर्ण अडथळा. (वा.) अवरोध पडणे– अडथळा होणे; विलंब लागणे : ‘कासीराव रास्ते यांचा काळ रोज मजकुरी जाला. त्याची स्त्री सती निघाली याजकरिता गंगाधरराव रास्ते यांस अवरोध पडला.’ – पुअभा ३·१२२. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अवरोध

अवरोध avarōdha m (S) Obstruction, stoppage, hindered or impeded state. In comp. as मलावरोध, मूत्रा- वरोध, श्र्वासावरोध, रक्तावरोध, कंठावरोध, व्यवहारा- वरोध, गत्यवरोध, मार्गावरोध, शक्त्यवरोध. 2 Impurity contracted from hearing of a death amongst one's relations. 3 f S A woman.

मोल्सवर्थ शब्दकोश

अवरोध m Obstruction, stoppage.

वझे शब्दकोश

पु. १ अडथळा; हरकत; अटकाव; अडकाठी; प्रति- बंध; कुंठितावस्था; 'कृष्णप्राप्तीशीं अवरोधु । सबळ क्रोधू उपजेल ।।' -एरुस्व २.४८. सामाशब्द-मलावरोध, मूत्रावरोध, श्वासावरोध, रक्तावरोध, कंठावरोध, व्यवहारावरोध, गत्यवरोध, मार्गावरोध, शक्त्यवरोध. २ नातलगाच्या मृत्यूच्या श्रवणानें येणारी अशुद्धता; सुतक; मृताशौच. ३ अंत:पुर; जनानखाना; राणीवसा. 'तदुपरि अवरोधद्वार किंचिद्विलंबें । यदुपती मग पात्रे पार्थ हस्तावलंबें ।।' -सारुह ५.४३. -स्त्री. कुलीन स्त्री. औरत. [सं.]

दाते शब्दकोश

(सं) पु० अवष्टंभ, दबा, जाड्य. २ अडथळा. ३ अन्तःपुर.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

संबंधित शब्द

दम

पु. १ श्वास. (ल.) प्राण; जीव. २ धाप; हवावी; सुसकारा; प्रमाणाधिक श्वासोच्छवास; कष्टानें श्वास टाकणें. ३ स्वतः- बद्दलची फाजील कल्पना; अहंमन्यता; अहंकार; महत्त्वाकांक्षा; गर्व; बढाईखोरपणा. ४ क्षण; पळ. ५ जोम; हिम्मत; निश्चय; विश्वास; तेज; धीर. ६ शक्ति; सत्व; चांगलपणा; सामर्थ्य; गुण (औषधांचा). ७ श्वास कोंडून धरण्याची शक्ति; अवसान. 'तुझा दम मोठा म्हणून तूं बुडून राहतोस.' ८ कायम ओलसरपणा, दमटपणा (जमी- नीचा). ९ एखाद्या वाद्यांतील हवा (वाजविण्यासाठीं कोंडलेली, भरलेली). १० वाफ देणें (मंदाग्नीवर ठेवलेल्या अन्नास). ११ धूम; पखवाज, संबळ इ॰ कांचा खर्ज सूर. १२ हिम्मत; जोम; शक्ति; धीर; दृढनिश्चय; सहनशक्ति इ॰ उठावणी करण्याची, प्रोत्साहित करण्याची, पाठपुरावा करण्याची शक्ति (संपत्ति, अधि- कार, उद्योग यांची); व्यापारधंद्यांतील भरभराट; किफायत; व्यापारांतील ऐपतगिरी; गब्बरपणा. १३ धान्याचा सकसपणा; केळीं वगैरे पदार्थांचा (पोटांत) पुष्कळ वेळपर्यंत भूक न लागतां राहण्याचा गुण; जुन्या, वापरलेल्या वस्तूंची अधिक टिकण्याची शक्ति; पुष्कळ वेळ जळत राहण्याची दारूकामाची शक्ति; न तापतां पुष्कळ वेळ बार उडण्याची (तोफ, बंदूक इ॰) शक्ति. १४ झुरका (गुडगुडी, चिलीम इ॰चा). (क्रि॰ घेणें; पिणें खेंचणें; ओढणें; लावणें). १५ जोर; शक्ति. 'पावसानें पिकास दम आला. ' १६ धमकी. [सं. दम्; फा.] (वाप्र.) ॰कोंडणें-१ श्वास कोंडणें; श्वासाचा अवरोध होणें. २ हिंमत, उत्साह खचणें. ॰खाणें-१ थांबणें; श्वास घेणें; थोडा वेळ स्वस्थ बसणें. २ वाट पाहणें; धीर धरणें. ॰घेणें-थांबणें; विश्रांति घेणें. ॰छाटणें-१ श्वासाचा निरोध करणें; श्वास कोंडून धरणें. २ धीर धरणें; सहनशीलपणा धारण करणें. ३ श्वासोच्छ्वास अनियंत्रित चालणें; गुदमरणें; घाबरे होणें. 'कफामुळें दम छाटत नाहीं.' ॰टाकणें-सोडणें-१ आशा, विश्वास. धैर्य सोडणें. २ श्वास घेणें; विश्रांति घेणें. ॰देणें-१ धैर्य देणें; प्रोत्साहित करणें; उत्तेजन देणें. २ धमकी देणें; धाकदपटशा दाखविणें. ३ जोराने खडसावणें; भोसडणें. ४ क्षणभर विसावा घेऊं देणें. ॰धरणें-१ श्वासावरोध करणें; धीर धरणें. २ थांबणें; विसावा घेणें. ३ धैर्य धरणें. ४ कांहीं वेळ वाट पाहणें. ॰पाहणें- (एखाद्याच्या) अवसानाची, शक्तीची परीक्षा घेणें, करणें. ॰भरणें-धमकावणें; खडकावणें; तंबी देणें; भेडसावणें; दहशत घालणें; ताकीद देणें. ॰मारणें-१ झुरका घेणें (गुडगुडी इ॰चा). २ आपल्या करामतीची पराकाष्टा करणें. 'पुन्हां एकदां दम मार म्हणजे ते धोंडा सरकेल.' ३ गट्ट करणें; दाबणें (पैसा, अन्न इ॰). ॰लागणें-जीव खालींवर होणें; जलद, कष्टानें श्वास घेणें; धाप लागणें. ॰सुटणें-धैर्य, विश्वास नाहींसा होणें; धीर खचणें. दमादमानें-सावकाश; शांतपणें; हळू हळू; थांबून. दमावर धरणें-घाईशिवाय किंवा न थकतां एकसारखें काम करणें. एका दमानें-क्रिवि. एका श्वासानें अथवा अव्याहत प्रयत्नानें; एका सपाट्यांत. दमास येणें-थकणें. सामाशब्द- ॰छाट-पु. श्वासोच्छ्वास निरोधाची शक्ति; पुष्कळ वेळ दम कोंडून ठेवणारा माणूस. ॰छाटगोळा-पु. कुलपी गोळा; बाँब. ॰छाट- तोफ-स्त्री. गरनाळ. ॰छाट माणूस-मनुष्य-पु. पुष्कळ वेळ अवरोध करण्याची शक्ति असलेला मनुष्य. दमट, दमकट- कल-वि. १ ओलसर; आंबटओलें; कुंद; आर्द्र (जमीन इ॰). २ हिरवी; रसभरीत (फांदी). ॰टणें-अक्रि. १ ओलसर असणें. २ ओलसर होणें. ॰दाटी-स्त्री. धाकदपटशा. ॰दार-वि. १ ओल- सर; दमट (जमीन). २ ओलट; हिरवें (लांकूड); जमीनींतील भट्टींत तयार केलेला व दमानें जळणारा (कोळसा); सकस; कस- दार (धान्य); नफा होणारें; फायदेशीर (काम, धंदा). ३ धाडसी; अंगांत तेज किंवा पाणी असणारा; नशीबवान; निश्चयी. ४ धीराचा; सहनशील; उत्साही; दीर्घोद्योगी. ५ पैसेवाला; भांडवलवाला; पैशाची ऊब असणारा (सावकार). ६ पुष्कळ व वापरूनहि दणकट, मजबूत राहणारी (वस्तु, वस्त्र). ॰दिलासा-पु. उत्साह; धीर; समाधान. ॰विकरी, दमाची विकरी-स्त्री. उधारीचा धंदा; उधारीची विक्री. ॰सर-वि. दमट पहा. ॰सर्द-वि. १ थंड. २ नामोहरम; पराजित; हतप्रभ. 'अमर्यादकांस शासनें करुन ...दमसर्द केलें.' -राज ८.१२५. ॰सूट-क्रिवि. पहांटेच्या वेळीं.

दाते शब्दकोश

अनुघड      

स्त्री.       अडचण; अवरोध (हालचाल बंद पडणे) : ‘इंद्रियां अनुघडुं पडलिया ।’ – ज्ञा ८·१२१. [सं. अनु+घट]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनुघड-डु

स्त्री. अडचण; अवरोध; (हलचाल बंद पडणें). 'इंद्रियां अनुघडु पडलिया ।' -ज्ञा ८. १२०. [सं. अनु + घट्. अनु- घटन = एकत्र जुळणी]

दाते शब्दकोश

अपरोध      

पु.       १. अवरोध; विरोध; अडथळा. (को.) २. लाजाळूपणा; विनय; संकोच; मर्यादा. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अपरोध

पु. १ (कों.) अवरोध; विरोध; अडथळा. २ लाजाळूपणा; विनय; संकोचणें. [सं. अप + रोध]

दाते शब्दकोश

अवरोधणें

अवरोधणें avarōdhaṇēṃ v c (Poetry. अवरोध) To obstruct, impede, hinder, detain, stop.

मोल्सवर्थ शब्दकोश

अवष्टंभ      

पु.       १. अडथळा; अटकाव; अवरोध; खोळंबा; हरकत. २. टेका; आधार; आश्रय; आसरा. ३. (ल.) कृपादृष्टी; दया; मदत; पाठिंबा. ४. अहंकार; गर्व; आढ्यता : ‘येर अवष्टंभु जो आघवा । तो आरूढोनि मद्‌भावा ।’ – ज्ञा ९·४१४. ५. अष्टसात्त्विक भावांच्या ऊर्मी, फुंज : ‘आपण पां करूनि स्वयंभु । बुझविला अवष्टंभु । संजयें तेणें ॥’ – ज्ञा १८·१६२२. ६. मलावरोध ७. (ज्यो.) आपल्या वार्षिक भासमान गतीत सूर्य ज्यावेळी आकाशीय विषुववृत्तापासून दक्षिणेला जास्तीत जास्त अंतरावर असतो ती वेळ. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अवष्टंभ

(सं) पु० अवरोध.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

दिशा      

स्त्री. १. दिग्विभाग; पूर्व, पश्चिम इ. आठ दिशा; आकाशाची पृथ्वीकडची बाजू. २. प्रांत; प्रदेश. ३. रीत; प्रकार; मार्ग (कामाचा इ.). [सं.] (वा.) दिशा कोंडणे –अवष्टंभ, अवरोध होणे : ‘मुरडा हागवण उन्हाळे । दिशा कोंडतां आंदोळे ।’ – दास ३·६·३०. दिशा फाकणे, दिशा फुटणे, दिशा पालटणे, दिशा उघडणे – उषःकाल होणे; उजाडणे. दिशा भारणे, दिशा बांधणे – मंत्रसामर्थ्याने चोहीकडचा प्रदेश, लोक यांची नजरबंदी करणे; कोणालाही आपले कृत्य कळणार नाही असे करणे. दिशेस जाणे – (प्र.) बहिर्दिशेला, शौचाला जाणे. चारही दिशा मोकळ्या होणे – (कोठेही भटकणे, भीक मागणे इ. साठी) थोडीही आडकाठी नसणे; अंकुश नाहीसा होणे. दशदिशा पळणे –पांगापांग होणे; त्रेधा उडणे. दिशाचक्र      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धडक

क्रिवि. (हें ध्वन्यनुकारी क्रियाविशेषण अनेक प्रंसगीं अनिर्बंधपणें) योजितात. त्यामुळें याचा निश्चित असा एकच अर्थ देतां येत नाहीं. संदर्भावरूनच स्पष्ट अर्थ कळणें शक्य आहे). (व्यापक.) (भय, शंका, दैव इ॰ कानीं) प्रवृत्तीचा, गतीचा, क्रियेचा संकोच, अवरोध, विराम न होतां; थेट; सरळ; अविरोध; न थांबतां; एकदम; सपाट्यानें इ॰. (येणें, जाणें, मरणें इ॰). जसें:-महामारीनें धडक माणसें मारतात. यांत धडक = असंख्यांत पणें असा अर्थ तो चोर धडक घरांत शिरला. यांत धडक = नकच- रतां, एकदम असा अर्थ; तो वीर शत्रूवर धडक धांवतो. या वाक्यांत तो वीर शत्रूवर तुटून पडतो असा अर्थ. येणेंप्रमाणें धडक- बोलतो-चालतो-मारतो इ॰ कांचे अर्थ ध्यानांत येतील. हा मार्ग धडक काशीस जातो या वाक्यांत धडक = नीट, सरळ, थेट असा अर्थ संदर्भावरून सहज कळेल. [ध्व.]

दाते शब्दकोश

धडक, धडका      

क्रिवि.       (व्यापक) (भय, शंका, दैव इ. मुळे) प्रवृत्तीचा, गतीचा, क्रियेचा संकोच, अवरोध, विराम न होता; थेट; सरळ; अविरोध; न थांबता; एकदम; झपाट्याने इ. [ध्व.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गतिभंग      

पु.       अवरोध; प्रतिबंध; अडथळा. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घुणा

पु. १ (सोनारी) सांखळीचा. दागिन्याचा दुहेरी दुवा; आंवळ गांठ (याचा आकार ळ सारखा असतो). (क्रि॰ देणें). २ बिरडें; गेंद; पेंच; बोंडी; मणी (तोडा इ॰ दागि- न्यांचा). ३ दोरांची, सांखळ्यांची एकांत एक गुंतवून शोभेंसाठीं) केलेली मोठी गांठ, गोंडा, झुबका. ४ लांकडाशीं लांकूड जोडून तीं तेथें घट्ट रहावीं असा बांधण्याचा प्रकार. ५ (उतरणी- वर गतीचा अवरोध करण्याकरितां) गाडीच्या चाकांच्या मागें घालावयाचा लांकडाचा दांडा, काठी, खरडी. (क्रि॰ घालणें, लावणें). 'गाडीला घुणा लावा.' ६ (ल.) अडथळा. 'चालू कार्याला घुणा घालण्यासारखें होईल.' [सं. घोणा? तुल॰ का. गुणी = चाबकाची मूठ] ॰घालणें-अडथळा करणें; व्यत्यय आणणें. ॰घेणें-एखादें ओझें घट्ट बांधताना दोराची दुहेरी अढी, दुमड, विळखा (घोणा) घेणें.

दाते शब्दकोश

कुडणे      

उक्रि.       १. कुंपण घालणे; भिंतीसारखा कूड घालणे. २. बंद करणे; बुजविणे (रस्ता, मार्ग). ३. कैदेत टाकणे; बंदीत टाकणे, घालणे. ४. अडथळा, आडकाठी, अवरोध कराणे. ५. (ल.) दाबणे; ओशाळणे. ६. मनात कुढणे; तळमळणे; खेद मानणे; खिन्न होणे. ७. अवटरणे; दुखणे; ताठणे (पुष्कळ वेळ एके ठिकाणी बसल्याने शरीर, अवयव इ.) [सं. कुण्ड् = रक्षण करणे; कुड्य = भिंत]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुडणें

उक्रि. १ कुंपण घालणें; भिंतीसारखा कुड घालणे. २ बंद करणें; बुजविणें (रस्ता, मार्ग). ३ कैदेंत टाकणें; बंदींत टाकणें, घालणें. ४ अडथळा, आडकाठी, अवरोध करणें. ५ (ल.) दाबणें; दडपणें; ओशाळणें. ६ मनांत कुढणें; तळमळणें; खेद मानणें; खिन्न होणें. ७ अवटरणें; दुखणें; ताठणें (पुष्कळ वेळ एके ठिकाणीं बसल्यानें शरीर, अवयव इ॰). [सं. कुण्ड् = रक्षण करणें; कुड्य = भिंत]

दाते शब्दकोश

कुंठणे      

अक्रि.       थांबणे; कुंठित होणे; खोळंबणे; अवरोध होणे, केला जाणे; बंद होणे : ‘पाहा पां असमसाहास । जेथ कुंठले निर्देश ।’ - ऋ १. २४७. [सं. कुष्ठ = लंगडे असणे]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुंठणें

अक्रि. थांबणें; कुंठित होणें; खोळंबणें; अवरोध होणें, केला जाणें; बंद होणें. 'पाहा पां असमसाहास । जेथ कुंठले निर्देश ।' -ऋ १.२४७. 'मग संतुष्टीच्या ठायीं । कुठें सहजें ।' -ज्ञा ४१. [स.कुंण्ठ् = लंगडे असणें]

दाते शब्दकोश

लाइस

स्त्री. (नाविक कु.) कापडी बोंब लांकडी बोंबा- वर ठेवल्यानंतर त्यास गुंडाळणारी दोरी. ॰करणें-क्रि. उलटें वल्हवून होडीच्या गतीस अवरोध करणें.

दाते शब्दकोश

मक्कलशूळ

पु. बाळंतिणीच्या हृदयांत, मस्तकांत व बस्तींत होणारा शूळ. हा वाताच्या प्रकोपानें रक्ताचा अवरोध झाला म्हणजे उत्पन्न होतो. -योर २.६४०.

दाते शब्दकोश

निरोध

(सं) पु० अवरोध, बंद ठेवणें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

प्रतिबंध,प्रतिबंदी

पुस्त्री. १ अडथळा; विरोध; अडव- णूक; अडकाठी; प्रतिकार; विघ्न. २ अडवणूक, थांबवणूक, नियं- त्रण; अबरोध; अडथळा केलेली स्थिति. ३ (यंत्रशास्त्र) ज्या कारणानें चलन पावलेल्या पदार्थाचें चलन कमी होतें अथवा नाहीसें होतें किंवा उलटें होतें त्यास प्रतिबंध म्हणतात. -यंमू २१९. (इं.) रेझिस्टन्स. [सं. प्रतिबंध] प्रतिबंधक-न. अडथळा; अडवणूक; विरोध; विघ्न. [सं.] -वि. प्रतिबंध करणारा; अडथळा, प्रतिकार; अडवणूक करणारा; निवारक. [सं] ॰कारण-कार्यानिवारक कारण; स्वतः कोणतेहि कार्य उत्पन्न न करितां केवळ आपल्या अस्तित्वा नेंच दिलेलें कार्य घडवूं देत नाहीं असें कारण. -न्यायप २८. प्रतिबंधनन. अडचण; विघ्न; अडथळा. अधिक खादलिया अन्न । तें प्रतिबंधन गुरुसेंवें ।' -एभा १७.३१०. प्रतिबाधक-वि. १ विरोध, अडथळा, मज्जाव, प्रतिबंध करणारा; अवरोध करणारा. २ मार्गांत येणारा; प्रतिकूल असणारा; कार्यनाश करणारा.

दाते शब्दकोश

तोंडलें

न. तोंडलीचें फळ. हीं फळें तुळतुळीत हिरव्या रंगाचीं, सुमारें इंच-अर्धा इंच जाड व दोन तीन इंच लांब अस- तात. यांची भाजी करितात. हें गोड, थंड, मलाचा अवरोध कर णारें, जड, रक्तपित्त, दाह व सूज यांचा नाश करणारें आहें. हें बुद्धि मंद करणारें आहे असें म्हणतात. -योर १.४२. 'म्हणती सद्यःकीर्तिप्रज्ञाघ्नस्पर्श तोंडलें कवि त्या ।' -मोविराट ३.५१. [तोंडली]

दाते शब्दकोश

तुंबा, तुंबारा, तुबाडा      

पु.       १. पहा : तुंब ३. २. अडवल्यामुळे साचलेले पाणी. ३. (ल.) तुंबलेले, साचलेले काम. ४. तुंबून रहाण्याची अवस्था; एकत्र साठणे; पाणी तुंबणे. ५. पाणी तुंबावे म्हणून मोरीत, छिद्रात घालावयाचा बोळा. ६. अवष्टंभ; अवरोध; साकळ (रक्ताचे) : ‘रक्ताचा भलत्याच ठिकाणी तुंबारा होऊन त्यामुळेंच ते मृत्यु पावतात.’ – ब्रावि ६५. ७. प्रतिबंध नाहीसा झाल्यामुळे, तोंड पडल्यामुळे रक्त, पाणी इ.चा वेगाने चालणारा मोठा प्रवाह (क्रि. लागणे, धरणे, फुटणे, सुटणे, सोडणे.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तुंबा, तुंबारा-डा

पु. १ बांध; पाणी अडवि- ण्याचें साधन. २ अडविल्यामुळें सांचलेलें पाणीं. ३ (ल.) तुंब- लेलें सांचलेलें काम. ४ तुंबून रहवयाची अवस्था; एकत्र सांठणें; तुंबणें (पाण्याचें). ५ पाणी इ॰ तुंबावें म्हणून मोरी इ॰ छिद्रांत घालवयाचा बोळा. ६ अवष्टंभ; अवरोध; सांकळ (रक्ताचें) 'रक्ताचा भलत्याच ठिकाणीं तुंबारा होऊन त्यामुळेंच तें मृत्यु पावतात. -ब्रावि ६५. ७ प्रतिबंध नाहीसां झाल्यामुळें, एक तोंड पडल्या- मुळें (रक्त पाणी इ॰चा) सवेग चालणारा मोठा प्रवाह. (क्रि॰ लागणें; धरणें; फुटणें; सुटणें; सोडणें). 'रक्ताचां तुंबारा लागून रक्तबंबाळ झालें.' ॰सोडणें-पुष्कळ रक्त, पाणी वगैरें एकदम सुटल्यामुळें वाहुं लागणें. 'तुंबाडा सोडल्यासारखें तोंड वार्‍यास देऊं नयें.' [तुंबणें]

दाते शब्दकोश

गति-ती

स्त्री. १ जा ये; चळवळ; हालचाल, गमन; धाव; प्रयाण; चाल; प्रगति. 'रथाची गती ।' -ज्ञा १७.३८९. २ वर्तन; वागणूक; चाल; पद्धति. 'परि ते गती समस्तां । न मनेल ययां ।' -ज्ञा २.२०३. ३ स्थिति; दशा (मुख्यत्वें वाईट अर्थीं); 'पुसति बापाजी झाली हे कां गती ।' -मोअभंग सीतागीत (नवनीत पृ. २५९); (समासांत) कल्पना-कौशल्य-चातुर्य- पराक्रम-शौर्य-ज्ञान-गति, वगैरे. 'गती खुंटती ज्ञानबोध प्रबोधें । -राम १५७ ५ प्रारब्ध; दैव; घटित; नशिबाचा फेरा. 'दवाची गति विलक्षण अति' ६ आयुष्यांतील बाल-तरुण-वृद्ध अवस्था, ७ आकाशस्य गोलाचें एकंदर. परिभ्रमण. फेरी. ८ चढती पायरी; भरभराट; सुस्थिति; आबादानी; प्रगति ९ ग्रहाची आपल्या कक्षेंतील दैनिक फेरी. १० प्रकार; अवस्था; म्ह॰ कर्माच्या गति सांगाव्या किती. ११ खरें स्वरूप, खरा अर्थ, मर्म. 'अगा गति कळावी कर्माची ।...गहन कर्माची गति म्हणोनि ।' -यथा ४.४२०. मियां गति दखिली असें निकी । -ज्ञा १५.११६. १२ (यंत्रशास्त्र) चलन; चाल; (इं.) मोशन १३ साम्य; योग्यता, स्थिति, पदवी. 'जिष्णु म्हणे पावति गति इतर पशु न त्या पिनाकिच्या पशुची ।' -मोआदी २५६. 'शच्याद्यमरी म्हणती, आम्ही योग्या इच्या नसों गतिला ।' -मोवन ४.१४७. १४ मोक्ष; सद्गति; मुक्ति; उत्तम लोक. 'उपाय साधन आइका कोण गति अवगाति ।' -तुगा ४२८. 'पशुदेही नाहीं गती । ऐसें सर्वत्र बोलती ।।' -दा १.१०.२१. १५ आश्रय; कृपास्थान. 'गति तूंचि अमुची बा आश्रय आम्हांसि तूंचि मावासा ।' -मोकर्ण ४२.७. १६ गत; पर्यवसान; शेवट. 'अखेर संग्रामाच्या गति ।' -ऐपो २२. 'तिज वाटे नृपसुताची करिलचि तो ती गती ।' -विक २०. १७ गतः इलाजः उपाय. तसें केल्यावाचून व्यापार्‍यांस गतीच नाहीं' -विक्षिप्त १.९९. १८ वाजविण्यातील एक प्रकार, रीत. 'गति ग पखवा जावर झडती ।' -प्रला १३४ -क्रिवि गत्या पहा. रीतीनें योगानें. (वाप्र.) ॰मिळणें-अक्रि. मुक्ति मिळणें. ॰वर, ॰स येणें- १ कृत्रिम (वेष, मुखवटा) टाकून मुळावर येणें. २ ताळ्या- वर येणें; पूर्वीच वर्तन टाकणें; सुधारणें. ॰होणें-प्रवेश होणें; समजणें. 'त्यांची संस्कृतांत गति झाली होती' -कोरकि ४२९. सामाशब्द- ॰गतीं-क्रिवि (व) हळू हळू. 'गतिगति करत्यें काम' ॰चक्र-न. (यंत्र) यंत्र चालू करणारें मोठें चाक (इं) फ्लाय- व्हील [सं.] ॰दाता-वि. (इहलोकापासून, विभक्तपणा किंवा जन्ममरणापासून) बांधमुक्त करणारा मुक्तिदाता; ईश्वर. [सं.] ॰दायक मज्जारज्जु-(शाप.) इंद्रियांच्या गतीस कारण होणारा मज्जातंतु (इं.) मोटर नर्व्ह. ॰फल-न. दोन ग्रहांच्या परि- भ्रमणांतील वेळांचें; अंतर [सं.] ॰भंग-पु. चालीला अवरोध; प्रतिबंध; अडथळा. ॰भ्रंश-पु. खोळबा; खोटी; आडकाठी; खळ; खड (कोणतेंहि गमन किंवा चाल यामध्यें) [सं.] ॰मंडळ (अंगाहार)-पु. (नृत्य) आखंडल स्थान करून हात रेचित करणें व उजवा पाय उद्धटित करून मात्तल्लि, आक्षिप्त, उरोमंडल व कटिछिन्न हीं क्रमानें करणें. ॰मान-वि. चालणारा, हालणारा, गतींत असणारा [सं] ॰वर घातलेला, पडलेला-वि. मरणो- न्मुख झालेला, मरावयास टेंकलेला. [सं.] ॰विशिष्ट कर्तृत्व- शक्ति-स्त्री (शाप.) गति उत्पन्न करणारी शक्ति (इं.) काय- नेटिक एनर्जी. ॰विशिष्ट कल्पना-स्त्री. (शाप.) गतीसप्राधान्य देणारी उपपत्ति (इं.) डायनामिकल थिअरी. ॰शास्त्र-न. देण्याच्या कार्यानें ज्या नियमांनीं पदार्थास गति मिळते त्यांचा विचार करणारें शास्त्र. -यंस्थि १. (इं.) डायनामिक्स. ॰हीन- वि. १ आश्रय, आधार किंवा उपाय यांनी रहित; अनाथ; निरुपायी. २ हालचालरहित; स्थिर; कुंठितगति. [सं.]

दाते शब्दकोश

रक्त

न. रुधिर; जिवंत प्राण्याच्या शरीरांत सतत वाहणारा तांबडा रस; शरीरांतील एक द्रवरूप धातु. -वि. १ तांबडा; तांबूस रंगाचा; रक्तासारखा (तांबडा) लाल; लालभडक. २ रंगविलेलें. रंगीत. ३आषक; अनुरक्त; संवय, शोक, लळा, ओढा असलेला; [सं. रंज्-रत-रक्त; फ्रेंजि. रत, पार्तु. जि. अरत] (वाप्र.) ॰आट- विणें, रक्ताचें पाणी करणें-उरस्फोड करणें; फार मेहनत करणें. ॰पडणें-शौच्याच्यावाटे रक्त जाणें. रक्ताचें पाणी (आणि हाडाचे मणी) करणें-अतिशय इमानानें आणि मेहनतीनें कामगिरी करणें. ॰पाडणें-(मंत्र, जादूटोणा इ॰ नीं) बाहेर रक्त पडेल असें करणें. रक्तावणें, रक्ताळणें-क्रि. १ रक्त वाहूं लागणें; रक्तस्त्राव होणें (जखमेंतून). २ रक्तबंबाळ होणें (शरीर, वस्त्र, वस्तु). सामाशब्द- ॰ओढ-स्त्री. रक्त पडतें अशी हगवण; रक्त जाणें. ॰कांचन-पु. एक डोंगरी झाड; तेंटू तेंतु. ॰गुल्म-न. मुलाच्या डोक्याचीं हाडें व त्वचा यांमध्यें कधीं कधीं रक्त सांचून गुल्म होतें तें.' -बालरोगचिकित्सा ५०. ॰गोलक-पु. (शाप.) रक्ताचा थेंब, बिंदु इ॰ (इं.) ब्लड ग्लोब्यूल. -सेंपू २. ॰चंदन-पु. एक वृक्ष; तांबडा चंदन; याच्या बाहुल्या, खेळणीं इ॰ करतात. [सं.] ॰चंदनी-रक्तचंदनाच्या संबंधीं. ॰तालू-वि. घोड्याचा एक प्रकार. 'ताळूचे ठिकाणीं तांबडा, दारूप्रमाणें नेत्र; मानेवरील केस आरक्तवर्ण आणि बाकी सर्व अंग तांबडें अशा घोड्यास रक्ततालू म्हणतात.' -अश्वप १.२३. ॰धातु-पु. तांबदा खडू; तांबडा(हर) ताल. [सं.] ॰नेत्र- वि. तांबडे, लाल डोळे असलेला (घोडा); अशुभ चिन्ह होय. [सं.] ॰प-१ राक्षस. २ ढेंकूण. [सं. रक्त + पा = पिणें] ॰परमा-में- पुन. जननेंद्रियाचा रोग; कांहीं व्याधीच्या योगानें शिश्नद्वारां जो रक्तप्रवाह तिडीक लागून होतो तो; रक्तप्रमेह. 'मूत्रकोड आणि परमें । रक्तपिती रक्तपरमें । ' -दा ३.६.२९. [सं. रक्तप्रमेह] ॰पात-पु. खून; कापाकापी; मारामारी; कत्तल; रक्त सांडणें. 'त्याच्या दाराशीं रक्तपात केल्यावांचून तो पैसा देणार नाहीं. ' [सं.] ॰पिती-स्त्री. महारोग; महाव्याधि; गलतकुष्ट रोग. [सं. रक्त + पित्त] ॰पित्या-वि. रक्तपिती भरलेला; महारोगी. ॰पित्त- पुन. नाक, तोंड इ॰ पासून रक्तस्त्राव होणें. 'आम्लपित्त रक्तपित्त । ' -गीता १३.२४९७. ॰प्रदर-पु. एक प्रकारचा प्रदररोग. ॰प्रमेह- पुन. रक्तपरमा-में पहा. जननेंद्रियाच्या द्वारें रक्तस्त्राव होणारा प्रमेह; लघवींतून रक्त जाणें. ॰बंवाळ-बोंबाळ-वि. १ रक्तानें भरलेला, माखलेला; अंगांतून अतिशय रक्त वाहत असलेला. २ शरीर, अवयव इ॰ ची अशी स्थिति. 'हाताचा रक्तबंबाळ झाला.' ॰बाऊ-बाहु-पु. एक सन्निपात ज्वर; अंगावर तापाचे तांबडे चकंदळे उठणें. ॰बीज-वि. १ ज्याच्या रक्तापासून नवीन असुर उत्पन्न होई असा (एक असुर). २ ढेंकूण. ३ (ल.) डाळिंब, तांबडे दाणे असलेलें. [सं.] ॰बुंद-पु. राक्षस. [सं. रक्तबिंदु] ॰बोळ-पु. एका झाडाच्या औषधी तांबडा डिंक, गोंद. ॰भरित- (गो.) रक्तानें भरलेला. ॰माँडळी-स्त्री. (गो.) सापाची एक जात. ही चावली असतां तोंडांतून रक्त वाहतें. ॰मा(मां)स-न. रक्त व मांस; शरीरांतील महत्त्वाचा अंश. 'रक्तमांस आटलें- शोषलें-सुकलें इ॰ ' ॰मांस एक-एका रक्ताची; कुळांतील; सगोत्र. मांस निराळें-नात्याचा कांहीं संबंध नसणें; नातें नसणें; असगोत्र. ॰मान्य-वि. लढाईमध्यें केलेल्या कार्याबद्दल, झालेल्या जखमांबद्दल बक्षीस दिलेल्या, सारा माफ जमिनी. ॰मुखराग-पु. (नृत्य) वीर, रौद्ररस, किंवा मद्याची धुंदी दाख- विण्याची तोंडावरील लाली, तेज. ॰मेह-पु. रक्तप्रमेह पहा. [सं.] ॰मोक्षण-न. शरीरांतील रोगांश बाहेर पडावा म्हणून जळवा लावून, कापून, फांसण्या टाकून किंवा शिरा तोडून जें रक्ताचें निष्कासन करितात तें. ॰रंजन-न. तांबडें करणें. ॰रुधि रपेशी-स्त्रीअव. रक्ताच्या तांबड्या पेशी. (इं.) रेड कॉर्प्युस्कल्स. ॰रोडा-रोहिडा-रोहडा-पु. एक प्रकारचें झाढ, औषधी वन- स्पति; रगतरोडा. पानें भोकरीच्या पानासारखीं, मिऱ्याहून मोठीं गोल व तांबड्या रंगाची फळें येतात. [सं. रक्तरोहितक] ॰वर्ण वर्णी-वि. लाल; तांबड्या रंगाचें. [सं.] ॰वाहिनी-स्त्री. जीमधून रक्त वाहत असतें अशी शरीरांतील नाडी. [सं.] ॰विकार-पु. रक्तदोष; रक्तांतील बिघाड [सं.] ॰विपाक-पु. रक्तदोषानें होणारा रोग. विपाक पहा. [सं.] ॰वृध्दि-स्त्री. (आजारानंतर) शरीरांत रक्त वाढणें. याच्या उलट रक्तक्षय. [सं.] ॰शोषण-न. १ (आजारामुळें) रक्त कमी होणें; अंगातील रक्त कमी करून कृश करणें. २ (ल.) लोकांकडून त्याच्या शक्तीबाहेर पैसे उकळणें; जळवा लावणें. [सं.] ॰सांड-स्त्री. (कों.) रक्त- मोक्षण पहा. फासण्या टाकून रक्त काढणें. ॰स्त्राव-पु. रक्त जाणें, वाहणें; रक्ताचा पाट [सं.] ॰रक्ताचीआण-स्त्री. एखाद्याच्या रक्ताची शपथ घेणें; निकराची शपथ. बंदाखालीं बसणें पहा. रक्तांजनी-वि. एकरंगी पांढरा असून डाव्या कुशीवर फक्त तांबडी टिकली असलेला (घोडा). -अश्वप १.९७. [रक्त + अंजन] रक्तातिसार-पु. रक्ताची हगवण. -बालरोगचिकित्सा १०७. [रक्त + अतिसार] ॰रक्तांबर-पु. भगवें, तांबडें वस्त्र. -वि. १ तांबडें वस्त्र परिधान केलेला. २ रक्तानें न्हालेला; जखमी झालेला. [सं. रक्त + अंबर] रक्तांबील-ळ, रक्ताभोंबळा-वि. (काव्य) रक्तानें माखलेला; अंगांतून रक्तस्त्राव होत असलेला. [सं. रक्ता- विल] रक्ताभिमान-पु. समान रक्ताविषयीं अभिमान, जागृति; जातीचा जागतेपणा. 'आम्हालासुद्धां रक्ताभिमान हा आहेच.' -टिले २.४५०. ॰रक्ताम्र-पु. एक प्रकारचें झाड व त्याचें फळ. रातंबी पहा. [सं. रक्त + आम्र] रक्तार्श-पु. मूळव्याध; रक्ती मूळ- व्याध; शौचाच्या वाटेनें रक्त पडणें. [सं.] रक्तावरोध-पु. रक्त न वाहणें; रक्ताचें अभिसरण होण्याचें थांबणें; रक्ताचा विशिष्ट जागीं संचय होणें. [रक्त + अवरोध] रक्ताशय-पु. शरीरांतील रक्त संचयाची जागा; हृदय. [रक्त + आशय] रक्ता- सन-न. तांबड्या दुपारीचें झाड. रक्ताक्ष-वि. १ तांबड्या लाल डोळ्याचा (घोडा). २ तांबडा; लाल (मोतीं, रुद्राक्ष) [सं. रक्त + अक्ष] रक्ताक्षी-पु. साठ संवत्सरांतील अठावन्नावा संवत्सर. रक्ता-वि. पंधराव्या श्रुतीचें नांव. [सं] रक्ति-स्त्री. अनुराग; रंग. [सं.] रक्तिका-वि. सातव्या श्रुतीचें नाव. [सं.] रक्तिमा-पु. तांबडेपणा; लालपणा; लाली. [सं.] रक्तिया-वि. लाल रंगाची छटा असलेला (हिरा). हा दोष अशुभ मानतात. रक्ती-रक्त्या मूळव्याध-स्त्री. जींत रक्त पडतें अशी मूळव्याध. रक्त्या बोळ-रक्तबोळ पहा. रक्तोत्पल-न. तांबडे कमळ. [रक्त + उत्पल]

दाते शब्दकोश