आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
आकर
आकर ākara m (S) A mine or quarry lit. fig. Ex. रत्नाकर, ताम्राकर, गुणाकर, दयाकर, करूणाकर.
आकर m A quarry, mine.
(सं) पु० सांठा, खाण, खनि.
पु. खाण; ठेवा; सांठा; संग्रह; आगर. उ॰ रत्नाकर. करुणाकर, कुसुमाकर. ‘ऋतूंमाजीं कुसुमाकरु । वसंतु तो मी ।।’ -ज्ञा १०.२८३. [सं.] ॰ग्रंथ- पु. मोठें-जाड पुस्तक; प्रचंड ग्रंथ. ॰ज्ञान- न. खनिज्ञान; खाणीसंबंधीं शास्त्राचें ज्ञान-माहिती; जमीन पाहून त्या ठिकाणीं कोणत्या पदार्थाची खाण लागेल हें समजण्याची विद्या.
आकर
पु. खाण; ठेवा; साठा; संग्रह; आगर. उदा. कुसुमाकर : ‘ऋतूंमाजीं कुसुमाकरु । वसंतु तो मी ॥’ − ज्ञा १०·२८३. [सं.]
संबंधित शब्द
आगर
आगर āgara m n (आकर S) A plantation (of Cocoanut, Betelnut, or other fruit-trees). 2 (Or मिठागर) A tract on the sea-shore on which salterns are established. 3 An enclosure around a house sown or planted. 4 fig. A place or spot gen. of abundance or particular prevalence: as विद्येचा आ0 The seat of science (Benares); गाण्याचा आ0 The land of song (Hindustán); हा केवळ शास्त्राचा आ0 आहे He is a very mine of sacred science.
आगर
पु. न. १. नारळ, सुपारी इ. झाडांची बाग, मळा, शेत : ‘बोल्हावतु कां मानसें । आगरांतळीं ।’ − अमृ ६·३५. (सामान्यतः) शेत; मळा : ‘आगर बागा नाहीं मिती ।’ − वेसीस्व ३·५४. २. घराभोवतीच्या आवारात भाजीपाला लावण्याची जागा; परसू : ‘झोपडीच्या बाहेर गवतावर केळीच्या झाडाखाली, आगरांत न्याहारी करीन.’ − पाव्ह १७. ३. समुद्र किनाऱ्यावर किंवा खाडीजवळ मीठ तयार करण्याची जागा; मिठागर. ४. काही विशेष गुणांचे किंवा प्रचुरतेचे स्थान; साठा; संग्रह; खजिना. ५. संग्रहस्थान; जसे − विद्येचे आगर; गाण्याचा आगर : ‘पाहेन श्रीमुखें साजिरें सुंदर । सकळ आगर लावण्याचें ।’ − तुगा २०२०. ६. उत्पत्तिस्थान; वसतिस्थान; घर; निवास; खाण : ‘जो सकळ धर्मासि आगरु ।’ − ज्ञा २·३७४. ७. शेत : ‘निवृत्ति आगर, कृष्ण हा सागर’ − निगा १२९. [सं. आकर]
आकार
आकार ākāra m (S) Form, figure, shape. 2 Appearance, aspect, form, similitude. 3 An image impressed upon the mind, an impression: also an idea. 4 Definiteness or determinateness of form or appearance (as of a work approaching to completion; of a transaction, event, or other object of consideration or conjecture). 5 A roughly framed statement or estimate (of expenses, profits, produce, revenue); the Jamábandí settlement. 6 Sign, semblance, indication, appearance. Ex. ह्या व्यवहारांत शंभर रूपये मिळतील असा आ0 दिसतो. 7 An affection of the body considered as indicative of mental sentiment or emotion; as trembling, smiling, horripilation &c. are of dread, gratification, fright &c. 8 This word is much and neatly used in comp. as मंडलाकार, चक्राकार, गोलाकार, चंद्राकार, वर्तुलाकार, शूर्पाकार, गृहाकार, वृक्षाकार, अंडाकार, पुस्तकाकार, Annular, circular, globular, moon-form, like a house, tree &c. 9 (In modern geometrical works.) Figure. 10 Manner, way, style, fashion. Ex. मी परब्रह्म येणें आकारें ॥ जेथें जीव स्वरूप स्फुरे ॥ When the जीव calls to mind its true being as शिवात्मा, and disallows its distinctness as जीवात्मा, then it exclaims after this fashion. आ0 दाखविणें To make the show or pretence of. 2 To present the form, figure, or appearance of. आकारास येणें To be assuming some definite shape or likeness--a work &c. in progress, a sickness, a transaction or an event. 2 To fall or be reduced into some moderate form or amount; to abate.
अकरा
अकरा akarā a ind (एकादश S H) Eleven.
अकरा akarā a ind (एकादश S H) Eleven.
आक्रस्ताळेपणा
पु. हटवादीपणा; त्रागा. 'यावरून हा आक्रस्ताळेपणा पैशाकरितां होता ' -साम ६७. [अक्र- स्ताळा, अकताळा पहा.]
अकुतोभय
वि. अपभ्रष्टरूप अक्र (कृ) तोभय. १ जो कशा- सहि भीत नाहीं, ज्यास कोणतीहि भीति नाहीं असा (पुरुष, वस्तु). २ निर्भय; धीट; संकटें सहन करण्यास समर्थ; बेडर; मजबूत (इमा- रतीसंबंधीं). 'मातीची भिंत घालितां त्यापेक्षां चिऱ्यांची घातली म्हणजे अक्रतोभय होईल.' [सं. अ + कृतः + भयं]
आखर
पु. १. आकर; दबाव; वजन; शह; समार्थ्याची जाणीव : ‘आखर पडल्यावर सर्वही प्रांत स्वामीचा आज्ञांकित आहे.’ – पेद २४·११४.
आखर, आंखर
पु. आकर; दबाव; वजन; शह; सामर्थ्याची जाणीव. 'जरी येखादे स्थलीं या प्रांते स्वामीचा आंखर पडेल तरी बहुत कार्याची गोष्ट आहे ' -पेद २४. ११४. 'आख़र पडल्यावर सर्वही प्रांत स्वामीचा आज्ञांकित आहे ' -पेद २४.११४. [सं. आ + कृ]
बिजाकार
पु. ताणा; बिजवट; खाण; उत्पत्तिस्थान; उगम. [सं. बीज + आकर]
भोग
पु. १ उपभोग; सुखदुःखाचा अनुभव. (क्रि॰ येणें; करणें). यां सकळांतें वधावें । मग जे भोग भोगावे ।' -ज्ञा १.२११. २ उपभोगिलेलें सुख किंवा दुःख; विषय. ३ उपयोग; वापर; ताबा असणें. (क्रि॰ करणें; घेणें). 'तुम्ही या शाल- जोडीचा आजपर्यंत भोग घेतलात.' ४ उपभोगण्याचा, अनुभविण्याचा कोणताहि विषय. 'झालों कर्मधर्मविरहित । मना आवडे तो भोग भोगीत ।' ५ दैवगतीनें भोगावें लागणारें सुखदुःख. (क्रि॰ येणें; उठणें; उभा राहणें; उचलणें). 'भोग असेल तितका भोगून सारला पाहिजे.' ६ (काळ, प्रदेश इ॰चें) आक्रमण; ओलांडा. 'सूर्य प्रायः तीस दिवसांत एक राशीचा भोग करतो.' ७ आक्र- मण केलेली स्थिति. यावरून ८ आकांशातील रेखांश. ९ तार्याचें शरवृत्त आणि उत्तरायणपातांतील शरवृत्त ह्या पातळ्यांमध्यें जो कोन होतो त्याला त्या तार्याचा भोग म्हणतात. -सूर्य १८. १० कष्ट; त्रास. 'जरी मित्र आहे हरी तूमचा हो । तरी भोग कां न सुटे आमुचा हो ।' -कचेसुच ३. ११ सुखदुःखादि अनुभवाचें फळ; प्रारब्ध; दैव; नशीब. 'भजन घाली भोगावरी । अकर्तव्य मनीं धरीं ।' -तुगा २९०४. १२ नैवेद्य. 'तो भोग पारतंत्र्याचा ।' -संग्रामगीतें १२. १३ मैथुनसुख. १४ शिजत असतांना भाड्याच्या वर आलेला भात. १५ नागाची फणा. [सं.] म्ह॰ भोग फिटे आणि वैद्य भेटे. (वाप्र.) ॰येणें-दैवगतीनें सुखदुःखादि नशिबी येणें. 'आलिया भोगासी असावें सादर ।' ॰चढविणें- लावणें-देवास नैवेद्य दाखविणें. भोगास येणें-(कोणतीहि गोष्ट) अनुभवण्याचा प्रसंग नशीबीं येणें. सामाशब्द- ॰चतुष्टय-न. चार प्रकारचे भोग; स्थूलभोग, प्रविविक्त भोग, आनंदभोग आणि निरानंद- भोग यांचा समुच्चय. ॰पति-पु. (कायदा) एखादा पदार्थ ज्याच्या ताब्यांत आहे असा मनुष्य; वस्तूचा मालक. [सं.] ॰भरणि-णी-स्त्री. भोग भोगणें; दुःख सोसणें. 'अकळ प्रारब्ध भोगभरणि ।' -ज्ञानप्रदीप २४७. ॰भूमि-स्त्री. स्वर्ग; इंद्रलोक. [सं.] ॰भोगवटा-पु पदार्थाचा उपभोग; ताबा; वापर इ॰. 'माझा बाप ह्या वतनाचा भोगभोगवटा घेऊन देशांतरीं गेला.' ॰मूर्ति-स्त्री. १ उत्सवांत मिरवायची मूर्ति; दिखाऊ शरीर. 'हे ही पांडुहि विदुरहि या यांच्या भोगमूर्ति, हे शिव रे!' -मोउद्योग ११.६१. २ (ल.) कांही एक न करतां लोकांच्या श्रमाचें फळ उपभोगणारा इसम; मालक; धनी. ३ एखाद्या संस्थेंत प्रत्यक्ष काम करणारा मालक. [सं.] ॰लाभ-पु. एखाद्यानें आपल्याकडे ठेव म्हणून ठेवलेल्या वस्तूपासून झालेला फायदा. [सं.] ॰वटा-पु. उपभोग; वापर; वहिवाट; कबजा; ताबा. ॰वटदारपु. (गो.) जमिनीचा उपभोग घेणारा; धनी; वहिवाटदार. ॰विडा-पु. नऊ पानें, नऊ सुपार्या इ॰ घालून नऊ विडे करून ब्राह्मणांस किंवा सुवासिनीस मकरसंक्रांतीच्या दिवशीं स्त्रिया देतात त्यापैकीं प्रत्येक. ॰विलास- पु. सुखोपभोग; चैनबाजी. [सं.] ॰क्षम-न. शरीर. 'आणि तयाचि स्थिति तमीं । जे वाढोनि निमती भोगक्षमीं ।' -ज्ञा १४.२७४. -वि. भोगांना योग्य; भोगण्यास योग्य. 'निगे सांडूनि कोपट । भोगक्षम हें ।' -ज्ञा १४.२१८. [सं.] ॰क्षीण-वि. ज्यांचे प्रारब्ध संपलें आहे असें. 'पाठीं भोगक्षीण आपैसें । देह गेलिया ते न दिसे ।' -ज्ञा १५.३७५.' भोगायतन-न. अंतःपुर. 'देवाचिया भोगा यतनीं । खेळतां आशंकेना मनीं ।' -ज्ञा ११.५५२. [सं. भोग + आयतन] भोगावळ-न. (गो.) पिशाच्यांना दाखवावयाचा वार्षिक नैवेद्य, देणें. [भोग + आवली] भोगी-पु. साप. 'भोगी तुम्ही उपजलां जरि नागलोकीं ।' -र ४१ -वि. १ भोक्ता; हौशी; विलासी; रंगेल. २ भोगणारा; सुखदुःखादि अनुभविणारा, सहन करणारा. भोगी-स्त्री. १ मकरसंक्रांतीच्या पूर्वींचा दिवस. २ नरक- चतुर्दशीच्या पूर्वींचा दिवस. भोगीचा विडा-पु. (बायकी) भोगविडा पहा. भोगीभूषण-पु. शंकर; शिव. -हंको. भोगी (गि)या-वि. भोग घेणारा. 'स्वामी तुकयाचा भोगिया चतुर ।' -तुगा १३४. ॰राव, भोगीं(गें)द्र-पु. शेष. 'टाकोनि कपट कुटिल भाव । स्वामीसी हांसे भोगिराव ।' -ह ३.१८. भोगोत्र, भोगोत्तर-न. व्यक्तिशः उपभोगासाठीं विशेषतः ब्राह्मणास दिलेलें इनाम (जमीन इ॰). [सं. भोग + उत्तर] भोग्य- न. उपभोग; वहिवाट; वापर; ताबा; कबजा (क्रि॰ करणें). -वि. १ भोगण्यास किंवा सोसण्यास योग्य, जरूर, शक्य; अनु- भवनीय. २ उपयोगी; उपभोगण्यासारखें; वापरण्याजोगें. 'कांहीं भोग्य वस्तू गहाण ठेवशील तर व्याज हलकें पडेल.' ३ ग्रहादि- कांनीं आक्रमावयाचा राहिलेला (मार्ग). [सं] भोग्या-पु. १ आंधळी कोशिंबीर; इरगीमिरगी इ॰ खेळांमध्यें सर्वांनीं येऊन ज्यास शिवावयाचें असतें असा मनुष्य, दगड, खांब इ॰. लपंडाव, डोळेझांकणी इ॰ खेळांत दुसर्याचे डोळे झांकणारा. २ वेश्येचा उप- भोग घेणारा. 'जसा भोग्या मिळेल तशी रात्र कंठावी.' [भोग] ॰शिवणें-एखाद्याकडून कांहीं प्राप्त करून घ्यावयाचें असतां तें प्राप्त होत नाहीं असें समजलें असतांहि त्यास वारंवार भेटणें, प्रयत्न करणें. ॰भोंवर-पु. निर्लज्जपणें वेश्येच्या नादीं लागलेला पुरुष. म्ह॰ भोग्या भोंवर, लाट्या ओंबर. भोगणें-सक्रि. १ उपभोगणें (सुखदुःख); सोसणें; अनुभविणें; सहन करणें. २ उपयोग करणें; ताबा असणें; वापरणें. ३ उपभोगलें जाणें; मिळलें जाणें. 'त्या कुळाकडून पंचवीस रुपये व्याज आम्हास भोगलें.' -अक्रि. (ना.) संपणें; पूर्ण होणें. 'आज ३० तारीख आहे. आज तुझा महिना भोगला.'
कमलाकर
न. कमळांचें तळें; सरोवर. 'कमलाकर मधु- पांतें जेविं प्रेषूनि वायुसह वास ।' -मोसभा १.९. [सं. कमल + आकर]
कुला(ळा)गर
न. (गो.) पोफळीची बाग. [सं. कुल + आकर]
कुलागर, कुळागर
न. पोफळीची बाग. (गो.) [सं. कुल + आकर]
कुळारग
पु. १ खेड्यांतील जमीनदार, वतनदार (समु- च्चयानें); शेतसारा देणारीं कुळें; वतनदार कुळांचा वर्ग, समुदाय २ (गो.) देणेदारांची यादी, जंत्री. -स्त्री. १ कुळांपासून येणें असेलली रक्कम. 'आमची दहा रुपये कुळारग बुडाली.' २ कुळांना आगाऊ दिलेला पैसा. ३ त्यांना आगाऊ पैसे देणें, पैसे वसूल करणें इ॰ व्यवहार, प्रकार. 'आम्ही दहा हजार रुपयांची कुळारग केली.' कुळारगी असेंहि रूप आढळतें. ४ (क.) कुळाकडे विशिष्ट हक्कानें असलेली कायमची जमीन. 'कुळारग व खासगी मिळून पांच बिघे जमीन आहे.' कुळारग वार-वर्ग पहा. -वि. (राजा.) सरकारच्या अधिकाराखालीं शेतकर्यांनीं, कुळांनी वसविलेला (गांव); याच्या उलट खोतीचा (गांव); कुळाकडे असलेली (जमीन) खोतीची नव्हे अशी. [कूळ + आकर-? आगर- आरग] ॰गांव-न. कुळारगीगांव, ज्यांतील सर्व जमिनी कौल- दारांनीं धारण केल्या आहेत व ज्यांची वहिवाट गांवकर्यांच्या संमतीनें गांवकामगार पाहतात तो गांव. ॰पट्टी-स्त्री. कुळवार पट्टी. ॰वार-वर्ग-क्रिवि. प्रत्येक कुळामागें; दर कुळागणीक (खेड्यांतील शेतकर्यांच्या). (याद करणें, वसूल करणें-घेणें, पट्टी, वांधा, हिशेब, बाकी, शेतें इ॰ शीं योजला जाणारा शब्द).
नमक मिर्च मिलाना या लगाना
हिंदी अर्थ : किसी बात को बहुत बढ़ा चढ़ाकर क़ना मराठी अर्थ : तिखट मीठ लावून सांगणें.
तिरपणें, तिरपावणें
अक्र, वांकडें होणें; लचकणें; ताठणें (अवयव); अवघडणें; ताठरणें; (मान.) मुचकणें. [तिरपा]
रत्न
न. १ हिरा, माणिक, पाच इ॰ मूल्यवान खनिज पदार्थ; (हिरा, पाचु, माणिक, पुष्कराज, नीळ, गोमेद, लसण्या, प्रवाळ इ॰). २ (ल) कोणेक जातींतील, समुदायांतील किंवा वर्गांतील रत्नाप्रमाणें उत्कृष्ट व्यक्ति. उदा॰ पुत्ररत्न, कन्यारत्न, अश्वरत्न, 'सखाराम बापू म्हणजे एक रत्न आहेत.' -इंप ७१. ३ (ल.) शोभा देणारा, सौंदर्य वाढविणार, संसार, सभा इ॰स ज्याच्या योगानें शोभा येते असा पदार्थ. 'संसारांत मूल हें रत्न आहे.' ४ समुद्रमंथनापासून उत्पन्न झालेले चंद्र, अमृत, लक्ष्मी इ॰ चतुर्दश पदार्थ. ५ (उप.) मूर्ख मनुष्य. 'इंदूर प्रजेचें. दुर्दैव म्हणून हें रत्न या गादीला लाभलें.' -विक्षिप्त १.१७. ॰खचित-जडित-वि. हिरे, माणकें इ॰ रत्नें बसविलेलें; जडा- वाचें; रत्नें बसविलेला (सोन्याचा दागिना, सिंहासन इ॰). [सं.] ॰गुंज-एक झाड. यास लांब शेंगा येतात. एकएका शेंगेंत ८।१० गुंजा असतात. मुंबईकडे सोनें, रुपें तोलावयास यांचा उपयोग होतो; वाल. ॰त्रय-त्रितय-न. जैन धर्मांतील सम्यक् दृष्टि, सम्यक्ज्ञान व सम्यक् चारित्र्य हीं तीन असोलिक तत्त्वें. [सं.] ॰दीप-पु. दिव्यासारखा लखलखीत प्रकाश देणारें रत्न; स्वयंप्रकाशी रत्न; अशा प्रकारचीं रत्नें पाताळांत असल्या- बद्दलच्या कथा आहेत. ॰पारखी-वि. रत्नाची परीक्षा करणारा; ज्यास रत्नांची पारख आहे असा. ॰वाटी-स्त्री. हिरे इ॰ रत्नें बसविलेलें बशीच्या आकाराचें भांडें. [सं.] ॰सानु-पु. मेरु पर्वत. [सं.] रत्नाकर-पु. १ रत्नांची खाण. २ (ल.) समुद्र (तळाशीं रत्नें असतात म्हणून). ३ रामेश्वरापासून अलीकडील पश्चिमेच्या आंगचा जो समुद्र तो. [रत्न + आकर] रत्नाकर- आळविणें-पु. (समुद्र शांत करणें). काम न करतां (रडत, बोंबलत) परत येणें; अपयश घेऊन येणें. 'हा रडतोंड्या खरा. जेथें कामास पाठवावा तेथून रत्नाकर आळवीत येतो.' [सं.] रत्नाचल-पु. मेरु पर्वत. -ज्ञा १८.३५. [रत्न + अचल] रत्ना- भरण-न. जडावाचें भूषण. [सं. रत्न + आभरण]