मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

आकांत      

पु.       १. रडून केलेला गोंधळ : ‘ही मुले आकांत करतील.’ − देशमुखवाडी १८. २. तीव्र किंवा असह्य उपद्रव : ‘घरोघरीं आकांत परोपरी…’ − वाग्वै ११८. [सं. आ+क्रन्द]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आका, आकांत, आकांतणें, आकाबाई

आका, आकांत, आकांतणें, आकाबाई. See under अ.

वझे शब्दकोश

आका, आकांत, आकांतणें, आकाबाई ākā, ākānta, ākāntaṇē, ṃākābāī See under अ.

मोल्सवर्थ शब्दकोश

अकांत

अकांत akānta m (आक्रंदन S) Immoderate bellowing or wailing. v हो, वर्ष. 2 A superlatively grievous misfortune or privation. See अनर्थ in all the examples under Sig. II.

मोल्सवर्थ शब्दकोश

अकांत m Immoderate wailing.

वझे शब्दकोश

पु. प्र.आक्रांत. १ कोलाहल; आरडाओरड; आक्रोश; अतिशय शोक. २ मोठा अनर्थ. [सं. आक्रंदन]. ॰णें-होणें-करणें-मांडणें- मोठयानें शोक करणें. 'अकांतले पृथ्वीचे जन.' ॰वर्षणें-अनर्थ ओढवणें.

दाते शब्दकोश

अकांत लोकांत

अकांत लोकांत akānta lōkānta m Loud and open crying; bawling before the public. v कर, मांड.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. १ मोठयामोठयानें लोकांसमोर आक्रोश. ॰करणें-मांडणें. २ (गो.) घाबरणें.

दाते शब्दकोश

अकांत मांडणें-करणें

अकांत मांडणें-करणें v i Loudly bewail or bawl out before the public.

वझे शब्दकोश

अकांत लोकांत      

पु.       १. लोकांसमोर गळे काढून रडणे; सर्वांसमोर आक्रोश मांडणे. २. घाबरणे. (गो.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

आक्रांत

पु. मोठ्यानें रडणें; हंबरडा फोडणें; विलाप करणें; आकांत [सं. आक्रंदन किंवा म. आकांत अप.]

दाते शब्दकोश

विलाप

पु. शोक; दुःख; आरडाओरड; रडारड; आकांत. [सं. वि + लाप] विलापणें-अक्रि. मोठ्यानें शोक करणें; आकांत करणें; रडणें; आक्रंदणें. विलापी-वि. रडणारा; शोक करणारा.

दाते शब्दकोश

अहाःकार

पु. १ हाहाःकार; अहा, हाय असा शोक करणें; मोठयानें रडणें. २ आक्रंदन; आक्रोश; आकांत. [सं.अहह + कृ]

दाते शब्दकोश

अहाकार      

पु.       १. हाहाकार; अहा, हाय असा शोक करणे; मोठ्याने रडणे. २. आक्रंदन; आक्रोश; आकांत. [सं. अहह+कृ]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अकांतणें

अकांतणें akāntaṇēṃ v i (Poetry. अकांत) To bellow or cry immoderately. Ex. अकांतले पृथ्वीचे जन ॥

मोल्सवर्थ शब्दकोश

आक्रांत      

पु.       मोठ्याने रडणे; हंबरडा फोडणे; विलाप करणे; आकांत. [सं. आक्रंदन]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आक्रंदणे      

अक्रि.       मोठ्याने ओरडणे; रडणे; टाहो फोडणे; आकांत करणे : ‘बहुत जाचलों संसारें । मोहमाया जाळाच्या विखारें । त्रिगुण येताती लहरें । तेणें दुःखें थोर आक्रंदलों ।’ − तुगा ७०४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आक्रंदणें

अक्रि. मोठ्यानें ओरडणें; रडणें; टाहो फोडणें; विलाप करणें; आकांत करणें. ‘बहुत जाचलों संसारें । मोहमाया- जाळाच्या विखारें । त्रिगुण येताती लहरें । तेणें दुःखें थोर आक्रं- दलों ।’ –तुगा ७०४. ‘मच्छ तळमळती जळाविण । कीं माते- वांचूनि आक्रंदे तान्हें ।’ [आ + क्रंद्]

दाते शब्दकोश

आक्रोश

(सं) पु० कल्होळ, गोंधळ, आकांत.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

पु. १ मोठ्यानें रडणें; हंबरडा फोडणें; विलाप करणें; आक्रंदन; आकांत; कल्लोळ; चरफड. ‘वोळख तूं निरुतें । आक्रोशेंवीण जेथें । क्षमा असे ।।’ -ज्ञा १३.३३९. २ निंदा; ओरड; बडबड. ३ आवेश; अट्टाहास. ‘तेवींचि आक्रोशबळें । व्यापारें कोणे एके वेळें । निगालें तरी आंधळें । रोषे जैसें ।।’ –ज्ञा. १४.१८९. [सं. आ + क्रुश्]

दाते शब्दकोश

आंकात

अकांत पहा. ‘आमचा देव बहु सत्य । आम्हां आकांतीं पावत ।’-दा ६.६.४२.

दाते शब्दकोश

भेकणें

अक्रि. (रडणें या शब्दाबरोबर प्रयोग उदा॰ रडणें भेकणें) रडणें; रडून आकांत करणें. भेंकाड पहा. [ध्व.]

दाते शब्दकोश

धाय, धायमाय

स्त्री. १ रडण्याची मोठी आरोळी, टाहो; आकांत; ओक्साबोक्सीं रडारड; हंबरडा. (क्रि॰ मोकलणें; फोडणें; घेणें; घालणें). 'अनुर्धाचीया माया रषुमावंतीया । मोकलीली धाया । रात्रीमाजी काइ जालासी । सादु दे कां रे पुत्रराया ।' -उषा ७२७.'दुःशासन मोकली धाय । म्हणे गेले हातपाय ।' -मुआदि ४४.७.'बायकोसाठीं मीं धाय घेऊन बसलों आहे.' -कोरकि ११८. २ धापा. 'गंधर्व हस्तींचे कुर्‍हाडे । कर्णा अंगीं भेदले गाढे । रथ टाकूनिया एकीकडे । धाय टाकीत राहिला ।।' -मुवन १२.९७. ३ हृदय; अंतःकरण. 'कवणातें मी मोकलूं धाय ?।' -मुवन ७.१२७. ४ धीर; धैर्य. 'मग धाय टाकुनी रडे माये ।।' -ब ५५३. [सं. हृदय = (द + ह = ध) = धाय-भाअ १८३३.] ॰धाय रडणें, धायीधायी रडणें-ढळढळां, आक्रोश करून रडणें. 'रडवील कोण रणरंगीं । यवनांना धायी धायी । यापुढें ।।' -विक १०. ॰कंप-पु. संकल्पविकल्प; धरसोड. -मनको [धाय = हिय्या, धीर, निश्चय + कंप = कापणें, धरसोड करणें]

दाते शब्दकोश

धाय, धायमाय, धायमाव      

स्त्री.       १. रडण्याची मोठी आरोळी, टाहो; आकांत; ओक्साबोक्शी रडारड; हंबरडा. (क्रि. मोकलणे, फोडणे, घेणे, घालणे.) २. (ल.) हृदय : ‘कवणातें मी मोकलूं धाय।’ - मुवन ७·१२७. ३. धापा : ‘रथ टाकुनिया एकीकडे। धाय टाकीत राहिला।’- मुवन १२·९७. ४. धैर्य; धीर : ‘मग धाय टाकुनी रडे माये।’ - ब ५५३. [सं. हृदय]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धबधब, धबाधब, धबधबा      

क्रिवि.       १. उंचावरून पडणाऱ्या पाण्याच्या झोताचे किंवा नारळादी फळांच्या झाडावरून खाली पडण्याच्या आवाजाचे अनुकरण करून. २. धबधब अशा आवाजाचे अनुकरण करून. ३. जोराने; मोठ्याने : ‘धबधबा वक्षःस्थळ बडवित । थोर आकांत जाहला ।’ – ह ५·१२३. ४. पहा : धमधमा [ध्व.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धबधब-धबा

क्रिवि. १ उंचावरून पडणार्‍या पाण्याच्या झोताचें किंवा नारळादि फळांच्या झाडावरून खालीं पडण्याच्या आवाजानें अनुकरण. 'धबधब धबधब वाजे तंबुरा रे ।' -दावि ४३१. २ धबधब अशा आवाजानें अनुकरण. ३ जोरानें; मोठ्यानें. 'यशोदा चहुंकडे धांवत । आळोआळीं कृष्ण पाहत । धबधबा वक्षःस्थळ बडवित । थोर आकांत जाहला ।' -ह ५.१२३. ४ धमधमा पहा. [ध्व.]

दाते शब्दकोश

घोर

पु. १ वीणा इ॰ वाद्यांतील खर्ज स्वराची तार. (वाद्यांतील) खर्ज स्वर. २ झोपेंतलें घोरणें; मृत्युसमयीं होणारा घशांतील घरघर असा आवाज. 'हा वेदार्थसागरु । जया निद्रि- ताचा घोरु । तो स्वयें सर्वेंश्वरु । प्रत्यक्ष अनुवादला ।' -ज्ञा १. ७२. 'आपण गाढ झाले निद्रिस्त । चलनवलन सांडूनि स्थित । कंठीं घोर वाजवी ।' -नव १३.१६२. ३ काळजी; धासरा; मानसिक अस्वस्थता; खुणखूण; चिंता. (क्रि॰ करणें; लागणें). 'त्याचा नित्याचा घोर नाहींसा होऊन त्याची स्वभाववृत्ति प्रबळ झाली.' -नि ७०३. 'निरउपाय झाली गोष्ट कंबर बसली घोरानें ।' -ऐपो ४१२. ४ अन्य स्थळीं गेलेल्या माणसा- बद्दल घेतलेली खंत; घोकणी. (क्रि॰ घेणें; कर्माची षष्टी). 'पोरानें आईचा घोर घेतला.' ५ आक्रोश; आकांत; रडारड; कोलाहल. 'तो मरतांच पोराबाळांनीं एकच घोर केला.' ६ आरडाओरड; गलबला; गिल्ला; गलका; गोंगाट; कल्ला. 'हा काय मजुरदारांचा घोर पडला' ७ हल्ला. 'केला मखीं घोर निशाच- रांनीं ।' -आविश्वा २०. 'तेनी धरला सवता घोर' -ऐपो ३५२. ८ मरण्याच्या वेळची घरघर. ९ संकट. 'घोर हा नको । फार कष्टलों ।' 'मानअपमानाचे पडिले । भ्रांतीचे घोरीं ।' -दावि २६०. -वि. अघोर. १ भयंकर; भयप्रद; भयानक; विक्राळ (मुद्रा, आवाज, काम, घडणार्‍या गोष्टी) 'म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर ।' 'नव्हे सार संसार हा घोर आहे ।' -राम ६६. २ गाढ; घनघोर (निद्रा); 'त्यास घोर निद्रा लागली.' ३ निबिड; दाट; घनदाट; गाढ; भयाण (अंधार, अरण्य इ॰). 'मी राजाच्या सदनीं अथवा घोर रानीं शिरेन ।' -खरे, जन्मभूमि. ४ घनघोर; तुंबळ; हातघाईचें; निकराचें (युद्ध लढाई, इ॰). 'कलह उत्पादी अति- घोर ।' -एभा १.२०४. ५ अचाट; अवाढव्य; जगडव्याळ (इमारत). ६ अफाट (भरलेली नदी) [सं. घोर] घोरंदर, घोरांदर-वि. (काव्य.) भयंकर; घोर शब्दांतील विशेषणाचे सर्व अर्थ पहा. 'झोटी धरूनि पाडिती अपार । घोरांदर मांडिलें ।' -एरुस्व ८.४४. 'युद्ध मांडिलें घोरंदर ।' -मुआदि १३.३२. 'युद्ध जाहलें घोरांदर । सकळ राजे पराभविले ।।' -ह २६.५७. [सं. घोरतर] घोरवेळ-स्त्री. (ज्यो.) १ अशुभ, अनिष्ट, भयसूचक वेळ. २ (अनिष्टतेच्या ध्वनितार्थावरून) करकरीत तिन्ही सांजा, टळ- टळीत मध्यान्ह. घोरासुराचें आख्यान-न. (उप.) डाराडूर झोपं; घोर झोपं. 'घालून ठेवलेलें अंथरूण पायानंच उलगडून ही अश्शी घोरासुराच्या अख्यानाला सुरवात.' -फाटक नाट्यछटा २.

दाते शब्दकोश

कल्पांत

१ कल्पाचा शेवट; जगांचा अंत ज्यावेळीं होतो त्यास कल्पांत, प्रलय असें म्हणतात-तोहि एक कल्पपर्यंत राहतो. ब्रह्मदेवाच्या अहोरात्राचा शेवट. 'कुपितें कर्णें केली कल्पांतीं जेंवि घाबरी सृष्टि ।' -मोकर्ण ४७.१२. २ भयंकर संकट; अनर्थ या शब्दाचे अर्थ १, २ पहा. ३ (ल.) परमावधीचें दुःख; आकांत; कल्लोळ (भूक, तहान, ऊन, रोग, दुःख, विरह इ॰चा). [कल्प + अंत] ॰काळ-पु. १विश्वाचा अंतकाळ' प्रलयकाळ. २ (ल.) अति- शय, भंयकर, क्रूर माणूस, भूत, राक्षस.

दाते शब्दकोश

कल्पांत      

पु.       १. कल्पाचा शेवट. जगाचा अंत ज्या वेळी होतो त्याला कल्पांत प्रलय असे म्हणतात. तोही एक कल्पापर्यंत राहतो. ब्रह्मदेवाच्या अहोरात्राचा शेवट : ‘कुपितें कर्णें केली कल्पांतीं जेंवि घाबरी सृष्टि ।’ - मोकर्ण ४७·१२. २. भयंकर संकट, पहा : अनर्थ १, २. ३. (ल.) परमावधीचे दुःख; आकांत; कल्लोळ (भूक, तहान, ऊन, रोग, दुःख, विरह इत्यादीचा). [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

लय

लय laya a & ad (Vulgar. From लय S in the sense of Extinction or destruction, as a state suited to represent or image forth the conception of a wonderstruck and overwhelmed mind on beholding a magnitude, an extent, or a number utterly overbearing attempt at determination or computation or reasonable conjecture. लय is thus rather an interjection or an ejaculation of laboring emotion agreeing with Prodigious! monstrous! amazing! and, in Maráṭhí, akin to प्रलय, अनर्थ, आकांत, जुलूम &c. The word is dear to the कुणबीमाळी class, and is in incessant use.) Very many or very much; exceedingly numerous or abundant: also, as prefixed to an adjective, exceedingly or very; as लयमोठा, लयउंच, लयलांब.

मोल्सवर्थ शब्दकोश

मात

मात māta f ( P) A term at chess. Checkmate. 2 (Poetry.) An exploit, achievement, feat; a prodigy of valor; a deed of wonder. Ex. ऐक बाई सांगते मात त्याची ॥. 3 (Poetry.) An affair; a business or matter; an event or occurrence. Ex. कटकीची मात सांग जासुदा घरांत ॥; also नगरीं फुटली मात ॥ वनासिं जाता रघुवीर ॥ वर्षला येकचि आकांत ॥. v उठ, उड, & उठव, उडव. 4 In lax and familiar phraseology. Eclat, splendor, gloriousness, glare and glitter; a brilliant and dazzling display or execution. Ex. गाण्याची मात, जेवण्याची मात, प्र- योजनाची मात, लग्नाची मात. 5 Exuberance, copiousness, cheapness; astonishing facility of obtaining. Ex. घान्याची मात, साखरीची मात, जिनसाची मात

मोल्सवर्थ शब्दकोश

राडा

पु. १ पसारा; कामाचा रगडा; कचका. [क्रि॰ घालणें; पडणें). २ भानगड. 'या उपर गुता राडा फार करून राहिला नाहीं.' -पेद १.४३. ३ खोल चिखल, रेबड. ४ आकांत; रडारड (मृत्युसमयीं होणारी मनुष्यसमुदायाची)

दाते शब्दकोश

शोक

पु. १ दुःख; पीडा; खेद. २ आक्रोश; आकांत; रडारड; विलाप. (समासांत) शोकातुल; शोकाकुलित; शोका- तुर; शोकान्वित; शोकार्त्त; शोकाविष्ट; शोकाक्रांत; शोकग्रस्त; शोकनिवृत्ति; शोकभंग. [सं. शुच्]

दाते शब्दकोश

उल्बण      

न.       १. त्रिदोषांचा प्रकोप. २. आपत्ती; मोठे संकट, दुःख; आकांत. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उल्बण, उल्बाण

न. १ वातपित्तादिकांचा अतिशय क्षोभ. २ (ल.) भयंकर संकट; आपत्ति; अनर्थ (दुष्काळ, रोग, लुटालूट, परचक्र वगैरे). 'काळक्षोभाचिये दृष्टी, शतवर्षें अनावृष्टी । तेणें अत्युल्बणें आटे सृष्टी । पृथ्वीच्या पोटीं कांहीं नुरे ।' -एभा ३. १५८. ३ सार्वत्रिक पीडा; त्रास; दुःख; आकांत. [सं. उल्बण]

दाते शब्दकोश

उमास, उमासा      

पु. १. श्वास; उच्छ्‌वास; सुस्कारा; उसासा. (क्रि. टाकणे) : ‘अपिरिमित तियेला येति तेणे उमासे ।’ –सारुह ३·६३. २. विश्रांती; उसंत; दम; विसावा : ‘सैन्य पळाले दशदिशा । म्हणती त्राहें त्राहें जगदिशा । भीमें आकांत मांडिला कैसा । पळतां उमासा घेऊ नेदी ॥’ –जै १३·६३. ३. घेरी; बेशुद्धी : ‘उमासा येऊनि पडिला वनीं । परी दृष्टीसि कोठे न दिसे पाणी ॥’ –महिपती कथासारामृत २४·१९०. [सं. उद्+मिष्] (वा.) उमजखाणे, उमाज खाणे – विश्रांती घेणे; दम टाकणे. उमाह      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उमास-सा

१ श्वास; उच्छवास; उसासा. (क्रि. टाकणें). 'अपरिमित तियेला येति तेणें उमासे.' -सारुह ३.६३. 'मला उमासा टाकायला फावत नाहीं.' २ विश्रांति; उसंत; विसावा. 'सैन्य पळालें दशदिशा । म्हणती त्राहें त्राहें जगदिशा भीमें आकांत मांडिला कैसा । पळतां उमासा घेऊं नेदी ।।' -जै १३.६३. ३ घेरी; बेशुद्धि. 'उमासा येऊनि पडिला वनीं । परी दृष्टीसि कोठें न दिसे पाणी ।।' -महिपतिकथासारामृत २४.१९०. [सं. उद् + मिष्. प्रा. उम्मिस] उमस, उमास खाणें-विश्रांति घेणें; दम टाकणें.

दाते शब्दकोश

वाखा

पु. १ दुःख; पीडा; उपद्रव; नाश; संकट. 'पद प्रणामी बहु होति वाखे ।' -सारुह ५.२५. २ महामारी, पटकी वगैरेची साथ. 'आकांत वाखा प्रळये ।' -दा ३.७.८२.३ अकाली गर्भपात. ४ संहार; मारामारी; युद्ध. 'बेलोलखानाचा थोर वाखा केला.' -सभासद ४९. [अर. वाकिआ]

दाते शब्दकोश

वक्ष

वक्ष vakṣa n S वक्षस्थल n S The breast or chest (of female or of male). Ex. करूनिया हाहाकार ॥ वक्षस्थळ बडवी नृपवर ॥; also तोंड वक्षस्थळ पिटीत ॥ आकांत करी अद्भुत ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

वर्तणूक

स्त्री. १ वर्तन; वागणूक; राहाणी. २ जीवन; आयुष्यक्रम; दिवस कंठणें. 'तो काय दुष्ट राजा हो ! त्याचे हांता- खालीं प्रजांची वर्तणूक होणें कठीण दिसतें.' [वर्तणें] ॰जामिनी- स्त्री. पंचायतीच्या निकालाप्रमाणें वागतील अशी वादांतील पक्षाच्या स्नेहीमंडळीनें दिलेली हमी, जामिनकी. वर्तणें-अक्रि. १ वागणें; आचरण करणें. -ज्ञा ४.९३; 'पुत्र वर्तें पितृआज्ञेनें ।' २ राहणें; असणें (आंत, वर कडे). 'नृप चित्र चित्रसेन व्यूहाच्या सबळ वर्तती पृच्छीं ।' -मोकर्ण ७.४६. ३ अंमलांत असणें; चालू, रूढ असणें (चाल, विधि). ४ (काव्यांत) घडणें; होणें;-ज्ञा १.१३७.'एकचि वर्तला आकांत ।' ५ उपस्थित होणें; उद्भ- वणें. 'ज्याला वर्तली चिंता ।' -ऐपो ४१. [सं. वृतू] वर्तन- न. १ वागणूक; आचरण. 'नव्हे आणि वर्तन । ऐसें पैं तें ।' -ज्ञा १३.३५६. २ राहाणें; नांदणें; अस्तित्व. ३ धंदा; व्यवसाय; उपजीविकेचें साधन. 'यज्ञा ऐसें वर्तन । जीविकें केलें ।' -ज्ञा १७.३३९. [सं.] वर्तनीय-वि. (एखाद्या कामाधंद्याला) लाव- ण्याजोगा; कामांत गुंतविण्याजोगा. वर्त(वि)णें-उक्रि. १ वर्तणेंचें प्रयोजक रूप. २ (ज्यो.) गणित करून निश्चित करणें (ग्रहण, संक्राति इ॰). ३ (खलांत तपकीर इ॰) घोटणें. वर्तित- वि. चालविलेलें; वर्तविलेलें; व्यवस्था केलेलें. [सं.] वर्ती-वि. राहणारा; असणारा; वर्तणारा. उदा॰ अग्रवर्ती, मध्यवर्ती, पुरो- वर्ती इ॰

दाते शब्दकोश

वर्त्तणें

वर्त्तणें varttaṇēṃ v i (वर्त्तन S) To behave; to conduct one's self. Ex. पुत्र वर्त्ते पितृ आज्ञेनें ॥ आणि स्त्री पतिव्रता सगुण ॥ हें पूर्व तपाचें फळ जाण ॥ येत दिसोन आपैसें ॥. 2 To be, to subsist, to exist (in, at, on). 3 To be in force; to prevail; to be under observance--a custom, a rite. 4 Esp. in poetry. To happen, take place, come to pass. Ex. वटवृक्षाखालीं वर्त्तलें तें सांगेन; also एकचि वर्त्तला आकांत ॥ नाहीं मीति महाशब्दा ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

जीव      

पु.        १. प्राण : जीवित. २. प्राण असणारा जिवंत प्राणी. ३. लहान कीटक; प्राणी (चिलट, घुंगरडे, पिसू, किडा इ.). ४. तेज; वीर्य; जोम; धमक; पाणी; शक्ती, धैर्य; कार्यक्षमता; सत्त्व; सार (माणूस, घोडा, बैल इत्यादींचे). ५. अंतरात्मा; सचेतन आत्मा. पहा : जीवात्मा [सं.] (वा.) जीव अधांत्री उडणे - संकटात पडणे; भांबावून जाणे; घाबरून जाणे. जीव अर्धा करणे - मनुष्याला अतिशय त्रास देणे. सर्व शक्ती खर्च करणे (श्रम, व्यर्थ शिकवण इ.). जीव अर्धा होणे - भिणे; त्रासले जाणे; गर्भगळित होणे; श्रमणे; दमणे; अर्धमेले होणे. जीव अडकणे, जीव टांगणे, जीव टांगला असणे - आवडत्या वस्तूच्या प्राप्तीसाठी घाबरे होणे, काळजी लागणे. जीव आटणे - १. मरेमरेतो काम करणे. २. अतिशय थकून जाणे (मेहनत, काळजी इ.नी). जीव आंबणे - त्रासून जाणे; कंटाळणे. जीव उडणे - १. प्रेम नाहीसे होणे; विटणे. २. भीतिग्रस्त होणे. जीव कयंगटीस येणे - १. मेटाकुटीस येणे. २. मुरगळून पडणे. (कर.) जीव कालविणे - गलबलणे; अतिशय क्षोभ होणे; घाबरणे; गडबडणे. जीव की प्राण करणे - अतिशय प्रेम करणे. जीव कोड्यात पडणे - बुचकळ्यात पडणे; काही न सुचणे : ‘हे ऐकून भागाचा जीव कोड्यांत पडला.’ - ऊन १७. जीव कोरडा होणे, जीव कोरडा पडणे - घसा वाळणे; थकणे; अतिशय दमणे; (आजार, श्रम, भूक यांनी). जीव कोंडाळणे - गुदमरणे (ना.). जीव खरडून बोलणे, जीव सुकणे, जीव रडणे - आकांत करणे; ओक्साबोक्सी रडणे. जीव खाऊन - सर्व शक्ती एकवटून किंवा मनापासून; जोरजोरात : ‘ताशा वाजंत्रीवाले सकाळपासून दाराशी येऊन दोन पायांवर बसले होते आणि जीव खाऊन वाजवीत होते.’ - भुज १२२. जीव खाऊन काम करणे - मनापासून काम करणे; कसून काम करणे. जीव खाणे, जीव घेणे, जिवास खाणे - एखाद्याच्या जिवास त्रास देणे; झुरविणे. जीव खाली पडणे - उत्कट इच्छा पूर्ण होणे; साध्य गाठणे; मनाजोगे होणे. जीव गंगाजळ होणे - धन्य होणे; कृतार्थ होणे : ‘मळवट भरून त्येंच्यासंगं गेली असती. जीव गंगाजळ झाला असता माझा.’ - खळाळ ७४. जीव गोळा होणे - १. अधीर होणे. २. मरणोन्मुख होणे. अतिशय घाबरणे : ‘जों जों देखे देव काखेंत बोळा । तों तों त्याचा होतसे जीव गोळा ।’ - आसुच २६. जीव घेऊन पळणे - जीव वाचविण्यासाठी पळून जाणे. जीव जाळणे, जीव मारणे - निग्रह करणे; दमन करणे (कामेच्छा, पाप वासना, मनोविकार यांचे). जीव टाकणे - १. प्राण सोडणे. २. निराश होणे; चित स्वस्थ नसणे. ३. फार उत्कंठा लागणे; अतिशय हट्ट, छंद घेणे. ४. खूप प्रेम करणे; लुब्ध होणे : ‘त्यासाठी मी जीव टाकतो.’ - अआबांदे ११. जीव टाकून पळणे - अतिशय त्वरेने, घाईने, एकदम पळणे; भिऊन पोबारा करणे. जीव टांगणीस लागणे - १. एखाद्या वस्तूवर प्रीती बसणे. २. चिंताग्रस्त होणे. जीव टांगणे - काळजीत असणे : ‘लवकर ये रे बाबा - माझा जीव टांगलेला आहे.’ - एल्गार १२८. जीव टांगून ठेवणे - तिष्ठत ठेवणे; काळजीत ठेवणे : ‘चार वर्षं बिचारीचा जीव टांगून ठेवलात.’ - ऑक्टोपस ६१. जीव ठिकाणी नसणे - अस्वस्थ असणे; चैन न पडणे. जीव डहळणे, जीव मळकणे - (ना.) मळमळणे. जीव तुटणे - १. अतिशय थकणे. २. तळमळ लागणे. एखाद्याचा ध्यास लागणे; एखाद्याबद्दल अतिशय काळजी वाटणे. जीव तोडणे - दुःखाने सचिंत होणे. जीव तोडून करणे - अतिशय मेहनतीने करणे. (काम, धंदा). जीव थारी असणे - स्वस्थपणा असणे. जीव थारी नसणे - अस्वस्थ असणे; चैन न पडणे. जीव थोडा थोडा होणे - (ग्लानी, देणे इत्यादी कारणांनी) अतिशय चिंताग्रस्त होणे; काळजी लागणे; भीती वाटणे; फार दुःख होणे; धैर्य खचणे. जीव देणे - १. आत्महत्या करणे. २. सगळे लक्ष घालणे; लक्ष देऊन करणे; पुष्कळ प्रयत्न करणे. जीव धडधड करणे - काळजी, भीती वाटणे. जीव धरणे - नवीन शक्ती मिळविणे; रंगारूपास येणे; बरे व्हावयास लागणे. जगणे, वाढीस लागणे (झाड वगैरे). जीव धरून - १. धैर्य धरून; उत्सुकतेने; उत्साहाने (कृत्य करणे.) २. जिवंत राहून; अस्तित्व टिकवून (कसा तरी याला जोडून योजना.). जीव धागधूग करणे - घाबरणे; वरखाली होणे : ‘निकालाचा दिवस जो जो जवळ येऊ लागला तो तो माझा जीव धागधूग करू लागला.’ - पलको ४९१. जीव धुकुडपुकुड करणे - घाबरणे. (ना.) जीव नाकास येणे - नाकी नव येणे; नाकी नळ येणे; दमछाक होणे. जीव पछाडणे - मोठ्या कळकळीने, लाचारीने नम्र होणे. जीव पडणे - एखाद्या गोष्टीत मनापासून शिरणे; गोडी लागणे; तत्पर होणे. जीव पाखडणे - १. अतिशय मेहनत करणे; प्रयत्न करणे. २. जळफळणे; तडफडणे. जीव पोळणे - १. दुःख होणे. २. चट्टा बसणे; धडा मिळणे. जीव प्यारा असणे - जिवाविषयी अति प्रीती दाखविणे. जीव फुटणे - अतिशय उत्सुक होणे : ‘तुझे भेटीसाठी निशिदिवस माझा जिव फुटे ।’ - सारुह ६·१५८. जीव बसणे - (एखाद्यावर) मन बसणे; प्रेम करणे. जीव भांड्यात पडणे - जीव स्वस्थ होणे. जीव मट्ट्यास येणे - दमणे, अगदी थकून जाणे. जीव मुठीत धरणे - १. काळजीपूर्वक स्वतःचे संरक्षण करणे (धोक्यामुळे). जीव मोठा करणे - १. जोराचा प्रयत्न करणे; धैर्य धरणे. २. उदार होणे (खर्च करण्यात); मन मोठे करणे. जीव रखमेस येणे - कंटाळा येणे; त्रासणे. (कु.) जीव राखणे - जिवाचे रक्षण करणे; आळसाने काम करणे. जीव लावणे - प्रेम करणे; माया लावणे. जीव वर धरणे, जीव वरता धरणे - अतिशय उत्सुक होणे; उत्कंठा लागणे. जीव वारा पिणे - उदास भासणे; भयाण वाटणे. जीव सुकणे - अशक्त, व्याकूळ होणे. जीव सुचिंत नसणे - काळजीत असणे. जीव सोडणे - १. मरणे. २. जीव धोक्यात घालणे; स्वतःच्या जिवाची आहुती देणे. ३. अतिशय इच्छा दर्शविणे. ४. आजारी माणसावरून कोंबडे ओवाळून टाकणे (याने आजाऱ्याचा रोग कोंबड्यावर जाऊन ते मरते अशी समजूत). जिवाचं काय पांढ्‌ढ (कांळ-पांढरं) करणे - जिवाचे बरेवाईट करणे : ‘कोन्या आडशइरीवर जावं आन्‌ आपल्या जिवाचं काई काय पांढ्‌ढ करून टाकावं.’ - शिळान ७८. जिवाचा कान करणे - लक्षपूर्वक कान देऊन ऐकणे : ‘वयातीत वृद्धही त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी जिवाचा कान करीत असत.’ - लोसंक्षि १२१. जिवाचा घात करणे - १. आटोकाट प्रयत्न करणे; जिवापाड मेहनत करणे. २. अतिशय छळणे; गांजणे (जीव जाईपर्यंत). जिवाचा घोट घेणे - जिवाचा घात करणे; मरेपर्यंत छळणे. जिवाचा धडा करणे - साहसाचा प्रयत्न करण्यास तयार होणे. जिवाचा निधडा करणे - जिवावर उदार होणे : ‘तेव्हा त्याणें जिवाचा निधडा करून शिपाइगिरी म्हणावी तैशी केली.’ - ऐको ४४५. जिवाचा लोळ करणे - १. फार श्रम करणे; जिवाला त्रास देणे. २. फार मेहनत घेणे. जिवाची कोयकोय करणे - (कुत्र्यासारखे भुंकावयास लावणे म्हणजे) अतिशय छळणे. जिवाची ग्वाही देणे, जिवाची पाखी देणे - खात्रीपूर्वक सांगणे. जिवाची घालमेल होणे - जीव अस्वस्थ होणे : ‘तुझ्या जिवाची आता जी घालमेल चालली होती’ - असा ८१. जिवाची बाजी - जिवाची पर्वा न करता : ‘येसाजींनी जिवाच्या बाजीनं वाटा रोखल्या.’ - श्रीयो २४७. जिवाची मुंबई करणे - चैन करणे : ‘मोटारी उडवून जिवाची तात्पुरती मुंबई करतात.’ - शेले ३८. जिवाची राळवण करणे - अतिशय काम करणे (राळ्याच्या काडीसारखे होणे); त्रास घेणे. जिवाची हुल्लड करणे - मोठा नेटाचा प्रयत्न करणे. जिवाची होड करणे - प्राण पणास लावणे; एखादे कार्य सर्व सामर्थ्यानुसार करणे : ‘जिवाची होड करून चालविलेल्या त्या स्वातंत्र्यसंगराने.’ - मसासंअभा ४४६. जिवाचे चार - चार करणे - थेर करणे; नाचणे; चैन, विलास करणे. जिवाचे रान करणे - अतिशय कष्ट सोसणे. जिवाच्या आकांताने - गर्भगळित होऊन; अतिशय घाबरून; सर्व शक्तीनिशी : ‘ते जिवाच्या आकांताने बाहेर पडले.’ - माचू ३७३. जिवाच्या गाठी बांधणे - मनात नीट ठसवून किंवा बिंबवून घेणे. जिवात जीव आहे तोपर्यंत - मरण येईपर्यंत; जन्मभर; सदासर्वदा. जिवात जीव घालणे - १. उत्तेजन देणे; सांत्वन करणे; धैर्य देणे. २. आपले व दुसऱ्याचे मन एक करणे; आपले विचार दुसऱ्यास नीट समजावणे. जिवात जीव नसणे - धीर नसणे - अस्वस्थ्य होणे : ‘घरी येईपर्यंत तिच्या जिवात जीव नव्हता.’ - रथचक्र १७३. जिवात जीव येणे - गेलेली शक्ती, धैर्य पुन्हा येणे; धीर येणे. जिवानिशी - जिवासकट. जिवानिशी जाणे - मरणे (जुलमाने, अकाली). जिवाला करवत लागणे - अतिशय चिंता लागणे. जिवाला काही तरी करून घेणे - आत्महत्या करणे; जीव देणे. जिवाला खाणे - मनाला लागून राहणे; झुरणे; झिजणे. तडफडणे. जिवाला चरका लावून जाणे - बेचैन करणे : ‘हे पद जिवाला चरका लावून जात असे.’ - मास्मृग्रं १४२. जिवावर आंगेजणी करणे - जिवावर उदार होऊन कार्यभाग अंगीकारणे : ‘लढाई होईलसी दिसती ते बहूत हे थोडे परंतु हे जिवावर आंगेजणी करितील श्री यश कोन्हास देईल पहावे.’ - ऐको ४४५. जिवावर उठणे - दुसऱ्याच्या जिवाची काळजी न करणे; त्याचा जीव घ्यायला याला तयार होणे. जिवावर उड्या मारणे - दुसऱ्याच्या पैशावर, मदतीवर चैन बढाई मारणे. जिवावरची होड - प्राणावर बेतलेले संकट; प्राणाची पैज; प्राणपणाला लावणे. जिवावर द्वारका करणे - एखाद्याच्या आधारावर, आश्रयावर चैन करणे; महत्कृत्य करणे; मोठा उपकार करणे : ‘तुमच्या जिवावर एवढी द्वारका केले घरदार दोमजली ।’ - पला ८५. (दुसऱ्याच्या) जिवावर (आपले) पोट भरणे - दुसऱ्यावर अवलंबून आपला उदरनिर्वाह चालविणे. जिवावर येणे, जिवावर बेतणे, जिवाशी गाठ पडणे - १. जीव धोक्यात पडणे; मोठे संकट ओढवणे. २. दुष्कर वाटणे. ३. चिडणे. जिवावरचे आधण उतरणे - कठीण प्रसंगांतून बचावणे, निभावणे. ९८. जिवाशी धरणे, जिवाशी बांधणे, जिवी धरणे, जिवी बांधणे - अतिशय प्रीती करणे; बहुमोल वाटणे : ‘काय इणें न धरावें अधनत्वें भूप - जन - वरा जीवीं ।’ - मोवन १३·१८ जिवाशी बेतणे - प्राण जाण्याची वेळ येणे : ‘जिवाशी बेतल्यावर तरी शुद्धींत याल असं वाटलं होतं.’ - एल्गार ११२. जिवास जहानगिरी करणे, जिवास जहानगिरी होणे - जिवावर मोठे संकट येणे, आणणे; संकटाचा प्रसंग ओढवणे. जिवास जीव देणे - प्रिय माणसासाठी आपला जीव देणे. अतिशय सख्य करणे. जिवास पाणी घालणे - जिवावर उदार होणे : ‘अवघे लोक पळाले, ऐसा प्रसंग लोकांचा या भरोसियावर रहावे तरी आपल्या जीवास पाणी घालोन रहावे लागते.’ - ऐको ४४५. जिवास मुकणे - मरणे; मृत्यू पावणे. जिवी लागणे - १. आवडीचा असणे; प्रिय वाटणे. २. मर्मभेद होणे; जिवाला लागणे. जिवे धुस जाणे - धस्स होणे; जिवात धडकी भरणे : ‘तुमते एतां देखिलें । तेंची माझां जीवे घुस गेले ।’ - शिव १२५. जीवे प्राणे उभे राहणे - जिवावर उदार होणे : ‘हें जीवें प्राणें उभे राहिलें तेव्हां त्याणीं अमल दिल्हा व तह केला.’ - ऐको ४४७. जिवे मारणे - जीव जाईपर्यंत मारणे. जिवे वाचणे - एखादे संकट टळून जिवंत राहणे; जीव जाण्याचा प्रसंग असता जीव न जाता बचावणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

लोळ

पु. लोळण्याची क्रिया; लोळणें. दुःखातिशयानें गड- बडां लोळणें (या अर्थीं रडण्याचा किंवा रडून लोळ घालणें किंवा घेणें असा शब्द-प्रयोग करतात.) २ (ल.) (ताप, लोकांचा उपद्रव इ॰ मुळें) एखाद्याची झालेली दुरवस्था किंवा पीडितपणाची स्थिति; थकवा; अति श्रांत स्थिति; भागोटा. 'पोरानें किंवा तापानें माझ्या जिवाचा लोळ केला.' ३ (लोथ-ध च्या ऐवजीं असण्याचा संभव) लठ्ठ पोटांचें पोर; अगडबंब माणूस, धूस, उंदीर इ॰ मोठा प्राणी; धूड. 'काय हो घुशीचा लोळ सांपडला पिंजऱ्यांत.' ४ अव्यवस्थितपणें बांधलेला गठ्ठा; अव्यवस्थित पदार्थ, चिरगुटें, पोथ्या इ॰ ची रास ढीग. ५ काम, कारभार, कारखाना इ॰ चा पसारा; व्याप. ६ चाळा; वेडेंवांकडे कृत्य, वागणूक. 'वदवती न कवीसहि लोळ ते ।' -वामन, भामाविलास (नवनीत पृ ९९). [लोळणें] निजून लोळ पडणें-पसरणें-एखाद्या मोठ्या ओंड्यासारखें किंवा धोंब्याच्या कपड्यांच्या पसाऱ्याप्रमाणें- गाठोड्याप्रमाणें पसरणें-पडून असणें. (या अर्थीं पांघरूणाचा लोळ कामाचा लोळ इ॰). ॰आकांत-पु. मोठमोठ्यानें ओरडणें; प्रचंड व भयंकर गर्जना; आक्रोश. (क्रि॰ करणें; मांडणें; लावणें; चालविणें; उठणें; होणें). २ जोराचा प्रयत्न; धडपड; अविरत श्रम. ३ आरडाओरड; क्षोम; एखाद्या गोष्टीविषयींची सार्वत्रिक तक्रार; पटकी, पाऊस, दरवडेखोर, माहागाईची धारण इ॰मुळें उत्पन्न झालेली परिस्थिति. 'पेंढाऱ्यांचा-जरीमरीचा-पावसाचा- पाण्याचा-धारणीचा-माहागाईचा-लोळ-आकांत.' [म. लोळणें + आकांत] ॰कंड, लोळकण-स्त्री. १ लोळण; जमिनीवर गड- बडां लोळणें (विशेषतः जरूरीचें काम असतां किंवा जबरदस्ताचा प्रतिकार करतांना); एखादा जबरदस्त मनुष्य दुसऱ्याला त्याच्या इच्छेविरुद्ध ओढून नेत असतां त्यानें पडणें, लोळणें, धडपडणें इ॰ त्याच्या सर्व क्रिया. २ एखाद्याचें मन वळविण्या- करतां त्याच्यापुढें लोळण घेणें; लोटांगण घालणें. (क्रि॰ घेणें, मारणें). 'रांडाच्या पायीं लोळकंड घेणारा बुढ्ढा मूर्ख.' -नारुकु ३.४२. ३ कुत्रीं, मांजरें इ॰ चें बागडतांना एकमेकांवर उड्या मारणें, एक- मेकांच्या अंगावर लोळण घेणें. ॰घोळ-पु. १ (कागद, चिर- गुटें, खाद्यपदार्थ इ॰ ची) कालवाकालव; डिवचाडिवच; कुसकरणी; चुरडणें; घोटाळा; मिश्रण. २ हिशेब, जमाखर्च, कारभार इ॰ ची अव्यवस्था; घोंटाळा; गुंतागुंत; गोंधळ. ३ मनाची अस्वस्थता; गोंधळलेली स्थिति; विसकटलेली स्थिति. (क्रि॰ करणें; होणें). ४ हट्टी किंवा द्वाड पोर जमिनीवर लोळून व हातपाय आपटून करतें तो गोंधळ; हूड किंवा उच्छृंखल पोरानें घेतलेली लोळण; केलेली धडपड-गडगडणें. [लोळणें + घोळणें] ॰पट- स्त्री. लोळण; आजारामुळें आलेली पडून राहण्यासारखी स्थिति; अंथरुणावर पडून लोळणें; एखाद्या साथीनें पुष्कळांना दुखणें येऊन लोळत पडण्याची स्थिति; आजारामुळे आलेली दुर्बलता; हीन- दीनपणाची स्थिति. [लोळणें + पडणें] ॰वडी-स्त्री. निर- निराळ्या डाळींच्या चुरीच्या पिठाची लांबट वळवटी करून ती उकडल्यानंतर तिची केलेली वडी. [लोळणें + वडी]

दाते शब्दकोश

कपाल, कपाळ      

न.       १. डोक्याची कवटी; डोक्याचे हाड; करटी. २. मडक्याचा अर्धा भाग; खापर; खापराचा तुकडा; श्रौतकर्मात पुरोडाश भाजण्यासाठीचे वापरायचे खापराचे तुकडे. हे ८, ११, १२, १३ असून त्यांचा एक गट असतो. ३. भिवया आणि डोक्याचे केस यामधील भाग; ललाट; भाल. ४. नशीब; प्रारब्ध; ब्रह्मलिखित (ब्रह्मदेव मनुष्याच्या कपाळावर त्याचे भविष्य लिहून ठेवतो या समजुतीवरून) : ‘कीं एकदांचि फुटले त्वत्पतिपंचककपाळ पापाने ।’ - मोसभा ६·४. ५. (कपाल) चपटे, पातळ हाड; खांद्याचा किंवा मांडीचा फरा. ६. भिक्षापात्र : ‘कपाळ झोळी एका स्मशानींचा वास । एक जगन्निवास विश्वंभर ।’ - तुगा २०५०. ७. (भू.) कोणत्याही याम्योत्तर वृत्ताच्या पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडील अर्धे गोलार्ध. [सं.] (वा.) कपाल आपटून घेणे, कपाळ आपटून घेणे − दुःखाने, रागाने डोके आपटणे स्वतःला अपाय करून घेणे कपाल उगवणे, कपाळ उगवणे − भाग्योदय होणे, कपाल उठणे, कपाळ चढणे − डोके दुखणे; त्रास, कटकट होणे; पीडा होणे : ‘उगा करिती कोल्हाळ । माझें उठते कपाळ ।’ - रामदास. कपाल उणे असणे, कपाळ उणे असणे − दुर्दैवी, कमनशिबी असणे. कपाल काढणे, कपाळ काढणे − वैभवाला चढणे; नशीब काढणे. कपाल खुलणे, कपाळ खुलणे − दैव उदयाला येणे. [हिं.] कपाल जाणे, कपाळ जाणे − दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडणे; भाग्य नाहीसे होणे. कपाल टेकणे, कपाळ टेकणे − एखाद्यावर भरवसा ठेवून, अवलंबून असणे. कपाल ठरणे, कपाळ ठरणे − नशिबात लिहिल्यासारखी एखादी गोष्ट घडून येणे; दैवात असणे : ‘पुढें मागें... याही गोष्टीत सुधारकांचा वरचष्मा होऊन या हताश, विचारशून्य, मत्सरी ... लोकांस ... मूळूमुळू रडत बसावे लागेल हें याचे कपाळ ठरलेलेंच.’ −आगर. कपाल धुऊन घेणे, कपाळ धुऊन घेणे − एखाद्याचे भाग्य हिरावून घेणे; नशिबात असेल ते घेणे. कपाल पाहणे, कपाळ पाहणे, कपाल वाचणे, कपाळ वाचणे − नशिबी काय आहे ते पाहणे; नशीब पाहणे. कपाल निवडणे, कपाळ निवडणे − दैवात असेल ते उभे राहणे : ‘परंतु त्याचे कपाल काय निवडेल ते न कले.’ - पेद ३४·४. कपाल पिटणे, कपाळ पिटणे − दुःखातिशयामुळे डोके जमिनीवर आपटणे : ‘एक अवनीं कपाळ आपटिती ।’ - हरि १८·९६. कपाळपिटी करणे − व्यर्थ बडबड करणे कपाल फुटणे, कपाळ फुटणे − १. दुर्दैव ओढवणे; दैव प्रतिकूल होणे; सर्वस्वाचा नाश होणे; आपत्ती कोसळणे. २. वैधव्य येणे : ‘मी गरीब कितीही असलें । जरि कपाळ माझें फुटलें ।’ − (राजहंस) गोविंदाग्रज. कपाल फोडणे, कपाळ फोडणे − फार शोक, दुःख करणे : ‘कुंतल तोंडी, कपाळ फोडी, करी थोर आकांत ।’ − विक ५३. कपाल बडविणे, कपाळ बडविणे − दुःखातिशयामुळे किंवा क्रोधाच्या आवेगाने कपाळ पिटणे; कपाळावर हाताने मारून घेणे : ‘कळतां वृत्त क्रोधें घे बहु बडवूनि तो कपाळाला ।’ - मोवन ४·८३. कपाल मोक्ष करणे, कपाळ मोक्ष करणे − १. एखाद्याचा सर्वस्वी नाश करणे. २. खूप झोडपणे; ठार मारणे. पहा : कपाळमोक्ष. कपाळाची रेघ उमटणे, रेषा उपटणे, रेषा उघडणे − आकस्मिक रीतीने सुदैव प्राप्त होणे; एकदम मोठेपणा, श्रीमंती मिळणे. कपाळाचे कातडे नेणे − विपत्तीत लोटणे; भाग्यहीन करणे; नुकसान करणे. कपाळात तिडीक उठणे − १. डोके दुखणे. २ (ल.) त्रासणे; अतिशय चीड येणे; रागावणे : ‘आडमुठ्यांच्या घराचे नाव काढले कीं यशवंतरावाच्या कपाळास तिडीख उठे.’ - यशवंतराव खरे. कपाळातले तीन फातर − दुर्दैवाचे फेरे (ढोमले, थोड्यारेथोड्यारे म्हणून एक प्रकारची मासळी आहे. तिच्या डोक्यात तीन पांढरे दगड असतात यावरून) (गो.). कपाळाला अपकीर्ती येणे, कपाळाला अपयश येणे, कपाळाला दारिद्र्य येणे, कपाळाला आपत्ती येणे − अपमान, गरिबी, दुर्लौकिक इत्यादी प्राप्त होणे; नाव बद्दू होणे. कपाळाला आठ्या घालणे, कपाळाला आठ्या चढणे, कपाळाला आठ्या पडणे - त्रासणे; अति त्रास होणे; नापसंती दाखविणे; मनाविरुद्ध गोष्ट घडणे (त्रास झाला असताना कपाळाला आठ्या पडतात त्यावरून) : ‘उलट कपाळाला आठ्या घालून म्हटलें - तुला काय त्याची चौकशी?’ − उषःकाल. कपाळाला किंवा कपाळावर केस उगवणे - अशक्य गोष्ट घडणे (पुढे घडेल असे वाटणाऱ्या एखाद्या गोष्टीशी असंभाव्यता दर्शविताना हा प्रयोग योजतात. तळ हाताला केस येणे याप्रमाणे). कपाळाला येणे, कपाळी येणे − नशिबी येणे : ‘जरि आलें पतन या कपाळाला ।’ − मोआदि १०·८२. कपाळाला लावणे - कुंकू लावणे. कपाळावर, कपाळाला कपाळा किंवा कपाळी हात मारणे, लावणे − १. नशिबाला दोष देणे. २. आश्चर्य, दुःख, काळजी प्रदर्शित करणे : ‘अशींच तुम्ही दोघंही सदोदित कपाळाला हात लावून रडत बसत असतां.’ − हामुबा ८२. कपाळाशी कपाळ घासणे − १. आपल्याला लाभ होईल या आशेने एखाद्या भाग्यवानाशी सहवास करणे; संगतीत राहणे; लगट करणे. २. कच्छपी लागणे; मागे मागे असणे; गुलाम वृत्तीने अनुकरण करणे. कपाळास काठी घेणे, कपाळास काठी टेकणे − वैतागणे : ‘.... आम्ही कपाळास काठी घेऊन वरघाटें आलों.’ - ब्रच २६४; ‘कपाळास काठी टेकून वैतागोन ज्यात होतों.’ - ब्रच ३३५. कपाळी डाग लागणे − बेअब्रू होणे; फजिती होणे; कलंक लागणे. कपाळी काठी घेऊन जाणे − निघून जाणे; चालते होणे; काळे करणे. कपाळी भद्रा असणे − नेहमी दुर्दैवी असणे; प्रतिकूल ग्रह असल्यामुळे दारिद्र्य येणे. कपाळी लिहिलेले असणे − नशिबी असणे; प्राक्तनात असणे; योग येणे : ‘माझ्या कपाळीं आपली सेवा एवढीच लिहिली होती.’ - एक १२२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कपाल-ळ

न. १ डोक्याची कवटी; डोक्याचें हाड; करटी. २ मडक्याचा अर्धा भाग; खापर; खापराचा तुकडा; श्रौतकर्मांत ज्यावर पुरोडाश भाजतात असे खापराचे तुकडे. हे ८, ११, १२, १३ असून त्यांचा एक गट असतो. ३ भिवया आणि डोक्याचे केंस यामधील भाग; ललाट; भाल. ४ नशीब; प्रारब्ध; ब्रम्हलिखित (ब्रम्हदेव मनुष्याच्या कपाळावर त्याचें भविष्य लिहून ठेवितो या समजुतीवरून). 'कीं एकदांचि फुटलें त्वत्पतिपंचककपाळ पापानें.' -मोसभा ६.४. 'गडे, काय कपाळाला करूं । नाहीं घरांत एक लेंकरूं ।।' -प्रला. ५ (कपाल) चपटें, पातळ हाड; खांद्याचा किंवा मांडीचा फरा. ६ भिक्षापात्र. 'कपाळ झोळी एका स्मशानींचा वास । एक जगन्निवास विश्वंभर ।' -तुगा २०५०. ७ (भूगोलशास्त्र) कोणत्याहि याम्योत्तर वृत्ताच्या पूर्वेंकडील किंवा पश्चिमेकडील अर्धें गोलार्ध. -उद्गा. १ नाहीं, खोटें, अशक्य हा अर्थ पटविण्यासाठीं 'माझें कपाळ ! तुझें कपाळ !' इ॰ उद्गार काढतात. 'असें ऐकतां हासले द्वारपाळ । वदों लागले कृष्णाजीचें कपाळ ! ।' -कचसु ६. २ दुःखदर्शक उद्गार, हाय ! हाय ! 'काय सांगूं, कपाळ !' ॰उठणें, चढणें-डोकें दुखणें; त्रास, कटकट होणें; पीडा होणें. 'भजन करितो सर्व काळ । उठतें कपाळ आमचें ।।' 'उगा करिती कोल्हाळ । माझें उठलें कपाळ ।' -रामदास. ॰काढणें-वैभवास चढणें; नशीब काढणें. 'तो चांगला कपाळ काढील असा मला रंग दिसत आहे.' ॰खुलणें-(हिं.) दैव उदयास येणें. ॰जाणें-दुर्दैवाच्या फेर्‍यांत सांपडणें; भाग्य नाहींसें होणें. ॰टेकणें एखाद्यावर भरंवसा ठेवून, अवलंबून असणें; कपाळटेंक करणें. ॰ठरणें-नशिबांत लिहिल्या- सारखी एखादी गोष्ट घडून येणें; दैवांत असणें. 'पुढें मागें... याही गोष्टींत सुधारकांचा वरचष्मा होऊन या हताश, विचार- शून्य, मत्सरी... लोकांस... मुळूमुळू रडत बसावें लागेल हें यांचें कपाळ ठरलेलेंच.' -आगर. ॰धुवून पाहणें-नशिबीं काय आहे तें पाहणें; नशीब पाहणें; ॰पिटणें-दुःखातिशया- मुळें डोकें जमिनीवर आपटणें. 'एक अवनीं कपाळ आपटिती ।' -ह १८.९६. ॰फुटणें-१ दुर्दैव ओढवणें; दैव प्रतिकूल होणें; सर्वस्वाचा नाश होणें; आपत्ति कोसळणें. 'कपाळीं कुंकूं लागतें आहे म्हणून हसायला लागूं कीं कपाळ फुटलें म्हणून रडत बसूं.' २ वैधव्य येणें. 'मी गरीब कितिही असलें । जरि कपाळ माझें फुटलें ।' -(राजहंस) गोविंदाग्रज. ॰फोडणें-फार शोक, दुःख करणें. 'कुंतल तोडी, कपाळ फोडी, करी थोर आकांत ।' -विक ५३. ॰बडविण-दुःखातिशयामुळें किंवा क्रोधाच्या आवेगानें कपाळ पिटणें; कपाळावर हातानें मारून घेणें. 'कळतां वृत्त क्रोधें घे बहु बडवूनि तो कपाळाला.' -मोवन ४.८३. ॰मोक्ष करणें- १ एखाद्याचा सर्वस्वीं नाश करणें. २ खूप झोडपणें; ठार मारणें. कपाळमोक्ष पहा. -ळाला लावणें-कुंकूं लावणें. (गो.) कपा- ळाक लावप. -ळाची रेघ-रेषा उमटणें, उघडणें-आक- स्मिक रीतीनें सुदैव प्राप्त होणें; एकदम मोठेपणा, श्रीमंती मिळणें. -ळाचें कातडें नेणें-विपत्तींत लोटणें; भाग्यहीन करणें; नुकसान करणें. -ळांत तिडीक उठणें-१ डोकें दुखणें. २ (ल.) त्रासणें; रागावणें. 'आडमुठ्यांच्या घराचें नांव काढलें कीं यशवंतरावांच्या कपाळास तिडीख उठे.' -यशवंतराव खरे. -ळांतले तीन फातर-(गो.) दुर्दैवाचे फेरे. (ढोमले, थोड्यारें-थोड्यारे म्हणून एक प्रकारची मासळी आहे तिच्या डोक्यांत तीन पांढरे दगड असतात यावरून). -ळाला आठ्या घालणें, चढणें-त्रासणें; अति त्रास होणें; मनाविरुद्ध गोष्ट घडणें (त्रास झाला असतां कपाळास आठ्या पडतात यावरून). 'उलट कपाळाला आठ्या घालून म्हटलें-तुला काय त्याची चौकशी ?' -उषःकाल. -ळाला किंवा कपाळावर केस उगवणें-अशक्य गोष्ट घडणें. (पुढें घडेल असें वाटणार्‍या एखाद्या गोष्टीची असंभाव्यता दर्शवितांना हा प्रयोग योजितात. तळ हाताला केंस येणें याप्रमाणें). -ळावर, कपाळाला किंवा कपाळीं हात मारणें, लावणें-१नशी- बास दोष देणें. २ आश्चर्य, दुःख, काळजी प्रदर्शित करणें. 'अशींच तुम्हीं दोघंही सदोदित कपाळाला हात लावून रडत बसत असतां.' -हामुबा ८२. -ळाशीं कपाळ घासणें- १ आपल्याला लाभ होईल या आशेनें एखाद्या भाग्यवानाशीं सहवास करणें; संगतींत राहणें. २ कच्छपीं लागणें; मागें मागें असणें; गुलामवृत्तीनें अनुकरण करणें. -ळास अपकीर्ति- अपयश-दारिद्र्य-आपत्ति येणें-अपमान, गरीबी, दुर्लौ- किक इत्यादि प्राप्त होणें; नांव बद्दु होणें. -ळास, कपाळीं येणें-नशीबीं येणें. 'जरि आलें पतन या कपाळाला ।' -मोआदि १०.८२. -ळीं कांटी घेऊन जाणें-निघून जाणें; चालतें होणें; काळें करणें. -ळीं डाग लागणें-बेअब्रू होणें; फजिती होणें; कलंक लागणें. -ळीं भद्रा असणें-नेहमीं दुर्दैवी असणें; प्रतिकूल ग्रह असल्यामुळें दारिद्र्य येणें. -ळीं लिहिलेलें असणें- नशीबीं असणें; प्राक्तनांत असणें; योग येणें. 'माझ्या कपाळीं आपली सेवा एवढीच लिहिली होती.' -एक १२२. -म्ह॰ १ कपाळभर कुंकूं व हातभर बांगड्या = सुवासिनीपणाची स्थिति; सौभाग्य. २ (ल.) केवळ कुंकवाचा धनि म्हणूनच जी स्त्री. नवर्‍याला मानते अशा स्त्रीच्या बाबतींत योजतात. ॰कटकट-स्त्री. तोच तोच विषय पुन्हां पुन्हां सांगत बसणें; कर्म कटकट. 'आतां मी जातें आणि त्या पोरीजवळ कपाळकटकट करीत बसतें.' -पिंगला नाटक. ॰करटा, करंटा-वि. दुर्दैवी; अभागी; दैवहीन; जना वराच्या कपाळावर आंगठ्याखालीं झांकण्याइतपत पांढरा टिकला असल्यास तें अशुभ, कपाळकरंटें समजतात. 'काळें तोंड करी कपाळकरटे जा, खेप आणी दुजी ।' -आठल्ये. ॰कष्टी-स्त्री. १ अति त्रास; अतिशय श्रम, (मूर्ख किंवा हेकेखोर मनुष्याची समजूत घालण्यासाठीं पडणारा); डोकेफोड; उरस्फोड. २ एकाच गोष्टीचा नाद, हट्ट; एकसारखी बडबड-वटवट; खिसखिस; धरणें धरून केलेली मागणी. कपाळकूट-खटखट पहा. [कपाळ + कष्ट] -वि. थकवा आणणारें; त्रास देणारें (काम); असें काम करणारा. ॰काठी-स्त्री. (विणकाम) वही (ओवी) किंवा चाळा ज्यास पक्कें केलें आहे किंवा बांधलें आहे असें आडवें लांकूड किंवा दांडा. हें मागाच्या वर असतें. ॰कूट-स्त्रीन. १ माथेफोड; शिक- विण्याचे फुकट श्रम. कपाळकष्टी पहा. 'कपाळकुट जाहालें लोकीं बोभाट ऐकिला । सांवळें ।' -भज ८. २ वटवट; बडबड; एक- सारखी विनवणी, याचना. 'एकदां तिनें दाराची कडी लावली कीं कोणी कितीहि कपाळकूट करो, इला कडी काढील तर शपथ !' -इलासुंदरी १५. ॰क्रिया-स्त्री. यति संन्यासी वगैरे मृत झाल्या- वर समाधी देण्यापूर्वीं मस्तकावर शंख आपटून मस्तक फोड- ण्याची क्रिया; कपाळमोक्ष. ॰खटखट-स्त्री. त्रास; उद्वेग कपाळ- कूट पहा. -ळाचा डाग-पु. (कपाळावरील काळा डाग; दुर्लौ- किक; अपकीर्ति; कलंक; (क्रि॰ लागणें, चुकणें, लागू होणें). ॰टेंक-टेंकणी-ढोंकणी-स्त्री. (कपाळ टेंकणें). (ल.) एकाद्या- वर भार; भरंवसा टाकणें; अवलंबून राहाणें; स्वतःच्या आकांक्षा- इच्छापूर्ति दुसर्‍यावर सोंपविणें. ॰दुखी-स्त्री. ज्यांत सतत डोकें दुखत राहतें असा रोग; डोकेदुखी; कपाळशूळ. ॰पट्टा-पु. १ घोड्याची म्होरकी किंवा सरोसरी हिचा एक भाग; कपाळा- वरचा पट्टा. हा मुखपट्ट्याहून निराळा असतो. ॰पट्टी-स्त्री. १ कपाळ; कपाळाचा भाग; ललाटपटल. 'विधात्यानं प्राणि- मात्रांचें अदृष्ट डोळ्यांला न दिसणार्‍या कपाळपट्टीवर लिहून ठेवलं आहे.' -एक ४१. २ कुंचडें, कानटोपी इ॰ चा कपाळा- वरील भाग, पट्टी; टोपीचा कपाळावरील भाग. ३ दरवाज्याच्या चौकटीचें वरचें आडवें लांकूड; गणेशपट्टी. ४ मोटेच्या विहि- रीच्या धावेवरील खांबांवर असलेलें आडवें लांकूड. ५ कोण- त्याहि यंत्ररचनेंतील आडवें बहाल. ६ ब्रह्यलिखित; ब्रह्मदेवानें कपाळीं लिहिलेलें; नशिबी असलेलें. [कपाळ + पट्टी] ॰पांचशेरी- पांसरी-स्त्री. न टळणारी दैवगति; अटळनशीब. नशिबाचा दाखला कशानेंहि बदलत नाहीं असा. कोठेंहि गेलां तरी कपाळ- पांचशेरी बरोबर.' [कपाळ + पांचशेरी = चरितार्थ] ॰पाटी- कपाळपट्टी १ पहा. 'तीची असे सज्ज कपाळपाटी ।' -सारुह ५. ११०. ॰फुटका-वि. कपाळकरंटा; दैवहीन; कमनशिबी; अभागी. [कपाळ + फुटणें] ॰फोड-स्त्री. कपाळकूट; कपाळकष्टी पहा. (हा शब्द फार त्रासदायक कामाला लावितात). ॰फोडा स्त्री. कपाळ. फोडीचें फळ. ॰फोडी-पु. एक वनस्पति; चिरबोटी; फोपेटी. याचें फळ (कपाळफोडा) वार्‍यानें फुगवितां येतें; लहान मुळें हें फळ कपाळावर आपटून वाजवितात (कपाळावर फोडणें-म्हणून कपाळ- फोडी हें नांव). ॰फोड्या-पु. डोईफोड्या; मनाजोगें झालें नाहीं म्हणजे कपाळ फोडून घेणारा; इष्टवस्तु मिळेपर्यंत हट्ट धरून बसणारा (भिकारी); आततायी. -वि. कपाळकूट करणारा; हट्टी; दुराग्रही; अक्रस्ताळ्या; अकांडतांडव करणारा. ॰माळा-उद्गा. कल्पनातीत वाईट अवस्था पाहून आश्चर्य किंवा दुःखदर्शक उद्गार. -स्त्री. रुंडमाळा; शंकराच्या गळ्यांतील नरमुंडांची माळा. 'जटा विभूती उटि चंदनाची । कपाळमाळा प्रित गौतमीची । ... तुजवीण शंभो मज कोण तारी ।' -शिवस्तुति. ॰मोक्ष-पु. १प्रेत जळत असतां कपाळाची कवटी फुटण्याची क्रिया. २ मृत संन्याशाच्या डोक्यावर शंख आपटून मस्तक फोडण्याची क्रिया. ३डोक्यास आकस्मिक होणारा एखाद्या वस्तूचा आघात; डोकें फुटणें. -करणें-ठार मारणें. 'मनोहराला स्वर्गीं पाठवावें म्हणून त्याचा कपाळमोक्ष करण्याचा मी प्रयत्न केला.' -मतिविकार. ४ काशीक्षेत्रांतील पांच मुख्य तीर्थांपैकीं एक तीर्थ. -होणें-(ल.) मरणें; अंत होणें. 'खरी वेळ आली म्हणजे या भीमाच्याच लत्ताप्रहारानें त्या धर्म- भ्रष्टाचा कपाळमोक्ष होणार हें मला पक्कें दिसत आहे.' -कीच. ॰रेखा-रेषा-लेख-स्त्रीपु. नशीब; दैव; विधिलिखित (विधीनें कपाळावर लिहून ठेवलेलें. ॰शूल-सूळ-पु. कपाळदुखी पहा.

दाते शब्दकोश