मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

आर्ष

वि. ऋषिसंबंधीं; ऋषिप्रणीत (ग्रंथ, आचार, प्रयोग इ॰) 'रामयशोग्रंथशतीं क्षम जीवां जेविं आर्ष ताराया ।' -मोभीष्म ५.२५. २ प्रवित्र; पूज्य; प्रमाणभूत; आधारभूत (ग्रंथ, संप्रदाय, ज्ञान वगैरे.) ३ (ल.) मंद; जड; अव्यवस्थित; मूर्ख; हट्टी; हेकेखोर. ४ असमंजस; अयुक्त; मूर्खपणाचें; फाजील (भाषण, मत वैगैरे). 'तैसें माझें आर्ष बोलणें पूर्ण । अंगीकाराल वाटतें ।' -भवि १.४१. ५ विचित्र; तर्‍हेवाईक; रूढीस धरून नसलेला. [ऋषि- कालीं संस्कृत भाषा प्रचलित असल्याकारणानें तिच्यांत नेहमीं फेरबदल होत असत म्हणजे पूर्वीचे कांहीं शब्द व रूंपें नष्ट होऊन नवीन शब्द व रूपें भाषेंत येत असत. ऋषींनीं आपल्या वेदमंत्रांत योजिलेले शब्द व रूपें हीं जेव्हां अप्रचलित झालीं तेव्हां त्याना आर्ष (ऋषींनीं योजिलेलीं) असें म्हणत व असे अप्रचलित शब्द व रूपें चालू नसल्यामुळें कानाला विचित्र लागत. यावरून आर्ष शब्दाचे लाक्षणिक अर्थ झाले.] ॰प्रयोग-पु. ऋषींनीं दृष्ट अशा वेदग्रंथांत पाणिनीय व्याकरणाच्या नियमांना सोडून असणारे प्रयोग. ॰भाव-पु. भोळा भाव. 'परि सगुणस्वरूपें आर्षभावार्थें ।' -सप्र १.७१. ॰विवाह- पु. त्रैवर्णिकांच्या अष्टविवाहांतील एक प्रकार, यांत मुलीचा बाप वराकडून गाय व बैल यांची एक किंवा दोन जोड्या घेऊन त्यास आपली मुलगी देतो. अष्टविवाह' पहा. [सं.]

दाते शब्दकोश

आर्ष ārṣa a (S) Relating to ऋषि, saintly. 2 Sacred, holy, having authority--writings, institutes, knowledge. 3 fig. Dull, heavy, unheeding, superlatively stupid; inflexible in a preconception or determination; stupidly obstinate. 4 Foolish, silly, grossly absurd--speech, an opinion &c. Ex. माझे शब्द आर्ष निर्धार ॥ परि तुम्ही प्रीति ठेविली ॥

मोल्सवर्थ शब्दकोश

आर्ष ārṣa m (Corr. from अर्श S) Hæmorrhoids or piles.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. मूळव्याध. अर्श पहा. [सं. अर्श]

दाते शब्दकोश

आर्ष a Saintly; sacred; fig. Dull; Silly. m Piles.

वझे शब्दकोश

(सं) वि० छांदिष्ट, अर्वाच्य, सप्ताळशी, अनियमित. २ ऋषिप्रणीत.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

आर्ष      

वि.       १. ऋषीसंबंधी; ऋषिप्रणीत (ग्रंथ, आचार, प्रयोग इ.) : ‘राम यशोग्रंथशतीं क्षम जीवां जेविं आर्ष ताराया ।’ – मोमीष्म ५·२५. २. पवित्र; पूज्य; प्रमाणभूत; आधारभूत (ग्रंथ, संप्रदाय, ज्ञान वगैरे) ३. (ल.) मंद; जड; अव्यवस्थित; मूर्ख; हट्टी; हेकेखोर. ४. असमंजस; अयुक्त; मूर्खपणाचे; फाजील, बोबडे (भाषण, मत वगैरे) : ‘तैसें माझें आर्ष बोलणें पूर्ण । अंगीकाराल वाटतें ।’ − मवि १·४१. ५. विचित्र; तऱ्हेवाईक; रूढीस धरून नसलेला. (ऋषिकाली संस्कृत भाषा प्रचलित असल्याकारणाने तिच्यात नेहमी फेरबदल होत असत म्हणजे पूर्वीचे काही शब्द व रूपे नष्ट होऊन नवीन शब्द व रूपे भाषेत येत असत. ऋषींनी आपल्या वेदमंत्रांत योजिलेले शब्द व रूपे ही जेव्हा अप्रचलित झाली तेव्हा त्यांना आर्ष (ऋषींनी योजिलेली) असे म्हणत व असे अप्रचलित शब्द व रूपे चालू नसल्यामुळे कानाला विचित्र लागत. यावरून आर्ष शब्दाचे लाक्षणिक अर्थ झाले). ६. प्राचीन; पुरातन; अप्रचलित; प्रचारात नसलेला. ऋषींचा; ऋषिकालीन. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अर्श

अर्श arśa n m S corruptly अर्ष n Disease of the anus, but particularly Hæmorrhoids or piles.

मोल्सवर्थ शब्दकोश

अर्श n m Disease of the anus, piles.

वझे शब्दकोश

पु. चुकीनें अर्ष. १ मूळव्याध. २ बेंड, गळूं. उ॰ नासार्श; कर्णार्श. [सं.]

दाते शब्दकोश

अरस

अरस arasa a S (Esp. in poetry.) Wanting juice, lit. fig. jejune, insipid, dry.

मोल्सवर्थ शब्दकोश

वि. रसहीन; नीरस. (ल.) बेचव; शुष्क. 'कशासाठीं गावीं अरस कवनें मी स्ववदनें ' -केक ६- [सं. अ + रस]

दाते शब्दकोश

अर्श      

पु.       १. मूळव्याध. २. बेंड; गळू. उदा. नासार्श; कर्णार्शः ‘अर्श, कृमी इ. वर कच्चा अक्रोडचा रस पिण्यास द्यावा’– फचि २४. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अरस      

वि.       रसहीन; नीरस. (ल.) बेचव; शुष्क : ‘कशासाठी गावीं अरस कवनें मी स्ववदनें ।’ –केका ६. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अर्श पर चढ़ाना

हिंदी अर्थ : बहुत तारीफ़ करना मराठी अर्थ : हरभऱ्याच्या झाडावर चढविणें.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

अर्श पर दिमाग़ होना

हिंदी अर्थ : बहुत अभिमान होना मराठी अर्थ : गर्विष्ठ असणें.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

आरवार, आरवाळी, आरशिशि, आरशी, आरस, आरसी, आरळ, आरळी

अ मध्यें पहा.

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

आराष, आरास, आरी

आराष, आरास, आरी ārāṣa, ārāsa, ārī See under अ.

मोल्सवर्थ शब्दकोश

आरिख

वि. १ ॠषिप्रणीत; छांदस; वैदिक. 'पुराणिचे आरिख बोल' -दाव १७. २ छांदिष्ट आर्ष; अव्यवस्थित. 'जेवि कां. तें बाळ पंचवार्षिक । जडबुद्धि केवळ आरिख ।' -स्वादि ४.४.४२. ३ बोबडे; असंस्कृत. 'तो आरिखा शब्दांमाझारी । चातुर्य बोलां ते पुरी । स्वाक्षरें मुखाबाहेर । पडो नेदी ।' -ज्ञाप्र ७९२. [सं. आर्ष]

दाते शब्दकोश

आरिख      

वि.       १. ऋषिप्रणीत; छांदस; वैदिक : ‘पुराणिचे आरिख बोल.’ − वछा ९७. २. छांदिष्ट; आर्ष; अव्यवस्थित : ‘जेवि कां तें बाळ अज्ञान पंचवार्षिक । जडबुद्धि केवळ आरिख ।’ − स्वादि ४·४·४२. ३. बोबडे; असंस्कृत; गावंढळ : ‘तो आरिखा शब्दांमाझारी । चातुर्य बोलां ते पुरी । स्वाक्षरें मुखाबाहेरी । पडो नेदी ।’ − ज्ञाप्र ७९२. [सं. आर्ष]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अरु(रू)श–ष, अरुसा

वि. १ आर्ष; मूढ; विचित्र; मंद; जड; वेडावांकडा; मंदबुद्धीचा; बोबडा; मुर्ख. ‘हा अरुष भक्तिचा भाव । दयाळा धांव घेई धनुकरा ।’ –देप २८.१.२ विचित्र; विक्षिप्त (माणूस). ‘येक अरुषें आक्षेपिलें’ –सप्र ८.१२२. [सं. आर्ष]

दाते शब्दकोश

अरुश, अरूश, अरुष, अरूष, अरूसा      

वि.       १. आर्ष; मूढ; मंद; जड; वेडावाकडा; मंदबुद्धीचा; रेम्याडोक्या; मूर्ख : ‘हा अरूष भक्तिचा भाव । दयाळ धांव घेई धनुकरा ।’ – देप २८·१. २. विचित्र; विक्षिप्त (माणूस) : ‘येक अरूषे आक्षेपिले ।’ – सप्र ८·१२२. [सं. आर्ष]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आरूष

वि. (प्र.) आर्ष; छांदस्; वैदिक. १ असमंजस; असंबद्ध; वेडीवांकडी; गांवढळ; बोबडी; रुक्ष; छांदिष्ट; पोरकट; अडाणी (वाणी, बोल, भाषण, कृति वगैरे). 'ते माझे मर्‍हाटे आरुष बोल । सद्गुरुनें केले सखोल ।' -एभा १६.७. 'माझ बोलणें आरुष अत्यंत ।' -रावि १.२. २ मंद; मूर्ख; अजागळ; रुक्ष, गोसावड्यासारखा. 'या आरूष नामांचा चाळा । घेऊनि गर्जती वेळोवेळां' -एभा ५.४१२. [सं. आर्ष]

दाते शब्दकोश

अष्टमहारोग

अष्टमहारोग aṣṭamahārōga m pl S The eight great maladies; viz. वातव्याधि, अश्मरी, कृच्छू, मेह, उदर, भगंदर, अर्श, संग्रहणि, Rheumatism, stone or gravel, strangury, urinary affection, ascites, fistulas and ulcers in ano &c., hæmorrhoids, dysentery. Each has divisions, each comprehending numerous varieties. See प्रमेह, उदर, भगंदर, अर्श. See another account under महारोग.

मोल्सवर्थ शब्दकोश

आळशी

(सं) वि० सुस्त, आर्ष. २ वनस्पतीविशेष, जवस.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

अलुबुखार

पु. एक प्रकारचें अंबूस व रुचकर फळ व त्यांचे झाड. झाडापासून बाभळीच्या गोदांसारखा डिंक निघतो. बियां- पासून काढलेल्या तेलाचा उपयोग जाळण्याकडे करतात. ह्यांचे फळ बाहेरून तांबूस व काळसर असतें. मेह, गुल्म, अर्श, ज्वर, वायु यांचा नाश करतें. -वगु १.४७. [फा. आलु = गड्डा + बुखार. सं. अलुक]

दाते शब्दकोश

अरीस

स्त्री. मूळव्याधीचे मोड. 'एक वडी सेविजे अरीस मरति ।' वैद्यकबाड भाइअ ४६. [सं. अर्श]

दाते शब्दकोश

अरीस      

स्त्री.       मूळव्याधीचे मोड : ‘एकवडी सेविजे अरीस मरति ।’ – वैद्यक ४६. [सं. अर्श]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अरसा

अरसा arasā m ( H) A mirror or looking-glass. Ex. तव्याचा जातां बुरसा ॥ मग तोचि होय सहज अ0 ॥ अरशापुढें कोळसा Used where a thing remarkably foul, vile, base, or bad is compared with a thing remarkably bright, pure, fine, or good. अर- शा सारखा Bright and clear as a mirror;--used lit. fig. of houses, rooms, accounts, handwriting, business. अरशासारखें तोंड-मुख-चेहरा A clear complexion or beautiful countenance.

मोल्सवर्थ शब्दकोश

अर्शग्रहणी

अतिसार; संग्रहणी; कॉलरा. ‘एकार्त अर्ष ग्रहणी ’ –गीता १३. २४८८. [सं.]

दाते शब्दकोश

अर्शग्रहणी, अर्षग्रहणी      

अतिसार; संग्रहणी; कॉलरा : ‘एकार्त अर्ष ग्रहणी’ – गीता १३·२४८८. [सं.] अर्शद      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अरशिसी      

पहा : अर्धशिशी अरस      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अरस्य      

वि.       नीरस : ‘चाखों ते ते अरस्य.’– गीता १·२३१८. [सं. अरस]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अरुष or श, अरुष

अरुष or श, अरुष aruṣa or śa, aruṣa or श a (Poetry. आर्ष S) Dull, heavy, blockish; very stupid, foolish, or silly. Ex. तैशाच परि रुक्मिणीपति ॥ भक्त अ0 करितां स्तुति ॥ तीं तुज वचनें गोड लागती सप्रेम भक्तिचेनि बळें ॥

मोल्सवर्थ शब्दकोश

आरुश्श or श

आरुश्श or श āruśśa or śa a (Corr. from आर्ष S) Dull or unheeding; superlatively stupid and gross; being after the fashion of a ऋषि.

मोल्सवर्थ शब्दकोश

अर्वाळी      

पहा : अरवाडी, अरवाळी अर्श      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आर्ये      

वि.       आर्ष : ‘श्रीप्रभु आर्येः’ − लीचउ ४६६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अष्टमहारोग      

पु.       आठ मोठे रोग – वातव्याधी, अश्मरी, कुष्ठ, मेह, उदर, भगंदर, अर्श (मूळव्याध), संग्रहणी. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अष्टविवाह      

पु.       विवाहाचे आठ प्रकार १. ब्राम्ह = सालंकृत कन्यादान. २. गांधर्व = उभयतांच्या अनुमतीने. ३. राक्षस = जबरदस्तीने कन्या हरण करून. ४. दैव = यज्ञप्रसंगी ऋत्विजास कन्यादान करून. ५. आर्ष = गाय, बैल घेऊन कन्यार्पण. ७. असुर = शुल्क घेऊन. ८. पैशाच – कन्या चोरून आणून पत्नी करणे. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धोष्ट, धोष्ट्या

वि. (कों.) सुस्त; मंद आणि आजगळ; गबाळ्या; आर्ष स्वभावाचा; गैदी राहणीचा (मनुष्य).

दाते शब्दकोश

कर्णार्श

पु. कान फुटणें; कान वाहणें; कानाचा एक रोग. [सं. कर्ण + अर्श]

दाते शब्दकोश

महारोग

महारोग mahārōga m (S) A common term for eight grievous maladies; viz. वात, व्याधि, अश्मरी, कृछ्र, मेह, उदर, भगंदर, अर्श, संग्रहणी. Another account makes nine, beginning with राजयक्ष्मा Pulmonary consumption, and for कृछ्र giving कुष्ठ Leprosy, and for संग्रहणी, ग्रहणि. Practised sufferers will smile at the defectiveness and arbitrariness of these catalogues, as will the general scholar at the endless other enumerations of ambitious pseudo-savans ostentatious of universal learning. 2 महारोग is popularly applied, par eminence, to रक्तपिती Arabian or black leprosy.

मोल्सवर्थ शब्दकोश

मुळव्याध-व्याधि-धी

स्त्री. अर्श; गुदाला होणारा एक उष्णतेचा रोग. मुळव्याधीचे प्रकार:-रक्ती, मोडाची, लसणी, चुंबळी इ॰. [सं. मूलव्याधि]

दाते शब्दकोश

नासा

स्त्री. १ नाक. 'वनिता अधरीं सुवर्ण फांसा । पडोन मुक्त आलें नासा ।' -एरुस्व ७.३९. २ दाराच्या चवकटीचा वरील भाग; दाराचा माथा; कपाळपट्टी. याच्या उलट शिला = उंबरठा. [सं] नासाग्र-न. (काव्य.) नाकाचा शेंडा. नासाग्रीं दृष्टि ठेवणें-१ नाकाच्या शेंड्यावर दृष्टि खिळविणें. २ एकाग्र चित्तानें देव वगैरेचें ध्यान करणें. 'नासाग्रीं ठेवूनि दृष्टि । भक्तासी पाहसी कृपादृष्टि । ॰पुट-रंध्र-न. नाकपुडी. -ज्ञा ६.२३६. नासार्श- पु. नाकांत फोड, पुटकुळ्या येणें; नाकाचा एक रोग. [नासा + अर्श] नासावर्त-पु. घोड्याच्या नाकावरील डावीकडचा भोंवरा. उजवीकडे असल्यास जनावर्त म्हणतात. -अश्वप ९७. [नासा + आवर्त] ॰वंश-पु. १ नाकाचा दांडा. २ सरळ नाक. 'आतां कैसा भणों नाशावंसु । जो सर्व अवएओचा कळसू ।' -ॠ ९५. ॰व्रण-पु. नाकांतील व्रण, पुळी. ॰शोष-पु. नाक कोरडें पडणें. नासिक-का-नस्त्री. नाक. 'नास्तिका देऊनि नास्तिक । उंचा- वलें तें नासिक ।' -एरुस्व १.५८. नासिकाचूर्ण-न. (उप. सांकेतिक) तपकीर.

दाते शब्दकोश

रीसी

स्त्री. मूळव्यास. -वेद्यकबाड ४६. [सं. अर्श]

दाते शब्दकोश

उन्हाळी

स्त्री. १ हवेंतील उष्णता; उन्हाळ्यांतील उष्णता; उकाडा. २ एक मूत्रविकार; उन्हाळे. (क्रि. लागणें, होणें.) 'मुरडा हागवण उन्हाळे । दिशा कोंडतां आंदोळे ।' -दा ३.६.३०. ३ एक वनस्पति; रानटी तीळ; हिचीं फुलें लाल व पांढर्‍या रंगाचीं असून शेंगा चपट्या व पानें लहान व लांबट असतात. काडाचा सर्पणाकडे उपयोग होतो. शिवाय व्रण, खोकला, विष, दमा, अर्श, ज्वर, वायु- नाशक वगैरे गुण यामध्यें आहेत. ४ (कों) उन्हाळा पहा. ॰पाव- साळी-स्त्री. खेळांतील दोन पक्षांपैकीं कोणी डावाला सुरवात करा- वयाची हें ठरविण्यासाठीं खापरी किंवा पैसा यांस एका बाजूनें थुंकी लावून तो वर फेकतात. त्या खापरीचें किंवा पैशाचें कोरडें अंग ती उन्हाळी व थुंकी लागलेलें अंग ती पावसाळी. त्यापैकीं एकानें कोणतें तरी अंग मागावयाचें व मागितलेलें अंग वर आल्यास त्यानें प्रथम खेळावयाचें असतें. ॰भात-न. वायंगणें भात.

दाते शब्दकोश

उन्हाळी      

स्त्री. १. हवेतील उष्णता; उन्हाळ्यातील उष्णता; उकाडा. २. एक मूत्रविकार; उन्हाळे. (क्रि. लागणे, होणे). ३. एक वनस्पती; रानटी तीळ. हिची फुले लाल व पांढऱ्या रंगाची असून शेंगा चपट्या व पाने लहान व लांबट असतात. काडाचा सर्पणासाठी उपयोग होतो. शिवाय व्रण, खोकळा, विष, दमा, अर्श, ज्वर, वायू वगैरेचा नाश करण्याचे गुण यामध्ये आहेत.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

विवाह

पु. लग्न; स्त्रीपुरुषांमध्यें दांपत्यसंबंध उत्पन्न करणारा विधि, संस्कार, पद्धति. याचे आठ प्रकार मनुस्मृतींत सांगि- तले आहेत-ब्राह्म, दैव, आर्ष, प्राजापत्य, आसुर, गांधर्व, राक्षस, पैशाच. [सं. वि + वह्; सिं. विहाउ; हिं. ब्याह] विवाहणें- उक्रि. १ लग्न करणें; पत्नीचें पाणिग्रहण करणें. २ लग्न लावणें; लग्नांत देणें (मुलीस). विवाहमेळ-पु. विवाहप्रसंग; विवाह समारंभ; विवाहसंस्कार. 'म्हणसी मी सोयरा अति काळा । कां बोलाविसी विवाहमेळा ।' -एरुस्व ४.१२. विवाह होम-पु. विवाहाच्या प्रसंगी गृह्याग्निसिद्ध करून करावयाचा होम. विवाहित- वि. लग्न झालेला. विवाही-पु. व्याही; आपल्या मुलाचा किंवा मुलीचा सासरा. विवाहोपचार-पु. लग्नप्रसंगी करावयाचे विधी, संस्कार, होम वगैरे विशिष्ट गोष्टी.विवाह्य-वि. लग्न व्हावयास योग्य, लायक, शक्य, जरूर; ज्याचें लग्न व्हावयाचे आहे असा.

दाते शब्दकोश

महत्

वि. १ मोठा; बडा; विस्तृत. २ (ल.) थोर; वरच्या दर्जाचा; उत्कृष्ट; कोणत्याहि गुणांत श्रेष्ठ. जसें-महाबुद्धिमान्, महालबाड; महासोदा. महत् हा शब्द कर्मधारय आणि बहुव्रीहि समासांत महा असा होतो आणि तत्पुरुष समासांत तसाच राहतो. जसें-महादेव, महाबाहु व महत्पूजा; महत्सेवा. ३ अतिशय; फार; अत्यंत. जसें-महाप्रचंड; महातीक्ष्ण इ॰ [सं.] महतामहत्-वि. (व.) मोठ्यांतला मोठा; सर्वांत मोठा. महत्तत्व-न. सत्व, रज, तम या तीन गुणांची साम्यावस्था; मूळमाया; गुणसाम्य. 'सत्त्वगुणापासून महत्तत्व उत्पन्न झालें.' -टिले ४.३६१. महत्तमसाधारण भाजकपु. दिलेल्या सर्व संख्यांना पूर्ण भाग जाईल अशी सर्वांत मोठी संख्या. महदंतर-न. फार मोठें अंतर, तफावत; वेगळेपणा. महदहंबुद्धि-स्त्री. महत्तत्त्व; अहंकार- बुद्धि. 'एवं महदहंबुद्धि । मनें महाभूत समृद्धि ।' -माज्ञा १५.१०५. महदादिदेहांत-क्रिवि. महत्तत्त्वापासून स्थूलदेहापर्यंत. 'महदादि देहांतें । इयें आशेषेंही भूतें ।' -ज्ञा ९.६७. महद्ब्रह्म-न. मूळ ब्रह्म. 'तया महद्ब्रह्मातें व्याली । दैविकी इच्छा ।' -ज्ञा ११.५११. महद्भूत-वि. विलक्षण; असामान्य; चमत्कारिक. महद्वर्त्त-न. गोलाचें वर्तुळ; खगोलीय वृत्त. महती-स्त्री. मोठेपणा; महत्त्व. 'त्याचेनि माझी त्रैलोकीं ख्याती । मज महती त्याचेनी ।' -एभा १४.२६९. महतीवीणा-स्त्री. नारदाच्या वीणेचें नांव. महत्त्व-न. मोठेपणा; योग्यता; लौकिक; प्रतिष्ठा; किंमत. महती पहा. 'रायाजी पाटिल महत्त्व रक्षी ।' ऐपो ३२. उतरणें- योग्यता; प्रतिष्ठा; कमी होणें. ॰वाढविणेंफुशारकी, बढाई मारणें. ॰दर्शक-वि. पदार्थाचें माप, लांबी, रुंदी इ॰ दाखवि- णारें (परिमाण). ॰मापन-न. गणितशास्त्राचा एक विभाग; आकारमान मोजण्याची विद्या; मापनशास्त्र. महत्त्वकांक्षा- -स्त्री. मोठेपणाची इच्छा, हांव; जिगीषा. 'कर्तबगार लोकांच्या वेडाला महत्त्वाकांक्षा म्हणतात.' -विधिलिखित २१. महा-वि. १ महत् पहा. २ थोर; बडा. 'हे एक महा आहेत.' 'तो काय एक महा आहे.' ॰अर्बुद-न. एक हजार दशकोटि ही संख्या. ॰ऊर-पु. (अप.) महापूर; अतिशय मोठा पूर. ॰एकादशी- स्त्री. आषाढशुद्ध व कार्तिक शुद्ध एकादशी. ॰कंद-पु. १ मोठ्या जातीचा कंद. २ लसूण. ॰कल्प-पु. ब्रह्मदेवाच्या शंभर वर्षांचा काल; ब्रह्मदेवाचें आयुष्य; महाप्रलय; कल्प पहा. ॰काल-ळ- पु. १ प्रलय काळचा शंकराचा अवतार. 'महाकाळ उभा चिरीन बाणीं ।' २ बारा ज्योतिर्लिंगांपैकीं एक (उज्जनी येथील). ॰काली-स्त्री. १ पार्वती. २ प्रचंड तोफ; महाकाळी. -शर. ॰काव्य-न. वीररसप्रधान, मोठें, अभिजात, रामायण-महा- भारताप्रमाणें काव्य; (इं.) एपिक. 'आर्ष महाकाव्यांत कोण- कोणते गुण असावे याबद्दल पुढें विवेचन येईलच.' ॰काश-न. अवकाश; अफाट पोकळी. याच्या उलट घटाकाश, मठाकाश. [महा + आकाश] ॰कुल-कुलीन-वि. थोर, उच्च कुलांतील; कुलीन. ॰खळें-न. मोठें अंगण. ॰गाणी-नी-वि. गानकुशल. 'उत्तर देशींच्या महागणी । गुर्जरिणी अतिगौरा ।' -मुरुंशु १२२. ॰गिरी-पु. मोठा पर्वत; हिमालय. 'किं मक्षिकाचेनि थडकें । महागिरी पडों शकें ।' -एकनाथ-आनंदलहरी ४२. -स्त्री. १ तीनशें खंडीपर्यंत वजन नेणारें जहाज, गलबत; मालाचें तारूं; 'सबब त्यांजकडे दोन महागिऱ्या भरून गवत व एक महागिरी- भर लांकडे देविलीं असें,' -समारो ३.१६. २ मोठें तारूं; शिबाड; बतेला. ॰ग्रह-ग्राह-पु. मोठी सुसर; मोठा मगर. 'गज करवडी महाग्राह ।' -एरुस्व १०.८० -एभा २०.३५०. ॰जन- पु. १ काही गुण, विद्या इ॰ मुळें थोर, श्रेष्ठ माणूस. 'परंतु हृदयीं महाजन भयास मी मानितों ।' -भक्तमयूरकेका ७५. ३ व्यापारी; उदमी; सावकार. ३ गाव, कसबा इ॰ तील व्यापाराला नियम, शिस्त घालून देणारा, त्यावर देखरेख करणारा व कर वसूल करणारा सरकारी अधिकारी. ह्या अर्थीं महाजनी असाहि शब्द आहे. ४ पंच ॰जनकी-स्त्री. महाजनांचे काम, अधिकार. ॰डोळा-पु. एक मासा. -प्रणिमो ८१. ॰तल-न. सप्तपातालांपैकीं एक; नाग व असुर यांचें स्थान. ॰ताप-पु. (तंजा.) शोभेच्या दारूचा एक प्रकार; चंद्रज्योति. महताब पहा. ॰तेज-न. १ ब्रह्म २ सूर्य. 'हें अपार कैसेनि कवळावें । महातेज कवणें धवळावें.' -ज्ञा १.७४ महात्मा-पु. १ महानुभव पंथांतील व्यक्ति. ३ मोटा धैर्यवान, पराक्रमी मनुष्य. 'तैसें महात्मा वृक्षमुळीं । असावें खांड देउळीं ।' -भाए ४९३. गौतमबुद्ध, गांधी यांस संबोधितात. -वि. १ थोर मनाचा; उदार; महानुभाव. 'परते धर्म महात्मा, स्तविला बहु नारदादि साधूंनीं ।' -मोभीष्म १.९९. [महा + आत्मा] ॰दंदी- वि. महामत्सरी; कट्टर द्वेष्टा. 'छंदी फंदि महादंदि । रावण पडिला तुझ्या बंदि ।' -ज्ञानप्रदीप २६६. [सं. महाद्वंद्वी] ॰दशा-स्त्री. (ज्योतिष) कुंडलीतींल मुख्य ग्रहाची बाधा अंतर्दशा पहा. ॰दान- न. (मोठें दान) हत्ती इ॰ षोडशदानांपैकीं एक; षोडशमहादानें पहा. ॰देव-पु. १ शंकर; शिव. 'महादेव म्हणावया कारण । ब्रह्मयासि. जाण या हेतू ।' -एभा १३.२७९. २ (विणकाम) हातमागाच्या फणीचा मरचा अवयव, दांडा फळी. हा आणि तळाचा दांडा किंवा पार्वती मिळून फणीची चौकट होते या फणीच्या चौकटीस महादेवपार्वती किंवा हात्यादांडी असेंहि म्हणतात. ॰देवाचें देणें- न. कंटाळवाणें व दीर्घकाल टिकणारें काम. ॰देवापुढचा-वि. (शब्दशः) नंदी; (ल.) मूर्ख; निर्बुद्ध. ॰देवी-स्त्री. १ पार्वती; दुर्गा. २ एक प्रकारची वनस्पति. हिचें बीं महादेवाच्या पिंडीच्या आकाराप्रमाणें असतें. ॰देवी सहादेवी-स्त्री. (माण.) चैत्री पौर्णिमेस तिन्हीसांजचे वेळीं एखाद्या भिंतीवर जीं महादेवी सहादेवी म्हणून दोन गंधाचीं बाहुलीं काढून त्यांची पूजा कर- तात तीं. -मसाप ४.४.२५९. ॰दैव-(माण.) सर्व जातींचे लोक. ॰द्वार-न. (मंदिराचा किंवा राजवाड्याचा) बाहेरचा किंवा मुख्य दरवाजा. 'भक्त गर्जती महाद्वारीं । त्यांसी द्यावे दर्शन ।' -भूपाळी विठ्ठलाची पृ २२. ॰द्वीप-न. (मोठें बेट) खंड. 'तयाफळाचे हें महाद्वीप । पातली प्रभु ।' -ज्ञा १६.३२. ॰नदी-स्त्री. मोठी नदी; उगमापासून शंभर योजनांवर वाहात जाणारी नदी. ॰न मी-स्त्री. १ आश्विन शुद्ध नवमी; नवरात्राचा शेवटचा दिवस. २ रामनवमी. -शास्त्रीको ॰नवरात्र-न. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंतचा काल. ॰नस- पु. स्वयंपाकघर. ॰नक्षत्र-न. सूर्यनक्षत्र ॰नाड-पु. महाजना- सारखा एक वतनदार. 'महाजन व महानाड पेठ मजकूर याचें नांवें सनद कीं,' -थोमारो १.५४. [महा + नाड-डु] ॰निंब-पु. एक प्रकारचें झाड. ॰निद्रा-स्त्री. मरण; मृत्यु. 'तिसरें प्रमाण महा- निद्रा म्हणजे मृत्यु हें होय?' -टि ४.४८१. महानुभाव-पु. श्रीचक्रधरानें स्थापिलेला एक द्वैतवादी पंथ. या पंथात श्रीकृष्ण- भक्ति प्रमुख आहे. [महा + अनुभाव] -वि. १ ज्यानें कामक्रोधादि विकार जिंकले आहेत असा; महात्मा. २ उदार, थोर पुरुष. एवं पिंडारकीं ऋषि सर्व । शापानुग्रही महानुभाव ।' -एभा १.३३६. ३ प्रशस्त अनुभवाचा; ब्रह्मानुभवी. 'ऐसे जे महानुभाव । जे दैविये प्रकृतीचें दैव ।' -ज्ञा ९ १९४. ४ विद्या, बुद्धि, पराक्रम इ॰ गुणांनीं श्रेष्ठ मनुष्य; महाप्रतापी. ॰नेटका-वि. परिपूर्ण; पूर्णपणे; व्यवस्थित. 'यज्ञ मुनिचा राखे महानेटका ।' -मोरामायणें त्रिःसप्तमंत्रमय रामा- यण ३. ॰नैवेद्य-पुन. पंचपक्वान्नमय अन्नाचें ताट वाढून देवाला दाखवितात तो नैवेद्य (साखर, दूध इ॰चा छोटा नैवेद्य होतो). ॰न्यास-पु. पूजा करतांना शरीराच्या विवक्षित भागांना स्पर्श करून करावयास न्यास. याचाच दुसरा प्रकार लघुन्यास. ॰पड-पु. (महानु.) महापट; ध्वज. 'आहो जी देवा । पैलु देखिला महा- पडांचा मेळावा ।' -शिशु १०३३. [महापट] ॰प(पं)थ-पु. १ मृत्यु; मरण; मृत्यूची वाट. 'न देशील सत्यवंत । तरी करीन हाचि महापंथ ।' -वसा ६.८. २ निर्याणाचा मार्ग. 'लागले महापंथी तत्काळाची ।' -एभा ३१.२९८. ॰पद-न. ब्रह्मपद. 'कीं श्रुति हे महापदीं । पैठी जाहली ।' -ज्ञा १३.३७१. ॰पद्म-पु. १ एकं, दहं, शतं ह्या श्रेणींतील तेराव्या स्थानची संख्या (एकावर बारा शून्यें इतका आकडा) २ कुबेराच्या नवनिधींपैकीं एक निधि. नवविधी पहा. ॰पातक-न. ब्रह्महत्या, दारू पिणें, सुवर्णाची चोरी, गुरूच्या पत्नीबरोबर किंवा स्वतःच्या मातेबरोबर संभोग आणि यापैकीं एखादें पातक करणाराशीं मैत्री, अशा पांच मोठ्या पातकांपैकीं प्रत्येक. ॰पातकी-वि. १ ज्याच्या हातून महापातक घडलें आहे असा. २ अत्यंत पापी; दुराचारी. म्ह॰ अवसानघातकी महापातकी. ॰पाप-पी-महापातक-की पहा. ॰पीठ-न. विष्णूच्या चक्रानें झालेले शक्ती-पार्वतीच्या शरीराचे तुकडे ज्या ठिकाणीं पडले असें मानतात त्या अत्यंत पवित्र स्थानापैकीं प्रत्येक. अशीं स्थानें साडेतीन आहेत. तुळजापूर, मातापूर आणि कोल्हापूर, हीं तीन व अर्धे सप्तशृंग. औट पीठ पहा. ॰पुरुष-पु. १ ईश्वर. २ साधु- पुरुष; सत्पुरुष; ब्रह्मनिष्ठ मनुष्य. 'महापुरुषाचें चित्त । जालिया वस्तुगत ।' -ज्ञा १३. ७८९. ३ मेलेल्या ब्राह्मणाचें पिशाच्च. ॰पू(पु)जा-स्त्री. व्रतसमाप्ति इत्यादि विवक्षित प्रसंगास अनुसरून करतात ती मोठी पूजा. ॰पूर-पु. नदीस येणारा मोठा पूर, लोंढा. 'महापूरें झाडें जाती । तेथे लव्हाळे राहती ।' -तुगा १०४३. ॰प्रयास-पु. मोठे परिश्रम, कष्ट, प्रयत्न, खटाटोप. ॰प्रलयपु. १ प्रत्येक ४३२००००००० वर्षांनीं होणारा सर्व जगाचा नाश. २ ब्रह्मदेवाच्या शंभर वर्षांनीं होणारा सर्व (देव, ब्राह्मण, साधू, ब्रह्मा यासह) विश्वाचा नाश. 'जो ब्रह्याच्या स्थूळ देहाचें मरण । तो महाप्रलय जाण ।' महाकल्प पहा. ॰प्रयासपुअव. फार मोठे कष्ट, श्रम, प्रयत्न. ॰प्रसादपु. १ धार्मिक किंवा देवाच्या उत्सवा- नंतर वाटतात तो फुलें, मिठाई, जेवण इ॰ रूप प्रसाद. २ देव, गुरु इ॰पासून मिळालेली प्रसादाची वस्तु (कृपा, अनुग्रह म्हणून). ३ (शब्दशः व ल.) मोठी कृपा, अनुग्रह 'महाप्रसादाचेनि हरिखें । सप्रेम सुखें डुल्लती ।' ॰प्रस्थानन. (मोठा प्रवास) १ यथार्थ ब्रह्मज्ञानानंतर येणारा मृत्यु. २ (ल) मरण; मृत्यु ॰प्राणपु. १ मोठ्या जोरानें व प्रयासानें केलेला उच्चार: हकारयुक्त उच्चार २ जोरानें आणि प्रयासानें उच्चारण्याचा वर्ण. जसें-ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, भ, आणि ह अल्पप्राण आणि बाह्य प्रयत्न पहा. ॰फणी-पु. मोठा साप. ॰फल-ळ-न. मोठे, उत्कृष्ट फळ; नारळ. फणस इ॰ ॰बलि-ळी-पु. पिशाच्चादिकांस संतुष्ट कर- ण्यासाठीं मांस, अन्न इ॰ चा बलि, अर्पण करावयाचा पदार्थ ॰बळी-वि. अत्यंत प्रबळ, सामर्थ्यवान्. 'महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।' -मारुतिस्तोत्र. ॰बळी बुटी-स्त्री. रुंदट पानाचें आलें. ॰भाग-वि. १ अतिशय भाग्यवान् 'नित्य निष्काम अतिप्रीतीं । मज भजती महाभाग ।' -एभा २४ ३३५. २ सद्गुणी; सद्वर्तनी. ॰भारत-न. व्यासप्रणीत कौरव-पांडवाच्या युद्धाचें भारतीयांचे पवित्र असें एक महाकाव्य; महापुराण ॰भूत-न. पृथ्वी, आप तेज, वायु आणि आकाश ह्या पंचमहाभूतांपैकीं प्रत्येक. 'तरी होसी गा तूं परब्रह्म । जें या महाभूता विसंवतें धाम ।' -ज्ञा १०. १४९. ॰भेड-वि. अत्यंत भितराः भेकड. 'मग विरा- टाचेनि महाभडें उत्तरें ।' -ज्ञा ११ ४६९. ॰मणि-पु. मौल्यवान् रत्न; हिरा, माणिक इ॰ 'कांचोटी आणि महामणी । मेरू मषक सम नव्हे ।' -ह १ ८४. ॰मति-मना-वि. थोर अंतःकरणाचा; उदार मनाचा; महात्मा. ॰मंत्र-पु. निरनिराळ्या देवतांचा मुख्य मंत्र. जसें-गायत्री हा ब्राह्मणाचा महामंत्र. 'महामंत्र आत्मप्रा- प्तीची खाणी ।' ॰मंत्री-पु. मुख्यप्रधान; मुख्य मंत्री सल्लागार. ॰महोपाध्याय-पु. मोठ्या शास्त्राला देतात ती एक सन्मानाची सरकारी पदवी. ॰म/?/त्र-पु. हत्ती हांकणारा; महात. 'मुरडावया मत्त हस्ती । महामात्र दोन्हीं हस्तीं । अंकुश हाणी तैसा श्रीपती । मर्मोद्धाटनें करितसे ।' -यथादी २.१६. ॰माया-स्त्री. १ पार्वती; दुर्गा. २ जगदुत्पादक शक्ति; सर्व संसाराला, प्रपंचाला कारणीभूत अशी देवता; आदिमाया; मूलप्रकृति ३ जहांबाज कजाग बायको. ॰मार-पु. मोठा मार, फटका. 'शुक्रबाणाचा महामारु ।' -मुवन ३.३८. ॰मारी-स्त्री. १ महामृत्यु. 'तेथ अचेतना झुंजारीं । न मरत्या महामारीं ।' -एभा २८.२५०. २ (ल.) प्राणसंकट. 'तिचेनि योगें महामारी पातली हे जाणिजे ।' -मुवन ७.१८७. ३ पटकी या सांथीचा रोग. ४ या रोगाची अधिष्ठात्री, दुर्गादेवी. ५ जिवापाड श्रम; शिकस्तीचा प्रयत्न. ६ हाणाहाणी; मारामारी; मोठें युद्ध. 'दोघे झुंजतां महा- मारी' -मुवन ३.३६. 'तैसी मांडिली महामारी ।' -कथा २.२.६०. ॰मृत्यू-पु. मरण; मृत्यू (अपमृत्युविषयीं बोलतांना उपयोग) जसें- 'अपमृत्यूचा महामृत्यु झाला.' ॰मृत्युंजय- (वैद्यक) एक औषध. ॰यंत्र-न. तोफ. ॰यज्ञ-याग-पु. मोठा यज्ञ; पंच महायज्ञांपैकीं प्रत्येक; पंचमहायज्ञ पहा. 'तरी महायाग- प्रमुखें । कर्मे निफज नाही अचुकें ।' -ज्ञा १८. १६६. ॰यात्रा- स्त्री. १ काशीयात्रा. २ (ल.) मरण; मृत्यु. 'आधीं पेशवाई सकट सगळ्यांना महायात्रेला धाडीन.' -अस्तंभा १६२. महा- प्रस्थान पहा. ॰रथ-रथी-पु. १ शस्त्रास्त्रांत प्रवीण असून दहा हजार धनुर्धारी योद्ध्यांबरोबर एकटाच लढणारा योद्धा. 'महारथी श्रेष्ठ । द्रुपद वीरु ।' -ज्ञा १.९८. २ (ल.) अत्यंत शूर, कर्तब- गार पुरुष किंवा मोठा वक्ता. ॰रस-न. १ ब्रह्म. २ पक्वान. -मनको. ॰राज-पु. १ सार्वभौम राजा; सम्राट. २ (आदरार्थी) श्रेष्ठ माणूस. ३ जैन, गुजराथी वैष्णव लोकांचा गुरु. ॰रात्रि- स्त्री. महाशिवरात्र माघ वद्य चतुर्दशी. ॰राष्ट्र-नपु. मराठे लोकाचा देश; उत्तरेस नर्मदानदी, दक्षिणेस कर्नाटक, पूर्वेस तैलंगण आणि पश्चिमेस समुद्र यांनीं मर्यादित असलेला प्रदेश; मुंबई इलाख्यां- तील एक विभीग. ॰राष्ट्र-राष्ट्रीय-वि. महाराष्ट्रदेशासंबंधाचे (लोक, भाषा, रिवाज इ॰). ॰राष्ट्र-भाषा-स्त्री. मराठी भाषा; संस्कृत-प्राकृत भाषेपासून झालेली एक देशी भाषा. ॰राष्ट्री- एक जुनी प्राकृत भाषा. ॰रुख-पु. एक प्रकारचे झाड; महावृक्ष. 'कर्वत लागला महारुखा । म्हणे पुढती न दिसे निका ।' -मुआदि ३३.२९. ॰रुद्र-पु. १ रुद्राभिषेकाचा एक प्रकार; अकरा लघुरुद्र; लघुरुद्राच्या उलट शब्द महारुद्र. २ मारुती. 'महारुद्र आज्ञेप्रमाणें निघाला ।' -राक १.१. ॰रुद्रो-पु. (गु.) बाजरीची मोठी जात हिचें काड फार उंच होतें -कृषि २७७. ॰रोग-पु. १ अत्यंत दुःखदायक असा रोग. याचे आठ प्रकार आहेत-वात- व्याधि, अश्मरी, कृछ्र, मेह, उदर, भगंदर. अर्श आणि संग्रहणी. कांहींच्या मतें हे नऊ आहेत; त्यांत राजयक्ष्मा हा एक जास्त असून कृछ्राऐवजीं कुष्ठ व संग्रहणीच्या ऐवजीं ग्रहणी अशीं नांवें आहेत. २ रक्तपिती; गलित कुष्ठ. महार्घ-वि. १ महाग; दुष्प्राप्य. 'महार्घ येथें परमार्थ जाला ।' -सारुह १.२१. २ मौल्यवान् [सं. महा + अर्घ] महार्णव-पु. मोठा समुद्र; महासागर. 'वनीं रणीं शत्रु-जलाग्निसंकटी । महार्णवीं पर्वत-वास दुर्घटीं ।' -वामन स्फुट श्लोक ३५. (नवनीत पृ. १३७.) -न. १ (ल.) मोंठें, दीर्घकाल चाललेलें भांडण; युद्ध; लढाई. 'दोघां मांडलें महार्णव । दाविती बळ प्रौढीगौरव ।' -निगा २४. २ प्रसिद्धि; डांगोरा; जघन्यत्व. ३ लहान काम, प्रकरण, गोष्ट इ॰ ला मोठें रूप देऊन सांगणें; राईचा पर्वत करणें. 'एवढ्याशा गोष्टीचें त्वां लागलेंच महार्णव केलेंस.' [सं. महा + अर्णव] ॰लय-पु. १ आश्रयस्थान; आश्रम; धर्मशाळा. २ देऊळ. ३ परमात्मा. ४ भाद्रपद वद्यपक्षां- तील पितरांप्रीत्यर्थ केलेलें श्राद्ध; पक्ष; मृतपितृकानें भाद्रपद शुद्ध पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत दररोज करावयाचें श्राद्ध. हें रोज करणें अशक्य असल्यास १५ दिवसांतून एका उक्त दिवशीं करावें. [महा + आलय] ॰लक्ष्मी-स्त्री. १ विष्णुपत्नी २ अश्विन शुद्ध अष्टमीस पूजावयाची एक देवता, त्या देवतेचे व्रत. ३ भग- वती; कोल्हापूरची देवी. ४ (ना.) ज्येष्ठागौरी; भाद्रपद शुद्ध नव- मीस पूजा करावयाच्या देवता. ॰लिंग-न. बारा ज्योतिर्लिंगांपैकीं प्रत्येक. ॰वटी, माहावटी-स्त्री. राजमार्ग. 'हे कपटाची कस(व)टी । अनृत्याची माहावटी ।' -भाए ७५५. ॰वस्त्र-न. उंची, सुंदर वस्त्र; प्रतिष्ठित वस्त्र; शालजोडी इ॰ ॰वाक्य-न. वेदांतील जीवब्रह्माचें ऐक्य दाखविणारें तत्त्वमसि आदि वाक्य हीं चार वेदांची चार आहेत. 'तो महावाक्याचेनि नांवें । गुरुकृपे- चेनि थांवें ।' -ज्ञा १८.४०४. २ गायत्री मंत्र. ॰वात-पु. (तासीं ८० मैल वेगाचा) सोसाट्याचा वारा; झंझावत; तुफान. 'महावात सूटला म्हणुनि का कंप येत भूघरा ।' -सौभद्र. ॰विषुव-न. मेष संपात; हरिपद. ॰वृत्त-न. ज्या वृत्ताची पातळी गोलाच्या मध्य बिंदूतून जाते तें वृत्त; मोठें वर्तुळ. ॰वोजा-वि. मोठ्या थाटांची; तेजस्वी. 'संतोषोनी महाराजा । सभा रचित महवोजा ।' -गुच ३४. ९७. [महा + ओजस्] ॰व्याधि-पु. महारोग; रक्तपिती. ॰शब्द- पु. बोंब; शंखध्वनि. ॰शय-पु. १ थोर पुरुष; महात्मा, २ मोठ्या माणसांस महाराज रावसाहेब याप्रमाणे संबोधावयाचा शब्द. [सं. महा + आशय; बं. मॉशे; फ्रें मुस्ये (माँसिय)] ॰शिवरात्र-त्रि-स्त्री. माघ वद्य चतुर्दशी. ॰शून्य-न. जें कांहींच नाहीं असें जें शून्यास अधिष्ठानरूप ब्रह्म तें; परब्रह्म. 'आतां महा- शून्याचिया डोहीं । जेथ गगनासीचि ठावो नाहीं ।' -ज्ञा ६. ३१५. ॰महाष्टमी-स्त्री. अश्विन शुद्ध अष्टमी. ॰सरणी-स्त्री. स्वर्गमार्ग. ' होउनि सुयोधनाचा शोकार्त वरो पिता महास- रणी ।' -मोभीष्म ११.१५. ॰सागर-पु. पृथीवरील पाण्याचा सागराहून मोठा सांठा; मोठासमुद्र. उदा॰ हिंदी महासागर. ॰सिद्धांत-पु. एकमेवाद्वितीयं ब्रह्म हा मुख्य सिद्धांत. 'आणि महासिद्धांतापासीं । श्रुति हारपती शब्देंसीं ।' -ज्ञा १५.४३४. ॰सिद्धि-स्त्री. अष्टमहासिद्धी पहा. 'जेथ महासिद्धींचीं भांडारें । अमृताचीं कोठारें ।' -ज्ञा ६.३२१. ॰सुख-न. ब्रह्मसुख; ब्रह्म साक्षात्कार. 'जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ।' -ज्ञा १.१४. ॰स्म(श्म)शान-न. काशीक्षेत्र. 'सदाशिव बैसता निजासनीं । महाश्मशानीं निजवस्ती ।' -एभा २.३१. ॰क्षेत्र-न. काशी- क्षेत्र. -रा ३.४७६. ॰महेंद्र-पु. १ हिंदुस्थानांतील पर्वताच्या सात रांगांपैकीं एक. २ इंद्राचें नांव. 'हें महेंद्रपदही पाविजेल । परि मोह हा न फिटेल ।' -ज्ञा २.६५. [महा + इंद्र] महेश, महेश्वर-पु. शिव; शंकर. [महा + ईश्वर] महेश्वरी पातळ-न. महेश्वर नांवाच्या गांवी (इंदूर संस्थान) तयार झालेलें वस्त्र, पातळ. 'आधींच कंबर बारिक त्यावर महेश्वरी पातळ कसलें ।' -होला ८९. महोत्सव, महोत्साह-पु. मोठा उत्सव; आनंद- दायक प्रसंग. [महा + उत्सव] महोदधि-पु. १ महासागर; मोठा समुद्र. ' महोदधीं कां भिनले । स्त्रोत जैसे ।' -ज्ञा १५.३१७. २ हिंदीमहासागर [महा + उदधि] महोदय-पु. माघ किंवा पौष महिन्यांत सोमवारी सूर्योदयीं अमावस्यारंभ श्रवण नक्ष- त्राचा मध्य आणि व्यतिपाताचा शेवट यांचा योग; एक मोठें पर्व. [महा + उदय] महौजा-वि. तेजस्वी; ज्याचें तेज मोठें आहे असा; सामर्थ्यवान् 'पुरुष श्याम महौजा ओढित होता बळेंचि मजला जो ।' -मोवन १३.८८. [महा + ओज] महान्-वि. १ मोठा; विस्तृत; थोर. २ उशीरा पिकणारें (धान्य, पीक); गरवें ३ दोन किंवा अनेक वर्षें टिकणारें (झाड, मिरची, कापूस, पांढरी तूर इ॰).

दाते शब्दकोश

अष्ट

वि. आठ संख्या; सामाश्ब्द-अष्टगुण, अष्टादश, अष्ट- विंशति व पुढील शब्द. [सं. अष्टन्] ॰क न. १ आठ पदार्थांचा समुदाय. २ पाणिनीच्या व्याकरणाचे (सूत्रपाठाचे) आठ विभाग आहेत त्यांतील प्रत्येक. ३ ऋग्वेदसंहितेचे पठणाच्या सोयीकरतां आठ भाग केले आहेत, त्यांतील प्रत्येक. ४ आठ श्लोकांचा समूह; एक काव्यरचनापध्दति. उ॰ मंगलष्टकें, करुणाष्टकें. [सं.] -वि. आठ किंवा आठवा. ॰कपाळ्या-वि. १ अष्टांगें-दोन हात, दोन पाय, दोन गुडघे, वक्षःस्थळ आणि कपाळ इतक्यांचा उपयोग करूनहि ज्यास कांहीं मिळत नाहीं तो. २ (ल.) पूर्णपणें दुर्दैंवी; आपद्ग्रस्त; भद्र्या; कपाळकरंटा. ॰कर्णिका-स्त्री. कमळाच्या पाकळ्या. 'माझें हृदय दिव्य कमळ । जें तेजोमय परम निर्मळ । अष्टकर्णिका अतिकोमळ । मध्यें घननीळ विराजे ।' -ह ३५.१. ॰कुलाचल-पु. मेरूच्या चारी दिशांत जे भारतादि वर्ष आहेत त्या प्रत्येकाची मर्यादा करणारे (नील, निषध, विंध्याचल, माल्यवान्, मलय, गंध- मादन, हेमकूट, हिमालय इ॰) आठ पर्वत. अष्टकोन-नी- ण-णी-वि. आठ कोन-बाजू-असलेली, (वस्तु, आकृति). ॰गंध-न. आठ सुगंधी द्रव्यें (चंदन, अगरु, देवदार, कोष्टको- लिंजन, कुसुम, शैलज, जटांमासी, सुरगोरोचन) एकत्र करून केलेलें गंध; (सामा.) उटणें. ॰गुण-वि. आठपट. -पु. आठ गुण. ब्राह्मणाचे आठ गुण-दया, क्षांति, अनसूया, शौच, अना- यास, मंगल, अकार्पण्य, अस्पृहा. बुध्दीचे आठ गुण- शुश्रूषा श्रवण, ग्रहण, धारण, चिंतन, ऊहापोह, अर्थविज्ञान, तत्त्वज्ञान. ॰गोल-गोली-वि. कांठापदरांवर वेलबुट्टी काढलेला (चौपदरी शेला). 'कोणासी पागोटें परकाळा । कोणी मागती अष्टगोली शेला -भक्तावि. ३०.४१. [सं. अष्ट + गो]. ॰गोळी-क्रिवि. सर्वतर्‍हेनें; एकंदर. ॰घाण-स्त्री. अतिशय दुर्गंधी-घाण. [अष्ट + घ्राण]. ॰ताल- झंपाताल पहा. ॰दल-ळ-वि. आठ पाकळ्यांचें; आठ पानांचें; अष्टकोनी; अष्टभुज. -न. १ कमळाच्या आकाराची काढलेली आठ पाकळ्यांची किंवा भागांची आकृति. 'गर्भे रचिली उदंडें । अष्टदळें । -ऋ ७३. २ एक प्रकारची रांगोळी. ३ (ना.) ताम्हण; संध्या- पात्रा; 'एक अष्टदळ आणवा.' ॰दानें-न. अव. आमान्न, उद- कुंभ, भूमि, गोदान, शय्या, वस्त्र, छत्र, आसन हीं आठ वस्तूंचीं दानें और्ध्वदेहिकांत द्यावयाचीं असतात. ॰दिक्पाल-पु. अंत- रिक्षाच्या आठ दिशा पालन करणार्‍या देवता. जसें-पूर्वेंचा इंद्र, आग्नेयीचा अग्नि, दक्षिणेचा यम, नैऋत्येचा नैऋत, पश्चिमेचा वरुण, वायव्येचा मारुत, उत्तरेचा कुबेर (सोम), ईशान्येचा ईश; अष्ट- दिग्पाल. 'इयेवरी सप्तसागर । मध्यें मेरु महाथोर । अष्टदिग्पाळ तो परिवार । अंतरें वेष्टित राहिले ।।' -दा ४.१०.१. ॰दिग्गज- -पु. ऐरावत, पुंडरीक वामन, कुमुद, अंजन, पुष्पदंत, सार्वभौम, सुम- तीक असे अष्ट दिशांस पृथ्वीचे आधारभूत आठ हत्ती आहेत. [सं.] ॰दिशा-स्त्री. आठ दिशा; दिक्चक्राचे आठ भाग-पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋ/?/त्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य. ॰देह- पु. देहाचे आठ प्रकार-पहिले चार पिंडीं व पुढील चार ब्रम्हांडीं. 'स्थूल, सूक्ष्म, कारण । महाकारण, विराट, हिरण्य । अव्याकृत, मूलप्रकृति जाण । ऐसे अष्ट देह ।' -दा ८.७.४०. ॰धा-वि आठ प्रकारचे; 'भूतें गुण मेळविजे । त्यासी अष्टधा बोलिजे ।' [सं.] ॰धामूर्ति- स्त्री. आठ प्रकारच्या मूर्ती. 'शैली दारुमयी लौही लेप्या लेख्याच सैकती । मनोमयी मणीमयी प्रतिभा अष्टधा स्मृता ।।' -एभा २७.९८-१०३; 'शैली, दारुमयी, लेप्या, लेख्या, सैकती अथवा सूर्यमंडळीं, जळीं, स्थळीं, अष्टमूर्तिस्वरूप श्रीहरीसी पूजावें ।' -अमृतध्रृव ६. अष्टमूर्ति पहा. ॰(देह)प्रकृति-स्त्री. पृथ्वी, पाणी, अग्नि, वायु, आकाश मन, बुद्धि आणि अहंकार मिळून आठ प्रकारे विभागलेली.... प्रकृति.' - गीर ७१५. ॰(विध)प्रकृति-असाहि वाक्प्रचार आहे. सत्व, रज, तम, व मूळ पांच तत्त्वें मिळून आठ प्रकारची प्रकृति. 'पंच भूतें आणि त्रिगुण । ऐसी अष्टधा प्रकृति जाण ।' -दा ६.२.१४. ॰धातू-पु. सोनें, रुपें, तांबें, कथील, शिसें, पितळ, लोखंड, तिखें (पोलाद). कोणी पोलादाच्या ऐवजी पारा धर- तात. 'अष्टधातु सायासें । जेवि विधिजेति स्पर्शें ।' -ऋ २०. ॰धार-वि. आठ धारा असलेलें. 'तंव तेणें साधकें एक अष्टधार आड धरिलें ।' -कृमुरा २२.९६. ॰नायका-नाईका-स्त्री. १ अव. श्रीकृष्णाच्या आठ आवडत्या पत्न्या-रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती, कालिंदी (सूर्यकन्या), मित्रवृंदा (अवंतिराजसुता), याज्ञजिती (यज्ञजितकन्या), भद्रा (कैकेयनृपकन्या), लक्ष्मणा (महेंद्रनाथकन्या). २ इंद्राच्या आठ नायका-उर्वशी, मेनका, रंभा, पूर्वचिती, स्वयंप्रभा, भिन्नकेशी, जनवल्लभा, घृताची (तिलोत्तमा). 'अष्टनायिका येऊनि । सर्वा घरीं नृत्य करिती ।' -ह २६.२२८. ३ (साहित्य) वासकसज्जा, विरहोत्कंठिता, स्वाधीनभर्तृका, कल- हातांरिता, खंडिता, विप्रलब्धा, प्रोषितभर्तृका, अभिसारिका. ॰नाग- पु. आठ जातीचे सर्प-अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, शंख, कुलिक, पद्म, महापद्म. ॰पत्री-वि. १ कोणत्याही विशिष्ट आका- राच्या (क्राऊन, डेमी) छापावयाच्या कागदाचीं आठ पृष्ठें होतील अशा तर्‍हेनें घडी पडणारें छापलेलें (पुस्तक) (इं.) ऑक्टेव्हो. 'पांच पांचशें पानांचे अष्टपत्री सांचाचें एक एक पुस्तक.' ॰पद- पु. १ कोळी वर्गांतील प्राणी-गोचीड, सूतकिडे, विंचू, कातीण वगैरे. (इं.) अर्कनिडा. २ आठ पायांचा काल्पनिक प्राणी. ॰पदरी-वि. आठ पदरांचा (शेला), आठसरांची (माळ), आठ पेडांची, धाग्यांची (दोरी) [सं. अष्ट + पल्लव] ॰पदी स्त्री. १ आठ पदांचा समुदाय. २ आठ चरणांचें एक कवन; कविताप्रकार. ॰पाकूळ न. (लुप्त). आठ पाकळ्यांचें फूल. ॰पाद-अष्टपद पहा. ॰पुत्ना-वि. आठ पुत्र आहेत जिला अशी (स्त्री). सौभाग्यवती स्त्रीला असा आशीर्वाद देतात. ॰पुत्री-स्त्री. विवाहामध्यें वधूला, काठाला हळद लावून नेसावयास दिलेलें शुभ्र वस्त्र. तिला पुष्कळ अपत्यें व्हावींत या इच्छेचें द्योतक. 'फेडिलें मायेचें वधूवस्त्र । अष्टपुत्र्या पीतांबर । नेसली कृष्णमय स्वतंत्र । तेणें सुंदर शोभली ।' -एरुस्व १६.१५. ॰म्ह-अष्टपुत्री मेहुणीकुत्री. ॰पैलू वि. १ ज्याला आठ पैलू (बाजू) आहेत असा (हिरा, रत्न). २ (ल.) हुषार; कलाभिज्ञ; व्यवहारचतुर (इसम). ॰पैलू माळ- (गोफ) स्त्री.घोड्याच्या गळ्यांतील दागिना; आठ पैलू असलेल्या मण्यांची माळ किंवा आठ पदर असलेली माळ. ॰प्रकृति, ॰विधप्रकृति अष्टधाप्रकृति पहा. ॰प्रधान- पु. राज्यकारभारांतील आठ प्रधान-प्रधान, अमात्य, सचीव, मंत्री, डबीर, न्यायाधीश, न्यायशास्त्री, सेनापति. अष्टप्रधानांची पद्धत शिवाजीनें सुरू केली. कांहीं जण वैद्य, उपाध्याय, सचीव, मंत्री, प्रतिनिधी, राजाज्ञा, प्रधान, अमात्य हे आठ मंत्री समजतात 'प्रधान अमात्य सचीव मंत्री । डबीर न्यायाधिश न्यायशास्त्री ।। सेनापती त्यांत असे सुजाणा । अष्टप्रधानीं नृप मुख्य जाणा ।।' हा श्लोक रूढ आहे. ॰फली-ळी,॰फळ-फल- स्त्रीन. अटोफळी पहा. ॰भार पु. ८००० तोळ्यांचा एक भार. असे आठ भार. 'नित्य प्रसवे अष्टभार सुवर्ण । सूर्यासम प्रभा परिपूर्ण ।' -ह २५. १५. ॰भाव पु. अव. (साहित्य.) शरीराचे सत्त्वगुणाचे आठ भाव, प्रकार-स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभंग किंवा वैस्वर्य, कंप किंवा वेपथु, वैवर्ण्य, अश्रुपात, प्रलय. पर्याय-कंप, रोमांच, स्फुरण, प्रेमाश्रु, स्वेद, हास्य, लास्य, गायन. -हंको. 'आठवीया दिवशीं नाश अष्टभावा । अद्वयानुभवासुखें राहे ।।' -ब ११०. 'अष्ट- भावें होऊनि सद्गद । आनंदमय जाहला ।' ॰भैरव पु. भैरव ही शिवगणांतील स्वतंत्र देवता असून तिचीं पुढील आठ स्वरूपें आहेत-असितांग, संहार, रुरु, काल, क्रोध, ताम्रचूड, चंद्रचूड, महा. यांतील कांहीं नांवांऐवजीं कपाल, रुद्र, भीषण, उन्मत्त, कुपति इत्यादि नांवें योजिलेलीं आढळतात. ॰भोग पु. आठ प्रकारचे भोगः- अन्न, उदक, तांबूल, पुष्प, चंदन, वसन, शय्या, अलंकार. ॰म वि. आठवा.-स्त्री. अष्टमा. ॰मंगल वि. (विरू) अष्टमंगळ. १ ज्याचें तोंड, शेपूट, आयाळ, छाती व चार खूर शुभ्र आहेत असा; कित्येकांच्या मतें ज्याचे पाय, शेपूट, छाती व वृषण शुभ्र आहेत व जो कटीप्रदेशीं भोवर्‍यांनीं युक्त (नावांकित) असून ज्याच्या कपाळावर कमलाकृति केसांचें वेटोळें असतें असा (घोडा). २ (सामा.) आठ शुभलक्षणांनीं युक्त असा (घोडा). -न. पुढील आठ मंगल वस्तूंचा समुदाय-ब्राम्हण, अग्नि, गाय, सुवर्ण, घृत, सूर्य, व राजा. कांहींच्या मतें सिंह, वृषभ, गज, पूर्णोदककुंभ, व्यजन, निशाण, वाद्यें व दीप (राज्याभिषेकाच्या समयीं या अष्ट मंगलकारक वस्तू लागतात). ॰मंगलघृत न. वेखंड, कोष्ट, ब्राह्मी, मोहऱ्या, उपळसरी, सेंधेलोण, पिंपळी व तूप या औषधांच्या मिश्रणानें विधियुक्त बनविलेलें तूप. हें बुद्धिवर्धक आहे. -योर २.६७०. ॰महारोग पु. आठ मोठे रोग-वातव्याधि, अश्मरी, कृछ्र (किंवा कुष्ठ), मेह, उदर, भगंदर, अर्श (मूळव्याध), संग्रहणी. महारोग पहा. ॰महासिद्धी- १ अणिमा = शरीर अत्यंत सूक्ष्म होणें; २ महिमा = शरीर मोठें होणें; ३ लघिमा = शरीर वजनांत हलकें होणें; ४ प्राप्ति = सर्व प्राण्यांच्या इंद्रियांशीं त्या त्या इंद्रि- यांच्या अधिष्टात्री देवतांच्या रूपानें संबंध घडणें; ५ प्राकाश्य = ऐकून ठाऊक असलेल्या व स्वर्गादि पारलौकिक स्थानीं, व दिसण्याजोगे इहलोकच्या स्थानीं भोग व दर्शनाचें सामर्थ्य येणें; ६ ईशिता = शक्तीची, मायेची व तिच्या अंशाची ईशाच्या ठिकाणीं व इत- रांच्या ठिकाणीं असणारी प्रेरणा; ७ वशिता = विषय भोगीत असूनहि त्यांच्या ठिकाणीं आसक्त न होणें; ८ प्राकाम्य = ज्या ज्या सुखाची इच्छा करावी तें तें सुख अमर्याद प्राप्त होणें. -एभा १५.४२. ते ४७. ॰मर्यादागिरी- पु. आठ मोठे पर्वत-हिमालय, हेमकूट, निषध, गंधमादन, नील, श्वेत, शृंगवान व माल्यवान. हे जंबुद्रीपांत असून ते त्यांतील नऊ वर्षी (भागां)च्या मर्यादा आहेत. ॰मांगल्य- न. त्रैवर्णिकांचा एक संस्कार. अठांगुळें पहा. ॰मातृका स्त्री. आठ ईश्वरी शक्ती-ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इद्रांणी, कौबेरी, चामुंडा. सामान्यतः कौबेरी सोडून या सात असतात. विवाहादि मंगलप्रसंगीं यांची पूजा करतात. 'वेगे आल्या अष्ट मातृका । एकी चढिन्नली वृश्चिका । वाराही ते सूकरमुखा । वर्‍हाड देखा निघालें ।।' -एरुस्व १४.५८. ॰मांश पु. १ आठवा अंश; भाग. २ (वैद्यक) ज्वर नाहींसा होण्यासाठीं आठभाग पाण्याचे सात भाग आटवून एक अंश उरवितात तो काढा. ॰मी- स्त्री. चांद्रमासांतील प्रतिपदेपासून आठवी तिथी; या महिन्यांतून दोन येतात-शुद्ध व वद्य. ॰मूर्ति स्त्री. पृथ्वी, जल, तेज, वायु, आकाश, सूर्य, चंद्र व ऋत्विज् या परमेश्वराच्या आठ मूर्ती; शंकर; महादेव; अष्टधामूर्ति पहा. ॰योगिनी स्त्री. अव. आठ योगिनी; पार्वतीच्या सख्या; या शुभाशुभ फल देणाऱ्या आहेत-मंगला, पिंगला, धन्या, भ्रामरी, भद्रिका, उल्का, सिध्दा, संकटा. दुसरा पाठ-मार्जनी, कर्पुरा तिलका, मलयगंधिनी, कौमुदिका, भेरुंडा, माताली, नायकी, जया (शुभाचारा). यांत कधीं कधीं सुलक्षणा, सुनंदा हींहि नांवें आढळतात. ॰वक्र अष्टावक्र पहा. ॰वर्ग पु. १ आठ औष- धींचा समुदाय-ऋषभ, जीवक; मेद, महामेद, ऋध्दि, वृध्दि, काकोली, क्षीरकाकोली. २ मौंजीबंधनांत मातृभोजनांत भोजनाच्या वेळीं आठ मुंज्या मुलांना भोजनास बोलावितात तें कर्म ॰वर्ग्य- र्ग्या- पु. अष्टवर्गास जेवणारा बटु; उपनयनाच्या दिवशीं मातृ- भोजनाच्या वेळीं आठ बटू भोजनास बोलावितात ते प्रत्येक. ॰वर्षा- वि. आठ वर्षें वयाची (कुमारिका); (त्यावरून लग्नाला योग्य झालेली) उपवर. ॰वसु- पु. अव. प्रतीमन्वंतरांतील आठ वसू. चालू मन्वंतरांतील धर्मऋषि व दक्षकन्या वसु यांचे पुत्र-धर, ध्रुव, सोम, आप, अनिल, अनल, प्रत्यूष, प्रभास. भागवतांत द्रोण, प्राण, ध्रुव, अर्क, अग्नि, दोष, वसु, विभावसु अशीं नांवें आढळतात. 'इंद्र चंद्र वरुण कुबेर । अष्टवसु गंधर्वकिन्नर ।' -ह २५.१४१ ॰वायन- न. आठ वस्तूंचें दान; हळकुंड, सुपारी, दक्षिणा, खण, सूप, कंठण, धान्य, कांचमणी, या आठ पदार्थांचें वायन (वाण) सौभाग्यसंपादनार्थ लग्नांत आठ ब्राह्मणांपैकीं प्रत्येकाला वधूकडून दिलें जातें. ॰विध समाधि- स्त्री. समाधियोगाचे आठ प्रकार-यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधि. ॰विधा शृंगारनायका- (साहित्य) अष्टनायका पहा. ॰विना- यक- पु. अव. गणतीचीं आठ स्थानें-१ मोरेश्वर गणनाथ, (जेजुरी नजीक मोरगांव जिल्हा पुणें). २ बल्लाळेश्वर (मूळ मुरुड हल्लीं पाली, खोपवली नजीक-जिल्हा कुलाबा). ३ विनायक (कर्जत नजीक मढ-जिल्हा कुलाबा). ४ चिंतामणी (लोणी नजीक थेऊर- जिल्हा पुणें). ५ गिरिजात्मक (जुन्नर नजीक लेण्याद्रि-जिल्हा पुणें). ६ विघ्नेश्वर (जुन्नरनजीक ओझर-जिल्हा पुणें). ७ गणपति (नगर सडकेवर रांजणगांव-जिल्हा पुणें). ८ गजमुख (दौंड नजीक सिध्द- टेक-जिल्हानगर). ॰विवाह- पु. विवाहाचे आठ प्रकार-१ ब्रह्म = सालंकृतकन्यादान; २ गंधर्व = उभयतांच्या अनुमतीनें; ३ राक्षस = जब- रीनें कन्या हरण करून; ४ दैव = यज्ञप्रसंगीं ॠत्विजास कन्यादान करून; ५ आर्ष = गाय, बैल घेऊन कन्यार्पण; ६ प्राजापत्य = धर्माचरणार्थ कन्यापर्ण; ७ असुर = शुक्ल घेऊन; ८ पैशाच = कन्या चोरून आणून पत्नी करणें. सविस्तर माहिती धर्मसिंधु परिच्छेद ३ पूर्वार्ध पहा. ॰सात्विक भाव- अष्टभाव पहा. ॰सावध- वि. पुष्कळ गोष्टींकडे एकदम लक्ष पुरविणारा-देणारा; अष्टवधानी. ॰सिद्धि- अष्टमहा सिद्धि पहा. 'अष्ट सिद्धि चामरें घेऊनी । वरी वारिती अनुदिनीं ।' -ह १.१५. ॰सृष्टी- स्त्री. काल्पनिक, शाब्दिक, प्रत्येक्षा, चित्र- लेपा, स्वप्नी (स्वप्नसृष्टि), गंधर्वा, ज्वरिका (ज्वरसृष्टी), दृष्टी- बंधना. दा- ६.६.५१. [सं.]. ॰क्षार- पु. पळस, निवडुंग, सज्जी, आघाडा, रुई, तीळ, जव व टांकणखार.

दाते शब्दकोश