मराठी बृहद्कोश

नऊ मराठी शब्दकोशांमधील २,६२,७३६ शब्दांचा एकत्रित संग्रह

संबंधित शब्द

अभिराम      

वि.       १. सुंदर; रमणीय. २. आनंददायक; आल्हादकारक; सुखदायक; समाधानकारक.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आनंदवन

न. आनंद; सुख; सुख-आनंद देणें; पावणें. -वि. आनंददायक; आल्हादकारक. 'वरी आनंदीनी श्रीकृष्णकथा ।' -दाव २७.

दाते शब्दकोश

अर्धमुकुल दृष्टि, अर्धमुकुल दृष्टी      

स्त्री.       (नृत्य.) अर्धवट डोळा उघडणे; पापण्यांचे केस एकमेकांस लागतील इतक्या पापण्या मिटणे; आल्हादकारक सुगंध, सुखस्पर्श ह्या गोष्टींचा या अभिनयाने अर्धबोध होतो. [सं. मुकुल=किंचित उमलेली कळी.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कलानिधी, कलानिधी      

पु.       चंद्र : ‘आल्हादकारक कलानिधी परंतु न्यून क्षयासहित ।’ - सीता स्वयंवर. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कवित-ता-त्व-त्र-कवीत

नस्त्री. १ कवन; काव्य; पद्य; आल्हादकारक पद्यरचना; रसयुक्त वाक्यरचना. २प्रतिभा- संपन्न (गद्य, पद्य,) रचना. ' जेणें अनुताप उपजे । जेणें लोकिक लाजे । जेणें ज्ञान उमजे । या नाव कवित्व । ' -दा १४.३. ४८. [सं.]

दाते शब्दकोश

सुहाव

पु. १ आवड; प्रीति; प्रेम. 'एकु सुहावे पवाडे पढतु ।' -दाव ८४. २ (ल.) ब्रह्मसुख. -शर. -वि. सुशोभित; आल्हादकारक; मधुर. 'आणि शाब्दादिक सुहावे ।' -ज्ञा १५. १६१. [सं. सुभट] सुहावणें-क्रि. १ सुशोभित करणें. २ रचना, उभारणी करणें. 'वरि मंडप सुहाविला ।' -स्वादि १०.१. २.३. तयार करणें. 'जन्ममृत्यूची सुरंगी । सुहाविली निलागी ।' -ज्ञा १३.४८.

दाते शब्दकोश

कला-ळा

स्त्री. १ लिहिणें, वाचणें, गाणें, घोड्यावर बसणें, चित्रें काढणें इ॰ कौशल्याचीं कामें; कला चौसष्ट आहेत. चौसष्ट कला पहा. २ चतुराईची यांत्रिक वगैरे योजना; तिच्या रचनेचें ज्ञान; चालविण्याची युक्ति; त्यांपासून विवक्षित फल उत्पन्न करण्याचें चातुर्य; त्याची गुप्त खुबी, किल्ली, मख्खी; यटक. ३ चतुराई; बुद्धिकौशल्य; शोधक बुद्धि; कसब; युक्ति; लीला. 'तुका म्हणे त्याची कोण जाणें कळा । वागवी पांगुळा पायावीण ।' -तुगा ३६७७. 'तयांत फिरती तरी करिती अप्स- रांच्या कला' -नरहरी, गंगारत्नमाला १४३. (नवनीत पृ. ४३२.) ४ चंद्राच्या बिंबाचा सोळावा भाग; प्रत्येक दिवशीं वाढणारी किंवा कमी होणारी चंद्राची कोर. 'चंद्रासि लागती कळा । उपराग येतो ।' -र २. ५ वेळाचें एक परिमाण सुमारें ८ सेकंदाबरोबर; ३० काष्ठा म्हणजे एक कला. ६ एक अंशाचा (वर्तुळाच्या ३६० व्या भागाचा) एकसाठांशावा भाग. ७ पदार्थमात्राचा (सोळावा किंवा लहानसा) अंश; लेश; लव; तीळ; रज; कण. ८ कांति; टवटवीतपणा; स्वच्छपणा; नितळपणा; सौंदर्य; तेज; चमक (माणसाच्या चेहेर्‍यावरील). 'राजसुकु- मार मदनाचा पुतळा । रविशशि कळा लोपलिया ।' -तुगा २. 'घराची कळा अंगण सांगतें.' ९ सूर्य; पृथ्वी व परप्रकाश खस्त पदार्थ यांमध्यें कोण झाल्यामुळें पृथ्वीवरून त्या पदार्थाची जी कांहीं प्रकाशित व अप्रकाशित आकृति दिसते ती. -सृष्टिशास्त्र १३८. ग्रहाच्या प्रकाशित भागाचा जो अंश आपणांस वाढतांना किंवा कमी होतांना दिसतो तो. -ब्रूस, ज्योतिःशास्त्राचीं मूल- तत्त्वे. १० (प्राणिशास्त्र) शरीरांतील नाजुक त्वचेसारखा पडदा. (इं.) इंटरनल मेंब्रेन. ११ (अश्व) कुच आणि कुष्किका- घोड्याचे अवयव. -अश्वप ६४. १२ (ताल) मात्रा; नियमा- नुसार तालाचे झालेले भाग; हे आठ आहेत-ध्रुवका; सर्पिणी, कृष्णा, पद्मिणी; विसर्जिता; विक्षिप्ता; पताका व पतिता. १३ (ताल) खाली; टाळी न वाजविणें. १४ शास्त्राचा व्यावहारिक उपयोग; कोणत्याहि उद्दिष्ट विषयास उद्दिष्ट प्रसंगीं शास्त्रीय सिद्धांत लागू करणें (शास्त्र याच्या विरुद्ध). -सुकौ १२. [सं.] ॰तीत-वि. अत्यंत सूक्ष्म; अंशाच्या विभागाच्या पलीकडला; मायेच्या पलीकडला. 'कलितकाळ कौतूहल । कलातीत ।' -ज्ञा १८.३. [सं.] ॰निधि-पु. चंद्र. 'आल्हादकारक कलानिधि परंतु न्यून क्षयासहित ।' -सीता स्वयंवर. (नाको.) [सं.]

दाते शब्दकोश

नारळ

पु. १ एक फळ; नारिकेल. २ (स्त्री.) नारळीचें झाड; माड. ३ (ल.) डोचकें; टकलें; बोडकें. [सं. नारिकेल; सिं. नारेलु] ॰हातीं देणें-१ घालवून देणें; काढून टाकणें. २ जाण्या- साठीं निरोप देणें. ॰पंचा हातीं देणें-काम न करतां विन्मुख परत पाठवून देणें. ॰कांकडें-न. नारळ व त्याच्यासारखे इतर पदार्थ. [नारळ + काकडी] ॰गळया-वि. मोठें भोंक, भगदाड असलेलें; ज्यांतून नारळसुद्धां गळूं शकेल असें (मोठें छिद्र) (अतिशयोक्तीनें फाटक्या मोडक्या वस्तूस म्हणतात). ॰पाक, नारळी पाक- पु. साखरेच्या पाकांत खोबर्‍याचा कीस घालून बरफीसारख्या केलेल्या वड्या. ॰माड-पु. १ नारळ येण्यासाठीं राखलेलें नार- ळीचें झाड. याच्या उलट भंडारमाड = ताडीकरितां राखून ठेवलेलें. २ (देशावर) नारळीचें झाड. याच्या उलट इतर ताड इ॰ झाडें. नारळाचा चऊ-व-पु. (कों.) नारळाचा कीस. 'काढला नार- ळाचा चऊ ।' -मसाप २.१. नारळाची आई-स्त्री. १ नार- ळाची करवंटी; नरोटी. २ (ल.) (भिक्षेकरी नरोटी घेतात त्या वरून) भिक्षापात्र; दारिद्र्यावस्था. (क्रि॰ हातीं येणें). नारळी- स्त्री. १ नारळाची अर्धी करवंटी (भांड्यासारखी उपयोगी); नरोटी. २ नारळाचें झाड. हें झाड चाळीस पन्नास हात उंच सरळ वाढतें. सह्याद्रीच्या प्रदेशांत माड फार येतात. अव्वल प्रतीच्या झाडास प्रतिवर्षीं ५०० पर्यंत नारळ येतात. झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग आहे. सोटापासून खांब, तुळया इ॰; चुडता पासून शाकार, सर्पण; खोबरें खाण्याच्या व तेल काढण्याच्या उपयोगी; काथ्यापासून लोड, तक्के, दोर्‍या, गलबतावरील पालें; चटया होतात; पेंड गुरास घालतात; करवंट्यांचें तेल औषधी आहे. खोबर्‍याच्या किसापासून मुठेल तेल तयार होतें; तें व्रण, जखमा इ॰ भरून काढाण्यास उपयोगी पडतें. नारळी कांठ- पदर-वि. पदारामध्यें जरीची नारळाच्या झाडाची नक्षी काढलेलें (लुगडें, पागोटें इ.) 'नवीन तर्‍हा नारळी डोईला । पदर पागोट्याची फिरकी ।' -होला १७. नारळी पदरी पोषाख-पु. जेथें सन्मानार्थ वस्त्र द्यावयाचें तेथें नारळ देणें. नारळी झांप-स्त्री. प्रत्येक नारळीच्या झावळ्यावरील कर. नारळीपात्र-न. नरोटी; नारळी अर्थ १ पहा. नारळी पुनव- पौर्णिमा-स्त्री. श्रावणी पौर्णिमा. या दिवशीं पावसाळा संपला असें मानून समुद्राची पूजा करून त्यांत नारळ टाकतात. नारळी भात-पु. नारळाचा कीस घालून तयार केलेला भात. नारळेल-न. १ नारळाचें काढलेलें औषधी तेल. २ खोबरेल तेल. नारळ्या-पु. (कों.) समुद्राच्या कडेला मासे खावून राहणारा, पिवळ्या पायाचा, चोंचीचा व पांढर्‍या रंगाचा पक्षी; हा मारून खातात. नारिकेल-ली-पुस्त्री. नारळाचें झाड. नारळ-ळी पहा. नारि- केल-न. नारळ (फळ). नारिकेल पाक-पु. १ नारळांतलें खोबरें किसून तें साखरेच्या पाकांत घालून केलेलें एक मिष्ट खाद्य; नारळीपाक पहा. २ (ल.) (साहित्य) नारळाची कवटी कठीण असते यावरून ज्यांतला गूढ अर्थ उकलण्यास बराच परिश्रम लागतो अशा प्रकारचा लेख, प्रबंध, भाषण इ. याच्या उलट द्राक्षापाक. ३ एक औषधी पाक. नारिकेल-पाकन्याय-नारळ बाहेरून खडबडीतदिसतो. पण तो फोडण्याचे श्रम घेतल्यावर आंत गोड असें खोबरें सांपडतें. त्याप्रमाणें वरून ओबडधोबड दिसणार्‍या वस्तूच्या पोटांत शिरलें म्हणजे माधुर्य आढळतें. 'जे गत वृत्तांत अतज्ज्ञ जनांस बाह्यता केवळ नीरस वाटतात. त्यांच्या आंत नारिकेलपाकन्यायानें अत्यंत आल्हादकारक व उत्साहप्रद असा रससंचय असतो.' -नि. नारेळ-ळी-नारळ-ळी-पहा.

दाते शब्दकोश

मन

न. १ चित्त; चित्शक्ति; बुद्धि, विचार, तर्क, स्मृति इ॰ चें अधिष्ठान; अंतःकरणचतुष्टय आणि अंतःकरण पंचक पहा. २ अंतःकरण; हृदय; भाव, रस, विकार इ॰ चें अधिष्ठान; सुखदुः खादिकांचें ज्ञान करून देणारें इंद्रिय. ३ सदसद्विवेकबुद्धि; बरें- वाईट समजण्याची शक्ति; अंतर्याम. 'ज्यांचे मन त्यास ग्वाही देतें.' ४ जाणीव; आत्मबोध; भान; सावधपणा; शुद्धि. ५ संकल्पवि- कल्पात्मक अंतःकरणवृत्ति; इच्छा; निश्चयाशक्ति. 'संकल्प विकल्प तेंचि मन ।' -दा १७.८.६. ६ आवड; अंतःकरणाची ओढ, प्रवृत्ति; खुषी; मर्जी. ७ माया ८ प्रेम; लक्ष. [सं.] 'तुजवरिमन ईंचे यापरी कां इयेला ।' -र ४२. ९. ध्यान. म्ह॰ १ मनीं वसें तें स्वप्नीं दिसे. २ मन राजा, मन प्रजा. ३ मनांत एक, जनांत एक. ४ मनांत मांडे, पदरांत धोंडे. ५ मनीं नाहीं भाव, देवा मला पाव. ६ मनीं वसे तें स्वप्नीं दिसें. ७ मान जना, अपमान मना. ८ मन जाणे पापा माय जाणे मुलाचे बापा. ९ मनास मानेल तो सौदा. (वाप्र.) ॰उठणें-उडणें-आवडेनासा होणें; कंटाळा, तिटकारा, वीट येणें. 'ह्या सखलादी अंगरख्यावरून अलीकडे माझें मन उडालें आहे.' ॰कांपणें-दुःख होणें; भीति वाटणें. 'व्यूढोरस्कादिक नव मेले, मन कांपतें कथायाला ।' -मोभीष्म ९.६२. ॰खचणें- कचरणें-हिंमत सुटणें; हातपाय गळाठणें. ॰खाणें-आपण केलेल्या वाईट कृत्याबद्दल स्वतःलाच वाईट वाटणें; टोंचणी लागणें; पश्चात्ताप होणें. ॰गडबडणें-भीतीनें भरणें; गांगारणें; घाबरणें 'गडबडतें मन वेडें, माणुस मीं मीं म्हणोनि बडबडतें ।' -मोशल्य ४.४९. ॰घालणें-देणें-लावणें-मन एकाग्र करणें; लक्ष लावणें. ॰जाणें-इच्छा होणें. ॰तुटणें-मनांत कंटाळा, अप्रीति उत्पन्न होणें; मन पराङ्मुख होणें. म्ह॰ तुटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं. ॰थोड्यासाठीं निसरडें करणें-क्षुल्लक फायद्या- साठीं निश्चयापासून पराङ्मुख होणें. ॰दुग्ध्यांत पडणें-संशयांत पडणें; गोंधळणें. 'आतां माझें मन दुग्ध्यांत पडलें.' -बाळ २.१९५. ॰धरणें-१ एखाद्याच्या मनाप्रमाणें वागणें. २ हांजी हांजी करणें. 'आदर देखोनि मन धरी । कीर्तीविण स्तुती करी ।' -दा २. १०.२५. ॰पाहणें-मनाची परिक्षा करणें; (एखाद्याच्या) मनाचा कल अजमावणें; एखाद्याचे विचार त्याचें भाषण, वागणूक इ॰ वरून ठरविणें. ॰बसणें-लागणें-(कांहीं गोष्ट करावयास) अनु- कूल होणें; अतिशय आवडणें; आसक्त होणें; प्रिय वाटूं लागणें. 'नको कचा मज टाकुनि जाऊं, तुजवरि मन हें बसलें रे ।' ॰मनाविणें-मन वळविणें; मर्जी संपादणें; अनुकूल करून घेणें. ॰मानेल तसें करणें-इच्छेस येईल तसें करणें; स्वैर वर्तन करणें; स्वच्छंदानें वागणें. ॰मारणें-इच्छा मारणें; इच्छा दाबून ठेवणें. ॰मिळणें-उभयतांच्या आवडीनिवडी सारख्या असणें. 'स्त्री- पुरुषांचीं मनें मिळालीं नाहींत तर त्यांचा संसार सुखावह होऊं । शकत नाहीं.' ॰मुंडणें-इच्छा नाहींशी करणें. 'आधीं मन मुंडा व्यर्थ मुंडितां मुंडा ।' -मृ ६५. ॰मोठें करणें-उदारपणा दाखविणें; थोरपणानें वागणें. ॰मोडणें-एखाद्याची आशा विफल करणें; एखाद्याच्या इच्छेविरुद्ध वागणें; दुःख देणें. 'जयाचेनि शब्दें मन मोडे । तो एक पढतमूर्ख ।' -दा २.१०.६. ॰विटणें-कंटाळा, वीट येणें. 'बहुवीरक्षय घडला, तेणें बहुजीवितास मन विटलें ।' -मोभीष्म ११.७४. मनांत आणणें-संकल्प, निश्चय करणें; मना- वर घेणें. मनांत (मनीं) कढविणें-मनांतल्या मनांत रागानें चूर करणें. जळफळावयास लावणें. 'निजतेजें भानुला मनीं कढवी ।' -मोविराट ३.१२०. मनांत (मनीं) कालवणें-अंतःकरणांत अति शय कष्टी होणें; अतिशय दुःख होणें. 'बहुत दुःख मनीं जरिं कालवें । भिउनि ह्यास तयास न बोलवे ।' मनांत गांठ ठेवणें-मनांत वैरभाव, द्वेषबुद्धि, सूड घेण्याची इच्छा जागृत ठेवणें; अढी धरणें. मनांत गांठ बांधणें-घालणें-नीट ध्यानांत धरून ठेवणें; मनांत गोष्ट पक्की ठेवणें. मनांत चरचरणें-मनास काळजी, भीति वाटणें; दुःख होणें. मनांत ठेवणें-एखादी गोष्ट गुप्त राखणें; वाच्यता न करणें. मनांत नवमण जळणें-मनांतल्या मनांत संतापणें; मनांत द्वेष, सूड घेण्याची इच्छा जागृत ठेवणें. मनांत भरणें-पसंत पडणें; आवडणें. मनांत (मनीं) मांडे खाणें- व्यर्थ मनोरथ करणें; मनोराज्य करणें. मनांत (मनीं) म्हणणें-स्वगत बोलणें; स्वतःशीं पुटपुटणें. मनांतल्या मनांत जळणें-आंतल्या आंत जळफळणें; रागानें धुसमत राहणें. मनांतून उतरणें-आवडेनासा होणें; कंटाळा, वीट येणें. मनानें करणें- (कोणाची सल्ला न घेतां) स्वतःच्या विचारानें करणें. मनानें घेणें-मनाचा ग्रह होणें; मत बनणें. मनाला द्रव येणें-मनांत दया, प्रेम इ॰ कोमल भावना उत्पन्न होणें. मनाला लावून घेणें-अतिशय दुःख वाटणें. 'कल्पनेला सुचतील त्या गोष्टी मनाला लावून घेत बसले म्हणजे खाल्लेलं अन्न सुद्धां अंगीं लागा- यचं नाहीं.' -एक ४३. मनावर घेणें-धरणें-एखादी गोष्ट पत्करणें; तींत मन घालणें; सिद्धिस नेण्यास झटणें. 'झटता तुझा सखा तरि होतें हित, परि न हा मनावरि घे ।' -मोभीष्म ३.३. मनावर लिहून ठेवणें-कायमची आठवण ठेवणें; स्मृति- पटलावर कोरून ठेवणें. मनास (मनां) आणणें-१ लक्ष देणें; मानून घेणें. 'आम्ही वेडें बगडें गातों मनाशीं आणा ।' -ऐपो १४२. २ समजून घेणें. 'म्हणे पैल ते कोण ललना । कां तप करिते आणीं मना ।' -ह २६.२९. ३ मनावर घेणें; महत्त्वाचें मानणें; 'मी रागाच्या वेळीं बोललों तें मनास आणूं नका.' मनास येणें-वाटणें-आवडणें; पसंत पडणें. 'वारूबाई! पाहिलीस कां भावजय? येते का मनास?' -पकोघे. मनीं ठेवणें-गुप्त ठेवणें. 'चाल पुरा, हें मनींच ठेवून ।' -मोविराट ६.५२. मनीं जाण होणें-ओळखणें; जाणणें. मनीं धरणें-वागविणें-लक्ष्यांत असूं देणें. 'ह्यालागीं तुम्हाशीं बोधिलें । मनीं धराल म्हणोनिया ।' मनींमानसीं-मनोमानसीं-मनोमनी नसणें-(एखादी गोष्ट) अगदी मनांत देखील आलेली नसणें; स्वप्नींहि नसणें. मनो मन(य) साक्ष-१ मन मनाची साक्ष देतें. ज्यांना परस्परांविषयीं तिटकारा किंवा प्रेम वाटतें अशा मनुष्यास उद्देशून योजतात; एखाद्या गोष्टीबद्दल एकमेकांचे विचार एकमेकांना अंतर्मनाने कळतात या अर्थीं. २ मन स्वतःसाक्षी आहे; स्वतःच्या मनांतील अभिप्राय, उद्देश, भाव इच्छा इ॰ स्वतःस माहीत असतात. साधित शब्द.- मनाचा-वि. मनासंबंधीं; अंतःकरणाचा. मनाची आशा- ओढ-धांव-स्त्री. मनाचा कल, रोंख. सामाशब्द- ॰उथळा- वि. मोकळ्या मनाचा, साधा; छक्केपंजे न जाणणारा. ॰ओळख- स्त्री. एखाद्याच्या मनाची परीक्षा; स्वभावाविषयीं बनविलेलें मत. 'कोणाशीं वाईट बोलूं नये. कां? तर मनओळख होते.' ॰कपटी- वि. दुष्ट अंतःकरणाचा; लबाड. मनःकल्पित-वि. कल्पनेनें, तर्कानें केलेलें; काल्पनिक. मनकवडा-पु. दुसऱ्याचें मन वेधून घेण्याची शक्ति. 'मन माझें मोहिलेंस नकळे आहे तुझ्यापशीं मन- कवडा ।' -प्रला १६१. -वि. दुसऱ्याच्या मनांतील विचार ओळखणारा. ॰कामना-स्त्री. अंतःकरणांतील इच्छा. [मन + कामना] ॰कुजका-वि. हलक्या मनाचा; दुष्ट; विश्वासघातकी. मनःकृत- करणाचा. मनखोडी-स्त्री. मनोविकार. 'देवनाथ तुज हात जोडि मनखोडी सकळ सांडी ।' -देप ६३. मनच्या मनीं-क्रिवि. मनांतल्या मनांत; आपलें म्हणणें काय आहे हें न सांगतां. ॰गाडून-क्रिवि. मन लावून; अंतःकरणपूर्वक; एकाग्रतेनें. ॰देवता-स्त्री. अंतःकरणांतील देवता. १ मन; अंतःकरणांतील तर्क, आशा इ॰ ची प्रेरक शक्ति (क्रि॰ लवणें; वाहणें). 'यंदा सस्ताई होईल कीं महागाई? तुमची मनदेवता कशी लवते?' २ सदसद्विवेकबुद्धि; न्यायबुद्धि. ॰धरणी-स्त्री. मर्जी संपादन करणें; आर्जव; खुशामत. (क्रि॰ करणें) ॰धरणीचा-वि. दुस- ऱ्याचीं आर्जवें, खुशामत करण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा; मर्जी संपादणारा. ॰पाकुळका, मनाची पाकुळका, मन- पिंगळा-ळी-स्त्री. बऱ्यावाईट गोष्टी करण्याची प्रेरणा करणारी मनांतील देवता; मनोदेवता. मनःपीडा-स्त्री. मानसिक त्रास; दुःख, काळजी इ॰. मनःपूत-क्रिवि. (मनाला जें पवित्र, शुद्ध वाटतें त्याप्रमाणें) मनास येईल तसें; वाटेल तसें. 'कोणी वाटेल तें भलभलतें करूं लागला म्हणजे तो मनःपूत वागतो असें आपण म्हणतों.' -गीर १२५. म्ह॰ मनःपूतं समाचरेत् । मनःपूर्वक- क्रिवि. १ मनापासून २ जाणून बुजून; मुद्दाम. मनःप्रिय-वि. मनाला आनंद देणारें; समाधानकारक. मनभाव-पु. उत्सुकता; श्रद्धा; भक्ति; मनोभाव. 'मनभाव असल्यावांचून कार्य सिद्धिस जात नाहीं.' [सं. मनोभाव] ॰भूक-स्त्री. काल्पनिक, खोटी भूक; नेहमीच्या सरावामुळें वाटणारी भूक. ॰भोळा-वि. साधा; गरीब; निष्कपटी. ॰मन-स्त्री. (व) मनधरणी; खुशामत; आर्जव. ॰मानेसें-क्रिवि. मनास वाटेल तसें; मनःपूत. 'वर्तति मनमानेसें सुरतपदा अपतिका स्त्रिया बटकी ।' -मोसभा ६.२०. ॰मान्य- वि. स्वेच्छाचारी; स्वच्छंदी; बेताल. ॰मिळाऊ-वि. सर्वांशीं मिळून मिसळून राहणारा; गोड स्वभावाचा. ॰मुक्त-क्रिवि. यथेच्छ; अमर्यादपणें; मनमुराद; मनाची इच्छा पूर्ण होईपर्यंत. ॰मुराद- वि. १ मनोहर; आल्हादकारक; आनंददायक. २ विपुल; यथेच्छ; मनसोक्त; मनाची तृप्ति होईल इतकें (जेवणांतील पक्वान्न) [अर. मुराद = ईप्सित] ॰मेळ-वि. १ आवडतें; प्रिय; मनोहर. २ शास्त्र इ॰ चा फारसा विचार न करतां दोन्ही पक्षांच्या संमतीनें झालेलें (लग्न). ॰मोकळ-वि. खुल्या दिलाचा; सरळ; निष्कपट. ॰मोकळें करून-क्रिवि. खुल्या अंतःकरणानें; संकोच, भीति, लाज इ॰ सोडून. ॰मोठा-वि. १ उदार अंतःकरणाचा. २ उदार; सढळ; मोकळ्या हाताचा. ॰मोड-स्त्री. हिरमोड; निराशा. 'नको करूं मनमोड ।' -पला २२.४. ॰मोहतिर-न. मनाचा, मनानें ठरविलेला मुहूर्त; ॰मोहन-वि. मनाला खुष करणारा; रमणीय; आवडता; प्रिय. 'मनमोहन यादवराणा । कोणी जाउनि आणा ।' ॰मौज-स्त्री. १ गमतीचा विचार, कल्पना. २ लहर; नाद; छंद. ॰मौजा-करणें-स्वःच्या (रंगेल, अनिर्बंध) इच्छा तृप्त करणें. ॰मौजी-ज्या-वि. १. लहरी; छांदिष्ट; चंचलबुद्धि. २. मिजास- खोर; दिमाखी. ॰लज्जा-स्त्री. स्वाभविक, नैसर्गिक लाज; मनो- देवतेची टोंचणी; भीति; शरम; शिष्टाचार; संभावितपणा. 'तुला मनलज्जा नाहीं जनलज्जा तर धर.' ॰वळख-स्त्री. मनओळख पहा. ॰मनश्शांति-स्त्री. मनाची शांतता. ॰मनःसंतोष-पु. मनाचें समाधान; मनास होणारा आनंद. मनसमजावणी-समजा वशी-स्त्री. रागावलेल्या, दुःखी, सचित माणसाचें सांत्वन, समा- धान करणें. ॰समजूत-स्त्री. ग्रह; मत; समज; भावना. 'सर्व मनुष्यांची मनसमजूत एकसारखी असत नाहीं.' ॰समर्पण-न. (काव्य) मन अर्पण करणें. मनसाराम-पु. (विनोदानें) मन. 'मनसारामाचे स्वाधीन सर्व इंद्रियें आहेत.' ॰सुटका-स्त्री. मन एखाद्या गोष्टीपासून परावृत्त होणें. ॰सूत्र-न. इच्छानुरूप सत्ता चालविणारें, वागणारें, मन. ॰सोक्त-क्रिवि. यथेच्छ; स्वैर; स्वच्छंद. मनःपूत पहा. 'पशुपक्षी यांचा मनसोक्त व्यवहार आहे.' ॰सोद्दिष्ट-वि. मनांत योजिलेलें, ठरविलेलें, निश्चित केलेलें. मनस्तप्त-वि. १ दुःखदायक. २ अनुतापी; दुःखपीडित. मन- स्ताप-पु. (मनाला होणारा त्रास) दुःख; शोक; पश्चात्ताप; हुर- हुर; खिन्नता इ॰ मन(नः)स्थिति-स्त्री. १ मनाची स्थिति; मान- सिक अवस्था, भावना. २ मन. 'माझी मनस्थिति चंचल आहे.' ॰हलका-वि. दुर्बल; क्षुद्र मनाचा. ॰मनाकळित-वि. मनानें आकलन केलेलें. मनाजीपंत-पु. (विनोदानें) मन. मनाजोगा-वि. जसा हवा तसा; मनासारखा. मनापासून- क्रिवि. खरोखरी; बेंबीच्या देंठापासून; अतिशय; फार. मनापून- क्रिवि. खरोखरीं. मनायोग-ग्य-वि. क्रिवि. स्वेच्छेनें; मर्जीप्रमाणें. मना- सारखा-वि. इच्छेसारखा; आवडीचा; जसा पाहिजे तसा. मनुबाई-स्त्री. मन. मनेच्छ-च्छां-क्रिवि. मनसोक्त; यथेच्छ; मनाचें समाधान होईपर्यंत. 'नदी पुलिनी गंगातिरीं । क्रिडा करिती मनेच्छां ।' [मन + इच्छा] मनेच्छा-स्त्री. मनाची इच्छा; प्रवृत्ति, कल मनेप्सित-न. मनोवांछा; मनाची इच्छा. -. -वि. मनानें इच्छिलेलें; मनोवांछित. [मन + ईप्सित्] मनोगत-न. मनीषा; हेतु; उद्देश; विचार; इच्छा. 'श्रीकृष्णवासातें वांछिती । जाणे श्रीपती मनोगत ।' -एरुस्व १५.१३८. -वि. मनांत असलेलें; ठरविलेलें. 'कुंभाराचा मनोगत जो आकार असतो तो घटावर उत्पन्न होत असतो.' मनोगति-स्त्री. १ मनाची वृत्ति, क्रिया, विचार. २ मनाचा, विचाराचा प्रवेश, पोंच; मनाची धांव; आक- लन. ३ इच्छेचा कल, प्रवृत्ति. 'हा आपल्या मनोगतीनें चालतो- वागतो-करतो.' -वि. मनाप्रमाणें वागणारा, चालणारा; विचारा- प्रमाणें चंचल. -क्रिवि. मनाच्या गतीप्रमाणें; अतिशय, कल्पना- तीत वेगानें. 'आला गेला मनोगती ।' -मारुतिस्तोत्र. मनोगम्य- वि. मनाला जाणतां येण्यासारखें; मनानें आकलन होण्या- सारखें. मनोज-पु. मदन; काम. 'मनोज मध्यस्थ करूं निघाला । ' -सारूह २.६०. मनोजय-पु. मनाचा जय; आत्मनिग्रह; मनो- निग्रह. 'तैसा मनोजयें प्रचारु । बुद्धीद्रियांचा ।' -ज्ञा १६.१८४. मनोजव-वि. मनाच्या गतीनें जाणारा; फार त्वरेनें जाणारा. मनोत्साह-पु. मानसिक उत्साह; आनंद; आवड. 'ज्याचा जसा मनोत्साह तसें तो करितो.' मनोदय-पु. १ हेतु; विचार; आशय. २ इच्छा कल, प्रवृत्ति. मनोद्देश-पु. मनांतील योजना, हेतु, बेत, विचार. मनोधर्म-पु. १ (प्रेम, द्वेष, काम, क्रोध, मत्सर इ॰) अंतःकरणाची भावना, विकार. 'न निघे मनोधर्मीं । अरोचक ।' -ज्ञा १८.६५७. २ मनाची शक्ति (विचार, कल्पना, सदसद्विवेकबुद्धी इ॰). ३ (सामा.) चित्तवृत्ति; मनोगुण. 'आहार मिळाल्या उत्तम । हरिखेजेना मनोधर्म ।' -एभा १८.२३६. ४ मनाचा चंचलता. 'तंव आंतु त्राय मोडे । मनोधर्माची ।' -ज्ञा ६.२११. ५ हेतु; बेत; विचार -वि. मनोगतीप्रमाणें वागणारा. 'सहचरु मनोधर्मु । देवाचा जो ।' -ज्ञा १७.३३. मनोधारण- णा-नस्त्री, मन राखणें; मनधरणी. मनोनिग्रह-पु. मनाला ताब्यांत ठेवणें; मनोजय; संयमन. मनोनीत-वि. मनानें पसंत केलेलें, स्वीकारिलेलें. मनोनुकूल-वि. एखाद्याच्या मनाप्रमाणें; मनाला पसंत पडण्यासारखें. मनोनुभूत-वि. मनानें अनुभविलेलें, सहन केलेलें, उपभोगिलेलें मनोभंग-पु. इच्छा बेत, आशा इ॰ फलद्रूप न होणें; निराशा. मनोभव-पु. १ मदन; काम. २ कामेच्छा; विषयेच्छा. मनोभाव-पु. १ हेतु; विचार. २ भक्ति; श्रद्धा. ३ प्रीति. मनोभावें, मनोभावें करून, मनोभावा- पासून, मनोभावानें-क्रिवि. अंतःकरणपूर्वक; मनापासून; श्रद्धेनें. 'मनोभावें ईश्वराची सेवा करावी.' मनोभिराम-वि. मनाला तुष्ट करणारा; आनंददायक; मोहक; चित्ताकर्षक. 'तेव्हां तरी तारकशक्ति राम । देईल आम्हासि मनोभिराम ।' मनोमय-वि. मनःकल्पित; काल्पनिक; अंतःकरणांतील; मानसिक. मनोमय- कोश-पु. चैतन्याच्या पांच (अन्न-प्राण-मन-विज्ञान-आनंद) कोशांपैकीं तिसरा. पंचकोश पहा. मनोमयसत्यवाद-पु. एकाच वस्तूविषयीं निरनिराळ्या लोकांच्या मनांत सारख्याच कल्पना असतात असें मत; सादृश्यवाद. (इं.) कन्सेप्च्युअ/?/लिझम्. -नीति ४०६. मनोयोग-पु. मन लागणें; लक्ष्य; अवधान. मनोयोग्य- वि. मनपसंत; समाधानकारक; संतोषकारक. मनोरंजक-वि. मनाला रमविणारें; करमणूक करणारें; चित्ताकर्षक. मनोरंजन- न. १ करमणूक; गंमत; मौज. २ मनास वाटणारा आनंद, उल्हास. मनोरथ-पु. इच्छा; बेत; हेतु; उद्देश; योजना. 'तोषूनियां वैकुंठनायक । मनोरथ पूर्ण करील ।' -व्यं ५. मनोरथ-सृष्टी- स्त्री. मनोराज्य; काल्पनिक सृष्टि. मनोरम-वि. १ मनाला रम- विणारें; मोहक. २ आनंददायक; संतोषकारक; मनोरमा-स्त्री. १ सुंदर स्त्री. २ (संकेतानें) बायको; पत्नी. मनोराज्य-न. भावी उत्कर्षाविषयींचे कल्पनातरंग; हवेंतील मनोरे. मनोविकार, मनोविकृति-पुस्त्री. मनांत उद्भवणारे कामक्रोधादि विकार प्रत्येकीं; भावना; मनोवृत्ति. मनोवृत्ति-स्त्री. १ मनाची स्थिति; चित्तवृत्ति; स्वभाव. २ मनाचा व्यापार; विचार, भावना, विकार इ॰ 'ह्या मनोवृत्ति देवपरायण झाल्या.' मनोवेग-पु. मनाची गति; अत्यंत जलद गति. मनोगति पहा. 'मनोवेगें तात्कालीं । पातले विश्वेश्वराजवळी ।' -गुच ४१.१५७ मनोवेद्य-वि. मनानें, अंतःकरणानें जाणतां येण्याजोगें. मनोव्यापार-पु. मानसिक संकल्पादि व्यवहार; विकार, विचार इ॰ मनोहत-वि. निराश; हताश. मनोहर-पु. व्यंकोबाचा प्रसाद (नैवेद्य) -तीप्र २५२. -वि. मोहक; आल्हादकारक; रमणीय; सुंदर. मनोहारी, मनोज्ञ-वि. चित्ताकर्षक; रमणीय; सुंदर; मोहक. मनौनि-क्रिवि. मनापासून; मनांतून 'तैसें मनौनि धनवरी । विद्यमानें आल्या अवसरी ।' -ज्ञा १६.८७. मनौरें-रा-न.पु. मनाची इच्छा. 'कां जे लळेयाचे लळे सरती । मनोरथांचे मनौरे पुरती ।' -ज्ञा ९ ३. बरव्या मनानें-क्रिवि. शुद्ध मनानें; चांगल्या, प्रामाणिक हेतूनें. 'सीता स्वयंवर असें बरव्या मनानें अवलक्षुनि शास्त्र अव- लोकिलें.' मोकळ्या मनानें-क्रिवि. खुल्या दिलानें; स्वतःचें मन, हेतु, भावना इ॰ स्पष्ट रीतीनें सांगून; मन मोकळें करून.

दाते शब्दकोश

अर्ध

न. १ एका पदार्थाचे जे दोन सम विभाग ते प्रत्येकीं; निम्मा तुकडा, अर्धा भाग. २ (समांसात) अर्धा; निम्मा. उ॰ अर्धकोस, अर्धघटिका इ. [सं.] ०कच्चा वि. १ अर्धामुर्धा पिकलेला, तयार झालेला किंवा शिजलेला (फल, धान्य, विद्या, अन्न); अर्धामुर्धा; अपूर्ण; अपुरा. २ पुरें शेवटास न जातां अर्धवट राहिलेलें (काम). ०कंदरा पु. लगामाचा प्रकार. -अश्वप १८५. [सं. अर्ध + कंधरा ०काची वि. अर्धीकच्ची. 'एक अर्धकाचीं तुरटें ।' -एरुस्व १४. १०६. ०कोर स्री. अर्धा चतकोर; (गो.) नितकोर (भाकर). ०घबाड पु.न. एक शुभ मुहूर्त, परंतु घबाडापेक्षां कमी महत्वाचा. घबाड पहा. ०चंद्र पु. १ वद्य किंवा शुध्द अष्टमीचा चंद्र; अर्धा चंद्र. २ अर्ध चंद्राच्या आकारासारखी वस्तु. ३ (गचांडी देतांना हाताचा आकार अर्धचंद्रासारखा होतो म्हणून;) हकालपट्टी. 'या अष्ट मीच्या चंद्राच्या मुहूर्तावर मलाहि अर्धचंद्र मिळाला.' -मूकनायक. 'आणिक म्हणे भृत्यजना । यासी अर्धचंद्राची द्यावी दक्षिणा । देशाबाहेरी या ब्राम्हणा । घाला वहिले ।।' -कथा ५.११.७१. (हा प्रयोग मूळ संस्कृतांतच आहे.) (क्रि॰ देणें, मारणे, मिळणें, इ०). ४ (नृत्य) हाताचीं चार बोटें एकमेकांस लागून ताठ ठेवणें व आंगठा दूर पसरून ठेवणें. ५ अर्धचंद्राकृति (फाळाचा) बाण. ०चंद्री, तंद्री स्री. अर्धवट झोंप, मूर्च्छा. 'बाण भेदिला जिव्हारीं । निदूरथ पडिला धरणीवरी । डोळां लागली अर्धचंद्री । जेवीं खेचरी योगिया ।' -एरुस्व ९.३२. ०चरतीय, जरतीय-वि. अर्धे किंवा अर्धवट काम; अनिश्चित स्वरूपाचें काम; मोघम किंवा अनिश्चित भाषण. 'येतो म्हण किंवा नाहीं म्हण- उगीच अर्धचरतीय सांगूं नको.' [सं. अर्ध + जरा-जरित किंवा जर्ज- रित; अर्ध + चरित]. ०जेवा वि. अर्धवट जेवलेला; अर्ध्या जेवणांतून उठलेला; अर्धपोटी. [अर्ध + जिम्]. ०देशी कापड न. विदेशी सुताचें, हिंदुस्थानांत विणलेले कापड. ०धणी वि. अर्धतृप्त; अर्ध- पोटीं. 'भलतें करीं परी अर्धधणीं । नुठीं कदा ।' -ज्ञा १६.३०. ०नार स्री. स्रीजातींतील षंढ; षंढा; अर्धवट स्री; स्रीधर्मांपैकीं कांहीं बाबतींत उणीव असलेली स्री. [सं. अर्ध + नारी]. ०नारीनटे- श्वर पु. १ अर्धें आपलें (पुरुषांचे) व अर्धें पार्वतीचें (स्रीचें) असें शंकराचें रूप; अर्धनारीश्वर; शिवशक्ति. मोहिनीराज हें विष्णूचें रूप (यांत अर्धा विष्णु व अर्धी अमृतकलश घेतलेली मोहिनी असें अर्धनारीश्वर स्वरूप असतें. नेवासें येथें असा देव आहे). २ अर्धा पुरुष व अर्धी स्री एकत्र. 'अर्धनारीनटेश्वरी । जो पुरुष तोचि नारी ।' -ज्ञा ९.२७०; -एभा ११.३६९. ३ प्रकृतिपुरुष; शिव- शक्ति. 'प्रकृतिपुरुष शिवशक्ति । अर्धनारीनटेश्वर म्हणती ।' -दा २०.३.१०. ०नारीश्वर अर्धनारीनटेश्वर पहा. ०निकुट्टक (अंगहार) -पु. (नृत्य) उजवा पाय नूपुर करून मग तीचारी सोडून भराभर आक्षिप्तचारी त्याच पायानें करणें. नंतर दोन्ही हात फेंकून त्रिक वळविणें व शेवटीं निकुट्टक व कटिचिन्ह हीं करणें. ०निकुट्टित (करण)-न. (नृत्य) खांदा आकुंचित करून त्यावर त्या बाजूचा हात ठेवून बोटें हळु हळु ठोकणें व दुसरा हात आपल्या तोंडासमोर बोटें करुनं ठेवणे. उजवा पाय कुट्टित करणें व डावा पाय स्तब्ध ठेवणें. ०पड-डा वि. अर्धवट पडलेलें-केलेलें-बजा-वलेलें-म्हटलेले; अपुरें साधलेलें, बजावलेले; वरकरणीपणानें केलेलें. (सामा.) अपुरें; वरवर; सरासरी. [अर्ध + पडणें]. ०पद्मासन न. डाव्या पायाची मांडी मोडून बसणें व उजवा पाय मोडून डाव्या पायावर ठेवणें. ०पक्षकीटक पु. (प्राणी.) एक कीटक- वर्ग. यांतील किड्यांचे पुढील अर्धे पंख शृंगी द्रव्यानें कठिण झालेले असतात म्हणून यास हें नांव आहे. -प्राणिमो १०३. ०पिका वि. अर्धवट पिकलेला (फळ वगैरे). [अर्ध + पिकणें]. ०पुडी-वि. अर्धवट; अल्पायुषी (अर्धें झोपेंत जातें म्हणून). 'थोडें जिणें अर्धपुडी काया । गर्व करिती रडाया ।' -दा १८.५.३५. [सं. अर्ध + पुट ?]. ०पोटीं-क्रिवि. अर्धेंच पोट भरलें असतां; पूर्ण न जेवतां; भूक पुरी न भागतां. (क्रि॰ जेवणें, जाणें, असणें, उठणें, राहणें). ०फोड अर्धवट फोडलेलीं लांकडें; ठोकळे. (बुरूड) बांबू उभा चिरून केलेले दोन भाग. ०बाट-गा वि. १ अर्धवट संस्कार झालेला (वाटण्याचा-कुटण्याचा-शिजण्याचा इ०); अर्धवट बन- विलेला; अर्धबोबडा. २ अर्धवट भ्रष्ट झालेला, बाटलेला; जातींतून अर्धवट बाहेर पडलेला; वाळींत टाकलेला. ३ ज्याचा बाप एका जातीचा व आई दुसर्‍या जातीची आहे असा. ४ अर्धवट किंवा वरवर ज्याला माहिती-परिचय आहे असा. ५ (ल.) अर्धवट शिकलेला (विद्यार्थी, कारागीर, पंडित इ०). कडेचा पोहणारा; अतज्ज्ञ. -क्रिवि. अर्धेंमुर्धें करून; अपुरेपणानें; उणेंपणानें. [अर्ध + भ्रष्ट = बाट]. ०बाटे पाऊण मराठे न. १ संकर; पंचमिसळ; खिचडी; धेडगुजरी (भाषा, काम, पदार्थ); बारभाई; बजबजपुरी. २ (ल.) उचछृंखलपणाची वागणूक-आचार. ०बिंब न. १ अर्ध वर्तुळ आणि त्यावरील टिंब. २ (ल.) ओंकाराची-प्रणवाची अर्ध मात्रा. 'जंव मात्रात्रय मावळे । अर्धबिंबीं । '-ज्ञा ८.११५. ०बुकट-बुकुट वि. (राजापुरी) अर्धवट पहा. [अर्ध + बुकटी]. ०बोबडा वि. १ अर्धवट कुटलेलें-चेललेलें-वाटलेलें (मिरे वगैरे). २ शिजतांना अर्धवट राहिलेला-(भात-डाळ इ॰ पदार्थ); मऊ न झालेला, बोटचेपा. ३ (ल.) कसें तरी ओबडधोबडपणें केलेलें काम; बिगारी-वेठ काम. ०भरपोशाख पु. भर पोशाखांतील फक्त्त कांहीं विशिष्ट वस्तुयुक्त मामुली पोशाख. -बडोदें खानगी खातें नियम नोकर पोशाख पा. ३. ०मत्तल्लि(करण) न. (नृत्य) पाय अडखळल्यासारखें करून मागें टाकणें, डावा हात रेचित करणें व उजवा हात कमरेवर ठेवणें. ०मत्स्येंद्रासन न. योगासनांतील एक प्रकार. -संपूर्ण योगाशास्र पा. ३२५. ०मागधी स्री. एक प्राकृत भाषा. जैन धार्मिक ग्रंथ या भाषेंत लिहिले आहेत. हिलाच भारतीय वैय्याकरण आर्षभाषा म्हणत. शौरसेनी व मागधी भाषा प्रदेशांच्यामध्यें अर्धमागधीभाषाप्रदेश होता (म्हणजे हल्लींचा प्रदेश अयोध्या). त्याच्या दक्षिणेकडील मराठी भाषा कांहीं अंशीं या भाषेवरून बनली आहे. प्रचारकाल ख्रि. पू. ४ थ्या शतकाचा शेवट -ज्ञाको अ ४७५. ०मांडणी स्री. अर्धी मांडणी पहा. ०मात्रा स्री. १ ओंकारांतील अर्धीं मात्रा. 'अर्धमात्रापर तें न सांपडे ।' -परमा २.१३. २ एका वेळीं घ्यावयाच्या औषधाच्या प्रमा- णाच्या अर्ध्या इतकें. 'अर्धमात्रा रस देऊनिया जीव । रोग दूरी सर्व करिताती ।' -ब २२२.१; ३ (ल.) औषध; रसायनगुटिका. 'पंचगव्य तेंचि जाण अर्धमात्रा । -ब १०४.५. ४ किंचित्; थोडें. 'हे कृष्णकथा अलौकिक । महादोषासी दाहक । भवरोगासी छेदक । अर्धमात्रा सेविलिया ।' -एरुस्व १८.७५. ५ व्यंजन; अर्धस्वर. ६ संगीतांत स्वर घेतांना घेतलेली विश्रांति; एका मात्रेचा अर्धा काल. ०मुकुल(दृष्टी) स्री. (नृत्य) अर्धवट डोळा उघडणें; पापण्यांचे केंस एकमेकांस लागतील इतके जवळ आणणें. आल्हादकारक सुगंध, सुखस्पर्श ह्या गोष्टी हा अभिनय दर्शवितो. [सं. मुकुल = किंचित् उमललेली कळी]. ०मेला वि. १ अर्धवट मेलेला; थोडासा जिवंत राहिलेला. २ जर्जर; मृतप्राय; व्याकुळ. 'ती भुकेने अर्धमेली झाली आहे.' -पाव्ह २३. ०रथी वि. (रथांत बसून) एका रथ्यासह- वर्तमानहि युद्ध करतां येत नाहीं. तो; रथीहून अल्पवळी. (ल.) कच्चा योद्धा. 'अतिरथ नव्हे रथ नव्हे हा (कर्ण) केवळ अर्धरथचि अविदग्ध ।' -मोउद्योग १२.५८. [सं.]. ०रात्र स्री. मध्यरात्र. ०रेचित(करण) न. (नृत्य) उजवा हात तोंडासमोर नेऊन डोक्या- वर उचलून धरणें व उजव्या पायाकडील भाग किंचित वांकवून तो सूची करून जमिनीवर हळु हळु आपटणें. [सं.] ०रेचित(संयुक्त हस्त)-पु. (नृत्य) डावा हात चतुर व उजवा हात रेचित करणें. [सं.] ०लंड-मर्धलंड-पु. अधलंड, अधलंडमधलंड पहा. ०वट क्रिवि. १ अर्धेंपणानें; अपुरेपणानें; उणीव असलेल्या रीतीनें; वरवर; वरकरणीः मोघमपणें. 'काम पुरतें करावें, अर्ध- वट ठेवूं नये.' [सं. अर्ध + वत्] २ अर्ध्यांत; मध्यभागी; दोन्ही टोंकाच्या मध्यें.-वि. १ अधलामधला; अपुरा; २ (ल.) वेडा; अप्रबुद्ध; कमी समजूत असलेला. 'हा पुरता वेडा नव्हे पुरता शाहणा नव्हे, अर्धवट आहे.' ३ अर्धें वय झालेला; तरणा नव्हे. 'आम्ही म्हैस घेतली ती तरणी नाहीं, अर्धवट आहे.' ०वर्तुल-ळ-न. (गणित.) अर्धें वर्तुळ; वर्तुळाचा निम्मा भाग; व्यास आणि त्यानें कापलेला परिघाचा भाग यांच्यामध्यें जो वर्तु- लाचा भाग सांपडतो तो. -महमा ६. (इं.) सेमि-सर्कल. -विराम- पु. १ अर्धीं विश्रांति; पूर्ण विरामापेक्षां कमी थांबण्याची जागा. २ ती दर्शविण्याचें चिन्ह. ०वेडा वि. वेसडर; मुर्ख; अर्धवट. ०शिजा वि. अर्धवट शिजलेला; पुरता न शिजलेला (भात वगैरे) ०शिशी स्री. अर्धें कपाळ दुखण्याचा रोग; यानें अर्ध्या मस्तकाकडील मानेचा भाग, भुंवई, आंख, कान, डोळा व अर्धें कपाळ-या ठिकाणीं तर- वारीच्या आघातासारखें दुःख होतें. यावर गोकर्णाचें मूळ व फळ पाण्यांत वांटून त्याचें नस्य करावें अथवा मूळ कानांत बांधावें. [सं. अर्ध + शीर्ष] ०सम(वृत्त)-न. ज्यांत दोन दोन उ॰ पहिला आणि तिसरा व दुसरा आणि चौथा हे चरण सारखे असतात तें वृत्त. उ० पुष्पिताग्रा; हरिणीप्लुता; वियोगिनी, अपरवक्त्रा. [सं.] ०सूची (करण)-न. (नृत्य) उजवा पाय सूची करून उजवा हात उपपद्म करणें व डोक्याच्या वरच्या बाजूस नेऊन ठेवणें. ०स्थित(स्वर)-पु. (संगीत) द्व्यर्ध आणि द्विगुण या स्वरांमधील म्हणजे पांचवा, सहावा व सातवा हे स्वर. ०स्वस्तिक(करण)-(नृत्य) पु. पाय स्वस्तिक ठेवून उजवा हात कमरेवर व डावा हात वक्षःस्थलावर ठेवणें. ०स्वर-पु. य्, व्, र्, ल्, हीं व्यंजनें स्वरांबद्दल योजितात म्हणून त्यांस अर्धस्वर किंवा अंतःस्थ वर्ण म्हणतात. ०हार-पु. बारा किंवा चौसष्ट सरांचा हार; एक दागिना.

दाते शब्दकोश