आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
आस्पद
न. स्थान; स्थल सामाशब्द-अहंकारास्पद = अहंकाराचें स्थान-शरीर; गुणास्पद = विद्वान; सात्विक मनुष्य; मोहा- स्पद = कनक, कांता इ॰ वस्तू; दुःखास्पद; हास्यास्पद; शोकास्पद, इ॰ 'जगस्पृहे आस्पद । एक सार्वभौम पद ।' -ज्ञा १६.२३१. 'हें कर्म तुम्ही करतां परंतु परिणाम दुःखास्पद होईल.' [सं.]
आस्पद āspada n S A place. In comp. as अहंकारास्पद Seat of consciousness or self, the body; गुणास्पद Seat of excellencies or qualities, a clever, learned, or virtuous man; मोहास्पद Seat of desire, woman, money &c.; ममतास्पद Centre of one's affections, a son &c.; लोभास्पद, हर्षास्पद, शोकास्पद, दुःखास्पद, सुखास्पद &c.
आस्पद्
आस्पद् A place (In compounds means seat of -लोभ, हर्ष &c.)
आस्पद
न. स्थान; स्थल. सामा. शब्द − अहंकारास्पद − अहंकाराचे स्थान, शरीर; गुणास्पद − विद्वान, सात्त्विक मनुष्य; मोहास्पद − कनक, कांता इ. वस्तू. दुःखास्पद, हास्यास्पद, शोकास्पद इ. : ‘जगस्पृहे आस्पद । एक सार्वभौम पद ।’ − ज्ञा १६·२३१. [सं.]
संबंधित शब्द
आस्पत
स्त्री. (गो.) ऐपत; शक्ति, सामर्थ्य. 'हुंडा देण्याची आस्त नाहीं.' [सं. आस्पद]
आस्पत
स्त्री. ऐपत; शक्ती; सामर्थ्य. (गो.) [सं. आस्पद]
हास्यास्पद
हास्यास्पद hāsyāspada n (S हास्य & आस्पद Place.) A butt for derision or ridicule, a laughing-stock.
ममता
स्त्री. १ आपलेपणाची, आत्मीयतेची भावना; माझे- पणा. २ माया; प्रेम; प्रीति. ३ महत्त्वाकांक्षा; अभिमान. ४ (ल.) मत्ता. [सं. ममत्व; प्रा. ममत्त; हिं.] ॰लावणें-लावून घेणें-- प्रेमळ वर्तनानें दुसऱ्याची प्रीति संपादणें. ॰ग्रह-पु. आपलेपणाची भावना. (क्रि॰ करणें) ममतालु-ळू-वि. मायाळु; दयाळु; प्रेमळ. ममतास्पद-न. ममत्वबुद्धि ठेवण्याला, प्रेमाला पात्र; प्रेमाचा विषय (मूल, बायको इ॰). [ममता + आस्पद] ममते- शील-वि. मायाळु; प्रेमळ. 'कुशल ज्या त्या ममतेशील धनि ।' -अफला ४९.
ममतास्पद
ममतास्पद mamatāspada n S (ममता & आस्पद Place.) An object of affection considered as belonging to or connected with one's self,--a child, a wife &c.
उपहासास्पद
वि. थट्टेचा विषय झालेला; थट्टेस पात्र. [सं. उपहास + आस्पद]
उपहासास्पद upahāsāspada n S (उपहास & आस्पद Place or seat.) A laughing-stock; a butt for ridicule.
विनोद
पु. १ खेळ; क्रीडा; करमणूक. २ थट्टा; मस्करी; उपहास; चेष्टा. ' नये विनोद हा कामा मशी रांगें ' -तुगा ११२. ३ कौतुक; चमत्कार. 'तैसा भला जाहला विनोदु । कथेचा इये ।' -ज्ञा ४.३. 'तेही कथेचा विनोद । श्रोतीं सादर परिसावा ।' -मुविराट २३.११७. [सं. वि + नुद्] विनोदणें-क्रि. विनोद करणें. 'कोल्हाळ करित विनोदिनी' -दावि ७.२. विनोदा- स्पद-वि. थट्टेचा, उपहासाचा विषय; हास्यास्पद; चेष्टेचा विषय. [विनोद + आस्पद] विनोदी-वि. गमती; थट्टेखोर; चेष्टेखोर; करमणूक करणारा; हंसविणारा.
विनोदास्पद
विनोदास्पद vinōdāspada n (S विनोद & आस्पद Place.) A butt or object of ridicule or pleasantry; a laughing-stock.