मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

उचलबांगडी

उचलबांगडी f A general rising against & tarning out (as of a public officer).

वझे शब्दकोश

उचलपांगडी, उचलबांगडी      

स्त्री.       १. अर्धचंद्र देणे; डिच्चू देणे; हातपाय धरून उचलणे; जबरदस्तीने नेणे. २. जबदरस्तीने घालवून देणे; हकालपट्टी करणे; उच्चाटन : ‘मुधोजीची उचलबांगडी होण्याचा वेळ आला होता.’ − विवि ८·६·१११. ३. (ल.) पदच्युती.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

दुमची

स्त्री. १ घोड्याच्या शेंपटीखालून जाणारा खोगि- रांचा बंद; लडी. 'गिलच्यास पगडी नाहीं व घोड्यास दुमची नाहीं.' -भाव ९. २ (जनावराचीं मागची) तंगडी; लाथ; दुगाणी (अनेकवचनी प्रयोग) ३ (ल.) निकड; तगादा. (क्रि॰ लावणें; करणें) [फा. दुम्ची] (वाप्र.) ॰उचलणें-अनेक कचाटें घालून (एखाद्याची) उचलबांगडी करणें. ॰पुरविणें-(आपलें कार्य साधण्यासाठीं एखाद्याची) पाठ, पिच्छा पुरविणें. ॰सोड- विणें-(एखाद्यास) नामोहरम करून पळ काढावयास लावणें. 'त्यांणीं आपले हिमतीनें कंदाहाराचा पातशहा दुराणी गिलच्या याची पगडी व दुमची सोडविली ते मर्यादा अजुनी चालते.' -भाव ९. दुमच्या झाडणें-(घोडा, गाढव इ॰ कानीं) लाथा मारणें; दुगाण्या झाडणें.

दाते शब्दकोश

दुमची      

स्त्री.       १. घोड्याच्या शेपटीखालून जाणारा खोगिराचा बंद; लडी : ‘गिलच्यास पगडी नाहीं व घोड्यास दुमची नाहीं. –’ भाब ९. २. (जनावराची मागणी) तंगडी; लाथ; दुगाणी (अनेकवचनी प्रयोग). ३. (ल.) निकड; तगादा (क्रि. करणे, लावणे.). [फा.] (वा.) दुमची उचलणे –अनेक कचाटे घालून उचलबांगडी करणे. दुमची पुरवणे –पाठ धरणे; पिच्छा पुरविणे. दुमची सोडवणे –नामोहरम करून पळवून लावणे : ‘त्यांणीं आपले हिमतीनें कंदाहाराचा पातशहा दुराणी गिलच्या याची पगडी व दुमची सोडविली ते मर्यादा अजुनी चालते.’ – भाब ९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

एळकोटमल्हार

पु. नाश; उचलबांगडी. 'मी इकडे जयवंत- रावाचा एळकोट मल्हार करतो.' -चंद्रग्रहण नाटक ६१.

दाते शब्दकोश

एळकोटमल्हार      

पु.       नाश; उचलबांगडी : ‘मी इकडे जयवंतरावाचा एळकोटमल्हार करतो.’-चंद्रग्रहण नाटक ६१.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

इंद्र

पु. १ देवांचा राजा; स्वर्गलोकचा व पूर्व दिशेचा अधि- पति; मेघ, पाऊस यांची ही अधिष्ठात्री देवता म्हणून फार प्राचीन काळापासून मानतात. 'श्रिया वाखाणिजे अमरेंद्र । कृष्ण इंद्राचाहि इंद्र ।' -एरुस्व १.७८. २ (समुदायामध्यें) राजा, श्रेष्ठ, वरिष्ठ व्यक्ति; नायक; मुख्य; पुढारी. सामाशब्द-नृपेंद्र; खगेंद्र; विप्रेंद्र; फणींद्र; पक्षींद्र. ३ गोसावी, संन्यासी, यांच्यातील एक पंथ; या पंथातील व्यक्ति. ४ (सामा.) राजा. [सं.] म्ह॰ इंद्रायतक्षकाय- स्वाहा- (जनमेजयानें सर्पसत्र केलें त्यांत सर्व सर्पकुलें अग्निकुंडांत पडलीं, परंतु तक्षक इंद्राच्या पाठीशीं दडला तेव्हां जनमेजयानें 'इंद्रायतक्षकायस्वाहा असा मंत्र म्हणून आहुति देतांच इंद्रासह तक्षक आकर्षिला जाऊं लागला. या कथेवरून) = एखाद्यानें शत्रूला चुकवि- ण्याकरितां दुसर्‍याचा आश्रय केला असतां शत्रु प्रबल असल्यास त्या आश्रयदात्यासह आश्रिताची उचलबांगडी होणें या अर्थीं ही म्हण योजितात. 'जॉनसनसारख्या रसिकांनीं... ज्यास कवित्वसिंहासना- वर आरूढ करवून सर्वांच्या अभिनंदनास पात्र करून ठेविलें होतें त्यास मेकॉलेप्रभृति अर्वाचीन निबंधकारांनी पदच्युत करून 'इंद्राय- तक्षकायस्वाहा' या न्यायानें जॉन्सनप्रभृति मोर्चेलवाल्यांसहि त्या- बरोबरच खालीं ओढलें. -नि ८७६ [सं.]

दाते शब्दकोश

प्रतिकार

विरोध, प्रतिटोला, उलट जवाब, मज्जाव, धिक्कार, अटकाव, हरकत, प्रतिहल्ला, प्रतिचढाई, प्रतिरोध, उलट रेटा, प्रतिजबाब, उचलबांगडी, उलटें आव्हान, पारिपत्य, सर्व सामर्थ्य एकवटून विरोध, खाल्लेलें ओकायला लावूं ! आपली टणक बाजू दाखविणे, दाबून न दबणे.

शब्दकौमुदी

प्रतिकार (योग्य)

खटासी खट उद्धटासी उद्धट, ठकास ठक, भाल्यास भाला, जशास तसें, लाठीस लाठी जोड्यास जोडा, गोळीला गोळी, अरेला कारे, कांट्यानें कांटा, तोडीस तोड, शठं प्रति शाठ्यम्, दुष्टारशीं दुष्ट सुष्टार्शी सुष्ट, लुचाशीं छुच्चेगिरी, मनगटाला मनगट गुद्दथाला गुद्दा, शिवीस शिवी, तलवारीस तलवारीनें उत्तर ठोशास ठोसा, आडवें आलें तर कापून काढावें लागतें, साप पाहिला म्हणजे तो ठेचल्याशिवाय साेडणें योग्य नाहीं, नाठाळांच्या काठी देऊं माथां, जसा भेटेल तसा प्रतिकार, तंगडी उचलून उचलबांगडी, रोखठोक उत्तर, जालीम आजाराला जालीम उपाय, आतिरेकावर जालीम उतारा, प्रति-आह्वानाने उत्तर अंगावर आलें तर शिंगावर घेतलेंच पाहिजे.

शब्दकौमुदी

टांगाटोळी

स्त्री. उचलबांगडी; हातपाय धरून उचलून नेणें. [टांगणें]

दाते शब्दकोश

टांगाटोली, टांगाटोळी      

स्त्री.       उचलबांगडी; हातपाय धरून उचलून नेणे : ‘पोऱ्हं निंघाले शिक्याले । कधीमधी टांगाटोली ।’ – बगा १०७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उच्चाटण, उच्चाटन      

न.       १. हकालपट्टी; उचलबांगडी; उखडणे; घालवून देणे; उलथून पाडणे; दूर करणे. २. मंत्राच्या साहाय्याने मनुष्याला स्वतःचे घरदार, नोकरी, उद्योग याविषयी तिटकारा उत्पन्न करून त्याला ते सोडायला लावणे; जादूटोणा करून वेडापिसा करणे. ३. जादूटोणा; मंत्रप्रयोग. [सं. उच्चाटन]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उच्चाटण-न

न. १ मंत्राच्या साहाय्यानें मनुष्यास स्वतःचें घरदार, नोकरी, उद्योग यांविषयीं तिटकारा उत्पन्न करून त्यास तें सोडावयास लावणें; जादूटोणा करून वेडापिसा करणें. २ जादू- टोणा; मत्रंप्रयोग. ३ हकालपट्टी; उचलबांगडी; उखडणें; घालवून देणें; उलथून पाडणें; दूर करणें. [सं. उच्चाटन]

दाते शब्दकोश

उचलपांगडी-बांगडी

स्त्री.१ हातपाय धरून उचलणें; बलात्कारानें नेणें (लहान मुलांना शाळेंत नेण्यासाठीं प्रयोग). २ बलात्काराने घालवून देणें; हकालपट्टी करणें उच्चाटण. 'मुधो- जीची उचलबांगडी होण्याचा वेळ आला होता.' -विवि ८.६. १११. [उचल + पांग-डी = कोळ्याचें जाळें (हें मोठें असल्यास दोघे, चौघे उचलतात.)]

दाते शब्दकोश

उखडंपट्टी      

स्त्री.       १. उचलबांगडी; हकालपट्टी. २. ताशेरा; भोसडपट्टी; हजेरी; रागावून बोलणे; निर्भर्त्सना. (व.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उखंडपट्टी

स्त्री. (व.) १ उचलबांगडी; हकालपट्टी. २ ताशेरा; भोसडपट्टी; हजेरी; रागावून बोलणें; निर्भर्त्सना. [उखडणें]

दाते शब्दकोश