मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

उद्धरण

उद्धरण n Drawing up or out, rescuing, saving.

वझे शब्दकोश

उद्धरण uddharaṇa n (S) Drawing up or out. 2 fig. also उद्धरणी f Rescuing or delivering (from hell or perdition): releasing (from the operation of a curse): repairing, renewing, brushing up (a ruined temple &c.): restoring, recovering, reestablishing (a lost, forgotten; disused estate, privilege, practice, fashion): refreshening and raising up, morning and evening (the sacrificial fire): delivering, extricating, or saving gen.

मोल्सवर्थ शब्दकोश

उद्धरण, उद्धरणी      

न.       स्त्री.      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

उद्धरणें

उद्धरणें uddharaṇēṃ v c (उद्धरण) To rescue, deliver, save (from hell or perdition): to emancipate from a low form of existence, or to exempt from further migration. 2 Used occasionally in all of the variations of Sig. II. of उद्धरण. Ex. राम उद्धरुनि मौतमजाया.

मोल्सवर्थ शब्दकोश

उक्रि. १ सोडविणें; सुटका करणें; वर काढणें; मुक्त करणें. 'भक्त उद्धरावेआं अपारु ।' -दाव ४. 'उन्नतगजेंद्रउद्ध- रण । गर्भसंरक्षण परीक्षितीचें ।' -एभा २.३०५. २ वैभवाच्या स्थितीस नेणें; स्वर्गादि उत्कृष्ट लोकीं पोहोचणें; मुक्त करणें. 'राम उद्धरुनि गौतमजाया ।' 'भगीरथानें आपल्या भस्मीभूत पीतरांना स्वर्गीय गंगा पाताळांत आणून उद्धरिलें.' ३ (विपरीत लक्षणा) शिव्या देणें (वडील माणसांना). (एखाद्याचे) पितर उद्धरणें-वाड- वडिलांना, पितरांना शिव्या देणें. [सं. उद् + हृः उद्धरण]

दाते शब्दकोश

उद्राण      

न. मुक्ती; मोक्ष. पहा : उद्धरण : ‘पोवाडा गात्याला उद्राण । ऐकत्याला घडो पुण्य ।’ – ऐपो ६३. [सं. उद्धरण]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उद्राण

न. मुक्ति. उद्धरण पहा. 'पोवाडा गात्याला उद्राण । ऐकत्याला घडो पुण्य !' -ऐपो ६३. [उद्धरण अप.]

दाते शब्दकोश

उद्धार

उद्धार uddhāra m (S) See उद्धरण. 2 also उद्धारगत f (उद्धार & गति) Rescue or deliverance; esp. emancipation from an inferior form of existence, or exemption from further migration; final salvation.

मोल्सवर्थ शब्दकोश

उद्धार      

पु. पहा : उद्‌धरण. १. वर, बाहेर काढणे.२. मुक्ती; मोक्ष; सुटका; सोडवणूक; हीन स्थितीतून वर आणणे; गर्भवास चुकवणे. ३. पुनरुज्जीवन; पुनर्जन्म. ४. आलापन (राग, रागिणी वगैरे) : ‘रागोद्धार करितां प्रत्यक्ष। दीप लागले लक्षानुलक्ष ।’ – शनि २२८. ५. वेचा; अवतरण (एखाद्या ग्रंथातील). [सं. उद् + हृ किंवा धृ] (वा.)उद्धार करणे –(

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उद्धारण, उद्धारणी, उद्धारणें

उद्धारण, उद्धारणी, उद्धारणें uddhāraṇa, uddhāraṇī, uddhāraṇēṃ See उद्धरण & उद्धरणें.

मोल्सवर्थ शब्दकोश

उद्धारणें

उद्धारण & उद्धारणें See उद्धरण and उद्धरणें.

वझे शब्दकोश

उद्धरगत      

पहा : उद्धारगत. उद्धरण, उद्धरणी      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उद्धर्त्ता

उद्धर्त्ता uddharttā a S उद्धारक a S That rescues, delivers, saves &c. See under उद्धरण.

मोल्सवर्थ शब्दकोश

उद्धुत      

वि. १ सुटका केलेला; मुक्त केलेला; रक्षिलेला; वर चढवलेला; उत्कर्ष केलेला. पहा : उद्धरण. २. अवतरण; अवतरून, उतरून घेतलेले (वाक्य वगैरे). [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उधडणें

उक्रि. १ उसवणें; उकलणें; फोडणें. २ (साल, कांठ वगैरे) फाडणें; चिंधड्या, चिरफळ्या करणें. 'मधें उधडिला तडतडाटें ।' -मुसभा ७.५५. ३ (ल.) धुडकावणें; हांकलणे; उच्चा- टन करणें. 'उधडिला सिंह कोल्ह्यांनीं ।' -संग्रामगीतें ८१. ४ (व.) (चांभारी) मेलेल्या जनावराचें कातडें काढणें. 'महारांनीं तें जना- वर उधडलें.' [सं. उद् + धृ-प्रा. उद्धडन; म. उ + धड; हिं. उध- डना; म. उद्धरण = उधडणें]

दाते शब्दकोश

विश्व

न. जग; सृष्टि. 'तैसें व्यासमति कवळलें । मिरवे विश्व ।' -ज्ञा १.३९. -वि. सर्व; सगळें; अचाट; अगणित. [सं.] ॰कर-विश्वंकर-पु. सृष्टिकर्ता. ॰कर्मा-पु. १ ब्रह्मदेवाचा पुत्र व देवांचा शिल्पकार, सुतार, कारागीर. २ हुषार कारागीर; शिल्पी. ॰कारण-न. (काव्य) सृष्टिनिर्माणकर्ता; ब्रह्मदेव,. ॰कुटुंब- वादी-पु. सर्व जग हें एक कुटुंब असून सर्व असून सर्व लोक त्या कुटुंबातील भागीदार आहेत असें मत असणारा. 'त्याचीं मतें नास्तिक्या- कडे झुकत होतीं व तो जहाल विश्वकुटुंबवादी बनत चालला होता हें सुशीलेला ठाऊक नव्हतें.' -सुदे २०६. ॰कुटुंबी-पु. १ सर्व- सृष्टि हें ज्याचें कुटुंब आहे तो परमेश्वर. २ (ल.) उदार आश्रय- दाता; जनकल्याणकर्ता; मोठ्या कुटुंबाचा धनी. ॰कोश-पु. सर्व विषयांचें ज्ञान देणारा मोठा ग्रंथ. ॰जनीन-जनीय-वि. सर्व- जगास योग्य, सोईस्कर, हितकर, लाभदायक, संबद्ध. ॰जित्-पु. एका यज्ञाचें नांव; जग जिंकणारा. 'ज्या विश्वजित् यज्ञांत यज- मानानें आपलें सर्वस्व दान करावें असें सांगितलें आहे...' -टि ४.५१. ॰जीवन-न. (काव्य) सृष्टीचा प्राण; परमेश्वर. ॰दुनी- स्त्री. सर्वजग; सर्वसृष्टि; सर्व मानवजाति अलमदुनीया याप्रमाणें. 'देवा विश्वदुनीच्या भाग्यानें शेत पिको.' [विश्व + फा. दुनिया] ॰धाया-पु. सृष्टीचा आधार; परमेश्वर. ॰नेत्र-पु. सृष्टीचा, जगाचा डोळा; परमेश्वर. ॰पाल-विश्वंभर-पु. जगाचें पोषण- कर्ता; जगाचें पालन करणारा; परमेश्वर. ॰प्रयत्न-अचाट प्रयत्न; शक्य ते सर्व प्रयत्न. ॰प्रामाण्य-न. सर्व जगाला प्रमाण असें; सर्व जगास योग्य वाटणारें तें. 'जे विश्वप्रामाण्याची मुदी । आणि तुझ्या हातें असे सुबुद्धी ।' -ज्ञा १६.४६८. ॰बाहु-पु. ज्यांचे हात सर्वत्र आहेत असा; परमेश्वर. -ज्ञा १३.८७४. ॰बीज-न. सर्वसृष्टीचें मूळ; आद्यकरण; परमेश्वर. ॰ब्राह्मण-पु. सुवर्णकार; देवशिल्प करणारी जात. ॰भेषज-न. सार्वत्रिक औषध; सुंठ. 'मध आणि विश्वभेषज हे दारूंत मिसळून द्यावेत' -अश्वप २.१३४. ॰मंगल-न. सर्व सृष्टीचें कल्याण, सुख, सुदैव, शुभ. -वि. सर्वजगाचें कल्याण करणारा; शुभदायक. ॰मतिचालक- पु. सर्व जगाच्या मनांत प्रेरणा करणारा; सर्वाच्या बुद्धीस चालना देणारा. ॰मूर्धा-पु. ज्याचें डोकें सर्वत्र आहे असा; परमेश्वर. -ज्ञा १३.८७८. ॰मोहिनी-स्त्री. सर्व जगास भुरळ पाडणारी, भूल- विणारी, मोहून टाकणारी. -ज्ञा १.२१. ॰रचना-स्त्री. सृष्टीची व्यवस्था; घटना. -ज्ञा २.९५. ॰रूप-वि. १ सर्व सृष्टीमधील वस्तूंची रूपें धारण करणारा; सर्व सृष्टीमधील वस्तूंच्या रूपांत असणारा; ब्रह्माचें उपपद. २ व्यापक; महत्त्वाचा. 'म्हणतां जाय पाप । प्रश्न असे विश्वरूप ।' ॰विद्या- लय-न. विद्यापीठ; अनेक विद्यांचें अध्ययन-अध्यापनादि कार्य करणारी संस्था. (इं.) युनिव्हर्सिटी. ॰व्यापक-व्यापी-वि. सर्वव्यापी; सर्वत्र भरून राहिलेलें, सर्व वस्तुमात्रांशीं संबद्ध. ॰व्याप्ति-स्त्री. सर्व सृष्टीमध्यें भरून राहणें. ॰संस्था-स्त्री. (ज्यो.) सूर्य, चंद्र, ग्रह, तारें व इतर आकाशस्थ ज्योती ज्या आकाशाच्या प्रदेशांत कार्य करितात तो प्रदेश. (इं.) युनिव्हर्स. ॰साक्षी-वि. सर्व सृष्टीस पाहणारा. ॰सृट्-पु. सृष्टिकर्ता; जग निर्माण करणारा; ब्रह्मा. विश्वस्तः-क्रिवि. सर्व ठिकाणीं; सर्वत्र. विश्वतश्चुक्षु-पु. ज्याचे सर्वत्र डोळे आहेत असा, ज्याला सर्व दिसतें असा; परमेश्वर. -ज्ञा १३.८७. विश्वतोभय-पु. सर्व बाजूंनी भय उत्पन्न करणारा; परमेश्वर. -एभा २.१०१. विश्वतो- मुख-पु. सर्व बाजूंनीं ज्यास मुखें आहेत असा; परमेश्वर. -ज्ञा ११.२३३. विश्वतोमुखीं- क्रिवि. सर्वांचें तोंडीं; सर्वतोमुखीं; ज्याच्या त्याच्या तोंडीं; सर्वांच्या बोलण्यांत. विश्वाचा जिव्हाळा-पु. १ सृष्टीचाप्राण, जीव. २ (संकेतानें) शिव. विश्वात्मक-वि. सृष्टिस्वरूपी. -ज्ञा १५.५९५. विश्वात्मा-पु. सृष्टीचा प्राण; जगदात्मा; सर्वव्यापी तत्त्व; ब्रह्म. विश्वांप्रि-पु. ज्याचे सर्वत्र पाय आहेत असा. -ज्ञा १३.८७४. विश्वानुसार- वि. सृष्टीतींल पदार्थांप्रमाणें. -ज्ञा १६.१७३. विश्वाभिराम- वि. जगाचा आवडता; जगत्प्रिय; परमेश्वर. विश्वाभिमान-पु. देह हा मी व सर्व सृष्टि माझा भोग्य विषय होय असा अभिमान. विश्वेश-पु. सृष्टिचा स्वामी, मालक; परमेश्वर. -ज्ञा १५.४०. विश्वाशराव-पु. सर्व सृष्टिचा प्रभु; मालक; परमेश्वर. -ज्ञा १८. १८०१. विश्वेश्वर-पु. १ सर्व सृष्टीचा प्रभु; परमेश्वर. २ काशीक्षेत्रांतील मुख्य देवता. विश्वोदयपंथ-पु. माया. विश्वो- द्धार-पु. सर्व सृष्टीचें रक्षण, तारण, उद्धरण. २ सृष्टितारक, रक्षक परमेश्वर.

दाते शब्दकोश