मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

पांढरा ऊस

पांढरा ऊस pāṇḍharā ūsa m White or yellowish sugarcane. Disting. into विलायती ऊस & वेडा ऊस.

मोल्सवर्थ शब्दकोश

ऊस      

पु.       १. साखर, काकवी, खडीसाखर, गूळ इ. ज्याच्या रसापासून तयार होतात अशी गवताच्या वर्गातील एक वनस्पती. २.उसाचा फड; उभे पीक (वा.) ऊस खतविणे − उसाला खत घालणे. ऊस सोजळणे, ऊस साळणे − उसाची पाने, पाती सोलणे. ऊस रंगणे – उसाचा गाभा लाल पडणे; उसावरील एक रोग. ३. उसापोटी काऊस = सूर्यापोटी शनैश्चर; जन्मदात्यास त्रासदायक. (व.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

स्त्री.       एक प्रकारची खारी माती. [सं. ऊषर]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पुरणीचा ऊस

पुरणीचा ऊस puraṇīcā ūsa m Sugarcane that grows and ripens without requiring water after its settlement on being planted: opp. to शिंपणीचा ऊस.

मोल्सवर्थ शब्दकोश

शिंपणीचा ऊस

शिंपणीचा ऊस śimpaṇīcā ūsa m Sugarcane that requires irrigation: opp. to पुरणीचा ऊस.

मोल्सवर्थ शब्दकोश

ऊंस or ऊस

ऊंस or ऊस ūṃsa or ūsa m (इक्षु S) Sugarcane, Arundo saccharifera. Pr. ऊस गाड झाला म्हणून काय जाळ्या- मुळ्यासुद्धां खावा? Shall we utterly beggar a benevolent man in our haste to enrich ourselves by his benevolence? (Shall we kill the goose in our greediness after her golden eggs?) 2 A sugarcaneplantation, or standing crop. Pr. उसांत जाऊन वाढें शोधी or आणणें.

मोल्सवर्थ शब्दकोश

आडसाल्या उस      

पु.       अठरा महिन्यांनी होणारा. (आइसाल्या ऊस म्हणून एक वर्षाआड येणारा ऊस.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हडक्या ऊस

हडक्या ऊस haḍakyā ūsa m A species of sugarcane. It is hard (bony), of thick rind, and of scanty but sweet juice.

मोल्सवर्थ शब्दकोश

तांबडा ऊस

तांबडा ऊस tāmbaḍā ūsa m Red sugarcane, Saccharum officinarum.

मोल्सवर्थ शब्दकोश

उस

उस usa An interjection upon a sudden pang or twinge. v म्हण, कर. See हाय.

मोल्सवर्थ शब्दकोश

उद्गा. हाय ! दुःखोद्नार; एकाएकीं दुःख झाल्यामुळें किंवा कळ वगैरे निघाल्यामुळें निघणारा उद्नार. (क्रि. म्हणणें; करणें). [ध्व.; सं. उत् + श्वस; तुल॰ का. उस = हुश्श]

दाते शब्दकोश

वेडा ऊस

वेडा ऊस vēḍā ūsa m Wild or degenerate sugarcane. Used medicinally.

मोल्सवर्थ शब्दकोश

ऊस, ऊंस

पु. साखर, काकवी, खडीसाखर, गूळ इ. ज्याच्या रसापासून तयार होतात अशी एक ५-६ हात उंचीची वनस्पती; ऊंस हिंदुस्थानांत सर्वत्र होतो. याचे पांढरा, तांबडा, काळा, पुंड्या, पटरी वगैरे प्रकार आहेत. तसेंच १ साल्या = दरसाल गाळला जाणारा; याच्या गुळाचा उतार कमी असतो. २ आड(ढ)साल्या = दीड वर्षानें गाळला जाणारा; याचा गूळ कसदार व रुचकर असतो. ३ खोडवा = जमिनी पासून वीतभर बुंधा राखून तोडतात व त्यास धुमारे फुटून होणारा; याचा गूळ चिकीचा असतो. उसाचा कोणताहि भाग फुकट जात नाहीं. हा समशीतोष्ण आहे. रस थंड असतो. वेडा ऊंस म्हणून एक औषधोपयोगी प्रकार आहे. २ उंसाचा फड; उभें पीक. ' उसांत जाऊन वाढें शोध किंवा आण. ' [सं. इक्षु; प्रा. इक्खु, उच्छु; हिं. ऊख.] ॰म्ह १ ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खावा?; = एखादी गोष्ट चांगली असली म्हणून आपल्या फायद्याकरितां तिचा हवा तसा उपयोग करावा काय? ऊंस गोड पण मुळ्या खोड = एखादा उदार भेटला म्हणून आपण त्याला साराच लुबाडूं नये. ऊस मुळासकट खाल्ला तर मुळापासून दातांना त्रास होऊन रक्त येतें, त्याप्रमाणें एखादा देणारा भेटला व त्याचा फार फायदा घेतला तर तोही त्रासतो. २ (व.) उसापोटीं काऊस = सूर्यापोटीं शनैश्वर. ३ उसांत जाऊन वाढें शोधी, किंवा आणणें. उंसांतलें वाड-१ उसाचा शेंडा, वाढें. २ (ल.) हुषार, होतकरू मुलगा. ॰खतविणें-उसास खत घालणें. ॰साळणें- सोजळणें-उसाचीं पानें-पाती सोलणें.

दाते शब्दकोश

डोंगर ऊस      

एका जातीचा ऊस. डोंगरकठड, डोंगरकठडा, डोंगरकठडी, डोंगरकठाड, डोगरकठाडा, डोंगरकठाडी      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कातळा उस      

एक प्रकारचा ऊस. कातळी      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कळक्या ऊस      

एक प्रकारचा ऊस. हा फार टणक असून यात रस थोडा पण फार गोड असतो. कळखंड      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खुळा ऊस      

उसासारखे औषधी झाड; औषधी ऊस. यालाच ‘रानऊस’ म्हणतात. खुळाचा पाऊस      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ऊंस, ऊस

ऊंस, ऊस m Sugarcane.

वझे शब्दकोश

पुंडा-पुंडा ऊंस, पुंड्या, पुंड्या ऊस

पु. उंसाचा एक प्रकार, ताबुस ऊंस. 'सप्ताळें ऊंस पुंडे कविठ कमरखें वाळकें सूक्ष्म थोरें ।' -सारुह ३.८९. [सं. पुंड्र; प्रा. पुंड; पांडु]

दाते शब्दकोश

उन्हाळ ऊस, उन्हाळवांगी      

उन्हाळ्यात होणारी ऊस−वांगी वगैरे पिके. उन्हाळणे      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ऊस

स्त्री. एक प्रकारची खारी माती. [सं. ऊष-र.प्रा.ऊस = खारी माती]

दाते शब्दकोश

उस      

उद्गा.       हाय; दुःखोद्गार; एकाएकी दुःख झाल्यामुळे किंवा कळ वगैरे निघाल्यामुळे निघणारा उद्गार. (क्रि. म्हणणे, करणे.). [ध्व.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

गुऱ्हाळ      

न.       १. ऊस गाळण्याचा चरक; ऊस गाळण्याचे यंत्र. २. चरक असलेली जागा. ३. गूळ तयार करण्याचा कारखाना (यंत्र, इमारत इत्यादी सर्व उपकरणांसह). ४. ऊस गाळण्याचा, गूळ करण्याचा धंदा, काम. ५. (ल.) लांबलचक हकीगत, भाषण; कंटाळवाणे भाषण; चऱ्हाट : ‘पण श्रीमंतांचे गुऱ्हाळ आवरेना त्याला ते काय करणार ।’ - ऐलेसं [सं. गुर + आलय] (वा.) एरंडाचे गुऱ्हाळ - कंटाळवाणे, निरर्थक बोलणे; ज्यातून काही निषन्न होत नाही असे बोलत राहणे. गुऱ्हाळलावणे - बडबडत बसणे; चऱ्हाट लावणे : ‘मी आपला काहीतरी गुऱ्हाळ लावीत असतो.’ - कलंदर ४१०.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आगोस

स्त्री. (कों.) उन्हाळ्याच्या सुरवातीचे दिवस. जसें-आगोठ = पावसाळ्याचा आरंभ. [सं. अग्र + उस्त्र = किरण; प्रा. ऊस; आग + ऊस]

दाते शब्दकोश

खड्या      

पहा : खडिया : ‘विहिरीवर लोक खड्या ऊस (वारे ऊस) करीत.’ - माआ २९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंबोणी

स्त्री. ऊस लावल्यावर तिसर्‍या दिवशीं प्रथम पाणी देतात तें. अंबवणी पहा.

दाते शब्दकोश

अरुण

पु. १ सूर्याचा सारथी; कश्यपपुत्र; गरुडाचा वडील भाऊ. २ उष:काल; प्रभात; पहांट; अरुणोदय; (तांबडे फुटणें). -वि. तांबडा; लाल; रक्त; आरक्त. ‘रागेजली अरुणकांति विराज वीते ।’ –नल ९७ [सं.]. -णिमा-स्त्री. तांबडेपणा; लाली; रक्तिमा. -णोदय-पु. तांबडे फुटणें; सुर्योदयापूर्वी पूर्वदिशेकडे रक्तप्रकाश दिंसूं लागणें; सूर्य उगवण्यापूर्वी तीन घटकांचा काळ; प्रभात; पहांट. ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला ।’ -होला १६.

दाते शब्दकोश

आसव      

न.       १. एखाद्या वस्तूचे औषधीप्रयोजनासाठी काढलेले सत्त्व, अर्क. याकरिता त्या वस्तूचे बाष्पीकरण करून त्या वाफेचे द्रवात रूपांतर करण्यात येते. ती वस्तू एखाद्या द्रवात उकळून तिचे सत्त्व काढण्यात येते. किंवा थेंबाथेंबाने पाझरण करून ते गोळा करण्यात येते. २. ऊस, काकवी वगैरेपासून काढलेली दारू. ३. (सामान्यतः) मद्य. ४. अर्क. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अवंशीं

क्रि.वि. पूर्वरात्रीं; रात्र पडतांच. ‘अंवशीं पहाटें पूर्वरात्रीं व उष:कालीं ’. इतररुपें अंशिक (कु.), अंशीं, अंवशीं (चि.), अंशेक (कु.).

दाते शब्दकोश

भविष्य

न. भावी गोष्ट. २ भावी गोष्टीविषयीं अगोदर केलेलें कथन; भाकीत. (क्रि॰ सांगणें; बोलणें). ३ (व्या.) पुढें येणारा काळ. ४ (व.) उत्पात. -वि. भावी. [सं. भू] ॰काल-पु. (व्या.) वर्तमान क्षणापुढें येणारा काळ. या काळीं असलेल्या क्रियापदावरून पुढल्या काळाचा बोध होतो. [सं.] भविष्यद्वक्त्ता, भविष्यवादी-वि. भाकित करणारा; भविष्य सांगणारा. [सं.] ॰भविष्य-पु. (व्या.) विवक्षित भविष्य काळाच्या पुढल्या काळीं एखाद्या क्रियेचा व्यापार व्हावयाचा असतां योजावयाचा भविष्यकाळ. उदा॰ करणारा असेन. [सं.] ॰भूत-पु. (व्या.) एखादी क्रिया भूतकाळीं करावयाची होती, परंतु कांहीं व्यत्ययामुळें ती सिद्धीस गेली नाहीं, अशा वेळीं योजावयाचा तो भविष्यभूतकाळ. उदा॰ करणार होतों. [सं.] ॰माण-वि. होणारें. 'कां भविष्यमाणें जियें हीं । तींही मज- वेगळीं नाहीं ।' -ज्ञा ७.१६२. [सं.] ॰वादी-वि. (ख्रि.) १ संदेष्टा. 'भविष्यवादी स्वर्गीं सारे लागति नाचाया ।' -उस ७६. २ (ख्रि.) आत्म्याच्या प्रेरणेनें गाणारा; काव्य करणारा. ३ (ख्रि.) ईश्वरी प्रेरणेनें पवित्र शास्त्रांतील रहस्याचा उलगडा करणारा, (इं.) प्रॉफेट्. ४ अति दूरदृष्टि (पुरुष). [सं.] ॰सूचक-वि. १ पुढील गोष्ट आगाऊ दाखविणारा. २ पूर्वसूचक; अग्रसूचक; उब्दोधक. [सं.] ॰ज्ञान- न. पुढें होणार्‍या गोष्टीचें ज्ञान. [सं.] भविष्योत्तर-न. भवि- तव्याचें भविष्य; भाकीत केलेली भावी गोष्ट. (क्रि॰ सांगणें; कथणें; कथून ठेवणें; कथन करणें). 'फिटे भविष्योत्तर आणि पावे सायु- ज्यता.' [सं.] भविष्या-वि. १ भविष्यद्वक्ता. २ दिवसगतीवर टाकणारा; ढकलपट्टी करणारा; चेंगट. ३ मागचें पुढचें अवधान नसावें, वारंवार भ्रांति पडावी अशा स्वभावाचा. [सं.]

दाते शब्दकोश

चारणे      

क्रि.       चरकात ऊस टाकणे. (झाडी)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चिपटी      

स्त्री.       १. रस काढून घेतलेला, पिळलेला ऊस; उसाचे चिपाड. २. खायला न मिळाल्यामुळे, आजारामुळे वळलेली पोटाची खपाटी, दामटी; रोडावलेले शरीर, पोट, इत्यादी. ३. झाडाची बारीक फांदी; फोक; शिपटी; शिमटी. [सं. चिपिट्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चकती      

स्त्री.       १. वाटोळी, सपाट, पातळ अशी कोणतीही वस्तू किंवा पदार्थ; (केळे, काकडी, ऊस इत्यादिकांची) खाप, फोड; चांदकी; चांदुकली; थापटी; पातळ वडी; वाटोळा तुकडा. २. चिठ्ठी; पत्र; हुकुमाचा कागद; तिकीट; कार्ड. ३. सनद; पास; दस्तक; परवाना. ४. शिपायाचा बिल्ला : ‘एक चपराशी चकती पाहून रयत थरथरी बकरी जशी ।’ - पला ६५. ५. मांसाचा पातळ तुकडा. पहा : परसुंदा ६. (ग्रंथ.) ग्रंथावर लावण्यात येणारी क्रमांकदर्शक चिठ्ठी. [सं. चक्रवत्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चोतरी, चोथरी, चोथड      

पु.       चोथा; (पदार्थ, ऊस इ.) चोखल्यानंतर, चावल्यानंतर, चघळल्यानंतर अवशिष्ट राहिलेला टाकाऊ अंश, भाग. ‘नीतिरूपी इक्षुदंडाचा आस्वाद न घेता… त्याची नुसती चोतरी हातीं देण्यात तुम्हाला काय पुरुषार्थ वाटतो कोणास ठाऊक?’ − नीशाप्र २४२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चोवडी      

स्त्री.       चोयटी; चुयटी; रस चोखून घेतल्यावर (ऊस इत्यादिकांचा) राहिलेला चोथा : ‘नाना भूस आणि कण । येकाचि म्हणणे अप्रमाण । रस चोवडिया कोण । शाहाणा सेवी ।’ − दास १८·५·३०. [सं. सीव्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चोयटी      

स्त्री.       चावून राहिलेला चोथा : ‘ऊस खाऊन टाकलेल्या चोयट्याचे ढिगारेही दोन तीन ठिकाणी पडलेले होते.’ − शिदोरी ३९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डोळा      

पु.       (कृषि.) अंकुर; मोड फुटण्याची, येण्याची जागा (बटाटा, ऊस, नारळ इ.ला). (वा.) डोळा बांधणे –एका झाडावर दुसऱ्या झाडाचे कलम करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ढें(ढें)कणें

अक्रि. (राजा.) १ आवेशानें एखाद्यावर उस- ळणें, ओरडणें; शिरा ताणणें; अंगवर येणें. २ डरकाळी फोडणें. [ढेंक]

दाते शब्दकोश

गांडा

पु. एक प्रकारचा ऊस. [हिं. गन्ना]

दाते शब्दकोश

गाठ      

स्त्री.       १. तिढा; अढी; गुंडाळा; वेटोळे; गुंतागुंत इत्यादी. २. झाडाचे टेंगूळ; लाकडातील गट्टा, गुळुंब. ३. बोरू, ऊस यांच्या दोन पेऱ्यांमधील सांधा. ४. (ल.) शरीराचा गोल मांसल भाग; पोटरीतील बेडकी. ५. बिनतोंडाचे (आंधळे) गळू; केसतूड; सूज; अवधाणा; बेंड (प्लेगच्या आजारात बहुधा सांध्यात गाठ येते). ६. (अव.) कपाळावरील आठ्या. ७. बेंबीभोवतालची ग्रंथी किंवा काठिण्य. ही प्राण व अपान या दोन वायूंच्या संयोगाने बनते असे म्हणतात. ८. पैशाचा कसा, थैली (मूळात पैसे ठेवून वस्त्राला मारलेली गाठ). ९. (ल.) बंधन; आळा; बेडी; अर्गळा. १०. अढी; पूर्वग्रह : ‘त्याजविषयीं जर आपल्या मनांत गांठ आहे तर.’ - नि १४९. ११. फास; सरकफास. [सं. ग्रांथे] (वा.) गाठ घालणे, गाठ ठेवणे - १. लक्ष ठेवणे; दृष्टी पुरविणे; मनावर घेणे. गाठ घालणे - १. भेटणे; एकत्र येणे; समोरासमोर येणे. २. चढाई करून जाणे; सामना घेणे : ‘घालीन गांठि त्यातें, मी कीं मारील तो मला आजी ।’ - मोकर्ण २०·२१. गाठ घेणे - भेटणे. गाठ तोडणे - दूर जाणे; अंतर पाडणे : ‘त्यांची गाठ पडली, तेव्हा सोशीत (शत्रूचा गोळीबार सोशीत) गाठ तोडीत तीन कोस लष्करपावेतो आले.’ - ऐलेसं ३१२०. गाठ पडणे - १. खरे काय ते पक्के करणे. ‘आता देतो म्हणाला, आता नाही म्हणता; तेव्हा आम्हास गाठ पडत नाही.’ - ऐलेसं २६८८. २. भेट घेणे. गाठ सुटणे - भांडवल कमी होणे. गाठीस करणे - साठविणे; राखणे; शिल्लक ठेवणे. जन्माची गाठ - विवाहसंबंध; हिंदू लोकात एकदा लग्न झाले म्हणजे ते मृत्यूपर्यंत टिकते असे समजले जात असे. सात गाठी देऊन ठेवणे, सात गाठीपलीकडे ठेवणे - केव्हाही खर्च न करण्याच्या उद्देशाने साठविणे. गाठ देणे, गाठ मारणे - गाठ तयार होईल असे करणे. गाठीला असणे - साठवलेला पैसा जवळ असणे. गाठीला लावणे - पैशाला पैसा जोडणे; पैसा साठवणे. गाठीस असणे - १. हुकमात किंवा ताब्यात असणे; जवळ असणे. २. शिलकीस ठेवलेला असणे; संग्रही असणे (पैका इ.).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गब्रा      

स्त्री.       पिकावरील कीड. (ज्वारी, मका, ऊस इ. च्या गाभ्यातील.) [सं. गर्भ]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गळीत      

न.       १. तेल निघणारे धान्य; ज्यापासून तेल निघते असा पदार्थ; तेलकट (आत तेल असणारा) पदार्थ. २. रस निघणारी वस्तू (ऊस वगैरे).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घानोड      

स्त्री.       ऊस पिळण्याचे गुऱ्हाळ. (झाडी)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घन्कर      

पु.       चरकात ऊस टाकणारा. (झाडी)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हाय

हाय hāya An interjection upon the sudden apprehension of some exquisite (esp. corporal) pleasure. 2 An interjection upon a pang or twinge or some sudden emotion or sensation of pain. Note. These two senses are the senses rather of the written word than of the interjection or sound हाय; for they belong to the interjection हाय under different modifications. The first is the sense of हाय as uttered with a full and continuing expiration; the second, of हाय as ejaculated suddenly and sharply. Other common ejaculations are हां, हूं, चूं, कूं, इस, उस, ढम, घम, कटा. हाय खाणें or घेणें To take alarm at; to conceive terror or apprehension or anxiety at or about. हाय खाणें or घेणें (तापाची, खाण्याची &c.) To have apprehensions (about fever, eating &c.) हाय पतकरणें or मोकलणें To acknowledge some wrong or foolish or disadvantageous doing; to evince regret or sorrow about. हाय सोडणें -देणें -घालणें To vent sighs or a sigh; and हाय घालणें To sigh after, i. e. long for. हायास आणणें To exhaust, spend, knock up; to reduce to extremity of weariness and weakness. हायास येणें To come or fall into the state of exhaustion or prostration; to be knocked up, broken down, tired out &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

हूं

उद्गा. १ प्रवृत्त करणें, परवानगी देणें, निकड लावणें, उतेजन देणें, संमती देणें, कबूल करणें इ॰ साठीं उपयोगांत आणावयाचा उद्गार; हं ! हां !! २ दुखापत झाली असतां काढलेला दुःखोद्गार; हाय ! चूं ! कूं ! उस ! (क्रि॰ म्हणणें; करणें). [ध्व.] म्ह॰ (गो.) हूं म्हळ्यार तपलें घास तूं = अनु- मोदन दिलें तर तुम्हींच काम करा.

दाते शब्दकोश

हूं hūṃ ind An interjection of inciting, urging, or setting on; at it! to it! 2 An ejaculation (like चूं, कूं, ईस, उस &c.) of a person wincing under a sudden twinge. See हाय. v म्हण, कर.

मोल्सवर्थ शब्दकोश

इडाळणे      

क्रि.       १. अधिक पिकणे; उतरणे; ‘त्यातच विटलेली, इडाळलेली पेरू केळी मांडले होते.’ − हात १४. २. सुकणे; डागाळणे : ‘उन्हांत पडलेला ऊस तापून आतील रस इडाळतो’ − गार १३२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

इक्षु

(सं) पु० ऊस, गन्ना, काठा. २ स्त्री० शेरडी.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

इक्षु      

पु.       ऊस. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

इक्षुजा      

स्त्री.       (रसा.) ऊस आणि बीट यांपासून तयार होणारी साखर. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

इक्षुकांड      

पु.       उसाचे पेर; कांडे; (सामान्यतः) ऊस.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

काकर      

पु.       १. ऊस लावायचा लहान उंचवटा. (झाडी) २. पहा काकरी १

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कांडाळणे      

अक्रि.        १. लांब व बळकट अशी पेरे येणे; वेगाने व जोमाने वाढणे (जोंधळा, बाजरी इ.) २. (ल.) मूल सपाटून वाढीला लागणे. ३. जोंधळा, बाजरी, ऊस पेराशी काळा पडणे. (नाशिक). ४. (ल.) रक्तपिती होणे. [सं. कांड]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कांडाळणें

कांडाळणें kāṇḍāḷaṇēṃ v i (कांड) To have its several कांड (internodations or portions included betwixt two articulations) forming long and strong, i.e. to be shooting up vigorously;--used of जोंधळा, बाजरा &c. Hence fig. To grow or shoot up--a child. 2 In some districts, as around Nashik &c. To get black and diseased at the joints;--used of जोंधळा, बाजरा, ऊस &c.: also to be affected with रक्तपिती or black leprosy at the joints--a person.

मोल्सवर्थ शब्दकोश

कांडारा, कांडारे, कांडारो      

पु.        बांबू, केळ, ऊस इ. चा उभा चिरलेला तुकडा, फांक. (गो.) [सं. कांड]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कांडारणे      

उक्रि.        जोराचा कोंब फुटणे, फोफावणे. कांड, खोड मजबूत भक्कम होणे. (ऊस, जोंधळा–क्वचित मुलांची वाढ.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कांडे      

न.        १. पेर; पूर्व; सांधा. २. दोन पेरांतील भाग, तुकडा. ३. ऊस, बांबू इ. चा तीन चार पेरांचा तुकडा, भाग, टिपरे. ४. झाडाचे सबंध खोड, विशेषतः फांद्या फुटायच्या आधीचे. ५. (ल.) लांबी मोजण्याचे एक माप (काडी, दोरा इ.) अशा रीतीने वाटेल त्या लांबीचे घेतलेले माप, यावरून (लांब भिंतीचा, ओट्याच्या, विहिरीचा, पाण्याच्या पाटाचा, इमारत कामाचा) एक किंवा विशिष्ट भाग. ६. जुनी वाळलेली, वठलेली टणक वेल. ७. एकदा मळणी केलेली किंवा झोडपलेली धान्याची ताटे, कणसे (फेकून दिलेली किंवा दुसऱ्यांदा मळणी करण्यासाठी, झोडपण्यासाठी ठेवलेली). ८. भात, नाचणी, वरई इ. ची लावणी करायला योग्य असलेली दाढ. ९. बोटांच्या सांध्याला होणारा एक रोग. १०. बाण; तीर : ‘कांडे मोकलीसी चांगें ।’ – उषा १५२६. पहा : कांड. ११. बोरू. (ना.) [सं. कांड] (वा.) अडीच कांड्यावर येणे – १. (गव्हाच्या ताटाला ओंबी फुटते तेव्हा अडीच पेरे असतात यावरून) ओंबी बाहेर पडण्याच्या बेताला येणे. २. चिडण्याच्या परमावधीला पोचणे (माणूस). कांडे पेरे घेणे – मोजमाप घेणे. कांडे चिरणे – (आट्यापाट्या) सूर धरणाऱ्याने पहिली टाळी देऊन पहिल्या पाटीला पाय लावून पुन्हा परत येऊन दुसरी टाळी देणे. कांडे पेरे पाहणे – (गुरे विकत घेताना) त्यांचे सांधे व हाडपेर, अंगकाठी वगैरे पाहणे. कांडे पेरे मिळणे किंवा कमीजास्त होणे – वरील प्रकारात बरोबर जुळणे किंवा न जुळणे. कांडे पेरे लावणे, कांडे पेरे लावून पहाणे – वहिमी, खुनी मनुष्याच्या, चोराच्या पायांचे मोजमाप सापडलेल्या भागाच्या पायाशी ताडून पाहणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कांडी      

स्त्री.        १. वेखंड, सुंठ, आले, हळद इत्यादींची मुळे व तुकडा; मोड; अंकुर; ऊस वगैरेची पेरे. २. त्या आकाराचा धातूचा तुकडा. ३. (वस्त्रोद्योग) वस्त्र विणण्यासाठी ज्या काठीला सूत गुंडाळलेले असते ती काठी. ४. (वस्त्रोद्योग) धोट्याच्या आतील दोऱ्याचे गुंडाळे, बाबीण; धोट्यामध्ये बसेल अशा लाकडी अगर बोरूच्या तुकड्यावर भरलेल्या सुताची गुंडाळी. ५. लसणीचा गड्डा. ६. चंदनाचे खोड.(गो.) ७. (नाविक) दोन्ही रोजांना सांधणारे व दोन्ही रोजांसहित भागाचे लाकूड. हा गलबताचा पाया होय. या लाकडाच्या वरच्या अंगाला दोन्ही बाजूंनी खाचा पाडून त्यात फळ्या बसवतात. (को.) ८. (छापखाना) फर्मा ठोकताना पान (पेज) व सामान (फर्निचर) हे चौकटीला आवळून बसण्याकरता ठोकायचा लाकडाचा तुकडा. ९. ओळ; चरण : ‘ब्राह्मणु एकु कांडि म्हणतु होता ।’–गोप्र ४५. [सं. कांड] (वा.) कांडी चिरगाळणे, कांडी फिरवणे– गारुड्याने आपल्या हातातील लाकडाची लहान काठी आपल्या हाताभोवती अथवा अंगाभोवती फिरवणे. (यक्षिणीची) कांडी फिरवणे – चमत्कार घडवून आणणे, अवचित एखादी गोष्ट घडवून पूर्वी घडलेल्या कृत्याच्या उलट होणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कबिरा      

पु.       उसाची एक जात. [क. कब्बु = ऊस]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कबकबीत      

वि.       पचपचीत; पाणचट (ऊस, कलिंगड, खरबूज इ.); बेचव.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कबू      

पु.       उसाची एक जात. हा जाड असून पेऱ्यावर उभ्या लाल रेषा असतात. (गो.) [क. कब्बु = ऊस]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कडंग      

वि.       १. वाळलेले; कडकडीत (अनावृष्टीमुळे अगर अतिपक्वतेमुळे बनलेला तांदूळ इ.) : ‘ऊस चांगला कडंग झाला होता.’ – भुज ६५. २. फार भाजल्यामुळे, चावताना किंवा दळताना कडकड वाजणारे; कठीण; खट्टर (धान्य, भाकरी). ३. खरपूस; पक्के.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कळक्या-ऊंस

पु. एक प्रकारचा ऊंस. हा फार टणक असून यांत रस थोडा पण फार गोड असतो. [कळक + ऊस]

दाते शब्दकोश

कळक्याऊस

कळक्याऊस kaḷakyāūsa m (कळक & ऊस) A kind of sugarcane, hard, and of little yet very sweet juice.

मोल्सवर्थ शब्दकोश

कमरक, कमरख      

न.       एक झाड व त्याचे आंबट फळ; कर्मर; कंब्रक; कम्रक. हे झाड फार मोठे होत नाही. पाने पातळ, रंग हिरवा, छाया थंड असते. याच्या फळांचे लोणचे करतात : ‘सप्ताळें, ऊस, पुंडे, कविठ, कमरखे, वाळकें सूक्ष्म, थोरें ।’ - सारुह ३·४९. [सं. कर्मरंग]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कणीस

न. १ ज्यांत धान्य भरलें जाहे असा धान्याचा तुरा; गुच्छ; भुट्टा. (भात, वरी, राळा, गहूं या धान्याशिवाय). २ केतकीच्या झाडास येणारा तुरा, पुष्प; केवड्याचा गुच्छ. ३ नारळाची पोय; शेरणी (जीस पुढें नारळ धरतात ती). ४ कुरड्या करण्याकरितां शिजविलेलें व मळलेलें तांदुळाचें पीठ. हें सोर्‍यांत दाबून त्याच्या कुरडया पाडतात. ५ उंसाचें वाढें, तुरा. 'ऊस सांडूनि मागती । कणीस त्याचें ।' -एभा २१.३३९. [सं. कणिश; प्रा. कणिस; 'कणिसं सस्यशीर्षकं ।' -हेमचंद्र] ॰निसवणें-पसवणें-कणीस बाहेर येणें. पागोरा-पु. (व्यापक.) जोंधळा, बाजरी वगैरेचें कणीस. (क्रि॰ घेणें; तोंडर्णें मोडणें). 'हिंडत्या फिरत्या बलुत्यांनीं कणीसपागोरे नेले म्हणून ताटेंथोटीं राहिलीं.'

दाते शब्दकोश

कणीस      

न.       १. (ज्वारी, बाजरी, मका इ.चा) दाणे, धान्य भरलेला, धान्याचा तुरा; गुच्छ; भुट्टा. (क्रि. निसवणे, पसवणे.) २. केतकीच्या झाडाला येणारा तुरा, पुष्प, केवड्याचा गुच्छ. ३. (जिला पुढे नारळ धरतात ती) नारळाची पोय; शेरणी. ४. उसाचे वाढे, तुरा : ‘ऊस सांडूनि मागती । कणीस त्याचें ।’ - एभा २१·३३९. [सं. कणिश]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कंडारणे       

अक्रि.       १. लठ्ठ होणे; भरणे (ऊस, धान्याचे कणीस, माणूस, जनावर इ.) २. (ल.) मोठा व धट्टा - कट्टा होणे (माणूस, जनावर, झाड इ.) [सं. कांड]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कराकर, कराकरा      

क्रिवि.       दात खाणे, ऊस चावणे, काकडी खाणे या वेळी होणाऱ्या आवाजाने युक्त. पहा : कराकरा [ध्व.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

करवा      

पु.       सोललेल्या उसाचा तुकडा; गंडेरी. [क. कर्बु, कव्बु=ऊस]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कूं

कूं kūṃ ind कू f An ejaculation (like चूं, हूं, इस, उस &c.) of one wincing under a sudden pang or twinge. v म्हण, कर. See हाय.

मोल्सवर्थ शब्दकोश

कूं, कू

अस्त्री. एखादी व्यथा झाली असतां मनुष्याच्या तोंडून निघणारा दुःखोद्गार (चूं, हूं, इस्, उस् हुश् याप्रमाणें). (क्रि॰ म्हणणें; करणें). हाय पहा. [ध्व. सं. कु = कूं कूं शब्द- करणें).

दाते शब्दकोश

कूं, कूं      

अ.       एखादी व्यथा झाली असताना मनुष्याच्या तोंडून निघणारा दुःखोद्गार (चं, हू, इस्, उस्, हुश् याप्रमाणे). (क्रि. म्हणणे, करणे) पहा : हाय [ध्व.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खोडवा

खोडवा khōḍavā m sometimes खोडांवा m The second crop of sugarcane; canes sprouting from the left stock: also the stock left to reshoot. Also खोडव्याचा ऊस After-canes. खोडवा taken up by some designating word (as मिरच्याचा-वांग्याचा-शाळूचा-तमाखूचा) expresses After-shoots, or the remaining roots and stock (the मूळखंडें) after the first gathering. Hence, metaphorically, खोडवा comes to be applied (as in N. D.) to the Plantation or field (wherein the roots and stock are left). Also खोडव्याचा-शाळू- तमाखू-वांगीं-ताग-अंबाडी &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

खोडवा, खोडवे, खोडावा, खोडावे      

पु.       १. उसाचे दुसरे पीक; तोड झाल्यावर राखलेल्या बुडख्यापासून पुन्हा फुटलेला ऊस; पुन्हा फुटण्याकरिता जमिनीत राखून ठेवलेले बुडखे. २. मागची फूट; पहिल्या काढणीनंतर राहिलेली मुळे किंवा बुडखे (मिरच्या, वांगी, शाळू, तंबाखू यांचे). ३. (ल.) मुळ्या किंवा बुडखे ठेवलेले शेत अथवा मळा. (घाटी.) ४. लागवडीसाठी वापरण्यात येणारा केळीचा सोट.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

मंजी

उश. (माण.) म्हणजे.

दाते शब्दकोश

मुसावणें

मुसावणें musāvaṇēṃ v i (Poetry. मूस Crucible. To occupy thoroughly; to fill and thus assume the form of; as melted metals do of the crucible.) To fill and swell; to flow through copiously and vigorously;--as blood, sap &c. through the veins and vessels, filling, distending, plumping, enlarging. Ex. अहो वाढियेला ऊस तेथें मुसावला रस. 2 (Poetry.) To pervade. Ex. किजेल भाषाविवरण ॥ जेथें नित्यानंद पूर्ण ॥ मुसावला असे ॥. 3 To get plump generally. 4 To be poured into a crucible. Ex. तें कर्मपंकें लिप्तलें अज्ञानें ॥ मुसावलें सूटकेसी मुकलें ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

अक्रि. १ पूर्णपणें भरणें; भरून जाणें; भरून फुगणें; नसांतून रक्त, रस इ॰ पूर्णपणें भरून वाहणें. 'अहो वाढि- येला ऊस । तेथें मुसावला रस ।' २ वाढणें; फुगणें. ३ मग्न होणें; साकार होणें; एकत्र होऊन जाणें. 'घृत थिजलें कीं विघुरलें । परी घृतपणा नाही मुकलें । तेवीं अमूर्त मूर्तीं मुसावलें । परी तें संचलें परब्रह्म ।' -एभा १.२४६. ४ निमग्न होणें; रमणें. ५ व्यापणें; आंत पूर्णपणें भिनणें; भरून असणें. 'कीजेल भाषा विवरण । जेथे नित्यानंद पूर्ण । मुसावला असे ।' ६ मुशीमध्यें घातला जाणें; मुशींत आटून तयार होणें; मुशींत ओतून मुशीच्या आकाराची वस्तु करणें. 'गाळोनियां मीक्षसुख । तेथींचा मुसा- वोनि हरिख ।' -एरुस्व १.५४. [मूस]

दाते शब्दकोश

नैशकर      

पु.       ऊस. - भाद्विसंवृ १७२. [फा.नै - शकर]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निपाणी      

स्त्री.       १. निर्जल; अपुऱ्या पाण्याच्या पुरवठ्याचा (देश, गाव, स्थान). २. विहीर, पाटबंधारा इ.च्या पाण्याची जरूर नसलेला; एकदाच पावसाने भिजलेल्या जमिनीच्या ओलाव्याने वर वाढणारा (ऊस इ.). ३. पाणी न घातलेले, न मिसळलेले; निर्भेळ (दूध, दारू इ.).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ओलाचा      

वि.       पाटाच्या किंवा पावसाच्या पाण्याखेरीज केवळ जमिनीतील ओलीमुळे उगवलेला, लावलेला (ऊस इ.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ओलाचा

वि. पाटवण किंवा पावसाच्या पाण्याखेरीज केवळ जमिनींतील ओलामुळें उगवलेला, लावलेला (ऊस इ॰)

दाते शब्दकोश

ओटाळी      

स्त्री.       दोन−दोन, तीन−तीन ऊस एका जागी बांधण्याचे काम.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पंड्या, पंड्याऊस

पु. एक जातीचा ऊस; पुंड्या पहा.

दाते शब्दकोश

प्रमाण

प्रमाण pramāṇa n (S) Proof, evidence, authority. Four kinds are enumerated,--प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द Perception by an organ of sense; inference; analogy or comparison; testimony; and (in cases of disputed property) four other kinds, viz. भोग, लेख, साक्ष्य, दिव्य The evidence of actual possession; that of a grant or other written document; that of witnesses to the right; and that of an appeal by ordeal. प्रमाण is further any seat or form of Evidence, or any ground or basis of Evidencing or establishing. Ex. (from विवेकसिंधु) अर्थापत्ति उपमान इतिहास परिशेषादि प्रमाण तयासी हि स्वतंत्र कवण प्रमाण तो बोलेल ॥. 2 Support, sanction, warrant, grounds for assurance or admission. Ex. आज पा- ऊस लागेल असें प्र0 नाहीं; तो आज येईल उद्या येईल हें सांगवत नाहीं त्याचे येण्याचें प्र0 नाहीं. 3 Ordeal- 4 Definiteness or exactness of amount. Ex. शब्द किती आहेत ह्याचें प्र0 कोण्हास लागलें नाहीं; त्या लढाईमध्यें किति मेलीं त्याचें प्र0 लागत नाहीं. 5 Measure, magnitude, quantity: also a dose. 6 A measure (whether of weight, length, capacity, or time). 7 The rule or standard by which a thing is determined, adjusted, or proportioned. 8 The name of that term of the Rule of three which expresses the rate. See त्रैराशिक. नैको ऋषिर्यस्यवचःप्रमाणं ॥ &c. A part of the Shlok श्रुतिश्च भिन्ना स्मृतयश्च भिन्ना नैको ऋषिर्यस्यवचःप्रमाणं ॥ धर्मस्यतत्वं निहितं गुहायां महाजनो येन गतः सपंथा ॥1॥- (Inspired authorities differ and) it is not one ऋषि, if the word of the ऋषि might stand as प्रमाण, then there are, not one, but many.

मोल्सवर्थ शब्दकोश

फड

फड phaḍa m ( H) A place of public business or public resort; as a court of justice, an exchange, a mart, a counting-house, a custom-house, an auction-room: also, in an ill-sense, as खेळण्या- चा फड A gambling-house, नाचण्याचा फड A nachhouse, गाण्याचा or ख्यालीखुशालीचा फड A singingshop or merriment shop. The word expresses freely Gymnasium or arena, circus, club-room, debating-room, house or room or stand for idlers, newsmongers, gossips, scamps &c. 2 The spot to which field-produce is brought, that the crop may be ascertained and the tax fixed; the depot at which the Government-revenue in kind is delivered; a place in general where goods in quantity are exposed for inspection or sale. 3 Any office or place of extensive business or work,--as a factory, manufactory, arsenal, dock-yard, printing-office &c. 4 A plantation or field (as of ऊस, वांग्या, मिरच्या, खरबुजे &c.): also a standing crop of such produce. 5 fig. Full and vigorous operation or proceeding, the going on with high animation and bustle (of business in general). v चाल, पड, घाल, मांड. 6 A company, a troop, a band or set (as of actors, showmen, dancers &c.) 7 The stand of a great gun. फड पडणें g. of s. To be in full and active operation. 2 To come under brisk discussion. फड मारणें- राखणें-संभाळणें To save appearances, फड मारणें or संपादणें To cut a dash; to make a display (upon an occasion). फडाच्या मापानें With full tale; in flowing measure. फडास येणें To come before the public; to come under general discussion.

मोल्सवर्थ शब्दकोश

फलुस

स्त्री. एक फळांतील साखर; फलशर्करा; (इं.) फ्रुक्टोज. साध्या साखरेपेक्षां ही गोड व पचण्यास हलकी असतें. हिचा उपयोग मधुमेह विकारावर होतो.' -ज्ञाको(फ) ७. [सं. फल + उस प्रत्यय]

दाते शब्दकोश

रात

स्त्री. १ रात्र. 'सुग्रीव म्हणें यत्नें लंकेचें भस्म जा करा रातीं ।' -मोरामायणें युद्ध ५५७. २ रातकिडा. [सं. रात्रि; प्रा. राती; हिं. पं. गुज. बं. उरिया रात; सिं राति; पोर्तुजि. अराची] म्ह॰ (गो.) रातचे बोल दिसाक पोल = रात्रीचे बोल दिवसाच्या वेळीं फोल होतात. रातच्यारात-क्रिवि. रात्रभर. सामाशब्द- रातकिडा-पु. रात्रीं किर्र आवाज काढणारा एक किडा. रात- बिरात-स्त्री. संकटाचा, धोक्याचा, अनुपपतीचा काल; वेळप्रसंग. 'रातबिरात आहे, चार जिन्नस घरांत बाळगून ठेवावें.' -क्रिवि. संकटकालीं; रात्रींबेरात्रीं. 'धान्य घेऊन ठेवावें, रातबिरात उष- योगी पडेल.' [हिं. रात + बिरात] रातवडा-पु. (गो.) एका रात्रीचें काम. रातवणी-न. (बायकी) रात्रीं हातपाय, घुण्या- करितां, शौचाकरितां किंवा पिण्याकरितां ठेवलेलें पाणी. [रात्र + वणी = पाणी] रातवा-पु. १ रात्रीचा सर्व काल; रात्रपणा. (क्रि॰ पडणें; होणें). २ रात्रीचा पाऊस. 'रातवा पडूं लागला; रातव्याच्या पावसानें किंवा रातव्यानें बाजरी नासेल. ३ बुजूं नये म्हणून घोड्याला रात्रीं बाहेर काढणें. (क्रि॰ देणें) [रात] रातवा घेउन निघणें-रात्र असतांना निघणें. (पावसानें) रातवा धरला-पावसानें रात्रीं पडण्याला सुरुवात केली. रातसार- क्रिवि. रात्रभर. रातांधळा-वि. ज्याला रात्रीं मुळींच दिसत नाहीं असा; रातांधळें प्राप्त झालेला. रातांधळें-न. एक नेत्र- रोग ह्यामुळें सुनुष्यादिकांस रात्रीं दिसत नाहीं. रातोरातीं- क्रिवि. रात्री; मध्यरात्रीच्या वेळीं. [वात] रातावणें-अक्रि. (काव्य) रात्र पडणें, होणें. 'रातावलें आतां जाऊं दे बाई घरा ।' [रात] रातिवळा-पु. (कों.) रात्रीं गुरांच्या पुढें टाकलेली वैरण किंवा ओलें गवत. रातिवा-पु. रात्रपणा; रात्र 'जे कांडाचेनि आंधारें । करिति रातिवा ।' -शिशु ९४४. राती-स्त्री. १ (काव्य) रजनी; रात्र. 'आनंदकंदा प्रभात झाली उठ सरली राती ।' -भूपाळी घनश्यामाची २०. २ अंधार. [सं. रात्री] रातीच्या रातीं-क्रिवि. (कुण.) रात्रीच्या मुदतींत; रात्रीच्या रात्रीं. राती(त्रि)दिवो-क्रिवि. रात्रंदिवस. 'तंव राहटवी रातिदिवो ।' -माझा १८.५०४. [प्रा.] रातोरात- क्रिवि. १ रात्रीच्या रात्रीं; दिवसाची इ॰ वाट न पाहतां रात्रीच्या वेळीं. २ सर्व रात्र; रात्रभर. 'हें पत्र म्यां रातोरात जागून लिहिलें' ३ रात्रीच्या वेळीं, रात्र असतांना. 'एव्हां निघालास तर रातोरात पोंचशील.' रातोरातीं-क्रिवि. रात्रीं; मध्यरात्रींच्या वेळीं. [रात] रात्र-स्त्री. १ रजनी; रात्रि; सूर्योस्तापासून सूर्योदयापर्यंतचा काळ; पृथ्वी दैनंदिन गतीनें आपल्या आसाभोंवतीं फिरतांना तिचा सूर्यानें अप्रकाशित असलेला अर्धा भाग. २ रातकिडा; झिल्ली. [सं. रात्रि] (वाप्र.) ॰ओरडणें-झिल्लीच्या शब्दानें नादणें. ॰वेर्‍याची जाणें-अतिशय दु:खांत व हालांत रात्र जाणें. मरती रात्र झाली-शपथेचा एक प्रकार. बंदाखालीं बसणें पहा. सामा- शब्द- ॰किडा-पु. रातकिडा; झिल्ली. रात्रंदिवस, रात्रंदिस- क्रिवि. रात्रीं व दिवसां; अहर्निश; अहोरात्र; सर्वदा. रात्रांध- वि. रात्रीं ज्यास दिसत नाहीं असा; रातांधळें झालेला. [सं.] रात्रि-स्त्री. रात्र; रजनी. [सं.] रात्रिं(त्रि)चर-पु. १ निशा- चर; राक्षस. २ चोर. [सं.] रात्रिंदिव-क्रिवि. (काव्य) रात्रीं व दिवसां; सर्वकाळ. 'जे रात्रिंदिव तूझें हित साधाया धरूनि धनु जपती ।' -मोकर्ण ३.३७. [सं.] रात्रिविर्तां-क्रिवि. रात्रीं; भर मध्यरात्रीं. [रात्रि + विर्तां] रात्रौ-क्रिवि. रात्रीस; रात्रीच्या ठायीं. [सं.] रात्रौणें-अक्रि. रात्र करणें. 'ऐसेआंहीं यावें रात्रौनि सायासीं ।' -शिशु १८३.

दाते शब्दकोश

शेरडी

स्त्री० शेळी, बकरी. २ ऊस.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

शिंपण, शिपणी

स्त्री. सेक; सिंचन; प्रोक्षण; सडा; शिंपणे. (क्रि॰ करणें; टाकणें; शिंपणें). शिंपणें, शिपणें-क्रि. १ सिंचणें; वर उडविणें; सडा टाकणें; प्रोक्षण करणें; सिंचन करून ओलें करणें; अभिषिक्त करणें. 'इथें वड शिंपीजे ।' -वसा ६०. शि-(शिं)पणें-न. १ रंगपंचमीस किंवा शिमग्याच्या समाप्तीस अंगावर रंग उडवितात तें; रंग उडविण्याचा खेळ. २ रंगपंचमी. 'शिंपण्या दिवशीं हल्ला नेमिली कुंप झाले तयार ।' -ऐपो ३५२. ३ (कों.) दांड्यांतून पाणी वाहून नेऊन तें झाडांस देण्याची रीत. शिंपणपंचमी-शिंपणेंपंचमी-स्त्री. रंगपंचमी. शिप- णीचा ऊस-पु. पाटाच्या पाण्यावर होणारा ऊंस. याच्या उलट-पुरणीचा ऊस.

दाते शब्दकोश

सकाळ

स्त्री. प्रात:काल; सूर्योदयापासून माध्यान्हापर्यंतचा काल. [सं. उष:काल; सत्काल-भाअ १८३३]सकाळचा तारा-पु. शुक्र सुर्याच्या अगोदर उगवतो त्या वेळेस त्यास म्हण- तात.सकाळ-ळा-ळीं-क्रिवि. १ उदयीक; दुसर्‍या दिवशीं प्रात:कालीं. २ प्रभातीं; लवकर प्रात:काळीं. सकाळ वकाळ- क्रि. (ना.) लवकर; झटपट; न रेंगाळतां. सकाळवणी- वाणी-क्रि. लवकर; वेळेवरच; झटपट; उशीर होण्यापूर्वींच; अगोदरच. सकाळसंध्याकाळ, सकाळसांज-क्रिवि. सकाळीं व सायंकाळीं; दोन्ही वेळीं; सायंप्रात:.सकाळें-क्रिवि. योग्य काळीं; त्वरेनें. 'अमर अमृतपान करितां । मरताती सर्वथा सकाळें ।' -एभा ११.१३१३. 'सत्त्व शुद्धि होईल सकाळें ।' -गीता १२.४७६.

दाते शब्दकोश

सकळ, सकळवेळीं, सकळा

क्रिवि. १ सकाळच्यावेळीं; सकाळींच; लवकर. २ वेळेच्या पूर्वीच; अगदीं वेळेवर; योग्य अवधि असतां. 'तूं चाकरी सोडणार तर मला सकळवेळीं सांग म्हणजे दुसरा कोणी पाहीन.' [सं. उष:काल; सुकाल]

दाते शब्दकोश

सळसळ

स्त्री. १ सळ असा आवाज; उकळी; खदखदणें. (क्रि॰ करणें; बाजणें). २ शिवशिव; रवरव; कंडू (जखम, गळूं वगैरेची); तडस; मुसमुस (भरलेले स्तन वगैरेची); चुरचुर; खवखव; शिवशिव (दांत, जीभ वगैरेची) (क्रि॰ सुटणें). [ध्व.] सळसळ-ळां, सळाळांक्रिवि. १ सळसळणारा आवाज करून (आधण वगैरे). (क्रि॰ वाजणें; करणें). २ थरथर, धडधड, वगैरे आवाजसारखें. सळसळणें-अक्रि. १ उकळणें; खदखदणें; उस- ळणें (पाणी वगैरे सळसळ आवाज करीत, रक्त वगैरे). 'सळ- सळणार्‍या रक्ताला ।' -संग्रीमगीतें १०३. २ शिवशिवणें, रव- रवणें; कंडू सुटणें (खरूज, गळूं वगैरे). ३ तटतटणें; हुळहुळणें; मुसमुसणें (भरलेले आंचूळ, स्तन, स्तनाग्रें वगैरे). ४ शिव- शिवणें; खवखवणें (दांत, हात, पाय, जीभ-खाण्याकरितां, चावण्याकरितां, मारण्याकरितां). ५ कुडकुडणें; थरथरणें; शिव- शिवणें (थंडी, आंबट पदार्थ वगैरेमुळें-दांत वगैरे). ६ सळसळ असा आवाज करीत जाणे (सर्प वगैरे). [ध्व.] सळसळीत- वि. गुळगुळीत; तुळतुळीत; तकतकीत.

दाते शब्दकोश

संध्या

स्त्री. १ दिवस व रात्र यांमधील संधिकाल. २ त्रैवर्णिं- कांनीं प्रात:काळीं, माध्यान्हीं, व सायंकाळीं करावयाची दैनिक प्रार्थना, उपासना. 'हल्लीं संध्या करणें हें ब्राह्मणानां नांवच नाहीं.' -टिले ४.१४१. ३ दोन युगांमधील संधिकाल. ४ संधि- प्रकाश; तिन्हिसांजा; उष:काल. 'सुदती दिती कामार्ता गांठीं संध्येंत काश्यपा...' -मोमंत्र ३.५२. ५ कालावधि; अवकाश. उदा॰ सकाळ; दुपार; सायंकाळ; तिसरा प्रहर. [सं. संध्या] ॰काल-काळ-पु. सायंकाळ; सूर्यास्तसमय. ॰काळचा तारा- पु शुक्र ज्यावेळीं सूर्यास्तानंतर पश्चिमेकडे दिसतो त्यावेळीं त्यास म्हणतात. ॰काळीं-क्रिवि. सायंकाळीं; सूर्यास्तानंतर. ॰काळी- स्त्री. एक फुलझाड व त्याचें फूल; गुलबाशी. ॰पात्र-न. ताम्हान; संध्या करतांना पणी सांडावयाचें भांडें. ॰भट-पु. न्यायशास्त्राचा मुतालिक. -शिदि ४३७. ॰मठ-पु. संध्या करण्याकरितां बांध- लेली जागा, इमारत, घर. 'संध्यामठ भूयेरी । पायरिया नदी- तीरीं ।' -दा २.७.२२. ॰राग-पु. १ सायंकाळच्या वेळीं आकाशांत दिसणारा तांबूस रंग. 'नातरी संध्यारागींचे रंग ।' -ज्ञा ६.२५४. 'कीं संध्यारागें गवसलें । निववितें पूर्णचंद्रं प्रकटलें ।' -ऋ २१. २ (संगीत) संध्यांकाळच्या वेळीं गावयाचा राग. ॰वंदन-न. त्रैवर्णिकांनी करावयाची संध्योपासना.

दाते शब्दकोश

सपाटणें

सपाटणें sapāṭaṇēṃ & सपाटा Commonly झपाटणें or चपाटणें & झपाटा. 2 सपाटा, besides having senses and uses in common with झपाटा, confers, when prefixed to names of objects, the sense of Hugeness or enormousness, with the force of the words Monster or hulk; as सपाटा डोंगर, सपाटा झाड, सपाटा धोंडा, सपाटा वाडा-इमारत-घर, सपाटा साप; and, more freely, सपाटा पाऊस, सपाटा पीक, सपाटा ऊस &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

टारफुला, टाळाफुला      

पु.       जोंधळा, ऊस या पिकांत उगवणारी एक वनस्पती. ही दुसऱ्या झाडात आपल्या मुळ्या खुपसून स्वतःचा निर्वाह करते व दुसऱ्या पिकाचा नाश करते.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तास

तास tāsa m ( A) An hour. 2 A plate of metal on which the hours are struck, a gong. Ex. घटिका गेली पळें गेलीं तास वाजे झणाणां ॥ आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना ॥. 3 n (सीता S) A furrow dug along by the plough. 4 The bed of a river. 5 A common term for the streams into which a river breaks up in the dry season. 6 Turning over the ground with a plough. Ex. राजापूरप्रांतीं सात तासें घालावीं तेव्हां ऊस पेरावा. ताशीं लागणें (To get well up in the furrow.) To be somewhat advanced, or to be growing nicely;--used of corn.

मोल्सवर्थ शब्दकोश

त्रिकांड      

वि.       १. तीन पेरे असलेला (ऊस, बांबू इ.). २. तीन भाग, प्रकरण असलेला (ग्रंथ, कोश). ३. कर्म, उपासना व ज्ञान ही कांडे, प्रकरणे असलेला (वेद) : ‘तुझा अनुहताचा डमरू । ...त्रिकांडी थोरू गर्जत ।’ – एभा १९·२. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तुरा      

पु.       १. पागोटे, टोपी वगैरेंना लावण्यासाठी मोती, फुले इ.चे केलेले भूषण, अलंकार; चूड. २. राजगिरा, मका, ऊस यांना येणारा गुच्छ; झुबका; गौंडा. ३. पक्ष्याच्या डोक्यावरील शेंडी. ४. एक प्रकारची लावणी. या प्रकारात प्रकृतीवर पुरुषाचे वर्चस्व वर्णिलेले असते व नायक नायिकेच्या आर्जवात असतो. या लावणीवाल्यांच्या डफावर तुरा लावलेला असतो. ५. नथीतील विशिष्ट ठिकाणचा मोत्यांचा समूह, गुच्छ. [अर. तुर्रा] (वा.) तुरा लावणे – मोठा पराक्रम करणे; कीर्ती, प्रतिष्ठा मिळविणे. तुरा लावून फिरणे – दोष अंगी लागला असता त्याचे निराकरण होवो अगर न होवो, प्रतिष्ठितपणे मिरवणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टवळी      

स्त्री.       जोंधळा किंवा ऊस यांतील एक प्रकारचे बांडगूळ. [क.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

थळ, थल      

पु.       १. (ऊस, सुपारी, केळी, मिरच्या इ. ची) लागवड; बन. २. भुतांनी पछाडलेली जागा; विशेष प्रसंगी भुतांची जमण्याची जागा. ३. (क्व.) मर्यादित जागा, स्थळ. ४. अर्धेलीने खोताला द्यावयाचा उत्पन्नाचा भाग. ५. एका जमीनदाराच्या किंवा कुळाच्या एकंदर मिळून जमिनी, शेत. ६. घोडा, बैल इ. ची त्यांच्या गुणावरून ठरवलेली जात; बिजवट. ७. थारोळे; तळे : ‘तैसें बहुतीं बहुतकाळ सेवसेवूनि केलें थळा’ –मुरंशु ४१५. ८. देवस्थानची पंचक्रोशी. ९. जमीन. [सं. स्थल] (वा.) थळ उठणे, थल उठणे – १. पिशाच्चांचा उपद्रव सुरू होणे. २. वस्ती हलणे : ‘कोल्हापुरास थळ उठलें आहे. मरीच्या उपद्रवामुळें नित्य २५–४० माणूस मरतें.’ –ऐलेसं २६०१. थळ घेणे, थल घेणे, थळ देणे, थल देणे, थळ नेमणे, थल नेमणे, थळ ठरवणे, थल ठरवणे, थळ मागणे, थल मागणे – जमिनीच्या मालकीची अथवा बांधाची भांडणे तोडण्यास कबूल करणे, देणे, नेमणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उद्-त्

एक उपसर्ग अर्थ-१ वरचढपणा; श्रेष्ठत्व; वर्चस्व. उ॰ उत्तर; उद्वाहन; उद्गार; उद्दिष्ट. २ वियोग; विभाजन; बिघाड; दूरी- करण; अपसारण; (पासून-मधून). उ॰ उत्सर्जन; उत्क्षेपण. ३ वर; ऊर्ध्व; उंच. उ॰ उत्थान; उत्तिष्ठ. [सं. उद्; तुल. झें उश्; हि. उअस् = ओस्-ओइस्]

दाते शब्दकोश

उदय

भविष्याची आशादायक चाहूल, प्रगतीची शिडी चढले, वंशवृक्ष वाढीस लागला, नवयुगाची ही इमारत घडविली, अडचणींदून वर आला, व्यापक क्षेत्र मिळालें, नवजीवनाचा उष:काल, ध्येयशिखराकडे पहिले पाऊल, भाग्य उदेले

शब्दकौमुदी

उधसणें

सक्रि. १ उकरून काढणें; उसकटणें; उसकणें; ‘हें प्रकरणपुन्हां उधसवूं नका‘ २ –अक्रि. वर येणें; उस- ळणें. ‘सर्वांचेंच दुबळेपण उधसून वर आलें’ –उपेअं १९. [सं. उद् + हस्]

दाते शब्दकोश

ऊख      

पु.       ऊस. [सं. इक्षु]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उंस

(सं) पु० ऊस, इक्षु, साठा, शेरडी.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

उंशील

उंशील uṃśīla n R (ऊस) A plantation of sugarcanes.

मोल्सवर्थ शब्दकोश

उसेती

स्त्री. (नाविक) भरतीची वेळ. [उस + येणें]

दाते शब्दकोश

उसल or उंसल

उसल or उंसल usala or uṃsala n P (ऊस & आलय) A sugarcaneplantation.

मोल्सवर्थ शब्दकोश

उष्मा

पु. १ उष्ण; उष्णता. 'कां कस्तुरीसगट परिमळ । उष्मेसगट अनळ ।।' -अमृ १.४२. २ उकाडा; दाह; गरमी. [सं. उष् = जाळणें]

दाते शब्दकोश

उष्मांक      

पहा : उष्णांक उस      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उसमट

पु. (गो.) घुसमट पहा. [उस + मर प्रत्यय]

दाते शब्दकोश

उसमटणें

क्रि. (गो.) गुदमरणें; घुसमटणें पहा. [का. उस्स, उस्सने = कष्टानें श्वास घेणें; म. उस = दीर्घश्वास]

दाते शब्दकोश

उष्ण

वि. १ तप्त; गरम; दाहयुक्त. २ ऊन; थंड न झालेला; न निवलेला (अन्न वगैरे पदार्थ). ३ (ल.) रागीट; आवेशयुक्त; तडफदार; उतावळा; प्रखर. ४ शरीरांत उष्णता उत्पन्न करणारा (सुंठ, मिरीं इ॰ पदार्थ). ५ तिखट; जालीम; कडक (पदार्थ). -न. १ ऊन, गरम हवा; ताप. २ उष्ण विकृति; शरीरांतील उष्णता, दाह, गरमी; याविरुद्ध शैत्य. [सं. उष् = जाळणें] ॰कटिबंध-पु. पृथ्वीच्या दोन्हीं अयनवृत्तांमधील भाग; भूमध्यरेषेपासून दक्षिणो- त्तर २३ ।।' अंशांपर्यंतचा प्रदेश. 'उष्णकटिबंधावर सूर्याचे किरण लंबारुपानें पडतात.' -मराठी ६ वें पुस्तक (१८७५) २९७. ॰काल-पु. उन्हाळा. ॰दर्शक-वि. उष्णता दाखविणारा (इं.) थर्मोस्कोप. [सं. उष्ण + द्दश्] ॰मान-न. उष्णतेची तिव्रता, प्रमाण, माप (इं.) टेंपरेचर. ॰मापक-न. उष्णतेची तीव्रता मोजण्याचें (उष्णतामापक) यंत्र. (इं.) थर्मामीटर. ॰वात, वायु-पु. १ उष्णतेनें पोटांत गुबारा धरणें. २ अंबट, करपट ढेंकरा येणें. ॰वास- पु. पंचाग्निसाधन. 'उष्णवास जळवास । शीतवास अरण्यवास ।।' -दा ४.१.१२. [सं. उष्ण + वस्] ॰वीर्य-वि. शरीरांत उष्णता उत्पन्न करणारें, उष्ण परिणामकारक (औषध). [सं. उष्ण + वीर्य]

दाते शब्दकोश

उष्णता, उष्णत्व

स्त्रीन. १ तप्तता; गरमपणा; उष्णपण. उष्ण पहा. 'उष्ण प्रकाश तो सूर्याचा । शीत प्रकाश तो चंद्राचा । उष्णत्व नस्तां देह्याचा । घात होये ।।' -दा १६.२.१०. २ उष्ण विकृति (शरीराची). [सं. उष् = जळणें] ॰गतिशास्त्र-न. उष्णता आणि यंत्रसिद्ध काम यांमधील संबंध दाखविणारें शास्त्र. (इं.) थर्मोडाय- नॅमिक्स. ॰जलविद्युत्-स्त्री. उष्णतेपासून उत्पन्न होणारी वीज; (इं.) थर्मो इलेक्ट्रीसिटी. -तेचें यांत्रिक सममूल्य-न. एक भाग उष्णता उत्पन्न करावयास करावें लागणारें काम किंवा श्रम; (इं.) मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. ॰द्रव-पु. द्रवरूप उष्णता, (इं.) कॅलोरिक फ्लुइड. ॰धारणशक्ति स्त्री. उष्णता टिकून राह- ण्याची शक्ति. ॰परिमाण न. उष्णतेचें माप; (इं.) क्वांटिटी ऑफ हीट. ॰मान, उष्णमान-न. उष्णतेची तीव्रता; (इं.) टेंपरेचर. ॰मापक न. पदार्थातील उष्णता मोजण्याचें यंत्र; (इं.) कॅलोरी- मीटर. ॰मापन-न. पदार्थांतील उष्णता मोजण्याची क्रिया; (इं.) कॅलोरीमिट्री. ॰यंत्त्र-न. उष्णतेनें चालणारें इंजिन; (इं.) हीट इंजिन. ॰वहन-न. एका परमाणूची उष्णता त्याच्या अतिनिकट परमाणूस मिळण्याची क्रिया; (इं.) कंडक्शन. ॰विसर्जन-न. उष्ण पदार्थां- तून उष्णता बाहेर पडून जाण्याची क्रिया; (इं.) रेडिएशन. ॰विस्तृति-स्त्री. उष्णता सर्वत्र पसरण्याची क्रिया; (इं.) डिफ्युजन ऑफ हीट. ॰उष्णतोत्पादक-वि. उष्णता उत्पन्न करणारा; (इं.) एक्सोथर्मिक.

दाते शब्दकोश

उसराण

उसराण usarāṇa n (ऊस & राण) Ground prepared for the planting of sugarcanes. 2 A cleared plantation of sugarcanes.

मोल्सवर्थ शब्दकोश

उसराण      

न.       उसाचे शेत; ऊस लावण्याची जमीन.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उसरा-री

१ स्त्री. वाळविलेली भाजी; सुकविलेली भाजी (अळूं, मेथी, गाजरें इ॰). सुकलेल्या आंब्याच्या फोडी; वाळव लेल्या पालेभाजीस पळवा म्हणतात. 'या आंब्याच्या उसर्‍या आहेत.' २ (ल.) कृश; वाळलेलें शरीर. 'तत्सुख हे मत्सुख तनु होतचि होती तदाधिनें उसरी ।' -मोआदि ३५.४. 'रोग न ये हा भोग लागला देह वाळून उसरी ।' -पला ७६. उसर करणें-क्रि. वाळविणें; कृश करणें; निगा न राखून, त्रास देऊन किंवा छळ करून (जनावर, मनुष्य यास) कृश करणें; हयगय करणें. [सं. उष् = उष्णता देणें, जाळणें.]

दाते शब्दकोश

उससणें

अक्रि. १ उसासा टाकणें; श्वास टाकणें. 'मग उस- सौनि किरीटी । वास पाहिली ।।' -ज्ञा ११.२५३. २ वाढणें; उत्पन्न होणें; जिवंत होणें; जीवन पावणें; प्रकट होणें. 'तंव आयुष्यनदी उससे । देहाचि देहा ।।' ज्ञा १७.१३२. 'परि तें असो हें ऐसें । कावरें झाड उससे । यया महदादि आरवसें । अधोशाखा ।।' -ज्ञा १५. १०९. [सं. उत् + श्वस्; प्रा. उस्सस]

दाते शब्दकोश

उसवणे, उसविणे      

उक्रि.       १. शिवण काढून टाकणे; टाके उलगडणे; दोरा काढणे; उघडणे (शिवण्याच्या उलट क्रिया.) २. घरावरील शिवलेले गवत काढून टाकणे. (को.) [सं. उस् + सिव् = शिवणे]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

विलायती

विलायती vilāyatī a ( A) Relating to a foreign country, esp. to England or Europe. 2 Sharp at acquiring prevalence or influence. The word has the import and force, and occurs in the vulgar applications, of the English words Clever, cunning, knowing, knavish, shrewd &c. 3 विलायती, signifying Foreign, is freely applied to exotics of nature and to products of art viewed, not simply as foreign, but as superexcellent, extraordinary, or remarkable; as वि0 ऊस m A kind of sugarcane; वि0 कोंबडा m A turkey; also a Guinea-fowl; वि0 गवत n Lucerne or Medicago sativa; वि0 चना m The garden-pea (common green pea); वि0 चिंच f A small-leaved tree, bearing a small fruit; वि0 थुवर f Slipper plant; See थुवर; वि0 धोतरा m A variety of Thorn-apple. It has thorny leaves, and it bears a yellow flower; वि0 निवडुंग m n The broad-leaved, dark green, unthorny निवडुंग, Euphorbia inermis; वि0 बाभळ f The Parkinsonian tree; वि0 मूग f (Commonly भुईमूग) Ground-nut; वि0 मेंधी f Myrtus communis. Grah.; वि0 वांगी f A plant, and वि0 वांगें Its fruit, the Tomato. See fully under बेलवांगी. वि0 शेर n Slipper-plant. See थुवर. 4 Applied in the sense of Wild, haramscaram, rantipole, mischievous &c. to children.

मोल्सवर्थ शब्दकोश

विसणणें

अक्रि. आवेशयुक्त होणें; सरसावणें; चिडणें; उस- ळणें. 'आवेशें भुजा त्राहाटिती । विसणैले हांका देती ।' -ज्ञा १. १३३. [सं. आवेशन]

दाते शब्दकोश

दंड      

पु.       १. काठी; सोटा; छडी; सोडगा. २. लिंग. ३. मार; (शारीरिक) शिक्षा. ४. शिक्षा म्हणून घेतलेला पैसा. सरकारी न्यायपद्धतीने गुन्हा शाबीत झाला म्हणजे हा आकारला जातो. ५. खांद्यापासून कोपरापर्यंतचा हात. ६. केलेल्या, पाडलेल्या भागांच्या खुणांसाठी शेतात किंवा बागेत घातलेला मातीचा उंचवटा; बांध; गडगा; पाणी जाण्यासाठी दोन्ही बाजूंना उंचवटा करून पाडलेली सरी; पाट; नदीकिनारा; काठ. (बे.) ७. लांबी मोजण्याचे परिमाण; चार हातांची काठी. २००० दंड = १ कोस. ८. वेळेचे परिमाण; चोवीस मिनिटे. ९. पैलवानांच्या व्यायामाचा प्रकार; जोर (यावरून) एखादे कठीण काम अथवा प्रचंड उद्योग. (क्रि. काढणे, पेलणे). १०. क्रमाने उतार असलेली किंवा निमुळती पण लांबट टेकडी, सोंड (पर्वताची). ११. डोंगराच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत असलेला उतार, ओघळ, अरुंद वाट; दंडवाट. १२. पर्वतरांगेची एक लहान शाखा; डोंगराच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत वाकडीतिकडी गेलेली खडकांची ओळ. १३. (कवायत वगैरे प्रसंगी केलेला) सैन्यरचनेचा एक प्रकार; रांग; फरा; व्यूह. १४. ताठ उभे राहणे. १५. जिंकणे; ताब्यात, कह्यात आणणे. १६. अपराधाबद्दल शिक्षा म्हणून घेतलेली रक्कम; जातीत परत घेण्यासाठी दिलेले प्रायश्चित्त. १७. रताळी, ऊस इ. लावण्यासाठी मातीचा केलेला लांबट उंचवटा, वरंबा. १८. तडाका : ‘निंदा निस्तेज दंडी कामलोभावर पडी ।’ - ज्ञा १३·४९४. १९. हिंसा : ‘ऐसा मनें देहें वाचा । सर्व संन्यासु दंडाचा ।’ - ज्ञा १३·३१०. २०. पाठीचा कणा : ‘माजी उभारलेनि दंडे । शिरकमल होय गाढें ।’ - ज्ञा ६·२०२. २१. (वस्त्राचे) दोन भाग, तुकडे जोडण्यासाठी घातलेली शिवण. (क्रि. घालणे). [प्रा. दंडी = जुन्या वस्त्राचा सांधा]. [सं.] (वा.) दंड आवळणे, दंड बांधणे, दंडाला काढण्या लावणे - कैद करणे. दंडथोपटणे - १. कुस्ती खेळण्यापूर्वी दंड ठोकणे;कुस्तीला सिद्ध होणे. २. (ल.) साहसाने अथवा कोणालाही न जुमानता एखादे कार्य करायला उभे राहणे. दंड थोपटून उभे राहणे - (ल.) वादाला, विरोधाला तयार होणे. दंड दरदरून फुगणे, दंड फुरफुरणे - आपल्याशी कुस्तीला योग्य असा गडी पाहिला म्हणजे पहिलवानाचे दंड स्फुरण पावणे, फुगणे. दंडाला माती लावणे - कुस्तीला तयार होणे (कुस्तीपूर्वी दंडाला माती लावतात).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दंड

पु. १ काठी; सोटा; छडी; सोडगा; दंडा. २ मार; शिक्षा (शारीरिक). ३ शिक्षा म्हणून घेतलेला पैसा; याचे राजदंड, ब्रह्मदंड जातिदंड असे तीन प्रकार आहेत. सरकारी न्यायपद्धतीनें गुन्हा शाबीत झाला म्हणजे शिक्षेदाखल सर कारांत भरावयास पैसा. ४ खांद्यापासून कोंपरापर्यंतचा हात. ५ केलेल्या, पाडलेल्या भागांच्या खुणांकरितां शेतांत किंवा बागांत घातलेला मातीचा उंचवटा; बांध; गडगा; पाणी जाण्यासाठीं दोहों बाजूंस उंचवटा करून पाडलेली सरी, पाट; (बे.) नदीकिनारा; कांठ; (वस्त्राचे) दोन तुकडे जोडण्याकरितां घात- लेली शिवण. (क्रि॰ घालणें). [प्रा. दंडी = जुन्या वस्त्राचा सांधा] ६ लांबी मोजण्याचें परिमाण, चार हातांची काठी. २००० दंड म्हणजे एक कोस. ७ वेळेचें परिमाण, चोवीस मिनिटें. ८ पैलवानांच्या व्यायामाचा एक प्रकार; जोर. 'आनंत्या नित्यनेम उठतो दंड सवाशें काढितो ।' -ऐपो ६७. (यावरून) एखादें कठिण काम अथवा प्रचंड उद्योग. (क्रि॰ काढणें; पेलणें). ९ क्रमानें उतार असलेली किंवा निमुळती पण लांबट टेंकडी, सोंड (पर्वताची). १० डोंग- राच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत असलेला उतार, ओघळ, अरुंद वाट; दंडवाट. ११ पर्वताच्या रांगेची एक लहान शाखा; डोंग- राच्या माथ्यापासून तों पायथ्यापर्यंत वांकडीतिकडी गेलेली खड- कांची ओळ. १२ (कवाईत वगैरे प्रसंगीं केलेला) सैन्याच्या रचनेचा एक प्रकार; रांग; फरा; व्यूह. 'तया दंडीं क्षोभलें । लोकत्रय ।' -ज्ञा १.१६५. १३ ताठ उभें राहण्याची अवस्था. १४ जिंकणें, ताब्यांत, कह्यांत आणणें. १५ अपराधाबद्दल शिक्षा म्हणून घेतलेलें द्रव्य, पैसा; जातींत परत घेण्यासाठीं दिलेलें प्रायश्चित्त. १६ रताळीं, ऊस इ॰ लाव- ण्याकरितां मातीचा केलेला लांबट उंचवटा, वरंबा. १७ तडाका. 'निंदा निस्तेज दंडी । कामलोभावर पडी ।' -ज्ञा १३.४९४. १८ हिंसा. 'ऐसा मनें देहें वाचा । सर्व संन्यासु दंडाचा ।' -ज्ञा १३.३१०. १९ पाठीचा कणा. 'माजी उभारलेनि दंडे । शिरकमल होय गाढें ।' -ज्ञा ६.२०२. [सं.] (वाप्र.) आवळणें, बांधणें, दंडाला काढण्या लावणें-चतुर्भुज करणें; कैद करणें. ॰थोपटणें-१ कुस्ती खेळण्यापूर्वीं दंड ठोकणें; कुस्तीस सिद्ध होणें. २ (ल.) साहसानें अथवा कोणासहि न जुमानतां एखादें कार्य करण्यास उभें राहणें. ॰थोपटून उभें राहणें-(ल.) वाग्युद्धास तयार होणें. ॰दरदरून फुगणें-आपल्याशीं कुस्तीला योग्य असा गडी पाहिला म्हणजे पहिलवानाचे दंड स्फुरण पावून फुगणें. ॰फुर- फुरणें-मारामारीची, कुस्तीची वगैरे उत्कट इच्छा होऊन दंड स्फुरण पावणें. भरणें-तालीम वगैरेमुळें दंड बळकट व जाड होणें. ॰भरणें-शिक्षेदाखल पैसा देणें. दंडास दंड लावून- घांसून-क्रिवि. बरोबरीच्या नात्यानें; सारख्या सन्मानानें. दंडाला माती लावणें-कुस्तीला तयार होणें (कुस्तीपूर्वी दंडास माती लावतात). दंडपासून साधित शब्द- दंडादंडी-स्त्री. मारामारी; काठ्यांची झोडपाझोडपी; कुस्ती; झोंबी. [दंड] दंडायमान-वि. १ (अखंडित काठीप्रमाणें) निर्मर्याद; अपार (वेळ, काळ). २ मध्यें पडलेला; आडवा पडलेला, पसरलेला. [सं.] दंडारणा-पु. सोटा; सोडगा; बडगा. -वि. जाड; स्थूल; घन (वस्तु); बळकट; मजबूत; जाड (मनुष्य, पशु). दंडारा-ळा-वि. (शिवण) ज्यास दंड घातला आहे असें; मध्यें शिवण असणारें (वस्त्र, कपडा). [दंड] दंडावणें-अक्रि. थंडीनें अथवा अवघड श्रमानें ताठणें (शरीर, अवयव). [दंड] दंडासन-न. आळसानें (जमीनीवर) पाय ताणून पसरणें, निजणें; सरळ हात- पाय पसरून आळसानें पडणें. (क्रि॰ घालणें). [सं. दंड + आसन] दंडार्ह-वि. दंड्य; दंड करण्यास योग्य. [सं.] दंडित-वि. १ शिक्षा केलेला. दंड केलेला. २ (ल.) निग्रह केलेला; वश केलेला; मारलेला; ताब्यांत आणलेला. [सं.] दंडिता-वि. १ शिक्षा करणारा; मारणारा; शिक्षा करितो तो. [सं.] दंडिया-पु. १ बारा ते पंधरा हात लांबीचें धोतर, लुगडें. २ बाजाराचा बंदो- बस्त करणारा छोटा अधिकारी; पोलीस मुकादम. [हिं.] दंडी- पु. १ दंड धारण करणारा; संन्याशी. २ द्वारपाल. ३ -स्त्री. अर्ध्या दंडापर्यंत बाह्या असणारी चोळी. [सं.] -वि. १ दंड धारण करणारा. २ दंड म्हणजे उभी जाड शिवण असलेला (कपडा). दंडी-स्त्री. मेण्यासारखें, चार माणसांनीं उचलावयाचें टोपलीचें वाहन. डोंगर चढतांना हींत मनुष्य बसतो व हमाल ही खांद्यावर वाहतात. [हि.] दंडुका-पुस्त्री. (काव्य) हाताचा पुढचा भाग. -मोको. दंडुका, दंडुकणें, दं(दां)डूक, दंडोका-पुन. सोटा; बडगा; दांडकें; काठी; लांकडाचा लहानसा जाड तुकडा; शिपायाच्या हातांतील सोटा. [सं. दंड] दंडुकेशाही-स्त्री. मारहाण किंवा जुलूम करून अंमलगाज विण्याची पध्दति; पाशवी बल; दांडगाई. 'पोलिसांची दंडुकेशाही अलीकडे फारच बोकाळली आहे.' -केसरी १६-४-३०. दंडुक्या- वि. काठीनें मार देण्यास संवकलेला; दांडगा; जबरदस्त. दंडेरा- वि. दंडारा पहा. दंडेल-ली-वि. दांडगा; अरेराव; अडदांड; झोंड; मुख्यत्वें, जो कर्ज परत फेडण्यास नाकबूल असतो तो; दंडुक्या (मनुष्य). दंडेली-स्त्री. अरेरावीची वर्तणूक; दंडेलपणा; दांडगाई; जबरदस्ती; अन्याय; सामर्थ्याचा दुरुपयोग (मुख्यत्वें देणें न देण्यासंबंधीं). दंड्य-वि. १ शिक्षा करण्यास योग्य. २ दंड करण्यास योग्य. [सं.] दंड्याप्रमाणें-क्रिवि. शिरस्त्याप्रमाणें. सामाशब्द- ॰थडक-स्त्री. खांद्याच्या बाहेरच्या भागानें केलेला आघात. [सं. दंड + थडक] ॰दास-पु. दंडाबद्दल गुलाम होऊन राहिलेला मनुष्य. [सं.] ॰धारी-पु. यम. 'नुपेक्षी कदां कोपल्या दंडधारी ।' -राम २७. -वि. १ हातांत काठी असलेला. २ (ल.) संन्यासी. ॰नायक-पु. कोतवाल; पोलिसांचा अधिकारी. 'सवे सारीतु पातीनिलें । दंडनायका पाशीं ।' -शिशु ५०४. ॰नीति- स्त्री. १ नीतिशस्त्र; नीति; संसारांतील वर्तुणुकीचे आणि व्यवहाराचे कायदे, नियम. यालाच दंडनीति, अर्थशास्त्र, व्यवहारशास्त्र, दृष्टार्थ- शास्त्र, हे जवळजवळ पर्यायशब्द आहेत. २ (कायदा) शिक्षा करून दाबांत ठेवण्याचें शास्त्र. हें राजनीतीच्या चार भागांपैकी चवथें होय. ३ अर्थशास्त्र, आन्वीक्षिकी पहा. [सं.] ॰पत्र-न. न्यायांत खोटा ठरला म्हणजे त्यापासून दंड घेण्याचें पत्र. [सं.] ॰पक्ष (करण)-न. (नृत्य) पाय ऊर्ध्वजानु करणें व त्यावर उजवा हात लताख्य करीत राहणें. [सं.] ॰संयुतहस्त-पु. (नृत्य) हात हंसपक्ष करून बाहू पसरून एका हातानें दुसर्‍या हातास एकदां कनिष्ठिकेपासून आरंभ करून आंतील बाजूनें बाहेरच्या बाजूस विळखा घालणें; नंतर कनिष्ठिकेपासूनच पण बाहेरील बाजूनें प्रारंभ करून आंतील बाजूस विळखा घालणें. [सं.] ॰पाणी-पु. शिव; यम. -वि. ज्याच्या हातांत दंड आहे असा; धट्टाकट्टा व दांडगा; गलेलठ्ठ व झोंड; आडदांड. [सं.] ॰पाद-(आकाशी, चारी)- वि. (नृत्य) नूपुरपाय पुढें पसरून क्षिप्त करणें म्हणजे कुंचित पाय उचलून दुसर्‍या पायाच्या बाहेरील बाजूस पोटर्‍यांचें स्वस्तिक होईल अशा प्रकारें टांचेच्या भारावर टेकणें व मग तें स्वस्तिकां- तील पाऊल उचलून पसरणें व खालीं टाकतांना अंचित करून दुसर्‍या पायांत अडकविणें. [सं.] ॰पारुष्य-न. १ कडक, कठोर शिक्षा. २ काठीनें हल्ला करणें; छड्या मारणें; ठोंसे देणें; मारणें (हात, पाय, शास्त्र इ॰ कांनीं). ३ (कायदा) हल्ला; भय प्रदर्शक रीतीनें हात किंवा काठी उगारणें, मारणें. [सं.] ॰पूपिकान्याय-पु. (उंदरानें काठी नेली त्या अर्थीं तिला बांधलेली पोळी खाल्ली हें उघडच होय यावरून) कार्यकारण, अंगउपांग, प्रधानअप्रधान यांचा न्याय; ओघाओघानेंच प्राप्त झालेली गोष्ट. उदा॰ राजाचा जय झाल्यानंतर त्याच्या सेनेचा जय अर्थांतच दंडपूपिकान्यायानें होतो. [सं. दंड = काठी + पूपिका = पोळी + न्याय] ॰प्रणाम-पु. साष्टांग नमस्कार;;लोटांगण. 'दंड प्रणाम करोनिया ।' -गुच ९.९. ॰प्राय-वि. दंडासारखा; साष्टांग (नमस्कार). 'करी दंडप्राय नमन ।' -गुच ४१.१४. ॰फुगडी- स्त्री. (मुलींचा खेळ) परस्परांच्या दंडांना (किंवा खांद्यांना) धरून उभ्यानें फुगडी खेळण्याचा एक प्रकार. [दंड + फुगडी] फुगई- फु(पु)रोई-स्त्री. १ दंडासाठीं केलेली जप्ती; दंड. २ (अधि- कार्‍यानें) बेकायदेशीर बसविलेला दंड; बेकायदेशीर दंड बसविणें. (क्रि॰ घेणें; देणें; भरणें). ॰वळी, कोपरवळी-स्त्री. (व.) (दंडावरची) वांक; स्त्रियांचा एक अलंकार. [दंड + वेली] ॰वाट-स्त्री. १ (उजाड, भयाण असा) लांबच लांब रस्ता; जवळपास गांव, वस्ती नाहीं असा रस्ता. २ टेकड्यांच्या कडेनें गेलेली अरुंद पायवाट. ३ एकमेकास मिळणारे रस्ते. ॰वान्- वि. काठी, दंड, वेत्र इ॰ हातांत घेणार. [सं.] ॰विकल्प- पु. शिक्षेची अदलाबदल; शिक्षा कमी द्यावी कीं अधिक द्यावी याविषयीं विचारणा. [सं.] ॰सरी-स्त्री. (बागेमध्यें) पाणी जाण्याकरितां खणलेला लहानसा पाट, चर, खाचण; तसर्‍यांच्या बाजूचा पाट. [दंड + सरी] ॰स्नान-न. घाई घाईनें केलेलें अर्धवट स्नान; नद्यादिकांच्या ठिकाणीं अंग न चोळतां केकळ दंड मात्र भिजतील अशा प्रकारचें केलेलें स्नान; काकस्नान; पाण्यांत एक बुचकळी मारून केलेलें स्नान. [सं.]

दाते शब्दकोश

डोंगर

पु. १ लहान पर्वत; टेंकडी; पहाड; घाट. २ (ल.) मेहनतीचें काम; काळजी करण्यासारखा आजार; कर्जाचा बोजा, पाप, गुण, संकट, त्रास याचें आधिक्य. ३ (ल.) काजळाचा गोळा रास (भांड्याच्या बुडावर धरलेली). ४ (कों.) डोंगराळ मुलु- खांत प्रथम नाचणी पेरलेलें शेत. ५ (कों.) शुष्क, डोंगराळ प्रदेश; नाचणी, वरी यांसारख्या पिकांच्या उपयोगी जमीन. [प्रा. डुंगर; गु. डुंगर] (वाप्र.) डोंगर खणून (पोखरून) उंदीर काढणें- अचाट परिश्रम करून त्याची फलश्रुति फारच अल्प झालेली दाख- विणें. डोंगरावरून उडी टाकणें-क्षुल्लक गोष्ट करणें. उदा॰ हलकी देणगी देणें. डोंगरीं दिवा लावणें-पेंढारी, लुटारू इ॰ ना भिऊन) डोंगरांत जाऊन राहणें, वस्ती करणें. ॰म्ह १ डोंग- रास दुखणें आणि शिंपींत औषध. २ दुरून डोंगर साजरा. सामा- शब्द- ॰कठडा, कठाड-डी, कांठ, किनारा-पु. डोंगराची कड, हद्द, सीमा; डोंगराच्या पायथ्याचा, आसपासचा प्रदेश. डोंगरकठाड्याचे गांवास रान लागत पडलें.' ॰कणगर-कंगर- पु. डोंगर पर्वत; डोंगराळ मुलूख; टेकट्या. ॰करी-वि. डोंगरी; डोंगरांत राहणारे. 'डोंगरकरी कोण आहेत...यांची जोराची चव- कशी चालू केली' -अस्पृ ४ ॰कोळी-पु. डोंगराळ मुलुखांतील एक जात व तींतील व्यक्ति. ॰खिंडी-स्त्री. खिंडींतील अरुंद मार्ग; घाट. ॰गांव-पुन. डोंगरावरील, डोंगरामधील गांव. डोंगरत- क्रिवि. (व.) उत्तरेस, उत्तरेकडेस 'तो डोंगरात गेला.' ॰दळें- न. जंगल तोडून लागवडीस आणलेली डोंगरावरील जमीन. ॰पठार-स्त्री. डोंगराच्या माथ्यावरचा सपाट प्रदेश. ॰रान-न. डोंगराळ प्रदेश, मुलुख. ॰वट, डोंगरट डोंगराळ-वि. डोंग- रानीं युक्त; डोंगरी; डोंगरासंबंधीं, खडकाळ, (प्रदेश); पहाडी. ॰सरा-री-स्त्री. डोंगरांची, टेकड्यांची रांग. डोंगराचें लवण- न. डोंगरांतील वळण अथवा वांकण. डोंगरी-स्त्री. १ लहान डोंगर; टेकडी. २ डोंगरी कापड पहा. -वि. १ डोंगरांवर पिकणारें, होणारें. २ डोंगरांनीं युक्त; डोंगराळ. ३ डोंगरासंबंधीं. [डोंगर] ॰कापड-न. १ डोंगरी किल्ल्याच्या (मुंबईच्या) मुलुखांत पूर्वीं विकत असेलेलें जाडेंभरडें कापड. २ (ल.) हलक्या जातीचें व दराचें कापड. इंग्रजींतहि डुंगरी या नांवानेंच हें कापड प्रसिद्ध आहे. ॰ऊस, डोंगरी-पु. एक जातीचा ऊंस. -कृषि ४५०. ॰किल्ला-पु. मुंबईचा फोर्ट जॉर्ज किल्ला. ॰बागायत-न. (कों.) डोंगराच्या उतावरील बागाईत. ॰मिरी-स्त्री. (राजा.) काळीं मिरीं, मिर्‍यांची एक जात.

दाते शब्दकोश