मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

एकतानता, एकतानपणा      

स्त्री. पु.       एकाग्रता; तन्मयता; अनन्यवृत्ती : ‘वेळ आपल्या गतीनें एकसारखा एकतानपणें जातच असतो.’ − वज्रा २१३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

एकतानता, एकतानपणा

स्त्रीपु. एकाग्रता; अनन्यवृत्ति. 'वेळ आपल्या गतीनें एकसारखा एकतानपणें जातच असतो. ' -वज्राघात २१३.

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

अवेग्रता

स्त्री. अव्यग्रता (अप.) एकतानता. 'कीर्तनें अवे- ग्रता घडे । कीर्तनें निश्रये सांपडे' -दा ४.२.२९. [सं. अव्यग्रता]

दाते शब्दकोश

धूर

पु. १ जळत्या लांकडांतून निघालेला कोळशाचा अंश. २ जिल्हई; मुलामा (सोनें, चांदी इ॰ वरील). ३ (ल.) मग्नता; तन्मयता; एकतानता; तल्लीनता. 'त्याचा त्या कामांत धूर आहे.' ४ धुंदी. 'विद्येचा-गर्वाचा-धनाचा किंवा पैशाचा-अधिकाराचा- धूर.' ५ एकाच ठिकाणीं फार वेळ बसल्यामुळें किंवा ओझ्याच्या भारामुळें येणारी कळ. (क्रि॰ उठणें; निघणें लागणें; होणें). ६ तिखट-मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यानें नाकातोंडांतून जे उष्ण भप- कारे सुटतात ते. 'मुखीं घालितां अतितिखटीं । नाकीं तोंडीं धूर उठी ।' -एरुस्व १४.१०९. करपट ढेंकर ७ आकाशाची अभ्रा- च्छादित स्थिति; धुकें; मळभ. (क्रि॰ उठणें; निघणें; होणें). [सं. धूम्र] ॰देणें-दाखविणें-(ल.) फसविणें; ठकविणें; चकविणें. 'त्या लफंग्यानें त्याला चांगलाच धूर दिला.' धूरा- वर धरणें-गांजणें; निर्दयपणें वागविणें; छळणें. ॰निघणें-गुप्त बातमी थोडीशी बाहेर येणें, किंचित् कळणें. -ख ४९३३.

दाते शब्दकोश

धूर      

पु.       १. जळत्या लाकडातून निघणारा कोळशाचा वायुरूप अंश. २. जिल्हई; मुलामा (सोने, चांदी इ. वरील). ३. (ल.) मग्नता; तन्मयता; एकतानता; तल्लीनता. ४. धुंदी. ५. एकाच ठिकाणी वा स्थितीत फार वेळ बसल्यामुळे किंवा ओझ्याच्या भारामुळे येणारी कळ. (क्रि. उठणे, निघणे, लागणे, होणे). ६. तिखट, मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने नाकातोंडातून सुटणारे उष्ण भपकारे; करपट ढेकर : ‘मुखीं घालितां अतितिखटीं । नाकीं तोंडीं धूर उठी ।’ - एरुस्व १४·१०९. ७. ढगाळलेले आकाश; धुके; मळभ. (क्रि. उठणे, निघणे, होणे). [सं. धूम्र] धूर दाखविणे, धूरदेणे - (ल.) फसवणे; ठकवणे; चकवणे. धूर निघणे - गुप्त बातमी थोडीशी बाहेर येणें, किंचित् कळणे. धुरावर धरणे - गांजणे; निर्दयपणे वागविणे; छळणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुंग

वि. १ बेभान; मूढ; धुंद; जड; निपचित (ज्वर, झोंप, दुःख, निशा इ॰ नीं). २ गर्क; तल्लीन; निमग्न (एखाद्या विद्येचा अभ्यास, व्यासंग यांत). ३ थक्क; आश्चर्ययुक्त; मोहपावून परावृत्त; स्तम्भित (शास्त्रांतील कठिण अंश पुरतेपणीं मनांत न आल्यामुळें इ॰). ४ एखाद्या विषयांत एकतानता झाल्यामुळें इतर व्यवसायांत अनासक्त, विरक्त. [फा. गुंग = मुका]

दाते शब्दकोश

गुंग      

वि.       १. बेभान; मूढ; धुंद; जड; निपचित (ज्वर, झोप, दुःख, नशा इ. नी.). २. गर्क; तल्लीन; निमग्न (एखाद्या विद्येचा अभ्यास, व्यासंग यात). ३. थक्क; आश्चर्यचकित; मोह पावून परावृत्त; स्तंभित (शास्त्रातील कठीण अंश पुरतेपणी मनात न आल्यामुळे इ.). ४. एखाद्या विषयात एकतानता झाल्यामुळे इतर व्यवसायात अनासक्त, विरक्त [फा. गुंग = तल्लीन, मूक]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घमंड, घमंडी      

स्त्री.       घोष; गजर; एकतानता; नादमधुरता : ‘ताळमृदांगघमंडी । मिळोनि जातां उठे अधिक आवडी ।’ –दावि १७५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घमंड-डी

स्त्री. १ विपुलता; प्राचुर्य; अतिशयता; रेल- चेल; समृद्धि; अतिरेक. 'आज लाडवांची घमंड झाली.' २ (कामाचा, काळजीचा) रगाडा; नेट; कचका; निबिडता. 'आज कामाची घरांत घमंडी आहे.' 'आशा ह्या कर्जाचे पेंचाचे घमं- डींत तो अद्यापि पडला आहे.' -व्यनि ९०. ३ थाट; बहार; मजा; रंग. 'केलें घमंड कीर्तनीं ।' -दावि ४१६. 'घमंडी मोठी न्हायाची । केंस पसरूनि उदवायाची ।' प्रला २१७. ४ अतिशय उपभोग; चैन; चंगळ. 'त्यावेळेस त्यांची खाण्या- पिण्याची व नानाप्रकारचे मळीण विषयोपभोग घेण्याची मोठी घमंडी उडती.' -व्यनि ४३. ५ घोष; गजर; एकतानता; नाद- मधुरता. 'ताळमृदांगघमंडी । मिळोनि जातां उठे अधिक आवडी ।' -दावि १७५. 'घमंडी टाळांची घाई । करटाळिया फडकती पाहीं ।' -ह १०.१४१. -वि. १ कर्णमधुर; सुस्वर; सुश्राव्य. 'भजन कीर्तन घमंड करित ।' -दावि १६७. २ भरपूर; विपुल; समृद्ध; मोठा; मनसोक्त. 'नटोनि घमंड नाचो लाऊं लोकां ।' -दावि १४. 'द्याकार घमंड मांडला ।' -वेसीस्व ११.७७. [हिं. घमंड = गर्व]

दाते शब्दकोश

जुगल      

स्त्री.        १. जमाव; समूह. २. सख्य; मिलाफ; एकतानता (वाद्ये, उपाय) यांची. ३. सामना; बरोबरी. ४. जोडीने गाणे, खेळणे, दुसऱ्याशी आपले जमविणे; साथ; एकमेकांचा संयोग. ५. एकत्र केलेले खलबत; मसलत. ६. (सामा.) जूग; जूट; जोडी. [सं.युगल]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जुगणें

अक्रि. १ भाग, तुकडे जोडणें, जुळविणें. २ (ल.) जमणें; मिलाफ होणें; एकमत होणें; सिद्ध्यनुकूल परस्पर सुसंगत होणें (दोन माणसांचे विचार, उपाय, पदार्थ), 'एक बैल पडला तापट, दुसरा पडला मठ्ठ यामुळें नांगराचे कामास दोघांचें जुगत नाहीं.' ३ समजूत पटणें; सख्य होणें; तडजोड होणें (शत्रु, वादी; प्रतिवादी यांची). ४ मिलाफ बसणें; परस्पर जमणें; जुळणें; अनुरूप घटना होणें (काव्याचे चरण इ॰कांची). 'आम्ही कापड घेणार होतों परंतु कापडकर्‍याचें आमचें जुगत नाहीं.' ५ संभोगार्थ स्त्रीपुरुषांनी एकवटणें. ६ अनेक सोंगट्या एका घरांत येणें. [सं. युग] जुगल-स्त्री. १ जमाव; समूह. २ सख्य; मिलाफ; एकतानता (वाद्यें, उपाय यांची). 'या मृदंग्याची आणि गवयाची जुगल चांगली होते.' ३ सामना; बरोबरी. ४ जोडीनें गाणें; खेळणें; दुसर्‍याशीं आपलें जमविणें; साथ; एकमेकांचा संयोग. 'याला पुढें तसें गातां येत नाहीं पण मागून सूर देण्याविषयीं जुगल चांगली करितो.' ५ एकत्र केलेलें खलबत; मसलत. ६ (सामा.) जूग; जूट; जोडी. [सं. युगल; प्रा. जुगल] जुगविणें-१ एकत्र जोडणें; संयोग करणें. २ मेळ बसविणें; एक मिलाफ करणें. ३ सख्य करून देणें; मैत्री करविणें. [जुगणें प्रयोजक]

दाते शब्दकोश

लय

पुस्त्री. १ वाद्य वाजविल्यानंतर मागें कांहीं काळ पावेतों राहणारा त्याचा नाद, ध्वनि. २ (-पु.) (वादनांत) ताल देण्याच्या क्रियेमघील विश्रांतीचा काल. ह्याचे द्रुत, मध्य व विलंबित असे तीन भेद आहेत. ३ (वादनांत, नृत्यांत, चाल- ण्यांत) समकाल. ४ गायन, वादन व नृत्य यांचें ऐक्य. ५ (एका पदार्थाची दुसऱ्याशीं तद्रूपता झाल्यानें होणारा) नाहींसे- पणा; लोप; अनस्तित्व. ६ (खर्चामुळें, वापरामुळें) खलास होणें; क्षय; नाश; नि:पात. ७ झोंप. ८ राजयोग समाधीस होणाऱ्या दुसऱ्या विघ्नाचें नांव. ९ -पुन. जगाचा नाश; प्रलय; संहार. उत्पत्ति आणि स्थिति या शब्दांबरोबर वापरतात. 'कयास मज ही लया रुद्र करि दया दृष्टि झांकली ।' -ऐपो ३६८. १० -पु. चित्ताची एकाग्रता; एकतानता. (क्रि॰ लागणें; होणें). 'लय लक्षूनियां झालों म्हणती देव ।' -तुगा २८०८. [सं. ली-लय] लयास जाणें-अक्रि. १ तद्रूप, ऐक्य होणें. 'जरी स्तव्य बुद्धीसीं लया । जाइजे कां ।' -ज्ञा १६.१८. २ विनाश पावणें; नाहींसें होणें. सामाशब्द- ॰क्रिया-स्त्री. १ संहारकार्य. २ गाण्यांत ताल धरणें. [सं.] ॰स्थ-वि. तटस्थ; समाधींत असलेला. 'लयस्थें एके ।' -ज्ञा ११.१२९. [सं.]

दाते शब्दकोश

निंदी      

स्त्री.       १. एकतानता; नाद. २. भोवरा वगैरेची पूर्ण गती; गिरकी. ३. टकळी; कटकट; एखादी वस्तू देण्याविषयी पिच्छा पुरवणे. (क्रि. लावणे). (ना., व.) [सं.निनाद]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निंदी

स्त्री. (व.) १ एकतानता; नाद. 'त्याला नाहीं ऐकूं गेलें; कारण तो आपल्या निंदींत होता.' २ भोंवरा वगैरेची पूर्णगति; गिरकी. 'माझा भोंवरा निंदीवर आला आहे.' निधा २ पहा ३ (ना.) टकळी; कटकट; एखादी वस्तु देण्याविषयीं पिच्छा पुरविणें. (क्रि॰ लावणें). [सं. निनाद]

दाते शब्दकोश

रंजणें

उक्रि. १ एखादा विषय गोड लागल्यामुळें अंतःकरण आनंदित होऊन उद्वेगादि दुःखें विशरून त्या विषयाकडे लागून राहणें; रंगणें; मोहित होणें; (काव्य) गुंगून जाणें; एकतानता होणें; आल्हादणें; सुप्रसन्न होणें (सौंदर्य, उत्कृष्टता यांमुळें). २ मनोरंजन करणें. 'वरिवरी देह न पूजी । लोकांतें न रंजी ।' -ज्ञा १३.२०७. [सं. रञ्ज्]

दाते शब्दकोश

समाधिक, समाध

स्त्री. १ चित्तैकाग्र्य; इंद्रियांचें दमन करून आत्मस्वरूपांत लीन होणें; एकतानता; तंद्री; इंद्रियवृत्ति- निरोध; योगांतील आठवें व शेवटचें अंग. 'ऐसिये सरिसिये भूमिके । समाधि राहे ।' -ज्ञा ६.६. 'समाध उभ्यानें लागली तटस्थ ।' -दावि ४५७. २ संन्याशानें स्वतःस जिवंतपणीं जलांत बुडवून घेणें, किंवा पुरून घेणें ३ मृत संन्याशास जलांत बुडविण्याचा किंवा मातींत पुरण्याचा विधि, संस्कार. ४ संन्याशास पुरलेल्या भूमीवर बांधतात तें वृंदावन, थडगें. [सं.] ॰सुख-न समाधिअव- स्थेंत होणारा आनंद समाधिस्त-स्थ-वि. १ समाधि लावलेला; ध्यानमग्न; आत्मचिंतनांत मग्न, गढलेला. 'देह केला वाव समा धिस्थ ।' -तुगा ७७३. 'वेदस्वरूपीं होय समाधिस्त ।' २ समाधि घेतलेला; मृत; पुरलेला.

दाते शब्दकोश

तादात्म्य

न. १ (दोन) पदार्थांचें परस्पर अद्वैत, एकरूपता; 'अग्नि आणि अग्निची ठिणगी या दोहोंच्या तादात्म्यासारखें परमात्मा आणि जीवात्मा यांचें तादात्म्य आहे.' २ आत्मे अथवा भावना यांमधील अद्वैत, एकरूपता; एकतानता, ऐक्यभाव. [सं. तत् = तो + आत्मा]

दाते शब्दकोश

यकरंगी

स्त्री. एकतानता. -मुधो. [अर.]

दाते शब्दकोश

चित्त

न. मन; अन्तःकरण; बुद्धि; वृत्त्यात्मक अन्तःकरण पंचकांतील चवथा अवयव; मनोवृत्ति, विकार, भावना, राग इ॰ कांचें अधिष्ठान मानलेलें हृदयस्थान. 'जे वस्तूचा निश्चयें केला । पुढें तेंचि चिंतूं लागला । तें चित्त बोलिल्या बोला । येथार्थ मानावें ।' -दा १७.८.८. [सं.] (वाप्र). ॰उडून जाणें अक्रि. १ घाबरणें, उदास होणें; मन न रमणें. (कर्त्याची षष्टी असते). 'तें ऐकून महाराजांचें चित्त उडून गेलें.' -चंद्र १३४. २ एखाद्या गोष्टी- विषयीं मन विटणें; नावड उत्पन्न होणें. ॰पुरविणें-वि. लक्ष्य देणें; लक्ष्यपूर्वक ऐकणें. चित्तांत खाणें-अक्रि. मनास लागणें; वाईट वाटणें. सामाशब्द-॰क-वि. हुषार; चलाख; अल्पवयस्क असून मोठ्या विषयाकडे चित्त लावण्याचा स्वभाव ज्याचा तो. चित्तंगम-वि. हृदयंगम; मनोवेधक; हृदयस्पर्शी. 'माझीं मी निवडूनि अर्पिलिं फुलें अत्यंत चित्तंगम ।' -टिक १५२. ॰गेह-न. हृदयरूपी घर; मन हेंच घर; मन. 'विकल्प प्रवेशला ते समयीं । चित्तगेहीं कैकेयीच्या ।' -रावि ९.१६१. [सं. चित्त + गेह = घर] ॰चतुष्टय न. मन, बुद्धि, चित्त व अहंकार या चारांचा समुदाय. चित्तचतुष्टय डाहाळिक । कोंभैजेतो ।' -ज्ञा १५.९७. 'चित्त- चतुष्ठ्यय चमत्कार । मन बुद्धी चित्त अहंकार ।' एभा २२.३५०. -एभा ३.११२. [सं. चित्त = मन + चतुष्टय = चारांचा समुदाय] ॰चमत्कार-पु. आश्चर्य; अचंबा; सानंदाश्चर्य. [सं. चित्त + चमत्कार] ॰चाळक-वि. १ इच्छेचें, मनोवृत्तींचें नियमन करणारा (ईश्वर). 'चित्तचाळक विटेवरला । तो हरि माझ्या मनीं भरला ।' 'जयजय सकळ चित्तचाळका ।' २ मन रमविणारा; मनोरंजक; मन चाळविणारा, विकारयुक्त करणारा. [सं. चित्त + चालक] ॰चोर-चोरटा-वि. मन हरण करणारा; चित्ताकर्षक. [सं. चित्त + चोर] ॰ज-पु. मदन; कामदेव; मनांत जन्मणारा (मदन). [सं. चित्त = मन + ज = जन्मणारा] ॰जडसंयोग-पु. आत्मा आणि शरीर यांचा संयोग. [सं. चित्त = चैतन्य + जड = स्थूल (शरीर, देह) + सम् + योग = एकत्र येणें] ॰निग्रह-पु. मनाचें संयमन, नियमन; मन ताब्यांत ठेवणें. [सं. चित्त + निग्रह = ताब्यांत, दाबांत ठेवणें] ॰निर्वृत्ति-स्त्री. मनाची शांति; चित्ताची विश्रांति. [सं. चित्त + निर् + वृत्ति] ॰पावन-पु. चितपावन पहा. ॰पोळ्या- पु. चितपावनांना तुच्छतेनें, उपहासानें संबोधण्याचा शब्द. ॰प्रसन्न-वि. समाधानी; संतुष्ट; शांत चित्ताचा. [सं. चित्त + प्रसन्न = तुष्ट, शांत] ॰भ्रंश-पु. १ मानसिक शक्तींचा भंग; म्हतारचळ. २ देहभानाचा नाश; चित्तभ्रम; डोकें ठिकाणावर नसणें; डोकें फिरणें. [सं. चित्त + भ्रंश] ॰भ्रामक-वि. मनाला मोहून टाकणारा; चित्ताकर्षक; मन वेडें करणारा. [सं. चित्त + भ्रामक] ॰लहरी- स्त्रीअव. मनस्तरंग; मनाची हुक्की; मनोविकार; मनाचे छंद, तरंग, विलास इ॰ 'ब्रह्मानंद सागरीं । वीराल्या चित्तलहरी ।' [सं. चित्त = मन + लहरी = लाटा, तरंग] ॰विभ्रम-पु. मन बहकणें; बुद्धि- भ्रंश; मन ठिकाणावर नसणें. [सं. चित्त = मन + वि = विरुद्ध + भ्रम = फिरणें] ॰वृत्ति-स्त्री. १ लक्ष्य; मन. 'चित्तवृत्ति ठिकाणीं नाहीं फिरली, बदलली. उडून गेली.' २ मनाच्या लहरी, तरंग, परि- भ्रमण, उड्डाण. 'चित्तवृत्ती घटकेघटकेंत पालटतात.' [सं. चित्त = मन + वृत्ति = वर्तन, वागणें, असणें] ॰वेधक-वि. मन आकर्षिणारा; मन हलवून सोडणारा; अन्तःकरणास भिडणारा; हृदयंगम; [सं. चित्त + वेधक = वेधणारा] ॰वैकल्य-न. मनोभ्रम; बुद्धि- भ्रंश; मन बहकून जाणें. [सं. चित्त + वैकल्य = विकलता, भ्रम, पंगुपणा] ॰शुद्धि-स्त्री. मनाचा शुद्धपणा, पवित्रपणा; मनाचें रागद्वेषादि वाईट भावनांपासून अलिप्त राहणें. 'चित्तशुद्धि नस- लिया जाणा । एकांतीं मांडिती देवार्चना । पुढें आठवी मन- कामना । तें रानोरान हिंडवी ।' [सं. चित्त + शुद्धि] ॰संकोच- पु. १ मनोनिग्रह; मनावरील दाब. २ (विनयामुळें होणारा) मनाचा लाजाळूपणा; भीडस्तपणा; शालीनता. [सं. चित्त + संकोच = आंखूडपणा; भिडस्तपणा] ॰समाधान न. मनाचें स्वास्थ्य; चित्ताची शांति; संतुष्टता. [सं. चित्त + सम् + आ + धा अन] ॰स्थैर्य-न. मनःस्वास्थ्य; मनाची स्थिरता, शांति. [सं. चित्त + स्थैर्य = स्थिरता] ॰हीन-वि. मन ठिकाणावर नसणारा; मनावर योग्य संस्कार नसलेला; अप्रबुद्ध. 'तें आघवेंचि गेलें वाया । जे चित्तहीन ।' -ज्ञा ९.१७८. [सं. चित्त = मन + हीन = टाकलेलें, वाईट क्षुद्र] ॰चित्ताची आर्द्रता-स्त्री. मनाचा कोंवळे- पणा; चित्ताची मृदुता. चित्ताथिला-वि. सजीव; विचारी; चित्तसंपन्न. 'मा मी तव चित्ताथिला । आणि श्रीगुरु ऐसा दादुला ।' -ज्ञा १८.१७.३२. चित्तैकाग्र्‍य-न. मनाची एका- ग्रता, एकतानता. [सं. चित्त + ऐकाग्र्‍य = एकाग्रता]

दाते शब्दकोश