मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

एकांडा      

पु.       एकटा स्वार : ‘नित्य नवे गणतीस लागती एकांडे देशावरले.’ -प्रभाकर-खर्ड्याचा पोवाडा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

एकांडा शिलेदार      

स्वतःच्या हिंमतीवर सर्व काही करू पाहणारा; दुसऱ्याचेसहकार्य न घेणारा कार्यकर्ता, राजकीय पुढारी इत्यादी. एकांडेपणा      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

अधांतरी

वि. निराधार; एकांडा. 'अशा अधांत्री व सर्वतंत्र स्वतंत्र लोकांनीं सुरत येथील हिंदुसभेच्या निर्णयाकडे पाहून नाकें मुरडावीं ह्यांत आश्वर्य नाहीं.' -सासं २.१६४. [सं. अध: + अंतर्]

दाते शब्दकोश

अहादी      

पु.       १. माणूस; एकांडा शिपाई : ‘अहादीवर अहादी रवाना केले.’ – मराचि थोशा ६४. २. शिपायापेक्षा वरच्या दर्जाचा लढाऊ स्वतंत्र स्वार. [फा. अहदी=एक]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अहादी

पु. माणूस; एकांडा शिपाई. 'अहादीवर अहादी रवाना केले.' -मराचि थोशा ६४. [अर.अह्दी = एक]

दाते शब्दकोश

एकांग

न. एक अंग, अवयव. -वि. एकांगी पहा. ॰झुंज- स्त्री. द्वंद्वयुद्ध; दोघांचे युद्ध. ' एकांग झुंजें झुंजती । एकमेकां निक- रेंसीं ।।' -मुआदि ४४.७२. ॰वीर-पु. १ अनुयायी, सैन्य किंवा कोणी मदत नसलेला; मदतीचा अपेक्षा न करणारा; कोठल्याहि सैन्यपथकांत सामील नसलेला; एकांडा वीर; काश्मिरांतील राज- तारंगिणींत. ‘एकांगवीर’ या लढाऊ कामगाराचें वर्णन येतें; एकांड्या पहा. ‘सन्नद्ध करितां दळभार । येथें लागेल उशीर । मी एकला एकांगवीर । भीमकी घेऊनि येईन ।।’ –एरुस्व ५.१. २ (ल.) वादांत कोणाची मदत न घेतां एकटाच स्वसमर्थन करणारा. ‘पांचही दर्शनांशीं झुंजार । हा वेदांतासि साजे बडिवार । जो एकांगवीर । ख्यातिवादियां ।।’ –विपू ७.१४. ३ (सामा.) कोणाच्या मद- तीची अपेक्षा न करणारा; धाडसी, उत्साही, माणूस. [सं.]

दाते शब्दकोश

एकांगवीर      

पु.       १. अनुयायी, सैन्य किंवा कोणी मदत नसलेला; मदतीची अपेक्षा न करणारा; कोठल्याही सैन्यपथकात सामील नसलेला; एकांडा वीर. काश्मिरातील राजतरंगिणीत ‘एकांगवीर’या लढाऊ कामगाराचे वर्णन येते. पहा : एकांड्या : ‘सन्नद्धकरितां दळभार । येथें लागेल उशीर । मी एकला एकांगवीर । भीमकी घेऊनि येईन ॥’ - एरुस्व ५·१. २.(ल.) वादात कोणाची मदत न घेता एकटाच स्वसमर्थन करणारा : ‘पांचही दर्शनांशीं झुंजार । हा वेदांतासि साजे बडिवार । जो एकांगवीर । ख्यातिवादियां ॥’-विसिंपू. ७·१४. ३. कोणाच्या मदतीची अपेक्षा न करणारा, धाडसी, उत्साही माणूस. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खांदाडीभर      

वि.       खांद्यावर मावेल एवढे (ओझे) : ‘खंडोबाचा उदो गाजवून कुटबी एकांदा हात मारील उडता, तर खांदाडीभर सोन्याचं डाग आणील.’ - हपा २५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

फटकळ

न. अशुभ गोष्ट घडून येणें; दुर्घटना. -शर. -वि. १ तोंडानें वाटेल तसें (अभद्र शिवराळ, वगैरे) बोलणारा; मागें पुढें न पाहतां एखाद्यास शिवी देण्याचा किंवा बीभत्स भाषण करण्याचा स्वभाव असलेला; तोंडचा-हाताचा-पायाचा-फटकळ पहा. २ कडकावणारा; धडकावून, बेधडक बोलणारा; तोंडाचा हलका; फट्या पहा. ३ स्वतंत्र बाण्याचा वृत्तीचा; कोणावर अवलंबून नसणारा; एकांडा. ४ (प्रायः कवितेंत) घाणेरडें; खराब; वाईट (भाषण, मनुष्य इ॰). 'कळलें त्यांसि कर्म फटकळ तें.' -मोआदि २८.१. ५ अशुभ; विषम (काळ). 'काळ मोठा फटकळ आला.' -ख २९९९. फटकाळ पहा. ६ व्यर्थ बडबड करणारा; बडबड्या. 'वदला, नरकपिभय दाखविसी भ्याड न हा फटकाळा ।' -मोरा रामायणपंचशती ३०५. [फटकन] ॰काळ- पु. वाईट, प्रतिकूल, विषम वेळ; दुर्दैवाची, आपत्तीची वेळ, संधि अथवा योग. फटकळ अर्थ ५ पहा.

दाते शब्दकोश