मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

औडकचौडक

पु. लहान मुलांचा एक खेळ. त्यांतील गाणें असें-'औडकचौडक दामाडू । दामाडूचे पंचाडू । पचांडखोड खासा । हिरवा दाणा कुडकुडी । राजघोडी व्याली । सोनपाणी प्याली । अन्यामन्या शेजीवचा । डावा उजवा हातच कन्या ।।' अर्थ:- अरे भाऊ! आपल्या शेताच्या ह्या बांधापासून त्या बांधावर जा. तेथें आपली जनावरें घेऊन राळे, गहूं, तीळ आणि हरभरे वगैरे पिवळीं धान्यें आपल्या शेतांत पेर व त्याजवळच्या मळ्यांत बाजरी व ओंवा पेर. -चिज १२.१९१६. अवडकचवडक पहा.

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

आवडकचवडक

औडकचौडक पहा.

दाते शब्दकोश

अवडकचवडक, अंवड(क)चंवडक

स्री. १ मुलांचा खेळ. औडकचौडक पहा. २ पसारा; गोंधळ; अव्यवस्था (घरांतील वस्तूंची वगैरे). (क्रि॰ करणें, मांडणे, चालवणें). ३ अव्यवस्थित, गोंधळाची स्थिति, अवस्था. [ध्व. किंवा चिवड द्वि. ?]

दाते शब्दकोश