तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह
शब्दार्थ
कमचा, कमची
स्त्री. १. फोक; फोकाटी; बारीक छडी, शिपटी; शिरटी. [हिं.] २. बांबूची बारीक कांबीट; कामटी : ‘गोसावी नंग पिऊन भांग हाती घेऊन समशेर कमची खबर आम्ही घेतों फिरंग्याची ।’ - ऐपो २९२. ३. वेताची छडी, काठी; चमकी : ‘म्हणे गंगु हैबती हो अशी कशी प्रीती तुमची महादेव । ख्याल करती विलायती थेट कमची ।’ - प्रला १४३.
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
संबंधित शब्द
कमचा-ची
स्त्री. १ (हिं.) फोक; फोकाटी; बारीक छडी शिपटी; शिरटी. २ बांबूची बारीक कांबीट; कामटी 'गोसावी नंग पिऊन भांग हातीं घेउन समसेर कमची खबर आम्ही घेतों फिरंग्याची ।' -ऐपो ३९२. ३ वेताची छडी; वेताची काठी; चमकी. 'कमचा पाठीं उडती भरी ।' -(नवनीत) अमृतराय २३९. 'म्हणे गंगु हैबती हो अशी कशी प्रीती तुमची महादेव । ख्याल करती विलायती थेट कमची ।' -प्रला १४३. [तु. कमची; हिं. कमची = छडी; सं. कमठ = वेळू]
दाते शब्दकोश