मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

कलि, कली      

पु.       १. कृतत्रेताद्वापारादी चार युगांतील शेवटचे, चालू युग; कलहाचा किंवा दुर्बुद्धीचा काळ. २. भांडण; तंटा; कलह : ‘नर्मीच कलि प्रगटे ।’ - मोमंभा ३·२३. ३. कलियुगाची देवता : ‘सांभाळा जी ब्रीदावळी । तुम्ही कां कलिसारखे ।’ - तुगा १४५८. ४. दशावतारी गंजिफातील शेवटचा रंग. ५. पाप : ‘गर्तिच्या बाटविल्या त्वां मुली । काय वाढविसिल हा कली ।’ - राला ४०. ६. युद्ध : ‘करिति महागजसमान गाढ कली ।’ - मोआदि २८·३६. ७. मत्सर : ‘तच्चित्ती शिरला अनर्थ मूलक कली ।’ - विक ३१. वाईट विचार. [सं.] (वा.) कलि संचरणे - मनुष्य भांडणाच्या बेताला आला म्हणजे त्याच्या संबंधाने म्हणतात.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       बिब्बा; भिलावा. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कळी

कळी kaḷī f (कली S) A bud. 2 A vessel of ivory, wood &c. of the form of an unblown lotus. 3 A grain of the dish called बुंदी. 4 A nodule of burnt limestone. 5 A roll of betel-leaf, supárí &c. of the form of a bud. 6 The hinder of the two triangular pieces composing, together with the आगा, a side of the skirt of an angrakhá. 7 A common term for the bud-form twists in the front of the turban of a Maráthá. 8 A quantity of silk (about three मासे weight) wound around a stick. 9 A bit of stick, a rib of a leaf, or any thing similar coated over with earth and afterwards with tinsel, or a little roll of earth tinseled over. Ex. गणपतीच्या मस्तकावरची कळी पडली. 10 (Formed from कळ Quarreling, to agree with नळीं in the proverb.) A quarrelsome female. Pr. येगे कळी बैस माझे नळीं. 11 A side-piece of an oblong छप्पर. कळी उमळणें g. of s. To open out; to drop reserve and enter freely into talk--a cold or taciturn person. 2 To glow with emulation.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री. १ भांडण; तंटा; कज्जा; कलागत. 'विकत कळी जयानें घेतली आजि मोलें ।' -सारुह ३.७८. 'कळी करि सुनिर्मळीं परम उग्र दावा नळीं ।' -केका २१. 'येगे कळी बैस माझे नळीं.' २ कलियुग; चालू युग. 'ऐसें युगीं परी कळीं । आणि महाराष्ट्र मंडळी. ।' -ज्ञा १८.१८०२. ३ युद्ध. 'ऐसें गोत्रचि दोहीं दळीं । उदित जालें असे कळी ।' -ज्ञा १.१८४. कळीचा नारद-पु. कळलाव्या; भांडण लावून देणारा; काज्जेदलाल; आगलाव्या; चुगल्या; लावालावी करून तंटे उपस्थित करणारा (पुराणांत नारद हा नेहमीं तिन्ही लोकांत भांडणें उपस्थित करतो अशा कथा आढळ- तात यावरून). [कळ + नारद] कळीवांचून कांटा निघणें- भांडणतंटा किंवा त्रासावांचून अनिष्ट गोष्ट नाहींशी होणें. 'कालेजांत विद्यार्थ्यांची मनस्वी गर्दी होत असते ती कमी व्हावी यासाठीं कॉलेजची फी वाढवून १५ रुपये करावी म्हणजे आपोआपच कळीवांचून कांटा निघेल अशी कल्पना निघाली आहे.' -मनोरंजन पु. ७. भाग ८.

दाते शब्दकोश

क्रि. वाटे; कळे; भासतें. 'कळी हृद्पद्माची उगवली कळी घेउनि कळी ।' -नृसिंह नव १२४. [म. कळणें]

दाते शब्दकोश

कळी f A bud. A nodule of burnt limestone. A grain of बुंदी. कळी उमलणें To be cheerful, to drop, reserve and enter freely into talk. कळीचा चुना m Slaked lime.

वझे शब्दकोश

स्त्री. १कलिका; फूल उमलण्यापूर्वीं पाकळ्यांचा जो परस्परांत संकोच झालेला असतो ती स्थिति; मुकुल; कोरक. २ कमळाच्या कळीच्या आकाराचें एका जातीचें हस्तीदंती किंवा लांकडी भांडें (यांत केशर इ॰ ठेवितात). ३ बुंदीच्या लाडवांतील दाणा. ४ लहान खडा (भाजलेल्या चुनखडीचा, मिठाचा, इ॰); उदा॰ चुनकळी. 'तुका म्हणे लवणकळी । पडतां जळीं तें होय ।' -तुगा २७२९. ५कळीच्या आकृतीचा खावयाचा विडा-पट्टी; कळीदार पट्टी. ६आंगरख्याच्या घोळाच्या दोन त्रिकोणी भागांपैकीं मागील भाग (हे दोन भाग व आगा मिळून घोळाची बाजू होते-मोल.); अंगरख्याच्या कापडाचे त्रिकोणा- कार जे तुकडे असतात ते प्रत्येकीं. -शाको. ७ सदर्‍याच्या बगलेंत किंवा चोळीच्या बगलेंत जो अनुक्रमें चौकोनी व तिकोनी तुकडा देतात ती; बगल झांकणारा कपडा. ८ मराठेशाही पागोट्याच्या पुढील भागीं असलेला कळीच्या आकृतीचा पीळ. ९ एखाद्या काटकी भोंवतालीं गुंडाळलेलें सुमारें तीन मासे वजनाचें रेशीम, रेशमी दोरा. १० एखादा काटकीचा तुकडा किंवा पानाचा हीर किंवा असाच दुसरा पदार्थ ज्यावर मातीची लहानशी गोळी लावून त्यावर बेगड चिकटविलेला असतो किंवा बेगड लावलेली मातीची कळीच्या आकाराची गोळी ज्यावर बसविलेली असते तो कळस. 'गणप- तीच्या मस्तकावरची कळी पडली.' ११ चौपाखी छपराची त्रिकोनी बाजू. ॰उमलणें-१ फूल विकसणें, फुलणें, उघडणें. २ (ल.) मौन सोडून मोकळेपणानें बोलावयास लागणें (आंतल्या गांठीच्या व घुम्या माणसानें). ३ एखाद्याचा रुसवा, औदासिन्य जाऊन चेहरा प्रफुल्लित होणें. ४ स्पर्धेनें किंवा मत्सरानें जळणें; चढाओ- ढीच्या भरीस पडणें. कळीचा चुना-पु. भाजलेली चुनखडी; चुन्याच्या कळ्यापासून तयार केलेला रवाळ चुना (खाण्याचा). कळ्यांची पटी -पु. (कु.) चांपेकळ्यांची तयार केलेली वेणी. कळीचें पान, कळीदार पान-न. आंकड्याचें विड्याचें पान; ज्याची आकृति लांबट किंवा कळीसारखी आहे असें टोंकदार पान. कळीचें काम -न. दगडांची बिनथरी ओबडधोबड रचाई; (इं.) रँडम रबल.

दाते शब्दकोश

स्त्री० न उमलेलें फूल, लहान कळा. २ भाजलेली चुनखडी. ३ वि० भांडण, कलह लावणारा, कळचेट्या. कळीचा नारद, पु० भांडण लावणारा, चहाड, कज्जेदलाल.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

पु. (विणकाम) सात चटके ज्यांत एकत्र असतात ती सुताची लड. [सं. कलिका]

दाते शब्दकोश

कळी      

स्त्री.       १. कलिका; फूल उमलण्यापूर्वी पाकळ्यांची परस्परात संकोच झालेली स्थिती; मुकुल; कोरक. २. कमळाच्या कळीच्या आकाराचे एका जातीचे हस्तिदंती किंवा लाकडी भांडे (यात केशर इत्यादी ठेवतात.). ३. बुंदीच्या लाडवातील दाणा. ४. लहान खडा. (भाजलेल्या चुनखडीचा, मिठाचा इ.) जसे : – चुनकळी : ‘तुका म्हणे लवणकळी । पडतां जळीं तें होय ।’ – तुगा २७१९. ५. कळीच्या आकृतीचा खायचा विडा - पट्टी; कळीदार पट्टी. ६. अंगरख्याच्या घोळाच्या दोन त्रिकोणी भागांपैकी मागील भाग (हे दोन्ही भाग व आगा मिळून घोळाची बाजू होते.); अंगरख्याच्या कापडाचे त्रिकोणाकार असलेले तुकडे. ७. सदऱ्याच्या बगलेत किंवा चोळीच्या बगलेत लावलेले अनुक्रमे चौकोनी व त्रिकोणी तुकडे; बगल झाकणारा कपडा. ८. मराठेशाही पागोट्याच्या पुढील भागी असलेला कळीच्या आकृतीचा पीळ. ९. एखाद्या काटकी भोवताली गुंडाळलेले सुमारे तीन मासे वजनाचे रेशीम, रेशीम दोरा. १०. लहानशा काटकीला माती लावून भोवती बेगड गुंडाळून तयार केलेला तुकडा; बेगड लावलेली मातीची, कळीच्या आकाराची गोळी बसवलेली असते तो कळस. ११.चौपाखी छपराची तिकोनी बाजू. (सं) (वा.) कळी उमलणे, कळी खुलणे – १. फूल विकसणे, फुलणे, उघडणे. २. (ल.) (आतल्या गाठीच्या व घुम्या माणसाने) मौन सोडून मोकळेपणाने बोलायला लागणे. ३. एखाद्याचा रुसवा, औदासीन्य जाऊन चेहरा प्रफुल्लीत होणे. ४. स्पर्धेने किंवा मत्सराने जळणे; चढाओढीच्या भरीस पडणे. कळी उसळणे – जोराची लैंगिक वासना होणे : ‘जेव्हा त्याची कळी उसळे तेव्हा तो ककीला हैराण केल्याशिवाय रहात नसे.’ – वासू ५४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

स्त्री.       १. भांडण; तंटा; कज्जा; कलागत : ‘विकत कळी जयानें घेतली आजि मोलें ।’ – सारुह ३·७८. २. कलियुग; चालूयुग : ‘ऐसें युगीं परी कळीं । आणि महाराष्ट्र मंडळी ।’ – ज्ञा १८·•१८०३. ३. युद्ध : ‘ऐसें गोत्रचि दोहीं दळीं । उदित जालें असे कळी ।’ – ज्ञा १. १८४. [सं. कलि] (वा.) कळीला येणे – भांडायला लागणे : ‘पण तो कळीला आला.’ – ययाती २९८. कळीवाचून काटा निघणे – भांडणतंटा किंवा त्रासावाचून अनिष्ट गोष्ट नाहीशी होणे : ‘कॉलेजात विद्यार्थ्यांची मनस्वी गर्दी होत असते व ती कमी व्हावी यासाठी कॉलेजची फी १५ रूपये करावी म्हणजे आपोआपच कळीवांचून काटा निघेल अशी कल्पना आहे.’ – मनोरंजन पु. ७. भाग ८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

स्त्री.       (वस्त्रोद्योग) सात चटके एकत्र असणारी सुताची लड. [सं. कलिका]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कलि

कलि kali m (S) S The fourth age of the world, the iron age or that of vice. It commenced, according to some, 300, according to others, 3101, according to others, 1370 years before the Christian era. Its duration is through 432000 years; at the expiration of which period the world is to be destroyed. 2 Strife or dissension. कलि संचरणें Used of a person beginning to quarrel: as ह्याच्यांत-मनांत-पोटांत कलि संचरला.

मोल्सवर्थ शब्दकोश

कलि m Strife. The 4th age of the world.

वझे शब्दकोश

(सं) पु० (कलह पहा.) २ चवथें युग.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

चुनकळी or चुन्याची कळी

चुनकळी or चुन्याची कळी cunakaḷī or cunyācī kaḷī f (चुना & कळी) A nodule of burnt limestone. चुन्याच्या कळ्या f pl are burnt and unslaked limestones. From these is prepared कळीचा चुना Slaked lime.

मोल्सवर्थ शब्दकोश

कल्हई; कलई

(स्त्री.) [अ. कल्ई] कथिलाचा मुलामा; आरसा बनवण्यासाठीं काचेस एका बाजूनें लावावयाचें मिश्रण. “आरसे आहेत; ज्यांची कलई उडाली असेल व पालखीस लागू होत असे असतील ...ते हुजूर पाठविणें” (राजवाडे १२।१४२).

फारसी-मराठी शब्दकोश

चुनकळी, चुन्याची कळी

स्त्री. भाजलेल्या चुन्याचा खडा; न विरविलेल्या चुन्याचा खडा. चुन्याच्या कळ्या पाण्यांत घालून कळीचा चुना तयार करतात. [चुना + कळी]

दाते शब्दकोश

कळी गुळी

कळी गुळी f Indigo.

वझे शब्दकोश

कलई, कलईकर, कलईगर

कलई, कलईकर, कलईगर kalī, kalīkara, kalīgara &c. See under कल्हई.

मोल्सवर्थ शब्दकोश

कलिका or कली

कलिका or कली kalikā or kalī f S An unblown flower, a bud.

मोल्सवर्थ शब्दकोश

कलिका, कली

कलिका, कली f A bud, an unblown flower.

वझे शब्दकोश

कलिका, कली      

स्त्री.       कळी; न उमललेले फूल; मुकुल; कुड्‌मल. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पेश(ष-स)कळी

स्त्री. अंगरख्यास पुढच्या अंगास लावि- लेला त्रिकोणाकृति तुकडा; पुढच्या बाजूला येणारी कळी. 'पेष- कळ्यांची तिरपी बाजू जोडावयाची.' -शिकशि २.२८. [हिं.]

दाते शब्दकोश

भात(तु)कली

स्त्री. १ लहान मुली स्वयंपाक, जेवण इ॰ संसारातील गोष्टीचें अनुकरण करून खेळतात तो खेळ; खेळांतला स्वयंपाक. २ ह्या खेळांत करून खातात तीं खाद्यें (समुच्चयानें). [भात अल्पार्थी]

दाते शब्दकोश

चुनकळी, चुन्याची कळी      

स्त्री.       भाजलेल्या चुन्याचा खडा; न विरवलेल्या चुन्याचा खडा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कल्हई / कलई

(आ) स्त्री० कथलाचा मुलामा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

कलई

स्त्री. कोपर व मनगट यांमधील भाग. 'दंड कलईपेक्षां वीस टक्के मोठा असावा' -के २६.१.१९३७. [अर.]

दाते शब्दकोश

(आ) स्त्री० कथलाचा मुलामा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

कलई      

स्त्री.       कोपर व मनगट यांमधील भाग : ‘दंड कलईपेक्षा वीस टक्के मोठा असावा.’ - के २६·१·१९३७. [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कळि(ळी) वर

न. कलेवर पहा. 'आतांचि पडो अथवा राहो । मिथ्या कळीवर ।' -दा ७.१०.९. [सं. कलेवर]

दाते शब्दकोश

पा(पां)कळी

स्त्री. १ फुलांतील दलांपैकीं प्रत्येक. २ संत्रें, लसूण इ॰कांतील प्रत्येक अलग, फोड, कुडें, कांडी इ॰. ३ (क्व.) पाकोळी. [सं. पक्ष; पाख; का. पकळि]

दाते शब्दकोश

फा(फां)कळी

स्त्री. १ फांक; फोड; छकल; शकल; पाकळी २ (क्क.) (लांकडी) पट्टी; फळी. [फांक]

दाते शब्दकोश

सां(सा)कळी

स्त्री. पुराचा पाट, लोंढा (नाल्यांत, खाड्यांत घुसणारा). (क्रि॰ फुटणें; पडणें; भरणें).

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

कलि-ली

पु. १ कृतत्रेताद्वापारादि चार युगांतील शेवटचें, चालू युग; कलहाचा किंवा दुर्बुद्धीचा काळ; कांहींच्या मतें या युगाचा आरंभ ख्रिस्ती शका पूर्वीं तीनशें, कांहींच्या मतें ३१०१ व कांहींच्या १३७० वर्षांपूर्वीं झाला. याचा अवधि ४३२००० वर्षे आहे व तो अवधि संपला म्हणजे सर्व जगाचा प्रलय होणार आहे. २ भांडण; तंटा; कलह. 'नर्मींच कलि प्रगटे ।' -मोमंभा ३. २३. ३ कलि- युगाची देवता. 'सांभाळा जी ब्रीदावळी । तुम्ही कां कलिसारिखे ।' -तुगा १४५८. ४ दशावतारी गंजीफांतील शेवटचा रंग. ५ बिब्बा; भिलावा. ६ पाप. 'गर्तिच्या बाटविल्या त्वां मुली । काय वाढ- विसिल हा कली' -राला ४०. ७ युद्ध. 'करिति महागजसमान गाढ कली ।' -मोआदि २८. ३६. ८ मत्सर. 'तच्चित्तीं शिरला अनर्थ मूलक कली ।' -विक ३१. ॰काल -पु. कलियुगांतील दिवस; अज्ञानमय, त्रासदायक, संकटकारक काल. कळिकाळ पहा. [सं.] - चा पहारा -पु. राक्षसी निर्दयता; दुष्टपणा किंवा बेबंदी घडून आली असतां उच्चारावयाचा शब्द. ॰द्रुम-पु. १ बेहडा, त्याचें झाड व फळ. २ बिब्याचें झाड व त्याचें फळ. [सं.] ॰पुरुष -पु. १ वाईट, भांडखोर मनुष्य; दुष्ट मनुष्य. २ नाटकां- तील नायकाचा प्रतिस्पर्धी; खळपुरुष; दुष्ट पात्र. 'आपल्या नित्याच्या ओळखीचा जो कलिपुरुष' -विचारविलास ४१. [सं.] ॰मल -पु. कलियुगांतील पापवासना; दुष्ट वासना; दुर्बुद्धि; दोष; पातकें. 'एका जनार्दनीं रसाळा । कथा कलिमल नाशिनी ।' -एरुस्व ९. ६६. [सं. कलि + मल] ॰महात्म्य-न. कलियुगापासून उद्भवणारे परिणाम, संकटें इ॰ कलियुगाचें वर्चस्व; अंमल, प्रभाव. [सं.] ॰युग-न. कलि-ली अर्थ १ पहा. युगचतुष्टयांतील चवथें युग. ॰युगवर्ष-न. शालिवाहन शकापूर्वीं ३१७९ या वर्षीं (ख्रिपू. ३१०२ ता. १८ फेब्रुवारी) भारतीय युद्ध झालें त्यानंतर थोडक्याच दिवसांनीं कलियुग सुरू झालें. -ज्ञाको क १७५. ॰युगाचा ब्रह्मा-पु. कल्पक व चतुर पुरुष; बुद्धिवान मनुष्य. ॰संचरणें -क्रि. मनुष्य भांडण्याच्या बेतास आला म्हणजे त्याच्या संबंधानें म्हणतात. 'ह्याच्या मनांत, पोटांत कली संचरला'

दाते शब्दकोश

कळा

कळा kaḷā m (कली S) A large कळी or bud: an ornamental bud-form knob (as that of the handle of चौफुला &c. &c.): a large कळी in some other senses. See कळी, of which word this is the intensive or enhancing form. 2 From कला and used in all its senses.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. १ फुलाची मोठी कळी; कोरक; कळीचें मोठें स्वरूप. 'तो कनक चंपकाचा कळा । -ज्ञा ६.२५७. २ केळ- फूल. 'पाहतां जैसा केळीचा कळा । स्वयें विकासे फळांदळां ।' -एभा २.५७७. ३. चौफुला वगैरेस शोभेसाठीं कळीच्या आकाराचें हातांत धरण्यासाठीं जें बोंड बसवितात तें. ४ बुगडीचा वरचा कळीसारखा भाग. [सं. कलिका] ॰फूल-न. १ एक औषधासाठीं वाळविलेली फुलाची कळी. २. कोणातेंहि कळीच्या आकाराचें फूल. ॰मोगरा -पु. (सोनारी) मोगर्‍याच्या फुलांच्या कळीसारखा आकार दिलेला कोणत्याहि दागिन्याचा भाग. कळी पहा.

दाते शब्दकोश

(सं) स्त्री० न उमललेली कळी. २ (कला पहा.)

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

माथेकळी

माथेकळी māthēkaḷī f (A head कळी or crown कळी) A कळी (triangular slip A) sometimes inserted over the कळी or hinder slip of the skirt of an angrakhá.

मोल्सवर्थ शब्दकोश

बोंगडा

पु. (राजा.) पूर्णपणें न उमललेली फुलाची कळी; फुगीर झालेली लवकरच उमलणारी कळी.

दाते शब्दकोश

चांपौळ, चांपौळी

नस्त्री. चाफ्याची कळी किंवा फूल. 'नाना चांपा चांपौळी पूजिला ।' -ज्ञा १८.८५३. [चांपा + कळी]

दाते शब्दकोश

गुन्चा

(पु.) हिंदी अर्थ : कली, कलिकाओं. मराठी अर्थ : कळी, कळ्या.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

गुन्चा दहन

(वि.) हिंदी अर्थ : गुलाबके कली समान सुंदर मुख. मराठी अर्थ : गुलाबाच्या कळी सारखें सुंदर मुख.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

कळ

स्त्री. १ भांडण; कलागत; तंटा; खोडी. (क्रि॰ काढणें; लावणें). 'ऐसें गोत्रचि दोहीं दळीं । उदित जालें असे कळी ।' -ज्ञा १.१८४. 'तिनें घरांतल्या घरांत बारीक कळ लाव- ण्यास अगोदरच प्रारंभ केला होता.' -रंगराव. 'एलवड्यावर पहिल्यानें जाउन केली कळ ।' -ऐपो ३८७. २ कुरापत; भांड- णाचें कारण. (क्रि॰ काढणें). 'आम्हासि ग्रह नाहीं अनुकूळ । नसती उत्पन्न होते कळ ।' -शनि १८२. 'मी म्हणतो कीं त्वां कळ काढली.' -बाळ २.४५. [सं. कलि] म्ह॰ बोलतां कळ धुतां मळ = उत्तर-प्रत्युत्तरानें भांडण वाढतें आणि वरवर धुतल्यानें अधिक अधिक मळ सुटत जातो.

दाते शब्दकोश

कळीकाळ

कळीकाळ kaḷīkāḷa m (Poetry.) The age called कळी or a time of the age कळी, i. e. an evil or adverse time. Ex. घालुनिया कास करितो कैवाड ॥ कळिकाळासिं आड लागों नेदी ॥. Ex. तुझिया मुद्रिकेचें अद्भुत बळ ॥ तेणें क्षणैक जिंकिजेल क0 ॥ Ex. क0 तोडरीं बांधोन ॥ लंकेस सुखें नांदेका ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

कलियुग      

न.       चार युगांपैकी चौथे चालू युग. पहा : कलि, कली [सं.] (वा.) कलियुग संचरणे -भांडणाची सुरसुरी येणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुड्मळ, कुड्‌मुळ      

पु.       फुलाची कळी; उमलणारी कळी; कमळ : ‘ऐक्यभावाची अंजुळी । सर्वेंद्रिय कुडुमुळीं ।’ -ज्ञा १५.२. [सं.कुड्मल]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

मोडणी

स्त्री. १ शेतांतील कापणी केलेल्या धाटांचीं किंवा पिकाचीं कणसें मोडण्याची, खुडण्याची क्रिया (मळणी करण्या- साठीं); कापणी; मोडण्याची क्रिया. 'होता स्थूळ पिकाची मोडणी । होय सूक्ष्म बीजाची पुडझाडणी ।' -स्वादि १३. ५.४६. २ मार्ग; पद्धत; वागण्याची रीत; ओळ; मोड (-स्त्री.) पहा. ३ मांडणी. ४ देवाला कौल लावले म्हणजे अमकी गोष्ट करावयाची तर उजवी कळी दे, नको करूं असें म्हणावयाचें असेल तर डावी कळी (प्रसाद) दे, अशा प्रकारें कौल लावण्याची क्रिया.

दाते शब्दकोश

पाकळी

वि. पाकळ्या असलेलें (फूल इ॰). या शब्दा पूर्वीं एक, दु, ति, इ॰ सारखे अनेक शब्द जोडून समास बनतात. जसें:-एकपाकळी = पाकळ्यांचें एकच वर्तुल असलेलें (फूल); दुपा- कळी = पाकळ्यांचीं दोन वर्तुलें, रांगा असलेलें; तिपाकळी, चौपा- कळी. बहुपाकळी, अनेकपाकळी इ॰ [पाकळी]

दाते शब्दकोश

शगूफा

(पु.) हिंदी अर्थ : कली, फूल, नभी घटना. मराठी अर्थ : कळी, पुष्प, नवीन घटना.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

कल्हई-ल्हे, कल्हय

स्त्री. १कथील व नवसागर यांचें मिश्रण करून स्वंयपाकाच्या तांब्यापितळेच्या भांड्यांस जो लेप करतात तो, व तो देण्याची क्रिया. २मुलामा; पातळ थर; सोन्याची कल्हई अथवा रुप्याची कल्हई = दागिन्या- वरचा मुलामा-सोन्याचा अथवा रुप्याचा. ३भिंगामध्यें प्रतिबिंब दिसावें म्हणून त्यास जो पार्‍याचा लेप देतात तो. आरशाच्या मागील पार्‍याचा लेप, मुलामा. 'आरसे आहेत, ज्यांची कल्हई उडाली असेल व पालखीस लागू होत असे असतील ... ते हुजूर पाठवावे.' -रा १२.१४२. [अर. कलई = कथील] ॰करणें -क्रि. १झिलई, पातळ हात, लेप देणें; चकचकीत करणें; वरच्या अंगानें चकाकी आणणें. २(ल.) सावरासावर करणें; वाईट बाजूवर पांघरूण घालून चांगली बाजू पुढें मांडणें; एखाद्या गोष्टीस वरवर चांगलें स्वरूप देणें. ३उगीच उपद्व्याप करणें; उद्योग, स्तोम माजविणें, फुगविणें (साधारण दुखापत वगैरेचें.) ४(विनो- दानें) पुरणपोळींत पुरण वगैरे थोडें भरणें; ॰चा वि. १ज्याला कल्हई केली आहे असा. २(ल.) वरवर धुतलेला; किंचित उजळ केलेला; चकचकीत केलेला. ॰कर-गर-गार -पु. भांड्याकुंड्यांना कल्हई लावणारा. [अर. कलई = कथील + फा. गर(म. कर).] ॰करप -(गो.) (ल.) सारवासारव करणें.

दाते शब्दकोश

फिरकी

स्त्री. १ गाण्यांतील लकेर; कंप; फिरक. २ नाच- ण्यांतील फेरा; गिरकी. ३ मळसूत्राचा अवयव; नर. ४ पाळणा, कठडा इ॰ ची कांतीव खुंटी. ५ आंसावर फिरणारी कोणतीहि लहान वस्तू; किरकिरें, गिरगिरें, भोंवरा इ॰ ६ दरवाजाच्या कुलपाची मूठ. ७ सोनाराचा लहान ताजवा. रास्त वजन दाखविणारा कांटा. ८ कांतणें इ॰ कांस गरगर फिरवायाजोगा चक्राकार अवयव असतो ती; करंज्या, शंकरपाळे इ॰स मुरड घालण्याचें साधन. ९ मराठ्यांच्या पागोट्याची कळी. 'नवीन तर्‍हा नारळी डोईला पदर पागोट्याची फिरकी ।' -होला १७. १० जमीनपहाणी खात्यांतील एक भाग; जमीन मोजणीदारांची टोळी. ११ बुरडी पंख्याची दांडी. -बदलापूर ९४. १२ (जरतार धंदा) बारीक रीळ. १३ (मातकाम) मातीचें चित्रे पाटावर ठेवून तें एका गोलाकार फिरणार्‍या लांकडी चौफुल्यावर ठेवतात ती. १४ (विणकाम) हातमागावरील ताण्याचीं सुतें सरकूं नयेत म्हणून घातलेला आडवा जाड दोरा. १५ माळेला बांडी (लोटे) बांधण्यासाठीं लांकडाची काठी असते ती; खापेकड. -मसाप २.२५२. -वि. १ फिरणारी २ फिरकीदार. [फिरणें] फिरकी पगडी-स्त्री. कळीची पगडी. 'निमाजामा फिरकी पगडी माजी शोभे पटका ।' -आपद ३९. फिरकीदार-वि. कळी असलेलें. फिर- कीचें फूल-न. डोक्यांत घालण्याचें मळसूत्राचें सोन्याचें फूल.

दाते शब्दकोश

फिरकी phirakī f (फिरणें) A quaver or shake (in singing). 2 A turn round or a whirl (in dancing). 3 A male screw. 4 A turned piece of wood (as in rails upon the top of a building, around a cradle &c.); a baluster. 5 A whirligig; any little roller or thing turning on an axis. 6 The handle of a door-lock &c. 7 A small pair of scales (as that of a goldsmith or shroff). 8 A crimpling instrument (for cakes &c). 9 A common term for the little twists (or कळी) in the turban of a Maráṭhí. 10 A division of a survey establishment or department; a party or body of surveyors. 11 A strong thread retracted or reverted across the warp before the advancing woof. Its use is to maintain or stay the lines composing the warp, so that if any snap, the break is arrested.

मोल्सवर्थ शब्दकोश

अधर्म

धर्मभ्रष्ट बाट्य, इतोपि भ्रष्टः ततोपिभ्रष्टः, मेले विटाळचांडाळ मानीत नाहींत, विटाळ कालवतात, दिवसेंदिवस सश्रद्ध इसम विरळा, श्रद्धा रोडावली, माणुसकी लोपली, कळी प्रबळ झाला, अधर्माचें अभ्युत्थान झालें, सर्वांनीं धर्मावरच गदा उगारली, जीवनमूल्यें चळलीं, धर्माला ग्लानि आली.

शब्दकौमुदी

आगा

पु. १ पु. अंगरख्याचा पेश कळी आणि खुटकळी यांच्या- मधील भाग. २ पुढील भाग. -वि. मुख्य; श्रेष्ठ. उ॰ आगा हैदर. [सं. अग्र; प्रा. अग्ग; फा. आगा = श्रेष्ठ]

दाते शब्दकोश

अनुनय

मनधरणी, अर्ज-विनंत्या करून पाहूं या कळी उमलते का ! रुसवा काढणें, लोणी-मस्का लावणें, हांजी हांजी करणें, तालावर नाचणें, शब्द झेलणें, थुंकी झेलायला तयार, बूट पुसणें, शागिर्दी स्वीकारणें, गळ घालणें, करुणा भाकणें, प्रार्थना-विनवणी-धावा करणें, हट्ट घेणें, निकड-झक्कू लावणें, गळीं-हातापायां पडणें, रडून भेकून विनवणी.

शब्दकौमुदी

आंगरखा-राखा

पु. (प्र.) अंगरखा. अंगांत बंडीच्या वर घालावयाचा बंदांचा घेरदार, मनुष्याच्या उंचीच्या मानानें उंच असलेला कपडा; डगला; (गो.) सदरा. [सं. अंग + रक्षक; प्रा. रक्खग-अ; हिं. रखा] अंगरख्याचे कांहीं प्रकार -प्यालेदार- याचा छातीचा भाग प्याल्याच्या आकाराचा कापलेला असतो. -कंठीदार- याचा छातीचा भाग कंठीसारखा असतो. -गुंडीदार- गळ्याला गुंडी असलेला. नीमकंठी- अर्धी कंठी (चौकोनी छाती) असलेला. -गज- रेदार- गजर्‍याप्रमाणें चूण असलेला. -छडीदार- छडीसारखे पट्टे ज्यावर आहेत अशा कापडाचा. -छिटाचा- चिटाचा; छापील कापडाचा. जरदोजी- जरीचा. -अगाबानी- बुट्टीदार अगाबानी कापडाचा. -बानातीचा- लोंकरीचा -मलमलीचा इ॰ आंगर- ख्याचे अवयव -आगा, कळी, खुटकळी, पेशकळी, बंद, चोळा, घेर, अस्तन्या इ॰ यासंबंधीं माहिती त्या त्या शब्दा- खालीं पहा.

दाते शब्दकोश

अंकुर      

पु.       (वन.) १. खोडावरील कळी; बियातील गर्भ; कोंब, बीज अथवा बीजुक रुजल्यावर त्यातून आलेला वनस्पतीचा आरंभीचा खोड व पाने यांचा किंवा तत्सम शाकीय भाग. २. (ल.) मूल; वंशवृक्षाचा कोंब; वंशज : ‘गंगाबाईच्या या एका अंकुराशिवाय कुणीच वंश नव्हता.’ – इंप २८. ३. अणकुची; टोक. ४. भावी कर्तृत्वाचे चिन्ह. (असे लहान मुलाच्या अंगचे – चेष्टा, भाषण इ.) (क्रि. दिसणे.) [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अर्धमुकुल दृष्टि, अर्धमुकुल दृष्टी      

स्त्री.       (नृत्य.) अर्धवट डोळा उघडणे; पापण्यांचे केस एकमेकांस लागतील इतक्या पापण्या मिटणे; आल्हादकारक सुगंध, सुखस्पर्श ह्या गोष्टींचा या अभिनयाने अर्धबोध होतो. [सं. मुकुल=किंचित उमलेली कळी.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अर्धोन्मीलित      

वि.       अर्धे उघडलेले (डोळे, कळी इ.) : ‘तेथ अर्धोन्मीलित स्थिती । उपजे तया ।’ –ज्ञा ६·२०३. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अर्धोन्मीलित

वि. (काव्य) अर्ध उघडलेले (डोळे, कळी इ.) ‘तेथ अर्धोन्मीलित स्थिती । उपजे तया ।’ –ज्ञा ६.२०३. ‘निर्विकल्प समाधि प्रवर्तली । दृष्टि अ॰ झाली ।’ [सं.]

दाते शब्दकोश

अटी      

स्त्री.       १. मोहरमात हातात घालावयाची पिळदार दोरी; सैली; सुताची किंवा रेशमाची लड; कळी. २. पहा : अट ९ ३. हट्ट; अट : ‘ऐसी एका अटीं । रितीं शिणतीं करंटी ॥’ – तुगा २७८४. ४. कष्ट; श्रम.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अयमुर्चे      

क्रि.       फुलाची कळी अर्धवट उमलणे. (गो.) [सं. अधी+मुच्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अयमुर्चें

क्रि. (गो.) फुलाची कळी अर्धवट उमलणें. [सं. अर्ध + मुच्; का. -मुरुचु = मुरडणें.]

दाते शब्दकोश

बाँगॉ

पु. (गो.) कळी कमलिनीचा कंद; बोंड.

दाते शब्दकोश

बगल

स्त्री. १ काख. २ अंगरखा, बंडी इ॰च्या बाहीला लावलेली कळी किंवा तिकोनी अगर चौकोनी पट्टी. ३ लंगड्या माणसाची कुबडी. ४ -न. बाजू. ५ (मल्लविद्या) जोडीदाराच्या उजव्या बगलेंतील खड्ड्यांत जंबियानें मारणें. [फा. बघल] (वाप्र.) ॰देणें- एका बाजूला होणें, सरणें. ॰मारणें- १ सैन्याची एक बाजू पराभूत करणें, कापणें. २ एके बाजूस होणें, वाट देणें. 'आम्हांस गिल- च्यानें वाट देऊन एकीकडे बगल मारून जाहला.' -भाब ११३. ॰दाखविणें, बगल-ला वर करणें-आपल्या जवळ कांहीं नाहीं हें सिद्ध करण्यासाठीं बाहू वर करून दाखविणें; दिवाळें वाज- ल्याचें प्रसिद्ध करणें. बगलेंत असणें- १ (एखाद्याच्या) आश्रया- खालीं किंवा वशिल्याचा असणें. 'जो कोणा तरी थोर माणसाच्या बगलेंत असेल त्याला सारे लोक नमून असतात.' २ अंकित असणें; मुठींत असणें. बगला मारणें-क्रि. (कृषि.) डोळे, मोड, अंकुर पुसून काढणें; डोळे काढून टाकणें. (एखादी वस्तु) बगलेंत घालून चतुःसमुद्राचें स्नान करून येणें-(ल.) ती वस्तु आपल्या खिजगणतींत नाहीं असें धरून वागणें. बगलेंत धरणें- आपल्या आश्रयाखालीं घेणें. बगलेंत मारणें-छाती व बाहू यांच्यामध्यें दाबून धरणें; काखोटीत मारणें. बगलेंतील गोष्ट- स्वकपोल कल्पित गोष्ट. (गोष्ट) बगलेतून काढणें-खोटी गोष्ट बनवून ती खरी करून सांगणें; बात झोकणें; बनावट गोष्ट करणें. म्ह॰ तें काम त्यांच्या बगलेंतलें आहे = तें त्याला सहज करतां येण्याजोगें आहे. याशिवाय जास्त वाप्र. साठीं काख पहा. सामा- शब्द- ॰थैली-स्त्री. खाकेंत अडकविण्याची पिशवी. ॰बच्चा- पु. १ सर्वस्वी दुसर्‍याच्या तंत्रानें चालणारा; दुसर्‍याचा हस्तक. २ वशिल्याचा माणूस. ॰बंद-पु. (अंगरखा इ॰ चा) काखेखालील आवळण्याचा बंद. [फा.] ॰बिल्ली-स्त्री. १ लाडिकपणें वाग- विलेलें मूल; आवडतें मूल. २ (कांहींच्या मतें) काखमांजर. ३ (ल.) वशिल्याचा मनुष्य. [हिं. बिल्ली = मांजर] ॰भावार्थी-वि. दिसण्यांत गरीब, साधाभोळा पण संधि सांपडली कीं बगलेंत मारून लांबविणारा; भगलभावार्थी; कावेबाज. ॰भिस्ती-स्त्री. १ चाम- ड्याची पाण्याची पिशवी (पखाल) बगलेंत नेणारा याहून पाठीवर पखाल वाहणारा निराळा. २ (विनोदानें) शिजलेला परंतु अधिक दिवस ठेवल्यामुळें नासलेला भाजीपाला, दहीं इ॰ पदार्थ. [हिं. बगल बहस्ती] बगला, बगलेक-अ. (गो.) पाशीं, जवळ; कडे. बगलाविणें-सक्रि. चोरलेला माल बगलेंत मारून चालतें होणें. बगली-स्त्री. १ छातीला मांडीच्या घर्षणासुळें पडणारें क्षत, व्रण. २ (बगलेखालीं आणून) मुद्गल खेळण्याचा एक प्रकार. ३ कुस्तीं- तील एक डाव; आपला एक हात जोडीदाराच्या मानेवर ठेवून दुसर्‍या हातानें त्याच्या हाताचा पंजा धरून तो वर वरून बगले खालून जाऊन त्याला चीत करणें. ४ पाय घसरल्यानें उंटास होणारा रोग. ५ मल्लखांबाची एक उडी. -वि. वरील प्रमाणें घसणारा (उंट). बगल्या-वि. १ दुसर्‍याच्या हाताखालीं चाकरी करणारा; मदतनीस; हस्तक; अर्ध्यावचनांत, अर्ध्या मुठींत असणारा; पार्श्वक; होयबा; अंकित. ॰चोर-पु. बाह्यतः प्रतिष्ठेनें वागून संधि मिळाली

दाते शब्दकोश

बोंड

न० भजें. २ कळी. ३ अग्रभाग.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

बोंगा

पु. १ अर्धवट फुललेली कळी; बोंगडा; फुगीर कळा. २ नाळ; गर्भनाडी (फुगलेली, पुढें आलेली) ३ पोटाचा फुगीर भाग. पोटाचें डेरकें; गर्भारपणांतील पोटाचा फुगीरपणा; गभिणीचें मोठें व अव्यवस्थित पोट. (क्रि॰ वाढणें; फुगणें) ४ धोतराच्या अगर लुगड्याच्या निर्‍यांचा फुगीरपणा. ५ मोठें, बेढब पागोटें. ६ कापड विणताना शेवटीं राहिलेले किंवा ताण्यांतील खराब झालेले सुताचे तुकडे; गुंता. म्ह॰ अंगापेक्षां बोंगा मोठा. बोंगा, बोंगाडा-वि. १ धष्टपुष्ट; मोठा; स्थूल; गलेलठ्ठ. २ मोठा; बोजड; स्थूळ; अवजड (अंगरखा, वस्तू) बोंगाड्या, बोंग्या-वि. (व.) मंदबुद्धि; वेडसर; मठ्ठ; मूर्ख; बावळट.

दाते शब्दकोश

बुंदी

स्त्री. हरभऱ्याचें पीठ भिजवून पातळ करून तें झाऱ्यां- तून तुपांत पाडून तळलेली कळी. (अव.) बुद्या. 'चोटी मुग दळ बुंदी विशेष ।' -नव ९.११७ [सं. बिंदु; हिं. बुंदिया] बुंदीचा लाडू-पु. साखरेच्या पाकांत बुंद्या घालून केलेला लाडू; एक पक्वान्न. ॰पाडणें-बुंदीच्या लाडवाच्या कळ्या पडणें. 'हजार पानांच्या बुंदी पाडीन.' -मोर १४.

दाते शब्दकोश

चांपेकळी

स्त्री. चाफ्याची कळी. 'चापेकळिया मिरवत । चापेकळी जानकी ।' -वेसीस्व ९.१३४. चांपेकळ्यांची माळ-स्त्री. चापेकळ्याप्रमाणें आकृति असलेल्या सोन्याच्या किंवा चांदीच्या मण्यांची माळ-हार.

दाते शब्दकोश

चापेकळी      

स्त्री.       चाफ्याची कळी : ‘चाफेकळिया मिरवत । चापेकळी जानकी ।’ – वेसीस्व ९·१३४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चौदा

स्त्री. चौदा विद्या. 'चौदाजणींची ठेव । नचले स्वरूप वर्णावया ।' -ह ३.३ -वि. १४ संख्या; दहा आणि चार. [सं. चतुर्दश; प्रा. चउद्दाह; हिं. चौदह; बं. चौद्द; उ. गु. चौद; प. चौदा] सामाशब्द- ॰इंद्र-पु. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाच्या कालांत जसे पृथ्वीवर एकामागून एक असे चौदा मनु राज्य करून जातात त्याचप्रमाणें स्वर्गांत एकामागून एक चौदा इंद्र त्या कालांत राज्य करून जातात. म्ह॰ चौदा इंद्र झाले तरी इंद्राणी एकच (सभोंवतीं अनेक फेरफार होत असतांना देखील जी एकच व्यक्ति, वस्तु, संस्था, विधि, चाल इ॰ टिकून राहते तिचें वर्णन करतांना या म्हणीचा उपयोग करतात). गोत्रें-नअव. (कोंकणस्थ ब्राह्मणांचीं) अत्रि, कपि, काश्यप, कौंडिण्य, कौशिक, गार्ग्य, जामदग्न्य, नित्युंदन, बाभ्रव्य, भारद्वाज, वत्स, वसिष्ठ, विष्णुवृद्ध व शांडिल्य. चौकड्या-वि. चौदा चौकड्यांचें राज्य असणारा. 'चौदा चौकडिया लंकापति । त्याची कोण झाली गति ।' -तुगा ॰चौकड्यांचें राज्य-न. कृत, त्रेता. द्वापार व कलि हीं चार युगें मिळून एक चौकडी होते. अशा चौदा चौकड्या होईपर्यंत केलेलें राज्य; अतिशय दीर्घकाल केलेलें राज्य; रावणाचें राज्य. 'सर्व देवांना बंदींत टाकणारा व चौदा चौकड्या राज्य करणारा रावण स्वतःच्या प्रतापासंबंधाच्या... ...चुकीच्या कल्पनेला बळी पडला.' -कीचकवध. ॰तंतुवाद्यें-वीणा, बीन, रुद्रवीणा, एकतारी, सारंगी, सतार, सारमंडळ, तुंबरी (तंबुरी), सरोद, कोंका, रखब, मदनमंडळ, ताउस व तुणतुणें. ॰ताल-ळ-वि. चौदा मजले उंच; फार उंच; गगनभेदी. [चौदा + ताल] ॰नारू- पु. चौदा अलुते-अलुतेदार पहा. [चौदा + नारू = अलुतेदार] ॰ब्रह्में-नअव. शब्द, मीतिकाक्षर, खं, सर्व, चैतन्य, सत्ता, साक्ष, सगुण, निर्गुण, वाच्य, अनुभव, आनंद, तदाकार व अनु(नि)र्वाच्य ब्रह्म. -दा ७.३.५ ते ९. ॰भवनें, भुवनें-नअव. चौदा लोक, सप्तवर्ग आणि सप्तपाताळ मिळून चौदा लोक. भूः, भुवर्, स्वर्, महर्, जन, तप, सत्य हे सात लोक आणि अतल, वितल, सुतल, महातल, रसातल, तलातल व पाताल हे सात पाताल लोक मिळून चौदा लोक. ॰मनु-सात सातांचे दोन वर्ग. (१) स्वायं- भुव, स्वारोचिष, औत्तमी, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत. (२) सावर्णि मनुः-सावर्णि, दक्ष, ब्रह्म, धर्म, रुद्र, देव व इंद्रसावर्णि. ॰रत्नें-नअव. देव आणि दानव यांनीं समुद्रमंथन करून चौदा मूल्यवान वस्तू काढिल्या त्याः लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्र, कामधेनु, ऐरावत, रंभा (आदिअप्सरा). उच्चैःश्रवा नामक सप्तमुखी घोडा, कालकूट विष, धनुष्य (शार्ङ), पांचजन्य शंख, अमृत. ॰लोक-पुअव. चौदा भवनें पहा. 'तेतिस कोटि देव सकळ । चौदा लोक सुवर्णाचळ । वेष्टित राहिले ।' -दा ४.१०.१४. ॰विद्या-स्त्रीअव. ऋक्, यजुस्, साम, अथर्व हे चार वेद व शिक्षा, छंद, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष, कल्प हीं सहा वेदांगें व न्याय, मीमांसा, पुराणें, धर्मशास्त्र मिळून चौदा विद्या. 'चौदा विद्या ज्यांचे हाती ।' -भूपाळी गणपतिची पृ. ३. चौदावें रत्न-न. १ (चुकीनें) चाबूक. २ (ल.) खरपूस मार (चौदा रत्नें वर्णन करणार्‍या 'लक्ष्मीः कौस्तुभ पारिजातक.' श्लोकांतील 'शंखोऽमृतं चांबुधेः' या तिसर्‍या पादाच्या शेवटीं 'चांबुधेः' बद्दल चुकीनें चाबूक असें वाचल्यानें चादावें रत्न म्हणजे चाबूक असा अर्थ; किंवा चौदावें रत्न (अमृत) निघाल्यावर दैत्यांना बसलेल्या मारावरून शिक्षा.) 'आम्ही इतके धीट आहों कीं चवदावें रत्न आमच्या दृष्टीस पडलें कीं पुरे, आम्ही आपले पाय लावून पळत सुटलोंच.' -आगरकर. २ भाबडया माणसाची केलेली खोडी, फसवणूक. चौदावेंरत्न दाखविणें-चाबकानें मारणें, खरपूस समाचार घेणें.

दाते शब्दकोश

चौदा चौकड्यांचे राज्य      

न.       कृत, त्रेता, द्वापार व कली ही चार युगे मिळून एक चौकडी होते. अशा चौदा चौकड्या होईपर्यंत केलेले राज्य; अतिशय दीर्घकाल केलेले राज्य; रावणाचे राज्य : ‘सर्व देवांना बंदीत टाकणारा व चौदा चौकड्या राज्य करणारा रावण स्वतःच्या प्रतापासंबंधाच्या चुकीच्या कल्पनेला बळी पडला.’ − कीव.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चौकडी

स्त्री. १ चार वस्तूंचा समुदाय (चार कागद, नाणीं, मोतीं इ॰) २ एकजुटीच्या, विचाराच्या चार मनु- ष्यांचा समुदाय; उदा॰ चांडाळचौकडी. ३ कापडावरील, लुग- ड्यावरील चौकट; आडव्या-उभ्या रेघा; चतुरस्त्र चिन्ह. ४ हरि- णाचें उड्या मारणें, बागडणें; हरिणाची उडी. ५ कृत, त्रेता, द्वापर व कली या युगांचा मिळून होणारा काल; उ॰ चौदा चौकड्या रावणाचें राज्य; बहात्तर चौकड्या इंद्राचें राज्य. 'जैं चौकडिया सहस्त्र जाये । तैं ठायेठावो विळुचि होये ।' -ज्ञा ८.१५६. 'चौदा चौकडिया आयुष्यगणना । बंधुवर्ग जाणा कुंभकर्ण ।' -तुगा ३४३६. ६ (क.) आठ लुगड्यांचा समुदाय; चोवीस मुट्टे किंवा तोबे. 'आज मी चौकडी सणगें विकलीं.' 'एक चौकडी सुताचा काय भाव आहे ?' [चौकटी] (वाप्र.) ॰भुलणें-गुंग होणें-मोहून, भुलून जाणें; भांबावून जाणें; बावचळणें; गोंधळणें. सामाशब्द- ॰चा-ड्याचा-वि. चौकटी असलेलें (कापड, लुगडें इ॰). ॰ची गाडी-स्त्री. चार घोड्यांची राजाच्या स्वारीची गाडी, बगी, रथ. 'स्वारीबरोबर पिछाडीस एक चौकडीची गाडी ठेवणें' -ऐरापु प्र. ९.५१०. चौकटा पहा.

दाते शब्दकोश

चौकडी caukaḍī f An aggregate of four: (as of four sheets of paper, of four pieces of money, of four men united in counsel, of four pearls &c.) 2 A square (on cloth &c.) 3 The bounding of a deer. 4 A period comprising the four ages, viz. कृत, त्रेत, द्वापार, कलि. Fourteen of these (चौदा चौकड्या) constitute Ráwan̤'s period; and seventy-two (बाह- त्तर चौकड्या) the period of the sway of Indra in heaven or of Manu on earth. चौ0 भुलणें or गुंग होणें (From the figure of a deer forgetting its gambols.) To be fascinated or bewildered. चौकडीचा or चौकड्याचा Having squares, tesselated--chintz, cloth, a pavement.

मोल्सवर्थ शब्दकोश

चौकडी      

स्त्री.       चार युगांचा समुदाय; कृत, त्रेता, द्वापार व कली या युगांचा मिळून होणारा काल. उदा. चौदा चौकड्यांचे राज्य.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चेवणे      

अक्रि.       त्रासणे; चेतणे : ‘तंव देखला स्फुंदत । नारद कळी लावित । त्यासि पुसे जगन्नाथ । कां चेवलासि ।’ − कक ३·१०·१०. [सं. चेतन]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चेवणें

अक्रि. त्रासणें; चेतणें. 'तंव देखला स्फुंदत । नारद कळी लावित । त्यासी पुसे जगन्नाथ । कां चेवलासि ।' -कथा ३.१०.१०. [सं. चेतन]

दाते शब्दकोश

चिणणे      

सक्रि.       १. वीट, दगड इ. रचून बुजविणे (दार, खिडकी इ.) : ‘धर्माचा दारवंटा दृढतर चिणिला हा कली फार खोटा ।’ - निमाक १·५७. २. (बीळ इत्यादिकात) दगड, माती ठोकून भरणे. ३. ठासणे (लहानशा जागेत माणसे, सामान); कोंबणे; चेंदणे. ४. जिवंत गाडणे (एखाद्या माणसाला भिंतीच्या पोकळीत जुलमाने घालून) भिंत बांधून काढणे. ५. ठार मारणे. [सं. चि.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चिणणें

सक्रि. वीट, दगड, इ॰ रचून बुजविणें (दार, खिडकी इ॰), 'धर्माचा दारवंटा दृढतर चिणिला हा कली फार खोटा ।' -निमा १.५७. २ (बीळ इ॰ कांत) दगड, माती ठोकून भरणें. ३ ठांसणें (लहानशा जागेंत माणसें, सामान); कोंबणें; चेंढणें. ४ जिवंत गाडणें (एखाद्या माणसाला भिंतीच्या पोकळींत जुलमानें घालून); भिंत बांधून काढणें. ५ ठार मारणें. ६ चेतविणें; खिजविणें; चिढविणें.

दाते शब्दकोश

चित्कलि(ळि)का

स्त्री. चैतन्यकालिका; ज्ञानरूप ज्योति. 'अर्जुनालागीं चित्कळिका । उजळलिया श्रीकृष्णें ।' -ज्ञा ११. १७८. [सं. चित् = चैतन्य + कलिका = कळी]

दाते शब्दकोश

चुणकळी

स्त्री. ज्याचा भाजून चुना करितात असा भूस- भुशीत खडा; दगड; चुनखडी. [चुना + कळी]

दाते शब्दकोश

चुनकशी      

पहा : चुणीदार चुनकळी, चुन्याची कळी      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डाल(ला)न

न. उंसाच्या चरकांतील नवरा-नवरी जेथें बसविली असते ती चौकट; प्लेट (जर नवरा-नवरीखेरीज माथे- कळी असेल तर) आडवा दांडा. याच्या टोकास बैल जुंपतात. [डालें]

दाते शब्दकोश

दांडोली

स्त्री. (काव्य.) दौंडी; डांगोरा पहा. (क्रि॰ पिटणें; फिरविणें). 'जवळ असतां बोलाबोली । शोभनामाजीं वाढेल कली । निकरां जाईल दांडोली । आम्हा आणि रुकमिया ।'

दाते शब्दकोश

दांडोली dāṇḍōlī f (Poetry.) Proclamation by the crier, v पिट, फिरव. Ex. जवळ असतां बोलाबोली ॥ शोभ- नामाजी वाढेल कली ॥ निकरा जाईल दां0 ॥ आम्हा आणि रुकमिया ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

दावा

पु. १ द्वेष; वैर; मत्सर; शत्रुत्व. 'कळी करि सुनि- मळीं परम उग्र दावा नळीं ।' -केका २१. 'आमरण पांडवासी माजा निर्विघ्न चालिला दावा ।' -मोगदा ९.१५. २ भांडण तंटा; कज्जा. ३ (एखाद्या वस्तूवरील) मालकी; न्याय्य अधि- कार, हक्क. 'हें घर म्यां तुला दिलें, याजवर माझा दावा राहिला नाहीं.' ४ (कायदा) न्याय मिळविण्याकरितां, हक्क प्रस्थापित करण्याकरितां दिवाणी कोर्टांत चालविलेला खटला, कज्जा, फिर्याद; (इं.) प्लेंट्. ५ दुसर्‍याच्या विरोधामुळें (एखाद्या पदार्थावर) स्वत्त्व प्रतिपादन करण्याचा व्यापार. 'तो अलीकडे या गांवावर दावा सांगतो.' ६ मागणी. 'राजे आपलें इमान राखून ऐवज अदा करितील तरी व्याजाचा दावा करणार नाहीं.' -पया ४००. ७ हल्ला. 'बळकट झालें म्हणजे..दावे दरवडे करावे.' -मराआ २२. ८ सापाचा डंख. 'सर्प बारा वर्षें दावा राखितो.' [अर. दआवा; गु. दावो] (वाप्र.) ॰उगवणें-घेणें-(एखाद्यानें) केलेल्या अपकरांचा) सूड उगविणें(एखाद्यानें) केलेल्या अप- कारांचें उट्टें काढणें. ॰गाणें-सांगणें-(एखाद्यावर) सूड उगवि- ण्याबद्दल धमकी देणें. ॰तोडणें-कज्जा मिटविणें; (हक्कासंबंधीं भांडणाचा) निकाल लावणें. ॰धरणें-द्वेष करणें; मत्सरबुद्धि बाळ- गणें; डाव, दांत धरणें. ॰रद्द करणें-फिर्याद काढून टाकणें. ॰लावणें-१ शत्रुत्व पुकारणें; भांडणें. २ फिर्याद गुदरणें. ॰साधणें-१ यशस्वी रीतीनें सूड उगवून घेणें. २ फिर्याद जिंकणें. 'म्हणे तुक्यानें साधिला दावा । न्याय सांगावा कवणासी ।' उभा दावा-पु. खडें वैर; तीव्र शत्रुत्व. म्ह॰ जावा जावा आणि उभा दावा. दुस्मान दावा-कट्टें वैर; हाडवैर. सामाशब्द- ॰दरफडा-पु. आरडाओरडा करून धमकावणें; दपटशा देणें; खडसावणें; चरफडाट; दंडेलीचें, उर्मटपणाचें बोलणें. (क्रि॰ करणें; मांडणें; कर्माची षष्ठी योजतांना गाणें ह्या धातूचा प्रयोग). [दावा + दरफडणें] ॰द्वेष-पु. मत्सर; वैर; (सामा.) मत्सर; द्वेष- बुद्धि. (क्रि॰ होणें; करणें) [दावा + द्वेष] ॰हेवा-पु. मत्सर व द्वेष. (प्र.) हेवादावा. [दावा + हेवा] दावेकरी-खोर- दार-वि. १ मत्सर, द्वेष, शत्रुत्व करणारा; वैरी. 'चहूं पादशहाचे आपण दावेदार.' -सभासद ४५. 'पति नव्हे हा दावेकरी । पूर्वींल जन्मांतर साधिलें ।' २ (एखाद्याजवळ आपल्या) हक्काची मागणी करणारा; हक्क सांगणारा; हक्कदार. ३ धनको. ४ पूर्वीच्या काळीं फिर्यादीनें गावचपांयती पुढें फिर्याद केली व पंचायतीनें जर त्याचें भांडण मिटविलें नाहीं व त्या फिर्यादीस सरकारांत अपील करण्याची ताकद नसली तर तो शेजारच्या गांवीं जाऊन राही व तेथून स्वतःच्या गांवांत लुटालूट करीत असे, तशा प्रका- रचा (मनुष्य). [फा. दआवा-दार] दावेदारी, दावेखोरी- स्त्री. १ शत्रुत्व; वैर; द्वेष. २ (एखाद्याविरुद्ध) हक्क असणें; सांगणें हक्कदारी. दावेदादी-वि. द्वेष, मत्सर करणारा; वैरी. [दावेदार] दावेदुश्मन, दावेदुस्मान-पु. शत्रु; वैरी; मत्सर, दावा करणारा.

दाते शब्दकोश

दिलका कँवल खिलना

हिंदी अर्थ : चित्त प्रसन्न होना मराठी अर्थ : कळी खुलणें.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

दुलदूल

वि. मऊ; मृदु. 'अरे सख्या रे करीं पिवळी कळी दुलदूल । गुलगुलित असी नादर विरळा ।' -प्रला ९३. [सं. दुल् = हालणें; दुल् = हालचाल दाखविणारा शब्द]

दाते शब्दकोश

दुलदूल      

वि.       मऊ; मृदू : ‘अरे सख्या रे करीं पिवळी कळी दुलदूल । गुलगुलित असी नादर विरळा ।’ – प्रला ९३. [सं. दुल्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डूब

१ (व.) हुलकावणी; थाप; झुकांडी. २ बुडी; बुच- कळी. ३ तोटा; बूड. ४ विटलेल्या वस्त्राला पुनःरंग देणें. ५ पुन्हां दिलेला रंग; वस्त्रावर बसलेला रंग. ६ वैपुल्य; सुबत्ता. डू पहा. [डुबणें]

दाते शब्दकोश

द्वापर, द्वापार      

पु.       कृत, त्रेता, द्वापर आणि कली या चार युगांपैकी तिसरे, ८६४००० वर्षांचे युग. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ढाळ्या

ढाळ्या ḍhāḷyā m A छप्पर supplementary to the piece called कळी.

मोल्सवर्थ शब्दकोश

ढेकणी

स्त्री. १ (विणकाम) वही (ओवी) वरची धनु- कली (धनुष्यकृति भाग). यालाच अटण्याच्यादोर्‍या बांधलेल्या असतात. २ (चाळ्यासाठीं) चक्र नसलें म्हणजे त्याऐवजीं काम- टीचे तुकडे असतात व त्यास नकशीच्या दोर्‍या बांधतात. या प्रत्येक तुकड्यास ढेकणी म्हणतात.

दाते शब्दकोश

धनु

पुन. १ धनुष्य. 'मुसळाचें धनु नव्हे हो सर्वथा । पाषाण पिळितां रस कैंचा ।' -तुगा ४२१०. २ कापूस पिंजण्या- साठीं वापरण्यांत येणारें धनुष्य. ३ वर्तुळाचा अर्धा भाग; वर्तुल- खंड. ४ मेषादि राशीपासून नववी रास. ५ चार हातांचें परिमाण; चार हात लांबी. 'धनु रे धनु भणतु । राऊतें बरवतांति ।' -शिशु ५६५. धनुकणें-उक्रि. (कापूस) पिंजणें, कांतणें. धनुक- धनुष्य. 'पांच सतें धनुका । उचलीली येके वेळें ।' -उषा १३. ॰कली- १ लहान धनुष्य. २ धनकुंबी; गलोल. ३ कापूस पिंजण्याचें धनुष्य. धनुःफल, धनुष्फलक-न. वृत्त परिघाच्या विवक्षित खंडाची मापणी; वर्तुलखंडाचें माप; ज्याफल. [सं.] धनुरासन-न. पोटावर उपडें निजून हात पाठीकडे नेऊन पाय उचलून दोन्ही पाय दोन्ही हातांनीं टाचांशीं घट्ट धरावे. नंतर डोक्याकडे व पायाकडे तोल निरनिराळ्या वेळीं झुकेल असें करावें. त्याच्यायोगें अन्नपचन होतें. धनर्गुण-पु. धनुष्याची दोरी; ज्या. [सं.] धनुर्धर-धारी-वि. १ धनुष्य धारण करणारा; धनुष्यानें लढणारा; तिरंदाजी करणारा. 'तेथ बाणवरी धनुर्धर । वर्षताती निरंतर ।' -ज्ञा १.१६६. २ (ल.) शास्त्र, कला इ॰ कांत निपुण; पंडित; तज्ज्ञ. [सं.] धनुर्मध्य-पु. (धनुष्याचा मध्य) धनुष्याच्या दोरीस ज्या ठिकाणीं बाण लावितात ती जागा. [सं.] धनुर्मार्ग-पु. वक्ररेषा [सं.] धनुर्मास-पु. १ (ज्यो.) धनुराशींत सूर्य येतो तो काल. यावेळीं धन संक्रांत असते. २ (ल.) या राशीस सूर्य असतां सकाळीं धनुर्लग्न आहे तोंपर्यंत देव नैवेद्यादि पूर्वक करावयाचें भोजन; झुंझुरमास. [सं.] धनुवाड, धनुवाड-धनुर्धारी; धनुष्य धारण करणारा. 'दोघे धनुर्वाडे संपूर्ण । तुज मारिती विंधोन बाण ।' -भारा किष्किधा १.३५. 'धर्मु तो अवघेयां वडिलु । अर्जुनु धनुवाडा कुशलु ।' -गीता १.३१४. धनुर्वात-पु. ज्यांत शरीर धनुष्याकृंति होतें तो वातविकार. याचे अंतरायामवात व बहिरायामवात असे दोन प्रकार आहेत. [सं.] धनुर्विद्या-स्त्री. लक्ष्य भेदण्याचें व तीर मारण्याचें शास्त्र; धनुष्य वापरण्याची विद्या. [सं.] धनुर्वेद-पु. एक उपवेद; धनुर्विद्या; भारतीयांचें युद्धशास्त्र. या वेदांत शस्त्रें, अस्त्रें, युद्ध करण्याचे प्रकार वाहनें इ॰ अनेक गोष्टीचें विवेचन केलें आहे. 'आइकें कुटिलालकमस्तका । धनुर्वेदत्र्यंबका ।' -ज्ञा १०.२१५. [सं.] धनुशाखा-स्त्री. एक वेलि. हिच्या तंतूपासून धनुष्याच्या दोर्‍या करीत. धनुष्कोटि-पुस्त्री. १ धनुष्याचें टोक. २ रामेश्वराजवळचें एक तीर्थस्थान. धनुस्तंभ-पु. शारीरिक विकार; एकाएकीं झटका येऊन अंग धनुष्याप्रमाणें वांकणें; धनुर्वात.

दाते शब्दकोश

गदे(द्दे)पदे(द्दे)

पुअव. १ टाळाटाळी; अळंटळं; चालढ कली; बहाणे; सबबी; लबाडीची चुकवाचुकवी. २ (सामा.) छ्केपंजे, पाचपेच, डावपेच. [सं. गद्यपद्य]

दाते शब्दकोश

गंधफुल्ली      

स्त्री.       सुगंधी कळी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गट-ट्ट

क्रिवि. एखादा पदार्थ त्वरेनें गिळण्याच्या वेळेच्या शब्दाचें अनुकरण. [ध्व.] ॰करणें-गटकाविणें(गिळणें)- १ दुसर्‍याच्या द्रव्याचा अपहार करणें. २ उधळपट्टीनें फस्त करणें. ३ मटकावणें; गिळून टाकणें; सगळें एका घासांत खाणें. 'सद्दर्शनचि सुदर्शन करि गट चट कटक अंतरायाचें ।' -मोआदि १०.८५. ॰कन-कर-दिनीं-दिशीं-क्रिवि. भरभर; एकदम (खाणें, पिणें याचा वाचक); गटगटां; ढसढसां; मटमटां; गट शब्द होईल असें. ॰कळी, गटंगळी, गटांगळी, गटक- ळणें-गचकळी, गचकळणें पहा. ॰गट-टां-क्रिवि. १ गटकन पहा. (क्रि॰ पिणें). 'फळें खातीं गटगटां ।' -भारा किष्किंधा १५.१११. २ उकळणें, कढणें यांतील आवाजाचें अनुकरण. (क्रि॰ शिजणें; वाजणें). ॰गटणें, गटगटावणें अक्रि. १ गटकन गिळणें; ढसढस पिणें; मटमट खाणें. २ गदगद उकळणें, कढणें (तांदूळ, डाळ, भाजी इ॰) ॰गिळ्या-गीळ-वि. दुस- र्‍याचा पैका खाणारा; हरामखोर. ॰गोळा-गटंगोळा-पु. बकाणा; गटाणा; तोंडभर मोठा घास खाणें, कोंबणें. (क्रि॰ करणें; करून टाकणें) गटगोळा-गटंगोळा वरती डोळा-वि. वरून सालसपणा दाखवून सर्वस्व नागविणारा; गोगलगाय पोटांत पाय.

दाते शब्दकोश

गुल खिलना

हिंदी अर्थ : फूल खिलना मराठी अर्थ : कळी अुमलणें.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

गुलाब

पु. १ एक फुलझाड. हें सरळ वाढतें. याचीं पानें सुंदर असून झाडाच्या सर्वांगांस कांटे असतात. फुलाचा रंग तांबडा, गुलाबी, पिंवळा, पांढरा असतो. फुलांपासून अत्तर काढतात व गुलकंद तयार. २ त्यांचे फूल. ३ गुलाबपाणी व अत्तर. ' गुलाबशिसे उत्तमसे तीन चार पाठविलेत तर बरें होतें.' -ब्रच २५३. [फा.गुल् = फुल + आब = पाणी; हिं. गुलाब = गुलाबाचें फूल] ॰कंद-पु. गुलकंद. 'गुलाबकंद वजन पक्के एक शेर पाठविला तो घेणें.' -ब्रच १२९. ॰कळी-स्त्री. गुलाबाची कळी; ही औषधी असते. ॰चक्री-छकडी-स्त्री. साखरेच्या पाकांतील गुलाबाची मिठाई. ॰छकडी-स्त्री. १ चटकचांदणी स्त्री; एक प्रकारचें गाणें. ॰छडी-पु. खडीसाखरेची कांडी. ॰जांब-जामून-पुन. मैद्यामध्ये तूप व खवा मिसळून तुपांत तळून आणि नंतर जिलबीसारखी पाकांत मुरत टाकून केलेली मिठाई. -गृशि १.४३६. [फा. गुलाबजामन् = एक फळ] ॰दान-दाणी-नस्त्री. गुलाबपाणी ठेवण्याची व तें शिंपड- ण्याची झारी, [फा. गुलाब्दान्] गुलाबदान- पु. द्राक्षाची (पांढर्‍या रंगाच्या) एक जात. -कृषि ५१२. ॰पाणी-न. गुलाबाच्या फुलापासून तयार केलेलें सुंगधी पाणी. 'हें पानसुपा- रीच्या वेळीं अंगावर शिंपडतात. ॰पाश-पु. गुलाबदाणी. [फा.] ॰शकर-स्त्री. गुलाबपाक. 'गुलाब-शकरीच्या वड्या सुमार पन्नास पाठविल्या त्या पावल्या.' -ख १२.६६३६. ॰शेवतें- न. (गो.) सोन्याचें गुलाबाचें फूल; एक दागिना. गुलाबचें फूल-न. १ गुलाब. २ गुलजार. ३ (ल.) नाजूक स्त्री, मूल. 'बाईसाहेब, हें ऊन फार कडक आहे बरें ...आपण आपलें हें गुलाबाचें फूल घरांत नेऊन जपून ठेवा.' -त्राटिका. गुलाबी- -स्त्री. १ (कोल्हाटी, डोंबारी) दोरावर काम करणारी मुलगी, हिला लाडकें नांव. २ एक लहान झुडुप. -वि गुलाबविषयक; गुलाबाचा (रंग, वास, अत्तर). ॰अत्तर-न. गुलाबाच्या फुलांपासून काढलेलें अत्तर. ॰चंदन-न. गुलाबासारख्या वासाचें चंदन; चंदनाची एक जात. ॰जांब-जाम-पु. एक फळ; राय- जांभूळ. [फा. गुलाब्-जामन्] ॰झोंप-स्त्री. पहांटेची, थंड वेळेची झोंप. ॰थंडी-स्त्री. सौम्य प्रकारची, सुखावह थंड हवा (ही गुलाबांना हितावह असते असें म्हणतात); पहांटेची थंडी.

दाते शब्दकोश

घाटौले      

न.       कळी : ‘तंव गगनीं नक्षत्रें उमटत । जैसी आकाशीं घाटौलीं फुलत । नातरि मेघ वीणि साधित । मोतियांची ॥’ – रुस्व ४८६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घरफोड      

स्त्री.       घरातील माणसांत कली माजवून देणे, कलागती उत्पन्न करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घुबा      

पु.       कळा; न फुललेली कळी. (को.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घुबा

पु. (कों.) कळा; न फुललेली कळी. –श्या. आ.

दाते शब्दकोश

घुगा      

पु.       पूर्णपणे उमललेली कळी; फूल.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घुगा

पु. १ पूर्णपणें उमललेली कळी. २ (को.) छपरावर घातलेल्या भातेणाच्या जुन्या पेंढ्या; घरावरील तृणाची कुसकी गुंडी.

दाते शब्दकोश

जाण      

स्त्री.       जानोसा; जानवस घर; वधू किंवा वरपक्षाचे गावात एखाद्या जागी उतरणे : ‘नवरदेवनी जाण उतरनी सूर्यातळी । अशी जमकनी बाशिंगनी कळी ॥’ – लोसाको.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जायशिळी      

स्त्री.        जास्वंद : ‘नाकाला जायशिळीची कळी आल्यागत दिसत हुतं’ - गोतावळा २२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जवा

पु. १ स्त्रियांच्या हातांतील एक सोन्याचें कांकण; यांत जवाच्या आकाराच्या कळ्या बसविलेल्या असतात. २ त्या कांकणांतील एक जवाची कळी, दाणा, अवयव. [सं. यव; म. जव] जव्याची माळ-स्त्री. सोन्याच्या जवाकार मण्यांची माळ.

दाते शब्दकोश

जवा      

पु.       १. स्त्रियांच्या हातांतील एक प्रकारचे सोन्याचे काकण; यात जवाच्या आकाराच्या कळ्या बसविलेल्या असतात. २. त्या काकणातील एक जवाची कळी, दाणा, अवयव. [सं. यव]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

काळाई

काळाई kāḷāī f (कालिका S) A name amongst the कां- सार- people and other vulgar for काळी or देवी. 2 (Amongst agriculturists. From काळा Black, i. e. Black earth.) A term for the ground or soil. Ex. यंदा का0 नें हातचें सोडलें. 3 unc See काळवंडी.

मोल्सवर्थ शब्दकोश

काळिलावा

वि. कळलाव्या; आगलाव्या; भाडंणतंटा उप- स्थित करणारा. 'एकु वेळु मीं कैलासां गेलां । तंवं भणती हा कळि- लावा आला ।' -शिशु १३१, [कळ + लावणें]

दाते शब्दकोश

केवडा      

पु.       १. केतकीचे झाड व त्याचा तुरा, कणीस. हिंदुस्थानात पाणथळ जागी केवडा येतो. पांढऱ्या जातीला केवडा व पिवळ्या जातीला केतकी म्हणतात. केतकीला फार सुवास येतो. त्याचे तेल व अत्तर काढतात. २. बायकांच्या वेणीतील लांबट चौकोनी सोन्याचे फूल. ३. अंगरख्याची काखेतील कळी. ४. वेणीचा एक प्रकार. (क्रि. घालणे, काढणे, उतरणे.) ५. जोंधळ्यावरील एक रोग. [सं. केतकी]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

केवडा

पु. १ केतकीचें झाड व त्याचा तुरा, कणीस; हिंदु- स्थानांत पाणथळ जागीं केवडा होतो. पांढर्‍या जातीस केवडा व पिंवळ्या जातीस केतकी म्हणतात. केतकीस फार सुवास येतो; त्याचें तेल व अत्तर काढतात. २ बायकांच्या वेणींतील लांबट चौकोनी सोन्याचें फूल. ३ अंगरख्याची काखेंतील कळी. ४ वेणीचा एक प्रकार. (क्रि॰ घालणें; काढणें; उतरणें). ५ जोंधळ्यावरील एक रोग. -शे ९.३२. [सं. केतकी; हिं केओंडा, केवडा; गु.केवडो.] केव- ड्याचा खाप-पु. स्त्रीपुरुषाच्या स्वरूप-चेहर्‍याला म्हणतात. -चें कणीस-न. केतकीचें फूल.

दाते शब्दकोश

किलकिला, किलकिले, किलकिलीत      

वि.        अर्धोन्मीलित (डोळे, दार, कळी इ.); अर्धे उघडलेले; किंचित उघडलेले. (क्रि. होणे, करणे.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

किलकिला-लीत

वि. अर्धोन्मीलित (डोळे; दार, कळी इ॰); अर्धे उघडलेलें; किंचित् उघडलेलें. (क्रि॰ होणें; करणें).

दाते शब्दकोश

किरी      

स्त्री.        लसणाची कळी. (झाडी) [सं. कलिका]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कळ      

स्त्री.       १. भांडण; कलागत तंटा; खोडी [क्रि. काढणे, लावणे.] : ‘ऐसें गोत्रचि दोहीं दळीं । उदित जालें असे कळीं ।’ - ज्ञा १·१८४. २. कुरापत; भांडणाचे कारण (क्रि. काढणे.) : ‘आम्हासि ग्रह नाहीं अनुकूळ । नसती उत्पन्न होते कळ ।’ - शनि १८२. [सं. कलि]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कला      

पु.        फुलाची कळी, कळा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कळा      

पु.       १. फुलाची मोठी कळी; कोरक; कळीचे मोठे स्वरूप : ‘तो कनकचंपकाचा कळा ।’ – ज्ञा ६·२५७. २. केळफूल : ‘पाहतां जैसा केळीचा कळा । स्वयें विकासे फलांदळां ।’ – एभा २·५७७. ३. चौफुला वगैरेत शोभेसाठी कळीच्या आकाराचे हातात धरण्यासाठी जे बोंड बसवतात ते. ४. बुगडीचा वरचा कळीसारखा भाग. [सं. कलिका]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कळामोगरा      

पु.       (सोनारी) मोगऱ्याच्या फुलाच्या कळीसारखा आकार दिलेला कोणत्याही दागिन्याचा भाग. पहा : कळी

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कळाफूल      

न.       १. औषधासाठी वाळवलेली फुलाची एक कळी. २. कोणतेही कळीच्या आकाराचे फूल.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कल्हईगार

काचेस एका बाजूनें लावावयाचें मिश्रण. “आरसे आहेत; ज्यांची कलई उडाली असेल व पालखीस लागू होत असे असतील ...ते हुजूर पाठविणें” (राजवाडे १२।१४२).

फारसी-मराठी शब्दकोश

कळ्हो

पु. कलह; दंगा; भांडण; तंटा; कळी; कळो पहा. 'जाणता पुरुष असेल जेथें । कळ्हो कैचा उठेल तेथें ।' -दा १९.४.१६. (क्रि॰ करणें; माजविणें.) [सं. कलह]

दाते शब्दकोश

कळ्‌हो      

पु.       कलह; दंगा; भांडण; तंटा. पहा : कळी : ‘जाणता पुरुष असले जेथें । कळ्‌हो कैचा उठेल तेथें ।’ – दास १९·४·१६. (क्रि. करणे, माजवणे.) [सं. कलह]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कलीचा पाहरा

कलीचा पाहरा kalīcā pāharā m (Watch or sentinelship of कलि The iron age.) An exclamation uttered upon any occurrence of monstrous wickedness or lawlessness.

मोल्सवर्थ शब्दकोश

कलिका-कली

स्त्री. कळी; न. उमलेळें फूल; मुकुल; कुड्मल [सं. कलिका]

दाते शब्दकोश

कळिकाळ

पु. १ (काव्य) कलियुग; कलियुगांतील काळ. २ (ल.) अनिष्ट, संकटमय वेळ; विपत्तीचा समय. 'त्यासी कळि- काळाचें नाहीं भय ।' -ह १८.८२. 'घालुनियां कास करितो कैवाड । कळिकाळासि आड लागों नेदी ।' [सं.कलि + काल]

दाते शब्दकोश

कलिकाल

कलिकाल kalikāla m (S) A time of the age कलि, i.e. a dark, troublous, calamitous time. See ex. under कळीकाळ.

मोल्सवर्थ शब्दकोश

कळिकटा-काटा

पु. भांडण; कलह. 'विधि निषेधां- चिया वाटा । दाविता हाचि दिवटा । बंधमोक्ष कळिकाटा । शिष्ट हाचि ।' -अमृ ६.५. -वि. भांडखोर; कलह लावणारा. [सं. कलि + कंटक]

दाते शब्दकोश

कलिमाहात्म्य

कलिमाहात्म्य kalimāhātmya n (S) The sway or influence of the evil age कलि.

मोल्सवर्थ शब्दकोश

कळिंद्री वि.      

दरिद्री; दळभद्र्या. पहा : कलंदर (गो.) [फा. कलंदर] कळी      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कलियुग

कलियुग kaliyuga n (S) The fourth age. See कलि.

मोल्सवर्थ शब्दकोश

कळलावी

स्त्री. १ एक फुलाची वेल, हिचीं पानें आल्याच्या पानाप्रमाणें असतात. फुलाच्या पाकळ्या लांब असून फूल जास- वंदीच्या फुलाएवढें असतें. ही वेल कुंपणावर येते. हिला खड्या- नाग, (कों.) कलई, कळवी अशीं नांवें आहेत. -वगु २.२२. २ एक वनस्पति-कंद. [सं. कलिहारि]

दाते शब्दकोश

कळलावी      

स्त्री.       १. एक औषधी फूलवेल. हिला खड्यानाग. (को.) कलई, कळवी अशी नावे आहेत : ‘(कळलावीच्या) कांद्यात गर्भाशयास वेणा आणणारे द्रव्य असते.’ – वनश्री ४७२. २. एक वनस्पती कंद. [सं. कलिहारि]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कलय

स्त्री. (गो.) कलई पहा.

दाते शब्दकोश

कल्याण

न. कलीचें राज्य; कलियुग. 'कालांतरानें सत्ययुग संपून जिकडेतिकडे कल्याण झालें.' -भूभ्र ३१७. [सं. कलि + आयान]

दाते शब्दकोश

कळ्यौचें

क्रि. (गो.) फुलणें; कळी येणें. [कळ्यो = कळ्या]

दाते शब्दकोश

कलयुग

न. कलियुग चौथें युग; शेवटचें युग, ज्यांत कली कलह, भांडण इ॰चा अम्मल जास्त तें. [सं. कलियुग]

दाते शब्दकोश

कोल      

पु.       १. दंड; काठी. २. तिळाची कळी : ‘झाडिलीचि कोळे झाडी ।’ - राज्ञा १३·५८६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कोळ(ळि)गा

पु. भ्रमर. 'उदैजेति परबिंबीं कळि कोळिगा राहिला कोंभिं ।' -ॠ ९०. [सं. कुलिंग ?]

दाते शब्दकोश

कोळगा, कोळिगा      

पु.       भ्रमर : ‘उदैजेति परबिंबीं कळि कोळिगा राहिला कोंभीं ।’ - ऋ ९०. [सं. कुळिंग]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कोंभ

पु. डांग; वन; अरण्य. एकांतजागा; सांधीकुंदी. 'उदैजेति परबिंबीं । कळि कोळिगा राहिला कोंभीं ।' -ऋ ९०.

दाते शब्दकोश

कोंभ      

पु.       डांग; वन; अरण्य; एकांत जागा; सांधी कुंदी : ‘उदैजेति परबिंबीं । कळि कोळिगा राहिला कोंभीं ।’ - ऋ ९०.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कोश      

पु.       १. खजिना; साठा; संग्रह; तिजोरी; खाण; वखार. २. जीवाचे अन्न-प्राण-मन-विज्ञान-आनंदमय असे जे कोश आहेत त्यांपैकी प्रत्येक; आत्म्याचे आवरण. ३. (ग्रंथ.) ज्यात वर्णानुक्रमे शब्दांची रचना करून त्यांची माहिती दिली आहे असा ग्रंथ. ४. आवरण; पटल; पापुद्रा; अस्तर. ५. म्यान (तरवारीचे). ६. कोळीकीटक अंड स्थितीतून कीट स्थितीत येऊन शरीराभोवती रेशमासारखे मऊ आवरण करतो तो; कोशेटा. ७. कळी : ‘अंतरीं फांकें । हृदयकोशु ॥’ - ज्ञा ६·२०९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कोश

पु. १ खजिना; सांठा; संग्रह; तिजोरी; खाण; वखार. २ देहामधील अन्न-प्राण-मन-विज्ञान-आनंदमय असे जे कोश आहेत त्यांपैकीं प्रत्येक; आत्म्याचें आवरण. ३ शब्द, विषय, संज्ञा इ॰ चें संग्रहयुक्त विवेचन करणारा ग्रंथ; निघंटु; (इं.) डिक्शनरी, शब्दसंग्रह. उदा॰ शब्दकोश, ज्ञानकोश, चरित्रकोश, इ॰. ४ आवरण; पटल; पापुद्रा; अस्तर. ५ म्यान (तरवारीचें). ६ कोळी-कीटक अंड स्थितींतून कीटस्थितींत येऊन शरीराभोंवती रेशमासारखें मऊ आवरण करतो तो; कोशेटा. ७ कळी. 'अंतरी फांके । हृदयकोशु ।' -ज्ञा ६.२०९. ८ दिव्य करून लावलेला निकाल; न्यायदानांतील दिव्य (अग्नि, पाणी, विष, वजनाचा कांटा, उकळणारें तेल, कुलदेवतेवर पाणी घालणें-ब्राह्मणांच्या चरणांवर पाणी घालणें. किंवा त्यांचें तीर्थ घेणें इ॰.) शपथ; प्रतिज्ञा. 'पीयालीं कृतनिश्चयाचा कोश ।' -ज्ञा १३.६०४. ॰कार-पु. १ रेशमाचा किडा; कोळ्याच्या वर्गांतील प्राणी. २ कोशस्थि- तींत असलेला, कोशवासी किडा, फूलपाखरूं. ३ शब्दार्थकोश रचणारा; कोश तयार करणारा संपादक. ॰कीट-कीटक-पु. कोशकार (अर्थ १।२) पहा. कोशकिडा हा आपल्या भोंवतीं कोशेटा करून आपणांसच कोंडून घेतो. 'एर्‍हवीं कोशेकीटका- चिया परी । तो आपणपया आपण वैरी ।' -ज्ञा ६.७२. -वि. १२.१६१. ॰गृह-न. भांडार. 'कीं कोशगृहीं प्रवेशोनी ।' -रावि १.७१. ॰पान-न. देवाचें तीर्थ पिणें. दिव्याचा एक प्रकार. शपथ घेणें; दिव्य करणें. ॰पिणें-शपथ घेणें. 'शरीर वाचा मानस । पियालीं कृतनिश्चयाचा कोश ।' -ज्ञा १३.६०४. ॰वृद्धि-स्त्री. संपत्तीची वाढ; भरभराट; समृद्धि. 'होम हवनें होय कोशवृद्धि ।।' ॰शुध्दि-स्त्री. दिव्यानें निरपराधित्व सिद्ध करण्याची क्रिया.

दाते शब्दकोश

करी      

स्त्री.       १. कळी. २. लसणाचा तुकडा. (झाडी) [सं. कालि]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कर्णिका      

स्त्री.       १. कमळ वगैरे पुष्पांचा कोश : ‘येरी म्हणती योगद्रुमा । श्रेष्ठ कर्णिका राजउगमा ।’ − नव २२·७१. २. कमळाची कळी : ‘यंत्र उभवणि उपासकां । त्याची आंगोळियां मुद्रिका । त्रिकोण षट्‍कोन कर्णिका । जडित माणिका आगमोक्त ।’ − एरुस्व १·५१. ३. कमळाची पाकळी : ‘माझें हृदय दिव्य कमळ । जें तेजोमय परम निर्मळ । अष्ट कर्णिका अति कोमळ । मध्यें घननीळ विराजे ।’ − हरि ३५·१. ४. तानवडे. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कर्णिका

स्त्री. १ कमळ वगैरे पुष्पांचा कोश. 'येरी म्हणती योगद्रुमा । श्रेष्ठ कर्णिका राजउगमा ।' -नव २२.७१. २ हाताचें मधलें बोट. ३ कमळाची कळी. 'यंत्र उभवणि उपासकां । त्याची आंगोळियां मुद्रिका । त्रिकोण षट्कोण कर्णिका । जडित माणिका आगमोक्त ।' -एरुस्व १.५१. ४ कर्णभूषण (तानवडें, ताटंक इ॰). -देहु ४६. (नाको.) ५ कमळाची पाकळी. 'माझें हृदय दिव्य कमळ । जें तेजोमय परम निर्मळ । अष्ट कर्णिका अति कोमळ । मध्यें घननीळ विराजे ।' -ह ३५.१. [सं.]

दाते शब्दकोश

कृत      

न.       कृत, त्रेता, द्वापार व कली या युगांपैकी पहिले; सत्ययुग. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुड्मळ-मुळ

पु. कळा; उमलणारी कळी; कमळ. 'ऐक्य भावाची अंजुळी । सर्वेंद्रिय कुड्मुळीं ।' -ज्ञा १५.२ [सं. कुड्मल]

दाते शब्दकोश

खडा

पु. १ लहान दगड; गोटी; गोटा; धोंड्याचा बारीक तुकडा; दगडाचा लहान खंड. २ कळी (चुन्याची); तुकडा (गोंद, हिंग, कात, खडीसाखर इ॰ चा); अलंकारांतील, अंगठींतील मणी, रत्न. 'एकेक खडा निवडक हातीं लागला.' -विवि १०.५- ७.१२७. ३ मळाचा लहान पण कठिण गोळा; (सामा.) गड्डा; गोळा; पिंड. ४ गुळाची लहान ढेप. [सं. खंड; सिं. खडो] (वाप्र.) ॰उडणें-(गुडगुडी ओढतांना तींतील खडा वर उडतो त्या- वरून) सर्वस्वी संपणें; खर्च होणें (द्रव्य, वस्तु). ॰टाकून ठाव घेणें-(पाण्याची खोली ठोकळमानानें खडा टाकून पाहतात यावरून) एखाद्या कामाचा कल जाणावयाचा असतां सहजपणें एखादा शब्द टाकून कामाची माहिती काढणें; आपलें काम होईल कीं नाहीं याचा अजमास पाहणें. खडानखडा माहिती असणें.-एखाद्या कामांतील बारीक सारीक सर्व गोष्टी माहीत असणें. ॰फुटणें-खडक फुटून पाण्याचा ओघ सपाटून बाहेर येणें. 'नदीचा खडा अजून फुटला नाहीं.' खडेखाणें-खस्ता खाणें; कष्ट करणें; त्रास सहन करणें (दगदगीच्या कामांत). ॰खावविणें-चारणें- त्रास देणे;सतावणें; बेजार करणें. ॰घासणें-फोडणें(नांवानें)- १ एखाद्याची निंदा करणें; तक्रार करणें. २ (नांवाशिवाय) खूप कष्ट करणें; दगदग करणें. ॰मोजणें-खडे मांडून हिशोब करणें (कागदावर लिहितां येत नसल्यामुळें). खड्या खड्यानीं डोकें फुटणें-अनेक बारीकसारीक गोष्टींमुळे दिवाळखोर बनणें, भिकेस लागणें (एकाच गोष्टीमुळें नव्हे). खड्यांनीं डोकें फोडणें-दगडानीं मारून गाईला ठार केलें असतां प्रायश्चित्तादाखल त्या व्यक्तीचा दगडांनीं डोकें फोडून वध करणें. खड्यासारखा निवडणें-१ एखाद्याला कुचकामाचा म्हणून बाजूला सारणें, करणे; निरुपयोगी ठरविणें. २ चट्कन् वेगळा काढणें, ओळखणें. 'राहतां राहतां सुशिक्षितांचा वर्ग राहिला व त्यांस मोर्ले यांनीं शत्रू म्हणून खड्यासारखें निवडून काढलें आहें.' -टिव्या ५. खड्या- सारखा बाहेर पडणें-निरुपयोगी म्हणून बाजूला सरणें.

दाते शब्दकोश

खडा      

पु.       १. लहान दगड; गोटी; गोटा; धोंड्याचा बारीक तुकडा; दगडाचा लहान खंड. २. कळी (चुन्याची); तुकडा (गोंद, हिंग, कात, खडीसाखर इत्यादीचा); अलंकारातील, अंगठीतील मणी, रत्न : ‘एकेक खडा निवडक हातीं लागला.’ - विवि १०·५७·१२७. ३. मळाचा लहान पण कठीण गोळा; (सामा.) गड्डा; गोळा; पिंड. ४. गुळाची लहान ढेप. [सं. खंड] (वा.) खडा उडणे - १. (गुडगुडी ओढताना तिच्यातील खडा वर उडतो त्यावरून) सर्वस्वी संपणे; खर्च होणे (द्रव्य, वस्तू). २. आजाराने बेजार होणे; काम करून थकून जाणे. खडा टाकून ठाव घेणे, खडा टाकून पाहणे - (पाण्याची खोली ठोकळमानाने खडा टाकून पाहतात यावरून) अंदाज घेणे; सहजपणे एखादा शब्द टाकून कामाची माहिती काढणे; आपले काम होईल की नाही याचा अजमास पाहणे. खडा न खडा माहिती असणे - एखाद्या कामातील बारीकसारीक सर्व गोष्टी माहीत असणे. खडा होणे - खड्यासारखे घट्ट परसाकडे होणे. खडा पहारा देणे - सतर्कपणे, सावधपणे लक्ष देणे, (विशेषतः सुरक्षिततेसाठी.) खडा फुटणे - खडक फुटून पाण्याचा ओघ सपाटून बाहेर येणे. खडे खाणे - खस्ता खाणे; कष्ट करणे; त्रास सहन करणे (दगदगीच्या कामात.) खडे खावविणे, चारणे - पराभव करणे; त्रास देणे; सतावणे; बेजार करणे. खडे घासणे, फोडणे - १. एखाद्याची निंदा करणे; तक्रार करणे. २. (नावाशिवाय) खूप कष्ट करणे; दगदग करणे. खडे मोजणे - खडे मांडून हिशोब करणे (कागदावर लिहिता येत नसल्यामुळे). खड्याखड्यांनी डोके फुटणे - अनेक बारीकसारीक गोष्टींमुळे दिवाळखोर बनणे, भिकेला लागणे (एकाच गोष्टीमुळे नव्हे.) खड्यासारखा निवडणे, बाजूला करणे, टाकणे, सारणे - १. एखाद्याला कुचकामाचा म्हणून बाजूला सारणे, करणे; निरुपयोगी ठरविणे. २. चटकन वेगळा काढणे, ओळखणे : ‘राहतां राहतां सुशिक्षितांचा वर्ग राहिला व त्यांस मोर्ले यांनीं शत्रू म्हणून खड्यासारखें निवडून काढलें आहे.’ - टिव्या ५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खतेला-ली-लें

वि. १ भरलेला; खतलेला; लिप्त; व्याप्त; सांचलेला. 'कीं आंधारें खतेलें अंबर ।' -ज्ञा १६.२७. 'कलि- युगीं घोर पाप हें खेतलें । स्वधर्म सांडिलें चहूं वर्णीं ।' -ब २८९. २ मळलेलें; घाणेरडें. 'पहा दर्पण खतेलें ।' -दावि ४४९. [खत]

दाते शब्दकोश

खुडमुळ

न. फुलाची कळी. [सं. कुड्मल]

दाते शब्दकोश

खुडमुळ      

न.       फुलाची कळी. [सं. कुडमल]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खुतखुत

स्त्री. १ खदखद (उकळण्याचा आवाज). २ हुरहुर; रुखरुख; मनाची टोंचणी. ३ (राजा.) उवांचा बुजबु- जाट. ४ (राजा.) गर्दी; दाटी; भीड; पुंजका. (क्रि॰ पडणें). [ध्व.] खुतखुतणें-अक्रि. (चुन्याची कळी भिजतांना किंवा पाणी कढतांना) खुत, खुत, शब्द होणें; खदखदणें.

दाते शब्दकोश

खुतखुतणे      

अक्रि.       (चुन्याची कळी भिजताना किंवा पाणी कढताना) खुत्‌ खुत् असा आवाज होणे; खदखदणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

मढ

पु. कळी; अंकुर. 'तो तृतीय-नयनाचा मढु । फुटला जैसा ।' -ज्ञा ११.३०४

दाते शब्दकोश

मुग्धा

कोणाकडे डोळा उचलून बघायची नाहीं, अव्याजमनोहर मुग्ध सुंदरी, आश्रम-हरिणी, कोमल- किशोरी, पानाआडची कळी, लाजाळूचे झाड.

शब्दकौमुदी

मुका

वि. १ बोलता येत नसलेला; न. बोलणारा; वाचा नसलेला. २ रागानें किंवा हिरवटपणानें बोलत नाहीं असा; स्तब्ध. ३ शांत बसलेला. ४ तोंड नसलेलें (गळूं, फोड) डोकें किंवा तोंड नसलेला (नारू). ५ न वाजणारा; अगदीं कोंवळा; आंत गर नसून पाणी भरलेला (नारळ). ६ चाड; न भिजलें जाणारें; मोड न येणारें (कडधान्य). ७ न उमललेली; न फुललेली (कळी). ८ आवाज न करता चालणारें (रहाटगाडगें, चरक, यंत्र इ॰) [सं. मूक; का मुत्तु, मुद्दु] म्ह॰ मुक्याचे मनी मंगळवार (मंगळवारी कोणताहि बेत करूं नयें अशी समजूत आहे त्यावरून). (वाप्र.) ॰मुलगा होणें-प्रथम न्हाण येणें. ॰रहाणें-(बागलाणी) गप्प बसणें. मुकावणें-मुकें होणें; स्तब्ध बसणें. 'मुकावल्या वेदश्रुती ।' -परमा १.१८. सामाशब्द- ॰गोवर-पु. ज्यांत अंगावर पुटकुळ्या पुरळ योत नाहीं असा गोंवर. ॰दंद-पु. मुका दाबा पहा. ॰दावा-पु. गुप्त द्वेष; डूक. ॰नारळ-पु. कोंवळा असल्यामुळें न वाजणारा नारळ. ॰मार- मारा-पु. १ वैरामुळें किंवा दुष्टपणानें जादूटोण्याच्या योगानें किंवा शापांनीं केलेला गुप्त नाश हानि. २ पुराव्याला कांहीं खुणा वगैरे राहाणारा नाहीत असा दिलेला अंगावर मार. ॰मैद- म्हसोबा, मुकी मण्यार-पुस्त्री. (निदार्थी) हिरवट, तिरसट मनुष्य. मुकी अर्जी-स्त्री. एखाद्याची नालस्ती करण्यासाठीं बिन- सहीचा किंवा खोट्या सहिनें केलेला अर्ज. मुकी कमान-स्त्री. चपटी कमान. मुकी वस्तु, मुकें जनावर-स्त्रीन. गाय म्हैस इ॰ जनावरें. 'मुकी वस्तु निघातें मारी ।' -दा २.१.६६. मुके गळूं-न. तोंड न पडलेलें गळूं. ॰गाळ-न. एक मुलींचा खेळ. ॰दंद-मुका दावा पहा. ॰फळ-फूल-पान-न. कोंवळें किंवा पक्क न झालेलें फळ; न उमलेलें, कळीच्या स्थितींत असलेले फूल, पान. ॰फुल-न. एक मुलींचा खेळ. ॰भिजाणे-पुअव. भजलेले परंतु मोड न फुटलेले दाणे (हरभरा, पावटा इ॰चे) मुकाणा-पु. मुकणा पहा.

दाते शब्दकोश

मुकुल

पुन. १ मोठा कळा; कळी (उमलणारी). २ कमळ. ३ घोड्याच्या कपाळावर जाईच्या कळीप्रमाणें असलेला भोंवरा. -अश्वप १.८५. [सं.] ॰दृष्टि-स्त्री. (नृत्य) पापण्या स्फुरण पावण्यास लावणें. अशा दृष्टीचा अभिनय, झोंप. स्वप्न व सुख दर्शित करतो. मुकुलित-वि. १ पूर्ण न उमललेलें (फूल); अर्धवट मिटलेले (डोळे). २ (ल.) संक्षिप्त; थोडक्यांत. मुकुळणें-अक्रि. बंद ठेवणें; करणें; आवरून घेणें. 'परि तो रसातिशयो मुकुळी । मग ग्रंथार्थदीपु उजळी ।' -ज्ञा ५.१४२. [सं. मुकुलित]

दाते शब्दकोश

नाजू(जु)क

वि. १ कोमल; सुकुमार; नरम; हलकेपणानें, काळजीनें वापरण्याच्या उपयोगाचा; कष्ट सहन न करणारा. 'नाजुक साजुक कळी प्रफुल्लित पातळ पुतळी ठेंगणी ।' -अफला ७८. २ अशक्त; दुर्बळ; बारिक; हलका (मनुष्य, वस्तु). ३ पातळ (पोळी इ॰). ४ दिखाऊ; सुरेख; सुंदर (वस्तु). ५ कुशलतेचें (काम). ६ गुप्त (गोष्ट इ॰); जनानी; बायकासंबंधीं (काम). ७ चोखंदळ; दिमाखाचा. [फा. नाझुक्; सिं. नाजुकु] ॰काम- न. १ नाजूकपणाचें काम; युक्तीचें व कौशल्याचें काम. २ गुप्त वेश्यागमन; परदारागमन; रंडीबाजी. ३ लांच घेणें. ॰खर्च-पु. १ गुप्त व्यसनांस लागणारा खर्च; रंडीबाजीला लागणारा पैसा. २ लांचलुचपतीचा खर्च. ॰जागा-स्त्री. मृदुभाग; (विशेषतः) गुह्यें- द्रियाची कोमल जागा; गुह्येंद्रिय. ॰जेवण-न. १ खाण्यांत चोखं- दळपणा. २ थोडेंसेंच जेवण; फार भूक नसणें. जेवण कमी असणें. ॰मसलत-स्त्री. खाजगी खलबत, विचारविनिमय; गुप्तपणाची, मुत्सेद्देगिरीची, युक्तीची अशी योजना.

दाते शब्दकोश

नाजूक

[फा. नाझुक्] कोमल; सुकुमार; भेद्य; कमकुवत; काळजी पूर्वक करायला हवी, नाहीं तर द्रव्याला अब्रूला अगर जिवाला अपाय होईल अशी (गोष्ट); महत्त्वाची. “तूं तर केवळ देवाघरची मुखरणिमध्यें श्रेष्ठपणीं! नाजुक साजुक कळी प्रफुल्लित पातळ पुतळी ठेङ्गणी” (अनन्तफन्दी ७८).

फारसी-मराठी शब्दकोश

नंदी

पु. १ शंकराचें वाहन जो बैल तो; हा कामधेनूचा पुत्र असून शिवगणांपैकीं एक आहे; शंकराच्या देवळासमोर, मूर्तींसमोर बसवितात ती दगडाची बैलाची प्रतिमा. २ (ल.) मूर्ख, ठोंब्या, टोणपा मनुष्य; सांभापुढचा. [सं.] ॰पुत्र-पु. (ल.) टोणपा; ठोंब्या; दगडोबा. [नंदी + पुत्र = मुलगा] ॰बाळ-पु. १ नंदीबैलाला मिरविणारा व त्याचे खेळ करणारा मनुष्य. २ (ल.) ठोंब्या, दगडोबा, निरक्षर मनुष्य. [नंदी + बाळ] ॰बैल-पु. १ संकेतानें होय नाहीं इ॰ अर्थानें मान हलविण्यास शिकविलेला व जो वस्त्रलंकार इ॰ घालून (मालकाच्या) उपजीविकेकरितां घरोघर फिरवितात असा बैल. 'नंदीबैला गुबु गुबु गुबु! 'आला बग नंदीबैल आइ जाउं दें । सोड आतां लवकरि मज मौज पाहुं दे.' २ नंदीबैल फिरवून उपजीविका करणारी जात. 'नंदिबैल, बहुरूपी, भोरपे... मानभाव इत्यादि भिकारी लोक पांचशेवर आहेत.' -खेया ७२. ३ (ल.) मूर्ख, बेअ- कली, ठोंब्या मनुष्य. 'तुम्ही व ते मराठे असून त्यांची क्लृ/?/प्ति तुम्हास कशी कळली नाहीं यावरून तुम्ही शुद्ध नंदीबैल आहां.' -बाजीराव. 'मी एक शब्द सुद्धां त्या नंदीबैलाजवळ बोलणार नाहीं.' -भयंकरदिव्य.

दाते शब्दकोश

नसता

नसता nasatā p pr of नसणें Not existent, extant, or present: also not real, actual, subsisting, standing. Ex. सदा करितो ढवाळी ॥ नसतीच घेऊन येतो कळी ॥; also ईश्वर होतां पाठमोरा ॥ नसतींच विघ्नें येतीं घरा ॥. 2 Uncalled for; undemanded or unwarranted by any occasion; as न0 कारभार Meddling; idle fingering or pawing; fiddle faddle; न0 खर्च Uncalled for expense; न0 उपद्रव Trouble undeserved, or unincurred by one's own act. 2 Unprofitable; as न0 उद्योग-धंदा-व्यवहार-व्यापार. 3 Used jocosely in the vocative (अरे नसत्या ho! Mr. Nobody, ho! अरे नसत्या गुडगुडी भरून आण राव बसले आहेत) when a poor and mean man is boasting to his visitors of his wealth and numerous attendants. 4 p a Penniless, i. e. to whom there is not. Pr. असत्याचे विकार नसत्याचे घोरंकार.

मोल्सवर्थ शब्दकोश

वि. १ अस्तित्वांत नसलेला; अविद्यमान. 'हठें बाई कैसी धरुनि बससी गोष्टि नसती ।' -सारुह ६.१२२. २ खरी, प्रत्यक्ष नसलेली; खोटी; निराधार. 'हा कर्मभोग ओढवला सायासी । नसतेंच विघ्न हें ।' -शनि ६८. 'ईश्वर होतां पाठमोरा । नसतींच विघ्नें येतीं घरा ।' ३ अनावश्यक; फाजील; अवास्तव. 'तूं फार करितोसि टवाळी । नसतीच चढविली कळी ।' -शनि ७०. जसें:- नसता कारभार = उगाच लुडबुड करणें; नसता खर्च = अवास्तव, उगाच आलेला खर्च; नसता उपद्रव = कारण नसतां, स्वतःचा दोष नसतां झालेला त्रास. ४ नुकसानीचा; तोट्याचा. जसें:-नसता उद्योग-धंदा- व्यवहार-व्यापर. ५ गरीब; अकिंचन; दरिद्री. ६ (गरीबाच्या येथें गडीमाणसें नसतात. त्यास जर श्रीमंतांना पानसुपारी, मेजवानी इ॰ देण्याचा प्रसंग आला तर तो थट्टेंनें, उपरोधानें आपल्या अविद्य- मान, लटक्याच गड्याला नसत्या म्हणून हांक मारून करण्यास सांगतो अशा अर्थीं) नसणारा; लटुपुटीचा (माणूस, गडी). 'अरे नसत्या ! गुडगुडी भरून आण, राव बसले आहेत.' -क्रिवि. वांचून; विना. -शर. म्ह॰ असल्याचे विकार नसल्याचे घोरंकार = श्रींमंताना चैन कराविशी वाटते तर गरीबास काबाडकष्ट करावे लागतात.

दाते शब्दकोश

नसता      

वि.       १. अस्तित्वात नसलेला; अविद्यमान. २. खरी, प्रत्यक्ष नसलेली; खोटी; निराधार : ‘हठें बाई कैसी धरुनि बससी गोष्टि नसती ।’ – सारुह ६·१२२. ३. अनावश्यक; फाजील; अवास्तव : ‘तूं फार करितोसि टवाळी । नसतीच चढविली कळी ।’ – शनि ७०. ४. नुकसानीचा; तोट्याचा. ५. गरीब; अकिंचन; दरिद्री. ६. (गरिबाकडे गडी, नोकर नसतात. त्याला श्रीमंतांना पानसुपारी, मेजवानी इ. देण्याचा प्रसंग आला तर तो थट्टेने, उपरोधाने आपल्या खोट्याच गड्याला ‘नसत्या’ म्हणून हाक मारतो. अशा अर्थी) नसणारा; लुटुपुटीचा (माणूस, गडी).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ओशाळ, ओशाळगत, ओशाळी, ओशाळीक

स्त्रीपु. ओशाळेपणा; लज्जा; खजिलपणा; शरमिंधेपणा; मोकळे- पणा न वाटणें अशी अवस्था. 'नसतां ओशाळ महीपाठीं । कलि- काळातें मारुं काठी ।' -नव २१.३३. 'सुंदर परंतु निर्दोष वस्तूकडे पतित मनाला ओशाळेपणामुळें उघड्या डोळ्यांनीं पाहण्याचा धीर होत नाहीं.' -एकचप्याला पृ. ७५. [ओस = छाया]

दाते शब्दकोश

परिस्फुट

स्त्री. १ उघडकीस आणणें; उघड करणें; गुप्त गोष्टीची प्रसिद्धि. २ डांगोरा; बोभाटा; गवगवा. -वि. स्पष्ट, साफ; रोखठोक; स्वच्छ; उघड (भाषण इ॰). [सं.] परि- स्फोट-पु. १ उमलणें (कळी इ॰); बाहेर पडण्याचा, फुटण्याचा व्यापार. २ (ल.) परिस्फुट पहा. ३ सूक्ष्म स्पष्टीकरण; विवरण; फोड. [सं.]

दाते शब्दकोश

पर्यय

पु. (कालचक्र) चौकडी (कृत. त्रेता, द्वापार व कलि या चार युगांची); एका मन्वंतरांत असे ७१ पर्यय असतात. सरासरी साडेतीन कोटी वर्षांचें एक मन्वंतर मानितात. [सं. परि + अय्]

दाते शब्दकोश

पूत

वि. पवित्र; शुद्ध; निर्मळ; स्वच्छ. 'मोही तन्मन जैसें साधूचें पूतहि मन गाढ कली ।' -मोभीष्म ५.४४. [सं.]

दाते शब्दकोश

फाळका

पु. १ मोठा तुकडा (लांकूड, फळ इ॰ चा). २ केळीच्या पानाचा (डांगेचा) एका अंगाचा तुकडा (जेवण्याकडे उपयोगी). ३ (विणकाम) सूत उकलण्याचें बांबूचें केलेलें रहाटवजा साधन. यावर सुताची कळी घालून उकलतात. ४ (कु.) नौकेचा खालचा भाग. [फाळ] फाळकी-स्त्री. १ लहान फाळका. २ जमिनीचा अरुंद भाग; पट्टी. [फाळका अल्पत्व]

दाते शब्दकोश

फकी-क्की

स्त्री. १ (प्र. फक्की) फक्का याचें अल्पतादर्शक रूप. लहान घास; फका. २ चूर्ण; पूड. ३ चुन्याची कळी उम- लल्यावर त्याची होण्यारी भुकटी. [ध्व. फक]

दाते शब्दकोश

फुलणें

अक्रि. १ (कळी) उमलणें; विकासणें. २ फुलांचा बहर येणें; मोहोर येणें. 'कां वांझ फुलीं फुललें । झाड जैसें ।' -ज्ञा ९.४३४. ३ (भात, जोंधळा इ॰ ची) लाही होणें. ४ (काळी जमीन, चुना, धान्य इ॰ भिजल्यानें) फुगणें. ५ शरीरा- वयव फुगीर होणें; सुजणें. ६ (सूर्य उगवतांना दिशा) उजळणें; फांकणें. ७ अभिमानानें किंवा गर्वानें फुगणें; ताठा भरणें; हर्षानें; स्तुतीनें चढून जाणें. ८ खुष दिसणें; मुद्रा प्रफुल्लित दिसणें. ९ हातोड्यानें ठोकल्यानें खिळ्याचें डोकें फुलासारखें पसरत होणें; खिळा पक्का होणें. १० (घोडा, गाय इ॰कांच्या) अंगावर पांढरे ठिपके उठणें; अंग पांढर्‍या ठिपक्यांनीं भरणें, व्यापून जाणें. ११ (माणसांच्या इ॰) दाटीनें जागा भरून जाणें. 'नाटकगृह काल फुललें होतें.' १२ (देवी, फोड, कोड इ॰ नीं) सर्व अंग व्यापणें. १३ कपडावर फूल येणें; तंतूच्या बारीक बारीक गुठळ्या बनणें. १४ वार्धक्यामुळें केस पांढरें होणें, होत जाणें. १५ विंचरल्यानें केंस मोकळे होणें; जटा नाहींशा होणें, होत जाणें. १६ मांजराच्या शेंपटी- प्रमाणें केंस वर उभे राहणें; पिंजारला. उभारला असणें (पिसारा इ॰). फुलफुलणें पहा. [सं. प्रा. फुल्ल; किंवा सं. स्फुट्; प्रा. फुल]

दाते शब्दकोश

रुसवा

लटका राग, गाल फुगवले, मर्जी खप्पा झाली, कळी खुलेना, ' आम्ही नाहीं जा॔ झाले, अदया कठोरा अशीं संबोधने मिळालीं, तळपायाची आग गालांपर्यंत गेली, फुरंगटली, फणका-याने म्हणाली, एकेक डोळा एवढाला केला, अकारण घुस्सा केला, समजूत काढतां नाकीं-नऊ आले, नाजूक फसवा रुसवा, रुसवाफुगवा, कृतक काप, खोट्टं खोट्टं रागावणें, रुसूं बाई रुसूं कोपऱ्यात बसू ; तिकडून आला नवरा फुस्कन हंसू त्यांतला प्रकार ! पारदर्शक राग, रागाचा केवळ आवि्भाव, प्रेमकलह, रागाचा कढतपणा कायम होता.

शब्दकौमुदी

सादनी

स्त्री. (सोनारी) पाठतगड व वरतगड हीं एक- मेकांस जोडून त्यांची पेटी तयार करण्यासाठीं जी धातूच्या पत्र्याची अरुंद अशी कळी उभाकतात ती. साधनी पहा.

दाते शब्दकोश

सारि-री

पु. द्यूतकार; सोंगट्या फांसे खेळणारा. -स्त्री. १ सोंगटी. -एभा २९.७७५. २ सोंगट्यांचा खेळ; सारीपाट. 'सारी खेळतां अस्करूं । निकरेंही भांडो ।' -ज्ञा ११.५४८. ॰पाट—सारंगपाट पहा; सोंगट्यांचा खेळ. -एभा २.२९. 'शिवा सांगातें ते अवसरी । सारीपाट खेळतसे गौरी ।' कथा १.६.४०. ॰फळी-स्त्री. सोंगट्यांचा खेळ. 'पुष्करासि म्हणे कली । तूं नळासी खेळ सारीफळी ।' -कथा १.९.१०.

दाते शब्दकोश

शेरिया

शेरिया śēriyā m A quantity of spun silk composed of two थोक or eight कळी or twenty-four फाळा.

मोल्सवर्थ शब्दकोश

शगूफ

पु. फूल; कळी. [फा.]

दाते शब्दकोश

सल

नपु. १. शल्य; शस्त्रादिकाचें टोंक; कांटा; मांसांत रुतलेला अणकुचीदार पदार्थ; कूस. 'सल सिलका आणि सराटें ।' -दा ३.७.४. २ पोटांत न वाढतां राहिलेला गर्भ; गर्भाशयांत राहिलेला मृत गर्भ. 'सल आडवें गर्भपात ।' -दा ३.६.४७. ३ (ल.) मनांत खुपत असलेलें अपमान वगैरेचें दु:ख; दु:खकारक स्मृति; त्रासदायक गोष्ट; पीडाकारक निमित्त. 'सलें गेलीं चित्तीं भय दशमुखाच्याहि धसलें ।' -मोरामायणें १.४१०. ४ वठलेलें झाड, शाखा. 'विसर विजती सलें । सलतीं तियें ।' -ज्ञा १६.१४६. ५ बीं पेरलें असतां उगवलेला कोंवळा अंकुर हा विषारी असतो व जनावरानें खाल्ला असतां त्यास रोग होतो. किरळ पहा. 'सल खाऊन गुरें मेली.' ६ साल; त्वचा. 'कलि- युगांत कोरडीं । चहुंयुगांचीं सलें सांडी ।' ज्ञा १५.१२९. ७ -स्त्री. (कों.) उसण; सलक. [सं. शल्य; प्रा. साल] सल चढणें-विषाद वाटणें. सलीं लागणें-पोटांत सल वाढल्या- मुळें झिजून आजारी पडणें. सलणें-अक्रि. १ बोचणें; टोंचणें; खुपणें. 'आंगीं देहाची लुती जिती । जेणें आली तें चित्तीं । सलेना जया ।' -ज्ञा १३.७३१. २ (ल.) न खपणें; सहन न होणें; डोळ्यांत खुपणें; मनाला टोंचून, लागून राहणें; रुखरुख लागणें (केलेल्या चुकीची, दोषाची). 'आचरणें खोटीं । अपराधाची केलीं सलताही पोटीं ।' -तुगा १८८५.

दाते शब्दकोश

सळी

स्त्री. कळी; कुचाळी; कुभांड. 'जें सळी लाविली वायेंची । आपणेंआ आपणु ।' -शिशु २००. [सं. छल = कपट]

दाते शब्दकोश

सरजा

(फा) पु० नथ दागिन्याची मोत्याची कळी. २ बंदुकीचा आकडा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

तळवा

पु. हाताचा, पायाचा तळ; तळहात; तळपाय. 'जरी स्वर्गीं नाहीं कळी । तरी शेंडीतें खांडोळी । जरी न देखे पाताळीं, तरी तळवा घासे ।' -कथा १.६. 'धरिती अरुणता तळवे ।' -मोकृष्ण १६.३५. [तळ] (वाप्र.) ॰तळव्याची आग मस्तकास जाणें-नखशिखांत संतप्त होणें; अतिशय संतापणें; तळची. तळपायाची आग मस्तकास जाणें पहा. म्ह॰ तळव्यास लोणी आणि नेत्रास थंडी.

दाते शब्दकोश

त्रेता, त्रेतायुग

स्त्रीन. चार युगांतील दुसरें युग; कृत, द्वापर व कलि हीं बाकीचीं तीन युगें होत. ह्याचा अवधि बारा लक्ष शहाण्णव हजार वर्षांचा असतो. 'त्रेतायुग बारा लक्ष शाहाण्णौ सहस्त्र ।' -दा ६.४.१. [सं.] त्रेतायुग-न. त्रेता पहा.

दाते शब्दकोश

तरतरणे      

अक्रि.       १. (जमीन, चुन्याची कळी, हरभरे इ. भिजल्यामुळे) फुगणे; (तळलेले पदार्थ, झाडे, पाने इ.) फुलणे; फुगणे; फुगून टवटवीत होणे; (फोड, गळू इ.) सुजणे; टापसणे; ताठणे : ‘सारमेयाच्या शरिरावरती । गोचिड होऊनि तरतरताती ।’ – अमृत १७. २. (ल.) (आनंदातिशयाने) प्रफुल्लित होणे; खुलणे. ३. (ल.) (संपत्ती, ऐश्वर्य इ.नी) भरभराटणे. ४. (एखाद्या गोष्टीविषयी) आतुर, उत्सुक, उत्कंठित होणे. ५. (विंचू, झुरळ इ.नी) तुरतुर चालणे; धावणे. (माण.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तरतरणें

अक्रि. १ (जमीन, चुन्याची कळी, हरभरे इ॰ भिजल्यांमुळें) फुगणें; (तळलेले पदार्थ, झाडें, पानें इ॰ ). फुलणें; फुगणें; फुगून टवटवीत होणें; (फोड, गळू इ॰) सुजणें; टापसणें; ताठणें. 'सारमेयाच्या शरीरावरती । गोचिड होउनि तरतरताती ।' -अमृत १७. २ (ल.) (आनंदातिशयानें) प्रफुल्लित होणें; खुलणें. ३ (ल.) (संपत्ति, ऐश्वर्य इ॰ कानीं) भरभराटणें; तेजीस चढणें. [तरतर]

दाते शब्दकोश

ठिगळ, ठिगळी, ठिगड      

न. स्त्री.       जुन्या फाटक्या वस्त्राला लावलेली कळी, जोड, पट्टी; दुरुस्ती; छिद्र इ.ला जोडलेला तुकडा; कपड्याची दुरुस्ती. (क्रि. लावणे, जोडणे.). [सं. स्थग्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

थोक

थोक thōka m A quantity of silk--four कळी or little sticks with silk wound around; also the quantity, whether of silk or of cotton thread prepared by the weaver.

मोल्सवर्थ शब्दकोश

ठुशी, ठुसी      

स्त्री.       १. चोळीच्या बाहीखालचा तिकोनी कापडी तुकडा; कळी; बगल : ‘ठुशीच्या आतली घामट बाजू तिनं पाहिली.’ - रथचक्र. २. स्त्रियांच्या गळ्यातील एक सोन्याच्या टिकल्यांचा किंवा पेट्यांच्या खाली मणी लावलेला दागिना.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उगा      

क्रिवि.       १. न बोलता, हालता, काम करता; स्वस्थ; शांत; गप्प; उगीच; मुकाट्याने : ‘आतां नाइकें न पाहें । म्हणोनि मी उगा राहे ।’ −एभा ९·४५५. २. खटपट न करता; विना धंदा किंवा उद्योग. ३. अकारण; अनिमित्त; निष्कारण; जरुरी नसता : ‘उगा लोळसा घोळ मोठा करीतो.’ − राक ३६. ४. व्यर्थ; निरर्थक; बेकायदा : ‘उगा भ्रमसि वाउगा कशाला युगांत खळ हा कली.’− राला १०६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उगा

क्रिवि. १ न बोलतां-हालतां काम करतां; स्वस्थ; गप्प; उगीच; मुकाट्यानें. 'तंव रज तम उगे । कां पां राहाती ।' -ज्ञा १७.६३. 'आतां नाइकें न पाहें । म्हणोनि मी उगा राहे ।' -एभा ९.४५५. 'राहे भीष्म उगा, कीं सोडी तव सुत न दूरभिमानातें ।' -मोभीष्म १२.२८. 'नको छंद घेऊ उगा राहिं गोपाळा ।' -कृष्णाचा पाळणा १४. २ न खटपट करतां; विना धंदा किंवा उद्योग. ३ अकारण; अनिमित्त; निष्कारण; जरुरी नसतां. 'उगा लोळसा घोळ मोठा करितो.' -राक ३६.४ व्यर्थ; निरर्थक; बे फायदा. 'उगा भ्रमसि वाउगा कशाला युगांत खळ हा कली.' -राला १०६. उगी, उगला पहा. [ह. का. उगि = भिणें; का. उके = गप्प?]

दाते शब्दकोश

उकलणें

उ. क्रि. १ सैल करणें; उलगडा करणें; गुंतागुंत काढणें; मोकळा करणें. 'देव्हूडियां वेणिआं उकलैलियां । उधवटां गांठीं सूटलियां ।' -शिशु ७१६. 'सावध व्हा कंठीं यमपाश कसे घालितां अहा! उकला ।' -मोसभा ५.११. २ फोडून निराळें करणें; दुफळी करणें; फोडणें; चिरणें; निराळा करणें; (गो.) उकलास पहा. ३ (ल.) विवरण करणें; स्पष्ट करणें; फोड करून सांगणें. 'उकलूं जाणे अंतर । प्राणीमात्राचें । -दा १४.७.१२. ४ सुटका करणें; मुक्त करणें. 'संसारी गुंतोन काये । उकलवी ऐसें हृदयें । तो सत्व- गुण ।' -दा २.७.४३. -अक्रि. १ स्पष्ट होणें; उघडणें; मोकळी होणें; सुटणें. 'अंगीं उटी दिसे सुढाळ । कीं इंदुबिंब उकललें निर्मळ ।' -ह ७.११. २ उलणें; उमलणें (जमीन, फूल. कळी, दांत वगैरे). 'उकलतेनि उन्मेखें । प्रज्ञाकुशलतेंचि तिखें ।' -ज्ञा १५.१८५. [सं. उत्कल्]

दाते शब्दकोश

उमळणे      

अक्रि.       उत्पन्न होणे; फुलणे; उमलणे; बहरणे (कळी वगैरे). [सं. उद्+मील्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उमलणे      

अक्रि.       १. विकासणे; फुलणे : ‘तें उमललें अष्टदळ । ठेऊं वरी ॥’ –ज्ञा १५·६. [क. मलर] २. भेग पडणे; फुटणे; उकलणे. ३. सैल होणे; विरघळणे (कपड्यावरचा मळ, चुन्याची कळी, मातीचे ढेकूळ वगैरे). ४. फुगणे; लाही होण्याजोगे फुगणे (भिजत घातलेले धान्य वगैरे). ५. प्रफुल्लित होणे; उल्हासयुक्त होणे (मन वगैरे). ६. प्रकट होणे; उत्पन्न होणे : ‘परी एकी केधवां गेली । शाखा कोडी केधवां जाली । हें नेणवे जेवीं उमललीं । आषाढ अभ्रें ॥’ –ज्ञा १५·१२५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उमळणें

क्रि. फुलणें; उमलणें (कळी वगैरे). [सं. उद् + मील्]

दाते शब्दकोश

उमलणें

अक्रि. १ विकासणें; फुलणें. 'तें उमलेलें अष्टदळ । ठेऊं वरी ।। 'ज्ञा १५.६. २ भेग पडणें; फुटणें; उकलणें. ३ सैल होणें; विरघळणें ( कपड्यावरचा मळ, चुन्याची कळी, मातीचें ढेंकूळ वगैरे). 'वरचें खरकटें उमललें म्हणजे मग भांडे घांस.' ४ फुगणें; लाही व्हावयाजोगें फुलणें. (भिजत घातलेलें धान्य वगैरे); ५ प्रफुल्लित होणें; उल्हासयुक्त होणें (मन वगैरे). ६ प्रकट होणें; उत्पन्न होणें. 'परी येकी केधवां गेली । शाखाकोडी केधवां जाली । हें नेणवे जेवीं उमललीं । आषाढअभ्रें ।' -ज्ञा १५. १२५. -उक्रि. १ उचलणें; उखळणें (वाकवून घट्ट बसविलेलें खिळ्याचें टोंक वगैरे.). २ सुटें करणें; उघडणें; खोलणें (कोयंड्याचीं मिळ- विलेलीं दोन टोकें वगैरे ). ३ क्षार लावून तापवून सांधणें, एकत्र करणें (सोन्याच्या दागिन्याची टोकें). ४ सोलणें; मोकळें करणें; काढून टाकणें (धान्य भिजवून त्याचीं सालें वगैरें). [सं. उद् + मील-उन्मीलन; प्रा. उम्मीलण]

दाते शब्दकोश

युग

न. १ कृत, त्रेता, द्वापार आणि कलि असे जे विश्वाचे कालमापक चार मोठाले विभाग त्यांपैकीं प्रत्येक. २ मोठा काल- विभाग; वरील चारी कालविभाग मिळून होणारा काल; चारी युगांचा काल. ३ जोडी; दोन वस्तू; युग्म; द्वय. उदा॰ कर्णयुग; वस्त्रयुग इ॰ ४ जोखड; जू; धुरा. -वि चार संख्या (युगें चार मानिलीं त्यावरून). 'नाराच सहस्त्र युग । ' -मोकर्ण ४३.७७. ॰धर्म- पु. १ कालमाहात्म्य; त्या कालांतील लोकांची प्रवृत्ति. कलानुरूप योग्य वर्तन. ॰पत्-क्रिवि. एकत्र; एकदम; एकाच वेळीं. ' घट आणि घटाभाव हे एका अधिकरणीं युगपत् संभवत नाहींत. ' ॰माहात्म्य-न. युगाचा मोठेपणा; युगाचे महत्त्व; युगाचें वैशिष्ट्य; काळाचा गुण, प्रभाव. युगांत-पु. १ युगाचा शेवट. २ प्रलयकाळ; चारी युगांनंतर येणारा प्रलयकाल. ' जैसा सिंहाचिया हांका । युगांतु होय मदमुखा । ' -ज्ञा २.२१५. [युग + अंत] युगादि-पु. युगाचा प्रारंभ, सुरुवात [युग + आदि] युगानुयुग- क्रिवि. कित्येक युगेपर्यंत. [युग + अनुयुग] युगुल, युगल, युगूळ-न. (काव्य) जोडी; द्वय; दोन वस्तू. [सं. युगुल]

दाते शब्दकोश

युग yuga n (S) An age, one of the four ages कृत, त्रेता, द्वापार, कलि. 2 The period comprising the four ages. 3 A couple, brace, pair. 4 A yoke.

मोल्सवर्थ शब्दकोश

प्रश्न

पु. १ विचारणा; सवाल; चौकशी; विचारपूस; पृच्छा. २ शुभ किंवा अशुभ दर्शविणारें चिन्ह; शकुन. 'असे सातही उत्तम प्रश्न झाले ।' -कचेसुच ५. ३ भविष्यांतील गोष्टीसंबंधानें ज्योतिषी वगैरेंचा घेतलेला सल्ला; मुद्दा; बाब. ४ विचारलेल्या भविष्याचें सांगितलेलें भाकित किंवा उत्तर. 'जोशाचा प्रश्न उत- रला.' ५ कोडें; कूट. 'आपल्याला काय प्रश्न विचारावा हा मोठा प्रश्नच आहे.' -भावबंधन पृ. ३३. ६ अथर्वण वेदांतील एका उपनिषदाचें नांव. [सं.] ॰उठविणें-प्रश्न टाळणें. ॰पाहणें- भूत आणि भविष्य गोष्टीचें ज्ञान फलज्योतिष, रमल इ॰ शास्त्रां- वरून करून घेणें. ॰सांगणें-ज्योतिषशास्त्र वगैरेवरून विचार- लेल्या प्रश्नाचें उत्तर सांगणें; कूटप्रश्न, कोडें इ॰ सोडविणें. ॰माला, प्रश्नावलि-ळी-स्त्री. प्रश्नांची परंपरा, मालिका. [प्रश्न + माला, आवलि] प्रश्नार्थक सर्वनाम-न. (व्या.) प्रश्न विचारतांना ज्या सर्वनामाचा उपयोग करितात तें. उदा॰ कोण, काय. प्रश्नालंकार- पु. बाहेरून वाक्य प्रश्नासारखें दिसतें पण वस्तुतः वक्त्याचा त्या गोष्टीविषयीं पक्का निश्चय असतो अशा ठिकाणीं होणारा अलंकार. उदा॰ 'जें झाकिलें अनंतें दिव्यें भव्यें सदंबरें सुघडें । तें साधुकाय काय क्षुद्रमती करिल नागवें उघडें ।' 'कळी करि सुनिर्मळीं परम उग्र दावानळीं । तयांत अविशुद्ध मी शलभ जेविं दावानळीं । व्रणार्थ पशुच्या शिरावरि वनीं उभे काकसे । स्मरादि रिपु मन्मनीं अहि न काळ भेका कसे । -केका २१. [प्रश्न + अलंकार] प्रश्नोत्तर- जाति-स्त्री अनेक प्रश्नांचें एकच उत्तर; जो प्रश्न तेंच उत्तर इ॰ नानाविध प्रश्न व उत्तरें यांचे प्रकार. हा चित्र म्हणून एक प्रकारचा अलंकार होतो. 'अरे, ही तर एका प्रकारची प्रश्नोत्तरजातीच आहे बरें.' -कमं १.२२. प्रश्नोत्तरी-स्त्री. प्रश्न विचारण्याच्या वेळेच्या ग्रहदशेवरून केलेलें भूतभविष्य टिपण किंवा जन्मपत्रिका. [प्रश्न + उत्तर] प्रश्नणें-क्रि. विचारणें. -शर.

दाते शब्दकोश

पाप

न. १ अपराध; कुकर्म; दुष्टपणा; दोष; पातक; नीति- बाह्य वर्तन 'पापापासून ईश्वरक्षोभ, ईश्वरक्षोभापासून नरक- प्राप्ति, नरकप्राप्तीपासून स्वहितनाश.' याच्या उलट पुण्य. २ वाईट हेतु; कुकल्पना; कुढा भाव; दुष्ट वासना. 'मनांत कांहीं पाप आलेसें वाटतें.' ३ -पुस्त्रीन. (ल.) दुष्ट, त्रासदायक, पापी मनुष्य. 'संसप्तक थोडेसे असति न धरतील तेहि पाप तग ।' -मोकर्ण ४२.७१. ४ व्याधि; पीडा; अडचण; संकट; लचांड. [सं.] (वाप्र.) ॰उभें राहणें-पाप भोगणें; पाप उघडकीस येणें; मार्गांत आडवें येणें. ॰खाणे-पश्चात्तापानें मन खाणें; मनास हुरहुर लागणें. ॰बोंब मारून-देऊन उठणें, ज्याचें पाप त्याचे पुढें येऊन नाचणें-स्पष्टपणें पाप उघडकीस येणें. पापाचा वांटा उचलणें-पापकृत्याचे परिणाम भोगण्यास सिद्ध असणें किंवा नाइलाजानें तयार होणें (मागील जन्मांतील पापाचीं फळें भोगावी लागतात अशी समजूत आहे त्यावरून). पापानें पाय धुणें- सर्वदा पापचरण करणें. पापानें पाय धुतलेला-वि. अतिशय पापी; दुष्ट; महान्पातकी (मनुष्य) तो पाप देणार नाहीं तर पुण्य कोठून देईल-तो फारच कृपण आहे. वाईट वस्तु देखील दुसर्‍याला त्याच्यानें देववत नाहीं, मग चांगली देववत नाहीं, यांत काय नवल ? सामाशब्द- ॰कर्मी-वि. दुष्कर्मी; वाईट कृत्यें करणारा; दुष्ट; पापी. कष्ट-पुअव. अतिशय श्रम, कष्ट; अत्यंत दुःख; काबाडकष्ट (रागानें, त्रासानें वैतागून बोलतांना योज- तात). 'म्यां पापकष्टानें स्वयंपाक केला तो कुत्र्यानें विट ळला.' ॰कळी-स्त्री. कलियुग. ऐसी आली पापकळी । आश्चिर्य मानिलें सकळीं ।' -दा ३.५.२२. [पाप + कलि] ॰खाण-स्त्री. अत्यंत, भयंकर, पापी मनुष्य; महान् पातकी; पापाचें आगार. ॰ग्रह-पु. मंगळ, शनि, राहु, केतु हे अशुभ मानलेले ग्रह; आकाशांतील ग्रहांची अपशकुनकारक, दुश्चिन्हकारक युति, योग. ॰दृष्टि-स्त्री. पापी नजर; काम, मत्सर इ॰नीं युक्त अशी दृष्टि, पाहण्याचा प्रकार. -वि. कामुक; पापी; कलुषित, दुष्ट, दोषी नजरेचा. ॰द्वेष्टा- वि. पापाचा तिरस्कार करणारा. ॰धुणी-स्त्री. पाप धुतलें जाणें; पापापासून मुक्तता. 'जें श्रवण करतां पापधुणी । होय एकदां सर्वांची ।' -ह ४.४४. [पाप + धुणें] ॰निरास-पु. पाप धुवून टाकणें, दूर करणें. ॰पिंड-पु. (स्त्री रजस्वला असतांना गर्भ राहतो. यावेळीं मातेचें अशुद्ध रक्त वाहत असतें, त्यावरून या काळांतील) गर्भ पिंड; गर्भ. ॰पुत्र-पु. कुपुत्र. 'बाप तयाला ताप वृद्धपणिं पापपुत्र हा करी ।' -ऐपो ३६८. ॰बुद्धि-मति-वि. कुबुद्धि; दुष्ट, वाईट मनाचा; पापी वृत्तीचा. ॰भी(भे)रु-वि. पापाला भिणारा, भिऊन वागणारा. ॰मूर्ति-राशि-रूप-स्वरूप-वि. घोर, महान् पातकी; मूर्तिमंत पातकी. ॰योनि-नी-स्त्री. १ पापजाति. 'तिथे पापयोनींही किरीटी । जन्मले जे ।' -ज्ञा ९.४४३. २ गुन्हेगार जाती. 'पापयोनि शब्दानें अलीकडे सरकारदरबारांत ज्यांना गुन्हे- गार जाती असें म्हणतात तशा प्रकारचा अर्थ विवक्षित असून....' -गीर ७४८. -वि. पापी; पातकी (माणूस). ॰वासना-स्त्री. अपवित्र, पापी इच्छा; दुष्ट वासना. ॰वेळ-स्त्री. रात्रीं अकरा वाजल्या पासून तों पहाटे तीन वाजेपर्यंतचा काळ. धार्मिक व पवित्र कार्याला ही वेळ अयोग्य समजतात. ॰संग्रह-पु. पापांचा सांठा, संचय. ॰संताप-पु. पापामुळें होणारें दुःख; मनस्ताप; कांचणी. पापाचा बाप-पु. जन्मदाता बाप (कारण तो मुला- मुलीचा उत्पत्तिकारण असल्यामुळें त्यांच्या पापांची त्याच्यावर जबाबदारी येते). याच्या उलट पुण्याचा, धर्माचा बाप पापाचे पर्वत-पुअव मोठीं आणि पुष्कळ पापें. 'अपार जीव मारले । पापांचे पर्वत सांचले ।' -रावि १.११०. पापात्मा-पु. अत्यंत पापी; दुष्ट मनुष्य; पापमूर्ति, पापाचा केवळ अर्क. पापापूर्व- न. अनीतीच्या कृत्यांपासून उत्पन्न होणारें वाईट फळ, परिणाम इ॰. अपूर्व पहा. पापिष्ट, पापी-वि. अतिशय पापचरणी; दुष्ट; अनीतीनें वागणारा; पातकी; पापयुक्त. पाप्याचा पितर-न. (ल.) अतिशय रोड, दुर्बल व क्षीण, मनुष्य (पापी माणसानें दिलेले पिंड त्याचें पितर खात नाहींत त्यामुळें ते रोड बनतात त्यावरून).

दाते शब्दकोश

माथा-थें

पुन. १ डोक्याचा अग्रभाग; टाळू २ कपाळ. 'अजायुद्ध होतें तेव्हां माथ्यासी माथा आपटतो.' ३ डोकें. ४ घुसळावयाच्या रवीचा माथला;एखाद्या तसल्या वस्तूचें डोकें. ५ शिखर; टेंबा; शेंडा (पर्वत, झाड इ॰ चा). ६ लाक्षणिक अर्थां- करितां डोई पहा. माथां-क्रिवि. (काव्य) डोक्यावर. 'धर्म- प्रसाद माथां आंगी भगवत्प्रसाद दृढ वर्म ।' -मोकर्ण ११.९. [सं. मस्तक; प्रा. माथअ; पं. मथ्था; सिं. मथो; हिं. बं. माथा; गु. माथुं] म्ह॰ १ उरीं केस माथा टक्कल. २ पोटांत जळें माथ्यांत कळे. (वाप्र.) ॰तुकविणें-आनंदाने मस्तक डोलविणें. 'तियांचे भाॐ वाणिता । कवींसी माथा तुकविणें ।' -शिशु ६००. माथां मारणें-एखाद्यावर सोंपविणें; विश्वासणें; हवालणें; लावणें; अंगा- वर टाकणें (काम, धंदा). माथां वाहणें-फुलें इ॰ डोक्यावर सम- र्पण करणें. 'वाटे इषुंनीं माथां धीर गुरु म्हणोनि वाहिला काय? ।' -मोभीष्म ११.१२१. (उजळता)माथा होणें-आलेला अपवाद इ॰ दूर होणें. माथीं बसणें-एखाद्यावर लादलें जाणें. माथ्यांत राख घालणें-वैतागणें. माथ्यार पदर गांड उक्ती-(गो.) वरचा देखावा उत्तम राखणें पण आंत कांहींच अर्थ नसणें. माथ्यावर चढविणें-लडिवाळपणें वाटेल तसें वागूं देणें; डोक्यावर घेणें. माथ्यावरचा पदर टाकणें-उत- रणें-पडणें-वेश्या बनणें (बहुतेक सभ्य स्त्री डोकीवरून पदर घेते यावरून). माथ्या वैयलयान हुवार वचप-(गो.) डोकीवरून पाणी जाणें; गंगेत घोडे न्हाणें; एखाद्या कामाची मेहनतीची शिकस्त होणें याअर्थी. सामाशब्द- माथफळी-स्त्री. गोसावी, बैरागी लोक कुबडीवजा टेकण्यासाठी घेतात त्या साध- नाची वरील आडवी फळी. माथाकूट-स्त्रीन. १ (मूर्खास शिक- विणें, हटवाद्याशीं वाद करणें इ॰) कंटाळा आणणारा, त्रास- दायक व बिनफायदेशीर धंदा, काम. २ एखाद्या गोष्टी बद्दल चीड व शीण आणणारा हट्ट धरून बसणें; एकसारखी बडबड; त्राग्याची मागणी (वाक्यांत काम, छंदा. उद्योग इ॰ शब्दाबरोबर योजतात). ॰फोड-स्त्री. माथेफोड. ॰रोग-पु. गुरांचा एकरोग. -शे ६.४८. ॰शूळ-पु. १ भयंकर डोकेदुखी. २ एक सरळ वाढणारी वनस्पति. माथाटी-स्त्री. माथोटी पहा. माथें-न. शिर; मस्तक. 'संक- टांत तीच म्हणोनी उंच करी माथें ।' -विक ६ [सं. मस्तक] (वाप्र.) ॰करणें-(कु.) (विधवांनी) केशवपन करणें. ॰पिक- वणें-डोकें उठवणें; त्रास देणें. ॰फिरणें-वेडा होणें; अतिशय रागावणें. 'माझें माथें फिरलें.' ॰बोडविणें-हजामत करविणें.' सामाशब्द- ॰माथेकळी-स्त्री. आंगरख्याची एक कळी, भाग. ॰फळी-स्त्री. उंसाच्या चरकांतील नवरानवरीचे माथे जीत बस- विलेले असतात ती आडवी फळी. ॰फिरू-पु. संतापी; अविचारानें भलतेंच कृत्य करणारा; भ्रमिष्ट. ॰फोड-स्त्री. माथाकूट पहा. -वि. कठिण व त्रासदायक; चीड व शीण आणणारें (काम). ॰सूळ-पु. डोकेंदुखी. माथो-पु. (चि.) मस्तक; कपाळ; (सामा.) वरचा भाग. माथोट, माथोटी-नस्त्री. १ बैलाच्या शिंगाच्या मुळाशीं बांधलेली दोरी. २ अशी दोरी जेथें बांधतात तो बैलाच्या डोक्याचा भाग. ही दोरी बैलाला पकडण्याच्या उपयोगी पडते व हिला कासरा लावतात. ३ शिंगाभोवतालचें गोंडे इ॰ ज्यास बांधलेले असतात तें बंधन. ४ डोंगराचा माथा. [माथा + अट] माथ्या-थ्यो-पु. १ रवी इ॰ चा माथा, बोंड. २ (चि.) रवी. माथ्याचा-वि. (गुज.) हेकेखोर; हट्टी.

दाते शब्दकोश

चार

वि. १. ४; चार ही संख्या. २ एक परिमित संख्या दर्शविणारें. 'त्याला चार गोष्टी समजावून सांग.' 'त्याचेजवळ चार पैसे आहेत.' ३ चवथ्या प्रतीची, (वसुलीच्या कागदांत वापर- तात.) [सं. चतुर्; फा. चाहरम्, च्यारम; फ्रें. जिप्सी स्तर; आर्मेनि. त्सतर; झें. तेस्सारेस्स] सामाशब्द-॰अभिमानी- पुअव. विश्र्व, तैजस, प्राज्ञ, प्रत्यगात्मा हे शरीरांतील चार अव- स्थांचे अभिमानी. ॰अवस्था-स्त्रीअव. जागृति, स्वप्न, सुषुप्ति आणि तुर्या या चार अवस्था. ॰अक्षरें-न. अव. थोडीशी विद्या; विद्येचे एक परिमाण, माप. 'ज्यास चार अक्षरें येतात त्यासच ठेवावें.' त्याला चार अक्षरें आलीं कीं देतों कोठें तरी नोकरींत अडकवून.' [चतुर् + अक्षर] ॰आणी-स्त्री. (व.) पावली; चार आण्याचें नाणें. ॰आत्मे-पुअव. जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा व निर्मलात्मा. ॰काणे-ने-न्हे-पु. अव. तीफाशीं खेळांतले एक विशिष्ट दान. चार पगडे. ॰खण-पु. निवार्‍याची जागा; रहावयाची एखादी लहानशी खोली. ॰खणी-स्त्री. एक प्रकारचें कापड. -देहु १५०. ॰खाणी-स्त्रीअव. प्राणिवर्गांतील व वनस्पतिवर्गांतील सृष्ट पदार्थांचे अगर वस्तूंचे कल्पिलेले चार वर्ग-अंडज; स्वदेज; उद्भिज्ज. 'चारी वर्ण चार खाणी । चारी युगें चारी वाणी । चारी पुरुषार्थ चहुं लक्षणी । मुक्तीची मांडणी चतुर्धा ।' -एभा ३.७७. चत्वार- भूतग्राम पहा. ॰खुट-खुंट-क्रिवि. चोहोंकडे; सर्वत्र. 'अक्कल कोटचे थेट राहणार चार खुट फिरलों शाही ।' -पला ४.१३. ॰खुंट जहागीर-स्त्री. पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर या चार दिशांकडे मिक्षेकर्‍याच्या झोळीचे कोंपरे असतात, झोळीचा विस्तार हाच जहागिरीचा प्रदेश. यावरून लक्षणेनें भिक्षेकर्‍याची वृत्ति; दरिद्री स्थिति. 'चार खुंटाची जहागिरी असल्यावर कुणाची पर्वा राहील.' ॰गोमी-वि. ज्याच्या किनारीमध्यें रेशमी चार गोमी असतात असें (लुगडें). ॰गोष्टी लावणें, करणें- वेडेवांकडे आक्षेप काढणें. ॰गोष्टी सांगणें-मन वळविण्या- जोगें. समजून पटण्यासारखें भाषण करणें. ॰घेणें-चार देणें- शेजारधर्माने देणें, घेणें करणें. ॰चौघे-पुअव. चार-पांच माणसें; कांहीं थोडकीं माणसें. ॰डोळे-पुअव. दोन माणसें (एकाच कामांत गुंतलेलीं). 'तुमचे आणि माझे असे चार डोळे झाले म्हणजे चुकी होण्याचा संभव कमी.' ॰दाणे-पुअव तिफाशी डावांतील एक विशिष्ट दान; चार काणे. ॰दिवस-पुअव. थोडे दिवस; थोडा काल; कांहीं काळ. म्ह॰ चार दिवस स्रासूचे आणि चार दिवस सुनेचे. ॰दिशा-स्त्रीअव. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या दिशा. चार दिशा मोकळ्या होणें-वाटेल तिकडे जाण्याला जग सगळें मोकळें असणें. ॰दोष-पुअव. आत्माश्रयता, अनोन्याश्रयता, चक्रकापत्ति व अनवस्था हे चार दोष विकल्प विषयीं शास्त्रांत सांगितले आहेत. ॰धामें-नअव. हिदुस्थानांत उत्तरेस केदारेश्वर, दक्षिणेस रामेश्वर (हिं शिवधामें), पूर्वेस जग- न्नाथ व पश्चिमेस द्वारका (ही दोन विष्णुधामें) ही देवस्थानें. [चतुर् + धाम] चारपंजम-वि. चवथ्या व पांचव्या प्रतींचे, हलक्या दर्जाचें रेशीम. [फा. चाहरम् + पंजम् = चार व पांच] ॰पायी-स्त्री. खाट; पलंग. [सं. चतुर् + पद; हिं. चारपाई] ॰पुरुषार्थ-पु. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ. ॰बैली-वि. जिला बैलांच्या दोन जोड्या म्हणजे चार बैल लागतात अशी (गाडी, मोट). ॰भक्त-पुअव. आर्त, जिज्ञासु, अर्थी आणि ज्ञानी हे चार प्रका- रचे भक्त ॰मुक्ति-चत्वारमुक्ति पहा. ॰युगें-नअव. कृत (किंवा सत्य), त्रेचा, द्वापार व कलि हीं चार युंगे. ॰लोक-पु.अव. १ स्वर्ग, मृत्यु, पाताळ आणि कैलास. २ समाज; समाजांतील माणसें; चार स्नेही. ॰वर्ण-पुअव. चातुर्वर्ण्य पहा. ॰वाटा- स्त्रीअव. १ कोणतीहि बाहेरची वाट. २ (ल.) विस्तीर्ण जगांत हिंडण्याची परवानगी दहा वाटा किंवा बारा वाटा असेंहि म्हण- तात. 'तुला चारी वाटा मोकळ्या आहेत, जा कसा !' ॰वाणी चतुर्विध वाचा पहा. ॰स्थानें-नअव. नेत्र, कंठ, हृदय आणि मुर्ध्नि हीं स्थानें. ॰हात होणें-१ लठ्ठाठ्ठी होणें; हात घाईवर येणें. २ लग्न होऊन कर्तास्रवर्ता होणें. चारही ठाव- पुअव. भात, वरण, भाजी, पोळी हे जेवणांतील मुख्य मुख्य पदार्थ; म्हणजे उत्तम प्रकारचें जेवण. याच्या उलट. 'घड्याळ टिपरूं' = निवळ चटणीभाकरी

दाते शब्दकोश

खुंट

पु. १ खालीं राहिलेला भाग; खोड; कांड; सोट; बुंधा (झाड, झुडुप, शेपूट, केरसुणी, हजामत झाल्या नंतरचे केंस इ॰ चा). 'समूळ फोडियेले खुंट ।' -एरुस्व १०.७६. २ (मासे मारण्यासाठीं समुद्र किंवा नदी यांत) रोविलेला खांब, डांभ. ३ ज्यामध्यें फाळ बसवितात तें नांगराचें टोंक; खुळसा; कोळसा. ४ गाय, म्हैस यांच्या आचळांतून दुध येण्यास प्रति- बंध करणारा मळ. ५ गोफण, जाळें, शिंकें करण्याकरितां दोरीचे दोन पदर अथवा पेड तिरकस बाहेर ओढले जातात त्यापैकीं शेवटचे तंतू पुन्हां याच रीतीनें बाहेर काढले जाऊन वळले जातात, अशा शेवटच्या तंतूपैकीं प्रत्येकास खुंट म्हणतात. ६ दुध न देणारा जनावराचा सड; मुका, आंधळा सड. ७ पृथ्वीचे चार कोपरे, 'हिंदू देश कोण खुंट चारी ।' -तुगा ११८. 'चार खुंट जहागीर. ८ दणकट शरीराची गाय, म्हैस, जनावर किंवा स्त्री. 'काळवीट खुंट खरे, '-ऐपो २४२. ९ मध्यम आकाराचा केळीचा कोंब, खोड, मोना (मोठया केळीस चिकटलेला किंवा निराळा काढलेला). १० चार रस्त्यांचा चौक; चौहाट; अड्डा. ११ रस्त्याचें टोंक; शेवट. १२ (ल.) कुटुंब; घरदार; त्यापैकीं एक व्यक्ति; वंशाची शाखा; वंशांतील मूल; वंशाचें फल; संतान. १३ बुगडीचें मळसूत्र ज्यांतून जातें तो भाग; बुगडीचा, कुड्यांचा कानां- तील भाग. १४ अंगरख्याच्या बाहीच्या चुण्या जींत एकत्र करतात ती पट्टी अथवा गजासारखी शिवण. १५ (ल.) आधारस्तंभ; आश्रयदाता. १६ (आंधळ्या कोशिंबिरीच्या खेळांत) आंधळ्याचें सोंग घेणाराचें डोळे झांकणारा मुलगा; भोग्या. १७. (गो.) कुंपणाची काटी. १८ (कों.) तुकडा. १९ खोखोच्या खेळांतील न हालणारा गडी. 'होऊनियां खुंट बसा जपून.' -मोग- र्‍यांची कविता, मराठी तिसरें पुस्तक खेळ ५ पृ. ४८. २० (ढोरधंदा) अत्यंत आखूड सळ. २१ कांठ; कोपरा. 'खेटितां कुंप कांटी खुंट दरडी न पाहे ।' -तुगा ३४९. २२ स्वारी; उतारू (गाडीमधील). २३ खांब; मेढ. 'मग परमस्नेहाचा खुंट उभवोन । गरके घालिती त्यासवें ।' -नव २४.१५५. २४ जनावरास बांधण्यासाठीं जमीनींत गाडलेला लांकडी खुंटा; दांडकें. २५ वाघूर लावण्यासाठीं ठोकलेल्या लांकडाच्या मेढी; खुटला. -वि. (गो.) ताठ; नीट. [सं. कुठ्-कुंठ् = स्तम्भित होणें; प्रा. खुंट; तुल॰ का. कुंटु = लंगडा] (वाप्र.) ॰होणें-हट्ट धरून खुंटा सारखें ताठ व स्तब्ध बसणें. ॰ळणें-वाल इ॰ चा एक एक दाणा लावण्यासाठीं जमीनींत खुंटीनें, किंवा काठीनें टोचा, भोंक पाडणें, टोवणे. खुंटास खुंट उभा राहणें-होणें-एक जातो तोंच त्याच्या जागीं दुसरा येणें; गेलेल्याची जागा नवीन येणारानें भरून काढणें; खंड पडल्याची जागा भरून काढणें. खुंटास खुंट घेणें -जशास तसें करणें; उसनें फेडणें. खुंटासारखा उभा राहणें-असणें-खुंटणें-खुंटाप्रमाणें ताठरणें, ताठ उभा राहणें. ॰म्ह -आजा मेला नातु झाला खुंटास खुंट उभा राहिला. खुंटावरचा कावळा = घरदार, वतनवाडी, बायकामुलें नसलेला, वाटेल तेथें राहणारा माणूस. सामाशब्द ॰कन-कर-दिनीं दिशीं-क्रिवि. तीव्र व हलक्या आवाजानें; खाडदिशीं (दोन काष्ठांचा परस्परांना लागून होणारा शब्द) (क्रि॰ वाजणें). चुटकी, टाळी यांच्या होणार्‍या आवाजांप्रमाणें शब्द होऊन ॰कळी-स्त्री. बगलकळी; अंगरख्याच्या पाठीमागचा त्रिकोणी तुकडा. बगलेंतील पेशकळी आणि आगा असे दोन तुकडे व खुंट- कळी मिळून अंगरख्याची एक बाजू होते. ॰खुंटण-न. खुंट अर्थ १-२ पहा. ॰पान-न. (राजा.) केळीच्या गाभ्यापासून निध- णारें शेवटचें आणि कोंक्याच्या पूर्वीं येणारें आंखूड पान. ॰बरा-पु. खुंटी. खुंटा पहा. ॰बावली-स्त्री. १ (राजा.) एक प्रकारची बाहुली. २ उंचीवरचा पदार्थ काढण्यासाठीं चवड्यांवर उभें राहणें. (क्रि॰ करणें). अशा रीतीनें खुंटबावलीवर उभें राहणें. ३ (निंदेनें). काम न करणारी व खुंट्यासारखी तिष्ठत रहाणारी स्त्री. ॰बाळी-स्त्री. स्त्रियांचे एक कर्णभूषण. 'खुंटबाळ्या साध्या बाळ्या त्याजवर ।' -अफला ५५. ॰भाजी-स्त्री. विशेष विस्तार व्हावा म्हणून पुन्हां पुन्हां अग्रें खुडून राखिलेली भाजी; खुंटापासून किंवा मुळापासून निघालेला कोंब व त्याची भाजी. ॰रोग-पु १ पुष्कळ दिवस खुंटास बांधून ठेवल्यामुळें पशूंना येणारा रोडके- पणा किंवा होणारा आजार. २ (ल.) अशा बैठेपणापासून होणारा आजार, रोग. ॰रोगी -वि. खुंटरोग झालेला. खुंटला-पु. (व.) गाडीच्या दोन बाजूंस (आंतील सामान बाहेर पडूं नये म्हणून) लाविलेले खुंट प्रत्येकी. ॰सार-वि. (गो.) खुंटासारखा.

दाते शब्दकोश

अर्ध

न. १ एका पदार्थाचे जे दोन सम विभाग ते प्रत्येकीं; निम्मा तुकडा, अर्धा भाग. २ (समांसात) अर्धा; निम्मा. उ॰ अर्धकोस, अर्धघटिका इ. [सं.] ०कच्चा वि. १ अर्धामुर्धा पिकलेला, तयार झालेला किंवा शिजलेला (फल, धान्य, विद्या, अन्न); अर्धामुर्धा; अपूर्ण; अपुरा. २ पुरें शेवटास न जातां अर्धवट राहिलेलें (काम). ०कंदरा पु. लगामाचा प्रकार. -अश्वप १८५. [सं. अर्ध + कंधरा ०काची वि. अर्धीकच्ची. 'एक अर्धकाचीं तुरटें ।' -एरुस्व १४. १०६. ०कोर स्री. अर्धा चतकोर; (गो.) नितकोर (भाकर). ०घबाड पु.न. एक शुभ मुहूर्त, परंतु घबाडापेक्षां कमी महत्वाचा. घबाड पहा. ०चंद्र पु. १ वद्य किंवा शुध्द अष्टमीचा चंद्र; अर्धा चंद्र. २ अर्ध चंद्राच्या आकारासारखी वस्तु. ३ (गचांडी देतांना हाताचा आकार अर्धचंद्रासारखा होतो म्हणून;) हकालपट्टी. 'या अष्ट मीच्या चंद्राच्या मुहूर्तावर मलाहि अर्धचंद्र मिळाला.' -मूकनायक. 'आणिक म्हणे भृत्यजना । यासी अर्धचंद्राची द्यावी दक्षिणा । देशाबाहेरी या ब्राम्हणा । घाला वहिले ।।' -कथा ५.११.७१. (हा प्रयोग मूळ संस्कृतांतच आहे.) (क्रि॰ देणें, मारणे, मिळणें, इ०). ४ (नृत्य) हाताचीं चार बोटें एकमेकांस लागून ताठ ठेवणें व आंगठा दूर पसरून ठेवणें. ५ अर्धचंद्राकृति (फाळाचा) बाण. ०चंद्री, तंद्री स्री. अर्धवट झोंप, मूर्च्छा. 'बाण भेदिला जिव्हारीं । निदूरथ पडिला धरणीवरी । डोळां लागली अर्धचंद्री । जेवीं खेचरी योगिया ।' -एरुस्व ९.३२. ०चरतीय, जरतीय-वि. अर्धे किंवा अर्धवट काम; अनिश्चित स्वरूपाचें काम; मोघम किंवा अनिश्चित भाषण. 'येतो म्हण किंवा नाहीं म्हण- उगीच अर्धचरतीय सांगूं नको.' [सं. अर्ध + जरा-जरित किंवा जर्ज- रित; अर्ध + चरित]. ०जेवा वि. अर्धवट जेवलेला; अर्ध्या जेवणांतून उठलेला; अर्धपोटी. [अर्ध + जिम्]. ०देशी कापड न. विदेशी सुताचें, हिंदुस्थानांत विणलेले कापड. ०धणी वि. अर्धतृप्त; अर्ध- पोटीं. 'भलतें करीं परी अर्धधणीं । नुठीं कदा ।' -ज्ञा १६.३०. ०नार स्री. स्रीजातींतील षंढ; षंढा; अर्धवट स्री; स्रीधर्मांपैकीं कांहीं बाबतींत उणीव असलेली स्री. [सं. अर्ध + नारी]. ०नारीनटे- श्वर पु. १ अर्धें आपलें (पुरुषांचे) व अर्धें पार्वतीचें (स्रीचें) असें शंकराचें रूप; अर्धनारीश्वर; शिवशक्ति. मोहिनीराज हें विष्णूचें रूप (यांत अर्धा विष्णु व अर्धी अमृतकलश घेतलेली मोहिनी असें अर्धनारीश्वर स्वरूप असतें. नेवासें येथें असा देव आहे). २ अर्धा पुरुष व अर्धी स्री एकत्र. 'अर्धनारीनटेश्वरी । जो पुरुष तोचि नारी ।' -ज्ञा ९.२७०; -एभा ११.३६९. ३ प्रकृतिपुरुष; शिव- शक्ति. 'प्रकृतिपुरुष शिवशक्ति । अर्धनारीनटेश्वर म्हणती ।' -दा २०.३.१०. ०नारीश्वर अर्धनारीनटेश्वर पहा. ०निकुट्टक (अंगहार) -पु. (नृत्य) उजवा पाय नूपुर करून मग तीचारी सोडून भराभर आक्षिप्तचारी त्याच पायानें करणें. नंतर दोन्ही हात फेंकून त्रिक वळविणें व शेवटीं निकुट्टक व कटिचिन्ह हीं करणें. ०निकुट्टित (करण)-न. (नृत्य) खांदा आकुंचित करून त्यावर त्या बाजूचा हात ठेवून बोटें हळु हळु ठोकणें व दुसरा हात आपल्या तोंडासमोर बोटें करुनं ठेवणे. उजवा पाय कुट्टित करणें व डावा पाय स्तब्ध ठेवणें. ०पड-डा वि. अर्धवट पडलेलें-केलेलें-बजा-वलेलें-म्हटलेले; अपुरें साधलेलें, बजावलेले; वरकरणीपणानें केलेलें. (सामा.) अपुरें; वरवर; सरासरी. [अर्ध + पडणें]. ०पद्मासन न. डाव्या पायाची मांडी मोडून बसणें व उजवा पाय मोडून डाव्या पायावर ठेवणें. ०पक्षकीटक पु. (प्राणी.) एक कीटक- वर्ग. यांतील किड्यांचे पुढील अर्धे पंख शृंगी द्रव्यानें कठिण झालेले असतात म्हणून यास हें नांव आहे. -प्राणिमो १०३. ०पिका वि. अर्धवट पिकलेला (फळ वगैरे). [अर्ध + पिकणें]. ०पुडी-वि. अर्धवट; अल्पायुषी (अर्धें झोपेंत जातें म्हणून). 'थोडें जिणें अर्धपुडी काया । गर्व करिती रडाया ।' -दा १८.५.३५. [सं. अर्ध + पुट ?]. ०पोटीं-क्रिवि. अर्धेंच पोट भरलें असतां; पूर्ण न जेवतां; भूक पुरी न भागतां. (क्रि॰ जेवणें, जाणें, असणें, उठणें, राहणें). ०फोड अर्धवट फोडलेलीं लांकडें; ठोकळे. (बुरूड) बांबू उभा चिरून केलेले दोन भाग. ०बाट-गा वि. १ अर्धवट संस्कार झालेला (वाटण्याचा-कुटण्याचा-शिजण्याचा इ०); अर्धवट बन- विलेला; अर्धबोबडा. २ अर्धवट भ्रष्ट झालेला, बाटलेला; जातींतून अर्धवट बाहेर पडलेला; वाळींत टाकलेला. ३ ज्याचा बाप एका जातीचा व आई दुसर्‍या जातीची आहे असा. ४ अर्धवट किंवा वरवर ज्याला माहिती-परिचय आहे असा. ५ (ल.) अर्धवट शिकलेला (विद्यार्थी, कारागीर, पंडित इ०). कडेचा पोहणारा; अतज्ज्ञ. -क्रिवि. अर्धेंमुर्धें करून; अपुरेपणानें; उणेंपणानें. [अर्ध + भ्रष्ट = बाट]. ०बाटे पाऊण मराठे न. १ संकर; पंचमिसळ; खिचडी; धेडगुजरी (भाषा, काम, पदार्थ); बारभाई; बजबजपुरी. २ (ल.) उचछृंखलपणाची वागणूक-आचार. ०बिंब न. १ अर्ध वर्तुळ आणि त्यावरील टिंब. २ (ल.) ओंकाराची-प्रणवाची अर्ध मात्रा. 'जंव मात्रात्रय मावळे । अर्धबिंबीं । '-ज्ञा ८.११५. ०बुकट-बुकुट वि. (राजापुरी) अर्धवट पहा. [अर्ध + बुकटी]. ०बोबडा वि. १ अर्धवट कुटलेलें-चेललेलें-वाटलेलें (मिरे वगैरे). २ शिजतांना अर्धवट राहिलेला-(भात-डाळ इ॰ पदार्थ); मऊ न झालेला, बोटचेपा. ३ (ल.) कसें तरी ओबडधोबडपणें केलेलें काम; बिगारी-वेठ काम. ०भरपोशाख पु. भर पोशाखांतील फक्त्त कांहीं विशिष्ट वस्तुयुक्त मामुली पोशाख. -बडोदें खानगी खातें नियम नोकर पोशाख पा. ३. ०मत्तल्लि(करण) न. (नृत्य) पाय अडखळल्यासारखें करून मागें टाकणें, डावा हात रेचित करणें व उजवा हात कमरेवर ठेवणें. ०मत्स्येंद्रासन न. योगासनांतील एक प्रकार. -संपूर्ण योगाशास्र पा. ३२५. ०मागधी स्री. एक प्राकृत भाषा. जैन धार्मिक ग्रंथ या भाषेंत लिहिले आहेत. हिलाच भारतीय वैय्याकरण आर्षभाषा म्हणत. शौरसेनी व मागधी भाषा प्रदेशांच्यामध्यें अर्धमागधीभाषाप्रदेश होता (म्हणजे हल्लींचा प्रदेश अयोध्या). त्याच्या दक्षिणेकडील मराठी भाषा कांहीं अंशीं या भाषेवरून बनली आहे. प्रचारकाल ख्रि. पू. ४ थ्या शतकाचा शेवट -ज्ञाको अ ४७५. ०मांडणी स्री. अर्धी मांडणी पहा. ०मात्रा स्री. १ ओंकारांतील अर्धीं मात्रा. 'अर्धमात्रापर तें न सांपडे ।' -परमा २.१३. २ एका वेळीं घ्यावयाच्या औषधाच्या प्रमा- णाच्या अर्ध्या इतकें. 'अर्धमात्रा रस देऊनिया जीव । रोग दूरी सर्व करिताती ।' -ब २२२.१; ३ (ल.) औषध; रसायनगुटिका. 'पंचगव्य तेंचि जाण अर्धमात्रा । -ब १०४.५. ४ किंचित्; थोडें. 'हे कृष्णकथा अलौकिक । महादोषासी दाहक । भवरोगासी छेदक । अर्धमात्रा सेविलिया ।' -एरुस्व १८.७५. ५ व्यंजन; अर्धस्वर. ६ संगीतांत स्वर घेतांना घेतलेली विश्रांति; एका मात्रेचा अर्धा काल. ०मुकुल(दृष्टी) स्री. (नृत्य) अर्धवट डोळा उघडणें; पापण्यांचे केंस एकमेकांस लागतील इतके जवळ आणणें. आल्हादकारक सुगंध, सुखस्पर्श ह्या गोष्टी हा अभिनय दर्शवितो. [सं. मुकुल = किंचित् उमललेली कळी]. ०मेला वि. १ अर्धवट मेलेला; थोडासा जिवंत राहिलेला. २ जर्जर; मृतप्राय; व्याकुळ. 'ती भुकेने अर्धमेली झाली आहे.' -पाव्ह २३. ०रथी वि. (रथांत बसून) एका रथ्यासह- वर्तमानहि युद्ध करतां येत नाहीं. तो; रथीहून अल्पवळी. (ल.) कच्चा योद्धा. 'अतिरथ नव्हे रथ नव्हे हा (कर्ण) केवळ अर्धरथचि अविदग्ध ।' -मोउद्योग १२.५८. [सं.]. ०रात्र स्री. मध्यरात्र. ०रेचित(करण) न. (नृत्य) उजवा हात तोंडासमोर नेऊन डोक्या- वर उचलून धरणें व उजव्या पायाकडील भाग किंचित वांकवून तो सूची करून जमिनीवर हळु हळु आपटणें. [सं.] ०रेचित(संयुक्त हस्त)-पु. (नृत्य) डावा हात चतुर व उजवा हात रेचित करणें. [सं.] ०लंड-मर्धलंड-पु. अधलंड, अधलंडमधलंड पहा. ०वट क्रिवि. १ अर्धेंपणानें; अपुरेपणानें; उणीव असलेल्या रीतीनें; वरवर; वरकरणीः मोघमपणें. 'काम पुरतें करावें, अर्ध- वट ठेवूं नये.' [सं. अर्ध + वत्] २ अर्ध्यांत; मध्यभागी; दोन्ही टोंकाच्या मध्यें.-वि. १ अधलामधला; अपुरा; २ (ल.) वेडा; अप्रबुद्ध; कमी समजूत असलेला. 'हा पुरता वेडा नव्हे पुरता शाहणा नव्हे, अर्धवट आहे.' ३ अर्धें वय झालेला; तरणा नव्हे. 'आम्ही म्हैस घेतली ती तरणी नाहीं, अर्धवट आहे.' ०वर्तुल-ळ-न. (गणित.) अर्धें वर्तुळ; वर्तुळाचा निम्मा भाग; व्यास आणि त्यानें कापलेला परिघाचा भाग यांच्यामध्यें जो वर्तु- लाचा भाग सांपडतो तो. -महमा ६. (इं.) सेमि-सर्कल. -विराम- पु. १ अर्धीं विश्रांति; पूर्ण विरामापेक्षां कमी थांबण्याची जागा. २ ती दर्शविण्याचें चिन्ह. ०वेडा वि. वेसडर; मुर्ख; अर्धवट. ०शिजा वि. अर्धवट शिजलेला; पुरता न शिजलेला (भात वगैरे) ०शिशी स्री. अर्धें कपाळ दुखण्याचा रोग; यानें अर्ध्या मस्तकाकडील मानेचा भाग, भुंवई, आंख, कान, डोळा व अर्धें कपाळ-या ठिकाणीं तर- वारीच्या आघातासारखें दुःख होतें. यावर गोकर्णाचें मूळ व फळ पाण्यांत वांटून त्याचें नस्य करावें अथवा मूळ कानांत बांधावें. [सं. अर्ध + शीर्ष] ०सम(वृत्त)-न. ज्यांत दोन दोन उ॰ पहिला आणि तिसरा व दुसरा आणि चौथा हे चरण सारखे असतात तें वृत्त. उ० पुष्पिताग्रा; हरिणीप्लुता; वियोगिनी, अपरवक्त्रा. [सं.] ०सूची (करण)-न. (नृत्य) उजवा पाय सूची करून उजवा हात उपपद्म करणें व डोक्याच्या वरच्या बाजूस नेऊन ठेवणें. ०स्थित(स्वर)-पु. (संगीत) द्व्यर्ध आणि द्विगुण या स्वरांमधील म्हणजे पांचवा, सहावा व सातवा हे स्वर. ०स्वस्तिक(करण)-(नृत्य) पु. पाय स्वस्तिक ठेवून उजवा हात कमरेवर व डावा हात वक्षःस्थलावर ठेवणें. ०स्वर-पु. य्, व्, र्, ल्, हीं व्यंजनें स्वरांबद्दल योजितात म्हणून त्यांस अर्धस्वर किंवा अंतःस्थ वर्ण म्हणतात. ०हार-पु. बारा किंवा चौसष्ट सरांचा हार; एक दागिना.

दाते शब्दकोश

घर

न. १ रहावयासाठीं बांधलेली जागा; वाडा. २ एका कुटुंबांतील (एके ठिकाणीं) राहणारी मंडळी; कुटुंब. ३ गृहस्था श्रमधर्म; संसार; प्रपंच. 'त्याला नोकरी लागतांच त्यानें स्वतंत्र घर थाटलें' ४ एखाद्या व्यवसायांत जुटीनें काम करणारीं माणसें, मंडळी, संस्था; अडतीची जागा. ५ (उंदीर, चिचुंदरीं इ॰ काचें) बीळ; घरटें. ६ एखादा पदार्थ शिरकवण्यासाठीं केलेला दरा, भोंक, खोबण, खांचण. 'भिंतीस घर करून मग खुंटी ठोक.' ७ (मालकाच्या इच्छेविरुद्ध मिळविलेलें, बळकावलेलें) वस्तीचें ठिकाण. 'कांट्यानें माझ्या टाचेंत घर केलें.' ८ एखादी वस्तु सुरक्षितपणें ठेवण्यासाठीं केलेलें धातूचें, लांकडाचें आवरण, वेष्टण, कोश. उ॰ चष्म्याचें घर. 'माझ्या चष्म्याचें घर चामड्याचें आहे.' ९ पेटींतील, टाइपाच्या केसींतील कप्पा, खण, खाना. १० सोंगट्याच्या, बुद्धिबळांच्या पटावरील, पंचांगा- तील (प्रत्येक) चौक; चौरस; मोहर्‍याचा मुळचा चौरस; मोहर्‍याचा मारा. 'राजा एक घर पुढें कर' 'घोडा अडीच घरें (एकाच वेळीं) चालतो.' ११ (ज्यो.) कुंडलीच्या कोष्टकां- तील सूर्य, चंद्र इ॰ ग्रहांचें स्थान. १२ घराणें; वंश; कुळ. 'त्याचें घर कुलीनांचें आहें.' 'त्याच्या घराला पदर आहे.' = त्याच्या वंशात परजातीची भेसळ झाली आहे.' १३ उत्पत्तिस्थान; प्रांत, प्रदेश, ठिकाण, ठाणे (वारा, पाउस, प्रेम, विकार, रोग इ॰ काचें); 'सर्वज्ञतेचि परि । चिन्मात्राचे तोंडावरी । परि ते आन घरीं । जाणिजेना ।' -अमृ ७.१३०. 'कोंकण नारळाचें घर आहे.' १४ रोग इ॰ कांच्या उत्त्पतीचे कारण, मूळ, उगम, जन्मस्थान, खाण. 'वांगें हें खरजेंचें घर आहे.' 'आळस हें दारिद्र्याचें घर आहे.' १५ वादांतील आधारभूत मुद्दा, प्रतिष्ठान. गमक, प्रमाण. १६ सतार इ॰ वाद्यांतील सुरांचें स्थान; सनईसारख्या वाद्याच्या दोन भोकांमधील अंतर; सता- रीच्या दोन पडद्यांमधील अंतर. १७ शास्त्र, कला इ॰ कांतील खुबी, मर्म, रहस्य, मख्खी, किल्ली. 'तुम्ही गातां खरे पण तुमच्या हातीं गाण्याचें घर लागलें नाहीं.' 'गुणाकार, भागाकार हें हिशेबाचें घर.' १८ सामर्थ्य; संपत्ति; ऐपत; आवांका; कुवत. 'जें कांहीं करणें तें आपलें घर पाहून करावें.' १९ मृदंग इ॰ चर्मवाद्यांच्या, वादी, दोरी इ॰ परिच्छेदातनें परिच्छिन्न प्रांत, जागा. २० (संगीत) तान, सूर यांची हद्द, मर्यादा, क्षेत्र. २१ (अडचणीच्या, पराभवाच्या वेळीं) निसटून जाण्या- साठीं करून ठेवलेली योजना; आडपडदा; पळवाट; कवच; 'हा घर ठेवून बोलतो.' २२ खुद्द; आपण स्वतः; स्वतःचा देह- म्ह॰ इच्छी परा तें येई घरा.' २३ (वर्तमानपत्राचा, पत्र- काचा, कोष्टकाचा रकाना, सदर. (इं.) कॉलम. 'येऊन जाऊन पत्रप्रकाशकास स्वतःचा असा मजकूर दर खेपेस पराकाष्ठा दोन तीन घरें घालणें येतें.' -नि १५. २४ वयोमानाचा विभाग; कालमर्यादा. 'हा नवा गृहस्थ पन्नाशीच्या घरांत आला होता.' -कोरकि ३२. २५ (मधमाशीचें पोळें वगैरेतील) छिद्र. 'केळीच्या सोपटाचीं घरें ज्यांनी पाहिली असतील' -मराठी सहावें पुस्तक पृ. २२५. (१८५७) २६ ठाणें; ठिकाण. 'कुबल, बांकी घरें । शिवराजाच्या हाता आलीं' -ऐपो ९. २७ बायको; स्वस्त्री. 'घरांत विचारा.' घर उघडणें पहा. [सं. गृह; प्रा. घर; तुल॰ गु. घर; सिं. घरु; ब. घर; आर्मेंजि. खर; फ्रेजि. खेर; पोर्तु. जि केर.] (वाप्र.) ॰आघाडणें-(कों.) घर जळून खाक होणें. ॰उघडणें-१ लग्न करून संसार थाटणें. 'नारोपंतांनी आतां घर उघडलें आहे, ते पूर्वीचें नारोपंत नव्हत!' २ एखा- द्याचें लग्न करून देऊन त्याचा संसार मोडून देणें. 'सदुभाऊंनीं आपली मुलगी त्या भटाच्या मुलास देऊन त्याचें घर उघडलें' ॰करणें-१ विर्‍हाड करणें; रहावयास जागा घेऊन तींत जेवण- खाण इ॰ व्यापार करावयास लागणें. 'चार महिनें मी खाणाव- ळींत जेवीत असे, आतां घर केलें आहें.' २ (त्रासदायक वस्तूंनीं) ठाणें देणें; रहाणें; वास्तव्य करणें. 'कांट्यानें माझ्या टांचेंत घर केलें.' 'माझ्या हृदयांत घर करून बसून त्यानें मला घायाळ केलें.' -बाय ३.३. ॰खालीं करणें-घर सोडून जाणें; घर मोकळें करून देणें. 'गावांत प्लेगचें मान वाढतें असल्यामुळें सर्वानी आपापलीं घरें खालीं केलीं.' ॰घालणें- (एखाद्याच्या) घराचा नाश करणें. ॰घेणें-१ (सामा.) लुबा- डणें; लुटणें; नागविणें; बुचाडणें. 'मग रेणुकेनें बोलिलें । अहो जेऊनि कैसें घर घेतलें ।' -कालिकापुराण २३.४०. 'ज्या ठिकाणीं वादविवादाचा किंवा भांडणाचा काहीं उपयोग नसतो त्या ठिकाणीं पडून घर घेणें यांतच मुत्सद्दीपणा असतो.' -चंग्र ८४. २ (एखाद्याचा) नाश करणें. 'म्हणती जन्मोनि द्रौपदीनें । आमचें घर घेतलें तिणें ।' -जै ७१.९९. ३ (त्रासदायक वस्तु) घर करून बसणें, ठाणें देऊन बसणें; घर करणें अर्थ २ पहा. ॰चालविणें-प्रपंचाची, संसाराची जबाबदारी वाहणें. म्ह॰ घर चालवी तो घराचा वैरी. ॰जोडणें-इतर घरण्यांशीं, जातीशीं, लोकांशीं इ॰ मैत्री, शरीरासंबंध घडवून आणणें; मोठा संबंध, सलोखा उत्पन्न करणें. 'लक्ष्मीपतीचें घर थोर जोडे ।' -सारुह २.१. याच्या उलट घर तुटणें. ॰डोईवर घेणें-आरडा ओरड करून घर दणाणून सोडणें; घरांत दांडगाई, कलकलाट, धिंगामस्ती करणें. 'वडील माणसें घरीं नाहींत हें पाहुन मुलांनी घर डोईवर घेतलें.' ॰तुटणें-मैत्रीचा, नात्याचा संबंध नाहींसा होणें; स्नेहांत बिघाड होणें. (दुसर्‍याचें) ॰दाखविणें- १ आपल्या घरीं कोणी त्रासदायक मनुष्य आला असतां कांहीं युक्तीनें त्याला दुसर्‍याच्या घरीं लावून देऊन आपला त्रास चुकविणें; (एखाद्याची) ब्याद, पीडा टाळणें. २ घालवून देणें; घराबाहेर काढणें. ॰धरणें-१ घरांत बसून राहणें; घराच्या बाहेर न पडणें (संकटाच्या, दंगलीच्या वेळीं पळून जाणें, पळ काढणें, गुंगारा देणें, निसटणें याच्या उलट). २ (रोग इ॰ नीं शरीरावर) अंमल बसविणें; एखादा आजार पक्केपणानें जडणें. 'दम्यानें त्याच्या शरीरांत घर धरलें.' ३ चिटकून राहाणें; चंचलपणा न करतां एकाच ठिकाणीं भिस्त ठेवून असणें. ४ (बुद्धिबलांत, सोंग- ट्यांत) सोंगटी एकाच घरांत ठेवून घर अडविणें. ॰धुणें,धुवून नेणें-१ एखाद्याचें असेल नसेल तें लबाडीनें गिळंकृत करणें; हिरावून नेणें; नागविणें; बुचाडणें. 'तुम्ही कारकुनावर फार भरंवसा टाकून राहूं नका, तो संधि सांपडल्यास तुमचें घर धुवावयास कमी करणार नाहीं.' २ नागविणें; लुबाडणें; लुटणें; अगदीं नंगा करणें. 'शंभर वर्षांनीं घर धुवून नेल्यानंतर ही ओळख आम्हांस पटूं लागली आहे.' -टिव्या. घर ना दार देवळीं बिर्‍हाड-फटिंग, सडा, ज्याला घरदार नाहीं अशा भणंगास उद्दे- शून अथवा ज्याला बायकामुलांचा संसाराचा पाश नाहीं अशाला उद्देशून या शब्दसंहतीचा उपयोग करतात. ॰निघणें-(स्त्रीन) नव- र्‍याला सोडून दुसर्‍या मनुष्याबरोबर नांदणें; (सामा.) दुसर्‍याच्या घरांत, कुटंबांत निघून जाणें. 'माझें घर निघाली.' -वाडमा २. २०९. ॰नेसविणें-घरावर गवत घालून तें शाकारणें; घर गवत इ॰ कानीं आच्छादणें; (कों.) घर शिवणें. ॰पहाणें-१ (एखाद्याच्या) घराकडे वक्रदृष्टी करणें; (रोगाचा, मृतत्युचा) घरावर पगडा बसणें; घरात शिरकाव करणें). 'कालानें एखाद्याचें घर पाहिलें कीं तें बुडालेंच म्हणून समजावें.' 'म्हातारी मेल्याचें दुःख नाहीं पण काळ घर पाहतो.' २ (बायकी) वधूवरांचें योग्य स्थळ निवडणें. 'सुशील तारेनें आपल्या पुण्यबलाच्या साह्यानें योग्य घर पाहून... ... ...' -रजपूतकुमारी तारा- (आनंदी रमण.) ॰पालथे घालणें-(घर, गांवइ॰) १ हरव- लेली वस्तु शोधण्यासाठीं घराचा कानाकोपरा धुंडाळणें. 'त्या बाईनें आपला सोन्याचा फुटका मणि शोधण्यासाठीं सारें घर पालथें घातलें.' २ सर्व घरांत; गावांत हिंडणें; भटकणें. 'त्या मुलाला रांगतां येऊं लागल्यापासून तें सारें घर पालथें घालूं लागलें आहें.' ॰पुजणें-१ आपलें काम करून घेण्यासाठी एखा- द्याच्या घरीं आर्जवें, खुशामत करण्यास वारंवार जाणें. २ (घरें पुजणें) आपला उद्योग न करतां दुसर्‍यांच्या घरीं भटक्या मारणें. ॰फोडणें- १ संसार आटोपणें, आंवरणें. २ कुटुंबातील माणसात फूट पाडणें; घरात वितुष्ट आणणें. 'बायका घरें फोड- तात.' ३ घरास भोंक पाडून आंत (चोरी करण्यासाठीं) शिर- काव करून घेणें; घर फोडतो तो घरफोड्या. ॰बसणें-कर्ता मनुष्य नाहींसा झाल्यामुळें, दुर्दैवाच्या घाल्यामुळें कुटुंब विपन्ना- वस्थेस पोहोंचणें; घराची वाताहत, दुर्दशा होणें. ॰बसविणें- संसार थाटणें; घर मुलाबाळानीं भरून टाकणें (स्त्रीच्या विवाहोत्तर जीवनाच्या बाबतींत या वाक्प्रचाराचा उपयोग करतात). 'माझी बायको मेली म्हणून मीं मुलाचें लग्न करून दिलें, म्हटलें कीं सून तरी घर बसविल.' ॰बुडणें-१ कुटुंबाची नासाडी, दुर्दशा होणें; कुटुंब धुळीस मिळणें. २ संतति नसल्यामुळें वंशाचा लोप होणें. ॰बुडविणें-१ (एखाद्याच्या) कुटुंबाचा विध्वंस करणें; संसाराचा सत्यनास करणें. २ घरास काळिमा आणणें. ॰भंगणें-कुटुंब मोडणें, विस्कळित होणें; कुटुंबास उतरती कळा लागणें; कुटुंबाचा नाश होणें; मंडळीत फूट पडणें. 'बापलेकांत तंटे लागस्यामुळें तें घर भंगले.' ॰भरणें-१ दुसर्‍यास बुडवून, त्यांची उपेक्षा करून आपण श्रीमंत बनणें. २ दुसर्‍याचें घर लुटणें, धुणें. व स्वतः गबर होणें. घर भलें कीं आपण भला-लोकांच्या उठा- ठेवींत, उचापतींत न पडतां आपल्या उद्योगांत गर्क असणारा (मनुष्य). ॰मांडणें-थाटणें-(संसारोपयोगी जिन्नसांनीं) घर नीटनेटकें करणें; घराची सजावट करणें. ॰मारणें-घर लुटणें. घर म्हणून ठेवणें-एखादी वस्तु, सामान प्रसंगविशेषीं उपयोगी पडण्याकरितां संग्रही ठेवणें; प्रत्येक वस्तु जतन करून ठेवणें. ॰रिघणें-घर निघणें पहा. 'घर रिघे जाई उठोनि बाहेरी ।' ॰लागणें-घर भयाण भासणें (एखाद्याचा मुलगा अथवा पत्नी वारली असतां घरांतील भयाण स्थिति वर्णिताना ह्या वाक्प्रचा- राचा उपयोग करतात). घराचा उंबरठा चढणें-घरांत प्रवेश करणें. 'जर तूं माझ्या घरची एखादीहि गोष्ट बाहेर कोणाला सांग- शील तर माझ्या घराचा उंबरठा चढण्याची मी तुला मनाई करीन.' घराचा पायगुण-घरांतील माणसांची वागणूक, वर्तणूक, वर्तन, शिस्त; घराचें पुण्य पाप. घराचा पायगुणच तसा, घरची खुंटी तशी-कुटुंबांतील माणसाची वागण्याची रीत असेल त्याप्रमाणें; एखाद्या कुटुंबांतील माणसांच्या सर्वसाधारण अशा वाईट व्यसनास खोडीस, संवयीस उद्देशून म्हणतात. घराचा वासा ओढणें- ज्याच्यामुळें एखादें काम, धंदा चालावयाचें व जें नसल्यास बंद पडावयाचें असें साधन, वस्तु, गोष्ट ओढणें; एखाद्या मोठया कामांतून फार जरूरीचें साधन नाहींसें करणें; अडबणूक करणें. 'आमच्या मंडळींतून पाटीलबुवानीं रामभाऊस फितविलें, आतां आम्हीं काय करूं शकूं! त्यानीं आमच्या घराचा वासाच ओढला. खाल्ल्या घराचे वासे मोजणें-कृतघ्न होणें; केलेला उपकार विसरणें. घरांत, घरीं- (ल.) पतीनें पत्नीबद्दल शिष्ट- संप्रदायानें वापरण्याचा शब्द. याच्या उलट पत्नी नवर्‍या संबंधीं बोलतांना 'बाहेर' या शब्दाचा उपयोग करते. 'तुम्हांला पदार्थ दिला तर घरांत मनास येणार नाहीं.' 'हा जिन्नस घरांत दाखवून आणतों.' -विवि १०.५-७.१२७. घरांतले-विअव. (बायकी) नवरा; पति; तिकडचे; तिकडची स्वारी. 'आमच्या घरांतल्यांनीं दादासाहेबांना दारूचें व्यसन लावलें.' -एकच प्याला. घरांतील मंडळी-स्त्री. (सांकेतिक) बायको; पत्नी. 'पाहूं घरांतील मंडळीस कसाकाय पसंत पडतो तो.' -विवि ७. १०. १२७. घरांत पैशाचा-सोन्याचा धूर निघणें-निघत असणें-घरची अतिशय श्रीमंती असणें; घरांत समजणें- कुटुंबांतील तंटा चव्हाट्यावर न आणणें; घरांतल्याघरांत तंटा मिटविणें; आपापसांत समजूत घडवून आणणें. घराला राम- राम ठोकणें-घर सोडून जाणें. 'आज या घराला रामराम ठोकण्यापेक्षां घटकाभर जुलमाचा रामराम पतकरला.' -भा ९०. घरावर काट्या घालणें-गोवरी ठेवणें-निखारा ठेवणें- एखाद्याच्या कुटुंबाची धूळधाण, बदनामी करणें; घरावर कुत्रें चढविणें- (गोव्याकडे घरावर कुत्रें चढल्यास घर सोडावें लागतें यावरून) १ एखाद्याच्या घरांत कलागती. भांडणें लावून देणें, तंटे उत्पन्न करणें. २ दुष्टावा करणें; अडचणींत आणणें. घरावर गवत रुजणें- घर ओसाड, उजाड पडणें. घरास आग लावणें-(ल.) एखादें दुष्कृत्य करून घराचा नाश करणें. घरास कांटी लागणें-घर उध्वस्त होणें; घरांत कोणी न राहणें. घरांस कांटी लावणें-१ घराच्या भोवतीं कांटे, काटक्या लावून येणें-जाणें बंद करणें. २ (ल.) घर उजाड, उध्वस्त, ओसाड करणें. घरास हाड बांधणें, घरावर टाहळा टाकणें- (एखाद्यास) वाळींत टाकणें; समाजांतून बहिष्कृत करणें; जाती- बाहेर टाकणें. (शेत, जमीन, मळा, बाग) घरीं करणें- स्वतः वहिवाटणें. घरीं बसणें-(एखादा मनुष्य) उद्योगधंदा नसल्यामुळें, सोडून दिल्यामुळें घरीं रिकामा असणें; बेकार होणें. 'तो एक वर्ष झालें घरीं बसला आहे.' (एखाद्याच्या) घरीं पाणी भरणें-(एखादा मनुष्य, गोष्ट) एखाद्याच्या सेवेंत तत्पर असणें; त्यास पूर्णपणें वश असणें. 'उद्योगाचे घरीं । ऋद्धिसिद्धि पाणीभरी.' घरीं येणें-(एखादी स्त्री) विधवा झाल्यामुळें सासरच्या आश्रयाच्या अभावीं पितृगृहीं, माहेरीं परत येणें; विधवा होणें. 'कुटुंब मोठें, दोन बहिणी घरीं आलेल्या.' -मनोरंजन आगरकर अंक. घरीं तसा दारीं देवळीं तसा बिर्‍हाडीं, घरीं दारीं सारखाच-सर्व ठिकाणीं सारखाच वागणारा; (सामा.) सर्वत्र उपद्रवकारक असलेला (मनुष्य, मूल); जसा स्वतःच्या घरीं उपद्रवकारक तसाच दुसर्‍याच्या घरीं उपद्रवकारक असलेला (मनुष्य, मुलगा). आल्या घरचा-वि. पुनर्विवाहित स्त्रीस पहिल्या नवर्‍यापासून झालेला (मुलगा). म्ह॰ १ घर फिरलें म्हणजे घराचे वांसेहि फिरतात = (एखाद्या) घरांतल्या मुख्याची खपा मर्जी, नाराजी झाली तर घरांतलीं लहानमोठीं नोकरचाकर सर्वच माणसें त्याच्या विरुद्ध उठतात. सामाशब्द- ॰असामी-स्त्री १ वतनवाडी; जमीनजुमला; मालमत्ता. २ घरकामासंबंधाचा मनुष्य; घराकडचा माणूस. ॰कज्जा-पु. घरां- तील तंटा; कौटुंबिक भांडण; गृहकलह. ॰करी-पु. पत्नीनें नवर्‍यास उद्देशून वापारावयाचा शब्द; घरधनी; कारभारी; यज- मान; घरमालक. 'माझे घरकरी गांवाला गेले.' ॰करीण- स्त्री. पतीनें पत्नीविषयीं वापरावयाचा शब्द; कारभारीण. 'माझ्या घरकरणीला तिच्यामुळें आराम वाटतो.' -कोरकि ३१५. २ घरधनीण; घरची मालकीण; यजमानीण. ॰कलह-पु. घरांतील भांडण; घरांतील माणसांचें दायग्रहणादिविषयक भांडण; आपसां- तील भांडण; अंतःकलह. ॰कसबी-पु आपल्या अक्कलहुषारीनें घरगुती जरूरीचे जिन्नस घरच्याघरीं तयार करणारा व घरची मोडतोड दुरुस्त करणारा मनुष्य; घरचा कारागीर; बाहेर काम करून उपजीविका न करणारा माणूस. ॰कहाणी-काहणी-स्त्री. (वाईट अर्थीं उपयोग) घरांतल्या खाजगी गोष्टीचें कथन. ॰कान्न-स्त्री. (गो.) घरधनीण; बायको; घरकरीण. [सं. गृह + कान्ता]. ॰काम-न. घरगुती काम. घरासंबंधीं कोणतेंहि काम; प्रपंचाचें काम. 'बायकांचा धंदा घरकामाचा लावतात.' ॰काम्या-वि. घरांतील कुटुंबांतील किरकोळ कामें करण्यास ठेवलेला नोकर, गडी; घरांतील काम करणारा. [घरकाम] ॰कार-री-पु. (गो. कु.) १ नवरा, पति. २ घरचा यजमान; घरधनी; मालक. [सं. गृह + कार] घरकरी पहा. ॰कारणी-पु. घरचें सर्व काम पाहणारा; कारभारी, दिवाणजी; खाजगी कारभारी. ॰कुंडा-पु. (कों.) १ पक्ष्याचें घरटें; कोठें. २ (ल.) आश्रय- स्थान; 'आम्हीं तुझ्या विश्रांतीचा घरकुंडा सोडतांच हे आमचे अद्वैतज्ञानाचे पांख आम्हांस तोलत नाहींसे होऊन आम्ही खालीं पडों लागलों.' -दादोबा, यशोदा पांडुरगी. [सं. गृह + कुंड] ॰कुबडा-कुबा-कोंबा-घरकोंग्या-कोंडा-कुंडा-कोंघा-कोंबडा-घुबड-पु. (घरांतला घुबड, कोंबडा इ. प्राणी) (दुबळ्या व सुस्त माणसाला-प्राण्याला तिरस्कानें लावावयाचा शब्द). नेहमीं घरांत राहाणारा; एकलकोंड्या; माणुसघाण्या; चारचौघांत उठणें, बसणें, गप्पा मारणें इ॰ ज्यास आवडत नाहीं असा, कधीं बाहेर न पडणारा मनुष्य; घरबशा. ॰कुल्ली- वि. (गो.) बहुश; घराबाहेर न पडणारी (स्त्री.); घर- कोंबडी. ॰केळ-स्त्री. (प्रां.) गांवठी केळ. घरीं लावलेलीं केळ. ॰खटला-लें-पुन १ घरचा कामधंदा; गृहकृत्य; प्रपंच, शेतभात इ॰ घरासंबंधीं काम. २ घराची, कुटुंबाची काळजी, जबाबदारी- अडचणी इ॰ ३ गृहकलह; घरांतील भांडण. ॰खप्या-वि. घरांतील धुणें, पाणी भरणें, इ॰ सामान्य कामाकरितां ठेवलेला गडी; घरच्या कामाचा माणूस; घरकाम्या पहा. [घर + खपणें = काम करणें, कष्ट करणें] ॰खबर-स्त्री. घरांतील व्यवहारांची उठाठेव-चौकशी; घराकडची खबर, बातमी. 'उगाच पडे खाटे वर तुज कशास व्हाव्या घरखबरा ।' -राला २२. [घर + खबर = बातमी] ॰खर्च-पु कुटुंबपोषणाला लागणारा खर्च; प्रपंचाचा खर्च. ॰खातें-न. घरखर्चाचें मांडलेलें खातें; खानगी खातें. ॰खास(ज)गी-वि. घरांतील मालमत्ता, कामें कारखाना इ॰ संबंधीं; घरगुती बाबीसंबंधीं; घरगुती, खासगी व्यवहारबाबत. ॰गणती-स्त्री. १ गांवांतील घरांची संख्या. २ गांवांतील घरांची मोजणी, मोजदाद. ३ गांवांतील घरांच्या मोजणीचा हिशेब, तपशील. (क्रि॰ करणें; काढणें) [घर + गणती = मोजणी] ॰गाडा- पु. संसाराचीं कामें; जबाबदारी; प्रपंचाची राहाटी; प्रपंच; संसार; घरखटला. (क्रि॰ हांकणें; चालवणें; सांभाळणें). ॰गुलाम-पु. घरांतील नोकर; गडी. 'चौदाशें घरगुलाम मुकले या निजपा- यांला ।' -ऐपो ३१३. ॰गोहो-पु. चुलीपाशीं, बायकांत, आश्रि- तांत शौर्य दाखविणारा मनुष्य; गेहेशूर; घरांतील माणसांवर जरब ठेवणारा पण बाहेर भागुबाईपणा करणारा पुरुष. [घर + गोहो = नवरा, पुरुष] ॰घरटी-स्त्री. दारोदार; एकसारखी फेरी घालणें (क्रि॰ करणें). 'चंद्र कथुनि मग महेंद्रगृहीं घरघरटी करित वायां ।' -आमहाबळ १९.१ ॰घाला-ल्या, घरघालू-वि. १ खोड साळ; फसवाफसवी करणारा; बिलंदर. 'भिजल्या पोरी कशी होरी ग हे घरघाली ।' -राला ४०. २ कुळाची अब्रू घालवणारा; घर- बुडव्या; दुसर्‍याचें घर बुडविणारा किंवा व्यसनादिकांनी आपलें घर बुडवून घेणारा. 'कशी घरघाली रांड बसली आम्हां गिळून ।' -राला ४६. ३ सर्व नाश करणारा. 'भयानका क्षिति झाली घर- घाली रुद्रविंशति जगिं फांकली ।' -ऐपो ३६८. [घर + घालणें; तुल॰ गु. घरघालु = द्रोही, खर्चीक] ॰घुशा-सा-वि. सर्व दिव- सभर उदासवाणा घरांत बसणारा; घरबशा, घरकोंबडा; घरकु- बडा पहा. [घर + घुसणें] ॰घुशी-सी-स्त्री. नवर्‍याचें घर सोडून दुसर्‍याच्या घरांत नांदणारी; दुसर्‍याचा हात धरून गेलेली विवा- हित स्त्री. 'कोण धांगड रांड घरघुशी ।' -राला ७८. [घर + घुसणें] ॰घेऊ-घेणा-वि. घराचा, कुटुंबाचा नाश, धुळधाण करणारा; घरघाला; घरबुडव्या; दुसर्‍यास मोह पाडून, फसवून त्याचें घर बळकावणारा. 'जळो आग लागो रे ! तुझि मुरली हे घरघेणी ।' -देप ८०. 'लांबलचकवेणी, विणुन त्रिवेणी, घर- घेणी अवतरली ।' -प्रला १११. [घर + घेणें] ॰चार, घरा- चार-पु. १ कुटुंबाची रीतभात; घराची चालचालणूक; कौटुं- बिक रूढी, वहिवाट. म्ह॰ घरासारखा घरचार कुळासारखा आचार. २ गृहस्थधर्म; संसार; प्रपंच. -जै १०६. 'दुःखाचा घरचार निर्धन जिणें भोगावरी घालणें ।' -किंसुदाम ५०. [सं. गृहाचार; म. घर + आचार = वर्तन] ॰चारिणी, ॰चारीण- स्त्री. (काव्य.) गृहपत्नी; घरधनीण; यजमानीण; घरमालकीण. 'शेवटीं नवनीत पाहतां नयनीं । घरचारिणी संतोषे ।' [सं. गृहचा- रिणी] ॰जमा-स्त्री. घरावरील कर; घरपट्टी. घरजांव(वा)ई- पु. बायकोसह सासर्‍याच्या घरीं राहणारा जांवई; सासर्‍यानें आपल्या घरींच ठेवून घेतलेला जांवई; सासर्‍याच्या घरीं राहून तेथील कारभार पाहणारा जांवई. 'तो संसाराचा आपण । घर जांवई झाला जाण । देहाभिमानासि संपूर्ण । एकात्मपणमांडिले ।।' -एभा २२.५९२. [घर + जांवई] ॰जांवई करणें-सक्रि. १ (एखाद्यास) सर्वसंपत्तीसह कन्यादान करणें; जांवयाला घरीं ठेवून घेणें, त्याला आपली जिंदगी देणें. 'त्याला त्यांनीं घरजां वईच केला आहे.' -इंप २७. २ (उप.) एखादी उसनी घेत- लेली वस्तु लाटण्याच्या हेतूनें, मालकानें परत मिळण्याविषयीं तगादा लावीपर्यंत, ठेवून घेणें. ॰जांवई होऊन बसणें-अक्रि. आपल्यावर सोपविलेल्या कामाचा किंवा धंद्याचा नफा किफायत आपल्याच कामीं लावणें, आपणच घेऊन टाकणें. ॰जिंदगी, जिनगानी-स्त्री. १ घरांतील सामानसुमान, उपकरणीं, भांडी- कुंडीं, द्रव्याव्यतिरिक्त इतर मालमत्ता; घरांतील जंगम चीजवस्त; मिळकत. २ (सामा.) मिळकत; इस्टेट. 'पादशहाची घरजि- नगानी समग्र लुटून.' -ख ८.४२२४. [घर. फा. झिंदगी, झिंद- गानी = मालमत्ता,जन्म,संसार] ॰जुगूत-जोगावणी-स्त्री. १ काटकसर; मितव्यय; थोडक्यांत घराचा निर्वाह. २ घरांतील जरूरीची संपादणी; कसाबसा निर्वाह. 'एक म्हैस आहे. तिणें घर जुगूत मात्र होत्ये.' -शास्त्रीको [घर + जुगुत = युक्ति + जोगवणी = प्राप्तीची व खर्जाची तोंडमिळवणी] ॰टका-टक्का-पु. घरपट्टी घरजमा; घरावरील कर. ॰टण-णा-घरठाण अर्थ २ घरवंद पहा. ॰टीप-स्त्री. १ गांवांतील घरांची गणती. (क्रि॰ करणें; काढणें). २ घरमोजणीचा हिशेब, तपशील; घरगणती पहा. [घर + टीप = टिपणें, लिहिणें] (वाप्र.) ॰टीप काढणें-करणें- घेणें-(ल.) (शोधीत, लुटीत, मोजीत, आमंत्रण देत) गांवां- तील एकहि घर न वगळता सर्व घरांची हजेरी घेणें; कोणतीहि क्रिया, रोग, प्रादुर्भाव गांवांतील एकहि घर न वगळतां होणें. 'यंदा जरीमरीनें ह्या गांवाची घरटीप घेतली.' ॰टोळ- स्त्री. (कों.) प्रत्येक घराचा झाडा, झडती. 'त्या गांवची घरटोळ घेतली तेव्हां चोर सांपडला.' घरडोळ पहा. ॰ठा(ठ)ण- न. १ घर ज्या जागेवर बांधलेलें आहे ती इमारत बांधून राहण्याच्या कामासाठीं उपयोगांत आणलेला जमीनीचा विभाग. -लँडरेव्हिन्यू कोड. २ मोडलेल्या घराचा चौथरा; पडक्या घराची जागा. घरवंद पहा. [सं. गृहस्थान; म. घर + ठाणा-ण] ॰ठाव-पु. १ नवरा; पति; संसार. 'मुदतींत आपल्याकडे नांदण्यास न नेल्यास मी दुसरा घरठाव करीन.' २ अनीति- कारक आश्रय; रखेलीचा दर्जा; रखेलीस दिलेला आश्रय. 'निरांजनीला मुंबईंत एका गुजराथी धनवानानें चांगला घरठाव दिला होता.' -बहकलेली तरुणी (हडप) ८. ॰डहुळी-डोळी, -डोळा-स्त्री. १ घराचा झाडा, झडती, झडती; बारीक तपासणी. 'मग थावली ते वाहटुळी । सैंघ घेऊनि घरडहुळी । -ज्ञा ६.२१६. 'तया आधवियांचि आंतु । घरडोळी घेऊनि असें पाहतु ।' -ज्ञा ११.५८६. २ प्रत्येक घराची केलेली झडती. (क्रि॰ घेणें). [घर + डहुळणें = ढवळणें] ॰डुकर-न. १ गांवडुकर; पाळीव डुकर. २ निंदाव्यजक (कुटुंबांतील) आळशी, निरुद्योगी स्त्री. [घर + डुकर] ॰तंटा-पु. गृहकलह; घरांतील भांडण. [घर + तंटा] ॰दार-न. (व्यापक) कुटुंब; घरांतील माणसें, चीचवस्त इ॰ प्रपंचाचा पसारा, खटलें; [घर + दार] (वाप्र.) घरदार खाऊन वांसे तोंडीं लावणें-सारी धनदौलत नासून, फस्त करून कफल्लक बनणें; ॰दार विकणें-घर व त्यांतील मालमत्ता विकणें; सर्व स्थावर जिंदगी घालविणें. म्ह॰ एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणें = एका पाहुण्यासाठीं कांहीं मिष्टान्न केलें तर तें घरांतील सर्व मंडळींस वाढावें लागतें. ॰देणें-न. घरपट्टी; घरटका. ॰धणी- नी-पु. १ यजमान; गृहपति; घरांतील कर्ता माणूस. 'निर्वीरा धरणी म्हणे घरधणी गोंवूनी राजे पणीं ।' -आसी ५२. २ पति; नवरा; घरकरी. 'मग घरधन्यास्नी पकडूनश्येनी न्ये.' = बाय २.२. ॰धंदा-पु. घरांतील कामधाम; गृहकृत्य. [घर + धंदा] ॰धनीण-स्त्री. १ घरमालकीण; यजमानीण. २ पत्नी; बायको; घरकरीण. 'माझी घरधनीण फार चांगली आहे.' -विवि ८.२. ४०. ॰नाशा-वि. घराचा, कुटुंबाचा नाश, धुळधाण कर णारा; घरघाल्या. [घर + नासणें] ॰निघ(घो)णी-स्त्री. १ घरनिघी पहा. २ (क्क.) घरभरणी अथवा गृहप्रवेश शब्दाबद्दल वापर- तात. केव्हां केव्हां या दोन्हीहि शब्दांबद्दल योजतात. [घर + निघणें] ॰निघी-स्त्री. वाईट चालीची. दुर्वर्तनी, व्यभिचा रिणी स्त्री; घरांतून बाहेर पडलेली, स्वैर, व्यभिचारिणी स्त्री. 'कीं घरनिघेचें सवाष्णपण ।'-नव १८.१७२. [घर + निघणें = निघून जाणें, सोडणें] ॰निघ्या-पु. १ स्वतःचें कुटुंब, घर, जात सोडून दुसर्‍या घरांत, जातींत जाणारा; दुर्वर्तनी, व्यभिचारी मनुष्य. २ एखाद्या व्यभिचारिणी स्त्रीनें बाळगलेला, राखलेला पुरुष; जार. [घर + निघणें] ॰पटी-ट्टी-स्त्री. १ घरटका; घरदेणें; घरावरील कर; हल्लींसारखी घरपट्टी पूर्वीं असे. मात्र ती सरकारांत वसूल होई. पुणें येथें शके १७१८-१९ मध्यें घरांतील दर खणास सालीना ५ रु. घरपट्टी घेत. मात्र घरांत भाडेकरी किंवा दुकानदार ठेवृल्यास घेत. स्वतःचें दुकान असल्यास, किंवा भाडे- करी नसल्यास घेत नसत. -दुसरा बाजीराव रोजनिशी २७९- ८०. 'पंचाकडे घरपट्टी बसविण्याचा अधिकार आला.' -के १६.४. ३०. २ एखाद्या कार्याकरितां प्रत्येक घरावर बसविलेली वर्गणी. [घर + पट्टी = कर] ॰पांग-पु. निराश्रितता; आश्रयराहित्य. 'तंव दरिद्रि- यासी ठाव तत्त्वतां । कोणीच न देती सर्वथा । जेथें घरपांग पाहतां । बाहेर घालिती पिटोनि ।।' -ह २९.३५. [घर + पांग = उणीव] ॰पांड्या-पु. घरांतल्याघरांत, बायकांत बडबडणारा, पांडित्य दाखवणारा. [घर + पांड्या = गांवकामगार] ॰पाळी-स्त्री. (सरका- रला कांहीं जिन्नस पुरविण्याची, सरकाराचा विवक्षित हुकूम बजावण्याची, भिकार्‍यांना अन्न देण्याची इ॰) प्रत्येक घरावर येणारी पाळी, क्रम. [घर + पाळी] ॰पिसा-वि. ज्याला घराचें वेड लागलें आहे असा; घरकोंबडा; घरकुंडा; [घर + पिसा = वेडा] ॰पिसें-न. घराचें वेड; घरकुबडेपणा; घर सोडून कधीं फार बाहेर न जाणें. [घर + पिसें = वेड] ॰पोंच, पोंचता-वि. घरीं नेऊन पोंचविलेला, स्वाधीन केलेला (माल). [घर + पोहोंच विणें] ॰प्रवेश-पु. नवीन बांधलेल्या घराची वास्तुशांति करून त्यांत रहावयास जाण्याचा विधि. (प्र.) गृहप्रवेश पहा. [म. घर + सं. प्रवेश = शिरणें] घरास राखण-स्त्री. १ घराचें रक्षण करणारा मनुष्य. २ थोडासा संचय, शिल्लक, साठा, संग्रह. 'सगळा गूळ खर्चूं नको घरास राखण थोडकासा ठेव.' घर म्हणून पहा. ॰फूट-स्त्री. आपसांतील दुही, तंटेबखेडे; गृहकलह; घर, राज्य इ॰ कांतील एकमतानें वागणार्‍या माणसांमध्यें परस्पर वैर. द्वेषभाव. [घर + फूट = दुही, वैर] ॰फोड-स्त्री. घरांतील माणसांत कलि माजवून देणें, कलागती उत्पन्न करणें. [घर + फोडणें = फूट पाडणें] ॰फोडा-स्त्री. १ (कायदा) एखाद्याच्या घरांत त्याच्या संमतीवाचून कुलूप-कडी काढून, मोडून किंवा मार्ग नाहीं अशा ठिकाणीं मार्ग करून (चोरी करण्याकरितां) प्रवेश करणें; (पीनलकोडांतील एक गुन्हा). २ घराची भिंत वगैरे फोडून झालेली चोरी. (इं.) हाउस् ब्रेकिंग. [घर + फोडणें] ॰फोड्या-वि. १ घरांत, राज्यांत फूट पाडणारा, दुही माजविणारा; घरफूट कर. णारा. २ घरें फोडून चोरी करणारा. [घर + फोडणें] ॰बंद-पु. १, (कों.) घरांची वस्ती, संख्या. 'त्या शहरांत लाख घरबंद आहे. [घर + बंद = रांग] २ घराचा बंदोबस्त; घरावरील जप्ती; घर जप्त करणें; घराची रहदारी बंद करविणें; चौकी-पहारा बसविणें. 'एकोनि यापरी तुफान गोष्टी । क्रोध संचरला राजयापोटीं । पाहारा धाडूनि घरबंदसाठीं । ठेविला यासी कारागृहीं ।' -दावि ४५६. [घर + बंद = बंद करणें] ॰बशा-वि. उप. घरकोंबडा; घरांत बसून राहणारा. [घर + बसणें] ॰बसल्या-क्रिवि. घरीं बसून; नोकरी, प्रवास वगैरे न करतां; घरच्याघरीं; घर न सोडतां. (ल.) आयतें; श्रमविना. (क्रि॰ मिळणें; मिळवणें). 'तुम्ही आपले पैसे व्याजीं लावा म्हणजे तुम्हांला घरबसल्या सालीना पांचशें रुपये मिळतील.' ॰बाडी-स्त्री. बेवारसी घरांचें भाडें (ब्रिटीशपूर्व अमदानींत, कांहीं शहरांतून सरकार हें वसूल करीत असे). घरवाडी पहा. ॰बार-न. घरदार; घरांतील मंडळी व माळमत्ता; संसार; प्रपंचाचा पसारा. 'तेवि घरबार टाकून गांवीचे जन ।' -दावि ४१२. 'घरबार बंधु सुत दार सखे तुजसाठिं सकळ त्यजिले ।' -देप २७. [सं. गृह + भृ; म. घर + भार; हिं घरबार; गु. घरबार] ॰बारी-पु. १ कुटुंबवत्सल; बायकोपोरांचा धनी; गृहस्थाश्रमी; संसारी. 'भार्या मित्र घरबारिया ।' -मुवन १८.७१. २ घरधनी; घरकरी; नवरा; पति. 'कां रुसला गे माझा तो घरबारी ।' -होला १४८. [सं. गृह + भृ; म. घरबार; हिं. घरबारी; गु. घरबारी] म्ह॰ ना घरबारी ना गोसावी = धड संसारीहि नाहीं कीं बैरागी नाहीं अशा मनुष्याबद्दल योजतात. ॰बारीपणा-पु. गृहस्थ- पणा; कर्तेपणा. 'पुरुषास घरबारीपणा प्राप्त होतो.' -विवि ८.२. ३५. [घरबारी] ॰बुडवेपणा-पु. १ घराचा नाश करण्याचें कर्म. २ देशद्रोह; स्वदेशाशीं, स्वदेशीयाशीं, स्वराज्याशीं बेइमान होणें. 'हा प्रयत्न त्यांच्या इतर प्रयत्नाप्रमाणेंच घर- बुडवेपणाचा आहे हें आम्ही सांगावयास नकोच.' -टि १.५४८. [घर बुडविणें] ॰बुडव्या-वि. अत्यंत त्रासदायक; दुसर्‍याच्या नाशाची नेहमीं खटपट करणारा; घरघाल्या; स्वतःच्या, दुसर्‍याच्या घरादारांचा नाश करणारा; देशद्रोही. [घर + बुडविणें] ॰बुडी, ॰बुड-स्त्री. १ (एखाद्याच्या) संपत्तीचा, दौलतीचा नाश; सर्वस्वाचा नाश. २ एखादें घर, कुटुंब अजिबात नष्ट होणें; एखाद्या कुळांचें, वंशाचें निसंतान होणें. [घर + बुडणें] ॰बेग(ज) मी-स्त्री. कुटुंबाच्या खर्चाकरितां धान्यादिकांचा केलेला सांठा, पुरवठा, संग्रह; प्रपंचासाठीं केलेली तरतूद. [घर + फा. बेगमी = सांठा] ॰बेत्या-पु. (राजा.) घराची आंखणी करणारा. (इं.) इंजिनिअर. [घर + बेतणें] ॰बैठा-वि. घरीं बसून करतां येण्या- सारखें (काम, चाकरी, धंदा); बाहेर न जातां, नोकरी वगैरे न करतां, स्वतःच्या घरीं, देशांत करतां येण्याजोगा. २ घरांत बसणारा (नोकरी, चाकरीशिवाय); बेकार. -क्रिवि. (सविभक्तिक) घरीं बसून राहिलें असतां; घरबसल्या पहा. [घर + बैठणें] ॰भंग- पु. १ घराचा नाश, विध्वंस. 'जिवलगांचा सोडिला संग । अव- चिता जाला घरभंग ।' -दा ३.२. ६०. २ (ल.) कुळाचा, कुटुंबाचा नाश; कुलनाश. [घर + भंग] ॰भर-वि. (कर्तुत्वानें, वजनानें) घर, कुटुंब भरून टाकणारा-री; घरांत विशेष वजन असणारा-री; घरांतील जबाबदार. -क्रिवि. घरांत सर्व ठिकाणीं, सर्वजागीं. 'त्यानें तुला घरभर शोधलें.' [घर + भरणें] ॰भरणी- स्त्री. १ गृहप्रवेश; नवीन बांधलेल्या घरांत राहण्यास जाण्याच्या वेळीं करावयाचा धार्मिक विधि; वास्तुशांति; घररिघणी पहा. २ पतीच्या घरीं वधूचा प्रथम प्रवेश होताना करण्याचा विधि; नव- वधूचा गृहप्रवेश; गृहप्रवेशाचा समारंभ; वरात; घररिगवणी; घर- रिघवणी. 'वधूवरें मिरवून । घरभरणी करविली ।' -र ४८. ॰भरवण-णी-स्त्री. (गो. कु.) गृहप्रवेश; वरात; घरभरणी अर्थ २ पहा. [घर + भरवणें] ॰भाऊ-पु. कुटुंबांतील मनुष्य; नातलग; कुटुंबांच्या मालमत्तेचा, वतनवाडीचा वांटेकरी; हिस्सेदार; दायाद. ॰भाट-पु. १ (कु.) घराच्या आजूबाजूची आपल्या माल- कीची जागा, जमीन; घरवाडी; विसवाट. २ (गो.) घराशेजा- रचा, सभोंवारचा नारळीचा बाग. [घर + भाट] ॰भांडवल- न. १ कुटुंबांतील मालमत्ता, जिंदगी, इस्टेट. २ एखाद्याचा खाजगी द्रव्यनिधि, ठेव; उसना काढलेला, कर्जाऊ काढलेला पैसा, द्रव्यनिधि याच्या उलट. [घर + भांडवल] ॰भांडवली- वि. घरच्या, स्वतःच्या भांडवलावर व्यापार करणारा. [घर- भांडवल] ॰भाडें-न. दुसर्‍याच्या घरांत राहण्याबद्दल त्यास द्यावयाचा पैसा, भाडें. [घर + भाडें] ॰भारी-पु. (प्र.) घरबारी. १ घरबारी पहा. २ ब्रह्यचारी, संन्यासी याच्या उलट; गृहस्था- श्रमी. ॰भेद-पु. कुटुंबाच्या माणसांतील आपसांतील भांडण, तंटा; फाटाफूट; घरफूट. ॰भेदी-द्या-वि. १ स्वार्थानें, दुष्टपणानें परक्याला, शत्रूला घरांत घेणारा; फितूर; देशद्रोही. २ घरचा, राज्याचा, पक्का माहितगार; घरचीं सर्व बिंगें ज्यास अवगत आहेत असा. म्ह॰ घरभेदी लंकादहन = घरभेद्या मनुष्य लंका जाळण्यार्‍या मारुतीप्रमाणें असतो. ३ घरांतील, राज्यांतील कृत्यें, गुप्त बातम्या बाहेर फोडणारा; घर फोडणारा. 'घरभेद्या होऊनि जेव्हां ।' -संग्रामगीतें १४०. ४ घरांत, कुटुंबांत, राज्यांत, तेटें, कलह, लावणारा. ॰भोंदू-वि. १ लोकांचीं घरें (त्यांना फसवून) धुळीस मिळवणारा. २ (सामा.) ठक; बिलंदर; प्रसिद्ध असा लुच्चा; लफंगा (मनुष्य). [घर + भोंदू = फसविणारा] ॰महार- पु. राबता महार. ॰मारू-र्‍या-वि. शेजार्‍यास नेहमीं उपद्रव देणारा; शेजार्‍याच्या नाशविषयीं नेहमीं खतपट करणारा. ॰माशी-स्त्री. घरांत वावणारी माशी; हिच्या उलट रानमाशी. ॰मेढा-मेंढ्या-पु. घरांतील कर्ता, मुख्य मनुष्य; कुटुंबाचा आधारस्तंभ; घराचा खांब पहा. [सं. गृह + मेथि; प्रा. मेढी; म. घर + मेढा = खांब] ॰मेळीं-क्रिवि. आपसांत; घरीं; खाजगी रीतीनें; आप्तेष्टमंडळीमध्यें (तंठ्याचा निवडा. तडजोड करणें). 'घरमेळीं निकाल केला.' [घर + मेळ; तुल॰ गु. घरमेळे = आप- सांत] ॰मोड-स्त्री. मोडून तें विकणें. 'कांहीं दिवसपर्यंत येथें घरमोडीचा व्यापार उत्तम समजला जात होता.' -टि १. १६९. [घर + मोडणें] ॰राखण-स्त्री. १ (प्रा.) घराची पाळत; रक्षण; पहारा. २ घरराखणारा; घरावर पहारा ठेवणारा. [म. घर + राखणें] ॰राख्या-वि. घराचें रक्षण करणारा; घराचा पहा- रेकरी; घरराखण. [घर + राखणें] ॰रिघणी, ॰रिघवणी-स्त्री. १ बांधलेल्या घरांत प्रवेश करतेवेळीं करावयाचा धार्मिक- विधि घरभरणी अर्थ १ पहा. २ घरचा कारभार; घरकाम. 'रचून विविध देहकुटी । तो घररिघवणी परिपाठी ।' -विपू ७. १२८. [घर + रिघणें = प्रवेश करणें] ॰रिघणें-घरांत येणें, प्रवेश करणें. 'घररिघे न बाहतां भजकाच्या ।' -दावि १६१. ॰लाठ्या-वि. (महानु.) घरांतील लाठ्या, लठ्या; घरपांड्या; गृहपंडित; घरांत प्रौढी मिरविणारा; रांड्याराघोजी. 'ऐसेआं घरलाठेआं बोला । तो चैद्यु मानवला ।' -शिशु ८९९. [घर + लठ्ठ?] ॰वट-ड-स्त्री. १ (कु. गो.) एखाद्या कुटुंबाची सर्वसाधारण, समायिक जिंदगी, मालमत्ता; कुटुंबाचें, संस्थेचें सर्वसाधारण काम, प्रकरण. घरोटी पहा. २ (गो.) कूळ; कुटुंब; परंपरा. ३ अनुवंशिक, रोग, भूतबाधा इ॰ आनुवांशिक संस्कार. [सं. गृह + वृत्त; प्रा. वट्ट] ॰वण-न. (कों.) घरपट्टी; घरासंबंधीं सरकार देणें. ॰वणी- न. घराच्या छपरावरून पडणारें पावसाचें पाणी. याचा धुण्याकडे उपयोग करतात. [सं. गृह. म घर + सं. वन, प्रा. वण = पाणी] ॰वंद-पु. (राजा.) घरटणा; पडक्या घराचा चौथरा; पडलेल्या घराची जागा. -वि. घरंदाज; कुलीन; खानदानीचा. 'शहर पुणें हरहमेष भरलें वाडें बांधिती घरवंदानी ।' -ऐपो ४२०. [गृहवंत?] ॰वरौते-स्त्री. १ घरवात; प्रपंच; संसारकथा; घरवात पहा. २ -न. वनरा- बायको; दापत्य; जोडपें. 'तीं अनादि घरवरौतें । व्यालीं ब्रह्मादि प्रपंचातें ।' -विउ ६.५ 'पुढती घरवरौतें । वंदिलीं तिये ।' -अमृ १.४९. [गृह + वृत्-वर्तित्] ॰वसात-द- स्त्री. १ वसति; रहाणें; वास; मुकाम. २ घराची जागा आणि सभोंवतालचें (मालकीचें) आवार, परसू, मोकळी जागा, अंगण. [घर + वसाहत] ॰वांटणी, ॰वांटा ॰हिस्सा- स्त्रीपु. घराच्या मालमत्तेंतील स्वतःचा, खाजगी, हिस्सा, भाग. [घर + वांटणी] ॰वाडी-स्त्री. (कों.) ज्यांत घर बांधलेलें, असतें तें आवार; वाडी. कोणाच्या अनेक वाड्या असतात, त्यापैकीं जींत धन्याचें घर असतें ती वाडी. [घर + वाडी] ॰वात-स्त्री. संसार; प्रपंच; संसाराच्या गोष्टी; प्रपंचाचा पसारा; घरवरौत; घरकाम. 'घरवातें मोटकीं दोघें । जैं गोसावी सेजे रिगे । दंपत्यपणें जागे । स्वामिणी जें ।।' -अमृ १.१३. 'ऐसी तैं घरवात वाढली । खातीं तोंडें मिळालीं ।' -दा ३.४. ६. [सं. गृहवार्ता] ॰वाला-वि. १ घराचा मालक. २ (खा.) नवरा; घरधनी; पति. [घर + वाला स्वामित्वदर्शक; प्रत्यय; तुल॰ गु. घरवाळो] ॰वाली- वि. (खा.) बायकों; पत्नी; घरधनीण. 'माझ्या घर- वालीनें साखर पेरतांच त्यानें सर्व सांगितलें ।' -राणी चंद्रावती ५३. [घर + वाली; गु. घरवाळी] ॰वासी-वि. कुटुंबवत्सल; प्रपंचांत वागणारा. [घर + वास = राहणें] ॰वेडा- वि. १ घरपिसा. २ बाहेर राहून अतिशय कंटाळल्यामुळें घरीं जाण्यास उत्सुक झालेला; (इं.) होमसिक्. ॰शाकारणी-॰शिवणी-स्त्री. घरावरील छपराची दुरुस्ती करणें; घरावर गवत वगैरे घालून पाव- सापासून संरक्षणाची व्यवस्था करणें; घराच्या छपराचीं कौलें चाळणें. [घर + शाकरणें, शिवणें] ॰शोधणी-स्त्री. १ स्वतःचीं खाजगी कामें पहाणें. २ स्वतःच्या साधनसामर्थ्याचा विचार करणें; स्वतःची कुवत अजमावणें. [घर + शोधणें] ॰संजोग- पु. १ एखाद्या कामास लागणारा घरचा संरजम. 'त्या हरदा- साचा घरसंजोग आहे.' = कीर्तनास लागणारीं साधनें तबला, पेटी, टाळ इ॰ हीं त्या हरदासाच्या घरचींच आहेत. २ काटकसरीचा प्रपंच; घरजुगूत; घरव्यवस्था. ३ सुव्यवस्थित घरांतील सुखसोयी, समृद्धता. [घर + सं. संयोग, प्रा. संजोग + सरंजाम] ॰संजो- गणी-स्त्री. घरसंजोग अर्थ २ पहा. घरजुगूत; काटकसर; मितव्यय. ॰समजूत-स्त्री. घरांतल्याघरांत, आपआपसांत स्नेह भावानें. सलोख्यानें केलेली तंट्याची तडजोड, समजावणी. ॰संसार-पु. कुटुंबासंबंधीं कामें; घरकाम; प्रपंच. ॰सारा-पु. घरावरील कर; घरपट्टी; घरटक्का. [घर + सारा = कर] ॰सोकील- वि. घरीं राहून खाण्यास सोकावलेला; घरीं आयतें खाण्यास मिळत असल्यानें घर सोडून बाहेर जात नाहीं असा; घराची चटक लागलेला (बैल, रेडा इ॰ पशु). [घर + सोकणें] ॰स्थिति- स्त्री. १ घराची स्थिति; घरस्थीत पहा. २ गृहस्थाश्रमधर्म; संसार; प्रपंच. 'ॠषीस अर्पिली कन्या शांती । मग मांडिली घरस्थिति ।' -कथा ३.३. ६३. [सं. गृहस्थिति] ॰स्थीत-स्त्री. घराची, कुटुं- बाची रीतभात, चालचालणूक, वर्तक, आचार, स्थिति. म्ह॰ अंगणावरून घरस्थीत जाणावी = अंगणाच्या चांगल्या किंवा वाईट स्थितीवरून त्या घारांतील मंडळीचा आचार कसा आहे तें समजतें. शितावरून भाताची परीक्षा या अर्थी. [घर + स्थिति अप.] घराचा खांब, घराचा धारण, घराचें पांघरूण-पुन. (ल.) घरांतील कर्ता माणूस; घरांतला मुख्य; घरमेढ्या. घराचार-पु. १ संसार; प्रपंच; गृहस्थाश्रमधर्म; घरकाम. 'परी अभ्यंतरीं घराचार माडें ।' -विपू ७.१३८. 'यापुरी निज नोवरा । प्रकृती गोविला घरचारा ।' -एभा २४.३२. -कालिकापुराण ४.३५. २ (ल.) पसारा; व्याप 'तेथ वासनेचा घराचार । न मांडे पैं ।' -सिसं ४.२०७. ३ घरां- तील मंडळींची राहटी, रीतभात, आचरण, वागणूक, व्यवहार. 'वंध्यापुत्राचा घराचार । तैसा जीवासि संसार ।' -एभा २६. ३०. [सं. गृह + आचार] घराचारी-वि. १ घरंदाज. २ नवरा; पति; घरकरी; ददला. 'ऐशिया स्त्रियांचे घराचारी । खराच्या परी नांदती ।' -एभा १३.२१४. [घराचार] घरास राखण- स्त्री. १ घरांचें रक्षण करणारा मनुष्य. २ थोडासा संचय, शिल्लक, सांठा, संग्रह. 'सगळा गूळ खर्चू नको घरास राखण थोडकासा ठेव.' घर म्हणून पहा. घरींबसल्या-क्रिवि. घरबसल्या पहा. घरोपाध्या-पु. कुलोपाध्याय; कुलगुरु; कुलाचा पुरोहित, भटजी. [घर + उपाध्याय; अशुद्ध समास]

दाते शब्दकोश