आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
कसपट
कसपट kasapaṭa n A minute particle (as of wood &c.); a splint, a straw, a hair. कसपटाप्रमाणें मोजणें-लेखणें-गणणें-मानणें-धरणें To hold lightly, esteem as a straw, vilior algâ, flocci &c.. Pr. बायको धमकट दादला क0
न. (लाकूड वगैरेचा) लहान कण; सालपट; केर; गवताचा तुकडा; धान्याचे कण; तूस. 'बायको धमकट दादला कसपट' - टाप्रमाणें मानणें, मोजणें, लेखणें, गणणें, धरणें-तुच्छ मानणें; क्षुद्रवत् लेखणें.
कसपट n A minute particle; a straw. कसपटाप्रमाणें मोजणें-मानणें-लेखणें Hold lightly.
कस्पट
न. पहा : कसपट : ‘धनगराच्या मेंढरांनी बारीकसारीक कस्पटसुद्धा टिपले होते.’ - व्यंमाक १९.
काडी कसपट
गदळ; घाण; केरकचरा : ‘म्यां म्हटलें हा मार्ग चांगला काडीकसपट नसे ।’ - अफला ७५. काडीखार, काडेखार
कसपत
न. (वन.) निश्चल पाण्यावर तरंगणाऱ्या, खोड नसलेल्या वनस्पती.
कसपट
न. (लाकूड वगैरेचा) लहान कण; सालपट; केर; गवताचा तुकडा; धान्याचे कण; तूस. [सं.] (वा.) कसपटाप्रमाणे लेखणे, कसपटाप्रमाणे गणणे, कसपटाप्रमाणे धरणे - तुच्छ मानणे; क्षुद्रवत् लेखणे.
कस्पट
न० गवत किंवा लांकूड याचा अणुरेणूएवढा भाग.
संबंधित शब्द
असकट
वि. १ वारंवार. २ (ल.) बारीक. 'कणिक चाळावी असकट । पाखडूनि सांडावें कसपट । होईल परिपाक चोखट । पूर्ण- पुरिया सिध्दलाडू ।।' -एरुस्व १८.५०. [सं. असकृत्]
बलंगी
स्त्री. बाजरीच्या निंबुराचें कसपट, गोंड; तें दातांत अडकल्यानें होणारें दुःख. 'हिरडी सुजे भरे बलंगी ।' -दा ३.६.१८.
धमकट
धमकट dhamakaṭa a Strong, firm, lasting. 2 Sturdy, lusty, robust, athletic. Pr. बायको ध0 दादला कसपट.
न. दांडपणा. 'ते महा धीट रागीट । तिचें मोडारे धमकट । बाधोनि आणावी बळकट । शस्त्रास्त्रेंसीं ।' -कथा ५.१७. ४१. -वि. १ मजबूत; टिकाऊ; दणगट (पदार्थ). २ लठ्ठ आणि सशक्त; काटक; घटमूट. म्ह॰ बायको धमकट दादला कसपट. [धमक + ट प्रत्यय] धमकटी-वि. १ धीट व चावट; फाजील (स्त्री.) 'माते माझे चावूनि अधर । चुंबन देती वारंवार मज कष्टविती थोर । धमकटी मिळोनी ।' -ह ७.१५५. २ दांडगी; उन्मत्त, 'तरण्या धमकट्या तेथें वागती ।' -दावि ४१६.
के(कें)सर
पुन. १ फुलांतील तंतु. 'का कमळावरी भ्रमर । पाय ठेविती हळुवार । कुचुंबैल केसर । इया शंका ।' -ज्ञा १३. २४७. २ आंब्याच्या कोयीला असणार्या शिरा. -न. १ भाताचें लोंगर, कणीस, लोंबी. २ मंजरी, मोहोर, (तुळस, आंबा इचा). ३ कसपट; केर; बारीक कण; केसपट. ४ सिंहाची, घोडयाची आयाळ. -अश्वप १.६२. ॰बोंडी-स्त्री. केसर; एक प्रकारचें झाड. याच्या बोंडांत केशरी रंगाचा गर व बिया असतात.
केर
पु. न. १. कचरा; गवताच्या काड्या; धुरळा; शेण, माती, गवत, पाने इत्यादींचा वाईटसाईट अंश. २. गाळ; रेंदा; निरुपयोगी पदार्थ; अवशिष्ट भाग. ३. बारीक कण; गवतकाडी, कसपट, तुकडा इ. (साखरेतील, धान्यातील, कापसातील.) (को.) [क. किर, केर] (वा.) केर फिटणे- कचऱ्याप्रमाणे उडून जाणे; नाश होणे : ‘तेथ भेडांची कवण मातु । कांचया केर फिटतु ।’ - ज्ञा १३४. केर फेडणे - नाश करणे. केरवारा करणे - घरातील निरनिराळी कामे करणे. १. (ल.) धसफस करून काम बिघडवणे; नासणे; खराब करणे. २. तिरस्काराने नाकारणे. (उपदेश वगैरे.)
केर
पु. १ कचरा; गवताच्या कड्या; धुरळा; शेण; माती, गवत, पानें इ॰ चा वाईट साईट अंश. २ गाळ; रेंदा; निरुपयोगी पदार्थ; अवशिष्ट भाग. -न. ३ (कों.) बारीक कण; गवत- काडी, कसपट, तुकडा इ॰ (साखरेंतील, धान्यांतील, कापसां- तील). (वाप्र.) ॰फिटणें-कचर्याप्रमाणें उडून जाणें; नाश होणें. 'तेथ भेडांची कवण मातु । कांचया केर फिटतु ।' -ज्ञा १.१३४. ॰फेडणें-नाश करणें. ॰वारा करणें-क्रि. घरांतील निरनिराळीं कामें करणें. ॰वारा करून टाकणें-क्रि. १ (ल.) धसफस करून काम बिघडविणें; नासणें; खराब करणें. २ तिर- स्कारानें नाकारणें (उपदेश वगैरे). सामाशब्द- ॰कचरा-पु. केराप्रमाणें निरुपयोगी पदार्थ, यांस समुच्चयानें म्हणतात. ॰कत- वार-कातर-पु. अडगळ; गाळसाळ; केरकचरा. [केरद्वि.] ॰कसपट-कस्तान-किलच-न. केरकचरा; गवतकाडी; गाळ- साळ. ॰कोंडा-पु. केर व कोंडा; घराची झाडलोट करणें वगैरे सारखीं हलकी नोकरी (उदरभरणार्थ केलेली). ॰कोन-खंड-पु. घरांतील केर सांचविण्याचा कोपरा, कोन. ॰डोक-न. छपरापासून लोंबणारें जाळें; गवताच्या काड्या; जळमट (चालतांना डोक्याला लागतात म्हणून). ॰पट्टी-स्त्री. केरनेणावळ; केर काढण्यासाठीं झाडूवाले जे नेमतात त्यांचा खर्च वारण्यासाठीं बसविलेला कर. ॰पाणी-पोतेरें-न. झाडलोट, पाणी भरणें, सारवणें, सडासं- मार्जन वगैरे बायकांचीं रोजचीं कार्यें. ॰भार-पु. केराचा ढीग. ॰सुणी-सोणी-स्त्री. १ केर झाडण्यासाठीं शिंदीच्या पातींची अगर नारळीच्या हिंराची केलेली झाडणी; वाढवण; सळाथी. २ आयदी स्त्री.; आळशी स्त्री. -वि. नेहमीं बाजूला शेपटी वळविलेला (घोडा); उघडगांड्या पहा. [सं. केर + संवाहनी] म्ह॰ १ केरसुणीच्या काड्या मोडून फळ नाहीं. २ केरसुणी पाहून जांत अन् दिवा पाहून येतं -मसाप ४.४.२७२. ॰सुणीकार-रु-पु झाडलोट करणारा नोकर. 'तंव गोरंभकु नामें केरसुणीकारु ।' -पंच १.२६. केरावारी-केरासमान-वि. टाकाऊ; कवडी किंमतीचा (माल).
केरकसपट
केरकसपट kērakasapaṭa n (केर & कसपट) A general and loose term for a straw, hair, or minute particle.
केसपट
न. केर; बारीक कण. कसपट पहा. [केस + पट]
केसपट
न. केर; बारीक कण. पहा : कसपट
केसपट or केंसपट
केसपट or केंसपट kēsapaṭa or kēṃsapaṭa n (Commonly कसपट) A minute particle; a splint, a straw, a hair &c.
केसर
न. कसपट; केर; बारीक कण; केसपट.
किसार
न. शल्य; कसपट. -शर सोहिमह.
किसार
न. शल्य; कसपट.
किसपट
न. कसपट; बारीक, सूक्ष्म कण (लाकडाचा; गवताची काडी); केसपट, झिलपीचा बारीक तुकडा; कुसळ. [सं. कुश]
किसपट kisapaṭa n (Commonly कसपट) A minute particle (of wood &c.); a straw, a hair, a splint.
किसपट
न. कसपट; बारीक कण (लाकडाची, गवताची काडी); केसपट, झिलपीचा बारीक तुकडा; कुसळ. [सं. कृश]
कुस्काट, कुस्कुट
न. सुके व निरुपयोगी गवत; कूस असलेले गवत; कस्पट; कुस्करलेले किंवा सहज भुगा होणारे गवत. (गो., कु.)
कुस्काट, कुस्कुट
(कु.गो.) सुकें व निरुपयोगी गवत; कूस असलेलें गवत;कस्पट; कुसकरलेलें किंवा सहज भुगा होणारें गवत. [म. कूस + कठ प्रत्यय]
खुसप(पु)ट
न. १ गुप्त दोष; व्यंग; न्यून; चीड येण्या- जोगें किंवा अप्रतिष्ठा व्हावयाजोगें वर्म, चुकी; गुंजावीस; बारीक- सारीक दोष. (क्रि॰. काढणें). २ (अव.) अल्प, क्षुद्र, संदिग्ध टीका, शेरा, भाषण; गोडीगुलाबीनें व निकाल लागेल अशा रीतीनें जास्त महत्त्वाची गोष्ट पुढें मांडण्यासाठीं बोलणें (विनंति, खरडपट्टी); हातीं घेतलेल्या कामापासून परावृत्त करण्यासाठीं काढलेल्या अडचणी; आक्षेप. ३ भांडणास कारण किंवा निमित्त; कळ; कुरापत; खोडी. (क्रि॰ काढणें; निघणें). ॰रचणें- मांडणें-(भांडण उकरून काढण्यासाठीं) एखाद्याचे न कळत झालेले अपराध, चुक्या, व्यंगें ओळीनें पुढें मांडणें, ठेवणें. [कसपट, कुसपट; सं. कुशपत्र ?]
ओसाण, ओसाणे
न. केर; कसपट; पुरात वाहून आलेली वस्तू : ‘वरि तराति ओसाणें । सुखदुःखांचीं ॥’- राज्ञा ७·७१.
तुकडा
खंड, अंश, भाग, विभाग, कांड, पेर, फाळका, काप, मणका, फांटा, कामटी, खांड, काप, चिटोरें, टीचभर तुकडा, कातळा, धांदोटी, चिरोटी, चिंधूक चिरटोळी, पाकळी, पाळें, टोंक, पट्टा, पट्टी, पाट, दुवा, अयन, कला, सर्ग, प्रकरण, टिकली, ढलपी, टक्का, ठिकरी, खापरी, कस्पट, टोला, थोटूक, बुडखा, कळपा, ठिगळ, चतकोर.