मराठी बृहद्कोश

सहा मराठी शब्दकोशांतील २,१८,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

काऊस

पु. १ (व.) उंसाच्या शेंड्याचा नीरस भाग; वाढें. २ (ल.) कुचकामाचा माणूस. म्ह॰ उंसाच्या पोटीं काऊस जन्मला = हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]

दाते शब्दकोश

काउस

न. (व.) एक प्रकारचें गवत. हें शेतांत उगवतें. याच्या मुळ्या १०-१२ फूट खोल जातात. त्या पिकांना त्रास- दायक असतात. [सं. काश]

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

एका तागडीचीं पारडीं

न. अ. (वाक्प्र) सारख्या कौश- ल्याच्या, गुणदोषांच्या (चोरांच्या, लबाडांच्या, खोट्यांच्या) जोडीला म्हणतात; समदुर्गुणी माणसें (निंदाव्यंजक). [एक + तागडी + पारडें]

दाते शब्दकोश

गवत

न. १ तृण; शष्प; याचे पुष्कळ प्रकार आहेत-पवनी, गोंडवळ, कुसळ, मारवेल, वरवेल, सुरी, कुंधा, काशा, काऊस, तिखाडी, करडू, शिपी इ॰ २ घांस; चारा; ज्या वनस्पतीच्या मुळ्या व पानें सर्व प्रकारचीं जनावरें खातात तें. [सं. गो + अत्त; प्रा. दे. गवत्त] (वाप्र.) गवत(ता)ळणें-अक्रि. (कों.) १ गवतानें आच्छादित होणें (नवीन केलेली पाळ, शेत, गवताची हुंडी). २ गवत किंवा रानझाडांनीं गुदमरणें, खुरटणें (पिकांची वाढ). म्ह॰ (व.) गवताची गरव्हार उताणी चाले = एखाद्या जयानें किंवा क्वचितकाळीं झालेल्या धनलाभानें गर्विष्ठ बनून छाती काढून चालणार्‍यास म्हणतात. सामाशब्द- ॰कटाई-स्त्री. १ गवत कापण्यास परवानगी मिळण्याची पट्टी, कर. २ सरकारी पागांकरितां गवतखरेदीचा खर्च भागविण्यासाठीं बसविलेला कर. ३ गवत कापण्याची मजुरी. ४ (सामा.) गवतकापणी. ॰काडी- स्त्री. सामान्यपणें गवत, चारा इ॰ ॰कापी-वि. (निंदार्थीं) लोणीकापी (तलवार, वस्तरा यांची धार बोथट असल्यास त्यास म्हणतात). ॰काप्या-अडाणी न्हावी, शिपाई, कामकरी व त्याचें हत्यार किंवा शस्त्र [गवत + कापणें] ॰चराई-स्त्री. कुरणांतील चरणावळ; चरण्याचें भाडें. गवतशी-स्त्री. (कों.) पेंढ्याची एक काडी. -ताचा उंट-पु. गवत्या टोळ; नाकतोडा; याचे पंख सरळ असून हा काळोख्या रात्रीं झिग झिग करीत हिंडतो. -तारू-वि. गवती छपराचें. 'एक गवतारू खोप रहायातें ।' -केक १५. -ताळ-वि. सपाटून गवत उत्पन्न होणारी (जमीन). विपुल गवत असलेली (जागा). -ती चहा-पु. पातीचा चहा. हा हिरवा व खरखरीत असून याचें सुवासिक तेल काढतात. तापांत घाम येण्यासाठीं हा देतात. याची उंची १-१।। हात. पाती कढींत घालतात. -ती जमीन-स्त्री. गायरान; गवताची जागा. -तुलें-न. (माण.) एक तृणधान्य. -त्या-वि. १ गवता- विषयीं. २ गवतकाप्या; अडाणी. -त्यागोमाजी-पु. (तिरस्का- रार्थी-एक कल्पित विशेष नाम) अलबत्यागलबत्या माणूस. कोणी तरी अप्रसिद्ध, गल्लीकुचींतील माणूस; भलतासलता, बिन ओळखीचा, क्षुद्र, गफलती; गवतकाप्या मनुष्य; गवत्या.

दाते शब्दकोश

कौंस

पु. कंस; वर्तुळाच्या परिघाचा कोणताहि भाग; परिघांश. [अर. कौस = धनुष्य]

दाते शब्दकोश

ऊस, ऊंस

पु. साखर, काकवी, खडीसाखर, गूळ इ. ज्याच्या रसापासून तयार होतात अशी एक ५-६ हात उंचीची वनस्पती; ऊंस हिंदुस्थानांत सर्वत्र होतो. याचे पांढरा, तांबडा, काळा, पुंड्या, पटरी वगैरे प्रकार आहेत. तसेंच १ साल्या = दरसाल गाळला जाणारा; याच्या गुळाचा उतार कमी असतो. २ आड(ढ)साल्या = दीड वर्षानें गाळला जाणारा; याचा गूळ कसदार व रुचकर असतो. ३ खोडवा = जमिनी पासून वीतभर बुंधा राखून तोडतात व त्यास धुमारे फुटून होणारा; याचा गूळ चिकीचा असतो. उसाचा कोणताहि भाग फुकट जात नाहीं. हा समशीतोष्ण आहे. रस थंड असतो. वेडा ऊंस म्हणून एक औषधोपयोगी प्रकार आहे. २ उंसाचा फड; उभें पीक. ' उसांत जाऊन वाढें शोध किंवा आण. ' [सं. इक्षु; प्रा. इक्खु, उच्छु; हिं. ऊख.] ॰म्ह १ ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खावा?; = एखादी गोष्ट चांगली असली म्हणून आपल्या फायद्याकरितां तिचा हवा तसा उपयोग करावा काय? ऊंस गोड पण मुळ्या खोड = एखादा उदार भेटला म्हणून आपण त्याला साराच लुबाडूं नये. ऊस मुळासकट खाल्ला तर मुळापासून दातांना त्रास होऊन रक्त येतें, त्याप्रमाणें एखादा देणारा भेटला व त्याचा फार फायदा घेतला तर तोही त्रासतो. २ (व.) उसापोटीं काऊस = सूर्यापोटीं शनैश्वर. ३ उसांत जाऊन वाढें शोधी, किंवा आणणें. उंसांतलें वाड-१ उसाचा शेंडा, वाढें. २ (ल.) हुषार, होतकरू मुलगा. ॰खतविणें-उसास खत घालणें. ॰साळणें- सोजळणें-उसाचीं पानें-पाती सोलणें.

दाते शब्दकोश