मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

काफला, काफिला

पु. १ प्रवाशांचा, लमाणांचा तांडा; प्रवासी यात्रेकरूंचा तांडा, समूह; कारवान. 'किती येक ते काफले लूटताती' -इमं २४. २ जहाजांचा, गलबतांचा समुदाय; आर- मार. [अर. काफिला; इ. कॉफिला]

दाते शब्दकोश

काफला, काफिला      

पु.       १. प्रवाशांचा, लमाणांचा तांडा; प्रवासी यात्रेकरूंचा तांडा; समूह; कारवान : ‘किती एक ते काफले लूटताती ।’ - इमं २४. २. जहाजांचा, गलबतांचा समुदाय; आरमार. (वा.) काफला करणे - लुटणे. [फा. काफिला]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

काफिला

(पु.) हिंदी अर्थ : यात्रियोंका समूह. मराठी अर्थ : तांडा.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

संबंधित शब्द

समूह

जमाव, झुंड, टोळकें, घोळका, पेंढार, लेंढार, जथा, सैन्य, टोळी, समुदाय, गट, संघ, लोट, रीघ, जनौघ, वरात, चिल्लावळ, गोतावळा, जमात, मंडळ, रांग, दाटी, पथक, कंपू , गर्दी, तुकडी, ताफा, जत्राच, कळप, तांडा, काफिला, मिरवणूक, भेंडोळी, पुंजका , ढीग, गठ्ठा, रास, माळ, चळत, मालिका, घड, फणा, झुबका, गुच्छ, मोठी संख्या.
नर्तिकांचा तांडा, वेटर्सचा ताफा, विद्यार्थिनींचा घोळका, पोरांचें लेंढार, टवाळांचा कंपू , बॅण्डवाल्यांची तुकडी, टारगटांचे टोळकें, नटींचा संच, भुतांचा जमाव, मोहोरांचा ढीग, दिव्यांच्या माळा, ढीगभर रुपये, पैशांची रास, तारकांचा पुंजका, ढगांची दाटी, वाहनांची रांग, नाण्यांची चळत, थैलाभर पैसे, किल्ल्यांचा जुडगा, ता-यांचा पुंज, काड्यांचा जुडा, आगबोटींचा काफिला, केळ्यांचा फणा, द्राक्षांचा घड, पुष्पांचा गुच्छ, पोपटांचा थवा, गाईचें खिल्लार, मुंग्यांची रांग, डासांचें सैन्य, हरिणांचा कळप, भुंग्यांचा थवा, श्वापदांचा जमाव, अळ्यांचा पुंजका, झाडांची गर्दी.

शब्दकौमुदी

आरमारी तांडा      

पु.       लढाऊ गलबतांचा काफिला.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

छबि(बी)ना

पु. १ घोडदळाचा पहारा; रातपहारा. (लष्कर किंवा किल्ला यांच्या भोंवतालचा, लष्कर चालू असतां आघाडीचा, राजा, देव यांच्या मिरवणुकीस असणारा) 'जागो- जाग छबिने भाऊचे । ऐपो ११३. स्वरीमध्यें असणारें घोडदळ किंवा पायदळ. २ आरमारांतील पहारा करणारें जहाज किंवा काफिला. ३ (कु.) कस्टम खात्याची पहारेकर्‍याची जलद जाणारी होडी; सरकारी प्रवासी गलबतः याच्या बांधणींत व आकारांत बराच फरक असतो. [फा. शबीना]

दाते शब्दकोश

छबिना, छबीना      

पु.       १. घोडदळाचा पहारा; रातपहारा (लष्कर किंवा किल्ला यांच्या भोवतालचा तसेच राजा, देव यांच्या मिरवणुकीबरोबर असणारा) : ‘शनिवारवाड्याच्या त्या उत्तराभिमुख प्रवेशद्वारावर छबिन्याचे शिपाई शिस्तीत उभे होते.’ − स्वामी ३. २. स्वारीमध्ये असणारे घोडदळ किंवा पायदळ. ३. आरमारातील पहारा करणारे जहाज किंवा काफिला. ४. आबकारी खात्याची पहाऱ्यावर असलेली जलद जाणारी होडी; सरकारी प्रवासी गलबत. [फा. शबीना]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

काफला

(पु.) [अ. काफिला] प्रवाशांचा अगर लमाणांचा ताण्डा; कार्वाण; समूह (ज़हाजांचा). “कितीयेक ते काफले लूटिताती” (इम २४).

फारसी-मराठी शब्दकोश