आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
कारवा
कारवा kāravā m ( H from Palanquin bearer.) A disguise, or the person assuming it, or the dancing of such a character. The disguise is that of a male in female garb with turban and sword, or that of a female in male attire. v दे, नाच, नाचव.
पु. (नृत्य) स्त्रीचा वेष घेऊन डोकीस पागोटें व कमरेस तलवार लावणारा सोंगाड्या; किंवा पुरुषाचा वेष घेत- लेल्या स्त्रीचें सोंग; असें सोंग घेणारी व्यक्ति; अशा सोंगाड्याचा नाच. (क्रि॰ देणें; नाचणें; नाचविणें). [हिं. काहारवा; काहार = पालखीवाला भोई यावरून]
कारवा
पु. (नृत्य) स्त्रीचा वेष घेऊन डोक्याला पागोटे व कमरेला तलवार लावणारा सोंगाड्या किंवा पुरुषाचा वेष घेतलेल्या स्त्रीचे सोंग; असे सोंग घेणारी व्यक्ती; अशा सोंगाड्याचा नाच. (क्रि. होणे, नाचणे, नाचविणे.) [हिं. कहारवा; काहार = पालखीवाला, भोई यावरून]
संबंधित शब्द
केहरवा
पु. १. केरवा. पहा : कारवा. २. (ताल) याला चार मात्रा व दोन विभाग असतात.
केहरवा
पु. १ केरवा; कारवा पहा. २ (ताल) ह्यास मात्रा चार व विभाग दोन असतात. केरवा पहा.
केहरवा kēharavā m Commonly कारवा.
केरवा
केरवा kēravā m Commonly कारवा.
पु. केरवा नाच. कारवा पहा.
केरवा
पु. केरवा नाच. पहा : कारवा
केरवां
पु० एक प्रकारचा नाच, कारवा.
कहारवा, कहिरवा
कारवा पहा.
कहारवा or कहिरवा
कहारवा or कहिरवा kahāravā or kahiravā See कारवा.
कहारवा, कहिरवा
पहा : कारवा कहारी
कहरवा
कहरवा kaharavā & कहाकी See कारवा & काकवी.
कहरवा, कहरवी
पहा : कारवा कहरी, कहऱ्या, कहारी
कहरवा, कहरवी
कारवा पहा.
करवा
करवा karavā m A morsel of sugarcane as prepared for the mouth. Applied with the verb पडणें to a limb or part considered as broken off. Ex. हाता- चा क0 or कंबरेचा क0 पडला. 2 A hollow notched as a channel for the reception of a rope. 3 (Better कारवा) A description of dance. 5 A flaw upon a pearl,--a line roundabout its middle.
पु. नृत्यांतील एक प्रकार; कारवा, केरवा नाच. यांत वेषपरिवर्तन केलेलें असतें. 'त्या दिवशीं गाणें व करवा नाच पाहून दरबार फार खुष झालें.' -धर्माजी ९०. [सं. करव]
करवा
पु. नृत्यातील एक प्रकार; कारवा, केरवा नाच. यात वेषपरिवर्तन केलेले असते : ‘त्या दिवशीं गाणें व करवा नाच पाहून दरबार फार खुष झालें.’ - धर्माजी ९०. [सं. केरव]