मराठी बृहद्कोश

तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह

शब्दार्थ

काहार

पु. फार त्रास. कहर पहा. 'पोटें पिटिलें काहारें ।' -तुग ६५४. 'बळी सर्वस्वें उदार । जेणें उभारिला कार । करूनि काहार । तो पाताळीं घातला ।' -तुगा १२५१.

दाते शब्दकोश

काहणी and काहार See कहाणी and कहार.

वझे शब्दकोश

पु. कार दगड पहा. जेथें पाण्याचा मार विशेष होतो (पूल वगैरे जागीं) तेथें हा उपयोगांत आणतात.

दाते शब्दकोश

पु. भोई; कोळी; कहार पहा. 'काहारीं मग जाळियांत धरिला तो मत्स्यही चांगला' -अकक कृष्णकौतुक २.२६.

दाते शब्दकोश

काहार      

पहा : कार. जेथे पाण्याचा मार विशेष होतो (पूल वगैरे जागा) तेथे हा दगड उपयोगात आणतात. काहार      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       फार त्रास; ताप. पहा : कहर : ‘पोटें पिटिलें काहारें ।’- तुगा ६५४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       भोई; कोळी. पहा : कहार : ‘काहारीं मग जाळियांत धरिला तो मत्स्यही चांगला ।’ - अकक कृष्णकौतुक २·२६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

काहाडणी, काहाडणें, काहाणी, काहात, काहार, काहाली

हे शब्द कहामध्यें पहा.

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

गरीर      

वि.       उर्मट : ‘थोरली बायको काहार गरीर असता....’ - पेसाप ९५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कारवा

पु. (नृत्य) स्त्रीचा वेष घेऊन डोकीस पागोटें व कमरेस तलवार लावणारा सोंगाड्या; किंवा पुरुषाचा वेष घेत- लेल्या स्त्रीचें सोंग; असें सोंग घेणारी व्यक्ति; अशा सोंगाड्याचा नाच. (क्रि॰ देणें; नाचणें; नाचविणें). [हिं. काहारवा; काहार = पालखीवाला भोई यावरून]

दाते शब्दकोश

कारवा      

पु.       (नृत्य) स्त्रीचा वेष घेऊन डोक्याला पागोटे व कमरेला तलवार लावणारा सोंगाड्या किंवा पुरुषाचा वेष घेतलेल्या स्त्रीचे सोंग; असे सोंग घेणारी व्यक्ती; अशा सोंगाड्याचा नाच. (क्रि. होणे, नाचणे, नाचविणे.) [हिं. कहारवा; काहार = पालखीवाला, भोई यावरून]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)