मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

कुडावा

पु. १ (काव्य) कूड; कार्वी, झिलप्या वगैरेवर माती लिंपून केलेली भिंत. [कुड] २ (ल.) रक्षण; थारा; पाठ- पुरावा. 'करी संकटीं सेवकाचा कुडावा ।' -राम ६७. 'धावोनि त्यांचा करी कुडावा ।' -निगा ११८. 'तैं कुडाविला जाणा कंस । पति तुमचा ।' -कथा २.२.५१. [सं. कुण्ड् = रक्षण करणें]

दाते शब्दकोश

पु. (कु.) एक खाण्यास योग्य पक्षी.

दाते शब्दकोश

कुडावा      

पु.       १. कुड; कार्वी, झिलप्या वगैरेवर माती लिंपून केलेली भिंत. २. (ल.) रक्षण; थारा; पाठपुरावा : ‘करी संकटीं सेवकाचा कुडावा ।’ - राम ६७. [सं. कुण्ड = रक्षण करणे]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       एक खाद्य पक्षी. (कु.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

कुढावा

कुडावा अर्थ २ पहा. 'तुका म्हणे देवा माझा करावा कुढावा ।' -तुगा ११८८.

दाते शब्दकोश