आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
कैक
कैक a Many a one, many.
कैक kaika a Many a one; many.
वि. पुष्कळ, बहुत.
वि. पुष्कळ; कित्येक. [कतिपय एक प्रा. कइअक = निकर, समूह?]
कैक
वि. पुष्कळ; कित्येक. [सं. कतिपय + एक]
संबंधित शब्द
घुमणें
अक्रि. १ (तोफ इ॰ कांचा व गंभीर शब्द) दुमदुमणें; दणाणणें; घोषणें; प्रतिध्वनियुक्त होणें; हवेंत भरून राहाणें. 'जंव नाशु नाहीं पवना । तंव वाचा आथी गगना । म्हण- ऊनि घुमें । -ज्ञा ६.२७८. २ (वाद्यें इ॰ कानीं) आंतल्या आंत बराच वेळ खोल आवाज काढणें. ३ (वाद, गप्प, आजार, आवाज, खेळ इ॰) रेंगाळणें; लांबत जाणें; चिघळणें; रेंगणे. ४ (पिशाच्चसंचारामुळें, थंडीच्या हुडहुडीमुळें, अति श्रमामुळें, रेंगाळलेल्या दुखण्यामुळें, हरिक इ॰ कांचा माद चढल्यानें) हूं हूं करणें; धापलणें; उपासणें; लाहक्या देणें; धापा, सुस्कारे टाकणें; कुंथणे. 'तरवारीनें कैक मेले कैक घायाळ तिथें घुमती ।' -विवि ८.४. ८०. ५ (हरीक इ॰ धान्य, पदार्थ) चिवचिवणें; उमळणें; खतखतणें; फसफसणें. 'हे हरीक कांहीसें घुमतात, निवळले म्हणजें चांगलें होतील.' ६ (अंगात संचारलेलें भूत) चेष्टा करूं लागणें; खेळणें; हालचाल करणें. ७ (पारवे इ॰ पक्ष्यांनी आपला) घूंघूं असा आवाज करणें (पक्ष्यांनीं) तार- गंभीर आवाज करणें, गाणें. 'जेंवीं घुमती पारवें पंक्ती । तेवीं वाजति पादभूषणें ।' 'पंचमस्वरें पक्षी घुमती । राघव स्मरणें गर्जोनिया ।' ८ (एखाद्या गोष्टीची) बराच काळ बोलवा असणें. 'ते वाडा बांधणार हें वर्षभर घुमत आहे.' ९ (एखादी गोष्ट गुप्तपणें) कर्णोपकर्णीं पसरणें; पसरलेली असणें. 'तिनें पोट केलें आहे हें वर्तमान दोन महिने गांवांत घुमत आहे.' १० लवकर पुरें व्हावें म्हणून चालू झालेलें कार्य लांबणीवर पडणें. तें काम चालू होऊन पांच वर्षें झालीं, अझून घुमतेंच आहे, समा प्तीस गेलें नाहीं.' [सं. घूर्णन; प्रा. घुम्म, घुम्मण; सिं. घुमणु]
क
वि. कैक; कित्येक; पुष्कळ. [कई + एक. कतिपयः एक:]
घुमणे
अक्रि. १. पहा : घुमघुमणे ‘जंव नाशु नाहीं पवना । तंव वाचा आथी गगना । म्हणौनि घुमे ।’ – ज्ञा ६·२७८. २. (वाद्ये इत्यादिकांनी) आतल्या आत बराच वेळ खोल आवाज काढणे. ३. (वाद, गप्प, आजार, आवाज, खेळ, काम इ.) रेंगाळणे; लांबत जाणे; चिघळणे; रेंगणे. ४. (पिशाच्चसंचारामुळे, थंडीच्या हुडहुडीमुळे, अतिश्रमामुळे, रेंगाळलेल्या दुखण्यामुळे, हरीक इत्यादिकांचा मांद चढल्याने) हूं हूं करणे; धापलणे; उसासणे; लाहक्या देणे; थापा, सुस्कारे टाकणे; कुंथणे : ‘तरवारीनें केक मेले कैक घायाळ तिथे घुमती ।’ विवि ८·४·८०. ५. (हरीक इ. धान्य पदार्थ) चिवचिवणे; उमळणे; खतखतणे; फसफसणे. ६. (अंगात संचारलेले भूत) चेष्टा करू लागणे; खेळणे; हालचाल करणे. ७. (पारवे इ. पक्ष्यांनी आपला) घूं घूं असा आवाज करणे; (पक्ष्यांनी) तारगंभीर आवाज करणे, गाणे. ८. (एखाद्या गोष्टीचा) बराच काळ बोलवा असणे. ९. (एखादी गोष्ट गुप्तपणे) कर्णोपकर्णी पसरणे; पसरलेली असणे. [सं. घूर्णन]
इजा, बिजा, तिजा
अ. १ एकामागूनएक असें तीन वेळां; दोनदां झालें कीं तिसर्यांदां झालेंच पाहिजे अशा कल्पनेनें तिसर्या वेळीं वापरतात. -स्वप ६७. (क्रि. होणें; सांगणें) २ (ल.) वारंवार; कैक वेळां. [बीजूं, तीजुं हे दोन व तीन या अर्थीं गु. व बिजा, तिजा, हे हिंदी शब्द यांस जुळणारा असा एक इजा शब्द या अर्थीं केलेला दिसतो; तुल॰ का. इज = दोन]
इजा बिजा तिजा
अ. १. एका मागून एक असे तीन वेळा; दोनदा झाले की तिसऱ्यांदा होतेच अशा कल्पनेने तिसऱ्या वेळी वापरतात. (क्रि. होणे, सांगणे). २. (ल.) वारंवार; कैक वेळा.
जंग
वि. पुष्कळ : ‘गर्जति कवि (कैक) जंग’ – (गंगु हैबती) मला ७५.
कै, कैं
कोठे : ‘तरि मागिला जुंझी राणे । कै गेलें होते ।’ - शिव ९१५. [सं. क्व] कैक
कईक
कैक पहा.
पाणी
न. १ उदक; जीवन; जल; सलिल. 'पाणियां छाय दुनावली । परिमळाचि ।' -शिशु ६२८. 'चोखे पाणिया न्हाली ।' -वसा २५. २ पाऊस; पर्जन्य. ३ हत्यारें भट्टींत तापवून नंतर तीं पाण्यांत बुडवून त्यांच्या आंगीं आणिलेली दृढता. (क्रि॰ देणें; चढविणें; उतरणें). ४ (ल. एखाद्याच्या अंगांतील) धमक; अवसान; वीर्य; शक्ति; तेज. 'आलें न रजपुतांचें परि यवनां सर्व हरवितां पाणी ।' -विक ६८. ५ (मोत्यें, रत्न, हिरा इ॰कांचें) तेज; कांति; झकाकी. 'नाना मुक्ताफळांचें पाणी ।' -दा १६.४.१६. ६ चेहऱ्यावरील टवटवी; कांति; तजेला. ७ धातूंचें भांडें इ॰कांस सोनें, चांदी इ॰कांचा देतात तो मुलामा; झिलई. ८ शस्त्र इ॰ घासून त्याच्या धारेस आणलेली तीक्ष्णता; कडकपणा.(क्रि॰ देणें; पाजणें). 'नाना शस्त्रांमधें पाणी ।' -दा १६.४.१६. ९ अब्रू; लौकिक, कीर्त्ति. (क्रि॰ जाणें; उतरणें; चढणें). १० (राग, गाणें इ॰कांची) नीरसता; रुक्षपणा; रसहीनता. ११ (डोळ्यांतील) चमक; तेज. १२ अश्रू. 'दुर्गा देवीच्या डोळ्यांतून पाणी येऊं लागलें.' -विवि ८.३.४९. पाणी याचें समासांत पूर्वपदीं 'पाण' असें रूप होऊन अनेक सामासिक शब्द होतात. उदा॰ पाणकोंबडा, पाणघोडा, पाणलोट इ॰ सामासिक शब्द पहा. [सं. पानीय; प्रा. पाणिअ; गुज. पाणी; हिं. पानी; फ्रें. जिप्सि. पनी; पोर्तु जिप्सी. पानी] (वाप्र.) ॰उतरणें-१ पराभूत, पराजित होणें. 'पाणिपतच्या लढाईनंतर मराठ्यांचें पाणी उतरल्या- नंतर निजमास संधी सांपडली.' -विवि ८.६.१०९. २ अब्रू जाणें; अपकीर्ति होणें. 'ज्या स्नेहानें पाणी उतरतें, तो स्नेह रुपयें पाण्यांत टाकून राखावा, त्यापेक्षां रुपये राखावे हें फार चांगलें आहे.' -बाळ २.३. ३ (डोळे इ॰कांतील) तेज, चमक, कमी होणें. 'तिच्या सतेज डोळ्यांचें पाणी उतरूं लागलें.' -पाव्ह ५४. ॰ओळखणें- जोखणें-(एखाद्याच्या अंगांतील) गुण, धमक, धैर्य, विद्वत्ता इ॰ कल्पनेनें ताडणें. (अंगाचें, रक्ताचें) ॰करणें-अतिशय खपणें; कष्ट करणें; फार मेहनतीनें (एखादें काम, कर्तव्य इ॰) करणें. म्ह॰ रक्ताचें पाणी हाडाचा मणी. ॰काढून टाकणें-सक्रि. (रसा.) (एखाद्या पदार्थांतील) द्रव, द्रवांश नाहींसा करणें, घालविणें. (इं.) डीहायड्रेट्. ॰कोंडणें-(सैन्य इ॰कांचें) पाणी बंद करणें; त्यास पिण्यास पाणी मिळूं न देणें. 'कडबा दाणा बंद कोंडिलें पाणी कहर वर्षला ।' -ऐपो २३६. ॰घालणें-१ (बायकी) (विटाळशी इ॰ स्त्रीस जेवतांना) पाणी वाढणें, देणें. २ (बायकी) (विटाळशीस, बाळंतिणीस स्नान घालून शुद्ध करून घेणें. ३ नाश करणें; खराबी- करणें; गमावून बसणें. 'ह्यानें आपल्या हातानें आपल्या रोजगारावर पाणी घातलें,' ४ (ल.) (एखाद्या गोष्टीच्या) अभिवृद्ध्यर्थ प्रयत्न करणें, जोपासनेबद्दल उपाय करणें. ५ (एखाद्या वस्तूवर) पाणी सोडणें; त्याग करणें. ६ (कों.) सर्पाचें विष उतरविण्यासाठीं सर्प चावलेल्या मनुष्यास मंत्रित पाणी पिण्यास देणें व अंगावर घालणें ७ वृक्ष इ॰कांच्या वाढीला जरूर तें पाणी त्यांच्या मुळांशीं ओतणें. ॰चढणें-महत्त्व प्राप्त होणें; वीरश्री, त्वेष संचरणें. 'थोरासंगें दुर्बळास पाणी चढे ।' -पला ४.१९. ॰छाटणें-कापणें-१ (पोहणारानें, बोटीनें आपल्या अंगच्या जोरानें) पाणी दुभंगलें पुढें सरणें. २ (पोहणाराच्या, नावेच्या) गतीमुळें पाणी दुभंगलें जाणें. ॰जाळणें-(ल.) करडा अंमल चालविणें; क्रूरपणाचीं कृत्यें करणें. ॰जोखणें-ओळखणें-(एखाद्याची) कर्तृत्वशक्ति, धमक, विद्वत्ता, पराक्रम इ॰ अजमावणें. ॰तावणें-(एखाद्याच्या नांवानें, नांवा- वर, नावांविषयी इ॰ शब्दांसह प्रयोग असल्यास-एखाद्याचें) मरण, अनिष्ट इच्छिणें. (शवदहनासाठीं नेतांना तें उचलण्यापूर्वी, पाणी तापवून त्यास स्नान घलितात त्यावरून हा अर्थ). ॰तुटणें-(पोहणाराच्या, नावेच्या गतीनें) पाणी दुभंगलें जाणें. 'पेनोवेणां दळ बहुतें मीनलें । वाटे पाणी तुटलें ।' -शिशु ५७८. ॰तुंबविणें-(धरण इ॰ बांधून) पाणी कोंडून धरणें. ॰तोडणें- पाणी छाटणें अर्थ १ पहा. ॰दाखविणें-(कर.) (शेतकऱ्यांत रूढ) (गुरांस) पाणी पाजून आणणें; पाण्यावर नेणें ॰देखील न घोटणें-(एखाद्याचे) प्राण कंठीं येणें; मरणासन्न होणें; पाणी घशाखालीं उतरण्याइतकाहि अवकाश, धीर नसणें. ॰देणें-१ पोलादाच्या अंगी नरमपणा, कडकपणा, चिवटपणा इ॰ निरनिराळे गुण आणण्यकरितां तें भिन्न भिन्न ठराविक प्रमाणांत तापवून पाण्यांत बुडविणें. या क्रियेचे कडक पाणी, नरम पाणी, जांभळें पाणी, पिवळें पाणी इ॰ निरनिराळे भेद आहेत. -ज्ञाको प ७४. 'पाणी देण्याच्या कृतीनें लोखंडांत फेरफार होतात.' पदाव १.१५५. २ शस्त्र इ॰कांस धार लावणें. ३ (मृताचा) श्राद्धविधि करून (त्याला) तिलांजलि देणें; (सामा.) तर्पण करणें. ॰देणें-सोडणें-१ (एखादी वस्तु इ॰) गमावून बसणें. २ सोडून देणें; आशा सोडणें; (वस्तू इ॰कांचा) उत्सर्ग करणें (एखाद्या वस्तूचें दान देतांना तीवर थोडेसें पाणी-आपला हक्क नाहींसा करण्याचें द्योतक म्हणून-सोडण्याचा प्रघात आहे त्यावरून हा अर्थ). (कर्माला 'वर' अथवा 'ला' हे प्रत्यय लावून प्रयोग). 'मागें एक पुढें एक । दोनी मिळुनि विठ्ठल देख । ऐसी होतांचि मिळणी दिलें संसारासि पाणी ।' -एकनाथ ॰पडणें-फुकट जाणें; निरुपयोगी होणें; खराब होणें; दर्जा, गुण, महत्त्व, उपयुक्तता इ॰ बाबतींत मागें पडणें; नाश पावणें. कर्म- स्थानीं असलेल्या शब्दास 'वर' हें शब्दयोगी अव्यय जोडून प्रयोग जसें:-रोजगारावर-पोटावर-संसारावर-कामावर-स्नेहावर-पाणी पडलें. 'त्या कार्यावर तर सर्वस्वीं पाणीच पडलें असतें .' -इंप ८. ॰पाजणें-१ (मृतास) तिलांजली देणें; प्रेतदहन होत असतांना प्रेताच्या कपाळमोक्षानंतर चितेभोवतीं सच्छिद्र मडक्यानें पाण्याची धार धरणें; श्राद्ध इ॰ करून तर्पण करणें. २ (ल.) (एखाद्यास) मरेमरेतों खूप मारणें, बडवणें. (१ ल्या अर्थावरून रूढ). ३ पराजित करणें; जिंकणें; चीत करणें. ॰पाणी करणें-१ तहानेनें 'पाणी द्या' 'पाणी द्या' असें म्हणत सुटणें; एकसारखें पाणी मागत राहणें. २ (एखादें जनावर मनुष्य इ॰कांस फार) राबवून, पादाडून बेदम करणें. ३ (अन्न, वस्त्र, पदार्थ इ॰कांची) पूर्णपणें नासाडी करणें. ॰पाणी होणें-१ पुनःपुन्हां पाणी पिण्याची प्रवृत्ति (मिष्ठान्न खाण्यानें, उन्हाच्या त्रासानें) होणें. २ (एखाद्या वस्तूचा) नाश, खराबी होणें. 'हे कठोर मांस झडून जाईल तर किंवा याचें पाणी पाणी होईल तर किती बहार होईल.' -विकार- विलसित ॰पिऊन भांडणें-वाद करणें-(ल.) नेटानें व जोराजोरानें, आवेशानें भांडणें. ॰फिरणें-(बडोदें) व्यर्थ, फुकट जाणें; पाणी पडणें पहा. 'सेनापतीच्या चातुर्यावर व सैनिकांच्या शौर्यावर पाणी फिरतें.' सेवामाहात्म्य १०. ॰भरणे-वाहणें- घालणें-(एखाद्याच्या घरीं विद्वत्ता, संपत्ति, विशिष्ट व्यक्ति इ॰कानीं) बटकीप्रमाणें राबणें; दास्य पत्करून राहणें; वश असणें (एखाद्याच्या घरीं या शब्दासह प्रयोग). 'रूपाचेनि आहे । ऐरावतु पाणि वाहे ।' -शिशु ५०८. 'उद्योगाच्या घरीं ऋद्धिसिद्धि पाणी भरी ।' ॰मरणें-१ (एखाद्याचें) धैर्य गळणें; गर्भगळित होणें; धाबें दणाणणें. २ एखाद्या गोष्टींत किंवा हिशेब, भाषण इ॰कांत) खोटेपणा, पोकळपणा, लबाडी इ॰ असणें. ॰मागूं न देणें-एकदम, तडाक्यासरशीं ठार करणें (मरतांना पाण्याकरितां मनुष्य तडफडतो, पाणी मागत असतो त्यावरून हा वाक्प्रचार). 'तुला मी बडविलें तर पाणी मांगू देणार नाहीं.' ॰मारणें- पाणी कापणें-छाटणें पहा. ॰मुरणें-१ (एखाद्याचें भाषण, वर्तन इ॰कांत कांहीं तरी संशयास्पद असा) कमीपणा, वैगुण्य, दोष, मर्मस्थान असणें. २ भिंत वगैरेंत पाणी जिरणें. ॰लागणें-१ वाईट पाणी पिण्यांत आल्यानें आजारी होणें; पाणी बाधणें. 'कैक जणाला पाणी लागलें मासोळी मागें खारी ।' -ऐपो ३५४. २ ज्याची संगति धरली असेल त्याचे किंवा जेथें कांहीं काळ रहिवास आला असेल त्या ठिकाणचे गुणदोष, ढंग अंगीं जडणें. (आंत) ॰शिरणें-(धंदा, रोजगार, काम इ॰कास) अवदशा; उतरती कळा येणें; नासाडी होणें; फसगत होणें; आंत बट्यांत येणें. ॰शोषून घेणें-(रसा.) (एखाद्या पदार्थांतील) द्रव रस शोषून घेणें; (इं.) डेलिक्विस्. ॰सारणें-(व.) आंघोळीसाठीं पाणी उपसणें. ॰सोडणें-१ (ब्राह्मणास दिलेल्या दानावर पाणी सोडलें म्हणजे दानाची सांगता होऊन त्यावरचें आपलें स्वामित्व नाहींसें होऊन ब्राह्मणाकडे जातें या धार्मिक कल्पनेवरून पुढील अर्थ) (एखादी वस्तु) स्वेच्छेनें कायमची देऊन टाकणें; (एखाद्या वस्तूचा) त्याग करणें. 'हे स्त्री नव्हे प्रतिष्ठा तुमची जरि ईस सोडितां पाणी ।' -मोविराट १.१०३. २ (ल.) (एखाद्या वस्तूची) आशा सोडणें, ती गेली असें समजून स्वस्थ बसणें. ३ (एखादी वस्तु, भावना इ॰) नाइलाजास्तव सोडण्यास, तिच्याकडे दुर्लक्ष कर- ण्यास, विसरून जाण्यास, नाश करावयास तयार व्हावें लागणें. 'परि त्याहीं आम्ही त्या प्रेमासि रणांत सोडिलें पाणी ।' -मोद्राण १७.९०. ॰होणें-(एखाद्या वस्तूची) खराबी, नाश होणें; नाहींसें होणें. 'त्या दुःखाचें तुमच्या दर्शनानें पाणीच होऊन गेलें.' -रत्न ५.२. पाण्याआधीं वळण बांधणें-नदी, ओढा इ॰कास पूर येण्यापूर्वींच पुराच्या पाण्याचा निकाल लाव- ण्याची व्यवस्था करणें. २ (ल.) भावी संकटाची उपाययोजना आधींच करून ठेवणें. 'पाण्याआधीं वळण बांधितां उत्तम. नाहीं तर शेणामेणाचे लोखंडाचे जालियावर पुढें भारी पडेल.' -भाव ८३. पाण्याचा कांटा मोडणें-अग्निसंयोगानें पाणी कोमट होणें, करणें (अतिशय थंड पाणी अंगावर घेतल्यास अंगावर कांटा उभा राहतो, किंवा तें अंगाला कांट्याप्रमाणें बोचतें ह्यावरून वरील अर्थ). पाण्यची गार गोठणें-पाणी गोठून बर्फ होणें. पाण्यांत घाम येणें-(एखाद्यानें) अतोनात संतापणें; रागानें अंगाचा भडका होणें. पाण्यांत घालणें-बुडविणें; नाश करणें; खराब करणें. 'संसार घातला पाण्यांत । स्वतें समस्त बुडविलें ।' पाण्यांत जाणें-व्यर्थ होणें; फुकट जाणें. 'नानाची मुत्सद्देगिरी सारी पाण्यांत जात असली तर ...' -नि. पाण्यांत दिसणें-(ल. एखादी व्यक्ति एखाद्याच्या) द्वेषास पात्र होणें, असणें.पाण्यांत पडल्यासारखें होणें-फजीत होणें; लाजिरवाणें होणें. 'मग देवाला लाज वाटली. पाण्यांत पडल्यासारखें झालें.' -नामना ६९. पाण्यांत पाहणें-(एखाद्याचा एखाद्यानें) अतिशय द्वेष करणें (एखाद्याचा कट्टा शत्रु किंवा त्याला ज्याचा अतिशय दरारा आहे अशी व्यक्ति भीतीमुळें त्यास सर्वत्र जळीं, स्थळीं, काष्ठीं, पाषाणीं दिसूं लागते त्यावरून). पाण्यानें वाती पाजळणें-(महानु.) अशक्य गोष्ट शक्य करूं पाहणें. 'अवो दुजी कनुधार लागती । तरि पाणिअ/?/ वाति पाजळती ।' -शिशु ६७५. पाण्यापेक्षां, पाण्याहून पातळ करणें-(एखाद्याची) फजिती, पाणउतारा, तेजोभंग करणें; फार लाजविणें. 'नामचि करि पाण्याहुनि पातळ यश भास्करादि तेजांचे ।' -मोवन १२.५०. पाण्यावर घालणें- नेणें-(कर.) (गुरांना) पाणी पाजण्यासाठीं विहीर, नदी इ॰कांवर नेणें. पाण्यावर लोणी काढणें-(कर. ल.) अतिशय कंजूषपणा करणें. गळ्याशीं पाणी लागणें-१ पाणी गळ्यापर्यंत येणें. २ (कर्ज इ॰ गोष्टींची) पराकाष्ठा होणें. दुसऱ्याच्या ओंजळीनें पाणी पिणें-१ दुसरा पाजील तेवढेंच पाणी पिऊन स्वस्थ बसणें. २ (ल.) दुसरा सांगेल तसें मुकाट्यानें वागणें. उन्हा पाण्यानें घर जाळणें-जळणें-(ल.) खोट्या आरोपानें, निंदेनें रसातळास नेणें, जाणें; (एखाद्याचा) नाश करणें, करूं पाहणें, होणें (अकरण- रूपांत योजितात व हें घडणें अशक्य असें दर्शवितात). खोल पाण्यांत शिरणें-१ आपल्या आवांक्याबाहेरचें काम शिरावर घेणें. २ (एखाद्या गोष्टीची) फाजील चिकित्सा करणें. ३ (एखादें गूढ, गुपित) उकलण्याचा प्रयत्न करणें. पाणी केस तोडतें- पाण्याच्या अतिशय जोराच्या प्रवाहाचें वर्णन करतांना योजितात. पाणी खाल्लेला-वि. पाण्यांत ठेवल्यामुळें आंत पाणी मुरलेला. पाण्यांतील पावप्यादे-जलसंचारांत प्रवीण; आरमारांतील प्रबळ लोक. 'इंग्रज लोंक पाण्यांतील पावप्यादे.' -इतिहाससंग्रह-ऐति- हासिकचरित्र ११५. पाण्यापाण्यानें-क्रिवि. नदीच्या कांठा- कांठानें. पाण्यापेक्षां शीतळ-वि. अत्यंत सोशीक; सौम्य; शांत; गंभीर स्वभावाचा. पाण्यावर-क्रिवि. नदीच्या कांठीं. 'कऱ्हेच्या पाण्यावर.' -ख ३१९३. पाण्यावरचा बुडबुडा, पाण्या वरची रेघ-पुस्त्री. (ल.) क्षणभंगुर, अशाश्वत वस्तु. क्षणभंगुरता- दर्शक इतराहि वाक्प्रचार आहेत ते पुढें दिले आहेत:-जलबुद्बुद; धुळीवरचें सारवण; दुपारची सावली; विजेचें चमकणें; विजेसारखा; वीजच; अभ्रच्छाया; आभाळाची सावली; कमलिनीवरचा बिंदु; काजव्याचा उजेड; खुंटावरचा कावळा; तेरड्याचा रंग (तीन दिवस); शिराळशेटाचें राज्य; आवाहन व विसर्जन बरोबर; औट घटिकेचें राज्य; घडीचें, घटिकेचें घड्याळें; उपळवणी; तृणाचा शेक; पुष्करपत्रतोयतरल; पळतें पीक इ॰. 'चिताडसी कां? चित्र जिवाचें पाण्यावरच्या रेघांनीं ।' -वाग्वैजयंती-गोविंदाग्रज. पाण्यास आश्रय-आसरा-पु. अतिशय तहानेल्यानें उपाशे पोटीं पाणी पिणें आरोग्यदृष्ट्या अनिष्ट असतें, म्हणून आधीं अन्नाचे एक दोन घांस खाऊन नंतर पाणी पितात. अन्नाच्या ह्या दोन-तीन घांसांस, अल्पांशास उद्देशून हा वाक्प्रचार योजतात.म्ह॰ १ पाण्यांत राहून माशांशीं वैर करूं नये = आपल्या कार्यक्षेत्रांतील मंड- ळीशीं वैर करूं नये. त्यांच्याशीं मिळूनमिसळून वागण्यांतच फायदा असतो. २ (हिं.) पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया वैसा = जशी वेळ येईल तसें वागणें. ३ पाण्यापासून जवळ सोयऱ्यापासून दूर = मनुष्यानें पाण्याच्या जवळ राहणें सोईचें असतें, तसेंच सोयऱ्या- पासून दूर रहावें म्हणजे प्रेमांत बिघाड करणाऱ्या गोष्टी टाळतां येतात. ४ पाण्यांत म्हैस बाहेर मोल = अनिश्चित, आगामी गोष्टी- विषयीं, निरर्थक चर्चेस, चिकित्सेस उद्देशून ही म्हण योजितात. सामाशब्द- पाणआघाडा-पु. आघाड्याची एक जात. हा आघाडा सूज, कफ, खोकला, वायु, शोष यांचा नाश करतो. -वगु १.९. [पाणी + आघाडा] ॰उतार-पु. १ नदींतून चालून जातां येण्याजोगा, कमी पाणी असलेला मार्ग. २ (नदी इ॰काचें) ओसरणें; कमी होणें. 'गंगेसि भंग बहु पाणउतार होतो ।' -र २. [पाणी + उतार] ॰उतारा-पु. १ मानखंडना; तेजोभंग; अपमान; क्षुद्रपणानें लेखून (एखाद्याची) केलेली विडंबना; अवहेलना. २ (क्व) पाणउतार पहा. [पाणी + उतरणें] ॰कणीस-न. ओहळांत, ढोंपरभर पाण्यांत कसईच्या झाडाप्रमाणें होणारें पुरुषभर उंचीचें एक झाड. याचीं पानें बाजरीच्या पानांसारखीं असून याचें कणीस बाजरीच्या कणसासारखेंच असतें. हें कणीस वाळवून त्यावरील कापूस चकमक पेटविण्यास घेतात. हें तेलांत बुडवून पेटविलें असतां काकड्याप्रमाणें जळतें. -वगु ४.६२. रामबाण. ॰कसर-स्त्री. पाटस्थळाच्या पाण्याकरील कर, पट्टी. 'गांवची पाणकसर गेल्यावर्षापासून दीडपट वाढविण्यांत आली.' -के १९.७.३०. [पाणि + कसर] ॰काठी- स्त्री. १ (गो.) विहीरींतून पाणी बाहेर काढण्याचें एक साधन. ओकती पहा. २ (ल. गो.) उठाबशी. [पाणी + काठी] ॰काडो- पु. (कु.) शेतांस पाणी काढून पैरीप्रमाणें आळीपाळीनें वाटून देणारा; पाणकाढा. हा शेतकऱ्यांनीं आपसांत पाण्याविषयी तंटा होऊं नये म्हणून निवडलेला असतो. [पाणी + काढणें] ॰कापड- न. जखमेवर, शरीराच्या कापलेल्या भागावर बांधतात ती ओल्या वस्त्राची चिंधी. [पाणी + कापड] ॰कांदा-कंद-पु. नदींत होणारा एक विशिष्ट कंद. यास नागदवणीच्या फुलासारखीं फुलें येतात. -वगु ४.६३. [पाणी + कांदा] ॰कावळें-न. (विशेषतः गुरांची) गर्भोदकाची पिशवी. पाणकी-स्त्री. पाणी भरण्याची मजुरी कर- णारी स्त्री. 'कुणि विधवा ठेविता घरामधें पाणकी ।' -ऐपो ३६९. पाणकुकडें-कोंबडें-न. घशांत किंवा जिभेच्या खालच्या बाजूस होणारा एक विकार. ॰कुक्कुट-पु. (महानु.) पाणकोंबडा. 'चंद्र चकोरा चोखटीं । वोळे अमृतधारी आतुटी । ते गोडपणें पाण- कुक्कुटी । लाहिजे कैसा ।' -ऋ ५२. [पाणी + सं. कुक्कुट = कोंबडा] ॰कोंबडा-डें-पुन. १ जलचर पक्षी. 'पाणकोंबडे कोंबडे । वडवाघुळा घुबडे ।' -दावि २४४. २ चंद्राभोवतालीं पडणारें खळें. [पाणी + कोंबड] ॰केश-पुअव. शेवाळ. ॰कोंबडी-स्त्री. एक जलचर कोंबडी. ॰कोळी-पु. मासे खाणारा एक पक्षी. -प्राणिमो ५७. ॰क्या-पु. १ लोकांच्या घरीं पाणी भरून त्यावर उपजीविका करणारा मनुष्य. 'एखादा पाणक्या नवरा मिळता तरी पतकरता.' -मोर ३४. २ (ल.) निरक्षर व धटिंगण मनुष्य. [सं. पानीयक-पाणकअ-पाणका-पाणक्या. -राजवाडे (ग्रंथ- माला).] ॰खार-पु. (कों.) उकडआंबे इ॰ खारविण्यासाठीं पाण्यांत मीठ घालून केलेला खार. [पाणी + खार] ॰गहूं-पु. मोटेच्या, पाटाच्या पाण्यानें होणारा गहूं. [पाणी + गहूं] ॰घर- न. १ पाणी तापवून स्नान करण्याकरितां असलेली खोली; न्हाणी- घर. २ विहीर इ॰ खणतांना जेथें पाणी लागतें तो जमिनींतील खोल थर. [पाणी + घर] ॰घोडा-पु. आफ्रिका खंडांत मोठ्या नद्यांत, सरोवरांत आढळणारा एक अजस्त्र पण निरुपद्रवी प्राणी. याचा रवंथ करणाऱ्या प्राण्यांत समवेश होतो. याचा रंग काळसर तपकिरी असतो. याच्या कातड्याच्या ढाली करतात. -ज्ञाकोप ६७. (इं) हिपॉपोटेमस् [पाणी + घोडा] ॰घोणस-पु. पाण्यांत असणारी सापाची एक निरुपद्रवी जात. [पाणी + घोणस] ॰चक्की- स्त्री. पाण्याच्या जोरानें, साहाय्यानें चालणारी चक्की. [पाणी + चक्की] ॰चट-वि. १ ज्यास गोडी कमी आहे असा (द्रव पदार्थ); बेचव. २ (ल.) शुष्क; बाष्कळ; नीरस; अर्थशून्य (बोलणें, लेखन, गाणें, बोलणारा, लिहिणारा, गाणारा इ॰). 'शेवटीं आपल्या निस्सीम भक्तांकडूनहि वरच्या सारख्या पाणचट प्रशंसे- पेक्षां अधिक कांहीं सर्टिफिकीट मिळूं नये ...' -टि १.१.२६४. [पाणी + छटा] ॰चूल-स्त्री. पाणघरांतील, स्नानाचें पाणी इ॰ तापविण्याची चूल. 'तेथें पाणचुलींत विस्तव घालून त्यावर पाणी तापत ठेविलें.' -कोरकि ५१२. [पाणी + चूल] ॰चोरा-रा-पु. गारोड्याजवळील पाणी भरण्याचें सच्छिद्र पात्र. 'पाणचोऱ्याचें दार । वरील दाटलें तें थोर ।' -तुगा २५८३. [पाणी + चोर] ॰जंजाळ-न. (कों.) पर्जन्य, पाण्याचा पूर इ॰कानीं जिकडे तिकडे होते ती जलमय स्थिति. 'बहू पाणजंजाळ देखोनि डोळां ।' -राक १.३२. [पाणी + जंजाळ] ॰जांवई-पु. (थट्टेनें) जांवयाचा भाऊ; पडजांवई. [पाणी + जांवई] ॰झुकाव-पु. पाणी बाजूनें टिपकवून लावण्यासाठीं दरवाज्यावर केलेलें झुकाऊ कारनिस, गलथा; पाणकारनिस. -राको ५९२. [पाणी + झुकविणें] ॰झेली- स्त्री. (चेंडू, विटीदांडू इ॰ खेळांत) झाडावरून खालीं पडतांना किंवा पाण्यांतून चेंडू, कोललेली विटी इ॰ जमिनीवर पडण्यापूर्वीं झेलणें. याच्या उलट आणझेली. [पाणी + झेलणें] ॰टका- टक्का-पु. पाटस्थळ जमिनीवरील एक लहानसा कर. [पाणी + टक्का] ॰टिटवी-स्त्री. तांबडा कल्ला असलेली टिटवीची एक जात. पाणड्या, पाणाडी-ड्या-वि. जमीनींत कुठें किती खोल खणलें असतां पाणी लागेल हें काहीं आडाख्यांच्या सहाय्यानें जाणणारा. [पाणी] पाणढाळ-पु. पाणी वाहून जाण्याजोगा जमीन, छपराचें पाखें इ॰कांस दिलेला, असलेला उंचसा उतार; सखलपणा. -वि. पाणी वाहून जाण्यायोग्या उतारानें युक्त, उंच उतारीची (जमीन इ॰). [पाणी + ढाळ = उतार] ॰ताव-पु. सोनें, चांदी इ॰ तापवून पाण्यांत बुडवून त्याचा कस पाहण्याची पद्धत; याच्या उलट सुकताव = सोनें इ॰ तापवून नुसतेंच थंड करणें. [पाणी + ताव] ॰तीर-पु. (युद्धशास्त्र) स्फोटक व ज्वालाग्राही पदार्थांनीं भरलेलें चिरूटासारखें निमुळत्या आकाराचें एक युद्धोपयोगी साधन. याचा व्यास दीड-दोन फूट असून लांबी सहा यार्ड असते. याच्या आघातानें मोठमोठीं जहाजें समुद्राच्या तळाशीं जातात. (इं.) टॉर्पेडो. -ज्ञाको (प) ६७. 'गेल्या महायुद्धांत योजलेल्या अनेक शस्त्रास्त्रांत पाणतीराचा पहिला नंबर लागेल.' -ज्ञाको. प ६७. [पाणी + तीर = बाण] ॰तुटी-वि. जींतील रसांश, द्रवांश कमी झाला आहे अशी, कांहींशी पिकलेली (पालेभाजी). [पाणी + तुटणें] ॰थरा-पु. घराच्या जोत्याच्या सर्वांत वरच्या थरांतील दगड, चिरा; पाटथर पहा. ॰थरी-स्त्री. १ आंत्रपेशी; प्लीहा. २ प्लीहेचा एक विकार; पोटांतील चीप. ३ प्लीहा, आंत्रपेशी वाढणें. [पाणी + थर] ॰थळ-स्त्रीन. १ पाऊस गेल्यानंतरहि जेथील ओल जात नाहीं व उन्हाळ्यांतहि खणलें असतां पाणी लागतें अशी जमीन. 'आणि पाणथळ असे तेथें भात लावी.' -पाव्ह ११. २ पाटाच्या पाण्यानें भिजणारी जमीन. [पाणी + थळ] ॰दळ-न. (क्व.) पाणथळ अर्थ १ पहा. [पाणी + दळ] ॰दिवड-स्त्रीन.. (कों.) पाण्यांतील सापाची निर्विष जात. [पाणी + दिवड] ॰दोरी-स्त्री. विहीरींतून पाणी काढण्याच्या उपयोगाची दोरी; बारीक दोर. [पाणी + दोरी] ॰नेचा-पु. पाण्यांत. दलदलींत उगव णारी एक वनस्पति; (इं.) हायड्रोटेरिडि. -ज्ञाको. अ २२१. [पाणी + नेचा] ॰पट्टी-स्त्री. पाणकापड पहा. ॰पिकलें, पाण- पीक-न. (कों.) ज्या पिकास सबंध पावसाळ्यांतील पावसाची जरूरी असतें तें पीक; पहिलें पीक; खरीप. याच्या उलट रब्बीचें पीक. [पाणी + पिकणें, पीक] ॰पिता-वि. १ फार पाणी खाल्लेलें; फाजील पावसानें नासलेलें (पिकाचें कणीस इ॰). २ (ल.) पचपचीत; पाणचट; पचकळ; मुळमुळीत (भाषण, कारभार, मस- लत, व्यवहार, गोष्ट, काम इ॰). ३ (झटकन् पाणी पिण्यासारखें) तलख; चलाखीचें; तडफेचें (कृत्य, कृति इ॰). ४ रोखठोक, चोख; स्पष्ट (जबाब, जाब, उत्तर इ॰). [पाणी + पिणें] ॰पिशी-स्त्री. फाजील पावसामुळें न भरलेलें, पोचट राहिलेलें धान्याचें कणीस. ॰पिसा-वि. पर्ज्यनातिरेकामुळें पोंचट, दाणें झडून गेलेलें, दाण्यांनीं न भरलेलें (कणीस इ॰). ॰पिसें-न. वेड; वेडगळपणा; भ्रमिष्टपणा. -शर. -मनको. -वि. वेडगळ; खुळचट. -मनको. [पाणी + पिसें] ॰पेटी-स्त्री. (स्थापत्यशास्त्र) पाण्यांत काम करतेवेळीं पाणी आंत येऊं नये म्हणून कामाभोंवतीं बसविलेली उभ्या फळ्यांची मुंढे मारून केलेली पेटी. (इं.) कॉफरडॅम्. -राको ३६/?/ [पाणी + पेटी] ॰पोई-स्त्री. १ वाटसरूंना, आल्यागेल्यांना पाणी पाजण्या- साठीं केलेली सोय; पन्हेरी. 'येइ भाई येथ पाही । घातलीसे पाणपोई ।' -यशोधन. २ अशा ठिकाणीं आल्यागेल्यांस पाणी देण्याची क्रिया. [पाणी + पोई] ॰फोल-न. (राजा.) भाताच्या फुलांवर पाऊस अतिशय पडल्यामुळें त्यामध्यें होणारें फोल, पोचटपणा; असलें न भरलेलें पोचट कणीस. [पाणी = पाऊस + फोल = पोचटपणा] ॰बुड-स्त्री. पाटाच्या पाण्यानें भिजणाऱ्या जमीनी- वरील कर. [पाणी + बुडणें] ॰बुड-पु. (कों.) पाणकोंबड्यासारखा एक पक्षी. [पाणी + बुड] ॰बुडा-ड्या, पाणिबुड्या- पाणबुड्यी-पु. १ मासे धरणारा कोळी. 'तरी माशालागीं भुलला । ब्राह्मण पाणबुडां रिघाला ।' -ज्ञा १६.४५१. २ पाण्याच्या तळाशीं असलेल्या वस्तू वर काढण्याकरितां पाण्यांत बुडी मारून बराच वेळ पाण्यांत राहण्याचा सराव ज्यास आहे तो; समुद्रांत बुडी मारून मोत्यें वर काढणारा. 'ते वाक्समुद्रिचे पाणबुडे । कीं सारासारसीमेचे गुंडे ।' -ऋ २४. ३ एक प्रकारचा पक्षी. [पाणी + बुडणें] ॰बुडी-स्त्री. १ पाण्यांत मारलेली बुडी; सुरकांडी. (क्रि॰ मारणें). २ पाण्याच्या पृष्ठभागाखालून संचार करणारी युद्धोप- योगी नौका. (इं.) सब्मरीन्. 'तें आरमार पाणबुड्यांच्या आघातामुळें इतउत्तर आपली पूर्वकामगिरी देण्यास कितपत समर्थ राहील....' -टि ३.३.३४८. [पाणी + बुडी] ॰बुडीत-वि. पुरानें, पावसानें जलमय झालेली (जमीन, पीक). [पाणी + बुडणें] ॰बोदाड-वि. (ना.) पाणथळ; दलदलीची (जमीन). [पाणी + बुडणें] ॰भर-भरजमीन-स्त्री. १ नवीनच खोदलेल्या विहि- रीच्या पाण्यानें, ओढ्याच्या, पाटाच्या पाण्यानें भिजणारी शेत जमीन. २ पुराच्या पाण्यानें भिजणारी जमीन. ३ असल्या जमीनीवरील सरकारी सारा. [पाणी + भरणें + जमीन] ॰भर जिराईत-स्त्री. पाटाच्या पाण्यानें भिजणारी परंतु कोरड म्हणून गणली गेलेली जमीन. [पाणभर + जिराईत] ॰भरणीचा- भरीत-भरिताचा-वि. १ पाटाचें पाणी मिळणारें (शेत, मळा इ॰). याच्या उलट कोरडवाय-वाही. २ पाटाच्या, विहिरीच्या पाण्यानें तयार झालेलें, काढलेलें (पीक इ॰). ॰भरा-वि. १ विहिरीच्या, पाटाच्या पाण्याची जरूरी असलेला (गहूं, जोंधळा इ॰). २ सदर पाण्यानें भिजणारी (जमीन). [पाणी + भरणें] ॰भऱ्या-भर्या-पु. पाणक्या; पाणी भरण्याचा धंदा करणारा. [पाणी + भरणें] ॰भाकरी-स्त्री. नदीच्या, तलावाच्या पाण्याच्या पृष्ठभागावर खापऱ्या फेकण्याचा मुलांचा खेळ; भाकरीचा खेळ. 'तें गलबत वाऱ्याच्या सोसाट्यांत सांपडून मुलांच्या पाणभाकरीच्या खेळांतल्या खापरीप्रमाणें भलतीकडे गेलें.' -कोरकि ७७. [पाणी + भाकरी] ॰मांजर-न. मांजरासारखा एक जलचर प्राणी. [पाणी + मांजर] ॰मोट, पाणमोटली-की-मोटळी, पाण्याची मोट-स्त्री. प्रसूतीसमयीं गर्भ बाहेर पडण्यापूर्वी गर्भोदकानें भर- लेली गर्भाशयांतून बाहेर पडणारी पिशवी. (क्रि॰ येणें; पडणें; फुटणें; निघणें) [पाणी + मोट, मोटली = चामड्याची मोठी पिशवी] ॰रस-पु. पूर्वीं रस काढून घेतलेल्या आंब्यांवर पाणी ओतून ते हालवून, चेंदून पुन्हां त्यांपासून काढलेला पाणचट रस. [पाणी + रस] ॰रहाट-पु. पाण्याच्या साहाय्यानें चालणारा रहाट; पाणचक्की. [पाणी + रहाट] पाणरॉ, पाणसर्प-पु. (गो.) पाण्यांत असणारी सापाची एक जात. [पाण + सर्प] पाणलव्हा-पाणलांव-पु. (कों.) पक्षिविशेष; यास निबुड असेंहि म्हणतात. [पाणी + लाव, लांव्हा = पक्षिविशेष] ॰लोट-पु. १ पाणी; वाहून जाईल असा उतार; पाणढाळ २ टेकडीची, डोंगराची उतरती बाजू; उतरण. ३ पाण्याचा जोराचा प्रवाह; लोंढा; झोत; धोत. ४ डोंगरमाथा; जेथें पाणी पडलें असतां तेथें न थांबतां दोहोंबाजूंस वाहून जातें अशी डोंगर माथ्याची धार. उदा॰ सह्याद्रीचा पाणलोट. [पाणी + लोट] ॰वटा-ठा, पाणवथ-वथा-पु. नदी इ॰कांवर गांवचे लोक जेथें पिण्यासाठीं पाणी भरणें, वस्त्रें धुणें इ॰ क्रिया करतात तें ठिकाण. 'दिवसा पाणवठा म्हणुनियां रात्र आम्ही ही धरली ।' -रासक्रिडा १२. 'पौलपट्टणीं येऊनि शुद्ध । पाणवथीं बैसला ।' -नव १८.४३. [पाणि + वर्त्तिकः-वटा] म्ह॰ बारा कोसांवरचा पाऊस, शिंवेचा राऊत, पाणवठ्याची घागर बरोबर गांवांत येतात. ॰वड-स्त्री. पाण्याचे रांजण, घागरी, डेरे इ॰ भरून ठेवण्यासाठीं (घरांत) केलेला ओटा, ओटली. [पाणी + ठाव] पाणवडा- वाडा-पु. पाणवठा पहा. 'क्लेशगांविंचा उकरडां । भवपुरिचां पानवाडां ।' -राज्ञा १६.४०५. [पाणि + वर्त्तिकः] पाणवसा-पु. (कों.) गाई, म्हशी इ॰ गुरांच्या जीवनास हेतुभूत असणारें (गांवचें) पाणी, गवत इ॰ समुच्चयानें; पाणसा. [पाणी + वास] ॰वळ-न. (कों.) पावसाळ्यानंतर कांहीं काळपर्यंत जींत ओलावा टिकून राहतो अशी जमीन; पाणथळ अर्थ १ पहा. २ -वि. बेचव; पाणचट. पाणचट अर्थ १ पहा. [पाणी + ओल] ॰वाट-स्त्री. १ पाणी वाहून जाण्यासारखा उतार; सखल पृष्ठभाग; ओहळ; पाणलोट. 'पाणी पाणवाटें जैसें । आपणचि धांवे ।' -दा ७.९.११. २ पाण्याची वाट. [पाणी + वाट] ॰वारू-पु. (प्राचीन पौराणिक कथांत रूढ) होडी; नाव. [पाणी + वारू = घोडा] ॰शाई- स्त्री. तारस्वार काढण्याकरितां मृदंग इ॰कास लोहकीट इ॰काच्या लुकणाचा, शाईचा देतात तो पातळ थर; याच्या उलट भरशाई. [पाणी + शाई] ॰शेंग-स्त्री. (ल.) मासळी. [पाणी + शेंग] ॰शोष-पु. पाणपोस पहा. [पाणी + सं. शोष = सुकणें] ॰सरकी- स्त्री. पाणसर्याचें काम, हुद्दा. पाणसरा पहा. [पाणसरा] ॰सरडें- न. पाण्यांत असणारी एक निर्विष सापाची जात. [पाण + सरडा] ॰सरडें-न. रहाटाची माळ सरूं नये म्हणून बसवितात तें प्रति- बंधक लांकूड. [पाणी + सरा = आडवीतुक्ई] ॰सरा-पु. डोंगराच्या घाटांतील वंशपरंपरागतचा जकातदार. याला वतन व ठराविक हक्क असत. घाटदुरुस्तीचें काम याच्याकडे असे. [पाणी + सरणें ?] ॰सळ-साळ-स्त्री. १ (गवंड्याचा धंदा) बांधकाम इ॰ सम- पातळींत आहे कीं नाहीं हें पाहण्याचें गवंड्याचें साधन; साधणी. (इं.) लेव्हल् बॉटल. २ समपातळी. 'भिंतीचें बांधकाम थराचें असेल तर भिंतीच्या प्रत्येक १८ इंच उंचीस माथा पाणसळींत आणावा व त्यावर पातळ चुन्याचा रद्दा करून घालावा.' -मॅरट १४. ३ पाणी वाहून जाईल असा उतार. [पाणी + सळ] पाणसा-पु. गुराढोरांच्या जीवनोपयोगी असें (एखाद्या ठिका- णचें) गवत व पाणी; पाणवस. 'ह्या गांवचा पाणसा गुरांस मानवत नाहीं.' ॰साप-पु. पाण्यांत असणारी सर्पाची जात. [पाणी + साप] ॰सापूड-स्त्री. घर इ॰कांच्या छपराच्या खालच्या बाजूस वाशांच्या टोंकांजवळ कामट्यांच्या, रिफांच्या, ओंबणाच्या शेवटीं बांधतात ती जाड कामटी; सापूड. [पाणी + सापूड] ॰सासरा-पु. (विनो- दानें) जांवयाच्या भावानें आपल्या भावाच्या सासर्यास विनोदानें, थट्टेनें उल्लेखण्याची संज्ञा. जांवयाच्या भावास पाणजांवई असें थट्टेनें म्हणतात त्याप्रमाणेंच हाहि शब्द आहे. ॰सासू-स्त्री. पाण- जांवयानें स्वतःच्या भावाच्या सासूस थट्टेनें उल्लेखण्याची संज्ञा. [पाणी + सासू] ॰साळ-वि. (क्व.) समपातळींत असलेली (जमीन इ॰) [पाणसळ] ॰साळ करणें-जमीन इ॰ समपातळींत आहे कीं नाहीं तें पाहणें. ॰साळ-स्त्री. प्रवासी, वाटसरू इ॰कांना पाणी पुरविण्याच्या सोयीकरतां रस्त्याच्या बाजूस बांधलेली छपरी इ॰; पाणपोई. [पाणी + सं. शाला = घर] ॰साळ, पाण- सळी भात-स्त्रीन. पाटच्या, विहीरीच्या पाण्यावर केलेलें (मळा इ॰तील) भाताचें पीक. [पाणी + साळ] ॰सुरुंग-पु. समुद्रांतील आगबोटी इ॰कांचा नाश करण्याकरितां समुद्राच्या पृष्ठभागाखालीं योजून ठेवण्याचें सुरुंगासारखें आधुनिक युद्धो- पयोगी साधन. 'बंदरांत घातलेल्या पाणसुरुंगांनीं व पाण- बुड्यांनीं हें समुद्रावरील वर्चस्व पोखरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.' -टि ३.३.३५०. [पाणी + सुरुंग] ॰सोस, पाणशोष, पाणसोक-पु. १ ताप इ॰कांत पुनः पुनः लागणारी अतिशय तहान; घशास पडणारी कोरड. २ प्रकृतीला होणारा एक (पुनः पुनः तहान लागण्याचा) विकार. [पाणी + शोष = कोरडें पडणें, होणें] ॰सोळा-पु. दिवडाच्या जातीचा, बांड्या रंगाचा, पाण्यांत राहणारा एक निर्विष साप. -बदलापूर ३४७. पाणि- ढाळ-पु. १ ओहोटी. 'अनुरागाचा निरु ताउनी । पाणिढाळु ।' -ज्ञा ७.९९. २ पाण्याचा ओघ खालीं सोडून देणें. 'पाणिढाळु गिरीशें । गंगेचा केला ।' -ज्ञा १८.१६८८. [पाणी + ढाळणें] पाणीपद-न. (महानु.) तेजाचें स्थान; गांभीर्य; ढाळ. 'परि जाणतां उपहासावें । बोलांचें पाणिपद निहाळावें ।' -शिशु ३६५. [पाणी = तेज + पद = स्थान] पाणिपात्र-न. पाणी प्यावयाचें भांडें. 'एकें हरितलें पाणिपात्र । एकें नेलें पीठ पवित्र ।' -एभा २३.५२०. [पाणि + पात्र = भांडें] पाणिय(ये)डा-पु. (महानु.) पाणवठा. 'आत्मगंगेचां पाणियेडां । थोकला अज्ञान-सीहांचा दडा ।' -भाए १०६. [पाणी + वटा, ठाव] पाणियाडा-डें-ढें- पुन. १ पाण्याचा सांठा; तळें. 'सतरावियेचें पाणियाडें । बळिया- विलें ।' -ज्ञा ९.२१४. 'शुक्रें धरिलें पाणियाडें । अवर्षण पडे बहुकाळ ।' -भाराबाल १.७८. २ जलपात्र. -माज्ञा-कठिणशब्दांचा कोश. [पाणीवडा] पाणिलग-वि. पाण्याच्या सान्निध्यानें राहणारा. 'पाणिलगें हंसें । दोनी चारी सारसें ।' -ज्ञा ६.१७७. [पाणि + लग] पाणिवथा-पु. पाणवठा पहा. पाणिवैद्य-पु. (कों.) विषार इ॰ उपद्रवावर पाणी अभिमंत्रून देणारा वैद्य. [पाणि + वैद्य] पाणीकांजी-न. (व्यापक.) पाणी काढणें व भरणें इ॰ गृहसंबंधीं कामांविषयीं व्यापक अर्थीं योजावयाचा शब्द. [पाणी + कांजी] पाणीचोर-पु. पाणचोर पहा. 'जैसें पाणी चोराच्या द्वारीं । वरील रंध्र दाटिजे जरी ।' -विपू २.६६. [पाणी + चोर] पाणीटाळ-पु. ओहोटी. -हंको, -शर, -मनको. पाणिढाळ अर्थ १ पहा. [पाणी + ढाळ] पाणी तावणें-न. (ना.) आंघोळीचें पाणी तापविण्याचें भांडें किंवा जागा. [पाणी + तावणें] पाणी- दाम-पु. पाणीपट्टी. [पाणी + दाम = किंमत] पाणीदार-वि. १ ज्याच्या अंगीं चांगलें पाणी, तेज आहे असा (हिरा, रत्न, मोत्यें इ॰). २ तीक्ष्ण; चांगल्या धारेचें (शस्त्र इ॰). ३ तेजस्वी; स्वाभिमानी; रग, धमक इ॰कानीं युक्त (मनुष्य, पशु इ॰). [पाणी + फा. दार = युक्त] पाणीपट्टी-स्त्री. म्युनिसिपालिटी इ॰ स्थानिक संस्था नगरवासीयांकडून पाणीपुरवठ्याबाबत घेतात तो कर. 'म्युनिसिपालिटीनें पाणीपट्टी वाढविली.' -के १७.६.३०. [पाणी + पट्टी = कर] पाणीपण-न. पाण्याचा भाव. 'कां गंगा- यमुनाउदक । वोघबळें वेगळिक । दावि होऊनि एक । पाणीपणें ।' -ज्ञा १८.५२. [पाणी + पण = भाववाचक नामाचा प्रत्यय] पाणीपाऊस-पु. १ नद्या, तळीं, विहीरी इ॰कांना पाण्याचा पुरवठा करून देणारा पाऊस. 'पीकपाऊस आहे, पाणीपाऊस अझून नाहीं.' २ पाऊस, पीक इ॰; पाऊसपाणी. [पाणी + पाऊस] पाणीपिसा-वि. स्नान करणें, कपडे धुणें इ॰ पाण्याच्या व्यापारांचें ज्यास वेड आहे असा. पाणीपिसें पहा. 'एक राखे एक शंखे । एक ते अत्यंत बोलके । पाणीपिशीं झाली उदकें । कुश- मृत्तिकें विगुंतलीं ।' -एभा १४.२०९. [पाणी + पिसा = वेडा] पाणीभरा-वि. पाणभरा पहा. पाणीवळ-पु. पाण्यांतला मळ. 'तेणें बहुतीं जन्मीं मागिलीं । विक्षेपांचीं पाणिवळें झाडिलीं ।' -ज्ञा ६.४७१. पाणीशेणी-न. झाड-सारवण, पाणी भरणें इ॰ गृहसंबंधीं स्त्रीनें करावयाचीं कृत्यें समुच्चयानें. [पाणी + शेण] पाणेरा-रें-पुन. पाणी भरलेलीं भांडीं ठेवण्याकरितां केलेली चिरेबंदी ओटली. [पाणी] पाणोटा-ठा, पाणोथा-पु. १ पाणवठा पहा. २ (बे.) नदीचा उतार. [पाणी]