आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
कोट्यधीश, कोट्याधीश
कि. नवकोट नारायण; श्रीमंत; करोडपती. [सं.]
संबंधित शब्द
कोटि-टी
स्त्री. १ शंभर लक्ष; एक करोड; कोट. 'जाग- जागीं आहेत वीर कोटी ।' -र १०. २ (वादविवादांत) निरुत्तर करण्यासारखें खुबीदार उत्तर; भाषणाची मोठ्या युक्तीनें रचना; खुबीचें भाषण. ३ शब्दांत, वाक्यांत कांही फरक करून किंवा एकाच उच्चाराचे पण भिन्न अर्थांचे शब्द घेऊन अर्थाच्या गमती करून अलंकार-चमत्कार दाखविणें. हें एक भाषा कौशल्य समजलें जातें. श्लेष पहा. 'अहो विद्वत्ताप्रचुर कोट्यांची गुंतवळें गेलीं दहापांच घशांत' -नाकू ३.३४. ४ विशिष्ट वर्ग, प्रकार, 'रजोगुणाची कोटी । लोभिष्ट पोटीं स्त्री पुत्रां ।' -एभा १३.४५. भेद. 'गुजरातमध्यें दोन मोठ्या कोटि-म्हशी आणि गाई' ५ काट- कोन त्रिकोणाची उभी बाजू; लंब रेषा; कर्णाखेरीज एक बाजू. ६ थोर योग्यता, दर्जा; श्रेष्ठपणा; शौर्य, सद्गुण, विद्या यांमध्यें अतिशय प्रवीण असलेल्याच्या स्तुतिदर्शक सन्मानदर्शक संज्ञा. 'खर्या साधूंची कोटी याच्या उलट असते.' ७ धनुष्याचें टोंक; चंद्रकलेचीं टोंकें. ८ कल्पना; विचारसरणी. 'परंतु ही कोटी इति- हासदृष्ट्या टिकेल असें आम्हांस वाटत नाहीं' -टि ४.११६. ९ पराकाष्ठा; कळस; उच्च शिखर. 'पराकोटी.' ॰उभविणें-ध्वजा उभारणें. 'तरी यशाची उभऊनि कोटी ।' -नव १९ १७७. ॰क्रम-पु. १ युक्तिवाद; शक्कल; खुबीदार विवेचनपद्धति; श्लेषा त्मक भाषण. 'हाच कोटिक्रम स्वीकारलेला आहे.' -गीर १५७. २ पेंच. ॰क्रम लढविणें-तोड काढणें; युक्ति योजणें ॰ज्या-स्त्री. (त्रिकोणमिती) कोभुजज्या. काटकोन त्रीकोनांतील लघुकोनाच्या लगतची बाजू व कर्ण यांचें गुणोत्तर. कोटिज्या आणि भुजज्या यांच्या वर्गांची बेरीज १ भरते. (इ.) कोसा- ईन. ॰ध्वज (लावणें, उभारणें)-पु. नवकोट नारायण होणें; अफाट संपत्तीचा देखावा करणें; कोट्याधीश होणें. ॰भोज-वि. कोट्याधीश. 'धनेश्वर नामें कोणीयेक ब्राह्मण । तो वस्तुवित्तेसि संपूर्ण ।कोटिभोज पै ।' -कथा २.१५.६. ॰शः- वि. कोट्यावधी. 'या कामाला कोटिशः रुपये पडतात.' [सं.] ॰स्पर्शज्या-स्त्री. (त्रिकोणमिति) कोटिज्या व भुजज्या यांचें गुणोत्तर. कोस्पर्शज्या (इं.) कोटॅन्जेंट.
कोटिभोज
वि. कोट्याधीश : ‘धनेश्वर नामें कोणियेक ब्राह्मण । तो वस्तुवित्तेसि संपूर्ण । कोटिभोज पै ।’ - कथा २·१५·६
नव
वि. नऊ. नऊ संख्या. 'हे नवरत्नमाळा गोमटी । जो घाली सद्गुरुच्या कंठीं ।' -एभा १०.२३८. [सं. नव; गुज. नव; झें. नवन्; ग्री. एन्नेअ; लॅ. नोव्हेम्; गॉ. निउन; अँसॅ. निगन्, प्राज. निउन; अज. नेउन; प्राप्र. नेविन्त्स; स्लॅ. देवन्ति; लिथु-देव्यन्ति; हिब्र्यू; नओइ; कँब्रि-नव्] ॰कुलपांचें तारूं- न. लढाऊ गलबत. 'विलायत जंजिरा नवकुलपांचें तारूं ।' -विवि ८.३. ५४. ॰तुकड्यांची चोळी-स्त्री. नऊ तुकडे जोडून केलेली चोळी; इच्या उलट अखंड चोळी, तीन तुकड्यांची चोळी. म्ह॰ नवव्या दिवशीं नवी विद्या. सामाशब्द- ॰कोट (टी)नारायण-पु. १ कोट्याधीश; अतिशय श्रीमंत मनुष्य. 'पण हे विचारांचे नवकोटनारायण आचाराच्या बाबतींत मात्र सुदाम्यापेक्षां दरिद्री आसतात.' -प्रेम २१. २ (विपरीत लक्ष- णेनें) अतिशय दरिद्री; कंगाल मनुष्य. -शास्त्रीको. [नव + कोट नारायण] ॰कोटी कात्यायनी(येणी)-चामुंडा-स्त्रीअव. नऊ कोट देवी, कात्यायनी, चामुंडा. 'नवकोटी कात्यायेणीचा विचार । पिंडीं कोठें ।' -दा ९.५. ३१. 'पहावया श्रीकृष्णाचें लग्न । सकळ दैवतें निघालीं सांवरोन । नवकोटी चामुंडा संपूर्ण । चालती वेगें तेधवां ।' -ह २४.१०५. [नव + कोटी + कात्यायनी, चामुंडा] ॰कोण-पु. (भूमिति) नऊ कोपरे असलेली व नऊ बाजूंनीं मर्या- दित आकृति. -वि. नऊ कोन असलेली. [नव + सं. कोण] ॰खंड- खंडें-नअव. १ पृथ्वीच्या नऊ खंडांचा समुदाय. इलावृत्त, भद्राश्व, हरिवर्ष, किंपुरुष, केतुमाल, रम्यक, भरत, हिरण्मय व उत्तरकुरू हीं नवखंडें होत. दुसरेहि पाठभेद आहेत. (अ) भरत, वर्त्त?, राम?, द्रामाळा (द्रमिल, द्रामिल?), केतुमाल, हिरे (हीरक?), विधि- वस?, महि आणि सुवर्ण. (आ) इंद्र, कशेरु, ताम्र, गभस्ति, नाग, वारुण, सौम्य, ब्रह्म, भरत हे नऊ भाग. -हंको. 'नवखंडें सप्तद्वीपें । छपन्नदेशींच्या रायांचीं स्वरूपें ।' -ह २८.६४. [नव + सं. खंड = तुकडा, पृथ्वीचा भाग] ॰खंड पृथ्वी-स्त्री. जींत नऊ खंडें आहेत अशी पृथ्वी. 'नवखंड पृथ्वी व दहावें खंड काशी.' 'नवखंड पृथ्वीचें दान.' ॰खणी-वि. नऊ खणांची. 'दुखणी काय नवखणी माडी नलगे धरा नखेंदु खणी ।' -मोकृष्ण ८३.१३. 'लावण्याची सकळ संपदा सहज उभी नवखणी ।' -पला ४.३४. [नव + खण] ॰गजी-पुस्त्री. १ (नऊ गजी) नऊ गज लांबीचा सोपा. राजदरबारचा भव्य दिवाणखाना; कचेरी; सदर. 'राजा नवगजींत बैसला ।' -ऐपो १७.२ तंबू; डेरा. 'बाडें सुंदर खाबगे नवगज्या सिद्धाच होत्या घरीं ।' -सारुह ३.४५. 'तमाम येऊनु नऊ गजी आसपास येऊनु उतरीले' -इमं ७. नवगोजी पहा. [नव + गज = एक परिमाण] ॰गुणपुअव. बुद्धि, सुख, दुःख, प्रयत्न, इच्छा द्वेष, संस्कार, पुण्य व पाप असे न्यायशास्त्रांत सांगितलेले नऊ गुण. 'बुद्धि सुख दुःख प्रयत्न । इच्छा द्वेष संस्कारण । पुण्य पाप नवगुण । बोलिजेती ।' -विउ ३.४. -वि. नऊपट. ॰गुण-वि. नऊ दोर्यांचें (यज्ञोपवीत इ॰). नऊ फेर्यांचें. 'नवगुण तव कंठी ब्रह्मसूत्र प्रभा जे ।' -मुरा बालकांड ११३. [नव + सं. गुण = दोरा] ॰गोजी-पु. डेरा. शामियाना. 'उतर तर्फेसी नवगोजी देऊनु उतरिले.' -इमं ७. ॰ग्रह-पुअव. १ सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू, व केतु हे नऊ ग्रह. २ (उप. निंदार्थी) जूट; टोळकें; टोळी; कंपू. ३ -न. मंगलकार्यारंभीं करतात ती नऊ ग्रहांची पूजा; ग्रहमख. 'दोन्हीं घरीं नवग्रहें झालीं । देवदेवकें पूजिलीं । -कालिका १६.४१. [नव + ग्रह] ॰चंडी-स्त्री. १ देवीची आराधना (विशेषतः तिच्या स्तोत्राचें, सप्तशतीचें नऊ वेळां पठण करून केलेली). 'जर मला पुत्र- प्राप्ति झाली तर देवीची नवचंडी करीन.' -रत्न १.३. २ नवरात्र; नवरात्र पहा. [नव + सं. चंडी = देवी] ॰छिद्रें-नअव. नवद्वारें पहा. ॰जणी-स्त्रीअव. १ नऊ स्त्रिया. २ (ल.) नवविधाभक्ति. 'अत्यंत शहाण्या सुवासिनी । आणिक आल्या नवजणी । कृष्णाची खुतखावणी । त्या जाणोनी वर्तती ।' -एरुस्व १६.४३ ॰ज्वर- पु. दूषित तापाचा एक अतिशय तीव्र प्रकार; हा ताप नऊ दिवसांच्या मुदतीचा व प्रायः घातुक असतो. [नव + सं. ज्वर = ताप] ॰टकें- न. शेराच्या अष्टमांशाचें, (कैली) अर्ध्या पावशेराचें माप. [नऊ + टांक] ॰टांक-न. अदपावाचें वजन. नवटकें पहा. [नव + टांक; गुज. नवटांक; गो नवटांग] ॰द्वारें-नअव. दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, तोंड, गुदद्वार व मूत्रद्वार अशीं मानवी शरीराचीं नऊ द्वारें, छिद्रें. 'नवद्वारें देहीं । तो असतुचि परि नाहीं ।' -ज्ञा ५.७५. ॰नाग-पुअव. १ पुराणांतरीं वर्णिलेले अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक व कालीय ह्या नांवांचे नऊ नाग, सर्प. २ नऊ हत्ती. [नव + सं. नाग = सर्प, हत्ती] ॰नाग- सहस्त्रबळी-वि. नऊ हजार हत्तींचें बळ असलेला. [नव + सं. नाग = हत्ती + बळी = बलवान] ॰नागसहस्त्रशक्ती-स्त्री. नऊ हजार हत्तींचें बळ. 'अंगीं जियेस नवनागषस्त्रशक्ति ।' -आपू ३९ [नव + सं. नाग = हत्ती + सं. सहस्त्र = हजार + सं. शक्ति = बळ] ॰नागोर्या-पु. (ना.) चेंडूलगोर्यांचा खेळ. ॰नाथ-पुअव. मच्छिंद्र, गोरक्ष, जालिंदर, कानीफा, चरपटी, नागेश, भरत, रेवण व गीहिनी हे नवनारायणाचे अवतार मानतात. प्रकाश, विमर्श, आनंद, ज्ञान, सत्यानंद, पूर्णानंद, स्वभावानंद, प्रतिभावानंद, व सुभगानंद असहि पाठभेद आहे. -नव १.३९. ते ४३. -ज्ञाको (न) ३७ ॰नारायण-कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पला- यन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस, व करभाजन. -नव १.२९ ते ३०. ॰नारीकुंजर-पु. नऊ स्त्रियांनीं आपल्या शरीरन्स निरनिराळ्या प्रकारें पीळ व मुरड देऊन (कृष्णाच्या पुयोगसाठीं) बनवि- लेली हत्तीची आकृती. [नव + सं. नारी = स्त्री + सं. कुंजर = हत्ती] ॰निधि-धी-पुअव. कुबेराचे नऊ खजिने. त्याचीं नावें:-महा- पद्म, पद्म, शंख, मकर, कच्छप, मुकुंद, कुंद, नील, आणि खर्व. 'मोल तुमचिया या श्रीचरणरजाचे न होय निधिनवही ।' -मोमंभा १.११२. [नव + सं. निधी = खजिना, सांठा] ॰महाद्वारे-नअव. नवद्वारें पहा. ॰महारोग-पुअव. राजयक्ष्मा, कुष्ट, रक्तपिती, उन्माद, श्वास, मधुमेह, भगंदर, उदर व मुतखडा हे नऊ दुर्धर व भयंकर रोग. [नव + सं. महायोग = मोठा, भयंकर रोग] ॰रंगी-वि. नऊ रंगांनी युक्त (पदार्थ.) ॰रत्नराजमृगांक-पु. (वैद्यक) एक औषधीं रसायन. [नव + रत्न + राजन् + मृग = हरिण + अंक = चिन्ह] ॰रत्नें-नअव. हिरा, माणिक, मोतीं, गोमेद, इंद्रनील, पाच, प्रवाळ, पुष्कराज, वैडूर्य किंवा तोर्लल्ली हिं नऊ प्रकारचीं रत्नें 'नवरत्नांची आंगठी.' ॰रत्नांचा हार-पु. स्त्रियांचा गळ्यांत घालण्याचा एक बहुमोल हार. ॰रस-पुअव. (साहित्य) साहित्य- शास्त्रांत वर्णिलेले शृंगार, विर, करूण, अद्भुत, हास्य, भया- नक, बीभत्स, रौद्र आणि शांत या नांवांचें नऊ रस. जी दैविकीं उदार वाचा । जैं उद्देशु दे नाभिकाराचा । तैं नवरससुधाब्धीचा । थावो लाभे ।' -ज्ञा १०.७. ज्ञाता जो सरसावला, नवरसां-माझिरि शृंगारसा ।' -रा ५ [नव + सं. रस] ॰रसिका-वि. चलाख; त्र- तरीत; आवेशयुक्त; नऊ रसांनीं भरलेलें, पूर्ण (गान, कवन, कथा, वर्णन, ग्रंथ, श्लोक, गवई, कवि, वक्ता इ॰). [नवरस] ॰रात्र-न. १ (सामा.) नऊ अहोरात्रांचा समुदाय. २ (विशेशार्थाणें) चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचा काल (रामाचें नवरात्र); तसेंच अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचा नऊ दिवसांचा काल. (देवीचें नव- रात्र) यास प्रतिपदेपासून चंपाषष्ठीपर्यंत सहा दिवस खंडोबाचें नवरात्र असतें. ३ वरील कालांत करतात तो देवाचा, देवीचा उत्सव, पूजा. [नव + सं. रात्रि = रात्र] ॰लख-वि. (काव्य) नऊ लक्ष. 'आकाशांत नवलख तारे आहेत.' [नव + लक्ष = शंभर हजार] ॰लक्षणें-नअव. आचार, विनय, विद्या, प्रतिष्ठा, तीर्थदर्शन, निष्ठा वेदपठन, तपस्या व दान हिं ब्रह्मणाचीं नऊ लक्षणें. -शर. ॰लाखा-ख्या-वि. ज्याच्याजवळ नऊ लक्ष रुपये आहेत असा; लक्षाधीश; अतिशय श्रीमंत. 'अपुल्या पुम्ही घरचें नवलाखे मिजाजी ।' -प्रला १७५ [नव + लाख = शंभर हजार] ॰विध- वि. नऊ प्रकारचें. [वन + सं. विधा = प्रकार, भेद] ॰विधभजन- न. नवविधा भक्ति पहा. 'नवविधभजन घडो । तुझिये स्वरूपें प्रीति जडो ।' ॰विध रत्नें-नअव. नवरत्ने पाह. ॰विधा भक्ति-स्त्री. श्रवण = ईश्वराचें गुणवर्णन, चरित्रें इ॰ ऐकणें; कीर्तन = ईश्वराचें चरित्र वर्णन करणें, वाचणें; स्मरण = ईश्वराचे गुण, चरित्र इ॰ आठवणें; पादसेवन = ईश्वराचे पाय धुणें, चेपणें इ॰ सेवा; अर्चन = पूजा करणें; वंदन = नमस्कार करणें; दास्य = चाकरी करणें; सख्य = ईश्वराशीं सलगी करणें; आत्मनिवेदन = ममत्व सोडून ईश्वरास सर्वस्व, स्वतःला अर्पण करणें. या नऊ प्रकारानीं करावयाची ईश्वराची भक्ति, सेवा. 'श्रवण कीर्तन स्मरण । पाद- सेवन अर्चन वंदन । दास्य सख्य आत्मनिवेदन । हे भक्ति नव- विधा पै ।' -विपू ५.२३. -दा १.१. ३. [सं. नवविधा = नऊ प्रकारची + भक्ति = सेवा] ॰सर-वि. नऊ सरांचा (हार इ॰). नव + सर] ॰सुती-स्त्री. जानवें करण्यासाठीं नऊ पदरी वळून केलेला दोरा. [नव + सुत = दोरा] ॰नवांकित-वि. पुठ्ठ्यावर नवाच्या आंकड्यानें चिन्हित (घोडा). [नव + सं. अंकित = चिन्हानें युक्त] नवास्त्र-वि. नवकोण पहा. [नव + सं. अस्त्र = कोण, कोपरा]
लाख
वि. १ संख्यावाचक विशेषण. एकावर पांच शून्यें देऊन होणारी संख्या; शंभर हजार; लक्ष पहा. 'लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा न मरो.' -राजसंन्यास ७३. २ (ल.) अतिशय उत्तम; फार महत्त्वाची; बिनमोल (गोष्ट, युक्ति, माणूस). 'त्यानें काल एक लाख गोष्ट सांगितली.' 'मावशी सुद्धां खरोखर लाख माणूस आहे.' -निचं ३८. ३ (ल.) पुष्कळ; अनेक. 'अरे जा!! तुझ्यासारखे लाख पाहिले आहेत.' [सं. लक्ष; प्रा. लक्ख; लाख] म्ह॰ १ (कों.) लाखोश्री आणि भिकेश्री एकच (मेल्यावर गरीब व श्रीमंत सारखेच) २ लाख मरावे पण लाखांचा पालनवाला मरूं नये. (वाप्र.) लाख नसावा पण साख असावी-संपत्ति नसली तरी पत असावी. लाखांतली गोष्ट-अतिशय महत्त्वाची गोष्ट. सामा- शब्द- लाखपंचोत्र्या-वि. लाख गोष्टी सांगितल्या असतां त्यांतील पांच गोष्टी ज्याच्या खऱ्या असतील असा; गप्पा मारणारा; थापाड्या; गप्पीदास. लाख-लाखाचा माणूस-पु. अत्यंत श्रेष्ठ, योग्य, लाखांत एक या योग्यतेचा मनुष्य. लाख रुपयांचा-वि. अत्यंत महत्वाचा, अमोल, उत्कृष्ट. लाख रुपयांची संधि-स्त्री. अमूल्य संधि; योग्य वेळ. 'इतक्यांत ही लाख रुपयांची संधी...त्यानें वायां जाऊं दिली नाहीं.' -लक्ष्मी आणि सरस्वती. लाखांचा पालनवाला-वि. अनेक माणसांचें, कुटुंबांचें पालनपोषण करणारा; अनेकांच्या उपयोगी पडणारा (राजे, कोट्याधीश, सरदार, उदार लोक यासंबंधीं योजतात). लाखाच्या ठिकाणीं-वि. क्रिवि. लाख रुपये दिले तरी न मिळणारी (अडचणीच्या वेळीं दिलेल्या लहान रकमेबद्दल, मदतीबद्दल योजतात). 'तूं मला दहा रुपये आतां दिलेस तर ते लाखांच्या ठिकाणीं आहेत.' लाखी-वि. जीस मोल नाहीं अशी; अमोल (गोष्ट, वस्तु, मसलत). 'ही लाखी मसलत रावमुरारीस कोणी दिली असेल ती असो.' -नि. ५३९. लाखों-वि. असंख्य; अनेक; लक्षावधी. लाखोलाख-वि. लक्षावधि; असंख्य. [लाख द्वि.] लाखोपति-वि. लक्षाधीश; मोठा श्रीमान. लाखोली, लाखौली-स्त्री. १ लाख संख्या. २ देवाला फुलें, फळें, धान्य मोजून त्यांची वाहिलेली लक्ष संख्या. (क्रि॰ वाहणें). -ज्ञा १३.३८७. 'शतजन्मीं नमनांची मी तुज वाहत असेन लाखोली ।' -मोशांति ६.८. 'कणैरीची लाखौली वाऊनी ।' -शिशु ७३९; -दा १७.३.६. ३ (उप.) शिव्यांचा वर्षाव, भडिमार करणें; एखाद्यास खूप शिव्या देणें. [लाख + आवली] लाखोंशा-क्रिवि. लक्षावधि; लाखो; असंख्य. [लक्षशः] लाख्या-वि. १ उत्कृष्ट; उत्तम; लाख रुपये किंम- तीचा; बहुमोल (मनुष्य, पदार्थ, भाषण). 'तो लाख्या बोलणारा आहे.' २ पहिल्या प्रतीचा; श्रेष्ठ; प्रतिष्ठित (व्यापारी पेढीवाला). ३ लक्षाधीश; धनाढ्य (सावकार).