आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
कौरव
कौरव kaurava m (S) The patronymic of the descendents of कुरू, but usually applied to the sons of धृतराष्ट्र. Their war with the पांडव forms the principal subject of the महाभारत.
संबंधित शब्द
असाधु
वि. वाईट; साधुनव्हे तो; दुष्ट; अधम. 'पै असाधु- कर्मा तैसा ।' -ज्ञा १७.३९९. 'कौरव हो गौरव हो सुजनीं न करुनि असें असाधु तरा ।' -मोसभा ६.१००. ॰ वाद -पु. निंदा.
आतुर
वि. १ उत्सुक; उतावीळ; उद्युक्त. 'बहुतकरूनि कौरव । हे आतुर दुस्वभाव ।' -ज्ञा १.१७२. २ आर्त; विव्हळ; व्यथित; पीडिलेला; दुखणाईत. सामाशब्द. कामातुर-अर्थातुर- क्षुधातुर-चिंतातुर इ॰ 'कामातुराणां न भयं न लज्जा । अर्थातुराणां न पिता न माता । क्षुधातुराणां न रुचिर्न पक्वं । चिंतातुराणां न सुखं न निद्रा ।' [सं.] ॰संन्यास-पु. मरणसमयीं घाईघाईनें घेतलेला संन्यास; केवळ प्रेषोच्चारादिक विधि करून घेतलेला संन्यास, चतु- र्थाश्रम. [सं.]
आतुर
वि. १. उत्सुक; उतावीळ; उद्युक्त : ‘बहुतकरूनि कौरव हे आतुर दुस्वभाव ।’ − ज्ञा १·१७२. २. आर्त; विव्हळ; व्यथित; पीडलेला; दुखणाईत : ‘बाळक, वृद्ध, आतुर जन । न करितां स्नान दोष नाहीं ।’ − एभा २१·१२२. [सं.]
आटवणे, आटविणे
स. क्रि. १. (सोनारी धंदा) सोने, रूपे इ. धातूचा रस करणे; आटवण्याची क्रिया करणे. २. द्रव पदार्थ उष्णतेच्या साहाय्याने घट्ट करणे, आटतील असे करणे. ३. (ल.) कमी करणे; ठार मारणे : ‘द्रौणिपराभवकाळी म्यां कौरव सैन्य फार आटविलें ।’ − मोकर्ण ४०·३४.
आटवणें-विणें
क्रि. १ (सोनारी धंदा) सोनें, रुपें इ॰ धातूंचा रस करणें: अटण्याची क्रिया करणें. २ द्रव पदार्थ उष्णतेच्या साहा- यानें घट्ट करणें, अटतील असे करणें. ३ (ल.) कमी करणें; ठार मारणें. 'द्रौणिपराभवकाळीं म्यां कौरव सैन्य फार आटविलें ।' -मोकर्ण ४०.३४. [अटणें प्रयोजक]
दरारा
पु. १ जोराचें खडसावणें; धमकी. २ धाक; दब- दबा; भीति; अधिकार इ॰ ची छाप (क्रि॰ दाखविणें; बसविणें; बसणें). 'कौरव भट भीतिकथन होय सुरांतहि महा दरारा हो ।' -मोभीष्म ४.५०. [सं. दर; हिं.]
धावडणे
उक्रि. १. पळवणे; धावायला लावणे; पिटाळणे; दामटणे : ‘वहनें धांवडीत सत्वरा। कौरव प्रवेशले नगरा।’ - मुआदि २९·१३८. २. घासणे; सारवणे : ‘तया शक्ति चक्राचां तगटीं । धावडि जे क्षुद्रानंदाची पीठी ।’ - भाए ५४८.
धावडणें, धांवडणें
उक्रि. १ (काव्य धांवणें) पळावयास लावणें; पळविणें; पिटाळणें; दामटणें. 'वहनें धांवडीत सत्वरा । कौरव प्रवेशले नगरा ।' -मुआदि २९.१३८. २ घासणें; सारवणें. 'तया शक्ति चक्राचां तगटीं । धावंडि जे क्षुद्रानंदाची पीठी ।' -भाए ५४८.-अक्रि. १ पळून जाणें. २ पळ काढणें. [धावड]
झुंज-झ
नस्त्री. १ लढाई; युद्ध; रण. 'बहुतकरूनि कौरव । हे आतुर दुःस्वभाव । वांटिवावीण हांव । बांधिती झुंजीं । -ज्ञा १.१७२. २ भांडण; कलह; झोंबाझोंबी. [सं. युद्ध; प्रा. जुज्झ; सं. युज्; प्रा. जुंज. हिं. जूझ; आर्मेनियन जिप्सी जुज] (वाप्र.) झुंजणें, झुज(झ)णें-१ लढणें; युद्ध करणें. २ हुजत घालणें; भांडणें. झुंजविणें-१ झुंजण्यास लावणें; लढविणें. २ भांडणास प्रवृत्त करणें. [झुंजणें] (कण्या-दाणे टाकून कोंबडे) झुंज- विणें-१ आपल्या गमतीखातर खर्च सोसूनहि लोकांना भांडाव- यास प्रवृत्त करणें. २ बक्षीस ठेवून त्यासाठीं एखाद्या मंडळांत, जूट असणार्या लोकांत भांडण लावणें; आपल्या समाईक देणगीनें एखाद्या गटांत फूट पाडणें, कलागत लावणें. झुंझात राहणें-लढाईंत ठार होणें. झुंझा(जा)स उभें राहाणें-लढाई देणें; लढाईस सिद्ध असणें. 'मेजवानी म्हणून दहा लक्ष रुपये घेत असल्यास उत्तम, नाहींतर झुंजास उभें राहावें ' -भाव ३१. सामाशब्द- झुंजणार-रा-वि. झुंजार; लढवय्या. 'सखाराम पानशे परशु- राम भाऊ भले झुंजणार ।' -ऐपो २५५. झुंजागाळ-स्त्री, (गो.) रणभूमि. [झुंज + (गो.) गाळ = मैदान] झुंजा(झा)- र-ट-स्त्री. १ लढाई; युद्ध; घनचक्कर. (क्रि॰ लागणें; असणें; होणें). २ -वि. लढवय्या; युद्धनिपुण; रणशूर. 'धाक घेतला झुंझारीं । केशिक सैन्य पळे दूरी ।' -एरुस्व १०.३६. [झुंज] झुंजा(झा)रराव-पु. योद्ध्यास द्यावयाची एक पदवी; वीरपुरुष; शूरबहाद्दर; रणगाजी. 'पुण्यांतल्या तरुणांनीं मोठमोठ्या झुंझार- रावांना चकविलें.' -इंप १२०. [झुंजार + राव] झुंजारी-वि. (गो.) अंगाशीं अंग लावून लढणारा; झुंजार (-वि.) पहा. [झुंज]
कुरुक्षेत्र
कुरुक्षेत्र kurukṣētra n (S) The country near Delhi, the scene of the great battle between the कौरव & पांडव.
कुरुवीर
कुरुवीर kuruvīra m (S) A common term for the warriors of the कौरव family.
निष्कंटक
न. भय, उपद्रव इ॰ पासून मुक्तता; शांततेची, स्वास्थ्याची स्थिति, 'तो शत्रु मेला यामुळें तेथें निष्कंटक झालें.' -वि. १ कांटे नसलेला; कांट्याविरहित. २ (ल.) धोका, भय, उपद्रव, अडचण इ॰ नसलेलें (राज्य, रस्ता इ॰); निर्धास्त. 'कौरव मारुनि देईल निष्कंटक सर्व राज्य आतेला ।' -मो [सं.]
ओळणे (ओळ्ळे)
अक्रि. १. एखाद्याकडे ओढले जाणे, वळणे : ‘ओळखगावरि घनसा I’ - मोआदि ३६·४८. २. अनुकूल होणे; प्रसन्न होणे : ‘कौरव म्हणती कोण देवो। आजी आम्हां ओळता॥’ - मुसभा १४·९३. ३. अनुग्रह करणे; उपदेशणे; कृपा करणे : ‘एणें श्रीकृष्णघनें शमवाया सर्व ताप ओळावें ।’ - मोमोसल २·९१.
ओळणें
अक्रि. १ (काव्य) एखाद्याकडे ओढला जाणें, वळणें. 'ओळ खगावरि घनसा ।' -मोआदि ३६.४८. २ अनुकूल होणें; पसन्न होणें; प्राप्त होणें. 'कौरव म्हणती कोण देवो । आजी आम्हां ओळला ।।' -मुसभा १४.९३. २ अनुग्रह करणें; उप- देशणें; कृपा करणें. 'एणें श्रीकृष्णघनें शमवाया सर्व ताप ओळावें ।' -मोमौसल २.९१. 'मच्छिंद्रानें बोध गोरक्षासि केला । गोरक्ष ओळला गयनीप्रती ।' -ज्ञानदेवगाथा प्रस्तावना ४. [वळण]
पांडव
पु. १ पंडुराजाचा वंशज; विशेषतः युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुळ व सहदेव या पंडुराजाच्या पांच मुलांना समुच्चयानें हा शब्द लावण्यांत येतो. २ (ल.) पांच रुपये इ॰कांचा समुदाय. ३ एक प्रकारचा पाणकोंबडा. [सं.] पांडवांचें लेणें-न. डोंगर, खडक इ॰ पोखरून केलेली मनुष्यशक्तीस करण्यास अशक्य दिसण्याजोगी देवालय, मूर्ति; राहण्याच्या खोल्या इ॰कांची रचना. ॰कृत्य-न. लेणें. लेणीं हीं मनुष्यशक्तीच्या आटोक्यांच नाहींत असा प्रायः समज आहे. तीं पराक्रमी पांडवांनी केलीं असावींत अशा समजुतीवरून हा अर्थ. 'एका टेकडीच्या गुहेंत पांडवकृत्य आहे.' -कोरकि २२३. [पांडव + कृत्य] ॰प्रताप-पु. कौरव- पांडवांच्या कथांचा श्रीधरकवीनें लिहिलेला ओवीबद्ध ग्रंथ. [पांडव + प्रताप = पराक्रम]
प्रणणें, पर्णणें
सक्रि. १ (काव्य) विवाह करणें; वरणें; पाणिग्रहण करणें (विशेषतः वराकडून). 'स्वयंवरा आली उर्वशी । ते मागौती पाठविली साधुसीं । परी बुद्धि ठेली कैसी । जे हेची प्रणावी ।' -शिशु २०२. 'पर्णूं म्हणती पांचाळपुत्री । तें नावेक- विलोकूं ।' -मुविराट ४१.१८. २ (ल.) स्वीकार करणें; घेणें. 'कौरव प्रणून अपकीर्ति । जाते झाले स्वस्थळां ।' -मुविराट ६. १७०. [सं. परि + नी]
शकुनि
शकुनि m The name of the maternal uncle of the कौरव princes. Hence शकुनिमामा A term for an old treacherous or officious relative whose counsels are ruinous.
शकुनि śakuni m S The eighth of the periods called करण. 2 The name of the maternal uncle of the कौरव princes. Hence शकुनिमामा A term for an old treacherous or officious relative whose counsels tend to ruin.
तिगड
पु. (कर.) भांडण. 'भले ब्रह्मदेवाचे सुत । नारद अवचित । पांडवनगरींत । लाविला तिगड कौरव पांडवाचा ।'
विदुर
विदुर vidura m (S) The proper name of the younger brother of धृतराष्ट्र and chief counselor of दुर्योधन and the कौरव princes. 2 Hence (as विदुर was illegitimate) a cant term for a male child born out of wedlock.
पावणें
उक्रिअक्रि. १ पोंचविणें; पोचती करणें; नेणें; (एखादी वस्तू; मनुष्य) पाठवणी करणें; नेऊन सोडणें; 'श्रृंग पावोनि ये तूर्ण करि स्वजनाधि चूर्ण ।' -मोराघनाक्षर रामायण ३८. 'जावूनि सभाद्वारापावेतों प्रभुवरासि पावाया ।' -मोउद्योग १०.२३. २ (एखादें स्थल; स्थिति; दशा इ॰ प्रत) पोंहोंचणें; येणें; प्राप्त होणें. 'धर्माप्रति वात्सल्यस्वीकृतदूतत्व देव तो पावे ।' -मोउद्योग ११.३३. 'मी गांवांस संध्याकाळीं पावलों.' 'हा वृद्धत्व पावल्यावर बधिरत्व पावला.' 'हृदयाची डावी बाजू आकुंचन पावली म्हणजे धमनींत रक्त जातें.' ३ मिळणें; प्राप्त होणें. 'म्हणोनि अवसरे जें जें पावे । कीं तेणेंचि तो सुखावे ।' -ज्ञा ४.१०९. 'चित्तीं नित्य असोत, सर्व म्हणजे या याचका पावलें ।' -मोकृष्ण १५.२९७, ४ हातीं लागणें; मिळणें; सांपडणें. 'मागील कर्जा- पैकीं काय पावलें तें सांग.' 'तो विळा मला तेथेंच पावला.' ५ प्रसन्न होणें; कृपा करणें; (देवानें भक्ताचा नवस; अभीष्ट इ॰) पूर्ण करणें; वोळणें. 'देव नवसास पावला.' 'मानूं हृदयांत कृतघ्नत्वा वास मज नको पावें ।' -मोरामा १.५११. 'अगा प्रणतवत्सला म्हणति त्या जनां पावला ।' -केका ९. ६ समजणें; लक्षांत येणें; अंगीकाराचा विषय होणें. 'ही गोष्ट मला पावली.' ७ अवसर सांपडणें; मोकळीक मिळणें; समर्थ होणें; शक्य असणें. 'तुला एक दोन काठ्या रगडून लावल्या म्हणजे तूं हांसू पावणार नाहींस.' ८ जबाबदार असणें; जबाबदारी घेणें. 'भीम म्हणे संसप्तक कौरव मज सर्व पावले जा गा !' -मोकर्ण ३९.५६. ९ हरकत नसणें; मोकळीक असणें. 'संसारांत तरा, म्हणाल मजला खोटा म्हणा पावलें ।' -मोअंबरीषाख्यान (नवनीत ३६०). [सं. प्राप्; प्रा. पाव; गुज. पामवुं; हिं. पाना; बं. पाओवा; सिं. पाईणु] परत्र पावणें-परलोकीं जाणें; मरणें. 'कळला कंसासी समाचार । व्योमासुर पावला परत्र । धगधगिलें कंसाचें अंतर । म्हणे विचार कैसा करूं ।' -ह १२.१७१.
काटा
पु. १. अणकुचीदार, तीक्ष्ण टोक असलेली, जी बोचली असताना रक्त काढते अशी काडी; बाभळीचा, बोरीचा दाभणासारखा टोचणारा अवयव : ‘सर्प कपाळीं कांटा नेहटे । कां सापसुरळीचे पुच्छ तुटे ।’ - भारा बाल ८·३५. २. सुई : ‘काटा आणिला । मेग सींउ बैसले ।’ - लीचउ २९. ३. (भयाने, थंडीने वगैरे) अंगावर उभे राहणारे शहारे; रोमांच. ४. (अव.) तापानंतर अंगावर येणारा खरखरीतपणा अथवा उठणाऱ्या बारीकपुटकुळ्या; पुरळ. ५. (अव.) तापाच्या पूर्वी अंगावर येणारी शिरशिरी; रोमांच; कसर. ६. विंचवाच्या नांगीचे पुढचे तीक्ष्ण टोक. ७. जो कुलुपाच्या दांडीत असतो व मागे सरतो तो कुलपादिकाचा खिळा. ८. वेळू, बांबू वगैरेंना येणारा तुरा, मोहोर, फुलोरा. ९. कंबर, मान, पाठ, यांच्या आतील बाजूला आधारभूत असलेला अस्थिविशेष. १०. गुणाकार, भागाकार यांचा ताळा पाहण्यासाठी अंक मांडण्याकरिता घातलेली चौफुली (ल.). ११. वजनाने विकलेल्या वस्तूंवर जे काही वजन कटते देतात ते. पहा : कडता. १२. काट्यासारखी शरीराला बोचणारी कोणतीही वस्तू (माशाचे हाड, चक्राचा दाता, घड्याळाचा हातकाटा, खडबडीत लगामाचे टोक, करवतीचा दाता, जेवणातील वापरायचे दाताळे - काटा, जनावरे किंवा भाजीपाला यावरील खरखरीत केस व लव इ.) : ‘काटा बराबर एकांवर एक आला.’ - रासक्रिडा ७. १३. हलवा, इतर मिठाई यावरील टोके, रवा. (क्रि. येणे, उमटणे, वठणे, उठणे.) १४. (वस्त्रोद्योग) वशारन करताना इकडून तिकडे (वशारन पुढे सरकण्यासाठी) फिरवायचे लाकूड. १५. सुताराचे एक हत्यार. (कु.) १६. (ल.) त्रास देणारा माणूस, व्याधी, शल्य, पीडा, शत्रू. १७. तराजूच्या दांडीमधील उभा खिळा : ‘जरि कांटा कलताए देवांचा । जेउता राजमठु ।’ - ऋ ३९. १८. काटा असलेला तराजू (विशेषतः सोनाराचा, सराफाचा) : ‘मेरूचिया वजनासपाहीं । कांटिया घातली जैसी राई ।’ - हरि ६०·१६१. [सं. कंटक] (वा.) काटा उपटणे - १. त्रासदायक प्राणी, शत्रू, गोष्ट नाहीशी करणे. (कर. व.) २. समूळ नाहीसा करणे, काढून टाकणे. काटा काढणे - आपल्या मार्गात असलेल्या, आपल्याला पदोपदी नडवणाऱ्या शत्रूला दूर करणे : ‘वसुदानाच्या पुत्रें जो अभिमुख काशिराजतो वधिला । कांटाचि काढिला तो जाणो तव सूनुच्या मनामधिला ।’ - मोकर्ण ४·१५. काटा मारणे - १. काट्याने सिद्ध करणे. २. अंगात (तापाची) कसर येणे. ३. काटेकोरपणे बरोबर आहे असे दाखविणे; चुकीचा तराजू वापरून वजनात खोट आणणे. काटा मोडणे - १. विंचू चावणे. (व.) २. पाणी किंचित उष्ण होणे. ३. पायात काटा घुसणे. काट्याचा नायटा होणे - काटा मोडल्यावर लगेच तो काढला नाही तर त्या ठिकाणी नायटा होतो, म्हणजे आरंभी क्षुल्लक वाटणाऱ्या वाईट गोष्टीचे पुढे मोठे हानिकारक परिणाम कधी कधी होतात. काट्याने काटा काढणे – एका दुष्टाच्या हातून परभारे दुसऱ्या दुष्टास शासन होईल असे करणे. काट्याप्रमाणे सलणे - सतत त्रासदायक होणे; दुखःकारक होणे; मत्सर, हेवा, द्वेष वाटणे. काट्यावर ओढणे, काट्यावर घालणे - वस्त्र काट्यावर ओढले असताना फाटते त्यावरून दुःखात घालणे; दुःखात लोटणे : ‘त्यांत (कौरव सैन्यात) मरेनचि शिरतां काट्यावरी घालितां चिरे पट कीं ।’ - मोविराट २. ४१. काट्यावर येणे - १. (बैलगाडी) आसाच्या दोन्ही बाजूला समतोल वजन होणे. २. (ल.) (मूल) खळीला येणे; रडायचे न थांबणे. ३. सहनशक्तीची परिसीमा होणे.
काटा, कांटा
पु. १ अणकुचीदार, तीक्ष्ण टोंक असलेली, जी बोचली असतां रक्त काढते अशी काडी; बाभळीचा, बोरीचा दाभणासारखा टोंचणारा अवयव. 'सर्प कपाळीं कांटा नेहटे । कां सापसुरळीचें पुच्छ तुटे ।' -भारा बाल ८.३५. २ (भयानें, थंडीनें वगैरे) अंगावर उभे राहणारे शहारे; रोमांच. ३ (अव.) तापानंतर अंगावर उभे खरखरीतपणा अथवा बारीक पुटकुळ्या अस- तात तो; पुरळ. ४ (अव.) तापाच्या पूर्वीं अंगावर येणारी शिर- शिरी; रोमांच; कसर. ५ विंचवाच्या नांगीचें पुढचें तीक्ष्ण टोंक. ६ कुलुपादिकाचा खिळा, जो कुलुपाच्या दांडींत बसतो व मागें सरतो तो. ७ वेळू, बांबू वगैरेंना येणारा तुरा; मोहोर; फुलोरा. ८ कंबर, मान, पाठ यांच्या आंतील बाजूस आधारभूत असलेला अस्थि- विशेष. ९ गुणाकार भागाकार यांचा ताळा पाहण्यासाठीं अंक मांडण्याकरितां घातलेली चौफुली (x). १० राघु, मैना इत्यादि कांच्या गळ्यांत होणारा एक रोग. ११ वजनानें विकलेल्या वस्तूं- वर जें कांहीं वजन कटतें देतात तें. कडता पहा. १२ नदी किंवा समुद्रांतील पाण्याखालीं झांकलेला खडक. १३ काट्यासारखी शरीरास बोचणारी कोणतीहि वस्तु (माशाचें हाड, चक्राचा दांता, घड्याळाचा हातकांटा, खडबडीत लगामाचें टोंक, करवतीचा दांता, जेवणांतील वापरावयाचें दांताळें-कांटा, जनावरें किंवा भाजीपाला यांवरील खरखरीत केंस. लव इ॰). 'काटा बराबर एकावर एक आला.' -रासक्रीडा ७. १४ हलवा, इतर मिठाई यांवरील टोंकें, रवा. (क्रि॰ येणें; उमटणें; वठणें उठणें). १५ (विणकाम) वशारन करतांना इकडून तिकडे (वशारन पुढें सरकण्यासाठीं) फिरवावयाचें लांकूड. १६ (व.) थेंब. 'घरांत तेलाचा एक कांटा नाहीं. ' -वशाप ५१.१२. ४७८. १७ (कु.) सुताराचें एक हत्यार. १८ (ल) त्रास देणारा माणूस, व्याधि, शल्य, पीडा, शत्रु. ' धर्माच्या हृदयांतिल काढितसे मी समूळ कांटा हो । ' १९ तराजूच्या दांडीमधील उभा खिळा. ' जरि कांटा कलताए दैवांचा । जेउता राजमठु । ' -ऋ ३९. २० काटा असलेला तराजू (विशेषतः सोनाराचा, सराफाचा). ' मेरूचिया वजनास पाहीं । कांटिया घातली जैशी राई । ' -ह ३०.१६१. [सं.कंटक, प्रा. कंटओ, अप. कंटउ; त्सीगन; फ्रे. जि. कंडो. ते काटा] ॰उपटणें-१ (क.व.) त्रासदायक प्राणी, शत्रु, गोष्ट, नाहींशी होणें. २ (व. ष.) समूळ नाहींसा करणें, काढून टाकणें. ॰काढणें -आपल्या मार्गांत असलेल्या, आपणांस पदोपदीं नडवणार्या शत्रूस दूर करणें. ' वसुदानाच्या पुत्रे जो अभिमुख काशिराज तो वधिला । कांटाचि काढिला तो जाणो तव सूनुच्या मनामधिला । ' -मोकर्ण ४.१५. ॰मारणें-१ काट्यानें सिद्ध करणें. २ अंगांत (तापाची) कसर येणें. ॰मोडणें-१ (व.) विंचू चावणें. २ किंचित उष्ण होणें. 'थंड पाण्याचा थोडा कांटा मोडला.' कांट्याचा नायटा होणें -कांटा मोडल्यावर लगेच तो काढला नाहीं तर त्या ठिकाणीं नायटा होतो म्हणजे आरंभीं क्षुल्लक वाटणार्या वाईट गोष्टीचे पुढें मोठे हानिकारक परिणाम कधीं कधीं होतात. कांटयानें कांटा काढणें-एका दुष्टाच्या हातून परभारें दुसर्या दुष्टाचें शासन होईल असें करणें. ' कांट्यानें काढितात कांटा कीं. ' काट्याप्रमाणें सलणें -सतत त्रासदायक होणें; दुःखकारक होणें; मत्सर, हेवा, द्वेष वाटणें. काट्यावर ओढणें-दुःखांत घालणें; वस्त्र कांट्यावर ओढलें असतां फाटतें त्यावरून. काट्यावर घालणें-दुःखांत लोटणें. ' त्यांत (कौरव सैन्यांत) मरेनचि शिरतां कांट्यावरि घालितां चिरे पट कीं । ' -मोविराट ३.४१. कांट्यावर येणें - (बैलगाडी) आंसाच्या दोन्ही बाजूंला समतोल वजन होणें. ॰धारवाडी -अगदीं बरोबर तोल दाखविणारा कांटा. ' टीका करणार्याच्या हातांत नेहमीं धारवाडी कांटा असला पाहिजे. ' कांटेकाळजी-अतिशय सूक्ष्म काळजी; चिंता. ' नवीन गव्हर्नर हे काट्याकाळजीनें व निःपक्षपातबुद्धीनें आपलें काम करतील. ' -टि १.४३३. ॰भर-(बायकी) थोडें. ' आज तिच्या दुखण्याला कांटाभर मागचें पाऊल आहे. ' ॰रोखण-स्त्री. (कु.) लांकडांत खांच, रेघ, पाडण्याच्या उपयोगी सुताराचें एक हत्यार; खतावणी; फावडी. ॰कणगी-(गो.) कणगर; कनक पहा.