मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

क्षुल्लक

क्षुल्लक a Little or small. Light, low. n A failing, folly.

वझे शब्दकोश

क्षुल्लक kṣullaka a (S) Little or small. 2 fig. Light, low, mean, insignificant, trivial, unworthy;--as a person, an action, an affair or a matter. 2 Used as s n A foible, folly, failing, weakness, defect.

मोल्सवर्थ शब्दकोश

न. क्षुद्र पहा. -वि. १ लहान; कमती; अल्प; थोंडें. २ (ल.) हलकें; कमी दर्जाचें ; कवडी किंमतीचें; क्षुद्र; (किरकोळ, माणूस कृति, काम, बाब). [सं.]

दाते शब्दकोश

क्षुल्लक

टीचभर, गुंजभर, चिमूटभर, सूक्ष्म, इवलासा, बिंदुसमान, नखाएवढा, अल्प, लहान, कमी, एवढासाच, उगीच नांवाला, जवळ जवळ नाहींच, एवढातेवढा, तुटके तोटके, अगण्य, क्षुद्र, तुच्छ, नीच, फडतूस, भिक्कार, ऐरेगैरे, फालतू, यःकत्रित, गण्यागंपू, कोणत्या झाडाचा पाला ? कवडी किंमतीची, एक नया पैसा किंमत होणार नाहीं, फुटकी कवडी कोणी देणार नाहीं, चार चव्वल किंमत नाहीं, दीड दमडीची सस्ती चीज.

शब्दकौमुदी

संबंधित शब्द

हलका

वि. १ वजनांत कमी; जड नसलेला. २ लहान; न्यून (प्रमाण, वजन, लांबी इ॰ मोजतांना). ३ कमीप्रतीचा; कडक नसलेला (गुण, प्रभाव इ॰ त). 'अंमलाच्या बाबतींत अफूपेक्षां भांग हलकी.' ४ सौम्य; मंद; कमजोर (थंडी, पाऊस इ॰). ५ जड नसलेलें; पचण्यास सोपें (अन्न). ६ शरीरास गुण- कारी, (अन्न) पचण्यास सोपें (पाणी). ७ सहन करण्याजोगा; फारसा मोठा नसलेला; क्षुल्लक (रोग, विकार. काम). ८ कमी महत्त्वाचें; किरकोळ (काम, बाब). ९ कमी दर्ज्याचा, अधि- काराचा, वजनाचा (माणूस). १० कमी किंमतीची (वस्तु). ११ बेताची; प्रमाणशीर; कमी (किंमत, अट). १२ क्षुल्लक; गौण (विषय). [सं. लघु; प्रा. हलुअ; हिं हलका; तुल॰ सं. क्षुल्लक] कानाचा हलका-वाटेल त्याचें ऐकून त्यावर विश्वास ठेवणारा. जिवाचा मनाचा हलका-संकुचित दृष्टीचा; क्षुद्र; हलकट. बुद्धीचा हलका-कमी बुद्धीचा; मठ्ठ डोक्याचा; मूर्ख. ॰पतला-वि. (व) कमकुवत; दुर्बळ; किरकोळ. ॰फराळ-पु. थोडें अन्न व पुष्कळ पाणी पिणें. ॰फूल-वि. अत्यंत हलका. ॰भार-पु. कमी पत, नांव. हलक्यानें-क्रिवि. हळूं; लवूप्रमा- णानें; सावकाश (बोलणें, चालणें इ॰). 'हलक्यानें-बोल, चाल इ॰.'

दाते शब्दकोश

काडी

स्त्री. १ गवत वगैरेचा तुकडा-दांडा; ' तृणाची काडी न मिळे । ऊष्णें झाडोरे करपले । ' -भावार्थ रामायण, बाल १. ७९. २ लांकडाची काटकी, शिरपूट, धातूचा बारीक लांबट तुकडा, आगकाडी इ. (ल.) काडीच्या मोलाची अथवा आकाराची वस्तु. 'जीवनें शिंपिला तिडपिडी । विजिला प्राण सांडी । लागला तरी काडी । उरों नेदी ।' -ज्ञा १३.७२०. 'काडीचोर तो पाडीचोर = काडी (क्षुल्लक वस्तु) चोरल्याचें एकदां सिद्ध झालें म्हणजे पुढें त्यानें पाडी (वासरूं) सारखी मोठी वस्तु चोरली असा आळ साह- जिकच येतो. क्षुल्लक अपराध करणारा माणूस मोठा अपराधहि करतो. [काष्ठ] ३ (जरीची किंवा रेशमाची या शब्दाच्या पुढें काडी आली असतां) जरी-रेशमी-कांठ (वस्त्राचा) किंवा वस्त्रा- वरची पट्टी, वीण असा अर्थ होतो. ४ (गंजिफा) डाव जिंकणें. एका खेळाडूस सर्व पानें देण्याची पाळी येणें. क्रि. लागणें. ५ (खा.) दिव्याची (पणतीची) ज्योत. ६ (बुरुड काम) बांबूची बारीक कांब ७ (व. ना.) हातांतील टेकावयाची काठी. ८ (व. ना.) सरपण (अव.) कड्या. ९ गुरांचा चारा. 'जनावरांनां वैरण-काडी देण्याचा हुकूम सोडला.' -कोकि ७३६. १० (गो.) बायकांच्या नाकांतील चमकी. ११ (कु.) एक जातीचा मासा. याच्या अंगावर कांटे असून आकृति सर्पाप्रमाणें असतें म्ह॰ १ काडीची सत्ता लाखाची मत्ता = थोड्याशा अधिकारानें जें काम होतें तें पुष्कळशा पैशानें होत नाहीं. २ काडीपासून जोडावे लाखापासून मोडावें. (वाप्र.) (आडवी उभी) काही ओढणें-(ल.) निषेधपर आडव्या उभ्या रेघा काढायला समर्थ नसणें, म्हणजे कांहींहि अक्षर लिहितां न येणें. अक्षरशत्रु. -ची आग माडीस लागणें-श्रेष्ठ माणसास कनिष्ठ माणसापासून किंवा एखाद्या क्षुल्लक करणापासून अगर व्यक्तीकडून उपद्रव होणें. -नें औषध लावणें-दुसर्‍याच्या जखमेला दुरून बोट न लावतां काडीनें औषध लावणें यावरून, अंग राखून काम करणें. ॰मोडणें-मोडून देणें-क्रि. पदर फाडून देणें, पालव कापून देणें. विवाहसंबंध तोडून टाकणें, रद्द करणें. काडी लागणें-जळणें; राख होणें; नाश पावणें, नाहींसा होणें. 'नमुताईंच्या संसारास काडी लागली.' -हाच कां धर्म -नाशिककर २५. ॰कसपट-न. गदळ; घाण; केरकचरा, 'म्या म्हटलें हा मार्ग चांगला काडीकसपट नसे ।' -अफला ७५. ॰कुडुल्यो-(वाप्र, बायकी) छप्पापाणी खेळतांना जर सर्व मुली बसल्या तर एका मुलीनें सर्व गड्यांस सावध करून तोंडानें काडी कुडुल्यो म्हणून सर्वांनीं उठणें. ॰खार-काडेखार-पु. पापडखार (सोनार वापरतात). -चा-यत्किंचितहि; थोडा; अल्प. 'नाटक वाल्यांत काडीची देखील गुण नसतो' -विकार विलसित. ॰पेंढी-स्त्री. पेंढी काडी पहा. ॰भर-फार थोडा; यत्किंचितहि. 'तुम्हांला कोणी काडीभरहि उपद्रव करणारा नाहीं.' -विवि ८.३.५३. ॰महाल-पु. कोल्हाटी-डोंबारी घिसाडी इ॰ भटक्या लोकांच्या गवती झोंपड्यांनां तुच्छतेनें म्हणतात. ॰मात्र-काडी- भर पहा. ॰माया-(व.) अगदीं रोड. ॰मोड- १ (हिंदुकायदा) नवरा व बायको यांनीं आपला विवाहसंबंध तोडून टाकणें (या- समयीं गवताची काडी चार मंडळींसमक्ष मोडतात. ही रीत शूद्रादि लोकांत आहे). २ (ल.) संबंध तोडणें. 'घाबरियांच्या मोडा काड्या । धाडा भ्याडां वळतियां ।' -तुगा २२७. ॰येवढी-काडीभर पहा.

दाते शब्दकोश

डोंगर      

पु.       १. पृथ्वीवरील खडक, माती यांचा नैसर्गिक उंच भाग; लहान पर्वत; टेकडी; पहाड; घाट; उंचवटा; डगर; कडा; सुळका. २. ढीग; रास; थप्पी; चवड; ढिगारा; गंज; गंजी. ३. (ल.) मेहनतीचे काम; काळजी करण्यासारखा आजार; कर्जाचा बोजा; पाप, गुण, संकट यांचे आधिक्य. ४. (ल.) काजळाचा गोळा, रास (भांड्याच्या बुडावर धरलेली). ५. डोंगराळ मुलुखात प्रथम नाचणी पेरलेले शेत. (क.) ६. शुष्क, डोंगराळ प्रदेश; नाचणी, वरी यांसारख्या पिकांच्या उपयोगी जमीन. (को.) [सं. दांग] (वा.) डोंगर खणून (पोखरून) उंदीर काढणे –कष्टाच्या मानाने क्षुल्लक फळ मिळणे. डोंगर माजून राहणे –डोंगर बळकावून राहणे. डोंगरावरून उडी टाकणे –क्षुल्लक गोष्ट करणे; हलकी देणगी देणे. डोंगरी दिवा लावणे – (पेंढारी, लुटारू इ.ना भिऊन) डोंगरात जाऊन राहणे, वस्ती करणे, संसार थाटणे. डोंगरी मोर नाचविणे –बढाया, थापा मारणे; चाळवण्या दाखविणे : ‘आजपावेतो डोंगरी मोर नाचविले, आता अवघड पडले असे जाणून पाटीलबाबांनी आबा चिटणीसास सामोरी पाठविले.’ –ऐको ४८८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हेंगड-डा, हेंगडतिफड, हेंगाड-डा

वि. १ ओबड- धोबड; चमत्कारिक; वेडेविद्रें; कर्णकटु (भाषण, कामधंदा, बोली). २ राकट; कठोर; विद्रुप; विशोभितच रानटी; राक्षसी (रीत, वहि वाट, वर्तणूक, स्वरूप, अंग). ३ मूर्ख; रानवट; अडाणी (माणूस) ४ हट्टी; दुराग्रही. [का. हेंगसू = स्त्री] म्ह॰ हेंगाडा कुणबी दुणा राबे धन्याला खर्च फार लागे. हेंगडतट्टू-पु. हेंगाड-डा माणूस हेंगड(डु)मेंगड(डु), हेंगडा मेंगडा-स्त्रीन. १ किरकोळ; क्षुल्लक माल, वस्तु. २ बडबडच गप्पा. -वि. १ हलका; क्षुद्र; घाणेरडा; मळकटच क्षुल्लक. (वस्तु, प्राणी, दागिना). २ अडाणी; रानटी; खेडवळ; राकट; ओबडधोवड. ३ विसंगत; असंबद्ध (भाषण). -क्रिवि विसंगतपणें.

दाते शब्दकोश

क्षुद्र

न. न्यून; उणेपणा; वैगुण्य; दोष. -वि. लहान (योग्यता, आकार इ॰ नें); हलकें; क्षुल्लक 'क्षुद्र मत्स्य-प्राणी- ग्राम इ॰.' 'जोडा पुसणें, केर काढणें ही क्षुद्रकर्में तुम्हा सारख्यांनीं जातीनें करूं नयेत.' [सं.] ॰कल्पना-स्त्री. कमी महत्त्वाची; हलकी कल्पना. तर्क, विचार ॰घंटिका-स्त्री. घुगरु; घुंगरांची माळ; घुंगरू लावलेला एक दागिना. 'क्षुद्र घंटिका झळ- कती ।' -वेसीस्व ३.७१. ॰दृष्टि-स्त्री. हलके, बारीकसारीक दोष पाहण्याची प्रवृत्ति; कोतें मन; अनुदार वृत्ति. -वि. उणे पणा काढणारा; क्षुद्रदृष्टि ठेवणारा; क्षुद्रान्वेषी. ॰मेह-पु. लघवी थोडी होणें; अशी होणारी लघवी. ॰रोग-पु. क्षुल्लक रोग, विकार (यांची २०० पर्यंत संख्या आहे). क्षुद्रान्वेषण, क्षुद्रान्वेषी- क्षुद्रदृष्टि पहा. क्षुद्रकक्षुद्र पहा.

दाते शब्दकोश

सदका

पु. दानधर्म;ओंवाळून टाकलेली वस्तु. सत्का पहा. गाढवाचा सदका-शाहण्याचा सदका-कुचकामी, निरुपयोगी, क्षुल्लक वस्तु; क्षुल्लक, क्षुद्र, कुचकामी मनुष्य अशा अर्थीहि हा शब्द वापरतात. उदा॰ मोठा शेला देणार्‍याचा सदका मला ठाऊक आहे? [अर.सदका]

दाते शब्दकोश

अल्प

वि. १ थोडें; लहान; कोतें म्ह॰ अल्प मोली बहु- गुणी. सामाशब्द-अल्पबुद्धि-बल-व्यापार-लाभ-भाषी-विद्य- -व्यय; २ क्षुद्र (जन, पुरुष); दरिद्रि; भिकारी. 'कृष्णासि भेट- लाहो स्पर्शसुख जागीं अलभ्य अल्पा तें ।' -मोकर्ण. ५०.१६. ३ मूढ; मुर्ख. 'मानिति माया केवळ अल्प सभेंतील भूमि- तळ-पट हो ।' -मोसभा ५.८७. [सं.] ॰करणी स्त्री. थोडें, किंचित् किंवा अपुरें करणें. 'अल्प करणी बोभाट बहुत ।' ॰कर्ण- र्णी वि. विप्र. अल्पकानी. १ हलक्या कानाचा; कानपिसा; सहज विश्वास ठेवणारा; भाविक; भोळा, श्रद्धाळु. २ गुप्त गोष्ट ज्याच्याजवळ ठरत नाहीं असा; जिभेचा हलका. ॰कालिक तारे पु. अव. क्षणिक दिसणारीं नक्षत्रें. क्रोधी वि. चिडखोर; शीघ्रसंतापी; शीघ्रकोपी. ॰खादी वि. थोडेसें खाणारा. 'अशा प्रकारची आखूडशिंगी, कृष्ण- वर्णी, बहुदुधी, अल्पखादी व अल्पमोली व गाय पैदा करावी.' -आगर ३.८४. ॰गति वि. मंदगतीचा. ॰गुणें क्रिवि. सहज; थोडक्यांत. 'आणिक एक आह्यां देणें । मुक्ति होय अल्पगुणें ।' -गुच २९.१९०. ॰गोष्ट-स्त्री. लहान बाब; क्षुल्लक गोष्ट; बिनमहत्त्वाची बाब. ॰ग्रह- पु. किरकोळ ग्रह (आकाशांतील). (इं.) अस्टेरॉईड. ॰जनसत्ताक- वि. थोड्याशा लोकांची हुकमत असलेली. -नि ८२. ॰तृष्णा स्त्री. थोडीशी तहान, हांव. ॰दृष्टि वि. १ आकुंचित, कोत्या मनाचा; अदूर- दृष्टीचा. २ बारकाईनें व काळजीनें पाहणारा; कोटेकोर; बारीकसारीक देखील पाहणारा. ३ (ल.) कृपण; चिकट. ॰धन वि. गरीब; दरिद्री; कंगाल; अपुर्‍या साधनाचा, ऐपतीचा. ॰निद्रा वि. थोडीसी झोंप ज्याला पुरते असा; ज्याची झोंप लवकर मोडते असा. ॰प्राण पु. व्यंजनांतील एक भेद. जीं व्यंजनें उच्चारण्याला फार सोपीं आहेत तीं; ज्यांत हकाराचा ध्वनि येत नाहीं तीं; जोर न देतां सहज उच्चारावयाचा साधा उच्चार किंवा अक्षर उ॰ क्, ग्, ङ्, च्, ज्, ञ्, ट्, ड्, ण्, त्, द्, न्, प्, ब्, म्, य्, व्, र्, ल्, आणि ळ्. एकूण २०. महाप्राण पहा. ॰बुद्धि-मति वि. कोत्याबुद्धीचा; अल्प सम- जुतीचा. ॰भाष-भाषी वि. मितभाषी; अबोलका; वटवट न करणारा; ॰मोली वि. थोडक्या किंमतीचा; हलक्या किंमतीचा; स्वस्त. म्ह॰ अल्पमोली बहुदुधी. ॰वय-वयस्क वि. लहान उमरीचा; वाल. ॰विचार-री अल्पबुद्धि पहा. विद्य-द्या वि. थोडकें शिकलेला; वरवर ज्ञान असलेले; उथळ ज्ञान असलेला. म्ह॰ अल्पविद्यो महागर्वी. ॰विषय पु. क्षुल्लक बाबा, गोष्ट; हलकें काम; बारीक सारीक प्रकरण. प्रकरण. ॰वृत्त न. लहान वर्तुळ-मंडळ (भौगोलिक किंवा खगोलिक); लघुवृत्त. ॰शक्ति वि. अशक्त; निर्बल; कम- ताकद. ॰संख्यांक वि. थोड्या प्रमाणांत असलेले (लोक, द्रव, वगैरे). अल्पपक्ष. (इं.) मायनॉरिटी. ॰संतुष्ट-संतोषी-समा- धानी वि. ताबडतोब किंवा थोडक्यांत संतुष्ट होणारा, खूष होणारा; कमी महत्त्वाकांक्षी. ॰सत्ताकपद्धति-अल्पजनसत्ताक पहा. (इं.) ऑलीगर्ची. ॰समजूत वि. कोत्या समजुतीचा; अडाणी. ॰सामर्थ्य-न. थोडिशी शक्ति; अल्पबल. सिद्ध-वि. थोडक्या श्रमानें-मोलानें-साधनानें मिळविलेलें, मिळालेलें, केलेलें. ॰स्वल्प- वि. कांहींसें; थोडेसें; जरासें; किंचित; लहान प्रमाणाचें-रकमेचें; थोडेंबहुत. ॰ज्ञ-ज्ञान वि. कोत्या बुद्धीचा, समजुतीचा; अल्पबुद्ध; अल्पसमजूत.

दाते शब्दकोश

नख

पुन. १ मनुष्याच्या हातांच्या, पायांच्या बोटांच्या टोकाला असणारें शिंगाच्या जातीचें पातळ कवच. २ पशूच्या, पक्ष्याच्या पंजाला असणारें तीक्ष्ण अणकुचीदार हाड; पंजा. ३ खवल्या मांजराच्या अंगावर असलेल्या खवल्यांपैकीं प्रत्येक. ४ नखांतील विष; नखविष. (क्रि॰ बांधणें; लागणें; धावणें). ५ थेंब; अगदीं थोडें प्रमाण (तूप इ॰ चें). 'कुंकवाचें नख.' ६ (सोनारी) खरवईच्या दुसर्‍या टोकाशीं असणारी नाखाकृति लोखंडी मूठ; ही गडवे घडण्याच्या उपयोगी असते. [सं. नख; प्रा. नह; हिं. नह; सिं. नहु; पं. नहुं; पोर्तु. जि. नई] (वाप्र.) ॰दुष्टीस न पडणें-(एखाद्या कुलीन स्त्रीनें) बाहेर मुळींच न दिसणें, पडणें; पडद्याच्या आंत राहणें; अति मर्यादशीलपणानें वागणें, 'ती मराठमोळ्यांतील स्त्री आहे, तिचें नख तुझ्या दृष्टीस पडणार नाहीं.' ॰देणें-लावणें-ठार करणें. 'नीतीला नख देणारे ।' -संग्रामगीतें ९. ॰नख बोलणें-दिमाखानें, ऐटीनें, कुर्रेबाजपणानें बोलणें. ॰लावणें-(लहान अर्भक इ॰ कांच्या कोमल गळ्याला) नखांनीं दाबून जीव घेणें, ठार करणें. नख देणें पहा. 'माझे मर्यादेची रेख । पृथ्वी न विरवी उदक । उदकातें तेज देख । न लवी नख शोषाचें ।' -एभा २४.१३९. 'अरिहि न करिल असें त्वां केलें, कां नख न लाविलें जननी ।' -मोउद्योग ११.२३. ॰शिरणें-शिरकाव होणें; चंचुप्रवेश होणें. नखांबो टांवर काम करणें-नाजुकपणाचा आविर्भाव, दिमाख करून काम करणें. नखांबोटांवर खेळविणें-चाळविणें-(एखाद्यास) भूलथाप देणें; चाळविणें; झुलविणें; भुरळ पाडणें. नखांबोटांवर चालणें-ठमकत, ठमकत, मिजासीनें चालणें. नखांबोटांवर जेवणें-चाखतमाखत, चोखंदळपणानें जेवणें. नखांबोटांवर दिवस मोजणें-(एखाद्या गोष्टीची) अत्यंत आतुरतेनें वाट पहाणें, प्रतीक्षा करणें. नखांला आग लागली-अजून सारे अंग जळा- याचें आहे). संकटावर, संकटें येण्यास नुसती सुरवात झाली, अजून पुष्कळ संकटें यावयाचीं आहेत; (एखाद्याच्या) नखीं दोष नसणें, नखाला माती न लागणें-(एखादा) अत्यंत शुर्चि- र्भूत, निष्कलंक, पवित्र असणें. नखीं पातक लागूं न देणें-पापा- पासून अलिप्त राहणें; यत्किंचितहि पाप न करणें. 'नको लागों देऊं किमपि विमळे पातक नखीं ।' सारुह ७.१४६. नखें चावीत-कुरतुडीत-वाजवीत बसणें- १ निरूद्योगी, रिकाम- टेकडेपणानें असणें; उद्योगधंदा न मिळतां असणें. २ कुंठित, हिर- मुसलें होऊन बसणें. नखोनखीं सुया मारणें-शिक्षेचा एक प्रकार. 'नखोनखीं सुया मारिती । या नांव आदिभूतिक ।' -दा ३.७.७१.जेथें नख नको तेथें कुर्‍हाड लावणें- साध्याच साधनानें काम होईल अशा ठिकाणीं मोठमोठीं साधनें, शक्ति उपयोगांत आणणें. आपलींच नखें आपणांस विखें- आपल्याच दुष्कृत्यांनीं स्वतःवर आलेलीं संकटें. म्ह॰ जेथें नखानें काम होतें तेथें कुर्‍हाड कशाला. = जेथें क्षुल्लक, अल्प साधनानें, शक्तीनें काम होण्यासारखें असेल तेथें मोठें साधन शक्ति कशाला योजावी ? 'नखहि नको ज्या कार्या, त्या काढावा कशास करवाल ।' -मोभीष्म ४.४६. साधित शब्द-नखभर-वि. नखावर मावण्या- इतकें; अत्यंत थोडें. 'नखभर तूप.' नखाएवढा-वि. अगदीं लहान; किरकोळ; क्षुल्लक (जिन्नस, काम, कर्ज, अपराध, मनुष्य इ॰). 'मेला नखाएवढा जीव नाहीं.' -नामना १२. नखाची जीभ- स्त्री. नखाखालील नाजुक त्वचा; जिव्हाळी. सामाशब्द- ॰खुरपा-वि. नखानें खुरपून काढतां येण्याजोगा (कोवळ्या नारळांतील मगज इ॰). [नख + खुरपणें] ॰जीन-न. (राजा.) नखें काढण्याचें न्हाव्याचें हत्यार; नर्‍हाणी. [नख + फा] ॰मूळ, नखरडुं, नखरूं-न. नखाच्या जवळ होणारा फोड, सूज इ॰ विकार. [नख + मूळ] ॰वणी-न. ज्यांत मनुष्यानें नखें बुडविलीं आहेत असें धार्मिक कृत्यास निषिद्ध मानलेलें पाणी. [नख + पाणी] ॰विख, विष-न. १ नखांतील विष; नखांत एक प्रकारचें विष असून फार खाजविलें असतां खाजविलेल्या भागास तें बाधतें. 'खाजवूं नकोस, नखविष बाधेल.' २ नखांतील विष बाधून झालेला व्रण, जखम. (क्रि॰ बाधणें; लागणें; धावणें). 'नखविख आणी हिंगुर्डे । बाष्ट आणी वावडें ।' -दा ३.६. ४८. [नख + विख] ॰शिखपर्यंत, नखशिखांत-क्रिवि. पायांच्या नखां- पासून शेंडीच्या अग्रापर्यंत; आपादमस्तक; सर्व शरीरभर. 'दर पंधर- वड्यास जरी नखशिखांत क्षौर केलें तरी त्याबद्दल आम्ही त्यास दोष देणार नाहीं.' -आगर 'वाघास पाहतांच नखशिखपर्यंत कंप सुटला.' [नख + सं. शिखा = शेंडी + पर्यंत, अंत] ॰क्षत-न. १ नखानें (शरीर इ॰ कांवर) काढलेला ओरखडा. २ (प्रणय- लीलेंत) नखाचा ओरखडा, वण उमटणें. 'नखक्षतानें मृदु किण्वंती नवनवगुण रागिणी । धरावी हृदयीं कवटाळुनी ।' -राला ३६. दंतक्षत पहा. [नख + सं. क्षत = जखम, ओरखडा] नखाग्रीं- क्रिवि. १ नखाच्या टोंकावर. 'व्रजावन करावया बसविलें नखाग्रीं धरा' -केका ५. २ (ल.) लिहितांना चटकन् आठवेल इतका पाठ असलेला (धडा, श्लोक इ॰). जिव्हाग्रीं पहा. [नख + सं. अग्र = टोक] नखोदक-न. नखवणी पहा. [नख + उदक = पाणी]

दाते शब्दकोश

आडफांटा

पु. १ क्षुल्लक अडथळा; आक्षेप; हरकत; तक्रार; हुज्जत. अडफाटा पहा. २ अवचित अडथळा; विघ्न; संकट. ३ (कों.) भुतांखेतांची बाधा; भुतानीं पछाडणें. ॰भरणें-आडमार्गानें जाणें; बहकणें. 'अहंकार मद्य पिऊनी । भ्रमती मायाघोरविपिनीं । आपली शुद्धि विसरोनि । आडफांटा भरले हो ।' -ह ७.२२८. [आड + फांटा] ॰ट्या वि. १ आडफांटा, अडचणी, अडथळा घालणारा; तक्रार करणारा; तक्रारी. २ लहरी; चिडखोर; तिरसट; छांदिष्ट.

दाते शब्दकोश

आडफाटा      

पु.       १. क्षुल्लक अडथळा; आक्षेप; हरकत; तक्रार; हुज्जत. २. अवचित अडथळा; विघ्न; संकट. ३. भुताखेतांची बाधा; भुतांनी पछाडणे. (कों.) (वा.) आडफाटा काढणे, आडफाटा घेणे, आडफाटा फोडणे − कार्याचा बिघाड करणे. आडफाटा भरणे − आडमार्गाने जाणे; बहकणे : ‘अहंकार मद्य पिऊनी । भ्रमती मायाधीरविपिनीं । आपली शुद्धि विसरोनि । आडफाटा भरले हो ।’ − हरि ७·२२८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अधम      

वि.       १. हलका; कनिष्ठ; क्षुद्र; क्षुल्लक. २. (ल.) नीच; वाईट; हलकट; नष्ट; निंद्यकर्मी; दुष्ट. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अधम

वि. १ हलका; कनिष्ठ; क्षुद्र; क्षुल्लक. २ (ल.) नीच; वाईट; हलकट; नष्ट; निंद्यकर्मा; दुष्ट; विरुद्ध. 'वर्जीत गंगा । नाहीं उत्तम अधम जगा ।। '-तुगा ६४२. ॰किडा-पु. १ बकऱ्याच्या यकृतामधील रक्त ज्या विकारावर सांगितलें आहे असा एक रोग (एका दंतकथेप्रमाणें). ३ काळपुळी (कांहींच्या मतें ). ४ नेहमीं दुखणे- करी इसम-मुलगा. [सं. अध: + म]

दाते शब्दकोश

अगडत(द)(ध)(ब)गड

न. १ क्षुल्लक वस्तु; अडगळ; सटर- फटर. २ अमर्याद, शुष्क, निरर्थक बडबड; वांकडेंतिकडें बोलणें- करणें-वागणें, वगैंरे. ३ शिळेंपाकें जाडेंभरडें अन्न; गरीबीचें खाणें; भिकार खाणें. -क्रिवि. कसेंतरी; वेडेंवांकडें; ओबडधोबडपणें. [विचित्र प्रयोग. सं. अ + घट्; म. घाट]. अगडीं दगडीं जीव घालणें-पाडणें-एखाद्यास अडचणींत घालणें. अगडीं दगडीं पडणें-अडचणींत सांपडणें.

दाते शब्दकोश

अगडतगड, अगडदगड, अगडधगड, अगडबगड      

न.       १. क्षुल्लक वस्तू; अडगळ; सटरफटर. २. अमर्याद, शुष्क, निरर्थक बडबड; वेडेवाकडे वागणे, बोलणे वगैरे. ३. शिळेपाके, जाडेभरडे अन्न; निःसत्त्व खाणे; गरिबीचे खाणे; भिकार खाणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अगणनीय, अगणेय      

वि.       १. ज्याची गणना, मोजणी करता येणार नाही असे. २. (ल.) क्षुल्लक; खिजगणतीत नसलेले.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अगणनीय-अगणित

वि. १ अमोज; अमाप; मोजतां येण्यास अशक्य; असंख्य. २ (ल.) क्षुल्लक; खिसगणतींत नसलेलें. [सं. अ + गण् = मोजणें ]

दाते शब्दकोश

आगटा-टी-टें

--पु. स्त्री. न. १ काटक्या, गवत इत्यादिक पेटवून तयार केलेला विस्तव; शेगडींत घातलेला आहार किंवा निखारे; शेकोटी; धुणी; परसा. ‘पाहेपां कामिकांच्या पोटीं । सदा क्रोधाची आगटी ।’ –एभा १७.२२४. २. सोनाराची शेगडी-कुंडी; बागेसरी. म्ह॰ सोनाराचें पाहणें आगटींत = थोड्याशा लाभासाठीं मनुष्य एखाद्या क्षुल्लक गोष्टींतहि मन घालतो या अर्थानें. ३. (गो.) होमकुंड. ४ थोडीशी आग. [सं. अग्नी + स्थिति; प्रा. अग्गिठिई = आगिठी- आगठी. सिं. आगिठो.] ॰पेटविणें- भांडण तंटा-कलह-कलागत-लावणें-चेतविणें; कलह माजविणें. विज- वून टाकणें- १ आग विजविणें. २ (ल.) एखाद्या कुटुंबाचा समूळ नाश, नायनाट करणें.

दाते शब्दकोश

ऐलपैल

क्रिवि. या व त्या बाजूस; जवळच्या व दूरच्या दोन्ही कांठावर; अलीकडे पलीकडे. 'या नदीचे ऐलपैल वस्ती आहे.' [ऐल + पैल] -वि. (अलीकडचा व पलीकडचा) इतर; अवांतर; किरकोळ; मिश्र; सटरफटर; क्षुल्लक (वस्तु, काम, शब्द, मनुष्य इ॰). 'आम्हास संसारखर्चापेक्षां ऐलपैल खर्च फार लागतो.'

दाते शब्दकोश

ऐरीगैरी

वि. १ अशक्त; मूर्ख; मंद; जड (माणूस); हलकी; क्षुद्र; (वस्तू). २ अलबत्यागलबत्या; क्षुल्लक; कोणीतरी. 'कीर्तीचे चौघडे पोवाडे ऐर्‍यागैर्‍याचें नाहीं केलें.' -गापो ७६. [गैरी-द्वि.]

दाते शब्दकोश

अकिंचित      

वि.       क्षुल्लक; क्षुद्र; निरुपयोगी; बेकाम; प्रभाव, महत्त्व किंवा उपयोग नसलेली (व्यक्ती किंवा वस्तू). [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अकिंचित्

वि. किंचितहि नाहीं; मुळींच नाहीं. [सं. अ + किम् + चित्]. ॰कर-वि. क्षुल्लक;क्षुद्र. ॰ज्ञानअगदीं थोडें ज्ञान. ॰प्रद- बोध-वद्.

दाते शब्दकोश

आळिक      

वि.       क्षुल्लक : ‘हें अवघेच विचारतां आळिक.’ − भाए ७०. [सं. अलीक = थोडे]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आळिक

वि. क्षुल्लक. 'हें अवघेच विचारितां आळिक.' -भाए ७०. [सं. अलीक = थोडें]

दाते शब्दकोश

अलक्ष्य

न. १ दुर्लक्ष; गैरसावधता; अनवधानता. २ परमे- श्वर; ब्रह्म. -वि. (अप. अलक्ष); कल्पनातील; दुर्बोध; अज्ञेय; अतर्क्य. 'ध्वजवज्रांकुशरेखा । चरणींची सामुद्रिकें देखा । न वर्णवतीं सहस्त्र- मुखा । ब्रह्मादिकां अलक्ष्य ।।' -एरुस्व १.२२. ॰लेखणें-धरणे-मोजणें-मानणें-पाहणें-जाणणें किंमत न देणें; क्षुद्र किंवा क्षुल्लक मानणें; तिरस्कारणें; अनादरणें; अवज्ञा करणें. [सं.]

दाते शब्दकोश

अल्पगोष्ट      

स्त्री.       लहान, क्षुल्लक गोष्ट, बिनमहत्त्वाची बाब.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अल्पविषय      

पु.       क्षुल्लक बाब, गोष्ट; हलके काम; बारीक सारीक प्रकरण. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आलतू फालतू      

वि.       सामान्य; भलतासलता; वाटेलतो; क्षुल्लक; दर्जा नसलेला : ‘दुसरी आलतु फालतु परीक्षणं न छापण्याच्या प्रतिज्ञेनं …’ मसासं १.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनुल्लेखनीय      

वि.       दुर्लक्षणीय; बिनमहत्त्वाचे; क्षुल्लक [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आंबट      

वि.       १. खट्टा; आम्ल; चवीला व वासाला कच्चा आंबा, चिंच, लिंबू यांच्यासारखा. २. (ल.) निरुत्साही; खिन्न; वाईट; उदास. (वा.) आंबट करणे–निराशा करणे. आंबट मागणे– दुसऱ्याचे भांडण स्वतःवर ओढवून घेणे. आंबट होणे, आंबट होऊन येणे, आंबट घडणे– निराशा होणे, हताश होणे. वईवरून आंबट होणे– थोडक्यासाठी रागावून मनुष्यास तोडणे; क्षुल्लक कारणासाठी एखाद्यावर रागावणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंगठी

स्त्री. १ हाताच्या बोटांत घालावयाचा एक अलं- कार; मुदी; वेढें; मुद्रिका; मोहरेची-देव दर्शनी-मिन्याची-सील (नांवाचीं आद्याक्षरें) इ॰ अंगठ्या असतात. २ हाताची करंगळी. ३ पायाचें बोट. ४ अंगुस्तान. ॰म्ह १आंगठी कापली तरी हा मुतायचा नाहीं = अतिशय कृपण माणसाबद्दल योजतात. २ आंगठी सुजली म्हणून डोंगराएवढी होईल कां? = क्षुल्लक गोष्ट कितीहि फुगवून सांगितली तरी तिला महत्त्व येत नाहीं. ३ ज्याची आंगठी त्याच्याच डोळ्यांत घालणें = एकाद्याला डावांत फसविणें; ज्याच्या तंगड्या त्याच्याच गळ्यांत घालणें. [अंगु- लिस्थ (रत्न)-आंगुइट्ठ-आंगुट्ठी-आंगठी; सं. अंगुष्ट; सिं. आड्वठी]

दाते शब्दकोश

असा

वि. असला; अशा प्रकारचा; अशासारखा; विशिष्ट; इतका. ' म्हणोत म्हणणार बा तुज असा नसेल क्षमी ।' -केका ५१. -क्रिवि. १अशा रीतीनें; ह्या प्रकारें; म्हणून. २ सारखा-शब्दांतील आरंभीचा अ गाळून तो शब्दाच्या शेवटीं जोडून नेहमीं वापर तात. उ॰ 'भीष्म ग्रीष्म तरणिसा अर्जुन हेमंत तरणिसा गमला ।' -मोभी १०.९१. ' गोरगरीबांस अन्न द्यावेसें मला वाटतें.' [सं. ईद्दश; प्रा. अइस; म. असा ] ॰तसा- वि. कोणी तरी; साधारण; हलका; सामान्य प्रतीचा; क्षुल्लक; कमी प्रतीचा, दर्जाचा; नालायक; असाच पहा. ' हा पंडीत केवळ अशातशांतला नव्हे.' -क्रिवि. कोणत्या तरी उपायानें, रीतीनें, युक्तीप्रयुक्तीने; अडप- झडप. [सं. ईद्दश + ताद्दश]

दाते शब्दकोश

असातसा      

वि.       कोणीतरी; साधारण; हलका; सामान्य प्रतीचा; क्षुल्लक; कमी प्रतीचा, दर्जाचा; नालायक, पहा : असाच

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अशीतशी

वि. लहानसहान; किरकोळ; क्षुल्लक; महत्त्व नस- लेलें.

दाते शब्दकोश

अशीतशी      

वि.       लहानसहान; किरकोळ; क्षुल्लक; महत्त्व नसलेले.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

बारीक

वि. १ सूक्ष्म; ज्याची जाडी कमी आहे असा; पातळ; कृश (खांब, शरीरावयव सूत इ॰) २ एकंदरींत आकारानें लहान असलेला (दाणा; सुपारी, लवंग, डोळा इ॰) ३ तलम सूत असलेलें (वस्त्र इ॰) तलम, पातळ (कण, अवयव) जाड भरड नसलेलें (पीठ इ॰). ४ (ल.) गुप्त; गूढ (बातमी). ५ (ल.) 'श्रीमंत स्वामींची बहुतच मर्जी बारीक जाली आहे.' -रा १.२२८. [फा. बारीक्] म्ह॰ (व.) बारिकगळी सकनयळी = फार हळू बोलणार्‍या सुनेला सासू असें म्हणते. ॰कातणें- १ हिशेबांत किंवा वागण्यांत फार बारकाईनें पाहणें; कांटेकोरपणानें वागणें; फाजील चोखपणा करणें. २ अत्यंत कृश किंवा किडकिडीत होणें. (एखाद्यावर) बारीक कातणें-गोड गोड बोलून फस- विणें; दयालुत्वाचा व सभ्यतेचा आव आणून एखाद्याला बुडविणें, त्याचा नाश करणें. ॰पहाणें-पैसे किंवा खर्च यांकडे फार बार- काईनें पाहणें; खर्चाच्या अगदीं क्षुल्लक किंवा किरकोळ गोष्टींकडे लक्ष पुरविणें; चिक्कूपणा करणें. ॰कुटाळ-वि. सभ्यपणाचा आव आणून निंदा करणारा; धूर्तपणानें व गुप्तपणानें बालंट घेणारा; आळ घालणारा (उपरोधिक बोलण्यानें). ॰कुटाळी-स्त्री. गुप- चुपपणें घेतलेलें बालंट. ॰जोर-पु. (गो.) क्षयरोग. [बारीक + सं. ज्वर] ॰दृष्टि-नजर-स्त्री. (ल.) फाजिल हिशोबी पाहणी; चिक्कूपणा. ॰निरीक-सारीक-शिरीक-वि. किरकोळ; बारीक. [बारीक द्वि.] ॰मोठा-वि. बारीक आणि मोठा; कांहीं बारीक कांहीं मोठा. ॰रडणें-रडें-न. हळू आवाजानें रडणें; मुसमुसणें; मुळुमुळु रडणें. ॰राव-पु. काडीपहिलवान; सडपातळ कृश मनुष्य. ॰साय, साण-पु. (गो.) चौकसपणा; सूक्ष्म दृष्टि. ॰हंसणें, हंसें-न. स्मित करणें; गालांतल्या गालांत हसणें; मोठा आवाज न करतां हसणें.

दाते शब्दकोश

भांड, भांडखोर, भांडगा-रा

वि. क्षुल्लक कारणावरून भांडण करणारा. 'म्हणाल तरि तत्सुता कशि तुम्हांसवें भांडगा ।' -केका ३५. [भांडणें] म्ह॰ भांडाच्या गांडीखालून जाऊं नये. भांडकुदळ-वि. भांडखोर. [भांडणें] भांडकें-वि. भांडखोर. 'जैसें आपण नग्न भांडकें । जगातें म्हणें ।' -ज्ञा १८.१३५.

दाते शब्दकोश

भिकारी

वि. १ उदरनिर्वाहाकरितां भिक्षा मागणारा. २ (ल.) क्षुद्र; क्षुल्लक; हलकी(वस्तु पदार्थं वगैरे). [सं. भिक्षा]

दाते शब्दकोश

चिचोरडा

वि. (व.) क्षुल्लक (जीव). 'एवढासा चिचो- रडा आहे, पण मोठा हुषार आहे.'

दाते शब्दकोश

चिचोरडा      

वि.       क्षुल्लक (जीव). (व.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चिक्कर      

वि.       लहान; चिमुकले; क्षुल्लक; आकारात कमी (फळे, फुले, अक्षरे, आकृती, विड्याची पाने इ.) [क. चिक्क = लहान]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चिक्कर

वि. लहान; चिमुकलें; क्षुल्लक; आकरांत कमी (फळें, फुलें, अक्षरें, आकृति, विड्याचीं पानें इ॰). [का. चिक्क् = लहान]

दाते शब्दकोश

चिंधूक, चिंधूट      

न.       (उप.) लहान चिंधी; फटकूर; क्षुल्लक वस्तू : ‘… एकदा हुंडा दिला की, मग एक चिंधुकदेखील मिळायचे नाही …’ − पलकोघे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चक्कर      

न.       काही तरी क्षुल्लक काम.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चक्कर

न. १ एक खेळणें; चक्री; भोंवरा. २ कडें; मंडळ; वर्तुलाकृति रस्ता किंवा जमीनीचा भाग; डोंगराचा किंवा खड- प्याचा वाटोळा किंवा पुढें आलेला भाग. ३ (अश्वविद्या) घोडा मंडलावर धरण्याची जागा. ४ -न.स्त्री. भोंवळ; भोवंड; घेरी. ५ चुन्याची घाणी, घाणा. ६ पित्तप्रकोपामुळें डोळ्यांपुढें उभें राहणारें चक्र किंवा मंडळ; डोळ्यांपुढें काजवे चमकणें. ७ खळें; तेजोवलय; कडें; परिवेष; परिधि (चंद्रसूर्य, देवादिक इ॰ कांच्या भोंवतीं असणारें) ८ फेरी; गरका; वळसं; हेलपाटा; येरझारा. (क्रि॰ घेणें). ९ चाक. १० विष्णूचें सुदर्शन चक्र. ११ (व.) शेंडीचा घेरा. 'या वेळीं शेंडीला चक्कर ठेविलें.' १२ तर्‍हेवाईक, चक्रम मनुष्य; विचित्र, विक्षिप्त माणूस. 'काय चक्कर आहेस ?' १३ कांहीं तरी क्षुल्लक काम. [सं. चक्र] (वाप्र.) (एखाद्यावर) चक्करफिरणें- १ (सुदर्शन चक्रावरून प्रयोग) ईश्वराच्या कृपा- छत्राखालीं असणें. २ दुःखें, संकटें यांत गुरफटणें किंवा यांनीं घेरणें, वेष्टणें; संकटांत सांपडणें. ॰मारणें, मारून येणें-फेरी, गरका, वळसा, हेलपाटा, येरझारा घालून येणें; जाणें येणें; जाऊन परत येणें. 'किल्ल्यावरून चक्कर मारून परत तुझ्या महालाकडे येतो.' -कोरकि २९. 'दुकानाकडे चक्कर मारून ये.' चक्करा वर धरणें- १ घोडा मंडलाकार फिरविणें. २ (ल.) कचाटींत, जरबेंत धरणें. चक्करघाड-स्त्री. (विणकाम) (बे.) ताण्यांतील दोरे खालींवर होऊन धोटा जाण्यास वाट मिळण्यासाठीं फणीस दोरीनें फणीच्या वरच्या भागास जोडलेली चक्राकृति वस्तु. [सं. चक्र + घाट]

दाते शब्दकोश

चुकाभुका      

वि.       क्षुल्लक. (झाडी)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दभ्र

वि. क्षुल्लक; तुच्छ; अल्प. 'भीष्म म्हणे गांधारे पांडव पंडित खरे न दभ्र-मती ।' -मोविराट ४.५९. [सं.]

दाते शब्दकोश

दर्या, दर्याव, दरिया

पु. १ समुद्र; मोठी नदी; सरोवर; पाण्याचा मोठा साठा, विस्तार. कचभुजचे गुराबेची लढाई साल- मजकुरी दर्यांत होऊन' -वादसभा १.११. २ (कु.) मोठी खाडी. [फा. दर्या] दर्याई-वि. समुद्रावरील; आरमारी. 'दर्याई व खुशकी फौजा.' [फा.] दर्याक मारप-सक्रि. (गो.) समु- द्राला बळी देणें. दर्याखोबरें-न. खोबर्‍यांतील एक जात; झेरी- गोठला. -मुंव्या १४९. ॰गर्क-वि. समुद्रानें बुडविलेली (गांव, जमीन). दर्यांत-दर्यामें खसखस-पु. अतिशय मोठया वस्तूंशीं अगदीं क्षुल्लक वस्तूची तुलना. दर्यांदर-वि. (गो.) चांचा; लुटारू. ॰महाल-पु. नदी, सरोवर इ॰ कांच्या कांठीं बांध- लेला वाडा. ॰वर्दी-पु. खलाशी; नाविक; खारवा; नावाडी. [फा. दर्या-नवर्द + ई] ॰विस-वि. समुद्रकांठचा. 'दर्याविस तालुके मजकूरचे...' -समारो २.२.

दाते शब्दकोश

दुखरु, दुखरू      

न.       एखादे क्षुल्लक दुःख; दुखणे.उदा. नखुरडे इ. (राजा.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दुखरुं

न. (राजा.) एखादें क्षुल्लक दुःख; दुखणें. जसें:- टोंचल्याजागीं पुवळणें, नखुरडें इ॰. याच्या उलट रोग. [दुःख + रूं क्षुद्रतादर्शक प्रत्यय]

दाते शब्दकोश

दुसरा

वि. १ क्रमानें पहिल्याच्या पुढचा. २ निराळा; भिन्न; वेगळा; अन्य. ३ आणिक; शिवाय; इतर; आणखी कोणी. -क्रिवि. शिवाय; आणखी; (हें क्रियाविशेषण कर्ता अथवा कर्म यांच्या लिंगवचनाप्रमाणें फिरतें). 'आला तो आला दुसरा (दुसर्‍या) मला शिव्या देऊन गेला. दुसर्‍याचें घर दाखविणें-अम- क्याच्या घरीं जा असें सांगून (एखाद्यास) हांकून देणें. दुस र्‍याचें घरा निघणें-एखाद्या स्त्रीनें) लग्नाचा नवरा सोडून दुसर्‍या पुरुषाच्या घरीं त्याची बायको म्हणून राहणें. 'कोळ्यांच्या बायका जातींतल्या जातींत व्यभिचार करतात व दुसर्‍याचें घरही निघतात.' गुजा ५९. दुसर्‍याचें पागोटें गुंडाळणें- (एखाद्याला) फसविणें; चकविणें. दुसर्‍याच्या तोंडानें जेवणें- स्वतंत्र विचार करण्याची अक्कल नसल्यामुळें दुसरा सांगेल त्याप्रमाणें वागणें, बोलणें, करणें. म्ह॰ दुसर्‍याच्या डोळ्यांतील कुसळ दिसतें पण स्वतःच्या डोळ्यांतल मुसळ दिसत नाहीं = मनुष्याला दुसर्‍याचा क्षुल्लक दोष सहज दिसतो पण स्वतःचा ढोबळ दोष दिसत नाहीं. ॰घरोबा-पु. (मराठवाड्यांत रूढ) दुसरें लग्न; मोहतूर. ॰फुटावा- पु. गवत एकदां कापल्यानंतर त्याला पुन्हां होणारी फूट. दुसरेंबाल- पण-न. म्हातारपण. 'दुसरें बालपण म्हणजे म्हातारपण जितकें आपणांस नकोसें वाटतें तितकेंच पहिलें वाटेलें वाटेल यांत शंका नाहीं.' -विचावि ५४. दुसरेपणा-पु. (गो.) बिजवराशीं लग्न. दुस- र्‍यान-नें-क्रिवि. पुन्हां; दुसर्‍या वेळीं.

दाते शब्दकोश

धट      

पु.       १. तराजूची दांडी; रोवलेला मोठा तराजू, काटा : ‘धट रोंवूनि रमानायक । पारड्यामध्यें घातला ।’ – भवि ३१·५६. २. गाडीत, खटाऱ्यात बारदान भरताना गाडीचा मागे तोल जाऊ नये म्हणून मागील बाजूला जमिनीपासून साटीच्या बावखंडाला टेकून पुढच्या दांडीप्रमाणे उभे राहण्याचे दुबेळक्याचे लाकूड, टेकू. ३. (मुलकी खात्यांतील) मोजणीपत्रकातील तपशील, त्याचे पत्रक. ४. निश्चय; नेट. [सं.; बं.] (वा.) धट लागणे, धट चालणे – (एखादी क्रिया, गोष्ट) अव्याहत चालू असणे, केली जाणे. धट लावणे – (खाणे, पिणे, बोलणे इ.सारखी क्रिया) बेसुमार व अव्याहत करीत राहणे. (पुष्कळ मालाचे वजन करायचे असल्यास मोठा धट रोवून भराभर ठरावीक हप्त्यांचे वजन करतात त्यावरून हा अर्थ.) धटास लावणे – एखाद्या खाजगी, वैयक्तिक क्षुल्लक गोष्टीची शहानिशा करण्यासाठी, पदरी घालण्यासाठी ती जाहीरपणे लोकांपुढे मांडणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गांडपुशा      

वि.       हलकट; नीच; क्षुल्लक; यःकश्चित.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गावडा      

पु.       १. मीठ, कात तयार करणारी कोकण, गोव्यातील एक जात व त्यातील व्यक्ती. २ एक क्षुल्लक गावकामदार; धनगरातील एक मुख्य अधिकारी. ३. गोव्यातील एक कुणबी जात. [सं. ग्रामकूट]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गावडा

पु. १ मीठ, कात तयार करणारी एक जात व तींतील व्यक्ति. यांची वस्ती कोंकण व गोवें प्रांतीं आहे. [सं. ग्राम = गांव? का. गौडा?] २ एक क्षुल्लक गांवकामदार; धन- गरांतील एक मुख्य अधिकारी. [सं. गौ? गांव? का. गौडा] ३ (गो.) गोव्यांतील एक कुणबी जात. सारस्वतांनीं हे गौड देशाहून आणले असें समजतात. हे अभक्ष्यभक्षण करीत नाहींत. [सं. गौड? का. गौडा = पाटील]

दाते शब्दकोश

गदळ

न. १ घाण; गढूळपणा, राड (प्रवाही पदार्थांतील) २ गा, मैल, कचरा, मळ. ३ केर; धूळ; भूस; तूस (धान्यां तील). ४ (सामा.) एखाद्या वस्तूतील निरुपयोगी भाग; ५ गाळसाळ; हेंदळ; घुरळा. ६ माजलेलें व घाणेरडें गवत; रान -पु. (ल.) अव्यवस्था; गोंधळ; घोंटाळा; धांदल) वस्तु, कामकाज यांतील). -वि. १ घाणेरडें; मळकट; मलीन; गढूळ; भिकार; क्षुल्लक; कवडीमोल ओंगळ; हिडिस. (पाणी, माणूस, वस्तु, गोष्ट). २ घोंटाळ्याचें; गडबडीचें; घालमेली; गबाळी (कृत्य, पुस्तक, लेख). ३ क्षुभित (वाईट मनोविकारांच्या जोरानें मन) जसें दुःखी, संतप्त, मत्सरी, संशयी इ॰ [सं. गलित-गलिद-गलद, गदल हिं. गदला. तुल॰ का. गदडु = वाईट वास]

दाते शब्दकोश

गंतीचा      

वि.       क्षुल्लक.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हेलप(पा)टणें

उक्रि. १ व्यर्थ येरझार करावयास लावणें; निष्कारण खेप करविणें; क्षुल्लक निरोपासाठीं हेलपाटा घालावयास लाग(व)णें. २ बिघडविणें; फिसकटविणें; निरुप- योगी करणें (उपाय, मसलत, श्रम इ॰). -अक्रि. १ (कों.) वाऱ्यानें उमळून पडणें; नाश पावणें (झाड, झोपडें). २ नासधूस होणें; चुरडा होणें. [सं. हेला = फेरा] हेलप(पा) टणी-स्त्री. निरोपाचा व्यर्थ हेलपाटा; फेरा. हेलप(पा)ट- निशी-स्त्री. निष्कारण हेलपाटे खाण्याचा प्रकार; वरचेवर व्यर्थ खेपा करणें. [हेलपटा + फा. नविशी] हेलप(पा)टा-पु. १ फुकट खेप; येरझार; त्रासदायक फेरा, चाल. (क्रि॰ पडणें; बसणें; देणें; करणें). २ रस्त्याचें लांबचें बळणच गैर माहितीनें या वळणानें जाणें; त्यामुळें झालेले श्रम; फिरकांडा (क्रि॰ बसणें; खाणें; होणें).

दाते शब्दकोश

हेर

वि. येर; इतर; क्षुल्लक; कुचकामाचें; क्षुद्र. 'नृपा तुला उत्तम क्वारि जाली । दैवें निघाली परि हेरि जाली ।' -सारुह ३.१०. [येर]

दाते शब्दकोश

हेरफेर

पु. १ थोडासा बदल; फरक; फेरबदल (परस्पर दोन वस्तूंत). २ विसंगति; तफावत; अंतर (हिशेब, जमाखर्च इ॰ मध्यें). ३ बदली (पहारेकऱ्यांची); आवजाव (सैन्यांची); येरझार. [हेर = क्षुल्लक + फेर. किंवा पेर द्वि.] हेरून फेरून- क्रिवि. फेरफार करून; उलथेंपालथें करून; इकडेतिकडेच पुन्हा पुन्हां; वारंवार.

दाते शब्दकोश

हळु-ळू

वि. १ हलका; अजड. २ हल्लक; मोकळें. 'डोळे काढले कपाळ हळू झालें.' ३ (इतर अर्थीं) हलका पहा. [सं. लघु = लहू-हळु] हळु-ळू, हळूहळू, हळूच-कण- कन-कर-दिशी-१ सावकाश; हलकेंच; आस्ते; मंदगतीनें. २ सहज; सौम्यतेनें (बोलणें, चालणें, हलणें, वागणें). म्ह॰ (व.) हळु बोल्या गोंधळ घाल्या हळूच चुगली खाऊन कलागत लावणारा. हळुमळ-माळ-वार-वि. नाजूक; मऊ; कोमल (व्यक्ति, प्रकृति, फूल झाड इ॰). अरुवार पहा. हळुवट- वि. १ (काव्य) साधारण हलकें, मऊ, नाजूक, सौम्य. 'उपमे तुळितां निर्जर नगर । चढे हळुवट आकाशीं ।' २ क्षुद्र; क्षुल्लक; तिरस्करणीय. ३ हळवट पहा. ४ लहान; लघु. 'श्री. गुरु ते वस्तु घनवट । लघुते बोलिजे हळुवट ।' ५ उणें; न्यून. ॰वाय-क्रिवि. (गो.) हळुहळू. हळुवें-वि. हलकें.

दाते शब्दकोश

हुव

उद्गा. बकरें इ॰ स किंवा लोकांस पुढें जाण्यास प्रोत्साहन देतांना उच्चारावयाच्या शब्दाचें अनुकरण. [ध्व.] हुच्च- च्चा-वि. १ प्रपंचाकडे लक्ष्य न घालतां ख्यालीखुशाली, कुचेष्टा इ॰ ता काळ घालविणारा. २ हलकट; नीच. [हिं. हुच्च; का. हुच्चा = वेडा] ॰भाई-मणी-पु. क्षुल्लक, हलकट. कुचकिंमतीचा माणूस. हुचेदिवाणी-वि. हुचभाई; बेफामपणें हुरळून जाऊन साहसाचें काम करणारी व्यक्ति; हूड.

दाते शब्दकोश

जुजका      

वि.        जुजबी; किरकोळ; क्षुल्लक : ‘दोस्तीचा लौकिक अटक रामेश्वरापावेतों जाला त्यांत जुजका कामावर नजर ठेवणें हें खानदानांस उमेदपणांस लाजम नाही.’ - ऐको ४४७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झाबू, झावू, झाऊ      

१. क्षुल्लक; किरकोळ. २. अशक्त; मोडके–तोडके. ३. कुचकामाचे. झामझुक्का      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झावू

वि. क्षुल्लक; किरकोळ. झाऊ पहा.

दाते शब्दकोश

झावू      

वि.       क्षुल्लक; किरकोळ. पहा : झाऊ, झाबू, झावू

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

काडी      

स्त्री.       १. (जरीची किंवा रेशमाची या शब्दाच्या पुढे काडी शब्द आला असता) जरी रेशमी - काठ (वस्त्राचा) किंवा वस्त्रावरची पट्टी, वीण असा अर्थ होतो. २. (बुरूड काम) बांबूची बारीक कांब. ३. हातातील टेकायची काठी. (व. ना.) ४. सरपण (अव.) काड्या. (व. ना.) ५. गुरांचा चारा : ‘जनावरांना वैरण - काडी देण्याचा हुकूम सोडला.’ - कोकि ७३६. [क. कड्डि] (वा.) (आडवी उभी) काढी ओढणे - (ल.) (नकारार्थी) आडव्या उभ्या रेषा काढायला समर्थ नसणे, म्हणजे काहीही अक्षर लिहिता न येणे; अक्षर शत्रू. काडी ची आग माडीस लागणे - श्रेष्ठ माणसाला कनिष्ठ माणसापासून किंवा एखाद्या क्षुल्लक कारणापासून अगर व्यक्तीकडून उपद्रव होणे. काडीने औषध लावणे - दुसऱ्याच्या जखमेला दुरून, बोट न लावता काडीने औषध लावणे. यावरून अंग राखून काम करणे. काडी लागणे - जळणे; राख होणे; नाश पावणे; नाहीसा होणे : ‘नमुताईच्या संसारास काडी लागली.’ - हाच का धर्म - नाशिककर २५. काडी कुडुल्यो करणे - (बायकी) छप्यापाणी खेळताना जर मुली बसल्या तर एका मुलीने सर्व गड्यांना सावध करून तोंडाने ‘काडी कुडुल्यो’ म्हणून सर्वांनी उठणे. काड्या करणे - पहा : काड्या घालणे - ‘मला वाटते, कुणी तरी काड्या केल्या पंत.’ - बाविबु २२७. काड्या घालणे - दोन व्यक्तीत खोटेनाटे सांगून भांडण लावून देणे; एखाद्या होणाऱ्या कामात अडथळा आणणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कांटी, काटी      

स्त्री.        १. काटेरी झुडूप, शेताच्या कुंपणातील असलेली एक फांदी; काटेरी झाड किंवा झुडूप; वईतील त्याची एक फांदी : ‘धोंडे मढ्यावर टाकले त्यावरतीं कांटी टाकली.’ - विवि ८·४·६६. २. (आट्यापाट्या) प्रत्येक बाजूची उभी मर्यादरेषा (या दोघांना जोडणारी मधली आडवी पाटी). ३. बाभळीचे लहान झाड. ४. काटेरी कुंपण : ‘बाहेरी यमनियमांची कांटी लाविली ।’ - ज्ञा ९·२१३. (वा.) कांटी आपल्या पोटावर घासणे, काटी आपल्या पोटावर घासणे - (खाण्यापिण्यात) नसती काटकसर करणे. कांटी लागणे, काटी लागणे - ओस पडणे; उजाड पडणे. कांटी लावणे, काटी लावणे - (घर, संसार, व्यवहार, रोजगार) मोडणे, नाश करणे, सोडणे, विध्वंस करणे. कांटी आपल्या पोटावर ओढणे, काटी आपल्या पोटावर ओढणे - भुकेने मरण्यापेक्षा काटे खायला तयार होणे, अधाशी, स्वार्थपरायण होणे. काट्याचे कोल्हे करणे - क्षुल्लक गोष्टीचा बाऊ करणे. काट्याने काटी झाडणे - काट्याने काटा काढणे : ‘काटीनें काटी झाडावी ।’ - दास १९·९·१२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

किडा      

पु.        एक क्षुद्र जंतू; क्षुल्लक, बारीक प्राणी, जीव. [सं. कीट] (वा.) किडा मुंगी खाणे–काहीतरी खाणे; किरकोळ खाद्य; कोरडे खाणे (पोहे, लाडू वगैरे). किडे पडणे – कुजून कृमी पडणे; नासणे; अपवित्र होणे; भ्रष्ट होणे. (वा.) किड्यांचा पुंजा – (किड्यांनी खाल्लेला भुशाचा ढीग यावरून) रोगग्रस्त माणूस; किड्यांनी खाल्लेले कापड, धान्य वगैरे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

किडा

पु. एक क्षुद्र जंतु; क्षुल्लक, बारीक प्राणी, जीव. किड्यांत अनेक जाती आहेस. [सं. कीट; प्रा. कीडओ, अप. कीडउ; हिं. पं. बं. कीडा] ॰मुंगी खाणें-कांहीं तरी खाणें; किरकोळ खाद्य; कोरडें खाणें (पोहे, लाडू वगैरे). किडे पडणें- कुजून कृमि पडणें; नासणें; अपवित्र होणें; भ्रष्ट होणें; 'गुरुसेवा ज्यासी नावडे । त्याच्या ज्ञानासी पडले किडे ।' ॰मार-पु. एक वनस्पति. किड्यांचा पुंजा-पु. (किड्यांनीं खाल्लेला भुशाचा ढीग यावरून) रोगग्रस्त माणूस; किड्यांनीं खाल्लेलें धान्य, कापड वगैरे

दाते शब्दकोश

किलवाणा, किलवाणी, किलवाणे      

वि.        १. दीनवाणा; रड्या (स्वर, भाषण, माणूस) : ‘हे नरभूषण दायक अन्य दरिद्र फिरें जरि तो किलवाणें ।’ – किंशुक ३८; २. हलका; लहान; क्षुल्लक; कुरूप (कपडा, दागिना, इमारत) ३. दुर्दैवी; कृपण; नीच (मनुष्य, त्याची वागणूक, कृती). पहा : केविलवाणा

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

किलवाणा-णी-णें

वि. १ केविलवाणा पहा. दीनवाणा; रडवा (स्वर, भाषण, माणूस). 'हे नरभूषण दायक अन्य दरिद्र फिरें जरि तो किलवाणें ।' -किंशुक ३८. 'मी तरी तुझा अनाथ दीन । येथें दिसतों किलवाण ।' -भवि ४७.९१. 'बापूनें किल- वाणी तोंड करून म्हटलें.' -बाळ २.७०. २ हलका; लहान; क्षुल्लक; कुरूप (कपडा, दागिना, इमारत); दुर्दैवी; कृपण; नीच (मनुष्य, त्याची वागणूक, कृति). [केविलवाणा पहा]

दाते शब्दकोश

किंमात्र      

वि.        क्षुल्लक; कःपदार्थ : ‘वरकड किंमात्रे आहेत काय?’ – हिंगणे दभा २·२९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कोंबडा

पु. १ एक पाळींव पक्षी; मुरगा. याचा रंग चित्र- विचित्र असून डोक्यास तुरा असतो व गळ्यास कल्ले असतात. याचें मांस खातात. २ फुगडीचा एक प्रकार. गाणें- 'जिजी- बाईचा कोंबडा आला माझ्या दारीं, घालीन चारा पाजीन पाणी' इ॰ म्ह॰ १ (म्हातारीनें, शेजारणीनें) कोंबडा झांकला म्हणून उजडावयाचें (तांबडें फुटावयाचें) रहात नाहीं. २ कोंबडा नेला डोंगरा म्हणून का दिवस उगवत नाहीं. = जी गोष्ट व्हावयाची ती क्षुल्लक अडथळ्यानें टळत नाहीं. स्वाभाविक परिणाम व्हावयाचाच. कोंबडी—स्त्री. कोंबड्याची मादी. हि बाराहि महिने अंडीं घालते व एकवीस दिवसांत अंडीं उबवून पिल्लें बाहेर काढते. कोंबडें—न. १ कोंबड्याचें लहान पिल्लूं. २ ढगांतील तांबूस पट्टे; पाऊस पडण्याचें चिन्ह. (वाप्र.) दाणे टाकून कोंबडे झुंज- विणें-मुद्दाम पदरचें खर्चून भांडणें लावणें. ॰आरणें-न. कोंबडा आरवण्याची वेळ. कोंबडेरात-रात्र-स्त्री. पहांटे चार वाज- ण्याची वेळ.

दाते शब्दकोश

कर्नाटक कलह

पु. अल्प कारणावरून भांडणतंटा; झोंबाझोंबी; क्षुल्लक कारणावरून मोठमोठ्यानें शब्द निघून होणारा कलह. [कर्नाटक + कलह]

दाते शब्दकोश

कर्नाटक कलह      

अल्प कारणावरून भांडण तंटा; झोंबाझोंबी; क्षुल्लक कारणावरून होणारा कलह. कर्नाटकी संगीत      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुकूसकोंडा      

पु.        क्षुल्लक साहित्य. (झाडी)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कवडीमोल      

वि.       अगदी कमी किमतीचा; क्षुद्र; क्षुल्लक दर्जाचा : ‘एका मार्गातील कुशल वाटाडेही दुसऱ्या मार्गात कवडीमोल ठरतात.’ - लोटिकेले ४·१२२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खापऱ्याचोर

वि० हलक्या चोऱ्या करणारा, क्षुल्लक चोर, उचल्या, भामट्या.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

खाराखीर, खाराखिरी, खाराखेर, खाराखोर      

स्त्री.       १. बारीक तपास, छडा, पाहणी; बारीक चौकशी; सामान्यतः रिकामपणाची, वाईट हेतूने केलेली चौकशी; रिकामी उठाठेव. २ क्षुल्लक गोष्टीबद्दल दुराग्रह; तक्रार; घासाघीस; ओढाताण; बारीक कीस काढत केलेला वादविवाद; विनाकारण दोष काढणे; छेडणे; खोचून बोलणे; तुसडेपणाने बोलणे; आडफाटे फोडणे. ३. असमाधानामुळे होणारी चडफड; काहीही पसंत न पडणे; मर्जीस येण्यास कठीण. ४. चोळणे, उडवणे इ. कारणाने मालाची होणारी दुर्दशा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खाराखीर-खिरी, खाराखेर-खोर

स्त्री. १ बारीक तपास, छडा, पाहणी; बारीक चौकशी; सामान्यतः रिकाम- पणाची, वाईट हेतूनें केलेली चौकशी; रिकामी उठाठेव. २ क्षुल्लक गोष्टीबद्दल दुराग्रह; तक्रार; घासाघीस; ओढाताण; वादविवाद; बारीक कीस काढण्याचा वादविवाद; विनाकारण दोष काढणें; छेडणें; खोचून बोलणें; चिरडणें, तुसडेपणानें बोलणें; आडफाटे फोडणें. ३ असमाधानाची चडफड; कांहींहि पसंत न पडणें; मर्जीस येण्यास कठिण. ४ चोळणें, उडविणें इ॰ कारणानें मालाची होणारी दर्दशा. 'तूं माझ्या मालाची खराखिरी करूं नको.'

दाते शब्दकोश

खिडकी      

स्त्री.       १. गवाक्ष; वातायन; तावदान; जाळी; झरोका; बारी; मागचे दार; दिंडी; फाटक; वेसकट; पक्षद्वार (गुप्तदार); हवा व उजेडाकरिता केलेले लहान दार : ‘त्या खिडकीस एक लहानशी दुसरी खिडकी होती.’ - धकु ५३. २. (ल.) क्षुल्लक, लंगडी सबब; पळवाट; सुटण्यास जागा, सवड. ३. देवळाच्या गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूंना गज किंवा गरादे लावून तयार केलेल्या पडव्या. (गो.) [सं. खडक्किका]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खिडकी

स्त्री. १ गवाक्ष; वातायन; जाळी; झरोका; बारी; मागचें दार; दिंडी; फाटक; वेसकट; पक्षद्वार (गुप्तदार); हवा व उजेडाकरितां केलेलें लहान दार. 'त्या खिडकीस एक लहानशी दुसरी खिडकी होती' -धर्माजीरावाचें कुटुंब पृ. ५३. २ (ल.) क्षुल्लक, लंगडी सबब; पळवाट; सुटण्यास जागा, सवड. ३ (गो.) देवळाच्या गाभार्‍याच्या दोन्ही बाजूंस गज किंवा गरादे लावून तयार केलेल्या पडव्या. [सं. पक्षद्वारं खडक्किका-त्रिकांड शेष; सं. खडक्किका; प्रा.खडुकी अथवा खडक्किआ, खडक्की; का. किडकी; हिं. खिडकी; ते. किटिकी] ॰दार-वि. चौकडीदार; पोफळी; खिडकीच्या आकाराची वेलपत्ती काढलेलें; एकाआड एक रंगाच्या चौकडीचें व जाड सुतांनीं स्पष्ट मर्यादा दाखविणारें (कापड). [हिं. खिडकीदार]

दाते शब्दकोश

खिळा

पु. १ खीळ; मेख; लोहशंकु; लोखंडाची अणकुची- दार वस्तु. २ गाय, म्हैस यांच्या स्तनांतून दूध बाहेर निघण्यास आंतील प्रतिबंध करणारा मळ, हा जनावर व्याल्यानंतर काढावा लागतो. ३ रचलेल्या दगडांचा ढीग, वरंडा; एखादी शंक्वाकृति रचना. ४ जमिनींतून नुक्ताच बाहेर येणारा अंकूर. ५ तीन अथवा चार गांवांच्या सीमा एकत्र मिळण्याचें ठिकाण. ६ छापण्याचा ठसा, टाईप ७ (माण) गाडीच्या जोखडांतील भोकांत (बैलास दुसरी- कडे खांदा वळवितां येऊं नये म्हणून) बसविण्याची खुंटी, दांडा, शिवळ. खिळ्याचे प्रकार-स्क्रू, टेकस, कुर्‍हाडी, तारेचा. [सं. कीलक; प्रा. खीलओ; गु. खिळो; बं. ओरि. खील, खिला]. म्ह॰ खिळ्यासाठीं नाल गेला, नालासाठीं घोडा गेला, घोड्या- साठीं स्वार गेला, एवढा अनर्थ खिळ्यानें केला = क्षुल्लक चुकी- पासून परंपरेनें मोठा अनर्थ गुदरतो. ॰जोडणार-पु. ठसे, टाइप जुळविणारा, कंपाझिटर. ॰पट्टी-स्त्री. १ घराचें लोखंडी काम. 'घर तर झालें खिळापट्टी व्हायाची आहे.' २ कपाळावर लावि- लेल्या तांबडया गंधाच्या दोन ओळी व त्यांत सुपारी जाळून तिचा किंवा कस्तुरीचा लाविलेला टिळा. त्यावरून खिळेपट्टी करणें-लोकांच्या घरीं जेवणें. 'आज कोठें खिळेपट्टी झाली?' ॰माणी-वि. लोखंडी खुंटी व तिच्या भोवतीं लोखंडी मायणी असणारें (जातें). किलेमाणी पहा. ॰खिळारें-खिळोरें पहा.

दाते शब्दकोश

खकाण, खकाणा, खकाना      

न. पु.       १. केर; (पुस्तकांवर, लाकडी सामानावर साचलेली) धूळ. (क्रि. बसणे, येणे, उडणे, उधळणे.) २. (तंबाखूची, तपकिरीची, मिरच्यांची) पूड. (क्रि. उधळणे.) ३. गाळसाळ; केरकचरा; धुरळा. (माप करताना मालातील धुरळा वजा करतात त्याबद्दल हा शब्द वापरतात.) ४. क्षुल्लक; क्षुद्र : ‘म्हणून रॉय तेवढे चांगले, बाकीचा खकाणा असे त्यांच्याबाबत कोणी म्हणेल काय?’ - आआआ ९५. [अर. खाक = धूळ]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खुशी

स्त्री. १ आनंद; संतोष; समाधान. 'त्यांत खुशीची खबर आहे.' -ख ७.३५८६. २ मर्जी; इच्छा. 'माझे खुशीस आलें तर जाईन.' -वि. १ आनंदित; संतुष्ट; तृप्त. 'तो गाणें ऐकून खुशी झाला.' २ तयार; इच्छू. [फा. खुश्] खुशींत गाजरें खाणें-मूर्खपणानें; क्षुल्लक वृत्तीनें आनंद प्रदर्शित करणें. -चा सौदा-पु. गैर जबर्दस्तीची, मर्जीची, इच्छेची गोष्ट, मामला; वाटल्यास करावी न वाटल्यास न करावी अशी गोष्ट.

दाते शब्दकोश

लघु

वि. १ हलका; (भारानें) जड नव्हे असा. 'गुरुत्वें जेव्हडा चांगु । तेव्हडाचि तारुनि लघु ।' -अमृ ९.६९. २ लहान; छोटा. (आकारानें). ३ ऱ्हस्व (स्वर). याच्या उलट गुरु. ४ (संगीत) एकमात्राकाल. ५ हलका; क्षुल्लक; क्षुद्र (योग्यतेनें). 'बकी सुमती ताटका लघु न हे भली लाजशी ।' -केका ५५. [सं.] सामाशब्द- ॰कथा-स्त्री. एकवाङ्मयप्रचार; शक्य तितक्या परिमाणकारक रीतीनें आणि शक्य तेवढ्या कमी पात्रप्रसंगाच्या साह्यानें सांगितलेली एकच गोष्ट. -प्रतिभासाधन. ॰कोण- न-पु. (भूमिति) काटकोनापेक्षां लहान असलेला कोन; (इं.) अॅक्यूट अँगल. ॰कोणत्रिकोण-पु. (भूमिति) ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन लघुकोन असतात तो कोण. ॰ग्रह-पु. (ज्यो.) सात मोठे ग्रह व पृथ्वी हीं खेरीज करून बाकीचे लहान ग्रह; ग्रह- कल्प. उदा॰ मंगळाच्या पलीकडचे सूर्याभोंवतीं फिरणारे सुमारें २०० लहान ग्रह. [सं.] ॰चीर-न. रुमालासारखें वस्त्र. 'शुभ- लघुचीर हातीं घेऊनी । हरीवरूनि वारीत रुक्मिणी । -ह २७.७१. ॰तम साधारण भाज्य-पु. (गणित) दिलेल्या संख्यांनीं जीस नि:शेष भागतां येईल अशी सर्वांत लहान असलेली भाज्य संख्या. [सं.] ॰त्व-न. १ हलकेपणा. २ लहानपण. ३ (ल.) क्षुद्रता; मान्यतेनें हलकेपण; वैभव, ऐश्वर्य, गांभीर्य किंवा अधिकार यांचा अभाव, उणेपणा. ४ अवमानाची, हलकेपणा आल्याची भावना. (क्रि॰ येणें; वाटणें). 'ते पिढीजाद भिक्षुक, त्यांणीं याचना केली म्हणून त्यांस लघुत्व येतें असें नाहीं.' ॰दंती-वि. लहान दांत असणारा (घोडा). घोड्याचें एक अशुभ चिन्ह. 'अशुभचिन्हें पहा. [सं.] ॰न्यास-पु. पूजेंतील लहान देवतास्थापन विधि; न्यासाचा एक प्रकार. याच्या उलट महान्यास. न्यास पहा. [सं.] ॰भोजन-न. फराळ; अल्पाहार; उपाहार. [सं.] ॰मंगल-न. उपनयन व विवाह यांशिवाय बाकीचीं जातकर्मादिक कर्में, संस्कार प्र. [सं.] ॰मालिनी-वसंत-पु. एक रसायण; मात्रा. ॰मूत्र- न. लघवी दाबून धरणें; मूत्रनिग्रह. -वि. मूत्रावरोधास समर्थ असलेला. [सं.] ॰लाघव-न. चापल्य. 'किरातें लघु लाघवें करून । बाणामागें विंधोनि बाण । वदन संपूर्ण भरियेलें ।' -मुआदि ३०.१८६. [सं.] ॰लेखन-न. ऐकलेलें भाषण ठराविक चिन्हें इ॰ कांनीं लवकर व थोड्या जागेंत लिहून घेणे. (इं.) शॉर्ट- हँड. [सं.] ॰लेखनपद्धति-स्त्री. असा तऱ्हेनें लिहून घेण्याची लिपी, प्रकार. ॰लेखक-वि. लघुलेखन करणारा. ॰विष्णु-पु. (गो.) लघुरुद्राप्रमाणें एक अभिषेकाविधी. ॰वृत्त-न. लहान वृत्त; गोलाला मध्याखेरीज इतर ठिकाणीं सरळ पातळीनें कापिलें तर तेथें गोलाच्या पेक्षां लहान त्रिज्येचें जें वर्तुल होतें तें. -सूर्य १०. [सं.] ॰शंका-स्त्री. १ लघ्वी; मूत्र करणें. २ मूत्र. [सं.] ॰शंकेस जाणें-लघ्वी करण्यास जाणें. ॰सुदर्शन चूर्ण-न. एक ज्वरनाशक चूर्ण. यांत गुळवेल, पिंपळीं, हिरडेदळ, सुंठ, लवंग, काडेचिराईत इ॰ औषधी असतात. [सं.] लघ्वक्ष-पु. (ज्यो.) बृहदृक्षार्शीं लंबरूप असणारा व्यास. -सूर्य २२. [सं.] [लघु + अक्ष] लघ्वाहार-पु. फराळ; अल्पाहार करणें. [सं. लघु + आहार] लघ्वी-स्त्री. १ मूत्र करणें. २ मू्त्र (लघुशंका). ३ नाजूक स्त्री, परी. [सं.]

दाते शब्दकोश

माशी

स्त्री. १ मक्षिका. एक घरांत आढळणारा सपक्ष जीव, कीटक. २ नेम धरण्यास उपयोगी असें बंदुकीच्या तोंडावरच माशीसारखें चिन्ह; मासकी; मखी. [सं. मक्षिका; प्रा. मख्खिआ; पं. मक्खी; सिं. मखी; हिं. गुज. माखी; हिं. मछिआ; बं. माछी; फ्रेंजि. मखी] म्ह॰ (व.) माशी पादली = माशी शिंकणें याअर्थी. (वाप्र.) माशा उडवणें-स्वस्थ बसणें. माशा खाणें-गिळणें-१ मूर्ख, गोंधळलेला, बावरा झालेला दिसणें. २ गमणें; रेंगाळणें; चाचपडणें. माशा मारणें-मारीत बसणें-निरुद्योगी बसणें. माशी लागणें-१ दागिना इ॰ च्या वरील मुलामा, पातळ पत्रा झिजून आंतील लाख दिसूं लागणें. २ एखादें काम चालू असतां तें मध्येंच थांबणें; अडणें. 'पण कुठें माशी लागली ? ' -नाकु ३.७७. ३ मळमळूं लागून वांति होणें. ॰शिंकणें-(हानि किंवा अनर्थकारक गोष्ट घडून येण्यास क्षुल्लक कारण दाखविणाऱ्या माणसाच्या उपाहासार्थ योजतात) हरकत येणें; अडथळा येणें (माशी शिंकणें ही गोष्ट अशक्य तेव्हां असेंच असंभवनीय कारण सांगून कार्य बंद ठेवणारास उद्देशून उपयोग). (नाका-तोंडावरची) माशी न हालणें-गरीब स्वभावामुळें कांही न बोलणें. माशीला माशी-(नक्कल करि- तांना मूळच्या लेखांत शाईवर माशी बसून डाग पडला असल्यास नकलेंतहि तसाच डाग दाखविणें यावरून ल.) हुबेहुब, बिनचुक पण अर्थ न समजतां नक्कल करणें. माशी हागणें-क्रि. जना- वराच्या अंगातील व्रणांवर कीड होण्याचीं चिन्हें दिसणें. गुळा- वरल्या माशा किंवा साखरेवरले मुंगळें-जोंपर्यंत गोडी (उत्कर्षाचे दिवस) आहे तोंपर्यंत मित्र म्हणविणारे लोक. माशांचा वाघ-पु. माशा पकडणारा कीटक, कोळी.

दाते शब्दकोश

मिटका

पु. ओठांची मिटलेली स्थिति; (डोळे, फुले, कागद, पानें इ॰ची) चिकटलेली, मिटलेली, दाबून बसलेली स्थिति; चिकटणें. (क्रि॰ बसणें; पडणें). २ मिठी. (क्रि॰ मारणें). 'कमरेस मिटका मारला.' [मिटणें] मिटकावणें-सक्रि. १ घट्ट बंद करणें; दाबून धरणें (डोळे इ॰). २ कान टवकारणें, उभारणें. मिटकी-स्त्री. एकमेकांस चिवटलेले ओंठ उघडतांना होणारा आवाज; पदार्थ खातांना होणारा मिट्ट मिट्ट असा आवाज. मिटक्या मारणें-प्रेमानें गोडी चाखणें. 'तो नित्य तृप्त भगवान् विदुरगृहीं भोजनांत दे मिटक्या ।' -भोउद्योग ७.७६. २ (ल.) आशा धरून बसणें; जिभल्या चाटणें. मिटमिट-स्त्री. मिटकी; खातांना तोंडाचा होणारा आवाज. मिटमिट-मिटां-क्रिवि. १ मटमटां; मिटक्या मारून. २ मिचकावीत; उघडझाप करीत. मिटमिटीत- वि. १ नीरस; बेचव; कवकवीत (भाषण, खाद्य, काम इ॰). २ क्षुल्लक; अत्यल्प; तुटपुंजें (देणगी, खर्च). मिटमिट्या-वि. कृपणं; कवडाचुंबक. [ध्व.] म्ह॰ मिटमिट्या शेंबूडचाट्या.

दाते शब्दकोश

नादवाद      

पु.       १. भांडणाचा, फाजील, व्यर्थ असा मांडलेला वाद; गलका; भाषण इ. (क्रि. करणे, लावणे, लागणे, तुटणे.) २. पहा : नाद २. (वा.) नादावादात पडणे –क्षुल्लक लोभात गुंतणे; नादी लागणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नामित      

नावापुरता; खऱ्या वस्तूच्या तुलनेने अगदी क्षुल्लक; (इं.) नॉमिनल. नामी      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नासुकला

वि. (व.ना.) यःकश्चित; क्षुल्लक.

दाते शब्दकोश

नासुकला      

वि.       यःकश्चित; क्षुल्लक. (व., ना.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नेताळा      

वि.       निमित्ताला टेकलेला; क्षुल्लक कारणावरून नकार देणारा, नापसंती दर्शवणारा. (कर.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नेताळा

वि. (कर.) निमित्ताला टेंकलेला; क्षुल्लक कारण काढून रडणारा (पोर).

दाते शब्दकोश

नगण्य      

वि.       लक्षात न घेण्याइतके; क्षुल्लक.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नकुसले, नकूय      

वि.       क्षुल्लक; क्षुद्र; किरकोळ. (व.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नकुसलें

वि. (व.) क्षुल्लक; क्षुद्र; किरकोळ. 'नकुसल्या कामासाठीं तंटा केला.' [नको + असलें फा. नकस् = क्षुद्र, वाईट?]

दाते शब्दकोश

नकूच      

वि.       क्षुल्लक; क्षुद्र; किरकोळ : ‘नकूच गोष्टीकरितां सरकारचें मन दूषित होण्याजोगे लेख ते मुळींच लिहीत नाहीत.’ – विक्षिप्त ३·१४९. [फा. नकस्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नकूच

वि. क्षुद्र क्षुल्लक; किरकोळ. 'नकूच गोष्टीकरितां सरकारचें मन दूषित होण्याजोगे लेख ते मुळींच लिहीत नाहींत.' -विक्षिप्त ३.१४९. [नको + चें = असें; फा. नकस् = क्षुद्र]

दाते शब्दकोश

पामर

वि. क्षुद्र, क्षुल्लक; कःपदार्थ; हलका; नीच; तेजोहीन (नीतीनें नसून परिस्थितीनें क्षुद्र असा मनुष्य). 'विना न हृदयीं धरीं सरुज पामर प्रत्यया ।' -केका ४४. [सं.] पामरता-स्त्री. क्षुद्रता; लघुता; हलकेपणा दुर्बलता. 'मजकरितां भ्रात्यांनीं वरिली जोडून हात पामरता ।' -मोभीष्म ३.७.

दाते शब्दकोश

पोतेरें, पोतारें

न. १ शेणमातीनें चूल, घर इ॰ सारविण्याचें फडकें. २ असें सारवण; शेणशिंतोडा; (कु.) पोतेरां. ३ (ल.) क्षुद्र, क्षुल्लक वस्तु. 'शरीर नव्हे तें पोतारें ।' -गीता २.९०५. [पोत]

दाते शब्दकोश

प्राकृत

वि. १ सामान्य; नेहमींच्या प्रचारांतला; साधा; नेहमींचा. 'हासे बोले तैसा नव्हे अनंत । नये प्राकृत म्हणों यासी ।' -तुगा ९४. २ प्रकृतीपासून (मायेपासून) उत्पन्न झालेलें 'तैसे प्राकृत प्रकृतीं मिळे । कल्पक्षयीं ।' -ज्ञा ९.१०४. ३ मूळचा; स्वभावसिद्ध; स्वाभाविक; नैसर्गिक; अकृत्रिम ४ निरक्षर; अशि- क्षित; अडाणी; अज्ञानी. 'तीऐ स्थानिची महिमा । केवि वर्णवे प्राकृत आम्हां ।' -ऋ ४१. ५ क्षुल्लक; हलकें; क्षुद्र; कनिष्ठ. 'उत्तम मध्यमप्राकृतमेळ । वंदी, परी छळ करूं नेणें ।' -एभा १०.२१३. ६ सामान्य मनुष्यासारखा देहधारी; शरीरयुक्त. 'तैसा मनुष्य लोकाआंतु । तो जरि जाहला प्राकृतु ।' -ज्ञा १०.७९. ७ संस्कृत भाषेपासून झालेली किंवा संस्कार पावण्यापूर्वीं स्वाभाविक जनांची भाषा; जनभाषा. (देशी भाषा, मराठी, बालभाषा इ॰). 'साख- रेचा बोळू केला । परी तो कडूपणा नाहीं आला । तैसा ग्रंथू प्राकृत भाषा जाहला । असे संचला स्वांनंदू ।' -एभा ९.४९३. 'ग्रंथ प्राकृत दिसतो परि न प्राकृत विलोकितां नीट ।' -मोमोष्म १२. ८०. ८ प्रकट. -मनको. ९ प्रांपचिक; संसारांतील. 'पां प्राकृताही अमृतपाना । ना न म्हणवे जी ।' -माज्ञा १०.१९१. [सं.] (वाप्र.) ॰बोलणें, प्राकृतावर येणें-असभ्यपणाची भाषा बोलूं लागणें; शिवीगाळीवर येणें सामाशब्द- ॰तारा-पु. (नृत्य) स्वाभाविक स्थितींत असलेलें बुबुळ. ॰दृष्टी-स्त्री. १ चर्म- चक्षु; नेहमींची सर्वसाधारण दृष्टी. 'प्राकृत दृष्टीनें पाहिलें असतां ईश्वर दृष्टीस पडणार नाहीं.' २ लौकिक दृष्टी; सामान्यपणें विचार करणें; सर्वसाधारण दृष्टीनें झालेली जाणीव. 'जे देखिति प्राकृत- दृष्टी गुरूला ते शिष्य न करावे.' ॰हेंदरें-वि. गचाळ; गबाळ; अजागळ; घाणेरडा; बावळा; गयाळ. 'तेथ येर प्राकृतहेंदरें । केवि जाणों लाहे ।' -ज्ञा ९.३८०. प्राकृतिक-वि. १ प्रकृतिसंबंधीं; प्रकृतिविषयक. २ स्वाभाविक; नैसर्गिक; अकृत्रिम. ३ सामान्य; साधा; प्रचारांतील; रूढींतील. ॰प्रलय-पु. १ स्वाभाविकपणें, कालांतरानें होणारा सर्व विश्वाचा नाश; विध्वंस; पंचमहाभूतांचा ईश्वराचे प्रकृतींत होणारा लय; निसर्गाचा संपूर्ण नाश. [प्राकृत = नैसर्गिक + प्रलय] प्राकृत्या-वि. सामान्य विद्यार्थीं; ज्यास संस्कृत येत नाहीं व जो मराठी ग्रंथ वाचतो तो.

दाते शब्दकोश

फूसफास

वि. रद्दी; टाकाऊ; भिकार; पोकळ (माणूस, जनावर, वस्तु). -स्त्री. १ पोरचेष्टा; पांचट भाषण. (क्रि॰ लावणें; मांडणें). २ क्षुल्लक, टाकाऊ गोष्ट. ३ मुसमुसणें; चरफड. [ध्व.]

दाते शब्दकोश

राई

स्त्री. १ मोहरी. 'राई राईपण बीजीं ।' -ज्ञा १४. २५६. २ बारीक कण. -वि. क्षुद्र; निरुपयोगी; क्षुल्लक. 'स्वप्रकाशा प्रकाश काई । दृष्टान्त विचार अवघे राई ।' -ज्ञाप्र १०४. 'मायाबायाची आण याला राई ।' -राला ४२. [सं. राजिका] (वाप्र.) राईचा पर्वत करणें-एखादी हकीकत, बातमी, फुगवुन सांगणें; अतिशयोक्ति करणें; पराचा कावळा करणें. सामा- शब्द- ॰काई-वि. बारीक कण, तुकडे तुकडे झालेलें. ॰भर- क्रिवि. अगदीं थोडें. ॰भोग-पु. एक प्रकारचे तांदूळ. (प्र.) रायभोग पहा.

दाते शब्दकोश

रज

पु. न. १ धुळीचा कण; धूळ. 'नकुळ रजाहीं मळ- वुनि सर्वांगाला वनासि गेला हो ।' -मोसभा ७.६३. २ फुला- तील परागाचा कण; ३ सोनें इ॰ चा एक बारीक कण. ४ मनुष्याचे जे तीन गुण (सत्त्व, रज, तम) त्यांतील दुसरा. ५ स्त्रियांचा मासिक विटाळ. ६ घांसून साफ करावयाची पूड. 'आरि- सयालागीं सांचावें । अधिकें रज ।' -माज्ञा १८.१४०. [सं.] (वाप्र.) रजाचा गज करणें-१ राईचा डोंगर करणें; अति- शयोक्ति करणें; थोड्याचें जास्ती करणें; एकाचे दहा करणें; अगदीं क्षुल्लक वस्तूला अतोनात महत्त्व देणें; ज्यांत कांहीं अर्थ नाहीं अशा गोष्टी फुगवून सांगणें; पराचा कावळा करणें. २ पुष्कळ काळ पोसणें व चांगला वाढीला लावणें; लहानाचें मोठें करणें. रजःकण-पु. धुळीचा कण, बिंदु. [रज + कण] रजरेण-पु. धुळीचा कण. [रज + रेणु] रजोगुण-पु. सत्त्व, रज, तम, या तीन गुणांपैकीं दुसरा; कामक्रोधादि मनोविकार या गुणाच्या प्राबल्यानें उत्पन्न होतात. [सं.] रजोगुणी-वि. ज्यामध्यें रजोगुण पुष्कळ व प्रधान आहेत तो; विकारी; विषयी; कामुक. [सं.] रजोदर्शन-न. ऋतुदर्शन; ऋतुप्राप्ति; न्हाण; अगदीं पहिलें विटाळशीपण. [सं.] रजस्वला-वि. स्त्री. विटाळशी; ऋतुमती स्त्री; ऋतुस्नात; अस्पर्श स्त्री. हिला पहिल्या दिवशी चांडाली, दुसऱ्या दिवशीं ब्रह्मघातिनी, तिसऱ्या दिवशीं रजकी समजतात. 'कृष्णा म्हणे सभेंत न न्यावें मज, मी रजस्वला आंगा ।' -मोसमा ५.५. [सं.] रजी-स्त्री. घूळ; धुराळा. [रज]

दाते शब्दकोश

सटक्याबटक्या

वि. क्षुल्लक, कफल्लक (मनुष्य); असा तसा; कोणी तरी. 'अग हा सटक्या बटक्या लटक्याच गोष्टी करी । भात भुजाया खापर मिळेना पहा तयाच्या घरीं ।' -पला ११.२५.

दाते शब्दकोश

सूत

न. १ धागा; दोरा; तार; रेषा, तंतु (विशेषतः कापसाचा). २ (ल.) संधान; संबंध (आश्रय, आधार इ॰ चा); मार्ग; उपाय (मिळविण्याचा, संपादण्याचा, साध्य करण्याचा) नात्यागोत्याचा संबंध. ३ नासकें फळ. ४ जखम इ॰ मध्यें धाग्याप्रमाणें आढळणारा एक जंतु. ५ कापडाचें वीण- काम; वीण. ६ (ल.) समेट; स्नेहभाव; मित्रत्वाचा संबंध. ७ अगदीं थोडी लांबी दाखविणारें माप; एकअष्टामांश इंच. ८ लांकूड कापण्यासाठीं त्यावर खूण करावयाची दोरी. ९ चातुर्य; शहाणपण. [सं. सूत्र] (वाप्र.) सुताचा तो़डा-१ दोर्‍याचा तुकडा. २ (ल.) क्षुल्लक रकम, वस्तु. 'शंभर रुपये दिले त्यांपैकीं सुताचा तोडा हातीं लागला नाहीं.' सुतानें सूत लागणें-एका गोष्टीच्या शोधानें दुसरीचा शोध लागणें. सुतानें स्वर्गास जाणें-स्वर्ग गांठणें-किंचित सुगावा लागतांच त्यावरून तर्कानें एकंदर सर्व गोष्टीचें स्वरूप ओळखणें. सुतास (सूर्तीं) किंवा सुतींपातीं लागणें-सुरळीतपणें चालू लागणें; नीट व्यवस्था लागणें. सुतास-सुतीं-सुतीपातीं चालणें, लावणें-सुरळीत असणें, लावणें. ॰बांधणें-संबंध जोडणें; धागा लावणें (नातेंगोतें, मित्रत्व इ॰ चा). (मूठभर)सूत बांधणें-देणें(स्नेहदर्शक चिन्ह म्हणून एखाद्यास). पागोटें देणें. ॰असणें-स्नेहसंबंध असणें; जुळतें असणें. ॰जमणें-मैत्री जमणें. (नाकाशीं) सूत धरणें-(मरणोन्मुख अवस्थेंत श्वासो- च्छ्वास चालला आहे कीं नाहीं हें पाहण्यास नाकाशीं सूत धरतात. यावरून) मरणोन्मुख अवस्था. सूत नसणें-मैत्री नसणें. सामा- शब्द- ॰काडी-स्त्री. (कोष्टी) जिच्या भोंवतीं सूत गुंडाळलेलें असतें ती काडी; गणा; रिकांडी. सुतणें-सक्रि. वेष्टणें. -शर. ॰परमें-न. परम्याचा एक प्रकार; लघवींतून सुतासारखे जंतू जाणें ॰पाड-पु. न. सणंगाची वीण व किंमत. 'हें सणंग सुतापाडास बरें आहे.' ॰पात-पोत-पु. कापडाचें विणकाम, बनावट; वीण.

दाते शब्दकोश

श्वान

पुन. कुत्रा. 'श्वान हे लागे पाठी आशा बहु दारुणा ।' -तुगा ३४९. 'ना तरी हे धेनु हें श्वान.' -ज्ञा ५. ९४. [सं. श्वन्] ॰चेष्टा-स्त्री. कुत्र्याचे चाळे. ॰निद्रा-स्त्री. कुत्र्याची झोंप; किंचित् आवाजानें किंवा स्पर्शानें भंग पाव- णारी झोंप. ॰पुच्छ-न. १ कुत्र्याचें शेंपूट. २ (ल.) कधीं सरळ न होणारी, नेहमी वांकडी राहणारी वस्तु; ज्याचें मन कधीं बदलत नाहीं असा पूर्वग्रहदूषित मनुष्य; वाकड्यांत शिरणारा. ॰पुच्छवत्-वि. नेहमीं वांकडा, हट्टी, एककल्ली (स्वभावाचा). ॰मैथुन-न. १ कुत्र्याचें झोंबट. २ (ल.) प्रारंभीं सुखकर पण परिणामीं दुःखदायक गोष्ट. ॰लाड-पु. कुत्र्याचा लडिवाळपणा; पुढें पुढें करणें; खुशामत. ॰वृत्ति-स्त्री. १ कुत्र्याची रीत. २ (ल.) पुढें पुढें नाचणें; तोंडपुजेपणा; हांजी हांजी; खुशामत. ३ नीच सेवा; दुष्ट मनुष्याची चाकरी. ॰वैखरी-स्त्री. १ कुत्र्याचें भोंकणें; गुरगुरणें. २ (ल.) क्षुल्लक प्रसंगीं मोठमोठ्यानें संतापून आरडाओरड करणें; जोराजोरानें, तावातावानें बोलणें. 'भिक्षा द्यावयासि नसेल जरी । आंवरून धरावी श्वान वैखरी ।' ॰वैर-न. कुत्र्यासारखा द्वेष; स्वज- नांचा, नातलगांचा द्वेष, हेवा, शत्रुत्व. ॰शूरत्व-न. कुत्र्याचें शौर्य; प्रतिकार नसेल तेथें जोराचा हल्ला करणें; शौर्याचा आव आणून चालून जावयाचें पण अंगावर आल्यास पळ काढा- वयाचा अशी रीत. ॰स्वभाव-पु. कुत्र्यांचा स्वभाव; चिड- खोरपणा; तुसडेपणा; वसवस. श्वानी-स्त्री. कुत्री.

दाते शब्दकोश

स्वल्प

वि. १ फार थोडें; किंचित २ क्षुल्लक; सोपें. [सं.] स्वल्पाह/?/र-पु. फराळ; थोडेसें जेवण.

दाते शब्दकोश

ताद्रक

वि. तादृक; यथातथा; क्षुल्लक. 'आपले नज- रेनें जागा पाहतां म्हणणार्‍यांच्या गोष्टी ताद्रकच आहेत.' -वसमो. [सं. तादृश]

दाते शब्दकोश

तांडव

न. (नृत्य) १ शिवनृत्य; शंकर आणि त्याचे गण यांचें नृत्य; अभिनयपूर्वक नृत्य; वीररसप्रधान मर्दानी नृत्य. 'वामांगीचा लास्य विलासु । जो हा जगद्रूप आभासु । तो तांडव- मिसें कळासु । दाविसी तूं ।' -ज्ञा १७.८. 'लास्य आणि तांडव । दोन्ही नृत्यांचे भाव ।' -ह ५.६६. २ (एखाद्या क्षुल्लक गोष्टी- बद्दल) मोहरीचा मेरु, रजाचा गज, राईचा पर्वत करणें; अतिश- योक्ति. ३ थटथयाट; आक्रस्ताळपणा करणें; आदळ आपट करणें. ४ एखाद्या बीजरूप सूत्राचा, गोष्टीचा तिखटमीठ लावून केलेला विस्तार; शब्दपाल्हाळ; अर्थवाद. 'या श्लोकावर ज्ञानेश्वरानें बहुत तांडव केलें आहे.' [सं.] ॰कृष्ण-पु. १ (तांडव नृत्य करताना शरीर वक्र करावें लागतें यावरून) लंगडा बाळकृष्ण. २ (सांकेतिक) महादजी शिंदे; ह्याचा एक पाय पानपतांत जखमी झाल्यामुळें हा कायमचा लंगडा झाला होता म्हणून यास ह्या औपरोधिक नांवानें संबोधीत. 'तांडवकृष्णाकडे पत्रें पाठवावीं.' -ख ३२६४. [सं. तांडव + कृष्ण]

दाते शब्दकोश

तांडव      

न.       १. (नृत्य.) शंकर आणि त्याचे गण यांचे अभिनयपूर्वक नृत्य; वीररसप्रधान, मर्दानी नृत्य. २. (एखाद्या क्षुल्लक गोष्टीबद्दल) मोहरीचा मेरू, रजाचा गज, राईचा पर्वत करणे; अतिशयोक्ती करणे. ३. थयथयाट, आक्रस्ताळेपणा, आदळआपट करणे. ४. एखाद्या बीजरूप सूत्राचा, गोष्टीचा तिखटमीठ लावून केलेला विस्तार; पाल्हाळ; अर्थवाद.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तापट, तापड      

वि.       १. क्षुल्लक कारणाने संतापणारा; तामसी; रागीट. २. चलाख; चपळ; तडफदार. ३. पाणीदार; रगदार; तल्लख (घोडा इ.).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तापट-ड

वि. १ क्षुल्लक कारणानें संतापणारा; तामसी; रागीट; संतापी. २ चलाख; चपळ; तडफदार. ३ पाणीदार; रगदार; तल्लख (घोडा इ॰ जनावर). याच्या उलट मंद. [ताप]

दाते शब्दकोश

टिनपट, टिनपाट      

न.       १. जस्ताचे वजनाने हलके भांडे. २. (ल.) भिकार; दरिद्री; क्षुल्लक; कुचकामी. [इं. टिनपॉट] (वा.) टिनपट वाजणे, टिनपाट वाजणे – दिवाळे निघणे; फडशा पडणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तनघर

न. तणघर पहा. 'महा मंदिरें माड्या तनघरें । झोंपड्या अवघीं देव देवाइलें ।' -तुगा १८४३ [सं. तृण + गृह] म्ह॰ (माण.) तन खाई धन = गवत (शेतांत) फार वाढलें म्हणजे तें काढण्यास बराच खर्च येतो. यावरून एखाद्या क्षुल्लक गोष्टीकडे वेळींच लक्ष्य न दिल्यास ती पुढें डोईजड होते.

दाते शब्दकोश

तोळा

पु. (सोनें, चांदी इ॰ मौल्यवान पदार्थांचें) वजन कर- ण्याचें, वजनाचें एक परिमाण. हा सोळा माषांचा किंवा ऐशी रतींचा असतो असें ग्रंथांत वर्णन आहे. त्यावरून याचें वजन १०५ (ट्रॉय) ग्रेन होतें. व्यवहारांत जवाहिर्‍याचे बारा माष (मासे) मिळून तोळा होतो त्यावरून त्याचें वजन २१० ग्रेन ठरतें. निरनिराळ्या व्यापाराच्या प्रांतीं, शहरीं तोळ्याचें निरनिराळें परिमाण आहे तें पुढें दिलें आहे- पुणें, अहमदाबाद १९३ ।। (ट्रॉय) ग्रेन, अहमदनगर १८८ ।। (ट्रॉय)ग्रेन. सिंधप्रांत १८७ ।। (ट्रॉय)ग्रेन. जालना १८४ ।। (ट्रॉय)ग्रेन. मुंबई १८० (ट्रॉय) ग्रेन. कलकत्ता १७९.६६६६६. -छअ १९८. [सं. तुल्] ॰मासा-(प्रकृति, स्वभाव इ॰ कांचा) चंचलपणा, नाजूकपणा दर्शविणारा आहे.' = ह्याचा स्वभाव, ह्याची प्रकृति रोगाची भावना तोळामासा आहे.' = ह्याचा स्वभाव, ह्याची प्रकृति अगदी क्षुल्लक कारणानेंहि बिघडण्याइतकी नाजूक आहे. ॰मासा पाहणें-कृपण, हाताचा जड असणें. तोळेवरी-क्रिवि. (ना.) एखादें काम करण्याचे नांवानें मात्र भोपळ्या एवढें शून्य अशा अर्थीं. 'गोष्टी करावयास सांगा मात्र, देणेंघेणें मात्र तोळेवरीच !'

दाते शब्दकोश

तुच्छ

वि. १ क्षुद्र; क्षुल्लक; हलका; अल्प. २ हलकट; मान्यता नसलेला; नीच. ३ तिरस्करणीय; निरुपयोगी. [सं.] ॰करणें-हलकें मानणें; झिडकारणें; अवमानणें.

दाते शब्दकोश

तुच्छ      

वि.       १. क्षुद्र; क्षुल्लक; हलका; अल्प. २. हलकट; मान्यता नसलेला; नीच. ३. तिरस्करणीय; निरुपयोगी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तुला

स्त्री. १ तराजू; तागडी. 'तेव्हां आणवि तो तुला त्रिभुवनीं जीला नसे हो तुला.' -आशिबि २९. २ मेषादि बारा राशींपैकीं सातवी राशि. ३ वजन करणें अथवा वजन करून किती हें ठरविणें अथवा अमुक एक आहे हें वजन करून ठरविलेलें परिमाण. ४ बरोबरी; साम्य; समता; सारखेपणा; तुलना. 'भगवान् धर्मासि म्हणे, नाहींच तुला तव प्रतापा या ।' -मोभीष्म ११.१५२. ५ धार्मिकविधिपूर्वक आपल्या शरीराच्या भारंभार सोनें, रुपें, साखर इ॰ ब्राह्मणास देण्याचें कार्य; अशा रीतीनें ठरविलेलें भारंभार सुवर्ण वगैरे. (क्रि॰ करणें; देणें). [सं.] ॰म्ह गाजराची तुला आणि विमानाची वाट = क्षुल्लक गोष्टीबद्दल किंवा थोड्या यत्नाबद्दल मोठें बक्षीस अथवा फळाची अपेक्षा करणें. सामाशब्द- ॰कोश- परीक्षा-पुस्त्री. तुला करण्याचें दिव्य. ॰दान-न. आपल्या भारंभार सोनें, रुपें वगैरे ब्राह्मणास देणें. तुला अर्थ ५ पहा. ॰धार-पु. तराजूची दांडी; कांटा. ॰पुरुष-पु. १ माणसाच्या भारंभार सोनें इ॰ ची केलेली प्रतिमा. २ त्याच्या भारंभार सोनें इ॰. ॰मान-न. वजन करून काढलेलें प्रमाण. ॰संपात-पु. सूर्याचें तूल राशीमध्यें जाणें (ता. २२ सप्टेंबर या दिवशीं सूर्य विषुव- वृत्तावर येऊन दिवस व रात्र यांचें मान सारखें होतें तो काळ).

दाते शब्दकोश

थैक, थैथै

उद्गा. गुरें हांकण्याचा शब्द. 'गाय निघाली खाऊं साळी । थै, थै म्हणतां ओढाळी ।' -कथा २.१०.११३. [ध्व.] म्ह॰ थैक म्हणतां ब्रह्महत्त्या = क्षुल्लक गोष्टीचा भयंकर परि- णाम होणें.

दाते शब्दकोश

उकरडा      

पु.       कचऱ्याची रास; घाण, गदळ वगैरे टाकण्याची जागा : ‘जें क्लेशगांवींचा उकरडा ।’ −ज्ञा १६·४०५. पहा : (वा.) उकिरडाफुंकणे,उकरडा फुंकणे– उनाडक्या करीत फिरणे; निरुद्योगी असणे; अत्यंत दारिद्र्यावस्था प्राप्त होणे. उकरड्याची दैना फिटणे– क्षुल्लक वस्तूचाही केव्हाना केव्हा तरी उत्कर्ष होणे. उकरड्याची धन करणे– चांगल्या वस्तूंचाही नाश, दुरुपयोग करणे. उकरड्यासारखा वाढणे– बेसुमार वाढ होणे (संकटे, कर्ज, मूल, दुःख, रोपटे वगैरेंची.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपाधपेठ, उपाधपेठी      

वि.       १. उपाध्यायास लग्न, मुंज वगैरे प्रसंगी देतात तसे (सणंग, पागोटे वगैरे). २. हलक्या प्रतीचे; कमी किमतीचे; अगदी साधे; क्षुल्लक; टाकाऊ.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपाधपेठ, उपाधपेठीचें

वि. १ उपाध्यायास लग्न, मुंज वगैरे प्रसंगीं देतात तसें (सणंग, पागोटें वगैरे). २ हलक्या प्रतीचें; कमी किमतीचें; अगदीं साधें; क्षुल्लक; टाकाऊ. [सं. उपा- ध्याय + पेठ]

दाते शब्दकोश

उपअपराध      

पु. क्षुल्लक अपराध.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वापसणें

अक्रि. १ (जमीन) वाफ येऊन पेरण्यास योग्य होणें. २ (वासरें वगैरे) बिथरूम बेफाम होणें; वारा खाणें. ३ (ल.) मनास लावून घेणें; हळुवार होणें; क्षुल्लक गोष्टीवरून भल- तीच कल्पना करून घेणें. [वाफ] वापसा-पु. १ जमिनीची पेरण्यायोग्य स्थिति; पाऊस पडल्यानंतर जमान दमट, उबदार झालेली स्थिति. (क्रि॰ होणें). २ पावसानंतर जमीनींतून निघ- णाऱ्या वाफा. [वाफ] वापसें-न. (व.) शरद्ऋतु. वाप- श्याचें ऊन-न. (व.) शरदृतूंतील ऊन; विश्वामित्राचें ऊन. (इं.) आक्टोबर हीट.

दाते शब्दकोश

वाटचा चोर

पु० बिनगरजू, क्षुल्लक, वाटसरू, येणारा जाणारा कोणीही मनुष्य.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

वाय

क्रिवि. (वायां-वाव) व्यर्थ; निरर्थक; निष्फळ; मिथ्या.' ते वेळीं तुझा आक्षेप वाय ।' -विपू ७.७; ३.४०; -ज्ञा १५.३२७; १७.१९७. [सं. वि + अय्] ॰आभाळ-न. पोकळ अभ्र; बिन पावसाचें मळभ, ढग. ॰करणी-वि. व्यर्थ; निष्फळ; पोकळ. 'कासया होसी घामाघूम । वायकरणी बैदा हा ।' -अफला १४. ॰कळ-वि. १ शुष्क; पोकळ; निरर्थक; कुच- कामाचें (भाषण, कृत्य). २ अनिर्बंध; बेफायदा; स्वैर. ॰कांड-पु. निष्फळ बाण. 'काय पिनाकपाणीचिया भाता । वायकांडीं आंहाती ।' -ज्ञा ११.२०७. ॰धळ-वि. वायकळ पहा. ॰पट- वट-वि. व्यर्थ; मिथ्या. 'तैसा आत्मा भूंजे वायवटु । संसारू हा ।' -भाए ५९९. ॰फट-वि. १ निष्फळ; निरर्थक; बालिश; पोकळ (बोलणें, बोलणारा). २ स्वैर; स्वच्छंदी; हट्टी; तऱ्हेवाईक; लहरी; हूड; उनाड. (मूल वगैरे). ३ क्षुद्र; फुकट; क्षुल्लक; बेफायदा (काम). ॰फली-फूल-वि. फळें, फुलें न येणारें, वांझ (झाड, रोप). ॰फळ-वि. पोकळ; फोल; अर्थशून्य; रिकामें; वावगें (बोलणें). 'या वायफळ गप्पांत कांहीं अर्थ नाहीं.' -टिले ४. १९. [वायु + फल] ॰फूल-न. वांझ मोहोर; फळ न धरणारें फूल. 'अष्टलोकपालांसहित । स्वर्गसुखें वायफुलें समस्त ।' -ह २२.६. ॰बार-पु. वांझा, फुसका बार; गोळा न घालतां नुसती दारू भरून उडविलेला बंदुकीचा बार. वायबारचें काडतूस- न. बिन गोळीचें, नुसत्या दारूचें काडतूस. ॰बुंथी-स्त्री. बुरखा; भ्रामक आवरण. 'तरी नामाची वायबुंथी । सांडीचि ना ।' -अमृ २.३२. ॰बुद्धि-स्त्री. चुकीची, व्यर्थ, भ्रामक समजूत. 'मा येती न येती हे कायसी । वायबुद्धि ।' -ज्ञा १५.३२७. वायवाय- क्रिवि. व्यर्थ; निष्फळ; वायां. 'ऐकुनि मोकलुनि धाय रुदन करीत वायवाय ।' -अमृत, ध्रुवचरित्र ३. वायां, वायां-विक्रिवि. व्यर्थ; पोकळ; निष्फळ; मिथ्या; फुकट; निरर्थक. 'वेंचून वायां वय सर्व गेलें ।' -सारुह १.१८. -ज्ञा २.१४०. [सं. वि + अय्] वायाणी-णें-वि. व्यर्थ; मिथ्या; लटकें. 'तैसे सर्व कमीं असणें । तें फुडे मानूनि वायाणें ।' -ज्ञा ४.९८. वायांविण-वि. व्यर्थ; निष्फळ; निष्कारण. 'तोंडे पाप घेती कांइसें । वायांविण ।' -शिशु २१६.

दाते शब्दकोश

वही

स्त्री. १ (लग्नांत) बहुल्याभोंवतीं उतरंडी रचण्या- करितां आणतात तो मडक्यांचा समुदाय. बहुलें पहा. २ या समुदायांतील एक मडकें. 'बहुल्याच्या उतरंडींतील एक वही फुटली आहे.' वहीवरून अंबट होणें-(बहुल्याच्या चार कोंपऱ्यांस प्रत्येकीं पांच पांच मडक्यांच्या चार उतरंडी असतात; लग्नानंतर यापैकी दोन वरपक्षाकडे जातात, यावेळीं भांडण होतें त्यावरून) क्षुल्लक कारणासाठी भांडण. 'लग्न झाल पण वही- वरून झाला अंबट, हें काय?' [सं. वृत्ति]

दाते शब्दकोश

व्रत

न. १ स्वतःला लावून घेतलेला एखादा धार्मिक नियम, मेम; देहदंडाचा एक मार्ग. -ह ८.१०. (क्रि॰ घेणें.) २ असा नेम पाळण्याची केलेली प्रतिज्ञा, पण. ३ ब्रीद; प्रतिज्ञा; बाणा. 'नतावनधृतव्रत ज्वलन तूंचि बा धावनीं ।' -केका ६. [सं.] (वाप्र.) तीळ खाऊन व्रत मोडणें-अगदीं क्षुल्लक कारणासाठीं, फायद्यासाठीं बाणा, नेम सोडणें. सामाशब्द- ॰बंध-पु. मुंज; यज्ञोपवीत धारण करणें हें एक प्रकारचें व्रतच आहे. [सं.] ॰भिक्षा- स्त्री. व्रतबंधाच्या आनुषंगिक कर्मांपैकीं एक; भिक्षा मागणें. [सं.] ॰वैकल्य-न. १ व्रताची अपूर्णता; त्यांतील न्यूनता, कमीपणा. २ लहानसहान व्रतें, नेम इ॰ व्रत अर्थ १ पहा. ॰संग्रह-पु. व्रत घेणें; व्रतस्थ असणें. व्रतस्थ, व्रती-वि. १ व्रत पाळीत असलेला; व्रताप्रमाणें कांहीं नेम करणारा. २ स्त्रीसंग न करणारा; ब्रह्मचर्य पाळणारा. 'अमृतराव सात वर्षांचा असतांना त्याची आई स्वर्ग- वासी झाली; तेव्हांपासून बापूसाहेब व्रतस्थ होतें.' -मौनयौवना.

दाते शब्दकोश

यःकश्चित्

कुठल्या झाडाचा पाला ? असा तसाच, प्रभु रामचंद्राप्रमाणें याला एकवचनींच संबोधतात, निर्माल्यवत् पृथ्वीला भारभूत, कीटश्च कोटायते, टिटवी काय समुद्र आटविणार, कुच किंमतीचा, कस्पटासमान, क्षुद्र, क्षुल्लक, छुंगासुंगा, मुंगीला मुताचा पूर, क:पदार्थ, हें एक लहानसे डबके आहे, शामभट्टाची तट्टाणीच, सामान्य प्रतीचा, त्याची काय कथा ? ही जीर्ण चिंध्याची गोधडी, सपाट आयुष्याचा एक जीव.

शब्दकौमुदी

ग्रंथ      

पु.       १. अर्थपूर्ण वाक्यांची विशिष्ट प्रकारची संगतवार रचना; पोथी, पुस्तक (गद्य किंवा पद्य यांचे). २. (ल. व शब्दशः) गुंफणी; जुळवणी; जोडणी; संपादणी. ३. पुस्तक; भाग; अध्याय; परिच्छेद इ. ४. बत्तीस अक्षरांचे वृत्त किंवा वृत्ताची ओळ : ‘व्यासकृत महाभारत लक्षग्रंथ प्रसिद्ध हा भारी ।’ –मोआदि १¿९. (एका अनुष्टुभात ३२ अक्षरे असतात व अनुष्टुभालाही ग्रंथ म्हणतात त्यावरून ३२ ची संख्या). ५. (ल.) योजना; बेत; कट; मसलत : ‘बाळोबा आणि भाऊ हा सगळा एक ग्रंथ आहे.’ –अस्तंभा ९६. ६. प्रसंग; गोष्ट; हकीगत (व्यवहार इ संबंधी). ७. पराचा कावळा; एवढ्याचे एवढे करणे; विस्तार. ८. अर्थ; संगती : ‘त्यांनी राजीनामा कां दिला याचा ग्रंथ लावणे कठीण.’ –के २७¿५¿३०. ९. अकांडतांडव; कुंभांड. १०. स्मरणिका. [सं. ग्रथ्=रचणे] (वा.) ग्रंथ आटोपणे – (काम) संपणे; (कार्य) नाश होणे; (माणूस) मरणे : ‘पण आमच्या दुर्दैवाने सर्वच ग्रंथ आटोपला.’ –भयंकर दिव्य. ग्रंथ करणे – बाऊ करणे; क्षुल्लक गोष्टीला उगाच महत्त्व देणे. ग्रंथ लागणे – अर्थ समजणे. ग्रंथ लावणे – विशेष प्रसंगाने अथवा विशेषतः चातुर्मासात रामायण, महाभारतासारख्या मोठ्या ग्रंथाचे वाचन करणे; (ल.) एखाद्या विषयाची अनावश्यक दीर्घ चर्चा करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हग

पु. मल; विष्ठा; गू (मनुष्य, पशु इ॰ चा). [सं. हद्] ॰ओक-वकस्त्री. (पटकींतील) जोराचे ढाळ, ओकारी वगैरे. [हगणें + ओकणें] हगटणें-अक्रि. (क्रोध-तिरस्कारार्थी) हगणें. 'ससें उठलें कुत्रें हगटलें.' हगुटणें पहा. हगणवट-न. जना- वराचें गुदद्वार. हगणें-उक्रि. १ मल, विष्ठा शरीराबाहेर टाकणें; मलविसर्जन करणें. २ बाहेर टाकणें, पडणें (डोळ्यांतील चिपडें, पू). ३ वर टाकणें-येणें (समुद्रांतील घाण). ४ वर, बाहेर फेंकणें, येणें (जात्याचा खिळा ढिला झाल्यामुळें पीठ). (हें क्रियापद सकर्मक व अकर्मकहि आहे). म्ह॰ हगल्या पेक्षां निप- टणें बरें. हगंद(दा)री, हगदारी-स्त्री. सार्वजनिक शौचाची जागा; परसाकडेची जागा. जेथें मल, विष्टा, घाण पडते अशी जागा. [हगणें + दरी] ॰मुती-मूत-स्त्री. भीतीनें, तीव्र वेदनेनें मलमूत्र विसर्जनाची होणारी घाई; धास्तीनें मलमूत्र विसर्जन होणें. (क्रि॰ सुटणें; लागणें). हगरड-स्त्री. १ ढेंडाळी; हगवण. २ विष्टा. घाण इ॰ ढीग. हगरडा-रडें, हगिरडा-डें, हगु- रडा-डें-वि. १ शौच्याहून आल्यावर ढुंगण न धुतलेला. २ (ल.) अपुरा; अर्धवट राहिलेला; मध्येंच बंद पडलेला (काम, धंदा इ॰). ३ बिघडलेलें; खराब झालेलें (काम इ॰). ४ घाणे- रडें; ओंगळ; किळसवाणें. ५ क्षुल्लक; निरुपयोगी; बिनकिंमतीचें. हगरा-वि. १ सदोदित हगणारा. २ (ल.) भित्रा; भ्याड. ३ (व्यापक) वाईट; ओंगळ; घाण; किळसवाणी (व्यक्ति, वस्तु, गोष्ट इ॰). ४ क्षुद्र; गबाळ; निरुपयोगी; कुटकामाचा. हगरी- रें-स्त्रीन. १ शौचासाठीं केलेली व्यवस्था; ठाकोली. २ शौचाची लांकडी घडवंची; गलबतावरील मलविसर्जनाची जागा. ३ या घडवंचीचें भोंक. ४ (गुर्‍हाळ) चुलण्यांतील राख ज्या थारो- ळ्यांतून खालीं पडतें त्याचें भोंक. ५ (हगरी) शेतांत ठिक- ठिकाणीं ठेवलेल्या खताच्या राशी-प्रत्येकीं. ६ शेतांत खत न्याव- याच्या गाडींत खत भरण्यांसाठीं असलेल्या कुरकुलाचें मागील दार, झडप. हगरें-न. (अशिष्ट) १ सोरा; यवक्षार. २ टाईप पाडण्याचें यंत्र. हगली, मुतली, हगलेंमुतलें-स्त्री.न. १ क्षुद्र; बारीकसारीक गोष्टी; लहानसहान चुका, अपराध, गैरवर्तन (दुसर्‍या- जवळ गार्‍हाणी केलेलें). २ एखाद्याच्या साध्या, स्वाभाविक, खासगी गोष्टी. (क्रि॰ सांगणें; कानावर घालणें; पाहणें). 'हा दिवाण चाकर लोकांचीं हगलींमुतलीं राजाच्या कानावर घालतो.' ३ (लहान मुलाच्या) हगण्यानें भरलेलें कपडें; गुवेलें. हगवण- स्त्री. अतिसार; वारंवार शौचास होणें. म्ह॰ फुकाची भाजी हग- वणीस काळ. हगवणकर-करी-वि. हगवणीचा आजार अस- लेला. हगवणें-विणें-सक्रि. १ शौचास, परसाकडेस बसविणें (मूल इ॰). २ (ल.) ओशाळणें; लाजविणें; गोंधळविणें; दांत पाडणें. ३ नाश करणें; नायनाट करणें; घाबरून सोडणें; रडकुंडीस आणणें; बिघडविणें (सल्ला, युक्ति, धाडसाचें काम). ४ बलात्का- रानें काढणें; परत देण्यास भाग पाडणें (पैसा इ॰). हगाड- स्त्री. हगंदरी पहा. हगीरडामुतीरडा-वि. हगरडा अर्थ १ पहा. हगिरडें-न. फुरसें (एक जातीचा साप). हगीर-वि. हगरा पहा. हगीरमुतीर-वि. (ल.) घाबरगुंडी झालेला; अतिशय गोंधळलेला; दुःख, भीति इ॰ मुळें देहमान सुटलेला; पांचावर धारण बसलेला. हगुटणें-अक्रि. १ परसाकडेस घाई होणें; परसाकडेस लागणें. २ हगणें; हगटणें पहा. ३ (ल.) गर्भगळित होणें. ४ घाबरगुंडी उडणें; उगीच घाईत असणें. [हग + उठणें] हगूट-पु. परसाकडेची घाई. गुदद्वारावाटे नुकताच बाहेर पड- लेला किंवा पडत असलेला मळ; विष्टा. हगूर-वि. हलका. हगेरा, हगोला-वि. गुवानें भरलेला, बरबटलेला (कपडा). हगेरें, हगोलें-न. गुवानें भरलेलें वस्त्र, दुपटें; गुवेलें. हग्या, हगिया-वि. १ शौचास बसलेला, निघालेला. २ शौचास नेण्याचा (तांब्या, जोडा इ॰). 'दुराणी हगियांसी (जोड्यांनीं) मारूं लागले.' -भाव १४०. ३ हगावयास लावणारा. ४ (ल.) अतिशय जोराचा (मार इ॰).

दाते शब्दकोश

धट

पु. १ तराजूची दांडी; रोंवलेला मोठा तराजू, कांटा. 'ऐसें हें अनुभवाचेनि धटे । साचें ज्या ।' -ज्ञा ६.५३. 'धट रोंवूनि रमानायक । पारड्यामध्यें घातला ।' -भवि ३१.५६. 'मेकॉले साहे- बानीं... कलकत्ता मुक्कामीं अक भला मोठा धट लावून एके पारड्यांत आरबी, फारसी व संस्कृत ग्रंथ यांचे गठ्ठे... घालून...' -नि ९४१. २ गाडींत, खटार्‍यांत बारदान भरतांना गाडीचा मागें तोल जाऊं नये म्हणून मागील बाजूस जमीनीपासून साटीच्या बावखंडास टेंकून पुढच्या शिपायाप्रमाणें उभें करावयाचें दुबेळक्याचें लांकूड, टेकू. ३ (मुलकी खात्यांतील) मोजणीपत्रकांतील तपशील, त्याचें पत्रक. ४ निश्चय. -मनको. -हंको. [सं. बं. धट] ॰घेणें-घेऊन बसणें-धरणें धरून बसणें; सक्त तगादा लावणें. ॰लागणें- चालणें-(एखादी क्रिया, गोष्ट) अव्याहत चालू असणें, केली जाणें. ॰लावणें-(खाणें, पिणें, बोलणें, चालणें, लिहिणें, वाचणें इ॰ सारखी क्रिया) बेसुमार व अव्याहत करीत राहणें (पुष्कळशा मालाचें वजन करणें असल्यास मोठा धट रोंवून भराभर ठराविक हप्त्यांचें वजन करितात त्यावरून हा अर्थ).धटास लावणें- एखाद्या खाजगी, वैयक्तिक क्षुल्लक गोष्टीची शहानिशा करण्याक- रितां, पदरीं घालण्याकरितां ती जाहीरपणें लोकांपुढें मांडणें.

दाते शब्दकोश

पर्याय

पु. १ रीत; पद्धत; मार्ग; योजना; एखादें काम साधण्याची युक्ति, शेवटास नेण्याची रीत, योजना. 'जल- मार्गानें जावें किंवा पायवाटेनें जावें हे दोन पर्याय आहेत.' 'सावकार सोडीना तेव्हां शेत पिकलें म्हणजे तुझे स्वाधीन करीन असा पर्याय काढून मी निघून आलों.' 'ह्या दोघांचा कज्जा तुम्ही एक पर्याय काढून तोडा.' २ शेली; धाटी; विशेष पद्धत; वैशिष्ट्य. 'त्याचे बोलण्याचा पर्याय निराळा ह्याचे बोलण्याचा निराळा. ३ आवृत्ति; क्रम; एक वेळचा प्रयोग; एकदां केलेली कृति. 'शास्त्र केवळ पहिल्या पर्यायास समजतें असें नाहीं, दोन तीन पर्याय करावे लागतात.' 'तीन पर्याय जेव्हां करावे तेव्हां हें शेत होईल.' ४ कांहीं गौण किंवा निराळा प्रकार, रीत, चाल, उपाय, पंथ इ॰ 'एकादशीचा मुख्य पक्ष होईना तर कांहीं पर्याय करावा.' ५ टप्पा; पायरी; खंड; भाग; क्रमाक्रमानें व्हाव- याच्या क्रियेंतील एक अवस्था. 'एकदम दहा कोस चालण्याची शक्ति नाहीं, पर्यायापर्यायांनीं चालूं.' 'चार पर्यायांनी ब्राह्मणभोजन झालें.' ६ निरनिराळे मार्ग प्रत्येकीं (काम लवकर होण्यासाठीं); एकसमयावच्छेदेंकरून चालू केलेले कामाचे भाग; स्वतंत्र योजना. 'एकदांच चार पर्याय चालविले तेव्हां हजार ब्राह्मणांस चार घटकांत दक्षिणा आटपली.' ७ क्षुल्लक, खोटी सबब, उडवा- उडवी; बयादा. 'होय किंवा नाहीं म्हणून सांगावें तो हजार पर्याय सांगतो.' 'हिशोब विचारिला असतां तो अनेक पर्याय सांगतो.' ८ समान, एकाच अर्थाचे दोन शब्द परस्पर; प्रतिशब्द- ९ व्यवस्था; पद्धतशीर मांडणी; क्रम. १० गौण, समाविष्ट, अंत- र्भूत गोष्ट किंवा बाब; पोटविभाग. 'त्या कामामध्यें पर्याय पुष्कळ आहेत.' ११ गोष्ट; भावार्थ. 'माझा हा पर्याय पुसे त्यासी ।' -रामदासी २.१२७. [सं.] पर्यायापर्यायानें-क्रिवि. आलटून पालटून; अदलून बदलून.

दाते शब्दकोश

तृण

न. गवत किंवा कसलेंहि गवताच्या जातीचें तण. 'काय जिंकियलें मन । जीविता कामातुरा तृण ।' -तुगा १७९७. [सं.; प्रा. तण-न] (वाप्र.) तृणाची गरज-चाड, तृणाइतकी चाड-मुळींच इच्छा नसणें. तृणाची शेज करणें-संततीकरितां स्त्रीनें नवस करणें; प्रसूत झाल्यानंतर नऊ दिवस गवतावर निजणें. म्ह॰ १ तृणाला चाड आहे ती त्याला नाहीं = तो कोणालाही आवडत नाहीं; किंवा त्याला कोणी मुळींच चहात नाहीं. २ दांतीं तृण धरणें = अभिमान सोडून शरण जाणें. सामाशब्द- ॰कुट, कुटा-पु. गवताचा पेंढा; चुरा. 'मग असत्य तृणकुटा भरिला । -ज्ञा ३.२५०. ॰ग्राही-पु. तैलस्फटिक. तृण मणि पहा. ॰चर-वि. वनस्पतीवर अथवा गवतावर उपजीविका करणारा. 'तृणचरांमाजी देखा । कैसी उभी राहिली पिपीलिका ।' ॰जलूका-स्त्री. सुरवंटाच्या जातीचा एक प्राणी; उंट. चालतांना हा आपलें शरीर कमानदार करतो आणि मागली जागा सोडण्या- पूर्वीं पुढच्या भागानें नवीन जागेचें आक्रमण करितो. ह्यावरून जन्मांतरासंबंधीं दृष्टांत देत असतांना हिंदु लोक याचें उदाहरण देत असतात. ॰जाती-स्त्री. वनस्पतिगण-कोटी. ॰तुल्य-प्राय- वत्-वि. कवडीच्या मोलाचा; निरुपयोगी; व्यर्थ; क्षुल्लक; कसपटा- समान. ॰धान्यन. १ गवताप्रमाणें उगवणारें धान्य; नाचणी, वरी, सावा, राजगिरा, राळा, देवभात, बरटी, बरग इ॰ सारखें धान्य. २ कोणतेंहि बेसुमार वाढणारें धान्य. ॰मणि-पु. एक प्रकारचें रत्न; तैलस्फटिक; राळ ज्या वृक्षापासून होते त्यावृक्षाचा हा अश्मीभूत पदार्थ आहे. हा जळल्यास अगर चोळल्यास थोडा सुगंध येतो. ॰वेटी-गवताची दोरी. ॰शत्रु-पु. अनाडी न्हावी; न्हावगंड. तृणांकुर-पु. गवताला फुटणारा अंकुर. 'जैसा मेघ वर्षता साचार । अंगणांत उठती तृणांकुर ।' तृणाचा शेक- पु. (गवताचा जाळ गवत जळेपर्यंतचा असतो यावरून ल.) क्षणिक टिकणारी गोष्ट. पाण्यावरचा बुडबुडा पहा.

दाते शब्दकोश

हळद

स्त्री. एक झाड; याचें मूळ, मुळापासून तयार केलेली पूड; हळकुंड. [सं. हरिद्रा; प्रां. हलिद्द] म्ह॰ पी हळद आणि हो गोरी = उतावीळपणाबद्दल योजतात. 'आजपर्यंत लोकांनीं जीं मोडमोठालीं कामें उरकलीं, तीं लागलीच पी हळद हो गोरी या न्यायावर उरकलीं नाहींत.' -निंच (वाप्र.) ॰उतरणें-लग्नांत वधुवरास लाविलेली हळद मंगलस्नान घालून समारंभानें काढून टाकणें. -ऐरापुविवि १४९. ॰काढणें-(क.) बाळंतपण, लग्न इ॰ उरकल्यानंतर त्यांतून मोकळीक देण्यासाठीं स्नान घालणें. 'आज हळद काढावयाची आहे तेव्हां गूळपोळ्यांचें जेवण आहे.' ॰खेळणें-(कर्‍हाड) विवाहांत नवरानवरींनीं स्नानाचे वेळीं एकमेकांवर हळद उडविणें. ॰लाग(व)णें-१ (विवाहाचे वेळीं वधू- वरांस प्रथम हळद लावून मंगलस्नान घालतात त्यावरून) विवाह संस्कार होणें २ वैभवास, मानमान्यतेस चढणें; भाव वाढणें. ३ (ल.) दुर्मिळ होणें. 'हल्लीं भाद्रपद महिना, भटांना काय हळद लागली आहे; तेव्हां आम्हीं पक्ष लांबविला.' हळदीचा डाग लागणें-विटाळ होणें-लग्न झाल्यावर थोडेच दिवसांत नवरा किंवा बायको मरणें. हळकुं(खुं) ड-न. हळदीच्या मुळाचें कुडें; (गो.) हळकुटा [हरिद्राखंड] म्ह॰ अर्ध्या हळकुंडानें पिवळें होणें = थोड्याशा यशानें, प्राप्तीनें, गर्वानें ताठून जाणें. हळकुंडासाठीं लग्न मोडणें-एखादी क्षुल्लक बाब न जुळल्या- मुळें मोठें कार्य जुळत आलेलें असून तें मोडून टाकणें हळद- कुंकू-विडे, हळदा कुंकू-विडे-न. पुअव. चैत्रांत किंवा नव- रात्रांत सुवासिनी स्त्रियांनीं परस्परांस व कुमारिकांस वाटावयाचें सौभाग्यदर्शक हळद व कुंकू आणि विडे देणें व ओट्या भरणें इ॰. समारंभ. 'शेजारच्या मुली आपल्या सासरीं जाऊं येऊं लागल्या म्हणजे पुष्कळ वेळां सरोजिनिला हळदीकुंकू करण्याची पाळी येई.' -झामू. हळदवणी-पु. (कु.) एक ग्रामाचार. हळद लेकूरवाळी-स्त्री. एक प्रकारचें फांद्या फुटलेलें हळकुंड. हें शुभ मानतात व लग्नांत घालण्यासाठीं घेतात. हळदिवा-दुवा-वि. हळदीरंगाचा; पिवळा. [सं. हळद + इव] हळदिचा गाभा- पु. अत्यंत सुंदर रंग, अंगकळा हळदुली-स्त्री हळद लावण्याचा समारंभ. 'उटिलीं वधूवरें हळदुली स्वनदें ।' -एकनाथ. हळ- दुटणें-हळदुष्ण-न. (तंजा.) सुनमुखानंतर वधूवर परपस्परांस हळदकुंकू, पानसुपारी इ॰ देतात तो समारंभ. [हळद + उटणें] हळदेमाळी-पु. हळद पिकविणारा माळी. हळद्या-पु. १ काविळी सारखा एक रोग (माणूस, झाड इ॰ स होतो). २ एक जातीचें विष. ३ मधाच्या पोळ्यांतील पिठासारखा एक पिवळा पदार्थ.

दाते शब्दकोश

प्रेत

न. १ शव; मुडदा. २ सपिंडी, उत्तरक्रिया इ॰ होऊन पितर होण्यापूर्वींचा मृत जीव. [सं.] सामाशब्द- ॰कम-कार्य- क्रिया-नस्त्री. और्ध्वदेहिक विधि. ॰कला-ळा-स्त्री. १ मरण- समयीं तोंडावर येणारा फिकटपणा. २ (ल.) भीति, आजार, फजीती इ॰मुळें चेहर्‍यावर दिसणारा निस्तेजपणा. 'तेथें (महा- राष्ट्रांत) 'एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सर्व बाबतींत प्रेत- कळा आली होती...' -टि ४.२८२. ॰ज-वि. (प्रेतापासून उत्पन्न झालेला. परशुरामानें श्राद्धासाठीं प्रेतापासून उत्पन्न केला यावरून) चित्पावन किंवा कोंकणस्थ ब्राह्मणबद्दल उपाहासानें योजीतात. [सं.] ॰दीक्षा-स्त्री. प्रेतकळा. 'आक्रूरा गोपिकांस झिडकाविलं हरी मागत भिक्षा । आक्रूरा । गोकुळाच्या जनास दिधली प्रेतदिक्षा ।' -होला १२. ॰नाथ-पु. यम. 'यमपुरी वोस पडे । म्हणोनी रडे प्रेतनाथ ।' -एभा आनंदलहरी ३८. ॰भूमि- वन-स्त्रीन. स्मशान: मसणवटा. [सं.] ॰यात्रा-स्त्री. प्रेत स्मशानांत नेण्यासाठीं जमलेला, प्रेताच्या मागून जाणार्‍या लोकांचा जमाव. 'प्रेतयात्रा निघाली तेव्हां बराच लोकसमूह जमला.' ॰संस्कार-पु. मृत मनुष्याच्या शरीराची विल्हेवाट लावणें; मृतांना पारमार्थिक सुख प्राप्त करून देणें व मृताच्या पश्चात् त्याच्या आप्तांना मृताच्या अशौचापासून मुक्त करणें. ॰साया- स्त्री. प्रेतछाया. 'तया प्रेतसायाचा पाखाळु । रंकपणाचा उजाळु ।' -एकनाथकृत २०६. ॰प्रेतवरील पान-न. (ल.) अत्यंत क्षुल्लक परंतु अत्यंत अशुभ वस्तु. प्रेताशौच-न. प्रेत वाहून नेल्यामुळें होणारा विटाळ. [प्रेत + अशौच] प्रेत्यापु. (तिरस्कारार्थी) और्ध्व- देहिक कर्म सांगणारा ब्राह्मण; कारटा. [प्रेत]

दाते शब्दकोश

ताक

न. १ दहीं घुसळून लोणी काढून घेतल्यावर राहिलेला द्रव पदार्थ. 'घरीं कामधेनु पुढें ताक मागे ।' -राम ६३. 'रसिकीं घ्यावी कशास रुचि ताकीं ।' -मोभीष्म १०.४. २ सत्त्वहीन, नीरस पेय, पदार्थ. 'झाला घालाया घृत-वर्ण नभाचा परासु कवि ताकीं ।' -मोस्त्री ४.३९. [सं. तक; प्रा. तक्क] (वाप्र.) ताकाचें पाणी, ताकाचाथेंब-नपु. १ ताकाचा थोडा अंश; थोडेसें ताक. २ ताक; ताकवणी, दह्याची कवडी, दुधाची धार, लोण्याचा कण इ॰ शब्दांप्रमाणें वरील शब्द ताकाचें अतिशय लहान परिमाण, अंश दर्शवितो. ताका मिठाक गांठ-(गो.) १ ताक व मीठ यांची (कशीतरी) भेट. २ (ल.) काटकसर करून कसा तरी केलेला संसार. ताकाला जाऊन भांडें, गाडगें, लपविणें-दुसर्‍याजवळ कांहीं मागावयाचें झालें तर तें उघडउघड किंवा सरळ न मागतां आढेवेढे घेऊन मागणें; दुसर्‍याची याचना करण्याचें पत्करून याच- नेकरितां तोंड वेंगाडण्यास कचरणें. ताकास तूर लागूं न देणें- (एखाद्या गोष्टीचा दुसर्‍यास) बिलकूल थांग लागूं न देणें; टाळाटाळी करून स्वतःच्या मनांतील विचार दुसर्‍यास समजूं न देणें. ता म्हणतां ताकभात समजणें- १ ताकभात शब्द पूर्ण उच्चारला जाण्याच्या अगोदर किंवा त्यांतील ता उच्चारल्याबरो- बर पुढील क, भा, त हीं अक्षरें तर्कानें ओळखणें. २ (ल.) स्थळ, काळ, वृत्त व वर्तमान इ॰ कडे लक्ष देऊन कोणतीहि गोष्ट चटकन तर्कानें जाणणें; त म्हणतां तपेलें समजणें. (धर्माचें) ताक पिणें- एखादी वस्तु (तीहि क्षुल्लक) घरीं मिळणारी असून दुसर्‍यापासून तिचा अभिलाष धरणें. 'कोण वर्तणुक कसी रोज स्वदृष्टीनें पहातां । समजुन पुरतेपणें ताक कां धर्माचें पितां ।' -होला १०८. म्ह॰ १ जिच्या घरीं ताक तिचें वरती गेलें नाक = ज्या बाईच्या घरीं ताक होतें तिला फार तोरा असतो. २ ताकापुरतें रामायण = ताक मिळ विण्यापुरतें गोड बोलून ताक देणार्‍या बाईस खूष करणें. (ल.) आपलें काम साधण्यापुरतें दुसर्‍याचें आर्जव करणें. २ जेवढें ताक (मिळण्याचा संभव असेल) तेवढीच खुशामत; ताक थोडें तर खुशामतहि थोडीच. सामाशब्द- ॰कण्या-स्त्रीअव. गरीबीचें अन्न जाडेंभरडें जेवण; मीठभाकर. [ताक + कण्या] म्ह॰ ये रे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या = (ल.) कितीहि उपदेश, कान उघडणी इ॰ केली, मूळची परिस्थिति बदलली तरी जो आपला पूर्वींचा हट्ट, हेका, अवगुण सोडीत नाहीं त्याला उद्देशून ही म्हण योजतात. ॰कण्याचा-वि. (उप.) अगडबंब; भोपळसुती; झोड- काम्या. [ताक + कण्या] ॰घाटा-पु. ताक व ज्वारीचा भरडा; जाडें भरडें अन्न; ताककण्या; कांदाभाकर. 'ज्या भक्षिती केवळ ताक घाटा ।' -सारुह ३.१६. ॰तई-तय-तव-तेय-तेव- त्येय-त्येव-तोय-तोव-स्त्री. फोडणीचें ताक; कढी; मठ्ठा. [ताक + तोय = पाणी?] ॰पाणी-न. १ (व्यापक) दहीं घुसळणें, ताक करणें, लोणी काढणें इ॰ व्यापार. (क्रि॰ करणें). २ ताक, दहीं इ॰ ३ जाडेंभरडें अन्न; ताककण्या. ४ (ल.) अल्पाहार; थोडें जेवणखाण. 'शेजारीं दहा पांच ब्राह्मणांचीं घरें आहेत तेथें सम- यास ताक पाणी मिळतें.' [ताक + पाणी] ॰पिठ्या-वि. ताक व पीठ येवढ्या सारख्या लहान बिदागीवरच पुराण सांगणारा (पुरा- णिक), कथा करणारा (हरिदास); (सामा.) अल्पविद्य; बाताड्या; तुटपुंज्या ज्ञानाचा. [ताक + पीठ] ॰पिरा-वि. १ ताक पिणारा. २ (ल.) घामट; घाणेरडा ओंगळ. 'गौळीयांची ताकपीरें । कोण काय पोरे चांगलीं ।' -तुगा ३६८४. [ताक + पिणें] ॰मेढ-मेढी-स्त्री. घुसळखांब. [ताक + मेढ = खांब] ॰वणी-न. फार पाणी घातलेलें, अतिशय पातळ, पाणचट ताक. [ताक + पाणी]

दाते शब्दकोश

तोल

पु. १ वजन करणें; वजन करण्याची क्रिया. २ वजन करून पदार्थाचें समजलेलें मान, परिमाण. ३ कल; झोंक. 'राधेयपता- केचा होता मागेंचि तेधवां तोल ।' -मोकर्ण ७.४०. ४ (कांहीं जिन्नस तोलतांना) गिर्‍हाइकांस हवा असेल तेवढ्या वजनाचा जिन्नस देऊन लोकरीतीप्रमाणें आणखी थोडासा जिन्नस वर देतात तो. ५ (सामा.) तुलना; बरोबरी; तुलनेस, जोडीस जुळणें; समानता. 'मालोजीस मनसब देऊन तुमच्या तोलाचें करतो.' ६ (ल.) महत्त्व; मोठेपणा; वजनदारी; भारदस्तपणा. 'राष्ट्राचा केवल तोल ।' -संग्रामगीतें १०८. ७ -न. वजन करण्याचें परिमाण, माप, वजन. उदा॰ शेर, मण, तोळा, मासा इ॰. [सं. तुल् = वजन करणें] (वाप्र.) ॰देणें-(दुसर्‍याचा अपराध, अपकार) सहन करणें, पोटांत घालणें; गम खाणें; गई, क्षमा करणें; (दुसर्‍याच्या मतास मान देऊन, आपलें मत बाजूस ठेवून त्याच्या मतास) मान्यता, अनुमति, संमति देणें; आपला हेका सोडणें. ॰मिळ- विणें-(जरतार धंदा) वजन पडताळून पाहणें. लावून चालणें- ठमकत ठमकत, नखर्‍यानें, छाती काढून चालणें. ॰संभाळणें- समता, साम्य, समतोलपणा राखणें. झोंक जाऊं न देणें, इकडे- तिकडे न झुकणें. तोलाचा-वि. १ बरोबरीचा; सारख्या दर्जाचा, किंमतीचा, हिंमतीचा; जोडीस अनुरूप. २ (ल.) बहुमोल; भारी. म्ह॰ जसा वारा वाजेल तसा तोल द्यावा = परिस्थितीप्रमाणें वर्तन ठेवावें. तोलास तोल घेणें-देणें-१ भारंभार घेणें, देणें. २ (ल.) (द्रव्यव्यय, शौर्य, वर्क्तृत्व इ॰ बाबतींत दुसर्‍याशीं) बरो- बरी करणें; टक्कर देणें; स्पर्धा करणें. तोडीस तोड देणें पहा. सामा- शब्द- ॰दार-वि. १ (संपत्तीचा खर्च इ॰ बाबतींत) टक्कर देण्यास, स्पर्धा करण्यास, तोलास तोल देण्यास, बरोबरी करण्यास तयार असलेला; बरोबरी करण्याची हिंमत असलेला; याच्या उलट फुसका; क्षुल्लक; किरकोळ; क्षुद्र. २ भारी; प्रचंड. 'भागानगरकर मोगल फौज तोलदार सामान पुरा आहे.' -वाडशाछ १.२. ३ वजनदार; मातब्बर; भारदस्त; अब्रूदार; मानमान्यतेचा; प्रतिष्ठित. [तोल + फा] दार] ॰दारी-स्त्री. १ तोलासतोल देण्याची शक्ति; स्पर्धा; ईर्षा; बरोबरीच्या नात्यानें वागण्याची हिंमत. २ (क्व.) प्रतिष्ठितपणा; प्रतिष्ठा; भारदस्तपणा; वजनदारपणा; मानमान्यता. [तोलदार] म्ह॰ तोलदारीचा हेवा आणि सनकाडीचा दिवा = आपल्यापेक्षां उच्च दर्जाच्या माणसाशीं, अंगीं पात्रता नसतांहि स्पर्धा करणें (मूर्खपणा होय). तोलासन-न. (योग) दोन्ही पायाचें चवडे जमीनीवर टेंकून बसावें. दोन्ही पाय एकाशीं एक जुळवून, दोन्ही हात जमीनीवर टेंकून आसन उचलावें. यास डोलासन किंवा तोलासन म्हणतात. -संयोग ३५३. [तोल + सं. आसन = बसणें, बैठक]

दाते शब्दकोश

गांड

स्त्री. १ गुदप्रदेश; ढुंगण. २ मलद्वार; बृहती; बोचा. ३ मागची अथवा खालची बाजू; बूड अथवा तळ (वस्तूचा). [सं. गुद] (वाप्र.) ॰गुडाखू होणें-क्रि. भीतीनें दबून बसणें; थंडी, पेटके वगैरेंनीं आंखडलें जाणें. ॰जड होणें-गर्विष्ठ बनणें; शेखी चढणें. ॰तोंड हातीं धरणें-बाहेरख्यालीस किंवा खाबूसपणास प्रवृत्त होणें, सोकावणें; बदफैलीपणा व अविश्वास ह्या दोन्ही गोष्टी करणें. ॰फाटणें-भीतीनें गांगरणें; लेंड्या गाळणें; गर्भगळित होणें. ॰मारणें- १ गुदमैथुन करणें; बृहती तंतरणें. ॰वळणें, गांडीवर रेघ ओढणें-मागें सरणें; नाकबूल करणें. ॰गांडी- खालचें घोडें-न. उपजीविकेचें साधन (नोकरी, व्यापार, धंदा वगैरे). ॰गांडींत सुंठ फुंकणें-गांडींत काड्या घालणें; एखाद्यास उत्तेजन देणें; भर, फूस देणें. २ (ल.) शिक्षा, फजिती करणें; पराभव करणें. ॰गांडीवर घाव घेणें-काम- काजांत फजीत होणें; अपमानानें मागें सरणें; पराभव पावणें. ॰गांडीस हात पोंचणें-मातापितादिकांच्या ताब्यांतून सुटून स्वच्छंदानें वागण्यास मोकळें होणें. म्ह॰ १ गांडीवरचा घाव झांकतां नये आणि दाखवितां नये. २ गांड फाटे पण कपडा न फाटे. ३ गांडींत नाहीं गू कावळ्याला आमंत्रण = शक्तीबाहेरचें काम करण्याचा आव घालणें. कांहीं महत्त्वाचे सामाशब्द पुढें दिले आहेत:- ॰कणी-स्त्री. गोणीच्या मागचा पट्टा; लेंडी. याच्या उलट उराठी. ॰गमाऊ-वि. बेअकली; मूर्ख; नालायक. ॰गुडघा- घी, गांडगुंडा-पुस्त्रीपु. गांडीवर गुडघ्यानें मारलेला ठोसा. (क्रि॰ देणें; मारणें, बसणें). ॰गुलामी-स्त्री. मानहानीची खुशामती; फार हांजीहांजी. ॰गोटा-पु. (ना.) पाण्याच्या अभावीं दग- डानें गांड पुसणें. ॰चोळणा-पु. चड्डी. ॰जोरा-पु. (अशिष्ट) मागून दुजोरा; अनुमोदन; फूस; पाठ पुरावा. (क्रि॰ देणें). ॰पिटकी-स्त्री. १ ढुंगणावर ढुंगण आपटणें (लहान मुलांत रूढ). २ खेळीमेळी; दाट मैत्री. ॰पुशा-वि. हलकट; नीच; क्षुल्लक; यःकश्चित्. ॰पोतें-न. (कु.) जाडेंभरणें वस्त्र; नेसणें. ॰बोला- पु. ढुंगणावर आलेलें गळूं; व्रण; क्षत. ॰भरू-वि. (निंदावाचक) संपत्तिमान; द्रव्यवान; धनवान; श्रीमंत. ॰मणी-पु. गुह्यगोष्ट. 'राग नको धरूं मनीं । गांडमणी सांगतों ।।' -तुगा ३००३. ॰मांडूळ- महांडूळ-पु. काडू; लाल रंगाचा, दुतोंडी, पावसाळ्यांत उत्पन्न होणारा उरोगामी किडा. ॰मैत्री-मैत्रिकी-स्त्री. गांडपिटकी अर्थ २ पहा. ॰मोडी इरलें-न. माणूस वांकलें असतां दुमडून ढुंगण झांकलें जाईल अशा पद्धतीचें इरलें. ॰मोडी मुंगी-स्त्री. एक मुंगीची जात (ही चालत असतां हिचें ढुंगण मोडल्यासारखें दिसतें). ॰मोरा-वि. पाठमोरा; ढुंगणाकडून. 'तेव्हां त्याला गांडमोरा वर बोलावलान्.' -लोक २.४६. ॰रग-स्त्री. खोटा अभिमान, अहंकार; रिकामा तोरा, ताठा; बढाई. ॰राऊ-वू-पु. गांडू; गांडभरावू; गंड्या. ॰वळ-पुन. (कों.) काडू; गांडमां- डूळ पहा. ॰सुकाळ-ळा-ळ्या-पु. गांडराऊ-वू पहा.

दाते शब्दकोश

कवडी

स्त्री. १कपर्दिका; समुद्रांतील एका जलजंतूच्या शरी- रावरील कवच. याचा चलनाकडे उपयोग होत असे. एका पैशाला ६४ किंवा ८० कवड्या मिळतात. तीन प्रकारच्या कवड्या असतात- दही. सगुणी व भवानी. 'हातीं कवडी विद्या दवडी' 'शंख सिंपी घुला कवडे । आधीं त्यांचें घर घडे ।' -दा ९.७.५. 'परि खळ जन हे नेदिती कवडी तेही' -श्रीधर (नवनीत पृ. ४४४). २ हाताच्या पायाच्या नखावर जो पांढरा ठिपका असतो तो. ३ विटीदांडूच्या खेळांतील एक शब्द. ४ कवडा अर्थ ५ पहा. ५ रेशीमगाठी वस्त्राच्या काठाची विणकर विरळ झाली असतां त्यांत उभ्या ताण्याचे दिसणारे पांढरे ठिपके. अंश. ६ डोळ्यां- तील फूल, वडस. ७ चलनाचा अत्यंत अल्प अंश. ८ सर्पाच्या अंगावरील पांढरे ठिपके. ९ (उपहा.) दांत; कवळी? १० बुबुळाशिवाय डोळ्याचा पांढरा भाग. ११ कवडीचें झाड; हें लहान असून यास पंढरी फुलें येतात याचा तापावर उपयोग होतो. १२ झोपडलेल्या गव्हाच्या ताटांतील कणस. १३ मुसलमान लोक दाढीचा जो भाग कधींहि काढीत नाहींत तो; अल्लाचा नूर. १४ दह्याचा घट्ट गोळा; गांठ, गठळी. [सं. कपर्दिंका; प्रा. कवड्डिआ = कवडी; हिं. पं. कौडी] ॰कवडी सांठविणें - क्रि. चिक्कूपणानें पैशांचा सांठा करणें. ॰उलटी पडणें - क्रि. फांसा किंवा डाव उलटा पडणें; गोष्ट अंगावर येणें. ॰किमतीचा -वि. निरुपयोगी; कुचकामाचा. ॰चा खेळ -पु. इटीदांडूच्या खेळांतील एक प्रकार. ॰चा माल -पु. १ अगदीं कमी किमतीचा माल. २ (ल.) तुच्छ पदार्थ; कुचकामाचा. ॰टंक-चुबका-पूत -वि. चिक्कू, कृपण, कंजूष (मनुष्य). 'कवडीचुंबक आहे.' 'दोघेही गुलाम कवडी चुंबक !' -विवि ८.११.२०७. ॰बाज -वि. चांगल्या प्रकारें कवड्या खेळणारा. ॰मोल -वि. अगदीं कमी किमतीचा; क्षुल्लक दर्जाचा. 'एका मार्गांतील कुशल वाटाडेही दुसर्‍या मार्गांत कवडीमोल ठरतात.' -टि ४.१२२.

दाते शब्दकोश

काटा      

पु.       १. अणकुचीदार, तीक्ष्ण टोक असलेली, जी बोचली असताना रक्त काढते अशी काडी; बाभळीचा, बोरीचा दाभणासारखा टोचणारा अवयव : ‘सर्प कपाळीं कांटा नेहटे । कां सापसुरळीचे पुच्छ तुटे ।’ - भारा बाल ८·३५. २. सुई : ‘काटा आणिला । मेग सींउ बैसले ।’ - लीचउ २९. ३. (भयाने, थंडीने वगैरे) अंगावर उभे राहणारे शहारे; रोमांच. ४. (अव.) तापानंतर अंगावर येणारा खरखरीतपणा अथवा उठणाऱ्या बारीकपुटकुळ्या; पुरळ. ५. (अव.) तापाच्या पूर्वी अंगावर येणारी शिरशिरी; रोमांच; कसर. ६. विंचवाच्या नांगीचे पुढचे तीक्ष्ण टोक. ७. जो कुलुपाच्या दांडीत असतो व मागे सरतो तो कुलपादिकाचा खिळा. ८. वेळू, बांबू वगैरेंना येणारा तुरा, मोहोर, फुलोरा. ९. कंबर, मान, पाठ, यांच्या आतील बाजूला आधारभूत असलेला अस्थिविशेष. १०. गुणाकार, भागाकार यांचा ताळा पाहण्यासाठी अंक मांडण्याकरिता घातलेली चौफुली (ल.). ११. वजनाने विकलेल्या वस्तूंवर जे काही वजन कटते देतात ते. पहा : कडता. १२. काट्यासारखी शरीराला बोचणारी कोणतीही वस्तू (माशाचे हाड, चक्राचा दाता, घड्याळाचा हातकाटा, खडबडीत लगामाचे टोक, करवतीचा दाता, जेवणातील वापरायचे दाताळे - काटा, जनावरे किंवा भाजीपाला यावरील खरखरीत केस व लव इ.) : ‘काटा बराबर एकांवर एक आला.’ - रासक्रिडा ७. १३. हलवा, इतर मिठाई यावरील टोके, रवा. (क्रि. येणे, उमटणे, वठणे, उठणे.) १४. (वस्त्रोद्योग) वशारन करताना इकडून तिकडे (वशारन पुढे सरकण्यासाठी) फिरवायचे लाकूड. १५. सुताराचे एक हत्यार. (कु.) १६. (ल.) त्रास देणारा माणूस, व्याधी, शल्य, पीडा, शत्रू. १७. तराजूच्या दांडीमधील उभा खिळा : ‘जरि कांटा कलताए देवांचा । जेउता राजमठु ।’ - ऋ ३९. १८. काटा असलेला तराजू (विशेषतः सोनाराचा, सराफाचा) : ‘मेरूचिया वजनासपाहीं । कांटिया घातली जैसी राई ।’ - हरि ६०·१६१. [सं. कंटक] (वा.) काटा उपटणे - १. त्रासदायक प्राणी, शत्रू, गोष्ट नाहीशी करणे. (कर. व.) २. समूळ नाहीसा करणे, काढून टाकणे. काटा काढणे - आपल्या मार्गात असलेल्या, आपल्याला पदोपदी नडवणाऱ्या शत्रूला दूर करणे : ‘वसुदानाच्या पुत्रें जो अभिमुख काशिराजतो वधिला । कांटाचि काढिला तो जाणो तव सूनुच्या मनामधिला ।’ - मोकर्ण ४·१५. काटा मारणे - १. काट्याने सिद्ध करणे. २. अंगात (तापाची) कसर येणे. ३. काटेकोरपणे बरोबर आहे असे दाखविणे; चुकीचा तराजू वापरून वजनात खोट आणणे. काटा मोडणे - १. विंचू चावणे. (व.) २. पाणी किंचित उष्ण होणे. ३. पायात काटा घुसणे. काट्याचा नायटा होणे - काटा मोडल्यावर लगेच तो काढला नाही तर त्या ठिकाणी नायटा होतो, म्हणजे आरंभी क्षुल्लक वाटणाऱ्या वाईट गोष्टीचे पुढे मोठे हानिकारक परिणाम कधी कधी होतात. काट्याने काटा काढणे – एका दुष्टाच्या हातून परभारे दुसऱ्या दुष्टास शासन होईल असे करणे. काट्याप्रमाणे सलणे - सतत त्रासदायक होणे; दुखःकारक होणे; मत्सर, हेवा, द्वेष वाटणे. काट्यावर ओढणे, काट्यावर घालणे - वस्त्र काट्यावर ओढले असताना फाटते त्यावरून दुःखात घालणे; दुःखात लोटणे : ‘त्यांत (कौरव सैन्यात) मरेनचि शिरतां काट्यावरी घालितां चिरे पट कीं ।’ - मोविराट २. ४१. काट्यावर येणे - १. (बैलगाडी) आसाच्या दोन्ही बाजूला समतोल वजन होणे. २. (ल.) (मूल) खळीला येणे; रडायचे न थांबणे. ३. सहनशक्तीची परिसीमा होणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वेडा

वि. १ ज्याला वेड लागलें आहे असा; ज्याच्या मेंदूत बिघाड झाला आहे व त्यामुळें जो भलतेसलतें बोलतो किंवा करतो तो; खुळा; भ्रमिष्ट. २ मूर्ख; ज्याला व्यवहारचातुर्य नाहीं असा. ३ बेताल; फाजील; मूर्खपणाचें; असंबद्ध; विसंगत (वर्तन, भाषण इ॰). 'ही वेडी कल्पना तुझ्या डोक्यांत कोणी घातली.' ४ आसक्त; मोहित; आकृष्ट झालेला. 'त्या गवयानें मला अगदीं वेडा करून सोडलें.' ५ छांदिष्ट; नादी; एखाद्या गोष्टीचा ज्यानें ध्यास घेतला आहे, सारखा त्याच्या पाठीमागें आहे असा. ६ एकदम पुष्कळ कामें करावयाचीं असतां काय करावें, कसें करावें अशी मनाची भ्रांतिष्ट स्थिति झालेला; किंकर्तव्यमूढ; संभ्रांत झालेला. [वेड] ॰ऊंस-पु. रानऊंस; खुळा ऊंस. याचा औषधा- करितां उपयोग होतो. 'नाहिं करित कोणाची आस । औषधास वेडाऊंस साजणा ।' -सला ३२. ॰खुळा-पिसा-वि. वेडा; पिसाट; विरहादिकांनीं वेड्यासारखा वागणारा (वेडा, खुळा, पिसा, हे तिन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत). 'जयाचें नेत्रकटाक्षें होती । वेडेपिसे देवादि ।' ॰गोळा-वि. अगदीं अडाणी; मूर्ख; वेडा. -सृपनि १३४. ॰धोतरा-वि (ल) मूर्ख; माथेफिरू; वेडा. धोतरा पहा. ॰पीर-पु. १ छांदिष्टपणें, बेताल वागणारा-बोलणारा; आततायी मनुष्य. 'हा एक आपला वेडापीर आहे. जें तोंडाला येईल तें बडबडत असतो.' -पिंगला. २ अजागळ; वेड- गळ माणूस; मूर्ख मनुष्य. [वेडा + फा. पीर] ॰बागडा-वि. १ वेडावांकडा; अनेक ठिकाणीं वांकलेला. वाकडातिकडा. २ (ल.) सरळ मार्गानें न चालणारा; लहरी; छांदिष्ट. 'मी साधा आहें, मी वेडाबांगडा आहें, एवढाच कायतो माझा अपराध आहे.' -भा ९५. वेडावांकडा पहा. ॰मधुरा-पु. एक प्रकारचा दोषिक ताप. यांत शीतोपचार झाला असतां वांत होऊन वेड लागल्यासारखी स्थिति होते. मधुरा पहा. ॰वांकडा-वि. १ अनेक ठिकाणीं व निरनिराळ्या तऱ्हेनें वांकलेला; वाकडातिकडा. २ (ल.) कुटिल; वक्र; सीधा नसलेला; वाममार्गानें चालणारा (माणूस). ३ लहरी; भ्रमिष्ट. ४ असंबद्ध; भरमसाट; जसें आलें, सुचलें तसें-अगदीं वाई- टहि नाहीं व वाखाणण्यासारखेंहि नाहीं असें (भाषण, कृति इ॰). 'वेडेवांकडें गाईन । परि दास तुझा म्हणवीन ।' (एकाद्याला) वेडे वांकडें होणें-एखाद्यावर अनपेक्षित संकट येणें. (एखा- दीचें) वेडेवांकडें होणें-(बायकी) वैधव्य प्राप्त होणें; संसार विसकटणें. ॰विद्रा, विपारा-वि. १ वेडा आणि कुरूप; कुरूप आणि कुस्वभावी; भीतिदायक; भेसूर; हेंगाडा. 'मग पुरुष कस- लेही वेडेविद्रे, साधेभोळे, खुळे, अजागळ असले तरी बिघडत नाहीं.' -सवतीमत्सर ८३. २ वेडावांकडा. 'ढोलकें पिटणा- र्‍याच्या भोंवती भक्तांनीं वेड्याविघ्रा उड्या माराव्या.' -टि ४.७९. वेडी हळद-स्त्री. १ जाड्या खोडाची किंवा मोठीं कुडीं असलेली हळद. २ (ल. ) वेडदुल्ली; खुळी; मूर्ख; वेडसर. ३ (ल.) वेडें पीक. वेडेचार-चाळे-पुअव. १ वेडेपणाचीं कृत्यें; मूर्खपणाचीं कामें. 'वेडेचार शिकविति बालांना । खेचुनि खेळीं ।' होळीचें पद. २ वेडांतील हावभाव, चेष्टा चाळे इ॰ [वेडे + आचार] वेडें पीक-न. १ मशागतीवांचून विपुल येणारें पीक. उदा॰ एरंडांचें-निवडुंगाचें वेडें पीक. २ आलें तर पुष्कळ नाहीं- तर मुळींच नाहीं असें पीक. ३ (सामा.) पुष्कळ भरभराट; फजील पीक, उत्पादन, प्रचार इ॰ ४ (ल) वळला तर हवें तें देईल नाहींतर एक कवडीहि न देणारा दाता; अतिरेकी दाता; लहरी दाता. ५ (ल.) क्षुल्लक कारणावरून कधीं कधीं अतिरेक, आततायीपणा करणारा पण एरवीं मोठा उपद्रव दिला तरी अगदीं शांत राहणारा मनुष्य ६ (ल.) छांदिष्ट वर्तन; हास्यकारक वर्त- णूक; वेडेचार. वेडें भाग्य-न. नादान, नालायक, कर्तृत्वशून्य माणसाला प्राप्त झालेलें भाग्य; शिक्षण, शहाणपण किंवा योग्यता हीं कांहींहि नसतां आलेलें भाग्य. वेडेवेडे चार-पुअव. छांदिष्ट पणाचीं कृत्ये; वेड्यासारखें आचरण; खुळेपणाचीं कृत्यें. वेडें ज्ञान-न. चळ; खूळ; पिसें; मूर्खपणा. वेड्यांचा बाजार-पु. विचार न करतां एखाद्या गोष्टीच्या नादीं लागणार्‍या, कांहीं तरी करणार्‍या लोकांचा जमाव; मूर्ख माणसांची टोळी. (क्रि॰ भरणें) वेडथर, वेडदु(धु)ल्ली-वि. वेडगळ पहा. 'जा, वेडदुल्ली, तुला काय समजतें ?' -बाळ २.१८४. [वेडा + थर, दुल्ला] वेडपा-वि. वेडगळ पहा. वेडबंब-बंबू-वि. वेडा; मूर्ख. वेडा- वणें, वेडावणें-अक्रि. १ मूर्ख किंवा वेडा होणें; खुळावणें. २ वांकुल्या दाखविणें. ३ जड होणें; मुकी; स्तब्ध होणें (वाणी). 'वेडावेलचि रसना, नकरी सिंहापुढें शिवा चाळा ।' -मोकर्ण २८.८१. -दावि १३. वेडाळणें-अक्रि. १ वेडें होणें; खुळावणें. 'सिंहावलोकनें पडताळितां ग्रंथ । अविवेकी तेथें वेडाळूं लागत ।' -मुआदि १.९८. वेडावणें-न. (अव. वेडावणीं) वांकुल्या दाखविणें; चिडविणें. वेडावणें-उक्रि. १ वेडविणें; मोह पाडणें; एखाद्या गोष्टीच्या भरीं भरणें. 'तिनें आमच्या तरुण विद्वानांस इतके वेडावून टाकलें आहे कीं घरांत शुद्ध मराठी बोलण्याची मारामार.' -नि ५. वेडाळ-ळ्या-वि. वेडा; अर्धवट; मूर्ख; वेडसर. वेडाळवाणी-विक्रिवि. वेडाळ पहा. वेड्यासारखें (बोलणें, करणें इ॰). 'सकळ राजसदनींचीं माणसें । वेडाळवाणी बोलती त्यास ।' -नव १८.५३. [वेडाळ + वाणी = सारखें] वेडीव-स्त्री. (काव्य) वेडेपणा; अजाणपणा; नेणीव. -ज्ञा १३. १९०. 'वायां वेडीव घेइजे चतुरें । शस्त्रास वाखणिजे शस्त्रधरें ।' -मुसभा ७.६९.

दाते शब्दकोश

काटा, कांटा

पु. १ अणकुचीदार, तीक्ष्ण टोंक असलेली, जी बोचली असतां रक्त काढते अशी काडी; बाभळीचा, बोरीचा दाभणासारखा टोंचणारा अवयव. 'सर्प कपाळीं कांटा नेहटे । कां सापसुरळीचें पुच्छ तुटे ।' -भारा बाल ८.३५. २ (भयानें, थंडीनें वगैरे) अंगावर उभे राहणारे शहारे; रोमांच. ३ (अव.) तापानंतर अंगावर उभे खरखरीतपणा अथवा बारीक पुटकुळ्या अस- तात तो; पुरळ. ४ (अव.) तापाच्या पूर्वीं अंगावर येणारी शिर- शिरी; रोमांच; कसर. ५ विंचवाच्या नांगीचें पुढचें तीक्ष्ण टोंक. ६ कुलुपादिकाचा खिळा, जो कुलुपाच्या दांडींत बसतो व मागें सरतो तो. ७ वेळू, बांबू वगैरेंना येणारा तुरा; मोहोर; फुलोरा. ८ कंबर, मान, पाठ यांच्या आंतील बाजूस आधारभूत असलेला अस्थि- विशेष. ९ गुणाकार भागाकार यांचा ताळा पाहण्यासाठीं अंक मांडण्याकरितां घातलेली चौफुली (x). १० राघु, मैना इत्यादि कांच्या गळ्यांत होणारा एक रोग. ११ वजनानें विकलेल्या वस्तूं- वर जें कांहीं वजन कटतें देतात तें. कडता पहा. १२ नदी किंवा समुद्रांतील पाण्याखालीं झांकलेला खडक. १३ काट्यासारखी शरीरास बोचणारी कोणतीहि वस्तु (माशाचें हाड, चक्राचा दांता, घड्याळाचा हातकांटा, खडबडीत लगामाचें टोंक, करवतीचा दांता, जेवणांतील वापरावयाचें दांताळें-कांटा, जनावरें किंवा भाजीपाला यांवरील खरखरीत केंस. लव इ॰). 'काटा बराबर एकावर एक आला.' -रासक्रीडा ७. १४ हलवा, इतर मिठाई यांवरील टोंकें, रवा. (क्रि॰ येणें; उमटणें; वठणें उठणें). १५ (विणकाम) वशारन करतांना इकडून तिकडे (वशारन पुढें सरकण्यासाठीं) फिरवावयाचें लांकूड. १६ (व.) थेंब. 'घरांत तेलाचा एक कांटा नाहीं. ' -वशाप ५१.१२. ४७८. १७ (कु.) सुताराचें एक हत्यार. १८ (ल) त्रास देणारा माणूस, व्याधि, शल्य, पीडा, शत्रु. ' धर्माच्या हृदयांतिल काढितसे मी समूळ कांटा हो । ' १९ तराजूच्या दांडीमधील उभा खिळा. ' जरि कांटा कलताए दैवांचा । जेउता राजमठु । ' -ऋ ३९. २० काटा असलेला तराजू (विशेषतः सोनाराचा, सराफाचा). ' मेरूचिया वजनास पाहीं । कांटिया घातली जैशी राई । ' -ह ३०.१६१. [सं.कंटक, प्रा. कंटओ, अप. कंटउ; त्सीगन; फ्रे. जि. कंडो. ते काटा] ॰उपटणें-१ (क.व.) त्रासदायक प्राणी, शत्रु, गोष्ट, नाहींशी होणें. २ (व. ष.) समूळ नाहींसा करणें, काढून टाकणें. ॰काढणें -आपल्या मार्गांत असलेल्या, आपणांस पदोपदीं नडवणार्‍या शत्रूस दूर करणें. ' वसुदानाच्या पुत्रे जो अभिमुख काशिराज तो वधिला । कांटाचि काढिला तो जाणो तव सूनुच्या मनामधिला । ' -मोकर्ण ४.१५. ॰मारणें-१ काट्यानें सिद्ध करणें. २ अंगांत (तापाची) कसर येणें. ॰मोडणें-१ (व.) विंचू चावणें. २ किंचित उष्ण होणें. 'थंड पाण्याचा थोडा कांटा मोडला.' कांट्याचा नायटा होणें -कांटा मोडल्यावर लगेच तो काढला नाहीं तर त्या ठिकाणीं नायटा होतो म्हणजे आरंभीं क्षुल्लक वाटणार्‍या वाईट गोष्टीचे पुढें मोठे हानिकारक परिणाम कधीं कधीं होतात. कांटयानें कांटा काढणें-एका दुष्टाच्या हातून परभारें दुसर्‍या दुष्टाचें शासन होईल असें करणें. ' कांट्यानें काढितात कांटा कीं. ' काट्याप्रमाणें सलणें -सतत त्रासदायक होणें; दुःखकारक होणें; मत्सर, हेवा, द्वेष वाटणें. काट्यावर ओढणें-दुःखांत घालणें; वस्त्र कांट्यावर ओढलें असतां फाटतें त्यावरून. काट्यावर घालणें-दुःखांत लोटणें. ' त्यांत (कौरव सैन्यांत) मरेनचि शिरतां कांट्यावरि घालितां चिरे पट कीं । ' -मोविराट ३.४१. कांट्यावर येणें - (बैलगाडी) आंसाच्या दोन्ही बाजूंला समतोल वजन होणें. ॰धारवाडी -अगदीं बरोबर तोल दाखविणारा कांटा. ' टीका करणार्‍याच्या हातांत नेहमीं धारवाडी कांटा असला पाहिजे. ' कांटेकाळजी-अतिशय सूक्ष्म काळजी; चिंता. ' नवीन गव्हर्नर हे काट्याकाळजीनें व निःपक्षपातबुद्धीनें आपलें काम करतील. ' -टि १.४३३. ॰भर-(बायकी) थोडें. ' आज तिच्या दुखण्याला कांटाभर मागचें पाऊल आहे. ' ॰रोखण-स्त्री. (कु.) लांकडांत खांच, रेघ, पाडण्याच्या उपयोगी सुताराचें एक हत्यार; खतावणी; फावडी. ॰कणगी-(गो.) कणगर; कनक पहा.

दाते शब्दकोश

दांत

पु. १ चावण्याच्या, फाडण्याच्या उपयोगीं तोंडांतील दृश्य अस्थिविशेषांपैकीं प्रत्येक; दंत. २ (ल.) (फणी, करवत, दंताळें इ॰ कांचा) दांता; फाळ; नांगराचें टोंक; डंगाचें टोंक. ३ हस्तिदंत. 'सहदेव नकुळ घेउनि दांतीं सिंहासनीं पृथा बसली ।' -मोशांति ५.४३ ४ द्वेषबुद्धि; मत्सर; दावा; डाव; वंश. 'त्याचा दांत आहे.' 'तो दांत राखितो.' [सं. दंत; पहा. हिं. दांत; सिं. डंदु] (वाप्र.) -उठणें-दांतांनीं धरलेल्या पदार्थावर दांताच्या खोलगट खुणा उमटणें. ॰ओठ खाणें-चावणें-रागानें दांतांवर दांत घासणें; दांतानीं ओंठ चावणें; अतिशय चिडणें; रागावणें. ॰काढणें-दाखविणें-दांत विचकून, फिदिफिदी हंसणें. ॰किची खाणें-(ना.) (राग इ॰ कानीं) कचाकच, कडकड दांत- चावणें. किरकिटीस येणें-विपन्नावस्था, अन्नान्नदशा प्राप्त- होणें; अति निकृष्ट परिस्थितीनें ग्रस्त होणें. ॰खाऊन-ओठ खाऊन-मोठ्या रागानें व अवसानानें. 'नरवर गरधरखरतर शर करकर दांत खाउनी सोडी ।' -मोशल्य २.८४. ॰खाऊन- चावून अवलक्षण करणें-(प्रतिकार करण्याचें सामर्थ्य नसतां) रागाचा दुबळा आविर्भाव आणून, शिव्याशाप देऊन स्वतःचें हंसें करून घेणें. ॰खाणें-चावणें-(रागानें चडफडून, झोंपेंत) दांतांवर दांत घासणें. 'कोपें खातात दांत बा हेर ।' -मोस्त्री ४.२६. ॰खीळ-खिळी बसणें-१ (सन्निपातादि दोषांमुळें) वरील दांत व खालचे दांत एकमेकांस घट्ट चिकटून बसणें. 'रामनाम घेतां तुझी बैसे दांतखीळ ।' -एकनाथ २ (ल.) निरुत्तर होणें; एखाद्या पुढें बोलतां न येणें. ॰खोचरणें- दांताच्या फटींत, खळग्यांत काडी, कोरणी घालून अडकलेले अन्नाचे कण इ॰ काढणें. ॰झिजणें-(ल.) निष्फळ उपदेश केल्यानें, केलेल्या विनवण्या व्यर्थ गेल्यानें, शिकविलेला विषय मूर्ख विद्यार्थ्यास ण समजल्यानें तोंडाला फुकट शीण, श्रम होणें. ॰धरणें-असणें-ठेवणें-राखणें-बाळगणें-(एखाद्याशीं) द्वेष, अदावत, मत्सर करणें; (एखाद्यावर) डाव धरणें; पूर्वींचें शल्य मनांत ठेवून (एखाद्याच्या) नाशासाठीं टपून बसणें. ॰निस- कीस येणें-त्वेष, स्फुरण, आवेश इ॰ कानीं युक्त होणें; जिवावर उदार होणें. 'मल्हारराव यांचे इरेनें दातनिसकीस येऊन मोठेमोठे खेतांत येऊन जीवाअधिक केली.' -भाब ११. [दांत + सं. निकष = घासणें] ॰पडणें-(एखाद्याची) फटफजिती, नाचक्की होणें; पराजित, फजित होणें. ॰पाजविणें-एखादी वस्तु (विशेषतः खाण्याची वस्तु) मिळण्याजोगी नसतां तिच्याबद्दल उत्कंठित, आतुर होणें. ॰पाडणें-(एखाद्याची) फजिती करणें; (एखा- द्यास) वादांत पराजित करणें; टोमणा मारणें; निरुत्तर करणें. 'इतका खोटें बोलणारा तूं असशील असें मला वाटलें नव्हतें. नाहींतर दोन चार साक्षी ठेवून तुझे चांगले दांत पाडले असते.' -त्राटिका अंक ४, प्र. ३. ॰पाडून हातावर देणें-(अशिष्ट) (एखा- द्याची) कंब्ख्ती काढणें; पारिपत्य करणें; उट्टें फेडणें (विशेषतः धमकावणी देतांना उपयोग). ॰लागप-(गो) पैसे पदरीं असणें; गबर असणें; खाऊन पिऊन सुखी असणें. ॰वठणें-लागणें- उच्च्चारलेला शाप (एखाद्यावर) फलद्रूप होणें. 'त्याच्यावर तया चेट- कीचा दांत वठला' = त्याला चेटकीच्या शापाचें वाईट फळ मिळालें, त्याला शाप भोंवला. ॰वासणें-(ल.) हातीं घेतलेलें कार्य शेवटास नेववत नाहीं म्हणून निराश होऊन स्वस्थ बसणें. ॰वासून पडणें-१ आजारानें अशक्त होऊन अंथरुणास खिळणें. २ मेहनत फुकट गेल्यानें हिरमुसलें होऊन बसणें. दांत वासणें पहा. 'वासुनि दांत मुखांत दहांत पडे मति गाढ तमीं पचली ।' -वामन-सीतास्वयंवर ११. ॰विचकणें-१ उपहास करून हंसणें. 'जो ऐसा प्रभु त्या जना न विचकूं दे दांत, बाहे रहा । वैकुठींच सदा..' -मोरोपंत. 'प्रेमदांत पावुनियां श्रम दांत क्षुद्र विचकिती कीं जे ।' -भक्तमयूरकेका ६५. २ याचना करणें; कांहीं जिन्नस मिळविण्याकरितां एखाद्यास विनविणें. ॰होंठ खाणें-चावणें-दांत ओंठ खाणें पहा. दातां ओठांवर जेवणें-चोखंदळपणानें जेवणें. दांतांखाली घालणें- धरणें-(एखाद्यावर) करडा, सक्त अंमल चालविणें; कडकपणानें वागविणें; अतिशय छळणें; गांजणें. दांतांची मिरवणूक काढणें-(कर.) (एखाद्यानें) स्वतःचें हंसें करून घेणें. दांताचें विष-न.मत्सरानें, जळफळाटानें काढलेले विषारी उद्धार; शाप; अभिशाप; शिव्याशाप. दांताचें विष बाधणें-१ (एखाद्याचे) शापोद्गार फलद्रूप होणें; दांत वठणें लागणें पहा. २ दुसर्‍यास बाधेल असा शाप देण्यास समर्थ असणें. दांतांच्या कण्या करणें-१ विनवण्या, याचना करून व्यर्थ उपदेश करून, शिकविण्याचा निरर्थक खटाटोप करून दांत झिजविणें; तोंड शिणविणें. २ अनेक- वार सांगणे, विनविणें. 'एक कांबळा पासोडी द्या म्हणून दातांच्या कण्या केल्या.' -नामना ५४. दांतांच्या-कण्या घुगर्‍या होणें-व्यर्थ याचना करून, उपदेश करून, शिकविण्याचा निरर्थक खटाटोप करून तोंड शिणणें; फार व निरर्थक बोलावें लागणें. 'हांका मारतां मारतां माझ्या दांतांच्या कण्या झाल्या.' -पकोघे. दांता- वर मरावयाला पैसा नसणें-अगदीं अकिंचन, निर्धम असणें, होणें, बनणें; जवळ एकहि पैसा नसणें नसणें. दांतावर मांस नसणें-१ (ल.) पैशाचें पाठबळ नसणें; दारिद्रानें ग्रस्त होणें. २ (दुसर्‍याशीं) भांडण्याचें, (दुसर्‍यास) इजा करण्याचें सामर्थ्य अंगी नसणें. 'उगीच भरीस भरल्याप्रमाणें लग्नांत खर्च केला. आपल्या तर दांतांवर मांस नाहीं. कुटुंब एवढें थोरलें.. असें शंकर मामंजींचें रडगाणें चालूं होतें.' -पकोघे. दांतास दांत लावून असणें-निजणें-बसणें-राहणें-तोंड मिटून, कांहीं न खातां, उपाशीं असणें, निजणें, बसणें इ॰ दांतीं घेणें, दातांवर येणें- (एखाद्या) कार्यांत अपयश येणें; (व्यापार इ॰ कांत) नुकसान, तोटा येणें. दांती तृण-तण-कड्याळ धरणें-मान तुकविणें; नम्रपणा स्वीकारणें; शरण येणें; पराजय कबूल करणें. दांतीं बळ धरणें-आतोनात मेहेनत, धडपड, नेट करणें; प्रयासानें, नेटानें काम करणें. दांतीं येणें-१ (एखाद्यावर) रागानें दांत- ओंठ खाणें; दांत ओंठ खाऊन भांडण्यास प्रवृत्त होणें. 'येकीस एकी ढकलून देती । येताति येकीवरि एक दांतीं ।' -सारुह ७.६०. २ फार अडचणींत, पेचांत, येणें, सांपडणें. (एखाद्याचे) दांत त्याच्याच घशांत घालणें-(एखाद्याची) लबाडी बाहेर काढून त्याच्या पदरांत माप घालून त्याची फजिती करणें; (एखा- द्याची) लबाडी त्याच्यावर उलटविणें. सोन्यानें दांत किसणें- (ल.) पैशाच्या राशींत लोळणें. हसतां हसतां दांत पाडणें- हंसून, गोड गोड बोलून फजिती करणें, टोमणे मारणें, निरु- त्तर करणें, कुंठित करणें. दांत कोरून कोठें पोट भरत नसतें-भलत्याच कामीं चिक्कूपणा करून चालत नाहीं. मोठया कार्यास क्षुद्र साधन पुरत नसतें; क्षुल्लक बाबींत काटकसर करून मोठा खर्च भागत नसतो. आपलेच दांत आपलेच ओंठ-१ शिक्षा करणारा आपणच आणि ज्याला शिक्षा करावयाची तोहि आपल्यांतलाच अशी स्थिति असते तेव्हां भांडणारे दोन्ही पक्ष निवाडा, शिक्षा करणाराला सारखेच जवळचे स्वकीय असल्यामुळें दोहोंपैकी कोणाचेंहि बरेंवाईट करतां येत नाहीं अशा वेळीं योज- तात. २ स्वतःच्याच दुष्कर्माचें फळ भोगतांना स्वतःलाच दोष द्यावा लागतो. खावयाचे दांत वेगळे, दाखवावयाचे दांत वेगळे- हत्तीला देखाव्याचे बाहेर आलेले मोठे सुळे आणि चावण्या- करितां तोंडांत निराळे असलेले असे दोन प्रकारचे दांत अस- तात त्यावरून वर दाखवावयाचें एक आणि मनांत भलतेंच असा- वयाचें अशा रीतीचें ढोंग. म्ह॰ दांत आहेत तर चणे नाहींत. आणि चणे आहेत तर दांत नाहींत. = पूर्ण सुदैव कधींहि लाभत नाहीं, त्यांत कांहीं तरी कमीपणा असतोच. एक गोष्ट अनुकूल आहे, पण तिचा उपयोग होण्यास जी दुसरी गोष्ट आवश्यक असते ती अनुकूल नसते अशा वेळीं योजतात. सामाशब्द- ॰इळा-पु. दांतरा, दांते पाडलेला कोयता. ॰कडी-स्त्री. (राजा.) दांतखिळी. (क्रि॰ बसणें). ॰कस-स्त्री. (तोंडातून निघालेले) शब्द; उद्गार; भाषण; विशेषतः अशुभसूचक शब्द, भाकित इ॰ बत्तिशी पहा. (क्रि॰ बांधणें; लागणें) [दांत + कस] ॰कस(सा)ई-पु. नेहमीं अशुभ भविष्यें सांगणारा व ज्याचीं तसलीं अशुभ भविष्यें खरीं ठरतात असें मानलें जातें असा मनुष्य. [दांत + कसाई = खाटिक] -कसळ-ळी-कसाळ-ळी, किसळ-ळी-स्त्री. १ एक सारखें, नेहमीं दांत खाणें, शिव्याशाप देणें, ताशेरा झाडणें इ॰ युक्त दुर्भाषण. २ अभद्रसूचक, अशुभ भाषण, अमंगल भाषण; बत्तिशी. (क्रि॰ बांधणें). -वि. १ नेहमीं दांत खाणारा; शिव्याशाप देणारा; ताशेरा झाडणारा. २ नेहमीं अनिष्ट, अभद्र, अशुभ भविष्य सांगणारा. बत्तिशी वठविणारा-रें. (व्यक्ति, भाषण). दांतकसा- ळीस येणें-दांत खाऊन असणें, येणें. 'दांत कसाळीस येऊन.. इंग्रज.. आला.' -रा १०.८१. [दात + कसला = आयास, श्रम, छळ] ॰किरकंड्या-स्त्रीअव. (व.) दांत खाणें; शिव्याशाप देणें; दांत किरकीट अर्थ १ पहा. 'दांतकिरकंड्या खाल्ल्या माझ्यावर.' ॰किरकीट-किरकिटी-स्त्री. १ दांत खाणें; शिव्याशाप देणें. (क्रि॰ देणें). २ (ल.) हट्टानें, घुमेपणानें मौन धरून स्वस्थ बसणें. (क्रि॰ देणें). ३ (बायकी भाषा.) आर्जव, विनवण्या, गयावया करून उसनें मागणें; दांतांच्या कण्या करणें (तिन्ही अर्थी अनेकवचनी प्रयोग). [दांत + किरकीट = ध्व. दांत खाण्यानें होणारा शब्द] ॰केणें-न. (एखाद्याचें) नेहमींचें, नित्याच्या जेवणाचें अन्न, भक्ष. [दांत + केणें = धान्य, भाजीपाला इ॰ व्यापारी जिन्नस] ॰कोरणें-दांतांत अडकलेला पदार्थ, अन्नाचे कण इ॰ कोरून काढण्याची चांदी, तांबें इ॰ धातूची अणकुचीदार, लहान व बारीक सळई. ॰खिळी-खीळ-स्त्री. १ सन्निपातामुळें वरचे व खालचे दांत परस्परांत घट्ट बसून तोंड उघडतां न येणें. (क्रि॰ बसणें; मिटणें; लागणें, उघडणें). २ न बोलणें; मौनव्रत. [दांत + खीळ = खिळा] ॰घशीं-क्रिवि. तोंडघशीं. 'या रांडा घरघाल्या सख्या तूं पडशी दांतघशीं ।' -सला १०. [दांत + घसणें] ॰चिना- पु. दांत घट्ट करण्याचें औषध; दंतमंजन; (विरू.) दारशिणा; (व.) दाच्छना पहा. [सं. दंत + शाण] ॰पडका-गा-पड्या-वि. १ ज्यांचे दांत पडले आहेत असा. २ दांत पडल्यामुळें विरूप दिसणारा. [दांत + पडणें] ॰वडा-पु. (गो.) लहान मुलास दांत आल्यानंतर, त्याच्यावरून ओंवाळून मुलांकडून लुटवावयाच्या वाड्यांपैकीं प्रत्येक. ॰वडे काढप-(गो.) मुलास दांत आल्यानंतर लहान लहान वडे त्याच्यावरून ओंवाळून ते मुलांकडून लुटविणें. ॰वण-न. १ एक टोंक चावून शेवटास गोंडेदार केलेली, दांत घांस- ण्याची बाभळ, निंब इ॰ झाडाची लहान काडी. २ दंतमंजन; दांत घासण्यासाठीं केलेली पूड. (व.) दातवन. ३ दांतचिना; दांतांस लावून ते काळे करण्याचें औषध. [सं दंतवर्ण; प्रा दंतवण; गुज. दांतवण] ॰वाकें-न. शेतीच्या कांहीं आउतांचे, अवजारांचे दांते आंत वांकविण्याचें एक हत्यार [दांत + वांकणें]

दाते शब्दकोश

ब्रह्म

न. १ सत्तत्त्व; जगत्कारण; सच्चिदानंदरूप वस्तु. बाह्यसृष्टीच्या बुडाशीं असणारें नित्य द्रव्य. -गीर २२१. २ चार वेद. ३ (समासांत) ब्राह्मण. ४ (ल.) जातिभेद किंवा सोंवळेओवळें मोडल्यानें होणारा घोंटाळा; भ्रष्टाकार. ५ नवल; गूढ; अद्भुत अथवा दुर्ज्ञेय गोष्ट. 'याचेच गाण्यांत तुम्हास काय ब्रह्म वाटलें आहे न कळे.' ६ ब्रह्मदेश. ७ (ल.) विष्णु; कृष्ण. 'ब्रह्मासहि गहिंवरवी महिवरवीरेंद्र पांडुची भार्या ।' -मोउद्योग ७.४४. ८ ईश्वर; पर- मात्मा. [सं. बृह् = वाढणें] (वाप्र) ॰मिळणें-सांपडणें-हातीं लागणें-प्राप्त होणें-क्रि. (ल.) पराकाष्ठेची आश्चर्यकारक, उत्कृष्ट गोष्ट सांपडणें, मिळणें, सामाशब्द- ॰कटाह-पु. जगत्; ब्रह्मांडरूप कढई 'तेथ ब्रह्मकटाह शतकुट । हो पाहत असे ।' -ज्ञा १.१४७. [सं.] ॰कन्या-स्त्री. १ सरस्वती. २ अहिल्या. [सं.] ॰कप(पा)ट- न. १ त्रासदायक, संतापजनक काम; पेंच. २ पिच्छा न सोडणारें दुर्दैव. 'माझे पाठीसीं ब्रह्मकपाट लागलें.' ॰कर्म-न. ब्राह्मणाचीं धार्मिक कर्तव्यें. [सं.] ॰काष्ठ-न. मांदार. 'गंडक्यादि शिळा- मूर्ती । कां कां दारु ब्रह्मकाष्ठव्यक्ती ।' -एभा २७.९९ . ॰गांठ- स्त्री. १ जानव्यास दिलेली गांठ; पवित्र ग्रंथि. २ नेमानेम. ३ (ल.) घोंटाळा. ४ न मोडणारा संबंध. [सं.] ॰गिरि-पु. ज्यापासून गोदावरीचा उगम झाला तो नीलकूट पर्वत. [सं.] ॰गिऱ्हा-ऱ्हो- पु. ब्रह्मराक्षस. 'वेताळ खंडाळ लागल । ब्रह्मगिऱ्हो संचरला ।' -दा ३.२.२८. ॰गोल-ळ-गोल(ळ)क-पु. सृष्टि; जगत्: ब्रह्मांड. [सं.] ॰ग्रह-हो-पु. १ (प्र.) ब्रह्मगिरा-ऱ्हा; ब्रह्मराक्षस. २ (ल.) वर्णसंकर; अत्यंत घोटाळा. [सं.] ॰घातक-की- वि. १ ब्रह्महत्या करणारा. २ (ल.) ब्रह्मद्वेषी. [सं.] ॰घोंटाळा- पु. आचारविचारांची अव्यवस्था; फार गोंधळ. ॰घोष-पु. १ वेदघोष; मोठ्यानें वेद म्हणणें. २ ब्रह्म मताचा (जगदीश्वरवादाचा) घोष. उपदेश. [सं.] ॰घोळ-पु, १ जातिभेद, शुद्धशुद्धता इ॰च्या उपेक्षेनें झालेला घोंटाळा; अव्यवस्था. 'त्या प्रयोजनांत सोंवळ्या- ओंवळ्याचा विचार राहिला नाहीं. सर्व ब्रह्मघोळ झाला.' २ गोंधळ; अव्यवस्था (पुष्कळ माणसें एकदम बोलण्यापासून उत्पन्न झालेली); पराकाष्ठेचा गोंधळ. ॰घ्न-वि. ब्रह्मघातक. [सं.] ॰चर्य- न. १ चार आश्रमांपैकीं पहिला, मुंजीपासून लग्नापर्यंतचा-ब्राह्मणाचा आश्रम २ स्त्रीसंग न करण्याचें व्रत (आजन्म किंवा व्रतांगत्वेंकरून); एकपत्नीव्रत. [सं.] ॰चर्यस्खलन-न. स्त्रीसंगपरित्यागव्रताचा भंग (मुख्यत्वें ब्राह्मणाचा). ॰चारी-पु. १ मुंजीपासून लग्नाच्या कालापर्यंत सांगितलेले नियम पाळणारा ब्राह्मण; मुंज झालेला मुलगा; बटु. २ स्त्रीसंगपरित्यागाचें व्रत आजन्म किंवा कांहीं काल- पर्यंत करणारा ब्राह्मण. 'सोळा सहस्त्र गोपी भोगून ब्रह्मचारी.' ३ (उप.) पूर्ण रतिलंपट; व्यभिचारी असूनहि अव्यभिचाराचा व पावित्र्याचा डौल करणारा. [सं.] ॰चोटली-स्त्री. फारच लहान अशी पेटी, दागिना, ताट, भांडें इ॰. ॰जन-पु. ब्राह्मण. 'तेधवा रचिले ब्रह्मजन । तयां वेद दिधलें शासन ।' -ज्ञा १७.३३९. ॰जीवी पु. वेद शिकवून, आर्त्विज्य इ॰ करून उपजीविका करणारा ब्राह्मण. [सं.] ॰झांट-न. (अश्लील) शष्प या अर्थीं क्वचित् प्रयोग. -क्रिवि. काहीं देखील; थोडेसेंहि. (क्रि॰ देणें; मिळणें; प्राप्त होणें इ॰). ॰टाळी-स्त्री. १ योगाचा एक प्रकार; टाळींत (डोक्याच्या वरच्या भागांत) आत्मा नेणें. २ (ल.) रेंगाळणी; दीर्घसूत्रीपणा. (क्रि॰ देणें; लावणें; मांडणें). ॰तत्त्व-न. आत्म- तत्त्व; तात्त्विक सत्य; पदार्थमात्राच्या सत्तेला आधारभूत असें ब्रह्म. [सं.] ॰ताल-पु. एक ताल. यांत २८ मात्रा व १४ विभाग असतात. ॰तेज-न. १ सामान्य माणसाहून निराळें असें ब्राह्म- णाच्या अंगचें तेज; तेजस्विता. २ ब्राह्मणाच्या अंगचें विद्यादि सामर्थ्य. [सं.] ॰दंड-पु. प्रायश्चित्त, श्राद्ध, तीर्थविधि इ॰ कांच्या अधिकारार्थ ब्राह्मणास द्यावयाचें द्रव्य. [सं.] ॰दंड-डी-पुस्त्री. एक औषधी; काटेचुबक; उंटकटारी; अधःपुष्पी. ही पारदबंध करते. ॰दत्त-वि. ब्रह्मदेवानें दिलेलें. [सं.] ॰दिन-पु. १ ब्रह्मदेवाचा दिवस. २ वर्षप्रतिपदेच्या दिवशीं केलेलें गत व भावी मन्वादिकांचें श्रवण, अवलोकन; वर्षफळवाचन. [सं.] ॰देव-पु. १ ब्रह्मा; त्रिमूर्तीपैकीं रजोगुणात्मक पहिला; सृष्टिकर्ता. २ गांवाच्या सोनार, सुतार, जिनगर इ॰ कांनीं बसविलेला व ब्राह्मण पुजारी असलेला ग्रामदेव; ब्राह्मणदेव. [सं.] ॰देव होणें-क्रि. (ल.) (कर.) विवाहित होणें. ॰द्रोह द्वेष-पु. ब्राह्मणांचा द्वेष. [सं.] ॰द्रोही- द्वेषी-वि. ब्राह्मणांचा द्वेष करणारा. [सं.] ॰नंदन-पुअव. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र (नारद-वसिष्ठादिक). [सं.] ॰नंदिनी-स्त्री. ब्रह्मदेवाची कन्या; सरस्वती; अहल्या. तरी अहल्या ब्रह्मकन्यापूर्ण । गौत- माची निजपत्नी ।' -रावि ७.१२९ [सं.] ॰निर्वाण-न. ब्रह्मांड लय होऊन त्याशीं एकरूप होणें; मोक्ष. [सं.] ॰निष्ठ-वि. ब्रह्म- चिंतनांत निमग्न झालेला. [सं.] ॰पद-पदवी-नस्त्री. ब्रह्मनिष्ठ- तेचा अधिकार; पद; पदवी; अतिशय उच्च पद किंवा स्थान. (क्रि॰ पावणें; मिळणें; प्राप्त होणें). [सं.] ॰पाश-पु. ब्रह्मदेवाचा पाश; एक पुरातन शस्त्र. [सं.] ॰पिशाच-पुरुष-नपु. ब्रह्म- राक्षस. [सं.] ॰पिसा-वि. ब्रह्मराक्षसानें झडपलेला. ॰पिसें-न. ब्रह्मराक्षसानें झडपल्यामुळें उत्पन्न झालेलें वेड. ॰पीडा-स्त्री. (ल.) अतिशय पीडा देणारा, त्रासदायक, द्वाड मनुष्य; अतिशय दुःख किंवा त्रास. ॰पुरी-स्त्री. बहुतेक ब्राह्मणांची वस्ती असलेला गांव; विद्वान् व तपोनिष्ठ ब्राह्मणांनीं वसलेली जागा, गल्ली, पेठ. [सं.] ॰प्रलय-पु. १ ब्रह्म्याच्या प्रत्येक शंभर वर्षांच्या अंतीं होणारा सर्व विश्वाचा विनाश. यांत ब्रह्मा सुद्धां नाश पावतो. २ (ल.) मोठा अनर्थ; संकट. [सं.] ॰प्राप्ति-स्त्री. ब्रह्माची प्राप्ति; ब्रह्मांत जीवा- त्म्याचा लय; जीवास होणारा स्वस्वरूपसाक्षात्काररूप लाभ. [सं.] ॰बंधु-पु. भ्रष्ट व बहिष्कृत ब्राह्मण. [सं.] ॰बळ-न. ब्राह्मणाचें तेज. 'क्षात्रबळाहुनि शक्रा । परम गुरु ब्रह्मबळ पहा नीट ।' -मोअश्व १.९१. ॰बिंदु-पु. (ल.) वेदपठन करतांना उडालेली ब्राह्मणांची थुंकी. [सं.] ॰बीज-न. ब्राह्मणवीर्यापासून उत्पन्न झांलेला कोणीही माणूस. [सं.] ॰भाव-पु. ब्रह्मस्थिति. 'परि अनुभविलिया ब्रह्मभावा । गंवसणी होऊनि ।' -ज्ञा ८.२१०. [सं.] ॰भावना-स्त्री. सर्व चराचर ब्रह्म आहे असा ग्रह; अद्वैत- मताचा स्वीकार. [सं.] ॰भुवन-न. ब्रह्मदेवाचा सत्यलोक. ॰भूत-वि. अद्वैतानुभवसंपन्न 'एवं ब्रह्मभूत ही होऊनी ।' -यथादि ५.१८. ॰यज्ञ-पु. १ बेदाध्ययन. २ ऋषियज्ञ पहा. [सं.] ॰योनि-स्त्री. काशींतील एका खडकांतील लांब व अरुंद असें भोंक. या मधून प्रत्येक यात्रेकरून जावें लागतें. जातांना जर तो मध्येचं अडकला तर तो पापी असें समजतात. तेथेंच रुद्रयोनि नावाचें एक दुसरें भोक आहे. [सं.] ॰रंध्र-न. ज्यांतून मृत्यूनंतर आत्मा निघून जातो असें टाळूवरील गुप्त छिद्र; योगसामर्थ्यानें जेथून प्राण नेतां येतो मस्तकांतील गुप्त छिद्र; दहावें इंद्रिय. 'आक- ळलेनि योगें । मध्यमामध्यमार्गें । अग्निस्थानौनि निगे । ब्रह्मरंध्रा ।' -ज्ञा ८.९४. [सं.] ॰रस-पु. १ दैविक ज्ञानाचा आस्वाद; वेदा- भ्यासानें होणारा आनंद. २ ब्रह्मानंद. [सं.] ॰रात्रि-स्त्री. ब्रह्मदेवाची रात्र. ही देवांच्या सहस्त्र युगांबरोबर असते. [सं.] ॰राक्षस-पु. १ विद्वान् पण अभिमानी ब्राह्मणाचें मरणोत्तर झालेलें पिशाच्च. २ सामान्यतः ब्राह्मणाचें पिशाच्च. [सं.] ॰रेखा-षा-लिखित- लेख-स्त्रीनपु. १ ब्रह्मदेवानें प्रत्येक [प्राण्याच्या कपाळावर लिहिलेलें त्याचें नशीब; दैव; कधींहि न टळणारी गोष्ट. २ (ल.) खातरीचें व निश्चयाचें भाषण, वचन इ॰ 'माझें बोलणें हें ब्रह्मरेषा आहे. कधींहि खोटें होणार नाहीं.' [सं.] ॰र्षि-पु. १ ब्राह्मण जातीचा ऋषि पुरातनकालीं हा शब्द त्यांच्या विख्यात पावित्र्यामुळें ब्राह्मणांस लावीत असत. २ ब्राह्मण असून ऋषि; ब्राह्मणांतील सत्पुरुष. [सं.] ॰लोक-पु. ब्रह्म्याचा लोक; सत्यलोक. [सं.] ॰वर्च्चस-वर्चस्व- न. १ वेदांच्या अभ्यासापासून व व्रतपालनापासून उत्पन्न होणारा पवित्रपणा; तेज. 'ब्रह्मचर्यव्रत धरणें । ब्रह्मवर्चस्व चढे तेणें ।' -एभा १७.३३४. २ ब्राह्मणाची श्रेष्ठता, वैलक्ष्यण्य. [सं.] ॰विद्- वि. ब्रह्मज्ञानी; ब्रह्मवेत्ता (पुरुष). ॰विद्या-स्त्री. आत्मज्ञान. [सं.] ॰वीणा-पु. १ विशिष्ट प्रकारची वीणा; नारदाची महती वीणा. २ मस्तक. [सं.] ॰वृत्ति-स्त्री. १ ब्रह्माकार वृत्ति. २ ब्राह्मणाची उपजीविका. [सं.] ॰वृंद-पु. १ ब्राह्मणांची सभा, समुदाय. २ (ल.) धर्मशीलतेनें, विद्वत्तेनें श्रेष्ठ असलेला ब्राह्मण. [सं.] ॰वेत्ता- वित्-वि. ब्रह्मज्ञानी. [सं.] ॰शाप-पु. ब्राह्मणाचा शाप. [सं.] ॰शाला-ळा-स्त्री. वेदशाळा. 'केली जैसी वदनीं । ब्रह्मशाळा ।' -ज्ञा १७.२२२. [सं.] ॰संतर्पण-न. ब्राह्मणभोजन. ॰सदन- न. ब्रह्मलोक. ॰संपदा-स्त्री. दैवी संपत्ति. ॰सभा-स्त्री. ब्रह्मदेवाची सभा. [सं.] ॰संबंध-समंध-द-पु. ब्रह्मराक्षस. ॰संविति- स्त्री. ब्रह्मज्ञान. [सं.] ॰साम्राज्य-न. विस्तृत, बलाढ्य अधि- राज्य, अंमल; साम्राटाची सत्ता. ॰सायुज्य-न. ब्रह्माशीं एकरू- पता. [सं.] ॰साक्षात्कार-पु. ब्रह्माची प्राप्ति; ब्रह्मदर्शन; निर्गुण साक्षात्कार. [सं.] ॰सुख-न. ब्रह्माचें सुख; ब्रह्मरस. [सं.] ॰सुत-पु. नारदऋषि. ॰सूत्र-न. १ ब्रह्मदेवानें नेमलेली व्यवस्था, मार्ग; ईश्वरी नेमानेम. २ जानवें; यज्ञोपवीत. 'ब्रह्मसूत्रेवीण ब्राह्मण । संन्यासी नव्हे दंडेवीण ।' -भारा, बाल १०.६२. ३ लग्नाबद्दलचा ईश्वरी नेमानेम; ब्रह्म्यानें ठेवलेलें दैव. 'ब्रह्मसूत्र असेल तर त्या मुलीशीं ह्याचें लग्न होईल.' ४ (लग्न ठरवितांना) नवरानवरीची उंची मोजण्याचें सूत्र; प्रमाणसूत्र. ५ व्यासकृत वेदान्तसूत्रें. 'तो न पढो कां ब्रह्मसूत्र ।' -ज्ञा १७.८५. [सं.] ॰सूत्राची गांठ- स्त्री. दैवानें बांधलेली गांठ; लग्नाविषयीं ब्रह्म्यानें ठरविलेला पूर्व- संकेत. ॰सृष्टि-स्त्री. ब्रह्मदेवानें निर्मिलेलें जगत्, याच्या उलट विश्वमित्र सृष्टि. [सं.] ॰स्थान-न. १ ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीची जागा. २ बेंबी. ३ सहस्त्रदळकमळ; ब्रह्मरंध्रचक्र. 'तया अनाह- ताचेनि मेघें । मग आकाश दुमदुमों लागे । तंव ब्रह्मस्थानींचें बेगें । फिटले सहजे ।' -ज्ञा ६.२७९. [सं.] ॰स्व-न. १ ब्राह्मणाची मालमत्ता. २ ब्राह्मणाचें घेतलेलें कर्ज. ३ (सामा.) कर्ज. 'त्याचे काल- क्षेप चालत नाहीं, कमी जाहल्यामुळें ब्रह्मस्वही वहुत जाहले.' -समारो १.३३. [सं.] ॰हृदय-न. एक नक्षत्रपुंज. [सं.] ॰हत्या-स्त्री. १ ब्राह्मणाचा वध; व त्यामुळें लागलेलें पातक. २ (ल. एकसारखें पाठीस लागलेलें दुर्दैव. [सं.] म्ह॰ हैक-फट् म्हणतां ब्रह्महत्या = क्षुल्लक कारणानें, प्रसंगानें मोठाले अनर्थ उद्भ- वणें. ॰हत्यारा-वि. ज्यानें ब्राह्मण मारला आहे तो. [सं.] ॰ज्ञान-न. १ जगाचें कारण व आधार असलेल्या ब्रह्माचें ज्ञान. २ दैविक, अध्यात्मिक, विशुद्ध ज्ञान. ३ (ल.) फुकट शहाणपणाच्या गोष्टी. [सं.] म्ह॰ लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण. ब्रम्हज्ञानी-ज्ञ-वि. १ ब्रह्म जाणणारा. २ लोकांस ब्रह्मज्ञान सांगणारा. [सं.] ब्रह्माकार-पु. जग आणि सर्व वस्तू ब्रह्मरूप आहेत असें मानणें. 'ब्रह्माकार-बुद्धि -द्दष्टि-मन-वृत्ति.' [सं.] ब्रह्माची गांठ-स्त्री. लग्नाविषयीं ब्रह्मदेवानें ठरविलेली योजना, नेमानेम. ब्रह्मांड-न. १ जग; चवदा लोक; विश्व. चतुर्दशभुवनें व सत्यलोक पहा. २ डोक्यावरील टाळू; ब्रह्मरंध्र. 'ब्रह्मांडीं बैसली गोळी ।' ऐपो ८६. ३ -वि. प्रचंड; विस्तृत; अमर्याद. (समासांत) ब्रह्मांड-नदी-पर्वत-पाषाण-वृक्ष-साप-हत्ती-काम-कारखाना- कारभार-पसारा-कर्ज-खर्च-संसार. [सं.] ब्रह्मांडांत न माणें- मावणें-क्रि. अतिशय असंख्य, मोठा, अफाट इ॰ असणें. ब्रह्मांडकटाह-पु. विश्व; ब्रह्मांड अंडकटाह पहा. [सं.] ब्रह्मांड गोलक-गोल-पु विश्व, ब्रह्मगोल. [सं.] ब्रह्मांड मंडप-पु. ब्रह्मांडाचा मंडल, गोल; विश्व, ब्रह्मांडमंडपा माझारीं । जिची प्रतिमा नाहीं दुसरी ।' ब्रह्मांडज्ञान-न. जगानें ज्ञान (मुख्यत्वें मानवी शरीराच्या अभ्यासापासून व ज्ञानापासून मिळालेलें); पिंडज्ञान. [सं.] ब्रह्मानंद-पु. १ ब्रह्माचें सुख. २ ब्रह्माच्या ठिकाणीं लय झाला असतां होणारा आनंद. ३ (ल.) अत्यानंद, परमानंद. 'त्याचे ग्रंथ पाहतां विशेष । ब्रह्मानंद उचंबळे ।' [सं.] ब्रह्मानंदी टाळी लागणें-क्रि. सच्चिदानंदरूपांत तल्लीन होणें. ब्रह्मासन- न. १ ब्रह्मचिंतन करण्यास योग्य असें शरीराचें आसन, ठेवणें, बसण्याची पद्धति. २ अष्टाधिकारांपैकीं एक; वर्तकीपणाचा हक्क. [सं.] ब्रह्मास्त्र-न. १ ब्रह्मदेवाचें शस्त्र; त्याच्या मंत्रानें अभि- मंत्रित केलेली काडी, बाण अथवा कोणातीहि वस्तु. 'नरकें ब्रह्मास्त्र सोडिलें जाण । तेंही गिळिलें अवलीळा ।' २ ब्राह्मणाचा शाप. [सं.] ब्रह्माहमस्मिबोध-पु. मी ब्रह्म आहें असा बोध. 'जें ब्रह्माहमस्मिबोधें सणाणें ।' -ज्ञा १५.२५९. [सं.] ब्रह्माक्षर- न. त्रयमूर्ति ईश्वराचें पवित्र आणि गूढ नांव. ओम् पहा. [सं.] ब्रह्मिष्ट-वि. ब्रह्मचिंतनांत निमग्न झालेला. [सं.] ब्रह्मीभूत-वि. स्वतःब्रह्म झालेला; ब्रह्माशीं एकरूप झालेला, मृत संन्यासी. [सं.] ब्रह्मोपदेश-पु. ब्रह्माचा निर्गुण ध्यानात्मक पूजेचा उपदेश. [सं.]

दाते शब्दकोश