मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

क्षेपक

न. मध्येंच घातलेला; घुसडलेला (श्लोक. मजकूर वगैरे). [सं. क्षिप्]

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

क्षेप

पु. १ टाकणें; फेकणें; खर्च करणें; घालविणें. 'काल- धन-आयुष्य-वृत्ति-कर्म-धैर्य-क्षेप.' २ दूर पाठविणें. ३ खगोल अक्षांश. ४ क्षेपक; ग्रहादिकांचें सिद्ध झालेलें गणित स्पष्ट व्हावें इत्याद्यर्थ त्यांत मिळवावा किंवा उणा करावा म्हणून सांगितलेला अंकराशि. ५ कोणेक ग्रंथकाराचे ग्रंथांत इतरानें घातलेले श्लोक, वाक्य इ॰; प्रक्षिप्त मजकूर; क्षेपक. ६ एकच प्रसग, वेळ, एकच गोष्ट, प्रसंग, क्रिया इ॰. याला लागलेला सबंध काळ; अवकाश. 'देतां क्षेप, घेतां क्षेपें, जेवता क्षेपीं.' खेप पहा ७ विलंब. ८ अनादर [सं.] ॰निक्षेप- क्रिवि न चुकती; खात्रीनें; निश्चयानें टाकाटाक; खास 'तों भाऊसाहेब क्षेपनिक्षेप आले' -भाव ८८. 'त्यास क्षेपनिक्षेप आज्ञा करून इकडे रवाना करावें.' -पेद १.५५. ॰पात-पु. (ज्यो) दोन ग्रहांच्या कक्षा ज्या एका बिंदूंतून एकमेकांस छेदून जातात तो पात; ग्रहकक्षेचा आरोह छेदन बिंदु. ॰वृत्त- न. ग्रहाची कक्षाच विमंडल. ॰सूत्र-न. खगोल रेखांशवृत्त. क्षेपक-पु क्षेप अर्थ ४,५ पहा. -वि. टाकणारा; क्षेपणकर्ता. [सं.] क्षेपण-न क्षेप अर्थ १,२ पहा. क्षेपणी-स्त्री. (काव्य) वल्हें; क्षपणी. क्षेपणें; उक्रि. १ टाकणें; फेकणें. २ दूर पाठविणें. क्षेप्ता-वि. १ क्षेपक; फेंकणारा; टाकणारा. २ पाठविणारा.

दाते शब्दकोश

क्षेप kṣēpa m S Throwing, flinging, casting. Ex. of comp. कालक्षेप, धनक्षेप, आयुष्यक्षेप, वृत्तिक्षेप, कर्मक्षेप, धैर्यक्षेप, अवसानक्षेप, हितोपदेशक्षेप. 2 Sending away. 3 Celestial latitude. 4 also क्षेपक m The number which is to be added to or subtracted from a calculation (as of the heavenly bodies) in order to adapt it closely and accurately. 5 क्षेपक is further A stanza, sentence &c. inserted into the writings of one man by another. This may be, but is not necessarily, an interpolation or passage surreptitiously foisted in. 6 A single time or occasion; an instance of occurrence: also a single operation or action, or the whole period occupied by it; as देताक्षेपें, घेताक्षेपें, पाहताक्षेपीं, जेवताक्षेपीं. See the examples under the third sense of खेप; noting that, whilst खेप enjoys all freedom, क्षेप appears especially in the oblique cases.

मोल्सवर्थ शब्दकोश

चालन      

न.       ग्रहादिकांच्या अस्तोदयाचे अंतर जाणून कल्पितात ते क्षेपक; अशा प्रकारे मिळवून, वजा करून काढलेले अंतर. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चालन

न. १ (छपराचीं कौलें, पुस्तकाचीं पानें, गंजिफा, विड्याचीं पानें इ॰) चालविणें; उलथींपालथीं करणें; (ग्रहासंबंधीं वर्तविलेलें गणित, शास्त्रीय मूलतत्वें) पुनः करून पाहणें अगर उलटून पाहणें; नीट व्यवस्थेशिर लावण्याकरतां, बसवण्याकरतां, तपासण्याकरतां, छानण्याकरतां फिरविणें अगर उलटणें. २ ग्रहा- दिकांच्या स्तोदयाचें अंतर जाणून क्षेपक कल्पितात तें; अशा प्रकारें मिळवून, वजा करून काढलेले अंतर, फेरबदल. ३ चाल- वणें; सरकणें; गति. [स. चल्-चालना]

दाते शब्दकोश