मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

खातरी; खात्री

(स्त्री.) दिलासा; समाधान; दृढमत; विश्वास; प्रत्यय. “हर-एकाची खातरी करून रुख्सत केले” (दिमरा २।१७६).

फारसी-मराठी शब्दकोश

खातरी

खातरी f Regard; confidence; guarantee. खातरी करणें Satisfy regarding. खातरी पढणें Please, suit.

वझे शब्दकोश

स्त्री. १ खातर. अर्थ २ फ. २ जामीनकी; हमी; खातरदारी; खातरीपत्र. (जामिन देणार्‍या मनुष्यास अथवा वस्तूस लावतात). 'तुम्ही कोणाची खातरी द्या रुपये घेऊन जा.' खात- रीचा-वि. पसंत पडलेला; मनाला आवडलेला. ॰दार-वि. जामीन हा खातरी देतो, विश्वासूपणाबद्दल शिफारस करतो पण कोणत्याहि प्रकारची जबाबदारी घेत नाहीं.॰पत्र न. हमीपत्र; शिफारसपत्र; प्रशंसापत्र; सर्टिफिकीट. ॰लायक वि. विश्वसनीय.

दाते शब्दकोश

खातरी khātarī f ( H) See खातर in the two first senses. 2 Assurance, guarantee, testimony of credit. Ex. तुम्ही कोण्हाची खा0 द्या रुपये घेऊन जा. Applied whether to the person or to the thing affording the security.

मोल्सवर्थ शब्दकोश

खात्री      

स्त्री.       १. निश्चितता; खूणगाठ विश्वास. २. जामीनकी; हमी; खातरदारी; खात्रीपत्र. (जामीन देणाऱ्या मनुष्याला अथवा वस्तूला लावतात.) [फा. खातीर] (वा.) खात्री घालणे - जामीनदार म्हणून सही करणे : ‘याच्याखाली सही करा. खात्री घाला.’ - चाक १२०. खात्रीत नसणे - खिजगणतीत नसणे; किंमत न देणे : ‘तुला मी खात्रीतच नाहीं.’- कर्मयोग २८३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खात्री

खातरी पहा.

दाते शब्दकोश

खात्री वाटणे

असे प्रत्ययाला येईल-दिसून पडेल, पाहण्यात येतात, सत्यता पडूं लागेल, आतां ही शिक्कामोर्तब झालेली गोष्ट आहे, मोती खोटें आहे; मला विचार ! याबद्दल दुमत होणे शक्य नाहीं, बालंबाल खात्री, मनाशी खूणगांठ बांधून ठेव, ही वार्ता मेंदूच्या कप्प्यांत नीट घडी करून बसविली, चक्षुर्वे सत्यं, हातच्या कांकणाला आरसा कशाला ? या गोष्टी मनोमन सर्वांना ठाऊक आहेत, त्यांनी पुरतें ओखळले असेल, मनाची पक्की धारणा झाली.

शब्दकौमुदी

खातरी      

जामीनकी; हमी; खातरदारी; खातरीपत्र. खातरीचा      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जाहीर

[अ. झाहिर्] व्यक्त; प्रसिद्ध;सर्वश्रुत; माहीत. “ते खबर जाहिरा हाऊनु” (राजवाडे १५।२७४). “हे सबर च्यारो पादशाहासी जाहीर जाहाले” (इम १३). (दिमरा १।२०९). “जाहीरदारी खातरी करून” बाह्यतः दिलासा करून(दिमरा २।१७७).

फारसी-मराठी शब्दकोश

परत

स्त्री. १ फेड; उलट, परत करणें; दिलेला मोबदला; प्रतिक्रिया, कर्म. २ खजीन्यांतून परत पाठविलेलें खोटें नाणें. ३ माघारी वळणें; फिरणें; परतणें. ४ पुन्हां काळजी घेणें; लक्ष देणें. (क्रि॰ करणें). ५ शुश्रूशा; समाचार. 'तो आजारी पडला तेव्हां कोणी त्याची परतहि केली नाहीं.' ६ समासांत आवृत्ति किंवा फेड या अर्थानें योजतात. जसें:-परत-जेवण-चौकशी-खतावणी- पाहणी इ॰. -क्रिवि. पुन्हां; माघारी; मागें; उलट, फिरून. (देणें; करणें = माघारी देणें). [सं. प्रति] ॰जाणें, येणें-माघारी जाणें, येणें. ॰घेणें-सासरहून मुलगी विधवा होऊन माहेरी येणें. सामा- शब्द- ॰अर्जी-स्त्री. पुन्हां केलेला अर्ज. ॰अहेर-पु. अहेर करणाऱ्यांना फेड म्हणून आपला दुसरा अहेर करणें. ॰कळवी- स्त्री. सरकारी खजिन्यांतून प्रांतीं पाठविलेली रक्कम, पैसा (बदलून पाठविण्यासाठीं). ॰कूळ-न. साटेलोटें; परतवेल; ज्या घरीं आपले घरची मुलगी दिली ती जिवंत असतां त्या घरची मुलगी आपले घरीं करण्याचा प्रकार. ॰गोष्ट-स्त्री. उद्धटपणाचें, उलट उत्तर. ॰सांगणें-उलट सुलट शब्द बोलणें; तोंडासतोंड देणें. ॰जमा-स्त्री. कर्जाऊ रक्कम परत आली असतां ती जमेच्या बाजूस लिहिणें, मांडणें. ॰जबाब-जाब-पु. प्रत्युत्तर. (क्रि॰ देणें; करणें). ॰जामीन-जामिनकी-स्त्री. आपण ज्यास जामीन राहिलों त्याजकडून जामीन घेण्याचा प्रकार. ॰जिम्मा-पु. जिम्म्याला मोठा जिम्मा पाहणें. ॰जिम्मेदार-पु. परत जामीन पहा. ॰जिम्मेदारी-पु. परत जिम्मेदाराचें काम. ॰ताप-पु. पुन्हां आलेला ताप; उलटलेला ताप. ॰निशा-स्त्री. ज्याच्यासाठीं स्वतः जबाबदारी पतकरावयाची त्याच्याबद्दलची अधिक खातरी करून घेणें. ॰पंचाईत-स्त्री. पंचाईतीनें केलेली फेर चौकशी. ॰फैसला-पु. (कायदा) फिरून तपासणी करून दिलेला निकाल. ॰बहुडा-पु. बहुडा पहा. ॰भाडें-न. माघारी येण्याचें, आण- ण्याचें भाडें. ॰मांडव-पु. लग्नांतील मांडव परतणें. 'परत मांडव परतला ।' -दावि ४१. ॰मुकद्दमा-पु. (कायदा) पुन्हां चव- कशीकरतां घेतलेला दावा, खटला. ॰वाघ-पु. (ना.) मनुष्याचा वाघांत रूपांतर झालेला वाघ (एक अडाणी लोकसमजूत). ॰वेल- स्त्री. परतकूळ पहा. ॰वेळ-स्त्री. तिसरा प्रहर; दुपार परतल्यावरची वेळ. ॰व्याज-न. कर्जाची फेड करतांना आलेल्या जास्त रकमे- वरील सावकारानें कुळाला परत केलेलें व्याज. ॰हामी-पु. परत जामीन-जामीनकी पहा. ॰हुंडी-स्त्री. नाकारलेली हुंडी. परतून-क्रिवि. १ परत फिरून; माघारी वळून. २ पुन्हां; फिरून (गोष्ट इ॰ सांगणें). परतून-पडणें-(कर.) क्रि. विरुद्ध होणें; उलटून पडणें.

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

समज

पु. १ बोध; ज्ञान; आकलन; उमज; अवगमन. (क्रि॰ घेणें; धरणें). २ ग्रहणशक्ति; आकलनशक्ति. ३ जाणीव; खातरी; समाधान; बरोबर आकलन; परिज्ञान. ४ ताकीद; माहीती. ५ शहाणपणा; हुशारी; अक्कल; बुद्धि. 'वरहि वरा- यास पाहिजे समज ।' -मोउद्योग १.४१. ६ (ल.) धाक; दपटशा; मारठोक. [सं. सम् + मज्ज्; हिं. समझ] ॰उमज-पु. पूर्ण जाणीव; पूर्ण ज्ञान; वास्तविक बोध. समजणें-सक्रि. १ जाणणें; बोध, आकलन होणें. २ माहीत होणें; ठाऊक होणें; उघड होणें; स्पष्ट दिसणें. ३ अक्रि. पटणें; खात्री होणें; समा- धान होणें; शंकानिरसन होणें. ४ सारख्या सारख्या दिस- णार्‍या गोष्टीमधील सारखेपणा व फरक कोणता हें नक्की आणि पक्केपणानें सांगतां येणें. ॰समजूं लागणें-सज्ञान होणें; कळूं लागणें; कळण्यासारख्या वयांत येणें. समजदार-वि. १ सुज्ञ; विचारी; शाहणा; हुशार. २ चलाख; चांगली ग्रहण- शक्ति असलेला. समजपत्र-न. वाद न करतां समजूत झाल्याचें वादी-प्रतिवादी यांचें संमतिपत्र. समजवाली-वि. समजूत- दार; शाहाणी. 'तूं समजवाली सार्‍यांनीं जुट बांधावी ।' -राला ७३. समजविणें-उक्रि. स्पष्ट करून सांगणें; समजाविणें पहा. ॰समंजस-वि. १ समजूतदार; सुजाण; विवेकी; शाहणा; जाणता. २ बुद्धिवान; हुशार; तीव्र बुद्धीचा. ३ सद्गुणी; सज्जन; भला. ४ योग्य; लायख; बरोबर; शोभेसा समजस-वि. समंजसचा अपभ्रंश प्रथमार्थी. समजावण-णी- स्त्रीन. १ समजूत; स्पष्ट करून सांगणें. २ मन वळविणें; समाधान करणें; समजूत पाडणें; खात्री करणें. (क्रि॰ करणें; होणें). 'कर- उनि स्तन्यपान । स्वबाळांचें समजावण ।' -रास १.५७७. सम- जावशी, समजाविशी, समजावीस, समजी-स्त्री. योग्य प्रकारें समजूत पाडणें; वळणावर, ताळ्यावर आणणें; मनवळवणी; समाधान, खात्री करणें; शंका निरसन करणें; एखाद्यासंबंधीं मन ताळ्यावर आणणें. (क्रि॰ करणें; पाडणें; काढणें). 'समजाविशीस अर्धें मारवाड काबीज केलें होतें तें दरोबस्त त्यांजकडे दिलें.' -भाब १८. 'पडेल समजाविशी तशी करोत कां लाजशी ।' -केका १५.'बसल्या रुसून समजाविसी करिसी बरी.' -होल ५८. 'ह्यासाठीं माझी समजी व्हावी.' -बाळ २.६८. 'पदर पसरून उभी समजील.।' -प्रला १००. समजा- विणें-उक्रि. १ समजूत घालणें; स्पष्ट करणें; फोड करून सांगणें; पटविणें. २ खातरी, समाधान करणें; मन वळविणें, ताळ्यावर आणणें. समजीक, समजीस-समंजस पहा. समजीपत्र- समजपत्र पहा. समजूत-स्त्री. १ ग्राहक शक्ति; बुद्धि; आकलन- शक्ति. २ पूर्णज्ञान; जाणीव; बोध; आकलन. 'लोकांत समजूत व उपयुक्त ज्ञान यांचा बराच प्रसार झाला.' -नि ८. ३ खातरी; समाधान; मनवळवणी. समजाविशी पहा. ४ हुकूम; ताकीद; आज्ञा. 'सरकारचे सल्ल्यानें काम करण्यास त्यांस समजूत दिली.' -टिले १.१.१६०. ॰पाडणें-तडजोड, एकमत, संधि करणें; समाधान करणें; खातरी करणें, पटविणें. ॰दार-वि. समज- दार; समंजस पहा. ॰पत्र-न. १ आपसांत तडजोड झाल्याबद्दल संमतिपत्र, करारनामा, यादी. २ फिर्याद काढून घेण्याबद्दल पत्र, कागद, खत.समजून उमजून-क्रिवि. जाणून बुजून; मुद्दाम; बुद्धया; हेतुपुरस्पर; बुद्धिपुरःसर. समजोती- स्त्री. समजूत. 'मायबापाला करून समजोती ।' -दावि ३५०.

दाते शब्दकोश

प्रतीत

स्त्री. अनुभव; खात्री; प्रतीति पहा. -मनको. -वि. अनुभवलेलें; दिसून आलेलें; अनुभवानें किंवा पाहणी करून खरें ठरलेलें; प्रत्ययास आलेलें; सिद्ध केलेलें; ज्ञात. [सं.] प्रती(ची)- ति-स्त्री. १ अनुभव; खात्री; प्रत्यय; शोध; अंतरास, मनास पटलेला दाखला; प्रत्यय; अनुभवानें अवलोकनानें झालेली, खात्री; एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्याच्या स्वभावाबद्दल कोणीं केलेलें विधान खरें आहे असें आढळून येणें. 'कामभोगांती विरक्ती । ऐसें मूर्ख गा विवेक बोलती । ते अधःपातीं घालती । हे मज प्रतीति स्वयें झाली ।' -एभा २६.१६६. २ प्रत्यक्ष जाणीव, ज्ञान; छाप; अवलोकन. 'भेर्यादि शब्दाचे ठायीं वर्णाची प्रतीति होत नाहीं.' ३ चमत्कार; अद्भुत कर्म; साक्षात्कार. ४ प्रसिद्धि; ख्याति. 'ऐसी यया वेदांतीं । निरूपणभाषाप्रतीती ।' -ज्ञा १५.९०. [सं.] प्रतीतीस येणें-१ अनुभवास येणें; अवलोकनांत येणें. २ खात्री पूर्वक निश्चित होणें; तंतोतंत जुळून खात्री होणें.

दाते शब्दकोश

निशा

स्त्री. १ खातरी; विश्वास; आश्वासन; मनाचें समा- धान. (क्रि॰ करणें; होणें; पुरवणें). 'या गोष्टीविषयीं मला संदेह होता परंतु आज माझी निशा झाली.' २ पतीची खात्री; हमी; खात्री; जामिनकी. (क्रि॰ देणें; घेणें; पटविणें; पुरविणें). 'मी पांचशे रुपयांची निशा सावकारी देतों.' 'वसूल घेतला असेल तो वाजवी वजा करुन बाकी एवजाची निशा नबाबाकडून घेणें.' -समारो १३. ३ धालेपणा; मनशामोड; परिपूर्ति; अत्यंत, भरपूर तृप्ति; पुरेपुरे होणें. [फा. निसआ-नसिआ] ॰पाती-स्त्री. १ खात्री; विश्वास. निशा अर्थ १ पहा. (क्रि॰ करणें; पुरविणें). २ जामीनकी; हमी. (क्रि॰ देणें).

दाते शब्दकोश

(सं) स्त्री० रात्र. २ खात्री, हमी. ३ कैफ.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

हमी

स्त्री. जामिनकी (तिर्‍हाईंत माणसानें भरण्याची); जिम्मा; खात्री. (क्रि॰ देणें; भरणें; घेणें; पटणें; पटविणें). [अर. हामी] ॰टमी-स्त्री. (सामा.) हमी; खात्री (क्रि॰ करणें; देणें; भरणें). ॰तारण-न. हमीटमी. (क्रि॰ देणें; घेणें; पटविणें). ॰दार-वि. जामीन राहणारा. 'ती जवळून आपण ऐवजाचा हमीदार घेतला.' -ऐटि १.२२. ॰दारी-स्त्री. हमी दाराचें काम, पेशा. ॰पत्र-न. जामीनखत; खात्री पटविण्या- साठीं लिहून दिलेला कागद.

दाते शब्दकोश

खातर

स्त्री. १ गुमान, पर्वा; विचार; चिंता (सामान्यतः निषेधार्थी). 'पैका गेल्याची त्यास खातर नाहीं.' २ खात्री; विश्वास; भरंवसा; निशा. 'हा मनुष्य विश्वासु असी आमची खातर आहे.' ३ पसंती; मर्जी; मन. 'आमचे खातरेस वाटेल तें करूं.' ४ विचार. 'स्वामीची खातर जरूर जाणून...' -रा १.१३२. ५ आस्था. 'त्यांतही श्रीमंताचे सरकारांत या संस्थानची यास खातर अधिक.' -रा ७.३७. ६ सत्कार; मान ७ आश्वासन. ८ (ल.) (ना.) मनस्वी त्रास; खोडमोड. 'सायकलीवरून हिंडलों पण माझी चांगलीच खातर झाली.' -शअ. करितां; साठीं. माझ्याखातर' 'त्या खातरहि तें मला कर्तव्यच आहे.' -तोबं २२. [अर. खातिर्] (वाप्र.) ॰करणें-खात्री करणें; पटविणें; आश्वासन देणें. ॰पटणें-आवडणें, पसंत पडणें. खातरेस येणें-पसंत पडणें. सामाशब्द- ॰खा, खातीरखा-वि. १ स्नेहाचा, चांगलें इच्छिणारा; हितेच्छु (केवळ पत्रव्यवहारांत). २ यशस्वी. 'कित्येक उम्द उम्दे मनसुबे खातीरख्वाह् होतील.' -रा १.५३. ३ समा- धान. 'बहुत खातरखा केली.' -रा १०.२६५. -क्रिवि. १ इच्छेप्रमाणें. 'इंग्रेज पल्टणें पुण्यासमीप आली त्यांचें पारिपत्य खातरखा न जालें' -दिमरा १.४०. २ यथास्थित. 'बंदोबस्त ही खातरखा आमचे स्वामी करितील.' -रा १.१३२. ॰जमा-स्त्री. १ खात्री; विश्वास; निशा; संशय, आशंका, संदेहनिवृत्ति. (क्रि॰ करणें). 'एवंच दादासाहेब खातरजमेशीं जात नाहींत.' -भाब ८४.२ हिंमत. ' एक वेळ लढाई खातरजमेची द्यावी.' ख ११. ६०८४.३ गुमान; हिशेब; पर्वा.-वि. स्वस्थ. 'तुम्ही खातर- जमा असणें.' -रा १५.२१ [फा. खातिरजम्अ]॰जामीन- दार-पु. खातरीदार पहा. ॰तसल्ली स्त्री. समाधान. 'सर्वांची खातरतसल्ली होऊन जमाव जालाच असेल.' -दिमरा १.३१. [अर. तसल्ली = समाधान] ॰दारी स्त्री. १ खात्री; हमी (माणूस, चिन्ह यांची).२ विश्वास, निशा. [फा. खातिरदारी] ॰दास्त- स्त्री. खातरजमा, इच्छा. 'त्याची खातरदास्त पुरेल तेथें जावें.' -खा ९.४९६५. ॰नशीन -वि. श्रुत. -खरे ७.३५६६. [फा. खातिर्नशीन] ॰निशा -स्त्री. मनाचें समाधान; संदेहनिवृत्ति. 'अशी माझी खातर निशा झाली.' -बाळ २.१६. [फा. खाति- र्निशान]

दाते शब्दकोश

खातर      

स्त्री.       १. गुमान; पर्वा; विचार; चिंता (सामान्यतः निषेधार्थी.) २. खात्री; विश्वास; भरवसा. ३. पसंती; मर्जी; मन. ४. (ल.) मनस्वी त्रास; खोडमोड (ना.) [फा. खातिर] (वा.) खातर करणे - खात्री करणे; पटविणे; आश्वासन देणे. खातर पटणे, खातरेस येणे - आवडणे, पसंत पडणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खूणगाठ      

स्त्री.       १. (एखाद्या गोष्टीची) आठवण ठेवण्यासाठी वस्त्राला किंवा त्याच्या पदराला मारलेली गाठ. २. (ल.) खात्री. (वा.) खूणगाठ बांधून ठेवणे, खूणगाठ मारून ठेवणे - खात्री बाळगणे; पक्के समजणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निधडा      

पु.       १. मनाची खात्री; निश्चय; भरवसा; निःसंदिग्धता : ‘त्यानें जिवाचा निधडा करून शिपायगिरी म्हणावी तैशी केली.’ – भाब ११७. २. निश्चितपणा; खात्री; ठामपणा; अगदी नक्की असणे. ३. सक्त नकार; नाकबुली. (क्रि. सांगणे, देणे.).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निधडा

पू. १ मनाची खातरी; निश्चय; भरंवसा; निःसंदे- हता. 'त्यानें जीवाचा निधडा करून शिपायगिरी म्हणावी तैशी केली.' -भाब ११७. २ निश्चितपणा; खात्री; ठामपणा; अगदीं नक्की असणें. ३ सक्त नकार; नाकबुली. (क्रि॰ सांगणें; देणें). निधड्या छातीचा-वि. न डगमगणारा; धाडसी; मोठा पराक्रमी.

दाते शब्दकोश

निर्धार

पु. १ निश्चय; खातरी; विश्वास. 'कृपाळु म्हणोनी बोलती पुराणें । निर्धार वचनें यांचीं मज ।' -तुगा ११२४. २ संकल्प; ठाम उद्देश; निश्चय. 'आक्षेप परिहारीं निर्धारू । करितां परशास्त्र विचारू ।' -ऋ २३. ३ निकाल; निर्णय; निश्चय (एखाद्या गोष्टीचा, विषयाचा); निःसंदेहपणा. ४ नियम; नेम. ५ आधार; आश्रय. 'सकळ सिद्धीचा निर्धार । ते हे कवी ।' -दा १.७.१८. [सं.] निर्धारण-न. १ निश्चय करणें; ठरविणें; खातरी करून घेणें. २ संदेहाभाव. निर्धारणीय-वि. निश्चय कर- ण्यास, ठरविण्यास योग्य; निश्चित करण्यासारखी. निर्धारणें- उक्रि. (काव्य) १ निश्चय, निश्चित करणें; ठरविणें. 'देखा काव्य- नाटका । जें निर्धारितां सकौतुका ।' -ज्ञा १.७. २ निःसंदिग्धपणें जाणणें. 'मग आपसयाचि उमजला । दिशा निर्धारूं लागला ।' निर्धारित-वि. निश्चित, कायम केलेलें; ठरविलेलें; खात्रीलायक. निर्धार्य-वि. निश्चय करण्यास योग्य; ठरविण्याजोगें.

दाते शब्दकोश

निशा      

स्त्री.       १. खात्री; विश्वास; आश्वासन; मनाचे समाधान. (क्रि. करणे, होणे, पुरवणे). २. पतीची खात्री; हमी; जामीनकी. (क्रि. देणे, घेणे, पटवणे, पुरवणे) : ‘… बाकी एवजाची निशा नबाबाकडून घेणें. - ’

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ओळख      

स्त्री.       १.परिचय; ज्ञान; माहिती (वस्तू, मनुष्य याविषयी) : ‘ओळखी जालेंया बुधीं का हसीं.’- शिव ७८. २. आठवण; स्मरण; याद; अभिज्ञान. ३. खूण (वस्तू अथवा पदार्थ ओळखण्यासाठी केलेली); ओळखीचे साधन. ४. जामीन (कर्जदारासाठी घेतलेला). [सं. अवलक्ष, उपलक्ष] (वा.) ओळख पटविणे, ओळख देणे- उधार घ्यायचे किंवा पैसे द्यायचे असताना घेणाराच्या व देणाराच्या ओळखीचा तिसरा माणूस जामीन की दाखल पुढे उभा करणे; एखाद्या व्यक्तीला बोलणाऱ्यांनी आपण कोण याची माहिती किंवा आठवण देणे, खात्री करून देणे. ओळख पटणे- अमुक व्यक्ती इ. कोण ते निश्चित आठवणे; परिचय नसलेली किंवा न आठवणारी व्यक्ती अमुकच अशी खात्री पटणे. ओळख पडणे- चांगली माहिती होणे; परिचय होणे : ‘त्यांची माझी पुढे चांगली ओळख पडली.’-पलकोघे३७६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

प्रत्यंतर

न. १ पुरावा; खात्री, पुष्टि देणारी एखादी गोष्ट; दाखला; उदाहरण; दृष्टांत; प्रमाण; आधार. २ अनुभव; खात्री. [सं.]

दाते शब्दकोश

प्रत्यय

न. १ अनुभव; खात्री; प्रतीति. 'सहपरिवारें पळती कामक्रोध । कीं प्रत्यया येतां ब्रह्मानंद ।' -पांप्र ४५.२१. २ भरं- वसा; श्रद्धा; निष्ठा; आत्मविश्वास. ३ (व्याकरण.) नाम व धातु यांस विशेष अर्थ उत्पन्न करण्यासाठीं त्यांना जोडून येणारा शब्द. [सं.] प्रत्ययास येणें-पटणें; अनुभवास येणें. 'म्हणोनि जळो हें झुंज । प्रत्यया नये मज ।' -ज्ञा १.२०८. ॰प्रतिभू-पु. खात्री- लायक जामीन; विश्वासप्रतिभू. [सं.] प्रत्ययित-वि. विश्वास टाकलेला; भरंवसा टाकलेला; विश्वस्त. [सं.] प्रत्ययी-वि. विश्व- सनीय; भरंवशाचा; खात्रीचा; पतीचा. [सं.] प्रत्ययीभूत प्रमाण- न. अनुभवास, दाखला म्हणून येणारें उदाहरण, दृष्टांत, विधान.

दाते शब्दकोश

तहकीक

स्त्री. १ सत्य; निश्चिति; निर्णयात्मक सत्य; खरी हकीगत. 'कांहीं कदीम सनद असेल ते हुजूर आणून दाखवावी त्याजवरून तहकीक होईल.' -रा १४.४. 'परंतु तहकीक कळेना.' -भाब १२४. २ खात्री. 'तहकीक करून आकार होईल त्या- प्रमाणें खर्च लिहिणें म्हणोन.' वाडबाबा २.१८८. -वि. निश्चित; खरें. [अर. तह्कीक्] -कात-स्त्री. १ चौकशी; तपास; सत्या- न्वेषण; शहानिशा. 'सदर्हू गोष्टीची तहकीकात लाविली.' -रा १८.६०. 'धाकटे नाना व गोविन्द शिवराम तहकीकात करितां तो ( = तोतया जनकोजी) थोरात रघोजी असा ठराव झाला.' -ख २.६३१. २ हकीकत. 'दिघा मजकूराची तहकीकात मनास आणतां.' -वाडबाबा २.१५. ३ खचिती; खात्री; निश्चितपणा. [अर. तह्कीक् अव.]

दाते शब्दकोश

दिल-ल्

पुन. हृदय; अंतःकरण; मन. [फा. दिल्] (वाप्र.) ॰फांकणें-फांकटणें-अस्वस्थ होणें; बेचैन होणें; गोंधळून जाणें. म्ह॰ दिलमे चंगा तो काथवटमें गंगा = अंतःकरण शुद्ध, पवित्र असल्यास पवित्र गंगा आपणाजवळ असल्याप्रमाणेंच होय. सामाशब्द- ॰आरामी-स्त्री. आनंद; खुशाली; मनाचा संतोष; शांतवन. 'तुम्ही आपली खुशालखबर लिहून दिल् आरामी करीत जाणें.' -रा २२.६५. ॰कुल-वि. हिरमुसलेला; कष्टी; श्रमी; लज्जित. 'दिलकुल बसले जिकडील तिकडे सन्मुख एकहि येईना ।' -पला ८५. दिल्खाक्रिवि. मनाप्रमाणें; यथास्थित. 'तुम्ही व राव पंतप्रधान खातर्जमेनें दिल्खा तदारूक अमलांत आणावा.' -दिमरा १.७. [फा. दिल्खाह्] ॰खुलास-सा- पु. शुद्धभाव; मनाचा मोकळेपणा; समाधान. 'दिल्खुलाशानें जाब दिला नाहीं.' -सभासद ३९. [अर. खिलास् = शुद्धता] ॰खुशी-स्त्री. १ आनंद; संतोष; तृप्ति; चित्ताची प्रसन्नता. २ रुकार; संमति; इच्छा; आपखुशी; पसंती. [फा. खुशी] ॰गर्मी- स्त्री. प्रेम, प्रीति; लोभ. 'दिल्गर्मी करून..कुशल वर्तमान पुसिलें.' -पदमव ७८. ॰गिरी-वि. दुःख, खेद; खिन्नता; बेदिली. ॰गीर-वि. दुःखी; कष्टी; खिन्न; असंतुष्ट; गांजलेला. ॰जम(मा)ई-स्त्री. खातरजमा; चित्तशुद्धता; मनाची मिळणी; मैत्री. 'भाऊची मार्फत महादजी शिन्देची दिल्जमाई केली.' -पदमव ७७. ॰जमीयत-स्त्री. समाधान; खातरजमा; निःसंदेहता; निःसंशयता. 'तर मोहिबीं दिल्जमीयतीनें आपले कदीम ठिका- णास यावयाचें..केलें पाहिजे.' -रा ३.९१. [अर. जमीयत्] ॰जोई-स्त्री. सांत्वन; समाधान. 'तुम्ही आमचे तर्फेनें यांची तशफ्फी व दिल्जोई करावी.' -रा २२.२५. [फा. दिल्जोई] ॰ताजगी-स्त्री. चित्तसंतोष; अंतःकरण आनंदविणें; मन प्रसन्न करणें. 'आपली खैरखुशी कलमी करुन दिलताजगी करीत असलें पाहिजे.' -रा १०.१६५. ॰ताजा-वि. नवीन, ताजें प्रेम अस- णारा; नूतन प्रेमसंपादन केलेला; प्रेमाची नव्हाळी व भर असलेला. ॰दप्त(फ्त)र-न. स्मृतिपट; आठवणींचं हृदयरूपी संचयस्थान. ॰दर्या-वि. उदारधी; गंभीर (मन). 'दिल्पाक दिल्दर्या इलाही मेहेर्बान खान.' -ब्रप ३०७. [फा.] ॰दार-वि. उदार; मन- मिळाऊ; सहृदय; मोठ्या मनाचा. [फा.] ॰दारी-स्त्री. १ उदा- रता; धीटपणा; खंबीरपणा; सह्रदयता; धीर. २ उत्तेजन; खातर- जमा. 'संचणीचा वख्त आहे तक्वा-दिल्दारी पाठविणें.' -रा १६.३३. 'मावळे लोक तमाम याची दिल्दारी करुन.' -वाडशाछ १.११६. ॰दिलासा-पु. धैर्य; उत्तेजन; भरंवसा; उत्साह; आश्वासन. (क्रि॰ देणें). 'दिलदिलासा देतें मी सखया फारच सुख मानी.' -पला ४.१२. ॰देही-स्त्री. उत्कटता. 'कित्येक सरदार कामकाजाविषयीं दिलदेही करीत नाहींत.' -रा ५. १५७. [फा. दिल् दिही] ॰न(नि)शीन-वि. १ पसंत. २ अव- गत; श्रुत. 'अजराह यगानगत दिल्निशीन जालें तें कलमी केलें असें.' -पया ४६३. [फा. दिल्निशीन्] ॰पाक-वि. पवित्र; शुद्ध अंतःकरणाचा; कपटरहित; सरळ; निष्पाप. ब्रप ३०७. ॰पाकी-खी-स्त्री. अंतःकरणाची शुद्धता; सरळता; निखालसता; निष्कपटता. 'आम्ही दिलपाखीनें मशाकत करुन...' -इमं ११. ॰भ(ब-व)र-पु. प्रियकर; दयित; वल्लभ. 'सुंदरा म्हणे दिलभरा राजआंबीरा हासून मसी बोला जी ।' -होला १६९. 'आगे सखे लोभ करावा, दिलभर पलंगी असावा.' -सला १.४९. -क्रिवि. मनाची तृप्ति होईपर्यंत. ॰भर(रं)वसा-भरोसा-पु. धीर; खातरी; उत्तेजन. ॰भरी-स्त्री. समाधान; खात्री; उत्तेजन. 'तमाम रयतेची दिलभरी करुन लावणी होय तें करणें.' -रा १.३४६. सफाई-साफी-स्त्री.मनाची निखालसता, निःशंकता. 'पुन्हां दिलसाफीचा फर्मान उभयतांनीं बादशहापासून संपादन केला.' -प्रामस ३२. ॰हवाल-वि. अस्वस्थ; त्रस्त मनाचा; मनामध्यें विवंचना असलेला. ॰हवाली-स्त्री. मनाची अस्वस्थता; विवं- चना, काळजी.

दाते शब्दकोश

च      

शअ       १. निश्चय, खात्री, स्पष्टपणा, वैशिष्ट्य दाखवणारे शब्दयोगी अव्यय. उदा. तुम्हीच या = इतरांस न पाठवता तुम्ही स्वतः या; तुम्ही याच = कसेही करून, न चुकता या; तो चोरच आहे = तो चोरीचाच धंदा करणारा आहे; तो चोर आहे = इतर कोणी नाही तो स्वतः चोर आहे; मी जेवताच उठलो = जेवण होताक्षणी उठलो; मी येर्इनच = येर्इनच येर्इन (खात्रीने, निःसंशय मी येर्इन). २. या अव्ययाला कधी गुणदर्शक अर्थ असतो. उदा. एवढाच. ३. सदृश; सारखा. उदा. असाच. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अ. १ निश्चय, खात्री, स्पष्टपणा, वैशिष्ट्य, स्वतःपण इ॰ दाखविणारें अव्यय. उदा॰ तुम्हीच या = इतरांस न पाठ- वितां तुम्ही स्वतः या; तुम्ही याच = कसेंहि करून, न चुकतां या; तो चोरच आहे = तो चोरीचाच धंदा करणारा आहे; तोच चोर आहे = इतर कोणी नाहीं तो स्वतः चोर आहे. 'मी जेव- तांच उठलों = जेवण होतांक्षणीं उठलों; मी येईनच = येईनच येईन (खात्रीनें, नि:संशय मी येईन). २ या अव्ययाला कधी गुणद- र्शक अर्थ असतो. उदा॰ तो पंडित बराच आहे = चालण्यासारखा (उपयोग पडेल असा) आहे. ३ सदृश; सारखा. 'पढलेला ग्रंथ बहुत दिवस न पहिला असतां परका परकाच दिसूं लागतो.' [सं. चित्]

दाते शब्दकोश

अभय

न. १ सुरक्षितपणाची, निर्भयतेची खात्री. २ भीति नसणें; सुरक्षितता. 'अभय असे' = कशाबद्दलहि भिऊं नको; निर्भय रहा. ३ अभयमुद्रा. -वि. निर्भय. 'स्वकर्म आचरणारे अभय जे बळी सर्वो ठाई ।' -ऐपो ४२०. ॰कर —पु. अभय दर्शविणारी देवतेची किंवा राजाची हस्तमुद्रा किंवा हात. 'तुझीयेन अभयंकरें । अनावर माया हे वोसरे।' -दा १.४.९. ॰र्डिडीम- पु. १ निर्भयता असल्याबद्दल वाजविण्याचा डमरु; दुदुंभी वगैरे. २ (ल.) संरक्षणाच्या खात्रीबद्दल स्पष्टपणें जाहीर रीतीनें बोलणें; सुरक्षितपणाबद्दलचें वचन-कौल वगैरे. ॰दान-न. सुरक्षिततेबद्दलची देण्यांत येणारी खात्री-हमी, वचन. ॰पण-न. अभयदान. ॰पत्र-न सुरक्षितपणाबद्दलचें राजपत्र; कौल; सरकारच्या दहश- तीनें अथवा दुष्काळानें रयत परागंदा झाली असतां तिला आश्वा- सन द्यावयाचें पत्र, दवंडी, जाहीरनामा. ॰मुद्रा-अभयकर पहा. ॰लेख-अभयपत्र पहा. 'समुद्रयान करण्याचा जर त्यास प्रसंग आला तर कपतानाकडून नौकेबद्दल अ॰ घेतल्यावांचून तो तिजवर पाऊल ठेवणार नाहीं काय?' -नि ८८८. ॰वचन-अभयदान पहा. ॰हस्त-अभयकर पहा. 'धर्मप्रतिष्ठा तो सिध्दु । अभयहस्तु ।' -ज्ञा १.१३.

दाते शब्दकोश

अभय      

न.       १. सुरक्षितपणाची, निर्भयतेची खात्री; हमी. २. भीती नसणे; सुरक्षितता. ३. अभयमुद्रा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अभयदान      

न.       सुरक्षिततेबद्दलची देण्यात येणारी खात्री, हमी, वचन. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अधिकृत

वि. १ विशिष्टस्थानापत्र; सत्ताधिष्टित. २ अधि- कार मिळालेला; नेमलेला. 'ठाणेदाराची आपण अधिकृत बातमीदार आहोंत अशी खात्री पटबावी लागे.' -के १२.७.३०. ३ मनांत असलेलें; उद्दिष्ट; अधिकारलेला; अनुलक्षित. [सं.]

दाते शब्दकोश

अधिकृत      

वि.       १. विशिष्ट स्थानापन्न; सत्ताधिष्ठित. २. अधिकार मिळालेला; नेमलेला : ‘ठाणेदाराची आपण अधिकृत बातमीदार आहोत अशी खात्री पटवावी लागे.’ – के १२·७·३०. ३. मनात असलेले उद्दिष्ट. ४. साधार; शासनाची किंवा अधिकाऱ्याची मान्यता असलेला; त्यांच्या सूचनेवरून केलेला; झालेला (खुलासा वगैरे). [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अधिप्रमाणता      

स्त्री.       एखाद्याच्या खरेपणासंबंधाने खात्री देणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अकीन

(गु. [अ. यकीन्] दृढमत; खात्री.

फारसी-मराठी शब्दकोश

अकीन

पु. खात्री; सत्य. २ सत्याचा वाली. [अर. यकीन्]

दाते शब्दकोश

अकीन      

पु.       १. दृढविश्वास; खात्री; सत्य. २. सत्याचा वाली. [अर. यकीन]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आकण      

न.       १. एकदा मळणी केलेली कणसे (जोंधळा, बाजरी इ. ची) २. (काही प्रांतांत) दुसरी मळणी झाल्यानंतरचे धान्य. पहा : मदन. ३. धान्याची मळणी झाल्यानंतर उरलेले; माती, खडे मिसळलेले धान्य; मातेरे. [सं. आकृष्ट+कण] (वा.) आकण निघणे – १ . पिट्टा पडणे; अतिशय मेहनत पडणे; अतिशय दमून थकणे. २. खात्री होणे.(व.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आकण

न. १ एकदां मळणी केलेली कणसें (जोंधळा, बाजरी इ॰ चीं). २ (कांही प्रांतांत) दुसरी मळणी झाल्यानंतरचें धान्य; मदन पहा. ३ धान्याची मळणी झाल्यानंतर उरलेलें माती खडे मिस- ळलेलें धान्य; मातेरें. -ज्ञायो १.४४. [सं.आकृष्ट + कण किंवा आ + कंडण किंवा आ = ईषत्,किंचित् + क्षुण्ण = मळलेलें] ॰निघणें- (व.) पिठ्ठा पडणें; खात्री निघणें; अतिशय दमून थकणें. 'फार मजल तो चालून आल्यामुळें त्याची खूपच आकण निघाली.' ॰निकण- एकदां मळून, धान्य काढून झालेलीं कणसें पुन्हां मळून त्यांतून निघालेलें धान्य.

दाते शब्दकोश

अनिश्चित      

वि.       १. खात्री, निर्णय न केलेला. २. न ठरलेला. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनिश्वित

वि. कायम अखेर, खात्री, निर्णय न केलेलें. [सं.]

दाते शब्दकोश

अनुमत      

न.       १. अनुमोदन; संमती; मान्यता; खात्री; अभिमत; कबुली : ‘तोचि मार्ग दावि आम्हांते । तुझिया अनुमते चालू आम्ही ।’ २. अनुकूल मत; एकमत; एक भाव. ३. निर्णय; बनलेले मत; निवाडा; फैसला (न्यायाधीश किंवा पंच यांचा).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनुमत

न.१ अनुमोदन; संमति; मान्यता; खातरी; अभि- मत; कबुली. 'तोचि मार्ग दावि आम्हांते । तुझिया अनुमतें चालू आम्ही ।'. २ अनुकूल मत; एकमत; एकभाव. ३ निर्णय; बनलेलें मत; निवाडा; फैसला. (न्यायाधीश किंवा पंच यांचें ). -वि.- पसंत केलेलें; आवडलेलें; अनुकूल असलेलें. [सं. अनु + मन्]

दाते शब्दकोश

अनुप्रमाणित करणे      

क्रि.       प्रमाणपत्राच्या प्रतीच्या खरेपणाबद्दल खात्री देणे, साक्ष देणे, सही करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अपेक्षणीय      

वि.       वाट पाहिलेला; मार्ग प्रतीक्षा केलेला; साकांक्ष पाहिलेला, शोधलेला; आशा वाटत असलेला; वचन किंवा खात्री दिलेला. २. इच्छा करण्यास योग्य : ‘अपेक्षणीय जे काहीं । ते मीचि केला ।’ – ज्ञा १८·१११८. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अपेक्षणीय

वि. वाट पाहिलेला; मार्गप्रतीक्षा केलेला; आशाळ- भूताप्रमाणें पाहिलेला-शोधलेला; आशा वाटत असलेला; वचन किंवा खात्री दिलेला. २ इच्छा करण्यास योग्य. 'अपेक्षणीय जें कांहीं । तें मीचि केला ।' -ज्ञा १८.१११८. [सं. अपेक्षणीय]

दाते शब्दकोश

आश्वासक      

वि.       भरवसा देणारा, खात्री देणारा, हमी देणारा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आश्वासन      

न.       १. धीर; उत्साह; उत्तेजन : ‘तिसी द्यावें आश्वासन । उदईक आहे तुझे लग्न । तुवां असावे सावधान । पाणिग्रहण मी करीन ।’ − एरुस्व ५·७८. २. वचन देणे; ग्वाही देणे; खात्री देणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आश्वासणें

(सं) स० धैर्य देणें, खातरी करणें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

आत्मविश्वास      

पु.       (मानस.) स्वकर्तृत्वाचा भरवसा; स्वतःसंबंधीचा योग्य असा विश्वास, खात्री. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अवधारित      

वि.       १. निश्चित; ठरावीक; खात्री केलेले; निर्धारित. २. स्मरणात, आठवणीत असलेले. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अवधारित

वि. १ निश्चित; ठराविक; खात्री केलेलें; निर्धा- रित. २ स्मकणांत, आठवणींत असलेलें. [सं.]

दाते शब्दकोश

अविश्वास      

पु.       १. बेभरवसा; विश्वासाचा अभाव. २. एखाद्याच्या पात्रतेबद्दल किंवा कार्यक्षमतेबद्दल खात्री नसणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आयदेपणा      

पु.       आळशीपणा; ऐदीपणा : ‘यांच्या काम करण्याच्या शिताफीची, आयदेपणाची आणि कर्तव्यशून्यतेची कोणासही खात्री झाल्यावाचून राहणार नाहीं.’ − लोटिकेले १·१·२६८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ब-दील-खातर

क्रिवि. समाधानासाठीं; मनाच्या खातरी करितां. 'ब-दील-खातर हज्रतीचे एवढ्यावर ठराव झाला.' -रा ५.३१. [फा.]

दाते शब्दकोश

भाक

स्त्री. १ वचन; खात्री; आश्वासन. (क्रि॰ देणें) 'नारायणा आम्हा नाहीं वेगळीक । पूर्वील हे भाक सांभाळिली ।' -तुगा ३११. २ परस्परांतील ठराव; करार; (आण शब्दाला जोडून येतो) कबुलायत. 'जैसी पूर्वजांची भाक । पाळिती सत्य- वादी लोक ।' -एभा ७.५६८. ३ केलेल्या नवसाची फेड होई- पर्यंत देवापाशीं अनामत ठेविलेला पदार्थ. ४ भाषण; उक्ति. ५ (व.) विनवणी. [सं. भाषा] ॰उतरणें, भाकेस उतरणें- वचनाप्रमाणें हातून कृति घडणें. ॰देणें-वचन, कबूली देणें; शपथ घेणें. 'न करी चिंता वेळोवेळीं । म्हणोन भाक देतसे ।' -गुच १२.५३. ॰सत्य करणें-दिलेला शब्द खरा करणें; वचनाप्रमाणें कृति करणें. भाकेस गुंतणें-वचनांत, शब्दांत गुंतणें. 'यदुतिलक जिचे हा गुंतला पूर्ण भाके ।' -सारुह ४.४७. ॰पालक-पु. वचन पाळणारा. -ख्रिपु ॰बाहण-स्त्री. १ प्रतिज्ञा; वचन; शपथ (देवा- पाशीं घेतलेली). 'देवाला भाकबाहणीवर गुंतविलें.' २ नवसाची फेड होईपर्यंत देवापाशी अनामत ठेविलेला पदार्थ.' भाक पहा. 'देवाची भाकबाहण ठेवली.' [भाक + बाहण (द्विरुक्ति शब्द)] भाकणें-उक्रि. १ भविष्य सांगणें. 'दिवटा सरवदा भाकून गेला । अंतरीं धोका लागला ।' -दा ३.७.५९. २ अभिवचन, आश्वा- सन म्हणून देवाजवळ कांहीं वस्तु ठेवणें. ३ (काव्य.) मागणें; इच्छिणें; दीनवाणीनें विनंति करणें (करुणा, कीव,काकुळति इ॰ शब्दाबरोबर उपयोग). 'भाकावी करुणा । विनवा वैकुंठीचा राणा ।' -तुगा ६७३. [सं. भाष] भाकणूक-स्त्री. १ देवाकडून मिळा- लेलें उत्तर. २ (क.) भविष्य कथन. ३ बोलणें; सांगणें. ४ कौल; शकुन. ५ विनवणी. [भाकणें] भाकीत-न. भविष्य. (क्रि॰ करणें; सांगणें). [सं. भाषित; भाकणें]

दाते शब्दकोश

भरंवसा, भरोसा

पु. १ विश्वास; प्रत्यय; इतबार; आश्वा- सन. २ खातरी; मनाचा निश्चितपणा; निःसंदेह. [सं. विश्रंभ; हिं.] म्ह॰ भरवशाचे म्हशीस टोणगा = पूर्ण भरवसा असलेल्या माणसा- पासून, गोष्टीपासून, शेवटीं निराश होणें. ॰तुटणें-अक्रि. विश्वास नाहींसा होणें. 'उतावेळी होसी म्हणवुनि तुटे हा भरंवसा ।' मोट-म्हैस-चें कूळ-स्त्रीन. ज्यावर, भरवसा ठेवलेला आहे असा माणूस, गोष्ट.

दाते शब्दकोश

चाखणें

उक्रि. गोडी समजण्यासाठीं खाऊन पाहणें; चव घेणें; रुचि, आस्वाद घेणें; लक्षणेंनेहि हा शब्द पुष्कळ वेळां योजतात. [सं.चष्; प्रा. चक्खण; हिं. चाखना] (वाप्र.) चाखतमाखत बोलणें-नाजूक तर्‍हेनें, रुचि, चव घेत जेवणें (भूक नसतांना); चिकित्सा करीत किंवा नाकाओठावर जेवणें. चाखतमाखत जेवणें-अडखळत, थांबत थांबत बोलणें. चाखून रांधणें-अगोदर चाखून किंवा रुचि पाहून अथवा किंचित खाऊन पाहून मग शिजविणें (स्वयंपाक्याला पदार्थ चांगला झाला किंवा नाहीं हें चाखल्याशिवाय समजत नाहीं. म्हणून या वाक्प्रचाराचा उपयोग निषेधार्थी व शेवटाविषयीं, परिणामाविषयीं अनिश्चित किंवा संशयित असणें या अर्थी कर- तात). चुकीविषयीं कोणी चाखून रांधलें नाहीं-कोणा- लाही आपल्या हातून चूक व्हावयाची नाही अशी खात्री बाळ- गतां येत नाहीं. म्ह॰१ तळें राखील तो पाणी चाखील. २ चाखलें नाहीं पण देखले तर असेल.

दाते शब्दकोश

चंग

पु. १ अलगुजासारखें एक वाद्य. हातांत घेऊन चंग- रंग जमवीला ।' -होपो १५. २ मोठा डफ. ३ (ल.) घुंगरा- सारखें वाजणारें कडें. 'हरिनामें वाजवि चंग, अहो चंग ।' -देप ६६. ३ (ना.) वावडी उडतांना फडफड वाजावयासाठीं तिला कागद कातरून त्याचा जो फरारा लावतात तो; पतंगाची शेंपटी. ४ चंगकांचनी गंजिफांच्या आठ रंगांतील पहिला रंग. ५ घुंगुर- माळ; चंगाळ; बैलाचा एक दागिना. (गु.) घंटा. खाला ५१. ६ (चुकीनें ?) पैज; प्रतिज्ञा (चंग बांधणें या प्रयोगावरून अर्थ बनला असावा). [फा] (वाप्र.) ॰बांधणें- १ (पचंग बांधणें असा मूळ प्रयोग असेल) उद्युक्त होणें; कंबर बांधणें. 'तें काम करण्यास त्यानें चंग बांधला.' २ पैज; फुशारकी मारणें; खात्री- पूर्वक सांगणें; ठासून प्रतिज्ञा करणें. 'एखाद्या मर्त्यानें मी अमुक वर्षें जगेन असा चंग बांधणें हा केवळ मूर्खपणा होईल.' ॰बाळ- गणें-शौर्य, विद्या इत्यादिकांचा अड्डा, बाणा बाळगणें. सामा- शब्द-॰कांचनी-वि. गंजिफांचा एक जुना प्रकार. या गंजि- फाच्या जोडांतील आठ बाजूंची नांवें चंग, कांचन, वरात, कुमाश, ताज, गुलाम, रूप व शमशेर. याहून दशावतारी गंजिफा हा निराळा प्रकार आहे. ॰चिखलत-चिलत-चिल्लत- चिल्लद-चिल्ली-चल्ली-स्त्री. गंजिफांच्या खेळांतील कांहीं विशिष्ट संज्ञा. खेळांत शेवटीं शेवटीं दोन रंगांचीं दोन पानें राहिलीं असतां खेळणारानें एक पान उताणें पडावें म्हणून दोन पानें जुळून वर उडविण्याचा प्रकार. चंचल पहा. ॰राणी-स्त्री. १ प्रेमांतील स्त्री; प्रियपात्र; अतिपरिचित स्त्री. २ चंग डावांतील राणी.

दाते शब्दकोश

चूर      

वि.       १. (अभ्यासात, निद्रेत, मद्याच्या धुंदीत, प्रेमलीलेत); मग्न; गुंग; गर्क; तल्लीन; निमग्न; गढून गेलेला : ‘जो तो आपल्या ठिकाणी अगदी चूर होउन गेला.’ − वज्राघात ५१. २. थिजलेला; आश्चर्यचकित झालेला; विस्मित; गोंधळलेला : ‘आपणा स्वतःहून अधिक बुद्धिमान अशा स्त्रीशी बोलत आहों ही खात्री पटून तो मनात चूरच झाला.’ − के १५·५·३४. [हिं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चूर

वि. मग्न; गुंग; गर्क; तल्लीन; निमग्न; गढून गेलेला. ॰होणें-अक्रि १ (अभ्यासांत, निद्रेंत, नशेंत, मद्याच्या धुंदींत, प्रेमलीलेंत) गुंग, गर्क, मग्न होणें. २ खजिल होणें; थिजणें; आश्चर्य- चकित होणें; विस्मय पावणें; गोंधळून जाणें. 'आपणा स्वतः हून अधिक बुद्धिवान अशा स्त्रीशीं बोलत आहों ही खात्री पटून तो मनांत चूरच झाला.' -नवलपूरचा संस्थानिक, के १५.५.३४. [हिं. चूर होना-बारीक बारीक तुकडे होणें, चूर्ण होणें, निशेंत इ॰ धुंद होणें]

दाते शब्दकोश

दडा      

पु.       १. बूच; नाक, कान इ. च्या छिद्रात बसलेला मळ; दट्ट्या; (ल.) अडथळा. २. विश्वास; भरवसा; खात्री; आश्वासन. ३. लपून, छपून बसणे; दडणे : ‘याचा दडा हुजूर राहील.’ – वाडबाबा १७८. (क्रि. मारणे). ४. लपून बसलेली सैन्याची टोळी. ५. (लपून दरोडा घालणारा) पेंढारी. – शास्त्रीको. ६. चेंडू.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दडा

पु. १ बूच; नाक, कान इ॰ च्या छिद्रांत बसलेला प्रति- बंधक मळ; दट्ट्या; (ल.) अडथळा, अवष्टंभ. २ विश्वास; भरोंसा; खात्री; आश्वासन. ३ लपून, छपून बसणें; लपून बसण्याची जागा; दडण. 'याचा दडा हुजूर राहील.' -वाडबाबा १७८. (क्रि॰ मारणें). ४ छपून बसलेली सैन्याची टोळी. ५ (छपून दरोडा घालणारा) पेंढारी -शास्त्रीको ६ चेंडू. [दडणें]

दाते शब्दकोश

दिलावर

वि. धीर; शूर; धाडसी. -पदमव ८५ दिला- वरी, दिलदिलावरी-स्त्री. धैर्य; धाडस; आत्मविश्वास; खात्री; शांतवन; आश्वासन.

दाते शब्दकोश

दिलभरी      

स्त्री.       समाधान; खात्री; उत्तेजन : ‘तमाम रयतेची दिलभरी करून लावणी होय तें करणें.’ - मइसा १·३४६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दर्याफ्त-प्त, दर्याफ्ती-प्ती

स्त्री. आकलन; समजणूक; चवकशी; निर्णय; शोध; निकाल; समजावणी; खात्री. 'दक्षिणेतील एजंट याजकडे सर्व सरंजामांची दर्याप्ती होऊन वर्गवारी करण्यास आरंभ झाला.' -इनाम ४२. [फा. दर्याफ्त्]

दाते शब्दकोश

धडवत

वि. (मराठवाडा) जमिनकी, निश्चितपणा इ॰ ची खात्री असणारी. -निजामविजय ३०७.३१.

दाते शब्दकोश

धडवत      

वि.       जामीनकी, निश्चितपणा इ. ची खात्री असणारी. – निजामविजय ३०·७·३१. (मराठवाडा)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

एकीन

स्त्री. खात्री; दृढमत. 'ब-वाजिबी ताकीद होईल हे एकीन समजोन...।' -रा १५.१५२. [अर. यकीन्]

दाते शब्दकोश

एकीन      

स्त्री.       खात्री; विश्वास; दृढमत : ‘व -वाजिबी ताकीद होईल हेएकीन समजोन.’-मइसा १५·१५२. [फा. यकीन]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

एकीन; यकीन

(स्त्री.) [अ. यकीन्] दृढमत; खात्री; नक्की. “ब-वाजिबी ताकीद होईल हे एकीन समजोन” (राजवाडे १५।१५२).

फारसी-मराठी शब्दकोश

एतद्देशीय

वि. या देशांतील; या देशांत, येथील लोकां- कडून होणारीं (पुस्तकें, इतर कामें वगैरें). 'एतद्देशीय ग्रंथावर साहेबमजकुरांनीं जो टीकालेख लिहिला...' -टि २.१९३. -पु. युरोपियनेतर; नेटिव्ह; देशी लोक; हिंदी लोक. 'त्यांची (एल्फि- न्स्टन साहेबांची) अशी खात्री होती कीं एतद्देशीयांचीं मनें सुशिक्षित झाल्यामुळें इंग्लंडास आपला गाशा गुंडाळावा लागला तर ज्यांचा देश त्यांचा परत झाल्यास इंग्लंडची किर्तीच होणारी आहे.' -टि १.४४०. [सं.एतत् + देशीय]

दाते शब्दकोश

गाशा

पु. खोगिराचें आच्छादन किंवा बिछायत; वरील अंगास सकलातीचे किंवा बनातीचे निरनिराळ्या रंगाचे तुकडे व आंतील अंगास खारवें असें शिवून केलेलें दुहेरी वस्त्र; पातळ गादी. [अर. घाशिआ] (वाप्र.) ॰गुंडाळणें-१ जाण्यासाठीं आवरा- आवर करणें; आपलें सामानसुमान गुंडाळून चालतें होणें. 'पुण्यांतले लोक चांगले व्यवहारज्ञ आहेत, ते आपल्या हातीं लागणार नाहींत अशी खात्री होतांच स्वामींनीं तेथून आपला गाशा गुंडाळला.' -नि. २ पळून जाणें; ३ मरणें. ॰टाकणें-अंथरूण पसरणें (स्वार खोगिरावरचा गाशा निजावयास घेतात त्यावरून). 'इकडे स्वारांनींहि आपापल्या भाकरी खाऊन ते आतां गाशा टाकून विश्रांति घेत उघड्या पटांगणांत पडले होते.' -स्वप ९५.

दाते शब्दकोश

गाशा      

पु.       खोगिराचे आच्छादन किंवा बिछायत; वरील अंगास सकलातीचे किंवा बनातीचे निरनिराळ्या रंगाचे तुकडे व आतील अंगास खारवे असे शिवून केलेले दुहेरी वस्त्र; पातळ गादी. [फा.] (वा.) गाशा गुंडाळणे – १. जाण्यासाठी आवराआवर करणे; आपले सामानसुमान गुंडाळून चालते होणे; पळून जाणे : ‘पुण्यातले लोक चांगले व्यवहारज्ञ आहेत, ते आपल्या हातीं लागणार नाहींत अशी खात्री होताच स्वामींनीं तेथून आपला गाशा गुंडाळला.’ –नि. २. मरणे. गाशा टाकणे – अंथरूण पसरणे (स्वार खोगिरावरचा गाशा निजावयास घेतात त्यावरून) : ‘इकडे स्वारांनींही आपापल्या भाकरी खाऊन ते आतां गाशा टाकून विश्रांती घेत उघड्या पटांगणात पडले होते.’ –स्वप ९५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गॅरंटी

स्त्री. १ हमी; जिम्मा २ खात्री. [इं.]

दाते शब्दकोश

ग्वाही      

स्त्री.       गोही; साक्ष; शपथेवर दिलेली जबानी; साक्षीपत्र : ‘दुष्ट आचरण ग्वाही माझें मन ।’-तुगा १८५७; एखाद्याच्या चांगुलपणाबद्दल खात्री. (क्रि. देणे.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हार

स्त्री. १ नुकसान; तोटा; खोट. (क्रि॰ येणें; बसणें). 'आंब्याच्या व्यापारांत मला मोठी हार आली.' २ पराभव; अंगावर डाव येणें, लागणें (युद्ध, जुगार इ॰ त). (क्रि॰ येणें). ३ -पु. अपहार; हरण; लूट. ४ (अंकगणित) भाजक; छेद. [सं. हृ = हरण करणें, चोरणें] ॰खाणें-घेणें-जाणें-परा- भव पावणें; माघार घेणें; तोटा सोसणें; कमा दर्जाचे आहों असें कबूल करणें. 'त्यानें त्यांचा यथायोग्य समाचार घेऊन त्यांस हार खावयास लावलें' नाना-महादजी. ॰जाणें- कमीपणा पतकरणें; पड खाणें; पराभव पावणें; मागें राहणें. 'चलाखपणांत आम्हीं कोणत्याहि लोकांस हार जाणार नाहीं अशी आमची खात्री आहे.' -नि. ॰घेणें-पत्करणें- मानणें-नुकसान सोसणें. म्ह॰ १ हार मानली झगडा तुटला. २ हार मानली पण झगडा तुटो = कोणीकडून तरी तंटा मिटो. हारीं जाणें-पराभव पावणें; पत्कारणें. हारक-वि. १ हरण करणारा; लुबाडणारा; लुटणारा. २ निवारण करणारा; नाहींसें करणारा. उदा॰ पित्तहारक-वातहारक इ॰ (औषध) हारी मध्यें पहा. ३ (अंकगणित) भाजक. हारजीत-स्त्री. जया- पजय. 'हारजीत कोणाचे स्वाधीन नाहीं.' [हारणें + जितणें] हारणें-उक्रि. १ जिकणें. 'म्यां त्याला १०० रुपयांस हारलें.' २ हरणें पहा. हारतणें-हरण करणें. 'मुक्तीचा ठेवा हारता ।' -भाए ८८. हारतलेंपण-न. हरवलेपण; नसतेंपण; नाहींपणा 'हें आथी तरी कायिसें । हरतले पण ।' -अमृ ७. १०४. हारपणें-अक्रि. हरवणें; हरपणें पहा. हारवणें-विणें- उक्रि. गमावणें; घालविणें; हरविणें पहा. ॰सडणें-हारसरणें- अक्रि. (राजा.) पराभव कबूल करणें; हार खाणें; शरण जाणें. हारी-स्त्री. हार; पराभव; तोटा. हार पहा. -एभा २८.६८५. -वि. १ हारक पहा. (दुखहारी, ज्वरहारी). २ मोहक; आक- र्षक. हार्य-वि. हरण करण्यास शक्य, योग्य. [सं.] हार- सडणें-उक्रि. (राजा.) आटोक्यांत येईल इतपत कमी होणें, करणें; समावणें; सहज करतां येईल येथपर्यंत आकुंचित होणें, करीत आणणें. [हारणें + सडणें किंवा हार = रांग, ओळ] हार- सडीस आणणें-आटोक्यांत, मर्यादेंत आणणें; आटोपशीर करणें (मोठा उद्योग, धंदा इ॰ हळू हळू विल्हेवाट लावून). 'एक वर्षाचें लिहिणें तुंबलें आहे, सारा गोंधळ झाला आहे, एवढें हारसडीस आणून दे, मग मी शेवटास नेईन.' हारसडीस येणें-आवाक्यांत येणें.

दाते शब्दकोश

होबासा

पु. काम करून देण्याबद्दलचें आश्वासन; खात्री देणें. [हो + बा + असा]

दाते शब्दकोश

इकरार

पु. १ कबुली; करार; ठराव. २ जबानी (लेखी किंवा तोंडी). 'पर जिल्ह्यांतील साक्षीचा इकरार घेऊन पाठवणें- विषयीं जडजानें जडसास लिहावें.' -न्यासे ३४. [अर. इकार वचन, खात्री, कबूली] ॰नामा-पु. लेखी ठराव, कबुली; कबुला- यत. [फा.]

दाते शब्दकोश

इसारा

(आ) पु० विसार, खात्री, हमी, निशा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

इतबार

पु. १ विश्वास; श्रद्धा; भरंवसा. 'आतां इत- बार कोणाचा येत नाहीं. -सभासद २९. २ प्रतिष्ठा; पत; मानपान. 'कोणा इतवार याचा घरीं' -सला ११. [अर. इअतिवार् = विश्वास श्रद्धा] ॰पण-न. श्रद्धाळुपणा; विश्वास; भरंवसा; खात्री. -रा १५.३७२.

दाते शब्दकोश

इतबारपण      

श्रद्धाळूपणा; विश्वास; भरवसा; खात्री. इतबारी      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जामीन

पु. १ कुळाचा सावकारास विश्वास राहण्यासाठीं मध्यें विश्वासार्थ राहिलेला माणूस. २ खात्री पटविणारा मध्यस्थ; हमीदार; (इं.) गॅरंटर. 'एवढें विचारांत कां पडले आहां, तुम्ही हें औषध घ्या, गुण न आला तर मी जामीन.' ३ (ल.) पडायाला लागलेल्यास (खांब इ॰स) खालून दिलेला धिरा, जोड तुकडा, आधारभूत वस्तु. ४ पतंगाची दोरी. ही आंचका द्यावयासाठीं असते. ५ (सोंगट्या) तिफाशी सोंगट्यांच्या डावांतील एक विशिष्ट सोंगटी; पक्क्या रंगाची सोंगटी अडकून पडण्यासाठीं कच्च्या रंगाची जी सोंगटी मारतात ती. ६ विरजण (रात्रीच्या वेळीं नासणार्‍या दुधाला विरजण हें जामिनाप्रमाणें असतें म्हणून) [अर.] म्ह॰ जामीन रहा आणि गांठचे वहा. सामाशब्द- ॰कत(द)बा-पु. जामीनकीचा दस्तैवज; जामीनपत्र. [अर.] जामीनकी-स्त्री. १ हमी; जबाबदारी (दिलेली, कबूल केलेली) (क्रि॰ देणें; घालणें, लिहिणें). २ जामीन राहण्याबाबत दिलेला पैसा. ३ आरोपी करारास चुकल्यास जामीनाकडून घेतलेला दंड; जामीनाचा जप्त करावयाचा पैसा. ॰गत-गिरी-स्त्री. १ हमी; आमीनकी. (क्रि॰ देणें; घालणें; करणें) २ (ल.) जामीन होऊन स्वतःला बांधून घेणें. 'येतों म्हटलें त्यापेक्षां भोजनास गेलेंच पाहिजे. एर्‍हवी जामीनगत सुटणार नाहीं.' ॰दार-वि. हमी- दार; हमी घेणारा. ॰तलब-स्त्री. जामीनाची मागणी. 'या निमित्तें साहेबाच्या स्वारांनीं जामीन-तलब केली; त्याजवरून मशारनिल्हेस आपण हजीर-जामन असूं.' -रा १२.१६७. ॰सांखळी-स्त्री. १ एक घराणें दुसर्‍या घराण्यास जामीन राहतें, तिसरें पहिल्यास आणि चौथें तिसर्‍यास याप्रमाणें गांवां- तील सर्व कुटुंबांनीं एकमेकांस जामीन रहाण्याची क्रिया; गांवच्या वसुलाबद्दल सर्व रयतेची संयुक्त जबाबदारी. २ (ल.) एकमेकां- वर अवलंबून असणें; अन्योन्य सापेक्षत्व; संबंधांची सांखळी (कवितांचा भाग, नाटकांचें संविधानक यांतील). 'यांतला एकच खर्डा पाहून हिशेब मनांत येणार नाहीं, कांकीं ही सर्व खर्ड्यांची जामिनसांखळी आहे.'

दाते शब्दकोश

(आ) पु० ओळख, हमी. २ खात्री, ओळख देणारा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

जामीन      

पु.        १. देण्याघेण्याच्या व्यवहारास जबाबदार राहिलेला माणूस. २. खात्री पटविणारा मध्यस्थ; हमीदार. ३. (ल.) पडू लागलेल्या खांब इत्यादीस खालून दिलेला आधारा; जोड तुकडा; आधारभूत वस्तू. [अर.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खास

क्रिवि. १ खचित; निखालस; खात्रीनें; निश्चयपूर्वक. २ बरोबर; तंतोतंत. ३ खुद्द; स्वतः; जातीनें. -वि. १ राजा किंवा राज्यासंबंधीं; सरकारी. २ स्वतःचें; खाजगी; जातीचें. (समासांत) खासपथक; खासपागा. ३ शुद्ध; अस्सल; खरा; चांगला. ४ विशेष; विशिष्ट. ५ निवडक; थोरथोर; उच्च. सामान्य सामासिक शब्द राजकीय अथवा सरकारी या अर्थाचे व कांहीं स्वतःचे किंवा जातीचे या अर्थाचे खासकोठी-खास-खजाना-सरंजाम-जाम- दार-हुजुरात-जामीन-इनाम-नेमणूक इ॰. [अर. खास्स्] विशेष सामाशब्द. ॰आमदानी-स्त्री. नियमित पीक, उत्पन्न. याच्या विरुद्ध शिवाई आमदानी = जादा पीक. ऐन अमदानी हा शब्दहि कधींकधीं या अर्थानें योजतात. ॰खबर-स्त्री. १ खात्री- लायक बातमी. २ सरकारी बातमी. ॰खेल-वि. सेनाखास- खेल; सेनापति. 'एक सेनापती जन्मला । खासखेल सयन ।' ऐपो ७९. ॰गत, खाजगत-वि. १ स्वतःचा; आपला; जातीचा; खाजगी. 'आमचा खासगत वाडा पुण्यास आहे.' २ मालक स्वतः जमाखर्च लिहीत असल्यास हा शब्द तो आपल्या नांवामागें लावतो. -क्रिवि. जातीनें; खुद्द. 'मी खासगत त्यांसच रुपये दिले.' ॰गत राजश्री-(जमाखर्च) मालकाच्या नांवा- मागें लावतात. ॰गाडी-स्त्री. राजाची किंवा स्वतःसाठीं मुद्दाम काढलेली (स्पेशल) आगगाडी. 'खाशांच्या स्वार्‍या खासगाडीनें अगर मोटारीनें जाण्याच्या असल्यास...' -डुकराची शिकार (बडोदें) २. ॰जमीन-स्त्री. १ जमीनदार खुद्द करीत असलेली जमीन. २ जिचा वसूल प्रत्यक्ष सरकार वसूल करतें अशी जमीन. ॰नीस, खासनवीस-पु. खानगी कारभारी; सरकारी हिशेबनीस; (इं.) प्रायव्हेट सेक्रेटरी. ॰निशी-स्त्री. त्याचें काम. 'बाजी मुरार यांचे नातू हे खासनिशी करून...राहिले,' -मराचिसं १. ॰पंगत स्त्री. ज्या पंक्तींत यजमान जेवावयास बसतो ती पंगत; राजाची अथवा सरदारांची पंगत; थोरथोर लोकांची पंगत. २ उच्च जात; शिष्ट वर्ग. ३ निवडक मंडळी. ॰पथ(त)क-न. एखाद्याचे स्वतःचें, खासगी घोडेस्वारांचें पथक; ज्याच्या निशाणाखालीं हे घोडेस्वार चाकरी करितात आणि ज्याच्या खर्चानें ते ठेविले असतात त्याचें पथक; खाशांचें पथक. ॰पथ(त)की-वि. खासपथकासंबंधीं- (स्वार, शिपाई, घोडा). ॰पागा-स्त्री. राजानें अथवा राज्यक- र्त्यानें स्वतः ठेवलेली आणि त्याच्या हुकमांतील घोडेस्वारांची टोळी; घोडदळ. ॰पाग्या-पु.१ खासपागेवरचा अधिकारी. २ खासपागेंतील घोडा किंवा स्वार ॰बंदी-स्त्री. खेड्यांतील कांहीं घराण्यांत वाटेल तशी वांटून दिलेली जमीन व प्रत्येकीचा कांहीं ठोकळमानानें ठरविलेला सारा. ॰बरदार-बार्दार-बालदार- पु. राजा, सरदार किंवा मोठा माणूस यांची बंदूक वगैरे नेणारा सेवक. 'हिंमत बहादुर खासे बालदार' -ऐपो ३३३. ॰बातमी, वर्तमान-स्त्रीन. सरकारी खबर. ॰बारगीर-पु. राजा किंवा सरदार यांचा शरीरसंरक्षक स्वार. ॰बाल-स्त्री. वाळू चिकणमाती यांच्या मिश्रणानें बनलेली जमीन. ही खतावल्यास चांगलें पीक देते. ॰बिघा-पु. खासबंदी गांवांतील कुळांच्या जमिनीचा धारा ठरविण्याचें माप; मोजणीमाप. ॰महाल-पु. १ खाजगी महाल. २ विवाहित पत्न्यांचा महाल; राणीवसा. याच्या उलट खुर्द महाल (रखेल्यांचा महाल). ॰स्वारी-स्त्री. राजा किंवा सरदार यांचा लवाजमा, मिरवणूक; जिलीब; त्याचप्रमाणें स्वतः राजा, अथवा सरदार. खाशी स्वारी पहा.

दाते शब्दकोश

खातीर      

स्त्री.       १. दिलासा; खातरजमा; खात्री. पहा : खातर : ‘मिर्जाची बहुत खातीर केली.’ - दिमरा २·४०. २. समजूत : ‘पाटील बाबांनीं खातीर करून सांप्रत ठेवून घेतलें आहे.’ - दिमरा २·३७. (क्रि. करणे.) पहा : खातर

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खातीर

स्त्री. १ दिलासा; खातरजमा; खात्री. खातर पहा. 'मिर्जाची बहुत खातीर केली.' -दिभरा २.४०. २ समजूत, 'पाटील बाबांनी खातीर करून सांप्रत ठेवून घेतलें आहे.' -दिमरा २.३७. खातर पहा. -शअ. (गो.) साठीं; स्तव; काढणें; करणें; करितां. 'ह्या पॉटाचें पाडजिणें पोटाखातीर ध्यौच उणें.' [अर. खातिर]

दाते शब्दकोश

खातिर जमाई

स्त्री. मनस्तोष; संतोष; समाधान; खात्री. [अर.]

दाते शब्दकोश

खातिरजमाई      

स्त्री.       मनातून आनंद, संतोष; समाधान; खात्री. [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खातरदार, खातरीदार      

वि.       जामीन; खात्री देणारा; विश्वासूपणाबद्दल शिफारस करतो, पण कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही असा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खातरदारी      

स्त्री.       १. खात्री, हमी (माणूस, चिन्ह यांची.) २. आदरातिथ्य; सन्मान. [फा. खातिरदारी]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खातर्दास्त

(स्त्री.) [फा. खातिर्दाश्त] खातर्जमा; समाधान, खात्री; इच्छा. “कितेक आपले खातस्तीस्तव, सर्कारचे उपयोगास्त व रवाना केले असेती” (राजवाडे १।३१०). “हल्ली सर्व गोष्टी तुमच्या प्रत्ययास येऊन चुकल्या; एवढयानें तुमची खातर्दास्त झाली” (खरे
७।३४१७). “मिराचीही खातर्दास्त जाहली जे सर्कारांतून हे गोष्ट ज़ाहली नाहीं” (खरे २।१२०३). “अथवा त्यांची खातर्दास्त पुरेल तेथें जावें” (खरे ९।४९६५).

फारसी-मराठी शब्दकोश

खात्रीदार      

वि.       जामीन. हा खात्री देतो, विश्वासूपणाबद्दल शिफारस करतो पण कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खातरजमा

(फा) स्त्री० खातरी, विश्वास. २ गुमान, हिशोब.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

खातरजमा      

स्त्री.       १. खात्री; विश्वास; संशय, संदेह निराकरण. (क्रि. होणे, करणे, देणे) : ‘एवंच दादासाहेब खातरजमेशीं जात नाहींत.’ - भाब ८४. वि. निःशंक; स्वस्थ : ‘तुम्ही खातरजमा असणें.’ - मइसा १५·२१. [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खातर्जमा

(स्त्री.) [फा. खातिर्जम्अ] स्वास्थ्य; समाधान, संशय-निराकरण; खातरी; हिम्मत; आत्मविश्वास; हिशेब; पर्वा; स्वस्थ. “खानर्जमई” (राजवाडे ५।६८). “एक वेळ लढाई खातर्जमेची द्यावी; त्यांत यश-अपेश देणार भगवन्त” (खरे ११।६०८४). -“अम्मळशी नज़र वांकडी करून खावन्द पाहूलागल्यास क्षणांत मज्बुती अथवा खातर्जमा असेल ते नाहींशी होऊन डोळे उघडतील” (मदबा २।२८). “तुम्ही खातर्जमा असणें” (राजवाडे १५।२१).

फारसी-मराठी शब्दकोश

खमीर      

भरवसा; खात्री. खमीर      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खसूस

वि. निश्चित; खचित; विशेष निखालस; निःसंशय. 'अशी खसूसू खात्री होईल तरच दिला पाहिजे' -खाअं बडोदें १३७. [अर. खसूस = विशेष]

दाते शब्दकोश

खसूस      

वि.       निश्चित; खचित; निखालस; निःसंशय : ‘अशी खसुसू खात्री होईल तरच दिला पाहिजे.’ - खाअंबडोदे १३७. [फा. खुसूस]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

माजरत

स्त्री. खातरजमा; खातरी. 'कलह परस्परे दूर करवावया व जुंजास आम्ही इच्छित नव्हतों ये गोष्टीची माज- रत करावी इतक्या गोष्टी शाहाचे रुबरु करार जाल्या.' -पेद २१.२०२. [फा.]

दाते शब्दकोश

मानो

पु. (कु.) प्रमाण; खात्री. 'तो परत येय्तच हेचो मानो काय?' [मान = प्रमाण]

दाते शब्दकोश

मूषहूद

वि. स्पष्ट; उघड; खात्री केलेलें; सिद्ध. 'त्या खात्यांतील फिकरा पारसी व त्याचा तरजुमा हिंदवी करुन पाठविला आहे त्याजवरोन मुफसल मुषहुद होईल.' -रा १०.२३४. [अर. मूष हूद = स्पष्ट]

दाते शब्दकोश

नाभि(भी)कर-कार

पु. १ (काव्य) भिऊं नको असें आश्वासन; याबद्दल उच्चारण्याचा शब्द. -ज्ञा १०.७. 'ब्रह्मेया नाभीकारू दीन्हला ।' -दाव ४७७. २ अभयवचन; खात्री; विश्वास. 'मग कृपाळु यदुवीर । तयांसी दीधला नाभीकर ।' -ह २६.१८६. 'ऐसा जंव धावा केला । तंव ईश्वरू पावला । सकळिकां दीधला । नाभीकारू ।' -कालिका ११.८३. [सं. ना + भी + कर, कार]

दाते शब्दकोश

नाभीकार, नाभिकार      

पु.       भिऊ नकोस असे आश्वासन; याबद्दल उच्चारण्याचा शब्द; अभयवचन; खात्री; विश्वास : ‘ब्रह्येया नाभीकारू दीन्हला ।’ – दाव ४७७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नाक      

न.       १. श्वास व वास घेण्याचे इंद्रिय; श्वासनलिकेची सुरुवात; घ्राणेंद्रिय; नासिका. २. (ल.) धान्य, बटाटे इ.ला ज्या ठिकाणी मोड येतो ती जागा; डोळा. ३. सुई, दाभण इ.चे भोक; नेडे. ४. (कुटुंब, सभा इ.तील) मुख्य उत्कृष्ट मनुष्य; देशातील मुख्य शहर किंवा किल्ला. ५. नथीकरता नाकाला पाडलेले भोक, छिद्र. ६. धीटपणा; दम; खात्री. ७. निलाजरेपणा. ८. अब्रू; चांगली कीर्ती, नाव; उजळ माथा. [सं. नासिका] (वा.) नाक ओरबाडणे–नाकातील अलंकार हिसकून घेणे. नाक कापणे–खोडकी, गर्व जिरविणे; पराभव करणे. (आपले) नाक कापून दुसऱ्याला अपशकुन, अवलक्षण करणे–दुसऱ्याचे नुकसान व्हावे म्हणून आपला स्वतःचा नाश करून घेणे. नाक कापून पाटावाने पुसणे–एखाद्याची मोठी अप्रतिष्ठा करून नंतर थोडा सन्मान करणे. नाक खाजवणे–चिडवणे; वेडावणे; खिजवणे. नाक खाली पडणे, नाक पाडणे, नाक होणे–गर्व नाहीसा होणे, करणे; मानहानी होणे. नाक गुंडाळणे–आपला कमीपणा, पराभव कबूल करणे; शरण जाणे; क्षमा मागणे. नाक गेले तरी भोके राहिली आहेत असे म्हणणे–मागील गुन्ह्याची लाज सोडून पुन्हा निर्लज्जपणे बोलणे, वागणे. नाक घासणे–१. आर्जव, खुशामत करणे; हांजी हांजी करणे. २. क्षमा मागणे; चूक कबूल करणे. नाक चढवून बोलणे–उद्धटपणाने बोलणे. नाक ठेचणे –फजिती करणे; नक्षा उतरणे; खोड मोडणे. नाक जळणे,नाकातले केस जळणे–फार दुर्गंधी येणे. नाक झाडणे–१. तिरस्कार दाखवणे; ताठा, गर्व उतरविणे. २. नाक शिंकरणे. ३. घोडा इ. जनावराने जोराने नाकातून वारा काढणे. नाक तोडून कडोस्त्रीला खोवणे–१. भीक मागण्यासाठी लाजलज्जा सोडणे; अगदी लोचट बनणे. २. नापसंती दाखवणे; नावे ठेवणे. नाक धरणे–वाट पाहायला लावणे; खोळंबा करणे. नाक धरल्यास, नाक दाबल्यास तोंड उघडणे–एखाद्याला पेचात धरल्याशिवाय तो आपल्या म्हणण्याला कबूल होत नाही म्हणून त्याला पेचात धरणे. नाक धरून बसणे–१. (प्राणायामावरून) धार्मिक कृत्यांत गुंतलेला असणे. २. कर्तव्य न करता वेळ दवडणे. नाक मुठीत धरून जाणे–निरुपायाने, नाइलाजाने शरण जाणे; अभिमान सोडून जाणे.नाक मुरडणे, नाक मोडणे–नाक वाकडे करून नापसंती दर्शविणे; फजिती उडवणे; गर्व उतरवणे. नाक लावून (करणे)–धिटाईने; निलाजरेपणाने (करणे). नाक वर करणे, नाक वर करून चालणे, नाक वर असणे–१. दिमाख, ताठा, गर्व, निर्लज्जपणा दाखवणे; वरचढ असणे. २. स्वतः दोषी असतानाही दिमाख दाखवणे; शरम न वाटणे. नाक वाहणे–पडसे येणे. नाक सावरणे– (बायकी) मूल जन्मल्याबरोबर त्याला न्हाऊ घालताना त्याच्या नाकात तेलाचे एकदोन थेंब सोडून त्याच तेलाच्या हाताने नाकाच्या वरच्या भागापासून शेवटपर्यंत हलके चोळणे. नाकधुऱ्याकाढणे, नाकदुऱ्या काढणे–१. अतिनम्रपणाने विनवणे; शरण जाणे; क्षमा मागणे. २. केलेल्या अपराधाबद्दल प्रायश्चित्त भोगणे. नाकपुड्या पिंजारणे, नाकपुड्या फुलविणे, नाकपुड्या फुगविणे, नागपुड्या फुरफुरविणे, नाकपुड्या फेंदरणे–रागाने खेकसणे; अंगावर जाणे; नाक फुगवून राग दाखविणे. नाकमुष्ट्या हाणणे–हिणवणे; नाराजी दाखवणे. नाकाचा कानवला करणे–नाक मुरडणे. नाकाची घाण मरणे, जाणे –१. सवयीमुळे, पडशामुळे वास न येणे; सवय होणे. २. (ल.) सवयीमुळे वाईटाचा तिरस्कार न वाटणे. नाकात काड्या घालणे–चिडवणे; टोमणे मारणे; कुरापत काढणे; चीड येईल असे वागणे. नाकात दम येणे–निरुपाय होणे; अत्यंत थकणे. नाकात बोलणे– नाकातून, गेंगाण्या स्वरात बोलणे; (कोकणी लोकांप्रमाणे) अनुस्वारयुक्त बोलणे. नाकातोंडाची गुंजडी करणे– (नाक, तोंड आवळून, चंबूसारखे करून) राग, नापसंती दाखवणे. नाकाने कांदे, वांगी सोलणे–१. नसता, खोटा शुचिर्भूतपणा दाखवणे; उगीच पावित्र्याच्या गोष्टी सांगणे. २. एखादे वेळी फार चोखंदळपणा करणे पण एरवी वाटेल तसे वागणे. नाकापेक्षा मोती जड होणे–गौण वस्तूला अधिक महत्त्व प्राप्त होणे; कनिष्ठ दर्जाचा मनुष्य वरिष्ठाहून वरचढ होणे. नाकाला चुना लावणे, नाकाला चुना लागणे– १. बदनाम करणे, होणे : ‘सोसे कुलजा मृत्यु, न अयशाचा सोसवे चुना नाकीं ।’ – मोद्रोण २१·५८. २. डिवचणे. नाकाला जीभ लावणे, झिमोटा घालणे – तिरस्कार दाखवणे; गर्व, ताठा, दिमाख दाखवणे; नाक मुरडणे. नाकाला पदर लावणे– १. लज्जेने, अपर्कीतीमुळे तोंड झाकणे. २. घाणीचा तिरस्कार करणे. नाकाला मिरच्या झोंबणे–एखादी गोष्ट मनाला, वर्मी लागणे. नाकावर असणे–अगदी तयार असणे. नाकावरची माशी तरवारीने हाणणे–लवकर राग येणे. (व.) नाकावर जीव येणे–कमालीचे कष्ट पडणे. नाकावर टिचणे–१. एखाद्याचे पैसे ताबडतोब देणे. २. काकूं न करता, अडथळ्याला न जुमानता एकदम देणे, करून टाकणे. नाकावर निंबू घासणे,नाकावर निंबूपिळणे– प्रतिपक्षाला न जुमानता आपले काम साधणे; प्रतिपक्षाला चीत करणे. नाकावर पदर येणे–१. वैधव्य येणे. २. लाजेने लपून एकांतवासात बसणे. नाकावर पाय देणे–विरोधाची पर्वा न करणे; प्रतिपक्षावर मात करणे. नाकावर बोट ठेवणे–१. गुप्त ठेवायला, गप्प बसायला सांगणे. २. (रागाने किंवा अन्य कारणाने एखाद्याला) दबकावणे. नाकावर माशी बसू न देणे–अतिशय चिडखोर असणे; अपमान किंवा तिरस्कार अगदी सहन न होणे; थोडेदेखील उणे बोलणे सहन न होणे. नाकावर वाट करणे –विरोधाला न जुमानता काम सिद्धीला नेणे. नाकाशी सूत धरणे–अगदी मरणोन्मुख होणे. (मरताना श्वास आहे की नाही ते पाहण्यासाठी नाकाशी सूत धरतात). नाकासमोर जाणे, चालणे–अगदी सरळ मार्गाने जाणे. नाकाहोटांवर जेवणे–चाखतमाखत, चोखंदळपणाने जेवणे. नाकीचा बाल, नाकाचा बाल–१. अत्यंत आवडता, जिवलग माणूस; गळ्यातला ताईत. २. मोठ्यांच्या परमप्रीतीतला दुर्जन. नाकी नऊ, नळ, नव येणे–१. अतिशय दमणे, कंटाळणे, भागणे (श्रमाने). २. (नऊ इंद्रियांची शक्ती नाकात येणे) मरणाच्या दारीअसणे. नाकी वेसण घालणे–एखाद्याला कह्यात, कबजात ठेवणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नाक

न. १ घ्राणेंद्रिय; नासिका. २ (ल.) धान्य, बटाटे इ॰काला ज्या ठिकाणीं मोड येतो ती जागा; डोळा. ३ सुई, दाभण इ॰काचें भोंक; नेडें. ४ (कुटुंब, सभा इ॰कांचा) मुख्य उत्कृष्ट मनुष्य; देशांतील मुख्य शहर किंवा किल्ला. 'पुणें हें देशाचें नाक आहें. ५ नथेकरितां नाकास पाडलेलें भोंक, छिद्र. 'नाक तुटणें, बुजणें.' ६ धीटपणा; दम; खात्री. निलाजरेपणा; उजळ माथा. 'तेथें मी कोणत्या नाकानें जाऊं.' ७ अब्रू; चांगली कीर्ति, नांव. 'माझें नाक गेलें, गमावलें.' [सं. नासिका; प्रा. णक्क; फ्रेंजि. नख; पोजि. नकी] (वाप्र.) ॰ओरबडणें-नाकांतील अलंकार हिसकून घेणें. ॰कापणें-खोडकी, गर्व जिरविणें; पराभव करणें; ॰(आपलें) कापून दुसर्‍यास अपशकून, अवलक्षण करणें-दुसर्‍याचें नुकसान व्हावें म्हणून आपला स्वतःचा नाश करून घेणें. ॰कापून पाटावानें पुसणें-एखाद्याची मोठी अप्रतिष्ठा करून नंतर थोडा सन्मान करणें. ॰खाजविणें-चिड- विणें. ॰खालीं पडणें-पाडणें-होणें-गर्व नाहींसा होणें, करणें; मानहानि होणें. ॰गुंडाळणें-आपला कमीपणा, पराभव कबूल करणें; शरण जाणें; क्षमा मागणें. ॰गेलें तरी भोकें राहिलीं आहेत असें म्हणणें-पुन्हां निर्लज्जपणें बोलणें, वागणें; मागील गुन्ह्याची लाज सोडून चालणें. ॰चिरून मीठ भरणें-एखाद्यास फजीत करणें; नकशा उतरविणें. ॰घासणें-१ आर्जव, खुशामत करणें; हांजी हांजी करणें. २ क्षमा मागणें; चूक कबूल करणें. ॰चेचणें- ठेचणें-१ फजीती, पारिपत्य होणें, करणें. २ नक्षा उतरणें; खोड मोडणें. ॰जळणें, नाकांतले केस जळणें-फार दुर्गंधि येणें. ॰झाडणें-१ नाक चेचणें; तिरस्कार दाखविणें; ताठा, गर्व, उतरविणें. २ नाक शिंकरणें. ३ घोडा इ॰ जनावरानें नाकां- तून वारा काढणें. ॰तोंड मुरडणें-नापसंति दर्शविणें; नावें ठेवणें. ॰तोडून कडोस्त्रीस खोवणें-भीक मागण्याकरितां लाजलज्जा सोडून देणें; अगदीं लोंचट बनणें. ॰धरणें-वाट पहावयास लावणें; खोळंबा करणें. ॰धरल्यास किंवा दाबल्यास तोंड उघ- डणें-एखाद्यास पेंचांत धरल्याशिवाय तो आपल्या म्हणण्यास कबूल होत नाहीं या अर्थीं. (नाक व तोंड यानीं श्वासोछ्श्वास होतो. त्यापैकीं एक दाबलें तर दुसरें उघडावेंच लागतें). ॰धरून बसणें- (प्राणायामावरून) धार्मिक कृत्यांत गुंतलेला असणें, वेळ घालविणें. (ल.) कर्तव्य न करतां वेळ गमावीत बसणें. ॰पुडया पिंजा- रणें-फुलविणें-फुगविणें, फुरफुरविणें-फेंदरणें-रागानें खेंकसणें; अंगावर जाणें; नाक फुगवून राग दाखविणें. ॰फेडणें- नाक शिंकरणें. ॰मुठींत धरून जाणें-निरुपायास्तव, नाइला- जानें शरण जाणें; अभिमान सोडून जाणें. ॰मुक्यापुढें खाज- विणें-चिडविणें; क्षोभविणें. ॰मुरडणें-मोडणें-नाक वाकडें- तिकडें करून नापंसति दाखविणें. ॰मुष्ट्या हाणणें-(व.) हिण- विणें; नाराजी दर्शविणें. 'नाकमुष्ट्या हाणूं हाणूंच बेजार, स्वतः तर काम होईना.' ॰मोडणें-फजीती उडविणें; गर्व उतरविणें. ॰लावून(करणें)-क्रिवि. धिटाईनें; निलाजरेपणें. ॰वर करणें- वर करून चालणें-वर असणें-१ दिमाख, ताठा, गर्व, निर्लज्जपणा दाखविणें; वरचढ असणें. २ स्वतः दोषी असतांनाहि दिमाख दाखविणें; शरम न वाटणें. ॰वाहणें-पडसें येणें. ॰सावरणें-(बायकी) मूल जन्मल्याबरोबर त्यास न्हाऊ घाल- तांना त्याच्या नाकांत तेलाचे एकदोन थेंब सोडून त्याच तेलाच्या हातानें नाकाच्या वरच्या भागापासून शेवटपर्यंत हलकें चोळणें. नाकाची घाण मरणें-जाणें-१ संवईमुळें किंवा पडशामुळें वास न येणें; संवय होणें. २ (ल.) वाइटाचा तिरस्कार न येणें. नाकांत काड्या घालणें-चिडविणें; टोमणे मारणें; कुरापत काढणें; (एखाद्यास) चीड येईल असें कृत्य करणें. 'हरिच्या पुनःपुन्हां कां काड्या नाकांत घालिशी शशका' -मोसभा ४.८४. नाकांत काड्या जाणें-रुसणें; चिडणें; राग येणें. नाकांत दम येणें- (माळवी) नाकीं नऊ येणें. नाकांत बोलणें-नाकांतून, गेंगाण्या स्वरांत शब्द काढणें; अनुस्वारयुक्त बोलणें (कोंकणी लोकांप्रमाणें). नाकातोंडाची गुजंडी करणें-(नाक, तोंड आवळून, चंबू- सारखें करून) राग किंवा नापसंति दाखविणें. उंच्या नाकानें (करणें, बोलणें, वागणें, फिरणें)-मिजासीनें, निलाजरे- पणानें, (करणें इ॰). नाकानें कांदे-वांगीं सोलणें-१ नसता, खोटा शुचिर्भूतपणा दाखविणें; उगीच पावित्र्याच्या गोष्टी सांगणें. २ एखादे वेळीं फार चोखंदळपणा करणें पण एरवीं वाटेल तसें वागणें (ढोंगीपणा दाखवितांना वापरतात). नाकापेक्षां मोतीं जड होणें-(एखाद्याच्या अंगचा खरा गुण लोकांच्या अपेक्षेहून कमी आहे असें निदर्शनास आल्यावर योजतात) एखाद्या गौण वस्तूला अधिक महत्त्व प्राप्त होणें; कनिष्ठ दर्जाचा मनुष्य वरिष्ठा- हून वरचड होणें; (नाकास शोभा आणण्याकरितां मोतीं असतें पण तें जड झालें तर नाकास इजा होईल यावरून). तुल॰ सासूपेक्षां सून अवजड. नाकाला जीभ लावणें-तिरस्कार दाखविणें; गर्व, ताठा, दिमाख दाखविणें; नाक मुरडणें. नाकावर झिमोटा घालणें-तिरस्कार दाखविणें; नाक मुरडणें. नाकावर असणें- अगदीं तयार असणें. 'राग कसा त्याच्या अगदीं नाकावर आहे.' नाकावरची माशी तरवारीनें हाणणें-(व.) लवकर राग येणें. नाकावर निंबु घासणें-पिळणें-प्रतिपक्ष्यास न जुमानतां आपलें कार्य साधणें; प्रतिपक्ष्यास चीत करणें. नाकाला- पदर लावणें, लागणें-१ लज्जेनें, अपकीर्तीमुळें तोंड झाकणें. २ घाणीचा तिरस्कार करणें. नाकावर टिचणें-१ एखाद्याचे पैसे ताबडतोब देणें. २ काकूं न करतां, अडथळ्यास न जुमानतां एकदम देणें, करून टाकणें. नाकावर पदर येणें-१ वैधव्य येणें. २ लाजेनें लपून एकांतवासांत बसणें. नाकावर पाय देणें- विरोधाची पर्वा न करणें; प्रतिपक्ष्यावर मात करणें. नाकावर बोट ठेवणें-गुप्त ठेवण्यास किंवा गप्प बसण्यास सांगणें; (रागानें किंवा अन्य कारणानें एखाद्यास) दबकावणें. नाकावर माशी बसूं न देणें-अतिशय चिडखोर, क्रोधी असणें; अपमान किंवा तिरस्कार अगदीं सहन न होणें; थोडें देखील उणें बोलणें न सोसणें. 'जागृदवस्थेंत जसी नासाग्रीं बैसली नरा माशी ।' -मोगदा ५.२ नाकावर म्हशीनें पाय देणें-नाक नकटें, बसकें, चपटें असणें. नाकावर वाट करणें-विरोधास न जुमा- नतां काम सिद्धीस नेणें, करणें; नाकावर पाय देणें. नाकाशीं सूत धरणें-अगदीं मरणोन्मुख होणें (मरतांना श्वास आहे कीं नाहीं हें पाहण्याकरितां नाकाशीं सूत धरतात). नाकास चुना लावणें-नाकावर लिंबू पिळणें, पाय देणें पहा. 'सोसे कुलजा मृत्यु, न अयशाचा सोसवे चुना नाकीं ।' -मोद्रोण २१.५८. नाकास पदर येणें-बेअब्रू होणें; लाज वाटणें; मानखंडना होणें. नाकास मिरची झोंबणें-एखादी गोष्ट मनास लागणें; वर्मी लागणें. नाकासमोर जाणें-अगदीं सरळ मार्गानें जाणें. नाका- होंटावर जेवणें-चाखतमाखत खाणें; चोखंदळपणानें जेवणें. ॰दुराही, नाकधुर्‍या काढणें-१ अति नम्रपणानें विनविणें; शरण जाणें; क्षमा मागणें. 'सद्गति दे म्हणुनिच तो जाणा काढी मयूर नाकधुर्‍या ।' -भक्तमयूरकेकावली प्रस्तावना. २ कृताप- राधाबद्दल प्रायश्चित्त भोगणें. नाकीं नव-नळ येणें-१ अति- शय कंटाळणें; दमणें; भागणें (कामानें, श्रमानें). २ (नऊ इंद्रि- यांची शक्ति नाकांत येणें) मरणाच्या दारीं असणें. नाकीं वेसण घालणें-एखाद्यास कबाजांत, कह्यांत ठेवणें. नाकीं-नाक(का)चा बाल-अत्यंत आवडता, जिवलग, मोलवान् माणूस; गळ्यांतील ताईत; मोठ्याच्या परम प्रीतींतील दुर्जन (नाकांतील केंस काढतांना फार त्रास होतो म्हणून त्यांस फार जपतात त्यावरून). म्ह॰ (व.) १ नाक नकट तोंड वकट = कुरूप, अष्टावक्र अशा माणसास उद्देशून म्हणतात. २ नाकांत नाहीं कांटा, रिकामा ताठा-(बायकी, सोलापुरी) ३ (गो.) नाक गेल्यावर काय माझा चवरी गोंडा हाय = निलाजरा मनुष्य आपली कितीहि अब्रू गेली तरी पुन्हां नाक वर करतोच. सामा- शब्द- चिंबा-वि. बसल्या नाकाचा; नकटा. ॰तोडा-ड्या- पु. १ एक मोठ्या जातीचा टोळ. २ गवत्या टोळ (नाक तोडतो यावरून). ॰दुर-राई, ॰धुराई-धुरी-स्त्री. १ पश्चात्ताप दाखविण्यासाठीं नाक घासणें. 'माझ्या अपमानाबद्दल त्यानें किती जरी नाकधुर्‍या काढल्या तरी...बोलायची नाहीं.' -बाबं ४.३. २ (ल.) नम्रतेची विनंति (क्रि॰ काढणें). ॰पट्टी-स्त्री. (मल्लविद्या) जोडीदाराच्या कानावरून व गालावरून आपल्या हाताची पोटरी जोडीदाराच्या नाकपुडीवर दाबून वर दाब देऊन त्याला चीत करणें. ॰पुडी-स्त्री. नाकाचें एक पूड; नासारंध्र. [सं. नासापुट] म्ह॰ (व.) नाकपुडींत हरिकीर्तन = लहान जागेंत मोठें कार्य करा- वयाचें झाल्यास म्हणतात. ॰भुंकन-वि. नाकावर भोवरा अस- लेला (घोडा). नासिकावर्त पहा. -मसाप २.५७. ॰मोड-स्त्री. नकार दर्शविणें; तिरस्कारयुक्त नापसंती. ॰वणी-न. १ तपकीर; नस्य. २ नाकांत ओतावयाचा तीक्ष्ण पदार्थ. 'नाकवणी चुनवणी ।' -दा ३.७.६८. 'एका देती नाकवणी । काळकुटाचे ।' -ज्ञाप्र २९५. [नाक + वणी = पाणी] ॰शिंकणी-स्त्री. एक वनस्पति; भुताकेशी; हिच्या पानाच्या वासानें शिंका येतात. ॰शिमरो- वि. १ (गो.) नकटा. २ निलाजरा. [नाक + शिमरा = बसकें] ॰सूर- पुअव. नाकांतून बाहेर पडणारी हवा, श्वास. (क्रि॰ वाहणें; बंद होणें). ॰सुरॉ-वि. (गो.) नाकांतून येणारा (आवाज); गणगणा; गेंगाणा. नाकाचा दांडा-वासा-पु. नाकाचें लांबट हाड. नाकाचा पडदा, नाकाची पडदी, नाकाची भिंत-पुस्त्री. दोन नाकपुड्यांतील पडदा. नाकाचा शेंडा-नाकाची बोंडी- पुस्त्री. नाकाचा अग्रभाग. नाकाचो कवळो करप-(गो.) कंटा- ळणें. नाकाटणी, नाकाटी-स्त्री. रग जिरविणें; नक्षा उतरविणें; खरडपट्टी काढणें; नाक खालीं करावयास लावणें. (क्रि॰ करणें). [नाक + काटणी] नाकाटणें-नाकाटणी करणें. नाकाड-डा-नपु. (निंदार्थी) १ मोठें नाक. २ डोंगराचा पुढें आलेला नाकासारखा भाग. 'या नाकाडाचे पलीकडे आपला गांव आहे.' ३ भूशिर; जमीनीचें टोंक. ४ आंब्याच्या फळाचा मागील बाजूचा नाका- सारखा उंच भाग. नाकाड-ड्या-वि. मोठें आणि कुरूप नाक असणारा. नाकाडोळ्याचा(कानाचा)वैद्य-पु. साधारण, कामचलाऊ वैद्य. वैद्यकविद्येंत फारसा वाकबगार नसलेला वैद्य; वैदू. नाका डोळ्यानें सुरेख-वि. सुस्वरूप; देखणा; रेंखीव बांध्याचा. नाकादाई-स्त्री. (व.) खोड. खरडपट्टी. (क्रि॰ काढणें). 'खूप नाकादाई काढली आधीं, मग जेवूं घातलें.' नाका- वर रडें-न. रडण्याची तयारी, तत्परता; लवकर रडूं येणें. नाका- वर राग-पु. चिडखोरपणा; ताबडतोब रागावणें. नाकीचें मोतीं-न. नथ; बुलाख. 'नाकींचें मोतीं सुढाळ ।' -ह ५.१९७. नाकील-वि. सरळ, लांब व सुंदर नाक असणारा. नाकेला पहा. नाकु(को)स्ती, नाकु(को)ष्टें-स्त्रीन. नापंसति; नकार दाखवि- ण्याकरितां तिरस्कारानें नाक मुरडणें. (क्रि॰ मारणें; देणें; हाणणें). नाकेल-ला-वि. नाकील पहा. 'नाकेला अन् गुलजार । सांवळा नि सुंदर भासे ।' -बाल शिवाजी. नाकोटा-टें-पुन. (निंदार्थी) नाक.

दाते शब्दकोश

नि      

अ. उप.       १. खात्री; निखालसपणा. २. नकार; अभाव. उदा. निकोप, निकामी. ३. अतिशयता. उदा. निमग्न. [सं. निर्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नि

अ. एक उपसर्ग. याचे कांहीं अर्थः १ खातरी; निखाल- सपणा. २ नकार; अभाव; राहित्य. जसें निकोप; निकामी. ३ अतिशयिता. जसें:-निमग्न; इ॰. कधीं हा उपसर्ग निरर्थक, अनवश्यक असाहि लागतो. [सं. निर्]

दाते शब्दकोश

निभ्रांत

स्त्री. विक्रिवि. (प्र.) निर्भ्रांत पहा. निःशंक; निःसंशय. -ज्ञा २.१६५. 'ऐसें जाणा हो निभ्रांत । देव वैष्णवांचा अंकित।' -तुगा २१९८. 'म्हणौनि केलिया निभ्रांत । सांपडेचि तो ।' -ज्ञा १८.९११. निभ्रांती-स्त्री. खात्री; निःसंशय.

दाते शब्दकोश

निखालस

वि. १ स्पष्ट; साफ; निर्भिड; उघड; निश्चित; रोखठोक; सरळ; शुद्ध; निर्भेळ (मनुष्य, भाषण, वागणूक इ॰). 'चल सालसपण धरुनि निखालस खोट्या बोला बोलुं नको ।' -अफला ६०. २ वेगळा; भिन्न; निराळा; दुसरा; पृथक्. ३ संबंध- रहित. 'आमची जागा निखालस आहे.' -क्रिवि. १ निश्चयपूर्वक; स्पष्टरीतीनें; खात्रीनें. 'शिवाजी निखालस आपले पदरींचा गेला.' २ निक्षून; लाभलोभ, भीडभाड न धरितां. ३ निवळ; केवळ; पूर्णपणें; शुद्धपणें; निक्खळ. 'देशस्थ ब्राह्मण निखालस स्वराज्या- भिष्ट वृद्धीस जिवाची तमा न धरितां झटले.' -चित्रगुप्त १२३. [नि + अर. खालिस्] निखालसता, निखालसी-स्त्री. १ खात्री; खचितपणा; निश्चय; ठामपणा. 'त्याचे येण्याची निखा- लसता कांहीं दिसत नाहीं. २ संशयनिवारण; खातर्जमा. ३ शुद्धभाव; स्नेह. 'हरतर्‍हा होऊन निखालसीचा प्रकार घडेल या अंदेशावर मी बोलतों.' -पया २३६. ॰पत्र-न. यजीदपत्र; सोडचिठ्ठी. -रा २०.४१९.

दाते शब्दकोश

निखालसना; निखालसी

(स्त्री.) शुद्धभाव; संशयनिवारण; खात्री; खातर्जमा; स्नेह. “निखालसी” (खरे ९|४८४२). “हरतर्हा होऊन निखालसीचा प्रकार घडेल या अन्देशावर मी बोलतों” (साने-पयाव २३६).

फारसी-मराठी शब्दकोश

निनावा

पु. (कों.) दोषरहिततेविषयींची खात्री; निर्वाळा. निधडा अर्थ १ पहा. 'त्याला चाकर ठेवा त्याचा मी निनांवा देतों.

दाते शब्दकोश

निनावा      

पु.       निर्दोषत्वाची खात्री, निर्वाळा. (को.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निर्

एक अव्यव आणि उपसर्ग. याचे कांहीं अर्थ. १ खातरी; हमी; आश्वासन. २ नकार; अभाव. [सं.]

दाते शब्दकोश

निर्      

अ. उप.       १. खात्री; हमी; आश्वासन. २.नकार; अभाव. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निर्भ्रांत, निर्भ्रांती      

स्त्री.       खात्री; विश्वास; निश्चय; मनाचा निःशंकपणा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निर्भ्रांत-ती

स्त्री. खातरी; विश्वास; खातरजमा; मनाचा निशं:कपणा; निश्चय. निभ्रांत-वि. निःसंशय; खचित, खातरीचा; निश्चयाचा. -क्रिवि. १ खातरीनें, निश्चयानें. २ कां कू न करतां; न कचरतां; निःशंक; निर्भयपणें. [सं.]

दाते शब्दकोश

निर्धार      

पु.       १. निश्चय; खात्री; विश्वास. २. संकल्प; ठाम उद्देश. ३. निकाल; निर्णय; निःसंदिग्धता. ४. नियम; नेम. ५. आधार; आश्रय. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निर्धारण      

न.       १. निश्चय, खात्री करणे; ठरवणे. २. संदेहाभाव. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निर्वाळा

पु. १ खातरी; विश्वास; समाधान; निर्धास्तपणा. 'हा गडी तुम्ही चाकरीस ठेवा, ह्याचा निर्वाळा मी देईन.' (क्रि॰ असणें; होणें; देणें). २ निवाडा; निश्चय. 'परिहसैं भूपाळा । मि क्षेमेचा निर्वाळा ।' -भाए २७३. ३ शुद्धता. ४ परिपक्वदशा. 'कीं विरूढलिया जोंधळा । कणिसाचा निर्वाळा । वेचला कीं आगळा । दिसतसे ।' -ज्ञा १४.१२६.

दाते शब्दकोश

निर्वाळा      

पु.       १. खात्री; विश्वास; समाधान; निर्धास्तपणा. (क्रि. असणे, होणे, देणे.). २. निवाडा; निश्चय. ३. शुद्धता. ४. परिपक्व दशा : ‘कीं विरूढलिया जोंधळा । कणिसाचा निर्वाळा ।’ - ज्ञा १४·१२६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निश्चित

वि. ठराविक; खचित; कायम. [सं. निश्चय] ॰अर्थ-पु. १ ठराविक; ठाम गोष्ट. २ खातरी. निश्चिति-स्त्री. निश्चय. 'जैसी आत्मज्ञानविखीं । जंव निश्चिती नाहीं निकी ।' -ज्ञा १८.१५२. -क्रिवि. (काव्य) निश्चयानें; खातरीनें; खचित. 'वशिष्ठें कथिलें निश्चिति ।'

दाते शब्दकोश

निश्चय

पु. १ निर्धार; करार. 'सरकार अधिक पैसा मागतें परंतु द्यावयाचा नाहीं असा निश्चय झाला.' २ निर्णय; ठराव; निकाल; अखेरचा फैसला; ठाम मत. 'दुरून रुपें आहे असा भास झाला, हातीं घेतल्यानंतर शिंपी असा निश्चय ठरला.' ३ विश्वास; पूर्ण खातरी; भरंवसा; श्रद्धा. 'शहाण्या मनुष्याचे वाक्यावर निश्चय ठेऊन चालावें.' ४ खात्रीनें होणारी गोष्ट; सिद्धांत; अवश्यंभाविता. 'सूर्यास्तानंतर रात्र होईल या गोष्टीचा निश्चय आहे.' याच्या उलट दैवघटितत्व. -क्रिवि. खातरीनें; न चुकतां; निंसंशय. [सं.] ॰पूर्वक, निश्चयात्मक-वि. खातरीचा; खचित. निश्चयाचा पहा. -क्रिवि. निश्चय (-क्रिवि.) पहा. निश्चयाचा-वि. १ न बदलणारा; निर्णीत; अचंचल. २ ज्याबद्दल शंका, प्रश्न उत्पन्न होणार नाहीं असा.

दाते शब्दकोश

निश्चय      

पु.       १. निर्धार; करार. २. निर्णय; ठराव; निकाल; अखेरचा फैसला; ठाम मत. ३. विश्वास; पूर्ण खात्री; भरवसा; श्रद्धा. ४. खात्रीने होणारी गोष्ट; सिद्धान्त.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पारख

स्त्री. १ परीक्षा; तपासणी; चांचणी. 'पहिल्याच भेटीबरोबर पारख केली म्हणायची.' -नाकु ३.११. २ नाणें, हिरा, मोती, माणिक इ॰ची किंमत ठरविणें; दर्जा, भाव ठरविण्याचें ज्ञान. 'स्तुति करायला गुणांची पारख पाहिजे.' -गर्वनिर्वाण ८८. ३ किंमत; योग्यता; दर्जा. 'मी तों नसें रे तुज पारखीसी । पदोपदीं कां मज पारखीसी ।' -स ४.१४. -पु. १ पोतदार; पैसा पारखून घेणारा अधिकारी. २ सावकार. 'त्याचा पारख त्याला कर्ज देईनासा झाला.' -धर्माजी ८. [सं. परीक्ष् प्रा. परिक्खा; गुज. सिं. पारख] पारखाणावळ, पारखाई-स्त्री. नाणें, हिरा, मोती इ॰चा दर्जा, कस, किंमत इ॰ची परीक्षा करण्याबद्दल दिलेली मजुरी; पारखण्याची मजुरी; सराफी. [पारख] पारखणी-स्त्री. (नाणें इ॰ची) पारख करणें; परीक्षा; तपासणी. [पारखणें] पारखणें-क्रि. १ परीक्षा करणें; तपासणें. २ (नाणें इ॰ची) किंमत, दर्जा इ॰ ठरविणें. 'म्हणोनि फुडे । पारखावें खरें कुडें ।' -ज्ञा ८.२४२. ४ (गो.) अजमास करणें. [सं. परीक्ष् (परीक्षा करणें)] ॰सुलाखणें-उक्रि. परीक्षा करून खात्री करून घेणें; प्रचीति पाहून अनुभव घेणें; सारासार विचार, न्याय करून ठरविणें. (सोनें पारखतांना तें एक जिन्नसी आहे किंवा नाहीं तें पाहण्याकरितां त्यास सुराख म्हणजे छिद्र पाडतात त्यावरून; तावून सुलावून पहा) पारखून सुलाखून- असा प्रयोग रूढ आहे. (क्रि॰ पाहणें-ठेवणें-देणें-घेणें-आणणें). म्ह॰ पारखून केला पति आन् त्याला भरली रक्तपिती.॰पारख- नीस-पु. पारख करणारा अधिकारी; पोतदार. पारखावण- स्त्री. परीक्षा करण्याबद्दलची मजुरी; पारखाई; पारखाणावळ. पारखी-पु. १ (गो.) ज्योतिषी; भूतभविष्य सांगणारा. २ पोतदार; नाणीं पारखून घेणारा माणूस, अधिकारी. ३ सराफ; निधिधारक सावकार इ॰ यावरून आडनांवहि पडलें आहे. -वि. १ पारख करणारा; परीक्षक; तपासणारा; मर्मज्ञ. 'ऐसेनि कार्या- कार्यविवेकी जे प्रवृत्तिनिवृत्ति मापकी । खरा कुडापारखी । जियापरी ।' -ज्ञा १८.७१६. २ निवाडा करणारा.

दाते शब्दकोश

पण

पु. १ वचन; नियम; प्रतिज्ञा. 'जनकाचा पण पुरवी त्र्यंबक कोदंडदंड मोडूनी ।' -मोहनमद्रामायण ९. २ पैज; होड. (क्रि॰ करणें; घालणें) ३ (द्यूतांत, पत्त्यांच्या खेळांत) लावलेली रक्कम, पैजेचा जिन्नस. [सं.] ॰भोगणें-निश्चिति, खात्री असणें; पैज किंवा होड लावण्यास तयार असणें. ॰जित-वि. प्रतिज्ञापूर्वक वादांत पराजित झालेला; पणांत जिंकला गेलेला.

दाते शब्दकोश

उअ. १ परंतु; अद्यापि; यदापि; तथापि. २ देखील; सुद्धां; त्याचप्रमाणें; तथा; तसेंच. 'त्यानें त्याला सुद्धां एक तारेची तसबीर काढून दिली आहे व ती सलाबतखानाजवळ अद्याप आहे पण.' -आनंदीरमण. ३ कीं, ना याप्रमाणें वाक्यास जोर, खात्री देण्याकरितां योजितात जसें:-जातो पण; येतोपण. 'मी पण आलों- गेलों.' ४ हि ह्याअर्थीं योजितात. जसें:-शपथा पण वाहिल्या पण खरें नाहीं बोलला. शिवी पण दिली पण म्यां सोसली.' ५ कोणताहि दोहोंपैकीं वाटेल तो. 'मला फिरावयास जाण्यास घोडा पण चालेल, गाडी पण चालेल' [सं. पुनः; प्रा.; गो. पणून, पोण्ण]

दाते शब्दकोश

प्रामाण्य

न. १ सप्रमाणता; सत्य; न्यायीपणा; वस्तु- स्थितिदर्शकत्व. २ खरेपणा; सत्यता; विश्वसनीयता; प्रांजलपणा. ३ आधार; पुरावा; प्रमाण. [सं.] ॰ग्रह-पु. खरें, योग्य, न्याय्य आहे असें मानणें; मान्य करणें; ग्राह्य धरणें; सप्रमाण मानणें; विश्वा- सणें. [सं.] ॰निश्चय-पु. सत्य, बरोबर असल्याची खात्री. [सं.]

दाते शब्दकोश

प्रचि(ची)त, प्रचीति

स्त्री. अनुभव; खात्री; प्रत्यंतर; विश्वास; पडताळा. 'माझी मज असे घडली प्रचीत । नसेल पतित ऐसा कोणी ।' -तुगा ३५६. [सं. प्रतीति]

दाते शब्दकोश

प्रमाण

न. १ पुरावा; दाखला; आधार; साक्ष; वादग्रस्त विषयाचा निर्णय करणारा लेख भाग साक्ष इ॰. 'आणि उदो अस्ताचेनि प्रमाणें । जैसें न चलतां सूर्याचें चालणें ।' -ज्ञा ४.९९. प्रमाणाचे आठ प्रकार आहेत:-१ प्रत्यक्ष, २ अनुमान, ३ उपमान, ४ शब्द, ५ अर्थापत्ति, ६ अनुपलब्धि, ७ संभव, ८ ऐतिह्य (किंवा ५ भोग, ६ लेख, ७ साक्ष्य, ८ दिव्य). २ यथार्थ ज्ञानाचें साधन; निश्चिय; प्रमा उत्पन्न होण्यास कारणीभूत जें आप्तवाक्य, अनुमान इ॰. 'अर्थापत्ति उपमान । इतिहास परिशेषादि प्रमाण । तयासी हि स्वतंत्र कवण । प्रमाण तो बोलेल ।' -विवेकसिंधु ३ आधार; प्रत्यंतर; पुरावा; निश्चितपणा; खात्री. 'तो आज येईल उद्यां येईल हें सांगवत नाहीं. त्याचें येण्याचें प्रमाण नाहीं.' ४ कसोटी; कठिण प्रसंग; तप्त दिव्य. ५ सीमा; मर्यादा, इयत्ता; निश्चितपणा; तंतोतत बरोबर संख्या इ॰ 'शब्द किती आहेत ह्याचें प्रमाण कोण्हास लागलें नाहीं.' ६ परिमाण; आकार; विस्तार; (औषधाचा) टक; मात्रा. ७ माप (वजन, लांबीरुंदी, वेळ इ॰ चें). ८ एखाद्या वस्तूचा निश्चितपणा, विभाग इ॰ ठरविण्याचा नियम. ९ (गणित) त्रेराशिकांतील पहिला संख्या; दोन समान गुणोत्तरांची मांडणी. १० सर्वमान्य, ग्राह्य, आज्ञा, उपदेश, सल्लामसलत घ्यावयास योग्य असा शब्द, माणूस, वचन, ग्रंथ इ॰ 'धर्म म्हणे गा भीमा! तुज जरि आम्ही प्रमाण तरि सोडी ।' -मोवन ९.६४. ११ शपथ; वचन. 'वैश्य म्हणे तियेसी । प्रमाण द्यावें आम्हांसी ।' -गुच ३३.७१. १२ ज्ञान; यथार्थ ज्ञान. 'तैसें प्रमाता प्रमेय । प्रमाण जें त्रय । तें अज्ञानाचें कार्य । अज्ञान नव्हे ।' -अमृ ७.४६. १३ (चुकीनें) फर्मान हुकूम. 'बाच्छाय पाठविलें प्रमाण । वजीर बोलावा तमाम ।' -ऐपो १०.१४ अंतःकरण. -हंको. -वि. खरें; योग्य; बरोबर; सत्य; न्याय. 'हें माझें भाषण प्रमाण आहे.' -क्रिवि. मान्य; कबूल. 'सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण.' [सं.] म्ह॰ नैको ऋषिर्यस्यवचः प्रमाणम् । सामाशब्द- ॰गणित-न. त्रैराशिक. ॰चैतन्य-न. सप्त चैतन्यांतील आभासचैतन्याचें अंतःकरणचैतन्य नामक तिसरें अंग. ॰दिवा-पु. प्रमाणरूपी दिवा; लामणदिवा. 'प्रमाणदिवेयांचेनि बंबाळें । पांतां तरळैले वेदांचे डोळे ।' -शिशु ९. ॰पत्र-न. अधिकारपत्र; मुख्याच्या सहीचें पत्रक. 'ज्यांच्या- जवळ प्रमाणपत्रें असतील त्यांनाच वर्गणी द्यावी.' -के १२.७. ३०. ॰फल-न. त्रैराशिकांतील चौथी संख्या; उत्तर. ॰भूत- वि. १ प्रमाण म्हणून घेतां येईल असें; इयत्ता ठरविणारें. २ (यावरून) खरें; सत्याला धरून असलेलें. भूत पहा. ॰मद्यार्क-पु. (प्रमाणाइतकी) पुरी तेजदारू; पुरी कडक दारू. (इं.) प्रुफ स्पिरीट. ॰सूत्र-न. लग्नाचे वेळीं वधू व वर यांची उंची ज्यानें मोजतात तें सूत. प्रमाणांक-पु. त्रैराशिकांतील पहिली राशि. बाकीच्या दोन राशींस मध्यांक आणि इच्छांक अशीं नावें आहेत. प्रमाण + अंक] प्रमाणालंकार-पु. प्रमाण अर्थ १ पहा. [प्रमाण + अलंकार] प्रमाणीभूत-वि. प्रमाणभूत पहा.

दाते शब्दकोश

पुळपुळीत, पुळपुळा

वि. १ बेचव; निःसत्व; पचपचीत (खाद्य). २ सौम्य; नीरस; कंटाळवाणें; मिळमिळीत आवेश नस लेलें (भाषण). ३ इष्ट कार्य घडवून आणीलच अशी खात्री ज्यांत नाहीं अशी; मुळमुळीत (वागणूक; युक्ति; माणूस इ॰). ४ भित्रा; नेभळट; कर्तुत्वशून्य; नपुंसक; निःसत्व. 'नाहींतर हल्लींचीं मुलें पुळपुळींत.' -विवि ८.१.८. [पुळपुळ]

दाते शब्दकोश

पुनर्

क्रिवि. पुनः पहा. [सं.] (सामाशब्द) पुनरपि- क्रिवि. पुन्हांहि; वारंवार; वरचेवर; फिरून. [सं. पुनर् + अपि] म्ह॰ पुनरपि जनंन पुनरपि मरणं = पुनःपुन्हां तीच ती गोष्ट करणें व तिच्याबद्दल शिक्षा भोगणें. पुनरागमन-न. पुन्हां परत येणें; माघारी येणें; निघालेल्या ठिकाणीं परत येणें. [सं. पुनर् + आगमन] पुनरावृत्ति-स्त्री. १ ग्रंथादिकांची पुन्हां आवृत्ति. २ उजळणी; पुन्हां करणें; घडणें. ३ पुन्हां मागें येणें; माघारी येणें; पुनरागमन. ४ पुन्हां जन्मास येणें; पुनर्जन्म. 'पैं पुनरावृत्तीचेनि उभडें । झळंबती सत्यलोकींचे हुडे ।' -ज्ञा ७.८०. -एभा २९.६०८. [सं. पुनर् + आवृत्ति] पुनराशा-स्त्री. निराशेनंतरची आशा; पुन्हां आशा जागृत होणें; खात्री वाटणें. [सं. पुनर् + आशा] पुनरुक्त-वि. पुन्हां सांगितलेलें; एकदां उच्चारिलेलें (वाक्य). 'तो ब्रह्मज्ञान उपदेशविधी । शुक बोलिला तृतीयस्कंधीं । म्हणोनि तें निरूपण ये संधीं । न प्रतिपादीं पुनरुक्त ।' -एभा ३०.४०२. ४०२. [सं. पुनर् + उक्त] पुनरुक्तदोष-पु. एके ठिकाणीं सांगि तलेला प्रकार किंवा विधि पुन्हां सांगणें; हा शास्त्रांत वाक्यदोष सांगितला आहे. [सं. पुनरुक्त + दोष] पुनरुक्ति-स्त्री. १ एकदां बोललेलें वाक्य किंवा शब्द फिरून बोलणें; पुनरुचार. २ द्विरुक्ति; अनुवाद. [सं. पुनर् + उक्ति] पुनरुत्थान-न. १ पुन्हां उठणें; (ल.) जिवंत होणें. २ (ख्रि.) येशू ख्रिस्ताचें पुनरुज्जीवन. ३ (ख्रि.) मृतोत्थापन; मेलेलीं सर्व माणसें न्यायाच्या दिवशीं पुनः उठणें, (इं.) रेझरेक्शन. -योहा ५.२८.[सं. पुनर् + उत्थान] पुनरूढा-स्त्री. पुनर्विवाहित विधवा. 'मूळ नाटकांत राणी पुन- रूढा आहे.' -नि ५४१. [सं. पुनर् + ऊढा] पुनर्जन्म-पु. १ दुसरा जन्म; आत्म्याचें एका शरीरांतून दुसऱ्या शरीरांत जाणें. मेल्याबरोबर जीव पुन्हां जन्म घेऊन मागील जन्मांतल्या कर्मोंचें बरें वाईट फळ भोगतात हा पुनर्जन्माचा सिद्धांत आहे. २ (ल.) मृत्यु यावयाजोग्या मोठया संकटांतून झालेला बचाव. ३ (ख्रि.) ख्रिस्तद्वारां नवीन व पवित्र मन प्राप्त होणें. 'पुनर्जन्म झाल्याविना । ख्रिस्तकृपा त्या कळेना ।' -उसं १९७. [सं. पुनर् + जन्म(-न.)] पुनर्भू-स्त्री. पुनर्विवाह झालेली, पाटाची स्त्री. पुनर्भू तीन प्रकारची असूं शकते:-(अ) जिचें लग्र मात्र झालें परंतु पहिल्या नवऱ्याशीं संग झाला नाहीं अशी. (आ) जिचें प्रथमतः एकाशीं लग्न झालें असून जी पुढें व्यभिचारिणी म्हणून उघडकीस येते ती; व (इ) लग्नाचा नवरा मेला असतां जी सवर्ण व सपिंड अशा दुसऱ्यास दिली जाते ती. [सं. पुनर् + भू] पुनर्लग्न-न. एक बायको मेल्या- वर पुन्हां केलेलें लग्न. पुरुषाच्या पुनर्विवाहास हा शब्द योजतात. 'गृहस्थाश्रमीयानें करावा लागणारा यज्ञ सहधर्मचारिणी नसल्यामुळें करतां येत नाहीं...'करितां पुनर्लग्न करणें जरूर आहे.' -उषाग्रंथ- मालिका. ४. [सं. पुनर् + लग्न] पुनर्लभ्य-वि. पुन्हां मिळण्या- जोगें; पुन्हां संपादण्याजोगें. [सं. पुनर् + लभ्य] पुनर्विवाह- पु. विधवाविवाह; विधवेनें पुन्हां विवाह करणें. (इं.) विडो रिमँरेज याला प्रतिशब्द. [सं. पुनर् + विवाह]

दाते शब्दकोश

पुरावा (बिनतोड)

धादान्ताला सिद्धान्त कशाला ? हातच्या कांकणाला आरसा कशाला, त्याच्या पदरांत पापाचें मापच टाकलें, हा सूर्य हा जयद्रथ ! बाप दाखव नाहीं तर श्राद्ध कर ! चक्षुर्वै सत्यम्, पुराव्याची एकसंघ सरळ स्पष्ट व सहजसुलभ सांखळी, या प्रकरणावर संपूर्ण प्रकाश टाकील असा बळकट पुरावा, सबळ पुरावा, बालबाल खात्री करील असा.

शब्दकौमुदी

फैलजामीन

(आ) पु० अकृत्य करणार नाहीं अशाबद्दल खातरी.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

फायदेशीर

लाभदायक, उपयुक्त, त्यांतून कांहीं प्राप्ति होइल, नफ्याचें, तुमच्या भल्याचें, किफायतीचें, फायदेमंद, त्यांत कांहीं सुंटेल, त्यांत लभ्यांश आहे, हिताचें, हितकर, पथ्यावर पडेल, हात ओले होतील, तें कांहीं देऊन जाईल, हातीं कांहीं गवसेल, त्यांतून पीक निघेल, वाढावा मिळेल, बोनस सुटेल, व्याज-डिव्हिडंड याची खात्री, हा आंतबट्ट्याचा व्यवहार नाहीं, उखळ पांढरें होईल.

शब्दकौमुदी

फटफजिती

फज्जा, जिरली, परवड, धांदल, कढी पातळ झाली ! रग जिरली, खात्री झाली, तीन-तेरा झाले, त्रिधा उडाली, पच्ची झाली, जमिनीवर स्वतःची लांबी मोजली, पासले पडले, सगळाच मुदलांत घोटाळा झाला, गंमतच झाली, खूप केलीत, चेष्टा-मस्करीचा विषय झाले, करायला गेले काय नी वर झाले पाय ! अग अग म्हशी मला कांग नेशी अशी वेळ, बापापरी बाप गेला बोंबलतांना हात गेला ! तेरीबी चूप मेरीबी चूप, आतां काय करतो ? मारुतीची बेंबी गार म्हणायलाच हवी ! तोंड दाखवायला जागा उरली नाहीं, सोळा आणे झाली, हा शेपूटतुटका कोल्हा सर्वांना ताेच सल्ला देणार ! तेल गेलें तूप गेलें हातीं आलें धुपाटणें ! साग्रसंगीत झाली, संगळेच मुसळ केरांत गेलें, चुंबीत आले, नाकधु-या काढाव्या लागल्या, चोरीचा मामला हळूहळू बोंबला, सर्व ऐट गळ्यांत आली, तंगड्यां गळयात आल्या, गुरूचा उपदेश गुरूला फळला, केलें तुका झाले माका ! सड़ा दुस-याला खणला स्वतः आंत गेला, गरगरीत आपटले, सणसणीत आपटा खाल्ली, स्वाभिमान गिळावाच लागला, पळतां भुइँ थोडी झाला, लोटांगण घालाव लागले, रावण पडला उताणा त्याच्या तोंडांत फुटाणा, तो प्रयाेग अंगलट आला, सारेंच ओमफस् झालें, त्याचेच दांत त्याच्या घशांत घातले गेले.

शब्दकौमुदी

शाक बेशाक-शक-बे-शक

स्त्री. न. १ अनिश्चितपणा; शंका कुशंका; डळमळीतपणा; अनियमितपणा; चुका; दोष. २ विलक्षणपणा; अद्भुतता; अलौकिकता (एखादी गोष्ट, विधान, दस्तऐवज या संबंधीं). ३ शंका निरसन; खात्री; निश्चय; निकाल. ४ उहापोह; चर्चा. 'ते याद तुम्हाकडे येणार; त्याज- वर शाक-बे-शाक होय नव्हे होऊन सलाह जाणार.' -राज ७.८२. 'जें कांहीं लिहिलें त्याची पारख होऊन-शाकबेशाक वेळचे- वेळेस होऊन सत्य काय-तें निघत जाईल' -इनाम १२६. -वि. क्रिवि. १ डळमळीत; अनिश्चित. २ निश्चित; निःसंशय. [अर. शाक्क द्वि.]

दाते शब्दकोश

सांज

स्त्री. १ नवें धान्य निघाल्यावर तें खाण्यापूर्वीं बर्‍यावाईट देवतांना अर्पंण करण्याची रीत. (क्रि॰ धरणें; असणें). २ जमिनीच्या पिकाच्या अंदाजाचा खरेपणा; अंदाजाप्रमाणें पीक येण्याची खात्री, तशी जमिनीची पात्रता. (क्रि॰ बाळगणें; सोडणें, टाकणें; बुडणें, जाणें). ३ अंदाजलेलें, अपेक्षिलेलें, उत्पन्न, पीक. (क्रि॰ येणें; भरणें; उतरणें). उदा॰ भुईची- जमिनीची-काळीची-पांढरची सांज. 'रचूनि महत्तत्वाचें खळें । मळी एके काळुगेनि पोळें । तेथ अव्यक्तीची मिळे । सांज भली ।' -ज्ञा १३.३९. [? साच] सांजी-स्त्री. समृद्धि; वाढ. (क्रि॰ येणें). 'राशि न सरती जाणों आली सहसा धना तदा सांजी । मोअश्व ५.७२.

दाते शब्दकोश

साशंक

वि. १ भित्रा; बुजणारा; शंकेखोर. २ खात्री, विश्वास नसलेला;कचरणारा. [स + आशंका]

दाते शब्दकोश

शेनिश्चय

पु. पक्का विचार; ठराव; निकाल; शहानिशा; मनाची खात्री, सनाधान. (क्रि॰ करणें.) शहानिशा पहा. [सई + निश्चय]

दाते शब्दकोश

शहानिशा

(फा) स्त्री० खरेंखोटें, खातरी.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

सजावचें

सक्रि. (गो.) खात्री पटविणें. [सजविणें]

दाते शब्दकोश

शकुन

पु. (कों.) माशाच्या आकाराचें पिठाचें केलेलें चित्र; याला काकडीच्या बिया टोचलेल्या असतात. 'धूपारतीनंतर कूंभारानें एका ताटांत शकुन व दिवा घेऊन यावयाचें.' -आडि वऱ्याची महाकाली. [सं.] ॰उंडा-पु. १ मंगलकार्याच्यावेळीं कणिकेंत साखर वगैरे घालून केलेलें पक्वान्न. उंडा पहा. २ पुर- णाचा वडा. -पाकशास्त्र ५५. ॰गांठ-ग्रंथी-स्त्री. १ एखादी पुढें होणारी किंवा देशांतरीं झालेली जी गोष्ट ती विषयीच्या शकुनाची । आठवण राहण्यासाठीं पदरास बांधलेली खूणगांठ शकूनाला मान्यता देणें. (क्रि॰ बांधणें). 'स्ववस्त्रप्रांतीं हे त्वरित शकुनग्रंथि दिधली । -सारुह ८.३८; -वेसीस्व १.४१. २ शुभदायक, हितकारक घटना, बनाव, प्रसंग; मंगलकारक, शुभ- चिन्ह, लक्षण. ३ लग्नांत वधुवरांच्या पदरांस वराच्या मेहुणीनें बांधलेली शुभगांठ. ॰गांठ बांधणें-घालणें-१ अगदीं पूर्ण मनावर बिंबणें; पक्कें ध्यानांत ठेवणें. २ खात्री असणें; चांगला, बरोबर अजमास करणें. 'इकडे हीं तिघेजणें वाघोबाच्या तडा- क्यांतून कसची पार पडतात अशी त्यानें शकुनगांठ बांधून ठेविली.' -संभाजी. ॰पोतें-पु. शकुनाबाबतचा एक सरकारी कर. -पया १२९. ॰लाडू-पु. प्रयाणकालीं शुभदायक म्हणून पदरांत लाडू बांधतात तो. 'आतां वेळु नलवावा । राम या मुहूर्ते जावा । तां शकुनलाडू बंधावा । याच्या पदरीं ।' -वेसीस्व २.७. ॰वंती-वि. भविष्य सांगणारी. 'इच्छिले ते शकुनवंती । होय देती तात्काळ ।' -तुगा ३२१६. -स्त्री. भविष्यग्रंथ-पोथी. ही वरून ज्योतिषी, ठोक जोशी भविष्यें वर्तवितात. शाकुनिक-न. शकुन; दुश्चिन्ह; उत्पात; अद्भुत. -वि. शकनासंबंधी; अद्भुत कारक; अरिष्टकारक; अवलक्षणीय. [सं.]

दाते शब्दकोश

स्नेह

मैत्री, रहस्य, सख्य, भारी तोंडांत तोंड घालीत असतात ! दाट परिचय, संगदिल, दुःखाचा वांटा उचलील असा मित्र, नाकांतला बाल झाला, तेव्हां डोळे पुसायला तोच यईल ही खात्री अरे -तुरेचीच भाषा परस्परांत वापरली जाते, जिवाभावाचा संवगडी, आपुलकी, ते का परकेआहेत, तान पिढ्यांचा ऋणानुबंध, समदुःखी व समसुखी.

शब्दकौमुदी

शंका

स्त्री. १ संदेह; भय; अविश्वास; खात्री नसणें; आशंका; किंतु. 'जैसें शंका जात खेंवो लोपे । सापपण माळेचें ।' -ज्ञा ९.७३. २ आक्षेप; हरकत; विरुद्ध मताचा प्रश्न (वादग्रस्त बाब तींत). (क्रि॰ घेणें, करणें). ३ कल्पना; सूक्ष्मसंक्कार. 'तैसी या विषयांची शंका । मनां वसती देखा घातुक करी अशेखा । विवेक- जाता ।' -ज्ञा २.३२०. ४ (संगीत) गाण्यांत घाई करणें. ५ अडचण; अडथळा; गुतां; अडकठी; व्यत्यय. 'शंका होती पहिली तिसी । निःशंक झाली व्यथिताचारासी ।' -गुच ७. १५६. ६ लाज; भय. 'दिवसास रांडेच्या घरीं जातोस, लोक आपल्याला हांसतील ही कांहीं शंका बाळगीत जा.' [सं. शंक् = संदेह वाटणें] ॰घेणें-बाळगणें-लाज, भीति वाटणें. ॰धरणें-भीति, धाक वाटणें. 'लज्जावती फार तथापि त्याची। शंका न सीता धरि हो पित्याची ।' ॰बाह्य-वि. शंकेपलीकडे; शंका घेण्यास जागा नाहीं असें. 'त्याचें वर्तन शंकाबाह्य आहे.' ॰शील-ळ-वि. साशंक; संशयखोर; शंकित मनाचा [सं.]

दाते शब्दकोश

संशयवाद

स्थिर-मूल्यांविषयी साशंक, भवति वा न भवति या पंथांतले, संशयवादी, ततः किम् ततोपि किम्, नरो वा कुंजरो वा, नाना पंथ नाना मते जगी झालीं असंख्याते; आतां कोठें भाव धरूं देवा चित्त स्थिर करू म्हणणार, म्हटले तर आहे म्हटलें तर नाहीं, संशयात्मे, शंका- कुशंकांनीं पीडित, कशाचीहि पक्की खात्री नाहीं, प्रत्येक बाबतींत हातचा राखून असतात.

शब्दकौमुदी

ताम्र

न. १ तांबें; एक धातु. २ (वैद्यक) ताम्रभस्म. -पु. (सांकेतिक) मुसलमान; यवन; म्लेंच्छ. तांब्र पहा. 'ताम्र पराभवातें पाववावे.' -भाब ८४. -वि. तांब्यासारखा आरक्त; तांबड्या रंगाचा. [सं.] ॰चूड-पु. कोंबडा. [सं. ताम्र = तांबडा + सं. चुडा = तुरा] ॰चूड(हस्त)-पु (नृत्य) अंगठा व मधलें बोटें यांचीं अग्रें जवळ आणून, तर्जनी वाकवून ठेवून, बाकींचीं बोटें खोलगत केलेल्या तळहातास चिकटविणें. ॰पट-पट्टी-नपुस्त्री. १ राजादिकांनीं ब्राह्मणादिकांस भूमि इ॰काचें दान, इनाम दिल्याबद्दलचा तांब्याच्या पत्र्यावरील कोरलेला लेख; सनद. २ (ल.) शाश्वतीची खात्री, हमी; निरंतरपणा. [ताम्र + सं, पट्ट] ताम्रपट देऊन ठेवणें- (ल.) कायमचा अधिकार देणें. ॰पत्र-न. १ तांब्याचा पत्रा. २ ताम्रपट पहा. [ताम्र + सं. पत्र = पान, पत्रा ] ॰भस्म-१ (वैद्यक) ताम्र; तांब्यापासून केलेलें रसायन, मात्रा; ताम्रप्राणिद. २ (सांकेतिक; विनोदी भाषेंत) पुरणपोळी. ॰मुख-न. तांबड्या तोंडचे वानर. -वि. लालतोंड्या; मोगल; युरोपियन. तांब्र पहा. 'इराणी, दूराणी, ताम्रमुख पहा.शीख आदिकरून यांनी हौदे चाल विले'॰मुखी-वि. ताम्रमुख पहा [ताम्र = तांबडा + मिख = तोंड]

दाते शब्दकोश

ताम्रपट, ताम्रपट्टी      

न.पु.स्त्री.       १. राजांनी वगैरे ब्राह्मणादिकांना भूमी इ. चे दान, इनाम दिल्याबद्दलचा तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख; सनद. २. शाश्वती; खात्री; हमी; निरंतरता. ३. कायमचा अधिकार. [सं. ताम्रपट्ट]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तहकीकात      

स्त्री.       १.चौकशी; तपास; सत्यान्वेषण; शहानिशा : ‘सदर्हू गोष्टींची तहकीकात लाविली.’ – मइसा १८·६०. २. हकिकत : ‘दिघामजकूराची तहकीकात मनास आणतां.’ – वाडबाबा. २·१५. ३. खात्री; खचिती; निश्चितपणा. [अर. तह्‌कीक् अव.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तिरावचे      

सक्रि.       खात्री करणे. (गो.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तीरावचें

क्रि. (गो. कों.) खात्री पुरविणें, करणें.

दाते शब्दकोश

तकीक

स्त्री. खात्री; निश्चय; खरेपणा. तहकीक पहा. ‘साहेबानी आज्ञा केली होती जी बंगाल्याच वरतमान कैसा झाला तो तकीक करूनी पाठवन.’ –ऐपो २.३. तहकीक पहा.

दाते शब्दकोश

तमानियत

स्त्री. खात्री; खुलासा. 'अगर टिपु सुल- तान याज़कडोन या दों सरकारांसीं बदआहदी अमलांत येणार नाहीं असी राव पंतप्रधान यांची पक्की खातरजमा असल्यास खुलाशानें आमचीहि तमानियात व्हावी.' -रा ७.११. [अर. तमन्ना = विनंति]

दाते शब्दकोश

उमेद      

स्त्री.       १. आशा; धीर; भरवसा; खात्री; विश्वास. २. आकांक्षा; हिंमत; उत्साह; धैर्य; हौस; अवसान; ईर्षा : ‘अब्दालीचीं बोलावणीं बहुत उमेद लावून गेलीं.’ –ऐलेसं १·३४. ३. तारुण्य; ज्वानी; वय : ‘आबाजी आपले उमेदीत आलियावरी त. ॥ म ॥ देखमुखी करावयास आले.’ –मइसा १७·५ [फा. उमीद] (वा.) उमेदीस येणे – १. वयात येणे; पणात येणे (स्त्री वगैरे). २. जोमात, भरभराटीस येणे (कार्य वगैरे). ३. बहर येणे (झाडाला वगैरे).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उमेद

स्त्री. १ आशा; धीर; भरंवसा; खात्री; विश्वास. 'त्याची उमेद अशी होते कीं,' २ आकांक्षा; हिंमत; उत्साह; धैर्य; हौस; अवसान; ईर्षा. 'अब्दालीचीं बोलावणीं बहुत उमेद लावून गेलीं.' -ख १.३४. ३ तारुण्य; ज्वानी; वय. 'आबाजी आपले उमे- दींत आलियावरी त ।। म ।। देशमुखी करावयास आले.' -रा १७.५. [फा. उमैद, उमीद्, उमेद] उमेदीस येणें-१ वयांत येणें; पणांत येणें (स्त्री वगैरे). २ जोमांत, भरभराटीस येणें (कार्य वगैरे). ३ बहार येणें (झाडास वगैरे).

दाते शब्दकोश

उमेदवारी      

स्त्री.       १. आशावादीपणा; आकांक्षा; खात्री; निश्चय; दृढता; हिंमत; विश्वास : ‘त्यांची उमेदवारी पेशवे सर करूं सहजांत.’ –ऐपो २७७. २. तारुण्य; ज्वानी; पूर्ण वाढ; जोम; जोर : ‘हे आपले उमेद्‌वारीला आल्यानंतर त्यांचे लग्न केलें.’ –मदरु १·११. ३. कच्ची, पसंतीच्या अटीची नोकरी; शिकाऊ नोकरी; उमेदवार बनून राहणे. [फा. उमीदवार]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उमेदवारी-द्वारी

स्त्री. १ आशावादीपणा; आकांक्षा; खात्री; निश्चय; दृढता; हिंमत; विश्वास. 'त्यांची उमेदवारी पेशवे सर करूं सहजांत.' -एपो २७७. 'त्यास स्वारी निघावयाचा मार्ग पहात आम्हीं उमेदवारीनें बैसलो आहोंत.' -ख ८.४६६०. २ तारुण्य; ज्वानी; पूर्ण वाढ; जोम; जोर. 'हे आपले उमेद्वारींत आल्यानंतर त्यांचें लग्न केलें.' -मदरु १.११. ३ उमेदवारपणा; कच्ची, पसंती- च्या अटीची नोकरी; उमेदवार बनून राहणें. [फा. उमीद्वार]

दाते शब्दकोश

ऊणखूण      

स्त्री.       १. वर्म; रहस्य; गुपित; न कळणारी गोष्ट. पहा : उणखूण : ‘हे जिव्हारांची ऊणखूण । तुज संपूर्ण सांगितली ।’ − एभा ११·१५६०. २. प्रचीती; वाटाघाट; खात्री पटवणें; चर्चा : ‘रिघोनि सद्गुरूस शरण । काढून शुद्ध निरूपण । याची करिसी ऊणखूण । प्रत्यक्ष आतां ।’ − दास ६·१०·५२. ३. कमीअधिकपणा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उत्साहशक्ति, उत्साहशक्ती      

स्त्री.       उमेद; आत्मविश्वास; धमक; जयाबद्दलची खात्री; युद्धोपयोगी तीन शक्तींपैकी एक. दुसऱ्या दोन म्हणजे प्रभुशक्ती आणि मंत्रशक्ती. [सं. ]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

विश्वास

पु. १ भरंवसा; खात्री; निश्चय; इमानदारी. २ श्रद्धा; मनाचा अनुकूल ग्रह. [ सं. वि + श्वस् = श्वास घेणें] ॰घात- पु. १ विश्वास दाखवून फसवणूक; बेभरंवसा; बेइमानी; दगलबाजी; खोटेपणा. २ (कायदा) विश्वासानें ताब्यांत दिलेल्या मालाचा लबाडीनें गैरशिस्त उपयोग करणें. ॰घातक-घातकी-वि. बेमान; लबाड; खोटा; कृतघ्न. ॰जामीन-पु. खात्रीसाठीं जबा- बदार; विश्वासप्रतिभू. ॰निधि-पु. अत्यंत भरंवशाचा माणूस. ॰प्रतिभू-पु. विश्वासपणाबद्दल हमी घेणारा; एखादा मनुष्य खात्रीलायक आहे म्हणून हवाला देणारा. विश्वासणें-अक्रि. १ भरंवसा धरणें; विश्वास ठेवणें. २ अवलंबून राहणें; भरंवशावर राहणें; हवालीं करणें; स्वाधीन करणें. 'जो दुसऱ्यावरी विश्वासला । त्याचा कार्यभाग बुडाला ।' -दा. ३ (काव्य) खरें, सत्य मानणें. विश्वासला-पु. ज्यानें विश्वास ठेविला आहे असा. 'विश्वा- सला आतुडवीजे चोरा ।' -ज्ञा १६.२६०. विश्वासिक, विश्वासुक, विश्वासू-क-वि. प्रामाणिक; विश्वास ठेवण्या- लायक; भरंवशाचा. 'मित्र माझिये मती । विश्वासिक तूं एक ।' -मुआदि ३५.४८. विश्वासी-वि. १ खात्रीचा; भरंवशाचा. २ भरंवसा ठेवणारा.

दाते शब्दकोश

व्यवसाय

पु. १ धंदा; व्यापार; व्यवहार. -ज्ञा १३.५५६. २ खात्री; निश्चय. ३ खटाटोप; श्रम; सतत का. 'तरी कीर्तना- चेनि नटनाचे । नाशिले व्यवसाय प्रायश्चितांचे ।' -ज्ञा ९.१९७. व्यवसायात्मक-वि. निवडानिवड करणारी. -गीर १३६. व्यवसायी, व्ययसायक-ईक, व्यवसाई-वि. १ व्यापारी; धंदा करणारा. 'तो मार्गीं करून व्यवसाइक । त्या वंजारें वृषभ कटक' -नव २४.१७६. २ खटपटी; उद्योगी. व्यवसित-वि. निश्चित केलेले; ठरविलेलें. व्यावसायिक-वि. व्यवसाय, उद्योग करणारा; व्यापारी. 'कृषिक नव जाती कृषिके । तीर्थयात्रेसी पाथिकें । वयवहार सांडिला व्यावसायिकें । धेनु वंना नवजाती ।' -मुहरिश्चंद्राख्यान (नवनीत पृ. १८६).

दाते शब्दकोश

य(ये)कीन

पु. खात्री; सत्य; निष्ठा; निश्चय; विश्वास. क्रिवि. खचित; निश्चित; पूर्णपणें; खात्रीनें. 'आम्ही हरामखोर असें खचित यकीन जालें असल्यास आम्हांस परिछिन्न गोश्माली करावी.' -ऐस्फुले ४९. [अर. यकीन्]

दाते शब्दकोश

खूण

स्त्री. १ चिन्ह, ज्यानें एखादी गोष्ट जाणली जाते किंवा समजली जाते तें लक्षण; ठिपका; निशाणी; व्यंजन; संकेत- चिन्ह. ' हळूच खुणें सांगतसे । ' -नव १२.१८८ २ (विशेषतः) क्षेत्रसीमा चिन्ह; शींव. ३ संकेत; इशारा (डोकें हलविणें, हात- वारे, नेत्रसंकेत इ॰ क्रियेनें दिलेला). सूचना; सांकेतिक सूचना; उल्लेख; पर्यायोक्ति. (गुप्तरूपानें आपला अभिप्राय दुसर्‍यास सम- जावा म्हणून केलेला) ४ वर्म; मर्म; लक्षण. 'या खुणा तूं कहीं । चुकों नकों ।' -ज्ञा ९.१३४. [सं. क्षुण्ण; का. खून] (वाप्र.) ॰धरणें-ध्यानांत ठेवणें. ॰पाळणें-आज्ञा पाळणें; मनोगता- प्रमाणें वागणें.' नव्हे तयाची खूण पाळिळी । ' -ज्ञा १८.९१४. म्ह॰ दादाची खूण वहिनी जाणें = एखाद्याचें मर्म त्याचा जव- ळच्या माणसास ठाऊक असणें. समशब्द- ॰खाण-स्त्री. खुणा, संकेत, मनोगत, सूचना, चिन्हें यांस व्यापक शब्द. खूण पहा. ॰गांठ-स्त्री. १ (एखाद्या गोष्टीची) आठवण होण्यासाठीं किंवा ती सोडून देण्यासाठीं वस्त्रास किंवा त्याच्या पदरास मारिलेली गाठं. २ (ल.) खात्री. म्ह॰ विश्वास कीं खूणगांठ. ॰मुद्रा-स्त्री. इशारा, चिन्ह, निशाणी, मुद्रा, ठसा, अंक इ॰ मोधम शब्दा- बद्दल आणि व्यापक अर्थानें योजतात. एखादी खूण किंवा सर्व खूणा. खूण पहा.

दाते शब्दकोश

लाळ

स्त्री. १ मुखरस; तोंडाला सुटणारें पाणी; खाण्याचा पदार्थ तोंडांत घालून चर्वण करीत असतां तो घशाखालीं उतर- ण्यासाठीं व पचनास मदत होण्यासाठीं मिश्रणाचा स्वाभाविक पातळ पदार्थ. २ जनावरांना होणारा एक रोग. याचेमुळें त्यांच्या तोंडातून लाळ किंवा पाणी गळतें व कित्येक वेळां त्यांच्या खुरां- तून पाणी वाहूं लागून ते सडूं लागतात. (क्रि॰ येणें; जाणें). [सं. लाला] (वाप्र.) ॰उठणें-तोंडास पाणी सुटणें. 'परी अमृताही उठी लाळ ।' -अमृ १०.२०. ॰गळणें-(ल.) दृढ स्नेह- मैत्री असणें. 'काय त्या दोघांची लाळ गळती.' ॰गाळणें- अतोनात किंवा फाजील स्तुति करणें. 'राजांच्या पदरीं लाळ गाळणारे पुष्कळ असतात.' ॰घोटणें-१ तोंडाला पाणी सुटणें; अभिलाष धरणें. 'देखुनी तुझें रूप वेडावलें भूप । अंतरीं घोटिती लाळा' -मध्व ३४; -ह ३४७. २ लांगूलचालन करणें. 'विश्वा- मित्रानें मेनकेपुढें लाळ घोटावी?' -नारुकु २.४७. लाळेनें चणे भिजवून खाणें-(आपल्याच लाळेनें चणें भिजवून खाणें) मिळावयाचा अगर मिळणार अशी खात्री असलेला योग्य मान वगैरे तो मिळाला नसतांहि पुढें अद्याप मिळेल अशा आशेवर स्वतःचें समाधान मानून घेणें; दुसऱ्यानें न केला तरी स्वतःच स्वतःचा गौरव करून घेणें. लाळणें-अक्रि. १ लाळ गाळणें; लाळ पाझरणें. २ लाळ गळण्याच्या विकारानें युक्त होणें. लाळी, लाळेरें-स्त्रीन. लहान मुलाच्या तोंडातून गळणारी लाळ धर- ण्यासाठीं गळ्यांत अडकविलेला कापडाचा अगर रबराचा तुकडा. लाळें-न. जनावरास होणारा एक रोग. लाळ्यो-पु. (कों.) सारखी लाळ गाळणारा मनुष्य.

दाते शब्दकोश

उत्साह

पु. १ अनुकूल भाव; उल्हास; उत्सुकता. २ आनंद; संतोष; समाधान. सामाशब्द-रणोत्साह; दानोत्साह; पुत्रोत्साह; धनोत्साह; मानोत्साह. ३ सण; सोहळा; आनंदाचा समारंभ; मंगल- प्रसंग; आंनददायक कार्यक्रम (रामनवमी, शिवरात्र वगैरे प्रसंगीं करावयाचें अनुष्ठान, कथाकीर्तन , ब्राह्मण भोजन इ॰), वसंतोत्साह. 'करिती उत्साह बारशा ब्राह्मण । करूनी ब्राह्मण घरां गेले ।' -ब ४. 'असो गोकुळीं झाला आनंद । उत्साह करिती परमानंद ।' -ह १२.१४४. ४ उमेद; हिंमत; नेट; निकर; धैर्य. 'धर्म म्हणे, आजोबा उत्साहें कौरवार्थ भांडावे । -मोभीष्म १.७४. ५ वेग; जोर; आवेश. 'तो उत्साहो न संवरे । इंद्रिय ओघां । 'ऋ ६३. [सं. उत् + सह् ] ॰बुद्धि-स्त्री. मनाची उमेद; ईर्षा; उत्सुकता; तत्परता; काम करण्याची आवड. 'उत्साहबुद्धि न मनाप्रति दे उठाया ।' [सं.] ॰भंग, नाश पु. १ आनंदाचा विरस; निराशा. २ आनंददायक कार्यक्रमाचा बिघाड; त्यांत आलेलें विघ्न. ॰मूर्ति- उत्सवमूर्ति पहा १ व्यवहारांत पुढें असणारा; ज्याला नेहमीं पुढें करण्यांत येतें असा माणूस; कारभारी; फिरता व्यापारी, प्रचारक, प्रतिनिधी. ॰शक्ति-स्त्री. उमेद; आत्मविश्वास; धमक; जयाबद्द- लची खात्री; युद्धोपयोगी तीन शक्ती पैकीं एक. (दुसर्‍या दोन म्हणजे प्रभुशक्ति आणि मंत्रशक्ति). [सं.].

दाते शब्दकोश

पड

अ. हाताखाली, दुय्यम, दुसऱ्या प्रतीचा, मुख्य वस्तूच्या ऐवजीं घ्यावयाची या अर्थाचा एक प्रत्यय. जसें:- पड-चाकर-शिष्य-लंका-जीभ-कोट-साक्ष इ॰. 'तूं लंका पाहि- लीस तर काय झालें मी पडलंका पाहिली.' [प्रति = दुसरा किंवा सं. पर = पलीकडचा] ॰केश-स-पुअव. डोळ्याच्या पापणीच्या खालीं आंतील बाजूला उगवणारे केंस; डोळ्याचा एक रोग. ॰कोट-पु. किल्ल्याच्या बाहेरचा तट. ॰गादी-स्त्री. गालिचा; लहान गादी. ॰गहाण, गाहाण-न. गहाण ठेवणारानें किंवा सावकारानें आपल्याकडे गहाण ठेवलेले दुसऱ्याकडे गहाण टाकलेले जिन्नस. ॰गहाणदार-पु. पडगहाण ठेवून घेणारा. ॰छाया-स्त्री. १ प्रतिबिंब. २ छाया; साउली. [सं. प्रतिच्छाया] ॰जावई-पु. (व.) जावयाचा भाऊ. ॰जीभ-स्त्री. जिभेच्या मागें असणारी दुसरी लहान जीभ; जिभेच्या मुळाशीं लोंबणारी मांसाची लोळी. [सं. पतज्जिव्हा] ॰थळ-न. (राजा.) पिशाच्चाच्या उपद्रवाचा एका देवानें काहीं निर्णय सांगितला असतां इतर गांवचे देवाला विचारून जो त्याचा पडताळा पहातात तें; किंवा त्या देवानें सांगितल्याप्रमाणें पुजाऱ्याकडून करून घेतलेला लेख; पडताळा. [प्रति + स्थळ] ॰दोरा-पु. गळ्यांतील माळ, हार इ॰कास जोड- लेला व गळ्याभोंवती बांधावयाचा जोड दोरा. ॰नांव-न. टोपण, व्यावहारिक नांव. ॰नाळ-(कों.) (नाविक) मागच्या खांद्यास बाहेरच्या बाजूस जोडलेलीं लांकडें. ॰पापणी-स्त्री. पडकेश पहा. ॰बंद-पु. (गंजिफांचा खेळ) बंदाच्या (राजा, वजीर यांच्या खालील पानाच्या) खालेचें पान. ॰भिंत-स्त्री. मुख्य भिंतीच्या बोहेरची दुसरी भिंत. ॰भोज-भोजन-न. १ वरपक्षाकडून लग्नाचे दुसरे दिवशीं वधूपक्षास दिलेली मेजवानी. २ परत जेवण. [पड = प्रति किंवा परत + भोजन] ॰लंका-स्त्री. एक रावणाची लंका व दुसरी तिच्याहि पलीकडे दूर असलेली लंका. ॰विद्यार्थी- पु. विद्यार्थ्याच्या हाताखालचा दुसरा विद्यार्थी. 'शिवाय त्या शाळेंत पडविद्यर्थी असत ते निराळेच.' -चं १६. ॰शब्द- साद-पु. प्रतिध्वनि; प्रतिशब्द; पडिसाद. 'कां पडसादाचा अवचितां । गजर उठे ।' -दा ६.८.१९. 'शब्द पडसाद ऊठला । म्हणे कोणरे बोलिला ।' -रामदासी स्फुट अभंग २७ नवनीत पृ. १५०) [सं. प्रतिशब्द] ॰शाळा-ळ-शाला-स्त्री. १ घरापासून थोड्याशा अंतरावर बांधलेलें छोटेखानी घर; ओंवरी. २ उतारूंसाठीं देवालयालगत बांधलेली धर्मशाळा. 'मठ मंडपा धर्मशाळा । देवद्वारीं पडशाळा ।' -दा ४.५.२३. ॰सरी-स्त्री. १ उतार असलेल्या जमीनीवरील पाणी वाहून जाण्यासाठीं काढून दिलेला नाला, पाट, जलमार्ग. २ बागाईत जमीन. [पर + सरी] ॰साई-स्त्री. १ छाया; काळोख; झावळेपण. 'आंधार कोंडोनि घरीं । घरा पडसाई न करी ।' -अमृ ७.२१. (जुनी प्रत) २ सावली; पडछाया. 'दीपामागें पडसाई । तैश्या डोळ्यामागें भोंवई ।' -भाराबाल ६.५०. [पड + छाया] ॰सावली-स्त्री. पडछाया; प्रतिबिंब. ॰साळ-स्त्री. १पडशाळा पहा. २ (कु.) पडवी; ओटी. 'तेव्हां ती लवकर घरांतून बाहेर जाऊन पडसाळेंत एक वर्षाच्या वयाची हंसी होती तिला तिनें त्या घरांत आणिलें ।' -मराठी सहावें पुस्तक. पृ. १८. (१८७५) ॰साक्ष-स्त्री. १ पुराव्याला बळकटी देणारा दुसरा पुरावा. २ पडसाक्षी पहा. ॰साक्षी-पु. १ पुराव्याला बळकटी किंवा पुष्टि देणारा साक्षी- दार. २ साक्षादाराचा साक्षी; दुसऱ्याच्या विश्वासूपणाबद्दल शपथपूर्वक खात्री देणारा. ॰सूत्र-दोरा-नपु. मंगळसूत्र, गळसरी इ॰ ओंवून गांठ दिल्यावर जीं त्या दोऱ्याचीं टोकें राहिलीं असतात तीं. ॰स्थळ-न. पडथळ पहा. ॰हात-पु. (गो.) प्रतिहस्त.

दाते शब्दकोश

बे

शअ. वांचून; विरहित; अभाव दाखविणारा उपसर्ग. याचा फारशी किंवा हिंदी शब्दांशीं समास होतो व हा शब्द नेहमीं पूर्वपद असतो. [फा. बी; तुल॰ सं. विना; हिं. बिन] ज्यांच्या पूर्वपदीं बे शब्द येतो असे अनेक सामासिक शब्द आहेत. त्यांतील कांहीं पुढें दिले आहेत. सामाशब्द- ॰अकली-वि. मूर्ख; बेवकूब. [फा. बी + अक्ल्] ॰अदब-बी-स्त्री. अपमान; असभ्यता; अमर्यादा; अनादर. [फा. बी + अदबी] ॰अदाई-स्त्री. स्वामिद्रोह; विरोध. अबरु-अब्रू-स्त्री. दुर्लौकिक; अपकीर्ति; फजिती. [फा. बी + आब्रू] अबस-क्रिवि. वृथा; व्यर्थ; निष्फळ. ॰आब-पु. अपमान; बेअब्रू. -वि. अपमान झालेला. [फा. बी + आब्] ॰आराम- वि. अस्वस्थ; आजारी. [फा. बी + आराम्] ॰आरामी-स्त्री. अस्वास्थ्य. [फा.] ॰इज्जत-ती-स्त्री. अप्रतिष्ठा. ॰इज्जती-वि. गैरअबरूदार; हलकट. [फा.] ॰इतबार-पु. गैरविश्वास; गैरभरंवसा. [फा.] ॰इतल्ला-क्रिवि. गैरमाहीत; बे-दखल; बडतर्फ. 'त्याचे कार्कून बे-इतल्ला केले.' -रा १०.११०. [फा.] ॰इनसाफ- इनसाफी-पुस्त्री. अन्याय; न्यायाचा अभाव. -वि. अन्यायाचा; अन्यायी. [फा.] ॰इमान-इमानी, बेमान-वि. कृतघ्न; अप्रामाणिक; बेभरंवशाचा. [फा. बी + ईमान् = अधर्मी] ॰इमानी- इमानकी-स्त्री. खोटेपणा; अप्रामाणिकता; कृतघ्नता; विश्वास- घातकीपणा. ॰इलाज-वि. निरुपाय; नाइलाज. [फा.] ॰उजूर- क्रिवि. १ कांहीं न सांगतां; बिनतक्रार. 'या दिवसांत पोटास न मिळे तेव्हां लोक चाकरी बे-उजूर कैसी करितील? '-रा १०.५७. २ विलंबरहित; बेधडक. [फा.] ॰कदर-क्रिवि. निर्धास्तपणें. ॰कम-ब-कास्त-क्रिवि. कांहीं कमी न करतां; साद्यन्त; जसेंच्यातसें. [फा. बी + कम् + उ + कास्त्] ॰करारी- स्त्री. अनिश्चिती; तहमोड. 'त्याजकडून बेकरारीच्या चाली सुरू होतात.'-रा ७.१९ ॰कस-वि. नि:सत्त्व; कमजोर; बेचव; शुष्क. ॰कानू-स्त्री. अन्याय; जुलूम. ॰कानून-कानू-वि. बेकायदेशीर; कायद्याचा भंग करून केलेलें. [फा.] ॰कायदा-पु. कायदेभंग; कायद्यासंबंधाचा अभाव. ॰कायदा-कायदेशीर- वि. नियमबाह्य; गैरकायदेशीर; जुलमी; नियमाचें उल्लंघन करणारा; नियमाला सोडून असलेला [फा. बी + काइदा] ॰कार-वि. १ निरुद्योगी; बे-रोजगारी; रिकामा. २ (व.) निरर्थक; व्यर्थ; उगाच. ३ (ल.) हैराण; निरुपयोगी. 'तिन्ही मोर्चे मिळोन निमे माणूस दुखणियानीं बेकार आहे.' -पेद ३.१८ [फा.] ॰कार- चावडी-स्त्री. (को.) रिकामपणाच्या, निरर्थक गप्पागोष्टी. ॰कारी- स्त्री. रिकामपणा; निरुद्योगीता; बेरोजगारपणा. [फा. बीकारी] ॰किलाफ-पु. मैत्री; सख्य; संशयनिवारण. [अर. खिलाफ् = वैर] ॰कुबी-स्त्री. मूर्खपणा; गाढवपणा; मौखर्य. [फा. बेवकुफी] ॰कुसूर-क्रिवि. न. चुकतां; बिलाकसूर; पूर्णपणें. [फा. बी + कुसूर्] ॰कूब-वि. मूर्ख; वेडगळ; वेडझंवा [फा. बेवकुफ] ॰कैद-स्त्री. शिस्तीचा अभावं; स्वैर वर्तन; अव्यवस्थितपणा; कायदा, नियम किंवा शिस्त यांचे उल्लंघन. -वि. बेशिस्त; स्वैर; अनियंत्रित. -क्रिवि. स्वैरपणानें; कोणत्याहि तर्‍हेचा कायदा किंवा नियम न मानतां. [फा. बी + कैदी] ॰कैदी-वि. स्वैर; कायदा, नियम, नियंत्रिण इ॰ न पाळणारा; बेशिस्त. ॰कौली-वि. बिगर कौलाचा; अभयपत्रविरहित. ॰खत्रे-क्रिवि. निःशंकपणें. 'बेखत्रे हुजूर यावें.' -जोरा १०५. ॰खबर-क्रिवि. असावध; गाफीलपणें. [फा. बी + खबर्] ॰खबर्दार-वि. गैरसावध. [फा.] ॰खर्च-खर्ची-वि. १ खर्च केल्याशिवाय झालेलें, केलेलें; फुकटंफाकट. २ खचीं जवळ नाहीं असा; निर्धन; कृपण. [फा. बी + खर्च्] ॰खातरी-स्त्री. अविचार. 'चार कोटींची मालियत जवळ असतां कंजूषपणानें सर्दारास बेखात- रीनें निरोप दिल्हा.' -जोरा १०९. गर्द-वि. वृक्षरहित; झाडी नसलेलें. 'मुलूख अगदीं वीसपंचवीस कोसपर्यंत बे-गर्द, वेचिराख जाहला.' -पाब १४ [फा. बगिर्द] ॰गार-गारी-बिगार, बिगारी पहा. ॰गुन्हा-पु. गुन्ह्यापासून मुक्तता, सुटका.-वि. गुन्हा नसलेला; अपराधांतून मुक्त झालेला. -क्रिवि. गुन्हा नसतांना. 'बक्षीस बेगुन्हा कैद केलें. ' -जोरा १०५ [फा.] ॰गुमान-नी-वि. बेपर्वा; गर्विष्ठ; उन्मत्त; निःशंक; मुर्वत नसणारा. [फा. बेगुमान्] ॰चतुर-वि. मूर्ख. ॰चरक-क्रिवि. निर्भयपणें; धडाक्यानें; निर्भीडपणें; बेधडक. ॰चव-वि. रुचिहीन; कवकवीत; नीरस; निचव. ॰चाड-वि. चाड नसलेला; लज्जाहीन; उद्धट. ॰चिराख- ग-वि. दीपहीन; ओसाड; उध्वस्त; वस्तीरहित; उजाड. [फा. बी + चीराघ् = दिवा] ॰चूक-वि. बिनचूक; बरोबर; चुका केल्या- शिवाय. [फा. बी + हिं. चूक] ॰चैन-वि. अस्वस्थ; कांहींहि सुचत नाहीं असा [फा. बी + हिं चैन] ॰चोबा-पु. खांबाशिवाय असलेला लहान तंबू. [फा. बीचोबा] ॰छूटपणा-पु. आळा, बंध नसणें; स्वैराचार; स्वच्छंदीपाणा. ॰जबाब-क्रिवि. उद्धट- पणानें; बेपर्वाईनें (बोलणें, उत्तर देणें). [फा. बी + जवाब्] ॰जबाबदार-वि. स्वतःवरची जोखीम न ओळखणारा; जोखीम न ओळखून स्वैर वागणारा. बेजबाबदार राज्यपद्धति-स्त्री. लोकमतास जबाबदार नसलेली राज्यपद्धति. ॰जबाबी-वि. १ उद्धट; उर्मट; बेमुर्वतखोर. २ तासाचे ठोके न देणारें (घड्याळ). [फा. बी + जवाब् = निरुत्तर] ॰जबर-क्रिवि. निर्भयपणें; निःशंक- पणें; बेधडक; जोरानें; उठाव करून; धाक न बाळगतां. 'आमच्या भले लोकांनीं बेजबर घोडीं घालून कित्तूरकरास मोडून वोढ्यापर्यंत नेऊन घातला. ' -ख ५.२३८८ [फा.] ॰जात-वि. (अशिष्ट) हलक्या किंवा निराळ्या जातीचा. ॰जान-वि. निर्जीव; ठार. [फा.] ॰जाब-वि. बेगुमान; बेमुलाजा; बेजबाबदार. [फा.] ॰जाबता-पु. अन्याय; ठरावाविरुद्ध गोष्ट; अविचारी भाषा. 'आम्ही टोंचून घेणार नाहीं, असेना असे मरून जाऊं असे बेजाबता बोलत होते.' -टिकळचरित्र, खंड १. ॰ज्यहा-जा- जहा-वि. फाजील; अनाठायीं; अनुचित; अयोग्य; अमर्याद; अकालीन; रुष्ट; उधळपट्टीचा. [फा.बी + जा] बेजार-वि. १ हैराण; त्रस्त; दमलेले; थकलेला (श्रम, दुःख, कटकट यांमुळें). २ दुखाण्यानें हैराण झालेला; दुखणाईत. [फा. बिझार्] बेजारी- स्त्री. त्रास; हैराणी; थकवा. ॰डर-न. ड्रेडनॉट नांवाचें जंगी लढाऊ जहाज. -वि. न भिणारी; न डरणारा. बेडर पहा. [हिं. डर] ॰डौल-वि. कुरूप; बेढब; घाट किंवा आकार चांगला नसलेला. ॰ढंग-पु. दुराचरण; स्वैराचार; बेताल वागणूक; सोदेगिरी. [हिं.] ॰ढंग-गी-वि. दुराचरणी; व्यसनी; स्वैराचारी. [हिं.] ॰ढब- वि. बेडौल; कुरूप; विक्षिप्त; ढबळशाई; चांगला घाट, आकार नसलेला; ओबडधोबड. [हिं.] ॰तकबी-वि. असमर्थ; ना-तवान. [फा. बेतक्विया] ॰तकसी(शी)र, बेतक्शी(तकसी)र- स्त्री. अपराधापासून, गुन्ह्यापासून, भुक्तता. -वि. निरपराधी; नाहक; निर्दोषी. [फा. बी + तक्सीर] ॰तमा-स्त्री. १ निर्लोभि वृत्ति. २ बेफिकीरपणा; बेपरवा; उदासीनपणा. -वि. १ निर्लोभी; निरिच्छ. २ बेपरवा; बेगुमान; गर्विष्ठ; निष्काळजी; बेसावध; काळजी, कळकळ न बाळगणारा. -क्रिवि. बेगुमानपणें. 'खांद्यावर टाकून पदर बोले बेतमा । लग्नाच्या नवऱ्याशीं बोले बेतमा ।' -पला. [फा] ॰तमीज-वि. (ना.) उद्धट; असभ्य. [फा. बे + तमीज] ॰तर्तुद-स्त्री. तजविजीचा अभाव; अव्यवस्था. ॰तर्‍हा-स्त्री. असाधारणपणा; वैलक्षण्य; चमत्कारिकपणा. -वि. विलक्षण; चमत्कारिक; असाधारण; भारी; अतिशय. 'याउपर उपेक्षा करून कालहरण केलियास नाबाबाचे दौलतीस बे-तर्‍हा धक्का बसेल.' -रा. ५.१६६. [फा. बी + तरह्] ॰ताब-वि. असमर्थ; क्षीण; हतधैर्य. ' मातुश्री अहल्याबाई यांस शैत्यउपद्रव होऊन पांचसात दिवस बे-ताब होती.' -मदाबा १.२१८ [फा. बी + ताब्] ॰ताल- ळ-वि. १ गायनांत तालाला सोडून असलेलें (गाणें-बजावणें). २ ताल सोडून गाणारा, वाजविणारा. ३ (ल.) अमर्याद; अनियं- त्रित; स्वैर; उधळ्या. [हिं.] ॰तालूक-वि. गैरसंबंधीं; संबंध नसलेला; भलता. [फा. बे + तअल्लुक = संबंध] ॰दखल-वि. १ अधिकारच्युत; बेईतल्ला. २ गैरमाहीत. [फा. बी + दख्ल्] ॰दम-वि. दम कोंडला जाईपर्यंत; निपचीत पडेपावेतों दिलेला (मार); थकलेला; दमलेला; निपचीत. [फा.] ॰दरद-दी-दर्द- दर्दी-वि. १ बेफिकीर; बेगुमान; मागेंपुढें न पाहणारा; भय न बाळगितां स्वच्छंदपणें वागणारा. २ बारीकसारीक विचार न पाहणारा. ३ निर्घृण; क्रूर; दया नसलेला. [फा.] ॰दस्तूर-पु. अन्याय; नियमाविरहित गोष्ट; गैरशिरस्ता. ॰दस्रतूई-स्त्री. (गो.) उधळेपणा. [फा.] ॰दाणा-दाना-पु. १ आंत बी नाहीं असें द्राक्ष. हें लहान, गोड, गोल, बिनबियांचें असतें. २ सुकविलेलें द्राक्ष; किसमिस. [फा.] ॰दाणा डाळिंब-न. दाण्यांत बीं नसलेलें डाळिंब. ॰दाद-स्त्री. बेबंदशाही; अन्याय; जुलूम. [फा.] ॰दार-क्रिवि. जागृत; तयार. 'नबाब बेदार जाले.' -रा ७.८३ [फा.] ॰दावा-पु. सोडचिठ्ठी; नामागणी; हक्क सोडणें. ॰दावा पत्र-फारखती-नस्त्री. हक्क सोडल्याबद्दल, नसल्याबद्दल लिहून दिलेला कागद; सोडचिठ्ठी. ॰दिक(क्क)त-क्रिवि. बेलाशक; बिनहरकत; बिनतक्रार; बेउजूर; निःशंकपणें. [फा.] ॰दिल- दील-वि. उदासीन; असंतुष्ट; दुःखी कष्टी. [फा.] ॰दील होणें-बिथरणें. ॰दिली-स्त्री. १ असंतुष्टता; औदासीन्य; निरु त्साह. २ रुष्टता; मनाचा बेबनाव. ॰दुवा-स्त्री. अवकृपा; शाप. [अर.] ॰धडक-क्रिवि. बिनघोक; निर्धास्तपणें; निर्भय; बेलाशक. [हिं.] ॰धरी-वि. धरबंद नसलेला; नियंत्रण नसलेला; मोकाट; स्वैर. [बे + धर] ॰नवा-वि. अधीर; असहाय; निर्धन; भुकेला. 'पादशहा बेनवा होऊन खानास लिहीत. ' -मराचिथोर ५३. [फा.] ॰नहाक-नाहक-क्रिवि. विनाकारण; उगीचच्याउगीच; कारण नसतांना; हक्कनहक्क, हक्कनाहक्क पहा. ॰निगा-स्त्री. दुर्लक्ष; अपरक्षण. [फा.] ॰निसबत-क्रिवि. बेलाशक; काहींहि विचार न करतां; मनांत कोणातीहि शंका न बाळगतां; बेपर्वाइनें; एकदम. [फा.] ॰निहायत-न्याहत-क्रिवि. निःसीम; अपार; परकाष्ठेचा. [फा.] ॰पडदा-वि. १ पडदा नसलेला; उघडपणें; कोणत्याहि तऱ्हेची गुप्तता न राखतां. २ (ल.) मानखंडित. क्वचित् नामाप्रमाणें उपयोग करितात. -पु. १ उघड गोष्ट; २ (ल.) मानखं डना. [फा.] ॰परवा-पर्वा-वि. निष्काळजी; निर्भय; बेगुमान. [फा.] ॰परवाई-पर्वाई-स्त्री. निष्काळजीपणा; बेगुमानी; स्वैरावृत्ति. [फा. बी + पर्वाई; तुला॰ सं द्विप्रव्राजिनी] ॰पाया- वि. गैरकायदा; नियमाविरुद्ध. ॰फंदी-वि. १ व्यसनी; दुराचारी; स्वैर. बेशुद्ध. २ खट्याळ; उच्छृंखल; खोडकर (मूल). ॰फाम-वि. १ बेसावध; बेशुद्ध. २ निश्चिन्त; गाफिल; अनावर; मस्त; तुफान; बेभान. 'शत्रू माघार गेला म्हणून बेफाम नाहीं, सावधच आहों.' -ख ७.३३१०. [फा. बी + फह्म्] ॰फामी-स्त्री. गैर- सावधपणा; गाफिली; निश्चिन्ती; खातर्जमा; दुर्लक्ष. ' या विश्वा- सावर बेफामी जाली याजमुळें दगाबाजीनें निघोन गेला. ' -दिमरा १.२५२. ॰फायदा-वि. गैरफायदेशीर; तोट्याचें; अव्यवस्थित. ॰फिकि(की)र-स्त्री. निष्काळजीपणा. -वि. १ निष्काळजी; बेपर्वा; अविचारी. २ निश्चिंत; निर्धास्त; संतुष्ट. [फा. बी + फिक] ॰फिकिरी-स्त्री. निष्काळजीपणा; गाफिली; निःशकपणा. ॰बंद- पु. अराजकता; शिस्तीचा अभाव; गोंधळ. 'हुजरातीमध्यें बेबंद सर्वथा हिऊं देऊं नये.' -मराआ १४ -वि. अव्यवस्थित; मुक्त; व्यवस्था, बंदोबस्त, कायदा, शिस्त इ॰ नसलेला; बेशिस्त; अराजक. [फा.] ॰बंदशाई-ही, बेबंदाई-बंदी-स्त्री. १ अव्यवस्था; गोंधळ; मोंगलाई; अनायकी; अंदाधुंडी; अराजकता. २ जुलूम. ' सांगुं किती दुनियेवर बेबंदी । ही मस्लत खंदी । ' -राला १०६. ॰बदल-वि. १ बदललेला. २ बंडखोर. 'गुलाम कादर- खान पादशहासी बेबदल होऊन... ' -दिमरा १.२००. [फा.] ॰बनाव-पु. भांडण; तेढ; तंटा; बिघाड. ॰बर्कत-स्त्री. अवनति; हलाखी; तोटा. [फा.] ॰बहा-वि. अमोल; किंमत करतां येणार नाहीं असें. [फा.] ॰बाक-वि. निर्भीड; बेडर. [फा.] ॰बाक-ग, बेबाकी-स्त्री. अशेष फडशा; कर्जाची पूर्ण फेड. -वि. निःशेष; संपूर्ण; कांहींहि शिल्लक, बाकी न ठेवतां फेडलेलें (कर्ज). [फा.] ॰बारत-स्त्री. बेइतबार; अविश्वास. ॰बुनियाद-बुन्याद-स्त्री. अन्याय; राखरांगोळी; नाश. 'आम्ही मदारुल महाम व फारांसीस तिघे मिळून इंग्रेजांची बेबुनियाद करूं.' -रा १०.१९९ [फा. बुनियाद् = पाया] ॰बुदी-बुद-स्त्री. १ नाश; खराबी; अभाव. २ नाबूद. [फा.] ॰भरंवसा-भरोसा-पु. अविश्वास; संशयितपणा; खात्री नसणें. [हिं.] ॰भरोशी-वि. खात्री किंवा भरंवसा अगर विश्वास ठेवतां येणार नाहीं असा; फसव्या. ॰मजगी-स्त्री. वितुष्ट; अरुचि; बेबनाव. 'पादशहांची व गुलामकादार यांची बेमजगी होऊन... 'दिमरा १.१९९. [फा.] ॰मनसबा-मन्सबा- पु. अविचार; खराब मसलत. [फा.] ॰मब्लग-मुब्लक- मोब्लक-वि. असंख्य; अपरिमित. [अर. मब्लघ्] ॰मारामत- स्त्री. नादुरुस्ती. 'आरमाराची बेमरामत जाली.' -वाडसमा २.१९५ -वि. नादुरुस्त; दुरुस्तीची जरूर असलेलें; दुरुस्तीवांचून असलेलें; अव्यवस्थित. [फा.]॰ मर्जी-स्त्री. इतराजी; अवकृपा; मर्जीविरुद्ध वर्तन. [फा.] ॰मलामत-वि. कीर्तिवान्. [अर. मलामत = दूषण] ॰मस्लत-स्त्री. अविचार. ' स्त्रीनायक, बालनायक आणि बेमस्लत, तीन गोष्टी येके ठिकाणीं; चौथा अहंकार; तेव्हां ईश्वर त्या सर्दारीची अब्रू ठेवील तर ठेवो. ' -खपल २.७० [फा.] ॰मान-मानी-मानकी-गी-बेइमान इ॰ पहा. ॰मानगिरी - स्त्री. बेइमानी; हरामखोर. ॰मार-वि. १ किंवा हल्ला करतां न येण्यासारखा (किल्ला). २ अतिशय; कमालीचा; जोरदार; विपुल; भरपूर, बेसुमार इ॰. उदा॰ बेमार-पाऊस-वारा-ऊन्ह-धूळ- लढाई-पीक-धान्य-आंबे इ॰ (पडतो-सुटला-पडतें-उडते-चालती-झालें-पिकले इ॰ क्रियापदांस जोडून उपयोग). ३ आजारी; दुखणाईत. ४ थकलेला; दमलेला; बिमार. ५ (व.) वस्ती नसलेलें; उपयोगांत नसलेलें (घर, वस्तु). [फा.] ॰मारी-स्त्री. १ आजार; आजारीपण; दुखणें. २ शिणभाग; थकवा; अशक्तता. ॰मालूम- वि. माहीत न होण्याजोगें; दिसणार नाहीं, ओळखतां येणार नाहीं, शोधतां येनार नाहीं असें; जाणण्यास कठिण; हुबेहुब. 'नवीन माहितीचा जुन्या पद्धतीशीं बेमालूम सांधा जोडणें कठिण आहे.' -टि ४.२७१ [हिं.] ॰मुनासीब-मुनास्रब-वि. अयोग्य; गैरवाजवी; बुद्धीला न पटणारे; अयुक्त. [हिं.] ॰मुन्सफी-स्त्री. अन्याय. 'हिंदू मुसल्मान, ईश्वराचे घरचे दोन्ही धर्म चालत असतां मुसल्मानानें हिंदूचे जाग्यास उपद्रव करावा हे बे-मुन्सफी.' -पया १० [फा.] ॰मुरवत-मुर्वत-क्रिवि. असभ्यपणें शिष्टाचाराला सोडून; भीड, पर्वा इ॰ न बाळगतां. [फा.] ॰मुरवत-ती, ॰मुर्वत-ती-वि. कठोर; निर्दय; निर्भीड; निर्भय; बेमुलाजा. [फा.मुरुवत् = माणुसकी] ॰मुलाजा-मुलाहिजा- क्रिवि. कांहीं न पाहतां; दयामाया सोडून; निष्ठूरपणें; बेमुर्वतपणें. [अर.मुलाहझा = पर्वा, विचार] ॰मोताद-वि. बेसुमार; असंख्य; अपरिमित. [अर. मुअत्द्द = संख्या, परिमित] मोयीं(ई)न- मोइनी-मोहीन-वि. १ अनियमित; ठरावबाह्य. २ अपरिमित; असंख्य. [फा. बी + मुअय्यन्] ॰मोहर-स्त्री. बिन शिक्क्याचें; शिक्का नसलेलें; गैरमोहरबन्दी.'कित्येक दफ्तरें सर्वमोहर व कितेक बे-मोहरेची.'-रा, खलप २.९. [फा.] ॰मोहीम-- वि.मोहीम न करणारा; उपजीविकेकरतां किंवा धंद्या-उद्योगा- करितां खटपट न करणारा; घरबशा; बाहेर न जाणारा. [फा.] रंग-पु. विरस; खराबी; मौजेचा (मान, कींती, सौदर्य इ॰चा) भंग; अपमान; फजीति. -वि. ज्याचा रंग बिघडला आहे असा. [हिं.] ॰राजी-वि. असंतुष्ट. [फा.] ॰रुख्सत-क्रिवि. पर्वा- नगीवांचून. [अर. रुख्सत् = परवानगी] ॰रू(रों)ख-पु. १ दुसरी- कडे तोंड फिरविणें; दिशा बदलणें. २ प्रेमाचा अभाव. -वि. अप्रसन्न; उदासीन; रुष्ट; विन्मुख. [फा. रुख् = दिशा] ॰रोजगार-री- वि. निरुद्योगी; बेकार; रिकामा. [फा.] ॰लगाम-मी-वि. १ लगाम नसलेला. २ लगामाला दाद न देणारा. ३ (ल.) अनियंत्रित; स्वैर; मोकाट; बेताल. ४ आडवळणी; जाण्यायेण्यास सोयीचें नसलेलें; एकीकडे असलेलें; गैरसोयीचें (शेत, घर). -क्रिवि. एकीकडे; एका बाजूला; आडरस्त्यावर. [फा. बी + लिगाम्] ॰लगामीं पडणें- १ भलत्या मार्गाला लागणें; बहकणें; स्वैर बनणें. २ हयगय होणें; आबाळ होणें. ॰लाग-पु. निरुपायाची किंवा नाइलाजाची स्थिति. 'माझा बेलाग झाला.' -वि. १ जो घेण्याला किंवा ज्यावर मारा करण्याला कठीण आहे असा; दुःस्साध्यं; अवघड; बळकट (किल्ला). २ दुःस्साध्य; दुराराध्य; अप्राप्य; आचरण्यास कठीण असा (विषय). ३ सुधारण्याला कठीण; निरु- पायाचा; दुःसाध्य (रोग, विषय). -क्रिवि. १ मदतीवांचून; उपायावाचून; निरुपायानें; नालाजानें. २ निराधार; आधारावांचून. ३ तडकाफडकीं; ताबडतोब; एका क्षणांत. [फा. बी + म. लागणें] ॰वकर-वक्र-वि. फजीत; मानखंडित; अपमानित. [फा. बीवकर्] ॰वकरी-स्त्री. मानखंडना; अप्रतिष्टा; निर्भर्त्सना. [फा.] ॰वकूब (फ)बेकूब-वि. मूर्ख; खुळसट; अजाण; अडाणी अज्ञान. [फा. बेवकूफ] ॰वकूबी-फी-स्त्री. मूर्खपणा; मूढता. ॰वजे-स्त्री.(व.) गैरसोय; गैरव्यवस्था; गैररीत; विलक्षण प्रकार. [बिवजेह] ॰वतन- क्रिवि. हद्दपार; जलावतन. [अर. वतन् = जन्मभूमि] ॰वसवसा- वस्वसा-वस्वास-क्रिवि. निर्भयपणें; निश्चिन्त; शांतपणें; बे- दिक्कत; निर्भीडपणें. [अर. वस्वास, वस्वसा = भीति, काळजी] ॰वारशी-वारशीक-वारीस-वि. ज्यावर कोणाचा हक्क, वारसा नाहीं असा; निवारशी; योग्य हक्कदार, मालक किंवा वारसा नसलेला. [अर. वारिस् = वडीलोपारर्जित संपत्तीचा हक्कदार] ॰वारसा-पु. वारसाहक्क नसणें; वारस नसणें. ॰वारा-पु. कर्ज- फेड; कामकाज उरकून टाकणें; उलगडा; सांठा, पैसाइ॰ चा निकाल लावणें. [हिं.] ॰शक-वि. १ निर्धास्त; निःशंक; धीट. २ निर्लज्ज. -क्रिवि. १ निःशंकपणें; बेलाशक; निःसंशय २ निर्लज्जपणें. [फा. बी + शक्क्] ॰शरम-श्रम-वि. निर्लज्ज; पाजी; निलाजरा [फा. बे + शर्म्] ॰शरमी-श्रमी-स्त्री. निर्लज्जपणा; पाजीपणा. ॰शर्त- स्त्री. बिनशर्तपणा. -क्रिवि. बिनशर्त; अट न ठेवतां; आढेवेढे न घेतां. [अर. शर्त् = अट, नियम] ॰शिरस्ता-पु. गैरवहिवाट; गैररीत; वहिवाटीच्या विरुद्ध. [फा. सर्रिश्ता = वहिवाट, नियम] ॰शिस्त-स्त्री अव्यवस्था -वि. गैरशिस्त; अव्यवस्थित; अनि- यमित (मनुष्य, वर्तन, भाषण). [फा.] ॰शुद्ध-वि. गैरसावध; (मूर्च्छा इ॰ कांनीं) शद्धिवर, भानावर नसलेला; धुंद; अचेतन; जड. [फा. बी + सं. शुद्धि] ॰शुभह-क्रिवि. निःसंशय. 'बेशुभह शिकस्त खाऊन फरारी होतील.' -पया ४८२.[फा] ॰शौर- वि. बेअकली; मुर्ख; बेवकूब. [अर शुऊर् = अक्कल] ॰सतर- वि. अप्रतिष्ठित; मानखंडीत. [अर. सित्र = पडदा] ॰सनद- सनदी-वि. बेकायदेशीर; सनदेविरहीत. 'श्रीमंत दादासाहेब येऊन त्या उभयतांसी सलूक करणार नाहींत व बेसनद पैसाही मागणार नाहींत.' -रा ६.३८२. ॰समज-पु. (ना.) गैरसमज. -वि. अडाणी. [हिं.] ॰सरंजाम-वि. सामुग्रीविहीन; शिबंदी शिवाय. [फा.] ॰सरम-स्त्रम-(अशिष्ट) बेशरम पहा. ॰सावध- वि. १ लक्ष नसलेला; तयार नसलेला; निष्काळजी; गैरसावध. २ बेशुद्ध; शुद्धीवर नसलेला. [हिं.] ॰सुमार-वि. अमर्याद; अति- शय; अपरिमित; मर्यादेच्या, अंदाजाच्या बाहेर. [फा. बीशुमार्] ॰सुमारी-स्त्री. अपरिमित. ॰सूर-वि. बदसूर; सुरांत नस- लेला (आवाज-गाण्याचा, वाजविण्याचा). [हिं.] ॰हंगाम-पु. १ अवेळ; भलता काळ-वेळ. २ (ल.) दंगा. 'हे बेहंगाम कर- णार.'-ख १२०५. [फा.] ॰हतनमाल-हतन्माल-हन- तमाल-पु. बेवारशी म्हणून सरकारांत जमा झालेला माल, संपत्ति. [फा. बी + तन् + माल्] ॰हतन-मावशी--स्त्री. बेहतनमाल व बटछपाई या संबंधींच्या कामाचें खातें. ॰हतर-हत्तर-हेत्तर- वि. अधिक चांगले; श्रेयस्कर.[फा. बिह्त्तर; तुल॰ इं. बेटर] ॰हतरी-हेत्तरी-स्त्री. बरेपणा; सुधारपणा. ॰हद-द्द-स्त्री-स्त्री. परा- काष्ठा; अमर्यादपणा; अतिशयितता; बेसुमारपणा. -वि अतिशय; पराकाष्टेचा; बेसुमार; अमर्याद; निःस्सीम. [फा. बी + हद्द] ॰हया, हय्या-वि. उद्धट; निर्लज्ज; बेशरम; निलाजरा. [फा.] ॰हाल- पु. दुर्दशा. -वि.दुर्दशाग्रस्त; दुःखार्त. 'चिमट्यानें मांस तोडून बेहाल करून मारिला.'-जोरा ८५. [फा. बी + हाल्] ॰हिक्मत- स्त्री. मुर्खपणा. [हिं.] ॰हिम्मत-ती-स्त्री. भ्याडपणा. [हिं.] वि. हतधैर्य; भ्याड; भित्रा. ॰हिसा(शे)ब-वि. १ अयोग्य; गैरविचाराचें; अनुचित. २ अगणित; हिशोबाबाहेरील; हिशोब करतां येणार नाहीं असें. [फा.] ॰हुकूमी-स्त्री. अवज्ञा; बंडखोरी. ॰हुजूर-क्रिवि. १ एखाद्याच्या गैरहजेरीत. २ (चुकीनें) एखा- द्याच्या समक्ष. [फा.] ॰हुर्म(रम)त-ती-स्त्री. अप्रतिष्ठा; मान- खंडना; अपमान; अकीर्ति. -वि. मानखंडीत; पत घालवून बसलेला; मान नाहींसा झालेला. [फा.] ॰हुशार-वि. गाफील; गैरसावच. ॰हुशारी-स्त्री. बेसावधपणा; गाफिलगिरी. [फा.] ॰होश-ष- वि. बेशुद्ध; धुंद; तर्र; गाफील; मुर्ख; विचारशक्ति नाहींशी झालेला. [फा. बीहोश्] ॰होशी-स्त्री. बेशुद्धी.

दाते शब्दकोश

भर

पु. १ पूर्णता; प्राचुर्य; उत्कर्ष; सीमा; वैपुल्य; कळस; पर्व; ऊत; लोट; बहार; रंग (धान्य, तारुण्य, आरोग्य, मान, संपत्ति, खेळ, उद्योग यांचा).' सति भर आनंदाला जो देतो तोचि भर विलापाला ।' -मोसभा ७.५५. 'गाण्याला आतां भर आला आहे.' २ आवड; कल; मनोवृत्ति (उद्देश, इच्छा, प्रवृत्ति, आवड यांचा). 'पोरंचा प्राय: खेळाकडे भर असतो.' ३ बार (बंदुकीचा). ४ माज; मस्ती; कामुकावस्था (पशूंची). ५ भरतें; उत्तेजन. ६ आवेश. 'यमानें त्या भरांत सावित्रीला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला.' ७ उत्साह; डौल. 'उभे सडे फौजेंत भरानें । -ऐपो २६७. ९ सपाटा. 'होतां द्विज भोजन भर दुंदुभिचा पळहि तो न रव राहे । ' -मोआश्व ५.१३. ८ भार; ओझें. ' प्रपंच भर घे शिरीं करि कृपा पिता त्यावरी ।' -केका ९४. ९ (दुखण्याचा) जोर; आवेगं (शोकाचा). १० (गो.) नाद; फंद. 'भरीक पडचें.' ११ -स्त्री. भरती; भरताड (गलबताचें, गाडीचें); बुज- लेली स्थिति; बूज (तालीची, जाड भिंतीची); पूरण; उणीव भरून काढणें (संख्येची, परिमाणाची). १२ आधिक्य. 'जेव- णाच्या पदार्थांत कांहीं भर लागल्यास ते बंदरावर विकत घेत असूं.' -पाव्ह ४६. १३ भरून काढण्यासाठीं टाकलेली माती, दगड इ॰ (झाडाच्या मुळांवर, बांधाच्या, भिंतीच्या मध्यें इ॰). 'पडवीची जमीन वीतभर खोल आहे, भर घालून ती ओटीच्या जमीनीबरोबर करावी.' १४ पूरण; पुरी करण्यासाठीं मिळ- विलेली संख्या, परिमाण, तुकडा इ॰ उदा॰ रकमेची, कापडाची मापाची भर. -क्रिवि. (शब्दाच्या पुढें जोडल्यानें) पर्यंत; इतकें; पूर्णपणें. उदा॰ तोळाभर सोनें; कोसभर वाट. मणभर-भयभर-प्रीतिभर-आनंदभर इ॰. साद्यंत, इथून याअर्थीं. उदा॰ तिथून पृथ्वीवर; गांवभर; महिनाभर इ॰ शब्दाच्या मागें जोड- ल्यास परममर्यादेपर्यंत; पूर्णतम, उच्चतम स्थितींत, असा अर्थ होतो. उदा॰ भर-अम्मल-आकार-वैराग्य-हंगाम-पीक-ओझें-कचेरी-अमदानी-दौलत-कोस. 'मूठभर रुपयें दिले = मुठीच्या पूर्णमानाइतके रुपये दिले.' आणि 'भरमूठ रुपये दिले म्हणजे पराकाष्ठा करून मुठींत जितके राहूं शकतील तितके (चोंदूनचोंदून भरून) रुपये दिले असा अर्थ. [सं. भृ = भरणें; पोसणें; भर] ॰करणें- १ भरणें; कंठापर्यंत घालणें; तृप्त करणें; आपण न भोगतां दुसर्‍यास देऊन टाकणें. 'आपण स्वतः खाल्लें नाहीं, दान धर्महि केला नाहीं, शेवटीं चोराची मात्र भर केली !' २ न्यूनता पुरी करणें. ॰घालणें-देणें-उठावणी करणें; उत्तेजन देणें; चेत- वणें. ॰घेणें-आपणांस पुरेसें घेणें.(आपल्या)भरानें चालणें- क्रि. आपल्या स्वतःच्या (अविचारी) मार्गास अनुसरणें; स्वच्छंद वागणें. भरीं घालणें-देणें-प्रवाहांत, मार्गांत टाकणें; चेत- विणें;नादीं लावणें. 'तमोगुणें भरी घातलेसे ।' -तुगा ५३९. भरीचा-वि. १ पूरक; भरपाई करणारा; भरतीचा; पुरवणीचा. २ पुरा करण्यास, भरून काढण्यास पुरेसा असलेला. भरी पडणें- आंत पडणें; सहकारी होणें; भुलून जाणें. भरीस पडणें पहा. भरीं भरणें- १ अतोनात नादीं लागणें; पूर्णपणें ग्रासला जाणें; हांवभरी होणें. 'बहुमास भरीं भरला प्रियसख सचिवांसि विसरला निपट ।' -मोवन ४.९८. २ विनाकारण हट्टास पेटणें. भरीस घालणें- १ न्यूनता नाहींशी करण्यासाठीं कमी असेल तें घालणें. २ चढविणें; उत्तेजन देणें. 'लोकीं भरीस घातलें ।' -दा ३.५.१३. भरीस देणें-तोंडापुढे करणें; नादीं लावणें. 'सर्व उदासीनपणें पाहति आम्हांसि देवुनी भरिला ।' -मोआदि ४.८३. भरीस पडणें- १ भरतीस पडणें; (एखादी गोष्ट, काम, मनुष्य इ॰ च्या) कमीपणा, अडचणी भरूंन काढण्यासाठीं वेंचलें जाणें. 'खर्च होणें; नष्ट होणें; गडप, ग्रस्थ केलें जाणें. 'त्यांची सर्व संपत्ति रांडांचे भरीस पडली.' अभिमानास पेटणें. 'मी बाळपणापासून संसाराच्या भरीस पडलों.' (सकर्मक) भरीस घालणें. भरून येणें- १ मनांतून जाणें; विस्मरण पडणें (शोक इ॰). २ पूर्ण बरी होणें (जखम). सामाशब्द-॰अमदानीस्त्री. पूर्णावस्थेची अमदानी, कारकीर्द. ॰अमलीवि. पूर्णत्वानें सरकारच्या अमलाखालीं असणारा (गांव, जिल्हा, तालुका इ॰). ॰अम्मलपु. पूर्ण अंमल, सत्ता. ॰उभरस्त्री. १ भरणें, उपसणें; भरणें व ओतून टाकणें. २ भरणें आणि रितें करणें उदा॰ एखादा पदार्थ घेतांना मापणें आणि खात्री- करितां तो पुनः मापणें. 'मापाची भरउभर केल्यास मोजलेला दाणा कमीजास्त होतच आहे.' ३ (ल.) मिळवणें व गमावणें, खर्च करणें. 'संसाराची भरउभरच आहे.' ४ (वाईट अर्थानें) उठावणी, मथवणी; उभारणी; मन वळविणें; छाप बसविणें (मत, उद्देश, विचार यांची). ५ (ल.) एखाद्या गोष्टीविषयीं विचार करणें, बोलणें. [भरणें + उभरणें] ॰कचेरी-स्त्री. मनुष्यांनीं पूर्ण भरलेली कचेरी. ॰कवळ्या-पु. (गुर्‍हाळ) एक इसम प्रयम चरकांत कांडें लावतो, व त्यांतील रस निघाल्यावर दुसरा इसम तेंच कांडें पुनः लावून उरलेला रस काढून घेतो. यापैकीं पहिला इसम. -कृषि ४७३. ॰कुंब-कू(खू)म-वि. १ (राजा.) स्थिर, गंभीर, शांत, प्रकृतीचा. २ पुष्कळ. [भर + कुंब] ॰कोंडा-पु. (कु.) तूस (कणि- केंतील). ॰खुम-वि. (गो.) भरभक्कम. ॰खुमी-स्त्री. स्वभा- वाची स्थिरता; विचारीपणा, अमत्तता; गांभीर्य. ॰गच्चा-वि. भरचक्का व भररट्टा पहा. ॰गच्चीवि. सोनेरी, रुपेरी, कलाबतू ज्यांत फार विणली आहे असें (कापड, अशा कापडाचा केलेला अंगरखा इ॰). ॰गच्ची जेवण-न. चांगल्या चमचमीत पदा- र्थांनीं पोट भरणें; आकंठ भोजन. ॰ग(गी)त-स्त्री. १ भरती, भर- ताड (गाडीचें, पोटाचें). २ भरून काढलेली स्थिति (धक्का, बंधारा, जाड भिंत यांची). ३ पूरण; पूर्तता (संख्या, परि- माण यांची). -न. बारदान; भरताड; ओझें; आंतील जिन्नस. (गलबत, गाडी इ॰ च्या) (कों.) पूर्ण. ॰गांव-पुन. दाट वस्तीचा गांव; घरें जवळजवळ असून वस्ती मोठी असलेला भाग. ॰गोणीस्त्री. भरलेली, सबंध गोणी, पोतें; भरजकात बसण्या- जोगी गोणी. ॰गोळी-स्त्री. गोळीचा टप्पा (लांब पल्ल्याच्या बंदुका, तोफा यांच्या). -क्रिवि. २ गोळीच्या अंतरावर, टप्प्यांत. ॰घोसानेंक्रिवि. प्रतिष्टा न गमावितां; ऐटीनें; धौशा वाजवीत; चढ्या घोड्यानिशी. 'भर घोसानें श्रीमंत त्यावर पुण्यास येतां क्षणीं ।' -ऐपो ३९६. ॰चक्का-वि. चांगल्या वस्तूंची चंगळ असणारी (मेजवानी); तब्बल; ओकारी येण्याइतकें; यथेच्छ (भोजन). चिकार; दाट भरलेला; गदगच्च; प्रचुर; विपुल (जेवण- अलंकार, वस्त्र, आंबे, लाडू, पीक, पाऊस, हंगाम, पावसाळा, उन्हाळा). ॰चंदी-स्त्री. १ घोड्यास खाण्यास देण्याचें भरपूर धान्य. २ (ल.) भरपूर अन्न. ॰चौकस्त्री. घोडयाची भरधांव चाल. ॰जमास्त्री. भरजमाबंदी; सर्व जमाबंदी (देश, गांव इ॰ ची -सादिलवार; बूड इ॰ च्या वजा वाटीच्या पूर्वींची). ॰जमीन- स्त्री. पूर्णधारा असलेली जमीन. ॰जरी-वि. पूर्णपणें सोन्या- रुप्याच्या कलाबतूचा केलेला. (कपडा, गोंडा, कापड). ॰जवानी- जा(ज्वा)नी-स्त्री. १ ऐन उमेदीचें वय. २ तारुण्याचा भर. [भर + फा. जवानीं] ॰ज्यहा-ज्याहा-ज्यहा-झ्याल-क्रिवि. भरदवड पहा. ॰डावपु. (गंजिफा व बुद्धिबळ) पूर्ण स्थितींतील डाव (भारी पानें खेळण्याच्या, भारीमोहरीं घेण्याच्या पूर्वींचा). ॰तिन्ही सांज-स्त्री. पूर्ण निन्हिसांजाची वेळ; ऐन संध्याकाळ; याच्या उलट. फुकटी तिन्हिसांज ॰तीर-पु. बाणाच्या फेकीचें अंतर, बाणाचा टप्पा. -क्रिवि. अमुक अंतरावर. ॰तोंडली- स्त्री. सबंध; मसाला भरून केलेली तोंडल्यांची भाजी. ॰दंड- पु. भुर्दंड; दुसर्‍याचा जिन्नस आपल्या हातून हरवला किंवा जमीनकी अंगास आली असतां भरावा लागणारा पैका. ॰दवड- दौड-धांव-पल्ला-धूम-दपट--स्त्री. पु. पूर्णदौड, धांव (घोड्याची, मनुष्याची). -क्रिवि. पूर्ण वेगानें (दडवनें, धांवणें, दपटणें, हांकणें, पिटणें, चालवणें, दामटणें, काढणें, पळणें). ॰दार- वि. १ चांगला भरलेला; दळदार; गरभरू; ठसठसीत. २ पूर्ण वाढ झालेला; पिळदार (माणूस, घोडा, छाती, दंड इ॰). ॰दोन प्रहर-पु. ऐन दुपार. ॰दौलत-स्त्री. संपत्ति आणि वैभव यांची भरती, बहार. ॰धाव-चाल-स्त्री. घोड्याची-जलद चाल; चौपायीं जलद धावत जाणें. ॰नकशी-क्षी-वि. १ पूर्ण नकशीचा (कांठ); असल्या काठांचा (कपडा). २ अतिशय कोरींव काम असलेला (स्तंभ, छत, चौकट इ॰). ॰नवती-स्त्री. ऐन तारुण्याचा, हिंमतीचा भर, कळस, बहर. ॰पंचविशी-स्त्री. मनुष्याची ऐनउमर; प्रौढदशा; पुरुषाची उमेदी, वय. ॰पायी-ई-स्त्री. १ भरपावती (येणें अस- लेल्या रकमेची, सालाची). २ भरपावतीची रसीद; प्रायः भर- पाई भरून पावलों हे शब्द लिहून) केलेला इकरार. ॰पायी (ई)झाली-लिहून देतों-उद्गा. (कंटाळा, अतितृप्ति दाख- विणारे शब्द) बस, पुरें करा. ॰पावलीं-क्रिवि. भरचालीनें भरगतीनें. (क्रि॰ पळणें; धावणें; चालणें; येणें; जाणें). [भर + पाऊल] ॰पितळ-वि. (कु.) पितळ, कलाबतू लावून शोभिवंत केलेलें (पायतन, वहाण) ॰पूड-न वाहणार्‍या फोडावर, उठाणू- वर (हवेंत उघडें पडल्यानें) येणारी पातळ त्वचा. (क्रि॰ धरणें; फुटणें; वाहणें; निचरणें; गळणें). अशा रीतीनें बंद झालेलें सपू- यक्षत. ॰पूर-वि. १ पूर्ण भरलेलें; भरून काढलेले; चोंदलेलें. २ प्रचुर; मुबलक. पूर्ण. ३ गंभीर; भरघोंस (आवाज). [हिं.] ॰पेट- वि. भरपूर. ॰पोट-क्रिवि. १ भरलेल्या पोटानें, पोटावर. २ पोटभर (खाणें, पिणें). ॰पोशाख-पु. विशिष्ट दिवशीं किंवा प्रसंगीं घालवायचा पोशाख; खास पोशाख. ॰बादली-वि. पूर्णपणें सोन्याच्या, रुप्याच्या कलाबतूचा केलेला (गोंडा, कपडा, कापड). ॰बिंदु-पु. आकाशांतील क्रांतिवृत्ताचे विषुवापासून अति दूरचे बिंदु. -सूर्य २१. ॰भक्कम-वि. १ प्रचुर; बहुत; मुबलक. २ अतिशय भरलेला, चोंदलेला; आकंठ भरलेला. ॰भार-पु. पूर्ण भार, वजन. 'गुरूचा भरभार साहावया जाण ।' -एभा १२. ५५९. ॰मजल-स्त्री. १ पूर्ण मजल (प्रवासाची). २ -क्रिवि. भरमजलीनीं (प्रवास करणें). [भर + अर. मन्झिल] ॰मज(जा) लस-स्त्री. भरसभा; भरलेली कचेरी. [भर + अर. मज्लस्] ॰मजला-पु. मोठा व उंच वरचा मजला (घराचा). -वि. मोठा व उंच असा वरचा मजला असलेलें (घर). ॰माहा- क्रिवि सर्व महिना. 'एक भरमाहा घास दाणीयाचे ऐवजीं...' -वाडबाबा १.१७६. ॰मूठ-स्त्री. पूर्ण भरलेली मूठ (धान्य इ॰ कानीं). ॰रट्टा-वि. भरचक्का पहा. भर; मोठा; भक्कम; भारी या अर्थींहि योजतात. उदा॰ भररट्टा मजल-कोस-पल्ला. तबल, जबर, जरब शब्द पहा. ॰रस्ता-पु. हमरस्ता. ॰रास-स्त्री. १ शेतांत पिकलेल्या धान्याची एकत्र केलेली रास, ढीग. (भागीदारांत वांटण्याच्या पूर्वींची). २ (सामा.) रास, ढीग. ॰वयाचा- वि. प्रौढ, पोक्त; भरजवानीचा; ॰वसूल-पु. (देश, ग व, जमीन इ॰ पासून) मिळालेला पूर्ण वसूल. ॰वसुली-वि. ज्याचा भरवसूल (कांहीं वजावाट न होतां) मिळाला आहे असा (गांव, शेत इ॰). ॰वांगीं-नअव. निरनिराळ्या फोडी न करतां चिरून, मसाला भरून केलेली सगळ्या वांग्यांची भाजी. ॰वायकी-स्त्री. (व.) बढाई. ॰शाई-स्त्री. गंभीर आवाज निघण्याकरितां पख- वाजाच्या मध्यभागावर लावलेला शाईचा जाड थर, याच्या उलट पाणशाई. ॰सांड-वि. भरपूर, रगड. ॰सुगी-स्त्री. ऐन हंगाम. ॰हाक-स्त्री. १ भर आवाजानें मारलेल्या हांकेचें अंतर, टप्पा. २ -क्रिवि. अशा अंतरावर, टप्प्यावर.

दाते शब्दकोश

पदर

पु. १ वस्त्राचा, कापडाचा शेवटचा भाग; अंचल. 'ओढूं नको फरफरां, घेऊं दे सांवरूनियां पदर ।' -मोसभा ५.७. २ वस्त्राचा नकशीदार कांठ. ३ कापड, दोर, हार यांची घडी; दुमड (एकेरी, दुहेरी); सर. 'चार पदरी कंठा.' ४ ऋणानुबंध; स्नेहभाव. ५ नातें; आप्तसंबंध. ६ कांहीं स्वीकार करण्याकरितां पसरलेलें वस्त्र, वस्त्राचा भाग; ओटी; घोळ. यावरून ७ (ल.) (अ) ताबा मालकी; कब्जा; स्वामित्व; अधिकार; संबंध. 'हें भात तुम्ही आपल्या पदरीं घ्या.' 'हा दोष तुमच्या पदरीं पडेल.' (आ) आसरा; थारा; पाखर. 'न दर स्पर्शोदे तुजवरि विद्येचा सदा वसे पदर ।' -मोशांति ७.३३. 'मी तुमच्या पदरीं पडलों.' 'घालि पदर कृपेचा ।' -बयाबाई रामदासी. (इ) संबंध; अवलंबून असणें; स्वामित्व. 'आपले पदराचा माणूस जाऊं देऊं नये.' (ई) स्वतःची खाजगी मिळकत; पैसा; प्राप्ति; इस्टेट; संग्रह. 'मी सध्यां पदर मोडून खातों.' 'तुझे पदरास काय खार पडला?' ८ थर; आवरण; घडी; कपटा; पापुद्रा (कांदा, भाकरी इ॰च्या वरचा); डोळ्याच्या बुबुळावर येणारा सारा, पडळ. ९ वयांत आलेल्या मुलीनें लुगड्याचा छातीवरून घ्यावयाचा वस्त्राचा भाग. परवंट नेसण्याचें सोडून अंगावरून पदर घ्यावयाचा विधि. (क्रि॰ घालणें; काढणें). परवंट पहा. यावरून १० ऋतुस्नात होणें; नहाण येणें. (क्रि॰ येणें). [सं. पल्लव] ॰उतरणें-विधवा होणें; पदर टाकणें पहा. ॰खरचणें-खाणें-मोडणें-स्वतःच्या खर्चानें जगणें; स्वतः धंदा, संसार चालविणें. ॰घालणें-१ झांकण घालून एखादी वस्तु उघडकीस न येऊं देणें. २ वयांत येणें; ऋतुप्राप्ति होणें. 'बाईसाहेब यास पदर घातला.' (दिव्यास) ॰घालणें- देणें-दिवा मालवणें. ॰घालणें-भरणें-गमावणें-एखाद्या धंद्यांत गांठचा पैसा खर्च करावा, भरावा लागणें; नुकसान लागणें. पदरचा-स्वतःचा; खुद्द आपला; आपल्या कल्पनेनें योजलेला किंवा ठरविलेला. 'ही माझ्या पदरची बातमी नाहीं.' स्वतःच्या तैनातींत असलेला. नोकरीस ठेवलेला. 'पदरचा माणूस, आश्रित,' स्वतःजवळचें, स्वतःच्या गाठीस असलेलें. 'ती आपल्या पदरचें पापही देणार नाहीं.' (अतिशय चिक्कू माणसासंबंधीं म्हणतात). पदरचें घालणें-१ मुळांत नसतां एखादें वाक्य वगैरे (एखाद्या ग्रंथांत, बोलण्यांत) घुसडून देणें; तिखटमीठ लावणें. २ कमताई पडली असतां आपल्या जवळचा पैसा वगैरे घालून भरती करणें ॰टाकणें-१ (डोक्यावरील पदर खालीं काढणें) विधवा होणें. २ पदराच्या खुणेनें एखाद्यास जवळ बोलावणें. पदर पसरणें- १ नम्रपणानें, कळकळीनें याचना करणें. 'पदर पसरिला तुजला रिपुगज पंचानना नृपांमाजीं ।' -मोकार्ण २१.३. २ क्षमा मागण्या- साठीं ओटी पुढें पसरणें; लीन होऊन क्षमेची याचना करणें. 'चुकलें क्षमा करावी, पसराया उशिर काय पदर मला ।' -मोस्त्री ४.४३. ॰फाडून देणें-लग्नाचा संबंध तोडणें. ॰येणें-रजोदर्शन होणें; वयांत येणें (मुलगी). 'दूर दूर सरा, पदर मशि आला दुरुनि चाल शहाण्या! ।' -लावणी. ॰लागणें-१ नातें, आप्त- संबंध जुळणें (मराठ्यांत लग्न ठरवितांना वधूवरांच्या घराण्याशीं आपणांपैकीं एखाद्या घराण्याचा संबंध येतो कीं नाहींत). २ वाईट जातकुळीचा संबंध असणें. 'गोविंदरावाची मुलगी तुम्ही करूं नका, त्यांच्या घराला पदर लागला आहे.' ॰सारणें-कड घेणें; बाजू संभाळणें; लाज राखणें. 'माया माउली कोणी नुरली । पदर साराया । धांवरे धांव यदुराया ।' -धावा (जननीजनक). ॰पदरांत घेणें-१ घेणें; स्वीकार करणें; स्वाधीन करून घेणें, कबूल करणें. 'माझी चुकी मी पदरांत घेतली.' २ आश्रय देणें. 'काय करूं काळानें अभय दिलें घेतलासि तूं पदरीं ।' -मोकर्ण ४५.२९. ३ मुलीचा (लग्नासाठीं) स्वीकार करणें; लग्न लावणें. पदरांत घालणें-टाकणें-मुलगी देणें. पदरांत- पदरीं पडणें-१ मिळणें; हातीं येणें. 'आजचा दिवस पदरीं (पार) पडला.' २ ताब्यांत येणें; सांपडणें. 'त्या भूमिकेवांचुनि सांपडेना । अन्यत्र ठायीं पदरीं पडेना ।' म्ह॰ पदरीं पडलें पवित्र झालें. पदरांत बांधणें-१ जवळ, नजीक असणें. 'अद्यापि बांधिलसें तुजिया मतिनें अधैर्य का पदरें ।' -मोविराट ४.३. २ माथीं मारणें (आरोप, चूक इ॰). पदरांत येणें-ताब्यांत येणें. 'मेल्या विना न देइल आलें जें भव्य राज्य पदरा तें ।' -मोशल्य ३.८१. पदराला(स)गांठ बांधणे-मारणें-आठवण राहण्यासाठीं वस्त्रास गांठ मारणें; आठवण ठेवणें; आलेला अनुभव लक्षात ठेवणें. पदराला(स)खांच पडणें-नुकसान लागणें. पदराला(स)खार लागणें-पडणें-लाविणें-लावून घेणें-नुकसान लागणें; झीज सोसावी लागणें. पदरी असणें-आश्रयाखालीं किंवा ताब्यांत असणें. म्ह॰ अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम. पदरीं-पदरांत घालणें-१ स्वाधीन करणें. 'रवि गेल्यावर तो सुत गंगेच्या घातला तिनें पदरीं ।' -मोआदि १५.१६. २ ठरलेलें भरपूर देणें. पदरीं घेणें-कबूल करणें; मान्य करणें (अप- राध, दोष इ॰). पदरीं माप घालणें-खात्री पटवून देणें; सिद्ध करणें (दोष, पाप); चुकी, अपराध, लबाडी वगैरे पूर्णपणें दाखवून देणें; खात्री पटविणें. पदरीं धरणें-चोर वगैरेंना चोरी करतांना पकडणें. पदरीं बांधणें-१ स्वाधीन करणें. २ जबरदस्तीनें देणें; माथीं मारणें. एक पदरीवर येणें-अरेतुरे करणें, म्हणणें; एकेरीवर येणें. सामाशब्द- पदरकर-करीण-स्त्री. १ (कों.) नहाण येण्याच्या पूर्वीं पदर घेणारी मुलगी; पदर घेण्यालायख मुलगी. २ नुकताच पदर घेतला आहे अशी मुलगी. पदर अर्थ ९ पहा. ॰गांठ-स्त्री. गांठचा पैसा. पदर अर्थ ७ (ई)पहा. ॰पेशा-वि. आश्रित. 'विप्रांस शालजोड्या पदरपेशास कडेतोडे पुष्कळ द्रव्य वाटलें ।' -गापो ७७. ॰फेणी-स्त्री. (तं.) चिरोटा. ॰मोड-स्त्री. स्वतःच्या जवळचा पैसा खर्चणें; शिलकींतील (नफ्यां- तील नव्हे) पैसा खर्च करणें. (क्रि॰ करणें). 'स्नेह्यासाठीं पदर- मोड कर परंतु जामिन होऊं नको ।' -अफला. पदरानपदर-पु. (पदरानें पदर) विवाहसंबंधामुळें जडलेला दूरचा संबंध; लांबचा आप्तसंबंध. [पदर + अनु + पदर]

दाते शब्दकोश