मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

संबंधित शब्द

खुप-सुरत

[फा. खूब्सूरत्] सु-वदन; सुन्दर.

फारसी-मराठी शब्दकोश

खुशनुमा

(वि.) हिंदी अर्थ : खूबसूरत. मराठी अर्थ : सुंदर.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

सूरतदार

(वि.) हिंदी अर्थ : खूबसूरत, सुंदर. मराठी अर्थ : सुस्वरूप.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

पेंड

स्त्री. १ तीळ, खोबरें इ॰ कांतील तेल काढून घेतल्या- वर राहणारा चोथा. जसें:-खोबऱ्याची-तिळाची-करडीची- उंडिणीची-पेंड. या पेंडीच्या सामान्य चार जाती आहेत. पैकीं पहिल्या तीन गुरांना घालतात व चवथीचा खताप्रमाणें उपयोग करतात. २ -पु. पायाला किंवा जोड्याला चालतांना चिकटणारा चिखलाचा (ओल्या काळ्या मातीचा) गोळा; धान्याचा किंवा दुसऱ्या ओल्या पदार्थाचा भिजून झालेला लगदा. ३ कोंवळया नारळांचा घड; नारळीस येणाऱ्या शहाळ्यांचा झुबका. ४ (शेक- ण्यासाठीं) चेचलेलें आणि ऊन केलेलीं पानें; दुखलेल्या भागावर बांधावयाचा नारळाचा चव. ५ वेठीला धरलेल्या मनुष्यांनीं वाहिलेलें ओझें; अशा तऱ्हेनें वेठीचें ओझें वाहणें. ६ घराच्या पाटणीवर किंवा ओमणावर पसरलेला मातीचा थर. ७ (कों.) मोठें ढेंकूळ; मातीच्या भिंतीं इ॰ घालण्यांत उपयोग केला जाणारा मातीचा गोळा; भेंडा. 'कीं पेंड आणि कर्पूर । कीं हंस आणि घुबड अप- वित्र ।' -ह २१.१६५. [सं. पिण्याक; सं. पिंड; प्रा. पेंड] पेंडणें- सक्रि. १ पेंड (वाफललेलीं पानें इ॰ चें) पोटीस बांधणें. २ छपरावर किंवा पाहिल्या मजल्याच्या वरच्या जमीनीवर पेंड टाकणें. ३ कण- गीचें तोंड चिखलानें बंद करणें. ४ बांधणें; गुंडाळणें. ५ गुंडाळणें; वळकटी करणें. [पेंड] पेंड टाकणें-लागवडीस आणण्याच्या जमीनीवर बाजूनें खुणेसाठीं ढेकळें टाकून बांध-वरुळ्या घालणें. ॰वळणें-१ (मोठ्या प्रमाणांत, संख्येंत मनुष्यें, जनावरें इ॰ ) मरणें; आजारी पडणें २ घरांत अडकविणें, कोंडणें (ज्याप्रमाणें धनको रिणकोला कोंडतो त्याप्रमाणें ). पेंडओल-स्त्री. पेंडवल पहा. पेंडखजूर-पु. ओला, लगदा, गोळा झालेला खजूर. [पेंड = गोळा + खजूर] पेंडवल-स्त्री. (थोडासा पाऊस पडल्यामुळें झालेली) ढेंकळांची ओल; जमीन ओली होणें; ओलावा. (समासांत) पेंडवल-जमीन-भुई-काळी-शेत-मार्ग-रस्ता. -वि. १ (क्व) किंचित् ओली झालेली (जमीन). २ (जोंधळा या शब्दा- सह) कणसांत दाणा असलेला. पेंडवल पाऊस-पु. केवळ जमीन भिजण्यापुरता पडलेला पाऊस. पैडसणें-न. (कों.) तीळ, खोबरें इ॰ कांचें तेल काढून घेतल्यानंतर राहिलेला चोथा. पेंड अर्थ १ पहा. [पेंड] पेंडीचा खडा-पु. गाणाऱ्या किंवा नाच- णाऱ्याच्या कुरुपतेवरून श्रोते मंडळीचें लक्ष दूर करण्याकरितां तमासागिरामध्यें बसविलेला सुंदर, खूबसूरत मनुष्य. [पेंड = चोथा + खडा] पेंडीचें गुरूं-न. १ पेंडीची आवड असलेलें, पेंडीवर पोसलेलें जनावर. २ (ल.) लांचखाऊ; लांच घेणारा मनुष्य. [पेंड + गुरूं]

दाते शब्दकोश