मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

गणगोत

गणगोत n A comprehensive term for one's family, relations, &c.

वझे शब्दकोश

गणगोत gaṇagōta n (गण & गोत्र) A comprehensive term for one's family, race, relations, and connections.

मोल्सवर्थ शब्दकोश

न० आप्त, सोयरे, नातेवाईक, संबंधी.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

गणगोत      

न.       कुटुंब, घराणे, नातलग, संबंध, सोयरेधायरे, भाऊबंद इ. व्यापक अर्थी : ‘गणगोत मित्र तूं माझें जीवन ।’ - तुगा ७६९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

आंवळ काथॉ

पु. १ (गो.) गणगोत; आप्तेष्ट मंडळी. २ एकत्र जमून केलेला काथ्याकूट. [आवळणें + काथ्या?]

दाते शब्दकोश

चिटोरा, चिटोरे, चिठोरा      

न.       कपटा; कागदाचा लहान तुकडा : ‘शिवचरित्रावर काही नवा प्रकाश पडेल असं वाटणारं एखादं चिटोरं सापडण्याची आशा वाटली.’ - गणगोत ११२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चुनेगच्ची       

स्त्री.       १. चुन्याने बांधलेली आगाशी. २. (ल.) नुसती तंबाखू चुना लावून खाणे : ‘चुनेगच्चीच्या भक्कम तंबाखूच्या बाराची सवय झाल्यावर मीठा पानवाल्यांचा गुळचटपणा आवडेनासा होतो.’ − गणगोत २३९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गोत

(सं) न० नातें, गणगोत, आप्त.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

गरीबखाना      

पु.       (स्वतःच्या घराचा एक उपचार म्हणून विनयाने असा उल्लेख करतात.) गरिबाचे घर; झोपडी : ‘माझ्या गरीबखान्यात रामूभय्यांचे पहिले स्वागत झाले ते असे.’ − गणगोत १९७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घळघळणे      

अक्रि. डोळ्यांतून पाणी येणे; भावनावश होणे: ‘म्हातारी माणसे वयोमानामुळे लवकर घळघळतात.’ –गणगोत १६५. घळघळाट      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घुमवणे      

सक्रि.       फिरवणे; हिंडवणे : ‘तिथल्या अनेक गल्लीबोळातून त्यांनी मला घुमवलं.’ – गणगोत ११८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जमघट्टा      

पु.       बैठक; अड्डा : ‘कारण तो केशवरावाच्या ‘जमघट्ट्या’तला आहे.’ − गणगोत ८१.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जनाजा      

पु.       प्रेत; शवपेटी; मुसलमानांची तिरडी : ‘बावनखणीत त्या गायिका त्याच्या जनाज्यापुढे चालल्या होत्या’ − गणगोत १२६. [अर.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जथा      

पु.       १. समूह; थवा; तुकडी; तांडा; घोळका; समुदाय; मंडळी : ‘दातेसाहेबांनी आमचा हा जथा चक्क एका मजुराच्या घरीच उतरविला होता’ − गणगोत २०६. २. कुटुंब; वंश; जात; कुळ; पिढी; टोळी; ‘सूर्यवंशी जथा निका ।’ − वेसीस्व ६·५२. ३. घाणा; एका कृतीसाठी लागणाऱ्या मालाचे प्रमाण. [हिं.; सं. यूथिका]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खातर, खातिर      

स्त्री.       १. विचार : ‘स्वामीची खातर जरूर जाणून….’ - मइसा १·१३२. २. आस्था : ‘त्यांतही श्रीमंताचे सरकारांत या संस्थानची यास खातर अधिक.’ - मइसा ७·३७. ३. सत्कार; आदरातिथ्य. ४. आश्वासन. [फा. खातिर] (वा.) खातर होणे, खातिर होणे - स्वागत, आदरातिथ्य होणे : ‘आल्यागेल्या पै-पाव्हण्याची इथे मोठ्या उमदेपणाने खातिर होते’ - गणगोत ११३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खिलवणे      

सक्रि.       खायला घालणे; आतिथ्य करणे : ‘खातात कमी, पण खिलवतात फार.’ - गणगोत २५०.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ओढग्रस्त, घस्त      

पहा : ओढगस्त : ‘किती निराशा, कसले कसलेअपमान, केवढी ओढग्रस्त!’- गणगोत ११२. ओढण      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उमाप      

वि.       अगणित; अतिशय : ‘दानाचं पुण्य आणि तुमचे श्रम दोन्हींच्या बळावर उमाप धान्य मिळेल.’ –गणगोत १९२. [सं. उद्+मा]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)