मराठी बृहद्कोश

पाच मराठी शब्दकोशांतील २,०४,१४० शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

गभीर, गंभीर

वि. १ खोल; अगाध (समुद्र, नदी). 'विमल हृदय तूझें पोत गंभीर वारा ।' -मुरामा. अयोध्या ५७. (हा शब्द बहुधा लाक्षणिक अर्थानें वापरतात). २ शांत; सोशीक; भारदस्त; जरबी; धीराचा. ३ विचारशील; विवेकी. ४ आंतल्या गांठीचा; खोल मनाचा किंवा विचाराचा; ५ धन; घौस; उद्दाम (मेघ, सिंह, प्रवाह इ॰ चा ध्वनि). [सं. गभीर]

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

आभीर

पु. १ गुराखी; गवळी; अहीर; गवळी जात. अहीर पहा. 'हा आभीर गभीर भूपति असा सोडीच ना ते मिठी ।' -आकं ९. तालेमीच्या भूगोलामध्यें आभीर हें नांव सिंधु नदाच्या मुखाजवळील प्रदेशांत रहणार्‍या एका जातीचें म्हणून दिलेलें आहे. ही जात ब्राह्मण पुरुष व अंबष्ठ स्त्री यांपासून झालेली मान- तात. २ एक प्राचीन राष्ट्र. -ज्ञाको (आ) १९३ पहा. [सं.]

दाते शब्दकोश

गहिरा

वि. १ गडद; दाट; पक्का; जबर; चांगला खुललेला (रंग). २ खोल; दाट; निबिड; गाढ (पाणी, पीक, जंगल, छाया, झोंप). ३ गर्द रंगानें रंगविलेलें (वस्त्र). ४ मोठा; उंच; कडाक्याचा (आवाज,स्वर). 'भाट गर्जती गहिरावचनीं ।' -भारा बाल ७.५५. [सं. गभीर; प्रा. गहिर; हिं. गहरा] -री नजर-स्त्री. जिवांत भरणारी, हृदयास चटका लावणारी, नजर, दृष्टि; वांकडी नजर.

दाते शब्दकोश

यमक

न. एक शब्दालंकार. कवितेच्या एका चरणांत किंवा चरणार्धांत जीं अक्षरें ज्या क्रमानें संनिध असतील त्याच क्रमानें दुसऱ्या चरणांत किंवा चरणार्धांत त्यांची आवृत्ति झाली म्हणजे हा अलंकार साधतो. याचे अनेक भेद आहेत. उदा॰ वर्ण-पद-लिंग-प्रकृति-प्रत्यय-भाषा-पदावयव-यमक. या अलं- कारांतील प्रत्येक ओळींतील अक्षरांचा अर्थ प्रायः निराळा असतो. उदा॰ जो धैर्यें धरसा सहस्त्र करसा, तेजें तमा दूरसा । जो रत्नाकरसा गभीर सुरसा भूपां यशोहारसा ।' -र [सं.] 'हरिकीर्तनासीं नर हो तुम्ही जागा.' अशा चार ओळी. यमकाला यमक-१ जशास तसें; तोडीस तोड. (क्रि॰ मिळवणें; साधणें; लावणें; बसवणें; मिळणें; लागणें; बसणें). २ होस हो; प्रत्येक गोष्टीला होकार देणें; अनुमति देणें; होयबा करणें.

दाते शब्दकोश