नऊ मराठी शब्दकोशांमधील २,६२,७३६ शब्दांचा एकत्रित संग्रह
शब्दार्थ
गळा
पु. १. घसा; कंठ; मानेचा पुढील भाग व आतील मार्ग. २. (गायन) सूर; आवाज; कंठ. ३. घागर, बाटली, मडके इ. चा. काठ; मान; तोंड व पोट यांच्यामधील आकुंचित भाग. ४. (सतार) दांडीचे आरंभस्थान. [सं. गल्] गळा उघडा असणे - गळ्यात कोणताही अलंकार (विशेषतः मंगळसूत्र) नसणे. गळा ओरडून पडणे - मोठ्याने शोक करून कंठाला मिठी मारणे. गळा कफणी घालणे - आपल्यासारखा निकाल लावून घेईपर्यंत वैतागाने फकिरासारखे राहणे : ‘त्यावरी तुम्ही वतनाची खबर ऐकोन वतनाकरिता गळा कफणी घालून दरबारास गेलेती.’ - राखं ३·५५. गळा काढणे - मोठ्याने रडणे. गळा कापणे - १. फसविणे; ठकविणे; विश्वासघात करणे. २. उमेद खचवून नाश करणे. ३. गळा कापणे - (शिंपी) गळ्याचे कापड बेतणे. (केसाने) गळा कापणे - वरून मैत्री दाखवून आतून विश्वासघात करून नुकसान करणे. गळा गुंतणे, गळा अडकणे - अडविले, बांधले जाणे; एखाद्या अडचणीत गोवले जाणे. गळा गोवणे - १. प्रतिबंध करणे; अडकविणे; एखाद्याचे हातपाय बांधणे (जुलमाने, वचन इ. घेऊन). गळा गुंतविणे - अडकविणे (त्रासदायक कामकाजात). गळा घालणे - (चर्मकार) जोड्यावर रेशीम भरणे (रेशीम भरण्याचा एक प्रकार). गळा घोटणे - जीव घेणे; मारून टाकणे. गळा जाणे - फाशी जाणे. गळा ताणून बोलणे, गळा तांगडून बोलणे - फाडफाड, खरडून, मोठ्याने बोलणे. गळा तापणे, गळा सुटणे - कंठातील कफ इ. जाऊन टिपेला जाण्याइतका स्वर मोकळा होणे. गळा दाटणे - गहिवरणे; उमाळ्याने घसा दाटणे (दुःख, माया इ. मुळे) : ‘तथ्यप्रभूक्त परिसुनि धर्माचा गहिवरे गळा दाटे ।’ - मोशांति ६·४२. गळा धरणे - १. घसा बसणे (रोग, आंबट, तिखट, खवट इ. पदार्थामुळे). २. थांबविणे; खोटी करणे; हरकत आणणे (बोली, करार यात बेमानपणाने वागून). ३. वाचा बसणे; आवाज नष्ट होणे; निरुत्तर होणे. ४. ताब्यात घेणे : ‘त्वदगुणकीर्तन करितां लज्जा हे पापिणी धरू न गळा ।’ - भक्तमयूरकेका ५८. गळा निवळणे - (गायन) फुटलेला आवाज चांगला होणे, गळा पडणे - आळ घेणे : ‘गळां मोतीं असोन निवाडें । लोकांचिया गळां पडे ।’ - ह २१·२२९. गळा पडणे, गळा फुटणे, गळा बसणे - आवाज घोगरा होणे, चिरकणे. गळा पडणे, गळी पडणे - १. मानेला मिठी मारणे : ‘गेलों गृहासि माता धांवुनियां माझिया गळां पडली ।’ - मोअनु ६·६८. आलिंगन देणे. २. गळ घालणे; निकड लावणे; तगादा लावणे; सक्तीने पाठ पुरविणे. ३. अन्यायाने दोषारोप करणे. ४. शिव्या देत अंगावर तुटून पडणे. ५. एखाद्याच्या अंगावर भार घालणे; लोढणे होणे; फार भीड घालणे; विघ्नासारखे होणे. ६. वाईट सवय, खोड लागणे. गळा पिंजणे - गळा सोलवटणे; आवाज चिरकणे (वांती होऊन किंवा गाताना). गळा बसणे - १. आवाज नीट न उमटणे, न सुटणे. २. मानेत बसणे; थबकट किंवा चपटा होणे (भांडे). गळा बांधणे - आळा घालणे; हातपाय बांधणे, अडकविणे. गळा बांधणे, गळी बांधणे - १. सक्ती करणे; घेण्यास भाग पाडणे. २. अन्यायाने दोषारोप करणे; आळ घेणे; कलंक लावणे. गळा भरणे, गळा भरून येणे - गहिवरणे (मनोविकारांमुळे) व त्यामुळे आवाज कंपित होणे; गुदमरणे; श्वास कोंडणे : ‘असुहृदुदासीनाचे भरले भरतिल न अन्य काय गळे ।’ - मोमीष्म ११·११९. गळा मढणे - गळ्यात बांधणे; एखाद्याच्या अंगावर जबाबदारी टाकणे : ‘बाकीचे वायेदे मुदत लेहून घ्यावी, रुपये त्याच्या गळा मढावे, निशा करून घ्यावी.’ - हिंगणे दप्तर २·१३. गळा मोठा करून रडणे - भोकाड पसरणे; मोठ्याने रडणे. गळा लागणे - (संगीत) आवाज चांगला लागणे; सूर लागणे. गळा सुटणे - १. संकटमुक्त होणे. २. आवाज मोकळा होणे. ३. पाठ पुरविणे; हट्ट घेणे (मूल, तगादेदार, काम घेणारा.) ४. मोठ्याने ओरडणे, डरकणे. गळा सोडविणे - (खाटीक). १. धडापासून मान वेगळी करणे, कापणे : ‘केली हल्ला मधीं शिरला सोडवी गळा कानड्याचा ।’ - ऐपो ३९२. २. एखाद्याला पेचातून मुक्त करणे. गळे कापून नेणे - मुंडकी कापून नेणे : ‘काही गळे कापून नेले म्हणोन वर्तमान आहे.’ - ऐलेसं ३०१२. गळ्याखाली उतरणे - १. गट्ट करणे (लाच, लुच्चेगिरीचा पैसा इ.). २. स्वाधीन होणे; पदरात पडणे. गळ्याचा लाखोटा होणे - घसा बंद होणे, कोंदणे; गुदमरणे. गळ्याची आण, गळ्याची शपथ, गळ्याचेण - गळ्याची शपथ वाहणे, घेणे. गळ्याची फुंकणी होणे - घसा घोगरा होणे, बसणे. गळ्यात असणे - भार पडणे (काळजी, काम, खटपटी इ. चा); अवलंबून असणे. गळ्यात गळा घालणे - सलगीने वागणे; दुसऱ्याच्या कंठाला मिठी मारणे. गळ्यात गोणी येणे - १. अडचण, दुःख यांचे असमंजस उपायांनी निरसन करीत असता उलट जास्त अडचणीत येणे. (जसे :- एखाद्या बैलाने पाठीवरील ओझे लोटून देण्याचा प्रयत्न केला असता ते मानेवर येऊन जास्त ओझे होणे.). २. नुकसानी, तूटबूड अंगावर ओढून घेणे. गळ्यात घालणे - एखाद्याच्या इच्छेविरुद्ध जबाबदारी त्याच्या अंगावर टाकणे; माथी मारणे : ‘जेव्हा तुम्ही हे माझ्या गळ्यातच घातले तेव्हा माझा बेइलाज.’ - मासंवा २·१८२. गळ्यात घोंगडे येणे, गळ्यात लचाड येणे - (डोईवरचे घोंगडे घसरत घसरत गळ्यात आले म्हणजे जीव गुदमरतो त्यावरून) संकट गुदरणे. गळ्यात टाकणे - पहा : गळ्यात घालणे. गळ्यात तंगड्या घालणे - एखाद्याची लबाडी ओळखून त्याचीच फजिती होईल असे करणे. गळ्यात तंगड्या येणे, गळ्यात पाय येणे - सुटण्यास कठीण अशा अडचणीत जास्त गुरफटले जाणे. गळ्यात धनुष्य घालणे - (प्राचीन पद्धत) पराभव करणे व पराभव केल्याची खूण : ‘घालुनि धनुष्य कंठीं धरिला धरि गारुडी जसा अहितें ।’ - मोकर्ण १४·६७. गळ्यात धोतर घालणे - स्वतःचे म्हणणे सिद्ध करण्यासाठी एखाद्यावर सक्ती करणे. गळ्यात पडणे - हिताहिताची, रक्षणाची, पोसण्याची, कर बजावणीची, निस्तरण्याची इ. जबाबदारी अंगावर येणे. गळ्यात बांधणे - आग्रहाने देणे; स्वीकारण्यास भाग पाडणे. गळ्यात मारणे. पहा : गळ्यात घालणे. गळ्यात माळ असणे, गळ्यात माळ घालणे, गळ्यात माळखंड घालणे - १. शिस्त दाखवून काम सोपविणे, हवाली करणे; व्यवहार गळ्यात टाकणे. २. वराने वधू किंवा वधूने वर पसंत करणे, वरणे (माळेचा उपयोग लग्नात होतो यावरून). ३. वारकरी संप्रदायाची खूण आणि विठ्ठलाचा प्रसाद म्हणून तुळशीची माळ गळ्यात घालणे; वारकरी होणे. गळ्यात येणे - अंगावर येणे, बेतणे (धंदा, कारभार, काळजीचे कार्य). गळ्यातला ताईत, गळ्यातला तन्मणी - अत्यंत लाडका, प्रिय. (क्रि. करणे, मानणे, मोजणे, बाळगणे, बनणे, होणे.) : ‘तूं नवऱ्याच्या गळ्यातला ताईत.’ - विवि ८·२·३०. गळ्यात लोढणे अडकविणे, गळ्यात लोढणे बांधणे, गळ्यात लोढणे घालणे, गळ्यात धोंड बांधणे - अडचणीत आणणे; कठीण काम करण्याचा प्रसंग आणणे : ‘राष्ट्रीय पक्ष हा कांहीं जुन्या पक्षाच्या गळ्यांत लोढणें बांधण्यासाठीं निर्माण झालेला नाहीं.’ - लोटिकेले. नको असलेले काम करायला सांगणे; एखाद्याच्या मुक्त संचारावर बंधने येतील अशी बाब त्याच्या माथी मारणे. गळ्यात हात घालणे, गळ्यात हात टाकणे - १. आलिंगन देणे. २. मन अनुकूल करणे, वळविणे; दादा-बाबा करणे. लाडी गोडी लावणे. गळ्यापर्यंत येणे - सहनशक्तीची परमावधी होणे (कष्ट, पीडा, दुःख यात). गळ्याला दोरी लागणे, गळ्याला फास लागणे, गळ्याला रसायण लागणे, गळ्याला तात लागणे - एखाद्या कार्याकडे ओढ लागणे, त्याविषयी अतिशय चिंता लागणे; पेचात असणे; संकटात पडणे : ‘आग्रह करूनि लावू कोणेकाच्या गळ्यां कशी तात ।’ - भक्तमयूरकेका २. गळ्याला लागणे - एखादे काम केलेच पाहिजे अशा अवस्थेला येणे : ‘गळ्याला लागलेली पोर एकदाची कशीतरी उजवावी.’ - परिहरि १७. गळ्यावर गाणे म्हणणे, गळ्यात गाणे म्हणणे - सुरेलपणे शास्त्रीय पद्धतीने व मनमोकळेपणाने गाणे. गळ्यावर बोलणे - वरवर बोलणे; विचार न करता भाषण करणे. गळ्यावर सुरी ठेवणे, गळ्याला नख लावणे - जीव घेण्याची भीती घालणे; अत्यंत संकटात घालणे : ‘कां नख न लाविलें जननी ।’ - मोउद्योग ११·२३. गळ्याशी गळा मिळविणे - १. (गायन) दुसऱ्याच्या सुराशी आपला सूर मिळविणे. २. गळ्यात गळा घालणे. गळ्याशी येणे, गळ्याशी पाणी लागणे - नुकसानीची बाब होणे, परमावधीला पोहोचणे. गळ्यातील कफनी काढणे - मनासारखा निकाल होईपर्यंत त्राग्याने दीनवेष धारण केलेला असेल (पागोटे बांधण्याचे सोडून देणे, श्मश्रू न करता दाढीडोई वाढविणे इ.) तो सोडणे : ‘आपण बादशाहीवर नजर देऊन आमचे गळ्यांतील कफनी काढावी.’ - ऐलेसं ७४८८.
गळा
गळा gaḷā m (गल S) The throat, the forepart of the neck and the passages within. 2 In singing. The voice. 3 The neck of a pitcher, bottle, and similar things. गळां On the throat or neck. गळां ओरडून पडणें To fall upon in full cry. गळा केसानें कापणें To kill or ruin by deep or refined policies, observing meanwhile a bland and gentle deportment; to make a show of affection or kindness; to destroy as by a hair or invisible instrument. गळा कापणें To deceive, trick, gull. 2 To ruin by disappointing expectations. गळा कापला खोकला मिटला or वारला Used where a remedy is worse than the evil. गळा गुंतणें or अटकणें g. of s. To be restricted or bound down: also to be involved (in some difficulty). गळा गोवणें To restrict or confine; to tie one's hands (by exacting a promise &c.) 2 To involve or implicate (in a troublesome business &c.) गळा दाटणें g. of s. To be under some vehement emotion (of grief, tenderness &c.); to be choking. गळा धरणें g. of o. To attack or seize the throat--a disease, an acrid or a rancid article. 2 To stop, detain, obstruct (by unfaithfulness to engagements &c.) 3 g. of s. To become speechless; to lose one's voice. गळा तांगडून बोलणें To speak ratingly, fiercely, vehemently. गळा पडणें-फुटणें-बसणें g. of s. To become hoarse or cracked in one's voice. गळा पिंजणें g. of s. To have one's throat excoriated or rough-drawn (as through vomiting bile or crudities). गळा बसणें g. of s. To sink in the neck; to become low, flattish, or squat. गळा बांधणें To restrict or confine; to tie up one's hands. गळां or गळीं बांधणें To force upon; to oblige to accept. 2 To fix an accusation or a slur wrongfully. गळा भरून येणें g. of s. To swell and heave under some violent passion or affection; to feel stifling in the throat; to choke. गळा लागणें To get one's voice in tune; to catch the key. गळा सोडविणें To cut the throat of. गळीं or गळां पडणें To fall upon one's neck, i. e. to embrace. 2 To importune, urge, dun; to hang upon in entreaty or enforcement. 3 To accuse wrongfully. 4 To fall upon with abuse and reproaches. 5 To lie upon one's hands; to be a load, clog, encumbrance unto. 6 To attach itself unto--an evil habit. गळीं लागणें To importune, urge, hang upon--a child, a dun, a task-master. 2 To bawl, bellow, vociferate. Ex. गळीं काय लागतोस लाहनानें कां बोलेनास? गळ्याखालीं उतरणें To be gulped--a bribe, a peculation or picking. गळ्याचा लाखोटा होणें g. of s. To have one's throat stopped up, stuffed, clogged &c. गळ्याची फुंकणी होणें g. of s. To become hoarse. गळ्याची आण or शपथ or (abridged) गळ्याचेण An oath upon one's throat or life. Ex. तुला माझ्या गळ्याची शपथ आहे I adjure you upon my throat or life. गळ्यांत असणें To have (duties, cares, troubles) lying upon one. गळ्यांत गोणी येणें g. of s. To get a burden or trouble aggravated by injudicious measures to remove it. (The figure is that of a bullock which, in his endeavors to throw his load, throws it forward upon his neck, and becomes pinned to the ground by it.) 2 To incur a loss, or failure, or a misfortune. गळ्यांत धोतर घालणें To force a man to prove his assertions. गळ्यांत पाय येणें g. of s. To be involved in inextricable embarrassment. गळ्यांत माळ or माळखंड घालणें To commit unto or charge with the conduct of a business. 2 (The object of the माळ or माळ- खंड being a male or a female,) to elect (respectively) a person to be one's husband or one's wife. गळ्यांत येणें To devolve or fall upon--some care or business. गळ्यांत हात घालणें To clasp round the neck, i. e. to conciliate or persuade. गळ्यापर्यंत येणें To arrive at the highest bearable degree--a pain or an affliction. गळ्याला दोरी-फास-रसायण &c.--लागणें To have an ओढ or drawing towards (some business &c.) गळ्यावर or गळ्यांत गाणें To sing openly, clearly, sonorously; to sing with the voice duly exerted. गळ्यावर बोलणें To speak lightly, thoughtlessly insincerely. गळ्यावर सुरी ठेवणें To threaten the life of. गळ्याशीं गळा मिळविणें To suit voice with voice in singing. मोठा गळा करून रडणें To cry loudly; to bawl, bellow, roar.
पु. १ घसा; कंठ; मानेचा पुढील भाग व आंतील मार्ग. २ (गायन) सूर; आवाज; कंठ. 'तिचा गळा बसला.' 'त्याचा गळा मधुर आहे.' म्ह॰ १ गाणाराचा गळा नाचणाराचा चाळा. २ गातां गळा शिंपतां मळा. ३ घागर, बाटली, मडकें इ॰ चा कंठ, मान, तोंड व पोट यांचेमधील आकुंचित भाग. ४ (सुतार) दांडीचें आरंभस्थान. [सं. गल. हिं. गल्ल] (वाप्र.) ॰उगविणें- कर्जमुक्त होणें; संकटांतून पार पडणें. ॰ओरडून पडणें-मोठ्यानें शोक करून कंठास मिठी मारणें. ॰काढणें-मोठ्यानें रडणें. ॰कापणें-१ फसविणें; ठकविणें; भोंदणें. २ उमेद खचवून नाश करणें. ३ (शिंपी) गळ्याचें कापड बेतणें. म्ह॰ गळा कापला खोकला मिटला-वारला = संकटापेक्षां त्याच्या परिहाराचा उपाय जेथें विशेष घातक असतो तेथें वापरतात. केसानें गळा कापणें- वरून मैत्री दाखवून आंतून विश्वासघात करून नुकसान करणें. गळा गुंतणें-अटकणें- अडविलें, बांधलें जाणें; एखाद्या अडचणींत गोंवलें जाणें. ॰गोवणें- १ प्रतिबंध करणें; अडकविणें; एखाद्याचे हातपाय बांधणें (जुलमानें, वचन इ॰ घेऊन). २ गुंतविणें; अडकविणें (त्रासदायक कामकाजांत). ॰घालणें-(चांभारी) जोड्यावर रेशीम भरणें (रेशीम भरण्याचा एक प्रकार). ॰तांगडून बोलणें- फाडफाड, खरडून, मोठ्यानें बोलणें. ॰ताणणें-टांगणें-(गायन) गळ्याच्या शक्तिपेक्षा फार उंच स्वरानें गाणें; अशा प्रकारें गाईलें असतां गळ्यास त्रास होणें. ॰तापणें-सुटणें-कंठांतील कफ ई॰ जाऊन टीपेस जाण्याइतका स्वर मोकळा होणें. ॰दाटणें-गहिंवरणें; उमाळ्यानें घसा दाटणें (दुःख, माया ई॰ मुळें). 'तथ्यपरभूक्त परिसुनि धर्माचा गहिंवरें गळा दाटे ।' -मोशांति ६.४२. ॰धरणें- १ घसा बसणें (रोग, आंबट, तिखट, खवट, इ॰ पदार्थांमुळें). २ थांबविणें; खोटी करणें; हरकत आणणें (बोली, करार यांत बेमानपणानें बागून) ३ वाचा बसणें; आवाज नष्ट होणें; निरु- त्तर होणें. ४ ताब्यांत घेणें. 'त्वद्गुणकीर्तन करितां लज्जा हे पापिणी धरू न गळा ।' -भक्तमयूर केका ५८. ॰निवळणें- (गायन) फुटलेला आवाज चांगला होणें. ॰पडणें-आळ घेणें. 'गळां मोतीं असोन निवाडें । लोकांचिया गळां पडे ।' -ह २१. २२९. ॰पडणें-फुटणें-बसणें-आवाज घोगरा होणें, चिरकणें. गळां-गळीं पडणें-१ मानेस मिठ मारणें. 'गेलों गृहासि माता धावूनियां माझिया गळां पडली ।' -मोअनु ६.६८. आलिंगन देण. 'लावशील लळा तर गळां.' २ गळ घालणें; निकड लावणें; तगादा लावणें; सक्तीनें पाठ पुरविणें. ३ अन्या- यानें दोषारोप करणें. ४ शिव्या देत अंगावर तुटून पडणें. ५ एखाद्याच्या अंगावर भार घालणें; लोढणें होणें; फार भीड घालणें; विघ्रासारखें होणें. ६ वाईट संवय, खोड लागणें. ॰पिंजणें- गळा सोलवटणें; आवाज चिरकणें (वांती होऊन किंवा गातांना). ॰बसणें-मानेंत बसणें; थबकट किंवा चपटा होणें (भांडें). ॰बांधणें-आळा घालणें; हातपाय बांधणें, अडकविणें, ॰गळां- गळीं बांधणें-१ सक्ती करणें; घेण्यास भाग पाडणें. २ अन्या- यानें दोषारोप करणें; आळ घेणें; कलंक लावणें. ॰भरणें-भरून येणें-गहिवरणें (मनोविकारामुळें) व त्यामुळें आवाज कंपित होणें; गुदमरणें; श्वास कोंडणें.' असुहृदुदासीनाचे भरले भरतिल न अन्य काय गळे ।' -मोभीष्म ११.११९. ॰मोठा करून रडणें- भोकाड पसरणें; मोठ्यानें रडणें. ॰लागणें-(संगींत) आवाज चांगला लागणें; सूर लागणें. ॰सोडविणें-(खाटीक) १ धडापासून मान वेगळी करणें, कापणें. 'केली हल्ला मधीं शिरला सोडवी गळा कानड्याचा ।' -ऐपो ३९२. २ एखाद्यास पेंचांतून मुक्त करणें. गळां-ळीं-कंठांत; मानेवर. 'अर्पी गळां हार जया सुकाळीं ।' -वामन सीता स्वयंवर ६९. ॰म्ह १ गळां नाहीं सरी सुखी निद्रा करी. २ गळ्यांत माळा, पोटांत काळा. गळीं उत- रणें पटणें; समजणें. ॰जाणें-फांशीं जाणें. ॰लागणें-१ पाठ पुरविणें; आळी घेणें (मूळ, तगादेदार, काम घेणारा). २ मोठ्यानें ओरडनें, डरकणें. 'गळीं काय लागतोस, हळू कां बोलेनास?' गळयाखालीं उतरणें- १ गट्ट करणें (लांच, लुच्चे- गिरीचा पैसा इ॰). २ स्वाधीन होणें; पदरांत पडणें. -ळ्याची लाखोटा होणें-घसा बंद होणें, कोंदणें; गुदमरणें. -ळ्याची आण-शपथ, गळ्याचेण-(संक्षिप्त)-गळ्याची शपथ वाहणें, घेणें. -ळ्याची फुंकणी होणें-घसा घोगरा होणें, बसणें. -गळ्यांत असणें-भार पडणें (काळजी, काम. खटपटी इ॰चा); अवलंबून असणें. ॰गोणी येणें- १ अडचण, दुःख यांचें असमंजस उपायांनीं निरसन करीत असतां उलट जास्त अडचणींत येणें (जसें, एखाद्या बैलानें पाठीवरील ओझें लोटून देण्याचा प्रयत्न केला असतां तें मानेवर येऊन जास्त ओझें होणें). २ नुकसानी, तूटबूड अंगावर ओढून घेणें. ॰घोंगडें-लचांड येणें-(डोईवरचें घोंगडें घसरत घसरत गळ्यांत आलें म्हणजे जीव गुदमरतो त्या- वरून). संकट गुदरणें. ताई, आलें घोंगडें गळ्यांत !' -त्राटिका. ॰धनुष्य घालणें-(प्राचीन पद्धत) पराभव करणें व पराभव केल्याची खूण. 'घालुनि धनुष्य कंठीं धरिला धरि गारुडी जसा अहितें ।' -मोकर्ण १४.६७. ॰धोतर घालणें-स्वतःचें म्हणणें सिद्ध करण्यासाठीं एखाद्यावर सक्ति करणें ॰पडणें-हिताहिताची, रक्षणाची, पोसण्याची, बजावणीची, निस्तरण्याची इ॰ जबाब- दारी अंगावर येणें. 'भाऊ गेल्यापासून त्याचा संसार माझ्या गळ्यांत पडला.' ॰तगड्या-पाय येणें-सुटण्यास कठिण अशा अडचणींत जास्त गुरफटलें जाणें. 'ज्याच्या तंगड्या त्याच्या गळ्यांत.' ॰बांधणें-आग्रहानें देणें; स्वीकारण्यास भाग पाडणें ॰माळ, माळखंड घालणें- १ शिस्त दाखवून काम सोंप विणें, हवालीं करणें; व्यवहार गळ्यांत टाकणें. २ वरानें वधू- किंवा वधूनें वर पसंत करणें, वरणें (माळेचा उपयोग लग्नांत होतो यावरून). ॰येणें-अंगावर येणें, बेतणें (धंदा, कारभार, काळजीचें कार्य). ॰लोढणें किंवा धोंड बांधणें-नाखुषीनें अडचणींत आणणें; कठिण काम करण्याचा प्रसंग आणणें. 'राष्ट्रीय पक्ष हा कांहीं जुन्या पक्षाच्या गळ्यांत लोढणें बांधण्यासाठीं निर्माण झालेला नाहीं.' -टि ३.२६३. ॰हात घालणें- १ आलिंगन देणें. २ मन अनुकूल करणें, वळविणें; दादा-बाबा करणें. गळयापर्यंत येणें-सहनशक्तीची परमा- वधि होणें (कष्ट, पीडा, दुःख यांत). गळयाला दोरी- फांस-रसायण-तांत लागणें-एखाद्या कार्याकडे ओढ लागणें, त्याविषयीं अतिशय चिंता लागणें; पेचांत असणें; संक- टांत पडणें. 'आग्रह करूनि लावूं कोणेकाच्या गळयां कशी तात ।' -भक्तमयूरकेका २. 'माझ्या गळयाला त्या कामाचें रसा- यण लागलें आहे.' गळयावर-गळ्यांत गाणें-सुरेलपणें, शास्त्रीय पद्धतीनें व मनमोकळेपणानें गाणें. -वर बोलणें-सहज बोलणें; अविचारीपणाचें भाषण करणें'; कपटयुक्त बोलणें. -वर सुरी ठेवणें, गळ्यास नख;लावणें-जीव घेण्याची भीति घालणें; अत्यंत संकटांत घालणें. 'कां नख न लाविलें जननी ।' -मोउद्योग ११.२३. गळ्यांशीं गळा मिळविणें- १ (गायन) दुस- र्याच्या सुराशीं आपला सूर मिळविणें. २ गळ्यांत गळा घालणें. गळ्यांशीं येणें किंवा ॰पाणी लागणें-नुकसानीची बाब होणें, परमावधीस पोहोंचणें. 'मुलगी गळ्याशीं लागली.' (वयानें फार झाली, उपवर होऊन दिवसगत झाले). ॰म्ह १ त्याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हें काम उरकेल = एखाद्याच्या खणपटीस बसल्याशिवाय कार्य होत नाहीं अशा वेळीं म्हणतात. २ गळ्यांत माळा पोटांत काळा. ३ गळ्यांत गळा आणि नळ्यांत नळा = निकट मैत्री. ४ गळ्यांत गरसोळी आणि गांवांत बोंब = खाकेंत मूल व गांवांत शोध. ५ माझा गळा आणि कांदा मुळा. सामाशब्द-॰गळाकाटू-वि. १ गळ्यांच एके बाजूवर भोंवरा असलेला (घोडा). २ गळेकाटू; गळेकापू. गळ्यांतला ताईत-तन्मणी-वि. अंत्यत लाडका, प्रिय. (क्रि॰ करणें; मानणें; मोजणें; बाळगणें; बनणें; होणें). 'तूं नवर्याच्या गळ्यांतला ताईत.' -विवि ८.२.३०.
गळा m The throat. (In singing) The voice. The neck of a pitchor, bottle &c. -केंसानें गळा कापणें To kill or ruin by deep or refined policies, observing meanwhile a bland and gentle deportment, to make as how of affection or kindness. गळा कापणें Ruin by disappointing expectations. Deceive, trick. गळा गुंतणें or अटकणें To be restricted or bound down, also to be involved (in some difficulty). गळा गोवणें To restrict or confine. To involve or be implicated in a troublesome business &c. गळा दाटणें Be choking. गळा धरणे Attack the — a disease &c. Become speechless, lose one's voice. गळा फुटणें-बसणें Become hoarse in one's voice. गळी देणें Hang (a person). Cast into great danger.गळींगळां पडणें Importune, urge, dun, hang upon in entreaty or enforcement. Accuse wrongfully. गळीं-गळां बांधणें Force upon, oblige to accept. Fix an accusation or slur wrongfully. गळ्याची आणशपथ, गळयाचेण An oath upon one's throat or life. गळ्यांत तंगड्या घालणें Catch a man in his own trap. गळ्यांत पाय येणें To be involved in inextricable embarrassment.गळ्यांत माळ घालणें To commit to or charge with the conduct of a business. To elect a person to be one's husband or one's wife. गळ्यात येणें Devolve or fall upon. गळ्यांत हात घालणें To clasp round the neck, i. e. to conciliate or persuade. गळ्यापर्यंत येणें To arrive at the highest bearable – pain or an affliction. गळ्यावर गाणें Sing sonorously. Sing with the voice duly exerted. गळ्यावर सुरी ठेवणें Threaten the life of. मोठा गळा करून रडणें Cry loudly.
(सं) पु० कंठ. २ आवाज.
केशानें गळा कापणारा or काप्या
केशानें गळा कापणारा or काप्या kēśānē ṅgaḷā kāpaṇārā or kāpyā a That destroys with a show of fondness or kindness. See the phrase under गळा.
गोड गळा
गोड गळा Sweet voice (for singing); also sweet singing.
केशाने गळा कापणारा-काप्या
केशाने गळा कापणारा-काप्या a That destroys with a show of fondness or kindness.
गळा. पहा : गल [सं. गल्ल]
गळकघटक क्रिवि.
संबंधित शब्द
गळ
गळा; गल पहा. [सं. गल्ल] सामाशब्द- ॰खुटी-स्त्री. (व.) नाठाळ पशूच्या एका पायास व गळ्यास बांधावयाची दोरी. ॰खोड्याची टांग-स्त्री. (कुस्ती) खप्प्याची टांग पहा. ॰गट बांधणे-(माण.) अंगावरून धोतर लपेटून बांधून गळ्या- मागें गांठ देणें. ॰गंड-न गंडमाळा; गळ्याच्या मांसग्रंथींची वाढ (आवाळूं वाळूक इं॰. [सं. गलगंड] ॰गुं(गूं)ड-नस्त्री. १ गाय, बैल यांची मानेखालीची पोळी. २ अजागलस्तन. ३ गळ्या- खालची गांठ; गलांड. ॰गोंटी-स्त्री. गळगुंड अर्थ १ पहा. ॰ग्रह-पु. गलग्रह पहा. १ मानगुटी धरणारा पुरुष; डोईजड माणूस. 'तो घरांत गळग्रहच होऊन बसला आहे.' २ (ल.) फार त्रास देणारा; विनवणी किंवा बळजबरी करून पाठ पुरविणारा माणूस. जिगजिग लावणारा भिकारी; तगादेदार; धरणेकरी; वेठीस धरून कामे करून घेणारा. 'तो गळग्रह अगदीं दारांतच धरणं धरून बसला.' ३ (नियमितपणाच्या अभावीं, अविश्वासानें) थांबविणारा, अडथळा आणणारा, हरकत किंवा प्रतिबंध करणारा, खोळंबविणारा माणूस. ४ लोढणें; खोडा; प्रतिबंध; फांस. ५ आग्रह; जबरी; बलात्कार. 'तुम्ही भोजनास येण्याविषयीं मला गळग्रह घालतां परंतु मला फावणार नाहीं.' ६ गळ्यास येणारी सूज; गळा धरणें. ७ एक प्रकारचा चिमटा (तापलेलीं भांडीं उतरविण्याचा). ८ (ज्यो.) एक दुष्ट ग्रह. सामाशब्द- [सं. गलग्रह] ॰घांटी-स्त्री. १ गळ्यापुढेचें हाड; घांटी; मणका; घसा; गळा (यांत श्वसनलिका व अन्नमार्ग यांचा समावेश होतो). २ बैलाच्या गळ्यांतील घंटा. ॰चंडी-र्चोडी-स्त्री. १ मान. (क्रि॰ धरणें). २ गचांडी; अर्धंचंद्र (क्रि॰ देणें). ॰चढाव-पुन. फांशी. 'अपाजीराम यास गळचढाव केलें.' -ख ३९६९. ॰चिपी- स्त्री. १ मानगुटी धरणें, दाबणें. गळा. 'त्याची गळचिपी आवळूं नको, कदाचित प्राण जाईल.' ३ (ल.) खोटी; तहकुबी; आशेंत लोंबकळत ठेवणें. ३ पिच्छा; अति आग्रह; तगादा; खणपटी; पाठ- पुरावा. (क्रि॰ धरणें; आंवळणें; करणें; लावणें). [गळा + चेपणें] ॰चुबा-पु. (बडोदें) बायकांच्या चिंचपेटीप्रमाणें पुरुषच्या गळ्यां- तील एक अलंकार. -जनि, शेवटची यादी ३. ॰चुटी-चुट्या- चेट्या-चोट्या-स्त्रीअव. गळघांटीची सूज; (इं.) टॉन्सील. (क्रि॰ बसणें; येणें; फुगणें; होणें). २ (निंदार्थीं किंवा सूचकतेनें) श्वास किंवा अन्ननलिका. (क्रि॰ भरणें; धरणें; चेपणें; फोडणें). 'निंबाला निंबोण्या आल्या व कावळ्यांच्या गळचुट्या धरल्या.' ३ (एव.) अजागलस्तन. ४ (क्व.) बैलाच्या मानेखालची पोळी. ॰चुटी मोकळी होणें- गळचुटी ओसरणें, नाहींशीं होणें. ॰चेपी- स्त्री गळचिपी पहा. २दडपणें; न जुमानणें; फेंटाळणी. 'सरकार लोकांच्या हक्कांची गळचेपी करतें. ' -के २७.५. ३०. -वि. (माण.) गळ्याला दोन भोंवरे असलेला. हें अशुभचिन्ह समजतात. ॰जोट-ड-स्त्री, जीवश्वकंठश्च मैत्री. ' बाह्यइंद्रियांची चडफड । शमेंसि करावा गळजोड ।' -एभा २५.५४. ॰तंतु-पु गळसरी; जानवें. 'गळतंतुवत भजन हो ।'-दावि १७७. ॰द(ध)ट-वि. १ कोडगा; २ छांदिष्ट; बेफाम वगाफिल [गळा + दाट] ॰दंड-पु. गळ्यांतील सांखळी, हार. 'रिते कुंजर गळ- दंडीं ।' -एरुस्व ७.५६. ॰पट्टा-पु चारसहा बोटें रुंद व तीन हात लांब विणलेलें, गळयाभोंवतीं बांधावयाचे लोंकरीचें वस्त्र. [गळा + पट्टा] ॰पट्टी- स्त्री. १ (इं.) कॉलर. 'ज्या बहाद्दरानीं इंग्रजी पाठलून... इंग्रजी गळपट्टी वगैरे सुधारणेची सामग्री आप- लीशी करून टाकली...' -नि ९१३. पपप्रे ७८. २ (कुस्ती) जोडीवाल्याच्या गालफडाच्या खालून आपल्या हाताच्या पोट- रीनें जोडीदाराच्या गळयावर पट्टी बांधून (दाब देऊन) ' त्याला चीत करणें. ॰पातें-न. (व.) मोटेचें जूं. 'मोटेचें गळपातें घे व वाढयाकडे दुरुस्त करण्यास घेऊन जा.' [गळा + पातें] ॰पेंडें- ढें- न. खुंट्यास बांधलेल्या जनावराच्या दाव्यास जोडलेला गळ. बंद (हा चामडयाचाहि असतो). ॰फाशा-वि. हट्टी; अत्या- ग्रही (भिकारी). ॰फांसपु. १ सरफांस; गळयाला घातलेला फांस; फांशीं देण्याचा फांस. २ जीव जावयाजोग दोरीचा वेढा(गुरें इ॰ च्या गळ्यास) (क्रि॰ देणें; घालणें). ॰फांस घेणें-स्वतःच्या मानेस फांस लावून लोंबकळणें; मरणें; जीव देणें; आत्महत्या करणें. ॰फास देणें-दुसर्याच्या गळ्यास फांस लावणें; मारणें. ॰फांसणें-अक्रि. (काव्यांत) गळ्यास फांस लावणें, लागणें. ॰बंद-पु. १ खोगीराचा पुढील बंद. २ दोर (गुराला दावणीला बांधावयाचा). गळपडें पहा. ३ गळयाभोवतीं विशिष्ट तर्हेनें बांधावयाची पट्टी; नेकटाय (इं.) 'मोजे, बूट, गळबंद इत्यादि- कासंबंधींहि विशिष्ट पद्धत ठरली असल्यानें...' -सासं २.२१२. ॰वट-वंड-वणा-वणी-वि. क्रिवि. गळयापर्यंत भरलेलें; कांठो कांठ भरलेलें (भांडें); तोंडोंतोंड; भरपूर; तुडुंब. ' दुधाचें भांडें एक शेरानेंच गळवट भरलें मग त्यांत दुसरा शेर कसा मावेल?' 'गळवंड निठवें तांदूळ घे. ' ॰वटी-वडशी- स्त्री. मानेखालची पोळी. गळगोटी पहा. ॰श्र्वकंठश्च-स्यकंठस्य-न द्दढतर मैत्री; गळेलागू स्नेह; जीवश्चकंठश्च. ॰सट-न. कफ अथवा श्लेष्माची तार, चिकटा. ॰सर-री-पुस्त्री. १ गळ्यांत बांधाव- याचा मणी. २ चार ते आठ पदरी कांचेच्या किंवा सोन्याच्या मण्यांचा हार; एक दागिना. ३ एकपदरी हार. ' गळसरी दुसरी न धरी गळां । ' वामन, रुक्मिणीविलास १३. ४ सौभाग्यालंकार; मंगळसूत्र; काळ्या पोतीचा सर. ' कीं स्त्रियेसी सर्व शृंगार । परि गळसरीविण अपवित्र ।।' -कथा ३.८. ७३. 'सुगंधामाजी कस्तुरी । कीं अलंकारांत गळसरी ।' -भवि २.२०७. ५. (कु.) एक दागिना, यांत घागर्यांचें मंगळसूत्र, पदक इ॰ असून दोन बाजूंस (मुयेदें) (सुमारें १ ।। तोळा सोन्याचीं पोर्तुगाली चलनी नाणीं), गिन्या किंवा पुतळ्या ओंवतात, तसेंच बिलोरी काळ्या -हिरव्या पोतेचे सर असतात. हा फक्त सौभाग्यवती स्त्रिया घालतात. ६ (ल.) वेढा; वेष्टन.' असो त्या सिंधूच्या पैलापारीं । कुशद्विपाची गळसरी । ' -कथा ६.३. ६९ [सं. गल + सृ] ॰सरी बांधणें- (ल.) लग्न लावणें; सौभाग्यचिन्हांकिंत करणें. 'कीं माझा पिता दिनकर । तो हा जाणे विवाहविचार । त्याचे विचारें गळसर । बांधीन तुमचा ।।' -कंथा ५.१३. १५७. ॰सुजी- स्त्री. गुरांचा एक स्पर्शजन्य रोग. ॰सु (सो) री-नअव. गळघांटीची सूज; गळचुटया पहा. (क्रि॰ बसणें; येणें; फुगणें; होणें). 'गळसोटया आणि जीभ झडे ।' -दा ३.६. ३६. ' गळसुटया गंडमाळा मुरुम । ' -स्वानु २.५. ७. ॰सूत्र-नअव. (विनोदानें) १ गळघांटी. २ (काव्य) गळयां- तील दोरा.'योजितो हयगळा गळसूत्रें । ' ॰होड-स्त्री. गळ्याची शपथ.
नरडी-डें
स्त्रीन. १ घसा; अन्नमार्ग. २ गळयाच्या वरल्या भागीं दिसणारा, पुढें येणारा भाग; घाटी; गळा; कंठमणी. 'बळ- कटसुत-शोक-व्याघ्र धरी नृपहरिणाचें नरडें ।' -मोरा रामायण पंचशती ४६. 'हो सावध काळानें जों नाहीं घातलें मुखीं नरडें ।' -मोद्रोण १.४२. [सं. नर्दी = शब्दकरणारी; हिं. गु. नरडो] (वाप्र.) ॰घेणें-ठार मारणें.' अभावाची घेतली नरडी । धाकें उदर तडाडी ।' -दा ५.९. ४६. ॰दाबणें-(एखाद्याचा) गळा दाबून जीव घेणें. ॰धरणें-१ (एखाद्यास) जेवणास खोळंबा करणें. २ गळा धरणें; संकट आणणें; नरडीस बसणें. ॰फोडणें-(एखाद्याचा) गळा कापणें, दाबणें, मारणें. ॰बसणें-घसा बसणें, कोंदणें; आवाज न निघणें. ॰वाजणें-श्वासोच्छ्वास करतांना घसा घरघर वाजणें (दमेकरी इ॰ कांचा वाजतो त्याप्रमाणें). नरडीचा घोट घेणें, नरडीचें रक्त पिणें-ठार मारणें; जीव घेणें. 'तुझ्या नरडीचा घोंट घ्यावयास कोणी उरले नाहीं असें कां तूं समजतोस?' -उषःकाल. नरडीला हात घालणें-जीव घेणें; ठार मारणें. 'त्याच वेळीं बाजीच्या नरडीला हात घालावा,असा त्या मंडळींना त्वेष चढलेला होता.' -स्वप १४८. नरडीस नख देणें-(लहान मूल उपजांच त्याचा) गळा दाबून ठार मारणें. नरडीस बसणें-खणपटीस बसणें; पिच्छा पुरवून, तगादा करून, सतावून सोडणें; गळग्रह घालणें; गळीं पडणें.
नरडी, नरडे
स्त्री. न. १. घसा; अन्नमार्ग. २. गळ्याच्या वरच्या भागात दिसणारा, पुढे येणारा भाग; घाटी; गळा; कंठमणी. [सं. नर्दी; हिं., गु. नरडो] (वा.) नरडी घेणे, नरडे घेणे –ठार मारणे : ‘अभावाची घेतली नरडी ।’ – दास ५·९·४६. नरडी दाबणे, नरडे दाबणे– गळा दाबून जीव घेणे. नरडी धरणे, नरडे धरणे–१. जेवायला खोळंबा करणे. २. गळा धरणे; संकट आणणे. नरडी फोडणे, नरडे फोडणे–मारणे. नरडी बसणे, नरडे बसणे–घशातून आवाज न निघणे. नरडीचा घोट घेणे, नरडीचे रक्त पिणे–ठार मारणे; जीव घेणे. नरडीला नख देणे, लावणे–मूल जन्मताच त्याचा गळा दाबून ठार मारणे. नरडीला हात घालणे–ठार मारणे. नरडीस बसणे–खनपटीला बसणे; पिच्छा पुरवून, तगादा करून सतावून सोडणे; गळी पडणे.
गल
पु. गळा; मान. [सं. गल] ॰कंबल- बैलाच्या मानेखालची पोळी. [सं.] ॰गंड-पु गडमाळा रोग. ॰ग्रह- पु. १ गवांडी; गळचेपी. (क्रि॰ करणें). २ प्रतिपदा, चतुर्थी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, त्रयोदशी, पौर्णिमा व अमावास्या या तिथी (या तिथीस मुंज करीत नाहींत). ३ अन- घ्यायाचा दिवस. ४ ज्याच्या अन्नवस्त्राचा भार त्याच्या इच्छेविरुद्ध दुसर्यावर पडलेला असतो तो; खायला काळ व भुईला भार असा माणूस. -शर. ॰घांटी-स्त्री गळघांटी पहा. ॰गलची- ची. गळा; मानगुटी. ॰च्छ(स्य) कंठच्छ(स्य-स्थ)- वि. जीवश्च कंठश्च; अतिशय दाट' गहन (मैत्री). 'आज गलश्य कंटश' -पेद ६.२. [सं.] ॰शुंडिका-स्त्री. १ अन्नमार्ग; गळा; अन्नाची नळी; गळघांटी (निंघटु). २ पडजीभ; लोळा; घशांतील शुंडाकृति गांठ [सं.]
गळी
स्त्री. टीप; किनरी, तिपदरी गळा; बारीक स्वराचा गळा (आवाज). -वि खड्या सुराचा; टीपेचा; किनरी; तिप- दरी; तिप्पट उंच चढण्यास योग्य. [गळा]
गळी gaḷī f (गळा) Sharpness or shrillness (of voice); the treble.
गळी gaḷī a (गळा) Of a powerful voice; capable of ascending high into the treble.
घांटी
स्त्री. घसा; गळा. 'पूर्वी तुम्हां नाहीं भेटी । तरि कां येणें धरिली घांटी ।' -गीता २.२२६१. २ घाट; कंठ- मणि; कंठनाल; नरडें. 'तिणें पसरितांचि जाभाडी । हनुमंत सवेग घाली उडी । आकळितां जिव्हा लडबडी । तंव घाटीबुडीं रिघाला । ' -भारा किष्किंधा १८.६८. [सं. घाट] (वाप्र.) ॰खाऊन बोलणें- मोठ्यानें बोलणें; ओरडून, खेकसून बोलणें; जीव खरडून, तोडून, खाऊन बोलणें; गळा काढून रडणें, ओरडणें; शिरा ताणून बोलणें; गळेफोड करणें. ॰खाजवणें-(व.) घसा खवखवणें ॰चिप्प- चीप होणें- १ गळा, आवाज बसणें. २ गळ्यांतील, घशांतील विकारामुळे गिळतां न येणें. ॰पडणें-(व.) आवाज बसणें. ॰फुटणें-बदलणें-१ (मुलगा वयांत आल्यामुळें) आवाज प्रौढ होणें. २ (गाण्यांत) आवाज बसणें; आवाज घोगरा होणें; कंठ फुटणें. ॰बसणें-(ना.) गळ्यांतील विकारामुळें आवाज बिघडणें. ॰वर येणें-(व.) जिवावर येणें; दुष्कर वाटणें. 'काम मोठें घाटीवर येतें तिच्या.'
दम घोंटकर मारना
हिंदी अर्थ : गला दबाकर मारना । बहुत कष्ट देना मराठी अर्थ : गळा दाबून प्राण घेणें, फार त्रास देणें.
गचाटी, गचांडी, गचोंडी, गचोरा
स्त्रीपु. हाताचा पंजा मानेवर ठेवून दिलेला धक्का; अर्धचंद्र. (क्रि॰ देणें; मारणें) २ (धरण्याच्या वेळीं) मान; गळा. (क्रि॰ धरणें).' शिवराम्या, गचांडी सोडून माझे छातीवरून ऊठ.' बाळ - २.१४४. [गचा = गळा]
गळी
स्त्री. टीप; किनरी, तिपदरी गळा; बारीक स्वरांचा गळा (आवाज).
घाटी
स्त्री. १. कंठ; घसा; गळा : ‘पूर्वी तुम्हां नाहीं भेटी । तरि कां येणें धरिली घाटी ।’ – गीता २·२२६१. २. घाट; कंठमणी; कंठनाल; नरडे : ‘तिणे पसरितांचि जाभाडी । हनुमंत सवेग घाली उडी । आकळितां जिव्हा लडबडी । तंव घाटीबुडीं रिघाला ।’− भारा किष्किंधा १८·६८. [सं. घाट] (वा.) घाटी खाऊन बोलणे – मोठ्याने बोलणे; आरेडून, खेकसून बोलणे; जीव खरडून, तोडून, खाऊन बोलणे; गळा काढून रडणे, ओरडणे; शिरा ताणून बोलणे; गळेफोड करणे. घाटी खाजवणे –घसा खवखवणे. (व.) घाटी पडणे – आवाज बसणे. (व.) घाटी फुटणे, घाटी बदलणे – १. (मुलगा वयात आल्यामुळे) २. (गाण्यात) आवाज बसणे; आवाज घोगरा होणे; कंठ फुटणे. (ना.) घाटी वर येणे – जिवावर येणे; दुष्कर वाटणे. (व.)
के(कें)स
केश पहा. (कांहीं वाप्र) ॰काढणें-श्मश्रु करणें. ॰नखलणें केंसांतून नखें (बोटें) फिरवून (फणीप्रमाणें) केंस व्यवस्थित करणें; जटा काढणें. 'वेणी विंचरली केंस नखलुन । अलंकार चढविले हिर्याचे कळसकाप कुंचलुन ।' -प्रला २२७. केसानें गळा कापणें-विश्वासघात करणें; गोडगोड बोलून फसविणें. 'चांडाळानों, हरामखोरानों दगा करून आमचा सर्वांचा केसानें गळा कापलात अँ!! -कांचनगड. केसानेंचरण झाडणें-सेवा करण्याचा कळस करणें; अगदीं हलकी सेवा करणें. 'पाहिन क्षणभरी । चरण झाडीन केशीं ।' -धावा, नवनीत पृ ४४९. केसास धक्का लागूं न देणें-उत्तम प्रकारें संरक्षण करणें; उपद्रव होऊं न देणें. 'तुझिया ढका न लागो साधुपिपी- लिकचमूगुडा केशा ।' -मोकर्ण ५०.३. म्ह॰ १ (गो.) केस- काराचो पार ना तर बोडकांक कोण विचारतां = मोठमोठ्याची दाद नाहीं तर गरिबाची काय कथा? २ केस काढल्यानें मढें हलकें होत नाहीं. = थोड्याशा मदतीनें काम भागत नाहीं. ३ ह्जात बोडक्या आणि एक केसकरीण = निराधार अशा पुष्कळ निरश्रितांमध्यें थोडीशी मालमत्ता बाळगून असणारा. ४ ज्यानें केसकरणी गिळल्या त्यास बोडकीचा काय पाड. सामाशब्द- ॰करीण-स्त्री. सकेशा विधवा. ॰टी-स्त्री. १ घाणेरड्या, विसकटलेल्या केसांच्या झिपर्या. २ (तिरस्कारार्थीं प्रयोग). केंस. केशट्यो पहा. ॰तूड- तोड-नपु. केस तुटल्यानें होणारा फोड, गळूं. ॰पिक्या-वि. म्हातारा. 'हा केंसपिक्या सयाजीरावांचा वडील भाऊ.' -विवि ८.२.३०. ॰पुळी-(गो.) केसतूड पहा. ॰भर-क्रिवि. थोडें सुध्दां. 'मग एवढीं जड पारडीं उचललीं असतां खांदा केसभरहि इकडे कीं तिकडे कलत नाहीं.' -नि.
केस
पहा : केश. (वा.) केस काढणे - श्मश्रू करणे; दाढी-मिशा काढणे. केस नखलणे - केसातून नखे (बोटे) फिरवून (फणीप्रमाणे) केंस व्यवस्थित करणे; जटा काढणे : ‘वेणी विंचरली केस नखलुन । अलंकार चढविले हिऱ्याचे कळस काप कुंचलुन ।’ - प्रला २२०. केसांच्या अंबाड्या होणे - केस पांढरे होणे; वृद्धावस्था येणे. केसात माती घालणे - अतिशय दुःख होणे. केसाने गळा कापणे - विश्वासघात करणे; गोडगोड बोलून फसवणे : ‘चांडाळांनों, हरामखोरांनो दगा करून आमचा सर्वांचा केसाने गळा कापलात ।’ - कांचनगड. केसाने चरण झाडणे - सेवा करण्याचा कळस करणे; अगदी हलकी सेवा करणे : ‘पाहिन क्षणभरी । चरण झाडीन केशीं ।’ - धावा, नवनीत पृ. ४४९. केसाला टका, धक्का लागू न देणे, न लावणे - उत्तम प्रकारे संरक्षण करणे; उपद्रव होऊ न देणे : ‘तुझिया टका न लागो साधुपिपीलिकचमूगुडा केशा ।’ - मोकर्ण ५०·३. केसालाही धक्का न लागणे, केस वाकडा न होणे. - जरासुद्धा नुकसान किंवा दुखापत न होणे.
केशाकेशी
-केश धरणी पहा. 'तुम्हीं ही शब्दांची केशाकेशी चालविली आहे.' -नाकु २०३. केशांत-पु. घोड्याच्या कपा- ळावरचा भाग. -अश्वप १.६१. केशानें गळा कापणारा- काप्या-वि. वरून गोड बोलून विश्वासघात करणारा; गळा शब्द पहा.
का-कांठ
पु. १ कडा; बाजू; मर्यादा; टोंक; किनारी (ताट, पागोटें, मडकें इ. च्या भोंवतालचा भाग); कोर (भांडीं वगैरेंची); कंगोरा. २ किनारा (समुद्राचा); जवळची भूमि; थड-डी (समुद्र, नदी यांची). ३ पदर; किनारी (वस्त्राची वेलबुट्टीची किंवा साधी). [सं. कंठ = गळा, काष्ठा = सीमा] ॰कोणा मोजणें-सूक्ष्मपणें परीक्षणें, बारकाईनें तपासणें. -ठावर बसणें (पखवाजाच्या कांठावर थाप मारली म्हणजे बद आवाज होतो त्यावरून) सोडणें, कमी होणें, (धंदा, गोष्ट), नासणें (काम) अकर्तृक योजतात. 'याच्या कांठावर बसली (चोपकाडी किंवा एकादें अव्याहृत् स्त्रीलिंगी नाम) -ठावर मारणें-बिघ- डणें, नासणें, मारणें. -ठावर येणें-जीवावर येणें. ॰किनारा -पु. बाजूची पट्टी-कडा-कांठ. [काठ + किनारा] ॰कोपरा-पु. बाजू, कड, कोपरा, कोन. 'सारें शेत पिकलें (गेलें) नाहीं कांठ- कोपरा पिकला (गेला). ॰दोरा-पु. कापडाच्या गांठीस-काठाला घातलेला जाड दोरा, पदराला घातलेली दोर्याची शिवण. ॰(ठा) परा-प्रा-फरा पु. १ (कों.) फुटलेल्या मातीच्या मडक्याचा वरचा भाग; अर्धा भाग; गळा; कांठ. 'काणा कुंटा व्याधिव्याप्त । चिंता कांठफरा गळां वहात । तोही शुनीमागें धांवत । कामासक्त अविचारी ।' -एभा १३.२०६. 'जें कां काठफरा उलले । देखसी ज्याचें बुड गेलें । तें न पाहिजे हालविलें । असो संचरलें निज- आळां ।' -एरुस्व १८.४५. ५ बोडकें गलबत (शीड, काठी वगैरे कांहीं नसलेलें). गलबताचा सांगाडा; खटारा. ॰फुटका-वि. ज्याचा कांठ मोडला आहे असा. ॰मोडका-मोडा-कांठफुटका पहा. ॰मोरा-१ कांठप्रा पहा. 'जेवीं नीचाचा कांठमोरा । गळां अडकल्या मांजरा । ते रिघोनि शुचीचिया घरा । नाना रसपात्रां विटाळी ।' -एभा २६.२०६. 'कांठमोरा त्याचे निडळी रुतला ।' -पंच ४.४. 'हातां न ये ज्या घरचा गोरस । तरी ताडन करी त्यांचिया मुलांस । त्यांच्या गळां कांठमोरे हृषीकेश । घालोनियां हिंडवी ।' -ह ७.१४६. २ पोळी, भाकरीचा कडेचा तुकडा. (क्रि॰ घेणें; तोडणें). कांठमोरा गळ्यांत अडकणें-येणें-एकाद्या धंद्यांतील, कामांतील लभ्यांश हातीं न लागतां व्यर्थ शीण पडणें (ज्याला मडक्यांतील वस्तु खावयास मिळाली नाहीं पण मड- क्याचा कांठ गळ्यांत अडकला त्या कुत्र्याप्रमाणें). ॰रें-न. कापडाची किनारी, धार. 'धोतराची कांठरी लोंबू लागली.' ॰वा-पु. (ना.) कांठ; किनारा; थडी. ॰सर-तुडुंब; कांठोकाठ; ओतप्रोत.
कंठ
न. १ गळा (हनुवटीच्या खालील वं खांद्याच्या वरील शरीराचा भाग). 'कंठीं झळके माळ मुक्ताफळांची' -गणपतीची आरती. २ (गायन) गळ्यांतून निघणारा ध्वनि; आवाजी. 'स्वरा- वरुनि समजे कंठ.' 'तिचा कंठ फार मधुर आहे.' ३ (पोपट, कबूतर, चिमणा इ॰) पक्ष्यांतील नराला तारूण्यावस्था प्राप्त झाली असतां गळयाभोंवतीं जी एक काळी रेषा उमटते ती. (क्रि॰ फुटणें). ४ भांडें वगैरेंच्या तोंडाखालचा आवळ भाग; कांठ. ५ श्वासनलि- केचें वरचें तोंड, मणका; नरडें; घसा. 'दुःखामुळें कंठातून शब्द निघेना.' [सं.] ॰दाटणें-भरून येणें-सद्गदित होणें-दुःख किंवा आनंद यांच्या उमाळ्यानें घसा दाटणें, त्यामुळें तोंडांतून शब्द न निघणें; आवेग येणें; सद्गदित होणें. 'दासाकडे हनुमंत पाहे । तों कंठ आला भरून ।' -नव २२.४५. ॰फुटणें- (गायन) १ चिरका आवाज होणें. 'फार उंच स्वरांत म्हणूं नकोस, कंठ फुटला तर पंचाईत होईल.' २ कंठ (अर्थ ३) येणें (पोपट, इ॰ पक्ष्याला). ३ खणखणीत शब्द निघणें. 'त्याला नुकताच कंठ फुटला आहे.' ४ वयांत येणें; प्रौढदशा प्राप्त होणें. ॰बसणें- घसा वसणें; आवाज (गाण्यांत, भाषणांत) स्पष्ट न निघणें. 'उष्णकाळीं तेल तिखट खातां । तेणें बद्धक जहालें बहुतां । म्हणती कंठ बैसले आतां ।नये गातां कीर्तनीं ।।' -संवि २२.१२२. ॰मोकळा करून रडणें-मोठ्यानें रडणें; मनमुराद रडणें; ओक्साबोक्शी रडणें; भोकाड पसरणें. 'मोकळा करुनि कंठ तेधवां । आठवूनि मनिं जानकीधवा ।, -(वामन) भरतभाव १४. कंठास-कंठी-प्राण येणें-१ (भीतीनें, दुःखानें) अर्धमेलें होणें. 'प्रतिवचनप्रसंगीं प्राण कंठास आला ।' -सारुह २.१०३. २ दुःखानें किंवा भुकेनें व्याकुळ होणें. कंठास लावणें-मिठी मारणें; आलिंगन देणें. 'कंठास त्यास लावून ।' -संग्राम १५. कंठी प्राण उरणें-आसन्नमरण होणें; धुगधुगी राहणें. 'त्याच्या नुसता कंठीं प्राण उरला आहे.' कंठी प्राण ठेवणें, धरणें- राहणें-एखादी इच्छा किंवा आशा सफळ झाल्यावर मरूं अशा इराद्यानें जीव धरून राहणें. 'अस्थि शिरा दिसती नयनीं । प्राण कंठीं धरिले त्यानीं ।' -संवि २०.७७. -हृ २१.७२. 'तुम्हाविण कंठीं प्राण राहिला असे ।।' -रत्न ४.३. 'मुलगा येईपर्यंत म्हाता- र्यानें कंठीं प्राण धरून ठेविला होता.' कंठीं धारण करणें- १ गळ्यांत घालणें (माळ, अलंकार, इ॰). २ जपणें; स्मरण करणें. ३ अति प्रिय असणें. ॰कार्कश्य-न. कर्कश आवाज; आवाजाचा कर्कशपणा. ॰कोकिला-ळा-स्त्री. (ल.) सुकुमार, मधुर आवाजाची स्त्री; पिककंठी. [सं.] ॰गत-वि. १ गळ्यां- तील (दागिना, वस्तू इ॰). २ नेहमीं तोंडपाठ असलेला (अभ्यास, वचन इ॰); मुखोद्गत. ३ गळयाशीं आलेला. [सं.] ॰गत प्राण-वि. धुगधुगी असलेला; ज्याचा प्राण गळयाशीं आला आहे असा. ॰चामीकर न्याय-पु. गळयांत सोन्याचा दागिना असून तो हर- वला अशा समजुतीनें घरभर हिंडणें, समानार्थकः- काखेंत कळसा, गावांला वळसा; गांडीखालीं आरी, चांभार पोर मारी. ॰नाळ- न. गळयाची नळी; मान. 'मग कंठनाळ आटे ।' -ज्ञा ६.२०७. 'तदा कंठनाळांतुनी शब्द झाला' -गणपतिजन्म. [सं.] ॰नाळ चिरणें-गळा कापणें; ठार करणें. ॰पाठ-वि. तोंडपाठ; मुखोद्गत. 'धौम्य म्हणे तुज यावें शास्त्रासह कंठपाठ वेदानीं ।' -मोआदि २.५१. ॰भूषण-न. गळ्यांतील दागिना. ॰मणी-पु. १ गळयां- तील हारामधील मुख्य मणी; गळ्यांतलें रत्न. २ गळ्याचा मणका, घांटी. ३ (ल.) अतिशय लाकडा; गळयांतील ताईत (माणूस, वस्तु). 'आवडते कंठमणी ही.' -संग्राम २९. ॰मर्याद- क्रिवि. गळयापर्यंत. आकंठ पहा. 'आज मी कंठमर्याद जेवलों.' ॰माधुर्य-न. (गायन) सुंदर गळा; गोड आवाज. [सं.] ॰माळ-स्त्री. (गो.) गंडमाळा. ॰रव-पु. आवाज. [सं.] ॰रवानें, ॰रवेंकरून-१ मुद्दाम; निश्चयानें; स्पष्टोक्तीनें. २ मोठमोठ्यानें ओरडून; घसा फोडून; कंठशोष करून. ॰रवोक्त- वि. निश्चयानें संगितलेलें (भाषण इ॰). ॰शोष-पु. १ (तहानेनें) घशाला पडणारी कोरड. २ (ल.) ओरड; उगीच घसा कोरडा करणें; घसाफोड; व्यर्थ समजूत (काढणें); (क्रि॰ करणें). 'वादी प्रतिवादी- कडून अतोनात कंठशोष होत. असतांहि ...' -टि ४.१३१. [सं.] ॰सूत्र-न. १ जानवें. २ मंगळसूत्र. [सं.] ॰स्थ-वि. १ घशांत अडकलेलें (बेडका, प्राण). २ गळ्यांतील (दागिना इ॰) ३ (ल.) जिव्हाग्रीं; पाठ असलेला (अभ्यास, पाठ, इ॰). ४ कंठस्थ वर्ण (गळ्यांतून ज्यांचा उच्चार होतो ते:-अ, आ, क, ख, ग, घ, ङ, ह). [सं.] ॰स्थान-गळा. -वि. कंठस्थ पहा, ॰स्नान-न. १ गळयाखालचें स्नान (विशेषतः बायकांचें), (क्रि॰ करणें). २ (ल.) मान छाटणें; शिरच्छेद करणें. (शिर छाटल्यानें आंतून वाहणार्या रक्तानें होणारें स्नान); नागवणें; लुटणें. (क्रि॰ घालणें). 'धोंडी वाघासारख्या काळपुरुषास ज्यानें कंठस्नान घातलें, त्या वापू गोखल्याच्या पराक्रमाचें वर्णन काय करावें ?' [सं.] ॰कंठाग्र-न. घसा; ध्वनि इंद्रिय. कंठ अर्थ ५ पहा. (सामा- न्यतः सप्तम्यंत प्रयोग), कंठाग्रीं.'कंठाग्रीं संधानीं धरियेला हरी । अवघ्या विखारीं व्यापियेला ।' [सं.] ॰कंठाभरण-न. १ गळ्यांतील एक अलंकार. 'सौभाग्यद्रव्यें कंठाभरणें.' -एरुस्व ६. ८७. २ घोड्याच्या मानेखालीं असलेला शुभदायक भोंवरा. ३ गळयांतील ताईत; प्रिय. कंठावरोध-पु. घसा दाटून येणें; घसा धरणें, बसणें. [सं.]
(सं) पु० गळा. २ आवाज, स्वर.
आगळीक
आगळीक āgaḷīka f sometimes आगळीत or आगळी f (आ- गळा) Trespassing upon; injurious or troublesome aggression (upon the person or property of). v कर g. of o.
आकंठ, आकंठमर्याद
क्रिवि. गळ्यापर्यंत-पावेतों (भोजन, जल, संकट, इ॰ किंवा त्यांत बुडणें, निमग्न होणें.) 'हिमोदकें आकंठें ।' -ज्ञा १७.२५८. [सं. आ + कंठ = गळा]
आकरसणे
क्रि. १. जोराने ओढून, आवळून, करकचून, घट्ट बांधणे; आकसणे; संकोचणे; आखडणे; आटणे. २. ओढणे, ओढला जाणे; आकर्षणे. ३. शुष्क होणे; सुकणे (गळा, जीभ). ४. अंगाला ओढ लागणे. ५. आर्द्रता नाहीशी होणे [सं. आ+कृष्]
आकरसणें
अक्रि. १ शुष्क होणें; सुकणें (गळा, जीभ). २ अंगाला ओढ लागणें ३ आर्द्रता नाहींशी होणें (पान, फळ, जमीन वगैरे मधील). ४ चरफडणें; रागावणें; रागानें ओरंडणें; बोलणें; शापणें. [सं. आ + कृष्]
आळाप
पु. ओरडणे, गळा काढून मोठ्याने (रडणे) : ‘मग आळाप पांगुळाचेया ऐसा करिति.’ − लीचउ २२.
अनंती
स्त्री. १ अनंताची बायको. अनंतचतुर्दशीस अनंताबरोबर दुसऱ्या एका लहान रेशमाच्या दोऱ्याची पूजा करतात व तो पूजा करणाऱ्याच्या पत्नीच्या डाव्या दंडास बांधतात. २. गळ्यातील एक दागिना : ‘मग गळा अनंती घातलीया. नमस्कार करितां वाजीनलीया’ –लीचउ ४७०. अनंतोपगा
अनुप्रास (गमतीचे)
नभाची शोभा, शान्त एकान्त, बरे झरे, गुंग करणारे उत्तुंग पर्वत, घरांचे परिसर, करडी नर्स, तरणी मास्तरीण, पुढारी नव्हे पेंढारी, तगडा गडी, या भारी पोरी, दांड पांडोबा, दिग्विजयी दिगू, तोबा तोबा दत्तोबा, कवीला शिकविला, पचेल रुचेल व सुचेल तें, नाविन्यानें नाहलेला. अनाहूत अभिप्राय, सुवर्ण-सन्मानाला सुगंध, तो भासतो, भावनेचा भोवरा, सदा तापदा, मजेदार भडिमार, भटांची खटपट, वाचा व नाचा, जनांना अंजन, हुद्देदारांना गुद्दे, उघडे जबडे, मोकळा गळा, धरती वरती फिरती, असा ठसा, हाच नाच, खेळांत मेळ, वास्तव प्रेमास्तव, या वराला आंवरा, फुलांची लांच, नेपथ्याचें पथ्य.
अष्टयोगिनी
अष्टयोगिनी aṣṭayōginī f pl S The eight Yoginí (female fiends attendant on Durgá). They are named मंगला, पिं- गला, धन्या, भ्रामरी, भद्रिका, उल्का, सिद्धा, संकटा.
अवळ
वि. १ घट्टी; गच्च; आवळून बसणारें; अटस. २ अरुंद; बारीक; आकुंचित; आंखुड; संकुचित (गळा, मनगट, नळी). [सं. आ + वल्]
अवरुद्ध कंठ
पु. भावनेने दाटून आलेला कंठ, गळा – आवाज.
आयत्त
वि. स्वाधीन; आधीन; अवलंबून असणारा; अनु- यायी; अनुषंगी; हाताखालचा [सं.] ॰कंठ-वि. (संगीत) ज्याचा गळा, आवाज स्वाधीन आहे असा (मनुष्य). ॰कंठत्व-न. (संगीत) आवाज ताब्यांत असणें.
आयत्तकंठ
वि. (संगीत) ज्याचा गळा, आवाज स्वाधीन आहे असा (मनुष्य). [सं.]
बगोटा-टें
पुन. बाहुमूल; बाहुवटा; धडाला जेथून हात फुटतात तो भाग; हाताचा खुबा. [हिं.] बगोटी-टें-स्त्री. (कों.) (अशिष्ट) मान किंवा मानेचा मणका; नरडें; मानगुटी. -धरणें, बगोटीस बसणें-मानगोटी, गळा धरणें; पिच्छा पुरवणें. बगोटें-न. १ (कों.) बगोटा पहा. (क्रि॰ धरणें; ओढणें; उपटणें; दुखवणें). २ बगोटी पहा.
बोसीदा
(वि.) हिंदी अर्थ : पुराना धुराना, सडा गला. मराठी अर्थ : जुना पुराणा,.
भालदोरी
स्त्री. पिशाचादिकांचा उपद्रव होऊं नये म्हणून हात, गळा इ॰ मध्यें बांधावयाचा अभिमंत्रित दोरा. भारदोरी पहा. भालदोरी करून गोरटी । घालिती हरीच्या निजकंठी ।' -ह ४. २०६. [भारणें + दोरी]
भरून येणें
अक्रि. भरतें येणें; दाटून येणें; दुःखानें ऊर, गळा, वगैरे दाटणें.
भसरें, भस्त्रें
न. १ परसाकडेचा उपद्रव; धेंडाळी (मुख्यत्वें अपचनापासून होणारी). २ ज्यांत गळा सुजतो, तोंड सडतें असा उष्णतेनें होणारा आजार. [भस!]
चौपदरा, चौपद्रा
वि. १. झोळीसारखा; चार पदर एके ठिकाणी बांधलेला : ‘हातीं पायीं धरिला । मग तो चौपद्रा केला । काळांचां हातीं पडला । लागले मारूं I’ − गीतार्णव २·२३८०. २. चौपदरी; चारपदरी (बे.) (वा.) चौपदरा पसरणे, चौपद्रा पसरणे − चौपदरी गळा काढणे; रडणे; भेकणे.
चौपदरा-पद्रा
वि. झोळीसारखा; चार पदर एके ठिकाणीं बांधलेला; 'हातीं पायीं धरिला । मग तो चौपद्रा केला । काळांचां हातीं पडला । लागले मारूं ।' -गीता २.२३८०. २ (बे.) चौपदरी; चार पदरी. [चौ = चार + पदर] ॰पसरणें-चौपदरी गळा काढणें; रडणें, भेकणें.
चौपदरी
स्त्री. चौकोनी फडक्याचीं चार टोकें एकत्र धरून भिक्षेसाठीं बनविलेली झोळी; मधुकरीचें फडकें; भिकार्याची झोळी. 'अन्नसत्रवाल्यास जसा चौपदरीचा योग यावा त्याप्र- माणें या भरतभूमिवासी जडभरताची आजला हालहवाल होऊन गेली आहे.' -केसरी -वि. १ चार पदरांचा, पेडांचा (दोर इ॰). २ चौघडी; चार पदर होतील अशा रीतीनें घडी घातलेलें (लुगडें, धोतर इ॰). [चा = चार + पदर = कोपरा, टोंक] (वाप्र.) ॰गळा काढणें-मोठयानें रडणें, ओरडणें. ॰(हातीं) घेणें-येणें-भिक्षा मागण्याचा धंदा आरंभिणें; भीक मागणें. 'अलिकडे तूं मुळींच अभ्यास करीत नाहींस, पुढें चौपदरी हातीं घेणार आहेस कीं काय ?' ॰चा जहागिरदार-पु. (उप.) भिकारी. 'चौपदरीचा जहागिरदार, नी मिजास बादशहाची.
चौपदरी a Four-folded. f A four-folded alms-bag. चौपदरी गळा काढणें To bawl loudly.
चौपदरी caupadarī a Four-folded. 2 Of four strands, yarns, or single strings--a rope. चौ0 गळा काढणें To bawl or bellow loudly.
चितूर
पु. काळा तित्तर पक्षी. करड्या तित्तराएवढा तपकिरी काळा, अंगावर भरपूर पांढरे ठिपके व पट्टे आणि पंख व डोक्यावर लालसर पट्टे असलेला पक्षी. मादी बहुधा पांढरा गळा असलेली.
चंबू, चंभू
पु. पोट मोठे पण गळा लहान असे उभट भांडे, गडवा, तांब्या; गिंडी; एक धातूचे पात्र; सुरई; गडू. [क. चंबू]
चंबू-भू
पु. पोट मोठें पण गळा लहान असें उभट भांडें, गडवा, गिंडी; एक धातूचें पात्र; सुरई; गडू. [का. चंबु] (वाप्र.) ॰होणें-निरुत्तर होणें; स्तब्ध बसावयास लागणें. सामाशब्द- ॰गवाळें-न. (सोवळेंभांडें) १ भांडींकुंडीं, कपडेलत्ते वगैरे सामान- सुमान. २ बिर्हाड; वस्ती; बस्तान. 'मनुष्य एकदां कोणत्याहि गोष्टीविषयीं अत्यंत आतुर झाला म्हणजे सारासार विचार व शक्याशक्यतेचा संभव ओळखणारी त्यांच्यातील अक्कल आपलें चंबूगवाळें उचलून पार चालती होते.' -वाईकर भटजी. [चंबू + गवाळें = मुकटा वगैरे ठेवण्याची पिशवी, फडके] ॰गवाळें आटोपणें-निघून जाण्यासाठीं सामानाची आवरा- आवर करणें; बांधाबांध करणें; मुक्काम हलविणें; बिर्हाड उचलणें. 'आपलें चंबुगवाळें आटोपून तो तुळापुरी आला' -स्वप ११. ॰गवाळें फेंकणें-बळेंच आमंत्रण लावणें; आगंतूक जाणें.
चुकामुकी, चुकामूक
स्त्री. १. भेट ठरली असूनही ती चुकणे व गाठ न पडणे : ‘चुकामुकी माजि माय देखतांचि वाडेकोडें बाळ जसें गळा पडे ।’ − अमृतध्रुव ६. २. योजलेल्या अनेक साधनांत मेळाचा, ऐक्याचा अभाव. [चुकणे द्वि.]
चवडशी
स्त्री. चपट्या तोंडाचा हातोडा; भांड्याचा गळा अगर तोंड सारखें करण्यासाठीं उपयोगी पडणारा हातोडा. -बदलापूर ९६.
चवडशी
स्त्री. चपट्या तोंडाचा हातोडा; भांड्याचा गळा अगर तोंड सारखे करण्यासाठी उपयोगी पडणारा हातोडा.
छाट
पु. १ खाप; तुकडा; धांदोटी. २ तोडावयाचा किंवा तोडलेला भाग (पाहिजे असलेला आकार यावा म्हणून). ३ खालीं उरलेला गाळसाळ; निवडून टाकलेला भाग. ४ वर्गीकरण; निवड. 'हीं शंभर मोत्यें सारखीं नाहींत छाट करून प्रती लावा.' ५ (हिं.) वांती.-वि. (ना.) लबाड; धूर्त; धुरंदर. [सं. खंडन; हिं.] ॰छूट-स्त्री. १ छाट अर्थ १ पहा. २ कापणें ढलपा. ३ (ल.) छाटणी. छाटणी- स्त्री. कापणी; तोडण्याची क्रिया. छाट पहा. छाटणें-सक्रि. १ कापणें; तोडणें; भादरणें; कातरणें. २ खुडणें. ३ वर्गवारी लावणें; निवडणें. 'व्यापारी लोक फळें सरसकट घेऊन छाटून विकतात. ४ भट्टींत न घालतां वस्त्र चुबकून धुणें. ५ झटकन कापणें. 'तरवारीनें गळा छाटला.' ६ हलक्या हातानें मळ नाहींसा करणें; झाडणें. ७ कपात करणें (पगार, खर्च यांत). ८ गप्पा मारणें; वादविवाद करणें (गप्पा, राजकीय वर्त- मान). ९ (पाणी वगैरे) शिंपडणें. १० श्वास, दम कोंडून धरणें. ११ कत्तल करणें (सैन्याची). १२ प्रवाहांतील पाण्याची धार हातानें तोडीत पोहणें, या अर्थाचे पुढील शब्दहि आहेत. कत्तल करणें-उडविणें; खांडोळी करणें; लेखण्या करणें; सांकटणें; लोथी, लोदी. पाडणें; खापालणें; गुच्चे पाडणें; सफा उडविणें; (कफ, रोग) छाटणें-या रोगासंबंधी चर्चा करून निदान करणें. [सं. खंडन. हिं छांटना]
छाटणें
छाटणें chāṭaṇēṃ v c ( H) To clip, cut, pare, cut off. 2 To pick, sort, part off; to separate into classes. Ex. व्यापारी लोक फळें सरसकट घेऊन छाटून विकितात. 3 To wash (clothes) slightly, i. e. without putting them into the boiler. 4 To cut clean asunder; to cut smack through; as गळा छाटला or तरवारीनें चार केळी छाटल्या. 5 To knock off; to remove dirt, straws, rubbish &c. by some light and smart process. Ex. हलवायाजवळ साखर दिल्ही म्हणजे मळ छाटून देईल; देशचे पाण्यानें वस्त्राचा मळ कसा छाटतो! 6 To reduce or retrench (allowances, expenses):
दाटणे
अक्रि. १. (द्रवपदार्थ) घट्ट, दाट होणे; (लहान भांड्यात तांदूळ, साबुदाणा इ. शिजताना) घट्ट होणे, आवळणे; त्यामुळे टणक होणे. २. गर्दी, चेपाचेप होणे; चिमटणे; खेटणे : ‘दैत्यां दानवांचिआं लोथां । दाटला वसुंधरेचा माथा ।’ - शिव १४७. ३. (अंगरखा इ. अंगाला) तंग, घट्ट, आवळ होणे; चिकटून बसणे; (लहान जागेत मोठी वस्तू समाविष्ट झाल्यामुळे ती त्या जागेत) गच्च बसणे; अडचणणे. ४. भाराने दडपले, दाबले, दबले जाणे : ‘तरी सांगें कां न दाटिजे । धनुर्धरा ।’ - ज्ञा ३·१७७. ५. भिणे : ‘जरी चोरां सभा दाटे । अथवा मीना गळु घोटे ।’ - ज्ञा ७·९४. ६. (ल.) (आनंद, राग, शोक इ. भावना अनिवार झाल्याने गळा, हृदय इ.) भरून येणे; सद्गदित होणे; कोंडला जाणे. ७. (गर्व इ. ने) फुगणे; ताठणे; भरणे; चढणे : ‘जे होते बळवंत आपण असों ऐशा मदें दाटले ।’ - मोकृष्ण ५८·२५. ८. भरून जाणे; व्याप्त होणे; व्यापून असणे : ‘कीं ब्रह्मगोल वाटे विशिखांहीं दाटला तडा खातो ।’ - मोभीष्म ६·४६. ९. अडकणे; अडकून पडणे : ‘स्थळीं नावा जिया दाटिजे ।’ - ज्ञा १७·३६६. १०. भोसडणे; खरड काढणे; धमकावणे. (व.) ११. चिकटून बसणे : ‘लेंकुरुवें बापातें दाटिती । दादिया हलो नेदिती ।’ - ख्रिपु २·४२·६०. १२. बुडणे : ‘दाटेसि डोळेयांचा वळसां : सभेचे लोक’ - नरुस्व ८२. १३. पसरणे; अंथरणे : ‘पासवडा दाटिला कमलदळीं’ - नरुस्व ४६१. [क. दट्टिसु]
दाटणें
दाटणें dāṭaṇēṃ v i (दाट) To thicken or become inspissate--liquid substances: also to become closer, firmer, more solid--as boiling rice, sago &c. 2 To crowd, throng, press or squeeze together. 3 To pinch or be tight--a garment: to go hard; to stick fast; to be tight-compressed--a plug, peg &c. driven in. 4 fig. To be oppressed; to suffocate or choke;--used of गळा or हृदय under any vehement emotion: also to be full, intense, oppressive, choking;--used of the emotion--of affection, sorrow, rage &c. 5 To be filled with; to be thickly pervaded by;--as a house with smoke: also to fill or pervade. Ex. धुरानें घर दाटलें or घरीं धूर दाटला.
दाटणें v i – substances. To crowd, press or squeeze together. To pinch or be — garment. Fig. To be oppressed, to suffocate or choke — of गळा or हृदय under any vehement emotion; also to be full, oppressive, — of the emotion To be filled with. Ex. धुरानें घर दाटलें.
अक्रि. १ (द्रव पदार्थ इ॰) घट्ट, दाट होणें; (तांदूळ, साबुदाणा इ॰ शिजतांना) घन, दाट होणें; आवळणें. २ (लहान भांड्यांत भात, साबुदाणा इ॰ शिजतांना) अडचणणें; अडचणल्या- मुळें टणक होणें. ३ गर्दी, चेपाचेप होणें; चिमटणें; खेटणें. 'दैत्यां दानवांचिआं लोथां । दाटला वसुंधरेचा माथा ।' -शिशु १४७. -ज्ञा ९.२१६. 'तेयापासोनि पातकें जेतुलीं । संसारा लोकासी घडली । तीं येतुकीं दाटलीं । तुझ्या अंगीं ।' -ख्रिपु २.४९.१३३. ४ (अंगरखा इ॰ अंगाला) तंग, घट्ट, आवळ होणें; चिकटून बसणें; (लहान जागेंत मोठा पदार्थ समाविष्ट झाल्यामुळें तो त्या जागेंत) गच्च बसणें; अडचणणें. 'ह्या छिद्रांत ही खुंटी दाटते.' ५ भारानें दडपलें, दाबलें जाणें. 'तरी सांगें कां न दाटिजे । धनुर्धरा ।' -ज्ञा ३.१७७. ६ भिणें. 'जरी चोरां सभा दाटे । अथवा मीना गळु घोटे ।' -ज्ञा ७.९४. ७ (ल.) (आनंद, राग, शोक इ॰ भावना अनिवार झाल्यानें गळा, हृदय इ॰) भरून येणें; सग्ददित होणें; कोंडला जाणें. 'प्रेम-शोक दाटणें' 'कंठ दाटणें.' ८ (गर्व इ॰ कानें) फुगणें; ताठणें; भरणें; चढणें. 'जे होते बळवंत आपण असों ऐशा मदें दाटले ।' -मोकृष्ण ५८.२५. ९ भरून जाणें; व्याप्त होणें; व्यापून असणें. 'कीं ब्रह्मगोल वाटे विशिखांहीं दाटला तडा खातो ।' -मोभीष्म ६.४६. १० अडकणें; अडकून पडणें. 'स्थळीं नावा जिया दाटिजे । जळीं तयांचि जेवीं तरिजे ।' -ज्ञा १७.३६६. ११ (व.) भोसडणें; खरड काढणें; धमकावणें. १२ चिकटून बसणें. 'लेंकुरुवें बापातें दाटिती । दादिया हलो नेदिती ।' -ख्रिपु २.४२.६०. -सक्रि. १ (महानु.) पुसणें; पुसून स्वच्छ करणें; परिमार्जणें 'चंदनें श्रीकर उल्लाळिले । वरि उष्णोदकें प्रक्षाळिले । सवेंचि निर्मळा आंचळें दाटिले । सेवकजनीं ।' -ॠ ८४. २ दाबणें; दडपणें. 'दाटिजो पां परि भारें । चित्त न दटे ।' -ज्ञा ६.३६९. ३ खुपसणें; जोरानें आंत शिरकविणें. 'नाहें नावडोनि कांहीं । कामादिकांच्याचि ठायीं । दाटिली जेणें डोई । आत्मचोरें ।' -ज्ञा १६.४४५. [दाट; का. दट्ट, दट्टिसु] दाटून-क्रिवि. १ मुद्दाम; बळेंच; जाणूनबुजून; बुद्धि- पुरस्सर. २ (ल.) खोटेपणानें. काव्यांत दटुनि असेंहि रूप येतें. 'म्या त्याचें कांहीं केलें नसतां त्यानें दाटुन कज्जा काढिला.' ३ उगाच; निष्कारण; विनाकारण. 'देव म्हणे राया तूं दाटुनि धरितोसि कां विषादास ।' -मोभीष्म ११.८. ४ (व.) धमकावून; धाकदप- टशानें. दाटदुपट-स्त्री. (ना.) धाकदपटशा. दाटबळें-क्रिवि. मुद्दाम; बळेंच; जबरीनें; दाटून पहा. [दाटणें + बळ] दाटोदाटीं- क्रिवि. १ बळेंच; सक्तीनें; जबरदस्तीनें. 'रामायण लिहावयासाठीं । श्रीरामें पुरविली पाठी । श्रीराम संचरोनि पोटीं । दाटोदाटीं लिह- वित ।' -भारा किष्किंधा १.९. २ उत्सुकतेनें; उत्कंठित होऊन. 'मम अधरामृताची वाटी । बळें लावितसे वोठीं ।जो न घे दाटो- दाटी । अमृतासाठीं जो न ये ।' -मुरंशु २४९. ३ गर्दीनें; जोरानें; त्वरेनें. 'लग्न लागलियापाठीं । कायसी यादवांची गोष्टी । कार्य करूं दाटोदाटी । आम्ही जगजेठीं । असतां ।' -एरुस्व ६.३५.
ढोटरा
पु. गळा. (झाडी)
एकेरा, एकेरी
वि. १. दुहेरी, घडीचा किंवा पिळलेला नव्हे असा; एक पदरी (कापड, कागद, सूत वगैरेला लावतात); विरळ विणीचे (सणंग). २. कोता; बारीक; दुबळा (गाण्याच्या कामी गळा आवाज वगैरे). ३. एकवचनी; अरेतुरे असा सलगीचा (उल्लेख, संबोधन) : ‘तूंमला शिवकुमारी या एकेरी नांवाने हाक मार गडे !’-विवि ८·२·३०.४. एक एक; स्वतंत्र, दोन दोन, तीन तीन अशा प्रकारे संबद्ध नव्हेअसा. (वा.) एकेरीवर येणे–अरे तुरे म्हणणे, एकेरी नावाने संबोधणे (अनादरयुक्त) २. (ल.) चिरडीस जाणे, चिडणे.
एकेरा or एकेरी
एकेरा or एकेरी ēkērā or ēkērī a Single; not doubled, folded, twisted, complicated. 2 fig. Weak or feeble;--used of the गळा, कंठ or voice with reference to singing. 3 Of the singular number--language of address or mention. Ex. थोरास ए0 शब्द बोलूं नये. एकेरीवर येणें To begin to thee and thou a person; to address or make mention of in the singular number.
एकेरा-री
वि. १ दुहेरी, घडीचा किंवा पिळलेला नव्हे असा; एकपदरी (कापड, कागद, सूत वगैरेला लावितात); विरळ विणीचें (सणंग). उ॰ 'एकेरी फुलें गुंफून केलेली माळ ती एकेरी माळ.' २ कोता; बारीक; दुबळा. (गाण्याच्या कामीं गळा, आवाज वगैरे). ३ एकवचनी; अरेतुरे असा (उल्लेख, संबोधन). 'तूं मला शिवकुमारी या एकेरी नांवानें हांक मार गडे !' -विवि ८.२.३०. 'थोरास एकेरी शब्द बोलूं नये.' ४ एकएक; स्वतंत्र. दोन दोन, तीन तीन अशा प्रकारें संबद्ध नव्हे असा. एकेरीवर येणें-१ अरेतुरे म्हणणें; एकेरी नांवानें संबोधणें (अनादरयुक्त). २ (ल.) चिरडीस जाणें; चिडणें.
गाणे ( वाईट)
स्वराची हेंगाडी भेसळ, संगीत धुडगूस, गाण्याची उबळ आली, न पेलणाऱ्या ताना, फार विरस झाला सर्वांचा! गर्दभ गायनच ते, पिंजक्या ग्रामोफोन प्लेटीसारखा आवाज, ती हूडहुडी आणि ते अँय् व ऊँव काही कळेना ! शास्त्र खूप आहे पण गळा नाही.
गाठा
पु. १. खंडोबाच्या भक्ताच्या गळ्यातील रूप्याची हसळी किंवा कडे : ‘गळा गाठा हिंडे द्वारीं ।’ - तुगा ४१६. २. सोन्याची साखळी असलेला कानातील एक अलंकार. (कु.) ३. (ल.) पिंजरा : ‘पुंसा लावोनि बांधिजे गांठा ।’ - ज्ञा १३·२३४. ४. गोल तळीव पदार्थ. [सं. ग्रंथि] (वा.) गाठा फोडणे - वाघ्यामुरळ्यांच्या लग्नात गुरव एक कवड्याची माळ मुलीच्या गळ्यात घालतो तो विधी.
गाठा
पु. १ खंडोबाच्या भक्ताच्या गळ्यांतील रुप्याची हंसळी किंवा कडें. 'गळा गाठा हिंडे द्वारीं ।' -तुगा ४१६. २ (कु.) सोन्याची सांखळी असलेला कानांतील एक अलंकार. ३ (ल.) पिंजरा. 'पुसां लावोनि बांधिजे गांठा ।' -ज्ञा १३.२३३. [सं. ग्रंथि]
गायन (निंदा)
रंगभूमीवर एक पात्र तानांची भेंडोळी सोडीत होते, गळ्याची फुंकणी झाली आहे. गवयाचा गळा पडला. ते रेंकणे व हूडहूडी भरल्यागत विव्हळणे ऐकवत नाही, आवाज कसला? रसाचे गुन्हाळच ! 'वरतें करोनिया तोंड हांका मारितो प्रचंड, राग आळवितो नाना, गातो काय ते कळेना !'गद्धे-मल्हार रागांत गायन चालले होते.
गचाबोचा
पु. मान व ढुंगण; फरा व ढुंगण (जनावराचें). [गचा = गर्दन, गळा + बोचा = ढुंगण, गुदद्वार] ॰एक असणें- (निंदार्थी) फार लठ्ठ असणें; गबदुल होणें (अतिशय लठ्ठ बैल, थलथलीत किंवा पुष्ट माणूस यांसंबंधीं वापरतात).' मिष्टान्न खाव- याला मिळतें मग त्याचा गचाबोचा एक होईल तर काय झालें.'
गचाटी, गचांडी, गचोंडी, गचोरा
स्त्री. पु. हाताचा पंजा मानेवर ठेवून दिलेला धक्का; अर्धचंद्र. (क्रि. देणे, मारणे.) २. (धरण्याच्या वेळी) मान; गळा. (क्रि. धरणे). ‘शिवराम्या, गचांडी सोडून माझे छातीवरून ऊठ.’ - बाळ २·१४४.
गची
स्त्री. १. गळा; मान : ‘तो गचिये धरुनि माघारा । आंतु घाली ॥’ - राज्ञा ६·२३६. २. गचांडी; अर्धचंद्र : ‘म्हणे आता यासिं गचि देऊन दवडा ।’ - पंच ४·४.
गची-चि
स्त्री. १ (गो.) गळा; मान. 'तो गचिये धरूनि मागारा । आंतु घाली ।' -ज्ञा ६.२३६. २ गचांडी; अर्धचंद्र. 'म्हणे आतां यांसि गचि देउन दवडा ।' -पंच ४.४.
गडदन
न. गरदन, गर्दन; गळा. [फा. गर्दन]
गदगदून
क्रिवि. १. जोराने : ‘गुत्त्यात गदगदून गदगदून हसणारा घाब्रू.....’ - किरिस्ताव ४२. २. हुंदके देत; गळा दाटून येऊन : ‘ती गदगदून रडू लागली.’ - पूपु
गडखोल
पु. घोड्याचा गळा.
गिळगिळीत
वि. गळगळित. कांठोकांठ, घळघळीत. [सं. गळ; म. गळा]
गिरावण, गिरवाण, गिरेवान
न. आंगरख्याचा खांद्याचा भाग. [फा. गिरेवान् = गळा, गळपट्टी]
गल
पु. १. गळा; मान. २. (वै.) घसा; ग्रसनिका.
गळ
पु. गळा. पहा : गल [सं. गल्ल]
गलबाय दादाद करणें
अक्रि. गळा दाबून प्राण घेणें.
गलची
स्त्री. गळा; मानगुटी : ‘बारगीरानें झटपट करून गलची धरून कटार स्कंधावर उभा चालवून वरून भार घालून दाबला’ - मशिंयांक ८८२.
गळचिपी
गळचिपी gaḷacipī f (गळा & चेपणें) Seizing by the neck. 2 fig. Stopping, detaining, keeping in suspense or expectation. 3 Importunate beseeching; incessant urging, enforcing, worrying. v धर, अवळ, कर, लाव.
गळचिपी
स्त्री. १. मानगुटी धरणे; गळा दाबणे. २. (ल.) खोटी; तहकुबी; आशेत लोंबकळत ठेवणे. ३. पिच्छा; अति आग्रह; तगादा; खणपटी; पाठपुरावा. (क्रि. धरणे, आवळणे, करणे, लावणे.)
गळचंडी or गळचोंडी
गळचंडी or गळचोंडी gaḷacaṇḍī or gaḷacōṇḍī f (गळा) The back of the neck. v धर. 2 By some it is used for गचांडी A shove with the hand applied to the back of the neck. v दे. ग0 धरणें fig. To seize and stop; to arrest, detain, suspend. With g. of o.
गळदट or गळधट
गळदट or गळधट gaḷadaṭa or gaḷadhaṭa a (गळा & दाट) Wild and wilful; heady and heedless.
गळेकापू, गळेकाप्या, गळेकाटू
वि. गळा कापणारा; विश्वासघातकी; दगलबाज. (ल.) कसाई.
गळेकापू-काप्या, गळेकाटू
वि. (गळा कापणारा) विश्वासघातकी; दगलबाज; मैंद; शत्रु.
गळेपडू
गळेपडू gaḷēpaḍū a (गळा & पडणें One that falls upon the neck.) Applied to a person that hangs upon unweariedly in entreaty or enforcement; to a worrying beggar, a dun &c.; to a calumnious fellow, or to calumnious speech; to an indispensable and imperative duty or business.
वि १ स्वतःचें काम करून घेण्यासाठीं दुसर्यास त्रास येईपर्यंत अत्याग्रह करणारा; छळवादी (भिकारी, धरणे- करी). २ घेणारा; दुसर्यावर लटकें तुफान घेणारा; असा माणुस करीत असलेला (धंदा). ३ कुंभाडी; बालंटी (भाषण). 'याचा गळेपडू धंदा आहे, संगत कामाची नव्हें. ' ४ गळ्यांत पडणारें; न टाळतां येणारें (काम, व्यवहार). [गळा + पडणें]
गळेफोड
स्त्री. घसाफोड; त्रासदायक व निष्फळ आरडा- ओरड, खरडपट्टी, उपदेश, विवरण, शिक्षण इ॰ [गळा + फोडणें]
गळग्रह
पु. पहा : गलग्रह. १. मानगुटी धरणारा पुरुष; डोईजड माणूस. २. (ल.) फार त्रास देणारा; विनवणी किंवा बळजबरी करून पाठ पुरविणारा माणूस; जिगजिग लावणारा भिकारी; तगादेदार; धरणेकरी; वेठीला धरून कामे करून घेणारा. ३. (नियमितपणाच्या अभावी, अविश्वासाने) थांबविणारा, अडथळा आणणारा, हरकत किंवा प्रतिबंध करणारा, खोळंबविणारा माणूस. ४. लोढणे; खोडा; प्रतिबंध; फास. ५. आग्रह; जबरी. (क्रि. घालणे.) ६. गळ्याला येणारी सूज; गळा धरणे. ७. एक प्रकारचा चिमटा (तापलेली भांडी उतरवण्याचा). ८. (ज्यो.) एक दुष्ट ग्रह. [सं. गलग्रह]
गळघाटी
स्त्री. १. गळ्यापुढचे हाड; घाटी; मणका; घसा. (गळा श्वासनलिका व अन्नमार्ग यांच्यासह) २. बैलाच्या गळ्यातील घंटा.
गळहोडी
स्त्री. गळ्याची शपथ; 'तुम्ही सप्त पूर्वजाचे सुकुर्त स्मरौन बोला म्हनौनु सेपथ वा गळहोड देवाचे घातले उपरि समस्त महाजन व सेवकवर्ग आपले सुकुर्त स्मरौन बोलिले जे' -रा २०.२१८. [गळा + होड]
गळमोडी
स्त्री. (महानु.) मान मोडणें. 'आवर्तू गळ- मोडी मारुनि बका धात्री घडी पूजिली.' -गस्तो ७७. [गळा + मोडणें]
गळपट
स्त्री. गळा; मान : ‘थोरल्या बहिणीचा नवरा आला नि त्याची गळपट पकडून ओरडला....’ - चिताक ३४.
गळसरी
स्त्री. गरसली पहा. १ सोन्याच्या किंवा कांचेच्या मण्यांत सोन्याचे मणी ओवलेला स्त्रियांचा एक दागिना. २ मंगळसुस्त्र. [गळा + सर]
गलशुंडिका
स्त्री. १. अन्नमार्ग; गळा; अन्नाची नळी; गळघाटी. २. पडजीभ; लोळा; घशातील शुंडाकृती गाठ; घशात मधोमध लांबणारा मांसल अवयव. [सं.]
गळसूत्र
गळसूत्र gaḷasūtra n (गळा & सूत्र) A ludicrous or light term for the fauces or throat. Used pl. 2 (Poetry.) Traces. Ex. योजितो हयगळां गळ सूत्रें ॥.
गळवट-वंड-वणा-वणी
गळवट-वंड-वणा-वणी gaḷavaṭa-vaṇḍa-vaṇā-vaṇī ad (गळा, वत्, वाणी) Up to the neck or brim.
गंड
(क्रि॰ मोडणें; जिरवणे). ६ कांहीं विशिष्ट धंदेवाईकांस तिर- स्कारार्थीं त्यांच्या नांवाच्या शेवटीं जोडावयाचा प्रत्यय. जस- न्हावगंड ( = न्हावी); तेलगंड ( = तेली); वाणगंड ( = वाणी); जोस- गंड ( = जोसी) इ॰ तसेंच कुणब्यांच्या नांवानांहि जोडतात (प्राकृतांत गंड म्हणजे नापित (न्हावी) असा अर्थ आहे. तेव्हां त्यावरूनहि तिरस्कारार्थी शब्द बनला असेल). नपु. गळूं; केस्तूड. 'मी सर्वज्ञु एकुचि रूढु । ऐसा गर्वतुष्टीगंडु । घेऊनि ठाके ।' -ज्ञा १३.७१७. 'तुझें माथां शृंग पूर्ण तीक्ष्ण । तुज ऋष्यशृंग अभिमान । आमुचे हृदयीं गंडे तीक्ष्ण । गंडऋषि जाण आम्हांसि म्हणती ।' -भारा बाल २.३०. [सं.] सामाशब्द- ॰खोल-पु. घोड्याचा गळा; गडखोल. ॰गूळ-(प्रां.) गळगुंड. पहा. ॰मंडल-न. (काव्य.) गंड अर्थ १ पहा. 'वोतिली शशी मित्र गाळून । गडमंडळीं प्रभा पूर्ण ।' ॰स्थळ-न. गंड अर्थ २ पहा. 'गंडस्थळींचें तेज अधिक । लखलखीत दोन्हीं भागीं ।' -व्यं ६५.
गंडखोल
पु. घोड्याचा गळा; गडखोल.
गंडमाळ, गंडमाळा
स्त्री. अव. गळ्याला गाठी होण्याचा एक रोग; कफ, मेद हे दूषित होऊन काख, खांदा, मान, गळा व अंडसंधी या ठिकाणी सावकाश पिकणाऱ्या गाठी होतात. [क. गंडमाले]
गंडमाळा-ला
स्त्रीअव. मानेस गळवें होण्याचा एक रोग; कफ, मेद हे दूषित होऊन, काख, खांदा, मान, गळा व अंडसंधी या ठिकाणी सावकाश पिकणार्या गांठी होतात. यावर कांचनाच्या सालीचा काढा, सुंठीचें चूर्ण घालून पिणें, अथवा वायवर्णाच्या सालीचा काढा दूध धालून पिणें म्हणजे गंडमाळांचा नाश होतो. -योर २.२५३.
गोकटी, गोकनळी
स्त्री. (वाघ गोकटीस बसतो त्यावरून) मान; गळा; बोकांडी (क्रि. धरणे, फोडणे, फुटणे, बसणे.) (राजा.) (वा.).गोकटीधरणे, गोकनळी धरणे - अडविणे; कुचंबविणे; दुःखद स्थितीत तिष्ठत ठेवणे. गोकटीस बसणे - मानगुटीला बसणे; पिच्छा पुरवणे; खनपटीला बसणे. (शेत) गोकटीस येणे - पीक पोटरीस येणे; कणसात दाणे भरगच्च भरणे.
गोकटी-कनळी
स्त्री. (राजा.) (वाघ गोकटीस बसतो त्यावरून) मान; गळा; बोकांडी. (क्रि॰ धरणें; फोडणें; फुटणें; बसणें). [गो + कटि] गोकटी धरणें-अडविणें; कुचंबविणें; दुःखद स्थितींत तिष्ठत ठेवणें. गोकटीस बसणें-मानगुटीस बसणें; पिच्छा पुरवणें. खनपटीस बसणें. (शेत) गोकटीस येणें-पीक पोटरीस येणें; कणसांत दाणे भरगच्च भरणें.
गॉल
न. (गो.) अंगरख्याचा गळा. [पोर्तु.]
गॉल
न. अंगरख्याचा गळा. (गो.)
गोमटी
स्त्री. (गो.) मान. गोमटार बसप-मानेवर बसणें; हट्टास पेटणें. [का. गोमाळे = कंठमणी. गोमनाळी = गळा?]
गोणी
गोणी gōṇī f Sackcloth. 2 A packsack or sack. 3 fig. Load or burden (of business, cares &c.) गोणी गळ्यांत or मानेवर येणें or पडणें See explained under गळा. गोणी मणगटावर देणें To lay (the cares of life or some business or trouble) upon one. Also गोणी मणगटावर येणें or पडणें To come or fall upon one--such cares &c. गोणी पाठीवर घालणें To force (a burden or business) upon.
गोणी
स्त्री. १. तरट; गोणपाट. २. पोते; गोण; कंठाळी : ‘रचोनी गोण्या कनकपट सकळीं ।’ - नव २५·६ ३. (ल.) भार; ओझे; संकट. पहा : गोण २. [क.] (वा.) गोणी गळ्यात येणे, गोणी गळ्यात पडणे, गोणी मानेवर येणे, गोणी मानेवर पडणे - पहा : गळा. गोणी दंडावर देणे, गोणी मगटावर देणे - एखाद्याच्या इच्छेविरुद्ध त्याच्यावर भार, संकट, जिकीर, काम इ. लादणे; भार घालणे; अवघड काम सांगणे : ‘मी धर्मस्थापनेसाठीं युगायुगाचे ठिकाणीं संभवत असतो अशा प्रकारचें विधान केलेस, त्या वेळेस तें करण्याविषयी तुझ्या दंडावर कोणी गोणी दिली होती ?’-काळ. गोणी पाठीवर घालणे - एखाद्यावर ओझे, काम बळेच लादणे. गोणी मनगटावर येणे, गोणी मनगटावर पडणे - जिकिरीचे काम इ. एखाद्याच्या अंगावर येणे, पडणे.
गोर
स्त्री. गळा; मान. 'राहिना घरीं कधीं गोर गोंविली मज गाईचीं । -पला ८० ब. [प्रा. दे. गोरा]
गोर
स्त्री. गळा; मान : ‘राहिना घरीं कधीं गोर गोंविली मज गाईचीं ।’-पला ८० ब.
गरदन
(फा) स्त्री० मान, गळा.
गरदन, गर्दन
स्त्री. मान; गळा. [फा. गर्दन्] मारणें- ठार करणें.
गरदन, गर्दन
स्त्री. मान; गळा. [फा.]
ग्री(ग्रि)वा
स्त्री. १ गळ्याच्या पाठीमागील बाजू, मन्या- प्रांत; (सामा.) मान. २ कंठ; गळा. 'उदासीन जातो ग्रिवा दाटताहे ।' -राक १९५. ॰घंटा-स्त्री. गळ्याची घांट, गळ्या- वरील डेरा. 'उपरि सोळावा अध्यावो । तो ग्रीवेघंटेचा आवो ।' -ज्ञा १८.४०. ॰प्रणाली-स्त्री. (प्राणिशास्त्र) कवचधर वर्गापैकीं शीर्ष व वक्ष यामधील करकोंचा. ॰कशेरू-पु. (प्राणीशास्त्री.) मानेचा कणा; (इं.) सर्व्हिकल व्हर्टेब्रा.
ग्रीवा
स्त्री. १. गळ्याच्या पाठीमागील बाजू; (सामा.) मान. २. कंठ; गळा : ‘उदासीन जातो ग्रिवा दाटताहे ।’-राक १९५. [सं.]
ग्रीवा
(सं) स्त्री० मान, गळा, कंठ.
गुळु
पु. दंगल; कट. ‘फर्काबादवाल्यांनीं अकबरपुरच्या. जमिनदारास चिठ्या लिहिल्या कीं तुम्ही गुळु करुन ठाणें उठवून देणें म्हणजे आम्ही येतो.’ –पेद २.१३२. [फा. गुलु = गळा]
गुलू
(पु.) हिंदी अर्थ : गला. मराठी अर्थ : स्वर.
गुळू
पु. दंगल; कट : ‘हर्काबादवाल्यांनीं अकबरपुरच्या जमिनदारास चिठ्या लिहिल्या कीं तुम्ही गुळु करून ठाणें उठवून देणें म्हणजे आम्ही येतो.’ - पेद २·१३२.[फा. गुलु = गळा]
गया
पु. गळा : ‘मायबाई मना संसार घटना । गयाना चंद्रहार एक दागिनाग मना ।’ - शके ३०१.
घा(घां)ट
स्त्री. १ घसा; घशाचा बाहेरील भाग; घांटी; कंठ, कंठमणि. 'गेलें घांटी झालें माती.' २ गळा; कंठ; आवाज. [सं. घाट] (वाप्र.) घांटीं फुटणें-१ (मुलाच्या) आवा- जांतील कोमलता जाऊन तो मोठा, प्रौढ होणें; हें (मुलगा) वयांत येण्याचें लक्षण आहे. 'घांटीं फुटला' = बदसूर झाला. २ (गाणार्याचा) आवाज घोगरा होणें; स्वरभेद होणें; स्वर बिघडणें; आवाज चिरकणें, बसणें; घांटीं शेंदूर ओतणें-(पेय, खाद्य- पदार्थांत मिसळून) शेंदूर गिळावयाला, खायला लावणें; प्रति- पक्षीय गवयाचा कंठ बिघडविण्याकरितां ही युक्ति करतात. सामा- शब्द-॰कोर-स्त्री. गळ्याचा भाग; नरडी. 'असें कुंभाड करून दांड होऊन भांड धरिसी घाटकोर । -होला ३७. [घाट + कोर = कड, बाजू] ॰रोग-पु. गुरांना घशांत होणारा एक रोग. [घांट + रोग] ॰सर्प-पु. घशांत होणारा एक रोग; घटसर्प. हा कफदोषा- मुळें होतो, ह्यानें गळ्यांत लांबट व जाड अशी सूज उत्पन्न होऊन अन्नमार्ग बंद होतो. इं. डिफ्थेरिया
घाट
स्त्री. १. घसा; घशाचा बाहेरील भाग; घाटी; कंठ, कंठमणी. २. गळा; कंठ; आवाज. [सं. घाट] (वा.) घाटी फुटणे – १. (मुलाच्या) आवाजातील कोमलता जाऊन तो मोठा, प्रौढ होणे. हे (मुलगा) वयात येण्याचे लक्षण आहे. २. (गाणाऱ्याचा) आवाज घोगरा होणे; स्वरभेद होणे; स्वर बिघडणे; आवाज चिरकणे, बसणे.
घरडणे
उक्रि. १. घरटात घालून (धान्य इ.) भरडणे. २. (माणसाची, प्राण्याची मान, गळा) नरडी वाकडेतिकडे तोडणे; खांडणे; छिंदणे; खापलणे; चोचावून तोडणे; कापणे. ३. रगडणे; दात रगडणे. –(तंजा.)
घरडणें
उक्रि. १ घरटांत घालून (धान्य इ॰) भरडणें. २ (माणसाची, प्राण्याची मान, गळा, नरडी) वांकडेतिकडे तोडणें, खांडणें, छिंदणें, खापलणें, चोचावून तोडणें. [घरट]
घर्नळा
गळा, घसा. –(तंजा.) घर्म
घसा
पु० गळा, आवाज, नरडें.
घटी
स्त्री. गळा. (झाडी) [सं.]
घटसर्प
पु. (प्र.) घांटसर्प; गळ्यास होणारा एक (सर्पा- कृति) रोग. हा गुरानाहि होतो. (इं.) डिफ्थेरिया. [सं. घाट = गळा + सर्प]
घुस्मारणें
सक्रि. मारणें; घुसमटून मारणें; खुर्दळून ठार करणें. 'येणें गोपाळें चाणूर घुस्मारिला ।' -दावि २०. [अर. घुस्स = गळा दाबणें, कोंडमारा करणें; घुसणें + मारणें; तुल॰घस्मर]
हातवळा
हातवळा hātavaḷā m (हात & वळणें) Skill of hand; dexterity or expertness; masterliness of execution or performance. Pr. गातां गळा, शिंपता मळा, लिहितां हा0.
हलाहल
न. १ समुद्रमंथनांतून निघालेलें भयंकर विष. 'शंकरें धरिलें हलाहला । तेणें नीलवर्ण झाला गळा ।' -व्य. २ सापाचें जलाल विष. (सामा.) जहर, जहाल विष हालाहल पहा.
हलक
स्त्री. गवयाचा गळा; आवाज; फिरकी. [अर. हल्क्]
(पु.) हिंदी अर्थ : गरदन, कंठ. मराठी अर्थ : मान, कंठ, गळा.
जबह
(पु.) हिंदी अर्थ : गला काटकर प्राण लेना. मराठी अर्थ : अेका सुरींत प्राण घेणें.
जगन्मंगल
जगन्मंगल jaganmaṅgala a S Auspicious, propitious, favorable or good to the world. Ex. माळा हे कमळा विचारुनि गळा घाली जगन्मंगला ॥.
जळजळ
स्त्री. १ अंतर्दाह, वेदना (पित्तानें, तिखटानें); आग; (क्रि॰ सुटणें).' मिर्ची चावतांच उपाय नाहींसा तोंडाला जळजळाट सुटला.' २ जुलूम; जबरदस्ती. ३ क्रोधयुक्त मत्सर; मनांत जळणें; पोटांत राग. (क्रि॰ सुटणें). ४ प्रेमाची, मायेची आंच, अतिशय प्रीति, कळकळ. जळजळणें-अक्रि. १ घशांत किंवा पोटांत दाह होणें (ऊन्ह, तिखट अन्नापासून किंवा पित्ता- पासून). (अकर्तृक प्रयोग) जसें-'पोटांत-उरांत-घशांत-जळ- जळतें.' २ (क्क.) (वर शब्दाबरोबर प्रयोग) तडफडणें; रागानें जळणें; जळफळणें. ३ तापानें काहिली होणें. [जळजळ] जळ- जळाट-पु. १ (जळजळचा अतिशय) कडक आग; उष्णता; पोळणें; भाजणें; दाह; अतिशय जळजळ (गळा, डोके,पोट, घसा या ठिकाणीं) २ रागाचें कृत्य; उपद्रव; भयंकर जुलूम; अत्याचार. (क्रि॰ करणें; मांडणें; चालविणें; बसविणें) 'मामले- दराचा जळजळाट भारी हो ! म्हणून तीं कुळें परागंदा झालीं.' ३ निष्ठुरपणा; अतिशय कडकपणा. ४ दरारा; धाक. 'पूर्वी त्याबरोबर वाद सांगावा, तर त्याचा जळजळाट होता त्यामुळें उपाय नव्हता. जळजळीत-वि. १ अतिशय उष्ण; कढत; उकळणारें (पाणी, वस्तु). २ तिखट; तीक्ष्ण; कडक (मसाला, मद्य). ३ (व्यापक) झक्क; स्वच्छ; लखलखीत (रुपया, द्रव्य). 'ह्या सणंगाला मीं जळजळीत दहा रुपये दिलें.' -क्रिवि. पूर्णपणें; पूर्ण; पुष्कळ प्रमाणानें; भरपूर; घळघळीत.
जळजळाट
पु. १. (जळजळचा अतिशय) कडक आग; उष्णता; पोळणे; भाजणे; दाह : अतिशय जळजळ (गळा, डोके, पोट, घसा या ठिकाणी). २. रागाचे कृत्य; उपद्रव; भयंकर जुलूम; अत्याचार (क्रि. करणे, मांडणे, चालविणे, बसविणे.). ३. निष्ठुरपणा; अतिशय कडकपणा. ४. दरारा; धाक : ‘कोणी अंमलदार या देशाचा असला, म्हणजे तो फार जळजळाट करतो.’ –लोश ३२०.
जोते
न. १. जिने बैलाचा गळा जोखडाशी बांधला जातो ती दोरी किंवा पट्टा. २. जू; शेळू. [क.जत्तगि; सं. योक्त्र]
जोतें
न. १ जिनें बैलाचा गळा जोखडाशीं बांधला जातो ती दोरी किंवा पट्टा. २ जूं; शेळें [वै. सं. योक्त्र; प्रा. जुत्त; का. जत्तगी; हिं. जोत]
झापती
न. जोते; बैलाचा गळा जुवाशी गुंतवणारा पट्टा : ‘जू त्येंच्या खांद्यावर ठिऊन झापत्या बांदल्या.’ – रैत २५.
झरका
पु. (हालचाल, क्रिया, भाषण इ.) त्वरा; चपळाई; चापल्य; चलाखपणा. (क्रि.करणे, मांडणे, लावणे.) : ‘चालसि हंसगती झरका’ - पला १२९. (वा.) झरका देणे - गिरका देणे; फसविणे; हातावर तुरी देणे : ‘नाहीं तर दे झरका कापा गळा ।’ - सला २.
झरका
पु. (हालचाल, क्रिया, भाषण इ॰ कांतील) त्वरा; चपळाई; चापल्य; चलाखपणा. (क्रि॰ करणें; मांडणें; लावणें). [झरकणें] ॰देणें-सक्रि. गिरका देणें; फसविणें; हातावर तुरी देणें. 'नाहीं तर दे झरका कापा गळा ।' -सला २.
कानवला
पु. १ पोटांत गूळ-साखरेचें पूरण घातलेली मोठी करंजी. 'चिंतामणिगल बालक जो दुर्लभ त्यासि काय कानवला ।' -मो विराट ५७३. २ (व.) सपीटाची घडीची पोळी; चिरोटा. हा खिरीशीं खातात. 'बहु साधु साधु वदले ते काळाच्या पुढील कानवले ।' -मोशल्य १.५९. ३ (विनोदानें) कान पिर- गळा. (क्रि॰ देणें; घेणें; खाणें; मिळणें). हातापायांचा कानवला होणें-हातपाय कानवल्याप्रमाणें आखडून जाणें.
कांठे
न. (कों. कु.) मान; कंठ; गळा. [कंठ]
काठ
पु. १. कडा; बाजू; मर्यादा; टोक; किनारी (ताट, पागोटे, मडके इ. च्या भोवतालचा भाग); कोर (भांडी वगैरेची); कंगोरा. २. किनारा (समुद्राचा); जवळची भूमी; थड, थडी, (समुद्र, नदी यांचा). ३. पदर; किनारी (वस्त्राची बेलबुट्टीची किंवा साधी). [सं. कंठ = गळा, काष्ठा = सीमा] (वा.) काठकोणा मोजणे - सूक्ष्मपणे परीक्षणे, बारकाईने तपासणे. काठावर बसणे - १. (पखवाजाच्या काठावर थाप मारली म्हणजे बद्द आवाज होतो त्यावरून) सोडणे, कमी होणे, (धंदा, गोष्ट); नासणे (काम). अकर्तृक योजतात. २. नुसती गंमत पाहणे; जबाबदारी टाकणे; सहभागी न होणे. ३. (ग्राम्य) ढुंगणावर बसणे. काठावर मारणे - बिघडणे; नासणे, मारणे. काठावर येणे - जिवावर येणे.
काठे
न. मान; कंठ; गळा. (को.)
काठमोरा
पु. १. पहा : काठ : ‘जेवीं नीचाचा कांठमोरा । गळा अडकल्या मांजरा । ते रिघोनि शुचीचिया घरा । नाना रसपात्रां विटाळी ।’ - एभा २६·२०६. २. पोळी, भाकरीचा कडेचा तुकडा. (क्रि. घेणे, तोडणे.) (वा.) काठमोरा गळ्यात अडकणे, काठमोरा गळ्यात येणे - एखाद्या धंद्यातील, कामातील लभ्यांश हाती न लागता व्यर्थ शीण पडणे. (ज्याला मडक्यातील वस्तू खायला मिळाली नाही पण मडक्याचा काठ गळ्यात अडकला त्या कुत्र्याप्रमाणे.)
काठपरा, काठापरा, काठप्रा, काठाप्रा, काठापुरा, काठफरा
पु. १. फुटलेल्या मातीच्या मडक्याचा वरचा भाग; अर्धा भाग; गळा; काठ : ‘जें कां काठफरा उलले । देखसी ज्याचें बुडे गेलें । तें न पाहिजे हालविलें । असो संचरले निजआळा ।’ - एरुस्व १८·४५. (को.) २. बोडके गलबत (शीड, काठी, वगैरे काही नसलेले); गलबताचा सांगाडा; खटारा. ३. सांगाडा; आच्छादनविरहित उघडे घर वगैरे (कौलाशिवाय घर, कापडाशिवाय छत्री, पानाशिवाय इरले इ.). ४. मांसविरहित शरीर.
कचपाश
पु. १. डोक्यावरचे केस; कच. २. केसांचा पाश, फास. (क्रि. घालणे.) [सं.] (वा.) कचपाश घालणे – केसाने गळा कापणे; विश्वासघात करणे
कचपाश
पु. १ डोक्यावरचे केस; कच. २ केंसांचा पाश, फांस. (क्रि॰ घालणें) [सं.] ॰घालणें-केंसानें गळा कापणें; विश्वासघात करणें
कचपाश kacapāśa m S A head of hair; the hair as upon the head. 2 A snare of hair. क0 घालणें is To cast (around the neck) a noose of hair; i.e. to kill or ruin under cover of meekness, blandness, or lovingkindness (as by an invisible hair). The phrase answers to गळा केशानें कापणें q. v.
केश
पु. केस; रोम; लव. [सं.] (वा.) केश काढणे - श्मश्रू करणे (विशेषतः विधवा स्त्रीची). केश देणे - विधवेने केशवपनास मान्यता देणे. पहा : गळा
केसतूड
पहा : केसतोडा : ‘केसतूड होऊन मांडी विलक्षण ठसठसत रहावी तशी ती केंसानं गळा कापणारी बातमी.’ - उअ २१.
कलमकसाई
पु. १. हिशेबनीस; हिशेब तपासनीस; पगाराचा बटवडा करणे वगैरे कामाचा कारकून; खर्चात छाटाछाट करून लोकांचे (लेखणीने) नुकसान करणारा इसम : ‘हे जात कलमकसाई अज्ञानी शूद्रात कोणत्या प्रकारचे तंटे उपस्थित करीत असतील?’ - जोफु १०२. २. जो आपल्या लेखणीने (लेखाने) लोकांना बुडवतो तो. ३. कारकुनी डावपेचात दुसऱ्याचा गळा अडकविणारा. [फा.]
कंबु
पु. शंख. 'इक्षित हास्य मनोहर । ग्रीवा सुंदर कंबु जैशी ।' -एभा १४.४७८; 'श्रीद त्याजिलें वरिला अदक्षिणावर्त तुच्छ कंबु कसा ।' -मोसभा ४.१४. [सं.] ॰कंठ- पु. शंखा- सारखा गळा. (हें सौंदर्याचें लक्षण समजतात). ' ओंकार मातृकांसकट । तोचि जाणावा कंबुकंठ ।' -एरुस्व १.४२.
कंबुकंठ
पु. शंखासारखा गळा (हे सौंदर्याचे लक्षण समजतात.) : ‘ओंकार मातृकांसकट । तोचि जाणावा कंबुकंठ ।’ - एरुस्व १·४२.
कंधर, कंधरा
पु. स्त्री. मस्तक; शीर; कंठ; मान; गळा : ‘कंधरी घातली ज्याने त्याने ।’ - वामन उपदेश माला १·६२. [सं.]
कंधर, कंधरा
पुस्त्री. मस्तक; शीर; कंठ; मान; गळा. 'कंधरीं घातली ज्यानें त्यानें.' -वामन, उपदेशमाला १.६३. [सं.]
कंठ
पु. १. गळा (हनुवटीच्या खालील व खांद्यावरील शरीराचा भाग) : ‘कंठीं झळके माळ मुक्ताफळांची ।’ - गणपतीची आरती. २. (गायन) गळ्यातून निघणारा ध्वनी; आवाज. ३. (पोपट, कबुतर, चिमणा इ.) पक्ष्यातील नराला (तारुण्यावस्था प्राप्त झाली असता) गळ्याभोवती उमटली जाणारी रेषा. (क्रि. फुटणे.) ४. भांडे वगैरेंच्या तोंडासारखा आवळ भाग; काठ. ५. श्वासनलिकेचे वरचे तोंड, नरडे; घसा. [सं] (वा.) कंठ दाटणे, कंठ भरून येणे, कंठ सद्गदित होणे – दुःख किंवा आनंद यांच्या उमाळ्याने घसा दाटणे, त्यामुळे तोंडातून शब्द न निघणे; आवेग येणे; सद्गदित होणे : ‘दासाकडे हनुमंत पाहे । तों गहिवरे कंठ दाटलाहे ।’ -संवि २·८५; ‘सांगू जातां मुखाने । तों कंठ आला भरून ।’ - नल २२·४५. कंठ फुटणे, कंठ बोटणे – (गायन) १. चिरका आवाज होणे; वयात आल्यावर आवाजाचा पोत बदलणे. २. कंठ (अर्थ ल ३) येणे (पोपट इ. पक्षाला). ३. खणखणीत शब्द निघणे. ४. वयात येणे; प्रौढदशा प्राप्त होणे. ५. (ल.) अनुकूल परिस्थितीत स्पष्टपणे, मोकळ्या मनाने बोलणे. कंठ बसणे - घसा बसणे; आवाज (गाण्यात, भाषणात), स्पष्ट न निघणे : ‘उष्ण काळीं तेल तिखट खातां । तेणें बद्धक झालें बहुतां । म्हणती कंठ बसले आतां । नये गातां कीर्तनीं ॥’ - संवि १२·१२२ कंठ शोषणे - (दुःखाने) घसा कोरडा पडणे. कंठ मोकळा करून रडणे - मोठ्याने रडणे, मनमुराद रडणे, ओक्साबोक्शी रडणे; भोकाड पसरणे : ‘मोकळा करूनि कंठ तेधवां । आठवूनिं मनिं जानकीधवा ।’ - (वामन) भरतभाव १४. कंठास प्राण येणे, कंठी प्राण येणे – १. (भीतीने, दुःखाने) अर्धमेले होणे : ‘प्रतिवचन प्रसंगी प्राण कंठास आला ।’ - सारुह २·१०३. २. दुःखाने किंवा भुकेने व्याकूळ होणे. कंठास लावणे - मिठी मारणे; आलिंगन देणे : ‘कंठास त्यास लावून ।’ - संग्राम १५. कंठी प्राण उरणे – आसन्नमरण होणे; धुगधुगी राहणे. कंठी प्राण ठेवणे, कंठी प्राण धरणे, कंठी प्राण राहणे – एखादी इच्छा किंवा आशा सफळ झाल्यावर मरू अशा इराद्याने जीव धरून राहणे : ‘अस्थि शिरा दिसती नयनीं । प्राण कंठी धरिले त्यानीं ।’ - संवि २७·७७; ‘तुम्हाविण कंठी प्राण राहिला असे ॥’ - रत्ना ४०३. कंठी धारण करणे - १. गळ्यात घालणे (माळ, अलंकार इ.). २. जपणे; स्मरण करणे; अतिप्रिय असणे.
कंठनाळ
पु. गळ्याची नळी; मान : ‘मग कंठनाळ आटे ।’ - ज्ञा ६·२०७. [सं.] (वा.) कंठनाळ चिरणे - गळा कापणे; ठार करणे.
कंठस्नान
(सं) न० गळ्याखालचें स्नान. २ गळा तोडणें.
कंठस्थान
न. गळा.
कपटी
उफराट्या वृत्तीचा, वर गोरा आंत काळा, द्रोही, खोटा, हृदये तु हलाहलम्, पायघोळ संत, विषकुंभसम, दुटप्पी बगळा, गळेकापू , केसाने गळा कापला, कपट-कारस्थानी, हिकमती, कांगावखोर, उलट्या काळजाचा, कुभांडखोर, आंतल्या गांठीचा, दुसऱ्याच्या पायांत पाय घालणारा, अप्रामाणिक, काळ्याकुट्ट मनाचा. बोलण्यांत बोलणे नसणारा, बेभरंवशाचा भिडू, अवसानघातकी, दगलबाज, कळीचा नारद ! कानी लागणारा, डामरट कोल्हा, लबाड, लुच्चा व कावेबाज, चारसो बीस, बंडलबाज, त्याचे अंतरंग रोगट, नागमोडी वर्तनाचा, पक्का भामटा.
कृक
पु. घाटी; गळा; घसा; कंठनाल. [सं.]
कृक
पु. घाटी; गळा; घसा; कंठनाल. [सं.]
कृष्णावळ
पु. कांद्याला विनोदाने म्हणतात. कारण तो उभा चिरला म्हणजे शंखाकृती आणि आडवा चिरला म्हणजे चक्राकृती दिसतो आणि शंख, चक्र ही कृष्णाची आयुधे आहेत : ‘आगस्तीचें मूत्र गळा लावुनि म्हणती कृष्णावळ ।’ - तुगा २८२४. [सं. कृष्ण + वलय = कृष्णावळ]
कृति
स्त्री. १ कर्म; काम; कृत्य; कांहीं कार्य करण्याचा व्यापार. २ क्रिया; रीत; पद्धत; युक्ति; प्रकार (उद्योग, धंदा इ॰ चा). 'देशी धंद्याच्या कृतींत व यंत्रांत कांहीं एक सुधारणा कोणास सुचवितां आली नाहीं.' -सेंपू १.१०. 'औषधाची कृति.' ३ संख्येचा वर्ग; द्विघात. ४ केलेलें काम; साधलेली गोष्ट, कार्य. 'रघुवंश ही कालिदासाची कृति.' ५ ख्यति; पराक्रम. 'शाण्णव कुळीचे भूप मिळाले सांगाया झाल्या कृती ।' -ऐपो १७८. -वि. कुशल; हुषार. 'व्यसनीं सहाय होउनि आप्ताला होय जो परासु कृती ।' -मोद्रोण ११.१५. [सं.] सामाशब्द- ॰प्रधान-वि. ज्यांत कृतींना प्राध्यान्य दिलें आहे अशी (कादंबरी). (इं॰) नॉव्हेल ऑफ इन्सिडेंट्स; याच्या उलट मतिप्रधान. -विचावि १६१. कृतीचा- वि. कृत्रिम; करणीचा; बनावट. 'कृतीची आयाळें जडवुनि गळा, पुष्ट करुनी ।' -सिंहान्योक्ति, मराठी ६ वें पुस्तक पृ. १२५ (१८९६). 'हीं कृतीचीं फुलें, पण खरोखरी फुलासारखीं दिसतात.'
कृतीचा
वि. कृत्रिम; करणीचा; बनावट : ‘कृतीची आयाळें जडवुनि गळा, पुष्ट करुनी ।’ - सिंहान्योक्ति, मराठी ६ वे पुस्तक पृ. १२५ (१८९६).
कुंद
वि. चोंदलेलें; बुजलेला (नळ, गुडगुडीची नळी इ॰) कोंदट; थांबलेली; थबकलेली; स्थिर झालेली (हवा, वारा); (त्या- वरून) चोंदल्यामुळें बद किंवा बेसूर वाजणारा (वाद्य, गळा, स्वर, हवा). [कोंडणें.]
कुंद
वि. १. चोंदलेले; बुजलेले (नळ, गुडगुडीची नळी इ.); कोंदट; थांबलेली; थबकलेली; स्थिर झालेली (हवा, वारा); (त्यावरून) चोंदल्यामुळे बद किंवा बेसूर वाजणारा (वाद्य, गळा, स्वर, हवा.). २. हवालदिल; हताश. [फा. कुंद]
कुशिंग रोग
(वै.) अधिवृक्क बाह्यांगाचे कार्य व्यवस्थित सुरू न राहिल्याने होणारा रोग. मान, गळा, चेहरा यांना सूज येणे, पोटावरील त्वचेवर पिंगट ठिपके उठणे, स्नायू अशक्त होणे ही याची लक्षणे आहेत.
खबखबणे
अक्रि. १. खबाखब असा आवाज करणे (कुजक्या नारळाचा आवाज होतो तसा.) २. कफाने किंवा शेंबडाने दाटणे (गळा, नाक); बदबदणे. [ध्व.]
खबखबणें
अक्री. १ खबाखब असा आवाज करणें (रिकामें मडकें ठोकलें असतां, पंचपात्रांत आवाज केला असतां अथवा कुजक्या नारळाचा आवाज होतो तसा.) २ कफानें किंवा शेंब- डानें दाटणें (गळा, नाक); बदबदणें. [ध्व.]
खोक(ख)ला, खोक
पु. (राजा.) प्राणवायु उदानवायूशीं मिश्र झाल्यानें दूषित होऊन तोंडांतून बाहेर पडणारा आवाज; कास; ढांस; खाल्लेलें अन्न श्वासमार्गांत गेल्यानेंहि खोकला उद्भ- वतो. याचे पांच प्रकार आहेतः- वातदोषाचा, पित्तदोषाचा, कफदोषाचा, उरःक्षताचा व क्षयरोगाचा. -योर १.६१०. 'खोकलें खरुज अत्यंत ।' -गीता १३.२४९७. [सं. कास] म्ह॰ गळा कापला खोकला मिटला (वारला). (वाप्र.) ॰विकत घेणें-स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणें; नसतें लचांड आपण होऊन अंगावर ओढून घेणें. -लेकरी-वि. सदोदित खोकला येत असलेला.
खोकला or खोखला
खोकला or खोखला khōkalā or khōkhalā m खोक m R A cough. Pr. गळा कापला खो0 मिटला (or वारला).
खप्प्याची पट्टी
स्त्री. (कुस्ती) कुस्तींतील एक डाव; आपला हात जोडीदाराच्या गालफडावरून घेऊन त्याच्या गळ्याची घाटी हाताच्या पोटरीनें दाबून त्यास घुसमटवून चीत करणें; गळ्याची टांग. [अर खफाह = गुप्त?; गळा दाबणें; खफाह + पट्टी = बांधणें]
लाइण-णी
क्रिवि. व्यर्थ; उगाच; विनाकारण. 'सूर्याजी पिसाळ लाइणी गळा पडला आहे हें खरें केलें आणिहि स्वामीस विदित केलें कीं सूर्याजी़ पिसाळ लाइणी गळां पडतो.' -पेद ३१.८५. 'जगदलियांची वृत्ति कदीम सालाबाद पहिलेपासून चालत असतां लाइणी शिवाजी नाइकडा निमे पटेलकीसी कथळा करितो.' -रा १५.१२.
मान
स्त्री. १ ग्रीवा; गळ्याचा मागचा भाग. २ गळ्यास होणारा रोग. ३ (अशुद्ध) गळा. 'घास मानेंत अडकला.' ४ (नृत्य) नृत्यांतील मानेच्या चलनवलनाचें प्रकार (सम, नत, अंचित, कुंचित, रेचित. पार्श्वोंन्मुख, निवृत्त, त्र्यस्त व उन्नत हे ते नऊ प्रकार होत). [सं. मन्या; फ्रेजि. मेन] (वाप्र.) ॰अडकणें-पेंचात, संक- टांत सापडणें. ॰कंबर एक करप-(गो.) मान खाली वांक- वून कामास लागणें. ॰कांट्यावर नसणें-(एखाद्यानें) अति गर्विष्ठ, उद्दाम किंवा मगरूर असणें. ॰कापणें-१ एखाद्याच्या उपजीविकेच्या साधनाचा नाश करणें; मुंडी मुरगाळणें. २ विश्वा- सघात करणें; फसविणें. ३ मोठी हानि करणें. ॰खालीं घालणें- १ डोकें खाली घालणें; नांगी पडणें. २ (ल.) अपमान सहन करण्याचा प्रसंग येणें. ॰चोळणें-(व.) कांकूं करणें. ॰टाकणें-थकणें; शक्तिहीन, निर्बल होणें. ॰टोकाविणें-मानेंने खुणा करणें. ॰डोल- वणें-हालविणें-१ रुकार, पसंती, प्रशंसा करण्यासाठीं मान हालविणें; पसंती दर्शविणें; वाहवा, कौतुक करणें. २ कबूल करण्यास भाग पाडणें. ॰ताठ ठेवणें-स्वाभिमान राखणें. ॰तुकविणें- वाहवा, कौतुक करणें. 'काय जिंणे जर न घडे करणी तुकवी जिचेस जग मान ।' -विक ६५. ॰धरणें-सक्रि. १ (ल.) ऐन आणीबाणीच्या प्रसंगी एखाद्यास अडविणें. २ -अक्रि. मानेस कांहीं विकृति झाल्यामुळें ती आखडणें, इकडे तिकडे वळवितां न येणें. ॰(मुंडी) मुरगाळणें-१ (एखाद्याचा) आशाभंग करणें; नाश करणें. २ पूर्णपणें लुटणें. ॰मोडणें-१ (राखून ठेवलेला पैसा इ॰) नाइलाजास्तव किंवा नाखुषीनें खर्च करणें. 'पाचशें रुपयांची मान मोडली तेंव्हा लग्न झालें.' २ थोडक्या खर्चासाठीं मोठ्या नाण्याला हात लावणें. 'चार पैशांकरितां रुपयाची मान मोडावी लागली.' ॰वर करणें-१ गरिबींतून वैभवास चढणें; दिमाख दाखविणें. २ दुखण्यांतून उठणें; डोकें वर करणें. ॰वर न करणें-लज्जेनें किंवा नम्रपणें वागणें. ॰वांकडी करणें-१ संमति अथवा रुकार दाख- विण्यासाठीं डोकें एकें बाजूस वळविणें. २ असंमति दर्शविणें. ॰वाक- विणें-कबूल करणें; मान्यता दाखविणें; अनुसरणें. 'ह्या परिस्थि- तीसच मान वांकविली पाहिजे.' ॰सोडविणें-एखाद्यास अड- चणींतून, पेंचातून मुक्त करणें. (खालच्या) मानेंनें चालणें- पाहणें-१ नम्रतेनें, विनयानें, सलज्जतेनें चालणें. २ खालीं मान घालून, लाजेनें चालणें. मानेवर सुरी ठेवणें-एखाद्याला धमकी देणें, भिवविणें; नाश करावयास सिद्ध होणें. मानेस-मानगु- टीस बसणें-१ गळीं लागणें; खपाटीस बसणें. २ (भूत, पिशाच्च वगैरेनीं) झपाटणें; पछाडणें. ३ गळ्यांत लादणें; डोईवर ओझें पडणें; अवश्य कर्तव्य असणें (करावयाचें काम) सामाशब्द- ॰खुंट- खोडा-नपु. ओढाळ जनावराची मान व पुढचा एक पाय यांस एके ठिकाणीं बांधलेली दोरी. [मान + खूंट] ॰खुरी-स्त्री. (नेमाड) गुरांचा एक रोग; तोंडखुरी पहा. -शे. ११.३२. ॰गु(गो)टी-स्त्री. (तिरस्कारार्थी) मान; बोकांडी; अपकार, निग्रह इ॰ दाखविणाऱ्या क्रियापदाशींच फक्त जोडून योजतात. 'वाघानें मानगुटी फोडली- धरली-सोडली.' 'हा त्याचे मानगोटीस बसला.' ॰पुळी-स्त्री. (कों.) कांकर रोग. ॰मोड-स्त्री. १ मान दुखावणें. २ लिहिणें, शिवणें इ॰ कां करितां एकसारखी मान वांकवून करावयाचे परि- श्रम, यातायात, दगदग. ३ अपमान; मानहानि; मानभंग. ४ उभी उतरण. [मान + मोडणें] ॰मोडा-पु. (गो.) माशाची एक लहान जात. ॰मोडी-स्त्री. १ अतिशय उभ्या चढणीची जागा. २ (नेमाड) गुरांचा एक रोग. -शे ११.३. ३ (व.) इन्फ्ल्युएन्झा रोग. १९१८ सालीं ही सांथ आली होती, त्यास मानमोडीचें साल म्हणतात. ४ -वि. अतिशय उभ्या चढाचा (रस्ता, डोंगर). ॰मोडें-न. (नुकताच संसार करूं लागणारा तरुण, गरिबींतून बाहेर निघालेला, दुखण्यांतून उठलेला मनुष्य, झपाट्यानें पक्व दशेस येणारी वनस्पति इ॰ कांची) नाशक, विघातक, विध्वंसक अशी स्थिति, अवस्था.' या वांग्या कांहीं टवटवीत दिसूं लागल्या होत्या इतक्यांत काय मानमोडें आलें तें कळेना.' -शास्त्रीको. [मान + मोडणें] ॰वळा-ळी-पुस्त्री. मानेवरील आंखूड केसांची रेषा (प्रायः अनेकवचनी प्रयोग). [मान + ओळ] मानेचा कळस किंवा कांटा-पु. डोकें. (क्रि॰ ढळणें; पडणें; खाली येणें) मानेचा कळस म्हणजे पाठीच्या कण्याचें वरचें अग्र, मणका अशी प्रायः समजूत आहे. मानेचा कांटा ढळणें-अक्रि. मृत्यू, मूर्च्छा इ॰ समयीं मानेचें अवसान नाहीसें होऊन डोकें एका बाजूस वळणें, पडणें. मानेचा खाखोटा-पु. गळ्याची घांटी; कंठमणि. मानेची पन्हळी-स्त्री. डोक्याच्या पाठीमागच्या बाजूस माने- वर असलेली पोकळी, खळगी.
मायवत्
न. क्षेत्रांतील लोकजात; एखाद्या भूमीतील, गांवांतील सर्व मंडळी. 'म्हनउनु समस्त मायवत् बैसोन विचार केला आणि तुम्हापासी येउनु तुमच्या गळा पडोन तुम्हास कुळकर्ण व घरटा दिधला असे. '-रा १४.१.
महसली करणें
अक्रि. पाठविणें; धाडणें. 'वरचेवरी हुजरे महसली करून उष्ण कालांत गला येऊन पावे तें करावें.' -पेद १६.४३. [अर. मु + हासल]
मफसूद
पु. मकसूद बद्दल चुकीचें वाचन; हेतु; हकी- कत; अभिप्राय 'तूं जरूर गळा पडतोस तरी तुझा काय मफ- सूद तो सांगणें.' -रा १५.१०. [अर. मकसूद पहा]
मुडा
वि. १ तोंड किंवा गळा फुटलेलें (मडकें) २ चोंबडा (मनुष्य).
मुख
न. १ तोंड; ओठ, दातांची मुळें, दांत, जीभ, टाळा, गाल व गळा या सात अंगांच्या समुदायास मुख म्हणतात.- योर २.४४८. २ पक्ष्याची चोंच. ३ चेहरा; मुद्रा; तोंडवळा. ४ (ल.) द्वार; वाट; मार्ग; एखाद्या इमारतीचें द्वार. ५ एखाद्या कामाची सुरवात, इतर लाक्षणिक अर्थ तोंड या शब्दांत पहा. ६ साधन; करण; उपाय; हत्यार. 'ज्ञानग्नींचेनि मुखें । जेणें जाळिलीं कर्मे अशेखें ।' -ज्ञा ४.१०५.७ (सामासिक शब्दांत) अग्रभाग; मूळचा भाग; मूळवस्तु; मुख्य मनुष्य; पुढारी; अग्रेसर. ८ नदी समुद्राला मुळते तो भाग, स्थल. ९ (सोनारी धंदा) पोचे काढण्या- साठी लोखंडी पहारेचें टोंक वळवून त्याच्या शेवटीं मुखाकृति केलेला भाग. १० गणितश्रेढीतींल पहिली संख्या. ११ चतुष्कोणाच्या पायाच्या विरुद्ध बाजू. [सं.; फ्रेजि. पोर्तु. जि. मुई]म्ह॰ (सं.) मुखमस्तीति वक्तव्यम् । (तोंड दिलें म्हणून वाटेल ते बोलावें) सामाशब्द- ॰कमल-चंद्र-न.पु. (काव्य) कमलाप्रमाणें किंवा चंद्राप्रमाणें सुंदर असलेलें तोंड. ॰चर्या, मुखावरची चर्या, मुखकळा-स्त्री. तोंडावरील ओज, तेज. ॰चालन-न. (गायन) रागोचित गमक व अलंकार यांचा यथोक्त प्रयोग करून गायन करणें. ॰छिद्र-न. ज्वालामुखीचें तोंड; हें कढईसारखें असतें. ॰जड-वि. निबोल्या; कमी बोलणारा. 'बोलोंचि नेंणें मुखजड । तो येक मूर्ख ।' -दा २.१.४९. ॰जबानी-स्त्री. तोंडी हकीकत. ॰जबानीनें-क्रिवि. तोंडी; तोंडानें बोलून. [सं. मुख + फा.जबान् = वाचा] ॰टी-स्त्री. मुख, तोंड. 'पाहिली ब्रह्म्याची मुखटी' । -कथा ७.११.५५. ॰टोप-पु. (काव्य) शिरस्त्राणाचा तोंडाकडील भाग. ॰मुखंड-वि. मुख्य; पुढारी; प्रमुख; नायक; म्होरक्या. ॰मुखडा-पु. चेहरा; तोंडावर. 'मुखडा पाह्या उभी राहते धाउ- निया ।' -सला २५. [हिं.] ॰मुखदाक्षिण्य-न. १ भाषणशैली; वक्तृत्व; वाक्पाटव; शब्दचातुर्य. २ मुखसंकोच; एखाद्याच्या आदरार्थ किंवा भावनाविष्काराकरितां बोलण्यास घातलेला आळा. ॰दुर्बल-ळ-वि. वेळेवर विशेष बोलतां येत नसलेला; बोलण्याचा कंटाळा असलेला; मितभाषी; बोलण्यास भित्रा. ॰दूषिका- स्त्री. अव. मुरुम; तारुण्यामुळें तोंडावर उठणाऱ्या पुटकुळ्या. ॰पट्टा-पु. १ घोड्याच्या तोंडावरील पांढरा पट्टा. २ घोडा जिन घालून बसण्याकरतां सज्ज केला असतां त्याच्या तोंडावर येणारा चामड्याच्या पट्टा; म्होरकीचा भाग. ॰परिक्षा-स्त्री. (वैद्यक) तोंडात उत्पन्न होणाऱ्या चवीवरून करावयाची त्रिदोषपरीक्षा. वातदोषानें तोंड गुळमट होतें, पित्तानें तिखट किंवा कडू होतें आणि कफदोषानें आंबट, मधूर असें होतें. -योर १.२५. ॰पाक-पु. तोंड उतणें; या रोगानें तोंडात, गळफडांत, जिभेवर लहान लहान फोड येतात व ते फुटून त्याच्या योगानें पिवळे अथवा पांढरे चट्टे पडतात. -गृहवैद्य ४१. ॰पाठ-वि. तोंडपाठ; मुखोद्रत. ॰पृष्ट-न. पुस्तकाचें पहिलें पान; पुस्तकाचें अगदीं बाहेरील पान; (याच्यावर पुस्तकाचें नाव इ॰ छापलेले असतें). (इं.) कव्हर. ॰प्रिय-वि. १ शरीरपोषक नसतां फक्त जिभेला गोड लागणारा (पदार्थ). २ साधें व पोषक असें तोंडास वीट न आणणारें; चवदार लागणारें (अन्न.) ॰भंजन-न. एखाद्याचा नक्षा उतरणें; लाजविणें; रग जिरविणें; खोड मोडणें; घाबरविणें. [सं. भञ्ज् = मोडणें] ॰माधुर्य-न. ज्यामध्ये फार बडबड- ण्याची व पुष्कळ खाण्याची इच्छा उत्पन्न होते असा एक वातविकार ॰मार्जन-न. १ तोंड धुणें. २ (ल.) रागावलेल्या माणसाची गोड व प्रेमाच्या शब्दांनी केलेली मनधरणी. ३ एखा- द्याची त्याच्या तोंडावर खरडपट्टी काढणें; शिवीगाळ. ४ मुख- माधुर्य. ॰र-वि. १ बोलका; बडबड्या; तोंडाळ; फटकळ. २ आवाज काढणारा; सनाद; वाजणारा. ३ पुढारी; म्होरक्या. 'मुखरस्तत्रहन्यते' [सं.] मुखरत्व-न. बडबड; वाचाळता. ॰रंग-पु. मुखराग पहा. ॰रण, मुखरीण-रणी-वि. मुख्य; प्रमुख; पुढारी. 'हरें तोषें केलें मुखरण तुला कीं रणतरी ।' -वामन, विराट ७.१६१. ॰रस-पु. १ लाळ; थुंकी. २ (ल. निदार्थी) अनिष्ट भाषण; दुर्भाषण. (क्रि॰ पाघळणें; गळणें). ॰रा-पु. (ना.) ॰राग-पु. १ तोंडावरील तेज; तजेला; कांति. २ (नृत्य) निरनिराळ्या भावांच्या वेळीं दाखविलें जाणारें तोंडावरील तेज, हे चार प्रकारचें असतें- स्वाभाविक, प्रसभ, रक्त व श्याम. ॰रोग-पु. १ तोंडास होणारा रोग. २ चेहऱ्यासंबंधी रोग. मुखरोग एकंदर ६७ आहेत. म्ह॰ आंब्याला आला पाड कावळ्याला आला मुखरोग. ॰रोगी-वि. १ मुखरोगानें पछाडलेला; मुखरोग झालेला. २ (ल.) दुर्मुख- लेला; खिन्नवदन; खाणें पिणें व मंडळींत बसणें नाकारणारा, नाव- डणारा. ॰वट-वटा-वटी, मुखोटा-पु. १ तोंडवळा; चेहरा; तोंड. 'इच्छा इच्छुनी पाहती मुखवट ।' -दावि. ८.२ चांदी, सोनें इ॰ची देवाच्या मूर्तीवर लावण्याकरतां केलेली फक्त तोंडा- चीच प्रतिभा; (व.) मुखवट. पौराणिक नाटकांतील गणपती, रावण, नारसिंह इत्यादींची सोनें बनविण्याकरितां त्याच्या चेह- ऱ्याच्या कागदाचा लगदा वगरेच्या आकृति करीत त्या. ३ बुरखा; सोंग. ४ छातीपासून वरील शरीराचा भाग. ५ कागदावर काढलेलें तोंडाचे चित्र. ६ तोंडाची ढब; चेहरेपट्टी. ॰वटी-स्त्री. तोंडांत मावण्याइतकें प्रमाण. ॰वस्त्र-न. १ देवाची पूजा, नैवद्य वगैरे झाल्यावर देव वामकुक्षि करतात तेंव्हा त्याच्या मूर्तीच्या तोंडावर घालतात तें वस्त्र. २ तोंड पुसण्याचें वस्त्र. ३ ग्रंथ किंवा पोथी बांधून ठेवण्याचें वस्त्र. ४ मलपृष्ट; ग्रंथाच्या बाहेरील पान; (इं) कव्हर. ५ कागदाच्या पुडक्यांतील अगदीं वरचें पान. ॰वाद्य- न. १ तोंडानें वाजविण्याचें वाद्य. २ (ल.) बोंब; शंख. ॰वास- वासना-पु. १ तोंडाला सुवास देणारा पदार्थ. (पान सुपारी इ॰) २ चुकीनें मुखवस्त्राबद्दल उपयोग करतात. ॰विलास-पु. एक पक्वान्न. ॰वैवर्ण्य-न. लज्जा, भीति आश्चर्य इ॰ मुळें चेह- ऱ्याला आलेली विरूपता; चेहऱ्यांतील बदल. ॰व्रण-पु. तोंडावर उठळेला व्रण; तोंडावर झालेली जखम. ॰शुद्धि-स्त्री. जेवणानंतर तोंडाचा ओशटपणा जाण्याकरतां खावयाचे सुपारी, विडा इ॰ पदार्थ; सुपारी इ॰ खाणें. ॰श्री-स्त्री. मुखचर्या; तोंडावरील तेज. ॰संकोच-पु. १ एखाद्याच्या समोर भीतीमुळें अगर आदरामुळें बोलावण्यास वाटणारा संकोच; दबकलेपणा. २ आदरामुळें किंवा मोठेपणामुळें येणारा लाजाळूपणा. ३ वचकामुळें आलेली शाली- नता. ॰सूद. मुक्शूत-द-स्त्री. (कों.) मुखशुद्धि पहा. ॰सेक- पु. चूळ भरून टाकलेलें पाणी; गुळणा. 'असें असेल तर तो अभि- षेक नव्हे. मुखसेक आहे.' -भासाच्या प्रतिभा नाटकाचा मराठी अनुवाद ॰स्तंभ-पु. १ न बोलता स्तब्ध बसणें. २ ज्यामध्यें वाचा बंद होते असा एक रोग. -वि. घुम्या; न बोलणारा. म्ह॰ खावयास अगडबंब म्हणावयास मुखस्तंभ. मुखिया-पु. पुढरी; म्होरक्या. मुखरी, मुखी-स्त्री. (राजा.) मडकें, कैपड इ॰ ला पडलेलें बारीक भोंक, छिद्र. मुखीं-क्रिवि. (काव्य) तोंडपाठ; तोंडी. मुखें, मुखेंकरून-क्रिवि. एखाद्याच्या योगानें; रूपानें; द्वारें. उदा॰ त्यागमुखें, अन्वयमुखें, व्यतिरेकमुखें इ॰ मुखोदगत- वि. तोंडपाठ; तोंडी. [मुख + उद्गत]
मुंढा-डा
पु. १ खांद्याचा गोल भाग; खांदा. 'आनंत्या बोलला आज मुंढ्याला चिंध्या होती.' -ऐपो ७०. २ (सांके- तिक) मुंढा हात; पाऊण हात. ३ पखालीचें (दोन्हीकडील) तोंड. ४ हिजड्याचा सोबती; नोकर. -वि. १ डोकें, माथा, टोंक शेंडा, शेंडी, शिंगे किंवा अग्र नसलेला (प्राणी, झाड, बोट, चाकू, नारळ इ॰). २ कडा, गळा, काठ, इ॰ नसलेलें (भांडे). ३ निव्वळ, केवळ फक्त शंभरच असा पंचोतरी व सळी नललेला (शेकडा); याच्या उलट खरा (शेंकडा). ४ विरहित; साधा; ओका; दागिने नसलेला; मुंडा. ५ शिंगे मागें वळलेला; ६ छत्र नसलेलें (सिंहा- सन); सिंहालनाला छत्र असण्याचा अधिकार नसलेला (मांड- लिक); [सं. मुंड] ॰हात-पु. कोपरापासून वळलेल्या मुठीपर्यंत लांबीचा हात (लांबी मोजण्याचें एक प्रमाण). (गो.) मुंडिहाथ, मुंडोहात. ॰उलटा-पु. (जंबिया) आपल्या हातांतील जंबियानें आपल्या जोडीदाराच्या डावीकडील खांद्यावर मारणें. ॰सीधा- पु. (जंबिया) आपल्या हातांतील जंबियानें जोडी- दाराच्या उजव्या बाजूकडील खांद्यावर मारणें. ॰मुंढे फिरणें-१ खांदे गोलाकार होणें; खांदे भरणें. २ गलींत कवडी फेकून खेळा- वयाच्या कवड्यांच्या खेळांतील एक डाव. पारिभाषिक शब्द.
निम
वि.अर्धा; निमा. [फा. निमा] ॰कंठीदार-वि. अर्धी कंठी (छातीवरील निमगोल पट्टी) असलेला (अंगरखा) ॰की-स्त्री १ उजळणीचा एक प्रकार. एक पासून शंभरापर्यंत संख्यांच्या निमपटी पाठ करणें. २ निमकें अर्थ (२)पहा. ॰कें- न. १ घोड्याच्या अथवा बैलाच्या ओझ्याचा अर्धाभाग (मुख्यत्वें आयात-निर्गत मालावरील जकातीसंबंधीं व्यवहारांत योजतात). २ अर्ध, अथवा त्याचा कोणताहि गुणाकार. उदा॰ १।।, २।।. [निमा] ॰खाई-स्त्री. शेतकी. व्यापार, उद्योग इ॰ व्यवहारांत अर्धा वांटा, हिस्सा. २ शेताच्या उप्तन्नांतील अर्धा वांटा (जमीन- कौलानें देणार्याचा अथवा घेणार्याचा) ३ अर्धेल, अर्धुक; अर्धा. निमाई पहा. [निमा + खाई प्रत्यय] ॰गुंडीचा-वि. न लाग- णार्या गुंड्या, मुदनी असणारा (अंगरख्याचा गळा). ॰गोणी, निमकगोणी-स्त्री. (जकातबाब) अर्धी गोणी, धान्याचें पोतें. ॰गोरा-वि. १ कांहींशा गोर्या वर्णचा; थोडा, अर्धवट गोरा. २ ख्रिश्चन; युरेशियन. 'ब्राह्मणेतरास पहिल्यानें जागा द्याव्या. त्यांतहि पहिल्यानें निमगोर्यास किंवा आठ आणे युरेजिनास...' -टि ३.२२. ॰गोल-पु. अर्धगोलाकृति; अर्धवर्तुल स्तंभाकार शरीर, आकार; गोळ्याचा, पंचपात्राचा अर्धा भाग. -वि. अर्धगोलाकृति; अर्धवर्तुलस्तंभाकार. ॰गोल कानस-स्त्री. (सोनारी धंदा) एका बाजूस गोल व एक बाजूस चपटी कानस. ॰चिकणी-वि. सुपारीचा एक प्रकार. ही जाड व चापट असतें; भरडा. ॰जरी-वि. अर्धें कलाबतूचें आणि अर्धें रेशीम, कापूस इ॰ नीं बनविलेलें, तयार केलेलें; अर्धें जरीचें. ॰ताजीम-स्त्री. (अर्धा मान, अर्धा सत्कार) उठून उभें न राहतां केवळ उठल्या- सारखें करून (भेटीस आलेल्याचें) स्वागत अथवा रवानगी करणें. (क्रि॰ देणें; घेणें). याच्या उलट खडी अथवा पुरी ताजीम. [निमी + ताजीम] ॰थल-स्त्री. १ शेताचें अर्धें उत्पन्न; विशेषतः अर्धा वांटा, हिस्सा (जमीन कौलानें घेणार्याचा अथवा देणार्याचा). २ जमीनीचें उप्तन्न वांटून घेण्याकरितां जमीनी कौलानें देणारा आणि घेणारा यांची भागीदारी; सारखी वांटणी; अर्धेंलीची पद्धत. [निमा + थल] ॰थाना-स्त्री. कापणीनंतर पिकांचें उप्तन्न काढण्याचा प्रकार. सर्व पेंढ्या मोजून त्यांतीन तीन (एक अगदीं भरदार दाण्याची, एक मध्यम व एक अगदीं फोलकट अशा) पेंढ्यांचा साधारण उतारा काढावयाचा व नंतर सर्व पेंढ्यांच्या उतार्याचा हिशेब करावयाचा. ॰दस्ती-वि. १ नेहमीच्या रकमेच्या निम्यानें कर, खंड बसविलेली (माल, जमीन). २ निमें धान्य देण्याच्या ठरावानें केलेलें (शेत इ॰). [निमा + दस्त] ॰पट-स्त्री. अर्धा; निमा; अर्धा भाग. [निमा + पट] ॰पितळी- वि. (कु.) थोडी पितळ घातलेलें (पायतण). ॰शाई-स्त्री. १ अर्धें करणें.(क्रि॰ करणें). २ अर्धेली; अर्धा भाग. अर्धेल पहा. ॰सर- कारी-वि. सरकारचा कांहीं ताबा असलेली (शाळा, संस्था इ॰). 'टिळक विद्यापीठ हें कांहीं सरकारी किंवा निमसरकारी विद्यापीठ नव्हे ...' -केले १.३२. ॰सारा-पु. अर्धा सारा. कर. ॰स्तनी-वि. अर्ध्या बाह्यांचा (अंगरखा); जाकीट; कोपरी. -वाडसभा १.११९. [निमी + अस्तनी]निमा-पु. अर्धा भाग; अर्ध. -वि. अर्धा. [फा. नीम] निमाई-स्त्री. निमखाई पहा. निमें-स्त्री. अर्ध; एकद्वितीयांश. 'आयुष्य वर्ष शत त्यांत निमें निजेलें ।' -वामन, स्फुट श्लोक ६९ (नवनीत पृ १४१). -वि. अर्धें. (विशेषतः समासांत उपयोग). [फा. नीम] निमे(मो)निम-वि. अर्धाअर्धा. -क्रिवि. अर्ध्यानें; अर्धेंअर्धें करून; अर्ध्या केलेल्या स्थितींत. निमेंशिमें-क्रिवि. अर्धेंमुर्धें; जवळजवळ अर्धें; सुमारें अर्धें. [निमे] निम्मा, निम्माई, निम्मे, निम्मेनिम, निम्मेशिम्में-निमा, निमाई इ॰ पहा.
निमगुंडीचा
वि. न लागणाऱ्या गुंड्या, मुदनी असणारा (अंगरख्याचा गळा).
निरपेक्ष
वि. १ निरिच्छः निःस्वार्थी; निरभिलाषी; निष्काम; अपेक्षा नसलेला. 'वैराग्यनिरपेक्षाचा गळा । गिंवसीत असे ।' -ज्ञा १६.२०९. 'जैसी निरपेक्षाची सांगता स्थिति । आशाबद्ध मनीं जल्पती । कां साहदेवमतासीं हेळसती । ज्योतिषी जैसे निजद्वेषें ।' २ असहाय; अनाथ; अशरण. ३ सोडून; वगळून- शिवाय. उदा॰ व्यक्तिनिरपेक्ष. [सं. निर् + अपेक्षा] निरपेक्षता- स्त्री. १ निरिच्छपणाः निःस्वार्थता. २ पक्षपात नसणें.
निवाडे
क्रिवि. १. निश्चयाने; हटातटाने : ‘नांगर उचलूनिया निवाडें । नेहटूनि पाय ठेविला पुढे ।’ - एरुस्व १०·३३. २. खरोखरी : ‘गळां मोतीं असोन निवाडें । लोकांचिया गळा पडे ।’ - ह २१·२२९.
निवाडें
क्रिवि. १ (काव्य) निश्चयानें; हटातटानें. 'नांगर उचलूनिया निवाडें । नेहटूनि पाय ठेविला पुढें ।' -एरुस्व १०. ३३. २ खरोखरी. 'गळां मोतीं असोन निवाडें । लोकांचिया गळा पडे ।' -ह २१.२२९.
नळी
स्त्री. १. (सामा.) दोन्ही तोंडे खुली असून मध्ये पोकळ असणारा धातूचा, लाकडाचा, वेळूचा लांब तुकडा. २. बंदूक; ज्यात दारू ठासतात तो बंदुकीचा भाग. ३. मूत्रनलिका. ४. श्वासनलिका; अन्नमार्ग; गळा; कंठ : ‘वासनेहातीं बांधवी नळी ।’ – तुगा २७९९. ५. (विणकाम) धोटा; गणा किंवा कांडी ज्यात ठेवतात ते टोपण; कोश. ६. फुंकणी. (कु.) ७. पहा : नळकुटी १. ८. नाकपुडीचे छिद्र. ९. नळीच्या आकाराचे कौल. याचे एक तोंड जास्त रुंद व दुसरे किंचित निमुळते असते. १०. पाभरीच्या फणाला बसवलेल्या बांबूच्या पोकळ तुकड्यांपैकी प्रत्येक. याचे एक टोक फणाच्या भोकात व दुसरे चाड्यात बसवलेले असते. यातून बी जमिनीत पडते. ११. डोंगरातील अरुंद खिंड, मार्ग. १२. (ल.) बंदूकवाला. (बार, घोडा इ. शब्दांच्या लाक्षणिक अर्थांप्रमाणेच हा अर्थ.) १३. पळ; धूम. (गो.) [सं. नलक, नलिका] (वा.) नळीचे वऱ्हाड करणे–स्वतःची तुंबडी भरणे. नळी नख देणे, नळी दाबणे–१. एखाद्याची निर्वाहाची साधने नष्ट करणे. २. निष्ठुरपणे वागवणे.
नळी
स्त्री. १ (सामा.) दोन्ही तोंडें पोकळ असून मध्यें पोकळ असणारा धातूचा, लांकडाचा, वेळूचा लांब तुकडा. नळ पहा. २ बंदूक; ज्यांत दारू ठासतात तो बंदुकीचा भाग; नलिका. ३ मूत्रनलिका. ४ श्वासननलिका; अन्नमार्ग; गळा; कंठ. 'पहा त्या हिरण्यकश्यपें अपुलियेचि नळीं । बसविला नरसिंह पाचारीनी ।' -निगा ५३. 'वासनेहातीं बांधवी नळी ।' -तुग २७९९. ५ (विणकाम) धोटा; गणा किंवा कांडी ज्यांत ठेवतात तें टोपण; कोश. ६ (कु.) फुंकणी. 'नळी फुंकिली सोनारें ।' ७ मोरी; गटार. ८ गुडघ्यापासून घोड्यापर्यंत हाड; नळगुडी; नडगी. ९ (हात, पाय, मांड्या यांच्या) लांब हाडांपैकिं प्रत्येक. १० नाकपुडीचें छिद्र. ११ नळीच्या आकाराचें कौल. याचें एक तोंड जास्त रुंद व दुसरें किंचित निमुळतें असतें. १२ पाभरीच्या फणास बसविलेला बांबूच्या पोकळ तुकड्यांपैकीं प्रत्येक. याचें एक टोंक फणाच्या भोंकांत व दुसरें चाड्यात बसविलेलें असतें व यांतून बीं जमीनींत पडतें. १३ डोंगरांतील अरुंद खिंड, मार्ग. १४ (ल.) बंदूकवाला (बर, घोडा इ॰ शब्दांच्या लाक्षणिक अर्था- प्रमाणेंच हा अर्थ आहे). १५ (गो.) पळ; धूम. [नळा] ॰काढप-(गो.)पळ काढणें; धूम ठोकणें. नळीचें वर्हाड करणें-(स्वतःची) तुंबडी भरणें; तळीराम गार करणें. नळीं नख देणें, नळी दाबणें-१ (एखाद्याच्या) पोटावर पाय देणें, निर्वाहाचीं साधनें नष्ट करणें. २ निष्ठुरतेनें वागविणें. ॰निमटणें- नरडी दाबणें; प्राण घेणें. 'सूर्योदयो जाहल्यापाठीं । समूळ अंधारातें घोटीं । खद्योताची नळी निमटी । नक्षत्रकोटी तत्काळ गिळी ।' -एभा १३.४२२. नळीवर नेसणें-(धोतर, लुगडें इ॰) गुडघ्याच्यावर नेसणें. नळीचें कुलूप-न. जुन्या काळचें वाटोळें गावंठी कुलूप. हें लांब सळईच्या किल्लीनें उघडतें. याच्या उलट विलायती तर्हेचें. 'बेडकीचें' कुलूप. नळीचें पीस-न. बारीक निमुळत्या नळीच्या आकाराचें साळूचें पीस. 'सड, केंस, लव, पिसें, नळीचीं पिसें... इतके आच्छादनाचे प्रकार आहेत.' -मराठी ६ वें पुस्तक, पृ. ८(१८७५). नळीदार कौल-कऊल-न. मातीचे अर्धनळीच्या आकाराचें कौल; याच्या उलट थापीव कौल. नळीदार चोळणा-पु. पायांच्या नडग्या झांकणारी, घोट्यापर्यंत लांब असलेली विजार, पायजमा. नळ्या गंधक-पु. कांडीच्या आकाराचा गंधक.
नरांडी
स्त्री. १ पाण्याचा निकाल करण्यासाठीं काढलेला पाट; नाला; गटार. 'नरांडींतून नदीच्या पुराचें पाणी आंत घुसलें.' २ गळा; अन्ननलिका; घसा; घांटी; नरडी. ३ (क्व.) नळांडी. नळांडी पहा.
नरांडी
स्त्री. १. सांडपाणी जाण्यासाठी काढलेला पाट; नाला; गटार. २. गळा; अन्ननलिका; घसा; घाटी; नरडी. ३. पहा : नळकांडी
नरडी
स्त्री० नरडें, गळा.
पडका
वि. १ लवकर पडणारा; घोगरा (आवाज, गळा, कंठध्वनि). २ मोडकी; पडलेली; (इमारत).
पडका paḍakā a (पडणें) Easily becoming thick or hoarse--a voice. Used with गळा, कंठध्वनि, आवाज &c. 2 Falling, ruinous, dilapidated--a building.
पेंचप्रसंग
शृंगापत्ति त्रांगडे, पेंच, बांका प्रसंग, अवघड वेळ, बिनतोड परिस्थिती, आणीबाणीची वेळ अडचणीची स्थिती, पेंचदार समस्या, अक्रोड सिच्युएशन, प्राणसंकट, बिनतोड डाव, इकडे आड तिकडे विहीर, इकडे साप तिकडे दरड, धरलें तर चावतें सोडलें तर पळतें, इकडे आग तिकडे फुफाटा, खाल्ले तर बाधतें टाकलें तर श्रापते, वाघ म्हटलें तरी खातो वाघोबा म्हटलें तरी खातो, अडचणीचें दुखणें नि जांवई वैद्य ! समोर बैल मागे नाग, किल्ली आंत टाकून बाहेर खोलीला कुलूप घातलें, आईं खाटीक बाप कसाई, आई खाऊं घालीना बाप भीक मागूं देईना, असंगाशी संग नी प्राणांशीं गांठ, बोचकें कीं डोचकें गमवावें असा पेंचप्रसंग ! दगडाखालीं हात सांपडला, गळा गुंतला, प्रसंग पडे बांका तो गधेको कहना पडता है काका, तोंड बांधून बुक्क्यांचा मार, तेरी चूप मेरीबी चूप अशी स्थिती, चोरीचा मामला हळूहळू बोंबला ! आपलेच दांत आपलेच ओठ, न बोलावें तर साहत नाहीं बोलावें तर अब्रू जाते, यांत कुठूनही सुटका नाहीं, गाडा चिखलांत रुतला, कमळाच्या जाळ्यांत अडकल्यागत, नेहमीचा खोड्यात अडकला जाण्याची भीति, धडपड करावी तर अधिकच खोलांत, चिमट्यांत धरल्यागत स्थिति.
मृदंगाला दोन्हींकडून थाप, प्रवाहाच्या ऐन मध्यावर नावाडी सोडून गेले, जणूं नकळत मधमाश्यांचे पोळें जागें केलें, ही डोक्यावर टांगती तलवार ठरली, गुपचूप राहतां ।शिंक येऊं लागली तसें, सभेंत बोलतांना कासोटा निसटला ! कोणी ओळखलेंच तर आली का पंचाईत ! प्रकरण अंगाशीं येतें कीं काय असें वाटलें, काय करूं कसें करूं झालें, ही निरगांठ सुटावी कशी ? दोन पात्यांची ही कात्री आणि मध्यें माझे तुकडे !
रडली
कोपरे दुमडून तळवे तोंडावर ठेवून ती ओक्साबोक्शीं रडूं लागली, धो धो रडली, पापण्या पाणावल्या, विलाप केला, दोघीहि पंचम स्वर काढण्याच्या बेतांत होत्या, तिच्या डोळ्यांत गरगरून अश्रू जमायला लागले, अश्रुसिक्त गालांवर, तिनें सात -पदरी गळा काढला.
शेल
न. १ (व.) शेवट; अखेरी; टोंक; शेंडा. 'शेल पुरल.' = शेवट झाला. 'आम्ही शेल्या लोक गेलों' = आम्ही शेवटपर्यंत गेलों. २ (गो.) काथ्याची लांब दोरी; कासरा. ३ (हेट.) नारळाचा घड; नारळाचा देंठ. ४ (ल.) उच्चपद; उत्तम भाग; शिर; गळा. [सं. शैल; गु. छेल्ला]
शेली
स्त्री. १ टोंक; अग्र; झाडाचा शेंडा. २ (कु.) नारळाच्या पेंडीचा देंठ. ३ (ल.) मान; गळा. 'कापुनि घ्याया आलों शेली ।' -र ५०. [शेल]
सगलंकृत
वि. गिलंकृत याचें चमत्कारिक रूप. [सं. स + गल = गळा + कृत = केलेलें]
सरकणें
अक्रि. १ घसरणें; घंरगळणें; निसरणें. २ मागें- पुढें होणें; हलणें; सरणें; दूर होणें; बाजूला होणें; स्थानभ्रष्ट होणें; आजूबाजूस होणें. 'अमळ सरकून बसा.' ३ सरसावणें; पुढें जाणें; चालून जाणें; चाल करणें. 'दांडियांचां सरकौनि वारिके आंवरी । ' -शिशु ५५२. [सं. सृ-सर] 'सरकीमिरकी चिमटा गणेशाची आढी.' सागरगोटे खेळतांना हलूं नये म्हणून घालावयाची आण. सरकगांठ-स्त्री. मागेंपुढें करून सईलआंवळ करतां येईल अशी गांठ; निसरगांठ. 'या गळफांसाची सरकगांठ ओढून मीं आपला गळा आंवळलाच.' -भाब १४३. ॰पडदा-पु. मागेंपुढें सरकावतां येणारा पडदा. 'नाटकाचे सुरवातीचा सरकपडदा उघ- डला.' -के १०.६.३०. ॰पूल-पु. पुढेंमागें ओढून काढतां घालतां येण्यासारखा खंदक वगैरेवरील पूल. 'त्यावेळीं सरकपूल मोडून ठेवल्याप्रमाणें बाजूस सरकला असल्याकारणानें.' -सासं २.४२. ॰फांस-पु. गांठ मागेंपुढें ओढून घट्ट-सईल करतां येण्या- सारखा फांस; निसरफांस. ॰शेंडा-पु. (ना.) झाडाचा सर्वांत उंच शेंडा.
श्रमसाध्यता
गातां गळा शिंपतां मळा, फिरे तो चरें, ठोठावल्याने दार उघडतें, लक्ष्मी प्रयत्नसाध्य आहे, खपेल त्याचे शेत, केल्याने होत आहे रे, घाम गाळील त्याचें आहे, श्रमगम्य, झिजे त्याला मिळे.
ससोरा
पु. घसा; गळा; मानगुटी. (क्रि॰ धरणें). [सं. श्वस्]
स्त्री (लज्जाहरण)
अब्रूचे दूध एक दिवस सांडलें, लाजिरवाणा प्रसंग आला, केसाने गळा कापला, विश्वासधात केलान, तिची सोन्याची द्वारका लुटली गेली, त्याच्या काम-मगरमिठींत पडली, माशाने हें माणिक गिळलें, तिच्या अब्रूचे भांडें फुटलें, एक दिवस ती संपूर्ण गटली गेली, कुळास लांछन आणलेन, तिनें मिळविलेल्या पुण्यराशीवर पापाची ठिणगी टाकून गेला, त्या दिवसापासून तिची पाऊलवाट बदलली, कौमार्य-भंग झाला, कुकर्म केलें गेलें, तिच्या मर्यादेचीं वस्त्रें लौकरच विरल झालीं, घराण्याला काळोखी लावली, तो तिच्या अब्रुवर उठला.
सुगळ
वि. चांगल्या मानेचा. सुग्रीव (-व.) पहा. [सु + गळा]
सुस्वर
पु. १ (गायन) उत्तम सूर, गळा. २ -वि. उत्तम गळ्याचा, सुराचा; चांगल्या आवाजांत म्हटलेलें (गाणें). [सं.]
ताड
पु. नारळी, पोकळी या जातींतील एक उंच वृक्ष; ताल वृक्ष. हा आफ्रिकेंतून इकडे आला आहे. हें झाड उष्ण व दमट प्रदे- शांत होतें. याच्या पानांपासून काढलेल्या तंतूंच्या टोपल्या, परड्या वगैरे करितात. यास पंख्याच्या आकाराचीं पानें असतात. त्यांचें पंखे करतात. याच्या पानांवर अक्षरें कोरून ग्रंथ लिहिण्याचा पूर्वीं प्रघात असे. याच्या फुलांच्या देठांतून रस गळतो त्यास ताडी म्हणतात. [सं. ताल; प्रा. ताड] सामाशब्द- ताडभर, तीन ताड उंच-वि. अतिशय उंच. ताडाचा बुंधा-पु. (ल.) धिप्पाड व धष्टपुष्ट मनुष्य; अगडबंब मनुष्य. ॰गोळा-पु. ताडाच्या फळां- तील मगज, गीर. [ताड + गोळा] ॰पत्र-न. १ ताडाचें पान. यावर अक्षरें कोरून लिहीत असत. 'तींच ताडपत्रें आणि त्याच अक्षरपंक्ति तसें महाराजांचें झालें आहे.' -कमं २.५०. २ ताड पत्राचें स्त्रियांचें एक कर्णभूषण. 'ताडाचीं ताडपत्रें, गळा ल्यायली गळसरी ।' -वसा ५५. [ताड + सं. पत्र = पान] ॰फल-न ताडवृक्षाचें फळ. ॰माड-पु. १ ताडाप्रमाणें उंच व सरळ वाढणारी नारळीच्या झाडाची एक जात. -वि (ताडाच्या झाडाप्रमाणें) फार उंच; फाजील उंच. २ फार खोल (विहीर, खड्डा, तळें इ॰). [ताड + माड] ॰माड उडणें-आवेशानें, आनंदभरानें उंच उड्या मारणें, बेहोष होणें. ॰माड सुजणें-(एखाद्यानें) अतिशय, प्रमाणातीत सुजणें. (राजा.) ताडमाडास जाणें.
ताडपत्र
न. १. ताडाचे पान. पूर्वी यांचा उपयोग लिहिण्यासाठी करीत : ‘तींच ताडपत्रें आणि त्याच अक्षरपंक्ति तसें महाराजांचे झालें आहें.’ – कमं २·५०. २. ताडपत्राचे स्त्रियांचे एक कर्णभूषण : ‘ताडाची ताडपत्रें, गळा ल्यायली गळसरी ।’ – वसा ५५. [सं.]
टाक
पु. १. निब लावलेली एक प्रकारची लेखणी; लिहिण्याचे साधन. २. (ल.) लेख. [सं. टङ्क; क. टाकु] (वा.) टाक गुंतणे – हातचा लेख देऊन वचनास बांधून घेणे. टाक मारणे – लिहिण्यास घेणे, बसणे. टाकाने (लेखणीच्या टाकाने) गळा कापणे – नुसत्या लिहिण्याने एखाद्याचा नाश करणे.
ताळॉ
पु. (गो.) गळा; आवाज.
ताळॉ
पु. गळा; आवाज. (गो.)
टांगणें
सक्रि. लोंबकळणें; लोंबविणें; लटकाविणें; अधांत्रीं ठेवणें; अडकविणें. गळा टांगणें-१ (गायन) स्वर विवक्षित अवधीपर्यंत मोठ्या श्रमानें पोंचणें. २ जीव टांगणें-अंतःकरण ओढलें जाणें. [सं. टंकण; हिं. टांगना]
टांक
टांक m A weight. The nib of a pen. A penful of ink. (Enhancing particle to कोरडा.) Utterly dried — river, 2tank, well. टांक गुतणें To be bound by some note of hand passed or writing executed. टांक मारणें To set down in writing. टांकाणें गळा कापणें To kill with the pen.
टांक ṭāṅka m (टंक S) A weight, according to some, of one तोळा or the seventy-secondth part of a पक्का शेर; according to others, of nine मासे; according to others, of four मासे. 2 The nib of a pen. 3 By melon. A penful of ink. Pr. टांका आगळें लि- हावें घांसा उणें जेवावें Write a nibful over; eat a mouthful under (or less). Hence a very small quantity of a liquor gen. 4 A metal plate with an image of a god impressed. Hence fig. An indispensable person at a feast or rite--who must be invited. 5 (Poetry.) A rupee or any silver coin. 6 (Enhancing particle to कोरडा) Utterly dried up--a river, tank, well. टांक गुंतणें g. of s. To be bound by some note of hand passed or writing executed. टांक मारणें To set down in writing. टांकानें (or लेखणीच्या टांकानें) गळा कापणें To kill with the pen.
पु. १ एक तोळ्याचें (एकबहात्तरांश पक्का शेर,) वजन. ९ माशांचें किंवा ४ माशांचें वजन. 'तुका म्हणे घालूं खंडीमध्यें टांक ।' -तुगा ३८७०. (सामा.) थोडीशी दारू. २ लेखणीचें चिरलेलें टोंक; त्या टोंकभर शाई. ३ धातूच्या पत्र्यावरील देवतेचा ठसा. यावरून (ल.) एखाद्या समारंभाला अवश्य बोलावणें केलें पाहिजे असा प्रतिष्ठित माणूस. 'जेथें चंद्रसूर्याचा टांक न पडे ।' -सिसं २.३३.४ (काव्य) एक रुपाया; कोणतेंहि चांदीचें नाणें. 'पडती बहुवस टांक ।' -ज्ञा ७.२५. ५ (ल.) लेख. 'अजूनपर्यंत एक टांक तरी ओढला आहेस !' ६ टांकी; छिनी. ७ निब लावलेली अलीकडील प्रकारची एक लेखणी; (कु.) बोरू. ८ (व.) टांच 'टाकेला कांटा रुतला.' ९ (गो.) खर्च करण्याची शक्ति. 'पांच हजार हुंडा देण्याचा मला टांक नाहीं.' १० (गो.) दगडासारखी घट्ट जमीन. ११ (व.) वाढ. १२ एका जातीचा आंबा. -स्त्री. बरोबरी; समानधर्म. 'हा आठ रुपयांचा धोतरजोड आहे. परंतु बारा रुपयाचे जोड्याची टांक टाकतो.' -वि. कोरडा ठणठणणीत (नदी, तळें इ॰). [टंक] (वाप्र.) ॰गुंतणें-हातचा लेख देऊन वचनास बांधून घेणें. ॰मारणें = लिहिण्यास घेणें, बसणें. टांकानें (लेखणीच्या टांकानें) गळा कापणें = नुसत्या लिहिण्यानें एखाद्याचा नाश करणें. म्ह॰ टांका आगळें लिहावें घांसा उणें जेवावें.
तापणे
अक्रि. १. (सूर्य, अग्नी, ज्वर इ. मुळे) पर्वत, शरीर इ. तप्त होणे. २. (ल.) (कामक्रोधादी विकारांनी) क्षुब्ध, संतप्त, उद्दीपित होणे; संतापणे; रागावणे. ३. (ल.) (दुःख, शोक वगैरेमुळे) तळमळणे; व्याकूळ, घाबरे होणे; पोळणे : ‘अनुदिनी अनुतापे तापलो रामराया ।’ – रामदास करुणाष्टक १ (नवनीत पृ. १७०). ४. (विषयवासना, तृष्णा) चेतणे; उद्दीपित, प्रक्षुब्ध होणे; विकोपास जाणे. ५. शेकणे. (व.) [सं. तप्] (वा.) गळा तापणे –काही वेळ गायन केल्याने कंठातून बराच मोठा स्वर निघू लागणे. तापल्या तव्यावर (पोळी) भाजून घेणे –एखाद्या कार्यात दुसरे कार्य सहजासहजी होण्यासारखे असल्यास अवश्य करून घेणे.
तापणें
अक्रि. १ (सूर्य, अग्नि, ज्वर इ॰ कांच्या योगानें पर्वत, शरीर इ॰ तप्त होणें. २ (ल.) (काम, क्रोध इ॰ विकारांनी) क्षुब्ध, संतप्त, उद्दीपित होणें; संतापणें; रागावणें. ३ (ल.) (दुःख, शोक इ॰ कानीं) तळमळणें; व्याकुळ, घाबरें होणें; पोळणें; 'अनुदिनि अनुतापें तापलों रामराया ।' -रामदास-करुणाष्टक १. (नवनीत पृ. १७०). 'करूं वरि कृपा हरूं व्यसन दीन हा तापला ।' -केका ९. ४ (विषयवासना, तृष्णा) चेतणें; उद्दीपित, प्र/?/ब्ध होणें; विकोपास जाणें. ५ (व.) शेकणें. [ताप] (वाप्र.) गळा तापणें-कांही वेळ गायन केल्यानें कंठांतून बराच मोठा स्वर निघावा अशी दशा होणें. तापल्या तव्यावर (पोळी) भाजून घेणें-एखाद्या कार्यांत दुसरें कार्य सहजासहजीं होण्यासारखें असल्यास अवश्य करून घेणें; वाहत्या गंगेत हात धुणें. तापल्या पाठीनें-क्रिवि. अंगांत उमेद, जोम, ताकद आहे तोंपर्यत. म्ह॰ तापल्या पाण्याला चव नसते. मैत्रीचा एकदां भंग झाला तर ती पुन्हां पूर्ववत् सुखकारक होत नाहीं.
तीर्थकुंडी, तीर्थगंडी, तीर्थभिंडी, तीर्थपात्री, तीर्थवटी, तीर्थलोटी, तीर्थोटी
स्त्री. तीर्थ ठेवण्याचे, चंबूसारखे, बारीक गळा असलेले भांडे.
तटोरी
स्त्री. १ दाणें भरलेलें, चांगलें पोसलेलें धान्याचें कणीस. २ (अशिष्ट) वसा' गळा.
तटोरी
स्त्री. १. दाणे भरलेले, चांगले पोसलेले धान्याचे कणीस. २. वसा; गळा.
तुलसीमंजरी
तुलसीमंजरी tulasīmañjarī f (S) The compound pedicle (flower-stem) of the तुलसी. Ex. कासें दिव्य पीतांबर ॥ गळा तुळसीमंजऱ्यांचे हार ॥.
उन्मळणे
उक्रि. १. उपटणे; समूळ उच्छेद करणे : ‘गळा बांधूनियां उखळासी दावें । उन्मळीं त्या भावें विमळार्जून ।’ – तुगा २०. २. भडभडून येणे; कळमळणे; मळमळणे. [सं. उन्मूलन] (वा.) उन्मळून जाणे – (संकट, दुःख इत्यादींनी) खचणे.
उन्मळणें
उक्रि. १ उपटणें; समूळ उच्छेद करणें. 'गळा बांधूनियां उखळासी दावें । उन्मळीं त्या भावें विमळार्जून ।' -तुगा २०. २ भडभडून येणें; कळमळणें; मळमळणें. [सं. उन्मू- लन]
उपाय (अयोग्य)
अघोरी उपाय, सुतासाठी मणी फोडण्याप्रमाणे, बहाल तासून खुंटी काढणे, अव्यापारेषु व्यापार, नसता फंदा, जुजबी उपाय, वरातीमागून घोडे, दाट झाले पाणी घाल पातळ झाले पीठ घाल, गवताने अग्नि झाकण्याप्रमाणे, गळा कापला खोकला मिटला, भीक नको पण कुत्रा आवर, नुसत्या मलमपट्ट्या.
उपगळा
पु. मानेजवळचा भाग. [उप + गळा]
उपगळिं(ये)
क्रिवि. मानेखालीं. ‘गोसावी पहुडल असती । उपगळिये घेऊन उठविले’ –लीच १.६. ‘गोसावी उपगळिए घेऊन उठविलीं‘ –लीच १.१६. [उप + गळा]
उपंगळीं
क्रिवि. पाठकुळीं; मानेच्या मागील बाजूस; पाठीवर. ’मग उपंगळिए घेऊन गांवातु नेलें‘ –वृद्धाचार १९. [उप + गळा]
उरगळी
वि. ज्याच्या डोळ्यावर, उरावर व गळ्यावर मण्यासारखें चिन्ह आहे असा (घोडा). हें घोड्याचें अशुभ लक्षण होय. [ऊर + गळा]
उर्ण
कातीण : ‘उर्णाचिया गळा बांधियेली घेरी.’ –मुक्ता ४. [सं.] उर्णनाभिका
वारणें
वारणें vāraṇēṃ v c (वारण) To turn back or from; to prohibit; to oppose; to ward off or avert: also to remove or put away (an evil &c.) Pr. गळा कापला खोकंला वारला; वारलें हें झाड तिमिराचें ॥. 2 To drive away (flies &c.) by waving the hand. 3 To discharge or pay off (debts). 4 To wave (around an idol, a king &c.) a feather-brush &c. Ex. चौंरें वारिति हरीवरी ॥. 5 as v i (Allusively. To be turned back, removed &c.) To die.
विमलार्जुन
पु. एक दैत्य. 'गळा बांधुनियां उखळासी दावें । उन्मळी त्या भावें विमळार्जुन ।' -तुगा २०. [सं.]
विश्वासघात
तोंडघशीं पाडलें, फंदफितुरी व घात, आयत्या वेळीं माघार, दाखवावयाचे दांत वेगळे खायचे दांत वेगळे, विश्वास पानिपतमध्ये गारद झाला ! अचानक रंग बदलला, नूर फिरला, पायांत पाय घातला, परपक्षाला मिळाला, टोपी फिरविली, पगडी फिरविली, हा साप उलटला, साक्षींत फिरला, विश्वास दाखवून घोळविलें व अखेर फशी पाडलें.
टांग मारली, मंडपांतून माघार घेतली, पडद्याआड्रून सुरुंग लावला, जेवायला बोलावून विष घातलें, भाषा मैत्रीची कृति शत्रूची, केसाने गळा कापला, आंतून फितला, शत्रूशीं संगनमत मित्रांशी द्रोह, आंतून वै-याशी सूत जमविलें; इकडे सर्वांना झुलत ठेवलें, हंसतां हंसतां दांत पाडले.
वल्मीक
नपु. १ मुंग्यांनीं केलेलें वारूळ. 'शिरला भुजां- तरीं शर वल्मीकामाजिं नागसायकसा ।'. २ वातादोषानें मान, गळा, हातपाय इ॰ ठिकाणीं उत्पन्न होणारा गांठीचा रोग. [सं.]
तार
तार tāra f ( P) A wire; a piece of catgut; a string of silk &c. 2 A filament or thread of any viscous or inspissated substance. 3 Intoxication: also dullness from watching; dimness of vision from bile &c. v चढ, ये, लाग. 4 fig. Habitual mind or bearing: also fixed attention; earnest engagedness. v लाग. 5 (Esp. in pl तारा) A low and allusive term for a hair of the pubes. Hence तारा उपटणें, तारा उपटणारा &c. in the vulgar tongue. 6 fig. Thread, train, tenor, connection (as of a discourse). v लाव, लाग, धर, सोड, सुट. 7 Long-continuing train, proceeding, or subsisting (of a work, as of ploughing, writing, singing, or of any state, as of raining, shining, blowing); a consecution or course gen. v लाव, लाग. तार ओळखणें or जाणणें g. of o. To understand the mind, leaning, inclining of. तार राखणें-संभाळणें &c. To preserve the good will of. तारेस उभा राहणें or तारेनें वागणें or चालणें g. of o. To walk in the ways of: also तारेस उभा करणें, तारेस उतरणें g. of o. To meet the pleasure or mind of. तारेस लागणें or असणें To be engrossed by the desire or contemplation of. तारा तोडणें (To snap the chords.) To roar or bellow (overbearingly). गळा तार आहे g. of s. (His &c.) throat is a musical chord. Said of a vocalist.
लांडा
वि. १ ज्याचें शेंपूट कापलें आहे किंवा नाहींसें झालें आहे असा (पशु, पक्षी, सर्प, मत्स्य इ॰); कापलेलें, तुटलेलें, आंखूड (शेंपूट). २ थोटा; अग्रहीन; आंखूड (हात, लेखणी, चाकू, इ॰). ३ डोकें, टोंक, वरचा किंवा शेवटचा भाग नसलेली (वस्तु सामान्यतः) ४ अपुरा; कमी प्रमाणाचा (लांबी, रुंदी इ॰त); भरपूर मापाचा नव्हे असा. 'हा धोतर- जोडा तुम्हास लांडा होतो. आणखी चार बोटें रुंद असता तर ठीक दिसता. ' ५ (निंदार्थी-सुंता केली असते म्हणून) मुसलमान. -कोरकि १९०. [लंड] ॰कारभार-पु. अधिकार नसतां विनाकारण मध्यस्यी आणि ढवळाढवळ करणें; नसती लुडबुड, उठाठेव (निंदार्थी उपयोग). 'आम्ही आपसांत भांडूं, एकमेकांच्या उरावर बसूं, पण शेजारचे कोणी शेकोजी आमच्या घरांत येऊन लांडे कारभार करावयास लागले कीं तें आम्हांला खपावयाचें नाहीं.' -नि. ॰कारभारी-वि. लांडा कारभार करणारा; लुडबुड्या. ॰बुच्चा-वि. योग्य अलंकार नसलेला; ओका; भुंडा (हात, गळा इ॰). 'लांडाबुच्चा हात, दादला करी भात' ॰भाई-पु. (निंदार्थी) मुसलमान. लांडा अर्थ ५ पहा. ॰भुंडा-भोंडा-वि. शेंपूट किंवा अग्र तुटलेला, नसलेला. लांडा पहा. ॰भोंडा कारभार-री-लांडाकारभार-री पहा. ॰लटका-वि. खोटा आणि लबाड; उणा; खोटा; कपटी; विश्वास ठेवण्यास अपात्र (वस्तु, व्यवहार, गोष्ट इ॰). (प्र.) लटकालांडा.
मां(मा)स
न. शरीरांतील सप्त धातूंपैकीं एक. [सं. मांस; फ्रेंजि. मस; पोर्तुजि. मास] (वाप्र.) ॰कसणें-चांगलें खाली वर करून मांस भाजणें. सामशब्द- ॰ओंटी-स्त्री. बाहेर दिसण्यांत मोठी पण दूध थोडें अशीं गाय, म्हैस यांची ओटी, कास. ॰कंड-कण-गंड-- न. (निंदार्थी) मांस; विदारलेलें, छिन्नमिन्न होऊन इकडे तिकडे पडलेलें मांस; घायांतून, जखमेंतून लोंबणारें मांस किंवा आंतड्याचा लोंबणारा भाग, नासणारें, वाईट, मुरदाड मांस. [मास + कण] ॰कण- न. (कों.) शिजवण्याकरितां केलेले मांसाचे तुकडे. ॰कार-पु. (गो.) मांस विकणारा. ॰कूट-न. (गो.) मांसाचा तुकडा. ॰कोथ- पु. मांसार्बुद; चरणारा व्रण. ॰भरू-वि. दळदार; गरभरू (फळ); चांगली भरलेली (करंजी, पुरणपोळी). ॰भक्षक-वि. मांसा- हारी. [सं.] ॰मच्छर-न. मांस वगैरे. मा(मां)सल-वि. १ मासाळ; मासानें पूर्ण असें. २ (ल.) मासभरू; पुष्ट. मासवा- पु. (व.) मांसाचा किंवा झाडाच्या सालीचा अनुक्रमें माण साच्या किंवा झाडाच्या जखमेवर वाढणारा भाग. मासव्रण-पु, मासांतील व्रण. [सं.] मांसाळ, मासाळ-ळा-वि. (प्र.) मांसल; पुष्कळ मांस असलेला. 'एकें पीनावयव मांसाळें ।' -ज्ञा ११.१३९. मांसागळा-वि. धष्टपुष्ट; मांसल. 'धष्ट पुष्ट मांसा- गळा ।' -आमुदि २.३१. मासार्बुद-पु. कर्कट रोग. -राको २६८. मांसाहारी-वि. मांसावर निर्वाह करणारा. मासु(सो) रडा-डें-पुन. (निंदार्थी) मासकंड पहा. मासोंडणें-अक्रि. (व.) अंगावर मांस वाढणें; लठ्ठ होणें. 'म्हैस मासोंडली.' मासोळ-वि. (गो.) मांसयुक्त.
उलटा
वि. विपरीत; विपर्यस्त; परिवर्तित; उपडा; पालथा; विरुद्ध दिशेचा, बाजूचा; वरची बाजू खालीं असलेला; आंतील बाजू बाहेर आलेला; मागील बाजू पुढें असलेला; उलट पहा. -क्रिवि. विरुद्ध; परत. 'म्यां त्याला रुपया दिल्हा. त्यानें माझा उपकार मानावा परंतु तो उलटा मला मारायाला पाहतो.' -मोल -पु. १ तोड; किल्ली; उत्तर (एखाद्या कोड्याचें); एखाद्या श्लोकास परत समानार्थक किंवा विरुद्ध अर्थीं प्रतिश्लोक, वचन; नक्कल; प्रतिमा २ प्रत्युत्तराबद्दल किंवा परतफेडीदाखल दिलेलें उत्तर, वस्तु वगैरे. सामाशब्द-उलटा अहेर; उलटा दगड; उलटा निकाल; उलटा हल्ला. उलट पहा. ३ विष वगैरेवरील उपाय. उतारा अर्थ ४ पहा. [उलट] ॰खप्पा-पु. (मल्लविद्या) आपल्या एका हातानें जोडीदारावर तो उभा किंवा बसलेला असतांना त्याच्या खांद्यावरून आपला हात आणून आपल्या हाताच्या पोट- रीनें जोडीदाराच्या गळ्याची घाटी दाबून ज्या हातानें जोडीदा- राच्या गळ्याची घाटी दाबतों त्या आपल्या हाताचा पंजा आपल्या दुसर्या हाताच्या कोपराच्या लवणींत घालून व आपल्या दुसर्या हाताची पोटरी जोडीदाराच्या मानेवर बसवून त्याला घुसमटून मारणें. [उलट + फा. खुफ्तन् = निजणें; खफाह = (कुस्तींत)गळा दाबणें] ॰गिरा-पु. (मल्लविद्या) आपला एक हात जोडीदाराच्या बग- लेंतून बरगडीवर ठेवून बरगडीवर ठेवलेल्या हाताच्याच बाजूचा आपला पाय जोडीदाराच्या पायाच्या ढोणशिरेवर दाबून ठेवावा व आपल्या दुसर्या हातानें जोडीदाराच्या दुसर्या पायाच्या गुड- घ्याच्या लवणींत धरून पाय वर उचलावा म्हणजे जोडीदार चीत होतो. [उलटा + हिं. गिराना = पाडणें] ॰पट-पु. (मल्लविद्या) जोडी- दारानें आपल्यास उभ्यानें खालीं धरलें असल्यास आपल्या आंतील हातानें आपल्या पुढील जोडीदाराच्या पायांतून गुडघ्याच्या लव- णींत बाहेरून हात घालून व आपला आंतील पाय जोडीदाराच्या दुसर्या पायाच्या गुडघ्याच्या लवणींत बाहेरून घालून आपला गुडघा जोडीदाराच्या गुडघ्याच्या लवणींत टेकून गुडघ्यानें त्याच्या पायाच्या लवणींत जोरानें धक्का देऊन व हातानें जोडीदाराचा पाय वर उचलून त्यास चीत करणें. [उलटा + सं. पत्; हिं. पटकना = पाडणें] ॰पहारा-पु. विपरीत काळ; फिरलेला काळ. 'कलीयु- गाचा उलटा पहारा जाहल्या या चाली ।' -गापो १०२. [उलट + सं. प्रहर, म. पहारा] ॰पालट-स्त्री. १ विपरीत रचना; उलथापालथ; उलटसुलट करणें; अव्यवस्था. २ (ल.) परस्पर प्रश्नोत्तरें उत्तरप्रत्यु- त्तर. [उलटा द्वि]. ३ दुनियेची उलटापालट = जगांतील, संसारांतील घडामोड; मोठा खटाटोप; धाडस; (व्यापारांत) रुपयांची, पैशांची उलाढाल; पैशांची मोड; चलनी अदलाबदल. -क्रिवि. अव्यवस्थित रीतीनें. [तुल॰ सं. उपर्यस्त + पर्यस्त; प्रा. उवल्लत्थ-ठ्ठ + पल्लत्थ-ठ्ठ] ॰पालटा-सुलटा-वि. वरची बाजू खालीं व खालची बाजू वर असा; आंतील बाजू बाहेर व बाहेरील बाजू आंत असा; मागील बाजू पुढें व पुढील बाजू मागें असा; विरुद्ध मार्गाचा किंवा दिशेचा; अस्वाभाविक; उलट्या क्रमाचा; व्युत्क्रम; वेडावांकडा; विलोमअनुलोम. ॰सुलटा उभा राहणें-क्रि. विरुद्ध दिशेस तोंड करून उभें राहणें. ॰सुलटा पहारा-पु. दोन पहारेकरी विरुद्ध दिशांस तोंडें करून उभे राहून करीत असलेला पहारा.
फुटणें
अक्रि. १मोडणें; तुटणें; तुकडे पडणें; तडा जाणें; उकलणें; तडकणें; चीर पडणें; भंग पावणें; एकदम दुभंग होणें (सरळ व व्यापक अर्थी ). २ अंकुर येणें; कोंब, मोड येणें; रुजणें. ३ (दांत) हिरड्यांच्या बाहेर येणें.४ (दही, दूध इ॰) चोथा पाणी होणें; धनांश व द्रवांश वेगळें होणें. ५फुटका असणें (कागद, शाई, अक्षर, लेख); शाई पसरणें; ओल्या कागदानें, शाई शोषणें, फैलावणें; अक्षर व लेख मोठें, अस्पष्ट उतरणें. फुटका पहा. ६ (रस्ता इ॰ चे) फाटे, शाखा होणें; विभागला जाणें. ७ फूट (संधि- वात) विकारानें आजारी पडणें, मोडून येणें, ठणकणें (अंग-ताप येण्याच्या वेळीं). ८ घमघमणें; दरवळणें (वास). ९ (गुप्त गोष्ट) प्रसिद्ध, जाहीर होणें. १० फुट पडणें; विस्कळित होणें; पांगणें (सैन्य, संस्था इ ॰). ११ भांडण होऊन वेगळें होणें; बिघाड उत्पन्न होणें. १२ (खांडूक, गळूं इ॰) तोंड पडून वाहूं लागणें. १३ बाहेर पडणें; उगवणें; दिसूं लागणें (कांजण्या, पुळ्या इ॰) उगवणें; उद्भवणें; बाहेर येणें. 'रात्री माजी रक्षिले नगर । तंव पूर्वेस फुटले रविकर ।' -कथा २.२.६१. 'स्त्रीला फुटलें नाहीं रडे । -विक २९. १४ (आवाज, गळा इ॰) घोगरा होणें; चिरकणें; बदलणें; 'कंठ फुटला' (ल.) बोलता येऊं लागणें; वाचाळता उत्पन्न होणें. १५ (हात, पाय ओठ इ॰) तडकणें; भेगा पडणें. १६ (नारळ, फणस, पोकळ इ॰) जाणें पूर्ण वाढ होऊन फळें दिसुं लागणें. १७ (डोळें, कान इ॰) जाणें; आपापलें काम करण्यास असमर्थ होणें. १८ (मन, विचार इ॰) फांकणें; फांटे फुटणें; एकावधान न राहणें. १९ मर्यादा सोडून बाहेर येणें; अमर्याद होणें; शरधी जलधी फुटले कीं दैवें पाश एकदा तुटले ।' -मोभीष्म ३.५९. २० बाहेर निघणें; वेगळें होणें; अलग होणें. 'मासा जळावेगळा फुटे । तें दुःख वाटे रायासी ।' -भारा बाल ८.३५.२१ सरणें; सरकणें. फुटे न पद कंचुकी भिजलि अंग रोमांचिलें ।' -रसकल्लोल अकक पृ. २.१६७. [सं. स्फुट; प्रा. फुट; सं.स्फुटन; प्रा. फुट्टण; हिं. फूटना ]दिशा- फुटणें-उजेडणें.
बसणें
बसणें basaṇēṃ v i (वसन S) To sit; to rest upon the buttocks, the knees, or the hams and heels. 2 To sit down; to perch; to roost; to rest as a beast or a bird. 3 To be without employment, occupation, or specific business: also to sit idling or dawdling. 4 To stand upon a pedestal. 5 To lie upon, lit. fig., and with amplitude of application. Ex. अंगा- वर धुळ बसली; अम्मल प्रजांवर बसला; पेटीस पट्टी बसली; रंग बसला; मुलाम्मा-कल्हई-खळ-मळ-बसला. 6 To rest as a weight or burden, esp. in figurative senses. 7 To settle, subside, sink to the bottom: also to sink, abate, go down;--as the water of a river or well. 8 To become blunt--an edge. 9 To settle in any course or state; to set in;--as rain, heat, fever. 10 To sink, retire, lose height or prominence. 11 To become expert or capable by use or practice; to get in--the hand or other member, a faculty, or the understanding. 12 To come upon, arise unto, fall on, in figurative senses; as मार बसला; खर्च बसला; तोटा बसला. 13 To fit; to be accommodated or adapted unto; to sit, suit, apply, answer, agree, tally--joints, junctures, devices, contrivances, calculations. 14 To fall; to be ruined--a trader or his business. 15 To become hoarse, or low and inaudible--the voice or कंठ, गळा, घसा, आवाज. 16 To be established or set up--a rule or sway. 17 To acquire fullness and strength--a crop: also to settle down as irrecoverably gone. बसूं जाणे त्याला उठ कोण म्हणे (Him who knows where and how to sit who will bid to rise?) Who will stop or scold him who is doing a thing rightly?
अक्रि. १ बैठक मारणें. २ ढुंगण, गुडघा, घोटा इ॰ च्यावर टेंकणें. ३ खालीं बूड टेंकणें; उपवीष्ट होणें; बसक घेणें; पंख आकुंचित करून राहणें; विश्रांतीसाठीं खाली टेंकणें (पशु, पक्षी यानीं). ४ उद्योगधंदा, काम वगैरेशिवाय असणें; रिकामटेकडा, निरुद्योगी असणें. ५ फुकट वेळ घालविणें. ६ खुर्ची इ॰ बैठकीवर अधिष्ठित होणें. ७ (शब्दशः व ल॰) वर पडणें, असणें. 'अंगावर धूळ बसली.' ८ (विशेषतः ल॰) एखाद्यास भारभूत होणें; एखाद्यावर अवलंबून असणें. ९ तळीं जाणें; स्थिरावणें. १० खालावणें; कमी होणें (नदीचें, विहिरीचें पाणी). ११ बोथट होणें (शस्त्राची धार). १२ स्थिरावणें (एखाद्या मार्गांत, स्थितींत); (ल॰) रमणें. 'तदुपरि मग तीचें चित्त कोठें बसेना ।' -सारुह ३.५९. १३ स्थिरा- वणें (पाऊस, उष्णता, ताप) १४ र्हास, अपकर्ष होणें; खाला- वणें; काढतें घेणें; श्रेष्ठता गमाविणें; वैभव कमी होणें. १५ संव- यीनें निष्णात किंवा तरबेज होणें; अंतःप्रवेश होणें (हाताचा, दुसर्या अवयवाचा, बुद्धीचा, ज्ञानाचा); चांगलें समजणें. 'हें गाणें माझें बसलें.' १६ (ल.) अंगावर येणें; पडणें. 'मार-खर्च-तोटा-बसला.' १७ योग्य होणें; विवक्षितपणें जुळणें; मिळणें; पटणें; जडणें; बरोबर होणें; लागू पडणें (सांधेजोड, युक्ति, हिक- मत, हिशेब). १८ खचणें; बुडणें; बिन किफायतीचा होणें; नसणें; तोटा येणें (व्यापार, धंदा यांत). १९ धोगरा, बदसूर,खोल व अस्पष्ट होणें; बिघडणें (कंठ, गळा, घसा, आवाज). २० स्थापित होणें (अम्मल, सत्ता). २१ जोम, जोर मिळविणें (पिकानें). २२ पार जाणें; समूळ नाहीसें होणें. २३ दबणें; कमी होणें; चेपणें (गळूं). २४ आरंभ करणें. २५ प्रमाण ठरणें. २६ प्रहार लागू पडणें; फटकारा लागणें (चाबूक इ॰ चा). [सं. उपविश्; प्रा. उवइस, बइस; फ्रें जि. बेश; आर्मेजि. वेस] म्ह॰ बसूं जाणें त्याला ऊठ कोण म्हणे = ज्याला कोठें व कसें बसावें हें कळतें त्याला 'ऊठ' म्हणून कोण म्हणेल ? बसतां लाथ उठतां बुक्की, उठतां लाथ बसतां बुक्की-सर्वदा मार. बसले(ल्या) घडीचा-वि. पुष्कळ दिवस एकसारखा घडी घालून ठेवलेला व त्यामुळें कोरे- पणा व झकपकपणा गेलेला कोरा (कपडा). याचे उलट ताण्याचा = कोराकरकरीत. [बसणें + घडी] बसले राहून-क्रिवि. बसून. 'महाराज खिडकींत नेहमीं बसले राहून दिवस मोजीत.' -विक्षिप्त १.१३१. बसल्या महिना-वि. चाकरी न करितां दरमहाचा दर- महा मिळणारा(पगार). वसांत आणणें-सक्रि. स्वतःच्या ताब्यांत आणणें. 'दहाजणी मी बसांत आणिल्या प्रेमाचें पाजुन पाणी ।' -पला १४. बसून आंतील टांग (मारणें)-स्त्री. (मल्लविद्या) जोडीदारानें आपल्यास खालीं धरल्यास आपल्या एका हातानें जोडीदाराच्या कोपरावरून हात घालून त्याचा हात घट्ट धरून ज्या हातानें आपण जोडीदाराचा हात धरला असेल त्याच बाजूच्या आपल्या पायानें जोडीदारास वर ढकलून व त्याच्या हातास आपल्याकडे ओढून झटका देऊन त्यास चीत्त करणें. बसून बाहेरील टांग(मारणें)-स्त्री. (मल्लविद्या) जोडीदारानें आपल्यास खालीं धरल्यास जोडीदाराच्या कोंपरावरून आपला हात घालून त्या हातानें त्याचा हात घट्ट धरून त्याच बाजूच्या आपल्या पायानें जोडीदाराच्या पिंडरीस बाहेरून आपला पाय टेकून त्याच्या धरलेल्या हातास एकदम आंत झटका देऊन त्यास चीत करणें. (टांग = गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचा पायाचा भाग). बसणें-न बसण्यासाठीं पसरलेली, ठेवलेली कोणतीहि वस्तु; बैठक. बसता-वि. बसण्याच्या उपयोगी (घोडा, बैल इ॰).
ह(हं)सणें
उक्रि. १ हास्य, स्मित करणें. २ (ल.) एखा- द्यास नावे ठेवणें, खोड्या काढणें, उपहास करणें. ३ (ल.) फुटणें; उलणें (करंजी, गुरवळी लाडू इ॰). [सं. हसन] (खाप रानें) हसणें-(चुलीवर ठेवलेल्या) वर जमलेल्या मशीनें पेट घेणें. हसता नाहीं पोसता नाहीं-अत्यंत पोरका, गरीब, सुखदुःख देणारा कोणी आप्तेष्ट नसलेला हसायला आहेत पोसायला नाहीं-फक्त थट्टा, फजीति करणारे लोक असतात, पोटाल कोणी घालीत नाहींत. हसत हसत-हसतां हसतां दांत पाडणें-न रागावतां, चरफडतां एखाद्याची फजीती, पराभव. नाश करणें. हसत्या बरोबर हसणें, रडत्य़ा बरोबर रडणें-वारा येईल तशी पाठ देणें. हसून गोड (साजरें) करणें-१ दुसर्याचा राग, निषाद, शेवटीं गोडगोड शब्द बोलून घालविणें. २ गोड बोलून फसविणें. हंसतील त्यांचें दांत दिसतील-लोकांनीं नांवें ठेवल्यास त्याची पर्वा न करणें. आपण हंसे लोकांना शेंबूड आपल्या नाकाला-दुसर्याला ज्या दोषाबद्द हंसावयाचें तोच दुर्गुण आपणापाशीं असणें हंसतगौरी-पार्वती-लक्ष्मी-स्त्री. हसत- मुख, आनंदी स्त्री. ॰चहाड-वि. हंसत हंसत चहाड्या करणारा. ॰मुख-न. आनंदी, हंसरा चेहरा. -वि. उल्लसित, आनंदी वृत्तीचा. ॰शिंदळ-वि. १ नखरेबाज, चटकचांदणी (परंतु प्रत्यक्ष व्यभिचारी नाहीं अशी स्त्री). २ मोठमोठ्यानें हंस- ण्याची खोड असलेला (पुरुष). ३ हंसवून फसविणारा, भ्रष्ट विणारा, भुरळ घालणारा; गोड बोलून केसानें गळा कापणारा. हंसता-वि. १ हंसणारा. २ (ल.) हौशी; रंगेल; आनंदी; खेळकर. म्ह॰'हसती बायको रडता पुरुष कामाची नाहींत.' हसती-स्त्री हास्यविनोद. हसती(स्ती)दंती भेट ओळख- स्त्री. न बोलतांना नुसतें परस्परांकडे पाहून हंसून झालेली भेट; केवळ परस्पर स्मित करण्याइतकी ओळख. ह(हं)सरा-वि. १ नेहमीं किंवा पुष्कळ हंसणारा. २ खेळकर. आनंदी (मूल इ॰). हंसाबाजी-स्त्री १ हास्यविनोद; थट्टा. २ मस्करी; टिंगल; उपहास. [हिं] हसित-न. (न्याय) मुख, नेत्र व गाल हे ज्यामध्यें किंचित विकसित होऊन कांहीसे दांतहि दिसतील असें हंसणें. हसिताचे प्रकारः-अतिहसित, अपहसित, उपहसित, विहसित, स्मित. -मराठी रंगभूमी ३३२. हसूं-सं हंसू-सें- न. १ हंसणें. हास्य. २ विटंबना, उपहास; फजिती. 'चौघां- मध्यें माझें हंसें झालें.' ३ हसण्याचा विषय, हास्यास्पद वस्तु.
दाय
पु. वारसांना वांटून द्यावयाची मिळकत, जिंदगी; पितृ- धन; (एखाद्या) वारसाचा हिस्सा, वांटा. याचे हिंदुधर्मशास्त्रा- नुसार अप्रतिबंध व सप्रतिबंध (दाय) असे दोन प्रकार आहेत. 'प्रभु दीनबंधु, भूसुर हा दीन, न होय पात्र कां दाया ।' -मोकृष्ण ८.१६१. -मोउद्योग ६.५. [सं.] सामाशब्द- दायजी, दायाद-विपु. १ वारस; पितृधनांत हिश्शाचा हक्कदार; वांटेकरी २ (यावरून ल.) अशौचादि अधिकार बाळगणारा जवळचा नातलग; भाऊबंद. 'रेघ धरून झाल्यावर दायजी, मित्र, सोयरे वगैरे मंडळी वराला विड्याच्या पानांतून मुठींत कांहींतरी..नजराणा देतात.' -मसाप ४.४.२५४. [सं. दायाद; म. दाईज्] दायदु-पु दायाद. 'नव्हे आमुचा दायदु । जरि भणे तुम्हा मीचि बंधु ।' -ॠ ४३. [दायादु] ॰प्राप्त-वि. पित्रांदिकांचा, दायाच्या वाटणींत मिळालेला, आलेला (दास). दासांतील एक प्रकार; ॰भाग-पु. १ मृत माणसाच्या जिंदगीची वारसदारांत वांटणी, विभागणी. २ वडिलोपार्जित मिळकतींतील हिस्सा. ३ दायतत्त्व व दायकम (वारसाहक्क) या संबंधीं जीमूतवाहन यानें लिहिलेला व बंगाल्यांत हिंदु कायद्यांत प्रमाण असलेला ग्रंथ. ॰विभाग-पु. दायभाग अर्थ १, २ पहा. दायाद-पु. १ वारसदार; वडिलो- पार्जित मिळकतीचा दाईज. २ (ल.) पुत्र; मुलगा. 'कृपाचि जननीं तुझी सकल जीव दायाद या ।' -केका ९७. 'त्यावरि देवनदीनें दायादाचे गुणौघ आठविले ।' -मोभीष्म ११.१२६. ३ भाऊ- बंद; जिंदगीचा वाटेकरी. 'कीं खळ दायाद गळा कापी ।' दायाधिकारी-पु. समाईक कुटुंबाच्या मिळकतींत हिस्सा विभागून मागण्याचा अधिकार असलेला पुरुष. [दाय + अधि- कारी]
तीर्थ
न. १ पवित्र स्थळ; कोणतीहि यात्रेची जागा; पवित्र मानलेल्या नद्यांच्या किनार्यावरील पुण्य क्षेत्र. २ पवित्र नदी. ३ पवित्र नदीचें पाणी; ब्राह्मण किंवा संन्यासी यांचें चरणोदक; देव- मूर्तीला स्नान घातलेलें उदक; पवित्र जल; स्नानोदक, पादोदक इ॰. ४ पवित्र क्षेत्राची यात्रा. (क्रि॰ करणें; घडणें). ५ (गौरवार्थी) गुरु; धार्मिक अध्यापक; वडील, पूज्य व्यक्ति. 'तीर्थपाद.' ६ पवित्र प्रदेश, स्थळ. देवतार्थ; ऋषितीर्थ आणि पितृतीर्थ असे या तीर्थ- स्थळांचे तीन प्रकार आहेत. बोटांचा अग्रभाग, तळहाताचा बाहेरील (करंगळीकडचा) भाग व आंतील (अंगठ्याकडचा) भाग हीं अनुक्रमें त्यांचीं स्थानें होत. देव, ॠषि व पितर यांना त्या त्या स्थानांपासून श्राद्धसमयीं व तर्पण करतांना उदक देतात. तळहाताच्या मध्यभागीं एक चवथें अग्नितीर्थ कल्पिलें आहे. मनुष्य धार्मिक विधींत यांतूनच आचमन करतो, ब्राह्मणाला दिलेलें दान अग्नीनें भक्षण करूं नये किंवा दानाग्नीनें ब्राह्मणाचा हात दग्ध होऊं नये म्हणून त्याच्या हातावर याच ठिकाणीं पाणी सोडतात. [सं.] (वाप्र.) ॰करणें-१ गंगादि तीर्थास जाऊन स्नानादि यात्राविधि करणें. २ तीर्थाला भेट देणें. म्ह॰ १ तीर्थी गेल्यावांचून मुंडण होत नाहीं = बर्या बोलानें कोणी ऐकत नाहीं. सोनारानें कान टोंचल्याशिवाय समज पटत नाहीं. २ वाहिली ती गंगा, राहिलें तें तीर्थ = कांहींहि केलें तरी. कोणत्याहि बाजूनें फायदाच. सामाशब्द- ॰काक-पु. (तीर्थाच्या ठिकाणीं अस- लेला कावळा). (ल.) लूट करण्याकरितां, डल्ला मारण्याकरितां सर्वदां टपून बसलेला माणूस; उचल्या; गिधाड; छकवणारा. ॰कुंडी- गं(गिं)डी-पात्री-स्त्री. तीर्थ ठेवण्याचें चंबूसारखें बारीक गळा असलेलें भांडें; तीर्थाचें भांडें. 'हें जाणोनि मानसी । तीर्थागंडी देई कांतेसी । गंगा प्रोक्षून तिघांसी । भोजन देई जाणपां ।' -दत्तपदें १४७. ॰पंक्ति, तीर्थावलि-स्त्री. १ पुण्यक्षेत्रांचा क्रम. २ त्या क्षेत्रांची यादी (पूजादि प्रसंगीं म्हणावयाची आयोध्या, मथुरा, माया इ॰). ॰पंथ-पु १ (गोसावी लोकांतील तीर्थ हें पद नांवाच्या शेवटीं धारण करणारा) एक पंथ, भेद. २ तीर्थक्षेत्राचा मार्ग, वाट. 'प्रभातकाळीं उठुनि कापडी तीर्थपंथ लक्षी ।' -होला (भूपाळी १६.) ॰पाद-पु. मोक्षदाता गुरु; गायत्रीचा उपदेश करणारा गुरु; गुरुपदेश देणारा (पिता). ॰प्रसाद-पु. १ कथा- श्रवण, देवदर्शन यांसाठीं आलेल्यास द्यावयाचें देवावरील निर्माल्य, तीर्थ, अंगारा, खिरापत इ॰ 'आमच्याकडे आज सत्यनारायण आहे, तर आपण तीर्थप्रसादास या.' २ साधुसंतांनीं भक्तगणास, शिष्यांस अनुग्रहार्थ दिलेलें फळ, तीर्थ, अंगारा इ॰ पदार्थ. ॰यात्रा-स्त्री पुण्यक्षेत्रीं जाणें; तीर्थाच्या ठिकाणीं जाणें; तीर्थाटण; क्षेत्रस्थानचा प्रवास. ॰राजपु. १ प्रयाग क्षेत्र. 'तो तीर्थराज प्रगटे जग उद्धराया ।' -सारुह ८.१४६. २ समुद्र. ३ (ल.) सद्गुरु ॰रूप-वि. १ (प्रत्यक्ष तीर्थच या अर्थीं पत्र लिहितांना आरंभीं लिहितात) पिता. २ मातापिता (उभयता); ३ माता पित्यांच्या ठिकाणीं असणार्यास लावावयाची संज्ञा, मायना. ॰वटी-लोटी, तीर्थोटी-स्त्री. तीर्थ ठेवण्याचें भांडें, वाटी. तीर्थ- पात्र [तिर्थ + वाटी] ॰वासी-सू-पु. १ तीर्थाच्या ठिकाणीं राहणारा गोसावी किंवा साधु. २ तीर्थयात्रा करीत फिरणारा गोसावी; बैरागी. ॰विधि-पु. तीर्थश्राद्ध; तीर्थाचे ठिकाणीं करावयाचे क्षौर, श्वाद्ध, तीर्थपूजन, ब्राह्मसंतर्पण इ॰ विधि, धार्मिक प्रकार. ॰श्राद्ध-न. तीर्थाच्या ठिकाणीं करावयाचें सक्षौर श्राद्ध; तीर्थ- विधि. ॰स्वरूप-वि. पत्रांत आई, बाप यांशिवाय इतर वडील नातेवाईकांस किंवा पूज्य वाटणार्या माणसांस लिहिण्यांत येणारी आदराची संज्ञा, मायना. तीर्थाटन-न. अनेक तीर्थयात्रा करीत फिरणें. तीर्थयात्रा पहा. ॰तीर्थोदकन. तीर्थ अर्थ २ ३ पहा. तीर्थोपवास-पु. यात्रेकरूनें तीर्थाच्या ठिकाणीं गेल्यावर प्रथम दिवशीं करावयाचा उपास. तीर्थोपाध्याय-पाध्या-पु. क्षेत्राच्या ठिकाणीं असणारा ठराविक उपाध्याय; धार्मिक विधि सांगणारा तीर्थक्षेत्रींचा ब्राह्मण; पंड्या.
कलम
न. १ लेखांतील विशेष मुद्यांबद्दल किंवा गोष्टींबद्दल लिहिलेला तेवढाच भाग; स्वतंत्र सदर, बाब, मुद्दा; परिच्छेद. 'पुस्तकगृह हें एक सुधारणुकीचें मोठें कलम आहे ...' -नि १५. 'एकट्यावरूनच ... काव्यरचनेस नाक मुरडणें हें अली- कडील रसिकांचे पहिलें कलम ठरून गेलें आहे.' -नि १४१. २ एका झाडाची फांदी-डहाळी दुसर्या झाडाच्या फांदीवर लावून कांहीं कृतिविशेषानें त्या दोहोंचाहि एकजीव करणें; कल- माचे प्रकार:- १ जिभलीचें कलम - दोन फांद्यांचे नुसते लेखणी- सारखे तास घेऊन त्या एकमेकीस जोडणें. २ पाचरीचें कलम- एका फांदीला खांचा पाडून त्यांत दुसर्या फांदीचा तुकडा पाचरी- प्रमाणें मारणें, बसविणें. ३ दाबाचें कमल-फांदीला चीर घेऊन फट पाडून ती मातींत पुरतात, थोड्या दिवसांनीं तिला मुळ्या फुटल्या म्हणजे ही मुळ्यांची फांदी कापून निराळी लावतात. ४ खुंटीचें कलम-एक जाड बुंध्याचें सबंध झाड कापून टाकून त्या कापलेल्या भागांत आंतील गाभा व साल यांत फट पाडून त्यांत दुसर्या झाडाच्या फांदीचा जाड तुकडा खुंटीप्रमाणें बसविणें. ५ गुरीचें कलम-डोळे भरण्याचें. ६ भेटकलम-दोन झाडांच्या साली काढून आंगें एकत्र जोडून बांधून एकजीव होईल असें करणें. ३ वरील कलम करण्याची कृति. ४ चितार्याची कुंचली किंवा पेन्सिल. 'रजपूत कलम, कांगडी कलम, महाराष्ट्रीय कलम, मोंगली कलम इ॰' -चित्रकला संप्रदाय. 'इतकें नाजूक कलम, कोणत्या चितार्याजवळ असेल ?' -इंप ४४. ५ बोरूची लेखणी. 'हातीं कलम घेऊन पडला' -ऐपो ३९१. ६ कापा- काप; तोडतोड (हात, पाय वगैरेची); झाडांची खच्ची किंवा छाटाछाटी. 'हे ज्योतिषी व त्यांचे पुरस्कर्ते यांचे आमच्या कर्मठ राजाचें कारकीर्दींत खचित हात कलम केले असतें.' -विवि (क्रि॰ करणें) 'द्राक्षाच्या दुसर्या छाटणीच्या वेळेस फांदी जितकी जून असते तितकी ठेवून बाकीची छाटतात यास कलम म्हणतात.' -शेतकरी २.११. ७ रकाना. ८ कायद्याच्या पुस्तकांतील प्रत्येक नियम; कानू; परिच्छेद; 'पिनल कोड कलम ४३५ प्रमाणें अपक्रियेचा अपराध वामनरावाचे माथीं बसला.' -विक्षिप्त १.४३. ९ (कु.) (सोनारी धंदा) पच्ची करण्याचें एक हत्यार. १० दुकानदारांचा परस्पर उधार देवघेवीच्या हिशेबां- तील मुदत. ही १ महिना १० दिवस किंवा १।। महिना असतें. त्यानंतर उधार रकमेवर व्याज आकारतात. त्यास मुदत संपल्या- नंतर कलम पिकलें असें म्हणतात. ११ (ल.) पत्र 'चाललें कलम फौजेचें । राऊत पायदळाचे ।' -ऐपो २३०. [अर. कल्म = बोरू, लेखणी] ॰कसाई-पु. १ हिशेबनीस; हिशेब तपासनीस; पगाराचा बटवडा करणें वगैरे कामाचा कारकून; खर्चांत छाटाछाट करून लोकांचें (लेखणीनें) नुकसान करणारा इसम. २ जो आपल्या लेख- णीनें (लेखानें) लोकांना बुडवितो तो. ३ कारकुनी डावपेंचांत दुसर्याचा गळा गोत्यांत अडकविणारा. ॰कुचराई-स्त्री. लुच्चे- गिरीनें हिशेबांत एखादी बाब गोवणें, गाळणें; गबाळेपणानें किंवा घाईनें लेखामध्यें अक्षरें खाणें-गाळणें. [कलम + कुचराई] ॰जारी- १ पत्रें लिहून सैन्याची केलेली जमवाजमव; नांवनिशी. (क्रि॰ करणें; चालणें). 'कलम ज्यारीचे घटाव मचले ।' -ऐपो २१४. २ विज्ञप्ति; पत्रलेखन. 'ते कलमजारी करून फौज ठेवूं लागले.' -मराचिथोशा ९. [फा.] ॰तराश-स-पु. हुषार; चलाख; लेखणीबहाद्दर. [फा. तराश = चाकू] ॰दान-दानी-नस्त्री. १ लेखणी व दौत ठेवण्याचें लांकडी घर, ठोकळा, खोबळा; लांबट पेटी. [फा. कल्म दान्] २ ज्या दिवाणखान्याची मधली तख्तपोशी तबकासारखी सपाट असून दोन्ही बाजूंची (डाव्या व उजव्या हाताकडील) तख्तपोशी छपराप्रमाणें उतरती असते असा दिवाणखाना. ३ फटाक्यांची एक जात; प्रकार. 'कलम- दानी एका पेटींत ५०० पुडे असतात.' -मुंव्या ११८. ४ (इमारत) हवा आंत खेळण्यासाठीं भिंतींत केलेली खिडकीवजा योजना. ५ दरवाज्याच्या झडपेमध्यें फळीची चौकट करून आंत नक्षीदार अगर एखादी आकृति काढून पातळ फळी भरून तयार करतात तें. ॰बंद-वि. पत्रीं नमूद; लेखनिविष्ट; लिखित. 'तेच मजकूर येक जरा तफावत न करितां कलमबंद केले.' -रा १. ४४. [फा.] ॰बंद करणें-क्रि. लिहून घेणें; टिपून ठेवणें; टाक गुंतविणें. ॰बंदी-वि. १ अनेक प्रकारचीं अनेक कलमें निर्णयपूर्वक ज्यांत बांधून दिलीं आहेत तो लेख; निरनिराळीं खातीं, सदरें व बाबी निरनिराळ्या कलमाखालीं लिहिलेली याद (यांत हुकुमाची, कबुलायतीच्या किंवा कराराच्या कलमांची नोंद असते); विषयवार नोंदणी; सर्व तपशिलांच्या बाबींची एका- खालीं एक क्रमानें केलेली नोंद. २ कलमजारी पहा. ॰बहाद्दर- वि. लेखणीशूर; हुषार लेखक; तरबेज कारकून. ॰बाज-वि. १ कलम चालविणारा; फरडा. २ सर्व कलमें अथवा बाबी, नियम यांत निष्णात. 'कायद्याच्या कलमबाज शब्दार्थानें ...' -अभ्युदय ता. ३०.११.२८. ॰वार-क्रिवि. ज्यांत एकामागून एक सर्व अटी, बाबी लिहिल्या किंवा सांगितल्या आहेत अशा तर्हेनें; बाबीमागून बाब याप्रमाणें सूक्ष्मपणें व विशेषपणें; तपशील- वार; विषयवार. ॰सफाई-स्त्री. वळणदार लिहिणें; सुंदर अक्षर; कारकुनी हात. [फा.] ॰सूत्रा-वि. लेखनकुशल; लेखननिपुण. [अर. कलम + सं. सूत्र]
जग
न. १ स्थावरजंगमरूप अखिल सृष्टि; विश्व; पृथ्वी; दुनिया. २ ब्रह्मांड; माणसांचें वसतिस्थान; मनुष्यजात; लोक. [सं. जगत्] (वाप्र.) जगांतून उठणें- १ लोकाचाराविरुद्ध वागणें. २ (वैधव्यामुळें, आपत्तीमुळें) सर्वस्वी बुडणें. जगाबाहेरील- निराळी चाल-लोकविलक्षण चाल. जगामुलखानें सोड- लेला-जातीवेगळा टाकलेला; सार्या गांवाची ओवाळणी; सार्या दुनियेची खरवड. म्ह॰ आपण भला तर जग भलें आपण मेला जग बुडालें. सामाशब्द-॰गोळ-पु. (काव्य) पृथ्वीरूपी गोल. 'जैसा महाप्रलयीं जगगोळ । जाहाला उदकाभ्रें ब्रह्मगोळ ।' ॰चालक-वि. (काव्य) जगाचें भरणपोषण करणारा (ईश्वर). जगच्छेट-जगत्छेट पहा. जगजाहीर-वि. सर्व लोकांना माहित असलेला; प्रसिद्ध असलेला. ॰जीवन-न. जगज्जीवत पहा. ॰जुग-न. (महानु.) मोठी आपत्ति, जगावर आकाश कोसळणें. 'औचीतें जगजुग पडिले सनकादिकावरी । ॰जूट-पु. सुव्यवस्था. ॰जेठी-पु. (काव्य) १ जगामधील मोठा (ईश्वर). २ जगांतील बलवान पुरुष, मल्ल. 'आम्ही जगजेठी असतां ।' -एरुस्व ६.३५. -ज्जनक-पु. जग उत्पन्न करणारा. जगत्कारण पहा. -ज्जीवन-न. १ जगाचें जीवन; जीव सृष्टीचें जगण्याचें साधन (पाऊसपाणी, अन्न इ॰). २ सजीव प्राण्यांचें अस्तित्व -वि जगाचें धारण-पोषण करणारा (ईश्वर). ॰झंपू-वि. (महानु) जगाला झोडणारा. 'उधटेआं देवां जगझंपु ।' -शिशु १५४. ॰झोडी-स्त्री. बटीक; दासी. 'लाज धरीं भांडे । जगझोडी रांडे ।' -तुगा. २६०. ॰डंबर-न. १ अवडंबर; अवाढव्य पण निरर्थक थाटमाट, धामधूम, आव (विद्या, पैसा यांचा). (क्रि॰ घालणें). २ अफाट जगास आश्चर्यानें म्हणतात; विश्वविस्तार; एखादी अवाढव्य, विस्तीर्ण वस्तु. 'तो हा जगडंबरु ।' -ज्ञा. १५.४७. [सं. जगत् + अंबर] -ड्वाळ-ड्व्याळ-वि. प्रचंड; अवाढव्य (इमारत, शरीर, अरण्य); प्रमाणरहित, बोजड (पदार्थ). [सं. जगत् + व्याल] ॰ढाल-ढाळ-पु. ध्वज; झेंडा. [सं. जगत् + ढाल] जगत्-न. जग अर्थ १, २, पहा. जगती-स्त्री. १ जग अर्थ १, २ पहा. 'किं पळता सरली अवघी जगती ।' २ (महानु.) मठ. 'पूर्वाभिमुखजगती असे ।' -ऋ १०६. जगती- तल-न. पृथ्वीतल; पृथ्वीचा पृष्ठभाग. जगत्कर्ता-पु. ब्रह्मदेवाचें एक नांव. जगज्जनक पाहा. -त्कारण-न. जगाला उत्पन्न करणारी शक्ति; हा शब्द निरनिराळे पंथ, ईश्वर, माया, प्रधान, पर- माणु, या निरनिराळ्या शब्दांना लावतात. जगतत्रय-न. स्वर्ग, मृत्यु, पाताळ. जगत्पति-प्रभु-पु. जगाचा धनी, नियंता, ईश्वर किंवा राजा. जगत्पालक-पाळक-वि. जगाचें पालन करणारा. जगत्प्रसिद्ध-वि. जगजाहीर पहा. जगत्प्राण-पु. हवा; वायु. जगद्वंधु-पु. विश्वबंधु; सर्व सृष्टीवर प्रेम करणारा. जगत्शेट-पु. १ फार श्रीमंत. २ (ल.) निर्धन पुरुष. जगत्शेटीचा-नातू- वि. निर्धन मनुष्य. जगत्स्त्रष्टा जगज्जनक पहा. जगत्स्वामी- पु. जगाचा धनी. जगत्क्षय-जगाचा नाश. जगदंत-पु. जगाचा नाश शेवट, अखेर. [जगत् + अंत] ॰दंबा-दंबिका-स्त्री. पार्वती; देवी; जगाची माता. 'विन्मुख जाहली जगदंबा ।' -एरुस्व ५.७३. [जगत् + अंबा] ॰दळ-दाळ-वि. १ जगाला भरडणारा. 'दापीतेआं देवांचा जगदळा ।' -शिशु १५५. २ (बायकी) जगाशीं भांडणारा. ॰दात्मा-जगदीश-दीश्वर-पु. ईश्वर; ब्रह्म. [जगत् + आत्मा, ईश, ईश्वर] ॰दाभास-पु. विश्वसादृश्य; जडरूप माया; बाह्य सृष्टि. [जगत् + आभास] ॰दुद्धार-पु. १ जगाचा उद्धार, मुक्ति. २-वि. जगाचा उद्धार करणारा. [जगत् + उद्धार] -द्गुरु-पु. १ ईश्वर. २ श्रीशंकराचार्यांची पदवी. ३ थिऑसफी पंथांतील गुरुस्थानी मानलेली श्रेष्ठ विभूति. -द्भूषण-न. जगाचा अलंकार; ईश्वर. -द्वंद्य-वि. सर्व जगास पूज्य. -द्विनाश- जगत्क्षय पहा. -द्विलक्षण-वि. १ सर्व जगाहून निराळा; विलक्षण. २ वाह्यात; चमत्कारिक; तर्हेवाईक. जगधाम-जग- न्निवास-वि. (काव्य.) सगळें जग व्यापून राहणारा; परमेश्वर; सर्व जग हें ज्याचें घर आहे असा. ॰नाड-स्त्री. जगदळ-दाळ पहा. ॰न्नाथ-पु. १ जगाचा स्वामी. २ पुरी येथील श्रीविष्णूची मूर्ति. ॰म्ह आपला हात अन् जगन्नाथ = स्वतःस पूर्ण स्वातंत्र्य असणें. [जगत् + नाथ] ॰न्नायक-पु. जगाचा स्वामी, पालनकर्ता; ईश्वर. [जगत् + नायक] ॰न्निंद्य-वि. सर्व जग ज्याची निंदा करतें असा. ॰न्नियंता-वि. जगाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणारा. -न्मंगल-वि. जगाचें कल्याण करणारा. 'माळा हे कमळा विचारुनि गळा घाली जगन्मंगला ।' -न्माता-स्त्री. १ जगाची आई; जगदंबा. २ (ल.) मातृतुल्य स्त्री. -न्मित्न-पु. जगत्बंधु पहा. आवडतें मूल, सुस्वभावी माणूस. -न्मोहना-स्त्री. जगाला भुलविणारी स्त्री. ॰प्रसिद्ध-जगजाहीर पहा. ॰बोळ-पु. १ (महानु.) जगाला पारखा होणें. 'त्यागा जगबोळ जाहाला ।' -भाए ९१. २ कडू कातबोळ. 'नारदा होतुसें जगबोळाचें मानू ।' -भाए ६३. ॰भांड-वि. जगदळ पहा. ॰मित्र-मैत्र-वि. सर्व जगाशीं मैत्री करणारा. ॰लीला-स्त्री. १ जगाची रीत; सर्वसामान्य लोकांची वागणूक, पद्धति, समजूत वगैरे. 'जगलीला अशीच, बर्याला वाईट वाईटाला बरें म्हणावें.' २ आधिभौतिक मोह, माया; खोट्या जगाचा खर्या जगाप्रमाणें भास.
शिर
न. १ डोकें; माथा; मस्तक; शीर्ष. 'तीन शिरें, सहा हात । तया माझें दंडवत ।' २ झाडाचा माथा, शेंडा; टोंक. ३ सैन्याची आघाडी; बिनी. ४ डोई; व्यक्ति; घोड्यांची संख्या मोजतांना वापरतात. उदा॰ घोडा शिर चार = चार घोडे [सं. शिरस्; फा. सर] म्ह॰ १ शिरसलामत तो पगड्या पंच- वीस-जोंपर्यंत शरीरांत प्राण आहे, तों पर्यंत बाह्य शृंगार वाटेल तसा करता येईल (ल.) मूळ कायम असलें म्हणजे बाकीच्या गोष्टी मिळतात. २ शिर सुरी तुझ्या हातीं = तुझ्या हातीं माझा प्राण दिला आहे मारणें तारणें सर्व तुझ्या इच्छेवर. ॰हातावर घेणे-१ धाड- साचें काम करावयास सिद्ध असणें; अत्यंत शूर असणें. २ जिवावर उदार होऊन एखादें कार्य करण्यास उद्युक्त होणें; जिवाकडे न पहाणें. शिरावर जागें राहणें, शिरावर-शिरीं असणें-एखाद्याच्या संरक्षणासाठीं, कल्याणासाठीं तत्पर असणें; पाठ राखणें. 'श्रीरामा तूं स्वामी अससी माझ्या शिरावरी जागा ।' -मो केकाआर्या. 'शिरीं आहे रामराज । औषधाचें कोण ।' -रामदास. शिरावर घेणें-(एखादें कार्य) पत्करणें. पेशवाईच्या रक्षणाची जोखीम आम्हीं आमच्या शिरावर घेतली आहे. -अस्तंभा १७. शिरीं भार वहाणें-जबाबदारी पतकरणें; हमी घेणें- पतकर घेणें; सोसणें. 'शिरीं भार वाहेन बोले पुराणीं ।' -राम ३४. शिरःकंप-कंपन-पुन. डोकें लटलट हालणें; थरकापणें. ॰कमल- ळ-न. (काव्य) (कमलासारखें शिर). शिर; डोकें. [शिर + कमल] ॰गीर-स्त्री. कोंबड्याच्या डोक्यावरील तुरा. ॰गोम-वि. कपा- ळावर गोमेच्या आकाराचे, केस असलेला (घोडा). -स्त्री. घोड्याचें एक अशुभ चिन्ह. [शिर + गोम] ॰च्छेद-पु. डोकें उडविणें; वध. [सं. शिरच्छेद] ॰टोप-पु. १ कानटोपी; माकड टोपी; घरांत घाल- ण्याची टोपी; टकोचें; टोपडें. २ शिरस्त्राण. ॰ताज, शिर्ताज-पु. डोक्यावरचा एक दागिना; शिरोलंकार; मुकुट. 'शिरीं शिरताज रे शिरीं शिरताजगातो भरून ।' -ऐपो २३७. [फा. शिर्ताज्] ॰दीदे शिर्दीदे-क्रिवि. डोक्यावर; मस्तकीं; डोकीवर [फा. सर-इ-दीदा] ॰पाव, शिर्पाव, शिरोपाव-पु. १ राजा किंवा सरदार यांनीं कृपा- वंत होऊन दिलेलें पागोटें, वस्त्रें इ॰ बहुमानाचा पोशाख. 'मान पान, टिळा विडा व सिरपाव' -वाडबाबा ३४.१५. 'जवाहीर, सिरोपाव वगैरे जिन्साना पाठविला ।' -जोरा ८. २ जमाबंदीचे कतबे होण्याच्या वेळचा देशपाडें इ॰ चा हक्क. [फा. सरोफा] शिरपीडा-स्त्री. डोकेंदुखी. [सं.] ॰पेंच, शिर्पेंच-पु पागो- ट्यांत खोंबण्याचा जडावाचा मोत्यांचा तुरा; एक अलंकार. [फा. सर्पेच] ॰फोड्या-वि. भिक्षा मिळण्यासाठीं डोक्यावर हाणून घेणारा डोकें फोडून घेणारा (भिकारी); भिकाऱ्यांची एक जात व तींतील व्यक्ति. ॰बंद, शिर्बन्द, शिर्बस्ता-पु. पागोटें; पगडी. [फआ. सर्बन्द्] ॰भारी-स्त्री. डोक्यावर वाहून न्याव- याजोगें ओझें. [शिर + भार] शिरयाळें, शिरियाळें-न. डोक्याचा आधार; डोक्याची बैठक. 'उभऊनि करतळें । पडि- घाये कपोळें । पायाचे शिरियाळें । मांडूं लागे ।' -ज्ञा १४.१८५. [शिरस् + आलय;म. शिर + आळें] ॰वपन-न. हजामत; विशेषतः विधवा बायकांचे केस काढणें; विकेशा करणें. 'कैकयीचें शिर- वपन करून । छत्र धरोत कोण्हीतरीं ।' शिरसा-क्रिवि. १ डोक्यानें. २ शिर वाकवून; नम्रपणानें; आदरयुक्त आज्ञाबरहुकुम. 'तुम्ही आमचे वडील, त्यापेक्षां तुम्ही सांगाल तें आम्हास शिरसा मान्य आहे.' शिरसावंद्य-धार्य-मान्य-वि. अति- शय पूज्य; आदरणीय; माननीय. [सं.] ॰साष्टांग नमस्कार- दंडवत-पु. (डोक्यासहित आठ गात्रें जमिनीवर टेकून) अत्यंत नम्रतापूर्वक प्रणाम (वडील माणसें, थोर किंवा श्रेष्ट व्यक्ति यांस लिहावयाचा पत्रांतील मायना). [शिरस् + अष्ट + अंग + नमस्कार, दंड- वत] ॰स्त्राण-न. डोक्याचें रक्षण, आच्छादन करणारें टोपी, पागोटें इ॰. टोप; जिरेटोप. [सं.] ॰स्नात-वि. डोक्यावरून स्नान केलेला. ॰स्नान-न. डोक्यावरून केलेली आंघोळ; सबंध स्नान. शिरा तोरा-असणें-एखाद्याच्या वरचढ असणें;-चा अधिकारी असणें. 'गणितांत तो माझा शिरातोरा आहे.' ॰लावणें-दाखविणें- मिरविणें-शेखी मिरविणें; वरचढपणा गाजविणें. 'खंड्याला पाटिलकी मिळाल्यापासून तो भारी शिरातोरा दाखवूं /?/गला आहे.' शिरी-स्त्री. डोक्यावरील नक्षीचें, शोभिवंत कापड (हत्ती, घोडा इत्यादींच्या). शिरीं-क्रिवि. डोक्यावर; ऐनवेळीं. उदा॰ लग्नाच्या शिरीं, प्रसंगाच्या शिरीं, कामाच्या शिरीं. ॰असणें-अग्रभागीं असणें; संभाळणारा होणें. 'शिरीं असतां पंडरिनाथ । चिंता किमपि न करावी ।' शिरोग्रह-पु. डोकें धरणें; शिरोवेदना होणें (रोग, विकृति इ॰ नें). डोकें धरणारा, डोक्यावर परिणाम करणारा (रोग इ॰). [सं.] शिरोबस्ती-पु. डोकेंदुखी बंद- करण्याचा एक उपाय. शिरोबिंदु-पु. (भूमिति) अक्षाच्या समोरचें टोक, कोण बिंदू. -महमा १२,२०. शिरोभाग-पु. १ मानेपासून वरचा भाग; डोक्याचा भाग. २ (एखाद्या समा- जाचा, संघाचा) नायक, गुणांत योग्यतेनें उत्तम. शिरोभूषण- न. डोक्याला शोभा देणारी वस्तु; असंकार, इ॰. मुकुट पागोटें; टोपी. शिरोमणी-पु. १ डोक्यावरील दागिना; मुगुटमणि. २ मुख्य, श्रेष्ठ इसम; प्रमुख नायक. उदा॰ पंडित शिरोमणि, मूर्ख शिरोमणि, सोदाशिरोमणि. इ॰ 'बाप बळिया शिरोमणी । उताविळ या वचनीं । -तुगा १६४. [सं.] शिरोरोग-पु. डोक्यांतील बिघाड, रोग. त्याचे प्रकार-वातिक, पैत्तिक, श्लेष्मिक, सन्निपातिक, रक्तक्षयज, कृमिज. शिरोलेख-पु. (वृत्त.) मथळा; मायना; शीर्षक; लेखारंभीं लिहिलेलें वाक्य. (इं.) हेडिंग. 'शिरोलेखांत लिहिल्याप्रमाणें अद्याप ८।१० दिवसांचा अवकाश आहे. -टि २७२. शिरोवेदना-स्त्री. डोकेंदुखी; शिरपीडा. 'मोठी शिरोवेदना होत आहे.' -कमं ४. शिरोवेष्टन-न. कोणतेंहि डेक्याला गुंडाळावयाचें वस्त्र; (रुमाल, पागोटें वगैरे). [सं.]
लागणें
अक्रि. (ह्या क्रियापदाचा संलग्न, संयुक्त किंवा संबद्ध होणें, जुळणें, चिकटणें, जडणें असा मूळचा एकच अर्थ आहे. परंतु अनेक नामांशीं आणि शब्दांशीं उपयोग केल्यामुळें यांस अनेक भिन्न अर्थांच्या छटा आल्या आहेत. त्यांपैकीं सर्वसामान्य व कांहीं विशेष खालीं दिल्या आहेत) १ स्पर्श करणें; शिवणें. 'तूं त्याला लागूं नको. विटाळ होईल.' 'परि सावध व्हा लागो शुचि व्हाया हृदयलोह या परिसा ।' -मोभीष्म ६.११. २ लावणें; आंत घालणें; खुपसणें (रोप, झाड इ॰); लागवड, पेरणी करणें (जमीनीची). 'वाफा, अळें, सरी लागली.' ३ मूळ धरणें; रुजणें; चांगलें जीव धरणें; एक जीव होणें (लावलेलीं रोपें, कलमें) ४ मार बसणें; आघात होणें (शस्त्र इ॰चा). ५ (ल.) मनाला बोंचणें; परिणामकारक होणें; अंतःकरणाला भिडणें (रागें भरणें, शब्दांचा मार). -दा १०.८.२७. ६ बंद होणें; मिटणें; गच्च बसणें. (दरवाजा, खिडक्या, झांकण, पापण्या, डोळे). ७ योग्य प्रकारें जुळणें; जोडलें जाणें (शब्दशः व ल.) (तुकडे, विभाग, कविता, शब्द). ८ बरोबर होणें; लागीं बसणें; नीट सामावणें. ९ प्रचारांत असणें; रूढ असणें (तऱ्हा, पद्धति, रीत). १० चिकटणें; जडणें; आंगवळणीं पडणें (दुर्गुण, खोड, रोग). ११ येणें; उत्पन्न होण; आसक्ति होणें (भूक, तहान, खोकला, कंप इ॰). १२ निघणें व चालू होण; प्रारंभ होऊन सुरू असणें (स्थल आणि काल यांतील पदार्थ आणि प्रसंग, विशिष्ट परिमाण किंवा प्रकार). 'एथून मावळ संपलें आणि देश लागला.' 'या अध्यायापासून ग्रंथ कठीण लागला.' 'तेव्हांपासून ह्याचा त्याचा कलह लागला.' 'हें काय सोपें लागलें आहे? १३ बरेंवाईट कळणें; विशिष्ट प्रकाराचे किंवा जातीचें म्हणून समजणें, वाटणें. 'आंबे खाऊन पहा, गोड लागले तर घ्या.' 'त्याला बरी गोष्ट जरी सांगितली तरी वाईट लागते.' १४ प्राप्त होणें; मिळणें (नोकरी चाकरी, नेमणूक). 'इतकी खटपट करून अखेर त्याला नोकरी लागली.' १५ नातें किंवा संबंध असणें; नात्याच्या संबंधानें असणें. 'तुझा तो काय मेहुणा लागतो.' १६ आढळणें; भेटणें; रस्त्यांत मार्गांत येणें; पुढें येणें. 'वाटेनें चार नद्या लागतात, 'तुम्ही वाचीत जा आणि पुढें येणें. 'वाटेनें चार नद्या लागतात, 'तुम्ही वाचीत जा आणि पुढें वृत्तश्लोक लागेल तेथें ठेवा.' १७ फळ धरणें; बहर येणें; वृक्ष फलोत्पा- दनाच्या स्थितीस येणें. 'ह्या प्रांताचे माड लागूं लागले म्हणजे असे लागतात कीं एका एका माडास हजार हजार नारळ लागतात.' १८ करपणें; बिघडणें; बुडाशीं जळणें. 'भात बुडाशीं लागला.' १९ कामांतून जाणें; खराब, घाण होणें; डागळणें; कुजण्यास, सडण्यास आरंभ होणें; बुरशीनें व्याप्त होणें. 'लांकूड लागलें.' २० चिकटणें; चिकटून राहाणें. 'उदंड उपाधी तरी थोडी, लागोंच नेदी.' -दा ९.१०.५. २१ बसणें जडणें; बिलगणें (मन). 'चित्त तें लागलें तुझें पायीं ।' -दावि ५६. २२ चावणें; दंश करणें; झोंबणें (साप, विंचू, चिकट पदार्थ). २३ हल्ला, आघात होणें. 'त्याला विंचू लागला' 'मला ठेंच लागली-दगड लागला.' २४ पडणें; धाड येणें (मेकाड, मोवा इ॰ची); व्यापणें; ग्रासणें; (मेकाड इ॰नीं झाड). २५ परिणाम करणें; अनिष्ट व उपद्रव होईल असें करणें; (मादक पदार्थ, वाईट हवा, पाणी, उपवास, शिव्याशाप इ॰नीं). २६ जनावर, माणूस इ॰ची पाठ, पाय इ॰ गात्रांस (खोगीर, जोडा, लगाम इ॰च्या घर्षणानें) इजा होणें; घसटणें; खरचटणें; चोळवटणें; सोलवटणें. 'जोडा लागला.' २७ नेहेमींच्या एखाद्या आजारानें पछाडलें जाणें (जनावर). २८ पूर्णपणें व योग्य रीतीनें मिसळलें जाणें (साखर, तिखट, मीठ वगैरे अन्नांत एखादा पदार्थ). २९ घालविण्याची जरूरी पडणें; खर्चिला जाणें; व्यय होणें (पैसा, पदार्थ, वेळ). 'याच्या लग्नास पांचशें रुपये लागले.' ३० पाहिजे असणें; गरज असणें; सुस्थितीस पूर्णतेस जरूर असणें; (सामा. एखादी गोष्ट) (गरज, नड, उपयोगाचा प्रसंग) उत्पन्न होणें. 'क्षत्रियासि लागल्या अनुपत्ती । पूर्वोक्त करावी वणिग् वृत्ति ।' -एभा १७.४६२. ३१ योग्य स्वरांत बसणें; स्वरानुकूल असणें (गळा, आवाज, वाद्य, सूर). ३२ पेटणें; दीप्तियुक्त होणें (दिवा, विस्तव); चेतणें (आग). ३३ प्रत्यक्ष आरंभ होणें; मुख्य विधि, संस्कार याला सुरवात व्हावयाची वेळ येणें (लग्न, मुंज इ॰ विधीची). ३४ (बोलतांना) अडखळणें (माणूस, जीभ, शब्द). ३५ चालू होणें; क्रिया सुरू होणें; गति मिळणें, (एंजिन, यंत्र इ॰). ३६ चालणें; समर्थ, कार्यक्षम असणें (आपल्या विशिष्ट कार्यांत); उपयोगास येणें. 'जंग चढला आहे म्हणून चाकू लागत नाहीं.' ३७ तीक्ष्ण होणें; धारेनें युक्त होणें. 'दोन चाकू लागले आहेत, बाकींचे लागावयाचे आहेत.' ३८ निश्चित किंवा ठरलेलें असणें; न सुटण्यासारखें जोडलेले किंवा पाठीमागें लागलेलें असणें. 'उपजत्या प्राण्यास मरण हें लागलेंच आहे.' 'संसाराचें कृत्य हें रोज लागलेंच आहे' ३९ सुरू होणें; सतत चालू असणें; एकसारखा असणें; एकसारखा राहणें, घडणें (पाऊस, थंडी, उष्णता). 'कालपासून पाऊस सारखा लागला आहे.' ४० मग्न, गुंतलेला असणें. ४१ मनांत योजिलेला किंवा स्वाभाविक परिणाम होणें; यश येणें; उपयोग होणें. ४२ जुगणें; मैथुन चालणें, करणें (पशु, पक्षी यांमध्यें नरानें मादीशीं) (निंदार्थी माणसालाहि लावतात). ४३ योग्य स्थितीला येणें; फलदायी होणें (गाय, म्हैस इ॰ दूध देऊं लागणें, झाड फळाला येणें). ४४ संबद्ध, मालकीचा असणें; कार्यक्षेत्रांतील, कक्षेंतील, अधिकारांतील असणें. ४५ विवक्षित स्थितींत असणें; विवक्षित गुण, जात, धर्म असणें; विशिष्ट परिस्थिती असणें. 'मी कां श्रीमंत लागलों आहें? सर्वांस शाल- जोड्या द्या म्हणतां तो.' 'हा काय मुसलमान लागला!' ४६ लावणें; अंगीं लागू करणें (गुन्ह्याचें कृत्य); करावयासाठीं, पार पाडण्यासाठीं एखाद्या व्यक्तीवर लादलेलें असणें; सोपविलेलें असणें (कर्तव्य, काम इ॰). 'हें काम मजकडे लागलें.' ४७ सक्तीचें, आवश्यक, जरूर असणें; करणें-भोगण भाग पडणें. 'ह्याचे हातून न झालें तर तुम्हास जावें लागले.' 'हा पळून गेला तर रुपये तुम्हाला द्यावयास लागतील.' ४८ अडकणें; गुंतणें. 'कोठें तुझा जाउनि हेतु लागे ।' -सारुह २.९४. ४९ झपाटणें; पछाडणें; अंगात येणें; बाधा होणें. 'चिंतूला चिंचेवरची हडळ लागली.' ५० (शौच, मूत्रविसर्जन इ॰) क्रियेची इच्छा होणें. 'शौचास-मुतावयास लागली.' ५१ (क्रियापद ऊं, आवयास इ॰ प्रत्यय लागून त्यांचे पुढे 'लागणें' हें क्रियापदातील आलें असतां) क्रिया सुरू करणें; आरंभणें; घडणें; लागूं होणें. 'तो तें करूं किंवा करावयास लागला'; 'तो मारूं लागला-देऊं घेऊं-खाऊं-बोलूं बसा- वयास करावयास लागला.' ५२ क्रियापदांतील 'वें' ह्या प्रत्य- यापुढें 'लागणें' क्रियापद आलें तर आवश्यक होणें, अनिवार्य होणें असे अर्थ होतात. 'त्याला जावें लागलें.' ५३ बरोबर, बाजूला असणें; मदत करणें. 'हा धोंडा मला उचलूं लाग'; 'हें काम मला करूं लाग' ५४ नांगर टाकण्याच्या स्थितीत येणें; कडेला येणें; स्थिरावणें; गति खुंटणें (जहाज, होडी). ५५ (ल.) अगतिक होणें; हालचाल बंद पडणें. [सं. लग् लग्न; प्रा. लग्ग; हिं. गु. लांगना] म्ह० लागें बोट वाढे पोट = नुसतें निमित्त होऊन एखादें वाईट काम होऊन जाणें. (एखाद्यास-ला) लागला जाणें- १ ऋणी होणें, असणें; मिंधा असणें. 'त्वां मला दोन पैसे दिलेस म्हणून मी कां तुला लागला गेलों?' 'मी काय तुझे चार चवल लागतों?' २ जास्त परिचयाचा, आसक्त असणें. लागून असणें- १ (स्नेह, लोभ, इ॰ मुळें) अगदीं चिकटला असणें; तंत्रानें किंवा मर्जीप्रमाणें वागणें. २ एखाद्या स्त्रीनें एखाद्याशीं व्यभि- चारसक्त असणें. ३ मग्न, गुंतलेलें असणें. लागून जाणें-नवरा सोडून दुसऱ्यापाशीं राहणें (एखाद्या स्त्रीनें). कानास-कानीं-लागणें- गुप्त गोष्टी बोलणें; कुजबुजणें 'किती लागती परस्पर कानीं । मधुर भाषणी ।' -रत्न १०. पाणी लागणें-१ एखाद्या ठिकाणच्या हवेचा, चालीरीतींचा मनावर, वागणुकीवर परिणाम होणें. 'विदेशी लागलें पाणी ।' -दा ३.६.२५. २ एखाद्या ठिकाणची हवा बाधणें. ३ (पुसणें) एखाद्याकडे येणें असलेली रक्कम बुडणें; नाहीसें होणें. पायीं लागणें-नम्र होणें; नमस्कार, वंदन करणें. 'समर्थपायीं राजराजेंद्र लागती ।' -सप्र ३.६६. लागत-न. (गु.) भाडें; खर्च. 'अगाऊ लागत भरून पावती मिळविली पाहिजे.' -(बडोदे) खानगी खातें, लागतीचें नियम ४. लागत- खेवों-क्रिवि. लागतांच. लागतगुण-पु. संगतीचा परिणाम- गुण; संबंध जडल्यानें येणारा गुण. 'कोणाचा कोणास लागतगुण असतोच.' लागता गुण-पु. (बायकी) माणूस, संपत्ति, उत्कर्ष, वस्तु जोडण्याचा गुण; संपादन करण्याचा, मिळविण्याचा गुण. लागता जुगता-वि. मार्गावर आणलेला; योग्य क्रमांत, रागेंत लावलेला; पायावर उभा केलेला. [लागणें + जुगणें] लागता वळगता-वि. (गु.) संबंधी; संबद्ध. 'जबाबदार इसमानें आपले ताब्यांतील व लागते वळगते नोकर लोकांस वरचेवर माहिती देत जावी.' -(बडोदें) आगी पासून बचाव ४. लागतें-न. संबंध. 'न बुझावितां मतें । न फिटे आक्षेपाचें लागतें ।' -ज्ञा १३.३२७. लागन-क्रि. (खा.) मनाला वाटणें. लागरा-वि. १ मादक; अंमली; खाल्ली असतां लागणारी (सुपारी, औषध, इ॰). २ खराब झालेला; किडीनें खाल्लेला; किडका (धान्य, फळ, लांकूड इ॰). लागीर-स्त्री. न. १ पिशाच; भूत. २ पिशाच-भूत-समंध- बाधा; पछाडणी. (क्रि० लागणें; काढणें; निघणें). -वि १ किडकें; सडकें. २ किडण्यासारखें किडण्याजोगें (लांकूड, धान्य). ३ नास-नुकसान-दुखापत पोंचेल असा. ४ लागलेला. ५ बाधा झालेला; पछाडलेला. ६ चिकटलेला; चिकट. ७ मादक; माजगा; अंमली. ८ वाईट परिणाम करणारा; अहितकारी. ९ दुसऱ्याचें प्रेम, लोभ, दया, जडवून-लावून घेणारा; लाडिक. लागीर होणें- बाधा होणें; लागणें (भूत, पिशाच्च).
हात
पु. १ हस्त; बाहु; खांद्यापासून बोटांपर्यंत शरीराचा भाग. कोपरापासून बोटांपर्यंतचा भाग. २ कोपरापासून मधल्याबोटाच्या टोकापर्यंतचें माप. 'हा पंचा साडेचार हात भरला.' ३ उजवी किंवा डावी बाजू, तरफ. 'आमचें घर वाड्याचे उजव्या हातास आहे.' ४ ताबा; आटोका; अधिकार; खातें. 'तुझें काम करणें माझ्या हातीं नाहीं.' (कारक विभक्तींत प्रयोग). ५ स्वतः व्यक्तिगत मनुष्य. 'अपराधावांचून शिवी देणें हें माझ्या हातानें घडणार नाहीं.' ६ स्वामित्व; कबजा; मालकी; ताबा. 'साप्रंत माझ्या हातीं पैसा नाहीं.' ७ हातानें वाजविण्याच्या वाद्यावर मारलेली हाताची थाप. ८ डाव; खेळ (काठी, लाठी, पट्टा इ॰ शस्त्रांचा). 'पट्ट्याचे दोन हात करून दाखव.' ९ कर्तृत्वशक्ति; अंग; हस्तकौशल्य (एखाद्या विषयांतील, कलेंतील). 'त्याचा चित्र काढण्याचा हात चांगला आहे.' १० कुलुपाची किल्ली; चावी. 'कुलवाचा हात इकडे दे बघूं.' ११ सोंगट्या, पत्ते इ॰ खेळांतील डाव, खेळण्याची पाळी, खेळ; खेळणारा गडी. 'अजून आमच्यांतील एक हात खेळवयाचा आहे.' १२ हस्तक; मदतनीस; साहाय्यक; हाताखालचा मनुष्य. १३ ज्यावर दंड, जोर काढावयाचे तो लांकडी, दगडी ठोकळा; हत्ती १४ (रंग देणें, सारवणें इ॰ कामीं) वरून हात फिरविणें; हातानें दिलेला थर, लेप. १५. ठोंसा; तडाखा; हस्तक्रिया (भिन्नभिन्न प्रसंगीं त्या त्या अर्थांनीं) १६ (तेली-घाणा) कातरीस जोडलेला वांकडा लाकडी तुकडा. १७ हात टेकावयासाठी, हातानें धरावयाचा कोणताहि पदार्थाचा भाग. 'खुर्चींचे-रहाटाचे-हात. १८ हाताच्या आका- राची कोणतीहि वस्तु. १९ (सोनेरी) हातांतील दागिना सैल करण्याचें एक हत्यार. २० (नृत्य) दोन हातांनीं मिळून करा- वथाचे अभिनयाचे प्रकार. हे ४० प्रकारचे आहेत. २१ (शिंपी) कापड मोजण्याचें बारा तसूंचें एक माप; गज. २२ पान्हा (नट- बोलट फिरविण्याचा). [सं. हस्त; प्रा. हत्थ; हिं. गु. हाथ; ब. हात; आर्में. जि. हथ, अथ; पॅलेस्टाईनजि. हस्त; पोर्तुंजि. बस्त] म्ह॰ १ हात ओला तर मैत्र भला-नाहींतर पडला अबोला- जोपर्यंत माणूस दुसर्यास देत असतो तोंपर्यंत त्याच्याशीं सगळे मित्रत्वानें वागतात. २ हात घशांत घातला तरी कोरडाच = कितीहि मदत केली तरी बेइमान राहणारा. ३ हातपाय रोड्या, पोट लोड्या; हातपाय काड्या, पोट ढेर्या = पोटाचा तटतटीतपणा व अवयवांचा रोडकेपणा. ४ हात फिरे तेथें लक्ष्मी फिरें, तोंड फिरे तेथें अवदसा फिरे = उद्योगी माणसाचा हात श्रीमंती आणतो तर नुसत्या बडबड्याच्या हातून कांहींच होत नाहीं उलट दारिद्र्य येतें. ५ आपला हात जगन्नाथ (जगन्नाथपुरीस आपल्या हातानें वाटेल तेवढा प्रसाद घेतां येतो त्यावरून) वाटेल तेवढें व तसें घेणें; प्राचुर्य. ६ हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये = जें खात्रीनें आपलें आहे (आपणांस मिळावयाचेंच आहे) तें सोडून जें अनिश्चित आहे तें मिळविण्याच्या नादीं लागूं नये. ७ हातच्या कांकणास आरसा कशाला ? (हातांतील कांकण डोळ्यानें दिसण्या- सारखें आहे, आरसा आणणें वेडेपणा) = जी गोष्ट उघड सिद्ध आहे ती दाखविण्यास पुराव्याची जरूरी नाहीं. ८ हातपाय र्हावलें काम करूं वायले = नाइलाज होणें. ९ हातपाय लुलें तोंड चुरचुरां चाले = अशक्त पण तोंडाळ, मुजोर माणूस. १० हातभर लांकूड नऊ हात ढलपी = अतिशयोक्ति करणें. ११ हातांत नाहीं अडका बाजारांत चालला धडका = जवळ कवडीं नाहीं पण डौल बादशहाचा. (वाप्र.) ॰आंखडणें-देण्यासाठीं पुढें केलेली वस्तु एकदम मागें घेणें; देण्याचें प्रमाण कमी करणें, बंद करणें. ॰आटोपणें-मारणें इ॰ हातांनीं करावयाची कोणतीहि क्रिया बंद करणें. ॰आवरणें-१ हात आटपणें. २ कोणत्याहि कृत्यापासून परावृत होणें. 'ऐकेल वचन माझें आवरिल द्वेषिकाळ हात रणीं ।' -मोकर्ण ४६.४४. ॰इचकणें-(व.) हात मोडणें. ॰उगारणें-उचलणें-(एखा- द्यास) मारावयास प्रवृत होणें. ॰उचलणें-१ स्वयंस्फूर्तीनें, आपण होऊन बक्षीस देणें. २ हातीं घेणें (काम, धंदा). ॰ओढविणें- १ घेण्यासाठीं झांप टाकणें. २ विटंबना, करण्यासाठीं तुच्छता दर्शविण्यासाठीं तोंडापुढें हात करणें. ॰ओंवाळणें-तुच्छता दर्शविणें. ॰करणें-१ लाठी मारणें; शस्त्राचा वार करणें. हात टाकणें. 'स्त्रीचे अंगावर हात करूं नये.' २ पट्टा, बोथाटी वगैरेचे डाव करणें; फिरविणें. ३ वादविवाद, युद्ध करणें. ॰कापून-देणें- गुंतणें-लेखी करारकरून स्वतःस बांधून देणें. ॰खंडा असणें- एखादें कार्य (हुन्नर) हमखास पार पाडण्याचें कौशल्य, पटाईत- पणा अंगीं असणें. ॰गहाण ठेवणें-उजवा हात देवास वाहून कोणत्याहि कामीं त्याचा उपयोग करावयाचा नाहीं असा नवस करणें. २ कोणत्याही कामास हात न लावणें. ॰घालणें-१ (एखादें काम) पत्करणें; करावयास घेणें. २ एखादी वस्तु घेणें, धरणें, शोधणें यासाठीं हात पुढें करणें. 'मग विभु वसनासी त्याचिया हात घाली ।' -आनंदतनय. ३ (एखाद्या कामांत, व्यवहांरांत) ढवळाढवळ करणें; आंत पडणें. ॰घेणें-(पत्त्यांचा खेळ) हुकूम मारून अगर भारी पान मारून दस्त करून घेणें. ॰चढणें-प्राप्त होणें. 'अनुताप चढविया हात । क्षणार्धं करी विरक्त ।' -एभा २६.२०. हाताचा आंवळा-मळ, हातचें कांकण-उघडउघड गोष्ट; सत्य. ॰चा मळ-अत्यंत सोपें कृत्य; हात धुण्यासारखें सोपें काम; अंगचा मळ. ॰चालणें-१ हातांत सत्ता, सामर्थ्य, संपत्ति असणें, मिळविणें, मिळणें. १ एखादी गोष्ट करतां येणें. 'कशिद्यावर माझा हात चालत नाहीं.' ॰चाल- विणें-हत्यार चालविणें (संरक्षणार्थ). 'न्यायाच्या अभावीं ज्याला त्याला हात चालवावेसें वाटणें रास्तच होईल.' -टि १. २२. ॰चेपणें-लांचाचे पैसे मुकाट्यानें एखाद्याचे हातांत देणें. ॰चोळणें-फार राग आला असतां तळहात एकमेकांवर घासणें; कुंठितगति होऊन स्वस्थ बसावें लागणें. 'शल्य सुयोधन वाक्यें कोपे चोळी करें करा...।' -मोकर्ण २१.१३. ॰जोडणें-१ नमस्कार, प्रार्थना, विनंति करणें. २ शरण जाणें, येणें. 'अपराध फार केले परि आतां हात जोडिले स्वामी ! ।' -मोआर्याकेका. ३ नको असलेला पदार्थ हात जोडून आर्जवानें दूर सारणें; अव्हे- रणें. 'दानश्री त्याहुनि बहु दुग्धासहि हात जोडितो मीन ।' -मोबृहद्द ८. ॰झाडणें-१ झिडकारणें; नापंसत ठरविणें. २ निराशेनें सोडून देणें. ३ एखादें काम उरकून मोकळें होणें. ॰टाकणें-१ पोहतांना पाण्यावर हात मारणें. २ (एखाद्यावर) प्रहार करणें; मारणें. 'बायकोमाणसाच्या अंगावर हात टाकणें तुम्हाला शोभत नाहीं.' ॰टेकणें-१ काम करण्यास असमर्थ असल्यानें पराभव पावल्याचें कबूल करणें. २ म्हातारपणानें अशक्त होणें. ३ दमणें; थकणें; टेकीस येणें. ॰तोडणें-स्वतःच्या लेखानें आपणांस बांधून घेणें. ॰थावरणें-हात आवरणें; आटो- पणें. '...थावरूनि हातरणीं ।' -मोस्त्री ६.५१. ॰दाखविणें- दावणें-१ हस्तसामुदिक जाणण्यासाठीं जोशापुढें तळहात करणें. २ अहितकारक परिणाम करणें. ३ स्वतःची शक्ति, सामर्थ्य दाख- विणें. 'शक्रादि देव असते तरि त्यांसहि दावितोंचि हात रणीं ।' -मोभीष्म ३.४. ४ नाडीपरीक्षा करण्यासाठीं वैद्यापुढें हात करणें. ५ हातानें एखादी वस्तु दर्शविणें. ६ बडवून काढणें; पारिपत्त्य करणें; सूड घेणें; उट्टें काढणें. म्ह॰ हात दावून अवलक्षण चिंतणें, करणें. ॰दाबणें-लांच देणें. 'त्यानें आपल्यास मदत करावी म्हणून त्याचे हात दाबावे असें एकदां मनांत येतें.' -विवि १०. ९ २१०. ॰देणें-१ मदत करणें; तारणें. 'घडतां अधःपतन मज पुण्यें देतिल न हात परिणामीं ।' -मोआदि १९.३२. २ चोरणें; उचलेगिरी करणें. ३ खाद्यापदार्थावर ताव मारणें. ४ (बायकी, छप्पापाणी) छप्पू घातलेल्या मुलीस इतर मुलीनीं (तिनें उठावें म्हणून) हस्तस्पर्श करणें. ॰धरणें-१ अडविणें; हरकत करणें; स्पर्धा करणें; बरोबरी करणें. २ लांच देणें. ॰धरून जाणें- विवाहित स्त्रीनें एखाद्या परपुरुषाबरोबर पळून जाणें; जाराबरोबर निघून जाणें. ॰धुणें-(ल.) एखाद्या कामांतून आपलें अंग काढून घेणें. ॰धुवून पाठीस लागणें-एखाद्या नाश करण्याविषयीं हट्टानें प्रवृत्त होणें; चिकाटी धरून एखाद्याचा पाठलाग करणें. ॰न बनणें-(व.) विटाळशी होणें; गुंता येणें. ॰नाचविणें-चेष्टा करण्यासाठीं दुसर्याचे तोंडापुढें हातवारे करणें. हात ओवाळणें पहा. ॰पडणें-१ एखादें काम अनेकांनीं लागून संपविणें; एखादा खाद्यपदार्थ अनेकांनीं एकसमयवच्छेनेंकरून फन्ना करणें. २ (ना.) जिवंतपणीं भेट नाहीं पण दहनापूर्वी तरीं प्रेताचें दर्शन होणें. ॰पसरणें-भीक मागणें. ॰पाय खोडणें-१ अवयव आंख- डणें; विव्हल होणें. २ एखाद्यास प्रतिबंध, अडचण करणें. ॰पाय गळणें-गाळणें-१ अशक्त होणें; रोडावणें. २ खचून जाणें; नाउमेद होणें; गलितधैर्य होणें. ॰पाय गुंडाळणें-१ अंत- काळच्या वेदनांनीं हातपाय आंखडणें; कियाशक्ति रहित होणें. २ हरकत, अडथळा करणें. ॰पाय चोळणें-१ सूड घेण्याची प्रतिज्ञा करणें; चरफडणें. २ रागानें तरफडणें; शिव्याशाप देणें. ॰पाय झाडणें-१ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा. २ सुटकेसाठीं हातापायांचा उपयोग करणें. ३ धडपड करणें; चरफडणें. ॰पाय ताणणें-सुखानें, निष्काळजीपणानें हातपाय पसरून पडणें. ॰पाय धोडावप-(गो.) आटापिटा करणें. ॰पाय पसरणें- १ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा. २ मर्यादेच्या, आटोक्याच्या बाहेर जाणें; जास्त जास्त व्याप वाढविणें; पसारा वाढविणें. म्ह॰ भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. ३ काम होत नसल्यास सबबी सांगणें; कामांत आळस करणें (काम करीन असें वचन दिलें असतां). ४ मागणी वाढत जाणें, अधिकाधिक आक्रमण करणें. ॰पाय पाखडणें-अंतकाळच्या वेदनेनें, फार संतापानें हातपाय झाडणें. ॰पाय पांघरून-पोटाळून बसणें-आळशा- सारखें बसणें; जेठा मारून बसणें. ॰पाय फुटणें-१ उधळपट्टी सुरू होणें; संपत्तीला (जाण्यास) पंख फुटणें. 'दौलतीला अलीकडे हातपाय फुटुं लागले आहेत.' ३ लुच्चेगिर्या करण्यांत तरबेज होणें. २ थंडीनें हातपायास भेगा पडणें. ॰पाय फोडणें-लावणें- फुटणें-लागणें-१ मूळ गोष्टींत, अंदाजांत भर घालणें; वाढ विणें. २ नटविणें; थटविणें; अलंकृत करणें. ३ मागून वाढविणें (काम, दर, खर्च इ॰). ४ लबाड्या इ॰ नीं सजवून उजळून दाखविणें. ॰पाय मोकळे करणें-फेरफटाका करून हातपाय सैल, हलके करणें; फिरणें; सहल करणें. ॰पाय मोडणें-मोडून येणें-टाकणें-१ तापापूर्वीं अंग मोडून येणें; निरंगळी येणें. २ बलहीन, निःसत्त्व करून टाकणें; हरकत घेणें. ॰पाय सोडणें -अंतकाळच्या वेदनांनीं हातपाय ताणणें, ताठ होणें. ॰पाय हालविणें-उद्योग, परिश्रम, कष्ट इ॰ करणें; स्वस्थ न बसणें. ॰पोचणें-कृतकृत्य होणें (ढुंगणाला हात पोंचणें असा मूळ प्रयोग). ॰फाटणें-रुची वाढणें. 'जेथें जिव्हेचा हातु फाटे ।' -ज्ञा १८.२४९. ॰फिरणें-लक्ष जाणें; व्यवस्थित ठेवण्याची काळजी घेणें; साफसफाई करणें. ॰फेरविणें-१ लहान मुलास प्रेमानें कुरवाळणें. 'प्रेमें मजवरुनि हात फिरवूनी ।' -मोउद्योग १३.१८३. २ पुन्हां उजळणी, उजळा देणें. ॰बसणें-१ एक- सारखें लिहीत, वाचीत इ॰ राहणें. २ अक्षरांचें वळण बसणें; तें पक्कें होणें. ३ एखादें काम उत्तम प्रकारें करतां येणें; मनांत ठसणें; विशिष्ट क्रिया करण्याची सफाई हातास प्राप्त होणें. ॰बांधणें-१ मर्यादा घालणें; स्वैर होऊं न देणें. २ अडथळा आणणें. ॰बोट लावणें-भार लावणें-मदत करणें. ॰भिजणें-१ दक्षणा देणें; (गो.) हात भिजविणें. २ लांच देणें; हात ओले करणें. ॰मारणें-१ बळकाविणें (पैसा इ॰) देणें. २ अधाशीपणानें खाणें; ताव मारणें. ३ एखाद्या वस्तूवर विविध क्रिया करणें. ॰मिठ्ठीला येणें-(माण.) हाताहातीं होईपर्यंत भांडणें. ॰मिळविणें-१ घाव घालणें. 'तस्कारानें जलदीकरून हात मिळविला जाऊन ।' -ऐपो ३९०. २ (कुस्ती) सलामी घेणें. ॰मोडणें-१ असहाय्य, मित्रहीन होणें. २ मिळत असलेली देणगी, बक्षीस नाकारणें. ॰राखणें- कुचराई करणें. ॰राखून खर्च करणें-काटकसरीनें खर्च करणें. ॰लागा ना-(गो.) विटाळशी होणें. ॰लावणें-मदत करणें. ॰वसणें-क्रि. हस्तगत होणें. 'ते ज्ञाननिष्ठा जेथें हातवसे ।' -ज्ञा १८.१२४८; -भाए २४०. ॰वहाणें-१ हत्यार चालविणें. 'परि परमप्रिय अर्जुन त्यावरि याचा न हात वाहेल ।' -मोउद्योग १२.५४. २ प्रवृत्त होणें; कार्य करणें. ॰वळणें-१ सराव, परि- पाठ इ॰ नें हातास सफाई येणें. २ (एखाद्या गोष्टीस, कृत्यास) प्रवृत्त होणें. ॰सैल सोडणें-सढळपणें खर्च करणें. ॰सोडणें-१ पूर्वीप्रमाणें कृपा, लोभ न करणें. २ संगति. ओळख सोडणें. ॰हातांत देणें-लग्न लावणें. 'एखाद्या तरुणीचा हात माझ्या हातांत दे.' -भा ४९. ॰हालवीत येणें-काम न होतां रिकामें परत येणें. हातणें-क्रि. सारवणें. हाताखालीं घालणें-देख. रेखीखालीं, अंमलखालीं, कबज्यांत, ताब्यांत घेणें. हातां चढणें- प्राप्त होणें. 'जरी चिंतामणी हातां चढे ।' -ज्ञा ३.२३; -एभा १०.२८२. हाताचें पायावर लोटणें-आजची अडचण उद्यां- वर ढकलणें; आजचें संकट लांबणीवर टाकणें. हाताचे लाडू होणें-खरजेनें हाताच्या मुठी वळणें, त्या न उघडणें. हाताच्या धारणेनें घेणें-मारणें; बुकलणें. हातांत कंकण बांधणें- एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा करणें; चंग बांधणें (यजमानानें यज्ञ करावयाच्या पूर्वी हातांत दीक्षासूत्र बांधण्याच्या चालीवरून). हातांत हात घालणें-१ लांच देणें. २ मैत्रीच्या भावानें वागणें, प्रेम करणें. ३ विवाहसंबंध घडवून आणणें. ४ विवाहित स्त्रीनें परपुरुषाशीं संबंध ठेवणें; निघून जाणें. हातातोंडाशीं गांठ पडणें-१ घास तोंडांत पडणें; खावयास सुरुवात करणें; जेवणा- खेरीज इतरत्र लक्ष न जाणें. २ एखाद्या कार्यास घाईनें आरंभ होणें. ३ बोंब मारणें. हातातोंडास येणें-१ तारुण्यावस्था प्राप्त होणें (लग्न झालेली स्त्री, तरुण मुलगा इ॰). २ फल देण्याच्या स्थितीस येणें. हातापायांचा चौरंग होणें-पेटके वगैरेमुळें हातपाय आंखडणें. हातापायांचे डगळें होणें- पडणें-मोडणें-अशक्तपणानें अंगास कंप सुटणें; अंग शिथिल होणें. हातापायांचे ढीग पडणें-होणें-भीतीनें, आजारानें अशक्त असहाय्य होणें. हातापायांच्या फुंकण्या होणें- अशक्ताता, निर्बलता येणें. हाता(तीं) पायां(यीं) पडणें- १ गयावया करणें; प्रार्थना करणें. २ शरण जाणें; नम्र होणें; दया याचिणें. हाताबोटावर येणें, हातावर येणें-आतां होईल, घटकाभर्यानें होईल अशा स्थितीस येणें; हस्तगत कबज्यांत, साध्य होण्याच्या अगदी बेतांत असणें. हाताला चढणें-प्राप्त होणें. 'संसार कशाचा जरि न हाताला चढली ।' -राला ११२. हाताला येईल तें-जें कांहीं हातांत सांपडेल तें; ज्याचेवर हात पडेल तें. हाताल लागणें-गमावलेल्या, फुकट गेलेल्या, नासलेल्या, बिघडलेल्या वस्तूंतून अल्प अंश मिळणें. 'कापडांत पैसें घालूं नका, त्यांतून हाताला कांहीं सुद्धां लागणार नाहीं.' हाताला वंगण लावणें-लांच देणें. -राको १३३७. हाताला हात लावणें-१ पति पुण्याहवाचनादि धर्मसंस्कारास बसला म्हणजे पत्नीनें त्याच्या हातास नुसता हात लावणें (म्हणजे तिलाहि त्याचें फळ मिळतें). २ स्वतः कांहीं न करतां दुसर्यानें केलेल्या कामाच्या फळांत वांटेकरी होणें; दुस- र्याच्या कार्याला अनुमति देणें. हातावर असणें-पूर्णपणें साध्य असणें. हातावर घेणें-आणणें-काढणें-तारण, गहाण न ठेवतां पैसे उसनें आणणें, काढणें, घेणें. हातावर तुरी देणें-देऊन पळून जाणें-हातावर हात देऊन-मारून पळणें-पळून जाणें-फसविणें; डोळ्यादेखत फसवून पळून जाणें; देखत देखत भुल- विणें. 'सुभद्रा काबीज करण्यासाठीं श्रीकृष्ण परमात्म्याच्या मदतीनें बलिरामाच्या हातावर ज्या तुरी दिल्या... तें पाहून तरी आम्हांस कधीं विषाद झाला आहे काय ?' -आगर. हातावर दिवस काढणें-लोटणें-मोठ्या कष्टानें संसार चालविणें. हातावर धरणें-हातांवर संभाळीत राहावयास लावणें (मुलीनें). 'यानें मला सकाळपासून हातावर धरिलें.' हातावर पाणी पडणें- भोजनोत्तर आंटवणें. 'हातावर पाणी पडलें कीं चालला बाहेर.' हातावर पिळकणें-लांच देणें. हातावर पोट भरणें-संसार करणें-अंगमेहनत, भिक्षा, नौकरी करून उपजीविका करणें. हातावर मिळविणें-मिळवावें व खावें अशा स्थितींत राहणें. हातावर येणें-जवळ येऊन ठेपणें. हातावर येणें-लागणें- दूध देऊं लागणें-थानास वासरूं न लावतां किंवा पान्हवण (सरकी इ॰) पुढें न ठेवतां जनावरानें दूध देणें, पान्हवणें. हातावर शीर घेऊन असणें-कोणतेंहि धाडसाचें कृत्य कर- ण्यास सदां सिद्ध असणें. हातावर हात चोळणें-रागानें तळ- हात एकमेकांवर घासणें; चरफडणें. 'इंद्रें स्वतातघातक पाठीसीं घातला म्हणोनि करें । कर चोळी...' -मोआदि ७.४०. हाता- वर हात मारणें-१ एखादी गोष्ट, सट्टा इ॰ पटला म्हणजे दुस- र्याचे हातावर आपला हात मारणें. २ वचन देणें. हातास हात लावणें-(देणार्याच्या, घेणार्याचे हातास स्पर्श होणें) द्रव्यलाभ होणें. हातास-हातां-हातीं चढणें-प्राप्त होणें. 'तो किल्ला माझ्या हातीं चढला.' 'नवनींत मंथनावांचून । हातां न चढे सहसाहि ।' हातीं धरणें-१ स्वतःच्या देखरेखीखालीं घेणें; एखाद्यास आपल्या आश्रयाखालीं घेणें. २ निरंकुशपणें मोकाट सोडणें (जीभ, तोंड, पोट इ॰ इंद्रियें). हातीं धोंडे घेणें-१ विरुद्ध उठणें. २ वेड्यासारखें करणें. हातींपायीं (अन्न इ॰) डेवणें-धावणें-येणें-रेवणें-जाड्य, सुस्ती येणें; शिव्या देण्यास तयार होणें. हातींपायीं उतरणें-सुटणें-मोकळी होणें-सुखरूपपणें बाळंत होणें हातींपायीं पडणें, लागणें- अतिशय विनवण्या, काकुळत्या करणें. हातीं भोपळा घेणें- देणें-भिक्षा मागणें, मागावयास लावणें. आडव्या हातानें घेणें-१ चोरून; चोरवाटेनें घेणें. २ झिडकारणें; भोसडणें; तुच्छता दाखविणें; कचकावून खडकाविणें; मारणें. आडव्या हातानें घेणें, चारणें-बाजूनें, तोंडांत हात घालून खाऊं घालणें; औषधोपचार करणें (घोडा इ॰स). (देणें-चोरून देणें-मारणें- मागल्या बाजूनें मारणें-ठोकणें). एका हाताचीं बोटें पण सारखीं नाहींत-सारख्या परिस्थितींतील माणसें असलीं तरी त्यांच्यांत थोडाफार फरक असतो. दोहों हाताचे चार हात करणें-होणें-लग्न करणें, होणें या हाताचे त्या हातावर- क्रिवि. ताबडतोब; जेव्हांचे तेव्हांच (दुष्कृत्याची फेड लवकर व खात्रीनें मिळते या अर्थीं). या हाताचें त्या हातास कळूं न देणें-अत्यंत गुप्तपणें करणें. रिकाम्या हातानें-जरूं- रीच्या साधनां-उपकरणां-सामग्रीखेरीज; कांहीं काम न करतां. याचा हात कोण धरीसा आहे ? -याच्या वरचढ, बरो- बरीचा कोण आहे ? याचा हात धरण्याची शक्ति कोणास आहे ? हातांत काय तागडू मिळाला-(व) कोणता फायदा झाला ? हातांत नारळाची आई (नरोटी) देणें-भिक्षा मागावयास लावणें. सामाशब्द- ॰अनार-पु. शोभेच्या दारूचा एक प्रकार. ॰इंद-न. (कों.) खेंकडे पकडण्याचें जाळें. ॰उगावा-पु. १ एखाद्या किचकट, अडचणीच्या कामांतून, धंद्यांतून अंग काढून घेणें. २ सूड; पारिपत्य. (क्रि॰ करणें). ३ कर्जाची उगराणी; घातलेलें भांडवल परत मिळविणें. [हात + उगवणें] ॰उचल-स्त्री. १ पेढींतून स्वतःची रक्कम आतां थोडी मग अशा रीतीनें खर्चण्यास घेणें. २ मूळ भांडवल; मुद्दल. उचल मध्यें पहा. ॰उचला-वि. १ आप- खुषीनें, हात उचलून दिलेला (पदार्थ). २ ज्याचा स्वतः करण्याबद्दल पत्कर घेतला आहे असा (व्यवहार, उद्योग). ॰उसना-ना-वि. थोडा वेळ उसना घेतलेला; लवकर परत करण्याच्या बोलीनें आणलेला (त्यामुळें लेख इ॰ लिहून न घेत दिला-घेतलेला). ॰उसणें-नें-न. थोड्या मुदतींत परत कर- ण्याच्या बोलीनें (लेख करून न देतां) उसनी घेतलेली रक्कम. ॰कडी-स्त्री. हातांतील बेडी. 'मन सिंतरील विवेकासीं । यालागी हात कडिया दोहींसीं ।' -एभा २३.९५१. ॰कर- वत-पुस्त्री. हातानें चालविण्याची लहान करवत. ॰करवती- स्त्री. लहान हात करवत. ॰करीण-स्त्री. अचळाला हात लावतांच (वासरूं न सोडतां किंवा आंबोण न ठेवतां) पान्हा सोडून दूध देणारी गाय; म्हैस. इच्या उलट पान्हावणकरीण. ॰कापें-न. (गो.) लांडी, बिन बाह्यांची बंडी. ॰काम-न. हस्तकौशल्याचें काम (यांत्रिक कामाच्या विरुद्ध); हस्तव्यवसाय. (इं.) हँडफ्रॅक्ट. ॰कैची-कचाटी- स्त्री. आलिंगन; मिठी. ॰खंड-वि. १ मधून मधून कामांत सोडवणूक करणारा; मदतनीस (मूल, मित्र, शेजारी); अडल्या वेळीं आपल्या कामीं उपयोगी पडणारा. २ हात खंडा पहा. [हात + खंड = खळ, विसावा] ॰खंडा-वि. निष्णात, करतलामलकवत् असलेली; म्हणाल त्यावेळीं तयार (विद्या, कला). ॰खर्च-पु. किरकोळ खर्च; वरखर्च. ॰ख(खं)वणी- स्त्री. लहान खवणी. ॰खुंट-खुंटा-पु. (विणकाम) वशारन पसरलेल्या लांबीपाशीं असलेल्या समोरच्या खांबापासून मागा पाशीं बसण्याच्या जागेजवळ उजवीकडे दोरी बांधावयाची खुंटी. ॰खुरपणीचें लोणी-न. हातखुरप्या नारळाचें खोबरें. ॰खुरपा-वि. हातानेंच आंतील खोबरें खरवडून काढण्याजोगा (कोंवळा नारळ). ॰खुरपें-न. १ हातखुरपा नारळ. २ गवत काढण्याचा लहान विळा. ॰खे(खो)रणें-न. कलथा; उलथणें; झारा. (क्रि॰ लावणें-अन्नास, पैक्यास = पैका उकळण्याचा सपाटा). म्ह॰ हातखेरणें असतां हात कां जाळावा. ॰खेवणें-न. १ हातवल्हें. २ मदतनीस; हाताखालचा माणूस. ॰खेव्या-व्या-पु. हातखेवणें अर्थ २ पहा. ॰खोडा-पु. हात अडकविण्याचा सांपळा. 'चंद्रसूर्याचा हातखोडा । काळा कैसेनि घालिजे ।' -भाए ५४९. ॰गाडी-स्त्री. हातानें ढकलून चालविण्याची गाडी. ॰गुंडा-धोंडा-पु. १ हातानें फेकण्या-उचलण्या-जोगा दगड. 'कुश्चीतभावाचे हातगुंडे ।' -ज्ञाप्र २६५. २ असला दगड हातानें जेथवर फेंकला जाईल तितकें अंतर. ॰गुण-पु. (बरेंवाईट करण्याचा योग, गुण) नशीब; हातीं (काम, माणूस) धरणाराचा प्रारब्धयोग. हस्तगुण पहा. ॰घाई-स्त्री. १ हातानें वाजवावयाचें वाद्य जोराजोरानें, आवेशानें वाजविणें. २ (ल.) उतावळेपणा; जोराची हाल चाल. (क्रि॰ हातघाईवर, हातघाईस येणें-मारामारी करणें). ॰चरक-पु. १ हातानें फिरवून रस काढावयाचा चरक. २ हात घाणी. ॰चलाख-वि. चोर; उचल्या. ॰चलाकी-खी-स्त्री. हस्तचापल्य; लपवाछपवी; नजरबंदीचा कारभार (गारुडी, सराफ इ॰ चा). ॰चाळा-पु. १ हाताचा अस्थिरपणा; चुळबुळ; हातानें कांहीं तरी उगीच करीत रहावें अशी लागलेली खोड; हातचेष्टा. (क्रि॰ लागणें). २ अशा प्रकारानें होणारें नुकसान. (क्रि॰ करणें). ३ सदोदित हात गुंतलेला असणें; त्यांत निमग्न असणें (वाढता धंदा, व्यापार, खेळ इ॰ त); देवघेवीचा मोठा उद्योग. ॰चिठी-चिटी-ट्टी-स्त्री. १ अधिकार्यानें शिक्का- मोर्तब न करतां आपल्या हातच्या निशाणीनेंच पुरी केलेली चिठी, हुकूम. २ कोणाहातीं पाठविलेली चिठी-चपाटी. ॰चे हातीं- च्या हातीं, हातोहातीं-किवि. लेगच; ताबडतोब; आतांचे आतां; क्षणार्धांत पटकन् (करणें, घडणें). 'ही गडी हाताचे हातीं जाऊन येईल.' 'हाताचे हातीं चोरी-लबाडी-शिंदळकी' इ॰. ॰चोखणें-चुंफणें-न. तान्ह्या मुलास चोखण्यासाठीं हातांत देण्याची वस्तु. ॰जतन-स्त्री. हातानें केलेली मशागत (मालीस इ॰); रोज वक्तशीर घेतलेली काळजी. 'हा घोडा नुसत्या हातजतनानें इतका हुशार आहे.' ॰जुळणी-स्त्री. (ठाकुर) लग्न लागल्यानंतर मुलानें मुलीचे दोन हात धरणें. -बदलापूर १३८. ॰झाड-स्त्री. आपोआप उगवलेलें नसून मुद्दाम लाविलेलें झाड. ॰झाडणी-स्त्री. राग, तिरस्कार इ॰ नें हात झटकणें. ॰झालणा-पु. हातजाळें; हातविंड. ॰झोंबी-स्त्री. परस्परांचे हात धरून केलेली झटापट; हिसकाहसकी; झगडा. ॰तुक-न. १ हातानें वजन करणें. 'नव्हती हाततुके बोल ।' -तुगा ३४२३. २ अटकळ; अजमास. 'मग त्यागु कीजे हात- तुकें ।' -ज्ञा १८.१३१. ॰दाबी-स्त्री. लांच. 'मालकानें हात- दाबी केली म्हणजे माल त्यांना परत देतात.' -गुजा ६७. ॰धरणें-न. (खा.) सोधणें; स्वयंपाकघरांतील भांडीं उतरणें इ॰ चें फडकें. ॰धरणी माप-न. माप भरतांना त्याचे शेवटास डावा हात धरून, मापापेक्षां थोडें जास्त धान्य घेऊन केलेलें माप. बोटधरणी माप पहा. ॰धुणी-स्त्री. १ राजाच्या हात- धुणारास दिलेलें इनाम इ॰. २ स्वयंपाकघरांतील मोरी. ॰धोंडा- पु. १ हातानें उचलण्याजोगा धोंडा. २ धोंडा हातानें फेंकला असतां जेथवर जाईल इतकें अंतर; टप्पा. ॰नळा-पु. हातांत धरून सोडण्याचा, शोभेची दारू भरलेला नळा. ॰नळी-स्त्री. चपटें कौल. ॰निघा-गा-हातजतन पहा. हातजपणूक. ॰नेट- क्रिवि. १ (व.) हाताचा जोर, भार देऊन. २ (व.) हाता- जवळ. ॰पडत-पात-वि. हातीं असलेलें; अगदीं जवळ असणारें; लागेल त्यावेळीं ताबडतोब मिळणारें. ॰पहार-स्त्री. हातभर लांबीची पहार. ॰पा-हातोपा-पु. अंगरखा इ॰ ची बाही. ॰पाटिलकी-स्त्री. १ हातानें ठोकणें; चोपणें, बदडणें. तोंड- पाटिलकीचे उलट. २ बोलण्यापेक्षां प्रत्यक्ष कृति, काम. 'तोंड- पाटिलकी सगळ्यांस येते हातपाटिलकी कठीण.' ३ हस्तचापल्य; उचलेगिरी. ॰पाणी-न. १ लग्नांत रासन्हाणीचे वेळीं वधूच्या सासूनें तिचे हातांवर ओतावयाचें पाणी. (क्रि॰ घालणें). २ लग्नांत मांडव परतण्याचे दिवशीं सासूनें सुनेची बोहोल्यावर ओटी भरून, किंवा मांडवांत न्हातेवेळीं नवर्यानें केशरी रंगांत बुडवून तिचे हातांत घालवयाची अंगठी. ३ लग्नांत मुलाच्या हाताखालीं मुलीचा हात ठेवून त्यांवर समंत्रक पाणी घालणें. -बदलापूर २०५. ॰पान-पु. कोंका पडण्यापूर्वींचें केळीचें पान. ॰पान्हा- पु. हातकरीण गाय, म्हैस इ॰ नें सोडलेला पान्हा (वासरूं किंवा अंबोण दाखविल्याशिवाय). हातपान्ह्यास लगाणें, येणें, हातपान्ह्याची गाय इ॰ प्रयोग. ॰पालवी-स्त्री. हात पोंहो- चेल इतक्या उंचीवरील पाला. ॰पावा-वि. (कों.) हाताच्या आटोक्यांतील, हात पोहोंचेल इतक्या उंचीवरील (वेलीचें फूल इ॰ किंवा खोली-विहिरींतील पाणी इ॰). [हात + पावणें] ॰पिटीं-स्त्री. १ झोंबाझोंबी; गुद्दागुद्दी. २ (ल.) हातघाईची मारामारी. 'तंव राउतां जाली हातपीटी ।' -शिशु ९६८. [हात + पिटणें] ॰पेटी-स्त्री. हातानें भाता चालवून वाजवावयाची बाजाची पेटी; हार्मोनियम. २ सरकारी कामाचे कादगपत्र ठेवण्याची पेटी. -स्वभावचित्रें २४. ॰पाळी-स्त्री. चेंडूफळीचा एक प्रकारचा खेळ. -मखेपु ५६. ॰फळ-न. (बे.) मेर ओढण्याचें फळ. ॰फळी, हातोफळी-क्रिवि. हातोहातीं; लवकर. ॰बळ-न. हस्तसामर्थ्य. 'हातबळ ना पायबळ, देरे देवा तोंडबळ.' ॰बांधून डंकी-स्त्री. (कुस्ती) जोडीदारास खालीं आणल्यावर त्यानें आपला एक पाय धरला तर आपण दुसर्या पायानें जोडीदाराचे पाठीवरून झोंका घेऊन उडी मारून त्यास चीत करणें. ॰बेडी-स्त्री. कैद्याच्या हातांत अडकवावयाची बेडी; हातकडी. ॰बोनें-न. हातांत घेत- लेलें भक्ष्य. 'बुद्धीचेनि शाकें । हातबोनें निकें ।' -ज्ञा ६.२८२. ॰बोळावन-स्त्री. हातांनीं मार्गाला लावणें. 'जाणो नेदी योग्यता । ग्रहीं हातबोळावन करितां ।' -भाए ३४९. ॰भाता-पु. हातांत घेऊन फुंकावयाचा भाता; लहान भाता. ॰भार-पु. मदत; साहाय्य (विशषतः द्रव्याचें). (क्रि॰ लावणें). ॰भुरकणा- भुरका-वि. हातानें भुरकून खावयाजोगा (पेयपदार्थ). ॰भुर- कणें-भुरकें-वरील प्रकारचा पातळ पदार्थ. ॰भेटी-स्त्री. प्रेमानें हातांत हात घालणें. -एभा २८.५९२. ॰मांडणी-स्त्री. पैसे पावल्याची पोंच म्हणून पैसे नेणार्याची खतावणीवर घेतलेली सही. ॰मात-स्त्री. हात टेकणें. ॰मेटी हेटीमेटी-क्रिवि. आळसांत; निरुद्योगीपणानें; हातांवर व गुडघ्यावर टेकून रमतगमत (दिवस इ॰) घालविणें. 'दिवस गेला हातमेटीं चांदण्या खाली कापूस वेटी.' ॰रगाडा-पु. उसाचा हातचरक. ॰रवी-स्त्री. घुसळखांब, मांजरी यांचे विरहित हातानेंट फिरविण्याची लहानरवी. ॰रहाट- पु. हातानें ओढून पाणी काढण्याचा लहान रहाट. ॰रिकामी- स्त्री. विधवा स्त्री. -बजलापूर १७४. ॰रिती-वि. (महानु.) रिकामी विधवा. -स्मृतिस्थळ. ॰रुमाल-पु. १ तोंड वगैरे पुसण्याचा लहान रुमाल. २ नित्योपयोगी कागदपत्रें ठेवण्याच्या दप्तराचा रुमाल; चालता रुमाल; त्यांतील कागदपत्रांचें बंडल. ॰रोखा- पु. दस्तक; चिठी; आज्ञापत्र. 'पाराजीपंत वाघ यांस हातरोखा वरचेवर पाठवून अति आग्रहें अंतरवेदींत घालविलें.' -भाव १०२. ॰लाग-पु. हाताचा टप्पा. ॰लागास-लागीं येणें-असणें- कक्षा, आंवाका, आटोका, अवसान इ॰ त येणें, असणें. ॰लागा- लाग्या-वि. अनुकूल असणारा. 'तुमचे हातलागे लोक असतील.' -वाडबाबा १.६. ॰लावणी-स्त्री. १ वेश्येचा चिरा उतरणें; कौमार्यभंग. (क्रि॰ करणें). २ हाताची पेरणी; लागवण. -वि. हातपेरणीचें. ॰लावा-व्या-वि. हाताळ; चोरटा; चोरी करण्या- साठीं हात फुरफुरत असलेला. ॰वजन-न. १ जिन्नस हातांत घेऊन केलेलें वजन. २ अशाप्रकारें वजन काढण्याची लायकी. ॰वटी- हातोटी-स्त्री. १ हस्तकौशल्य; हस्तचातुर्य. २ (सामा.) कसब; नैपुण्य; चलाखी. 'अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये । परि ते हात- वटी चंद्री कीं आहे ।' -ज्ञा ९.२९. ३ विशिष्ट पद्धत, रीत, प्रकार. [हिं.] भाषणाची-पोहण्याची-व्यापाराची इ॰ हातोटी. ॰वडा- हातोडा-पु. सोनार, कासार इ॰ चें ठोकण्याचें हत्यार. ॰वडी हातोडी-स्त्री. लहान हातोडी. ॰वणी-न. १ हात धुतलेलें पाणी. २ (कों.) हातरहाटाचें पाणी पन्हाळांतून जेथें पडतें तेथील जमीनीचा उंच केलेला भाग; हातणी. ॰वल्हें-न. हातानेंच वल्हवावयाचें लहान वल्हें. ॰वश-वि. हस्तगत. ॰वशी-स्त्री. हात उगारणें. -शर. ॰वळा, हातोळा-पु. हातवटी पहा. म्ह॰ गातां गळा; शिंपता मळा, लिहितां हातवळा. ॰वारे-पु.अव. हातानीं केलेलें हावभाव; हाताची हालचाल. ॰विंड-न. (राजा.) हाता झालणा पहा. ॰विरजण-न. अजमासानें घातलेलें विरजण ॰विरजा-विरंगुळा-वि. कामांत मदत करण्याच्या लायक, लायकीस झालेला (पुत्र, शिष्य, उमेदवार इ॰) [हात + विरजणें] ॰शिंपणें-न. सोडवणी न देतां शेलणें इ॰ साधनानें भाजी- पाल्यास उडवून द्यावयाचें पाणी; असें पाणी शिंपणें. ॰शेकणें-न. (उसाचा चरक) चुलाण्यांत जाळ घालणारास त्याच्या मेहनती बद्दल द्यावयाचा गूळ. ॰शेवई-स्त्री. हातानें वळलेली शेवई; याचे उलट पाटशेवई. ॰सर-न. बायकांचा हातांतील एक दागिना, गजरा. 'हे पाटल्या हातसरांस ल्याली ।' -सारुह ६.२६. ॰सार- वण-न. खराटा, केरसुणी न घेतां हातानें जमीन इ॰ सारवणें. ॰सुख-न. १ दुसर्यास, शत्रूस हातानें मारूंन त्यामुळें अनुभवि- लेलें सुख (क्रि॰ होणें). २ हातानें दिलेला मार. ॰सुटका-स्त्री. १ एखाद्या व्यवहारांतून, धंद्यांतून स्वतः अंग काढून घेणें; मोकळें होणें. २ हातविरजा पहा. ३ हाताचा सढळपणा. ॰सुटी-स्त्री. औदार्य. 'हे हातसुटीक्षीरसागरा । वांचौनि नाहीं ।' -भाए ७६९. ॰सुतकी-स्त्री. पाथरवटाचें दगड फोडण्याचें हत्यार. ॰सूत-न. चातीवर हातानीं काढलेलें सूत. ॰सोकी(के)ल-सोका-वि. हाताच्या संवयीचा; अंगाखांद्यावर घेण्यास संवकलेला. 'केल कुत्रा हातसोंका ।' 'घडो नेदि तीर्थयात्रा.' -तुगा २९५४. ॰सोडवण-नस्त्री. हातसुटका अर्थ १,२ पहा. ॰सोरा-र्या सुरा-र्या-पु. कुरड्या इ॰ करण्याचा सांचा. ॰हालवणी-स्त्री. प्रवाशांवरील एक जुना कर (त्यांच्या हात हालवण्याच्या क्रियेबद्दल हा कर असे). हातचा-वि. १ हातानें दिलेला; स्वाधीनचा; हातांतला; हातानें निर्मिलेली, मिळविलेली, दिलेली (वस्तु, काम, उत्पादन इ॰). 'शुद्राचे हातचें पाणी स्नानसंध्येस घेऊं नये.' 'रोग्यास औषध देणें मनुष्याच्या हातचें आहे-आयुष्य घालणें नाहीं.' २ (अंकगणित) पूर्णांकाची बेरीज करतांना बेरजेच्या संख्येंतला अंक ज्या स्थानाचा त्या स्थानीं मिळविण्याकरितां उरलेला अंक. (क्रि॰ येणें; रहाणें; ठेवणें). ३ लवकर हातीं येणारें; अवसानांतील. ४ ताब्यांतील; कबजांतील. म्ह॰ 'हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये.' ॰चा पाडणें-१ हातां- तील सोडणें. २ एखाद्यास त्याचे ताब्यांतील वस्तू्स मुकविणें. ॰चा-धड-नीट-वि. नीटनेटकें काम करणारा (लेखक, कारागीर). ॰चा फोड-पु. फार प्रिय माणूस. तळहाताचा फोड पहा. ॰चा मळ-पु. सहज घडणारी गोष्ट. 'सरळ, सोपी आणि बालिकाबोध भाषा कशी वापरावी हें म्हणजे माझ्या हाताचा मळ आहे.' -कीच. ॰चा सुटा-वि. सढळ हाताचा. हातवा-पु. १ (बायकी) गौरीपूजनाचे सणांत हळदीकुंकवानें हात भिजवून जमिनीवर छाप मारणें. २ लग्नांत नवर्याच्या मिरवणुकीच्या मागें धरावयाचा कणकेचा दिवा. ३ घोड्याचा खरारा, साफ करण्याचा काथ्याचा पंजा. ४ काडवात मनको. ५ (कर्हाड) न्हाणवली बसवितांना, मखर बांधावयाचे ठिकाणीं, कुंकू पाण्यांत भिजवून हातानें पांच उलटे पांच सुलटे ठसें उठविणें. हातळ, हाताळ-ळु-वि. चोरण्याची संवय असलेला; चोर; भामटा. हातळणें, हाताळणें-उक्रि. १ हात लावणें; चोळ- वटणें; चिवडणें, २ हाताळ माणसानें वस्तू् चोरणें. हातळी, हाताळी, हाताळें-स्त्रीन. १ घोड्याचा काथ्या इ॰ चा खरारा. २ भात्याची बोटांत, हातांत अडकवावयाची चामड्याची वादीं. ३ (कर.) भाकरी. हाता-पु. हातांत राहील इतका जिन्नस, पसा (फळें, फुलें इ॰ पांच-सहा इ॰ संख्येचा संच एकेक वेळ हातांत घेऊन बाजूस ठेवतात). हाताखालचा-वि. १ मदतनीस; हाता- खालीं काम करणारा. २ उत्तम परिचयाचा; माहितींतील. ३ हातां- तील; कबज्यामधील; स्वाधीन. ४ दुय्यम; कमी दर्जाचा. हाता- खालीं-क्रिवि. १ सत्तेखालीं; दुय्यम प्रतींत. २ स्वाधीन. ३ जातांजातां; हातासरशीं; सहजगत्या. 'मी आपला घोडा विका वयास नेतोंच आहे, मर्जीं असली तर हाताखालीं तुमचाहि घोडा नेईन आणि विकीन.' हाताचा उदार, मोकळा, सढळ- वि. देणगी इ॰ देण्यांत सढळ. हाताचा कुशल-वि. हस्त कौशल्यांत निपुण, प्रवीण. हाताचा जड-बळकट-थंड-वि. १ चिक्कू; कृपण. म्ह॰ हाताचा जढ आणि बोलून गोड. २ मंद (लेखक). हाताचा जलद-वि. काम करण्यांत चलाख हाताचा फटकळ-वि. फटाफट मारणारा; मारकट. हाताचा बाण-पु. वर्चस्व, पगडा, वजन पाडणारें कृत्य, गोष्ट (क्रि॰ गमावणें; दवडणें; सोडणें). हाताजोगता-वि. १ हातांत बसेल; मावेल; धरतां येईल असा. २ हात पोहोचण्याजोगें. हाता- निराळा-वेगळा-वि. १ पूर्ण; पुरा; सिद्ध केलेला; पुन्हां हात लावण्याची जरूरी राहिली नाहीं असें (काम, धंदा इ॰). 'हा दुर्निवह कोश एकदां हातानिराळा झाला म्हणजे दुसरें काम घेतां येईल.' २ -क्रिवि. एकीकडे; बाजूस. 'कामापुरती भांडीं वहिवाटींत ठेवा वरकड हातानिराळीं ठेवा.' हातापद्धति-स्त्री. दलाल माल घेणार्याच्या हातावर रुमाल टाकून गुप्तरीतीनें मालाची किंमत माल घेणार्याकडून अजमावतो ती पद्धत. हाताची थट्टा-स्त्री. थट्टेंनें मारणें (थापटी इ॰); चापट देणें. (तोंडी थट्टा नव्हे्). हाता(तो)फळी-स्त्री. गुद्दागुद्दी; मारामारी; कुस्ती; हातझोंबी; धक्काबुक्की. 'मजसीं भिडे हातोफळी ।' -ह १९.१४३. -क्रिवि. पटकन्; चट्दिशी; तत्काळ; हातावर हात मारून. [हात + फळी] हातावरचा संसार-हातावरचें पोट-पुन. मजुरी, कामधंदा करून स्वतःचें कसेंतरी पोट भरणें (क्रि॰ करणें; चालविणें) थोड्या पगाराची, कष्टाची नोकरी करून उदरनिर्वाह. हातावीती- क्रिवि. हातोहात पहा. 'सर्वज्ञ हातावीती पुढें जाती ।' -पुच. हातासन-न. हातवटी. 'अन्योपदेशाचेनि हातासनें ।' -ज्ञा ६.११९. हातासरसां-क्रिवि. त्याच हातानें, प्रकारानें; तसेंच; त्याच बरोबर; चालू कामांत आहे तोंच. 'उष्टी काढतो आहेस तों हातासरशीं भांडीं घास मग हात धू.' हातिणें-अक्रि. मारणें. -मनको. हातिवा-स्त्री. काडवात. 'उजळोनि दिव्य तेजा हातिवा ।' -ज्ञा १६.२३. हातुवसीया-विय एक हात अंतरा- वरील. 'हातवसिया कळागंगा पार्वती ।' -धवळे ३१ हातोणी- स्त्री. (व.) खरकटें पाणी; हातवणी. हातोपा-हातपा पहा. हातोपात-ती-क्रिवि. एका हातांतून दुसर्या हातांत. वरचेवर; हातोहात. -ज्ञा १८.१५६. हातोरी-क्रि. (ना.) हातानें; साहा- य्यानें. हातोवा-पु. (महानु.) अंजली; ओंजळ. 'हातोवा केवि आटे अंभोनिधि ।' -भाए २१७. हातोसा-पु. मदत; हातभांर. (क्रि॰ देणें), हातोहात-ती-क्रिवि. १ हातचेहातीं; हातोपात. २ चटकन्; भरदिशीं. (क्रि॰ येणें = मारामारी करणें). 'हिंवांळ्याचे दिवसांत दुपार हातोहात भरतें.' हातोळा-हात- वळा पहा. हातोळी-स्त्री. (व.) लग्न. हात्या-पु. १ पाणर- हाटाचा दांडा. २ घोडा घासण्याची पिशवी; खरारा. हाताळी अर्थ १ पहा. ३ मागाच्या फणीची मूठ. ४ काहिलींतील गूळ खरवड- ण्याचें खुरपें. ५ (कर.) मोठी किल्ली.