मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

गूळ गूळ गोष्टी

गूळ गूळ गोष्टी gūḷa gūḷa gōṣṭī f pl Sugary speech; words of soft adulation or of blandishment.

मोल्सवर्थ शब्दकोश

गूळ

पु. आटवलेला उंसाचा रस; पदार्थाला गोडपणा येण्यासाठीं रस आटवून केलेला घन पदार्थ; साखरेचा कच्चा प्रकार, अवस्था; तांबडी साखर. [सं. गुड; प्रा. गुल; पाली गुळ; कों. गोड; खा. गूय] (वाप्र.) ॰करणें-उपहास, निंदा करणें. ॰देणें-हातीं देणें-१ लालूच दाखविणें; लांच देणें. २ फसविणें; भुरळ घालणें; झुलविणें; तोंडावर हात फिरविणें. ॰पुर्‍या वाटणें-हौस पुरविणें. गुळमटणें-१ (राजा.) अंबा; चिंच इत्यादींनी गुळमट, गोडसर होणें. २ गुळमटणें; संदिग्ध, अड- खळत बोलणें. म्ह॰ १ गाढवास गुळाची चव काय? २ जो गळानें मरतो त्याला विष कशाला? सामाशब्द- ॰आंबा, गुळंबा-ळांबा, गुळांब-पु. एक पक्वान्न. गुळाच्या पाकांत शिजविलेल्या आंब्याच्या फोडी; गुळाचा मोरंबा. ॰कैरी-स्त्री. (व.) गूळ घालून केलेलें बिन मोहरीचें आंब्याचें लोणचें. ॰खोबरें-न. (गूळ आणि खोबरें यांचा खाऊ). १ (ल.) निवळ फसवणूक; लांच; लालूच. 'गुळखोबरें विलोकुनि भलत्याहि जनासि बाळक वळावा ।' -मोउद्योग ७.९. २ पोकळ भाषण, वचन. ॰चट-चीट-मट-वि. १ थोडेंसें गोड; गोडसर. 'येक्या सगें तें कडवट । येक्या सगें तें गुळचट ।' -दा ११.७. १६. २ (तंजा.) गोड; मधुर. ॰चट, चीट-गूळसाखर वगैरे गोड पदार्थ. गुळण्णा-पु. (गो.) गुळाचा गणपति. [गूळ + अण्णा] गुळत्र- य-न. गूळ, राब, काकवी यांचा समुदाय. 'मद पारा गुळत्र ।' -दा १५.४. १५. गूळदगड-धोंडा-पु. १ गुळाच्या ढेपेंत सांप- डणारा दगढ. 'गुळासारिखा गुळदगड । परी तो कठिण निचाड ।' -दा ८.५. ४७. २ (ल.) ढोंगी, कपटी मनुष्य. ॰धवा-धा- धिवा-धुवा-देवा-धेवा-धावी-पु. केवळ तांबडा नव्हे, केवळ पांढरा नव्हे असा मिश्र रंग; गुळी रंग. -वि. अशा रंगाचा (मोती, इ॰ पदार्थ). ॰धानी-वि. लालसर; गुळधवा रंगाचा (मोती). ॰पापडी-स्त्री. १ एक पक्वान्न; गुळांत पाकविलेल्या रव्याच्या वड्या. २ (राजा.) गुळाच्या पाकांत भाजलेली कणीक वगैरे घालून केलेले लाडू. ३ (ल.) एखाद्यानें मागें अपराध करून समक्ष गोड गोड, कपटी भाषण करणें; गुळगुळ थापडी; गुळमट; गुळवणी ॰पीठ-न. एकमेकांचा दाट स्नेह; मेतकूट; एकी; सलोखा; एक विचार. ॰पोळी-स्त्री. गूळ घालून केलेली पोळी. गुळमट, गुळंबट-१ गुळचट अर्थ १ पहा. २ (गो.) आंबटसर. ॰मारी-- स्त्री. दर उसाच्या मळ्यापाठीमागें २२।। शेर गूळ घ्यावयाचा कर. ॰वणी, गुळेणी, गुळोणी-न. १ गुळ मिश्रित पाणी. २ (कु. व.) गुळाच्या पाण्याचें कालवण (पोळीशीं खाण्यासाठीं). यांत कधीं थोडें पीठहि घालतात. [गूळ + पाणी] ॰वरी, गुळोरी-स्त्री. एक खाद्य. पक्वान्न; गुरोळी पहा. 'मांडा सारखपांडा गुळवरी ।' -एभा २७.२९०.; -ह १०.३४. गुळवा-गुळावा-गुळवी- व्या-गुळ्या, गुळरांध्या-पु. गूळ तयार करणारा. [गुड- वाहक] ॰शील-शेल-शेलें-न. (व.) तांबडा भोपळा उकडून त्यांत दूध, गुळ घालून केलेली खीर. गुळाचा गणपती- गणेश-पुवि. १ आळशी; मंद; गलेलठ्ठ; अचळोजी. २ होयबा; बुळा; दुर्बळ; शेणाचा पोहो. म्ह॰ गुळाचा गणपति गुळाचाच नैवेद्य = वस्तुतः एकच असणार्‍या दोन व्यक्ती; ज्याचें त्यासच देणें. गुळार, गुळहार-गुर्‍हाळ पहा. गुळेरस-पु (हेट.) नारळाचें दूध व गूळ घालून केलेलें पिठाचे गोळे यांचें बनविलेलें एक पक्वान्न.

दाते शब्दकोश

गूळ gūḷa m (गुड S) Coarse or raw sugar; juice of the sugar-cane inspissated by boiling. Pr. वाण्यानें आपला गूळ चोरून खावा. गुळाचा गणेश or गणपति A term for a mild, easy, assenting, acquiescing fellow: also for a fat, lazy, humorous, happy fellow, a Falstaff. गुळाचा गण- पति गुळाचाच नैवेद्य Making a present to a man out of his own gift. Pr. गूळ नाहीं पर गुळाची वाचा नाहीं? You deny me, but cannot you deny me sweetly? 2 गूळपुऱ्या वाटणें-करणें To make a feasting. Pr. जो गुळानें मरतो त्याला विष कशाला? Why beat him who dies under a look?

मोल्सवर्थ शब्दकोश

गूळ m Coarse or raw sugar, juice of the sugar-cane inspissated by boiling. गुळाचा गणेश or गणपति A term for a mild, easy, assenting, acquiescing fellow: also for a fat, lazy, humorous, happy fellow, a Falstaff. गुळाचा गणपति गुळाचाच नैवेद्य Making a present to a man out of his own gift.

वझे शब्दकोश

पु० गुड.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

गूळ      

पु.       उसाचा रस आटवून केलेला घन पदार्थ; साखरेचा कच्चा प्रकार, अवस्था. [सं. गुड] [क. गुळ] (वा.).गूळ करणे - उपहास, निंदा करणे. गूळ देणे, हाती देणे - १. लालूच दाखवणे; लाच देणे. २. फसवणे; भुरळ घालणे; झुलवणे; तोंडावर हात फिरविणे. गूळपुऱ्या वाटणे - हौस पुरवणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गूल

गूल gūla m f ( P) The charred or kindled part (of a match, wick, torch). 2 A flake of fire. 3 The head of a nail. 4 A circular mark made by burning: (as with the head of a nail &c.) 5 m unc A rose. 6 f () Clamor, uproar, hubbub. 7 fig. Publicity or notoriety. गूल करणें To extinguish (a torch or lamp).

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री. १ दंगल; आरडाओरड; गलगा. 'तीन रोज उपवास लश्करांत गुल एकच जाहाली.' -पेद २०.१७६. २ (ल.) बोभाटा; प्रसिद्धि; जाहीरपणा. 'रात्रींच गूल झाली असती तर फार वाईट होतें.' -बाळ २.१२७. [अर. घुला; फा. घुल्- घुला] ॰गलबा-पु. दंगा; बखेडा. 'खंबायतकर मोगल उगेच सरकारचे महाल खाऊन गूल गलब्याचे वेळेस हे शैत्य होतात.' -ऐटि १.८०.

दाते शब्दकोश

गूल m f The charred or kindled part (of a match, wick, torch). A flake of fire. The head of a nail. Clamour, uproar, hubbub. Fig. Publicity or notoriety. गूल करणें To extinguish (a torch or lamp).

वझे शब्दकोश

पुस्त्री. १ (आगकाडी, मशाल, वात, यांचा) जळा- लेला भाग. २ आगकाडीचें टोंक; जो भाग जळतो तो. ३ बंदुक इ॰ चा तोडा पेटविल्यावर शेवटीं जो कळीसारखा आकार होतो तो. ४ विस्तवाची काजळी; किटाळ; फुणगी. ५ खिळ्याचा माथा, डोकें. ६ खिळ्याचें डोकें इ॰ तापवून दिलेला वाटोळा डाग. -पु. गुलाब. गुल पहा. [फा. गुल्] ॰खिळा-पु. मोठया दरवाज्यांत ठोकतां येणारा रोंदाचा खिळा. गूलडाग-गुल्ल- डाग पहा.

दाते शब्दकोश

पु. (गो.) जरीची वीण. [फा. गुल् = फूल]

दाते शब्दकोश

पु० दिव्याचा कोळी, २ आगकाडीला लावलेला रांधा. ३ स्त्री० बातमी, खबर.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

गूल      

स्त्री.       १. दंगल; आरडाओरडा; गलगा : ‘तीन रोज उपवास लश्करांत गूल एकच जाहाली.’ - पेद २०·१७६. २. (ल.) बोभाटा; प्रसिद्धी; जाहीरपणा : ‘रात्रींच गूल झाली असती तर फार वाईट होतें.’ - बाळ २·१२७. [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       जरीची वीण. (गो.) [फा. गुल = फूल]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गूल

(पु.) [भ. घूल] गर्दी; हूल; गल्बा. “गोटांत गूल होऊन जीन-बन्दी देखील झाली होती.” (खरे ६।२८७५).

फारसी-मराठी शब्दकोश

(पु.) [फा. गुल्] वातीच्या टोंकाला जमलेली राखेची गोळी; काजळी; तापलेल्या वस्तूनें दिलेला डाग; आगकाडीच्या टोंकाला असलेलें ज्वालाग्राही मिश्रणाचें लिम्पण.

फारसी-मराठी शब्दकोश

जा(जो)गूल

न (गो.) वीज.

दाते शब्दकोश

सा(सां)गूळ

स्त्री. (को.) १ फणसाच्या गर्‍याभोवतीं असणारा तंतु; पाती; चार. २ चार, अठळ्यासकट फणसाची भाजी; संबंध फणसाची भाजी. [सागळ]

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

मळणें

सक्रि. १ धान्य कणसांतून तुडवून, झोडपून बाहेर काढणें; तुडविणें (धान्य). २ (गुऱ्हाळघर, कों.) ऊंस चरकांत घालून रस काढणें, पिळणें. 'गूळ मळणें' = गूळ तयार करणें. ३ तिंबणें; मऊ करणें (कणीक). ४ चेपणें; रगडणें; चोळणें (हात, पाय इ॰). ५ (घोड्याला) खरारा, मालीश करणें. ६ अंगास उटी, उटणें लावणें. ७ (ल) रहदारीनें वाट पाडणें; रस्ता रुळविणें; (मार्ग मळणें). 'मळलेला मार्ग सोडून आपला मुलगा किंचित बाजूला गेला. ...' -केले १.३१२. [सं. मर्दन; प्रा. मलन; पं. मळना; गु. मळवुं; हिं. मलना; सि. मलवुं] मळण- न. १ (राजा.) उंसाचा रस गुळासाठीं कढविणें. २ गूळ घर; गूळ तयार करण्याची जागा. मळणकर-पु. मळणी करणारा; धान्य मळणारा. [मळणी + कर] मळणतळण-न. स्वयंपाकाचीं कामें (सर्व साधारण); कणीक तिंबणें, तळणें इ॰ कामें मळणी-स्त्री. १ कणसें झोडपून, बैलाकडून तुडवून धान्य काढणें. (क्रि॰ काढणें; करणें; घालणें) २ उसाचा रस काढण्याची क्रिया. ३ (ल.) मळणीचा हंगाम. ॰घालणें-धिंगामस्ती; धांवाधांव करणें; धुळींत खेळणें (लहान मुलांनीं) मळणीवर येणें-काहीं एक पदार्थ तयार झाल्यावर येणें; आयत्या वेळीं येणें. मळीव-वि. १ मळलेलें; झोडपलेलें; तु़डवलेलें (धान्य). २ तिंबलेलें; चेपलेलें; पिळलेले इ॰.

दाते शब्दकोश

गणपति

गणपति gaṇapati m (S) The deity गणेश q. v. 2 At the sugarpress. A quantity of गूळ set apart in the name of गणपति on the pouring of the गूळ out of the boiler. This is the हक्क or due of the गुरव. Hence applied to the stone which the purchaser of गूळ throws into the scale having the weights. गणपतीचें केलें She has conceived. गणपतीचें झालें (There is some of Gan̤pati's work.) Some woman has conceived. गणपतीचें नांव घेणें To make a beginning.

मोल्सवर्थ शब्दकोश

गणपति, गणपती      

पु.       १. गणेश देव, गजानन. २. (ल.) गणोबा; ढेरपोट्या माणूस. ३. (गुऱ्हाळ) कढईतून गूळ बाहेर ओतताना गजाननाच्या नावाने एकीकडे थोडासा काढून ठेवलेला गूळ. यावर गुरवाचा हक्क असतो. ४. (ल.) गूळ खरेदी करताना वजनाच्या पारड्यात टाकायचा दगड. [सं.] (वा.) गणपतीचे करणे - स्त्रीने गर्भार होणे. गणपतीचे नाव घेणे - प्रारंभ करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ऊस, ऊंस

पु. साखर, काकवी, खडीसाखर, गूळ इ. ज्याच्या रसापासून तयार होतात अशी एक ५-६ हात उंचीची वनस्पती; ऊंस हिंदुस्थानांत सर्वत्र होतो. याचे पांढरा, तांबडा, काळा, पुंड्या, पटरी वगैरे प्रकार आहेत. तसेंच १ साल्या = दरसाल गाळला जाणारा; याच्या गुळाचा उतार कमी असतो. २ आड(ढ)साल्या = दीड वर्षानें गाळला जाणारा; याचा गूळ कसदार व रुचकर असतो. ३ खोडवा = जमिनी पासून वीतभर बुंधा राखून तोडतात व त्यास धुमारे फुटून होणारा; याचा गूळ चिकीचा असतो. उसाचा कोणताहि भाग फुकट जात नाहीं. हा समशीतोष्ण आहे. रस थंड असतो. वेडा ऊंस म्हणून एक औषधोपयोगी प्रकार आहे. २ उंसाचा फड; उभें पीक. ' उसांत जाऊन वाढें शोध किंवा आण. ' [सं. इक्षु; प्रा. इक्खु, उच्छु; हिं. ऊख.] ॰म्ह १ ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खावा?; = एखादी गोष्ट चांगली असली म्हणून आपल्या फायद्याकरितां तिचा हवा तसा उपयोग करावा काय? ऊंस गोड पण मुळ्या खोड = एखादा उदार भेटला म्हणून आपण त्याला साराच लुबाडूं नये. ऊस मुळासकट खाल्ला तर मुळापासून दातांना त्रास होऊन रक्त येतें, त्याप्रमाणें एखादा देणारा भेटला व त्याचा फार फायदा घेतला तर तोही त्रासतो. २ (व.) उसापोटीं काऊस = सूर्यापोटीं शनैश्वर. ३ उसांत जाऊन वाढें शोधी, किंवा आणणें. उंसांतलें वाड-१ उसाचा शेंडा, वाढें. २ (ल.) हुषार, होतकरू मुलगा. ॰खतविणें-उसास खत घालणें. ॰साळणें- सोजळणें-उसाचीं पानें-पाती सोलणें.

दाते शब्दकोश

बेळेंबोळें

न. (लिंगाईत) गूळ व भात (हे दोन्ही जिन्नस मेजवानीच्या वेळीं प्रथम वाढण्याची वेळीं प्रथम वाढण्याची चाल आहे). [का. बेल्ल = गूळ]

दाते शब्दकोश

बेळेंबोळें bēḷēmbōḷēṃ n A term amongst the लिंगाईत people for गूळ & भात or raw sugar and boiled-rice. These are the two first articles served round by these people at an entertainment.

मोल्सवर्थ शब्दकोश

गुळंबा or गुळांबा

गुळंबा or गुळांबा guḷambā or guḷāmbā m गुळांब n (गूळ & आंबा) Mangoes preserved or boiled in गूळ.

मोल्सवर्थ शब्दकोश

गुळव्या

गुळव्या guḷavyā n (गूळ) The director, at a sugarmill, of the processes of sugar-boiling and of making गूळ.

मोल्सवर्थ शब्दकोश

गुर्‍हाळ

न. १ ऊंस गाळण्याचा चरक; ऊंस गाळण्याचें यंत्र. २ चरक असलेली जागा. ३ गूळ तयार करण्याचा कार- खाना (यंत्र, इमारत इत्यादि सर्व उपकरणांसह). ४ ऊंस गाळण्याचा, गूळ करण्याचा धंदा, काम. 'गुर्‍हाळ-लागलें-चाललें- संपलें.' ५ (ल.) लांबट हकीकत, भाषण; कंटाळवाणें भाषण; चर्‍हाट. 'पण श्रीमंताचें गुर्‍हाळ आवरेना त्याला ते काय कर- णार ।' -ख. [गुळहार] ॰म्ह गोष्टीचें गुर्‍हाळ पायलीचा फराळ. ॰घर-न. गुळ करण्याचा कारखाना; गुर्‍हाळ. ॰म्ह गुर्‍हाळघर आणि लगीनघर बरोबर.

दाते शब्दकोश

गुऱ्हाळ      

न.       १. ऊस गाळण्याचा चरक; ऊस गाळण्याचे यंत्र. २. चरक असलेली जागा. ३. गूळ तयार करण्याचा कारखाना (यंत्र, इमारत इत्यादी सर्व उपकरणांसह). ४. ऊस गाळण्याचा, गूळ करण्याचा धंदा, काम. ५. (ल.) लांबलचक हकीगत, भाषण; कंटाळवाणे भाषण; चऱ्हाट : ‘पण श्रीमंतांचे गुऱ्हाळ आवरेना त्याला ते काय करणार ।’ - ऐलेसं [सं. गुर + आलय] (वा.) एरंडाचे गुऱ्हाळ - कंटाळवाणे, निरर्थक बोलणे; ज्यातून काही निषन्न होत नाही असे बोलत राहणे. गुऱ्हाळलावणे - बडबडत बसणे; चऱ्हाट लावणे : ‘मी आपला काहीतरी गुऱ्हाळ लावीत असतो.’ - कलंदर ४१०.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घारगा      

पु.       १. एक खाद्यपदार्थ; पक्वान्न; तांदळाच्या, गव्हाच्या रव्यात किंवा सोजीत गूळ घालून त्याची धापटी – चांदकी करून ही तुपात तळतात. तांबड्या भोपळ्यात गूळ घालून त्यात कणिक मळून त्याचा गोळा करून त्याच्या थापट्या तुपात तळून काढतात. त्याला भोपळ्याचे घारगे म्हणतात. २. श्राद्धाच्या वेळी केले जाणारे वडे. (घाऱ्या.) – (तंजा.) [गुज, घारी, का. गारिगे]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घटणें

अक्रि. १(कापड इ॰) आक्रसणें; आंखुडणें. २ (धान्य; तेल, तूप, गूळ इ॰ पदार्थ मापांत, वजनांत) कमी होणें. 'दोन मण गूळ आणला त्यांत पांच शेर घटला.' ३(शरीर, अवयव इ॰) बळकट होणें; मजबूत होणें; भरदार बनणें; सुदृढ बनणें. ४(शास्त्राभ्यास, कला, इ॰ व्यासंगानें) घोकून घोकून घोटून घोटून पक्का होणें; दृढता पावणें. 'गांवठी शाळेंतील मुलें अक्षर घटावें म्हणून बखरांच्या नकला करितात.' -विवि. ८.८ १४८. ५ (शास्त्रांत, कलेंत मनुष्यानें) तरबेज, निष्णात, कुशल होणें; सरावणें. 'त्या कामामध्यें मी घटलों, माझा हात घटला, माझी बुद्धि घटली.' ६ योग्य दिसणें; शोभणें; साजणें; सजणें; बेताचें होणें. ७ (काव्य.) कमी होणें; शांत होणें; नाहीशीं होणें; शमणें. 'जैसे भाजिलें करवटें । तेणें क्षुधा न घटे ।' ८ घट्टे पडणें; (शिथिल अवयव) दृढ होणें; झिजणें. 'कटि खांदे वाहतां घटले ।' -मध्वमुनि (नवनीत पृ. ४४६.) [सं. घट्-ट्ट]

दाते शब्दकोश

कडता

कडता kaḍatā m Excess above the forty-sher-maund (weight-maund) given in selling certain articles, e. g. 1½ sher per maund of oil, of तूप, or of गूळ. कांटा is a deduction made, in favor of the अडत्या, from the आखें or half पल्ला, e. g. of 5 sher per आखें of तूप or of गूळ, 3½ sher per आखें of oil. In some parts कडता is an excess of 10½ sher per पल्ला of weight, and कांटा is a surplus of 2½ sher, total 13; which, added to 120, the nominal amount of a पल्ला, constitute a पक्का पल्ला. In yet other districts there are other differences of the quantities of both कडता & कांटा.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. (चाळीस शेरांचा) वजनी एक मण जिन्नस विकला असतां त्याच्यावर द्यावयाचा वर्ताळा (उदा॰ तूप, गूळ, तेल यांच्या दर मणामागें १ ।। शेर कडता मिळतो. ॰कांटा- पु अडत्याला अर्ध्या पल्ल्यावर किंवा एका आख्या- वर जो वर्ताळा मिळतो तो. कांही ठिकाणी हा कडता दर वजनी पल्ल्यास १० ।। शेर असतो आणि कांटा २ ।। शेर असतो , मिळून १३ शेर, हे कच्च्या पल्ल्यास १२० शेरांत मिळविले म्हणजे १३३ शेरांचा पक्का पल्ला होतो. दुसर्‍या कांही ठिकाणी कांटा व कडता यांचे प्रमाण निरनिराळे आढळतें. पुण्यांत गुळ वजन करतांना १ मण्याच्यापुढें ढेपेचें वजन भरल्यास मणामागें चार शेरप्रमाणें कडता (वजन) कमी करतात. [का. कडत = छाट]

दाते शब्दकोश

करकी      

स्त्री.       डोण्यात गूळ ओतल्यानंतर काहिलीला लागून राहणारा गूळ; गुळाची खरवड. (बे.) [क. करकु = भांडे जळल्यामुळे त्याच्या बुडाशी बनणारी कीट]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

करकी

स्त्री. १ (वे.) डोण्यांत गूळ ओतल्यानंतर काहि- लीस लागून राहणारा गूळ; गुळाची खरवड. [का. करकु = भांडें जळल्यामुळें त्याच्या बुडाशीं बनणारें कीट]

दाते शब्दकोश

करंबे, करमणे      

न.       १. भाजलेल्या आंब्याच्या गरात गूळ व मसाला घालून केलेले तोंडी लावणे; चिंचेत गूळ, मसाला घालून केलेले तोंडी लावणे. २. रुचकर पदार्थ घालून भाजलेले किंवा उकडलेले फळ किंवा बाठ धरलेला आंबा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

करंबें, करमणें

न. १ भाजलेल्या आंब्याच्या बलकांत गूळ व मसाला घालून केलेलें तोंडीलावणें; चिंचेंत गूळ, मसाला घालून केलेलें तोंडी लावणें. २ रुचकर पदार्थ घालून भाजलेलें किंवा उकडलेलें फळ; रुचकर पदार्थ घालून भाजलेला किंवा उकडलेला बाठ धरलेला आंबा.

दाते शब्दकोश

खांडवी, खांडवे, खांडवीपोळी, खांडवीबोळी      

स्त्री. न. पु.       १. तांदळाचा रवा काढून त्यात गूळ, खोबरे, लवंगा, वेलदोडे इ. घालून त्याच्या वाफेवर शिजवलेल्या वड्या. या तुपाबरोबर खातात. (को.) २. गूळ, पीठ, नारळाचे दूध एकत्र करून शिजवून करतात ते पक्वान्न.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

लोघट

वि. (कों.) चिघळलेला; पातळ; लिबलिबीत (गूळ, कणिक, साखर इ॰) लोंधा-पु. चिकट व मऊ गोळा; पातळ व चिघळलेला पदार्थ, गूळ भात, कणिक इ॰. -वि. चिघळलेला; पातळ; बिलबिलीत; पाझरलेला.

दाते शब्दकोश

राब

स्त्री. १ काकवीपेक्षां दाट असा उसाच्या रसाचा रांधा. २ दुकणेकर्‍यास पिण्यास द्यावयाचें पेय. पीठ घालून दाट केलेलें आणि कढविलेलें साखर घातलेलें पाणी. ३ (कों.) रोपोकरितां भाजलेली जमीन. ४ अशा रीतीनें तयार केलेल्या जमिनीवर केलेलें रोप. ५ जमीन भाजण्याकरितां लागणारें गवत, पानें, केर- कचरा, टगाळ इ॰. ६ तेला-तुपाचा गाळ, बेरी. [देप्रा. रब्बा; हिं. राब] (वाप्र.) ॰करणें-(जुन्नरी) जमीन भाजण्यासाठीं पान-पाचोळा वगैरे शेतांत पसरणें. 'त्यानें भातासाठीं राब केला आहे.' ॰जाळणें-(जुन्नरी) शेतजमीनवर पान-पाचोळा पस- रून जाळून जमीन भाजणें. ॰बरडळणें-भाजलेली जमीन नांग- रून दांताळ्यानें ढेकळें फोडून सारखी करणें. राबड-स्त्री. चिड- बिड; रेंदा; चिखल; गाळ; खळमळ; रेबड. [राब] राबडी-स्त्री. रबडी पहा. बासुंदीचा एक प्रकार; साखर व मसाला घालून आट- वून दाट केलेलें दूध. २ पातळ गूळ; पातळ चिखल [राब] राबणी-स्त्री. टहाळ, शेण, गवत, बारीक माती घालून रोपटा तयार करणें व भाजणें; भाजावळ; दाढ. राबणें-सक्रि. जमीन नांगरणें, लागवडीस आणणें. 'आम्ही वर्षास दहा बिघे शेत घरीं राबतो.' राबरी-स्त्री. घट्ट न झालेला, रातळ गूळ. राबाचें पाणी-न. उपयोग केलेलें पाणी.

दाते शब्दकोश

स्त्री० काकवी, पातळ गूळ.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

गण

पु. १ जमाव; संख्या; समुदाय; मेळा; समूह. 'या स्वधर्मपूजा पूजिंता । देवतागणां समस्तां ।' -ज्ञा ३.९६. २ पंथ; जाती; वर्ग; विभाग; वर्ण; विभाग; वर्ण. ३ (ज्यो.) फल ज्योतिषांतील एक सज्ञा. हे गण तीन असून देवगण, मनुष्यगण, राक्षसगण अशीं त्यांचीं नांवें आहेत. २७ नक्षत्रांमध्यें एक एक गण नऊ वेळां येतो व ज्योतिषांत त्यांचा अनुक्रम (अश्विनीपासून) दे म रा म दे म दे दे इ॰ आहे. हा जन्मनक्षत्रावरून धरतात व लग्न इ॰ प्रसंगीं विचारांत घेतात). ४ तीन गुल्म सैन्य (२७ रथ, २७ हत्ती, ८१ घोडे, १३५ पायदळ). ५ गणपती देवाच्या हाताखालचा क्षुद्र देवतावर्ग; प्रमथादि शिवगण; शंकराचे सेवक; यावरून. ६ मंगलप्रसंगीं जेवण्यास किंवा समारंभाला बोलावलेल्या मंडळांतील एक पुरुष (याच्या उलट सुवासिनी); गणसवाशीण पहा. ७ (गणित) संख्या; रक्कम; बेरीज; जमा. ८ पंथ; संप्रदाय (न्याय- शास्त्र, धर्म यांतील). ९ (व्या.) धातूचें रूपख्यात; धातुपाठांतील भ्यादि अदादि गण प्र. १० गणपती देवता; गजानन. ११ (शाप.) कोटी; वर्ग; प्रत; (इं.) ऑर्डर. १२ मानस; अभिप्राय; हेतु; खरा उद्देश. 'ते माझे मुलास मुलगी देतात कीं नाहीं तो गण काढून या.' १३ जमाव; समुदाय; राशी, पुंज; संघ. समासांत- अहर्गण, मासगण, वर्षगण, भगण. इ॰ = दिवस, महिनें, वर्षें, तारे यांचा समूह. १४ सेवक, भक्त यांचा समूह. १५ (काव्य) अक्ष- रांच्या गुरुलघुत्वावरून दिलेली सज्ञा; गण तीन अक्षराचा होतो. हे गण आठ असून म, य, र, स, त, ज, भ, न अशीं त्यांचीं नांव आहेत. १६ (गणित)गुण्यांक व गुणकांक एक कल्पून केलेला गुणा- कार; वर्ग. १७ तमाशांतील ईश्वरस्तुतिपर प्रारंभीचें गीत (बहुधा गणपतीचें). 'माझ नमन आधीं गणा ।' -ऐपो ७. १८ (ना.) खेळांतील डाव. १९ (साकेतिक) राघोबादादा पेशवे याचे शागीर्द. 'श्रीमंतांचें तेथें गणांचा कारखाना.' -ख १२७८. २० (ल.) देवाच्या उत्सवांतील चोपदार, चवरी वारणारा, पालखी उचलणारा इ॰ प्रत्येक माणूस, व्यक्ति. २१ (इंग्रजीं- तील कोरम या शब्दास हल्लीं योजला जाणारा प्रतिशब्द) सदस्यां- (सभासदां) पैकीं निदान अमुक भाग किंवा किसान अमुक संख्या हजर असली तरच सभेची कायदेशीर बैठक होऊं शकते अशी किमान मर्यादा. -सभा ७१. संख्यामर्यादा. [सं. गण् = मोजणें] (वाप्र.) ॰न(ने)मणें- १ गणपतीची आराधना करणें; आराधने साठीं गणपतीस्थापना करणें २ धंद्यास लागणें; एखादी गोष्ट कर- ण्याचें ठरविणें. ॰चौथपुजणें-(ना.) मारणें; चोप देणें. ॰देणें, पुजणें-(व.) १ ठोक देणें; मारणे. 'लोकांनीं त्याचा गण दिला-पुजला.' २ डाव (खेळांतील) देणें किंवा घेणें. 'माझा गण दे' सामाशब्द-गणक-पु. कुंडली मांडणारा, नांव, रास, पंचांग पाहणारा ज्योतिषी, जोशी; पंचांग करणारा ज्योतिषी; दैवज्ञ. 'ब्राह्मण बोलाविले गणक जोशी ।' -ह २३.६६. [गण] ॰गोत-न. कुटुंब; घराणें; नातलग; संबंध; सोयरेधायरे; भाऊ बंद इ॰ व्यापकअर्थीं' गण गोत मित्र तूं माझें जीवन ।' -तुगा ७६९. [गण + गोत्र] ॰दीक्षा-स्त्री. १ जमावांत (किंवा शिष्य- मंडळींत) दाखल होण्याचा संस्कार; मंत्रोपदेश. २ पुष्कळ लोकां- करितां व्रताचरण; धार्मिक विधि. ३ ज्यांत गणपती देव मुख्य आहे असा विशेष प्रकारचा संस्कार. ॰दीक्षी- १ अनेक जातींचा उपाध्याक्ष; वर्णगुरू; आचार्य; पुरोहित. २ गणेशपूजेची दीक्षा घेतलेला पुरुष. ॰द्रव्य-न. सार्वजनिक मालमत्ता; समाईक ठेव सार्वजनिक किवा सर्वसाधारण भांडवल. 'गणद्रव्यचोरी ।' करी ।' -गुच २८.५६. ॰नाथ-पु. १ शिवगणांचा स्वामी; गणपती देव. त्यावरून. २ नायक; अधिपति. ॰नायक-पु. गणपतीदेव. 'ओं नमो जि गणनायेका ।' -दा १.२.१. 'उठाउठा सकळलोक । आधीं स्मरा गणनायक ।' -गणपतीचीभूपाळी ५. ॰गण- भोंवरी-स्त्री. मुलांचा एक खेळ; अंगार्‍या भिंगार्‍या. ॰पत- चतुर्थी-स्त्री. (अशिष्टप्रयोग) गणेशचतुर्थी. ॰पति-पु. १ गणेश देव; गजाजन. २ (ल.) ढेरपोट्या माणूस. ३ (गुंर्‍हाळ) कढईंतून गूळ बाहेर ओततांना गजाननाच्या नांवानें एकीकडे थोडासा काढून ठेवलेला गूळ; यावर गुरवाचा हक्क असतो. त्यावरून. ४ गूळ खरेदी करतांना वजनाच्या पारड्यांत टाकावयाचा दगड. गण पतीचें करणें-स्त्रीनें गर्भार होणें. ॰पतीचें केलें-स्त्रीस गर्भ राहिला. ॰पतीचें झालें-(कोण्या गणपतीची करणी) कोणी स्त्री गर्भार झाली. ॰पतीचें नांव घेणें-प्रारंभ करणें. म्ह॰ उंदराला बोललेलें गणपतीस लागतें. ॰पतिपूजन-न. १ गणेश पूजा. (कांही एक कार्यारंभीं करतात ती). २ (ल.) कार्यारंभ ॰पंचायतन-न. गणपती, शिव, नारायण, रवि व देवी अशा पांच धवता यांत गणपती प्रमुख असतो. ॰पूर्ती, भरती-स्त्री किमान मर्यादेइतके सभासद जमणें, जमाव; कोरम. 'सर- कारपक्षाच्या लोकांनी संगनमत करून दडा दिली असती तर योग्य गणभरती (कोरम) नाहीं म्हणून अध्यक्षांना सभा बर खास्त करावी लागली असती.' -सासं २.९९. ॰मंडळी-स्त्री. ठराविक नेमलेली, स्थापन केलेली मंडळी; जूट; तुकडी; टोळी; गट; समूह; टोळकें इ॰ ॰मध्य-न. पत्रिका अथवा जन्मकुंड- लींतील ऐक्य आणि शत्रुत्व या डोहोंहून भिन्न (गणमैत्री किंवा गणवैर नसणें); नवरा व बायको, धनी व चाकर इ॰ कांच्या गणांचा भेद जसें:- एकाचा देवगण तर दुसर्‍याचा मनुष्यगण. गण अर्थ ३ पहा. ॰मैत्री-स्त्री. जन्मपत्रिकेंतील गणांमधली मैत्री; एक गण असणें; बहुतेक दोघांचा (नवरा, नवरी; धनी, चाकर गण एक आला म्हणजे त्यास गणमैत्री म्हणतात. 'या मुलाची) व त्या मुलीची गणमैत्री येते कां पहा?' गण अर्थ ३ पहा. ॰वेष-पु. संघातील व्यक्तींचा ठराविक पोशाख; (इं.) युनिफॉर्म. 'नुसत्या हिरव्या रंगानें ते गणवेष इतके खुलून दिसले असते.' -सांस २.२१३. ॰वैर-न. जन्म पत्रिकेंतील गणांची प्रति- कलता, वैर, शत्रुत्व, जसें:-राक्षसगण आणि मनुष्यगण. गणश:-क्रिवि. जमाती-वर्ग-टोळी-मंडळीकडून. ॰सत्ताक राज्य-न. विशिष्ट प्रजास्ताक राज्य, याचा प्रमुख अधिकारी लोकनियुक्त असतो व सर्वांच्या हिताचे प्रश्न सर्वानीं मिळूनच सोडविले जातात या पद्धतीचें मूळ फार प्राचीनकाळापासून भारतवर्षांत दृष्टीस पडतें. ॰सवाशीण-स्त्री. १ गांवाचा मेहतर, पाटील किंवा चौगुला याची बायको; मेजवानी किवा इतर समारंभांतील एक हक्कदार व्यक्ति; गांवांतील स्त्रियांच्या गांव- भोजनांत हिला पहिल्यानें आमंत्रण घ्यावें लागतें. उत्तरेकडे पाटील किंवा त्या जागेवरील अथवा तत्संसबंधींच्या माणसाला गण म्हणतात व त्याच्या बायकोस (किंवा इतर स्त्रीसहि) सवाशीण म्हणतात त्यावरून. २ समारंभांतील भोजनप्रसंगीं बोलावलेला एखादा पुरुष व स्त्री (अथवा कोणतेंहि मेहूण).

दाते शब्दकोश

खांड

स्त्री. १ ताली, बंधारा, भिंत यांतील भेग, तडा, चीर भोंक. 'खाचरास खांड पडली.' २ कातरा: सड: दांता; खरा (तरवार, विळा यांच्या धारेवरील). ३ दांतांमधील खिंड. ४ पिवळसर व भरड, हस्तकृतीची साखर. ही थोडी अंबूस असते. 'खाये खीर खांड ।' -तुगा ४२९. -न. १ भक्कम व चौरस किंवा साधी तुळई, तुळवट. २ एखाद्या वस्तूचा तुकडा (सुपारी, बिब्बा, हळकुंड, चंदन, गोवरी इ॰) 'ऐसें ह सेंड्या कडिल खांड ।' -दा २०.३. ४. ३ टोळी; दाटी; कळप (बकरीं, मेंढ्या यांचा). ४ झाडाचा ठोकळा, भाग. ५ शेताचा तुकडा. ६ धान्याचा चुरा; कळण. -वि. १ दाट. २ भंगलेलें. 'असावें का खांड देउळीं ।' -भाए ४९३. [सं. खंड] सामाशब्द-॰क(ग)ळी शिवी-खांड- गाळी-स्त्री. सुवासिनी स्त्रीस रांड, बोडकी या अर्थाची शिवी. [तुल॰ सं. खंडालि = जिचा नवरा दुराचारी आहे अशी स्त्री]. ॰कापी सुपारी-स्त्री. क(का)चरी सुपारी; सुपारी कोंवळी असतां शिजवून व राप (सुपारीच्या काचर्‍या शिजविलेलें पाणी) शिंप- डून उन्हांत वाळवितात. व काचर्‍या काढतात अशा सुपारीला खांडकापी म्हणतात. हिलाच चुकीनें 'लवंग काचरीसुपारी' म्हण- तात. खांडकी-स्त्री. दगडाचा फोडलेला मोठा तुकडा; चीप; कळपा; फाडी; इमारतकामांतील खांडकीची पुढील चौरस बाजू घडीव, असून मागील उतरती व अणकुचीदार असते. खांडकें- न. उसाचें कांडे. खांडक्या-वि. (गुर्‍हाळ) उसाचे तुकडे करणारा; पेरुळ्या. खांडडोह-हो-पु. १ उन्हाळ्यांत नदीचा प्रवाह आटल्यामुळें मध्यें मध्यें प्रवाहाला पडलेले खंड; खंडित डोह. खांडवा; भाट-टी. २ (चुकीने) पाण्याच्या प्रवाहांतील खोल जागा (कोठली तरी). सामान्यतः अनेकवचनी प्रयोग. (क्रि॰ पडणें) ॰तुळई -स्त्री. तुळवट; खांड अर्थ ५ पहा. ॰तोळी -स्त्री. (राजा.) एक पक्वान्न; खांडवी. हें तांदुळाच्या कण्याचें करतात. ॰दोर-पु. (व.) बैलासबांधावयाचा दोर. ॰पासोळा-पु. खुनशी, आकसखोर मनुष्य. [खांड + फासळी] ॰फाडोळी-वि. (व.) एका बाजूस फांसळी कमी असलेलें (जनावर). रागखांडव-पु. एका प्रकारचा मोरंबा. कृति-साल काढलेल्या हिरव्या आंब्याच्या फोडी तुपांत पर- तून खडीसाखरच्या पाकांत शिजवून, मिरीं, वेलदोडे, कापूर यांचा वास लावून बरणींत ठेवणें. -योर १.८०. खांडव-पु. (संगीत) अवरोह. (क्रि॰ करणें). खांडव-पु. लग्नांत विडे, सुपारी वाटण्यासाठीं केलेली कापडाची (खणाची) झोळी. [खंडवस्त्र] खांडव-वा-पु. नदीच्या प्रवाहांत पडलेली भाटी; खांडडोह. ॰वी-स्त्री. वाळविलेल्या खार्‍या मासळीचा तुकडा. खांडवी- वें-वे-पोळी-बोळी-स्त्रीनपुअवस्त्री. १ (कों.) तांदुळाचा रवा काढून त्यांत गूळ, खोबरें, लवंगा, वेलदोडे इ॰ घालून त्याच्या वाफे वर शिजवलेल्या वड्या, या तुपाबरोबर खातात. २ गूळ, पीठ, नार- ळाचें दूध एकत्र करून शिजवून करतात तें पक्वान्न. ३ (क. सार- स्वत) कानोले. ॰वेल-स्त्री. एक मोठी वेल. ॰साखर-स्त्री. १ एक प्रकारची गुळी साखर. खांड अर्थ ४ पहा. २ खडीसाखर.

दाते शब्दकोश

रस

पु. १ चव; रुची; स्वाद; जिव्हेनें खारट, तुरट, गोड इ॰ जो पदार्थाचा धर्म समजतो तो. 'सुरभिदुग्धपान रस मजला समजे ।' -मोअनु २.७. २ चीक; द्रव; पान, फूल, फळ इ॰तील पातळ अंश. ३ ऊंस, आंबा यांतून निघणारा द्रवपदार्थ. ४ अर्क. ५ अन्नाचें रक्त व्हावयापूर्वींचें रूपांतर; शरीरांतील ज्या अन्नापासून रक्त व घाम बनतो ती अन्नाची अवस्था. ६ धातूचें द्रवरूप; कोणत्याहि धातूचा वितळून केलेला द्रवपदार्थ; सोनें, चांदी इ॰ची अग्निसंयोगानें झालेली द्रवरूप स्थिति. ७ (साहित्य) अंतःकर- णाच्या वृत्तीचें कांहीं कारणानें उद्दीपन होतें आणि त्या उद्दीपित झालेल्या वृत्तीच्या अनुभवानें किंवा अवलोकनानें अनुरूप विचार प्रकट करण्याची प्रेरणा होते तिला रस म्हणतात. रस नऊ आहेत- शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र व शांत. 'तैं नवरससुधाब्धीचा । थावो लाभे ।' -ज्ञा १०.७. ८ (ल.) गोडी; आवड; राम; मनोरमता; मोहकता (प्रसंग, साहित्य, भाषण, व्यापार इ॰ तील.) 'वचनांत कांहीं, रस नाहि पाही ।' -लीलावती. ९ प्रीति; प्रेम; अनुराग. १० कस; योग्यता. 'ऐसि- यांचा कोण मानितो विश्वास । निवडे तो रस घाईं डाईं' -तुगा ३३६२. ११ खाणींतील मीठ; खनिजक्षार; (गंधक, मोर्चूत इ॰). १२ पारा. १३ पुरुषाचें वीर्य किंवा रेत. १४ विष. १५ उत्तेजक द्रव्य (तेल, मसाला, साखर, मीठ इ॰) (संस्कृतमध्यें असे अनेक प्रतिशब्द या शब्दाला आहेत). १६ पाणी. 'तरी नुरोनि वेगळेंपण । रसीं भजिन्नलें लवण ।' -ज्ञा १७.१८. १७ दूध. 'कथा सुरभिंचा रस स्वहित पुष्कळ स्वादुहि ।' -कैका. १८ रसायन; औषध. 'पैं कळांतर गांठीं बांधिजे । मग पुढिलांचे काज कीजे । पूजा घेऊनि रसु दीजे । पीडितांसी' -ज्ञा १७.२८७. १९ नारळाच्या रसांत गूळ मिळवून तयार केलेलें पातळ पेय. [सं.] सामाशब्द- ॰कस-पु. १ रसज्ञता. -शर. २ रसाचा कस; रंग; बहार; गोडी. (क्रि॰ जाणें; घेणें). 'भोग आतां रसकस घे बरी ही संधी साप- डली ।' -प्रला १९९. [रस + कसणें] ॰केळी-स्त्री. (महानु.) रसकेलि; नवरसाची क्रीडा. 'जेही रसकेळि खेळति मनें । कळा- विदांची.' -भाए २७२. [सं. रस + केलि = क्रीडा] ॰गुल्ला- गोल्ला-पु. (व.) एक बंगाली गोड खाद्य पदार्थ; एक प्रकारची मिठाई. ॰द-पु. मेघ. [सं.] ॰पूजा-स्त्री. औषधाबद्दलची किंमत; वैद्याची फी. 'रसपूजा धरोनि पोटीं । वैद्य औषधांच्या सोडी गांठी ।' -एभा ११.१०४४. ॰बाळ-बाळी-बेळी-बेळ-स्त्री. केळयाची एक जात (सोनकेळयाप्रमाणें). [रस + का. बाळे = केळ; का. रसबाळे] ॰भंग-पु. १ गोडी जाणें; काव्यग्रंथ गानादिसंबंधीं वाचकश्रोत्यांचा विरस. २ बेरंग; सौंदर्यनाश. ३ उत्साह, उमेद, यांवर विरजण पडणें. [सं.] ॰भरित-वि. १ रसानें युक्त अगर भरलेलें; रसपूर्ण; (फळ इ॰). २ (ल.) चटकदार; गोड; मनोरंजक; सुंदर (भाषण, वर्णन, इ॰). [सं.] ॰भरू-वि. रसानें भरलेला (फलादि पदार्थ); रसपूर्ण; रसाळ. [रस + भरणें] ॰भावना-स्त्री. पुटें देण्याची रीत; किमयेची रीत. 'परी मात्रेचेनि मापें । दिव्यौषध जैसैं घेपे । कां कथिलाचें कीजे रूपें । रसभावनी ।' -ज्ञा १८.७७४. ॰भोजन-न. ज्या जेवणांत आंबरस हें मुख्य पक्कान्न आहे असें जेवण. ॰मय-वि. (रसपूर्ण) जलमय. 'अद्व- यानंदस्पर्शे । दिठी रसमय जाली असे । ते अश्रु नब्हती जैसें । द्रवत्वचि' -ज्ञा १८.१६०४. ॰रंग-पु. मकरसंक्रांतीचे दिवशीं कुंकु आणि गूळ हीं दोन पात्रांत भरून ब्राह्मणांस, सुवासनीस देतात तो; संक्रातीचें हळदीकुंकू. [रस आणि रंग] ॰राय-पु. (महानु) शृंगारस. 'निर्यास गेलें । रसरायाचें ।' -भाए ९९. ॰वडी-स्त्री. तोंडीलावण्याकरितां मसाल्याच्या रसानें युक्त हरभऱ्याच्या पिठाच्या वड्या करतात त्या; पाटवडी. ॰वंती-स्त्री. १ (प्र.) रसवती; वाणी; वाचा (रसाचें अधिष्ठान मानली जाणारी); वक्तृत्व. २ गोड भाषण. ३ जीभ. ४ एक वनस्पति. ॰वांगें-न. मसालेदार रसानें युक्त असें शिजवून तयार केलेलें सगळें वांगें; भरलेलें वांगें (भाजी). ॰वान्-वि. १ रसभरित-युक्त-पूर्ण. २ चवदार; स्वादिष्ट; मिष्ट. [सं.] ॰विक्रय-पु. (तेल, मीठ, लोणी, साखर, दूध, तूप, इ॰) रसाळ, पोषक पदार्थींची विक्री. शास्त्रांत हा दोष मानला आहे. [सं.] ॰वृत्ति-स्त्री. शृंगारादिक रसभाव. (क्रि॰ प्रकट करणें). 'येथ विभूती प्रतिविभूती । प्रस्तुत अर्जुना सांगिजेती । ते विद्गदा रसवृत्ती । म्हणिपैल कथा ।' -ज्ञा १०.४१. ॰सोय-स्त्री. स्वयंपाक; पक्कान्न. 'जैसी रांधवणी रससोय निकी । करूनियां मोले विकी ।' -ज्ञा २.२५४; -अमृ ५.४३. ॰स्वादन- न. स्त्रियांच्या शृंगारचेष्टांचें वैगरे वर्णन ऐकण्यामध्यें असलेली श्रद्धा, गोडी. 'हावभाव कटाक्षगुण । सुरतकाम निरूपण । तेथ ज्याचें श्रद्धा श्रवण । रसस्वाद त्या नांव' -एभा ११.७०७. ॰ज्ञा-वि. १ रस जाणणारा; रसिक; मर्मज्ञ. 'पुष्पाच्या मकरंदाचा रसज्ञ भ्रमरा- सारखा दुसरा कोणी नाहीं.' २ योग्यता जाणणारा; महत्त्व ओळ- खणारा. ३ रस, भावना, वृत्ति ओळखणारा. [सं.] ॰ज्ञता-स्त्री. रस जाणण्याचा गुण, पात्रता. ॰ज्ञतावात-ज्ञानवात-स्त्रीपु. रस जाणण्याखेरीज बाकी सर्व इंद्रियांची ज्ञानशक्ति यांचा नाश करणारा वात. रसरसणें-अक्रि. १ रसानें पूर्ण भरून असणें. २ (अग्नि) प्रज्वलित असणें; धगधगणें; प्रखरणें. ३ तापणें; जळजळीत असणें; जळजळणें (तापांत अंग, डोळे, उष्णतेनें पाणी, तवा इ॰. ४ ऐन तारुण्यांत, भर ज्वानींत असणें. ५ भर-भरांत असणें (देवी, गोवर, ज्या त्या हंगामांत उत्पन्न होणारे पदार्थ) किंवा संतापानें. 'संजयो विस्मयें मानसीं । आहा करूनी रसरसी । म्हणे कैसे पा देवेसी । द्वंद्व यया' -ज्ञा १४.४११. [रस ध्व.] रसरसीत- शीत-वि. १ रसाळ; रसपूर्ण. २ भर ज्वानीनें युक्त; तारुण्यानें मुसमुसलेली. ३ प्रखर; प्रज्वलित; तापून लाल झालेलें. ४ पिवळा शब्दामध्यें पहा. रसा-रस्सा-पु. १ पुष्पळ रस असलेली भाजी; मसाला इ॰ घालून केलेलें पातळ तोंडीलावणें (बटाटा इ॰चें). २ मांसाचें कालवण. [सं.] रसाधिपति-पु. वरुण. [सं.] रसाभास-पु. १ कृत्रिम, खोटी भावना; अनुचितपणें प्रवृत्त केलेला रस. उदा॰ पशुपक्ष्यादिकांचा शृंगार वर्णन करणें. हा शृंगार- रसाभास झाला. २ अशा तऱ्हेचें काव्य अगर नाटक. ३ स्थायी- भाव नांवाखालीं येणाऱ्या अष्टरसांपैकीं एकाचें केलेलें खोटें आवि- ष्करण; अशा रसाचें (काव्य, नाट्य रूपानें) केलेलें दिग्दर्शन. ४ कांहीं खोट्या बतावणीनें खरी भावना दडवून ठेवणें. [सं.] रसाल-ळ-वि. १ रसभरित; ज्यामध्यें रस पुष्कळ आहे असा (फलादि पदार्थ). २ रसयुक्त; मधुर; गोड. 'केळीचें दळवाडें । हळू पोकळ आवडे । परि फळोनिया गाढें । रसाळ जैसें ।' -ज्ञा १३.२१२. ३ चटकदार; मनोरंजक; आवडेलसें (भाषण). 'आतां टाकून बहुत शब्दजाळ । बोले रामकथा रसाळ ।' ३ बरका फणस यास दुसरें नांव. ४ गमतीचें; विनोदी; हास्यजनक (भाषण). ५ खमंग; चांगलें; मुरलेलें; चमचमीत (पाक, लोणचें, ओला पदार्थ) ७ रसिक; रसज्ञ. 'तूं सांग तो वर तुला रुचला रसाळे ।' -नल ९१. रसाळी-स्त्री. १ (व.) आंबरसाचें जेवण. 'अंबादासपंत खाड्याच्या येथें दरवर्षी एक रसाळी होते.' २ (कों.) उंसाच्या चरकाचें खालचें लांकूड, काठवट, रसिक-वि. १ मर्मज्ञ; गान, काव्य इ॰ रसावर विशेष प्रीति असून त्यांतील मर्म जाणतो तो; सहृदय. २ थट्टा-मस्करी, भाषण इ॰ द्वारा दुसऱ्याच्या आणि आपल्या अंतःकरणप्रवृत्तीस विनोद उत्पन्न करील असा. ३ गमत्या; विनोदी. ४ भावनाप्रधान. ५ चंवदार; स्वादिष्ट; मधुर. ६ (ल.) (काव्य) आल्हाददायक; सुखोत्पादक. [सं.] रसिकत्व-न. १ माधुर्य. २ रसिकता. -ज्ञा १८.३४७. रसिक रसीला-वि. रसाचा खरा खरा भोक्ता; इंष्कबाज. [रसिक + हिं. रसीला = रसदार] रसोत्पत्ति-स्त्री. १ रसाची उत्पत्ति, निर्मिति. २ विनोद; हास्य; करमणूक. [सं.]

दाते शब्दकोश

अडदावा

अडदावा aḍadāvā m Ground gram with गूळ (as given to colts).

मोल्सवर्थ शब्दकोश

आधण      

न.       १. विस्तवावर तापविल्यामुळे कढत होऊन उकळू लागलेले पाणी; उकळण्यासाठी विस्तवावर ठेवलेले पाणी : ‘जरि अमृत घालूं आंधणा । कापुरु मेळउ इंधना ।’ − ऋ ५१. २. त्या प्रकारची पाण्याची अवस्था; उकळी; कढ (क्रि. येणे). ३. गूळ, काकवी वगैरे करिता काहिलीत कढण्यासाठी घातलेला उसाचा रस. ४. (ल.) राज्य, एखादा कारभार, संसार इत्यादी व्यवस्थित चालविण्याविषयीची जबाबदारी किंवा भरवसा (सामान्यतः) ओझे; भार (क्रि. ठेवणे). : ‘विठ्ठलराव कोरेगांवकर आले असता करार करून गेले आहेत. त्यावरी याणी आधण ठेविले आहे.’ − पेद ८·४५. ५. विसंबणूक; भरवसा. पहा : आधाण [सं. आदहन] (वा.) जिवावरचे आधण उतरणे – आलेले मोठे संकट आपोआप नाहीसे होणे; टळणे. आधण निवविणे – मकरसंक्रांतीच्या दिवशी सुवासिनी स्त्रीने ब्राह्मणाच्या घरी जाऊन त्याच्या चुलीवर ठेवलेल्या आधणात (भाताच्या भांड्यात) सोन्यारूप्याचा तुकडा घालून तांदूळ वैरणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आधण

न. १ विस्तवावर तापविल्यामुळें कढत होऊन उकळूं लागलेलें पाणी; उकळण्यासाठीं विस्तवावर ठेवलेलें पाणी. 'जरि अमृत घालुं आंधणा । कापुरु मेळउ इंधना ।' -ऋ ५१. २ त्या- प्रकारची पाण्याची अवस्था; उकळी; कढ. (क्रि॰ येणें). ३ गूळ, काकवी, वगैरे करण्यासाठीं काहिलींत कढण्यासाठीं घातलेला उंसाचा रस. ४ (ल.) राज्य, एखादा कारभार, संसार इत्यादि व्यवस्थित चालविण्याविषयींची जबाबदारी किंवा भरंवसा (सामा.) ओझें; भार; जबाबदारी. (क्रि॰ ठेवणें). ५ अपमृत्यु; आधाण पहा. [सं. आदहन; प्रा. आदाण; तुल॰ गो. आधन] जिवावरचें आधण उत रणें-आलेलें मोठें संकट आपोआप नाहींसें होणें, टळणें. ॰निव- विणें-मकरसंक्रांतीच्या दिवशीं सुवासिनी स्त्रीनें ब्राह्मणाच्या घरीं जाऊन त्याच्या चुलीवर ठेवलेल्या आधणांत (भाताच्या भांड्यांत) तांदुळांत सोन्यारुप्याचा तुकडा घालून ते वैरणें. म्ह॰ आधणांतले रडतात आणि सुपांतले हांसतात (सुपांतल्या तांदुळावरहि आधणांत पडून रडण्याचा प्रसंग येतो) = आज जे सुखांत आहेत त्यांना भावी दुःखाची कल्पना नसली तरी तें प्राप्त होतेंच, तें सृष्टिनियमाला अनुसरून आहे.

दाते शब्दकोश

अगदी

वि. १ सर्व; एकूणएक; तमाम; पूर्ण; निःशेष; समूळ; अपवादरहित. 'घरांतील माणसें अगदीं मेलीं'; 'पाऊस अगदीं गेला; 'तुम्हांस पोथी अगदीं दिली'. २ शेवटच्या पाय- रीवरचा; पहिला नंबरचा; पक्का; खरोखर; आत्यंतिक; पूर्ण. 'अगदीं, अंधळा-वेडा-मूर्ख'. ३ पराकाष्ठेचा; अतिशय. 'हें काम मला अगदीं नेहटलें, केलेंच पाहिजे'. -क्रिवी(नकारार्थी) मुळींच, कोठेंच किंवा कधींच. 'यांत गूळ अगदीं नाहीं'; 'असला पदार्थ अगदीं ब्रह्मांडांत नाहीं'; 'ही गोष्ट अगदीं होत नाहीं.' [सं. अगति?]

दाते शब्दकोश

अगदी or दीं

अगदी or दीं agadī or dīṃ ad Altogether, wholly, completely, perfectly; without any exception, reservation, or imperfection. Ex. घरांतील माणसें अ0 मेलीं; पाऊस अ0 गेला; तुम्हास पोथी अ0 दिल्ही. 2 To the uttermost degree; superlatively, quite, indeed: corresponding with our emphatic particles--stone (blind), stark (mad), dead (drunk), downright (ass, rogue, &c.) Ex. अ0 अंधळा-वेडा-धुंद-मूर्ख. 3 Extremely, exceedingly, very, having the force of the emphatic words hard, fast, too, utterly. Ex. हें काम मला अ0 नेहटलें केलेंच पाहिजे. 4 (With neg. con.) None at all; nowhere on the earth; never since time began. Ex. ह्यांत गूळ अ0 नाहीं; असला पदार्थ अ0 ब्रह्मांडांत नाहीं; ही गोष्ट अ0 होत नाहीं.

मोल्सवर्थ शब्दकोश

आळणे      

अक्रि.       घट्ट, दाट होणे; आटणे : ‘ऊंस गाळिलिया रस होये । तो ठेवितां बहुकाळ न राहे । त्याचा आळूनिया पाहे । गूळ होये सपिंडा’ − एभा १६·१८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आळणें

घट्ट,दाट होणें; आटणें. अळणें पहा. 'उंस गाळि- लिया रस होये । तो ठेवितां बहुकाळ न राहे । त्याचा आळूनिया पाहे । गूळ होये सपिंड ।' -एभा १६.१८. दुग्धें आळूनि केलीं दाटें ।' -मुवन ११.

दाते शब्दकोश

अनरसा

पु. तांदुळाच्या आंबलेल्या पिठांत गूळ मिसळून त्याच्यावर खसखस थापून तुपांत तळून (वडेघारग्यासारखें) केलेलें पक्कात्र. [तुल॰ ते. अरिसे]

दाते शब्दकोश

अनरसा      

पु.       तांदळाच्या आंबलेल्या पिठात गूळ मिसळून त्याच्यावर खसखस थापून तुपात तळून (वडेघारग्यासारखा) केलेला पदार्थ.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आंबट वरण      

न.       चिंच, गूळ घालून केलेले फोडणीचे पातळ वरण.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंबवणी      

न.       १. कैरी भाजून पाण्यात कालवून आत गूळ किंवा साखर घालून केलेले सार किंवा पन्हे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंबवणी

न. १ हिरवा आंबा भाजून पाण्यांत कालवून आंत गूळ किंवा साखर घालून केलेलें सार किंवा पन्हें. [सं. आम्र + वन]

दाते शब्दकोश

अर्धेल

अर्धेल ardhēla f (अर्ध Half.) A half-share or concern in an agricultural or commercial engagement; esp. the half-share, whether of the lessor or lessée, in the produce of a field; or of the monied or working member, in the profits of a mercantile scheme. 2 The practice of two persons' thus joining themselves. 3 A tenure of land wherein the cultivator is to pay half the produce, net or gross. 4 The state of being reduced to half (of money, goods &c.) Ex. ह्या व्यापारामध्यें मिळकत व्हावी ती तर नाहींच आणि पैक्याची अ0 झाली; खंडीभर गूळ वाऱ्यांत घातला आणि त्याची अ0 झाली. Also a moiety or half. Used still with reference to loss, destruction, consumption &c. Ex. धान्य वाळत घातलें त्याची अ0 गेली.

मोल्सवर्थ शब्दकोश

आर्गुमास

न. (गो.) कात, गूळ वगैरे घालून तयार केलेला चुना. [पोर्तु. ऑर्गामस].

दाते शब्दकोश

आर्गुमास      

न.       कात, गूळ घालून तयार केलेला चुना. (गो.) [पोर्तु. ऑर्गामस]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आसुत      

न.       (आयु.) एक प्रकारचा शिरका; कंद; मूळ; फळ ह्यांचे किंवा गूळ, मद्य, आध्याम्ल, दह्याची निवळ व उसाचा रस यांचे मिश्रण तीन दिवस धान्यात पुरून ठेविले म्हणजे जे सिद्ध होते त्यास ‘शुक्ल’ असे म्हणतात. यालाच शिर्का असेही म्हणतात. अशा निरनिराळ्या शिर्क्यामध्ये कंदमूलादिक भिजत घालून जे पदार्थ तयार करतात त्यांना आसुते म्हणतात. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अटपणें

उक्रि. १ एकत्र करणें; गुरफटणें; अकुंचित करणें. २ व्यवस्थित लावणें (पुस्तकें; हत्यारें वगैरे). ३ ताब्यांत घेणें; हातांत घेणें; गोळा करणें. 'बापाची संपत्ति वडील भावानें अटपली.' 'वारा पुढचा आला, शीड लवकर आटप.' ४ उरकणें; झटपट करणें. 'स्नान-संध्या अटपून पढावयास ये.' ५ गांठणें; मजल मारणें; मिळणें. 'तूं पुढें गेलास तरी मी धांवत येऊन तुला अटपीन.' ६ संभा- ळणें; व्यवस्थितपणे चालविणें. उद॰ संसार अटपणें ७ संपविणें; खलास करणें. 'भांड्यांतला गूळ अटपला.' ८ आवरणें; थांबविणें; मर्यादा घालणें; दाबणें. 'धीर धरोनी आटप म्हणुनी बाष्पें मज- साठीं ।।' -केक ४१. -अक्रि. १ मरणें; नाश पावणें. 'पांच हजार फौज अटपली'. २ सुकणें; संपणें; नाहींसें होणें. 'या तळ्यांतील पाणी अटोपलें तेव्हां पक्षीदेखील गेले.' [सं. आटोप?]

दाते शब्दकोश

अटपणें aṭapaṇēṃ v c To gather together, in, up; to draw in or wind up; to contract into narrower compass, lit. fig. 2 To gather up as in order to put by (books, papers, tools). 3 To take up; to occupy or take possession; to take in hand. Ex. बापाची संपत्ति वडील भावानें अटपली धाकट्यानें रोजगार अटपला. 4 To do or perform smartly, to despatch. Ex. स्नानसंध्या अटपून पढायास ये; चौघांनी चार कामें अटपलीं तर वरचेवर होईल. 5 To come up with, to overtake; to gain, make, reach, arrive at. Ex. तूं पुढें गेलास तरीं मी धावत येऊन तुला अट- पीन; मीं संध्याकाळीं पुणें अटपलें. 6 To manage, control, govern, restrain: also to accomplish, achieve, do. Ex. कारभार-राज्य-घोडा-मूल-अ0 7 To consume, finish, despatch, dispose of (eatables, materials, articles): also, freely, to gather up and dispose of, i.e. to make an end of by slaying or killing. In both these divisions of the sense the ordinary application is in the passive voice, and the construction elliptically (i.e. गेला-ली-लें subauditum) passive. Ex. भांड्यांतला गूळ अटपला; लढाईमध्यें पांच हजार फौज अटपली; तो गृहस्थ पट- कीनें हलोहाल अटपला.

मोल्सवर्थ शब्दकोश

अवार्डुपॉइझ

पु. इंग्रजी वजनाचीं विशिष्ट परिमाणें; औषद, मूल्यवान धातू, याखेरीज गूळ, साखर वगैरेसारखे पदार्थ मापा- वयाची जी (वजनी) पद्धति. तिचें कोष्टक जसें-१६ द्राम = १ औंस. १६ औंस = १ पौंड. २८ पौंड = १ क्वार्टर. ४ क्वार्टर = १ हंड्रेडवेट. २० हंड्रेडवेट = १ टन. [इं. फ्रें. अवॉ दे पॉई]

दाते शब्दकोश

बाखर

पु. १ पुरण; सारण (करंज्या-साटोर्‍या घालण्याचें, खोबरें, खसखस गूळ किंवा साखर इ॰ चें बनविलेलें). बाकर पहा. 'बाखराचें वाण । सांडुं हें जेवूं जेवण ।' -तुगा ८०५. २ (व.) पाटवडींत भरण्याचा मसाला; मक्याचे दाणे किसून केलेली उसळ किंवा कोहाळ्याच्या मोठ्या फोडींची मसालेदार भाजी. ॰वडा- पु. (व.) हरभर्‍याच्या पिठाचा बाखर घालून तळलेला वडा.

दाते शब्दकोश

बाखर bākhara m Stuffing for puffs and cakes (पुरी, करंजी &c.) composed of cocoanut-kernel, raisins, गूळ, खसखस, sugar &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

बॅलँ

न. (गो.) गूळ. [भेली ?]

दाते शब्दकोश

बलक

बलक m The gluten of vegetables and plants; the viscous substance of an egg &c.; any substance (as गूळ tamarind-pulp, mud) reduced to a slimy consistence.

वझे शब्दकोश

बलक balaka m The gluten of vegetables and plants; the viscous substance of an egg &c.: also any substance (as गूळ, tamarind-pulp, mud) reduced to a slimy consistence.

मोल्सवर्थ शब्दकोश

बलक, बलब

पु. १ चीक; चिकट पदार्थ (अंडें इ॰ कांतील). २ गूळ इ॰ चा द्रव. ३ मगज; गीर. [हिं.]

दाते शब्दकोश

बट्टी

बट्टी baṭṭī f ( H Because somewhat saucer-form like a वाटा) A little ढेप (rondle) or वडी (thick pat) of गूळ. 2 A half-खोबरें (cocoanut-kernel); a lump of soap; a flat mass of silver; a vessel of this general form &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

भार

पु. १ गुरुत्व; जडपणा. ज्या योगानें पदार्थ निराधार असतां खालीं येतो तो पदार्थाचा धर्मविशेष. २ वजन तोलून काढलेलें परिमाण. ३ कोणतीहि वजनदार वस्तु; वस्तु; दाब; दडपण. 'कागद वार्‍यानें उडतात त्यावर कांहीं भार ठेव.' ४ (ल.) (काम, उपकार, मेहेरबानी इ॰ चें) वजन; ओझें. 'तो भारु फेडावेआ जगन्नाथा । अवतरलासी तूं ।' -शिशु १४७. ५ (ल.) ओझ्याप्रमाणें मानलेलें काम; दयेचें कृत्य; उपकार. ६ (ल.) महत्त्व; गौरव; धन्यता; वजन ७ शैत्यादि विकरामुळें डोक्यास भासणारा जडपणा. 'आज माझे मस्तकास भार पडला आहे.' ८ एक रुपयाच्या वजनाइतकें वजन; एक तोळा वजन. 'ही वाटी पंचवीस भार आहे.' ९ (समासांत पदलोप होऊन) विशिष्ट वजन. 'पैसाभार लोणी, ढबूभार साखर, वीस रुपये भार गूळ.' १० ओझें; वजन उदा॰ काष्ठ-तृण-पर्ण-भार. 'सोनसाखळीचा झाला भार ।' -मसाप २.१. ११ (सैन्याचें एक अंग म्हणून) संख्या- बल. जसें-अश्वभार, कुंजलभार, दळभार, रथभार इ॰. १२ (काव्य) कळप; तांडा; समूह. 'वाटेसि गडगडतां व्याघ्र । थोकती जैसे अजाचे भार।' १३ समूह; समुदाय; मेळा; गर्दी. उदा॰ गोभार, द्विजभार, भृत्यभार इ॰. 'आशीर्वचनीं जयजयकार । करूनि बैसला ऋषींचा भार ।' -मुआदि १६.११०. १४ सेना; समूह. 'दळ- व्याचा भार कुरडूंच्या मैदानीं गेला ।' -एपो ६८. १५ भर; बहर.'मग हें रसभावफुलीं फुलैल । नानार्थ फळभारें फळा येईल ।' -ज्ञा ११.२०. 'नम्र होती फळभारें तरुवर सारे' -शाकुंतल. १६ ओझें; काळजी; जबाबदारी; आधार. 'सखे, मी सर्व भार परमेश्वरावर ठेविलेला आहे.' -रत्न २.१. १७ व्यूह; बेत. 'ते पाहोन राजभुवरानें लष्कर पायदळ फौज करून भार रचिले.' -इमं ९. १८ आठ हजार तोळे वजन. (चार तोळे = १ पल; १०० पला = १ तुला; २० तुला = १ भार. 'रत्नें प्रस्थ भार एक एक कनक । ऐसी दक्षिणा आरंभीं ।' -जै १.९१ -वि. जड. 'मत्प्रश्न भार कां गमला?' -मोअश्व २.३०. [सं. भार; फा. बार] ॰कस-नपु. १ गाड्यावर किंवा उंट, हत्ती इ॰च्या पाठीवर सामान कसून बांधण्याचा सोल, दोर. २ वादळांत तंबू डळमळूं नये ,म्हणून त्याच्यावरून टाकून जमिनीस खिळविलेली दोरी. [तुल॰ फा. बारकश्] ॰ग्रस्त-पीडित, भाराकुल, भाराक्रांत, भारान्वित, भारार्त-वि. (शब्दशः व ल.) ओझ्यानें पीडि- लेला, त्रासलेला. ॰दडीचावि. वजनदार; भारदस्त. ॰दर्शक- वि. वजन दाखविणारें (परिमाण). उदा॰ मण, पौंड, तोळा, मासा इ॰. ॰दस्त-दस्ती-दास्त-दार-वि. १ वजनदार; मह- त्त्वाचा. २ बहुमोलाचा; मूल्यवान्. [भार + फा.दस्त इ॰] ॰दस्ती- दारी-स्त्री. १ वजन; महत्व. २ हुकमत चालविण्याचें सामर्थ्य, अधिकार, सत्ता. भारंदाज-वि. वजनदार; फायदेशीर; भरभरा- टीचा (माणूस, धंदा). [फा. बार + अंदाज] भारंदाजीस्त्री. सार; महत्त्व; भरीवपणा; फायदेशीरपणा (मनुष्य, काम इ॰चा). ॰दार-वि. निष्णात; प्रवीण; वाकबगार; महत्त्वाचें काम कराव- याला जबाबदारी घेण्याला लायक, समर्थ. [हिं.] ॰दारी-वि. ओझें वाहणारा; ओझ्याचा. 'जरूरियात प्रसंगीं भागीदारी गाडे लागल्यास...' -राजमहाल कामगारी कारकुनांच्या कर्तव्या- संबंधीं नियम पृ. ६. ॰धडी-स्त्री. १ जड वस्तु; भारी सामान. 'भारधडी झाडून गेली परंतु वस्तीस मनुष्यें होतीं.' -भाब ३०. २ गैरलढाऊ लोक. 'मल्हारराव यांचीं मुलेमाणसें भारधडी इंदुरास राहिली.' -भाब ९६. ॰ब(बा)रदारी-क्रिवि. लवा- जम्यासह. 'औरंगाबादेहून देखील भारबारदारी दिल्लीस जात आहेत.' -शाछ १.२७. [भार + बरदार = वाहक] भारंभार-वि. सारख्या वजनाचें; भारोभार. 'हे रुपये द्यावे आणि भारंभार चांदी घ्यावी.' [भार + आणि + भार] ॰भूत-वि. १ जड; भार झालेला. 'भारभूत होय जीणें...।' -विक ८२. २ (ल.) निरुपयोगी; निरर्थक. ॰मान-न. १ गुरुत्व; जडपणा. याच्या उलट आकारमान. २ हवेचा दाब मोजण्याचें यंत्र; भारमापक यंत्र. (इं.) बॅरोमीटर. ॰वाहक-वि. १ ओझें वाहणारा (मनुष्य, गाडी, जनावर इ॰) 'कीं आले खर, भारवाहक असे पोटीं मनुष्याकृती ।' -विक १२. २ (संसार, कामधंदा इ॰चा) भार, जबाबदारी सहन करणारा. ३ अंगीं असलेल्या विद्यादि गुणांचा-द्रव्य मिळविणें इ॰ कामीं उपयोग न करणारा (माणूस); ओझ्याचा बैल. ॰शांखळ-ळा- स्त्री. (महानु.) शृंखला. 'तो जुझारां गडे । पाईं भारशांखळ काढे ।' -भाए ३५९. [भार + शृंखला] भारोभार-क्रिवि. सारख्या वजनाचें; भारंभार. [भार द्वि.] भारकी-कें-स्त्रीन (काटक्या, गवत, पानें इ॰चा) लहान भारा, ओझें. [भारा अल्प.]

दाते शब्दकोश

भार bhāra m (S) Gravity. 2 Weight, quantity measured by the balance. 3 A weight, anything used to press down or considered as having weight. Ex. कागद वाऱ्यानें उडतात त्यांजवर कांहीं भार ठेव. 4 Weight in figurative senses (as of an affair or a business, of an obligation or a favor): also a business or a kindness considered as a burden: also importance, influence, consequence, weight. 5 Heaviness (of the head); oppression from cold &c. Ex. आज माझे मस्तकास भार चढला आहे. 6 A rupee's weight. Ex. ही वाटी पंचवीस भार आहे. 7 In comp. and through an ellipsis. Of the weight of; as पैसाभार लोणी, ढबूभार साखर, वीस रुपयेभार गूळ. 8 A load or burden. Ex. काष्टभार, तृणभार, पर्णभार. 9 The application or address of a mantra. v टाक, घाल, फुंक, & लागू हो. 10 A weight, force, or power (as of an arm of war). In comp. as अश्वभार, कुंजर- भार or गजभार, दळभार, रथभार. 11 (Poetry.) A flock or herd: also a troop, host, or body gen. Ex. वाटेसि गडगडतां व्याघ्र ॥ थोकति जैसे अजाचे भार ॥; and प्रेमळ भक्तांचे भार ॥; also गोभार, द्विज- भार, भृत्यभार &c. भार ग्रस्त, भारपीडित, भाराकुल, भाराक्रांत, भारान्वित, भारार्त्त &c. Burdened, lit. fig., oppressed with a load.

मोल्सवर्थ शब्दकोश

भेल

भेल bhēla f C A small made-up lump or pat of गूळ.

मोल्सवर्थ शब्दकोश

भेला

भेला bhēlā m A string of bundles (of कडबा, सरम, or grass) connected at their ends. Several such are arranged spirally within a पेव or grain-cellar, forming a lining or case to protect the grain from damp. v घाल, बांध, बसव. 3 unc See भेलगा. 2 A ball or lump (as of squeezed tamarinds, butter, congealed ghee, गूळ, खवा, साखर &c.) Ex. ब्रज- वासी नंद लाला ॥ हातामध्यें लोण्याचा भेला ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. १ कडबा, सरम, गवत इ॰चें लांबच लांब वेटोळें, गुंडाळा. ओलावा, लोणा यापासून धान्याचें रक्षण व्हावें म्हणून हा पेवांत धान्याभोवतीं घालतात. (क्रि॰ घालणें, बांधणें, बसविणें). २ (क्व.) भेलगा पहा. ३ ढेप; रास; गोळा (गूळ, साखर, लोणी, खवा इ॰ चा). 'हातीं गुळाचा भेला । रसना चाटीतसे ज्याला ।' -यथादी २.३६८. 'आधींच नैषधकथा नवनीत भेला ।' -र २६.

दाते शब्दकोश

भेली

भेली bhēlī f C (Or भेल) A small made-up lump or pat of गूळ.

मोल्सवर्थ शब्दकोश

भगवान भात

पु. गूळ घालून केलेला नारळी भात; गुजराथी वगैरे लोकांत शुभप्रसंगीं हा शकुनाचा म्हणून मुद्दाम करतात.' -खेस्व १११.

दाते शब्दकोश

चेहळ

पु. १ घाम; (साखर, गूळ इ॰ कांस सुटलेला) द्रव, पाझर. -स्त्री. विपुलता; प्राचुर्य; समृद्धि; चंगळ. [हिं.]

दाते शब्दकोश

चेहळणें

अक्रि. (मीठ, साखर, गूळ इ॰ पदार्थ) ओल- सर होऊन पाझरणें; पातळ होऊन वाहूं लागणें; पाघळणें; द्रवणें; वितळणें. [चेहळ]

दाते शब्दकोश

चेंद      

स्त्री.       १. दाटी; गर्दी; खेचाखेच; गोंधळ. २. (पाणी सांडल्यामुळे, पाऊस पडल्यामुळे होणारी) चिडचिड; रेंदाड; चिखल; निसरडे. ३. गिळगिळीत, बिलबिलीत, चिघळणाऱ्या, पाघळणाऱ्या (खरबुजे, आंबे, गूळ इ.) पदार्थांची रास.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चेंद

चेंद cēnda f R (चेंदणें) Confinedness; thronged state; crowdedness or press. 2 also चेंदरड f R Muckiness or sloppiness (as through water spilled); miriness (as of a road); also a mass of squashy, slushy, oozing melons, mangoes, गूळ &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री. १ चेंगरट; दाटी; गर्दी; खेंचाखेंच. २ (पाणी सांडल्यामुळें, पाऊस पडल्यामुळें होणारी) चिडचिड; चेंदरड, रेंदाड; चिखल; निसरडें. ३ गिलगिलीत, बिलबिलीत, चिघळ- णार्‍या, पाघळणार्‍या, चेंदरलेल्या (खरबुजें, आंबे, गूळ इ॰) पदार्थांची रास. [चेंदणें]

दाते शब्दकोश

चेप

चेप cēpa f m (चेपणें) Pressing, thronging; a press or throng; crowdedness or throngedness. 2 fig. General prevalence (of a disease &c.) 3 m C A head-load or a bundle of light esp. thorny sticks pressed or squeezed close. 4 f A ढेप or rondle of गूळ sunken down or fallen close. 5 A mass (of hair clotted, of papers &c. sticking closely together).

मोल्सवर्थ शब्दकोश

चेतवण

न. अग्नि उत्पन्न करण्याकरितां, पेटविण्याकरितां उपयोगांत आणण्याचें गवत, काड्या, धलप्या. काटक्या इ॰; गूल; चूड; पेटवण. [चेतविणें.]

दाते शब्दकोश

चेतवण      

न.       अग्नी उत्पन्न करण्याकरिता, पेटविण्याकरिता उपयोगात आणण्याचे गवत, काड्या, धलप्या, काटक्या इ.; गूल; चूड; पेटवण.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चिघळ

पु. (कों.) गूळ, साखर, मीठ इ॰ पदार्थांस जो द्रव सुटतो. -स्त्री. एक प्रकरची रानभाजी.

दाते शब्दकोश

चिघळ      

पु.       गूळ, साखर, मीठ इत्यादी पदार्थाला सुटतो तो द्रव. (को.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चिघळणे      

अक्रि.       पाझरणे; गळणे; स्त्रवणे (मीठ, साखर, गूळ इ.); जखमेत पू होऊन ती पसरणे, वाहणे. [सं. गल्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चिघळ्या      

वि.       पाझरणारा; वितळणारा; झिरपणारा (गूळ, साखर इ. पदार्थ).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चिहळणे, चिहाळणे, चिळणे      

अक्रि.       १. चिघळणे. २. (मीठ, साखर, गूळ इत्यादी पदार्थ) द्रवणे; झिरपणे; गळणे; निचरणे. ३. (ल.) गळून जाणे : ‘बकाल दाटीतून आलेले डॉक्टर चिहाळून गेले.’ − कृकादे ८२. [सं. जिघृ]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चिहळणें, चिहाळणें, चिळणें

अक्रि. प्र चिघळणें. (मीठ, साखर, गूळ इ॰ पदार्थ) द्रवणें; झिरपणें; गळणें; निचरणें. [चिघळणें]

दाते शब्दकोश

चिकी

स्त्री० काकवी, पातळ गूळ.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

स्त्री. १ पातळ चिकट पदार्थ; गोंद; खळ. २ पाघ- ळणारा आंबूस गूळ. ३ काकवी. ४ दाट होईल इतकी कढ- विलेली साखर, पाक. ५ उडदाच्या पिठाची खळ. ६ तावदानें चौकटीत घट्ट बसविण्याचें लुकण, लंबी इ॰; लोट्याची लाख.

दाते शब्दकोश

चिकी cikī f (चीक) Inferior, i. e. thin and swashy गूळ. 2 Skimmings of boiling sugarcane-juice kneaded and solidified. 3 Sugar or syrup boiled to consistency. 4 A paste made of flour of उडीद. 5 Glaziers' putty.

मोल्सवर्थ शब्दकोश

चिकी, चिक्की      

स्त्री.       १. गुडदाणी. २. पातळ चिकट पदार्थ; गोंद; खळ. ३. पाघळणारा आंबूस गूळ. ४. काकवी. ५. दाट होईल इतकी कढवलेली साखर, पाक. ६. उडदाच्या पिठाची खळ. ७. तावदाने चौकटीत घट्ट बसविण्याचे लुकण, लांबी इ.; लोट्याची लाख.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चिक्की      

स्त्री.       गुळाच्या, साखरेच्या पाकात दाणे, तीळ, खोबरे इ. घालून करण्यात येणारी मिठाई; गुडदाणी : ‘चिक्कीमध्ये वापरण्यासाठी चिक्कीचा गूळ मिळतो.’ - मिखा १०७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चिंचोणी       

स्त्री.       चिंच दाट कोळून त्यात गूळ, खोबऱ्याचा कीस, चारोळी घालून सर्वपित्री अमावस्येला करतात तो पदार्थ. (व.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चिंचोणी

स्त्री. (व.) चिंच दाट कोळून त्यांत गूळ, खोबर्‍याचा कीस, चारोळी घालून सर्वपित्री अमावास्येस करि- तात तो पदार्थ. [चिंच + पाणी]

दाते शब्दकोश

चकी      

हलक्या दर्जाचा गूळ; काकवी. चकीर      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चोचा      

पु.       १. तुंबडी, रोंबी लावण्यापूर्वी वस्तरा इत्यादिकांनी मारलेली फासणी. २. औषधाकरिता दिलेली डागणी : ‘आणि मुलाच्या पोटावर शंभर चोचे मारतात.’ − स्मृतिचित्रे १२७. ३. डाग दिल्याने कातडीवर पडलेली खूण; डाग; गूल. सामान्यतः अनेकवचनी प्रयोग. उदा. चोचे देणे, मारणे. ४. हत्याराने वृक्ष इ. वर केलेले क्षत.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चोंचा

पु. १ तुंबडी, रोंबी लावण्यापूर्वीं वस्तरा इ॰ कानीं मारलेली फांसणी. २ औषधाकरितां दिलेली डागणी. ३ डाग दिल्यानें कातडीवर पडलेली खूण; डाग; गूल; सामान्यतः अनेक वचनी प्रयोग. उदा॰ चोचे देणें, मारणें. [चोंच]

दाते शब्दकोश

चुबका

पु १ (गवताचा, केसांचा, पानांचा) झुबका; बुचका; गुच्छ; झुपका; शेंडा; तुरा. २ पुंजका; जमाव; घोळका. 'जेथें जेथें गूळ पडला तेथें तेथें मुंग्यांचे चुबके जमले.' [सं स्तबक]

दाते शब्दकोश

चुबका cubakā m A tuft, knot, bunch; a mass composed of several particulars (of grass, hair, leaves &c.) 2 (Freely.) A swarm, a host, a thronging multitude. Ex. जेथें जेथें गूळ पडला तेथें तेथें मुंग्यांचे चुबके जमले.

मोल्सवर्थ शब्दकोश

दोर      

पु.       १. काथ्या, वाक, अंबाडी, ताग इ. झाडांच्या सालीचे लांब तंतू. २. केळ, अंबाडी, भेंडी इ.च्या सालीची किंवा तंतूंची वळलेली दोरी. (राजा.) ३. (ल.) नासलेले दही, गूळ इ.मधील तार; तार येण्याची अवस्था; चिकटण. [सं.दोरक] (वा.) दगडाचे दोर काढणारा – युक्तिवान; उद्योगी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दोर

पु. १ काथ्या, वाक, अंबाडी, ताग इत्यादि झाडांच्या सालीचे लांब तंतू. २ (राजा.) केळ, अंबाडी, भेंडी इ॰ कांच्या सालीची किंवा तंतूची वळलेली दोरी. ३ (ल.) नसलेलें दहीं, गूळ इ॰ मधील तार, तार येण्याची अवस्था; चिकटण. [सं. दोरक; प्रा. दे. दोर; हिं. दोर; फ्रेंजि. दोरी] दगडाचे दोर काढणारा-वि. युक्तिवान्; उद्योगी. दोरक-पु. १ शिवण्याचा दोरा. २ दोर अर्थ १ पहा. दोरखंड; दोरी. [सं.] ॰कस-पु. १ गाडी, मोट इ॰ नां बांधावयाचा दोर; नाडा; चर्‍हाट. २ बारीक दोरी. -न. एकत्र बांधलेल्या पुष्कळशा दोर्‍या. ॰खंड-न. १ जाड दोर; सोल. २ दोराचा तुकडा. ३ कालाचा(केळीच्या गाभ्याचा) तंतु. ॰खंडें-नअव. गलबताचे दोर; जाड दोर.॰गुंडापु. सालींचें किंवा दोरोचें भेंडोळें (शाकारण्याच्या कामीं उपयोगी). दोरडेंन. (कों.) १ जाड किंवा मोठा दोर; दोरखंड. २ (निंदार्थीं) दोराचा तुकडा (वाईट, निरुपयोगी दोरासंबंधीं योजतात). दोरणी-स्त्री. दोरी. दोरत्व-न. दोरपणा; दोर असण्याची स्थिति. 'दोरत्व दृष्टि अचळ झालें ।' -सिसं ९.९७. दोरवा-पु. १ अंगांत उभ्या जाड रेघा असलेला कपडा; कापडाचा एक प्रकार. २ (कों.) तडा; चीर; भेग; दगड इ॰ कामध्यें असणारा दोरा. ॰दोरा-पु. १ सूत (शिवण्याचें); वळीव, पिळदार सूत. २ तडा, भेग. दोरवा अर्थ २ पहा. ३ (ल.) लहान झरा; झिरण. 'या विहिरीस तळ्याचे दोरे आहेत.' ४ (ल.) जोड; संबंध; आप्तपणा; धागा- दोरा. 'हे जर आमचे जातीचे असतील तर यांचा आमचा कांहीं तरी दोरा असेल.' 'त्या दरबारांत आमचा कांहीं दोरा होता म्हणून जातांच पाय शिरकला.' ५ (ल.) गुप्त कारस्थान. 'हळूच लावले सारे दोरे ।' -ऐपो २५१. ६ नारूचा किडा; तंतु. ७ वृषणापासून शिश्नापर्यंतचें सूत्र. ८ (पदार्थ इ॰ च्या) शरीरास लागलेल्या किडीचा मार्ग; किडीच्या संचाराची रेषा. ९ गोगलगाई- सारख्या चिकट द्रव टाकणार्‍या प्राण्याची उमटलेली रेषा. १० एक प्रकारची बांगडी, दागिना. 'वेगळें निघतां घडीन दोरेचुडा ।' -तुगा २९५९. ११ (ना.) पोटांतील आंतडी [दोर] ॰वंजणें-(चांभारी धंदा) दोरा, घांसणें. [वंजणें = चोपडणें] दोरावणें-अक्रि. १ दोरा रेषा, शिरा, तड असणें (लांकूड, धोंडा, माती इ॰ मध्यें). २ दोराळ, चिकाळ होणें; तंतु सुटणें (नासलेला पदार्थ, तिंबलेली कणीक इ॰ मध्यें). दोराळ-वि. (राजा.) दोरमय; तंतुमय. (गरा, दहीं इ॰). दोरी-स्त्री. १ बारीक दोरा. २ जमीन मोजणीचें एक परि- माण. २० परतन, ८० किंवा १२० बिघे. ३ एक लहान मासा. ४ (सोनारी-सुतारी धंदा) चाचा एक अष्टमांश भाग; सूत. [दोर] ॰सैल देणें-सोडणें-ढिली करणें-लगाम, ताबा, नियम इ॰ ढिला करणें; स्वतंत्रता देणें. ॰सूत-क्रिवि. सरळ; ओळंब्यांत; सरळ रेषेंत. (क्रि॰ जाणें; असणें). 'हा मार्ग येथून दोरीसूत पुण्यास जातो.'

दाते शब्दकोश

दश

वि. दहा संख्या. (समासांत) दक्ष-रात्र, दशावतार, दश-दिशा. [सं. ग्री. डेकॅ; लॅ. देसेम्; गॉ. तैहुन्; आर्मो. डेक; हिब्रू. देअघ्; लिथु. देझिंथिस्; स्ला. देस्यति; फ्रें. जिप्सी देश; आर्मेनियम लसे] दशक-पु. १ दहांचा समुदाय. २ (गणित.) घेत- लेले-धरलेले दहा. ३ दर शेकडां दहा. दशक चढविणें-वर्चस्व स्थापणें, बसविणें. दश-कंठ-कंधर-ग्रीव-मुख्य-पु. रावण. [सं.] ॰कामजव्यसन-न. काम (इच्छा) यापासून उत्पन्न होणारे दहा दुर्गुण:- शिकार करणें, जुवा खेळणें, दिवसां निजणें, शिव्या देणें; रांडबाजी, दारू पिणें, नाचणें, गाणें, खेळणें, ढोंगी- पणा इ॰. ॰ग्रंथ-पुअव. वेद व त्यांची उपांगे; संहिता, ब्राह्मण, आरण्यक, आणि शिक्षा, कल्प, व्याकरण, निघंटु, निरुत्क, छंद, ज्योतिष. [सं. दश + ग्रंथ] ॰ग्रंथी-वि. वरील दशग्रंथ पढलेला. ॰दानें-नअव. दहा दानें; गो, भूमि, तिल, सुवर्ण, घृत, वस्त्र, धान्य, गूळ, लवण (मीठ), रुपें. ॰दिशास्त्रीअव. या पुढील प्रमाणें आहेत:- पूर्व; पश्चिम,दक्षिण, उत्तर या मुख्य दिशा, व आग्नेयी, नैऋत्य, वायव्य, ईशान्य या चार उपदिशा, आणि ऊर्ध्व व अधोदिशा. -क्रिवि. सर्व दिशांना-बाजूंना; सर्वत्र; चहूंकडे (क्रि॰ पळणें; फेकणें). ॰देह-पुअव. (वेदांत) दहादेह. 'चारी पिंडीं च्यारी ब्रह्मांडी । ऐसी अष्ट देहाची प्रौढी । प्रकृतिपुरुषांची वाढी । दशदेह बोलिजे ।' -दा ८.७.४१. ॰नाडी-स्त्रीअव. (योग.) दहा नाड्या; इडा, पिंगला, सुषुम्ना, गांधारी, जीवनी, दशतुंडी, दीक्षा, बाणदशा, शंखिनी, आणि सौक्षिणी या दहा. -कथा ७. ३.८६ । ८७. ॰नाद-पुअव. चीणी, चिंचिणी, घंटा, शंख, तंत्री, ताल, वेणु, मृदंग, भेरी व मेघ (याचा नाद, रव). 'तया कमळाचया सुगंधें । जीवभ्रमर झुंकारे दशनादें ।' -स्वादि ९.५.३६. ॰नाम संन्यासी-पु. अव. गिरी, पुरी, भारती, आनंद, चैतन्य, पर्वत, सागर इ॰ संन्याशाचे दहा पंथ. ॰पाद-पु. कुरली, झिंग्या खेंकडा इ॰ दहा पायांचे कीटक, प्राणी. (इं.) डेकॅपोडा. ॰पिंड-पु. अव. मृत मनुष्यास पहिल्या दिवसापासून दहा दिवसपर्यंत देररोज एक किंवा दहाव्या दिवशीं एकदम द्यावयाचे भाताचे दहा पिंड. ॰भुजी-स्त्री. दहा हातांची दुर्गादेवी. ॰मुखपु. रावण. ॰मूळ- न. दहा वनस्पतींच्या मुळांपासून केलेलें औषध हीं मुळें:- बेल; टाकळा, टेटू, शिवण, पाडळ, साळवण, गोखरू, पिठवण, डोरली व रिंगणी अशीं आहेत. ॰रथ ललिता-रथ थळीस्त्री. आश्विन कृष्ण चतुर्थीच्या रात्रीं करावयाचें एक व्रत, तत्संबंधीं गणपतीपूजन. ॰रात्र-न. दहा दिवस, रात्री; दशाह. ॰वंत-पु. (शीखधर्म) स्वतःच्या उत्पन्नाचा धर्मासाठीं एकदशांश भाग द्यावयाचा. ॰विध- वि. दहा प्रकारचें. ॰हरा-हार-पु. दशाहरा पहा. दशम- वि. दहावा. दशमग्रह-पु. (विनोदानें) जांवई. दशम- द्वार-पु. (योग.) १ पोत; एखादी जखम वाहण्याकरितां उघडी रहावी म्हणून तींत जी वात घालतात ती. २ ब्रह्मरंघ्र (शरीरास नऊ द्वारें आहेत तीं सोडून टाळूवरील). ३ (सांकेतिक) गुद. दशम- भ्रांती-स्त्री. मोजतांना एखादा मनुष्य आपणा स्वतःस विसरतो त्यावेळीं म्हणतात. गोष्टींत दहाजणांची मोजणी करतांना मोजणारा स्वतःस विसरला त्यावरून). दशमानपद्धति-स्त्री. मेट्रिक सिस्टीम या इंग्रजी शब्दास प्रतिशब्द. या पद्धतींत मीटर हें परि- णाम धरलें जातें व इतर परिमाणें दसपटीनें अगर दहाव्या हिश्शानें चढत उतरत जातात. १ मीटर = १.१ यार्ड-वार. ॰मांश-पु. १ दहावा भाग; दशांश. २ (ल.) टाइथ या बायबलांतील इंग्रजी शब्दास प्रतिशब्द. 'त्यानें अब्राहमापासून दशमांश घेतला.' -इब्री ७.६. दशमीस्त्री. १ चैत्रादि महिन्यांच्या दोन्ही पक्षां- तील दहावी तिथि. २ दशमी दशा; मानवी जीवनयात्रेचा शेवटचा अथवा दहावा भाग. दशांक-पु. दहाचा आंकडा. दशांकचिन्ह- न. नागाच्या फणीवरील दहाच्या आंकड्या सारखें चिन्ह. दशांग- न. चंदनादि दहा सुगंधीद्रव्यांचा धूप. दशांगुळें-नअव. १ दहा बोटें. 'तो परमात्मा दशांगुळें उरला ।' २ आठव्या महिन्यांत गर्भास दहा बोटें उत्पन्न होतात म्हणून गर्भवती स्त्रीचा त्यावेळीं करावयाचा एक संस्कार. ३ दोन हातांच्या दहा बोटांत घाला- वयाचा एक दागिना. 'पोल्हारें विरुद्या दशांगुळिं वळीं गर्जोनियां पोंचटें ।' -अकक २ अनंत-सीतास्वयंवर ३९. दशांतला- वि. ज्यांचे सुतक दहा दिवस धरावें लागतें अशा नात्यांतला.

दाते शब्दकोश

धान

न. १ साळ; भात. २ भाताचें रोप. ३ (रोप इ॰ कांचा) दांडा, देंठ. 'केतकीचें धान आणि उंबराची साल सम- भाग घेऊन चूर्ण करावें.' -अश्वप २.५०. ४ धणे. [सं. धान; बं. धान; गु. धान = धान्य] ॰गवत-न. ज्यास धान्य येतें असें गवत. उदा॰ गहूं, बाजरी, ज्वारी इ॰काचें गवत. 'उदाहरणार्थ रानगवतें व धानगवतें हा धडा पावसाळ्यांतच घ्यावा.' -अध्या- पन ७४. [धन + गवत] धानाष्टक-न. धणे, वाळलेला किंवा ओला पुदिना व मसाला यांचें एकत्र मिश्रण करून गूळ घालून केलेली चटणी.' -गृशि ३१८. [धान + अष्टक = आठांचा समुदाय] धानाधिस्पट होणें-क्रि. (कु.) धुळधाण होणें.

दाते शब्दकोश

धानाष्टक      

न.       धणे, वाळलेला किंवा ओला पुदिना व मसाला यांचे एकत्र मिश्रण करून गूळ घालून केलेली चटणी. - गृशि ३१८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धाणस

न. (गों.) फणसाचे गेर वांटून केलेलवी गूळ मिश्रित भाकरी.

दाते शब्दकोश

ढबक

ढबक ḍhabaka n (ढब!) A mass falling or fallen (from a wall &c.). 2 also ढबका m A large lump (as of pompion, melon, and fruits or of dough, गूळ and similar substances).

मोल्सवर्थ शब्दकोश

ढेंप

ढेप or ढेंप n A clod. f A mass. A lump of गूळ.

वझे शब्दकोश

ढेंपशी

ढेंपशी ḍhēmpaśī f (ढेंप) A lump of cowdung kindled or burned to ashes. 2 or गुळाची ढेंपशी A lump (the settled mass of boiled sugarcane-juice) of गूळ.

मोल्सवर्थ शब्दकोश

ढेप or ढेंप

ढेप or ढेंप ḍhēpa or ḍhēmpa n A clod. Hence arable land; as त्या गांवांत पंचवीस बिघे ढेप आहे: also a quantity of land determined, not by its extend, but by its produce; and divided into मुडा, खंडी, कुडव, & अधोली. 2 f A lump or rondel of गूळ,--the mass which the inspissated juice of the sugarcane forms on cooling down. Hence 3 A mass (of poilcake, boiled rice, damaged grain, coagulated milk &c. and freely, of clotted hair, papers, leaves, bundles of grass adhering closely together). 4 f also ढेपण f n A stack of bundles of कडबा covered over with clods (for protection against cattle, rain, fire). 5 n P A press or throng.

मोल्सवर्थ शब्दकोश

ढेपणें

ढेपणें ḍhēpaṇēṃ v i (ढेप) To stick unto or press upon and form a ढेप or mass--papers, leaves &c.: to close and get firm, to fix--boiled गूळ on cooling. 3 To get fixed or fast (in a post or an occupation). 4 (ढेप Clod or lump.) To sit or squat (with implication of length of time or of laziness in the sitter or of anger and abusiveness in the speaker). Ex. हा एढोळां कोण्हीकडे जाऊन ढेपला.

मोल्सवर्थ शब्दकोश

सक्रि. १ रास करणें; ढीग रचणें. २ (ल.) ढासणें; दाबून, खच्चून भरणें (अन्न). -अक्रि. चिकटून, दाबून ढेप होणें. (कागद, पानें इ॰ची); आंत जाऊन घट्ट होणें, थिजणें (कढ- लेला गूळ निवाल्यावर). ३ कायम होणें (एखाद्या कामावर, जागे- वर). ४ (ढेप = डिखळ, गोळा यावरून) बसणें; आसनमांडी घालणें (बसणार्‍याचा आळस किंवा एखाद्या ठिकाणीं जाऊन परत येण्यास होणारा फार उशीर अथवा बोलणार्‍याचा क्रोध इ॰ ह्या शब्दानें ध्वनित होतो). 'हा एढोळा कोण्हीकडे जाऊन ढेपला.' ५ (व.) माती लावणें; लिंपणें; (झाडाच्या बुंध्याच्या) भोंवतालीं माती लावणें. 'आंब्याचें झाड ३-४ वर्षांचें झाल्यावर त्याला ढेंपलें पाहिजे.' [ढेप]

दाते शब्दकोश

ढिसार      

वि.       नरम (गूळ, माल).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ढिसार

वि. नरम (गूळ, माल). ढिसर, ढिसळ पहा.

दाते शब्दकोश

धलपा

धलपा dhalapā m dim. धलपी f A chip or shaving: also a chip or slice (of a stone, plaster of a wall, mass of गूळ, dough, or similar substance). वाळून धलपी होणें To get thin like a chip.

मोल्सवर्थ शब्दकोश

ढपला

ढपला ḍhapalā m dim. ढपली f A chip or shaving: also a chip or slice (as of stone, of the plaster of a wall, of a mass of गूळ, dough, or similar substance)

मोल्सवर्थ शब्दकोश

गौडी

गौडी gauḍī f S Spirit distilled from गूळ or raw sugar. 2 A particular रागिणी. See राग.

मोल्सवर्थ शब्दकोश

गौल

वि. गोड; मधुर. 'वछ तुझें अति आरुप बोल । परिअमृताहूनि दिसती गौल' -स्वादि ६.१.२९. [ = सं. गुड-ल = गूळ; गु. गौल्य]

दाते शब्दकोश

गंड

(क्रि॰ मोडणें; जिरवणे). ६ कांहीं विशिष्ट धंदेवाईकांस तिर- स्कारार्थीं त्यांच्या नांवाच्या शेवटीं जोडावयाचा प्रत्यय. जस- न्हावगंड ( = न्हावी); तेलगंड ( = तेली); वाणगंड ( = वाणी); जोस- गंड ( = जोसी) इ॰ तसेंच कुणब्यांच्या नांवानांहि जोडतात (प्राकृतांत गंड म्हणजे नापित (न्हावी) असा अर्थ आहे. तेव्हां त्यावरूनहि तिरस्कारार्थी शब्द बनला असेल). नपु. गळूं; केस्तूड. 'मी सर्वज्ञु एकुचि रूढु । ऐसा गर्वतुष्टीगंडु । घेऊनि ठाके ।' -ज्ञा १३.७१७. 'तुझें माथां शृंग पूर्ण तीक्ष्ण । तुज ऋष्यशृंग अभिमान । आमुचे हृदयीं गंडे तीक्ष्ण । गंडऋषि जाण आम्हांसि म्हणती ।' -भारा बाल २.३०. [सं.] सामाशब्द- ॰खोल-पु. घोड्याचा गळा; गडखोल. ॰गूळ-(प्रां.) गळगुंड. पहा. ॰मंडल-न. (काव्य.) गंड अर्थ १ पहा. 'वोतिली शशी मित्र गाळून । गडमंडळीं प्रभा पूर्ण ।' ॰स्थळ-न. गंड अर्थ २ पहा. 'गंडस्थळींचें तेज अधिक । लखलखीत दोन्हीं भागीं ।' -व्यं ६५.

दाते शब्दकोश

गॉड

न. (कों. गो.) गूळ.

दाते शब्दकोश

गोडे      

न.       गोड कालवण; गुळवणी (गूळ, नारळ, दूध यांचे).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गोडें

गोडें gōḍēṃ n (गोड) Any sweet कालवण or mixture (as of गूळ, cocoanut, milk &c.)

मोल्सवर्थ शब्दकोश

गोडजेवण

गोडजेवण gōḍajēvaṇa n गोडतोंड n An entertainment of nice things given by the family of a bride to the bridegroom and his friends: also by the bridegroom's family to the friends accompanying the bride: also (गूळ being preeminently served) upon the fourteenth day after a death, by the principal mourner to the relatives and friends of the deceased. 2 गोडजेवण further signifies A meal upon sweets. Ex. गो0 केलें तर पाण्याचा शोष लागेलच.

मोल्सवर्थ शब्दकोश

गोळागुळ      

पु.       एक प्रकारचा वानर. [सं. गोलाड, गूल]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गोंडा

पु. १ गुच्छाप्रमाणें फूल; झुबका; तुरा (झेंडू इ॰ फुलांचा). २ घड; पुंजका; गोळा. ३ गेंद; झेला; झुबका; गूल; फुन्ना (पालखी, जनावराची शेंपटी इ॰ स गुच्छासदृश असणारा). ४ (कों.) झेंडूचें फूल; मखमल. ५ गुंडा पहा. ६ वेणींतील एक अलंकार. 'वेणीस जीचे विलसेत गोंडे ।' -सारुह २.३२. [का. गोंडे. प्रा. गोंडी = मंजरी] (वाप्र.) घोळणें- कांहीं मिळेल या आशेनें पुढें पुढें नाचणें; शेपूट हलविणें; खुशा- मत करणें; थुंकी झेलणें. ॰फुटणें-(गुळाला, रसाला) -कढ- णार्‍या रसावर साय येणें. ॰फोडणे-१ (सूर्य) पुरापुरा उगवणें; वर येणें. 'सुर्यानें गोंडा फोडला नाहीं तों दारीं येऊन बसला.' २ ठळकपणें प्रख्यात होणें; पुढें येणें (माणूस; बहुधां वाईट अर्थानें). ॰काढणें- (व.) फसविणें, घात करणें. ॰लावणें- (चांभारी) जोड्याच्या शेंडीस रेशमाचा गोंडा लावणें. ॰हालणें- झुलणें-(को.) सतत काम चालू ठेवणें (उत्तेजनासाठीं किंवा चेष्टेनें म्हणतात).

दाते शब्दकोश

गोंडा      

पु.       १. गुच्छाप्रमाणे फूल; झुबका; तुरा (झेंडू इ. फुलांचा). २. घड; पुंजका; गोळा. ३. गेंद; झेला; झुबका; गूल; फुन्ना (पालखी, जनावराची शेपटी इत्यादींना गुच्छसदृश असणारा). ४. झेंडूचे फूल; मखमल. ५. पहा : गुंडा. ६. वेणीतील एक अलंकार : ‘वेणीस जीचे विलसेत गोंडे ।’− सारुह २¿३२. [का. गोंडे] (वा.) गोंडा काढणे–फसविणे, घात करणे. गोंडा घोळणे–काही मिळेल या आशेने पुढे पुढे नाचणे; शेपूट हलविणे; खुशामत करणे; थुंकी झेलणे. गोंडा फुटणे−१. (गुळाला, रसाला) कढणाऱ्या रसावर साय येणे. २. सूर्य उगवणे. गोंडा फोडणे – १. (सूर्य) पूर्ण उगवणे; वर येणे. २. ठळकपणे प्रख्यात होणे; पुढे येणे (माणूस − बहुधा नाईट अर्थाने). गोंडा हालणे, गोंडा झुलणे – सतत काम चालू ठेवणे (उत्तेजनासाठी किंवा चेष्टेने म्हणतात). (को.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुड      

पु.       गूळ. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुड

पु. गूळ. [सं. गुड]

दाते शब्दकोश

गुड / गुढ

(सं) पु० गूळ.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

गुडाकू-खू

स्त्री. १ गूळ, केळी इ॰ मिश्र करून केलेली तंबाकू. २ रोगट पिकांच्या पानांवर शिंपडावयाचा तंबाखूचा काढा. ३ (ल.) त्रेधा; तिरपीट; दुःखपूर्ण स्थिति; दुर्दशा. [सं. गुडकं] ॰काढणें- वि. (ना.) खरडपट्टी काढणें.

दाते शब्दकोश

गुडाखू      

स्त्री.       १. गूळ, केळी इ. मिसळून केलेली तंबाखू. २. रोगट पिकाच्या पानांवर शिंपडायचा तंबाखूचा काढा. ३. (ल.) त्रेधा; तिरपीट; दुःखपूर्ण स्थिती; दुर्दशा. [सं. गुडक] (वा.) गुडाखू काढणे – खरडपट्टी काढणे. गुडाखू वळणे – घबराट होणे : ‘परंतु त्या बिचाऱ्याची आतल्या आत गुडाखू वळली.’ –भदि ३९२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुढ

(सं) पु० गूळ.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

गुळांबा

गुळंबा or गुळांबा m Mangoes preserved or boiled in गूळ.

वझे शब्दकोश

गुळचट or गुळचीट

गुळचट or गुळचीट guḷacaṭa or guḷacīṭa a (गूळ) Sweet, tasting like molasses. 2 C Sweetish.

मोल्सवर्थ शब्दकोश

गुळचट, गुळंबा, गुळमट, गुळमटणें, गुळवणी- वरी, गुळव्या, गुळसर, गुळार

गूळ मध्यें पहा.

दाते शब्दकोश

गुल्दान

(न.) कात्रीनें काजळी काढून घेण्याचें पात्र. “गुल्दानें रुप्याची” (साने-पयाव २८७). “गल्दानांनीं गूल कागवे” (साने-पयाव २८७).

फारसी-मराठी शब्दकोश

गुळेरस      

पु.       नारळाचे दूध व गूळ घालून बनवलेले पिठाच्या गोळ्यांचे एक पक्वान्न. (हेट.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुळहार

गुळहार guḷahāra n (गूळ & घर) A sugar-work. See गुऱ्हाळ, which form, although not etymologically the more correct, is yet the more common, form.

मोल्सवर्थ शब्दकोश

गुर्‍हाळ पहा. गुळहारी-वि. गूळ तयार करणारा. 'कवणी एक गुळहारी असे, तो गुळ करी.' -चक्रधर सिद्धांतसूत्रें ५३.

दाते शब्दकोश

गुळी, गुळी साखर

स्त्री. तांबडट, भरड अशी एक प्रका- रची साखर; गुळासारखा रंग असणारी एक प्रकारची साखर. [गूळ]

दाते शब्दकोश

गुलकावणी

गुलकावणी gulakāvaṇī f (गूल Noise, clamor.) Speech or actions designed to indicate intention, esp. to indicate falsely, and to mislead; making deceptive bearing, tendency, or inclination towards; making the pretence, feint, or show of. v दाखव, कर.

मोल्सवर्थ शब्दकोश

गुल्लडाग

पु. तापविलेल्या खिळ्यानें, मुद्रेनें दिलेला डाग, चोचा; गूल. 'गुल्लडागांची जांचणी ।' -दा ३.७.३४. [फा. गुल् = डागल्याची खुण + डाग]

दाते शब्दकोश

गुळमट

गुळमट guḷamaṭa a (गूळ) Sweetish.

मोल्सवर्थ शब्दकोश

गुळंबा, गुळांब-बा

पुन. गूळ शब्दांत पहा.

दाते शब्दकोश

गुळोणी

गुळोणी guḷōṇī n (गूळ & पाणी) Sugared water, eau desucre.

मोल्सवर्थ शब्दकोश

गुळशील, गुळशेल,गुळशेले      

न.       तांबडा भोपळा उकडून त्यात दूध व गूळ घालून केलेली खीर. (व.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुळसर

गुळसर guḷasara a (गूळ) Sweetish.

मोल्सवर्थ शब्दकोश

गुळत्र, गुळत्रय      

न.       गूळ, राब, काकवी यांचा समुदाय : ‘मद पारा गुळत्र ।’ - दास १५·४·१५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुळवा, गुळवी, गुळव्या, गुळावा, गुळ्या, गुळरांध्या, गुळहारी      

वि.       गूळ तयार करणारा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुळवणी

गुळवणी guḷavaṇī n (गूळ & पाणी) Sugared water, eau de

मोल्सवर्थ शब्दकोश

गुरमय      

स्त्री.       गूळ आणि गरम मसाला घालून केलेली पोळी. ‘कर गुरमय रोट्या, लेक बहिनाई आली ।’ - बगा. (अहि.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुरुळी

गुरुळी guruḷī f See गुरवळी or गुळवरी A puff stuffed with गूळ.

मोल्सवर्थ शब्दकोश

गूळआंबा

गूळआंबा gūḷāmbā m Mangoes preserved or boiled in गूळ.

मोल्सवर्थ शब्दकोश

गूलडाग      

पहा : गुल्लडाग गूळ      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गूळदगड

गूळदगड gūḷadagaḍa m गूळधोंडा m (A stone occurring in a mass of गूळ. Hence fig.) A wolf in sheep's clothing.

मोल्सवर्थ शब्दकोश

गूळधवा

गूळधवा a Of the colour of pale गूळ, of a yellowish red. Colour.

वझे शब्दकोश

गूळधवा-धा-धिवा-धुवा-देवा-धेवा-धावी

गूळधवा-धा-धिवा-धुवा-देवा-धेवा-धावी gūḷadhavā-dhā-dhivā-dhuvā-dēvā-dhēvā-dhāvī a Of the color of pale गूळ, of a yellowish red.

मोल्सवर्थ शब्दकोश

गूलगलबा      

पु.       दंगा; बखेडा : ‘खंबायतकर मोगल उगेच सरकारचे महाल खाऊन गूल गलब्याचे वेळेस हे शैत्य होतात.’ - ऐटि १·८०.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गूळकैरी      

स्त्री.       गूळ घालून केलेले बिनमोहरीचे आंब्याचे लोणचे. (व.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गूळखोबरे      

न.       १. गूळ आणि खोबरे यांचा खाऊ. २. (ल.) निव्वळ फसवणूक; लाच; लालूच : ‘गूळखोबरें विलोकुनि भलत्याहि जनासि बाळक वळावा ।’ - मोउद्योग ७·९. ३. (ल.) पोकळ भाषण, वचन. (वा.).गूळखोबरेदेणे - लालूच दाखविणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गूळमारी      

स्त्री.       उसाच्या प्रत्येक मळ्यापाठीमागे साडेबावीस शेर गूळ असा घेण्यात येत असे तो कर.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गूळमारी

गूळमारी gūḷamārī f A cess of twenty-two and a half sher of गूळ per sugarcane-plantation.

मोल्सवर्थ शब्दकोश

गूय

पु. (खा.) गूळ पहा.

दाते शब्दकोश

ग्वाड      

न.       १. गूळ. २. गोड. (कु. बे.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ग्वाड

न. (कु. बे.) गूळ; गोड. [गोड]

दाते शब्दकोश

घारगा

पु. एक खाद्यविशेष; पक्कान्न; तांदूळाच्या, गव्हाच्या रव्यांत किंवा सांज्यांत गूळ घालून त्याची थापटी-चांदकी करून ती तुपांत तळतात त्यास म्हणतात; तांबड्या भोपळ्यांत कणिक मळून त्याचा गोळा करून त्याच्या थापट्या तुपांत तळून काढ- तात त्यांस भोपळ्याचे घारगे म्हणतात. [प्रा. दे. घारिया; गु. घारी; का. गारिगे; तुल॰ सं. घार्तिक; का. घारिसु = तळणें]

दाते शब्दकोश

घाटले      

न.       १. घाटला; तांदळाच्या कण्या व नारळाच्या चवाचे दूध यांची घणसर खीर; गूळ, खोबरे, पाणी व तांदळाचे पीठ याची बनवलेली खीर; गुळवण्याला पीठ लावून घाटून केलेले (कोकणी) पक्कान्न, खाद्य. याला गोडे असेही म्हणतात. (राजा.) २. पिठले.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घाटलें

न. १ (राजा.) घांटलां; तांदुळाच्या कण्या व नारळांच्या चवाचे दूध यांची घणसर खीर; गूळ, खोबरें, पाणी व तांदळाचें पीठ यांची बनविलेली खीर; गुळवण्यास पीठ लावून घाटून केलेलें (कोंकणी) पक्कान्न, खाद्य. यास गोडे असेंहि म्हण- तात. २ (दादर) पिठलें. [घाटणें]

दाते शब्दकोश

घाटलें ghāṭalēṃ n (घाटणें To stir about.) A dish,--flour, गूळ, cocoanut &c. well stirred and boiled.

मोल्सवर्थ शब्दकोश

घरास राखण

घरास राखण gharāsa rākhaṇa f A person taking care of a house. 2 A little store, stock, stand by. Ex. सगळा गूळ खर्चूं नको घ0 थाडकासा ठेव.

मोल्सवर्थ शब्दकोश

घटणे      

अक्रि.       १. (कापड इ.) आकसणे; आखडणे; लहान होणे. २. (धान्य, तेल, तूप, गूळ इ. पदार्थ मापात, वजनात) कमी होणे. ३. शांत होणे; नाहीशी होणे; शमणे. ४. घट्टे पडणे; झिजणे; (शिथिल अवयव) घट्ट होणे : ‘कटि खांदे वाहतां घटले ।’ –मध्वमुनी (नवनीत ४४६. [सं. घृष्ट, घट्ट.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हातशेकणें

हातशेकणें hātaśēkaṇēṃ n (Hand-warming.) A term for the गूळ or molasses given to the चूलजाळ्या in remuneration for his service.

मोल्सवर्थ शब्दकोश

हेंड

न. १ झोंबटपणा; झोंबी. २ मैथुन. 'श्वानांचें हेंड तत्काळ सुटे । मनुष्याचें आकल्प न सुटे ।' -एभा १३.२११. ॰गूळ, हेंडूक हेंडूकमेंडूक-न. कुत्र्याचें गुप्त इंद्रिय; कुत्र्यांचें मैथून. (क्रि॰ गुंतणें; लागणें).

दाते शब्दकोश

इजट      

न.       ऊद मांजर, कांडेचोर; गूळ खाणारे मांजर. (माण. इजाट.) [का.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

इजट

न. (कर्ना.) इजाट; ऊद; कांडेचोर; गूळ खाणारें मांजर. (माण.) इजाट. [का.]

दाते शब्दकोश

काइरस

पु. काकडी वगैरे कच्च्या फळांची चिंच, गूळ घालून केलेली पातळसर कोशिंबीर. कायरस पहा. [का. काई = कच्चें फळ + रस]

दाते शब्दकोश

काजुला

पु. १ (कु.) समई मालवल्यानंतर लुकलुकणारें वातीचें टोंक; काजळी; गूल. २ (कु.) कानांतील मळ. [सं. कज्जल]

दाते शब्दकोश

काजुला

पु.       १. समई मालवल्यानंतर (शांत झाल्यानंतर) लुकलुकणारे वातीचे टोक; काजळी; गूल. (कु.) २. कानातील मळ. [सं. कज्जल]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

काजुलो

पु.       १. काजवा. (कु.) २. वातीचे गूल; कोळी; कोजळी. (गो.)३. काजूची दारू. (गो.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कांहींबांहीं

कांहींबांहीं kāṃhīmbāṃhīṃ a (कांहीं & बांहीं A qualifying reduplication. ) Used as a & ad Some little degree. Ex. कां0 गूळ घेतला कां0 घ्यावयाचा आहे; औषध घेतांच कां0 दिसूं लागलें.

मोल्सवर्थ शब्दकोश

कारली

स्त्री. शिमग्यांतील खेळांपैकीं एक प्रकार. सामान्य, नेहमीचा खेळ पुरा झाल्यावर यजमानाच्या लहान मुलास घेऊन मुरडत मुरडत गाणें व नाचणें. यावेळीं म्हणावयाचें गाणें ‘कारली ये ग्ये कारली । कारलीच्या वेळा हो मांडवा गेला...’ इत्यादि. हें गाणें झाल्यावर यजमानाचें बरें व्हावें म्हणून देवा- कडे गार्‍हाणें करून नेहमीच्या बिदागीशिवाय नारळ गूळ वगैरे मिळाल्यावर त्या मुलास उतरतात.

दाते शब्दकोश

कडण, कढण, कढन      

न.       मूगडाळ व गूळ एकत्र शिजवून केलेली आमटी; कढण. (गो.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कडता      

पु.       (चाळीस शेरांच्या) वजनी एक मण जिन्नस विकला असताना त्याच्यावर द्यावयाचा वर्ताळा (उदा. तूप, गूळ, तेल यांच्या दरमणामागे १॥ शेर). [क. कडत = छाट]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

केतके      

न.       गूळ उकरण्याचे उलथणे. (बे.) [क. कित्तु = उपटणे]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

केतकें

न. (बे.) गूळ उकरण्याचें उलथणें. [का. कित्तु = उपटणें]

दाते शब्दकोश

किराणा

पु. लवंग, मिरीं, मिरच्या, गूळ, तूप, साखर इ॰ माल; वाणजिन्नस. [सं. क्री = विकत घेणें; सिं. किर्याणी]

दाते शब्दकोश

किराणा, किराना      

पु.        लवंग, मिरी, मिरच्या, गूळ, तूप, साखर इ. माल; वाणसामान. [सं. क्रि = विकत घेणे, क्रयण]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कणदार

कणदार kaṇadāra a Granulous, composed of granules. 2 Full-eared--corn: also well-filled--ears. 3 Freely. Having substance or richness--कडबा, grass, grain, a soil, गूळ, तूप &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

कणगी, कणगुला, कणगुले      

स्त्री. पु. न.       लहान कणंग : ‘कणगीची काढितील लिंपण । गूळ शर्करा खातील संपूर्ण ।’ - जै ६·४९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कणगी, कणगुला-लें

स्त्रीपुन. १ (कों.) लहान कणंग. 'कणगींत उतरोनि पाट्या भरोनि देती.' -रामदासी २.२. 'कणगीची काढितील लिंपण । गूळ शर्करा खातील संपूर्ण ।' -जै ६.४९.

दाते शब्दकोश

कोळंगी

स्त्री. ठिणगी, गूल, काजळी.

दाते शब्दकोश

कोळंगी      

स्त्री.       ठिणगी; गूल; काजळी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कोंद      

स्त्री.       भाजलेले तीळ कुटून त्यात गूळ घालून तयार केलेले पुरण, लाडू इ. : ‘तिळाच्या कोंदेंची पोळी.’ - पाक ५४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कोंद

स्त्री. भाजलेले तीळ कुटून त्यांत गूळ घालून तयार केलेलें पुरण; लाडू इ॰. 'तिळाच्या कोंदेची पोळी.' -पाक ५४.

दाते शब्दकोश

कोयाडे      

न.       पिकलेले, पाडाचे व आंबट आंबे उकडून गीर काढून त्यात पाणी, गूळ व मसाला वगैरे घालून केलेला पदार्थ; आंब्याचे तोंडी लावणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कोयाडें

न. पिके व आंबट आंबे उकडून गीर काढून त्यांत पाणी, गूळ व मसाला वगैरे घालून केलेला पदार्थ; आंब्याचें तोंडींलावणें. [कोय]

दाते शब्दकोश

कप

पु० कापूस, गूल, सुरमाडाचा पांढरा बुरा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

क्षीराब्धी

स्त्री. खिरापत; प्रसाद. 'आषाढी व कार्तिकी क्षीराब्धीस डाळ चणियाची, गूळ.' -सनदा १७०. [खिरापत पहा]

दाते शब्दकोश

कुंवळणें

कुंवळणें kuṃvaḷaṇēṃ v i To dissolve--tamarinds, गूळ &c. in a liquor.

मोल्सवर्थ शब्दकोश

कुंवळणें kuṃvaḷaṇēṃ v c R To crush and squeeze about in a liquor (tamarinds, rice, गूळ, or similar substance) in order to dissolve it.

मोल्सवर्थ शब्दकोश

कुंवळणें v t Crush and squeeze about in a liquor (गूळ &c.) in order to dissolve it. v i Dissolve.

वझे शब्दकोश

कुवळणे      

उक्रि.       चिंचा, भात, गूळ वगैरे पाण्यात कुसकरून एकजीव करणे, कोळणे; गुरगुट करणे. (राजा.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खापटी

खापटी khāpaṭī f (Or खपटी) A pat or small cake of गूळ; a pat of other things.

मोल्सवर्थ शब्दकोश

खापटी f A pat or small cake of गूळ.

वझे शब्दकोश

खडा

खडा khaḍā m A small stone, a pebble. 2 A nodule (of lime &c.): a lump or bit (as of gum, assafœtida, catechu, sugar-candy): the gem or stone of a ring or trinket: a lump of hardened fæces or scybala: a nodule or lump gen. 3 A minor ढेप or mass of गूळ. 4 A radius of an umbrella-frame. खडा उडणें g. of s. (The leaping up of the खडा of a गुडगुडी when the tobacco is smoked out.) To be utterly spent or consumed--money, materials. खडा टाकून ठाव घेणें (To try the bottom by casting in a pebble.) To try, by some little experiment or effort, the nature or quality of. खडा फुटणें Expresses the opening of the rock and the gushing forth of water. Ex. नदीचा खडा or जमिनीचा खडा अझून फुटला नाहीं. खडे खाणें (To eat pebbles.) To toil, drudge, or suffer annoyance and vexation (as in a troublesome business). खडे खावविणें or चारणें (To feed with pebbles.) To annoy, harass, worry, oppress grievously. खडे घासणें or फोडणें (नावानें g. of o.) To be excited into fury at the mention of. 2 (Without नावानें) To toil, drudge, fag. खडे मोजणें To reckon with (calculi) pebbles, to calculate. खड्या खड्यानीं डोकें फुटणें g. of s. (To have one's head broken by many stones.) It is not one thing but many little things which bankrupt or ruin a man. खड्यांनीं डोकें फोडणें To throw stones at a man's head (lightly and gently) by way of expiating his sin of having killed a cow by throwing a stone at her. खड्यासारखा निवडणें To cast out or reject as worthless. And खड्यासार- खा बाहेर पडणें To fall out or aside as worthless.

मोल्सवर्थ शब्दकोश

खेदारू

पु. एक प्रकारचा गूळ. -शे ७.१४६.

दाते शब्दकोश

खेदारू      

पु.       एक प्रकारचा गूळ.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खीर

स्त्री. दुधांत गव्हले, तांदूळ, साखर इ॰ घालून आट- वून केलेलें पक्वान्न; गोमंतकांत रताळ्याचे तुकडे, तांदुळाचें पीठ, गूळ इ॰ पदार्थ खिरींत घालतात. खिरींचे प्रकार-गव्हाल्यांची, फणो- ल्यांची, नाखोल्यांची, मालत्यांची, बोटव्यांची इ॰ [सं. क्षीर; प्रा. खीर; सीगन खील; सिं. खीरु; पं. हिं. गु. खीर; ओरि. खीरी] (वाप्र.) खिरींत तूप पडणें-चांगल्या पदार्थाशीं दुसर्‍या चांगल्या पदार्थाचा संयोग होणें. म्ह॰ १ पोर पोटांत खीर ताटांत = मूल होण्यापूर्वींच त्याच्या उष्टावणाची तयारी; यावरून (ल.) अतिशय उतावळेपणा. २ जेथें खीर खाल्ली तेथें राख खावी काय? = जेथें फुलें वेचलीं तेथें गवर्‍या वेचाव्या काय? सामाशब्द- खिरींत सराटा-पु. चांगल्या माणसांतील वाईट माणूस; समाजांतील त्रासदायक माणूस; समाजकंटक; उपाधि; ब्याद; कांटा; (बायकी भाषा) विरूप माणूस; चांगल्या नाजूक वस्तूंतील वाईट व भसाडी वस्तु; एकचित्त मंडळींतील प्रतिकूल व्यक्ति. खिरींत हिंग-पु. चांगल्या मनुष्यांतील, वस्तूंमधील वाईट माणूस, वस्तु.

दाते शब्दकोश

खीर      

स्त्री.       १. दुधात गव्हले - शेवया, तांदूळ, साखर इ. घालून आटवून केलेले पक्वान्न. गोमंतकात तांदुळाचे पीठ, गूळ वा रताळ्याचे तुकडे घालून खीर करतात. २. कण्हेरी [सं. क्षीर] (वा.) खिरीत तूप पडणे - चांगल्या पदार्थाशी दुसऱ्या चांगल्या पदार्थाचा संयोग होणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खमंचा

पु. एक खाद्यपदार्थ; तुपावर भाजलेले पोहे, शेंगा- दाणे, फुटाणे, खोबर्‍याच्या चकत्या इ॰ सर्व पदार्थांचें मिश्रण तुपाची फोडणी करून, गूळ, मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर, मीठ, तिखट हळदीसहतींत टाकावें व ढकळून कढई उतरावी; खातांना, त्यांत लिंबू पिळावें. -गृशि १.४५६.

दाते शब्दकोश

खपटी

खपटी f A pat or small cake of गूळ or other things.

वझे शब्दकोश

खपटी khapaṭī f A pat or small cake of गूळ; a pat of other things.

मोल्सवर्थ शब्दकोश

खरूस

खरूस kharūsa m A head-ornament of silver (resembling a राखडी) for Shúdra females. 2 Biestings boiled with गूळ &c. and inspissated: also biestings gen.

मोल्सवर्थ शब्दकोश

खरवस, खरस

पुस्त्री. १ जनावराचें कोंवळें (व्याल्या- नंतरचें) दूध तापवून त्यांत गूळ घालून तयार केलेलें खाद्य. [सं. क्षार + रस]

दाते शब्दकोश

खरवस, खरस      

पु.       स्त्री. जनावरांचे कोवळे (व्याल्यानंतरचे) दूध तापवून त्यात गूळ घालून तयार केलेले खाद्य. [सं. क्षार + रस]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

लादा

पु. १ (कालवलेलें पीठ, मळलेला चिखल, चुना इ॰ कांचा भिंत इ॰ कांवर मारण्याजोगा) गोळा; (सामा.) चांगला भिजवून मळलेला गोळा. २ पाण्याचे बांध तयार करण्यासाठीं पळींवानें खणून काढलेल्या मातीचे चौरस गोळे. ३ (पीठ, भात, गूळ, इ॰ कांचें) पातळ स्वरूप; लिबलिबीत अवस्था. ४ पाण- वट चिखल. 'लादा लाटा कातरे । ठाईं ठाईं ' -दा ११.६.३.

दाते शब्दकोश

पु. १ धुण्याच्या कपड्यांचा बोजा, ढीग. २ बोजा; ओझें; भारा; लागेल त्यापेक्षां अतिशय जास्त प्रमाणांत असणारा कोणताहि पदार्थ (भात, गूळ, इ॰). ३ (क्व.) गुंता; लगदा; एकमेकांत मिसळलेला जुडगा (केंस, कपडा, कागद इ॰चा). ४ अशी गुंतागुंत, एकत्रित झालेली स्थिति. लादावर्दीचें काम- न. (लादलेलें असल्यामुळें) अव्यवस्थित, कसें तरी केलेलें काम.

दाते शब्दकोश

लाडन

स्त्री. न. १ गूळ करावयाच्या कढईस उडीद, राजगिरा इ॰च्या पिठाचें लुकण लावितात तें. २ राळेसारखा एक प्रका- रचा पानें-फांद्या यांपासून काढलेला चीक. [अर. फा. लादन्]

दाते शब्दकोश

लाढा

पु. १ लगदा; लादा (गूळ इ॰चा). २ अंगाचा चिकटपणा; दरदरून घाम येण्यानें होणारी अवस्था (तापामुळें, उष्णतेनें, देवी, गोवर वगैरेमुळें).

दाते शब्दकोश

लाढा lāḍhā m Clogginess or viscousness (as of गूळ through being boiled badly): also clamminess, thick sweatiness, or sweltering state (अंगाचा--of the body through fever, heat, small pox &c.) 2 A term for a barren buffalo or cow.

मोल्सवर्थ शब्दकोश

लाढण

स्त्री. गूळ करावयाच्या काहिलीस उडदाचें पीठ इ॰चें लुकण लावितात तें; लाडन पहा.

दाते शब्दकोश

लाहडा

पु. १ लगदा; राडा; गोळा (गूळ, चिखल इ॰ चा) २ गुंता; गुंतागुंत; मिसळ.

दाते शब्दकोश

लाहडा lāhaḍā m (लहालहा The imitation-word of Panting or blowing). Fullness, vehemence, intensity. Used with such words as ताप, देवी, गोवर, खरूज; as तापाचा ला0 Exacerbation or vehement glowing of fever; देवींचा -गोवराचा -खरजेचा -कां- जण्याचा ला0. Burning hot eruption of the small pox, measles &c. Also तापानें -देवीनें -खरजेनें -कांज- ण्यानें -उन्हानें ला0, signifying the burning distress of the subject of the fever &c. 2 Clogginess (as of गूळ, mud &c.): also cloggedness or clogged state (of hairs, papers &c.)

मोल्सवर्थ शब्दकोश

लगदा

लगदा lagadā m A well-kneaded and well-moistened mass (of mortar, mud, dough &c.): also any thin or batter-like stuff (as melting गूळ, squashy rice &c.) 2 Used in comp. or as a with such words as भात, पीठ, भाजी, in the sense of Watery and soft.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. १ लादा; भिजवून, चांगला मळून केलेला गोळा (चुना, चिखल, कणीक इ॰ कांचा). २ एक घास होईल एवढा मांस इ॰कांचा गोळा; लचका. 'रिपुहृदयांचे चि तोडिती लगदे । -मोकर्ण २१.२१. ३ घट्ट पदार्थ (चिघळणारा गूळ, पळप- ळीत भात इ॰). ४ (समासांत) पचपचीत व मऊ (भात, पीठ, भाजी इ॰ शब्दांशीं विशेषणाप्रमाणें योजतात.) ५ पुंजका गोळा; गुंता (केंस, कागद, पानें इ॰चा).

दाते शब्दकोश

लकडी

स्त्री० काडी, लांकूड. २ जास्त कडक झालेला गूळ इत्यादिकांचा पाक.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

लोळा

पु. १ घड्याळ, घंटा इ॰ चा लंबक. २ पडजीभ. ३ पीठ, मांस इ॰ चा तोडून काढलेला लचका-तुकडा-भाग. लांबट वाटोळा गोळा. (क्रि॰ घेणें; तोडणें; काढणें). [सं. लोल] ॰तोडणें-१ आईबापांनी मुलीचें लग्न करून देऊन तिला दुस- ऱ्याच्या स्वाधीन करणें. २ (कृपणानें) पैसा खर्चणें. ३ (व.) चावा घेणें; लचका तोडणें; एखाद्यावर खेंकसून धांवण. लोळी- स्त्री. १ लहान घंटेचा लहान बारिकसा लोळा; लहान लंबक. २ डूल, झुंबर, इ॰चा लोंबणारा मणि; लोलक. ३ शेंबूड इ॰चा जाड, घट्ट आणि लोंबत गोळा. ४ तोंडांतील पडजीभ. ५ बैल, गाय यांच्या गळ्याखालचें लोंबतें व पातळ कातडें. ६ (राजा.) लांबट आणि सारखा भरलेला फणस. ७ गूळ, मेण, पापडाचें भिजवलेलें पीठ इ॰ पदार्थाची लांबोडी गोळी.

दाते शब्दकोश

लोळी

लोळी lōḷī f (Dim. of लोळा) A small bell-clapper or tongue; a small pendulum; a pendant or bob of an earring, a jewel, or a chandelier; (esp. with जिभेची) the uvula; (esp. with गळ्याची, गळ्याखाल- ची, or बैलाच्या गळ्याखालची) a dewlap; (with घांसाची or अन्नाची or औषधाची or तोंडांत) the hard or cloggy mass of food or of medicines in a mouth dry from checked saliva; (गुळाची) the clammy pendant of a string of गूळ marred in the boiler; (कफाची or शेंबुडाची) a pendulous gob of phlegm or ball of viscid snot; (फणसाची) a bellclappershaped jack-fruit. 2 (Or लोळण or णी) The wild rolling or itch to roll (as of horses and asses exposed to the sun). v घे, घाल, मार, & ये. Also, generally, desire (as from drowsiness) to lie down. v ये. 3 (Better लोली) A small anchor of a particular kind.

मोल्सवर्थ शब्दकोश

लोंधा

लोंधा lōndhā m Any thin, batter-like, swashy, slushy stuff: (as melting गूळ, soft-boiled rice or vegetables, overwetted dough.) 2 Used as a Watery and soft, swashy, oozy.

मोल्सवर्थ शब्दकोश

लोंवथा

पु. मांस, भिजवलेंले पीठ, चिखल, गूळ इ॰ चा तोडून काढलेला तुकडा, खंड किंवा लचका; लोथ; लोथा.

दाते शब्दकोश

माड

पु. नारळाचें झाड. म्ह॰ आडो माडो समुद्रासारखा वाढो (मुलाला न्हावूं घालतांना स्त्रिया म्हणतात). = माडाप्रमाणें उंच व समुद्राप्रमाणें विस्तार पावो या अर्थी. ॰उतरणें, वहाणें- माडाची माडी काढणें व विकणें. सामाशब्द- ॰पीर-पु. ताडी पिण्याचें व्यसन असणारा; नारळसंत. [माड + फा. पीर] ॰बाग- पु. (हेट.) नारळीच्या झाडांचा बाग. माडागूण, मांडागूल- ळ-नपु. (कों.) नारळी, ताड यांस येणारा शेवटचा सुयरा, कोंका, पोय. [माड + अगूळ, अग्र] माडागौड-पु. (गो.) माडीपासून तयार केलेला गूळ.

दाते शब्दकोश

मदन

पु. गुर्‍हाळांत गूळ करतांना आटत असलेला रस. -ज्ञाको ऊ २८.

दाते शब्दकोश

मिठा, मिठडा

वि. गोड; मिष्ट; रुचकर; मिठास. [सं. मिष्ट; प्रा. मिठ्ठं] मिठाई-स्त्री. खाऊ, पेढे, बर्फी इ॰ साखरमिश्रित गोड पदार्थ. [हिं.] मिठा ठक-वि. गोडगोड बोलून फसविणारा. ॰बार-पु. पहिला बार, बहर; पहिलें पीक. ह्याच्या उलट खट्टाबार. ॰लिंबु-न. साखरलिंबू. मिठांश-शु-पु. मिष्टांश; गोडी. 'हें न निवडे मिठांशु । अमृतीं जेवी ।' -अमृ. ५.७. मिठास-स्त्री. स्वादिष्टपणा; माधुरी; मिष्टता; गोडी. मिठा(ठ्ठा)स, मिठ्ठा-वि. गोड. मिठाक्षर-न. गोड शब्द. मिठी-स्त्री. १ (गोड पदार्थ फार खाल्ल्यानें उत्पन्न झालेली) अरुचि; वीट; तिटकारा, शिसारी. (क्रि॰ बसणें). २ आवड; छंद; उत्कट इच्छा. [सं. मिष्ट] ॰पडणें-गोडी लागणें; ऐक्य पावणें. मिठे चावल-पु. (व.) गूळ व गरम मसाला घालून केलेला भात; गूळभात. [हिं.]

दाते शब्दकोश

मणगणें

क्रि. (कों.) चण्याची डाळ व तांदुळाचे पीठ यांत गूळ घालून कालवून तें एकत्र शिजवणें.

दाते शब्दकोश

मोहन

न. गूळ, खोबरें आणि वेलची वगैरे एकत्र करून ज्या करंज्या, मोदक इ॰ करतात त्यांत घालतात तें पुरण, चुकीनें तेल. मोवन, तूप. [मोवन]

दाते शब्दकोश

मसाला

पु. १ कांहीं खाद्य, पेय, औषध इ॰ अधिक गुण- कर व रुचिकर करण्याठीं घालतात ते पदार्थ समुच्चयानें (भाजींत हिंग, जिरें इ॰-खिरींत,लाडूंत लवंग, वेलदोडे इ॰-जनावरांच्या पौष्टिक औषधांत गूळ, मैदा, भांग इ॰) २ तोंडीं लावणें; खार; लोणचे; व्यंजन. ३ (सामा.) मिश्रणांतील द्रव्यें. जसें चुन्याचा मसाला, रंगाचा मसाला. ४ सरकारनें जवानीसाठीं बोलाविलेल्या आरोपीपासून न्यान देण्यापूर्वीं घेतलेला पैसा, खर्च. 'त्याजवरून सरकारांतून राजश्री बाळाजी महादेव याजकडे मनसबीविशीं पत्र दिल्हें त्यांनीं आपल्यास मसाला करून आणिले.' -थोमारो २.१५२. ५ वसूल करावयास गेलेल्या शिपायाला सरकारी चिठ्ठींत लिहिलेलें द्यावें लागतें तें द्रव्य. 'त्याजवर कोपायमान होऊन ढालाईत व दहा हजार रुपये मसाला करून पाठविले.' -भाव १०१.६ निरनिराळ्या निमित्तानें बसविलेले दंड, दस्त. 'त्या- वरून तुम्हीं लोहवाडीच्या पाटलास वीस रुपये मसाला घेतला.' -वाडबाबा २.७८. ७ सामान; सामुग्री; साहित्य. ८ (ओतकाम) डांबर आणि विटकर यांचा एकजीव करून केलेली ओतकामाची माती. [अर. मसालिह; मस्लहत्चें अव.] मसालेदार-वि. मसाल्यानें युक्त; मसाला घालून स्वादिष्ट केलेला (खाद्य, पेय इ॰ पदार्थ).

दाते शब्दकोश

मुडा

मुडा muḍā m An oval or a spheroid-form bundle or case formed of layers of rice-straw or grass bound round with cord, containing rice or grain, and sometimes charcoal. These cases are of different sizes and of some varieties of shape, and they bear different names (see कोळें, चोबा, आगळा, मुडें): also the quantity of rice or grain so contained; consisting at Bombay of twenty-five maunds, at some other places, of twenty-eight. See further under मुडी. 3 A lump of गूळ as taken out of the ढेपाळी or inspissating pit. मुडा घालून बसणें To sit bundled together, the head upon the knees and the arms around them (i.e. assuming the form of the rice-मुडा).

मोल्सवर्थ शब्दकोश

निचाड, निचाडा      

वि.       १. दांडगा; उद्धट; बेमुर्वत; अविनय. २. निरिच्छि; निष्काम. ३. निर्लज्ज; निगरगट्ट. ४. आवड, रुची, चव नसलेला. ‘गुळासारखा गूळ दगड । परी तो कठिण निचाड ।’ – दास ८·५·४७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निनाव      

पु.       नारळाचे दूध, डाळीचे रवाळ पीठ, साजूक तूप आणि गूळ यांपासून हरितालिकेच्या आदल्या दिवशी केला जाणारा गोड पदार्थ.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निस्तूक

निस्तूक nistūka sometimes निस्तोष ad (निस्तुष S) Wholly, totally, without any remainder or any excepted portion. Ex. जें धान्य ठेविलें होतें तें नि0 संपलें; पाऊस नि0 गेला; ह्यांत गूळ नि0 नाहीं. 2 Altogether, utterly, perfectly, thoroughly; without any imperfection or deficiency; or in all points and respects. Ex. हा कागद नि0 फुटतो; निस्तूक-मूर्ख-सोदा-लबाड-वेडा- अंधळा-बहिरा-नागवा. 3 Only, merely, simply, nothing but. Ex. हा नि0 वैदिक.

मोल्सवर्थ शब्दकोश

पाघळ

पु. गूळ, साखर इ॰ पदार्थास सुटणारा द्रव; पाझर; ओघळ. [पाघळणें]

दाते शब्दकोश

पाघळणें

अक्रि. १ (ओलें वस्त्र इ॰कांतून पाणी इ॰कां- सारखा द्रव) गळणें; ठिबकणें; टपकणें. 'ओंजळीवरी ओंजळी हात ओले पाघळती ।' -वसा ५०. २ गूळ, साखर इ॰ पदार्थ हवेतींल उष्णतेनें द्रवानें युक्त होणें; पाझरणें; चिघळणें. [सं. प्रगलन; हिं. पाघलना] पाघळत येणें-जाणें-(ल.) मानखंडना, तेजोभंग होऊन खालीं मान घालून जावें लागणें, जाणे. जीभ पाघळणें- बोलण्याच्या भरांत भोसळटपणानें न बोलावयाच्या गोष्टी बोलून जाणें.

दाते शब्दकोश

पाघळणी

स्त्री. वितळण्याची, विरघळण्याची किंवा ठिब- कण्याची क्रिया; गूळ; साखर इ॰कांस द्रव सुटणें. [पाघळणें]

दाते शब्दकोश

पाझर

पु. १ (पाणी, तूप इ॰ द्रव पदार्थ भरलेल्या मडक्यां- तून त्या पदार्थाचा किंवा खडकांतून पाण्याचा डोळ्यातून अश्रूंचा) थोडा थोडा होणारा स्त्राव; झिरपण; ठिबकी; टप्टप् गळणें. 'ऐकतांचि नेत्रीं लागले पाझर ।' -रामदासी २.५७. २ झरा ओघळ; ओहळ. 'कडे कपाट पाझर ।' -दावि २४४ .३ गूळ, साखर इ॰कांस हवेतींल ओलाव्यानें सुटणारें पाणी; पाघळ; चिहाळ. ४ दयार्द्रता. -शर. (क्रि॰ फुटणें) [सं. प्र + क्षर् = पाझरणें प्रा. पज्जर] दगडास पाझर फुटणें-अतिशय कठोर हृदयाच्या मनुष्याच्या ठिकाणीं दया इ॰ मृदु भावना उत्पन्न होणें.

दाते शब्दकोश

पाझरणें

स्त्री. १ (गूळ, साखर इ॰ पदार्थ हवेंतील जलां- शांनें) पाघळणें; द्रव्ययुक्त होऊन वाहूं लागणें; (भांडें, मडकें इ॰ कांतून आंतील पाणी इ॰ द्रव पदार्थ) गळणें; ठिबकणें; झरणें; झिरपणें; स्त्रवणें. 'कीं श्रृंघाराचे मेघु ॐळले । तैसें रुख-राए पाझिरैले । अंतराळीं ।' -शिशु ६१७. 'त्वचा वेढिली पाझरे आश्वलाची ।' -मुरा युद्धकांड ६.२१३. २ (अतःकरण इ॰) द्रवणें; कळवळणें; पिळवटणें. [सं. प्रक्षरण; प्रा. पज्झरई = पाझरतें; सिं. पघिर्जणु]

दाते शब्दकोश

पाझरणी

स्त्री. १ पाझरण्याची, ठिबकण्याची, गळण्याची क्रिया; गळती. २ (गूळ इ॰) पाघळण्याची क्रिया. [पाझरणें]

दाते शब्दकोश

पान

न. (कर.) पावशेर (शेंगा गूळ यांच्या व्यापारांत रूढ) 'शेंगांत दहा पान माती निघाली.'

दाते शब्दकोश

पानको

पु. (गो.) गूळ घालून भाजलेला पावाचा एक प्रकार.

दाते शब्दकोश

पांगूळ

वि. १ पांगळा; पंगु; लंगडा. 'गूळ क्ष्वेडचि वाटे मज तातविचार होय पांगूळ ।' -मोकृष्ण ८३.१९. २ कुंठित; खुंटलेला. 'कापूर आणि परिमळु । निवडूं जातां पांगूळु । निवाड होये ।' -अमृ १.२३. [सं. पंगु] ॰काठी-घोडा-धिरा- स्त्रीपु. १ लंगड्या मनुष्यास चालतांना आधारमृत असलेली काठी, कुबडी. २ (ल.) पांगळ्यांचा, दुबळ्यांचा, दीनांचा कनवाळू, मित्र, सहाय्यकर्ता. ॰गाडा-गाडी-पुस्त्री. पांगुळगाडा पहा. ॰पोवा-पोहा-पोहो-पु. पांगळ्या, दुबळ्या, लंगड्या मनुष्यांचा जमाव, टोळी; सामान्यतः प्रवास करणाऱ्या असल्या स्त्रिया व मुलें यांच्या जमावास उद्देशून वापरतात. [पांगूळ + पोवा = जमाव, समूह (यात्रेकरू, प्रवासी)] ॰वाडा-पु. लुळ्यापांगळ्या लोकांच्या वस्तीचा मोहल्ला, पुरा, पेठ. [पांगूळ + वाडा]

दाते शब्दकोश

पाप(पा)डी

स्त्री. १ तांदुळाच्या पिठांत मसाल्याचे पदार्थ मीठ घालून तें पीठ पाण्यांत भिजवून त्याचा पातळसा थर एखाद्या पानावर किंवा पातळ पत्र्यावर घालून तो वाफेंत उकडून, उन्हांत वाळवून केलेली आणि मग तळलेली पातळ, कुडकुडीत पोळी; लहान पापड; फेणी. २ कढणार्‍या उसाच्या रसाच्या वरची मळी व तिची थापटी, पापुद्रा. ३ तांदुळाच्या किंवा गव्हाच्या पिठांत गूळ घालून तयार केलेली आणि तळलेली थापटी; गूळपापडी. ४ (राजा.) सपाट दगडांची फरशी; फरसबंदी रस्ता. ५ (गो.) (सामा.) पापुद्रा. [पापड]

दाते शब्दकोश

पातोवळा, पातोळा

पु. तांदुळाच्या पिठांत कांकडी, गूळ व खोबर्‍याचा कीस इ॰ घालून हळदीच्या पानावर तें पीठ थापटून मोदकाप्रमाणें उकडून केलेलें पक्वान्न. हें दोन तीन दिवसपर्यंत टिकतें. (गो.) पातोळी. 'घावन पातोळ्यांच्या ओळी ।' -मसाप २.२३. [पात + पोळी]

दाते शब्दकोश

पावडें

न. १ दांडा घालण्यासाठीं मागें वर्तुळाकृति भोंक असलेलें व बाकी सपाट पत्र्याप्रमाणें सुमारें वीतभर लांबीरुंदीचें पुढें धार असलेलें सामान्यतः चौकोनाकृति लोखंडी हत्यार; फावडें; खोरें. २ महानुभावी पंथाचे लोक व इतर जोगी आंकड्यासारखा वांकलेला दंड हातांत घेतात तो. ३ कानफाटे लोक जवळ बाळग- तात तें एक लांकडाचें साधन. फावडी पहा. ४ गूळ करतांना आळ- लेला रस जमीनीवर ओतून घट्ट करण्याचें एक लांकडी हत्यार. इतर अर्थीं फावडें पहा. ॰ओढ-स्त्री. खोऱ्यानें पैसा ओढणें; अतिशय लूट. 'हिंदुस्थानच्या द्रव्याची जी पावडेओढ चालली आहे.' -टि २.२९६.

दाते शब्दकोश

पडद

स्त्री. १ पडदा अर्थ ८ पहा. २ ढेंपाळ्याला गूळ चिकटूं नये म्हणून ढेंपाळ्यांत घातलेलें फडकें.

दाते शब्दकोश

पन्हें

न. आंब्याची कैरी, चिंच इ॰कांचें आंबट पाणी करून त्यामध्यें गूळ किंवा साखर घालून तयार केलेलें पेय; आंबा इ॰ चें सरबत. (गो.) पनक. [सं. पानका]

दाते शब्दकोश

पंक

पु. (गो.) (मिठाई इ॰ करण्यासाठीं) साखर, गूळ इ॰चा केलेला पाक, रांधा. [सं. पाक]

दाते शब्दकोश

परिवडणें

सक्रि. १ प्रकार करणें; प्रत लावणें; वस्तू विशिष्ट पद्धतीनें मांडणें. २ वर घालणें. 'आधींच द्रव्यें चुरमुरीं । वरि परिवडिजती मोहरी । जिये घेतां होती धुवारी । नाकें तोंडें ।' -ज्ञा १७.१४६. ३ कालवणें; माखणें. 'गुळें गूळ परिवडिला । मेरू सुवर्णे मढिला ।' -अमृ ७.२४९. [परवड; सं. परि + वृ]

दाते शब्दकोश

फणी

फणी phaṇī f (फणा) A comb. 2 A weaver's instrument for pressing and closing the woof. 3 A combing card. 4 A scraper (of the adhering गूळ) of sugar-boilers. 5 A clustering stalk of plantains; an off-branch of the fruit-receptacle. 6 The hood of Coluber Nága &c. 7 m S A snake with a hood.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री. १ केंस विंचरण्याचें दांते असलेलें साधन; कंगवा; विंचरणी. २ कापड विणण्यासाठीं जींत दोरे (ताणे) ओंवतात ती चौकट. ही बोरूच्या चोयांची केलेली किंवा लोखंडी तारांचीहि असतें; मागाची फणी. ३ पिंजण्याचें यंत्र; साधन. ४ काहिलीला चिकटलेला गूळ खरवडण्याचें साधन. ५ केळ्यांचा घड; फडी. [देप्रा. फणग, फणिह] म्ह॰ (गो.) फणी गेली केस उगौंक = कामाचा मनुष्य कामाला गेला. सामाशब्द- ॰फरंडा- पु. चांदीच्या पत्र्याची लहान फणी व त्याचीच कुंकवासाठीं केलेली लहान डबी (विवाहसंस्कारांत वापरतात). फणेरें, फण्यारें-न. १ शिवणकामाचें सामान ठेवण्याचें जुगदान, पिशवी. २ (फणी, करंडा, आरसा इ॰) वेणीफणी करण्याचें साहित्य ठेवण्याची बायकांची पिशवी, झोळणा.

दाते शब्दकोश

फुटागूळ

पु. ढेप फुटून तुकडे केलेला, बारीक गूळ.

दाते शब्दकोश

फुटागूळ phuṭāgūḷa m गूळ broken or fallen into small lumps.

मोल्सवर्थ शब्दकोश

राबडी

राबडी rābaḍī f (राब) A kind of custard,--milk thick- ened by boiling and made up with sugar and spices. 2 Thin गूळ or thin mud.

मोल्सवर्थ शब्दकोश

राबरी

राबरी rābarī f गूळ not duly inspissated.

मोल्सवर्थ शब्दकोश

रेबड

न. १ घाण; रक्त मिश्रित पू. २ -स्त्री. चिखल, शेण, गु, इ॰चा ढीग अगर पसारा; रेंदाड; घाण; रबडा; चिखलाची जागा. रेबडणें-सक्रि. (भांडें, अंग इ॰) बरबटविणें; माखणें; चोपडणें; फासणें. -अक्रि. बरबटलेलें असणें किंवा होणें; (रस्ता, शरीर, नाक, तोंड, भांडें. वस्तु इ॰) माखलेलें असणें. रेबडी- टी-स्त्री. (राजा.) १ पाघळून पातळ झालेला गूळ. २ बिल- बिलीत झालेलें फळ; अविकल्यानें आंबा, फणस इ॰ चा थिलथिलीत झालेली गीर; कुजूनं शेण झालेला जिन्नस.

दाते शब्दकोश

रेबडी

रेबडी rēbaḍī f रेबटी f R Oozy and running गूळ, sweetmeats &c.; overripe and squashy pulp (as of the jack, melon &c.)

मोल्सवर्थ शब्दकोश

रेंद

रेंद rēnda f m C रेंदा m रेंदगड or रेंदगूड n m रेंदड f रेंदाड n Sloppy mud, mire, slush; foul and dreggy water, oil, ghee; running or oozing गूळ; bloody pus or sanious running; foul snot or slabber; a mass of dung and mucky dirt; any slop, filth, mess, or nastiness. 2 रेंदा is further applied, figuratively, to the nauseous mass of materials from which spirituous liquor is extracted; to materials mixed up for the making of brass, for the furbishing of gold &c. And रेंद m is further a Distillery, and, further, in the Tannah zillá, what at Poona and Satara is आवखोरा (A water or drinking vessel). रेंदा or रेंदाड, रेंदगड or रेंदगूड काढणें g. of o. To beat to a mummy or an oozing mass.

मोल्सवर्थ शब्दकोश

रेंद, रेंदग(गू)ड, रेंदड, रेंदा, रेंदाड

स्त्री. नपु. स्त्री. पु. न. १ घर, गुरांचा गोठा इ॰ तील केरकचरा किंवा गदळ. २ चिखल; घाण. ३ तेल, तुप इ॰ च्या बारदानांतील गाळ; पाण्यांत जमलेला मातीचा अंश; मातीमुळें गढूळ झालेलें पाणी. ४ ब्रण, गळूं इ॰ तील दाट पू; रक्त. ५ शेणाची रास. ६ पाघळलेला गूळ. ७ राड; खातेरें. रेंदा-रेंदाड-रेंदागड-रेंदगूड काढणें- झोडपून काढणें; रक्त निघेपर्यंत मारणें. ॰रेंद-वि. आळशी; मंद; सुस्त; जड. रेंदवणी-न. गढूळ पाणी; गदळ पाणी. [रेंदा + पाणी] रेंदसरा-पु. पाणी पाझरून येण्यासाठीं किंवा पडण्यासाठीं ठेवि- लेलें भांडें. [रेंदा + सरणें] रेंदाड, रेंदगड, रेंदगूड-वि. चिख- लानें भरलेलें; घाण किंवा धूळमिश्रित (पाणी, तेल, तूप, रक्त इ॰). रेंदावणें-अक्रि. १ (पाणी इ॰) गढूळ होणें; घाण होणें. २ (गळूं इ॰ मध्यें) पू सांचणें; पुबानें डबडबणें; पू गळण्यासारखें बर- बरीन होणें. रेंदाविणें-सक्रि. (पाणी इ॰) गढूळ करणें; घाण करणें. रेंद्या-वि. रबरबीत. 'रेंद्या चिखुल तें वाळलेसें वाटे । -दावि ७६१.

दाते शब्दकोश

रहाड or डी

रहाड or डी rahāḍa or ḍī The mud-pit of the gambolers and rioters during the होळी: also the dancing and capering and sport in it. 2 Muckiness or sloppiness (of a road, floor &c.); mud in general: also the slush or squashy matter (of rotting melons, dissolving गूळ &c.)

मोल्सवर्थ शब्दकोश

रपटा

पु. गूळ, चिंच, चिखल वगैरेचा केलेला लिबलिबीत, पातळ लगदा.

दाते शब्दकोश

रपटा rapaṭā m Any substance (as गूळ, tamarind-pulp, mud) reduced to a slimy or viscid consistence.

मोल्सवर्थ शब्दकोश

रवा

रवा ravā m ( H) A grain (as of gunpowder, sand &c.); a granule (as observable in congealed honey, ghee &c., in semilino or rolong flour, sugar &c.); grit (as in meal). 2 Granulous wheaten flour. 3 A lump or little mass (esp. of some granulous substance, of गूळ, घी &c.) 4 A particle (of gold or silver). 5 A bit of turmeric as scraped and colored in preparation for कुंकूं. 6 A spoke of a wheel. 7 A depression in the goldsmith's stamp called पेरांची अवटी, forming a granule on the stamped trinket. रवा काढणें (In trials by ordeal.) To take a piece of metal out of heated oil.

मोल्सवर्थ शब्दकोश

रवका

पु. एखाद्या रवाळ पदार्थाचा जमलेला, तोडून काढ लेला लहानसा डोळा; तुकडा; (गूळ, मध, तूप इ॰चा). 'कलिंगड चांगलें असलें म्हणजे त्याचे रवके तोडून खावयास बरें.' [रवा]

दाते शब्दकोश

सांजा

पु. १ गहूं दळले, भरडले असतां त्याच्या होणार्‍या कण्या; जाडा रवा. २ कोणत्याहि धान्याच्या कण्या. 'आणि संयाव शब्दें जाण । जे गोधूम खंडकण । देशभाषा विशेषण । सांजा ऐसें म्हणती ।' -रास १.१९४. ३ या कण्यांचें केलेलें गोड खाद्य; शिरा (गुळाचा). शिरा बारीक रव्याचा साखर घालून केलेला, तर सांजा जाड रव्याचा गूळ घालून केलेला असतो. [सं. संयाव] सांजवरी, सांजोरीस्त्री. १ सांजाची पुरी; एक पक्वान्न. 'सोज्वळ ब्रह्मतेजें । साखर सांजोरी । जेवितो हे गोडी । तोचि जाणे ।' -ज्ञागा १५९. २ (कर्ना.) सांदणें; इडली.

दाते शब्दकोश

सारण

सारण sāraṇa n Stuffing material, esp. of gurgions or coarse wheaten meal well-kneaded with गूळ or गूळखोबरें (as for पुरी, करंजी, गुरवळी, साटोरी, कचोरी &c.)

मोल्सवर्थ शब्दकोश

सारनुरी

स्त्री. (क.) राळपिठाचें सारण व गूळ घालून केलेली पोळी [सारण + पुरी]

दाते शब्दकोश

सायटी

सायटी sāyaṭī f सायटें n (Deteriorative forms of साय) Thin creamy surface (as on दहीं or poor milk): also the scummy pellicle or film on heated गूळ &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

शेंदव, शेदव

न. १ सैंधव; शेंदेलोण. २ खारटपणा; लोणा (जमीनीचा); खारट पाझर. 'खाडीच्या पाण्याचा एथपर्यंत शेंदव मारतो म्हणून एथच्या विहिरीचें पाणी खारें.' ३ मीठ, गूळ वगैरेस सुटणारा पाझर.

दाते शब्दकोश

शेरणी

शेरणी śēraṇī f ( P) Sweetmeats; but used esp. of the sweetmeats distributed in a temple &c. by a person of whom a desire expressed to an idol accompanied by a vow has been fulfilled. 2 A little ढेप or thick rondle of गूळ (esp. as made at the place and season of sugar-boiling to present to the idol and to certain village-officers &c.)

मोल्सवर्थ शब्दकोश

शिदलाडू, शिरलाडू

पुअव. (व.) कणकेंत गूळ घालून त्यांचे उकडून केलेले लाडू; सिद्धालाडू पहा.

दाते शब्दकोश

शिकरण, शिक्रण, शिखरण

स्त्री. कोळीं, खरबूज इ॰ दुधांत कुसकरून व गूळ किंवा साखर घालून तयार केलेला खाद्य पदार्थ. 'एक मधुर शिखरणी । श्वेतभक्ष्य पंचवरान्नी ।' -मुक्तेआदि २९.८३. [सं. शिखरिणी]

दाते शब्दकोश

शिरा

पु. १ रवा तुपांत भाजून व नंतर त्यांत गूळ किंवा साखर घालून केलेलें पक्वान्न; गोड सांजा. २ पाक; औषधी रांधा ३ अर्क; सत्त्व; काढा.

दाते शब्दकोश

शङ्कर-पाळा

(पु.) [फा. शकपारा] एक गूळ, तूप, कणकीचा तळीव पदार्थ.

फारसी-मराठी शब्दकोश

शंकरपाळा-ळें

पुन. एक खाद्य पदार्थविशेष; साखर अगर गूळ, तूप, कणिक यांचा तळीव गोड पदार्थ [सं. शंखपाळ. तुल॰ फा. सक (क्क)र्-पारा; म. साखरापारा]

दाते शब्दकोश

सर्वात्मना

सर्वात्मना sarvātmanā ad S (The third case of a compound of सर्व & आत्मन्) With the whole soul or self of; with one's whole spirit, mind, and heart. 2 Altogether or utterly; in every point and particular; in all ways and respects. Ex. हा स0 लबाड आहे -चोर आहे -सोदा आहे -मूर्ख आहे -&c. 3 with neg. con. Never; not at all; by no means; on no account or consideration; not (emphatically). Ex. मजपासून ही गोष्ट स0 घडायाची नाहीं; पैक्यावांचून संसार स0 चालायाचा नाहीं; घरांत गूळ स0 राहिला नाहीं. Note. This meaning differs from the meaning preceding it simply through the power of the negative construction.

मोल्सवर्थ शब्दकोश

ताडगूळ      

पु.       ताडीपासून बनवलेला गूळ.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तां(तं)बीट

न. (कर.) गूळ घातलेलें राळ्याचें पीठ. 'त्यानें तंबीट खाल्लें.' [का. तंबु = ओलें + का. इट्टु = पीठ]

दाते शब्दकोश

तांबीट, तंबीट      

न.       गूळ घातलेले राळ्याचे पीठ. [क. तंबु + इट्टु]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तेलची

तेलची tēlacī f A stuffed (with wheaten meal, गूळ &c.) cake fried in oil.

मोल्सवर्थ शब्दकोश

तेव

पु. गूळ, साखर, मेण इ॰कांस सुटणारा द्रव, पाझर; चिकी. २ अशा प्रकारच्या पदार्थांचा स्त्राव; घाम अथवा घाम येणें. (गो.) तेव. [सं. तेम] तेवट-वि. (राजा.) अंगीं फार तेव असणारा; वितळणारा; पाझरणारा (साखर, गुळ इ॰ पदार्थ). [तेव]

दाते शब्दकोश

तेव      

पु.       गूळ, साखर, मेण वगैरेंना सुटणारा द्रव, पाझर; चिकी; घाम. (गो.) [सं. तेम]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तेवणे      

अक्रि.       (गूळ, साखर इ.) पाझरणे; पाघळणे. (राजा.) [सं. तिम्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तेवणें

क्रि. (राजा.) (गूळ, साखर इ॰ कांनीं) तेवानें युक्त होणें; पाझरणें; पाघळणें. [सं. तिम् = ओलें होणें-तेम]

दाते शब्दकोश

तेवट      

वि.       अंगी फार तेव असणारा; वितळणारा; पाझरणारा (साखर, गूळ वगैरे पदार्थ).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तीळ

तीळ tīḷa m (तिल S) Sesamum-seed. 2 fig. A mole or a freckle. तीळ खाऊन व्रत मोडणें To commit an improper action for very little profit. तीळतीळ Just a bit; in a very little quantity: also by little and little. Ex. हें औषध नित्य ती0 खात जा; Pr. शेजीची केली आस आणि ती0 तुटे मास; ती0 जीव तुटतो. तीळ m pl तुटणें g. of o. To have one's connection with broken off, i.e. to have तिलांजलि with no longer. तीळपापड होणें g. of s. (Because तीळ & पापड hop and skip about in the frying pan.) To be snappish or testy. तीळ भिजत नाहीं (तोंडीं) Said of one who cannot keep a secret a single moment. तिळीं असणें g. of s. To be at the command or beck of. तिळीं थेंब पडणें (To have a drop of sweat falling upon the तीळ on the forehead.) To be inflamed with anger. तिळीं येणें g. of s. To come under the control of: also to be propitious or friendly unto. Ex. तीळ खा तिळीं ये गूळ खा गोडसें बोल. तीळभर, तीळप्राय, तीळतुल्य A jot, whit, tittle, iota, grain, scruple.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. १ गळिताच्या धान्यापैकीं एक. यांत काळे व पांढरे असे दोन प्रकार आहेत. तिळाचें तेल निघतें व त्याची पेंड गुरें खातात. रानतीळ म्हणून तिळाच्या झाडासारखें एक झाड असतें. २ शरीराच्या कातडीवरील नैसर्गिक काळा डाग. तिल अर्थ ३ पहा. ३ डोळ्यांतील काळा ठिपका. 'तिळा करितां पुतळी । दिसों लागे ।' -दा ८.३ ४. कां ते नेत्रद्वयांतील बाहुलाबाहुली । त्यांची तीळपुतळीनें सोयरीक केली ।' -स्वादि ११.१. ५७. -क्रिवि. तिळभर; यत्किंचित्. 'तरी तीळ सनदांचा उजूर न धरितां. -वाडसमा १.१५३ [सं. तिल] (हा शब्द समासांत आला असतां र्‍हस्व उच्चारला जातो यासाठीं र्‍हस्व तीचे सामासिकशब्द व वाक्प्रचार येथें दिले आहेत). (वाप्र.) ॰खाऊन व्रत मोडणें-(एक तीळ खाल्ल्यानेंहि उपवास मोडतो यावरून) थोडक्या लाभाकरितां वाईट गोष्ट करणें. तीळ घालून कूळ उच्चारप-(गो.) विकत श्राद्ध करणें. ॰तीळ-१ थोडें थोडें; जराजरा; किंचित्; अल्प. 'औषध नित्य तिळतीळ खात जा.' २ हळू हळू; धीरेधीरे. म्ह॰ शेजीची केली आस आणि तीळतीळ तुटे मास. ॰तीळ जीव तुटणें-सारखी काळजी, हुरहुर लागणें; अतिशय चिंता वाटणें. 'तिळतीळ तुटे ग जीव सदा चैन नच पडे ।' -सत्य- विजय. ॰तुटणें-सोयर, सुतक (तिलांजलीचा) संबंध सुटणें; नातें तुटणें. ॰दान देणें- १ (मृतमनुष्यास तिलांजली देतात यावरून ल.) तिलांजली देणें; संबंध सोडणें; त्याग करणें. २ एखाद्या पर्व दिवशीं तीर्थाच्या ठिकाणीं स्नान, तिलदान करतात तें. 'ऐसा श्रीकृष्णर्जुन । -संवादसंगमीं स्नान । करूनि देतसे तिळदान । अहंतेचें ।' -ज्ञा १८.१६१९. ॰पापड होणें-(अंगाचा) संताप होणें. 'माझ्या आवडत्या अंगाचा तिळपापड होऊन गेला.' -नाकु ३.३९. ॰तोंडीं तीळ न भिजणें-एखादी गुप्त गोष्ट तोंडांत, मनांत न राहणें. ॰तिळीं असणें-१ (एखाद्याच्या) कह्यांत, अर्ध्या वचनांत असणें. २ (व.) एक रास असणें. ३ (व.) ऐकण्यांत असणें. ॰तिळीं थेंब पडणें-(कपाळावरच्या तिळावर घामाचा थेंब पडणें) संतप्त होणें; अतिशय रागावणें. तिळीं येणें-१ दुसर्‍याच्या कह्यांत, सत्तेंत येणें. तिळागुणी होणें; स्वाधीन होणें. 'देव तिळीं आला । गोडें गोड जीव धाला ।' -तुगा २०३८. २ अनुकूल होणें; सख्य, प्रेम ठेवणें. 'तीळखा तिळीं ये गूळखा गोडसें बोल.' सामाशब्द- ॰काट-न. (कु.) तिळाचें काड; पाचोळा. [सं. तिल + काष्ठ] ॰कूटन. मोहर्‍या, मेथ्या, तीळ इ॰ कुटून केलेली पूड; एक तोंडीलावणें. ॰कोंद-स्त्री. तिळाचें सारण, पुरण कोंद पहा. ॰गूळ-पु. (मकरसंक्रांतीच्या दिवशीं वाटतात ते गूळ मिश्रित तीळ; शर्करामिश्रित तीळ; हलवा. तिळवण पहा. 'तिळगूळ घ्या, गोड बोला.' ॰तुल्य-ल्या- तिळमात्र; तिळप्राय. 'तिळतुल्य नाहीं मनिं डगल्या ।' -मध्व २२० 'मशारनिल्हेच्या अमलास अतःपर तिळतुल्या कजिया न करणें.' -वाडशा १.११७. ॰पुष्प-न. १ तिळाचें फूल. २ (ल.) डोळ्यांत पडलेला डाग, फूल. ॰प्राय-क्रिवि. किंचित्; थोडें; अल्प; 'सोमल तिळप्राय खाल्ला असतां विकार होतो.' ॰भर- राई-मुळीं देखील; थोडें सुद्धां. 'धर्मवासना कांहीं ज्याचें मानसिं तिळभर नाहीं ।' -मध्व ५५२. 'तुजसम अरोळी ढेईल तो उणी नाहीं तिळराई ।' -राला ९. ॰मांडा-पु. (बे.) वर तीळ लावून तयार केलेला मांडा. ॰वडी-स्त्री. १ साखर घालून केलेली तिळाची वडी. २ (राजा.) तोंडीलावण्याकरितां तिळाची अनेक पदार्थ घालून केलेली वडी. 'तिखट तिळवडे, सारबिजवडे ।' -अमृत ३५. ॰वण-स्त्री. (बायकी) लग्न झाल्यानंतर पहिल्या मकरसंक्रांतीस हलवा, तिळाचे लाडू, आहेर वगैरे नवरा-नवरीकडील माणसें परस्परांच्या घरीं पाठवीत असतात तो प्रकार. संक्रांतीच्या सणांतील एक कृत्य; तिळगूळ. [सं. तिल + वायन; म. वाण] ॰वणी-स्त्री. १ तिळगूळ. 'भारत कथा संक्रमणीं । निरोपमरूपें तिळवणी ।' -मुसभा ३.१५३. २ तिळवण पहा. तिळवा, तिळवा लाडू- पु. तीळ वगैरे घालून केलेला तिळाचा लाडू. 'दृढतर तिळवे हे गोड अत्यंत लाडू ।' -सारुह ३.५५. 'तिळवे लाडू अमृतफळें ।' -वसा २६. ॰संक्रांत-स्त्री. १ मकरसंक्रांतीला पाटील- कुळकर्ण्यांचा तिळगूळ घ्यावयाचा हक्क. तिळसें गुळसें-न. (ना.) संक्रांतीचा तीळगूळ. ॰होम-पु. तिळाच्या आहुती देऊन केलेला होम. तिळाचें कोळ-न (माण.) तीळ झाडून घेतल्यानंतर त्याच्या राहिलेल्या काडया, तिळागुणी-नस्त्री. सलोखा; ऐक्य; ऐकमत्य; प्रेमभाव. (क्रि॰ येणें; असणें; होणें). तिळागुणी येणें-(कोणेकास कोणीएक) अनुकूल होणें; दोघांचा प्रीतिभाव होणें. तिळांजळी, तिळांजुळी, तिळांजुळ, तिळोदक- तिलांजली-जुली इ॰ पहा. तिळांजळी देणें-तिलांजली देणें पहा. पूर्णपणें संबंध सोडणें. जे विषयांसि तिळांजळी देऊनि । प्रवृत्तिवरी निगड वाऊनि । मातें हृदयीं सूनि । भोगितांती ।' -ज्ञा ८.१२४. तिळातांदळा-वि. (शिवामूठ इ॰ स्त्रियांच्या धार्मिक- विधींत तीळ व तांदूळ एकत्र करतात त्यावरून ल.) मनमिळाऊ 'तुका म्हणे कान्हो तिळ्यां-तांदळ्या । जिंकें तो करी आपुला खेळ्या ।' -तुगा २५४. [तीळ + तांदूळ] तिळेल, तिळ्येल- न. (कों.) तिळाचें तेल [सं. तिलतैल; प्रा. तिलेल्ल; म. तिळ + एल] तिळोदक-न. १ तिलांजलि पहा. 'त्याचें उत्तर कार्य करि प्रभु साश्रु तिलोदक ओपी ।' -मो रामायणंपचशती अरण्य १२९. २ श्राद्धामध्यें पितरांना उपचार समर्पण करण्यासाठीं तीळ घालून अभिमंत्रित केलेलें पाणी. ॰देणें-(ल.) संबंध तोडणें; त्याग करणें. 'म्हणोनि भलतेणें एथ सद्भावें नाहावें । प्रयागमाधव विश्वरूप पहावें । येतुलेनि संसारासि द्यावें । तिळोदक ।' -ज्ञा ११.१०. -एभा २३.४८७.

दाते शब्दकोश

तिळागुणी

तिळागुणी tiḷāguṇī n Good understanding; agreement; rubbing well together. v ये, अस, हो. Pr. तीळ खा ति0 या गूळ खा गोडसें बोला.

मोल्सवर्थ शब्दकोश

तीळगूळ

तीळगूळ tīḷagūḷa m गूळ (or sugar) with sesamum-seed mixed up with it. Given about on the day of मकरसंक्रांति.

मोल्सवर्थ शब्दकोश

तिळवण

तिळवण tiḷavaṇa f गूळ or sugar mingled with sesamum-seed carried in procession with cloths, undressed rice &c., and interchanged betwixt the bride and bridegroom on the first मकरसंक्रांति which occurs after their marriage. 2 or तिळवणी f A particular plant.

मोल्सवर्थ शब्दकोश

तिंब(म)णें

न. १ एखाद्या स्त्रीस प्रसूतीनंतर दहाव्या दिवशीं तिच्या माहेरून तांदूळ, गूळ तूप इ॰ कांनीं भरून आलेलें ताट. २ न्हाणवलीच्या चवथ्या व बाळंतिणीच्या दहाव्या दिवशीं तिची ओटी भरून वडे, घारगे करीत असतात तो समारंभ. [तिमणा]

दाते शब्दकोश

टकोर

वि. कठिण; कडक (गूळ, माल). [ध्व. टक् + करणें]

दाते शब्दकोश

टकोर      

वि.       कठीण; कडक (गूळ, माल).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तंबीट      

न.       राळ्याचे तांदूळ व गूळ असे उखळात कुटून त्यांत खोबरे, वेलदोडे वगैरे घालून करतात ते लाडू. याचा नागाला नैवेद्य दाखवतात.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तंबीट

न. राळ्याचे तांदूळ व गूळ असे उखळांत कुटून त्यांत खोबरें, वेलदोडे वगैरे घालून लाडू करतात हे नागास नैवेद्य दाखविण्याकरितां लागतात. [का. तंबे + इट्टु = पीठ]

दाते शब्दकोश

टोचा      

पु.       १. थोडेसे टोचल्याने किंवा दगडातून टवका काढल्याने पडलेले भोक; लहान खाच; दगडाचा काढलेला टवका, कपरी. २. टोचल्याची खूण. ३. भोक पाडावयाची टोचणी किंवा टोचण्याचे हत्यार : ‘गूळ फोडण्याचा टोचा कडीत घातला.’ - बाविबु ३५३. ४. चर्मकारांचे एक हत्यार.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तवसळी, तवसोळी      

स्त्री.       तवशाचा, काकडीचा कीस, तांदळाचे पीठ व गूळ घालून केलेले पक्वान्न. पहा : पातोळा

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तवसळी, तवसोळी

स्त्री. तवशाचा, काकडीचा कीस, तांदुळाचें पीठ व गूळ घालून केलेलें पक्वान्न. पातोळा पहा. [तवशें + पोळी]

दाते शब्दकोश

उपराळा

उपराळा uparāḷā m (उपरि S) A weight placed upon one side of the load upon a beast, to produce equilibrium of the two sides. 2 Surplus stock, goods, or money; a provision for emergencies; an excess taken or a reserve made: also surplus remaining (as of a payment, an expenditure &c.) 3 Preponderance; excess of weight above the standard (as of a bale, sack, or other indivisible mass). 4 A false charge or imputation: also a pretext or false plea. 5 An aggressive or provoking act. 6 Advantage over; superiority (after a dispute or contest). 7 Backing, helping, succouring. 8 Excess upon certain articles (oil, ghee, गूळ, tobacco &c.) given by the vender. 9 Any trifling addition (as a bundle, a few sticks &c.) thrown over the load upon a beast. 10 Requital or recompense of evil. v कर. 11 The weight put into the scale with the article under weighing.

मोल्सवर्थ शब्दकोश

ऊस      

पु.       १. साखर, काकवी, खडीसाखर, गूळ इ. ज्याच्या रसापासून तयार होतात अशी गवताच्या वर्गातील एक वनस्पती. २.उसाचा फड; उभे पीक (वा.) ऊस खतविणे − उसाला खत घालणे. ऊस सोजळणे, ऊस साळणे − उसाची पाने, पाती सोलणे. ऊस रंगणे – उसाचा गाभा लाल पडणे; उसावरील एक रोग. ३. उसापोटी काऊस = सूर्यापोटी शनैश्चर; जन्मदात्यास त्रासदायक. (व.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उतरणें

उतरणें utaraṇēṃ v i (उत्तरण S) To descend or dismount; to go or come down gen. and both lit. & fig. 2 To tally, suit, correspond, agree with--accounts, measures, events with predictions, original with copy. 3 To alight, stop, put up. 4 To fall, fail, sink, abate, subside--courage, anger, fever, prices, value. 5 To fade, decay, decline, deteriorate; to change gen. to a worse state; e. g. to look wan--the countenance; to decline (in years and infirmities); to be getting threadbare--clothes; to be losing freshness, floridness, firmness, tastiness, lustre--the body, flowers, fish, meat, pearls. 6 To overripen and rot--a fruit: also, as used of mangoes in अढी, to ripen. 7 To turn out; to end or issue in; to become finally. Ex. एक काहीलभर रसाचा चार मण गूळ उतरला; हा रंग सुकल्यावर कसा उतरेल तो पाहावा. 8 To get well over; to pass through safely (as through a disease or malady, as through an examination or other difficulty). 9 To turn to go; to turn into any direction. 10 To sink down into (the mind). 11 To fall in with; to suit or please (मर्जीस-मनास). 12 To run in the bore or slit--a pearl, a trinket.

मोल्सवर्थ शब्दकोश

अक्रि. १ (जिना, घाट, पर्वत वगैरेवरून) खालीं येणें. 'उतरलें उदक पर्वत वळघे ।' -ज्ञा १०.६९. 'पुण्याचा रस्ता वाई नजीक सोनजाईच्या डोंगरावरून खालीं उतरत होता.' -विवि १०.१०.२१७. २ हिशेब, माप, भविष्य इत्यादि बरोबर जमणें, पटणें; ताळा पडणें; मुळाबरहुकूम नक्कल तयार होणें. 'आतां ग्रंथकारांच्या म्हणण्याप्रमाणें भाषांतर उतरलें आहे.' -विवि ८.८.८४. ३ मुक्काम करणें; थांबणें; वाहनांतून खालीं येणें. 'बिहारीलाल गाडींतून उतरले.' 'आपलें सर्व खटलें बाहेरच्या देवळांत उतरा आणि तुम्ही सडे किल्ल्यांत या.' ४ धैर्य, राग, भीति, ज्वर, दर, भाव इत्यादि कमी होणें. ५ कोमेजणें, निर्जीव होणें; निकृष्टावस्थेप्रत जाणें; म्लान होणें; सुकणें (चेहरा). 'करितां अधर्म सद्यः स्वपितृसुहृज्जन मुखप्रभा उतरे ।' -मोआदि ९.५७. ६ 'उतरलें पाहोनि सत्शिष्यवग्त्र ।' -दावि २६०. 'गंध- र्वाकडून दुर्योधनास धर्मराजापुढें उभें केलें तेव्हां त्याचें तोंड उत- रलें होतें.' ७ वयातीत होणें; प्रकृति खालावणें; वस्त्र जीर्ण होणें; शरीर, फुलें, मासे, मांस, मोत्यें वगैरेंचा तजेला नाहींसा होणें. ८ फळ वगैरे अविकणें, अधिक पिकणें. ९ अढी वगैरे बरोबर पिकून तयार होणें. १० योग्य रीतीनें बनणें, तयार होणें.' एक काहील- भर रसाचा चार मण गूळ उतरला.' ११ व्याधि, रोग वगैरेंतून पार पडण. 'देवींतून दोन मुलें उतरलीं, एक दगावलें.' १२ परीक्षेंत यश मिळविणें; उत्तीर्ण होणें; पास होणें. 'आमचा रामा यंदा परीक्षा चांगल्या रीतीनें उतरला.' १३ संकटांतून पार पडणें. 'तुम्हां जड भवार्णवीं उतरितां न दासा पडे ।' -केका १२१. १४ विशिष्ट दिशेकडे वळणें. 'महामारी तिकडे खानदेशांत उतरली.' १५ मर्जीं- तून जाणें; नाखुषी होणें. १६ मनास पटणें; योग्य वाटणें; पसंत होणें. 'हें नाटक लोकांच्या पसंतीस उतरलें.' -विवि ९.८.१७५. १७ मोतीं वगैरेंचे छिद्र मोठें होणें; वेजी उतरणें. १८ गरोदर स्त्री प्रसूतीपासून मोकळी होणें, हातींपायीं सुटणें. १९ नाहींसें होणें, फिटणें. 'तैं सुतकें सूतक उतरे दोहींचेही ।' -एभा २१.१२५. २० (लहान मुलींच्या खेळाच्या प्रारंभी) चकून पार पडणें. २१ लागणें; उत्पन्न होणें. 'जयाचिया दृष्टी उतरे ।' -विपू २.१६. [सं. उत्तरण] उतरून टाकणें- १ तबल्यावरील वाद्या, साज वगैरे काढून टाकणें. २ ओंवाळून टाकणें (आजारी माणसावरून खाद्य पदार्थ, प्राणी वगैरे). ३ (सामा) खालीं काढणें.

दाते शब्दकोश

वाहवारा

वि. वाहणारा; वाहून जाण्यासारखा; अर्धवट पातळ (गूळ, चिखल, गाळ वगैरे); ठिसूळ, ढिसूळ, शिथिल, थलथलीत, लिबलिबीत (शरीर). २ (ल.) स्वैर; विषय सोडून; मुद्द्यावेगळें (भाषण); बेशिस्त; अनुसंधानरहित (बोलणें). [सं. वह्]

दाते शब्दकोश

विघ(घु)रणें

अक्रि. १ द्रवणें; वितुळणें; विरघळणें; पातळ होणें (तूप, गूळ इ॰). 'विघरलें तें तूप होये । थिजलें त्या परीस गोड आहे ।' -एभा ११.१४५८. 'थिजल्या विघुरल्या घृताची । ऐक्यता न माडे ।' -दा ८.२.३८. २ कमी होणें. 'पुष्टि लागे विघरों । कांति पाहे निसरों ।' -ज्ञा १३.७५६. ३ (ल.) गर्भगळित होणें. 'म्हणें, मागें जाय, द्रुत परिभवें शत्रु विघरे ।' -मो रामायणें युद्धकांड. [सं. विघरण]

दाते शब्दकोश

कांहीं

वि. १ किंचित्, थोडें; अल्प; लहान (संख्या किंवा परिमाण); थोडेसें (वस्तु किंवा व्यक्तींपैकीं). २ विवक्षित समु- दायांतून अंश, अंशमात्र; थोडा किंवा कांहीं भाग; कित्येक; थोडा किंवा पुष्कळ; कमी किंवा जास्त. 'आंबे कांहीं खाल्ले कांहीं लोकांस दिल्हे, कांहीं ठेविले.' ३ फार नव्हे परंतु थोडेसें; अल्प प्रमाणांत. 'केवळ उपाशीं जाऊं नको कांहीं खा!' ४ एखादी अनिश्चित गोष्ट किंवा काम वगैरे. 'तुम्हांपासीं कांहीं बोलावयाचें आहे.' -क्रिवि. १ अवर्णनीय प्रकारचें, तर्‍हेचें; ज्याची फोड करतां येत नाहीं अशा तर्‍हेचें. 'ब्रह्मप्राप्तीचें सुख कांहीं विल- क्षण आहे.' २ अर्थ स्पष्ट करण्याकरितां. 'तो कांहीं गवत खात नाहीं अन्न खातो.' ३ (निषेधपर) मुळींच नाहीं; केव्हांहि नाहीं. 'राहेन मी हें न घडेचि कांहीं. ।' ४ भलतेंच; मनांत नसलेलें; अकल्पित. 'कांहीं करतां कांहीं होणें.' ५ कोणतीहि युक्ति, शक्कल. 'कांहीं तरी करून' [सं. किम्, किम् + हि] ॰एक-वि. १ थोडेंसें; कित्येक (मनुष्य, वस्तु). २ (निषेधपर) एकहि; मुळींच; तिळभरहि नाहीं. 'पेंढ्यार्‍यांनीं कांहींएक भांडें घरांत ठेविलें नाहीं.' कांहीं-वि. १ अल्पस्वल्प; येथें थोडें तेथें थोडें; सार्‍या समुदायापैकीं कांहीं व्यक्ती. 'कांहीं कांहीं शेतें बरीं आहेत कांहीं कांहीं वाईट आहेत.' -क्रिवि. २ (अतिरेक, बाहुल्य दाखविणार्‍या शब्दाशीं जोडून) अवर्णनीयप्रकारें; अतिशय कमालीचा; 'आज पावसानें कांहीं कांहीं शर्थ केली' ॰कांहींचे बाहीं-च्या बाहींच-वि. अगदींच भलतें; भलतेंसलतें; अवास्तव; बेताल; बाष्कळपणानें; गैरलागू; अमर्याद; अप्रासंगिक; बेताल; काहीं तरीच विसंगत; अनपेक्षित. 'एकदां जें आमचें भांडण जुंपलें तें कांहींच्या बाहींच!' -पकोघे. ॰न-होतेला-नव्हतेला- क्रिवि. जणूं कांहींच घडलें नाहीं अशा अर्थानें. 'रात्रीं चोर्‍या करून दिवसास कांहीं नव्हतेल्या गोष्टी सांगतो.' ॰बाहीं-वि. थोडा अंश; थोडेसें. 'आळु आला तो गेलिया । कांहीं बाहीं जें उरे ।' -ज्ञा १८.४१२. 'औषध घेतांच कांहींबाहीं दिसूं लागलें.' कांहींबाहीं गूळ घेतला कांहींबाहीं घ्यावयाचा आहे.' [कांहीं द्वि.] -क्रिवि. भलतेंच; अवास्तविक; अनियमित; असंबद्ध कांहींबाही बोलतां मंदवचनी.' -मराठी ६ वें पुस्तक पृ. १७३. ॰तरी-वि. वाटेल तें; वाह्यात्; असंबद्ध.

दाते शब्दकोश

पंच

वि. पांच; ५ संख्या. [सं.] ॰उपप्राण-पुअव. पांच वायु:-नाग = शिंक येणारा वायु, कूर्म = जांभई येणारा, कृकल = ढेंकर येणारा, देवदत्त = उचकी येणारा व धनंजय = सर्व शरीरांत राहून तें पुष्ट करणारा व मनुष्य मेल्यावर त्यांचे प्रेत फुगविणारा वायु. 'नाग कूर्म कृकल देवदत्त । पांचवा धनंजय जाण तेथ ।' -एभा १३.३२०. ॰कन्या-स्त्रीअ. पांच सुविख्यात पतिव्रता स्त्रिया; अहल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी. ॰कर्में-नअव. शरीराचीं मुख्य पांच कामें-ओकणें, रक्तस्त्राव होणें, मलोत्सर्ग, मूत्रोत्सर्ग, नाक शिंकरणें इ॰. किंवा गतीचे पुढील पांच प्रकार:-उत्क्षेपण (वर करणें), अपक्षेपण (खालीं करणें), आकुंचन (आखडणें), प्रसारण (पसरणें) व गमन (जाणें). ॰कर्मेंद्रियें-हात, पाय, वाणी, शिश्न व गुद. कर्मेंद्रिय पहा. ॰कल्याण-णी-वि. १ गुडघ्यापर्यंत पांढरे पाय व तोंडावर पांढरा पट्टा असलेला (घोडा) हा शुभ असतो. -अश्वप १.९०. 'पंच कल्याणी घोडा अबलख ।' ३ (उप.) सर्व अवयव विकृत असलेला (माणूस). ३ (उप.) भाड्याचें तट्टू, घोडा (याला दोन्ही टाचांनीं, दोन्हीं मुठींनीं व दांडक्यानें मारून किंवा तोंडानें चक् चक् करून चालवावें लागतें म्हणून). ४ (उप.) ज्याच्या नाकाला निरंतर शेंबूड असून तो वारंवार मणगटांनीं काढून टिरीस पुसत असणारा असा (पोर). ॰काजय-स्त्री. (गो.) पंचखाद्य पहा. ॰कृष्ण-पुअव. (१) महानुभाव संप्रदायांतील ५ कृष्ण-कृष्णचक्रवर्ती, मातापूर येथील दत्त, ऋद्धिपूरचा गुंडम राउळ, द्वारावतीचा व प्रतिष्ठानचा चांग- देव राउळ. -चक्रधर सि. सूत्रें पृष्ठ २१. (२) हंस, दत्त, कृष्ण, प्रशांत व चक्रधर. -ज्ञाको (म) ७७. ॰केणें-न. मसाल्यांतील मिरी, मोहरी, जिरें, हिंग, दगडफूल इ॰ पदार्थ. ॰केण्याचें दुकान-न. छोटेसें किराण्याचें दुकान. ॰केदार-पुअव. केदार, ममद, तुंग, रुद्र, गोपेश्वर. ॰कोटी-स्त्री. उत्तर हिंदुस्थानांतील शंकराचें तीर्थक्षेत्र. ॰कोण-पु. पांच कोनांची एक आकृति. -वि. पांच कोनांची. ॰कोश-ष-पुअव. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय अशीं देहाचीं पांच आवरणें. या कोशांचा त्रिदेहाशीं पुढीलप्रमाणें समन्वय करतात-अन्नमयाचा स्थूलदेहाशीं, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, यांचा सूक्ष्म किंवा लिंगदेहाशीं व आनंदमयाचा कारणदेहाशीं. ॰क्रोशी-स्त्री. १ चार, पांच कोसांच्या आंतील गांवें; एखाद्या क्षेत्राच्या भोंवतालची पांचकोस जमीन. 'पुरलें देशासी भरलें शीगेसी । अवघी पंचक्रोशी दुम- दुमीत ।' -तुगा २६१०. ३ (ल.) या गांवांतील जोशाची वृत्ति. ४ पंचक्रोशी यात्रा पहा. ॰क्रोशी यात्रा-स्त्री. क्षेत्राची विशे- षतः काशी क्षेत्राच्या भोंवतालच्या पांच कोसांतील देवस्थानांना प्रदक्षिणा, तार्थाची यात्रा. ॰खंडें-नअव. आशिया, यूरोप, अमे- रिका, अफ्रिका, ओशियानिया. ॰खाज-जें-खाद्य-नपुन. १ ख या अक्षरानें प्रारंभ होणारे खाण्यायोग्य असे पांच पदार्थ (खारीक, खोबरें, खसखस (किंवा खवा) खिसमिस व खडी साखर). -एभा १.०.४९२. 'पूर्ण मोदक पंचखाजा । तूं वऱ्हाडी आधीं ।' -वेसीस्व ३. २ (गो.) नारळाचा खव, गूळ. चण्याची डाळ इ॰ पांच जिन्नसांचा देवाला दाखवावयाचा नैवेद्य. ३ (कों.) तांदूळ किंवा गहू, काजळ, कुंकू, उडदाची डाळ व खोबरें यांचा भूतपिशाचांना द्यावयाचा बळी; या पांच वाणजिनसा. ॰गंगा- -स्त्री १ महाबळेश्वरांतील एक तीर्थ. येथें कृष्णा, वेणा, कोयना, गायत्री (सरस्वती) व सावित्री यांचा उगम आहे. २ काशी क्षेत्रां- तील एक तीर्थ. 'गंगा भारति सूर्यसूनु किरणा बा धूतपापा तसे । पांची एकवटोनि तीर्थ निपजे ते पंच-गंगा असें ।' -नरहरी, गंगा- रत्नमाला १५७ (नवनीत पृ. ४३३). ३ पंचधारा पहा. (क्रि॰ वाहणें). ॰गति-स्त्री. घोड्याच्या पांच चाली-भरपल्ला किंवा चैवड चाल; तुरकी किंवा गाम चाल, दुडकी, बाजी, आणि चौक चाल. यांचीं संस्कृत नावें अनुक्रमें:-आस्कंदित, धौरितक, रेचित, वल्गित, प्लुत. ॰गव्य-न. गाईपासून निघालेले, काढलेले पांच पदार्थ दूध, दहीं, तूप, गोमूत्र, शेण यांचें मिश्रण (याचा धार्मिक शुद्धिकार्याकडे उपयोग करतात). ॰गोदानें-नअव. पापधेनु, उत्क्रांतिधेनु, वैतरणी, ऋणधेनु, कामधेनु. हीं पंचगोदानें और्ध्वदेहिक कर्मांत करतात. ॰गौड-पु. ब्राह्मणांतील पांच पोट जाती-(अ) गौड, कनोज (कान्यकुब्ज), मैथिल, मिश्र व गुर्जर; किंवा सारस्वत, कान्य- कुब्ज, गौड, उत्कल आणि मैथिल. ॰ग्रंथ-पुअव. यजुर्वेदाचे पांच ग्रंथ-संहिता, ब्राह्मण,आरण्यक, पदें आणि क्रम. ॰ग्रही- स्त्री. एका राशींत पांच ग्रहांची युति. [पंच + ग्रह] ॰तत्त्वें-नअव. पंचमहाभूतें पहा. ॰तन्मात्रा-स्त्रीअव. पंचमहाभूतांचीं मूलतत्त्वें, गंध रस, रूप, स्पर्श, शब्द हे गुण. 'प्रकृति पुरुष महत्तत्त्व । पंच, तन्मात्रा सूक्ष्मभाव ।' -एभा १९.१६८ ॰तीर्थ-नअव. हरिद्वार किंवा त्र्यंबकेश्वर येथील गंगाद्वार, कुशावर्त, बिल्वक, नीलपर्वत आणि कनखल हीं पांच तीर्थें. ॰दंती-वि. पांच दांत असलेला (घोडा), सप्तदंती व अशुभलक्षण पहा. ॰दाळी-स्त्रीअव. तूर, हर- भरा, मूग, उडीद व वाटाणा या पांच धान्यांच्या डाळी. ॰देवी- स्त्रीअव. दुर्गा, पार्वती, सावित्री, सरस्वती व राधिका. ॰द्रविड- पुअव. ब्राह्मणांतील पांच पोटजाती-तैलंग, द्राविड, महाराष्ट्रीय, कर- नाटकी व गुर्जर. ॰द्वयी-स्त्री. १ दक्षिणा द्यावयाच्या रकमेचे (ती कमी करणें झाल्यास) पांच भाग करून त्यांतील दोन किंवा तीन ठेवून बाकीचे वाटणें. २ अशा रीतीनें शेत, काम, रक्कम, वस्तु इ॰ची वांटणी करणें. ॰धान्यें-नअव. हवन करण्यास योग्य अशीं पांच धान्यें-गहूं, जव, तांदूळ, तीळ व मूग. महादेवाला याची लाखोली वाहतात. ॰धान्याचा काढा-पु. हा धने, वाळा, सुंठ, नागर- मोथा व दालचिनी यांचा करतात. ॰धार-स्त्री. १ जेवतांना तूप पडलें न पडलें इतकें कमी वाढणें; तुपाच्या भांड्यांत पांच बोटें बुडवून अन्नावर शिंपडणें. २ झाडास पाणी घालण्याची पांच धारांची झारी. 'जगजीवनाचिया आवडी । पंचधार करी वरी पडी ।' -ऋ ७३. ॰धारा-स्त्री. (विनोदानें) तिखट पदार्थ खाल्ला असता किंवा नाकांत गेला असतां दोन डोळे, दोन नाक- पुड्या व तोंड यांतून वाहणाऱ्या पाण्याच्या पांच धारा. ॰धारें -न. देवावर अभिषेक करावयाचें पांच भोंकांचें पात्र. [पांच + धारा] ॰नख-नखी-वि. १ पांच नखें असलेला (मनुष्य, माकड, वाघ). २ ज्यांचें मांस खाण्यास योग्य मानिलें आहे असे पांच नखें असणारे सायाळ, घोरपड, गेंडा, कांसव, ससा इ॰ प्राणी. 'पंचपंच नखा भक्ष्याः ।' -भट्टिकाव्य ६.१३१. ३ छातीवर, खुरावर पांच उभ्या रेषा असणारा (घोडा). हें अशुभलक्षण होय. -अश्वप १.९५. ४ ज्याच्या चार पायांपैकीं कोणत्याहि एका पायाला फाटा फुटल्या- सारखी आकृति असते असा (घोडा). -अश्वप १.९८. ॰नवटे- पुअव. (राजा. कु.) संसारादिकांचा अनेकांनी मिळून अनेक प्रका- रचा केलेला नाश; (एखाद्या संस्थेंत, मंडळांत झालेली) फाटा- फूट; बिघाड. (क्रि॰ करणें). २ गोंधळ; घालमेल; अडचण. [पंच + नव] ॰पक्वान्नें-नअव. १ लाडू, पुरणपोळी इ॰ पांच उंची मिष्टान्नें. २ भारी, उंची खाद्यपदार्थ, जेवण. ॰पंचउषःकाल- पु. सूर्योदयापूर्वीं पांच घटिकांचा काळ; अगदीं पहाट. 'पंच पंच- उषःकालीं रविचक्र निघोआलें ।' -होला १७ ॰पदी-स्त्री. देवापुढें नित्य नियमाने पांच पदें, अभंग भक्तगण म्हणतात ती. 'पंचपदी राम कलिसंकीर्तन ।' -सप्र २१.३६. ॰पर्व-वि. कोणत्याहि एका पायास फरगड्याची आकृति असणारा (घोडा). -अश्वप १.१०२. १०२. ॰पल्लव-पुअव. आंबा, पिंपळ, पिंपरी, वड व उंबर या किंवा इतर पांच वृक्षाचे डहाळे (किंवा पानें). स्मार्त याज्ञिकांत हे कलशामध्यें घालतात. 'पंचपल्लव घालोनि आंत । आणि अशोकें केलें वेष्टित । नरनारी मिळाल्या समस्त । लग्नसोहळिया कारणें ।' -जै ५६.१४. ॰पाखंड-न. जैन, बौद्ध, चार्वक इ॰ पांच मुख्य प्रकारचीं अवैदिक मतें, संप्रदाय. ॰पाखंडी-वि. वरील पाखंड मतांपैकीं कोणत्याहि मताचा अनुयायी. ॰पात्र-पात्री-नस्त्री. पाणी पिण्याचें किंवा इतर उपयोगाचें नळ्याच्या आकाराचें मोठें भांडें. ॰पाळें-न. लांकडाचें, किंवा धातूचें पांच वाट्या अथवा खण असलेलें पात्र. हळद, कुंकु, इ॰ पूजासाहित्य ठेवण्याच्या उपयोगी; किंवा फोडणीचें सामान ठेवण्याच्या उपयोगी पात्र. (गो.) पंचफळें. ॰पुरुषार्थ-पु. धर्म, अर्थ, काम, मोक्ष (सलोकता, समीपता, सरूपता सायुज्यता) व परमप्रेमरूपा-परानुरक्ति- पराभक्ति हें पांच पुरुषार्थ. 'जैसा ज्यासी भावार्थ । तैसा पुरवी मनोरथ । पढिये पंचपुरुषार्थ । तो हरि नांदत वैकुंठी ।' एभा २४.२७०. ॰प्रमाणें-नअव. शब्दप्रमाण, आप्तवाक्यप्रमाण, अनुमानप्रमाण. उपमानप्रमाण व प्रत्यक्षप्रमाण. ॰प्रयाग-पुअव. नंदप्रयाग, स्कंदप्रयाग, रुद्रप्रयाग, देवेंद्रप्रयाग व कणप्रयाग हे पांच प्रयाग. ॰प्रलय-पु. निद्राप्रलय, मरणप्रलय, ब्रह्म्याचा निद्राप्रलय, ब्रह्म्याचा मरणप्रलय, व विवेकप्रलय. ॰प्रवर-पुअव. ब्राह्मणांत कांहीं पंचप्रवरी ब्राह्मण आहेत त्याचे पांच प्रवर असे-भार्गव, च्यावन, आप्नवान, और्व व जामदग्न्य. प्रवर पहा. ॰प्राण- पु. १ प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. हे पांच प्राण प्राण्याच्या आयुष्यास कारणीभूत आहेत. यांचीं स्थानें आणि कार्यें भिन्न भिन्न आहेत. (क्रि.॰ ओढणें; आकर्षणें; सोडणें; टाकणें लागणें). 'देह त्यागुन पंचप्राणीं । गमन केलें तात्कळीं ।' -मुआदि २८.२४. २ (ल.) अतिशय आवडती, प्रियकर वस्तु. 'तो पंचप्राण धन्याचा ।' -संग्रामगीतें ११९. (एखाद्यावर) पंच- प्राण ओवाळणें-पंचप्राणांची आरती करणें-दुसऱ्या- करितां सर्वस्व, प्राणहि देणें; सर्व भावें करून आरती ओवाळणें; खरी, उत्कटभक्ति किंवा प्रेम दाखविणें. 'पंच प्राणांची आरती । मुक्तीबाई ओवाळती ।' ॰प्राणाहु(व)ती-स्त्री. पांच प्राणांना द्याव- याच्या लहान लहान आहुती किंवा घास या त्रेवर्णिकांनीं भोज- नाच्या आरंभीं द्यावयाच्या असतात. पांच आहुती घेणें म्हणजे घासभर, थोडेंसें खाणें. (क्रि॰ घेणें). [पंच + प्राण + आहुती] ॰बदरी- स्त्रीअव. योग, राज. आदि, वृद्ध, ध्यान. या सर्व बदरी बदरी नारा- यणाच्याच रस्त्यावर आहेत. ॰बाण-पु. (काव्य) मदन; कामदेव. मदनाच्या पाच बाणांसाठीं बाण शब्द पहा. ॰बेऊळी-स्त्री. पांच नांग्यांची इंगळी. -मनको. ॰बेळी-स्त्री. बोंबिल, कुटें इ॰ विक्री- करितां एकत्र मिसळलेले लहान मासे. ॰भद्र-वि. सर्व शरीर पिवळें असून पाय आणि तोंड मात्र श्वेतवर्ण असणारा (घोडा). अश्वप १. २१. ॰भूतातीत-वि. १ पंचभूतांपासून अलिप्त, सुटलेला (मुक्त मनुष्य, लिंगदेह). २ निरवयव; निराकार (ईश्वर). ॰भू(भौ)तिक-वि. पांच तत्त्वांनीं युक्त; जड; मूर्त; सगुण. ॰भूतें-नअव. पंचमहाभूतें पहा. भे(मे)ळ-पुस्त्री. पंचमिसळ पहा. अनेक पदार्थांचें मिश्रण -वि. पांच प्रकार एकत्र केलेलें. 'मोहोरा पंचमेळ बरहुकूम पत्र पुरंदर.' -वाडसमा ३.८३. ॰मघा-स्त्रीअव. १ मघा नक्षत्रांत सूर्य आल्या- नंतरचे पांच दिवस. २ मघापासून पुढचीं पांच सूर्यसंक्रमणाचीं नक्षत्रें. ॰महाकाव्यें-नअव. रघुवंश, कुमारसंभव, माघ, किरात, नैषध हीं पांच मोठीं संस्कृत काव्यें. ॰महातत्त्वांचीं देवस्थानें- १ पृथ्वी = कांचीवरम् (कांची स्टेशन). आप-जंबुकेश्वर (श्रीरंगम् स्टेशनपासून १२ मैल). तेज = अरुणाचल (एम्. एस्. एम्. रेलवेच्या मलय स्टेशन नजीक). वायु = कालहस्ती (वरील रेलवेच्या रेणीगुंठा स्टेशनपासून गुडुर रस्त्यावर). आकाश-चिदांबरम् (चेंगलपट रस्त्यावर). ॰महापातकें-नअव. ब्रह्महत्या, मद्यपान, सुवर्णचौर्य, मात्रागमन किंवा गुरुस्त्रीसंभोग व वरील चार महापात- क्यांची संगत. ॰महापातकी-वि. वरील महापातकें करणारा. ॰महाभूतें-नअव. पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश हीं पांच. गंध, रस, रूप, स्पर्श व शब्द हीं यांचीं अनुक्रमें सूक्ष्मरूपें होत. यांना पंचसूक्ष्मभूतें असें म्हणतात. पंचमहाभूतांचीं हीं मूलकारणें आहेत. ह्यावरून जगदुत्पत्तिविषयक ग्रंथांतून पंचभूत व पंचतन्मात्रा अशा संज्ञा ज्या येतात त्यांचा अर्थ पंचमहा(सूक्ष्म)भूतें असाच होय तन्मात्र पहा. ॰महायज्ञ, पंचयज्ञ-पुअव. ब्रह्मयज्ञ (वेदाध्ययन), पितृयज्ञ (तर्पण), देवज्ञ (होम, वैश्वदेव), भूतयज्ञ (बलि), मनुष्ययज्ञ (अतिथिसंतर्पण). भोजनाच्यापूर्वी ब्राह्मणानें नित्य करावयाचे हे पांच यज्ञ आहि्नकांपैकीं होत. ॰महासरोवरें- नअव. बिंदुसरोवर (सिद्धपूर-मातृगया), नारायणसरोवर (कच्छ- प्रांतीं मांडवी), मानस सरोवर (हिमालयामध्यें उत्तरेस), पुष्कर (अजमीर), पंपासरोवर (एम्. एम्. एस् रेलवेच्या होसपेट स्टेशननजीक). ॰महासागर-पुअव. उत्तर, दक्षिण, हिंदी, पॅसिफिक व अटलांटिक महासागर. ॰माता-स्त्रीव. स्वमाता, सासू, थोरली भावजय, गुरुपत्नी व राजपत्नी. ॰मिसळ-मेळ- पुस्त्री. १ पांच डाळींचें केलेलें कालवण, आमटी. २ पांचसहा प्रकारच्या डाळी किंवा धान्यें यांचें मिश्रण. ३ (ल.) एका जातीच्या पोटभेदांतील झालेल्या मिश्रविवाहाची संतति, कुटुंब, जात; कोण- त्याहि वेगवेगळ्या जातीच्या संकरापासून झालेली जात; संकर- जात. ४ भिन्न भिन्न पांच जातींतील लोकांचा समाज. ५ (ल.) निरनिराळ्या जातींचा एकत्र जुळलेला समाज. -वि. मिश्र; भेस- ळीचें. 'हे तांदूळ पंचमिसळ आहेत.' ॰मुख-पु. १ शंकर. 'चतुर्मुख पंचमुख । वेगें षण्मुख पातला ।' -एभा ६.२५. २ सिंह ॰मुखी-वि. १ उरावर भोंवरा असून त्यांत पांच डोळे असणारा (घोडा). -मसाप २.५५. २ पांच तोंडांचा (मारुती, महादेव, रुद्राक्ष). ॰मुद्रा-स्त्रीअव. (योग) भूचरी, खेचरी, चांचरी, अगोचरी आणि अलक्ष अशा पांच मुद्रा आहेत. 'योगी स्थिर करूनियां तेथें मन । शनै शनै साधिती पवन । पंचमुद्रांचें अतर्क्य विंदान । तें अभ्यासयोगें साधिती ।' -स्वादि ९.३.६२. ॰रंगी-वि. १ पांच रंगांचें (रेशीम, नाडा इ॰). २ धोतरा, अफू, इ॰ पांच कैफी पदार्थ घालून तयार केलेला (घोटा). ॰रत्नीगीता-स्त्री. भगवद्गीता, विष्णुसहस्त्रनाम, भीष्मस्तवराज, अनुस्मृति व गजेंद्र- मोक्ष हे पांच अध्यात्म ग्रंथ. ॰रत्नें-नअव. सोनें, हिरा, नीळ, पाच व मोतीं किंवा सोनें, रुपें, पोवळें, मोतीं, राजावर्त (हिऱ्याची निकृष्ट जात). ॰रसी-वि. १ पांच (किंवा जास्त) धातूंच्या रसापासून तयार केलेली (वस्तु). २ तोफांचा एक प्रकार. 'पंचरशी आणि बिडी लोखंडी ।' -ऐपो २२५. ॰राशिक- राशि-पुस्त्री. (गणित) बहुराशिक; दोन त्रैराशिकें एकत्र करून तीं थोडक्यांत सोडविण्याचा प्रकार; संयुक्त प्रमाणांतील चार पदांपैकीं संयुक्त गुणोत्तरांतील दोन पदें आणि साध्या गुणोत्तरांतील एक पद हीं दिलीं असतां साध्या गुणोत्तरांतील दुसरें पद काढण्याची रीत. ॰रुखी-रुढ-वि. साधारण; सामान्य; रायवळ; अनेक प्रकारचें; जंगली (लांकूड-सागवान, खैर, शिसवी इ॰ इमारतीस लागणाऱ्या पांच प्रकारच्या लांकडाशिवाय). ॰लवणें-नअव. मीठ, बांगडखार, सैंधव, बिडलोण व संचळ. ॰लवी-वि. (गो.) पंचरसी पहा. ॰लोह-न. तांबें, पितळ, जस्त, शिसें व लोखंड यांचें मिश्रण. ॰वकार-पुअव. व नें आरंभ होणारे व प्रत्येकास लागणारे पांच शब्द शब्द म्हणजे विद्या, वपु, वाचा, वस्त्र आणि विभव. 'विद्यया वपुषा वाचा वस्त्रेण विभवेन वा । वकारैः पंच- भिर्हीनो नरो नाप्नोति गौरवम् ।' ॰वक्त्र-वदन-पु. महादेव. 'भक्तोत्सल पंचवदन । सुंदर अति अधररदन ।' -देप २००. याच्या पांच तोंडांचीं नावें:-सद्योजात, तत्पुरुष, अघोर, वामदेव आणि ईशान. ॰वर्ज्यनामें-नअव. आत्मनाम, गुरुनाम, कृपणनाम, ज्येष्ठापत्यनाम व पत्निनाम. या पांच नामांचा उच्चार करूं नयें. ॰विध-वि. पांच प्रकारचें. ॰विशी-स्त्री. १ पंचवीस वर्षांचें वय. २ पंचवीस वस्तूंचा समूह. पहिल्या पंचवीशींतलें पोरगें-तरणाबांड. ॰विषय-पुअव. (कर्ण, त्वचा, चक्षु, रसना, घ्राण या) पांच ज्ञानेंद्रियांचे अनुक्रमें पांच विषय:-शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध. पंचवीस-२५ संख्या; वीस आणि पांच. ॰विसावा-वि. सांख्य मताप्रमाणें मूल-प्रकृत्यादि जीं चोवीस तत्त्वें आहेत त्यांपलीकडील पंचविसावा (आत्मा). 'तूं परम दैवत तिहीं देंवा । तूं पुरुष जी पंचवीसावा । दिव्य तूं प्रकृति- भावा- । पैलीकडील ।' -ज्ञा १०.१५०. ॰शर-पु. पंचबाण पहा. ॰सार-न. तूप, मध, तापविलेलें दूध, पिंपळी व खडीसाखर हे पदार्थ एकत्र घुसळून तयार केलेलें सार. हें विषमज्वर, हृद्रोग, श्वास, कास व क्षय यांचा नाश करतें. -योर १.३५३. ॰सूत्र-सूत्री-वि. १ पांच दोऱ्यांचें, धान्यांचें, रेषांचें. २ सारख्या लांबीच्या पांच सुतांमध्यें केलेलें, बसविलेलें (शाळुंकेसह बनविलेलें शिवलिंग). 'पंचसूत्री दिव्य लिंग करी । मणिमय शिवसह गौरी ।' ॰सूना-स्त्रीअव. कांडण, दळण, चूल पेटविणें, पाणी भरणें, सारवणें यापासून जीवहिंसादि घडणारे दोष. 'पंचसूना किल्बिषें म्हणूनि । एथें वाखाणिती ।' -यथादी ३.२३. ॰सूक्तें-नअव. ऋग्वेद संहितेंतील पुरुषसूक्त,देवासूक्त, सूर्यसूक्त (सौर), पर्जन्यसूक्त व श्रीसूक्त हीं पांच सूक्तें. ॰सूक्ष्मभूतें-नअव. पंचमहाभूतें पहा. ॰स्कंध-पुअव. सौगतांच्या अथवा बौद्धांच्या दर्शनाला अनुसरून मानवी ज्ञानाचे पांच भाग. म्हणजे रूप, वेदना, विज्ञान, संज्ञा व संस्कार. या शब्दांचे विषयप्रपंच, ज्ञानप्रपंच, आलयविज्ञान संतान, नामप्रपंच आणि वासनाप्रपंच ह्या अनुक्रमें पांच शब्दांनीं स्पष्टी- करण केलें आहे. ॰स्नानें-नअव. पांच स्नानें-प्रातः-संगव- माध्यान्ह-अपराण्ह-सायंस्नान. ॰हत्यारी-वि. १ ढाल, तरवार, तीरकमान, बंदूक, भाला किंवा पेशकबज या पांच हत्यारांनीं युक्त. २ चार पाय व तोंड यांचा शस्त्राप्रमाणें उपयोग करणारें (जनावर-सिंह, वाघ इ॰). ३ (ल.) हुशार; योग्य; समर्थ; संपन्न; सिद्ध असा (मनुष्य). ४ (व्यंग्यार्थी) शेंदाड शिपाई; तिसमारखान. ॰हत्त्या-स्त्रीअव. ब्रह्महत्त्या, भ्रूणहत्त्या, बालहत्त्या, गोहत्त्या व स्त्रीहत्त्या. पंचाग्नि-ग्नी-पुअव. १ चारी दिशांना चार पेटविलेले व डोक्यावरील तप्त असा सूर्य मिळून पांच अग्नी. 'पंचाग्नी गोरांजनें । जें प्राप्त नव्हे ।' -दा ५.६.२९. २ शरीरांतील पांच अग्नी. ३ -वि. पांच श्रौताग्नि; धारण करणारा गृहस्थाश्रमी ब्राह्मण. हे पांच अग्नी-दक्षिणाग्नि; गार्हपत्य, आहवनीय, सभ्य व आवसथ्य हे होत. -ग्नि साधन-न. चारी दिशांनां चार कुंडें पेटवून दिवसभर उन्हांत बसणें. हा तपश्चर्येचा एक प्रकार आहे. याला पंचाग्निसेवन, धूम्रपान असेंहि म्हणतात. 'चोहींकडे ज्वलन पेटवुनी दुपारीं । माथ्यावरी तपतसे जंव सूर्य भारी । बैसोनियां मुनि सुतीक्ष्ण म्हणोनि हा कीं । पंचाग्निसाधन करी अबले विलोकी ।' पंचादुयी- दिवी-दुवी-देवी-स्त्री. पंचद्वयी पहा. [अप.] पंचादेवी-स्त्री. शेताच्या उत्पन्नाचे ५ वांटे करून ज्याचे बैल असतील त्याला ३ व दुसऱ्याला (मालकाला) २ वांटे देण्याची रीत. पंचानन-पु. १ शंकर. २ (सामा.) पांच तोंडांची किंवा बाजूंची वस्तु. ३ सिंह. पंचामृत-न. १ दूध, दहीं, तूप, मध आणि साखर या पांचांचें मिश्रण. यानीं देवाच्या मूर्तीला स्नान घालतात. 'पय दधि आणि घृत । मधु शर्करा गुड संयुक्त । मूर्ति न्हाणोनि पंचामृतें । अभिषेक करिती मग तेव्हां ।' २ शेंगदाणे, मिरच्या, चिंच, गूळ, खोबऱ्याचे तुकडे इ॰ पदार्थ एकत्र शिजवून त्यास तेलाची फोडणी देऊन केलेला पदार्थ. ३ एक पक्वान्न; मिष्टान्न. [सं.] म्ह॰ १ जेवावयास पंचामृत आंचवावयास खारें पाणी. २ पंचामृत खाई त्यास देव देई. ॰मृत सोडणें-(बायकी) चातुर्मासांतील पहिल्या महिन्यांत दूध, दुसऱ्यांत दहीं, तिसऱ्यांत तूप, चौथ्यांत मध व पाचव्यांत (अधिकांत) साखर किंवा पांचवा (अधिक) नस- ल्यास चौथ्यांतच मध व साखर यांनीं युक्त असे पदार्थ न खाणें. ॰मृतानें-पंचामृतें न्हाणणें-पंचामृताच्या पदार्थानीं देवास स्नान घालणें. पंचायतन-न. १ शिव, विष्णु, सूर्य, गणपति व देवी या पांच देवता व त्यांचा समुदाय. या पांच देवतांपैकी प्रत्येक देव- तेस प्राधान्य देऊन शिव, विष्णु, गणपति इ॰ चीं पांच पंचायतनें मानण्याचीहि पद्धत आहे. (गो.) पंचिष्ट २ (ल.) एकचित्त असलेले पांच जण. ३ पंचमहाभूतांचें स्थान; शरीर. 'तें अधिदैव जाणावें । पंचायतनीचें ।' -ज्ञा ८.३६. पंचारती, पंचारत- स्त्री. १ तबकांत पांच दिवे ठेवून आरती ओवाळणें. २ आरती करितां लावलेले पांच दिवे. ३ असे दिवे ठेवण्याचें पात्र. पंचाक्षरी-वि. पंचाक्षरीमंत्र म्हणणारा व अंगांतील भूतपिशाच्च काढणारा; देव- ऋषी. 'पंचाक्षरी काढिती समंध ।' ॰क्षरीकर्म-न. पंचाक्षरीमंत्र म्हणून अंगांतील भूत काढणें. ॰क्षरीमंत्र-पु. १ भूतपिशाच्च काढ्ढन टाकण्याचा पांच अक्षरांचा मंत्र. २ ॐ नमःशिवाय हा मंत्र. पंचास्त्र-न. पंचकोण. -वि. पंचकोणी. [सं.] पंचाळ-स्त्री. (विणकाम) १ पांच पंचांकरितां लावलेला ताणा. २ एक शिवी. -वि. १ फार तोंडाळ, बडबड करणारी (स्त्री). पंचीकरण-न. १ पांच महाभूतांपैकीं प्रत्येकाचा कमीजास्त भाग घेऊन त्या सर्वांच्या मिश्रणानें नवा पदार्थ तयार होणें. -गीर १८१. २ आका- शादि पंचभूतें, त्यांचे देहादिकांच्या उत्पत्तीसाठीं ईश्वरशक्तीनें झालेलें परस्पर संमिश्रण. तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ. हा देह किंवा विश्व हें पंचमहाभूतात्मक कसें आहे याचें विवरण करणारा ग्रंथ. पंचीकृत- वि. पांच मूलतत्वें एकत्र झालेली (स्थिती). पंचेचाळ- चाळीस-ताळ-ताळीस-वि. चाळीसामध्यें पांच मिळवून झालेली संख्या; ४५. पंचेंद्रिय-नअव. पांच इंद्रियें. डोळे, कान, नाक, जिव्हा व त्वचा. यांचीं कामें अनुक्रमें-पहाणें, ऐकणें, वास घेणें, चव घेणें व स्पर्श करणें. पंचोतरा-पु. १ दरमहा दरशेकडा पांच टक्के व्याजाचा दर. २ शेंकडा पांच प्रमाणें द्यावयाचा कर. ३ सरकारसारा वसूल करतांना पांच टक्के अधिक वसूल करण्याचा हक्क. ४ सरकाराकरितां शंभर बिघे किंवा एकर जमीन लागवडी- खालीं आणली असतां पाटलाला पांच बिघे किंवा एकर सारा- माफीनें द्यावयाची जमीन. पंचोतरा, पंचोतरी-पुस्त्री. गव- ताच्या शंभर पेंढ्या किंवा आंबे विकत देतांना पांच अधिक देणें. पंचोपचार-पुअव. गंध, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य या वस्तू व त्या देवाला समर्पण करणें. पंचोपप्राण-पुअव. नाग, कूर्म, कृकल, देवदत्त व धनंजय हे पांच उपप्राण. कूर्म अर्थ ३ पहा. पंचो- पाख्यानी-वि. १ (पांच प्रकरणांचे पंचोपाख्यान नांवाचा विष्णु- शर्म्याचा नीतिपर एक ग्रंथ आहे त्यावरून) अनेक कथा, संदर्भ, उदाहरण, दृष्टांत इ॰ नीं परिपूर्ण. २ कल्पित; विलक्षण; अद्भुत. ३ अभद्र; शिवराळ (स्त्रिया संबंधीं योजितात). पंच्याऐशी- पंच्याशी-वि. ८५ संख्या. पंच्याण्णव-वि. ९५ संख्या. पंच्याहत्तर-वि. ७५ संख्या.

दाते शब्दकोश

बीज

न. १ बी; फळाच्या आंतील कठीण भाग. २ धान्या- दिकांचें बीं. 'मुडाहूनि बीज काढिलें । मग निर्वाळलिये भूमीं पेरिलें ।' -ज्ञा ९.३६. 'शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ।' -तुगा २२७२.'बीज तैसें फळ येत असे गोड ।' -ब १२३.२. ३ खाण; कुल; बिजवट बी. ४ पुरुषाचें वीर्य; रेत. ५ कारणीभूत किंवा मूळ मुद्दा; गोष्ट. क्रिया, मूल; कारण; उगम; आधार; निमित्त. 'दर्शना बीजें तेथें । जाणीव आणी ।' -अमृ ७.११९. ६ खोल हेतु; भाव; इंगित; वर्म; अभिप्राय; गूढार्थ.' हे तुम्ही म्हणतां ह्यांत बीज काय !' 'नातरी अर्जुना हें बीज । पुढति सांगिजेल तुज ।' -ज्ञा ९.३४. ७ संख्या किंवा परिमाणें यांबद्दल अक्षरें योजून करा- वयाचें गणित; बीजगणित. ८ गूढमंत्राक्षर. ' परी म्यां अभ्यासिला जो सबीज । तो स्वामी ऐकावा ।'-जै ६३.१७. [सं.] म्ह॰ यथा बीज तथा अंकुर = बीज तसा अंकुर; झाड तसें फळ.भ्रष्ट किंवा भर्जित बीज -अंकुरत नाहीं, भर्जित किंवा भ्रष्ट बीजास अंकुर नाहीं, भाजलें बीज उगवत नाहीं, भाजलेल्या बीजास मोड येत नाहीं-निष्काम, निस्स्वार्थी, निवळ अध्या त्मिक, ईशप्रीति प्रेरित अशा कृत्यांना फळ येत नाहीं म्हणजे पुढल्या जन्मी मिळणारें चांगलें वाईट फळ येत नाहीं. त्यांच्या कर्त्याला श्रेष्ठ सुख जो मोक्ष तोच प्राप्त होतो. समाशब्द- ॰कणिका- स्त्री. लहान बीज. 'सविस्तर वटत्व जैसें । बीजकणिकेमाजीं असे ।' -ज्ञा ९.४१९. ॰कोश, बीजाशय-पु. फुलांतील एक भाग; बीजाची पिशवी. [बीज + कोश, आशय = सांठा अर्थ] ॰गणित-न. गणिताचा एक प्रकार; अव्यक्त गणित; बीज अर्थ ७ पहा. (इं.) आलजेब्रा. ॰गर्भ-वि. स्वाभाविक; प्रकृतिज. 'बीजगर्भ गुण अर्थात्‌ आपल्यामध्यें संक्रांत होतात.' -नीति ३२१ ॰बेंदूर-पु. १ शूद्रांचें विधी; उत्सव; चाली संप्रदाय इ॰ समुच्चयानें (क्रि॰ करणें) 'आपण आपले कुणबी आपणांस आपला बीजबेंदूरच बरा.' २ शेंदूर, गूळ; बैलांचीं चित्रें, फुलांच्या माळा इ॰ चे नजराणे शेतकरी लोक पाटील, कुळकर्णी, देशमुख इ॰ ना देतात तो. [बीज आणि बेंदूर हे दोन सण] ॰भरण-न. बीं भरण पहा ॰भाव-पु. बीज- रूप अव्यक्त. 'जयाची कां बीज भावो । वेदांतीं केला ऐसा आवो ।' -ज्ञा १५.५१२ ॰मंत्र-पु. १ (महानु.) जादूटोणा; मंत्रतंत्र. 'जिए कामाचेनि बीजमंत्रे । फिटेति ना ।-शिशु ८०१. २ मूलमंत्र. ॰मार-वि. पेरलेल्या बिजाइतकेंसुद्धां धान्य देत नाहीं अशी (जमीन). [बीज + मारणें] ॰मुद्रा-स्त्री. बीजाचा आकार; बीजाकार. 'कां बीजमुद्रेआंतु । थोके तरू समस्तु ।' -ज्ञा १३.९५ ॰वर्म-न. मुख्य गोष्ट; रहस्य. ॰संस्कार-पु. एखाद्या प्राचीन सर्वमान्य ग्रंथादिकांत उणा किंवा अधिक फरक करणें.' त्यानें पूर्वींच्या ग्रंथांत सुधारणा केली आहे; ही सुधारण कोठें स्वतंत्र रूपानें दिली आहे व कोठें बीजसंस्काराच्या रूपानें सांगितली आहे.' -टि ४ ४२२.बीजांकित-वि. बीजक्षरानें अंकित, लांछित, परिवेष्टित. 'रामनाम बीजांकित ।' [सं. बीज + अंकित]बीजांकुरन्याय- पु. १ परस्परांत असलेला कार्यकारणसंबंध; जसें-बीजापासून अंकुराची उप्तत्ति आणि अंकुरापासून बीजाची उत्पत्ती.' आधीं झाड कां बी.' याप्रमाणें दोन परस्पर संबद्ध गोष्टींची कालानुपूर्वता ठरवितां येत नाहीं तेव्हा द्दष्टांत देतात. 'अभिमानी जो विश्वांस । तो चतुराननाचा अंश । त्यासीं ऐक्य मानी हा विश्वास । बीजांकुर- न्यायें । ' २ जसें बी तसें फळ; जसें कर्म तसा परिणाम. [बीज + अंकुर + न्याय] बीजांकुरभाव-पु. बीजाची अंकुरावस्था.' घन- अज्ञान सुषुप्ती । तो बीजांकुरभावो म्हणती ।'-ज्ञा १५.८९. [बीज + अंकुर + भाव] बीजारोप-रोपण-पुन. १ बीज पेरणें. २ कोणत्याहि कार्याचें किंवा परिणामफलाचें मूळ घालून ठेवणें. 'करी राम कथा बीजारोपण ।' -रावि १. [सं. बीज + आरोप, आरोपण] बीजाक्षर-पु. १ मूळाक्षर; २ मंत्राक्षर; मंत्राचें आद्याक्षर, बीज अर्थ ६ पहा. [बीज + अक्षर] बीजिका-स्त्री. बीज; बी. 'जे भवद्रुमबीजिका । जे प्रपंचाची भूमिका ।'-ज्ञा १५.८२.

दाते शब्दकोश

गुल

पु. १ फूल. २ दिव्याची काजळी; कीट. ३ आग- काडीला लावलेलें फास्फरस व गंधक यांचें पूट. ४ हुक्क्यांतील कोळशाचा गोळा, विस्तव. [फा. गुल्] सामाशब्द-गुल(ला) अनार-पु. १ डाळिंबीचें फूल; अनारकली. 'सखे गुलाअनार गुलचमन निशिचा रमण तसा गोजिरा तुझा मुखवटा ।' -होला १०४. २ डाळिंबी रंग. ३ एक झाड; गुलनार पहा. -वि. डाळिंबी रंगाची (शालजोडी, वस्त्र इ॰). [फा. गुल् + अनार् = डाळिंब] ॰कंद-पु. एक लेह; गुलाबाचा फुलांच्या पाकळ्या व खडी- साखर यांचें मिश्रण; गुलाबाचा मुरब्बा. ॰काडी-स्त्री. आग- काडी. ॰केश-पु. कोंबड्याच्या शेंडी-तुर्‍याप्रमाणें असलेलें फूल. ॰गुलाब-पु. गुलाबाचें फूल; गुलाब. ॰गेंद-पु. फुलाचा गुच्छ. 'संगीन कुच भरदार, सजिव सजदार, गुलगेंद उसासले ।' -प्रला ११३. ॰चनी-चिनी, गुलाचीन-स्त्री. फुलाची एक जात; गुलदावरी. ॰चांदणी-स्त्री. एक फूल. ॰चिमणी-स्त्री. पिंवळ्या पोटाची चिमणी (पक्षी). ॰छबू-ब्बू-पु. निशीगंध; हें झाड कंदापासून होतें. फुलें विशेषतः सांयकाळीं उमलतात, त्यांस फार मधुर वास येतो. फूल लांबट असून सफेत रंगाचें असतें व देंठ थोडासा वक्र असतो. -वि. मोहक चेहेरा असलेला (माणूस). [फा. गुलिशब्बो] ॰छडी-जाफिरी-स्त्री. एक प्रकारचें फूल. [फा. गुलिजाफरी] ॰जार-वि. १ नाजूक; सुंदर; मोहक; रमणीय. २ टवटवीत; प्रफुल्ल. ३ संपन्न; ऐश्वर्ययुक्त. 'बाच्छाई तक्त गुलजार दिसे रंगबहार पुण्याची वस्ती ।' -होला १७८. ४ आबाद. 'महाल उंडणगांव वगैरे महाल गुलजार दिले.' -रा ८.२१२. [फा. गुल्झार् = गुलाबांची बाग] ॰टोप-पु. १ एक फूलझाड; व त्याचें फूल. 'पर्यातक गुलटोप गुलगुलित जळीं कमळणवावरी ।' -प्रला १५५. २ कबूतराची जात. ॰तुरा- पु. १ (व.) शंखासुर नांवाचें फूलझाड. २ गुलमोहोर; यास पिवळ्या व तांबड्या रंगाचीं झुपकेदार फुलें येतात. फुलास वास नसतो. याचें मूळ काढ्यांत घालतात, लांकूड बळकट असल्यामुळें खुंटे करतात. 'डवना मरवा गुलतुरा । वाळागीर पडदे आणवा ।' -पला ४.२२. ॰दान-न. १ फुलें ठेवण्याचें पात्र. २ पेटलेला तोडा न विझतां ठेवण्याची लोखंडी पेटी. ३ कात्रीनें दिव्याची कोजळी काढण्याचें पात्र. 'गुलदानें रुप्याचीं' -पया २८७. 'गुल- दानांनीं गूल काढावे.' -पया २८७. ॰दावदी-री-ली-स्त्री. एक फूल व झाड. 'शरिर सुकुमार कीं गुलदावरी ।' -प्रला ११०. ॰नार-१ डाळिंबीचें फूल; गुलअनार. २ डाळिंबाची एक जात; हीस फक्त फुलें येतात, फळ धरत नाहीं. -कृषि ७०१. ॰फूल-न. गोजिव्हा; गुलेगोजबान. -मुंव्या १४०. ॰बदन-वि. गुलाबाच्या फुलासारखा सुंदर देह असणारी (स्त्री). -पु. १ तापत्यांतील (रेशमी वस्त्र) एक भेद, प्रकार; एक प्रकारचें कापड. 'दाविली कंचुकी गुलबदनी ।' -प्रला १४९. 'गुलबदनें रेशमी' -ऐटि ५.२३. २ एक रंग. ॰बस-बाशी, गुलबाक्षी-स्त्री. सांयकाळी फुलणारें एक फुलझाड. याचीं फुलें पांढरी, तांबडीं, जांभळीं वगैरे अनेक प्रकारचीं असतात. 'छतें आरशांचीं बशिवलीं रंग गुल- बासी ।' -प्रला ९२. -न. या झाडाचें फूल. -वि. या फुलाच्या रंगाचें. [फा. गुलि-अब्बास] ॰मखमल-पुस्त्री. एक फूलझाड व त्याचें फूल; गेंद; छेंडू. ॰मस-पु. रानटी पांढरें फूल व त्याचें झाड. ॰मेधी-मेहंधी-स्त्री. मेंदीचा एक प्रकार व त्याचें फूल ॰मोहोर-पु. १ एक फुलझाड. २ (शोभेची दारू) दारूच्या झाडाचा एक प्रकार. एका बांबूस १६ लोखंडी तारा बांधतात, शेंड्याला फुलबाजी व इतरत्र रंगीबेरंगी ज्योती बांधतात, (जळता) भुई नळा दाखविल्याबरोबर ४ मिनिटांत फटफट आवाज होऊन तारा पडतात.

दाते शब्दकोश

मळ

पु. १ घाण; केरकचरा; रेंदा. २ विष्ठा. 'मज उपज- तांचि मळसा त्याजिलें याहून काय अत्याग ।' -मोभीष्म १२.५६. ३ पाप; पापवासना. 'जाऊनिया मळ । वाळवंटीं नाचती ।' -तुगा ७६७. ४ कमीपणा. 'म्हणे कर्मनिष्ठां मळु । ठेविला देखों ।' -ज्ञा १८.६२. ५ दोष. 'म्हणे तुम्ही निष्पाप निर्मळ । तंव तुमचेनि दर्शनें तत्काळ । नासती सकळ कळिमळ । ऐसे निजनिर्मळ तुम्ही सर्व । ' -एभा २.२४३. -स्त्री. (राजा.) अंगावरच्या मळाची वळी; मळी. [सं. मल] मळई-स्त्री. १ पावसानें किंवा नदीच्या प्रवाहानें वहात आलेली माती, पानें, कचरा इ॰. २ अशा जागेवर केलेलें बागाईत. ३ मासे धरण्याचें जाळें. -बदलापूर. ४ साय. (प्र.) मलई पहा. मळकट-न. १ पाप. 'जें त्रिविधीं मळकटां । तूं सांडिलासि सुभटा ।' -माज्ञा १५.५८१. २ मळाचें पुट; थर 'तें कळिमळांचीं मळकटें । नामोद्वाटें नासती ।' -एभा ४.२५३. -वि. मळलेला; घाणेरडा; मलिन. मळकटणें-अक्रि. मळणें; घाणेरडें, मलिन होणें. मळकटा-पु. मळाचा थर, लेप. 'धुऊनिया मळकटा । बुद्धीचा तेणें ।' -ज्ञा १८.१०११. मळका-वि. घाणे- रडा; मळलेला; मलिन. मळकी-स्त्री. १ नदीच्या प्रवाहाबरोबर आलेला गाळ. २ गाळ सांठून झालेला जमीन; मळई. ३ (बे.) अशा जमिनीवर केलेली लागवड. मळई पहा. मळको(खो)रा- वि. मळकट रंगाचें, नवीनपणाचा तजेला कमी झाला आहे असें (नाणें). मळघा(खा)ऊ-घाव-वि. १ जो मळला असला तरी मळलेला दिसत नाहीं असा (रंग). २ कष्ट, आजार इ॰ न चर- फडतां सोसणारा. ३ बाहेरून सुंदर पण आतून घाणेरडा दिसणारा (मनुष्य, पदार्थ). मळगा(घा)वणें-सक्रि. खराब, घाण करणें; मळविणें; मलिन करणें. मळणें-अक्रि. १ मलिन, घाण होणें. २ मोहानें व्याप्त होणें. 'मळलें होतें मन, परि केलें त्वां शुद्ध, तुजकडे वळलें ।' -मोकर्ण ४३.२३. मळमास,मळयागर मळशुद्धि-मल्मास इ॰ पहा. मळविणें-सक्रि. १ मळानें युक्त करणें; घाणेरडें करणें. २ (पराभव इ॰नीं तोंड) उतरविणें. 'पळवी सुयोधनातें, त्यासकट तदाश्रिताननें मळवी ।' -मोविराट ६.१४४. मळाचा कोठा-पु. मलाशय. मळी-स्त्री. १ अंगावरच्या मळाचा वळी. २ पावसानें किंवा नदीच्या प्रवाहा- बरोबर वाहून येतो तो गाळ (सामा.) चिखल. 'आता गंगेचे एक पाणी । परि नेलें आनानी वाहणीं । एक मळी एक आणि । शुद्धत्व जैसें ।' -ज्ञा. १७.१९६. ३ नदीकाठची बागाइती जमीन; मळई. 'काळी मळी पांढरा चोळ । परी ते केवळ वसुधाची ।' -एभा ४.२६०. ४ अशा जमिनीवर केलेली बागाइती शेती, लाग- वड. ५ साखर, गूळ इ॰ शुद्ध करताना निघतो तो मळ. ६ कोण- त्याहि पदार्थावर येते ती मळकट साय. ७ (राजा) मोठ्या शेतात बांध घालून पाडतात तें लहान खोचें, भाग प्रत्येकी. ८ (व.) नदी- कांठची पडीत जमीन. ९ (न्हावी धंदा) डोक्यातील मळ काढण्या- साठीं कोईचें केलेलें साधन. -वि. (जुन्नरी) मळकट, धुरकट रंग असलेली (मेंढीं). 'ही मेंढी मळी आहे.' मळी(ळि)ण-वि. १ मळलेला; घाणेरडा; ओंगळ; अस्वच्छ. २ (ल.) पापानें युक्त; पापी; दोषी. ३ तयार नसलेली; विसरलेली (विद्या, कला इ॰) ४ म्लान; मलूल. 'कुंथाच्या ढेंकरे न देवेल पुष्टी । रूप दावी कष्टी मळिण वरी ।' -तुगा २८७६. [सं. मलिन]

दाते शब्दकोश

माती

स्त्री. १ पृथ्वी; दगडावाचून पृथ्वीचा अंश; मृत्तिका, धूळ. २ (ल.) स्थूल शरीर. 'कीर्तनासी जाता तुझी जड झाली माती ।' -तुगा २९८७. ३ (ल.) नाश; नासाडी; दुर्दशा. 'पोरानें संसाराची माती करून टाकली.' ४ अगदीं काहीं नाहीं याअर्थीं. 'तुला काय कळतें माती?' ५ निरुपयोगी; बिनकिमतीचा पदार्थ. ६ (ल.) मृत शरीर. ७ निसर्गानें मेलेल्या जनावराचें मांस; मढें. ८ शाडू (मातीचा गणपति, चित्रें इ॰ कां करितां). [सं. मृत्तिका, मृद् = कुस्करणें; प्रा. मत्ति(ट्टि)आ; हिं. मट्टी-माठी] म्ह॰ १ अति तेथें माती = कोणत्याहि गोष्टीचा अतिरेक झाल्यानें नुकसान होतें. २ जित्या रोटी आणि मेल्या माती. ३ दरीची माती दरींत आटते. (वाप्र.) ॰आडकारणें-घालणें-ठेवणें- टाकणें-१ (शब्दशः व ल.) मातीखालीं ठेवणें; पुरणें; आच्छा- दणें; झाकणें (प्रेत, धन, ठेवा). २ विसरून जाणें; पुनःपुनः त्याच गोष्टीचा उल्लेख न करणें. ॰(मातेरा) करणें-(एखाद्या वस्तूची) नासाडी करणें; तिचा सुखावहपणा हिरावून घेणें. ॰(मोत)करणें-(व.) प्रेत दहन करणें, मूठमाती देणें; पुरणें. (अन्नात)॰कालवणें-एखाद्याच्या उपजीविकेचें साधन नाहींसें करणें; पोटावर पाय आणणें. ॰खाणें-पराभव पावणें. ॰च्या मोलानें विकणें-देणें-हलक्या दरानें, कमी किंमतीनें विकणें. 'पैशाची फार जरूरी होती, म्हणून मला आपलें सामान मातीच्या मोलानें विकावें लागलें.' ॰जड होणें-मरणोन्मुख मनुष्याचें शरीर जड होणें. ॰टाकणें-बोलणें-लोटणें-बुझविणें; (कलह, अपराध इ॰ कांवर) पांघरूण घालणें; विसरण्याचा प्रयत्न करणें. 'ह्या वादावर आतां माती लोटली पाहिजे.' मातीला देणें-जाणें-येणें-(कर.) प्रेत पुरणें; मढें पुरणें; प्रेतयात्रेला जाणें. 'मातीला गेलो होतों-काल माती दिली-मातीला चला.' (तोंडात) ॰पडणें-प्राप्ती बुडणें. (मातीत) ॰मिसळणें- प्रेत पुरणें; और्ध्वदेहिक, उत्तरक्रिया करणें. ॰होणें-१ नाश होणें. 'जें अनया कारण, त्याची पळांत हो माती ।' -मोआदि ३३.६०. २ खराबी होणें. 'यालागी श्रवणाची होय माती । पर- मार्थप्राप्ति त्यां कैची ।' -भाराबाल ११.१३०. ३ बेकार होणें. सामाशब्द-(माती शब्द समासांत पूर्वपदीं आला असतां त्याचें मात असें रूप होतें) ॰कट-वि. माती असलेला (पदार्थ) ॰कण-न. माती मिसळल्यामुळें नासलेलें धान्य. [माती + कण] मात्कर-पु. (व.) मातीच्या भिंती घालणारा; मातकाम करणारा. मातकरी- पु. (राजा.) शेतजमीन भाजण्यासाठीं पसरलेल्या राबावर माती घालण्याकरितां लावलेला मजूर; परैगडी. [माती + करी] ॰कापड- न. १ (अग्निपुटें देण्याकरितां कुपीस्थ रसायनें इ॰ची) ज्यांत भट्टी लावावयाची त्या भांड्यास मातीचा लेप दिलेल्या कापडाच्या पट्टीनें लेपटणें. २ असला लपेटा; आवरण. [माती + कापड] ॰काम-न. मातीचें काम; मडकीं घडणें, विटा घालणें, चित्रें करणें चिखलानें भिंत रचणें इ॰ काम. ॰ख(खा)ण-स्त्री. १ मातीची खाण. २ भाजावळीकरितां दाढीवर पसरण्यासाठीं दाढीच्या नजी- कच्या जमीनींतील जी माती खणतात ती जागा. ॰गाळणें-न. चाळणीवजा चिकणमाती गाळण्याचें मडकें मातट-ड-ळ, मात- मळ-वि. माती मिसळल्यामुळें खराब झालेला (गूळ, धान्य इ॰ पदार्थ) मातीमिश्रित. ॰सामान-न. मातीचीं चित्रें, भांडी इ॰ जिनसा. मातियेडें-न. मातकाम करणारा. -शर. [प्रा.] मातिरा-पु. मातेरें; नाश. 'चरमतनू परमलाभ, न करि मातिरा ।' -भज ५७. मातीचा मैराळ-वि. जंगी व स्थूल; गलेलठ्ठ (मनुष्य). मातीचें अत्तर-न. उत्तम मातीपासून तयार केलेलें अत्तर. मातीचे कुल्ले-पुअव. खरें प्रेम नसतां प्रेमाचा आणलेला नुसता आविर्भाव; दृड बंधन, एकोपा नसल्यामुळें संक- टाच्या वेळीं उपयोगी न पडणारें नातेवाईक, संबंधी; बळें लाव- ललें नातें किंवा संबंध; उसनें प्रेम, अवसान. म्ह॰ मातीचे कुल्ले लावल्यानें लागत नाहींत. मातीचे तेल-न. खडकतेल; घासलेट. मातीमीठ-न. खारट मातीपासून तयार केलेले मीठ. माती वडार-पु. वडारांतील एक पोट जात.

दाते शब्दकोश

कडु-डू

वि. १ कडवा (गोडाचे उलट, कडूनिंबाच्या चवी- प्रमाणें). २ बेचव; पित्तविकारामुळें बदलणारी (जिभेची रुचि). ३ न. रुचणारें; अप्रिय; कठोर (वाक्य, भाषण इ॰). 'आधीं कडु मग गोड.' ४ ज्यास कीड लागत नाही, जें कीड खात नाहीं असें (विशिष्ट झाड, वनस्पति). ५ जारज संतति (गोडच्या उलट). ६ गोड नसणारें; अशुद्ध (विशिष्ट तेल). ७ कठिण, गांठ्याळ (बाभळीच्या लांकडाचा आंतील भाग; नार; वरचा भाग ठिसूळ, नरम किंवा गोड असतो). ८ निर्दय; कडक; ताठर (माणूस, स्वभाव). ९ नापीक; लागवडीला प्रतिकूल (जमीन). १० झोंबणारी; कडक; तिखट (विशिष्ट भाजी). -न. १ (ल.) अफू. २ कात (रात्रीच्या वेळेस काताचें नांव घ्यावयाचें नाहीं म्हणून त्याबद्दल म्हणतात). ३ मृताशौच; कडू विटाळ या शब्दाचा संक्षेप. -स्त्री. डोळ्याचें दुखणें (डोळ्यांत माती गेल्यानें, जाग्रण केल्यानें येणारें). (क्रि॰ येणें. उ॰ डोळ्यांला कडू येणें). -पु. १ दासीपासून झालेली संतति; अनौरस, जारज संतति; लेकवळा (याच्या उलट गोड). 'त्याच्या राज्यांत मल्हारराव नामक त्याच्या एका कडू सापत्न भावानें जें बंड माजविलें होतें...' -हिंक ८४. २ पाटाची संतति [सं. कटु; प्रा. कडु; गु. कडवु; हिं. कडुवा; सिं कडो] ॰इंद्रा- यण-न. कुंपणावरील एक वेल; ह्याचीं फळें तांबडीं, विषारी व रुचीस कडू असतात; कवंडळ; इंद्रावण; इंद्रवारुण; कडूवृदांवन. २ (ल.) तुसडा, माणूसघाण्या; एकलकोंडा माणूस. ॰करांदा- पु. एक कडवट तपकिरी रंगाचा कंद. ॰कारलें-न. १ कारलें. २ (ल.) वाईट स्वभावाचा व न सुधारणारा माणूस. 'तो एक कडूं कारलें आहे, त्याची संगत धरूं नको म्हणजे झालें.' म्ह॰ कडू कारलें, तुपांत तळलें, साखरेंत घोळलें तरी तें कडू तें कडूच.' ॰कारळी-ळें-स्त्रीन. कारळे तीळासारखें औषधी बीं; कडू जिरें; काळें जिरें. याचें झाड दोन तीन हात उंच असून ह्यास बोंडें येतात व त्यांत बीं असतें. हें कृमिनाशक आणि वातनाशक आहे. -शे ९.२३४. ॰काळ-पु. वाईट दिवस; अडचणीची स्थिति; साथ; दुष्काळ; दुर्गति. (क्रि॰ येणें; असणें; चालणें; वाहणें; जाणें; टळणें; चुकणें; चुकविणें). ॰घोसाळें-न. घोसा- ळ्याची एक जात. -शे ९.२३५. ॰जहर-वि. अतिशय कडू; विषासारखें कडू. ॰जिरें-कडू कारळी पहा. ॰झोंप-स्त्री. अपुरी झोंप; झोंपमोड; झोंपेचें खोबरें. (क्रि॰ करणें). ॰तेल-न. १ करंजेल. करंजाच्या बियांचें तेल. २ उंडिणीचें तेल (हेट.) पुन्नागफळांचें तेल. ४ (सामा.) न खाण्यापैकीं तेल (चोखटेल किंवा गोडें तेल याच्या उलट). ॰दोडका-पु. १ कडवट दोडका. २ दासीपुत्र; लेकवळा. ३ (ल.) पंक्तिबाह्य; जाति- बहिष्कृत माणूस. कडू भोपळा पहा. ॰दोडकी-स्त्री. भाद्रपद महिन्यांत फुलणारी एक वेल; दिवाळी; हिचीं पानें औषधी असून. फळास दिवाळें म्हणतात. -शे ९.२३५. ॰निंब-पु. बाळनिंब; बाळंतनिंब; हा वृक्ष फार मोठा असून सर्वत्र होतो. याचीं पानें गुडीपाडव्याला खातात. हा अनेक व्याधींवर उपयोगी आहे. याचें लांकूड इमारतीच्या उपयोगी आहे. आर्यवैद्यकांत याला रसायन म्हटलें आहे. म्ह॰ १ गूळ चारणारापेक्षां निंब चारणारा बरा होतो. २ (कर्‍हेपठारी) कडू निंबाच्या झाडा- खालून उठून आला = ज्याच्या जवळ कांहीं पैसा नाहीं असा; भणंग; (उपहासार्थी योजितात). ॰पडवळ-न. कडू असलेलें पडवळ. -शे ९.२३५. ॰पाणी-न. १ पाण्यांत कडूनिंबांचे किंवा निरगुडीचे टहाळे घालून उकळलेलें पाणी (यानें आजार्‍यास, बाळंतिणीस वगैरे स्नान घालतात). २ विटाळ संपल्यानंतर बायका ज्या पाण्यानें डोक्यावरून स्नान करतात तें पाणी. अशा स्नानालाहि म्हणतात. (क्रि॰ घेणें). ३ मृताशौच किंवा कडूविटाळ संपल्यानंतर माण- सानें स्नानार्थ घ्यावयाचें पाणी. (येथें कडू म्हणजे दुःखदायक प्रसंगाशीं आलेला संबंध). (क्रि॰ घेणें). ४ भाजीपाला शिजविलेलें पाणी. ॰पाणी काढणें-(बायकी वाप्र.) वरील विटाळ फिट- ल्याचें स्नान झाल्यानंतर तें स्नान नाहींसें करण्यासाठीं पुन्हां दुसर्‍या साध्या पाण्यानें स्नान करणें किंवा अंगावर पाणी घेणें. ॰पाला- पु. कडू पाण्यांत घालावयाचीं करंज, लिंब, निर्गुडी, जांभळी इ॰ चीं पानें. ॰भोपळा-पु. १ कडवट रुचीचा भोपळा; दुध्या भोपळ्याची एक जात (याचा उपयोग सतार, वीणा, वगैरे वाद्यांच्या कामीं व सांगड, तुंबडी इ॰ च्या कामीं करतात). २ (ल.) दासीपुत्र. ३ (ल.) पंक्तिबाह्य; हलक्या जातीचा; बहिष्कृत माणूस. ॰भोपळी-स्त्री. कडू भोपळ्याची वेल; कडू भोपळा अर्थ १ पहा. -शे ९.२३६. ॰वट-टु-वि. (काव्य) कडवट पहा. 'कैलासवन कडुवट । उमावन तुरट ।' -शिशु ६१५. 'जैसा निंब जिभे कडुवटु ।' -ज्ञा १८.१८६. 'कडुवट हरिनामे वाटती पापियाला ।' -वामन, नामसुधा १.४.३४. ॰वाघांटी- स्त्री. कडवट फळें येणारी एक वनस्पति; आषाढी द्वादशीस हिच्या फळांची भाजी करतात. ॰विख-वि. कडूजहर; विषाप्रमाणें कडू. ॰विटाळ पु. १ मृताशौच; सुतक. २ बाळंतपणाचा विटाळ; बाळंतिणीला येणारा दहा दिवसांचा विटाळ; जननाशौच. (क्रि॰ येणें; जाणें; सरणें; फिटणें;). ॰वृंदावन-न. कडू इंद्रायण पहा. 'कडू वृंदावन । साखरेचें आळें ।' -तुगा.

दाते शब्दकोश

तेल

न. तीळ, खोबरें, भुईमूग, चंदन इ॰ पासून पेटण्याजोगा निघणारा एक स्निग्ध व द्रवरूप पदार्थ; पदार्थातील स्निग्ध अंश. [सं.] तैल; प्रा. तेल्ल; आर्मेनियम तेल] (वाप्र.) ॰काढणें-न. १ पिळून, शोषून घेऊन एखाद्या पदार्थाचा रस, सत्व काढणें. २ (ल.) खरपूस चोप देणें; कुटणें. ॰घेणें- (स्त्रीविषयीं हा वाक्प्र- चार योजीत असतात) आपल्या स्वतःला देवाकडे लावणें; एखाद्या देवाच्या उपयोगाकरितां कसबीन बनणें; गरतपणा सोडून भावीन होणें. दिव्यांतील थोडेसे तेल डोक्यावर घालण्यानें ती आपला उद्देश जाहीर करते. म्हणून लग्न झालेली स्त्री तेल खरेदी करणें ह्या अर्थी 'तेल घेणें' असें म्हणत नसून' तेल ठेवणें' असें म्हणते व तिला तेल खरेदी करण्यास सांगावयाचें असल्यास 'तेल घे' म्हणून न सांगता 'तेल ठेव' असें सांगण्याचा रिवाज आहे. ह्या अर्थीं तेल जिरविणें असेंही म्हणत असतात. जसें- 'तिनें येउनिया स्वकरीं । तेल जिरविलें आपले शिरीं ।' ॰चढविणें-उतरविणें- (बायकी) उष्ट्या हळदीचे वेळीं वधूपक्षाकडून वरपक्षकडे आलेलें तेल परटिणीकडून (किंवा ज्याच्या त्याच्या चालीप्रमाणें एखाद्या स्त्रीकडून) वरच्या पावलास, अंगास व डोक्यास आंब्याच्या पानानें तीन वेळ लावणें. आणि तोच अनुक्रम तीन वेळ उलटा करणें:-म्हणजे तेल उतरविणें. (पाठीला) तेल लावून ठेवणें-मार खाण्याची तयारी करून ठेवणें. लागणें-(अंगास तेल लावलेला (अभ्यंग) कोणत्याही कामाला उपयोगी पडत नाहीं यावरून) महाग, दुर्मिळ, अप्रांप्त होणें, असणें (मनुष्य, वस्तु इ॰). ॰घालणें-(एखाद्या कामांत त्या) कामाची खराबी होईल अशी कांहीं तरी वस्तू अथवा भीड मध्यें घालणें. म्ह॰ १ तेल जळें पीडा टळे. २ तेल गेलें तूपगेलें हातीं धुपाटणें आलें = दोन फायद्याच्या गोष्टी असतां मुर्खपणामुळें हातच्या दोन्ही जाऊं फायद्याचा गोष्टी असतां मुर्खपणामुळें हातच्या दोन्ही जाऊं देऊन मनुष्य पुन. कोराकरकरीत राहणें अशा अर्थीं योजितात. सामाशब्द- ॰कट-कटी, तेलगट-वि. १ ओशट; स्निग्धल तेलानें युक्त, लिप्त. २ ज्यांत तेल आहे असा (तीळ, खोबरें, इ॰पदार्थ). [तेल] ॰क(ग)तणें-अक्रि. तेलानें भरणें; माखणें; भिजणें (वस्त्र, शरीरावयव इ॰). ॰कट तजेला-पु. तुळतुळीतपणा; तेलाची चमक. ॰कटाण-स्त्री. तेलकट घाण-वास. ॰कटी-स्त्री. १ तेलाचा चिकट मळ, वळकट्या. २ ओशटपणा. -वि. तेलकट पहा. ॰कार-पु (गो.) तेली; तेल काढणारा. ॰खिस्का-पु. (माण.) खेड्यांतील मनकर्‍याच्या सुवासिनीला लग्नाचें आमंत्रण देण्याकरितां हलदकुंकू. तेल देतात तें तेलगंड-पु तेल्याला तिरस्कानें संबोधितात (न्हावगंड शब्दप्रमाणें). [तेली + गंड प्रत्यय] तेलगोटी-तेलरवा पहा. -गांगा ३३. घडी-स्त्री. जखमे- वर घालण्याकरितां तयार केलेली, तेलांग बुडवून केलेली काप- साची घडी. ॰घाणा-पु. १ तेलाची घाणी; तेल काढण्याचें यंत्र. २ (शूद्रादि जातींत) गणपतिपूजनापासून लग्न लागेपर्यंत ब्राह्मणानें करावयाचें धार्मिककत्य. तेलची-स्त्री. १ तेलांत, तुपांत तळलेली गोड पुरी; पुरणाची पोळी. 'तेलच्या आणि फेण्या गुरोळ्या जाण ।' -अफला ५७. २ कणकेंत तेलमिठाचें मोहन घालून त्याची तळलेली पुरी. -गृशि १.३९५. ॰तवा-पु. तळण्याचा तवा; हा पितळीप्रमाणें असतो. ॰तावन-स्त्री. (ना.) कढई. ॰तिमण-न. तिमण पहा. ॰तूप घालणें-(बायकी) लग्न झाल्यावर पहिलीं पांच वर्षें संक्रांतीच्या दिवशीं तेल, तूप, तिळ- गूळ, हळदकुंकू, विडा इ॰ जिन्नस घेऊन पांच घरीं नवर्‍यामुलीनें नेऊन देण्याची क्रिया. ॰तूप निरांजन-(गो.) तेल गेलें तूप गेलें हातीं निरांजन आलें या म्हणीप्रमाणें वाक्प्रचार. ॰दिवाळी- स्त्री. दिवाळीकरितां पाटलानें तेली लोकांवर बसविलेली तेलाची पट्टी, वर्गणी. ॰धार-स्त्री. पाटलाला वगैरे देण्याकरितां गांवच्या तेल्यावर बसविलेली तेलाची पट्टी. ॰पक-वि. तैलपक्क; तेलांत शिजवलेलें तळलेलें. ॰पाषाण-न. काळे तुळतळीत दगड. ॰फळ-साडी-नस्त्री. (बायकी) लग्नापूर्वी वराकडून वधूला दिली जाणारी देणगी. लग्न लागण्याचे पूर्वीं नवर्‍याकडून नवरीकडे पाठविलेलें तेल, साडी, खोबर्‍याच्या वाट्या, नारळ, हळदकुंकू, फरा- ळाचें सामान, करंज्यालाडू इ॰ सामान; लग्नापूर्वीचा अपुलकीचें व कौतुकाचें चिन्ह दाखविण्याचा हा पहिला प्रकार आहे. ॰बोळ- पु. बाळंतिणीसाठीं लागणार्‍या आवश्यक वस्तू. म्ह॰ पोराचें पोर गेलें आणि तेलबोळाचें मागणें आलें. ॰मीठ-न. किरकोळ वस्तु, पदार्थ; तेलमिटाखालीं-वारीं' इ॰ प्रकारानें कारक विभक्तींमध्यें हा शब्द योजितात व ह्याचा अर्थ 'हिंगतूप' अथवा 'हिंगधूप' ह्यासारखा होतो. ॰येवप-(गो.) (तेल येणें) नवरानवरीकडील एकमेकांकडे तेलहळद येणें. ॰रतीव-पु. प्रत्येय चालू असलेल्या तेलघाण्याच्या मालकानें घ्यावयाचा रोजचा तेलाचा रतीव; कर. ॰रवा-गोष्टी-पुस्त्री. कढत तेलांतून रवा. गोटी इ॰ काढवयाचा एक दिव्याचा प्रकार. तेलांतून वस्तू काढतानां जर हात भाजला नाहीं तर काढणारी व्यक्ति निर्दोषी आहे असें समजतात. दिव्य पहा. -गंगा ३३. -गुजा १३. ॰रांधा-पु. (माण.) देवतेचा स्थापनाविधि व त्यानंतर देवतेस करावयाचा भात. पोळ्या, तेलच्या इ॰ पदार्थांचा नैवेद्य. 'गोट्यांना तेल शेंदूर लावून त्याच दिवशीं रात्रीं तेलरांधा करतात.' -मसाप ४.४. २५८. ॰वण-न. १ तेलफळ पहा. लग्नापूर्वीचा सोहाळा. 'जहालें तेलवण मुहूर्त । अलंकार वाहिले समस्त ।' -कथा ४.८. ५५. २ (आगरी) विवाह- समारंभांत सुपांत दिवे लावून नवरी अगर यांस ओवळाण्याचा विधि. -बदलापुर ३९. ३ दैवज्ञ ब्राह्मणांत विवाहसमारंभांत विड्याच्या पानाला भोंक पाडून तें डोक्यावर धरून त्यांतून मुलीवर तेल पाडण्याचा विधि. -बदलापुर २३६. ॰तेलवण काढणें, घालणें-(ल.) चांगला मार देणें; कुटणें. ॰वरी- स्त्री तेलची पहा. 'घार्‍या तेलवर्‍या विदग्धा ।' -सारुह ६.७८. ॰वात-स्त्री. दिव्यांत तेल घालणें, वाती करणें, दिवे पुसणें इ॰ दिवे लावण्याच्या पूर्वीची तयारी. ॰वाट करणें-१ दिवाबत्ती करणें. २ दिव्यामध्यें तेल व वाती घालणें; दिवे पुसणें. ॰वात घालणें-(बायकी) (दर शनिवारीं मारुतीस) तेल व वात तेथें असलेल्या दिव्यांत नेऊन घालणें व दिवा लावणें. ॰शिपा-पु. (नविक) मोठमोठ्या माशांपासून काढलेलें एक साधारण तेल. नावेच्या बाहेरल्या अंगाला लावण्यास ह्याचा उपयोग करितात. जमाबंदीच्या हिशोबांत या शब्दाबद्दल नुस्ता शिपा येवढाच शब्द आहे. ॰शुभ्रात-स्त्री. एखाद्या प्रसिद्ध देवळांत नंदादीप लावण्या- साठीं आसपासच्या खेड्यापाड्यांवर सरकारी पट्टी बसवून जमविलेलें तेल. [तेल + शुभ + रात्र] ॰ष्टाण-साण-स्त्री. तेलाची घाण. तेलस-सर-वि. १ तेलकट. २ तेलट; ज्यांत तेल जास्त आहे असा. ॰साडी-तेलफळ पहा. 'मग सावित्रीशीं तेलसाडी नेस- विती ।' -वसा ४६. तेलाचा टिकला, तेलाची धार-थोड- केसें तेल. तेलाडे-पुअव. (नवीन बनावट शब्द) जमीनींत तलाचे झरे पाहणारे; तेलपारखी. 'उत्तम वाकबगार पानाडे विहिरीस पाणी कोठें लागेल हें सांगण्यांत पटाईत असतात तसेच इकडे तेलाडेहि असतात.' -सांस २.१३२. [तेल] तेलिया-पु. एक काळा रंग; तेलासारखा तुळतुळीत रंग. [तेल; हिं.] ॰कुमाईत-पु. घोड्याचा एक रंग. यांत केस लाल कमी व काळे जास्त असावे, पाय गुडघ्यापर्यंत काळे असावे व कपाळावर पंधरा ठिपका असावा. ॰पंचकल्याण-वि. चारी पाय पांढरे असणारा तेलिया कुमाईत (घोडा). -अश्वप १.२९. तेली-पु. तिळाचें वगैरे तेल काढून त्याच्यावर उपजीविका करणारी एक जात; तिच्यांतील एक व्यक्ति; तेल काढणारा व विकणारा. [तेल] म्ह॰ तेल्याचा बैल सदां आंधळा. ॰खूट-पु. गांवच्या तेल्यावर प्रयेक घाण्या- बाबत बसविलेला कर. तेलीण-स्त्री. तेल्याची बायको; तेल विकणारी स्त्री. 'तेलिणीशी रुसला वेडा । कोरडी भाकर खातो भिडा ।' -तुगा ३२८४. ॰म्ह॰ तेलणीशीं रुसला अंधारांत बसला. तेली तांबोळी-पुअव. तेली, तांबोळी ह्या जातीच्या आणि इतर हलक्या जातीच्या लोकांस व्यापक संज्ञा; अडाणी बहुसं- ख्याक लोक; हलके, अशिष्ट लोक. [तेली + तांबोळी] तेलीरी- स्त्री. (खा.) तेलांत तळलेली पुरी, तेलची. [तेल + पुरी] तेल्या- वि. तुळतुळीत; चकचकणारा; झगझगीत; तुकतुकीत (रंग). २ तेल्याबोर; घोड्याचा एक रंग. ३ तेलानें लिप्त, माखलेला; तेलकट. [तेल] ॰कुमाईत-तेलिया कुमाईत पहा. ॰खार, टाकण- खार-पु एक क्षार. याला चौकिचा टाकणखार असेंहि म्हणतात.

दाते शब्दकोश

वज्र

पुन. १ इंद्राचें आयुध; (सामा.) अमोघ शस्त्र. २ हिरा. 'माणिक मोती प्रवाळ । पाचि वैडूर्य वज्र नीळ ।' -दा ८. ६.३४.३ वीज; विद्युत्. ४ वज्रतुंड पहा. -पु. १ सत्तावीस योगां- पैकीं पंधरावा. २ जाज्वल्य, दहशत बसविणारा माणूस (योद्धा, शास्त्री). हा शब्द पहिल्या पदीं येऊन पुष्कळ समास होतात कांहींचे अर्थ पुढें दिले आहेत. ॰आंगठी-स्त्री. त्रिकोनाकृति कोंदणांत हिरा व तीन कोनांवर तीन रत्नें बसविलेली अशी आंगठी. -देहु ४९. ॰कपाट-न. वज्राचें, हिऱ्याचें कवाड, दार. 'मुक्तिचे वज्रकपाट । कामीनि हे ।' -भाए ७५६. कवच-न. वज्राचें, वज्रासारखें अभेद्य चिलखत. 'जैसें वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे ।' -ज्ञा २.१३२; -एभा १५.७. ॰कीट-पु. खवल्या मांजर. ॰कीटकी-स्त्री. (महानु.) एक रोग-जंतु. 'कव्हणा एका अंताचीए सवडी वज्रकीटकी लागली असे ।' -दृष्टांत- पाठ २. ॰कृत-वि. घट्ट; घट्ट बसेल असें केलेलें. ॰गर्भ-स्त्री. एक प्रकारची भिकबाळी. (बं.) गिमडा. -देहु ४५. ॰गांठ-स्त्री. पक्की, न सुटणारी गांठ. 'कर्माच्या वज्रगांटीं । कळासे तो ।' -ज्ञा १८.३९२. ॰घात-पु. १ वज्राचा प्रहार, तडाखा. २ (ल.) मोठा आपत्ति; नुकसान; संकट. ॰चुडेदानचुडेदान पहा. -ह ११.१३७. ॰चूडेमंडित-वि. १ हिऱ्याच्या कंकणांनीं विभूषित, शोभायमान असलेले (हात); 'वजचूडेमंडित हस्त । अवतार मुद्रा दाही झळकत ।' -ह २७.८०. २ पत्रांतून सुवासिनी स्त्रियांस लिहावयाचा मायना. अक्षय टिकणारे चुडे हातांत असणारी; (ल.) अखंड सौभाग्यवती. ॰जिव्ह-वि. खोंचदार, कडक भाषा वापरणारा. ॰जिव्हा-स्त्री. खोंचदार, कडक भाषण. ॰टीक-टीका- स्त्री. स्त्रियांचा गळ्यांतील एक दागिना. ॰तडक-पु. वीज. -ख्रिपु. ॰तुंड-पु. वज्राचा एक जातीचा दगड. स्फटिक, चंद्रकांत आणि अभ्रक या पदार्थांच्या कणांच्या अनियमित मिश्रणानें हा झालेला असतो. (इं.) ग्रॅनाईट. ॰देह-पु. वजाप्रमाणें अभेद्य, बळकट शरीर; रोगरहित, ताकदवान शरीर. ॰देही-वि. असें शरीर अस- लेला; फार बलाढ्य. ॰द्रोह-पु. दीर्घकालचा व फार तीव्र असा द्वेष. ॰द्रोही-वि. हाडवैरी. ॰धर-पु. इंद्र. ॰धार-वि. तीक्ष्ण धार असलेलें; तिखट (शस्त्र). नाद-निर्घोष-पु. विजेचा कड- कडाट. ॰पंजर-पु. (वज्राचा पिंजरा) दुर्भेद्य किल्ला, आश्रयस्थान; निर्भय आसरा. 'तरि शरणांगतां वज्रपंजर । तेहिं कां म्हणवावें ।' -भाए ६१४. -तुगा ७०६. ॰पथ्य-न. फार अवघड, कठिण पथ्य. ॰परीक्षा-स्त्री. १ हिऱ्यांची परीक्षा. २ (ल.) कठिण कसोटी; फार अवघड तपासणी. ॰पाणि-पु. इंद्र. 'कृपा भाकिता जाहला वज्रपाणी ।' ॰पात-पु. १ वज्रायुधाचा प्रहार. २ वीज कोसळणें; पडणें. ॰पाणी-वि. मोठा पातकी. -एभा २७.४९४. ॰प्रयोग- पु. १ फार अवघड प्रयोग, उपाय. २ मांत्रिक जादूगाराचा विशिष्ट मंत्रप्रयोग. ॰प्रहार-पु. वज्रपात पहा. ॰प्रायवि. १ वज्रासा- रखा कठीण (पदार्थ). २ वज्रासारखा अमोघ आघात असणारा (बाण, मुष्टि इ॰). ३ अतिशय वजनदार, खंडण करण्यास अव- घड (मुद्दा). ४ झोंबणारें; मर्मभेदी; हृदयांत सलेल असें (भाषण, इ॰). ॰बटू-पु. एक झाड. -न. त्याचें फळ. बजरबटू पहा. ॰बाण-वि. वज्रासारखे घातक बाण असलेला. ॰बुद्धि-स्त्री. १ खंबीर मन. २ उत्कृष्ट ग्रहणशक्ति. विशेषणासारखाहि उपयोग. ॰मणि-पु. हिरा. ॰मय-वि. १ वज्राचा, हिऱ्याचा केलेला. २ अतिशय कठीण. ॰महाग-वि. अतिशय महाग. ॰महागाई- स्त्री. अतिशयित, भरमसाट महागाई. ॰महाग्या-वि. अतिशय महाग विकणारा. ॰माला-स्त्री. हिऱ्याची माळ. ॰मिठी-स्त्री. फार घट्ट मिठी. 'मग तोंडा कां वज्रमिठी पाडिजे ।' -ज्ञा ७. १५२. ॰मुष्टि-पु. मल्लाचें एक आयुध. हें मुठीला लावतात. -स्त्रीपु. लोखंडासारखी, कठीण मूठ. २ (बडोदें) एक खेळ. -खाला ८०. ३ लुतीचा कांदा. सरण पहां. -वि. १ लोखंडासारखी मारक मूठ असलेली. 'मी वज्रमुष्टि... ।' -स्वयंवर. २ वज्रमुष्टि हत्यारानें लढणारा, हत्यार वापरणारा. ॰मूठ-स्त्री. वज्रमुष्टि पहा. ॰मूली- मूळ-स्त्री, एक झुडूप; रानउडीद. ॰योग-पु. वज्रासन; हट- योग. 'एक वज्रयोग क्रमें । सर्वाहार संयमें ।' -ज्ञा ४.१४७. ॰लेप-पु. १ चुन्यामध्यें कात, गूळ इ॰ सरंजाम घातल्यामुळें दृढता आलेला चुना. २ अशा चुन्याचा दगड इ॰ वर करतात तो लेप. ३ (ल.) अक्षयता; अविनाशता; चिरंतनपणा (वचन, निश्चय, संस्था इ॰ चा). याअर्थी विशेषणासारखा उपयोग; पक्कें; काययचें; स्थिर; अभंग. 'महापापां प्रायश्चित्तविधान । वज्रलेप पूर्ण गुरुवाक्यावज्ञा ।' -भाराबाल ११.२७९. ४ (महानु.) दृढता आणणारा पदार्थ. 'ना तो संशृतीसि ताठ । वज्रलेप ।' -ऋ ११. ॰लेप होणें-पक्कें, कायम होणें. 'आमच्या आजे सासुबाई एकदां कोणाचें नांव घ्यावयाचें नाहीं असें म्हणाल्या कीं मग तें वज्रलेप झालेंच समजावें !' -पकोघे. ॰वाट-स्त्री. (महानु.) वज्राचें वेष्टण. 'काळ लोहें डवरिलें । वज्रवाटीं बांधिलें ।' -शिशु. [सं. वज्र + वृत्त; प्रा. वट्ट] ॰वाणी-स्त्री. कठोर, झोंबणारें भाषण. -वि. असें भाषण करणारा. ॰वीर्य-न. वानराचें वीर्य (शुक्र). हें इतकें उष्ण असतें म्हणतात कीं त्यामुळें दगडहि उलतात. -वि. १ अमोघ, पराक्रमी वीर्याचा (माणूस-ज्याचीं मुलें फार सशक्त आहेत अशा- बद्दल. हें विशेषण योजतात). २ उत्साही; पराक्रमी; निश्चयी; सहनशील; ताकदवान इ॰. ॰शरीर-न. वज्रदेह पहा. ॰शरीरी- वि. वज्रदेही. ॰शलाका-स्त्री. घरावर वीज पडूं नये म्हणून लावतात ती तार. ॰शील-(व.) वरिष्ठ; वरचढ. 'सगळ्या कार- कुनांत तो वज्रशील होऊन बसला.' ॰संकल्प-पु. न फिरणारा निश्चय; दृढनिश्चय. ॰संकल्प-पी-वि. फार दृढनिश्चयी. ॰सांखळ-ळी-स्त्री. अभेद्य, अखंड्य कोटिक्रम. 'तार्किकां- चिया वज्रसांखळा ।' -शिशु २५. ॰हस्त-वि. वज्राप्रमाणें कठीण हाताचा. ॰हस्तेंक्रिवि. फार जोरानें. 'तों मुकुंदरायें काय केलें । वेताचे छडीस पडताळिलें । मारिते जाहले वज्रहस्तें ।' -संवि २०.११६. ॰हृदय-यी-वि. १ कठोर अंतःकरणाचा; अति निर्दय. २ अति निग्रही; निधड्या छातीचा. ॰क्षार-पु. एक औषधी क्षार. मीठ, सेंधेलोण, पादेलोण, टाकणखार, बागडखार, जवखार, सज्जीखार, या खारांचें विशिष्ट कृतीचें केलेलें औषध. वज्रांगी-स्त्री. चिलखत; कवच. 'वज्रांगी लेइला तैशी प्रलयमेघांची ।' -शिशु १००१. -ज्ञा ६.४७५. [वज्र + अंग] वज्राग्नि-पु. १ मूलबंधापासून उत्पन्न होणारी उष्णता; वज्रासनरूप अग्नि. -ज्ञा १२.५०. २ विद्युल्लताग्नि; विजेचा अग्नि. 'वज्राग्नी- चिया जाळीं । करूनि सप्तधातूंची होळी ।' -ज्ञा ११.३७७. [वज्र + अग्नि] वज्राघात-पु. १ वीज पडणें. 'शिरिं वज्राघातचि गमला ।' -संग्रामगीतें १२. २ (ल.) भयंकर संकट, आपत्ति. [वज्र + आघात] वज्राधिकार-पु. अनेक पिढ्या एका कुटुं- बांत असलेला अधिकार. [वज्र + अधिकार] वज्रानल-पु. वीज; विजेचा लोळ. [वज्र + अनल] वज्रांबट-वि. अतिशय आंबट. [वज्र + आंबट] वज्राभ्यास-पु. गुणाकाराचा एका प्रकार; वज्र- वध. [वज्र + अभ्यास] वज्रावळ, वज्राळें-स्त्री. न. एका वेलीच्या बियांची, मण्यांची केलेली माळ. मुलाला दृष्ट लागूं नये म्हणून ही त्याच्या गळ्यांत बांधतात. [वज्र + आवळी] वज्रासन-न. १ (योग.) एक आसन. मुसलमान नमाज पढावयास बसतात त्याप्रमाणें बसून हात जोडणें. -संयोग ३२०. -एभा ६. १२७. २ मूळबंध; आधारबंध. -ज्ञा ८.४९. ३ स्थिर, दृढ- आसन (जसें घोड्यावर). ४ (ल.) दृढपणें धारण करणें (अधिकार, सत्ता). [वज्र + आसन] वज्रास्त्र-न. इंद्राचें आयुध; वज्र; विद्युतास्त्र. [वज्र + अस्त्र] वज्राहत-वि. वज्राचा प्रहार ज्यावर झाला आहे असा. [वज्र + आहत] वज्रिका-वि. (संगीत) दहाव्या श्रुतीचें नांव. वज्री-स्त्री. पाय घांसण्यास उपयोगी असा कठीण, खरखरीत दगड, वीट, धातूचा पदार्थ इ॰ -पु. इंद्र. वज्रेश्वरी, वज्राबाई-योगिनी-स्त्री. एक देवता. वज्रोप- चार-पु. कडक उपचार, उपाय. [वज्र + उपचार]

दाते शब्दकोश

घर

न. १ रहावयासाठीं बांधलेली जागा; वाडा. २ एका कुटुंबांतील (एके ठिकाणीं) राहणारी मंडळी; कुटुंब. ३ गृहस्था श्रमधर्म; संसार; प्रपंच. 'त्याला नोकरी लागतांच त्यानें स्वतंत्र घर थाटलें' ४ एखाद्या व्यवसायांत जुटीनें काम करणारीं माणसें, मंडळी, संस्था; अडतीची जागा. ५ (उंदीर, चिचुंदरीं इ॰ काचें) बीळ; घरटें. ६ एखादा पदार्थ शिरकवण्यासाठीं केलेला दरा, भोंक, खोबण, खांचण. 'भिंतीस घर करून मग खुंटी ठोक.' ७ (मालकाच्या इच्छेविरुद्ध मिळविलेलें, बळकावलेलें) वस्तीचें ठिकाण. 'कांट्यानें माझ्या टाचेंत घर केलें.' ८ एखादी वस्तु सुरक्षितपणें ठेवण्यासाठीं केलेलें धातूचें, लांकडाचें आवरण, वेष्टण, कोश. उ॰ चष्म्याचें घर. 'माझ्या चष्म्याचें घर चामड्याचें आहे.' ९ पेटींतील, टाइपाच्या केसींतील कप्पा, खण, खाना. १० सोंगट्याच्या, बुद्धिबळांच्या पटावरील, पंचांगा- तील (प्रत्येक) चौक; चौरस; मोहर्‍याचा मुळचा चौरस; मोहर्‍याचा मारा. 'राजा एक घर पुढें कर' 'घोडा अडीच घरें (एकाच वेळीं) चालतो.' ११ (ज्यो.) कुंडलीच्या कोष्टकां- तील सूर्य, चंद्र इ॰ ग्रहांचें स्थान. १२ घराणें; वंश; कुळ. 'त्याचें घर कुलीनांचें आहें.' 'त्याच्या घराला पदर आहे.' = त्याच्या वंशात परजातीची भेसळ झाली आहे.' १३ उत्पत्तिस्थान; प्रांत, प्रदेश, ठिकाण, ठाणे (वारा, पाउस, प्रेम, विकार, रोग इ॰ काचें); 'सर्वज्ञतेचि परि । चिन्मात्राचे तोंडावरी । परि ते आन घरीं । जाणिजेना ।' -अमृ ७.१३०. 'कोंकण नारळाचें घर आहे.' १४ रोग इ॰ कांच्या उत्त्पतीचे कारण, मूळ, उगम, जन्मस्थान, खाण. 'वांगें हें खरजेंचें घर आहे.' 'आळस हें दारिद्र्याचें घर आहे.' १५ वादांतील आधारभूत मुद्दा, प्रतिष्ठान. गमक, प्रमाण. १६ सतार इ॰ वाद्यांतील सुरांचें स्थान; सनईसारख्या वाद्याच्या दोन भोकांमधील अंतर; सता- रीच्या दोन पडद्यांमधील अंतर. १७ शास्त्र, कला इ॰ कांतील खुबी, मर्म, रहस्य, मख्खी, किल्ली. 'तुम्ही गातां खरे पण तुमच्या हातीं गाण्याचें घर लागलें नाहीं.' 'गुणाकार, भागाकार हें हिशेबाचें घर.' १८ सामर्थ्य; संपत्ति; ऐपत; आवांका; कुवत. 'जें कांहीं करणें तें आपलें घर पाहून करावें.' १९ मृदंग इ॰ चर्मवाद्यांच्या, वादी, दोरी इ॰ परिच्छेदातनें परिच्छिन्न प्रांत, जागा. २० (संगीत) तान, सूर यांची हद्द, मर्यादा, क्षेत्र. २१ (अडचणीच्या, पराभवाच्या वेळीं) निसटून जाण्या- साठीं करून ठेवलेली योजना; आडपडदा; पळवाट; कवच; 'हा घर ठेवून बोलतो.' २२ खुद्द; आपण स्वतः; स्वतःचा देह- म्ह॰ इच्छी परा तें येई घरा.' २३ (वर्तमानपत्राचा, पत्र- काचा, कोष्टकाचा रकाना, सदर. (इं.) कॉलम. 'येऊन जाऊन पत्रप्रकाशकास स्वतःचा असा मजकूर दर खेपेस पराकाष्ठा दोन तीन घरें घालणें येतें.' -नि १५. २४ वयोमानाचा विभाग; कालमर्यादा. 'हा नवा गृहस्थ पन्नाशीच्या घरांत आला होता.' -कोरकि ३२. २५ (मधमाशीचें पोळें वगैरेतील) छिद्र. 'केळीच्या सोपटाचीं घरें ज्यांनी पाहिली असतील' -मराठी सहावें पुस्तक पृ. २२५. (१८५७) २६ ठाणें; ठिकाण. 'कुबल, बांकी घरें । शिवराजाच्या हाता आलीं' -ऐपो ९. २७ बायको; स्वस्त्री. 'घरांत विचारा.' घर उघडणें पहा. [सं. गृह; प्रा. घर; तुल॰ गु. घर; सिं. घरु; ब. घर; आर्मेंजि. खर; फ्रेजि. खेर; पोर्तु. जि केर.] (वाप्र.) ॰आघाडणें-(कों.) घर जळून खाक होणें. ॰उघडणें-१ लग्न करून संसार थाटणें. 'नारोपंतांनी आतां घर उघडलें आहे, ते पूर्वीचें नारोपंत नव्हत!' २ एखा- द्याचें लग्न करून देऊन त्याचा संसार मोडून देणें. 'सदुभाऊंनीं आपली मुलगी त्या भटाच्या मुलास देऊन त्याचें घर उघडलें' ॰करणें-१ विर्‍हाड करणें; रहावयास जागा घेऊन तींत जेवण- खाण इ॰ व्यापार करावयास लागणें. 'चार महिनें मी खाणाव- ळींत जेवीत असे, आतां घर केलें आहें.' २ (त्रासदायक वस्तूंनीं) ठाणें देणें; रहाणें; वास्तव्य करणें. 'कांट्यानें माझ्या टांचेंत घर केलें.' 'माझ्या हृदयांत घर करून बसून त्यानें मला घायाळ केलें.' -बाय ३.३. ॰खालीं करणें-घर सोडून जाणें; घर मोकळें करून देणें. 'गावांत प्लेगचें मान वाढतें असल्यामुळें सर्वानी आपापलीं घरें खालीं केलीं.' ॰घालणें- (एखाद्याच्या) घराचा नाश करणें. ॰घेणें-१ (सामा.) लुबा- डणें; लुटणें; नागविणें; बुचाडणें. 'मग रेणुकेनें बोलिलें । अहो जेऊनि कैसें घर घेतलें ।' -कालिकापुराण २३.४०. 'ज्या ठिकाणीं वादविवादाचा किंवा भांडणाचा काहीं उपयोग नसतो त्या ठिकाणीं पडून घर घेणें यांतच मुत्सद्दीपणा असतो.' -चंग्र ८४. २ (एखाद्याचा) नाश करणें. 'म्हणती जन्मोनि द्रौपदीनें । आमचें घर घेतलें तिणें ।' -जै ७१.९९. ३ (त्रासदायक वस्तु) घर करून बसणें, ठाणें देऊन बसणें; घर करणें अर्थ २ पहा. ॰चालविणें-प्रपंचाची, संसाराची जबाबदारी वाहणें. म्ह॰ घर चालवी तो घराचा वैरी. ॰जोडणें-इतर घरण्यांशीं, जातीशीं, लोकांशीं इ॰ मैत्री, शरीरासंबंध घडवून आणणें; मोठा संबंध, सलोखा उत्पन्न करणें. 'लक्ष्मीपतीचें घर थोर जोडे ।' -सारुह २.१. याच्या उलट घर तुटणें. ॰डोईवर घेणें-आरडा ओरड करून घर दणाणून सोडणें; घरांत दांडगाई, कलकलाट, धिंगामस्ती करणें. 'वडील माणसें घरीं नाहींत हें पाहुन मुलांनी घर डोईवर घेतलें.' ॰तुटणें-मैत्रीचा, नात्याचा संबंध नाहींसा होणें; स्नेहांत बिघाड होणें. (दुसर्‍याचें) ॰दाखविणें- १ आपल्या घरीं कोणी त्रासदायक मनुष्य आला असतां कांहीं युक्तीनें त्याला दुसर्‍याच्या घरीं लावून देऊन आपला त्रास चुकविणें; (एखाद्याची) ब्याद, पीडा टाळणें. २ घालवून देणें; घराबाहेर काढणें. ॰धरणें-१ घरांत बसून राहणें; घराच्या बाहेर न पडणें (संकटाच्या, दंगलीच्या वेळीं पळून जाणें, पळ काढणें, गुंगारा देणें, निसटणें याच्या उलट). २ (रोग इ॰ नीं शरीरावर) अंमल बसविणें; एखादा आजार पक्केपणानें जडणें. 'दम्यानें त्याच्या शरीरांत घर धरलें.' ३ चिटकून राहाणें; चंचलपणा न करतां एकाच ठिकाणीं भिस्त ठेवून असणें. ४ (बुद्धिबलांत, सोंग- ट्यांत) सोंगटी एकाच घरांत ठेवून घर अडविणें. ॰धुणें,धुवून नेणें-१ एखाद्याचें असेल नसेल तें लबाडीनें गिळंकृत करणें; हिरावून नेणें; नागविणें; बुचाडणें. 'तुम्ही कारकुनावर फार भरंवसा टाकून राहूं नका, तो संधि सांपडल्यास तुमचें घर धुवावयास कमी करणार नाहीं.' २ नागविणें; लुबाडणें; लुटणें; अगदीं नंगा करणें. 'शंभर वर्षांनीं घर धुवून नेल्यानंतर ही ओळख आम्हांस पटूं लागली आहे.' -टिव्या. घर ना दार देवळीं बिर्‍हाड-फटिंग, सडा, ज्याला घरदार नाहीं अशा भणंगास उद्दे- शून अथवा ज्याला बायकामुलांचा संसाराचा पाश नाहीं अशाला उद्देशून या शब्दसंहतीचा उपयोग करतात. ॰निघणें-(स्त्रीन) नव- र्‍याला सोडून दुसर्‍या मनुष्याबरोबर नांदणें; (सामा.) दुसर्‍याच्या घरांत, कुटंबांत निघून जाणें. 'माझें घर निघाली.' -वाडमा २. २०९. ॰नेसविणें-घरावर गवत घालून तें शाकारणें; घर गवत इ॰ कानीं आच्छादणें; (कों.) घर शिवणें. ॰पहाणें-१ (एखाद्याच्या) घराकडे वक्रदृष्टी करणें; (रोगाचा, मृतत्युचा) घरावर पगडा बसणें; घरात शिरकाव करणें). 'कालानें एखाद्याचें घर पाहिलें कीं तें बुडालेंच म्हणून समजावें.' 'म्हातारी मेल्याचें दुःख नाहीं पण काळ घर पाहतो.' २ (बायकी) वधूवरांचें योग्य स्थळ निवडणें. 'सुशील तारेनें आपल्या पुण्यबलाच्या साह्यानें योग्य घर पाहून... ... ...' -रजपूतकुमारी तारा- (आनंदी रमण.) ॰पालथे घालणें-(घर, गांवइ॰) १ हरव- लेली वस्तु शोधण्यासाठीं घराचा कानाकोपरा धुंडाळणें. 'त्या बाईनें आपला सोन्याचा फुटका मणि शोधण्यासाठीं सारें घर पालथें घातलें.' २ सर्व घरांत; गावांत हिंडणें; भटकणें. 'त्या मुलाला रांगतां येऊं लागल्यापासून तें सारें घर पालथें घालूं लागलें आहें.' ॰पुजणें-१ आपलें काम करून घेण्यासाठी एखा- द्याच्या घरीं आर्जवें, खुशामत करण्यास वारंवार जाणें. २ (घरें पुजणें) आपला उद्योग न करतां दुसर्‍यांच्या घरीं भटक्या मारणें. ॰फोडणें- १ संसार आटोपणें, आंवरणें. २ कुटुंबातील माणसात फूट पाडणें; घरात वितुष्ट आणणें. 'बायका घरें फोड- तात.' ३ घरास भोंक पाडून आंत (चोरी करण्यासाठीं) शिर- काव करून घेणें; घर फोडतो तो घरफोड्या. ॰बसणें-कर्ता मनुष्य नाहींसा झाल्यामुळें, दुर्दैवाच्या घाल्यामुळें कुटुंब विपन्ना- वस्थेस पोहोंचणें; घराची वाताहत, दुर्दशा होणें. ॰बसविणें- संसार थाटणें; घर मुलाबाळानीं भरून टाकणें (स्त्रीच्या विवाहोत्तर जीवनाच्या बाबतींत या वाक्प्रचाराचा उपयोग करतात). 'माझी बायको मेली म्हणून मीं मुलाचें लग्न करून दिलें, म्हटलें कीं सून तरी घर बसविल.' ॰बुडणें-१ कुटुंबाची नासाडी, दुर्दशा होणें; कुटुंब धुळीस मिळणें. २ संतति नसल्यामुळें वंशाचा लोप होणें. ॰बुडविणें-१ (एखाद्याच्या) कुटुंबाचा विध्वंस करणें; संसाराचा सत्यनास करणें. २ घरास काळिमा आणणें. ॰भंगणें-कुटुंब मोडणें, विस्कळित होणें; कुटुंबास उतरती कळा लागणें; कुटुंबाचा नाश होणें; मंडळीत फूट पडणें. 'बापलेकांत तंटे लागस्यामुळें तें घर भंगले.' ॰भरणें-१ दुसर्‍यास बुडवून, त्यांची उपेक्षा करून आपण श्रीमंत बनणें. २ दुसर्‍याचें घर लुटणें, धुणें. व स्वतः गबर होणें. घर भलें कीं आपण भला-लोकांच्या उठा- ठेवींत, उचापतींत न पडतां आपल्या उद्योगांत गर्क असणारा (मनुष्य). ॰मांडणें-थाटणें-(संसारोपयोगी जिन्नसांनीं) घर नीटनेटकें करणें; घराची सजावट करणें. ॰मारणें-घर लुटणें. घर म्हणून ठेवणें-एखादी वस्तु, सामान प्रसंगविशेषीं उपयोगी पडण्याकरितां संग्रही ठेवणें; प्रत्येक वस्तु जतन करून ठेवणें. ॰रिघणें-घर निघणें पहा. 'घर रिघे जाई उठोनि बाहेरी ।' ॰लागणें-घर भयाण भासणें (एखाद्याचा मुलगा अथवा पत्नी वारली असतां घरांतील भयाण स्थिति वर्णिताना ह्या वाक्प्रचा- राचा उपयोग करतात). घराचा उंबरठा चढणें-घरांत प्रवेश करणें. 'जर तूं माझ्या घरची एखादीहि गोष्ट बाहेर कोणाला सांग- शील तर माझ्या घराचा उंबरठा चढण्याची मी तुला मनाई करीन.' घराचा पायगुण-घरांतील माणसांची वागणूक, वर्तणूक, वर्तन, शिस्त; घराचें पुण्य पाप. घराचा पायगुणच तसा, घरची खुंटी तशी-कुटुंबांतील माणसाची वागण्याची रीत असेल त्याप्रमाणें; एखाद्या कुटुंबांतील माणसांच्या सर्वसाधारण अशा वाईट व्यसनास खोडीस, संवयीस उद्देशून म्हणतात. घराचा वासा ओढणें- ज्याच्यामुळें एखादें काम, धंदा चालावयाचें व जें नसल्यास बंद पडावयाचें असें साधन, वस्तु, गोष्ट ओढणें; एखाद्या मोठया कामांतून फार जरूरीचें साधन नाहींसें करणें; अडबणूक करणें. 'आमच्या मंडळींतून पाटीलबुवानीं रामभाऊस फितविलें, आतां आम्हीं काय करूं शकूं! त्यानीं आमच्या घराचा वासाच ओढला. खाल्ल्या घराचे वासे मोजणें-कृतघ्न होणें; केलेला उपकार विसरणें. घरांत, घरीं- (ल.) पतीनें पत्नीबद्दल शिष्ट- संप्रदायानें वापरण्याचा शब्द. याच्या उलट पत्नी नवर्‍या संबंधीं बोलतांना 'बाहेर' या शब्दाचा उपयोग करते. 'तुम्हांला पदार्थ दिला तर घरांत मनास येणार नाहीं.' 'हा जिन्नस घरांत दाखवून आणतों.' -विवि १०.५-७.१२७. घरांतले-विअव. (बायकी) नवरा; पति; तिकडचे; तिकडची स्वारी. 'आमच्या घरांतल्यांनीं दादासाहेबांना दारूचें व्यसन लावलें.' -एकच प्याला. घरांतील मंडळी-स्त्री. (सांकेतिक) बायको; पत्नी. 'पाहूं घरांतील मंडळीस कसाकाय पसंत पडतो तो.' -विवि ७. १०. १२७. घरांत पैशाचा-सोन्याचा धूर निघणें-निघत असणें-घरची अतिशय श्रीमंती असणें; घरांत समजणें- कुटुंबांतील तंटा चव्हाट्यावर न आणणें; घरांतल्याघरांत तंटा मिटविणें; आपापसांत समजूत घडवून आणणें. घराला राम- राम ठोकणें-घर सोडून जाणें. 'आज या घराला रामराम ठोकण्यापेक्षां घटकाभर जुलमाचा रामराम पतकरला.' -भा ९०. घरावर काट्या घालणें-गोवरी ठेवणें-निखारा ठेवणें- एखाद्याच्या कुटुंबाची धूळधाण, बदनामी करणें; घरावर कुत्रें चढविणें- (गोव्याकडे घरावर कुत्रें चढल्यास घर सोडावें लागतें यावरून) १ एखाद्याच्या घरांत कलागती. भांडणें लावून देणें, तंटे उत्पन्न करणें. २ दुष्टावा करणें; अडचणींत आणणें. घरावर गवत रुजणें- घर ओसाड, उजाड पडणें. घरास आग लावणें-(ल.) एखादें दुष्कृत्य करून घराचा नाश करणें. घरास कांटी लागणें-घर उध्वस्त होणें; घरांत कोणी न राहणें. घरांस कांटी लावणें-१ घराच्या भोवतीं कांटे, काटक्या लावून येणें-जाणें बंद करणें. २ (ल.) घर उजाड, उध्वस्त, ओसाड करणें. घरास हाड बांधणें, घरावर टाहळा टाकणें- (एखाद्यास) वाळींत टाकणें; समाजांतून बहिष्कृत करणें; जाती- बाहेर टाकणें. (शेत, जमीन, मळा, बाग) घरीं करणें- स्वतः वहिवाटणें. घरीं बसणें-(एखादा मनुष्य) उद्योगधंदा नसल्यामुळें, सोडून दिल्यामुळें घरीं रिकामा असणें; बेकार होणें. 'तो एक वर्ष झालें घरीं बसला आहे.' (एखाद्याच्या) घरीं पाणी भरणें-(एखादा मनुष्य, गोष्ट) एखाद्याच्या सेवेंत तत्पर असणें; त्यास पूर्णपणें वश असणें. 'उद्योगाचे घरीं । ऋद्धिसिद्धि पाणीभरी.' घरीं येणें-(एखादी स्त्री) विधवा झाल्यामुळें सासरच्या आश्रयाच्या अभावीं पितृगृहीं, माहेरीं परत येणें; विधवा होणें. 'कुटुंब मोठें, दोन बहिणी घरीं आलेल्या.' -मनोरंजन आगरकर अंक. घरीं तसा दारीं देवळीं तसा बिर्‍हाडीं, घरीं दारीं सारखाच-सर्व ठिकाणीं सारखाच वागणारा; (सामा.) सर्वत्र उपद्रवकारक असलेला (मनुष्य, मूल); जसा स्वतःच्या घरीं उपद्रवकारक तसाच दुसर्‍याच्या घरीं उपद्रवकारक असलेला (मनुष्य, मुलगा). आल्या घरचा-वि. पुनर्विवाहित स्त्रीस पहिल्या नवर्‍यापासून झालेला (मुलगा). म्ह॰ १ घर फिरलें म्हणजे घराचे वांसेहि फिरतात = (एखाद्या) घरांतल्या मुख्याची खपा मर्जी, नाराजी झाली तर घरांतलीं लहानमोठीं नोकरचाकर सर्वच माणसें त्याच्या विरुद्ध उठतात. सामाशब्द- ॰असामी-स्त्री १ वतनवाडी; जमीनजुमला; मालमत्ता. २ घरकामासंबंधाचा मनुष्य; घराकडचा माणूस. ॰कज्जा-पु. घरां- तील तंटा; कौटुंबिक भांडण; गृहकलह. ॰करी-पु. पत्नीनें नवर्‍यास उद्देशून वापारावयाचा शब्द; घरधनी; कारभारी; यज- मान; घरमालक. 'माझे घरकरी गांवाला गेले.' ॰करीण- स्त्री. पतीनें पत्नीविषयीं वापरावयाचा शब्द; कारभारीण. 'माझ्या घरकरणीला तिच्यामुळें आराम वाटतो.' -कोरकि ३१५. २ घरधनीण; घरची मालकीण; यजमानीण. ॰कलह-पु. घरांतील भांडण; घरांतील माणसांचें दायग्रहणादिविषयक भांडण; आपसां- तील भांडण; अंतःकलह. ॰कसबी-पु आपल्या अक्कलहुषारीनें घरगुती जरूरीचे जिन्नस घरच्याघरीं तयार करणारा व घरची मोडतोड दुरुस्त करणारा मनुष्य; घरचा कारागीर; बाहेर काम करून उपजीविका न करणारा माणूस. ॰कहाणी-काहणी-स्त्री. (वाईट अर्थीं उपयोग) घरांतल्या खाजगी गोष्टीचें कथन. ॰कान्न-स्त्री. (गो.) घरधनीण; बायको; घरकरीण. [सं. गृह + कान्ता]. ॰काम-न. घरगुती काम. घरासंबंधीं कोणतेंहि काम; प्रपंचाचें काम. 'बायकांचा धंदा घरकामाचा लावतात.' ॰काम्या-वि. घरांतील कुटुंबांतील किरकोळ कामें करण्यास ठेवलेला नोकर, गडी; घरांतील काम करणारा. [घरकाम] ॰कार-री-पु. (गो. कु.) १ नवरा, पति. २ घरचा यजमान; घरधनी; मालक. [सं. गृह + कार] घरकरी पहा. ॰कारणी-पु. घरचें सर्व काम पाहणारा; कारभारी, दिवाणजी; खाजगी कारभारी. ॰कुंडा-पु. (कों.) १ पक्ष्याचें घरटें; कोठें. २ (ल.) आश्रय- स्थान; 'आम्हीं तुझ्या विश्रांतीचा घरकुंडा सोडतांच हे आमचे अद्वैतज्ञानाचे पांख आम्हांस तोलत नाहींसे होऊन आम्ही खालीं पडों लागलों.' -दादोबा, यशोदा पांडुरगी. [सं. गृह + कुंड] ॰कुबडा-कुबा-कोंबा-घरकोंग्या-कोंडा-कुंडा-कोंघा-कोंबडा-घुबड-पु. (घरांतला घुबड, कोंबडा इ. प्राणी) (दुबळ्या व सुस्त माणसाला-प्राण्याला तिरस्कानें लावावयाचा शब्द). नेहमीं घरांत राहाणारा; एकलकोंड्या; माणुसघाण्या; चारचौघांत उठणें, बसणें, गप्पा मारणें इ॰ ज्यास आवडत नाहीं असा, कधीं बाहेर न पडणारा मनुष्य; घरबशा. ॰कुल्ली- वि. (गो.) बहुश; घराबाहेर न पडणारी (स्त्री.); घर- कोंबडी. ॰केळ-स्त्री. (प्रां.) गांवठी केळ. घरीं लावलेलीं केळ. ॰खटला-लें-पुन १ घरचा कामधंदा; गृहकृत्य; प्रपंच, शेतभात इ॰ घरासंबंधीं काम. २ घराची, कुटुंबाची काळजी, जबाबदारी- अडचणी इ॰ ३ गृहकलह; घरांतील भांडण. ॰खप्या-वि. घरांतील धुणें, पाणी भरणें, इ॰ सामान्य कामाकरितां ठेवलेला गडी; घरच्या कामाचा माणूस; घरकाम्या पहा. [घर + खपणें = काम करणें, कष्ट करणें] ॰खबर-स्त्री. घरांतील व्यवहारांची उठाठेव-चौकशी; घराकडची खबर, बातमी. 'उगाच पडे खाटे वर तुज कशास व्हाव्या घरखबरा ।' -राला २२. [घर + खबर = बातमी] ॰खर्च-पु कुटुंबपोषणाला लागणारा खर्च; प्रपंचाचा खर्च. ॰खातें-न. घरखर्चाचें मांडलेलें खातें; खानगी खातें. ॰खास(ज)गी-वि. घरांतील मालमत्ता, कामें कारखाना इ॰ संबंधीं; घरगुती बाबीसंबंधीं; घरगुती, खासगी व्यवहारबाबत. ॰गणती-स्त्री. १ गांवांतील घरांची संख्या. २ गांवांतील घरांची मोजणी, मोजदाद. ३ गांवांतील घरांच्या मोजणीचा हिशेब, तपशील. (क्रि॰ करणें; काढणें) [घर + गणती = मोजणी] ॰गाडा- पु. संसाराचीं कामें; जबाबदारी; प्रपंचाची राहाटी; प्रपंच; संसार; घरखटला. (क्रि॰ हांकणें; चालवणें; सांभाळणें). ॰गुलाम-पु. घरांतील नोकर; गडी. 'चौदाशें घरगुलाम मुकले या निजपा- यांला ।' -ऐपो ३१३. ॰गोहो-पु. चुलीपाशीं, बायकांत, आश्रि- तांत शौर्य दाखविणारा मनुष्य; गेहेशूर; घरांतील माणसांवर जरब ठेवणारा पण बाहेर भागुबाईपणा करणारा पुरुष. [घर + गोहो = नवरा, पुरुष] ॰घरटी-स्त्री. दारोदार; एकसारखी फेरी घालणें (क्रि॰ करणें). 'चंद्र कथुनि मग महेंद्रगृहीं घरघरटी करित वायां ।' -आमहाबळ १९.१ ॰घाला-ल्या, घरघालू-वि. १ खोड साळ; फसवाफसवी करणारा; बिलंदर. 'भिजल्या पोरी कशी होरी ग हे घरघाली ।' -राला ४०. २ कुळाची अब्रू घालवणारा; घर- बुडव्या; दुसर्‍याचें घर बुडविणारा किंवा व्यसनादिकांनी आपलें घर बुडवून घेणारा. 'कशी घरघाली रांड बसली आम्हां गिळून ।' -राला ४६. ३ सर्व नाश करणारा. 'भयानका क्षिति झाली घर- घाली रुद्रविंशति जगिं फांकली ।' -ऐपो ३६८. [घर + घालणें; तुल॰ गु. घरघालु = द्रोही, खर्चीक] ॰घुशा-सा-वि. सर्व दिव- सभर उदासवाणा घरांत बसणारा; घरबशा, घरकोंबडा; घरकु- बडा पहा. [घर + घुसणें] ॰घुशी-सी-स्त्री. नवर्‍याचें घर सोडून दुसर्‍याच्या घरांत नांदणारी; दुसर्‍याचा हात धरून गेलेली विवा- हित स्त्री. 'कोण धांगड रांड घरघुशी ।' -राला ७८. [घर + घुसणें] ॰घेऊ-घेणा-वि. घराचा, कुटुंबाचा नाश, धुळधाण करणारा; घरघाला; घरबुडव्या; दुसर्‍यास मोह पाडून, फसवून त्याचें घर बळकावणारा. 'जळो आग लागो रे ! तुझि मुरली हे घरघेणी ।' -देप ८०. 'लांबलचकवेणी, विणुन त्रिवेणी, घर- घेणी अवतरली ।' -प्रला १११. [घर + घेणें] ॰चार, घरा- चार-पु. १ कुटुंबाची रीतभात; घराची चालचालणूक; कौटुं- बिक रूढी, वहिवाट. म्ह॰ घरासारखा घरचार कुळासारखा आचार. २ गृहस्थधर्म; संसार; प्रपंच. -जै १०६. 'दुःखाचा घरचार निर्धन जिणें भोगावरी घालणें ।' -किंसुदाम ५०. [सं. गृहाचार; म. घर + आचार = वर्तन] ॰चारिणी, ॰चारीण- स्त्री. (काव्य.) गृहपत्नी; घरधनीण; यजमानीण; घरमालकीण. 'शेवटीं नवनीत पाहतां नयनीं । घरचारिणी संतोषे ।' [सं. गृहचा- रिणी] ॰जमा-स्त्री. घरावरील कर; घरपट्टी. घरजांव(वा)ई- पु. बायकोसह सासर्‍याच्या घरीं राहणारा जांवई; सासर्‍यानें आपल्या घरींच ठेवून घेतलेला जांवई; सासर्‍याच्या घरीं राहून तेथील कारभार पाहणारा जांवई. 'तो संसाराचा आपण । घर जांवई झाला जाण । देहाभिमानासि संपूर्ण । एकात्मपणमांडिले ।।' -एभा २२.५९२. [घर + जांवई] ॰जांवई करणें-सक्रि. १ (एखाद्यास) सर्वसंपत्तीसह कन्यादान करणें; जांवयाला घरीं ठेवून घेणें, त्याला आपली जिंदगी देणें. 'त्याला त्यांनीं घरजां वईच केला आहे.' -इंप २७. २ (उप.) एखादी उसनी घेत- लेली वस्तु लाटण्याच्या हेतूनें, मालकानें परत मिळण्याविषयीं तगादा लावीपर्यंत, ठेवून घेणें. ॰जांवई होऊन बसणें-अक्रि. आपल्यावर सोपविलेल्या कामाचा किंवा धंद्याचा नफा किफायत आपल्याच कामीं लावणें, आपणच घेऊन टाकणें. ॰जिंदगी, जिनगानी-स्त्री. १ घरांतील सामानसुमान, उपकरणीं, भांडी- कुंडीं, द्रव्याव्यतिरिक्त इतर मालमत्ता; घरांतील जंगम चीजवस्त; मिळकत. २ (सामा.) मिळकत; इस्टेट. 'पादशहाची घरजि- नगानी समग्र लुटून.' -ख ८.४२२४. [घर. फा. झिंदगी, झिंद- गानी = मालमत्ता,जन्म,संसार] ॰जुगूत-जोगावणी-स्त्री. १ काटकसर; मितव्यय; थोडक्यांत घराचा निर्वाह. २ घरांतील जरूरीची संपादणी; कसाबसा निर्वाह. 'एक म्हैस आहे. तिणें घर जुगूत मात्र होत्ये.' -शास्त्रीको [घर + जुगुत = युक्ति + जोगवणी = प्राप्तीची व खर्जाची तोंडमिळवणी] ॰टका-टक्का-पु. घरपट्टी घरजमा; घरावरील कर. ॰टण-णा-घरठाण अर्थ २ घरवंद पहा. ॰टीप-स्त्री. १ गांवांतील घरांची गणती. (क्रि॰ करणें; काढणें). २ घरमोजणीचा हिशेब, तपशील; घरगणती पहा. [घर + टीप = टिपणें, लिहिणें] (वाप्र.) ॰टीप काढणें-करणें- घेणें-(ल.) (शोधीत, लुटीत, मोजीत, आमंत्रण देत) गांवां- तील एकहि घर न वगळता सर्व घरांची हजेरी घेणें; कोणतीहि क्रिया, रोग, प्रादुर्भाव गांवांतील एकहि घर न वगळतां होणें. 'यंदा जरीमरीनें ह्या गांवाची घरटीप घेतली.' ॰टोळ- स्त्री. (कों.) प्रत्येक घराचा झाडा, झडती. 'त्या गांवची घरटोळ घेतली तेव्हां चोर सांपडला.' घरडोळ पहा. ॰ठा(ठ)ण- न. १ घर ज्या जागेवर बांधलेलें आहे ती इमारत बांधून राहण्याच्या कामासाठीं उपयोगांत आणलेला जमीनीचा विभाग. -लँडरेव्हिन्यू कोड. २ मोडलेल्या घराचा चौथरा; पडक्या घराची जागा. घरवंद पहा. [सं. गृहस्थान; म. घर + ठाणा-ण] ॰ठाव-पु. १ नवरा; पति; संसार. 'मुदतींत आपल्याकडे नांदण्यास न नेल्यास मी दुसरा घरठाव करीन.' २ अनीति- कारक आश्रय; रखेलीचा दर्जा; रखेलीस दिलेला आश्रय. 'निरांजनीला मुंबईंत एका गुजराथी धनवानानें चांगला घरठाव दिला होता.' -बहकलेली तरुणी (हडप) ८. ॰डहुळी-डोळी, -डोळा-स्त्री. १ घराचा झाडा, झडती, झडती; बारीक तपासणी. 'मग थावली ते वाहटुळी । सैंघ घेऊनि घरडहुळी । -ज्ञा ६.२१६. 'तया आधवियांचि आंतु । घरडोळी घेऊनि असें पाहतु ।' -ज्ञा ११.५८६. २ प्रत्येक घराची केलेली झडती. (क्रि॰ घेणें). [घर + डहुळणें = ढवळणें] ॰डुकर-न. १ गांवडुकर; पाळीव डुकर. २ निंदाव्यजक (कुटुंबांतील) आळशी, निरुद्योगी स्त्री. [घर + डुकर] ॰तंटा-पु. गृहकलह; घरांतील भांडण. [घर + तंटा] ॰दार-न. (व्यापक) कुटुंब; घरांतील माणसें, चीचवस्त इ॰ प्रपंचाचा पसारा, खटलें; [घर + दार] (वाप्र.) घरदार खाऊन वांसे तोंडीं लावणें-सारी धनदौलत नासून, फस्त करून कफल्लक बनणें; ॰दार विकणें-घर व त्यांतील मालमत्ता विकणें; सर्व स्थावर जिंदगी घालविणें. म्ह॰ एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणें = एका पाहुण्यासाठीं कांहीं मिष्टान्न केलें तर तें घरांतील सर्व मंडळींस वाढावें लागतें. ॰देणें-न. घरपट्टी; घरटका. ॰धणी- नी-पु. १ यजमान; गृहपति; घरांतील कर्ता माणूस. 'निर्वीरा धरणी म्हणे घरधणी गोंवूनी राजे पणीं ।' -आसी ५२. २ पति; नवरा; घरकरी. 'मग घरधन्यास्नी पकडूनश्येनी न्ये.' = बाय २.२. ॰धंदा-पु. घरांतील कामधाम; गृहकृत्य. [घर + धंदा] ॰धनीण-स्त्री. १ घरमालकीण; यजमानीण. २ पत्नी; बायको; घरकरीण. 'माझी घरधनीण फार चांगली आहे.' -विवि ८.२. ४०. ॰नाशा-वि. घराचा, कुटुंबाचा नाश, धुळधाण कर णारा; घरघाल्या. [घर + नासणें] ॰निघ(घो)णी-स्त्री. १ घरनिघी पहा. २ (क्क.) घरभरणी अथवा गृहप्रवेश शब्दाबद्दल वापर- तात. केव्हां केव्हां या दोन्हीहि शब्दांबद्दल योजतात. [घर + निघणें] ॰निघी-स्त्री. वाईट चालीची. दुर्वर्तनी, व्यभिचा रिणी स्त्री; घरांतून बाहेर पडलेली, स्वैर, व्यभिचारिणी स्त्री. 'कीं घरनिघेचें सवाष्णपण ।'-नव १८.१७२. [घर + निघणें = निघून जाणें, सोडणें] ॰निघ्या-पु. १ स्वतःचें कुटुंब, घर, जात सोडून दुसर्‍या घरांत, जातींत जाणारा; दुर्वर्तनी, व्यभिचारी मनुष्य. २ एखाद्या व्यभिचारिणी स्त्रीनें बाळगलेला, राखलेला पुरुष; जार. [घर + निघणें] ॰पटी-ट्टी-स्त्री. १ घरटका; घरदेणें; घरावरील कर; हल्लींसारखी घरपट्टी पूर्वीं असे. मात्र ती सरकारांत वसूल होई. पुणें येथें शके १७१८-१९ मध्यें घरांतील दर खणास सालीना ५ रु. घरपट्टी घेत. मात्र घरांत भाडेकरी किंवा दुकानदार ठेवृल्यास घेत. स्वतःचें दुकान असल्यास, किंवा भाडे- करी नसल्यास घेत नसत. -दुसरा बाजीराव रोजनिशी २७९- ८०. 'पंचाकडे घरपट्टी बसविण्याचा अधिकार आला.' -के १६.४. ३०. २ एखाद्या कार्याकरितां प्रत्येक घरावर बसविलेली वर्गणी. [घर + पट्टी = कर] ॰पांग-पु. निराश्रितता; आश्रयराहित्य. 'तंव दरिद्रि- यासी ठाव तत्त्वतां । कोणीच न देती सर्वथा । जेथें घरपांग पाहतां । बाहेर घालिती पिटोनि ।।' -ह २९.३५. [घर + पांग = उणीव] ॰पांड्या-पु. घरांतल्याघरांत, बायकांत बडबडणारा, पांडित्य दाखवणारा. [घर + पांड्या = गांवकामगार] ॰पाळी-स्त्री. (सरका- रला कांहीं जिन्नस पुरविण्याची, सरकाराचा विवक्षित हुकूम बजावण्याची, भिकार्‍यांना अन्न देण्याची इ॰) प्रत्येक घरावर येणारी पाळी, क्रम. [घर + पाळी] ॰पिसा-वि. ज्याला घराचें वेड लागलें आहे असा; घरकोंबडा; घरकुंडा; [घर + पिसा = वेडा] ॰पिसें-न. घराचें वेड; घरकुबडेपणा; घर सोडून कधीं फार बाहेर न जाणें. [घर + पिसें = वेड] ॰पोंच, पोंचता-वि. घरीं नेऊन पोंचविलेला, स्वाधीन केलेला (माल). [घर + पोहोंच विणें] ॰प्रवेश-पु. नवीन बांधलेल्या घराची वास्तुशांति करून त्यांत रहावयास जाण्याचा विधि. (प्र.) गृहप्रवेश पहा. [म. घर + सं. प्रवेश = शिरणें] घरास राखण-स्त्री. १ घराचें रक्षण करणारा मनुष्य. २ थोडासा संचय, शिल्लक, साठा, संग्रह. 'सगळा गूळ खर्चूं नको घरास राखण थोडकासा ठेव.' घर म्हणून पहा. ॰फूट-स्त्री. आपसांतील दुही, तंटेबखेडे; गृहकलह; घर, राज्य इ॰ कांतील एकमतानें वागणार्‍या माणसांमध्यें परस्पर वैर. द्वेषभाव. [घर + फूट = दुही, वैर] ॰फोड-स्त्री. घरांतील माणसांत कलि माजवून देणें, कलागती उत्पन्न करणें. [घर + फोडणें = फूट पाडणें] ॰फोडा-स्त्री. १ (कायदा) एखाद्याच्या घरांत त्याच्या संमतीवाचून कुलूप-कडी काढून, मोडून किंवा मार्ग नाहीं अशा ठिकाणीं मार्ग करून (चोरी करण्याकरितां) प्रवेश करणें; (पीनलकोडांतील एक गुन्हा). २ घराची भिंत वगैरे फोडून झालेली चोरी. (इं.) हाउस् ब्रेकिंग. [घर + फोडणें] ॰फोड्या-वि. १ घरांत, राज्यांत फूट पाडणारा, दुही माजविणारा; घरफूट कर. णारा. २ घरें फोडून चोरी करणारा. [घर + फोडणें] ॰बंद-पु. १, (कों.) घरांची वस्ती, संख्या. 'त्या शहरांत लाख घरबंद आहे. [घर + बंद = रांग] २ घराचा बंदोबस्त; घरावरील जप्ती; घर जप्त करणें; घराची रहदारी बंद करविणें; चौकी-पहारा बसविणें. 'एकोनि यापरी तुफान गोष्टी । क्रोध संचरला राजयापोटीं । पाहारा धाडूनि घरबंदसाठीं । ठेविला यासी कारागृहीं ।' -दावि ४५६. [घर + बंद = बंद करणें] ॰बशा-वि. उप. घरकोंबडा; घरांत बसून राहणारा. [घर + बसणें] ॰बसल्या-क्रिवि. घरीं बसून; नोकरी, प्रवास वगैरे न करतां; घरच्याघरीं; घर न सोडतां. (ल.) आयतें; श्रमविना. (क्रि॰ मिळणें; मिळवणें). 'तुम्ही आपले पैसे व्याजीं लावा म्हणजे तुम्हांला घरबसल्या सालीना पांचशें रुपये मिळतील.' ॰बाडी-स्त्री. बेवारसी घरांचें भाडें (ब्रिटीशपूर्व अमदानींत, कांहीं शहरांतून सरकार हें वसूल करीत असे). घरवाडी पहा. ॰बार-न. घरदार; घरांतील मंडळी व माळमत्ता; संसार; प्रपंचाचा पसारा. 'तेवि घरबार टाकून गांवीचे जन ।' -दावि ४१२. 'घरबार बंधु सुत दार सखे तुजसाठिं सकळ त्यजिले ।' -देप २७. [सं. गृह + भृ; म. घर + भार; हिं घरबार; गु. घरबार] ॰बारी-पु. १ कुटुंबवत्सल; बायकोपोरांचा धनी; गृहस्थाश्रमी; संसारी. 'भार्या मित्र घरबारिया ।' -मुवन १८.७१. २ घरधनी; घरकरी; नवरा; पति. 'कां रुसला गे माझा तो घरबारी ।' -होला १४८. [सं. गृह + भृ; म. घरबार; हिं. घरबारी; गु. घरबारी] म्ह॰ ना घरबारी ना गोसावी = धड संसारीहि नाहीं कीं बैरागी नाहीं अशा मनुष्याबद्दल योजतात. ॰बारीपणा-पु. गृहस्थ- पणा; कर्तेपणा. 'पुरुषास घरबारीपणा प्राप्त होतो.' -विवि ८.२. ३५. [घरबारी] ॰बुडवेपणा-पु. १ घराचा नाश करण्याचें कर्म. २ देशद्रोह; स्वदेशाशीं, स्वदेशीयाशीं, स्वराज्याशीं बेइमान होणें. 'हा प्रयत्न त्यांच्या इतर प्रयत्नाप्रमाणेंच घर- बुडवेपणाचा आहे हें आम्ही सांगावयास नकोच.' -टि १.५४८. [घर बुडविणें] ॰बुडव्या-वि. अत्यंत त्रासदायक; दुसर्‍याच्या नाशाची नेहमीं खटपट करणारा; घरघाल्या; स्वतःच्या, दुसर्‍याच्या घरादारांचा नाश करणारा; देशद्रोही. [घर + बुडविणें] ॰बुडी, ॰बुड-स्त्री. १ (एखाद्याच्या) संपत्तीचा, दौलतीचा नाश; सर्वस्वाचा नाश. २ एखादें घर, कुटुंब अजिबात नष्ट होणें; एखाद्या कुळांचें, वंशाचें निसंतान होणें. [घर + बुडणें] ॰बेग(ज) मी-स्त्री. कुटुंबाच्या खर्चाकरितां धान्यादिकांचा केलेला सांठा, पुरवठा, संग्रह; प्रपंचासाठीं केलेली तरतूद. [घर + फा. बेगमी = सांठा] ॰बेत्या-पु. (राजा.) घराची आंखणी करणारा. (इं.) इंजिनिअर. [घर + बेतणें] ॰बैठा-वि. घरीं बसून करतां येण्या- सारखें (काम, चाकरी, धंदा); बाहेर न जातां, नोकरी वगैरे न करतां, स्वतःच्या घरीं, देशांत करतां येण्याजोगा. २ घरांत बसणारा (नोकरी, चाकरीशिवाय); बेकार. -क्रिवि. (सविभक्तिक) घरीं बसून राहिलें असतां; घरबसल्या पहा. [घर + बैठणें] ॰भंग- पु. १ घराचा नाश, विध्वंस. 'जिवलगांचा सोडिला संग । अव- चिता जाला घरभंग ।' -दा ३.२. ६०. २ (ल.) कुळाचा, कुटुंबाचा नाश; कुलनाश. [घर + भंग] ॰भर-वि. (कर्तुत्वानें, वजनानें) घर, कुटुंब भरून टाकणारा-री; घरांत विशेष वजन असणारा-री; घरांतील जबाबदार. -क्रिवि. घरांत सर्व ठिकाणीं, सर्वजागीं. 'त्यानें तुला घरभर शोधलें.' [घर + भरणें] ॰भरणी- स्त्री. १ गृहप्रवेश; नवीन बांधलेल्या घरांत राहण्यास जाण्याच्या वेळीं करावयाचा धार्मिक विधि; वास्तुशांति; घररिघणी पहा. २ पतीच्या घरीं वधूचा प्रथम प्रवेश होताना करण्याचा विधि; नव- वधूचा गृहप्रवेश; गृहप्रवेशाचा समारंभ; वरात; घररिगवणी; घर- रिघवणी. 'वधूवरें मिरवून । घरभरणी करविली ।' -र ४८. ॰भरवण-णी-स्त्री. (गो. कु.) गृहप्रवेश; वरात; घरभरणी अर्थ २ पहा. [घर + भरवणें] ॰भाऊ-पु. कुटुंबांतील मनुष्य; नातलग; कुटुंबांच्या मालमत्तेचा, वतनवाडीचा वांटेकरी; हिस्सेदार; दायाद. ॰भाट-पु. १ (कु.) घराच्या आजूबाजूची आपल्या माल- कीची जागा, जमीन; घरवाडी; विसवाट. २ (गो.) घराशेजा- रचा, सभोंवारचा नारळीचा बाग. [घर + भाट] ॰भांडवल- न. १ कुटुंबांतील मालमत्ता, जिंदगी, इस्टेट. २ एखाद्याचा खाजगी द्रव्यनिधि, ठेव; उसना काढलेला, कर्जाऊ काढलेला पैसा, द्रव्यनिधि याच्या उलट. [घर + भांडवल] ॰भांडवली- वि. घरच्या, स्वतःच्या भांडवलावर व्यापार करणारा. [घर- भांडवल] ॰भाडें-न. दुसर्‍याच्या घरांत राहण्याबद्दल त्यास द्यावयाचा पैसा, भाडें. [घर + भाडें] ॰भारी-पु. (प्र.) घरबारी. १ घरबारी पहा. २ ब्रह्यचारी, संन्यासी याच्या उलट; गृहस्था- श्रमी. ॰भेद-पु. कुटुंबाच्या माणसांतील आपसांतील भांडण, तंटा; फाटाफूट; घरफूट. ॰भेदी-द्या-वि. १ स्वार्थानें, दुष्टपणानें परक्याला, शत्रूला घरांत घेणारा; फितूर; देशद्रोही. २ घरचा, राज्याचा, पक्का माहितगार; घरचीं सर्व बिंगें ज्यास अवगत आहेत असा. म्ह॰ घरभेदी लंकादहन = घरभेद्या मनुष्य लंका जाळण्यार्‍या मारुतीप्रमाणें असतो. ३ घरांतील, राज्यांतील कृत्यें, गुप्त बातम्या बाहेर फोडणारा; घर फोडणारा. 'घरभेद्या होऊनि जेव्हां ।' -संग्रामगीतें १४०. ४ घरांत, कुटुंबांत, राज्यांत, तेटें, कलह, लावणारा. ॰भोंदू-वि. १ लोकांचीं घरें (त्यांना फसवून) धुळीस मिळवणारा. २ (सामा.) ठक; बिलंदर; प्रसिद्ध असा लुच्चा; लफंगा (मनुष्य). [घर + भोंदू = फसविणारा] ॰महार- पु. राबता महार. ॰मारू-र्‍या-वि. शेजार्‍यास नेहमीं उपद्रव देणारा; शेजार्‍याच्या नाशविषयीं नेहमीं खतपट करणारा. ॰माशी-स्त्री. घरांत वावणारी माशी; हिच्या उलट रानमाशी. ॰मेढा-मेंढ्या-पु. घरांतील कर्ता, मुख्य मनुष्य; कुटुंबाचा आधारस्तंभ; घराचा खांब पहा. [सं. गृह + मेथि; प्रा. मेढी; म. घर + मेढा = खांब] ॰मेळीं-क्रिवि. आपसांत; घरीं; खाजगी रीतीनें; आप्तेष्टमंडळीमध्यें (तंठ्याचा निवडा. तडजोड करणें). 'घरमेळीं निकाल केला.' [घर + मेळ; तुल॰ गु. घरमेळे = आप- सांत] ॰मोड-स्त्री. मोडून तें विकणें. 'कांहीं दिवसपर्यंत येथें घरमोडीचा व्यापार उत्तम समजला जात होता.' -टि १. १६९. [घर + मोडणें] ॰राखण-स्त्री. १ (प्रा.) घराची पाळत; रक्षण; पहारा. २ घरराखणारा; घरावर पहारा ठेवणारा. [म. घर + राखणें] ॰राख्या-वि. घराचें रक्षण करणारा; घराचा पहा- रेकरी; घरराखण. [घर + राखणें] ॰रिघणी, ॰रिघवणी-स्त्री. १ बांधलेल्या घरांत प्रवेश करतेवेळीं करावयाचा धार्मिक- विधि घरभरणी अर्थ १ पहा. २ घरचा कारभार; घरकाम. 'रचून विविध देहकुटी । तो घररिघवणी परिपाठी ।' -विपू ७. १२८. [घर + रिघणें = प्रवेश करणें] ॰रिघणें-घरांत येणें, प्रवेश करणें. 'घररिघे न बाहतां भजकाच्या ।' -दावि १६१. ॰लाठ्या-वि. (महानु.) घरांतील लाठ्या, लठ्या; घरपांड्या; गृहपंडित; घरांत प्रौढी मिरविणारा; रांड्याराघोजी. 'ऐसेआं घरलाठेआं बोला । तो चैद्यु मानवला ।' -शिशु ८९९. [घर + लठ्ठ?] ॰वट-ड-स्त्री. १ (कु. गो.) एखाद्या कुटुंबाची सर्वसाधारण, समायिक जिंदगी, मालमत्ता; कुटुंबाचें, संस्थेचें सर्वसाधारण काम, प्रकरण. घरोटी पहा. २ (गो.) कूळ; कुटुंब; परंपरा. ३ अनुवंशिक, रोग, भूतबाधा इ॰ आनुवांशिक संस्कार. [सं. गृह + वृत्त; प्रा. वट्ट] ॰वण-न. (कों.) घरपट्टी; घरासंबंधीं सरकार देणें. ॰वणी- न. घराच्या छपरावरून पडणारें पावसाचें पाणी. याचा धुण्याकडे उपयोग करतात. [सं. गृह. म घर + सं. वन, प्रा. वण = पाणी] ॰वंद-पु. (राजा.) घरटणा; पडक्या घराचा चौथरा; पडलेल्या घराची जागा. -वि. घरंदाज; कुलीन; खानदानीचा. 'शहर पुणें हरहमेष भरलें वाडें बांधिती घरवंदानी ।' -ऐपो ४२०. [गृहवंत?] ॰वरौते-स्त्री. १ घरवात; प्रपंच; संसारकथा; घरवात पहा. २ -न. वनरा- बायको; दापत्य; जोडपें. 'तीं अनादि घरवरौतें । व्यालीं ब्रह्मादि प्रपंचातें ।' -विउ ६.५ 'पुढती घरवरौतें । वंदिलीं तिये ।' -अमृ १.४९. [गृह + वृत्-वर्तित्] ॰वसात-द- स्त्री. १ वसति; रहाणें; वास; मुकाम. २ घराची जागा आणि सभोंवतालचें (मालकीचें) आवार, परसू, मोकळी जागा, अंगण. [घर + वसाहत] ॰वांटणी, ॰वांटा ॰हिस्सा- स्त्रीपु. घराच्या मालमत्तेंतील स्वतःचा, खाजगी, हिस्सा, भाग. [घर + वांटणी] ॰वाडी-स्त्री. (कों.) ज्यांत घर बांधलेलें, असतें तें आवार; वाडी. कोणाच्या अनेक वाड्या असतात, त्यापैकीं जींत धन्याचें घर असतें ती वाडी. [घर + वाडी] ॰वात-स्त्री. संसार; प्रपंच; संसाराच्या गोष्टी; प्रपंचाचा पसारा; घरवरौत; घरकाम. 'घरवातें मोटकीं दोघें । जैं गोसावी सेजे रिगे । दंपत्यपणें जागे । स्वामिणी जें ।।' -अमृ १.१३. 'ऐसी तैं घरवात वाढली । खातीं तोंडें मिळालीं ।' -दा ३.४. ६. [सं. गृहवार्ता] ॰वाला-वि. १ घराचा मालक. २ (खा.) नवरा; घरधनी; पति. [घर + वाला स्वामित्वदर्शक; प्रत्यय; तुल॰ गु. घरवाळो] ॰वाली- वि. (खा.) बायकों; पत्नी; घरधनीण. 'माझ्या घर- वालीनें साखर पेरतांच त्यानें सर्व सांगितलें ।' -राणी चंद्रावती ५३. [घर + वाली; गु. घरवाळी] ॰वासी-वि. कुटुंबवत्सल; प्रपंचांत वागणारा. [घर + वास = राहणें] ॰वेडा- वि. १ घरपिसा. २ बाहेर राहून अतिशय कंटाळल्यामुळें घरीं जाण्यास उत्सुक झालेला; (इं.) होमसिक्. ॰शाकारणी-॰शिवणी-स्त्री. घरावरील छपराची दुरुस्ती करणें; घरावर गवत वगैरे घालून पाव- सापासून संरक्षणाची व्यवस्था करणें; घराच्या छपराचीं कौलें चाळणें. [घर + शाकरणें, शिवणें] ॰शोधणी-स्त्री. १ स्वतःचीं खाजगी कामें पहाणें. २ स्वतःच्या साधनसामर्थ्याचा विचार करणें; स्वतःची कुवत अजमावणें. [घर + शोधणें] ॰संजोग- पु. १ एखाद्या कामास लागणारा घरचा संरजम. 'त्या हरदा- साचा घरसंजोग आहे.' = कीर्तनास लागणारीं साधनें तबला, पेटी, टाळ इ॰ हीं त्या हरदासाच्या घरचींच आहेत. २ काटकसरीचा प्रपंच; घरजुगूत; घरव्यवस्था. ३ सुव्यवस्थित घरांतील सुखसोयी, समृद्धता. [घर + सं. संयोग, प्रा. संजोग + सरंजाम] ॰संजो- गणी-स्त्री. घरसंजोग अर्थ २ पहा. घरजुगूत; काटकसर; मितव्यय. ॰समजूत-स्त्री. घरांतल्याघरांत, आपआपसांत स्नेह भावानें. सलोख्यानें केलेली तंट्याची तडजोड, समजावणी. ॰संसार-पु. कुटुंबासंबंधीं कामें; घरकाम; प्रपंच. ॰सारा-पु. घरावरील कर; घरपट्टी; घरटक्का. [घर + सारा = कर] ॰सोकील- वि. घरीं राहून खाण्यास सोकावलेला; घरीं आयतें खाण्यास मिळत असल्यानें घर सोडून बाहेर जात नाहीं असा; घराची चटक लागलेला (बैल, रेडा इ॰ पशु). [घर + सोकणें] ॰स्थिति- स्त्री. १ घराची स्थिति; घरस्थीत पहा. २ गृहस्थाश्रमधर्म; संसार; प्रपंच. 'ॠषीस अर्पिली कन्या शांती । मग मांडिली घरस्थिति ।' -कथा ३.३. ६३. [सं. गृहस्थिति] ॰स्थीत-स्त्री. घराची, कुटुं- बाची रीतभात, चालचालणूक, वर्तक, आचार, स्थिति. म्ह॰ अंगणावरून घरस्थीत जाणावी = अंगणाच्या चांगल्या किंवा वाईट स्थितीवरून त्या घारांतील मंडळीचा आचार कसा आहे तें समजतें. शितावरून भाताची परीक्षा या अर्थी. [घर + स्थिति अप.] घराचा खांब, घराचा धारण, घराचें पांघरूण-पुन. (ल.) घरांतील कर्ता माणूस; घरांतला मुख्य; घरमेढ्या. घराचार-पु. १ संसार; प्रपंच; गृहस्थाश्रमधर्म; घरकाम. 'परी अभ्यंतरीं घराचार माडें ।' -विपू ७.१३८. 'यापुरी निज नोवरा । प्रकृती गोविला घरचारा ।' -एभा २४.३२. -कालिकापुराण ४.३५. २ (ल.) पसारा; व्याप 'तेथ वासनेचा घराचार । न मांडे पैं ।' -सिसं ४.२०७. ३ घरां- तील मंडळींची राहटी, रीतभात, आचरण, वागणूक, व्यवहार. 'वंध्यापुत्राचा घराचार । तैसा जीवासि संसार ।' -एभा २६. ३०. [सं. गृह + आचार] घराचारी-वि. १ घरंदाज. २ नवरा; पति; घरकरी; ददला. 'ऐशिया स्त्रियांचे घराचारी । खराच्या परी नांदती ।' -एभा १३.२१४. [घराचार] घरास राखण- स्त्री. १ घरांचें रक्षण करणारा मनुष्य. २ थोडासा संचय, शिल्लक, सांठा, संग्रह. 'सगळा गूळ खर्चू नको घरास राखण थोडकासा ठेव.' घर म्हणून पहा. घरींबसल्या-क्रिवि. घरबसल्या पहा. घरोपाध्या-पु. कुलोपाध्याय; कुलगुरु; कुलाचा पुरोहित, भटजी. [घर + उपाध्याय; अशुद्ध समास]

दाते शब्दकोश

हात

पु. १ हस्त; बाहु; खांद्यापासून बोटांपर्यंत शरीराचा भाग. कोपरापासून बोटांपर्यंतचा भाग. २ कोपरापासून मधल्याबोटाच्या टोकापर्यंतचें माप. 'हा पंचा साडेचार हात भरला.' ३ उजवी किंवा डावी बाजू, तरफ. 'आमचें घर वाड्याचे उजव्या हातास आहे.' ४ ताबा; आटोका; अधिकार; खातें. 'तुझें काम करणें माझ्या हातीं नाहीं.' (कारक विभक्तींत प्रयोग). ५ स्वतः व्यक्तिगत मनुष्य. 'अपराधावांचून शिवी देणें हें माझ्या हातानें घडणार नाहीं.' ६ स्वामित्व; कबजा; मालकी; ताबा. 'साप्रंत माझ्या हातीं पैसा नाहीं.' ७ हातानें वाजविण्याच्या वाद्यावर मारलेली हाताची थाप. ८ डाव; खेळ (काठी, लाठी, पट्टा इ॰ शस्त्रांचा). 'पट्ट्याचे दोन हात करून दाखव.' ९ कर्तृत्वशक्ति; अंग; हस्तकौशल्य (एखाद्या विषयांतील, कलेंतील). 'त्याचा चित्र काढण्याचा हात चांगला आहे.' १० कुलुपाची किल्ली; चावी. 'कुलवाचा हात इकडे दे बघूं.' ११ सोंगट्या, पत्ते इ॰ खेळांतील डाव, खेळण्याची पाळी, खेळ; खेळणारा गडी. 'अजून आमच्यांतील एक हात खेळवयाचा आहे.' १२ हस्तक; मदतनीस; साहाय्यक; हाताखालचा मनुष्य. १३ ज्यावर दंड, जोर काढावयाचे तो लांकडी, दगडी ठोकळा; हत्ती १४ (रंग देणें, सारवणें इ॰ कामीं) वरून हात फिरविणें; हातानें दिलेला थर, लेप. १५. ठोंसा; तडाखा; हस्तक्रिया (भिन्नभिन्न प्रसंगीं त्या त्या अर्थांनीं) १६ (तेली-घाणा) कातरीस जोडलेला वांकडा लाकडी तुकडा. १७ हात टेकावयासाठी, हातानें धरावयाचा कोणताहि पदार्थाचा भाग. 'खुर्चींचे-रहाटाचे-हात. १८ हाताच्या आका- राची कोणतीहि वस्तु. १९ (सोनेरी) हातांतील दागिना सैल करण्याचें एक हत्यार. २० (नृत्य) दोन हातांनीं मिळून करा- वथाचे अभिनयाचे प्रकार. हे ४० प्रकारचे आहेत. २१ (शिंपी) कापड मोजण्याचें बारा तसूंचें एक माप; गज. २२ पान्हा (नट- बोलट फिरविण्याचा). [सं. हस्त; प्रा. हत्थ; हिं. गु. हाथ; ब. हात; आर्में. जि. हथ, अथ; पॅलेस्टाईनजि. हस्त; पोर्तुंजि. बस्त] म्ह॰ १ हात ओला तर मैत्र भला-नाहींतर पडला अबोला- जोपर्यंत माणूस दुसर्‍यास देत असतो तोंपर्यंत त्याच्याशीं सगळे मित्रत्वानें वागतात. २ हात घशांत घातला तरी कोरडाच = कितीहि मदत केली तरी बेइमान राहणारा. ३ हातपाय रोड्या, पोट लोड्या; हातपाय काड्या, पोट ढेर्‍या = पोटाचा तटतटीतपणा व अवयवांचा रोडकेपणा. ४ हात फिरे तेथें लक्ष्मी फिरें, तोंड फिरे तेथें अवदसा फिरे = उद्योगी माणसाचा हात श्रीमंती आणतो तर नुसत्या बडबड्याच्या हातून कांहींच होत नाहीं उलट दारिद्र्य येतें. ५ आपला हात जगन्नाथ (जगन्नाथपुरीस आपल्या हातानें वाटेल तेवढा प्रसाद घेतां येतो त्यावरून) वाटेल तेवढें व तसें घेणें; प्राचुर्य. ६ हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये = जें खात्रीनें आपलें आहे (आपणांस मिळावयाचेंच आहे) तें सोडून जें अनिश्चित आहे तें मिळविण्याच्या नादीं लागूं नये. ७ हातच्या कांकणास आरसा कशाला ? (हातांतील कांकण डोळ्यानें दिसण्या- सारखें आहे, आरसा आणणें वेडेपणा) = जी गोष्ट उघड सिद्ध आहे ती दाखविण्यास पुराव्याची जरूरी नाहीं. ८ हातपाय र्‍हावलें काम करूं वायले = नाइलाज होणें. ९ हातपाय लुलें तोंड चुरचुरां चाले = अशक्त पण तोंडाळ, मुजोर माणूस. १० हातभर लांकूड नऊ हात ढलपी = अतिशयोक्ति करणें. ११ हातांत नाहीं अडका बाजारांत चालला धडका = जवळ कवडीं नाहीं पण डौल बादशहाचा. (वाप्र.) ॰आंखडणें-देण्यासाठीं पुढें केलेली वस्तु एकदम मागें घेणें; देण्याचें प्रमाण कमी करणें, बंद करणें. ॰आटोपणें-मारणें इ॰ हातांनीं करावयाची कोणतीहि क्रिया बंद करणें. ॰आवरणें-१ हात आटपणें. २ कोणत्याहि कृत्यापासून परावृत होणें. 'ऐकेल वचन माझें आवरिल द्वेषिकाळ हात रणीं ।' -मोकर्ण ४६.४४. ॰इचकणें-(व.) हात मोडणें. ॰उगारणें-उचलणें-(एखा- द्यास) मारावयास प्रवृत होणें. ॰उचलणें-१ स्वयंस्फूर्तीनें, आपण होऊन बक्षीस देणें. २ हातीं घेणें (काम, धंदा). ॰ओढविणें- १ घेण्यासाठीं झांप टाकणें. २ विटंबना, करण्यासाठीं तुच्छता दर्शविण्यासाठीं तोंडापुढें हात करणें. ॰ओंवाळणें-तुच्छता दर्शविणें. ॰करणें-१ लाठी मारणें; शस्त्राचा वार करणें. हात टाकणें. 'स्त्रीचे अंगावर हात करूं नये.' २ पट्टा, बोथाटी वगैरेचे डाव करणें; फिरविणें. ३ वादविवाद, युद्ध करणें. ॰कापून-देणें- गुंतणें-लेखी करारकरून स्वतःस बांधून देणें. ॰खंडा असणें- एखादें कार्य (हुन्नर) हमखास पार पाडण्याचें कौशल्य, पटाईत- पणा अंगीं असणें. ॰गहाण ठेवणें-उजवा हात देवास वाहून कोणत्याहि कामीं त्याचा उपयोग करावयाचा नाहीं असा नवस करणें. २ कोणत्याही कामास हात न लावणें. ॰घालणें-१ (एखादें काम) पत्करणें; करावयास घेणें. २ एखादी वस्तु घेणें, धरणें, शोधणें यासाठीं हात पुढें करणें. 'मग विभु वसनासी त्याचिया हात घाली ।' -आनंदतनय. ३ (एखाद्या कामांत, व्यवहांरांत) ढवळाढवळ करणें; आंत पडणें. ॰घेणें-(पत्त्यांचा खेळ) हुकूम मारून अगर भारी पान मारून दस्त करून घेणें. ॰चढणें-प्राप्त होणें. 'अनुताप चढविया हात । क्षणार्धं करी विरक्त ।' -एभा २६.२०. हाताचा आंवळा-मळ, हातचें कांकण-उघडउघड गोष्ट; सत्य. ॰चा मळ-अत्यंत सोपें कृत्य; हात धुण्यासारखें सोपें काम; अंगचा मळ. ॰चालणें-१ हातांत सत्ता, सामर्थ्य, संपत्ति असणें, मिळविणें, मिळणें. १ एखादी गोष्ट करतां येणें. 'कशिद्यावर माझा हात चालत नाहीं.' ॰चाल- विणें-हत्यार चालविणें (संरक्षणार्थ). 'न्यायाच्या अभावीं ज्याला त्याला हात चालवावेसें वाटणें रास्तच होईल.' -टि १. २२. ॰चेपणें-लांचाचे पैसे मुकाट्यानें एखाद्याचे हातांत देणें. ॰चोळणें-फार राग आला असतां तळहात एकमेकांवर घासणें; कुंठितगति होऊन स्वस्थ बसावें लागणें. 'शल्य सुयोधन वाक्यें कोपे चोळी करें करा...।' -मोकर्ण २१.१३. ॰जोडणें-१ नमस्कार, प्रार्थना, विनंति करणें. २ शरण जाणें, येणें. 'अपराध फार केले परि आतां हात जोडिले स्वामी ! ।' -मोआर्याकेका. ३ नको असलेला पदार्थ हात जोडून आर्जवानें दूर सारणें; अव्हे- रणें. 'दानश्री त्याहुनि बहु दुग्धासहि हात जोडितो मीन ।' -मोबृहद्द ८. ॰झाडणें-१ झिडकारणें; नापंसत ठरविणें. २ निराशेनें सोडून देणें. ३ एखादें काम उरकून मोकळें होणें. ॰टाकणें-१ पोहतांना पाण्यावर हात मारणें. २ (एखाद्यावर) प्रहार करणें; मारणें. 'बायकोमाणसाच्या अंगावर हात टाकणें तुम्हाला शोभत नाहीं.' ॰टेकणें-१ काम करण्यास असमर्थ असल्यानें पराभव पावल्याचें कबूल करणें. २ म्हातारपणानें अशक्त होणें. ३ दमणें; थकणें; टेकीस येणें. ॰तोडणें-स्वतःच्या लेखानें आपणांस बांधून घेणें. ॰थावरणें-हात आवरणें; आटो- पणें. '...थावरूनि हातरणीं ।' -मोस्त्री ६.५१. ॰दाखविणें- दावणें-१ हस्तसामुदिक जाणण्यासाठीं जोशापुढें तळहात करणें. २ अहितकारक परिणाम करणें. ३ स्वतःची शक्ति, सामर्थ्य दाख- विणें. 'शक्रादि देव असते तरि त्यांसहि दावितोंचि हात रणीं ।' -मोभीष्म ३.४. ४ नाडीपरीक्षा करण्यासाठीं वैद्यापुढें हात करणें. ५ हातानें एखादी वस्तु दर्शविणें. ६ बडवून काढणें; पारिपत्त्य करणें; सूड घेणें; उट्टें काढणें. म्ह॰ हात दावून अवलक्षण चिंतणें, करणें. ॰दाबणें-लांच देणें. 'त्यानें आपल्यास मदत करावी म्हणून त्याचे हात दाबावे असें एकदां मनांत येतें.' -विवि १०. ९ २१०. ॰देणें-१ मदत करणें; तारणें. 'घडतां अधःपतन मज पुण्यें देतिल न हात परिणामीं ।' -मोआदि १९.३२. २ चोरणें; उचलेगिरी करणें. ३ खाद्यापदार्थावर ताव मारणें. ४ (बायकी, छप्पापाणी) छप्पू घातलेल्या मुलीस इतर मुलीनीं (तिनें उठावें म्हणून) हस्तस्पर्श करणें. ॰धरणें-१ अडविणें; हरकत करणें; स्पर्धा करणें; बरोबरी करणें. २ लांच देणें. ॰धरून जाणें- विवाहित स्त्रीनें एखाद्या परपुरुषाबरोबर पळून जाणें; जाराबरोबर निघून जाणें. ॰धुणें-(ल.) एखाद्या कामांतून आपलें अंग काढून घेणें. ॰धुवून पाठीस लागणें-एखाद्या नाश करण्याविषयीं हट्टानें प्रवृत्त होणें; चिकाटी धरून एखाद्याचा पाठलाग करणें. ॰न बनणें-(व.) विटाळशी होणें; गुंता येणें. ॰नाचविणें-चेष्टा करण्यासाठीं दुसर्‍याचे तोंडापुढें हातवारे करणें. हात ओवाळणें पहा. ॰पडणें-१ एखादें काम अनेकांनीं लागून संपविणें; एखादा खाद्यपदार्थ अनेकांनीं एकसमयवच्छेनेंकरून फन्ना करणें. २ (ना.) जिवंतपणीं भेट नाहीं पण दहनापूर्वी तरीं प्रेताचें दर्शन होणें. ॰पसरणें-भीक मागणें. ॰पाय खोडणें-१ अवयव आंख- डणें; विव्हल होणें. २ एखाद्यास प्रतिबंध, अडचण करणें. ॰पाय गळणें-गाळणें-१ अशक्त होणें; रोडावणें. २ खचून जाणें; नाउमेद होणें; गलितधैर्य होणें. ॰पाय गुंडाळणें-१ अंत- काळच्या वेदनांनीं हातपाय आंखडणें; कियाशक्ति रहित होणें. २ हरकत, अडथळा करणें. ॰पाय चोळणें-१ सूड घेण्याची प्रतिज्ञा करणें; चरफडणें. २ रागानें तरफडणें; शिव्याशाप देणें. ॰पाय झाडणें-१ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा. २ सुटकेसाठीं हातापायांचा उपयोग करणें. ३ धडपड करणें; चरफडणें. ॰पाय ताणणें-सुखानें, निष्काळजीपणानें हातपाय पसरून पडणें. ॰पाय धोडावप-(गो.) आटापिटा करणें. ॰पाय पसरणें- १ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा. २ मर्यादेच्या, आटोक्याच्या बाहेर जाणें; जास्त जास्त व्याप वाढविणें; पसारा वाढविणें. म्ह॰ भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. ३ काम होत नसल्यास सबबी सांगणें; कामांत आळस करणें (काम करीन असें वचन दिलें असतां). ४ मागणी वाढत जाणें, अधिकाधिक आक्रमण करणें. ॰पाय पाखडणें-अंतकाळच्या वेदनेनें, फार संतापानें हातपाय झाडणें. ॰पाय पांघरून-पोटाळून बसणें-आळशा- सारखें बसणें; जेठा मारून बसणें. ॰पाय फुटणें-१ उधळपट्टी सुरू होणें; संपत्तीला (जाण्यास) पंख फुटणें. 'दौलतीला अलीकडे हातपाय फुटुं लागले आहेत.' ३ लुच्चेगिर्‍या करण्यांत तरबेज होणें. २ थंडीनें हातपायास भेगा पडणें. ॰पाय फोडणें-लावणें- फुटणें-लागणें-१ मूळ गोष्टींत, अंदाजांत भर घालणें; वाढ विणें. २ नटविणें; थटविणें; अलंकृत करणें. ३ मागून वाढविणें (काम, दर, खर्च इ॰). ४ लबाड्या इ॰ नीं सजवून उजळून दाखविणें. ॰पाय मोकळे करणें-फेरफटाका करून हातपाय सैल, हलके करणें; फिरणें; सहल करणें. ॰पाय मोडणें-मोडून येणें-टाकणें-१ तापापूर्वीं अंग मोडून येणें; निरंगळी येणें. २ बलहीन, निःसत्त्व करून टाकणें; हरकत घेणें. ॰पाय सोडणें -अंतकाळच्या वेदनांनीं हातपाय ताणणें, ताठ होणें. ॰पाय हालविणें-उद्योग, परिश्रम, कष्ट इ॰ करणें; स्वस्थ न बसणें. ॰पोचणें-कृतकृत्य होणें (ढुंगणाला हात पोंचणें असा मूळ प्रयोग). ॰फाटणें-रुची वाढणें. 'जेथें जिव्हेचा हातु फाटे ।' -ज्ञा १८.२४९. ॰फिरणें-लक्ष जाणें; व्यवस्थित ठेवण्याची काळजी घेणें; साफसफाई करणें. ॰फेरविणें-१ लहान मुलास प्रेमानें कुरवाळणें. 'प्रेमें मजवरुनि हात फिरवूनी ।' -मोउद्योग १३.१८३. २ पुन्हां उजळणी, उजळा देणें. ॰बसणें-१ एक- सारखें लिहीत, वाचीत इ॰ राहणें. २ अक्षरांचें वळण बसणें; तें पक्कें होणें. ३ एखादें काम उत्तम प्रकारें करतां येणें; मनांत ठसणें; विशिष्ट क्रिया करण्याची सफाई हातास प्राप्त होणें. ॰बांधणें-१ मर्यादा घालणें; स्वैर होऊं न देणें. २ अडथळा आणणें. ॰बोट लावणें-भार लावणें-मदत करणें. ॰भिजणें-१ दक्षणा देणें; (गो.) हात भिजविणें. २ लांच देणें; हात ओले करणें. ॰मारणें-१ बळकाविणें (पैसा इ॰) देणें. २ अधाशीपणानें खाणें; ताव मारणें. ३ एखाद्या वस्तूवर विविध क्रिया करणें. ॰मिठ्ठीला येणें-(माण.) हाताहातीं होईपर्यंत भांडणें. ॰मिळविणें-१ घाव घालणें. 'तस्कारानें जलदीकरून हात मिळविला जाऊन ।' -ऐपो ३९०. २ (कुस्ती) सलामी घेणें. ॰मोडणें-१ असहाय्य, मित्रहीन होणें. २ मिळत असलेली देणगी, बक्षीस नाकारणें. ॰राखणें- कुचराई करणें. ॰राखून खर्च करणें-काटकसरीनें खर्च करणें. ॰लागा ना-(गो.) विटाळशी होणें. ॰लावणें-मदत करणें. ॰वसणें-क्रि. हस्तगत होणें. 'ते ज्ञाननिष्ठा जेथें हातवसे ।' -ज्ञा १८.१२४८; -भाए २४०. ॰वहाणें-१ हत्यार चालविणें. 'परि परमप्रिय अर्जुन त्यावरि याचा न हात वाहेल ।' -मोउद्योग १२.५४. २ प्रवृत्त होणें; कार्य करणें. ॰वळणें-१ सराव, परि- पाठ इ॰ नें हातास सफाई येणें. २ (एखाद्या गोष्टीस, कृत्यास) प्रवृत्त होणें. ॰सैल सोडणें-सढळपणें खर्च करणें. ॰सोडणें-१ पूर्वीप्रमाणें कृपा, लोभ न करणें. २ संगति. ओळख सोडणें. ॰हातांत देणें-लग्न लावणें. 'एखाद्या तरुणीचा हात माझ्या हातांत दे.' -भा ४९. ॰हालवीत येणें-काम न होतां रिकामें परत येणें. हातणें-क्रि. सारवणें. हाताखालीं घालणें-देख. रेखीखालीं, अंमलखालीं, कबज्यांत, ताब्यांत घेणें. हातां चढणें- प्राप्त होणें. 'जरी चिंतामणी हातां चढे ।' -ज्ञा ३.२३; -एभा १०.२८२. हाताचें पायावर लोटणें-आजची अडचण उद्यां- वर ढकलणें; आजचें संकट लांबणीवर टाकणें. हाताचे लाडू होणें-खरजेनें हाताच्या मुठी वळणें, त्या न उघडणें. हाताच्या धारणेनें घेणें-मारणें; बुकलणें. हातांत कंकण बांधणें- एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा करणें; चंग बांधणें (यजमानानें यज्ञ करावयाच्या पूर्वी हातांत दीक्षासूत्र बांधण्याच्या चालीवरून). हातांत हात घालणें-१ लांच देणें. २ मैत्रीच्या भावानें वागणें, प्रेम करणें. ३ विवाहसंबंध घडवून आणणें. ४ विवाहित स्त्रीनें परपुरुषाशीं संबंध ठेवणें; निघून जाणें. हातातोंडाशीं गांठ पडणें-१ घास तोंडांत पडणें; खावयास सुरुवात करणें; जेवणा- खेरीज इतरत्र लक्ष न जाणें. २ एखाद्या कार्यास घाईनें आरंभ होणें. ३ बोंब मारणें. हातातोंडास येणें-१ तारुण्यावस्था प्राप्त होणें (लग्न झालेली स्त्री, तरुण मुलगा इ॰). २ फल देण्याच्या स्थितीस येणें. हातापायांचा चौरंग होणें-पेटके वगैरेमुळें हातपाय आंखडणें. हातापायांचे डगळें होणें- पडणें-मोडणें-अशक्तपणानें अंगास कंप सुटणें; अंग शिथिल होणें. हातापायांचे ढीग पडणें-होणें-भीतीनें, आजारानें अशक्त असहाय्य होणें. हातापायांच्या फुंकण्या होणें- अशक्ताता, निर्बलता येणें. हाता(तीं) पायां(यीं) पडणें- १ गयावया करणें; प्रार्थना करणें. २ शरण जाणें; नम्र होणें; दया याचिणें. हाताबोटावर येणें, हातावर येणें-आतां होईल, घटकाभर्‍यानें होईल अशा स्थितीस येणें; हस्तगत कबज्यांत, साध्य होण्याच्या अगदी बेतांत असणें. हाताला चढणें-प्राप्त होणें. 'संसार कशाचा जरि न हाताला चढली ।' -राला ११२. हाताला येईल तें-जें कांहीं हातांत सांपडेल तें; ज्याचेवर हात पडेल तें. हाताल लागणें-गमावलेल्या, फुकट गेलेल्या, नासलेल्या, बिघडलेल्या वस्तूंतून अल्प अंश मिळणें. 'कापडांत पैसें घालूं नका, त्यांतून हाताला कांहीं सुद्धां लागणार नाहीं.' हाताला वंगण लावणें-लांच देणें. -राको १३३७. हाताला हात लावणें-१ पति पुण्याहवाचनादि धर्मसंस्कारास बसला म्हणजे पत्नीनें त्याच्या हातास नुसता हात लावणें (म्हणजे तिलाहि त्याचें फळ मिळतें). २ स्वतः कांहीं न करतां दुसर्‍यानें केलेल्या कामाच्या फळांत वांटेकरी होणें; दुस- र्‍याच्या कार्याला अनुमति देणें. हातावर असणें-पूर्णपणें साध्य असणें. हातावर घेणें-आणणें-काढणें-तारण, गहाण न ठेवतां पैसे उसनें आणणें, काढणें, घेणें. हातावर तुरी देणें-देऊन पळून जाणें-हातावर हात देऊन-मारून पळणें-पळून जाणें-फसविणें; डोळ्यादेखत फसवून पळून जाणें; देखत देखत भुल- विणें. 'सुभद्रा काबीज करण्यासाठीं श्रीकृष्ण परमात्म्याच्या मदतीनें बलिरामाच्या हातावर ज्या तुरी दिल्या... तें पाहून तरी आम्हांस कधीं विषाद झाला आहे काय ?' -आगर. हातावर दिवस काढणें-लोटणें-मोठ्या कष्टानें संसार चालविणें. हातावर धरणें-हातांवर संभाळीत राहावयास लावणें (मुलीनें). 'यानें मला सकाळपासून हातावर धरिलें.' हातावर पाणी पडणें- भोजनोत्तर आंटवणें. 'हातावर पाणी पडलें कीं चालला बाहेर.' हातावर पिळकणें-लांच देणें. हातावर पोट भरणें-संसार करणें-अंगमेहनत, भिक्षा, नौकरी करून उपजीविका करणें. हातावर मिळविणें-मिळवावें व खावें अशा स्थितींत राहणें. हातावर येणें-जवळ येऊन ठेपणें. हातावर येणें-लागणें- दूध देऊं लागणें-थानास वासरूं न लावतां किंवा पान्हवण (सरकी इ॰) पुढें न ठेवतां जनावरानें दूध देणें, पान्हवणें. हातावर शीर घेऊन असणें-कोणतेंहि धाडसाचें कृत्य कर- ण्यास सदां सिद्ध असणें. हातावर हात चोळणें-रागानें तळ- हात एकमेकांवर घासणें; चरफडणें. 'इंद्रें स्वतातघातक पाठीसीं घातला म्हणोनि करें । कर चोळी...' -मोआदि ७.४०. हाता- वर हात मारणें-१ एखादी गोष्ट, सट्टा इ॰ पटला म्हणजे दुस- र्‍याचे हातावर आपला हात मारणें. २ वचन देणें. हातास हात लावणें-(देणार्‍याच्या, घेणार्‍याचे हातास स्पर्श होणें) द्रव्यलाभ होणें. हातास-हातां-हातीं चढणें-प्राप्त होणें. 'तो किल्ला माझ्या हातीं चढला.' 'नवनींत मंथनावांचून । हातां न चढे सहसाहि ।' हातीं धरणें-१ स्वतःच्या देखरेखीखालीं घेणें; एखाद्यास आपल्या आश्रयाखालीं घेणें. २ निरंकुशपणें मोकाट सोडणें (जीभ, तोंड, पोट इ॰ इंद्रियें). हातीं धोंडे घेणें-१ विरुद्ध उठणें. २ वेड्यासारखें करणें. हातींपायीं (अन्न इ॰) डेवणें-धावणें-येणें-रेवणें-जाड्य, सुस्ती येणें; शिव्या देण्यास तयार होणें. हातींपायीं उतरणें-सुटणें-मोकळी होणें-सुखरूपपणें बाळंत होणें हातींपायीं पडणें, लागणें- अतिशय विनवण्या, काकुळत्या करणें. हातीं भोपळा घेणें- देणें-भिक्षा मागणें, मागावयास लावणें. आडव्या हातानें घेणें-१ चोरून; चोरवाटेनें घेणें. २ झिडकारणें; भोसडणें; तुच्छता दाखविणें; कचकावून खडकाविणें; मारणें. आडव्या हातानें घेणें, चारणें-बाजूनें, तोंडांत हात घालून खाऊं घालणें; औषधोपचार करणें (घोडा इ॰स). (देणें-चोरून देणें-मारणें- मागल्या बाजूनें मारणें-ठोकणें). एका हाताचीं बोटें पण सारखीं नाहींत-सारख्या परिस्थितींतील माणसें असलीं तरी त्यांच्यांत थोडाफार फरक असतो. दोहों हाताचे चार हात करणें-होणें-लग्न करणें, होणें या हाताचे त्या हातावर- क्रिवि. ताबडतोब; जेव्हांचे तेव्हांच (दुष्कृत्याची फेड लवकर व खात्रीनें मिळते या अर्थीं). या हाताचें त्या हातास कळूं न देणें-अत्यंत गुप्तपणें करणें. रिकाम्या हातानें-जरूं- रीच्या साधनां-उपकरणां-सामग्रीखेरीज; कांहीं काम न करतां. याचा हात कोण धरीसा आहे ? -याच्या वरचढ, बरो- बरीचा कोण आहे ? याचा हात धरण्याची शक्ति कोणास आहे ? हातांत काय तागडू मिळाला-(व) कोणता फायदा झाला ? हातांत नारळाची आई (नरोटी) देणें-भिक्षा मागावयास लावणें. सामाशब्द- ॰अनार-पु. शोभेच्या दारूचा एक प्रकार. ॰इंद-न. (कों.) खेंकडे पकडण्याचें जाळें. ॰उगावा-पु. १ एखाद्या किचकट, अडचणीच्या कामांतून, धंद्यांतून अंग काढून घेणें. २ सूड; पारिपत्य. (क्रि॰ करणें). ३ कर्जाची उगराणी; घातलेलें भांडवल परत मिळविणें. [हात + उगवणें] ॰उचल-स्त्री. १ पेढींतून स्वतःची रक्कम आतां थोडी मग अशा रीतीनें खर्चण्यास घेणें. २ मूळ भांडवल; मुद्दल. उचल मध्यें पहा. ॰उचला-वि. १ आप- खुषीनें, हात उचलून दिलेला (पदार्थ). २ ज्याचा स्वतः करण्याबद्दल पत्कर घेतला आहे असा (व्यवहार, उद्योग). ॰उसना-ना-वि. थोडा वेळ उसना घेतलेला; लवकर परत करण्याच्या बोलीनें आणलेला (त्यामुळें लेख इ॰ लिहून न घेत दिला-घेतलेला). ॰उसणें-नें-न. थोड्या मुदतींत परत कर- ण्याच्या बोलीनें (लेख करून न देतां) उसनी घेतलेली रक्कम. ॰कडी-स्त्री. हातांतील बेडी. 'मन सिंतरील विवेकासीं । यालागी हात कडिया दोहींसीं ।' -एभा २३.९५१. ॰कर- वत-पुस्त्री. हातानें चालविण्याची लहान करवत. ॰करवती- स्त्री. लहान हात करवत. ॰करीण-स्त्री. अचळाला हात लावतांच (वासरूं न सोडतां किंवा आंबोण न ठेवतां) पान्हा सोडून दूध देणारी गाय; म्हैस. इच्या उलट पान्हावणकरीण. ॰कापें-न. (गो.) लांडी, बिन बाह्यांची बंडी. ॰काम-न. हस्तकौशल्याचें काम (यांत्रिक कामाच्या विरुद्ध); हस्तव्यवसाय. (इं.) हँडफ्रॅक्ट. ॰कैची-कचाटी- स्त्री. आलिंगन; मिठी. ॰खंड-वि. १ मधून मधून कामांत सोडवणूक करणारा; मदतनीस (मूल, मित्र, शेजारी); अडल्या वेळीं आपल्या कामीं उपयोगी पडणारा. २ हात खंडा पहा. [हात + खंड = खळ, विसावा] ॰खंडा-वि. निष्णात, करतलामलकवत् असलेली; म्हणाल त्यावेळीं तयार (विद्या, कला). ॰खर्च-पु. किरकोळ खर्च; वरखर्च. ॰ख(खं)वणी- स्त्री. लहान खवणी. ॰खुंट-खुंटा-पु. (विणकाम) वशारन पसरलेल्या लांबीपाशीं असलेल्या समोरच्या खांबापासून मागा पाशीं बसण्याच्या जागेजवळ उजवीकडे दोरी बांधावयाची खुंटी. ॰खुरपणीचें लोणी-न. हातखुरप्या नारळाचें खोबरें. ॰खुरपा-वि. हातानेंच आंतील खोबरें खरवडून काढण्याजोगा (कोंवळा नारळ). ॰खुरपें-न. १ हातखुरपा नारळ. २ गवत काढण्याचा लहान विळा. ॰खे(खो)रणें-न. कलथा; उलथणें; झारा. (क्रि॰ लावणें-अन्नास, पैक्यास = पैका उकळण्याचा सपाटा). म्ह॰ हातखेरणें असतां हात कां जाळावा. ॰खेवणें-न. १ हातवल्हें. २ मदतनीस; हाताखालचा माणूस. ॰खेव्या-व्या-पु. हातखेवणें अर्थ २ पहा. ॰खोडा-पु. हात अडकविण्याचा सांपळा. 'चंद्रसूर्याचा हातखोडा । काळा कैसेनि घालिजे ।' -भाए ५४९. ॰गाडी-स्त्री. हातानें ढकलून चालविण्याची गाडी. ॰गुंडा-धोंडा-पु. १ हातानें फेकण्या-उचलण्या-जोगा दगड. 'कुश्चीतभावाचे हातगुंडे ।' -ज्ञाप्र २६५. २ असला दगड हातानें जेथवर फेंकला जाईल तितकें अंतर. ॰गुण-पु. (बरेंवाईट करण्याचा योग, गुण) नशीब; हातीं (काम, माणूस) धरणाराचा प्रारब्धयोग. हस्तगुण पहा. ॰घाई-स्त्री. १ हातानें वाजवावयाचें वाद्य जोराजोरानें, आवेशानें वाजविणें. २ (ल.) उतावळेपणा; जोराची हाल चाल. (क्रि॰ हातघाईवर, हातघाईस येणें-मारामारी करणें). ॰चरक-पु. १ हातानें फिरवून रस काढावयाचा चरक. २ हात घाणी. ॰चलाख-वि. चोर; उचल्या. ॰चलाकी-खी-स्त्री. हस्तचापल्य; लपवाछपवी; नजरबंदीचा कारभार (गारुडी, सराफ इ॰ चा). ॰चाळा-पु. १ हाताचा अस्थिरपणा; चुळबुळ; हातानें कांहीं तरी उगीच करीत रहावें अशी लागलेली खोड; हातचेष्टा. (क्रि॰ लागणें). २ अशा प्रकारानें होणारें नुकसान. (क्रि॰ करणें). ३ सदोदित हात गुंतलेला असणें; त्यांत निमग्न असणें (वाढता धंदा, व्यापार, खेळ इ॰ त); देवघेवीचा मोठा उद्योग. ॰चिठी-चिटी-ट्टी-स्त्री. १ अधिकार्‍यानें शिक्का- मोर्तब न करतां आपल्या हातच्या निशाणीनेंच पुरी केलेली चिठी, हुकूम. २ कोणाहातीं पाठविलेली चिठी-चपाटी. ॰चे हातीं- च्या हातीं, हातोहातीं-किवि. लेगच; ताबडतोब; आतांचे आतां; क्षणार्धांत पटकन् (करणें, घडणें). 'ही गडी हाताचे हातीं जाऊन येईल.' 'हाताचे हातीं चोरी-लबाडी-शिंदळकी' इ॰. ॰चोखणें-चुंफणें-न. तान्ह्या मुलास चोखण्यासाठीं हातांत देण्याची वस्तु. ॰जतन-स्त्री. हातानें केलेली मशागत (मालीस इ॰); रोज वक्तशीर घेतलेली काळजी. 'हा घोडा नुसत्या हातजतनानें इतका हुशार आहे.' ॰जुळणी-स्त्री. (ठाकुर) लग्न लागल्यानंतर मुलानें मुलीचे दोन हात धरणें. -बदलापूर १३८. ॰झाड-स्त्री. आपोआप उगवलेलें नसून मुद्दाम लाविलेलें झाड. ॰झाडणी-स्त्री. राग, तिरस्कार इ॰ नें हात झटकणें. ॰झालणा-पु. हातजाळें; हातविंड. ॰झोंबी-स्त्री. परस्परांचे हात धरून केलेली झटापट; हिसकाहसकी; झगडा. ॰तुक-न. १ हातानें वजन करणें. 'नव्हती हाततुके बोल ।' -तुगा ३४२३. २ अटकळ; अजमास. 'मग त्यागु कीजे हात- तुकें ।' -ज्ञा १८.१३१. ॰दाबी-स्त्री. लांच. 'मालकानें हात- दाबी केली म्हणजे माल त्यांना परत देतात.' -गुजा ६७. ॰धरणें-न. (खा.) सोधणें; स्वयंपाकघरांतील भांडीं उतरणें इ॰ चें फडकें. ॰धरणी माप-न. माप भरतांना त्याचे शेवटास डावा हात धरून, मापापेक्षां थोडें जास्त धान्य घेऊन केलेलें माप. बोटधरणी माप पहा. ॰धुणी-स्त्री. १ राजाच्या हात- धुणारास दिलेलें इनाम इ॰. २ स्वयंपाकघरांतील मोरी. ॰धोंडा- पु. १ हातानें उचलण्याजोगा धोंडा. २ धोंडा हातानें फेंकला असतां जेथवर जाईल इतकें अंतर; टप्पा. ॰नळा-पु. हातांत धरून सोडण्याचा, शोभेची दारू भरलेला नळा. ॰नळी-स्त्री. चपटें कौल. ॰निघा-गा-हातजतन पहा. हातजपणूक. ॰नेट- क्रिवि. १ (व.) हाताचा जोर, भार देऊन. २ (व.) हाता- जवळ. ॰पडत-पात-वि. हातीं असलेलें; अगदीं जवळ असणारें; लागेल त्यावेळीं ताबडतोब मिळणारें. ॰पहार-स्त्री. हातभर लांबीची पहार. ॰पा-हातोपा-पु. अंगरखा इ॰ ची बाही. ॰पाटिलकी-स्त्री. १ हातानें ठोकणें; चोपणें, बदडणें. तोंड- पाटिलकीचे उलट. २ बोलण्यापेक्षां प्रत्यक्ष कृति, काम. 'तोंड- पाटिलकी सगळ्यांस येते हातपाटिलकी कठीण.' ३ हस्तचापल्य; उचलेगिरी. ॰पाणी-न. १ लग्नांत रासन्हाणीचे वेळीं वधूच्या सासूनें तिचे हातांवर ओतावयाचें पाणी. (क्रि॰ घालणें). २ लग्नांत मांडव परतण्याचे दिवशीं सासूनें सुनेची बोहोल्यावर ओटी भरून, किंवा मांडवांत न्हातेवेळीं नवर्‍यानें केशरी रंगांत बुडवून तिचे हातांत घालवयाची अंगठी. ३ लग्नांत मुलाच्या हाताखालीं मुलीचा हात ठेवून त्यांवर समंत्रक पाणी घालणें. -बदलापूर २०५. ॰पान-पु. कोंका पडण्यापूर्वींचें केळीचें पान. ॰पान्हा- पु. हातकरीण गाय, म्हैस इ॰ नें सोडलेला पान्हा (वासरूं किंवा अंबोण दाखविल्याशिवाय). हातपान्ह्यास लगाणें, येणें, हातपान्ह्याची गाय इ॰ प्रयोग. ॰पालवी-स्त्री. हात पोंहो- चेल इतक्या उंचीवरील पाला. ॰पावा-वि. (कों.) हाताच्या आटोक्यांतील, हात पोहोंचेल इतक्या उंचीवरील (वेलीचें फूल इ॰ किंवा खोली-विहिरींतील पाणी इ॰). [हात + पावणें] ॰पिटीं-स्त्री. १ झोंबाझोंबी; गुद्दागुद्दी. २ (ल.) हातघाईची मारामारी. 'तंव राउतां जाली हातपीटी ।' -शिशु ९६८. [हात + पिटणें] ॰पेटी-स्त्री. हातानें भाता चालवून वाजवावयाची बाजाची पेटी; हार्मोनियम. २ सरकारी कामाचे कादगपत्र ठेवण्याची पेटी. -स्वभावचित्रें २४. ॰पाळी-स्त्री. चेंडूफळीचा एक प्रकारचा खेळ. -मखेपु ५६. ॰फळ-न. (बे.) मेर ओढण्याचें फळ. ॰फळी, हातोफळी-क्रिवि. हातोहातीं; लवकर. ॰बळ-न. हस्तसामर्थ्य. 'हातबळ ना पायबळ, देरे देवा तोंडबळ.' ॰बांधून डंकी-स्त्री. (कुस्ती) जोडीदारास खालीं आणल्यावर त्यानें आपला एक पाय धरला तर आपण दुसर्‍या पायानें जोडीदाराचे पाठीवरून झोंका घेऊन उडी मारून त्यास चीत करणें. ॰बेडी-स्त्री. कैद्याच्या हातांत अडकवावयाची बेडी; हातकडी. ॰बोनें-न. हातांत घेत- लेलें भक्ष्य. 'बुद्धीचेनि शाकें । हातबोनें निकें ।' -ज्ञा ६.२८२. ॰बोळावन-स्त्री. हातांनीं मार्गाला लावणें. 'जाणो नेदी योग्यता । ग्रहीं हातबोळावन करितां ।' -भाए ३४९. ॰भाता-पु. हातांत घेऊन फुंकावयाचा भाता; लहान भाता. ॰भार-पु. मदत; साहाय्य (विशषतः द्रव्याचें). (क्रि॰ लावणें). ॰भुरकणा- भुरका-वि. हातानें भुरकून खावयाजोगा (पेयपदार्थ). ॰भुर- कणें-भुरकें-वरील प्रकारचा पातळ पदार्थ. ॰भेटी-स्त्री. प्रेमानें हातांत हात घालणें. -एभा २८.५९२. ॰मांडणी-स्त्री. पैसे पावल्याची पोंच म्हणून पैसे नेणार्‍याची खतावणीवर घेतलेली सही. ॰मात-स्त्री. हात टेकणें. ॰मेटी हेटीमेटी-क्रिवि. आळसांत; निरुद्योगीपणानें; हातांवर व गुडघ्यावर टेकून रमतगमत (दिवस इ॰) घालविणें. 'दिवस गेला हातमेटीं चांदण्या खाली कापूस वेटी.' ॰रगाडा-पु. उसाचा हातचरक. ॰रवी-स्त्री. घुसळखांब, मांजरी यांचे विरहित हातानेंट फिरविण्याची लहानरवी. ॰रहाट- पु. हातानें ओढून पाणी काढण्याचा लहान रहाट. ॰रिकामी- स्त्री. विधवा स्त्री. -बजलापूर १७४. ॰रिती-वि. (महानु.) रिकामी विधवा. -स्मृतिस्थळ. ॰रुमाल-पु. १ तोंड वगैरे पुसण्याचा लहान रुमाल. २ नित्योपयोगी कागदपत्रें ठेवण्याच्या दप्तराचा रुमाल; चालता रुमाल; त्यांतील कागदपत्रांचें बंडल. ॰रोखा- पु. दस्तक; चिठी; आज्ञापत्र. 'पाराजीपंत वाघ यांस हातरोखा वरचेवर पाठवून अति आग्रहें अंतरवेदींत घालविलें.' -भाव १०२. ॰लाग-पु. हाताचा टप्पा. ॰लागास-लागीं येणें-असणें- कक्षा, आंवाका, आटोका, अवसान इ॰ त येणें, असणें. ॰लागा- लाग्या-वि. अनुकूल असणारा. 'तुमचे हातलागे लोक असतील.' -वाडबाबा १.६. ॰लावणी-स्त्री. १ वेश्येचा चिरा उतरणें; कौमार्यभंग. (क्रि॰ करणें). २ हाताची पेरणी; लागवण. -वि. हातपेरणीचें. ॰लावा-व्या-वि. हाताळ; चोरटा; चोरी करण्या- साठीं हात फुरफुरत असलेला. ॰वजन-न. १ जिन्नस हातांत घेऊन केलेलें वजन. २ अशाप्रकारें वजन काढण्याची लायकी. ॰वटी- हातोटी-स्त्री. १ हस्तकौशल्य; हस्तचातुर्य. २ (सामा.) कसब; नैपुण्य; चलाखी. 'अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये । परि ते हात- वटी चंद्री कीं आहे ।' -ज्ञा ९.२९. ३ विशिष्ट पद्धत, रीत, प्रकार. [हिं.] भाषणाची-पोहण्याची-व्यापाराची इ॰ हातोटी. ॰वडा- हातोडा-पु. सोनार, कासार इ॰ चें ठोकण्याचें हत्यार. ॰वडी हातोडी-स्त्री. लहान हातोडी. ॰वणी-न. १ हात धुतलेलें पाणी. २ (कों.) हातरहाटाचें पाणी पन्हाळांतून जेथें पडतें तेथील जमीनीचा उंच केलेला भाग; हातणी. ॰वल्हें-न. हातानेंच वल्हवावयाचें लहान वल्हें. ॰वश-वि. हस्तगत. ॰वशी-स्त्री. हात उगारणें. -शर. ॰वळा, हातोळा-पु. हातवटी पहा. म्ह॰ गातां गळा; शिंपता मळा, लिहितां हातवळा. ॰वारे-पु.अव. हातानीं केलेलें हावभाव; हाताची हालचाल. ॰विंड-न. (राजा.) हाता झालणा पहा. ॰विरजण-न. अजमासानें घातलेलें विरजण ॰विरजा-विरंगुळा-वि. कामांत मदत करण्याच्या लायक, लायकीस झालेला (पुत्र, शिष्य, उमेदवार इ॰) [हात + विरजणें] ॰शिंपणें-न. सोडवणी न देतां शेलणें इ॰ साधनानें भाजी- पाल्यास उडवून द्यावयाचें पाणी; असें पाणी शिंपणें. ॰शेकणें-न. (उसाचा चरक) चुलाण्यांत जाळ घालणारास त्याच्या मेहनती बद्दल द्यावयाचा गूळ. ॰शेवई-स्त्री. हातानें वळलेली शेवई; याचे उलट पाटशेवई. ॰सर-न. बायकांचा हातांतील एक दागिना, गजरा. 'हे पाटल्या हातसरांस ल्याली ।' -सारुह ६.२६. ॰सार- वण-न. खराटा, केरसुणी न घेतां हातानें जमीन इ॰ सारवणें. ॰सुख-न. १ दुसर्‍यास, शत्रूस हातानें मारूंन त्यामुळें अनुभवि- लेलें सुख (क्रि॰ होणें). २ हातानें दिलेला मार. ॰सुटका-स्त्री. १ एखाद्या व्यवहारांतून, धंद्यांतून स्वतः अंग काढून घेणें; मोकळें होणें. २ हातविरजा पहा. ३ हाताचा सढळपणा. ॰सुटी-स्त्री. औदार्य. 'हे हातसुटीक्षीरसागरा । वांचौनि नाहीं ।' -भाए ७६९. ॰सुतकी-स्त्री. पाथरवटाचें दगड फोडण्याचें हत्यार. ॰सूत-न. चातीवर हातानीं काढलेलें सूत. ॰सोकी(के)ल-सोका-वि. हाताच्या संवयीचा; अंगाखांद्यावर घेण्यास संवकलेला. 'केल कुत्रा हातसोंका ।' 'घडो नेदि तीर्थयात्रा.' -तुगा २९५४. ॰सोडवण-नस्त्री. हातसुटका अर्थ १,२ पहा. ॰सोरा-र्‍या सुरा-र्‍या-पु. कुरड्या इ॰ करण्याचा सांचा. ॰हालवणी-स्त्री. प्रवाशांवरील एक जुना कर (त्यांच्या हात हालवण्याच्या क्रियेबद्दल हा कर असे). हातचा-वि. १ हातानें दिलेला; स्वाधीनचा; हातांतला; हातानें निर्मिलेली, मिळविलेली, दिलेली (वस्तु, काम, उत्पादन इ॰). 'शुद्राचे हातचें पाणी स्नानसंध्येस घेऊं नये.' 'रोग्यास औषध देणें मनुष्याच्या हातचें आहे-आयुष्य घालणें नाहीं.' २ (अंकगणित) पूर्णांकाची बेरीज करतांना बेरजेच्या संख्येंतला अंक ज्या स्थानाचा त्या स्थानीं मिळविण्याकरितां उरलेला अंक. (क्रि॰ येणें; रहाणें; ठेवणें). ३ लवकर हातीं येणारें; अवसानांतील. ४ ताब्यांतील; कबजांतील. म्ह॰ 'हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये.' ॰चा पाडणें-१ हातां- तील सोडणें. २ एखाद्यास त्याचे ताब्यांतील वस्तू्स मुकविणें. ॰चा-धड-नीट-वि. नीटनेटकें काम करणारा (लेखक, कारागीर). ॰चा फोड-पु. फार प्रिय माणूस. तळहाताचा फोड पहा. ॰चा मळ-पु. सहज घडणारी गोष्ट. 'सरळ, सोपी आणि बालिकाबोध भाषा कशी वापरावी हें म्हणजे माझ्या हाताचा मळ आहे.' -कीच. ॰चा सुटा-वि. सढळ हाताचा. हातवा-पु. १ (बायकी) गौरीपूजनाचे सणांत हळदीकुंकवानें हात भिजवून जमिनीवर छाप मारणें. २ लग्नांत नवर्‍याच्या मिरवणुकीच्या मागें धरावयाचा कणकेचा दिवा. ३ घोड्याचा खरारा, साफ करण्याचा काथ्याचा पंजा. ४ काडवात मनको. ५ (कर्‍हाड) न्हाणवली बसवितांना, मखर बांधावयाचे ठिकाणीं, कुंकू पाण्यांत भिजवून हातानें पांच उलटे पांच सुलटे ठसें उठविणें. हातळ, हाताळ-ळु-वि. चोरण्याची संवय असलेला; चोर; भामटा. हातळणें, हाताळणें-उक्रि. १ हात लावणें; चोळ- वटणें; चिवडणें, २ हाताळ माणसानें वस्तू् चोरणें. हातळी, हाताळी, हाताळें-स्त्रीन. १ घोड्याचा काथ्या इ॰ चा खरारा. २ भात्याची बोटांत, हातांत अडकवावयाची चामड्याची वादीं. ३ (कर.) भाकरी. हाता-पु. हातांत राहील इतका जिन्नस, पसा (फळें, फुलें इ॰ पांच-सहा इ॰ संख्येचा संच एकेक वेळ हातांत घेऊन बाजूस ठेवतात). हाताखालचा-वि. १ मदतनीस; हाता- खालीं काम करणारा. २ उत्तम परिचयाचा; माहितींतील. ३ हातां- तील; कबज्यामधील; स्वाधीन. ४ दुय्यम; कमी दर्जाचा. हाता- खालीं-क्रिवि. १ सत्तेखालीं; दुय्यम प्रतींत. २ स्वाधीन. ३ जातांजातां; हातासरशीं; सहजगत्या. 'मी आपला घोडा विका वयास नेतोंच आहे, मर्जीं असली तर हाताखालीं तुमचाहि घोडा नेईन आणि विकीन.' हाताचा उदार, मोकळा, सढळ- वि. देणगी इ॰ देण्यांत सढळ. हाताचा कुशल-वि. हस्त कौशल्यांत निपुण, प्रवीण. हाताचा जड-बळकट-थंड-वि. १ चिक्कू; कृपण. म्ह॰ हाताचा जढ आणि बोलून गोड. २ मंद (लेखक). हाताचा जलद-वि. काम करण्यांत चलाख हाताचा फटकळ-वि. फटाफट मारणारा; मारकट. हाताचा बाण-पु. वर्चस्व, पगडा, वजन पाडणारें कृत्य, गोष्ट (क्रि॰ गमावणें; दवडणें; सोडणें). हाताजोगता-वि. १ हातांत बसेल; मावेल; धरतां येईल असा. २ हात पोहोचण्याजोगें. हाता- निराळा-वेगळा-वि. १ पूर्ण; पुरा; सिद्ध केलेला; पुन्हां हात लावण्याची जरूरी राहिली नाहीं असें (काम, धंदा इ॰). 'हा दुर्निवह कोश एकदां हातानिराळा झाला म्हणजे दुसरें काम घेतां येईल.' २ -क्रिवि. एकीकडे; बाजूस. 'कामापुरती भांडीं वहिवाटींत ठेवा वरकड हातानिराळीं ठेवा.' हातापद्धति-स्त्री. दलाल माल घेणार्‍याच्या हातावर रुमाल टाकून गुप्तरीतीनें मालाची किंमत माल घेणार्‍याकडून अजमावतो ती पद्धत. हाताची थट्टा-स्त्री. थट्टेंनें मारणें (थापटी इ॰); चापट देणें. (तोंडी थट्टा नव्हे्). हाता(तो)फळी-स्त्री. गुद्दागुद्दी; मारामारी; कुस्ती; हातझोंबी; धक्काबुक्की. 'मजसीं भिडे हातोफळी ।' -ह १९.१४३. -क्रिवि. पटकन्; चट्दिशी; तत्काळ; हातावर हात मारून. [हात + फळी] हातावरचा संसार-हातावरचें पोट-पुन. मजुरी, कामधंदा करून स्वतःचें कसेंतरी पोट भरणें (क्रि॰ करणें; चालविणें) थोड्या पगाराची, कष्टाची नोकरी करून उदरनिर्वाह. हातावीती- क्रिवि. हातोहात पहा. 'सर्वज्ञ हातावीती पुढें जाती ।' -पुच. हातासन-न. हातवटी. 'अन्योपदेशाचेनि हातासनें ।' -ज्ञा ६.११९. हातासरसां-क्रिवि. त्याच हातानें, प्रकारानें; तसेंच; त्याच बरोबर; चालू कामांत आहे तोंच. 'उष्टी काढतो आहेस तों हातासरशीं भांडीं घास मग हात धू.' हातिणें-अक्रि. मारणें. -मनको. हातिवा-स्त्री. काडवात. 'उजळोनि दिव्य तेजा हातिवा ।' -ज्ञा १६.२३. हातुवसीया-विय एक हात अंतरा- वरील. 'हातवसिया कळागंगा पार्वती ।' -धवळे ३१ हातोणी- स्त्री. (व.) खरकटें पाणी; हातवणी. हातोपा-हातपा पहा. हातोपात-ती-क्रिवि. एका हातांतून दुसर्‍या हातांत. वरचेवर; हातोहात. -ज्ञा १८.१५६. हातोरी-क्रि. (ना.) हातानें; साहा- य्यानें. हातोवा-पु. (महानु.) अंजली; ओंजळ. 'हातोवा केवि आटे अंभोनिधि ।' -भाए २१७. हातोसा-पु. मदत; हातभांर. (क्रि॰ देणें), हातोहात-ती-क्रिवि. १ हातचेहातीं; हातोपात. २ चटकन्; भरदिशीं. (क्रि॰ येणें = मारामारी करणें). 'हिंवांळ्याचे दिवसांत दुपार हातोहात भरतें.' हातोळा-हात- वळा पहा. हातोळी-स्त्री. (व.) लग्न. हात्या-पु. १ पाणर- हाटाचा दांडा. २ घोडा घासण्याची पिशवी; खरारा. हाताळी अर्थ १ पहा. ३ मागाच्या फणीची मूठ. ४ काहिलींतील गूळ खरवड- ण्याचें खुरपें. ५ (कर.) मोठी किल्ली.

दाते शब्दकोश

राजा

पु १ नृप; नृपति; भूपाल; नरेंद्र; छत्रपति; लहान राज्यें व थोडक्या प्रजा असलेलें संस्थानिक व सरदार यांसहि हा शब्द लागतो. २ (मंडळीचा, टोळीचा) नायक; मुख्य. ३ सजातीय पदार्थसमुच्चयांत श्रेष्ठ मानलेला तो. ४ अन्न, वस्त्र इ॰ पदार्थ यथास्थित असल्यामुळें ते मिळविण्याचे कष्ट किंवा काळजी ज्यास करावी लागत नाहीं असा मनुष्य. ५ गंजिफांच्या बांजूतील मुख्य. पत्त्यांतील एक चित्राचें पान. ६ बुद्धिबळाच्या खेळांत डावांतील मुख्य मोहरा. ७ वर्षांचा शास्ता म्हणून मानलेला ग्रह; वर्षेशग्रह. ८ (ल.) वेडा; मूर्ख; स्वेच्छ वर्तन करणारा मनुष्य. ९ कसरीच्या राणीस म्हणतात. (समासांत) राजपत्नी; राजपुत्र; राजकन्या; राजगुरु; राजपुरोहित; राजोपाध्याय; राजसभा इ॰ ह्याचे मराठी शब्दाशींहि समास झाले आहेत. जसें- राजपसंत; राजदरबार इ॰. राजपद उत्तरपदीं येणारे नायक या अर्थाचे कांहीं सामासिक शब्द- मृगराज = मृगश्रेष्ठ; तीर्थराज = तीर्थांपैकीं मुख्य, सागर किंवा प्रयाग; तसेंच गजराज; सर्पराज; अश्वराज; द्विजराज; देवराज; कविराज; वैद्यराज; पंडितराज; स्वामिराज; गणराज; भूतराज; यक्षराज; वनराज (आपटा किंवा शमी), वृक्षराज, राज- पद पूर्वंपदीं असलेले कांहीं सामासिकशब्द-राजक्रांति; राजशोभा; राजकृपा; राजचित्त; राजमित्र; राजप्रिय; राजाश्रय; राजाश्रित; राजबुद्बि; राजसखा; राजरंग; राजमहाल; राजवटी इ॰. [सं. राज् = प्रकाशेणें] (वाप्र.) राजापासून रंकापर्यंत-श्रीमंतापासून तों गरीबापर्यंत; सर्व दर्जाच्या लोकांत. 'ब्राह्मणाला राजापासून रंकापर्यंत मान मिळत असे.' राजा याचें राज असें रूप होऊन झालेले कांहीं सामाशब्द- ॰अंबीर-पु. १ (शृंगारिक काव्य) गंभीर स्वभावाचा, सभ्य नायक. -वि. बादशाही; भव्य; नामी; उत्कृष्ट (मनुष्य, देश, पोषाख, बोलण्याची ढब, कोणतीहि गोष्ट). [सं. राजा + अर. अमीर] ॰आवळी-स्त्री. आवळीचा एक प्रकार. या झाडास फळें लहान येतात. हीसच हरपररेवडी, रानआवळी असेंहि म्हणतात. ॰कडी-स्त्री. विशिष्ट प्रकारची कानांतील कडी; एक कर्णभूषण. ॰कवि-पु. दरबारी कवि. [सं.] ॰काज-कारभार- नपु. राज्यकारभार; राज्यासंबंधीं सर्व प्रकारचें काम. ॰कारण- १ राज्यासंबंधीं मसलत; खोल व गूढ मसलत, कल्पना. 'राज- कारण बहुत करावें ।' -दा ११.५.१९. २ गुप्त निमित्त, गूढ (एखाद्या गोष्टीचें). 'भिंतीस किती सारवलें, लिंपिलें तरी चीर पडते याचें राजकरण कांहीं समजत नाहीं.' ३ शासनसंस्थे- संबंधीं गोष्टी; राजनीती; (इं.) पॉलिटिक्स. 'बिझांटबाई तरुण मुलांनीं राजकरणांत पडूं नये असें सांगतात.' -केले १.१९. ॰कारणी-वि. खोल मसलत कारणारा; मुत्सद्दी. ॰कारभार- पु. राज्यव्यवस्था. ॰कारस्थान-न. राजकीय मसलत, कल्पना, बेत, चतुराई; राज्याची मसलत. ॰कार्य-न. १ राजकीय कर्तव्यें, काम; राज्याचीं कामें. २ राजाचें काम. ३ राजाचें शासन, कायदा, कृत्य. [सं.] ॰किंकर-पु. राजाचा चाकर; सरकारी नोकर, शिपाई, जासूद इ॰ [सं.] ॰किशोर-पु. राजाचा मुलगा. [सं.] राजकी-पु. राजाचा नोकर. 'राजकी म्हणती आमुचें घर ।' -दा १.१०.४६. -वि. राजापासून उत्पन्न होणारी; राजाच्या संबंधाची (सत्ता, जुलूम, कृत्यें). याच्या उलट देवकी. 'दुसर्‍या राज्यांत गेल्यानें राजकी उपद्रव टाळायास येईल पण देवकी उपद्रवापुढें उपाय चालत नाहीं.' [राजीक] राजकीय- वि. राजासंबंधीं; राजाचा; राजविषयक (व्यवहार, कारभार, मनुष्य इ॰) [सं.] ॰कीय कैदी-पु. राजद्रोहामुळें तुरुंगांत कद केलेला राजकरणी पुरुष; सरकारविरुद्ध अराजकता माजविणारा म्हणून कैद केलेला मनुष्य. ॰कीय बंदी-पु, सरकारी कैदेंत अडकलेला कैदी; राजद्रोही बंदिवान. ॰कीय व्यवहार-पु. १ राज्याचें काम. २ राजनीति. [सं.] ॰कीय सभा-स्त्री. राजका- रणासंबंधीं सभा; (इं.) पोलिटिकल मिटिंग. 'क्वचित एखादा सरकारी नोकर आपल्या मुलांना राजकीय सभांना जाण्यास प्रति- बंध करतो.' -केले १.२३३.[सं.] ॰कुमर-कुंवर-री- कुमारी-स्त्री. राजाची कन्या. [प्रा.] ॰कुमार-कुंवर-पु. १ राजाचा मुलगा; राजपुत्र. २ पुनर्वसु नक्षत्र. [सं.] ॰कुल-न. राजघराणें; राजवंश. [सं.] ॰केळ-ळी-ळें-स्त्रीन. केळीची एक जात व तिचें फळ. ॰क्रांत-क्रांती-स्त्रीन. १ राज्याची उलथापालथ; राज्यव्यवस्थेंत मोठी उलाढाल, खळबळ, बदल. २ युद्ध, शत्रूचें आक्रमण इत्यादीमुळें माजलेली गडबड, गोंधळ, वगैरे नासधूस. ३ राजाचा जुलूम, अन्याय. [सं.] ॰गादी-स्त्री. राजाची गादी; सिंहासन. ॰गुह्य-न. राजाचें किंवा राज्यासंबंधीं गुपित, गुढ; गुप्त गोष्ट. ॰गोंड-स्त्री. (शहराचा, गांवचा) मोठा रस्ता. ॰गोंड-पु. गोंडांतील एक श्रेष्ठ जात. ॰गोंडा-पु. पाल- खीच्या दांडीला मध्यभागीं लोंबता बांधलेला, हातांत धरावयाचा गोंडा. ॰घोस-स्त्री एक वेल. हिच्या पानांच्या काढ्याचा देवी इ॰ आजारांत उपयोग करितात. ॰घोळ-स्त्री. घोळ नामक भाजीची एक जात. ॰चिन्ह-न. १ राजेपणाचें चिन्ह; राजाचें छत्र, चामर इ॰ वैभव. २ (सामुद्रिक) नशीबीं सिंहासनावर बसण्याचा योग आहे असें दाखविणारी खूण, लक्षणविशेष किंवा विशेष गोष्ट. (आजानुबाहुत्व इ॰) ३ राजाची मोहोर, शिक्का, किंवा सही (नाणें, पत्र इ॰ कांवरील). ४ (राजाच्या सह्या अस्पष्ट, वाचण्यास कठिण असतात यावरून ल.) फरपट्यांचें, बिरखुडी, वाईट लपेटीचें, दुर्बोध अक्षर. [सं.] ॰टिटवी-स्त्री. पिवळसर रंगाची टिटवी. ॰तिलक-पु. १ राजांमध्यें श्रेष्ठ; सार्वभौम राजा. २ राजाटिळा. ३ राज्याभिषेक. [सं. राजा + तिलक] ॰तुरा-पु. एक फुलझाड व त्याचें फूल. ॰तेज-न. राजाचें तेज, वैभव, ऐश्वर्य. [सं.] ॰तख्त-न. १ राजाचें सिंहासन. २ राजधानी. 'किल्ला रायगड राजतख्त.' -चित्रगुप्त १६७. ॰त्व-न. राजेपणा; राजाधिकार; राजपद. [सं.] ॰दंड-पु. १ राजानें केलेली शिक्षा. २ राजानें बलविलेला दंड. ३ जातिबहिष्कृत केलेल्या मनुष्यास जातींत परत घेतांना त्यानें राजास द्यावयाचा दंड. ४ राजाच्या हातांतील अधिकारदर्शक काठी. ॰दंत-पु. चौकडीचे दांत; पदार्थ तोडावयाचे दांत; पुढील दांत. [सं.] ॰दरबार-१ राजाची कचेरी; न्यायसभा. २ प्रजेचीं गार्‍हाणीं ऐकण्याकरितां बसावयाची राजाची जागा. ॰दरबारी-वि. राज्यासंबंधी. ॰दर्शन-न. राजाचें दर्शन; राजाची भेट. 'राजदर्शन म्हणजे मोटा लाभ.' [सं.] ॰दुहिता-स्त्री. राजाची मुलगी. 'वर शिशुपाळ ऐकतां । दचकली ते राजदुहिता ।' -एरुस्व २.४१. [सं.] ॰दूत-पु. राजाची नोकर हुजर्‍या, सेवक; जासूद. [सं.] ॰द्रोह-पु. १ सरकाराबद्दल अप्रीति; राजाविरुद्ध कट, बंड; फितुरी. २ राज्य व राजसत्ता याविरुद्ध गुन्हा. ३ (कायदा) बादशाहाविरुद्ध किंवा ब्रिटिश अमलाविरुद्ध द्वेष, तिरस्कार किंवा बेदिली बोललेल्या किंवा लिहिलेल्या शब्दांनीं किंवा खुणानीं किंवा इतर रीतीनीं उत्पन्न करणें; (इं.) सिडिशन्. ॰द्वार-न. १ न्यायाच्या कचेरीचा राजवाडा; राजदरबार. २ राजवाड्याचा दरवाजा. [सं.] ॰धन- न. राजाचा महसूल, उत्पन्न. [सं.] ॰धर्म-पु. १ राज्यकारभार चालविण्याकरितां मार्गदर्शक असा शास्त्रांत सांगितलेला कायदा, अनुशासन. २ राजास योग्य किंवा शोभणारा गुण, राजगुण. कार्योपदेशकैशल्य, प्रागलभ्य इ॰). 'जे राजधर्म सुरतरू सख मखसे सुखद उत्सवद नाकीं ।' -मोसभा १.१५. ३ राजाचें कर्तव्य विशेष काम. [सं.] ॰धातु-पु. कित्येक कवींनीं लोखंडास हें नांव दिलें आहे । ॰धानी-नगरी-स्त्री. राजाचें राहण्याचें मुख्य शहर. [सं.] ॰धान्य-न. एक धान्य; सांवा. [सं.] ॰धारी- पु. एक प्रकारचा तमाशा. -कलावंतखातें (बडोडें) १३८. ॰निष्ठ- स्त्री. राजाविषयीं, सरकाराविषयीं आदर दाखविणारा. ॰निष्ठा- स्त्री. राजासंबंधीं, सरकारसंबंधीं आदर, पूज्यबुद्धि. 'राज्यपद्धतीं- तील दोष अधिकार्‍यांच्या नजरेस आणणें हीच खरी राजनिष्ठा.' -टिसू २१५. [सं.] ॰नीति-स्त्री. १ राजव्यवहारशास्त्र. आन्वी- क्षिकी किंवा तर्कविद्या, त्रयी किंवा धर्म विद्या, वार्ता किंवा अर्थ- विद्या व दंडनीति असे चार राजनीतीचे भेद आहेत. २ नीति; नीतिशास्त्र. [सं.] ॰नील-नीळ-न. नीलमणी. [सं.] पंचक- न. ज्यांत राजपासून जुलूम किंवा नासधूस होते असा ज्योति- षीय गणितानें येणाके काल. अग्निपंचक, चौरपचक, मृत्युपंचक, हानिपंचक इ॰ पहा. [सं.] ॰पट्ट-पु. राजाचा शित्ताज; राजाचें ललाटपट्ट. [सं.] ॰पत्नी-स्त्री. राजाची स्त्री; /?/. [सं.] ॰पत्र-न. राजाचें पत्र; देणगीपत्र; सनद. 'ब्राह्मण स्थापिले वृत्ति- क्षेत्रीं । ते ते अक्षयीं राजपत्रीं ।' -मुसभा ६.५६. [सं.] ॰पद- न. राजाचा अधिकार, दर्जा; राजत्व. ॰पद्धति-त-स्त्री. राजास योग्य अशी रीति, चाल, वहिवाट. [सं.] ॰पसंत-द-वि. राजे व अमीर उमराव यांस असणारा; सर्वोत्कृष्ट; उंची; खासा; नामी. [सं. राजा + फा. पसन्द] ॰पिंडा-पु. देखणा व छबी- दार मनुष्य; राजबिंडा. [सं. राजा + पिंड] ॰पीठ-न. १ राजाचें आसन; राजाचें सिंहासन. २ राजाधानीचें शहर. [सं.] ॰पीढी- पु. (महानु.) राजपुरुष. 'रवमदें पातले राजपीढी ।' -गस्तो ४६. [राजा + पिढी] ॰पुत्र-पु. १ राजाचा मुलगा. २ क्षत्रिय. [सं.] ॰पुरी-स्त्री. बादशाही शहर; राजधानी. [सं.] ॰पुरुष-पु. १ सरकारी अधिकारी, नोकर. २ राजाच्या चाकरींतील कोणीहि लहान- मोठा मनुष्य. [सं.] ॰बंदी-पु. राजकैदी; राजकीय गुन्हेगार, बंदिवान. ॰बनसी-वि. राजवंशाचा. हा हिंदुस्थानी शब्द मराठी लावण्यांतून नेहमीं येतो. [राजवंशी; हिं. राजबनसी] ॰बाबती- स्त्री. राजास द्यावयाचा वसुलाचा चौथा भाग. चौथ पहा. ॰बिडा- वि. अतिशय सुंदर व नाजुक पुरुषास म्हणतात; राजसारखा अथवा अत्यंत देखणा; सुंदर आणि तेजस्वी (मनुष्य). [राजा + पिंड] ॰बिदी-स्त्री. राजमार्ग. 'इंद्रियग्रामींचा राजबिंदी ।' -ज्ञा ७.१०६. ॰बीज-वि. १ राजाच्या बीजाचा, वंशाचा. २ (ल.) सुस्वभावी व सुंदर मुलास म्हणतात. ॰बीध-स्त्री. (शहराचा) मुख्य; मोठा रस्ता; राजबिदी. ॰बेत-(को.) राजदंड. [राज वेत्र] ॰भाग-पु. राजाचा भाग; सरकारस द्यावयाचा कोणत्याहि उत्पन्नाचा भाग. [सं.] ॰भार्या-भाजा-स्त्री. राजाची पत्नी; पट्टाभिषिक राणी. 'येरु बोले पाहीन पिता माझा । नको जाऊं मारील राजभाजा ।' -ध्रुवाख्यान ४ (नवनीत पृ. ४११). [सं.] ॰भोग-पु. सरकारचा हक्क. [सं.] ॰भ्रष्ट-वि. राज्यावरून निघा- लेला. ॰मंडल-ळ-न. १ राजांचा समुदाय. २ राजकीय मंडल; राजभृत्य; राजपुरुष; बादशाहा भोंवतालचे अमीरउमराव इ॰ [सं.] ॰मंत्र-पु. राजाचा बेत, उद्देश. [सं.] ॰मद-पु. राज्याचा गर्व, दर्प. [सं.] ॰मंदिर-न. १ सौध; राजवाडा. २ (लावणी, शृंगारविषयक काव्य इ॰ कांत) विलासंमदिर; रंगमहाल; अंत: पुर इ॰ [सं.] ॰महाल-पु. राजवाडा. ॰मान्य-वि. १ राजानें मान देण्यास योग्य; पूज्य; श्रेष्ठ; वरिष्ठ; २ ज्याला पत्र पाठवा- वयाचें असतें किंवा ज्याचा उल्लेख करावयाचा असतो त्याला सन्मानार्थ कागदोपत्रीं हें विशेषण लावतात. ३ सर्वांस पसंत पडेल असें. 'हा एक राजमान्य उपाय आहे ।' [सं.] ॰मार्ग- पु. १ राजाचा हमरस्ता; सार्वजनिक रस्ता. २ (ल.) सर्व लोकांनीं मान्य व पसंत केलेली चाल, वहिवाट, रहाटी. [सं.] ॰माष-पु. एक कडधान्य. [सं.] ॰मुद्रा-स्त्री. १ राजाची मोहार; चिता शिक्का; ठसा. २ राजाच्या छापाचें नाणें. [सं.] ॰मोहरा-मोहोरा-वि. १ शहाणा; शूर किंवा विद्वान् (मनुष्य); विद्या, शौर्य इ॰ गुणांनीं प्रसिद्ध असलेला, तेजस्वी (पुरुष). 'या राज्यांत नानाफडनवीस एक राजमोहरा होता.' २ देखणा व छबीदार (मनुष्य); राजबिंडा. ॰यश-न. राजाचें, राज्याचें यश; कीर्ति. 'राजयश वर्णितां वर्णितां भाट शिणले ।' [सं.] ॰यक्ष्मा- पु. क्षयरोगाचा एक भेद; कफक्षय. [सं.] ॰योग-पु. १ हठयो- गाहून भिन्न असा योगाचा साधा व सोपा प्रकार; प्राणनिरोध इ॰ न करितां अंत:करण एकाग्र करून भगवत्स्वरूपीं लावण्याचा उपाय. 'राजयोगतुरंगीं । आरूढला ।' -ज्ञा १८.१०४७. २ राज्य मिळ- वून देणारा पत्रिकेंतला ग्रहयोग. ३ श्रेष्ठ, सर्वोत्कृष्ठ योग; प्रापं- चिक वैभव व संपत्ति हीं उपभोगीत असतांहि त्यांहून आत्म्याची भिन्नता ओळखून आत्मचिंतनाचा अभ्यास चालू ठेवणें. [सं.] ॰योगी-पु. राजयोग करणारा मनुष्य; हठयोगीच्या उलट. [सं.] ॰रा-स्त्री. (नेहमीं अनेकवचनी उपयोग) कुलाचारच्या प्रसंगीं तबकांत ठेविलेल्या देवीच्या सात मूर्ती. [सं. राजश्वेरी = एक देवी] ॰राज-पु. राजाधिराज; राजांचा राजा; बादशाहा. [सं.] ॰राजेश्वर-पु. सम्राट; बादशाहा; सार्वभोमराजा. [सं.] ॰राणी- स्त्री. राजाची मुख्य पत्नी; पट्टराणी. [सं.] ॰रीति-स्त्री. १ राजांस योग्य अशा रीति, पद्धति, सरणी, मार्ग. २ सर्वमान्य पद्धति. [सं.] ॰रु(रो)शी-स्त्री. सार्वजनिक आणि स्वतंत्र परवानगी; उघड व पूर्ण स्वतंत्रता; मुभा. 'पोरांस सुटीच्या दिवसीं खेळायास राजरूशी असती.' [सं. राजा + फा. रूशन] ॰रू(रो)स- श-ष-क्रिवि. उघडपणें; प्रसिद्धपणें; स्वतंत्रपणें; अनियंत्रितपणें; बेधडक. 'तो राजरोस इराणीच्या दुकानांत जाऊन चहा पितो' २ दिवसाढवळ्या. [सं. राजा + फा. रूशन, रोशन्; रोश-इ-रौशन] राजर्षि-पु. तपश्चर्येनें ज्यानें ऋषि ही उच्च पदवी मिळविली आहे असा क्षत्रिय; तपस्वी क्षत्रिय; राजांमधील ऋषि. 'राजर्षि महर्षि सकळ येथें न्यूनाचि भूमिपाळ सभा ।' -मोसभा १.१०. [सं. राजा + ऋषि] ॰लव्हा-न. १ पक्षिविशेष. याचे मोठा व लहान असे दोन भेद आहेत. ॰लक्षण-न. १ राजत्वाचें सूचक एखादें स्वाभाविक चिन्ह. २ (छत्र, चामर इ॰) राजाचिन्हांपैकीं कोणतेंहि चिन्ह. [सं.] ॰लेख-पु. राजाचें पत्र; सनद. [सं.] ॰वट-वटा-टी-पुस्त्री. १ एखाद्या राजाचा, राज्याचा, अंम- लाचा, कारकीर्दीचा काल; कारकीर्द. 'विक्रमाचे राजवट्यांत सर्व लोक सुखी होते.' २ अंमलाचा, वजनाचा काल; (सामा.) चलतीचा काल. ३ सामान्य चाल, रीत, संप्रदाय, वहिवाट. 'आमचा सकाळीं जेवण्याचा राजवटा नाहीं.' -क्रिवि. राज्यांत; अमलांत; कारकीर्दीत. 'वडिलांचे राजवटा ही गोष्ट घडली नाहीं.' [राज्य + वर्ति] ॰वंटा-पु. हमरस्ता; राजमार्ग. [राजा + वाट] राजवर्खी बांगडी-स्त्री. एक प्रकारची बांगडी. ॰वंश-पु. राजाचें कुल. [सं.] ॰वंश्य-वि. राजाच्या कुळांतील, वंशांतील. [सं.] ॰वनसी-वि. राजघराण्यांतील. [सं. राजवंशी] ॰वळ, राजावळी-स्त्री. राजाचीं अक्षरें (सही); राजाचा शिक्का; राजमुद्रा. 'तर्‍ही राजावळीचीं अक्षरें ।' -ज्ञा १७.३२२. ॰वांटा-पु. १ मुख्य वांटा, मोठा हिस्सा. 'तो सुखदु:खाचा राजवांटा ।' -ज्ञा ८.१८४. २ राजाचा भाग. ॰वाडा-पु. राजाचा वाडा; राजमंदिर; प्रासाद. ॰विद्या-स्त्री. सर्व विद्यांमध्यें श्रेष्ठ विद्या. 'या दोन्ही कारणांमुळें राजविद्या शब्दानें भक्तिमार्गच या ठिकाणीं विवक्षित आहे असें सिद्ध होतों.' -गीर ४१५. [सं.] ॰विलास-पु. राजाचीं सुखें व करमणुकी; उच्च प्रकारचीं सुखें व क्रीडा. [सं.] ॰विलासी-वि. राजासारखीं सुखें भोगणारा; राजविलास करणारा; राजविलासांचा शोकी. [सं.] ॰वेत्र-न. राजदंड. [सं.] ॰वैद्य-पु. १ वैद्यशास्त्रपारंगत असा उत्तम वैद्य. २ राजाचा वैद्य. [सं.] ॰व्रत बांगडी-स्त्री. बांगडीची एक जात. ॰शक-पु. ज्येष्ठ शुद्ध १३, आनंदनाम संवत्सर, शके १५९६. या वर्षी शिवाजी महाराजांनीं आपल्या राज्योराहणानिमित्त सुरू केलेला शक. कोल्हापूर व इतर कांहीं संस्थानांत हा चालतो. [सं.] ॰शय्या-स्त्री. सिंहासन; राजाची शेज. [सं.] ॰शासन-न. १ राजाची आज्ञा. २ राजा अपराध्यांना जें शासन करतो तें. [सं.] ॰शोभा-स्त्री. राजाची शोभा; राजाचें तेज, कांति इ॰. [सं.] ॰श्रियाविराजित-वि. १ राजाच्या तेजानें व शोभेनें विभूषित; लक्ष्मीनें राजासारखा सुशोभित असा. २ बरोबरीच्या गृहस्थास पत्र लिहावयाचें असतां त्याच्या सन्मानार्थ हा शब्द त्याच्या नांवापूर्वीं विशेषणाप्रमाणें योजतात; पत्राचा मायना. [सं.] ॰श्री-पु. १ राजाची पदवी; राजाचें वैभव; राजासंबंधीं बोलतांना सन्मानार्थ योजावयाचा शब्द. 'एव्हां राजश्रीची स्वारी कचेरीस आहे.' २ सामान्य माणसास पत्र लिहितांना त्याच्या नांवांपूर्वीं हा शब्द आदरार्थं योजतात. ३ (विनोदार्थी) विचित्र, तर्‍हेवाईक माणूस. ४ (सामा.) गृहस्थ. 'आतां हे राजश्री माज्या भीमास पाणि लावून ।' -मोस्त्री २.२९. ॰सत्ता-स्त्री. १ राजाची सत्ता, कायदे- शीर अधिकार. २ राजाची थोरवी, कदर, भारदस्ती. [सं.] ॰सदन-न. राजवाडा. [सं.] ॰सभा-स्त्री. राजाची सभा, कचेरी; राजाचा दिवाणखाना; दरबार. [सं.] ॰स्थान-न. राजाची राहण्याची जागा. ॰सूय-पुन. सार्वभौम राजानें करावयाचा यज्ञ (हा यज्ञ सार्वभौमत्वाच्या द्योतनार्थ राज्याभिषेक समयीं मांडलिक राजांसह करावयाचा असतो). अथवा राजा (सोम- लता) याचें सवन, (कंडन) ज्यांत करताता तो यज्ञ. 'देवर्षि म्हणें नृप तो सम्राट् प्रभु राजसूयमखकर्ता ।' -मोसभा १.४६. [सं.] ॰हत्या-स्त्री. राजाची हत्त्या; खून. [सं.] ॰हत्यारा-वि. राज- हत्त्या-करणारा. ॰हंबीर-पु. राजअंबीर पहा. ॰हंस-पु. १ चोंच आणि पाय तांबडे व वर्ण पांढरा असा पक्षी. दूध व पाणी एकत्र केलीं असतां त्यांतून दूध तेवढें वेगळें करण्याची शक्ति याला आहे असें मानितात. 'राजहंसाचा कळप पोहताहे ।' -र ९. २ (लावण्या, शृंगारिक काव्य) प्रियकर; नायक. ३ एक झाड. हीं झाडें लहान भुइसरपट असतात; पानें बारीक व जोडलेलीं; यास तांबूस रगाचीं बारीक फुलें व बारीक शेंगा येतात. [सं.] राजांगण-गणें-न. १ राजाच्या, श्रीमंत लोकांच्या वाड्यापुढें रिकामी राखलेली मोकळी जागा. २ राजवाड्याच्या समोरचा चौक. ३ चौसोपी घरास मध्यें असलेलें चतुष्कोणी अंगण. 'पैस नाहीं राजांगणीं ।' -दावि ५०४. [सं.] राजागर-न. १ राजाचा बाग. 'सुटली तरी राजागरीं मरें ।' -एभा ११.५५८. २ रायभोग तांदुळाचें शेत. 'तेणें पिंकती केवळ राजागर ।' -एभा २७.२०२. ॰धिकार- पु. राजाचा अधिकार. [सं.] राजाधिपति, राजाधीश-पु. राजाधिराज. [सं.] राजाधिराज-पु. राजांचा राजा; सार्वभौम; अनेक मांडलिकांवरचा मुख्य राजा. [सं.] राजानुकंपा-स्त्री. राजाची कृपा, दया. [सं.] राजानुग्रह-पु. राजाची प्रसन्नता. [सं.] ॰पुरी-वि. राजापूर गांवासंबधीं (गूळ, हळद, भाषा इ॰). राजाप्रधान सोडणें-(बायकी) चातुर्मासांत भात व वरण हे मुख्य पदार्थ वर्ज्य करणें. राजाभिषेक-पु. राज्यारोहणप्रसंगीं महानद्या, समुद्र इ॰ कांचें पाणी आणून त्यानें अमात्य, पुरोहि- तादिकांनीं मिळून राजावर विधिपूर्वक अभिषेक करावयाचा, राजाला, गादीवर बसविण्याचा समारंभ. [सं.] राजाम्लक-की-पुस्त्री. रायआवळा-ळी पहा. [सं.] राजावर्त, लाजवर्द-पु. हलका, कमी प्रतीचा हिरा (इं.) लपिसलॅझूली. याचा मुख्य रंग निळा; कधीं तांबूस पिवळाहि सांपडतो. [सं.] राजावली-स्त्री. राजांची परंपरा; राजाचें घराणें; राजवंश. [सं.] राजावळ-स्त्री. १ तांदुळाची एक जात. २ तांबड्या रंगाच्या लुगड्याचा एक प्रकार. ३ वर्षाचा अधिपति; मंत्री इ॰ ग्रह दाखविणारा पचांगाच्या आरंभीचा भाग; संवत्सर फल. राजावळी-वि. राजानें काढ- लेली (ओळ). 'तर्‍ही राजावळीचीं अक्षरें ।' -ज्ञा १७.३२२. राजासन-न. राजाचें सिंहासन; तख्त. [सं.] राजाळूं-न. पांढर्‍या अळवाची जात. ह्याच्या पानाचा देठ लांब व जाड आणि कांदा मोठा असतो. राजाळें-न. केळ्याची एक जात. राजाज्ञा- पु. राजाच्या प्रधानांपैकीं (अष्टप्रधानांपैकीं नव्हे) एक. -स्त्री. १ राजाची आज्ञा, शासन. २ निखालस व खसखशीत हुकूम; आदेश; आज्ञा. राजिक-वि. राजकीय. 'राजिक देविक उद्वेग चिन्ता ।' -दा ११.३.५. राजी-स्त्री. गंजिफांतील शब्द; राजेरी देणी. [राजा] राजीक-न. १ राजाचा जुलूम; अन्याय; राजापासून उत्पत्र होणारीं सतटें व दु:खें; याच्या उलट दैविक. २ सैन्याच्या स्वार्‍यांमुळें होणारी नासधूस; धूळधाण. ३ राजाचें काम; लढाई व तिच्यामुळें होणारी अव्यवस्था. ४ क्रांति; बंड. [राजा] राजी बेराजी, राजीक बेराजिक-स्त्रीन. निर्नायकी; बेबंदशाही; एक राजा गादीवरून दूर झाल्यापासून दुसरा येईपर्यंतचा मधील काळ. [राजीक] राजेंद्र-पु. १ राजांचा राजा; बलाढ्य राजा. २ राजअंबीर. [सं.] राजेरजवाडे-पुअव. राजे; संस्थानिक; सरदार इ॰. राजेश्री-वि. १ राजश्री याचें अशुद्ध रूप. २ (ल.) मूर्ख माणुस. 'हे राजेश्री दुसर्‍याला तोंडघशी पाडण्याऐवजीं आप- णच पडेल.' -के २४.६.३०. राजेश्वरी-स्त्री. शिवाची अथवा ईश्वराची पत्नी; देवी. [सं.] राजेळ-ळी, राजकेळ-स्त्री. न. केळीची एक जात व फळ. हे केळें ६ ते १२ इंच लांब व तिधारी असतें. ह्याचीं सुकेळीं करतात. राजैश्वर्य-न. राजाचें ऐश्वर्य, वैभव, थाटमाट. [राजा + ऐश्वर्य] राजोट-टी, राजोटा-स्त्रीपु. राजवट; राजवटा पहा. राजोट्या-पु. १ कुटुंबांतील कर्ता पुरुष; घरांतील मुख्य कारभारी. २ (ना.) लुडबुड करणारा, चोंबडा मनुष्य. राजोपचार-पु. १ राजत्वास योग्य असे आदर, उपचार; राजास उचित असे उपचार (छत्र धरणें, चवरी-मोरचेल वारणें इ॰). २ सात्विक, सौम्य औषधयोजना, शस्त्रक्रिया इ॰ नाजूक प्रकृतीच्या माणसास सोसण्याजोगा ओषधादि उपचार. [सं. राजा + उपचार] राज्य-न. १ प्रजेपासून कर घेऊन तिचें पालन करणें असा राजाचा अधिकार किंवा काम. २ राजाचा अंमल; हुकमत. ३ राजाच्या सत्तेखालवा प्रदेश. ४ राष्ट्र; कायद्यानें राहण्यासाठीं संघटित झालेलें व एका विशिष्ट देशांत राहणारें लोक (ही व्याख्या वुड्रो विल्सन यांची आहे); किंवा एका ठराविक प्रदेशांत दंडशक्तीच्या सहा- य्यानें न्याय व शांतता प्रस्थापित करण्यासाठीं स्थापित केलेला मनुष्यांचा समाज. ५ कोणत्याहि व्यवहारांत दुसर्‍यास न जुमा- नतां स्वतंत्रपणें वागण्याजोगें एखाद्याचें आधिपत्य असतें तें. त्याचें घरांत सारें बायकांचें राज्य झालें आहें.' ६ खेळांतील डाव, हार. [सं. राजन्] ॰क्रांत-क्रांति-स्त्री. राज्याधिकार्‍यांत आणि राज्यपद्धतींत जबरदस्तीनें घडवून आणलेली उलथापालथ. [सं.] ॰घटना-स्त्री. राज्यव्यवस्थेसंबंधीं मूलभूत कायदे वगैरे. ॰घटना मोडणें-राज्यघटनेच्या कायद्यांत ज्या पद्धतीनें राज्य- कारभार चालवा असें नमूद केलें आहे त्याप्रमाणें कारभार चाले- नासा होणें. -के ५.१.३७. ॰घटना राबविणें-मंत्रिमंडळास जे अधिकार दिले आहेत त्यांचा उपयोग लोकहितवर्धनार्थ कराव- याचाच. पण प्रत्यक्ष कायद्याच्या कलमांतील शब्दानें जो अधिकार दिला नसेल तोहि प्रत्यक्ष व्यवहाराला आवश्यक म्हणून पर्यायानें दिला गेला आहे असें म्हणून त्यांचाहि पायंडा पाडणें.' -के ५.१.३७. ॰पद्धति-स्त्री. राज्यकारभाराचा प्रकार. हिचे राज- सत्ताक, प्रजासत्ताक व राजप्रजासत्ताक असे तीन प्रकार आहेत. [सं.] ॰भार-पु. राज्याचा कारभार करण्याची जबाबदारी, भार, ओझों. [सं.] ॰रीति-स्त्री. शासनपद्धति. 'ज्या राष्ट्राची राज्यरीति उत्कृष्ट आहे त्यास धनसमृद्धि अपायकारक होत नाहीं.' -नि ५३. ॰लोट-स्त्री. राज्यक्रांति; राज्य बुडणें. 'झालिया राज्य- लोट ।' -एभा ३०.३५९. ॰व्यवहार-पु. राज्याचें काम. [सं.] राज्यांग-न. राज्याचीं मुख्य अंगें. हीं स्वामी, अमात्य, सुहृत्, कोश, दुर्ग, राष्ट्र, व बल अशीं सात आहेत. यांतच कोणी पौर- श्रेणी व पुरोहित यांचा समावेश करतात. [सं.] राज्याभिलाष-पु. राज्याचा अभिलाष; दुसरे देश जिंकण्याची किंवा त्यावंर राज्य कर- ण्याची महत्त्वाकांक्षा. [सं.] राज्याभिलाषी-वि. राज्याचा अभि- लाष करणारा. [सं.] राज्याभिषिक्त-वि. सिंहासनावर बसविलेला; ज्यास राज्याभिषेक झाला आहे असा; राजश्रीनें युक्त केलेला. [सं.] राज्याभिषेक-पु. राजाला गादीवर बसविण्याच्या वेळीं विधिपूर्वक करावयाचा अभिषेक; राज्याधिकाराचीं वस्त्रें देणें. [सं.] राज्यासन-न. सिंहासन; राजासन पहा. [सं.] राज्योपचार- पु. सरकारी अधिकार्‍याचें कृत्य. [सं.]

दाते शब्दकोश