मराठी बृहद्कोश

सहा मराठी शब्दकोशांतील २,१८,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

घडा

पु. १ घागर; घट; मडकें. 'अवतरली गाडग्यां घडां । पृथ्वी अनोळख जाली मूढां ।' -ज्ञा १८.५४३. २ ताडाच्या पोंगीला (ताडी काढण्यकरितां) लावावयाचें गाडगें. ३ जम; घडी. -शर. [सं. घट; प्रा. हिं. पं. घडा; गु. सिं. घडो] (वाप्र.) घडा फोडणें-संकेत, खरें तत्व बाहेर सांगणें; ग्पुत गोष्ट प्रकट करणें. (एखाद्याचा) घडा भरणें-अपराधांची परमावधि होऊन शिक्षेस पात्र होणें.' त्याचा घडा भरला म्हणजे त्याला शासन होईलच होईल.' (आयुष्याचा) घडा भरणें- १ अंतकाळ जवळ येणें; आयुष्य संपणें. २ (ल.) अधिकाराची मुदत संपण्याच्या बेतांत येणें. (पापाचा) घडा भरणें-(पापपुण्यें सांठविण्यासाठीं घडें असतात या कल्पनेवरून) दुष्कृत्यांचा कळस होऊन त्यांचे फळ भोगण्याची वेळ येणें. (कच्या) घड्यानें पाणी भरणें-वाहणें-१ निष्फळ काबाडकष्ट करणें; निरर्थक उद्योग, मेहनत करणें. २ अतिशय हाल काढणें; कष्ट करणें. सामाशब्द-॰बाजी-स्त्री. दारू उडविण्याचा प्रकार; मडक्यांत फाटके, चिचुंद्र्या इ॰ ठांसून त्यांचा घडाका करणें; (प्र घडें- बाजी पहा.

दाते शब्दकोश

घडा m An carthen pitcher. घडा फोडणें Let the cat out of the bag. घडा भरणें Be ripe for reward or punishment. Be full, be on the point of expiring.

वझे शब्दकोश

घडा ghaḍā m (घट S through H) An earthen pitcher. 2 By eminence. The pitcher which is fastened to the पोगी or fruitstalk of a Palm, to receive the exuding liquor. कच्या घड्यानें पाणी भरणें or वाहणें (To fill or carry water in a raw pitcher.) To toil and fag to no purpose; to labor in the very fire; to have the work of Sisyphus. घडा फोडणें To let the cat out of the bag. घडा भरणें g. of s. (To have one's cup or measure full.) To be ripe for reward or punishment; to have reached the acme, crisis, highest pitch (of excellence or crime). 2 (आयुष्याचा &c.) To be full; to be on the point of expiring--the period of life, of holding an office &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

(सं) पु० मडकें, कुंभ, मातीची घागर.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

धडा

पु. (महानु) घडा; घागर. 'तोकैसादिसताए कांतळा । जैसा अमृतरसाचा ॐतिला । कीं श्रेष्ठेने धडा घातला । रेवांतासी ।' -शिशु ९९४.

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

घट

पु. १ पाणी इ॰ ठेवण्याचें भांडें; घडा; घागर (मातीची किंवा धातूची). 'जैसी भांडघटशरावीं । तदाकारें असे पृथ्वी ।' -ज्ञा १३.८७२. २ नवरात्रांत उपास्य देवतेजवळ पाण्यानें भरून ठेवलेली मातीची घागर; घडा; कलश; नवरात्र बसणें; विशेष प्रकारची देवीची पूजा. ३ (ल.) विश्व; ईश्वरानें निर्माण केलेलें यच्चयावत् जगत्; शरीर इ॰ सृष्ट जीव, पदार्थ. 'म्हणौनि प्राणिजाताच्या घटीं । करूनि कंदावरी आगिठीं ।' -ज्ञा १५.४०७. 'तें विस्तारिलें सर्व घटीं ।' ४ वाद्यविशेष. दक्षिण हिंदुस्थानांत मातीचा माठ पालथा घालून त्याच्या पाठीवर दोन्ही हातांनीं तबल्यासारखें वाजवून गायनाची साथ करतात. ५ नवरात्रांकरितां कुंभाराकडून मातीची घागर घेण्याचा हक्क. [सं. घट] (वाप्र.) घटीं बसणें-अक्रि. १ (नवरात्र इ॰कांत) आराध्य देवता घटावर अधिष्ठित होणें; देवतेची स्थापना होणें. २ घटस्थापन करणारा यजमान अथवा उपाध्याय यानीं घट असे- पर्यंत व्रतनियमानें असणें. ३ (ल.) (आजारामुळें-आळसानें किंवा कांहीं कारणानें) घरांत बसून असणें. ४ (स्त्रीनें) विटाळशी होणें; अस्पर्शपणामुळें निरुद्योगी बसून असणें. सामाशब्द- ॰क्रिया-स्त्री. (गो.) घटस्फोट पहा. 'तदनंपर हिंदूरीतिप्रमाणें विधियुक्त घट- क्रिया करून...' -राजकार ५. (गोमंतकांतील रीतिभाती, भाषां- तर १८८०.) ॰पट, घटंपटं-स्त्री. न. न्यायशास्त्रांत नेहमीं घट (घडा) व पट (वस्त्र) यांचीं उदाहरणें देण्याची चाल आहे. त्यांत घट व पट हे शब्द पुढील अर्थीं रूढ आहेत- १ फुशारकीचें- शेखीचें-चढाईचें-पोकळ ऐटीचें-भाषण. २ असंबद्ध. टाळाटा- ळीचे बोलणें; लप्पेछप्पे; थाप. ३ निष्कारण उरस्फोड; वाचा- ळता; व्यर्थ बडबड; माथाकूट; वितंडवाद; शब्दावडंबर. उ॰ (कवी निरंकुशतेचे भोक्ते असल्यामुळें नैयायिक व वैय्याकरणी यांनीं घातलेल्या भाषेवरील व्याकरणविषयक निर्बंधाच्या खटाटो- पास घटपट असें हेटाळणीनें संबोधितात. कवींना साहजिकच व्याकरणविषयक सूक्ष्म निर्बंध म्हणजे व्यर्थ उरस्फोड, माथाकूट आहे असें वाटतें). 'नलगे व्याकरणाची न्यायाची घटपटादि खटपट ती । वैकुंठ पेठ मोठी नामावरि हीनदीन खट पटती ।' -कीर्तन १.३७ [घट + पट] घटंपटा-स्त्री. (व.) खटपट; अवडंबर; लटपट; 'त्याच्या लग्नाच्या वेळीं मोठी घटंपटा झाली.' ॰भंग-पु. घटाचा नाश; घागर फुटणें. 'घटभगीं घटाकाशें । आकाश जेवीं ।' -ज्ञा १४.५४. ॰मठ-पु. १ घट आणि मठ. २ (ल.) सर्व सृष्ट वस्तू (ज्यांत पोकळ अवकाश आहे अशा) 'घटमठ नाम मात्र । व्योम व्यापक सर्वत्र ।' -ब २६२. 'मजवरी घालती व्यर्थ आळ मी सर्वातील निर्मळ । जैसें आकाश केवळ । घटमठांशीं वेगळें ।' -ह ७.१५२. घटाकाश आणि मठा- काश असे प्रयोग वेदांतांत ऐकूं येतात. [घट = घागर + मठ = मठ-राहण्याचें ठिकाण; घर] ॰माळ-स्त्री. नवरात्रांत देवीच्या पूजेकरितां स्थापन केलेला घट व त्यावर सोडलेली फुलांची माळ; देवतांप्रीत्यर्थ वसविलेला माळेसहित घट. [घट + माला] ॰वात-स्त्री. १ नवरात्रांत घट बसविणे व अखंड दिवा लावणें. २ या हक्काचें वेतन, मान. 'होलीस पोली व घटवात वगैरे मानपान जो घ्यावयाचा तो घेतो.' -मसाप २.१७२. [घट + वात (दिव्यांतील बत्ती)] ॰वांटप-पु. न. (कों.) घर- दार, भांडीकुंडीं, जमीन जुमला इ॰ कांची (भावाभावांत- नातेवाईकांत) वांटणी; [घट + वांटणें] ॰स्थापना-स्त्री. घट बसविणें; आश्विन शुद्ध प्रतिपदेस मातीच्या स्थंडिलावर घट ठेवून त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यांत कुलदेवतेची स्थापना करून तिची नऊ दिवस पूजा करतात, दररोज घटावर फुलांची नवी माळ लोंबती बांधतात, अखंड दीप जाळतात. आणि सप्तश- तीचा पाठ इ॰ कर्में करतात. त्या विधीस घटस्थापना म्हणतात; देवतेची घठावर स्थापना; देवप्रतिष्ठा. [घट + स्थापना] ॰स्फोट- पु. (घागर फोडणें) १ गुन्हेगाराचा जिवंतपणी प्रेतविधि. जो पतित प्रायश्चित्त घेऊं इच्छित नाहीं त्याला वाळीत टाकण्या- करितां -समाजाच्या दृष्टीनें तो मेलेलाच आहे असें दर्शविण्या- करितां-मातीची घागर फोडणें इ॰ अशुभ क्रिया-विधि. २ जाति बहिष्कृत करणें. ३ नवरा-बायकोची फारकत; पंचायतीच्या किंवा कोर्टाच्या मदतीनें विवाहाचें बंधन रद्द ठरवून नवरा-बाय- कोनीं स्वतंत्र होणें; काडीमोड; (इं.) डायव्होर्स. 'इंग्रज लोकांतील घटस्फोटाचे वाईट वाईट खटले कोर्टापुडें येतात....' -टि ४.९५. 'जारकर्मांत विधवा गरोदर सांपडली असतां तिला बहिष्कृत करून तिचा घटस्फोट नामक विधि करतात.' -व्यनि २ घटाकाश-न. (वेदांत) घटांतील पोकळी; अवकाश, रिती जागा. 'कोणें धरोनियां आकाश । घरीं घातलें सावकाश । तरी घटयोगें घटाकाश । मिथ्या गगनास नांव आलें ।' -एभा १३. ७३२. -दा ८.७.४९. [घट + आकाश = पोकळी]

दाते शब्दकोश

घडली, घड्डी, घल्डी, घडळी

स्त्री. (व. ना. खा.) लहान घडा; घागर; कळशी. [सं. घटिका; प्रा. घडिआ, घडी; म. घडा]

दाते शब्दकोश

घडुली-लें

स्त्रीन. लहान मडकें, घडा, डेरा. 'यैसी घडुलि तोंडवरि भरिलि ।' -पंच ५.९. [म. घडा; हिं. घडोला]

दाते शब्दकोश

बेगडी

स्त्री. मातीची घागर; घडा. 'गुर्जर स्त्रिया डोक्यावरून हात न लावतां तीन तीन बेगडी घेऊन रस्त्यानें बोलत जात असतात.' -शिं आत्म ३२०.

दाते शब्दकोश

चौघडा

पु. १ देवालयांतून, राजवाड्यांतून नित्य चार, चार घटकांनीं वाजविण्याकरितां कालू, नगारे, नौबती, सूर, सनई इ॰. वाद्यांचा संच. -शर. प्रत्येकी दोन याप्रमाणें दोन मनुष्यांनीं वाज वावयाच्या चार नगार्‍यांचा समुदाय. यापैकीं दोन नगारें व दोन टिमक्या-झिला असतात. यावरून नौबती सूर, सनई इ॰ वाद्यांच्या समुदायासहि हाच शब्द लावतात. 'झडतो नामाचा चौघडा ।' -भज ६३. २ एक मान (चौघडा बाळगण्याचा). हा मराठी राज्यांत विजयी सरदारास मिळे, त्याबद्दल सरकारांतून त्यास सालीना १२०० रु. ची नेमणूक मिळे. [सं. चतुर् + घटि = घडी, घटिका; चतुर + घट = घडा] ॰वाजणें-(कर्त्याची षष्ठी). (ल.) एखाद्याची बदनामी होणें. चौघडी, ड्या-वि. चौघड्यांतील नगारा व झील वाजविणारा. [चौघडा]

दाते शब्दकोश

चौघडा, चौघड्याची अवटी

पु. स्त्री. सोन्याचांदीच्या पत्र्यावर ठसे उमटावयाचें सोनाराचें एक साधन. [चौ + घडा]

दाते शब्दकोश

चक्री

पु. कुंभार. 'दे येक म्हणतां कोरी घागरी । हास्य करोनि चक्री अंतरीं । पांच रुपया द्याल जरी । घडा देईन सुंदर वदे ।' -दावि २३५. -वि. चक्र धारण करणारा (विष्णु, कुंभार). 'दिनमणि तव नोहे चंद्रसा रंग चक्री' -मुरामाअरण्य १०१.

दाते शब्दकोश

दासघडा

पु. मिरवणुकींत कांहीं बायका डोक्यावर घडा घेतात तोप्रकार(?) ‘माझ्या मुलाच्या लग्नांत दासघडा चढणार आहे तो तुझ्याच डोक्यावर.’ –जोत्स्ना, ऑगष्ट १९३८. २५४.

दाते शब्दकोश

दुड्या

पु. १ मातीची मोठी घागर; घडा. दुड, दुडी पहा. २ (ल.) मोठ्या पोटाचा मनुष्य.

दाते शब्दकोश

दुर्दैवी

जीवनांत कित्येक गोष्टींनीं त्याच्याकडे पाठ फिरवली होती, त्याच्या जीवनाचा घडा सदैव पालथाच होता, आयुष्यांतली प्रत्येक महत्त्वाची संधी हुकली, नेहमींच बस् हुकली, मुक्या दुःखांची नि तिची नित्य गांठ, तो जीवन नेहमीं सरपटतच जगला.

शब्दकौमुदी

घागर

(सं) स्त्री० घट, घडा, कळशी.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

घडेबाजी

स्त्री १ मडक्यांत फटाके वगैरे भरून त्यांना बत्ती देणें; आतषबाजी; दारूकाम. '...झाडें नानाप्रकारचीं व घडेबाजी...दारू सुटावयाची. -ख ४५८७. (क्रि॰ उडविणें; करणें, लावणें). २ (ल.) एकदम होणारा वाद्यांचा गजर; कड- कडाट. [घडा + बाजी. हिं.]

दाते शब्दकोश

घडी

स्त्री. १ लहान घागर. -शर. २ भंडारी लोक दारू काढण्यासाठीं माडावर जें मडकें लावतात तें. घडा पहा.

दाते शब्दकोश

स्त्री. १ घटका; साठ पळांचा अथवा चोवीस मिनि- टांचा अवधि. 'तो अवकाळू मेघु काय घडी । राहत आहे ।' -ज्ञा १७.२५१. २ थोडासा वेळ; क्षण. 'पृथ्वीचिया पैसारा । - माजीं घडी न लागतां धनुर्धरा ।' -ज्ञा १०.२५०. ३ योग्य संधि; वेळ; काळ. 'ही पुन्हां न ये बा घडी ।' –राला ८८. ४ कालमापनाचें साधन; यंत्र; घटका; वाळूचें घडयाळ; घडयाळ इ॰. ५ (सामा.) (इंग्रजी ६० मिनिटांचा; वेळ मोजण्याचें साधारण माप तास असल्यानें तसाऐवजी चुकीनें धडी शब्द वापरतात. [सं. घटी; प्रा. घडि; हिं. गु. उ. बं. पं. घडी] (वाप्र.) (एखाद्याची) घडी भरणें-१ घटका भरणें पहा. 'आला समजूं पिशाच आपण घडी भराय माझी ।' -विक ५५. २ शिक्षा भोगण्याची वेळ येणें; घडा भरणें. घडीघटकेचा गुण-(एखादी गोष्ट अमुक प्रकारेंच कां घडली, तशीच कां घडली नाहीं हें सांगतां येत नसलें म्हणजे वरील वाक्प्रचाराचा उपयोग करतात). एखादी गोष्ट ज्यावेळीं-ज्याक्षणी घडली असेल त्या विवक्षित वेलेचें साम्यर्थ, प्रभाव, गुण. ॰घडी, घडोघडीं-क्रिवि. पुन्हां पुन्हां; वांरवार; पदोपदीं; घटको- घटकीं घडिघडि पहा. [घडी द्वि.] म्ह॰ घडीघडी लांब दाढी = हरघडीला रागावणें चरफडणें किंवा दाढी धरणें. घडीचें घडयाळ-ळें-न. क्षणभंगुर जीवित,शरीर; पाण्यावरचा बुड- बुडा. ॰भर-क्रिवि. घटकाभर; थोडा वेळ. [घडी + भरणें] ॰भरानें-क्रिवि. धोड्या वेळानें घटकाभरानें; एका घटकेनंतर; मागाहून. घडीवट-स्त्री. मुहूर्त; घटका. 'बोलें इंद्र सुरपती । जालि. घडीवटीयांची आईती । नोवरा येऊंद्या झडती । संभ्र- मेंसी ।' -कालिकापुराण १६.४२. [सं. घटी + वर्त; म. घडी + वट]

दाते शब्दकोश

घल्डी

स्त्री. (खा.) कळशी; लहान घागर; घडली. 'घल्डीभर पाणी लय होईन.' [घडा. घडली वर्णव्यत्यास]

दाते शब्दकोश

घृत

न. तूप; आज्य. 'अथवा इंद्रियें आणि प्राण । हेचि यज्ञोपचारभरण । अज्ञान घृत ।' -ज्ञा ९.२४०. 'घृत सोडुनि कोण करिल आ तेला ।' -मोउद्योग ६.३५. [सं.] ॰कुंभ- -पु. (काव्य). कामातुर प्रियकरा-रमणाबद्दल कवि हा शब्द वापरतात. [घृत + कुंभ = घडा] ॰कुमारी-स्त्री. कोरफड; कुमारी; कुवारकांडें; कुंवारी. [सं.] ॰कु(क)ल्या-स्त्री. १ (भोजनाच्या वेळीं) पानांत वाहणारे तुपाचे पाट; यावरून. २ (ल.) (जेवणांत) तुपाची व इतर पक्वान्नांची समृध्दि, चंगळाई; चमचमीत जेवण. वाजसनेयी संहितेंत (६.१२) हा प्रयोग येतो. [सं. घृत + सं. कुल्या = नदी, पाट] ॰कुल्ल्या मधुकुल्ल्या-स्त्री. १ (तुपाचे पाट व मधाचे पाट) तूप व गोड पदार्थ यांची चंगळ, रेलचेल, समृद्धि. २ (ल.) मिष्टान्नाचें सुग्रास व चमचमीत भोजन. 'पुराणांचा शिमगा जेव्हांपासून सुरू झाला व भटांच्या घृतकुल्या मधुकुल्या देशांत प्रवृत्त झाल्या तेव्हापासून...कौशल्य चट सारें पार वाहून गेलें.' -नि. [घृतकुल्या + मधु + कुल्या] ॰धेनु-स्त्री. तुपाचा गोळा घेऊन त्यास गाय कल्पून त्याची पूजा करून ब्राह्मणास दान करतात ती. [घृत + धेनु = गाय] ॰पक्व-पाचित-वि. तुपांत तळलेलें, शिजविलेलें (खाद्य). [घृत + सं. पक्व-पाचित = शिजलेलें, शिजविलेलें] ॰बुद्धि-स्त्री. बुद्धिचा जडपणा; मंद, जड बुद्धी; बुद्धीची ग्राहकशक्ति तीव्र नसणें. (पाण्यांत तुपाचा थेंब थिजतो किंवा फार हळू हळू पसरतो यावरून); याच्या उलट तैलबुद्धि (कारण तेलाचा थेंब पाण्यावर फार जलद पसरतो). २ -वि. मंदबुद्धीचा; तल्लख बुद्धि, ग्रहणशक्ति नसणारा. [घृत + बुद्धि] ॰विपाक-पु. (रसा.) तूप खतखतणें, फसफसणें, रासायनिक विकृति पावणें. साखरेचा दुग्धविपाक व नंतर घृतविपाक होऊं देऊन...' -सेंपु २.५.४. [घृत + विपाक = विकृति] ॰श्राध्द-न. तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशानें घराहून निघतांना करावयाचें श्राद्ध. यांतील मुख्य द्रव्य घृत (तूप) असतें म्हणून यास हें नांव आहे. -तीप्र परिशिष्ठ २. पृ. २. घृताम्ल-न. (रसा.) गाईच्या लोण्यांत असलेलें एक अम्ल. कॉडलिव्हर ऑईल व दुसर्‍या कांहीं चरब्या व कांहीं उद्भिज्ज कोटींतहि हें सांपडतें. दधिजाम्ल. (इं.) ब्युटिरिक अॅसिड. -सेंपू २.५४. [घृत + अम्ल = अॅसिड]

दाते शब्दकोश

किड्डी

स्त्री. तिरडी; किर्डी. ‘मी सौभाग्याचें आंगडे बांधैनः कीड्डी करीनः खांदी रीगैनः घडा फोडीनः’ –लीचपू १८.

दाते शब्दकोश

कलश

(सं) पु० कुंभ, घागर, घडा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

कळसा

पु. १ (कों.) तोटीची, मातीची घागर, घडा; कोंकणांत नारळी वगैरे झाडांस पाणी घालण्यासाठीं कळसा वापर- तात. २ (राजा.) धातूची घागर. ३ (कुंभारी) ज्यापासून मडकीं वगैरे करतात त्या मळलेल्या मातीचा ढीग. ४ (ना.व.) अक्षयतृतीयेच्या दिवशीं ब्राह्मणास जो मातीचा कलश दान देतात तो. ५ (व.) शुभकार्याच्या प्रसंगीं वापरण्यांत येणारी मातीची लहान घागर; कलश. ' कळसा घेऊन उभा रहा. ' म्ह॰ कांखेस कळसा, गांवात वळसा. [सं. कलश]

दाते शब्दकोश

कर्‍हा-र्‍हें

१ मडकें; मातीचा लहान घडा; जया मड- क्यास तोटीसारखें स्तन (टोक) असतें असें मडकें; रहाट गाडग्याच्या माळेंतील मडकें. 'राहाटमाळेचे करे । पुढती रिता पुढती भरे ।' -एभा १०.६७६. 'सोन्याचा कर्‍हा मोत्यांनी भरा' -वेड्यांचा बाजार. २ लग्नांत पाणी भरलेल्या तांब्यांत अथवा पंचपात्रींत आंब्याच्या डहाळ्या, पानें टाकून त्यावर शेंडी वर केलेला नारळ ठेवतात. या भांड्यास कर्‍हा म्हणतात. व तो नवरीच्या व नवर्‍याच्या बहिणीच्या (बहीण नसल्यास दुसर्‍या स्त्रीच्या) हातांत असतो आणि तो कर्‍हा घेऊन ती आपल्या बहिणीच्या (वधूच्या) अगर भावाच्या (वराच्या) मागें उभी असते. -(क्रि॰ घेणें.) ३सामान्यतः कलश; तांब्या. ४ (बायकी) मंगळगौरीची पंचामृती पूजा झाल्याबरोबर तें तीर्थ एका भांड्यांत भरून त्याचें तोंड चोळीनें बांधून त्यावर गोड्या तेलाचा दिवा ठेवतात तो (हा प्रकार बहुधा कोंकणस्थांत आढळतो). ५ एखाद्या मंगल संस्काराच्या वेळीं ओवाळावयास अगर मागें धरावयास जो दिवा घेतात तो. 'मागें मी मुहूर्ताचा कर्‍हा घेऊन उभी होतें.' -वेड्यांचा बाजार. [सं. करक; प्रा. करअ = करा] ॰दिवा-पु. वरील. ५ वा अर्थ पहा. ओलाण दिवा; लामण दिवा. (क्रि॰ घेणें.) [सं. करक + दीप; प्रा. करअ + दीव] ॰दिव्याचा मान-पु. कर्‍हा दिवा धरणार्‍या स्त्रीस वस्त्रें वगैरे देऊन तिचा केलेला सन्मान व तीं द्यावयाचीं सन्मानाचीं वस्त्रें- पोषाख.

दाते शब्दकोश

कुंभ

पु. १ घागरा; घडा. 'दैवें अमृतकुंभ जोडला ।' -ज्ञा २.२५२. २ कुंभराशि (अकरावी राशि). ३ हत्तीचें गंडस्थळ. 'भवेभकुंभभंजना ।' -ज्ञा १०.५. ४ कुंभिपाक नांवाचा नरक. 'काळदंड कुंभयातना थोरा ।' -तुगा ७०२. ५ धान्य मोजण्याचें एक माप; वीस द्रोण म्हणजे एक कुंभ (मनु ८.३२०. वरील टीप) ६ (गो.) वीस खंडींचे माप. [सं.] (वाप्र.) ॰फळ गळ्यास लागणें-(कु.) संकटांत सांपडणें. समशब्द- ॰कामला स्त्री. काविळीची शेवटची अवस्था. [सं.]॰कार- पु. कुंभार. [सं.] ॰पाक-पु. एक नरक. कुंभ अर्थ ४ पहा. 'कुंभपाक लागे तयासि भोगणें ।' -तुगा २८. ॰पुट-न. एका मातीच्या घागरीस चाळीस भोकें पाडून ती अर्धी कोळश्यानें भरावी व वर औषध ठेवावें, तोंडावर एक परळ झांकून मतकापड करून तोंड लिंपावे व सावलींत वाळवावें, मग घागर चुलीवर ठेवून परळांत निखारे घालून खालीं जाळ लावावा. तीन दिवसांनी औषध काढून घ्यावें. -योर १.२१०. ॰मेळा-पु. कुंभ राशीस गुरू येतो तेव्हां हरिद्वारास भरणारी जत्रा. ही वर्षभर असते. -तीप्र ३१. ॰विवाह- पु. मुलीच्या जन्मकाळीं तिला वैधव्य प्राप्त होण्यासारखे अनिष्ट ग्रह असतील तर अरिष्टनिरसनार्थ, खर्‍या लग्नापूर्वीं तिचा घटाशीं विवाह करतात तो. ॰संभव-पु. अगस्ति ऋषि. [सं.] ॰स्थळ-न. हत्तीचें गंडस्थळ. 'गज हाणीत मुसळें । विदारित कुंभ- स्थळें । -एरुस्व १०.५५.

दाते शब्दकोश

कुंड

न. १ पाण्याची विहीर; झरा; तळी (पवित्र); (चारी बाजूंनीं दगडांनी बांधलेला) हौद; टांकें; पुष्करणी. २ भांडे; घट; घडा. ३ (व.) कामटीचें तयार केलेलें व हर- मुंजी रोगण इ॰ लावून घट्ट व टिकाऊ बनविलेलें भांडे. ४ कुंडी (फुलझाडांची). 'दवण्याचे कुंड घालोनि ।' -ऐपो १५. [सं. कुंड; कुण्ड् = रक्षण करणें]

दाते शब्दकोश

माठ

पु. पसरट असा मातीचा घडा; रांजण. -स्त्री. (कु.) चिकण माती असलेली जागा. [सं. मृद् + घट; मृत्तिका + घट] ॰ली-स्त्री. (कु.) मातींचें लहान भांडें.

दाते शब्दकोश

मेहतर, म्हेतर

पु. १ श्रेष्ठ; नाशीक प्रांतांत भिल्लांच्या जातीच्या पाटलाला, पुण्याकडील सुताराला मेहतर म्हणतात. जातीचा मुख्य; म्होरक्या; पुढारी. -गांगा २९. २ भंगी. ३ घडा; रांजण. [फा. मिहतर] सामाशब्द-मेहेत्रेपण-पणा-नपु. जातीचा पुढारीपणा; एक हक्क; हक्काची बाब. 'नेवासें परगण्यां- ताल न्हाव्यांमधील मेहेतरपणाचा कज्जा न्हाव्यांनीं पाटीलकुळ- कणींनिंशीं हुजुरास येऊन तोडून घेतला.' -पेशवेकालीन महा- राष्ट्र पृ. ४८३.

दाते शब्दकोश

पायली

स्त्री. १ धान्य मोजण्याचें चार शेराचें (पक्का किंवा कच्चा) एक माप. बारा किंवा सोळा पायल्यांचा एक मण होतो. खानदेशांत अठ्ठेचाळीस शेरांची एक पायली होते. [पाय = एक चतुर्थांश; पाव] डोळा पहा. (वाप्र.) ॰भरणें-१ (स्वतःच्या गरजा, आयुष्य, भरभराटीची स्थिति इ॰चें) माप भरून घेणें; स्वार्थ साधणें; कम करून घेणें. २ एखाद्याला उतरती कळा लागणें. घडा, पायरी भरणें पहा. ॰चा पसा करणें-होणें-परद्रव्याचा गुप्तपणें अपहार करणें; कमी करून सांगणें; कमी करणें; होणें. ॰चे पंधरा-अतिविपुल; पु्ष्कळ; फार स्वस्त; ज्यास फारशी किंमत, महत्त्व नाहीं असें; क्षुद्र: 'छप्पन्न. तुझ्यासारखे पायलीचे पंधरा आहेत.' गोव्याकडे 'पायलेड पन्नास' = पायलीचे पन्नास असा प्रचार आहे. आपली पायली भरणें-स्वतःपुरतें पाहणें; स्वार्थ. आपलपोटेपणा करणें. म्ह॰ आण पायली करूं दे वायली.

दाते शब्दकोश

प्रहर

पु. सबंध दिवसाचा आठवा भाग; तीन तास. [सं.] ॰दिवस येणें-(ल.) पापाचा घडा भरणें. 'होळकरी जुलमी वेड प्रहर दिवस येईपर्यंत जाणारें नाहीं.' -विक्षिप्त ३.१५९.

दाते शब्दकोश

स्त्री (निंदा)

हा एक चिखल आहे, पापाची व मोहाची खाण, मोहाचे जाळें, पुरुषाच्या कामवासनेचें खेळणें, चांचल्याची मूर्ति, न उलगडणारें कोडे, मधाचे पोळें, सर्वांत बिकट गड, दुफळीचें कारण, प्रमादांची दरी, संसाराचें दोन अंकी नाटक, उग्रमधुर पाप, पातकांचा घडा, चांचल्याची मूर्ति, सुरी व सुंदरी यांना हाताळणें धोक्याचें असतें.

शब्दकौमुदी

तडगी

स्त्री. मातीचा लहानसा घडा.

दाते शब्दकोश

उदकुंभ

पु. पाणी भरलेला घट; पाण्याचा घडा; कळशी (धार्मिक विधींत उपयोग ). 'आली घरासि युवती उदकुंभ ठेवी' -आकृ १०. [सं. उद + कुंभ] ॰दान-श्राद्ध-न. मृताच्या अक- राव्या दिवसापासून एक संवत्सरपर्यंत (अब्दपूरित श्राद्धापर्यंत) मृतास उद्देशून दररोज करावयाचें श्राद्ध. यांत ब्राह्मणास उदकुंभाचें दान करितात. हें श्राद्ध रोज करणें शक्य नसल्यास एकच दिवस श्राद्ध करून दररोज नुसतें उदकदान व आमान्न (किंवा धान्य) दान करतात; अथवा वर्षाचें धान्य एकदमच देतात. [सं.]

दाते शब्दकोश

विनाश

चुराडा, विध्वंस, चुथडा, वींमोड, फडशा, गच्छन्ति, मातिरें, उच्छेद, सत्यानाश, निर्दाळण, घात, कंबक्ती, दामटी, वाटोळे, नायनाट, धूळधाण, इतिश्री, लोप, तुकडे होणें, भंग, सारेंच बोंबललेलें दिसले, त्या त्या गोष्टींचा फडशा उडाला, दाणादाण झाली, चंदन उडाले, अनर्थ झाला, अपरिमित नुकसान पोहोंचलें, चिंधड्या उडाल्या, रसातळाला गेले, सत्यनाश झाला, वाटोळे झालें, कार्यात बिघाड, समूळ नष्ट, समूळ उच्छेद, बारशाऐवजीं बारावें करण्याची वेळ आली, राख-रांगोळी झाली, चुथडी झाला, राव रंक एक झाले, नियतीने सूड घेतला, कुत्र्याच्या मरणाने मेले, पापाचा घडा भरला, आसन डळमळलें, पाळेमुळे खणून काढलीं गेलीं, सर्वच आटोपलें.

शब्दकौमुदी

काल

पु. १ वेळ; समय (ज्याचें मोजमाप दिवस, प्रहर. इ॰ नीं होतें तो). २ हंगाम; मोसम; योग्य वेळ. ३ संकटाची वेळ. ४ यमराज; मृत्यु; ज्यापासून जिवाला धोका वाटतो अशी वस्तु, प्राणी (साप, वाघ इ॰); एखादें संकट; मृत्यु; नाश; मृत्युसमय. 'शिवाजी महाराजांचा काल शके १६०२ मध्यें झाला.' ५ चांगलें किंवा वाईट होण्यास कारणीभूत अशी पर- मेश्वराची इच्छा. ६ भूत, भविष्य, वर्तमान इत्यादींचा समय. ७ (गायन) ताल, कालाचीं तालोपयोगी प्रमाणे:-अणु, द्रुत, लघु, गुरु, प्लुत. [सं. काल] (वाप्र.) ॰देशतार्तम्य करणें- देश पाहून करणें-वर्तणें-काल, स्थल परिस्थिति पाहून वागणें. ॰साधणें-अचूक, योग्य संधि गांठणें; योग्य काळीं एखादी गोष्ट घडवून आणणें. सामाशब्द:- ॰कंटक-पु. काळकंटकं पहा. ॰कल्ला-पु. वेळ; प्रसंग; संधि वगैरे. ' सशाचे पारधीस वाघाचें सामान असावें, न जाणो कालकल्ला आहे. ' -क्रिवि. दुःखाचे दिवसांत; वेळप्रसंगीं (भविष्यकालीन प्रसंग); संकटाचे दिव- सांत; अडचणीचे दिवशीं; जास्त अर्थासाठीं वेळ-अवेळ पहा. 'धान्य देऊन ठेवावें, कालकल्ला उपयोगी पडेल.' [काल द्वि.] ॰कूट-न. १ देवदैत्यांनीं अमृताच्या प्राप्तीसाठीं समुद्रमंथन केल्यावेळीं निघालेलें, त्रैलोक्य जाळणारें विष. ' तैसें तें घनदाट । उठावलें एकवाट । जैसे उसळलें कालकूट । धरी कवण । ' -ज्ञा १.८९. २ सामान्यतः विष. ३ (ल.) द्वेष; मत्सर. ॰कृत-वि. (कायदा) मुदतबंद गहाण; गहाण ठेवण्याचा एक प्रकार; यांत विशिष्ट मुदतीच्या आंत गहाण सोडवून नेण्याची सवलत असते. [सं.] ॰क्रमण-णा-नस्त्री. करमणूक; वेळ घालविणें (ख्याली खुशालीत, चैनींत). [सं.] 'कालक्रमणा बरवी होइल आतां म्हणोनि नाचतसे ।' ॰गति-स्त्री. दैवाची गति; काळवेळ लोटणें, जाणें; बरें-वाईट होण्याची काळाची रीति, ओघ; कालाचा प्रभाव. ' कालगतीनें भूमीनें पीक सोडलें.' [सं.] ॰गुजराण-गुजारा-री-गुद्राण-पुस्त्रीन. संकटांत काळ घालविणें; हरहुन्नर करून काळ कंठणें; कसें तरी करून तात्पुरता उदरनिर्वाह करणें. [सं. काल + फा. गुजरान् = जीवन] ॰गूत-न. १ कला; कल्पनेची योजना; चतुराईची योजना; गूढ योजनेंतील रहस्य. २ अशा तर्‍हेची रचना किंवा रीत. ३ यंत्रांतील गूढ रचना, किल्ली व त्या रचनेनें युक्त असें यंत्र. [सं. कला + गति-गुत?] ॰ग्रस्त-वि. मरणोन्मुख; अतिशय संकटानें त्रस्त झालेला, घेरलेला; विपत्तींत सांपडलेला. ॰घन- पु. (काव्य) मृत्युरूपी ढग; प्रलयमेघ; सृष्टीचा नाश होण्याच्या वेळीं जे मेघ वृष्टि करून सृष्टि बुडवितात तो. 'कालघन गडगड आटले हो तेधवां ।' ॰चक्र-न. १ कालाची राहाटी व त्याचा प्रभाव; नशिबाचा फेरा; दैवगति; आयुष्यांतील बरी-वाईट घडा- मोड. (क्रि॰ घडणें; उलटणें; पालटणें). २ विशिष्ट कालघटकांची आवृत्ति, उ॰ ६० संवत्सरांचा फेरा; ॠतूंचें आवर्तन वगैरे. ३ कालाचा किंवा वेळाचा विशिष्ट अंश, भाग; मुदत; विशिष्ट कालखंड; कालाचें ठराविक परिमाण. ॰चरित्र-न. नशिबाचा खेळ; दैवाची लीला. 'कालचरित्र विचित्र ।' ॰त्रय-त्रितय-न. भूत, भविष्य, वर्तमान हे तीन काळ. ॰त्रयीं-क्रिवि. (नास्तिपक्षी) तीनहि काळीं (कधींहि नाहीं या अर्थानें). 'स्पर्श न करी कालत्रयीं ।' ॰दंड-पु. १ यमानें दिलेली शिक्षा. २ मृत्यु; मरण. ॰दशा-स्त्री. १ बरीवाईट दैवगति; परिस्थिति. २ सत्ता घाल- विणारा काळ, दिवस. (क्रि॰ फिरणें; पालटणें; बदलणें; वाईट असणें). 'कालदशा कोण्हाच्यानें सांगवत नाहीं.' ॰धर्म-पु. काल- महिमा; (मनुष्याच्या दैवावर चालणारी, घडणारी) कालाची सत्ता, अधिकार, सामर्थ्य, प्रभाव. ॰निर्वाह-पु. १ रोजच्या चरिता- र्थास लागणार्‍या वस्तूंचा पुरवठा. २ काळ घालविणें. ॰परत्वें- क्रिवि. काळाच्या अनुरोधानें; प्रसंगविशेषीं; योग्य कालीं; कधीं कधीं; केव्हां केव्हां. ॰पराभव-पु. संकटकाळीं काळाशीं झगडून यशस्वी होणें; कालावर विजय; बिकट परिस्थितींतून मार्ग काढणें, पार पडणें. ॰परिच्छेदरहित-वि. तिन्ही कालांच्या पलीकडील म्हणजे सतत, नित्य (परब्रह्म). ॰पाश-पु. मृत्यूचा फास; मरण. ॰पुरुष-पु. १ यमाचा सेवक; यम; यमदूत. २ ब्राह्मणास दान देण्याकरितां केलेली लोखंडाची, द्रव्य आंत भरलेली (पोकळ) यमाची प्रतिमा. ३ (ल.) कोणताहि भयंकर पुरुष; शत्रु; क्रूर मनुष्य. ॰बेल-स्त्री. १ भविष्य सांगणें; शकुन वगैरे सांगणें. २ कालबेला गोसाव्याचें काम. ॰बेला-ल्या-पु. गोसा- व्यांचा एक पंथ व त्यांतील व्यक्ति-वि. १ वरील पंथांतील; जो कालबेल करतो तो. २ कालबेलासंबंधीं. ॰महिमा-माहात्म्य- पुन. कालचक्र अर्थ १ पहा. ॰मान-न. १ वेळमापन. २ वेळामापक यंत्र; (इं.) क्रॉनोमिटर. ३ हंगाम; रागरंग; कोणताहि काल (चांगला -वाईट). 'आतांचें कालमानच वेगळें ।' (क्रि॰ फिरविणें; बदलणें; उलटणें; पालटणें.) ४ परिस्थिति. ॰मूर्ति-पु. १ भयंकर क्रूर माणूस. २ यम. ॰यातना-स्त्री. यमयातना; अत्यंत दारुण क्लेश. ॰रात्री-स्त्री. १ प्रत्येक ७७ व्या वर्षाच्या सातव्या महिन्याची सातवी रात्र. २ काली देवीचा जन्मदिवस; कांहींच्या मतें हा दिवस आश्विन शुद्ध अष्टमी व कांहींच्या मतें श्रावण वद्य अष्टमीची रात्र. ३ कल्पाची शेवटची रात्र. ४ (सामा.) अंधारी, काळीकुट्ट रात्र; भयंकर रात्र; मरण येण्याच्या वेळीची रात्र. ॰वंचन-ना-नस्त्री. १ कालक्रमण; वेळ घालविणें. २ मृत्यूची फसवणूक; गुदरलेल्या कठिण काळांत कसा तरी निर्वाह करणें. ॰सत्ता-स्त्री. कालमहिमा पहा. ॰साधन-न. १ वेळ समजण्याचें यंत्र (घड्याळ); छायायंत्र. २ स्नानसंध्या- वगैरे कर्मास जो काळ सांगितला आहे त्या वेळीं करावयाचें तें तें अनुष्ठान. ३ वेळाचें घेतलेलें माप. ॰सूत्र-न. नशिबाचा, दैवाचा धागा, रेषा. ॰स्वरूप-न. (मृत्युसम वाटणारा) कोण- ताहि अति भयंकर पदार्थ; मृत्युरूपी वस्तु. ॰हरण-न. १ कालक्रमण; वेळ घालविणें; २ दिवस मारून नेणें; त्या दिवसाची साधन सामुग्री मिळविणें; दिवस काढणें. ॰क्षेप-पु. १ काल- व्यय; कालक्रमण; कालहरण, कालातिक्रमण; आयुष्याचे दिवस कंठणें. २ निर्वाह.

दाते शब्दकोश

धर्म

पु. १ धार्मिक विधियुक्त क्रिया, कर्में; परमेश्वरासंबं- धीचें कर्तव्य; ईश्वरोपासना; परमेश्वरप्राप्तीचीं साधनें; परमेश्वरप्रा- प्तीचा मार्ग, पंथ. 'करितो धारण यास्तव धर्म म्हणावें प्रजांसि जो धरितो ।' -मोकर्ण ४१.८१. २ मनुष्यप्राण्यास सदाचरणास लावणारें व परमेश्वरचिंतनाचा मार्ग दाखवून देणारे ख्रिश्चन, यहुदी, हिंदु, इस्लामी वगैरे पंथ. 'मुख्यमुख्य नितितत्त्वांबद्दल सर्व धर्मांची एकवाक्यता आहे. '३ शास्त्रांनीं घालून दिलेले आचार, नियम; पवित्र विधी, कर्तव्यें. पंचपुरुषार्थांपैकीं एक. ४ दान; परोपकारबुद्धीनें जें कोणास कांहीं देणें, किंवा जें कांहीं दिलें जातें तें; दानधर्माचीं कृत्यें; परोपकारबुद्धि. 'अंधळयापांगळ्यांस धर्म करावा. ' 'महाराष्ट्रीयांपेक्षां गुजराथ्यांत धर्म अधिक.' ५ सद्गुण; शास्त्रोक्त वागल्यानें अंगीं येणारा नौतिक. धार्मिक गुण. 'कर्तव्यकर्म, नीति, नीतिधर्म किंवा सदाचरण यांसच धर्म असें म्हणतात. '-गीर ६५. ६ स्वाभाविक गुण; गुणधर्म; नैसर्गिक प्रवृत्ति. 'गाईनें दूध देणें हा गाईचा धर्म आहे.' 'पृथ्वीस वास येणें पृथ्वीचा धर्म. ' ७ कर्तव्यकर्म; रूढी; परंपरेनें, शास्त्रानें घालून दिलेला नियम उदा॰ दान करणें हा गुहस्थ धर्म, न्यायदान हा राजाचा धर्म, सदाचार हा ब्राह्मणधर्म, धैर्य हा क्षत्रिय धर्म. याच अर्थानें पुढील समास येतात. पुत्रधर्म-बंधुधर्म-मित्रधर्म-शेजार- धर्म इ॰ ८ कायदा. ९ यम. 'धर्म म्हणे साध्वि बहु श्रमलीस स्वाश्रमासि जा मागें ।' -मोविराट १३.६५. १० पांडवांतील पहिला. 'कीं धर्में श्वानू सरता । केला सर्वथा स्वर्गलोकीं ।' -एभा १.१०९. ११ धर्माचरणाचें पुण्य. 'ये धर्मचि, पुत्र स्त्री कोष रथ तुरग करी न सांगतें ।' -मोभीष्म ११.२६. १२ (शाप.) गुण- धर्म' स्वाभाविक लक्षण ' दोन किंवा अधिक पदार्थांचें एकमेकां- वर कार्य घडून त्यांपासून जेव्हां असा नवा पदार्थ उप्तन्न होतो कीं त्याचे धर्म मूळ पदार्थांच्या धर्मांपासून अगदीं भिन्न असतात, तेव्हां त्या कार्यास रसायनकार्य असें म्हणतात.' -रसापू १. (वाप्र.) धर्म करतां कर्म उभें राहणें-पाठीस लागणें-दुसर्‍यावर उपकार करावयला जावें तों आपल्यावरच कांहींतरी संकट ओढवणें. धर्मखुंटीस बांधणें- (जनावराला) उपाशीं जखडून टाकणें; ठाणावर बांधून ठेवणें. [धर्मखुंटी]धर्म जागो-उद्गा. (विशिष्ट गोष्टीचा संबंध पुन्हां न घडावा अशाविषयीं) पुण्य उभें राहो. धर्म पंगु-(कलियुगांत धर्म एक पायावर उभा आहे. त्याचें तीन पाय मागील तीन युगांत गेले. यावरून ल.)धर्म अतिशय दुबळा, अनाथ आहे या अर्थी. धर्माआड कुत्रें होणें- दानधर्माच्या आड येणार्‍याला म्हणतात. धर्माचा- १ धर्मासंबंधीं (पैसा, अन्न इ॰). २ मानलेला; उसना; खरा औरस नव्हे असा (पुत्र, पिता. बहीण इ॰). ३ फुकट; मोफत.'धर्माची राहण्याला जागा दिली आहे.' -पारिभौ २७. धर्माची वाट बिघडणें-मोडणें-एखाद्या दानधर्माचा ओघ थांबणें, थांबविणें. धर्माचे पारीं बसणें-१ दुसर्‍याचे पैसे खर्चीत रिकामटेकडें बसणें; धर्मावर काळ कंठणें. २ सद्गुणांचें चांगलें फल मिळणें; सदाचारामुळें चांगलें दिवस येणें. ३ सदोदित दानधर्म करणें. धर्मकृत्ये आचरणें.धर्मावर लोटणें- टाकणें-सोडणें-एखाद्याच्या न्यायबुद्धिवर सोंपविणें.धर्मा- वर सोमवार सोडणें-स्वतः झीज न सोसतां परभारें होईल तें पाहणें. -संम्ह. धर्मास-क्रिवि. (कंटाळल्यावरचा उद्गार) कृपा- करून; मेहेरबानीनें; माझे आई ! याअर्थीं. 'माझे रुपये तूं देऊं नको पण तूं एथून धर्मास जा ! ' 'मी काम करतों, तूं धर्मास नीज.' धर्मास भिऊन चालणें-वागणें-वर्तणें-करणें-धर्माप्रमाणें वागणें. धर्मास येणें-उचित दिसणें; पसंतीस येणें; मान्य होणें. 'मी तुला सांगायचें तें सांगितलें आतां तुझे धर्मास येईल तें कर.' म्ह॰ १ धर्मावर सोमवार = (दानधर्म करणें). कांहीं तरी सबबीबर, लांबणीवर टाकणें. -मोल. २ धर्माचे गायी आणि दांत कांगे नाहीं. ३ आज मरा आणि उद्यां धर्म करा. ४ धर्मादारीं आणि मारामारी. ५ धर्मस्य तत्वं निहितं गुहायाम् = धर्माचें रहस्य गुहेमध्यें ठेवलेलें असतें. (गुढ किंवा अज्ञेय असतें). धर्माचें खरें तत्त्व गहन, अगम्य आहे. ६ धर्मस्य त्वरिता गतिः = धर्मास विलंब लावूं नये या अर्थीं. सामाशब्द- ॰आई-माता-स्त्री. (ख्रि.) कांहीं चर्चेसमध्यें लहान मुलांचा बाप्तिस्मा होतो तेव्हां त्यांस ख्रिस्तीधर्मास अनुसरून वळण व शिक्षण देण्यांत यावें म्हणून त्यांच्या मातेहून भिन्न अशी जी स्त्री आपणावर जबाबदारी घेते ती. (इं.) गॉडमदर. 'प्रत्येक मुलीला एक धर्मबाप व दोन आया पाहिजेत.' -साप्रा ९०. ॰कर्ता-पु. १ धर्म करणारा; परोपकारी माणूस. २ न्यायाधीश; जज्ज. ३ (दक्षिण हिंदुस्थान) देवळाचा व्यवस्थापक, कारभारी. ॰कर्म-न. १ वर्तन; आचार; एखाद्याचीं कृत्यें. कर्मधर्म पहा. 'ज्याचें त्यास धर्मकर्म कामास येईल.' २ शास्त्रविहित कर्में, आचरण; धार्मिक कृत्यें. [सं. धर्म + कर्म] ॰कर्मसंयोग-पु. प्रारब्धयोग; कर्म- धर्मसंयोग पहा. ॰कार्य-कृत्य-न. धार्मिक कृत्य; परोपकाराचें कार्य; (विहीर, धर्मशाळा इ॰ बांधणें, रस्त्यावर झाडें लावणें; देवळें बांधणें; अन्नसत्रें स्थापणें इ॰). २ धार्मिक विधि, व्रत; धर्मसंस्कार. [सं.] ॰कीर्तन-धर्माचें व्याख्यान-प्रवचन-पुराण. 'किंबहुना तुमचें केलें । धर्मकीर्तन हें सिद्धि गेलें ।' -ज्ञा १८. १७९२. [सं.] ॰कुढाव-पु. (महानु.) धर्मरक्षक. 'कीं धर्म- कुढावेनि शाङ्र्गपाणी । महापातकांवरी सांघीतली सांघनी ।' -शिशु ३५. [धर्म + कुढावा = रक्षण] ॰खातें-न. १ धर्मासाठीं जो खर्च करितात त्याचा हिशेब ठेवणारें खातें; धार्मिक खातें. २ धर्मार्थ संस्था; लोकोपयोगी, परोपकारी संस्था. [सं. धर्म + खातें] ॰खूळ-वेड-न. धर्मासंबंधीं फाजील आसक्ति; अडाणी धर्म- भोळेपणा; धर्माबद्दलची अंधश्रद्धा. [म. धर्म + खूळ] ॰गाय- स्त्री. १ धर्मार्थ सोडलेली गाय. धर्मधेनु पहा. २ चांगली, गरीब गाय. 'कढोळाचें संगती पाहे । क्षणभरी गेलिया धर्मगाये ।' -एभा २६.४२. ॰ग्रंथप्रचारक-पु. (ख्रि.) ख्रिस्ती धर्म शास्त्र व तत्संबंधीं इतर पुस्तकें विकणारा, फेरीवाला; (इं.) कल्पो- र्चर. 'सदानंदराव काळोखे यांनीं एक तप धर्मग्रंथप्रचारकाचें काम मोठ्या प्रामाणिकपणें केलें.' [सं. धर्म + ग्रंथ + प्रचारक] धर्मतः- क्रिवि. धर्माच्या, न्यायाच्या दृष्टीनें; न्यायतः; सत्यतः; खरें पाहतां. ॰दान-न. दानधर्म; धर्मादाय. 'एक करिती धर्मदान । तृणास- मान लेखती धन ।' [सं.] ॰दारीं कुत्रें-न. परोपकाराच्या कृत्यास आड येणारा (नोकर, अधिकारी); कोठावळा. ॰दिवा दिवी-पुस्त्री. धर्मार्थ लावलेला दिवा. 'जे मुमुक्षु मार्गीची बोळावी । जे मोहरात्रीची धर्मदिवी ।' -ज्ञा १६.६५. ॰द्वार-न. कौल मागणें; ईश्वराला शरण येणें. [सं.] ॰धेनु-स्त्री. १ धर्मार्थ सोड- लेली गाय. 'ऐसेनि गा आटोपे । थोरिये आणतीं पापें । धर्मधेनु खुरपें । सुटलें जैसें ।' -ज्ञा १६.३२९. २ हरळी; दुर्वा. -मनको [सं.] ॰ध्वज-पु. १ धर्माची पताका; धर्मचिन्ह; धर्माचा डौल, प्रतिष्ठा; (क्रि॰ लावणें; उभारणें; उभविणें; उडणें). २ (ल) धर्माचा फाजील पुरस्कर्ता. [सं. धर्म + ध्वज] ॰ध्वजी-वि. धर्म- निष्ठेचा आव आणणारा ढोंगी-भोंदू माणूस. ॰नाव-स्त्री. येणार्‍या- जाणारानीं तरून जावें म्हणून नावाड्यास वेतन देऊन नदीवर जी धर्मार्थ नाव ठेवलेली असते ती; धर्मतर; मोफत नाव. [धर्म + नांव] ॰निष्पत्ति-स्त्री. कर्तव्य करणें; धर्माची संपादणूक. [सं.] ॰नौका-पु. धर्मनाव पहा. ॰न्याय-पु. वास्तविक न्याय; निःप- क्षपात, धर्माप्रमाणें दिलेला निकाल. 'तुम्ही उभयतांचें वृत्त श्रवण करून धर्म न्याय असेल तो सांगा.' [धर्म + न्याय] ॰पत्नी- स्त्री. १ विवाहित स्त्री. -ज्ञा १८.९४२. २ सशास्त्र (अग्निहोत्रादि) कर्माकरितां योग्य अशी प्रथम विवाहाची (दोन तीन पत्न्या असल्यास) ब्राह्मण स्त्री. [सं.] ॰पंथ-पु. १ धर्माचा, परो- पकाराचा, सदाचरणाचा मार्ग. 'सदां चालिजे धर्मपंथ सर्व कुमति टाकोनि ।' 'धर्मपंथ जेणें मोडिले । त्यास अवश्य दंडावें ।' २ धार्मिक संग, समाज. 'ख्रिस्तीधर्मपंथ.' [सं.] ॰परायण- वि. क्रिवि. १ परोपकारार्थ; धार्मिककृत्य म्हणून; धर्मासाठीं. २ धर्मार्थ; मोफत; (देणें, काम करणें). ३ पक्षपात न करतां; धर्मावर लक्ष ठेवून (करणें; सांगणें; बोलणें इ॰). 'धर्मपरायण बोलणारे पंच असल्यास धर्मन्याय होईल.' ॰परिवर्तन-न. (ख्रि.) धर्ममतें बदलणें; धर्मांतर. (इं.) कॉन्व्हर्शन. 'नारायण वामन टिळक यांचें १८९५ सालीं धर्मपरिवर्तन झालें.' [सं. धर्म + परिवर्तन] ॰पक्षी-पु. धर्मोपदेशक; पाद्री; पुरोहित. 'तो जातीचा धर्मपक्षी होता.' -इंग्लंडची बखर भाग १.२७२. [धर्म + पक्षी = पुरस्कर्ता] ॰पिंड-पु. १ पुत्र नसणार्‍यांना द्यावयाचा पिंड. २ दुर्गतीला गेलेल्या पितरांना द्यावयाचा पिंड. [धर्म + पिंड] ॰पिता-पु. धर्मबाप पहा. ॰पुत्र-पु. १ मानलेला मुलगा. २ उत्तरक्रियेच्या वेळीं पुत्र नसलेल्यांचा श्राद्धविधि करणारा तज्जा- तीय माणूस; धार्मिक कृत्यांत पुत्राप्रमाणें आचरणारा माणूस. 'धर्मपुत्र होऊनि नृपनायक ।' -दावि ४९१. ३ दत्तक मुलगा, इस्टेटीला वारस ठरविलेला. ॰पुरी-स्त्री. १ तपस्वी, विद्वान वगैरे ब्राह्मण ज्या क्षेत्रांत राहतात तें क्षेत्र; धार्मिक स्थल. २ ज्याच्या घरीं पाहुण्यांचा नेहमीं आदर सत्कार केला जातो तें घर; पाहुण्यांची वर्दळ, रहदारी असणारें घर. [सं.] ॰पेटी-स्त्री. धर्मादाय पेटी; धर्मार्थ पैसे टाकण्यासाठीं ठेवलेली पेटी. (देऊळ; सामाधि; धर्मार्थ संस्था वगैरे ठिकाणीं). [सं. धर्म + पेटी] ॰पाई- ॰पोवई-स्त्री. १ प्रवाशांसाठीं, गरिबांसाठीं अन्न पाणी वगैरे फुकट मिळण्याची केलेली व्यवस्था; धर्मार्थ अन्नोदक दान. २ अशी व्यवस्था जेथें केलेली असते तें ठिकाण; अन्नछत्र; धर्मशाळा. ॰प्रतिष्ठा-स्त्री. १ धर्माचा गौरव; सन्मान; डौल. २ धर्माची स्थापना. 'धर्मप्रतिष्ठा तो सिध्दु । अभयहस्तु ।' -ज्ञा १.१३. [सं.] ॰प्रधान-वि. १ धर्मरूप पुरुषार्थाविषयीं तत्पर; धार्मिक वृत्तीचा. २ धर्म ज्यांत प्रमुख आहे असा (विषय, हेतु इ॰). ॰बंधु-पु. मानलेला भाऊ; भावाच्या जागीं असणारा माणूस; स्वतःच्या धर्माचा अनुयायी; स्वधर्मीय. [सं.] ॰बाप-पु. (ख्रि) कांहीं चर्चेसमध्य लहान मुलांचा बाप्तिस्मा होतो तेव्हां त्यांस खिस्तीधर्मास अनु- सरून वळण व शिक्षण देण्यांत यावें म्हणून जबाबदारी घेणारा पित्याहून निराळा पुरुष. (इं.) गॉडफादर. 'ज्या प्रत्येक मुलाचा बाप्तिस्मा करावयाचा आहे त्याला दोन धर्मबाप व एक धर्मआई पाहिजे.' -साप्रा ९०. [धर्म + बाप] ॰बुद्धि-स्त्री. धर्म करण्याची मनाची प्रवृत्ति; धर्माचरणाविषयीं आस्था. 'या चोराला तुम्ही गरीब मानून घरीं जेवायला घालितां ही धर्मबुद्धि कामाची नव्हे.' [धर्म + बुद्धि] ॰भोळा-वि. १ धर्मावर अंधश्रद्धा असणारा, परम धार्मिक. २ (अनादरार्थी) धर्मवेडा; कट्टर सनातनी. (इं.) सुपरस्टिशस. 'बॅरिस्टर, या धर्मभोळ्या खुळचट लोकांत तुम्ही आपल्या वाईफला एक मिनिटहि ठेवणं म्हणजे तिच्या सगळ्या लाइफचं मातेरं करण्यासारखं आहे.' -सु ८. ॰भ्राता-पु. धर्म- बंधु पहा. ॰मर्यादा-स्त्री. धर्मानें घालून दिलेली मर्यादा, बंधन, शिस्त; धार्मिक नियंत्रण. [सं.] ॰मार्ग-पु. धर्माचा, सदा- चरणाचा, परोपकाराचा मार्ग. [सं.] ॰मार्तंड-पु. १ धर्माचा श्रेष्ठ अनुयायी; पुरस्कर्ता; धर्मभास्कर; एक पदवी. २ (उप.) धार्मिकपणाचें अवडंबर, ढोंग माजविणारा. 'भीतोस तूं कशाला, मोडाया हें सुधारकी बंड । आहोंत सिद्ध आम्हीं पुण्यपुरींतील धर्ममार्तंड ।' -मोगरे. ॰युद्ध-न. युद्धशास्त्राच्या नियमाप्रमाणें चाललेली लढाई; सारखें संख्याबल; सारख्या शस्त्राअस्त्रांनीं सज्ज अशा दोन पक्षांमधील न्यायीपणाचें युद्ध; न्याय्ययुद्ध; निष्कपट युद्ध. 'तों अशरीरिणी वदली उत्तर । धर्मयुद्ध नव्हे हें ।' -पाप्र ४५.३९. [सं] ॰राज-पु. १ यमधर्म. २ जेष्ठ पांडव, युधिष्ठिर युधिष्ठिर हा फार सच्छील असल्यामुळें त्याला धर्माचा अवतार सम जत. ३ (ल.) धर्मनिष्ठ, सात्त्विक मनुष्य ४ धर्माप्रमाणें भोळा- भाबडा माणूस. [सं.] ॰राजाची बीज-स्त्री. कार्तिकशुद्ध द्वितीया; भाऊबीज; यमद्वितीया. [सं. धर्मराज + म. बीज] ॰राज्य-न. ज्या राज्यांत सत्य, न्याय आणि निःपक्षपात आहे असें राज्य; सुराज्य; सुखी राज्य [धर्म + राज्य] ॰लग्न-न. धर्मविवाह पहा. ॰लड- वि. (अश्लील) नास्तिक; धर्मकृत्यें न करणारा; धर्माला झुगारून देणारा. याच्या उलट धर्ममार्तंड. 'सदर ग्रंथांत महाराष्ट्र धर्मलंड अतएव त्याज्य असें एका गंधर्वानें म्हटलें आहे.' -टि ४. [सं. धर्म + लंड = लिंग] ॰लोप-पु. धर्माची ग्लानी; अधर्माचा प्रसार. [सं.] ॰वणी-पु. (कुंभारी) तिलांजळीच्या वेळचा कुंभारी मंत्र. -बदलापूर ७२. [धर्म + पाणी] ॰वाट-स्त्री. १ शरण आलेल्या शत्रूवर दया दाखवून त्यास करून दिलेली वाट. 'तुज युद्धीं कैंचें बळ । धर्मवाट दिधली पळ ।' -एरुस्व ११.३७. २ खुला, मोकळा, बिन धोक, अनिर्बंध रस्ता, मार्ग. [सं. धर्म + वाट] ॰वान्-वि. धार्मिक; परोपकारी; सदाचरणी; सात्त्विक. [सं.] ॰वासना-स्त्री. दानधर्म, धार्मिक कृत्यें करण्याची इच्छा; धर्मबुद्धि. [सं. धर्म + म वासना] ॰निधान-न. धर्माचा खजीना, ठेवा, सांठा. 'रचिलीं धर्मनिधानें । श्रीनिवृत्तीदेवें ।' -ज्ञा ११.९. [सं.] ॰विधि-पु. धार्मिककृत्य, संस्कार. [सं.] ॰विपाक-पु. धार्मिक कृत्यांचा परिणाम, फल. सत्कृत्यांचें फल. विपाक पहा. [सं.] ॰विवाह-पु. गरिबाचें स्वतःच्या पैशानें करून दिलेलें लग्न; धर्मादाय लग्न. [सं.] ॰वीर- पु. १ स्वधर्मार्थ प्राणार्पण करणारा; धर्मासाठीं लढणारा. 'स्वधर्म- रक्षणाकरितां मृत्यूच्या दाढेंत उडी टाकणार्‍या धर्मवीराची ती समाधि होती.' -स्वप १०. २ धर्माचें संरक्षण, संवंधन करणारा; धर्माचा वाली; ही एक पदवीहि आहे. 'धर्मवीर चंद्रोजीराव आंग्रे.' ३ (ख्रि) रक्तसाक्षी. (इं.) मार्टिर. [सं.] ॰शाला-ळा, धर्म- साळ-स्त्री. वाटसरू लोकांना उतरण्याकरितां बांधलेलें घर; धर्मार्थ जागा; पांथस्थांच्या विश्रांतीची जागा. 'मढ मंडप चौबारी । देखे धर्मसाळां ।' -ऋ २०. [धर्म + शाला] ॰शाळेचें उखळ-न. (धर्म- शाळेंतील उखळाचा कोणीहि उपयोग करतात ल.) वेश्या; पण्यां- गना. म्ह॰ धर्मशाळेचे उखळीं येत्याजात्यानें कांडावें. ॰शास्त्र- न. १ वर्णाश्रम धर्माचें प्रतिपादक जें मन्वादिप्रणीत शास्त्र तें आचार व्यवहारादिकांसंबंधीं नियम सांगणारें शास्त्र, ग्रंथ. २ समाजाच्या शिस्तीसाठीं, धार्मिक आचरणाकरितां, सामाजिक संबंधाकरितां (लग्न वगैरे संस्थांबद्दल) विद्वानांनीं घालून दिलेले नियम किंवा लिहिलेले ग्रंथ. धर्माविषयीचें विवेचन केलेला ग्रंथ. ३ ख्रिस्तीधर्माचें शास्त्र. (इं.) थिऑलॉजी. याचें सृष्टिसिद्ध (नॅचरल), ईश्वरप्रणीत (रिव्हील्ड), सिद्धांतरूप (डागमॅटिक), पौरुषेय (स्पेक्युलेटिव्ह), व सूत्रबद्ध (सिस्टिमॅटिक) असे प्रकार आहेत. ४ (सामा.) कायदेकानू. [सं.] ॰शास्त्री-वि. धर्मशास्त्र जाणणारा. [सं.] ॰शिला-स्त्री. सती जाणारी स्त्री पतीच्या चितेवर चढतांना ज्या दगडावर प्रथम उभी राहते तो दगड. या ठिकाणीं उभी असतां ती सौभाग्यवायनें वाटतें. ही शिला स्वर्गलोकची पायरी समजतात. 'धर्म शिलेवर उभी असतांना थोरल्या माधवराव पेशव्यांची स्त्री रमाबाई हिनें नारायणराव पेशव्यांचा हात राघोबांच्या हातीं दिल्याचें प्रसिद्ध आहे.' -ज्ञाको (ध) ४४. 'धर्मशिळेवर पाय ठेविता दाहा शरीरा का करितो ।' -सला ८३. ॰शिक्षण-न. धर्माचें शिक्षण; धार्मिक शिक्षण. 'ज्या धर्म शिक्षणानें पुरुषाचा स्वभाव अभिमानी, श्रद्धाळु, कर्तव्यदक्ष व सत्यनिष्ठ बनेल तें धर्मशिक्षण -टिसू ११६. ॰शील-ळ-वि. शास्त्राप्रमाणें वागणारा; धार्मिक सदाचरणी; सद्गुणी. [सं.] ॰श्रद्धा-स्त्री. धर्माविषयीं निष्ठा; धर्मावर विश्वास. 'राष्ट्रोत्कष स धर्मश्रद्धा पुढार्‍यांच्याहि अंगीं पाहिजें.' -टिसू ११७. ॰संतति-संतान-स्त्रीन. १ कन्यारूप अपत्य (कारण कन्या कुटुंबाबाहेर जाते). २ दत्तक मुलगा. [सं.] ॰सभा- स्त्री. १ न्याय कचेरी; न्यायमंदिर; कोर्ट. २ धार्मिक गोष्टींचा निकाल करणारी मंडळी; पंचायत. [सं.] ॰समीक्षक, ॰जिज्ञासु-पु. (ख्रि.) धर्मसंबंधानें विचार करणारा; शोध कर णारा; पृच्छक. (इं.) एन्क्वायरर. 'धर्म समीक्षकांच्या शिक्षकांना उपयोगी पडतील अशा पुस्तकांची बरीच जरूरी आहे.' -ज्ञानो ७.५. १९१४. [सं.] ॰संमूढ-वि. कर्तव्य कोणतें हें ज्यास निश्चित कळत नाहीं असा. -गीर २५. ॰संस्कार-पु. धार्मिक संस्कार; धर्मविधी. ॰संस्थान-न. १ पुण्य क्षेत्र; धर्माचें, सदाचरणाचें स्थान. २ पूजा, अर्चा वगैरे करण्यासाठीं ब्राह्मणास दिलेलें गांव; अग्रहार. ३ (व्यापक) धर्मार्थ, परोपकारी संस्था, सभा. ॰संस्था- पन, ॰स्थापन-न. १ नवीन धर्मपंथाची उभारणी. 'धर्म स्थापनेचे नर । हे ईश्वराचे अवतार । जाले आहेत पुढें होणार ।' -दा १८.६. २०. २ धर्माची स्थापना; धर्मजागृति. [सं.] ॰सिद्धांत- स्वीकार-पु. (ख्रि.) उपासनेच्या वेळीं आपल्या धर्मश्रद्धेचे आविष्करण करण्याकरितां विवक्षित सिद्धांतसंग्रह म्हणून दाखविणें. (इं.) कन्फेशन् ऑफ फेथ. [सं.] ॰सिंधु-पु. धर्मशास्त्रावरचा एक संस्कृत ग्रंथ. यांत अनेक धर्मकृत्यांचें विवेचन केलेलें असून शुभाशुभ कृत्यांचा निर्णय सांगितला आहे. पंढरपूरचे काशिनाथ अनंतोंपाध्याय यांनीं इ. स. १७९१ त हा रचिला. ॰सूत्रें-नअव. ज्ञान व कर्म- मार्ग यांची संगति लावून व्यावहारिक आचरणाची सांगोपांग चर्चा करणारा प्राचीन ग्रंथ. सूत्रें पहा. [सं.] ॰सेतु-पु. धर्म- मर्यादा. [सं.] ॰ज्ञ-वि. १ धर्मशास्त्र, विधिनियम उत्तम प्रकारें जाणणारा. २ कर्तव्यपर माणूस; कर्तव्य जागरूक. धर्माआड कुत्रें-न. सत्कृत्याच्या, परोपकाराच्या आड येणारा दुष्ट माणूस. धर्मदारीं कुत्रें पहा. धर्माचरण-न. धार्मिक आचार; सदा- चरण. [सं. धर्म + आचरण] धर्माचा कांटा-पु. सोनें वगैरे मौल्यवान जिन्नसाचें खरें वजन लोकांस करून देण्यासाठीं विशिष्ट स्थलीं ठेवलेला कांटा; धर्मकांटा. वजन करवून घेणार्‍यांकडून मिळालेला पैसा धर्मादाय करतात. धर्माचा पाहरा-पु. सकाळचा प्रहर (सूर्योदयापूर्वीं दीड तास व नंतर दीड तास). धर्माची गाय-पु. (धर्मार्थ मिळालेली गाय). १ फुकट मिळालेला जिन्नस. म्ह॰ धर्माचे गायी आणि दांत कां गे नाहीं = फुकटचा जिन्नस किंवा काम क्कचितच चांगलें असतें. २ कन्या; मुलगी (कारण ही दुसर्‍यास द्यावयाची असते). -वि. गरीब निरुपद्रवी मनुष्य. धर्मात्मा-पु. (धर्माचा आत्मा, मूर्तिमत धर्म). १ धर्म- शील, धार्मिक प्रवृत्तीचा माणूस. २ धर्म करण्याकडे ज्याची प्रवृत्ति आहे असा. ज्यानें अनेक धर्मकृत्यें केलीं आहेत असा. [सं.] धर्मादाय-व-पु. १ धर्मार्थ जें दान तें; देणगी; भिक्षा. २ सर- कारांतून धर्मकृत्यांसाठीं प्रतिवर्षीं काढून ठेवलेली रक्कम; या कामीं ठराविक धान्य देण्यासाठीं दर गांवाला काढलेल्या हुकूम. -वि. मोफत; फुकट; धर्मार्थ. -क्रिवि. धर्म म्हणून; दान देण्याकरितां; धर्मार्थ. ॰टाकणें-सोडणें-देणें-धर्मार्थ देणें; दानधर्मासाठीं आपला हक्क सोडणें. धर्मादाय पट्टा-स्त्री. देऊळ, उत्सव इ॰ चा खर्च चालविण्यासाठीं किंवा एखाद्याच्या मदतीसाठीं, लोकांवर बसवितात ती वर्गणी. धर्माधर्मीं-धर्मींनें-क्रिवि. धार्मिक व उदार लोकांच्या मदतीनें अनेकांनीं धर्मार्थ हात लाविल्यानें; फुकट; स्वतः पैसा खर्च करण्यास न लागतां. 'लेखक ठेवून लिहिलें तर पुस्तक होईल नाहींतर धर्माधर्मीं ग्रंथ तडीस जाणार नाहीं.' [सं. धर्म द्वि.] धर्माधर्मीवर काम चाल- विणें-पैसा खर्च न करतां फुकट काम करून घेणें. धर्मा- धर्मीचा-वि. धार्मिक लोकांकडून मिळविलेला; धर्मार्थ (फुकट) मिळविलेला; अनेकांनीं हातबोट लावल्यामुळें संपादित (पदार्थ, व्यवहार). धर्माधिकरण-पु. १ धर्माचारांचें नियंत्रण. २ शास्त्रविधींची पाळणूक होते कीं नाहीं हें पाहाण्यासाठीं, नीति- नियमांवर लक्ष ठेवण्यासाठीं खातें, सभा. ३ धर्मशास्त्रांची अंमल- बजावणी. ४ सरकारी न्यायसभा; न्यायमंदिर. धर्माधिकार-पु. १ धर्मकृत्यांवर देखरेख करण्याचा अधिकार. धार्मिक गोष्टींवर नियंत्रण. २ न्यायाधीश. धर्माधिकरण पहा. [धर्म + अधिकार] धर्माधिकारी-पु. १ धर्मासंबंधीं गोष्टी पहाणारा वरिष्ठ अधि- कारी. धर्माधिकरणाचा अधिकारी. २ न्यायाधीश. धर्माध्यक्ष-पु. सरन्याधीश; धर्मगुरु; राजा. [धर्म + अध्यक्ष] धर्मानुयायी, धर्मानुवर्ती, धर्मानुसारी-वि. १ धर्माप्रमाणें चालणारा, वागणारा; सद्गुणी; सदाचरणी. २ एखाद्या धर्मपंथांतील माणूस. धर्मानुष्ठान-न. १ धर्माप्रमाणें वर्तन; पवित्र, सदाचारी जीवन. २ धार्मिक संस्कार, विधि. ३ धार्मिक कृत्य; सत्कृत्य. धर्मार्थ-क्रिवि. १ परोपकार बुद्धीनें; दान म्हणून देणगी म्हणून. २ मोफत; फुकट. धर्मार्थ जमीन-स्त्री. धार्मिक गोष्टींसाठीं दिलेली जमीन (देवस्थानास किंवा धर्मादायास दिलेली); इनाम जमीन. धर्मालय-न. १ धर्मस्थान; धर्मक्षेत्र; ज्या ठिकाणीं धार्मिक कृत्यें चालतात तें स्थळ. 'जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझें ।' -ज्ञा १.८३.२ धर्मशाळा. धर्मावतार-पु. अतिशय सत्वशील व पवित्र माणूस; प्रत्यक्ष धर्म. [धर्म + अवतार] धर्मासन-न. न्यायासन; न्यायाधीश बसण्याची जागा; न्याय- देवतेची जागा. धर्मित्व-वि. गुणित्व. 'जे धर्मधर्मित्व कहीं ज्ञानाज्ञाना असे ।' -अमृ ७.२८३. धर्मिष्ट-वि. धार्मिक; सत्त्वशील; सदाचरणी. धर्मी-वि. १ धर्मानें वागणारा; सदाचरण ठेवणारा; न्यायी; सद्वर्तनी. २ ते ते गुणधर्म अंगीं असणारा. (विषय, पदार्थ). ३ धर्मीदाता; उदार; धर्म करणारा. धर्मीदाता- पु. धर्मकरण्यांत उदार, मोठा दाता (भिक्षेकर्‍यांचा शब्द). धर्मोडा-पु. स्त्रियांचें एक व्रत; चैत्र महिन्यांत ब्राह्मणाच्या घरीं धर्मार्थ रोज नियमानें एक घागरभर पाणी देणें. [धर्म + घडा] धर्मोपदेश-पु. धर्माची शिकवण; धर्मांसंबंधी प्रवचन, उपदेश, धर्मोपदेशक-पु. गुरु; धर्माचा उपदेश करणारा. धर्मोपा- ध्याय-पु. धर्माधिकारी. धर्म-वि. १ धर्मयुक्त; धर्मानें संपादन केलेलें; धर्मानें मिळविलेलें; धर्मदृष्टया योग्य. 'उचित देवोद्देशें । द्रव्यें धर्म्यें आणि बहुवसें ।' -ज्ञा १७.३६०. २ (महानु.) वंद्य. 'जें पांता जालीं धर्म्यें । वित्त रागांसि ।' -ऋ २०. धर्म्यविवाह- पु. धर्मशास्त्रोक्त विवाह; सर्व धार्मिक संस्कारांनिशीं झालेला विवाह.

दाते शब्दकोश