मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

चाट      

स्त्री.       १. कुस्तीत जोडीदारास पाडण्यासाठी त्याच्या पायात जोराने पाय घालणे.; पायाची धडक देणे. (क्रि. मारणे.) (व.) २. तडाखा : ‘आणि ही पायावरची चाटही त्याच्याच फटकाऱ्याची.’ – चंग्र ४३. ३. तोटा; झीज; नुकसान. (क्रि. बसणे.) (वा.) चाट पडणे – आश्चर्यचकित होणे; थक्क होणे : ‘मी चाट पडतो.’ – लबोतोअ ३३. चाट बनणे – चकित होणे; फजिती होणे : ‘जर्मन वैमानिक क्रिट बेटावर येताच त्यांच्यावर चाट बनण्याचा प्रसंग आलाच?’ – किर्लोस्कर (ऑक्टो ४१). चाट मारणे – चुकवणे; गैरहजर राहणे : ‘आज चाट मारणारांना परहेड पाच रुपये दंड होणार आहे.’ – सुलतान १०७. चाट देणे – करायला पाहिजे असलेले काम, गोष्ट न करणे : ‘अनेकदा दाढी, आंघोळ यांनाही चाट मिळते.’ – माचू २०५. चाट होणे – थक्क, आश्चर्यचकित होणे; फजिती होणे : ‘मनात चाट झालो.’ –अचावा १०४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

स्त्री.       गप्प; बात (क्रि. देणे, मारणे.) (वा.) [सं. चाटु] चाट देणे – १. फसविणे. २. गाळणे; वगळणे : ‘…मुद्रणसुलभतेकरिता (अक्षरावरील) ओळीला गुजरातीमध्ये चाट देण्यांत आला…’ – हिंदोद ४२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वि.       १. हलकट; नीच; लबाड; सोदा; व्यसनी; लुच्चा; हरामखोर; पाजी; चावट : ‘मेळवूनी चाट करी सुरापान.’ – तुगा २५०९. २. चहाटळ; चावट; वात्रट : ‘गोकुळींची मुलें चाट । तेथें समस्त केलीं पै ।’ – हरिवि ७·६०. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वि.       १. रिकामी बडबड करणारा; गप्पीदास; चघळ. २. गजघंटा; तोंडाळ; तोंड स्वाधीन नसणारा. [सं. चाटु]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

स्त्री.       इच्छा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       तबल्याच्या पुठ्ठ्याचा कडेचा भाग, काठावरची वाजविण्याची बाजू. पहा : चाटी [ध्व.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चाट

वि. १ हलकट; नीच; लबाड; सोदा; व्यसनी; लुब्बा; हरामखोर; पाजी; चावट. 'मेळवूनी चाट करी सुरापान; -तुगा २५०९. २ चाहटळ; चावट; वात्रट. 'तरी गुज घेऊनि चाट ।' -परमा १४.२१. 'गोकुळींचीं मुलें चाट । तेणें समस्त केलीं पै ।' -ह ७.६०. [सं. चाट]

दाते शब्दकोश

चाट cāṭa a Light, low, scampish; of loose habits and practices; of blackguardly tricks or ways. Ex. ह्मणे पुससी वोष्ठ चाटूनि चाट ॥ पुन्हा बोलसी धीट गोष्टी ॥ अचाटा &c. 2 (Or चाटळ or चावट) Tediously talkative; addicted to prating: also given to blabbing.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री. १ (व.) कुस्तींत जोडीदारास पडण्यासाठीं त्याच्या पायांत जोरानें पाय घालणें; पायाची धडक देणें. (क्रि॰ मरणें) २ तडाखा; 'आणि ही पायावरची चाटहि त्याच्याच फटकार्‍याची.' -चंद्रग्र ४३. 'शिवाजीनें अफजुलखानास चांग- लीच चाट दिली.' ३ तोटा; झीज; नुकसान. (क्रि॰ बसणें). त्या व्यापारांत त्याला चांगलीच चाट बसली.' [ध्व. किंवा सं. चट् = तोडणें, बार करणें]

दाते शब्दकोश

वि. १ रिकामी बडबड करणारा; गप्पीदास; चधळ. 'चाट चावट वाजट ।' -दा २.३.३०. २ गंजघंटा; तोंडाळ. तोंड स्वाधीन नसणारा. [सं. वाचाट; सं. चाटु] ॰पण-न. चघळपणा. -हंको वाक्यवृत्ति २२२२.

दाते शब्दकोश

चाट a Light, low. Tediously talkative.

वझे शब्दकोश

पु. तबल्याच्या पुड्याचा कडेचा भाग, कंठावरची वाजविण्याची बाजू. 'चाटीवर वाजीव' 'चाट जुळळी नाहीं.' चाटी पहा.

दाते शब्दकोश

स्त्री. गप्प; बात. (क्रि॰ देणें; मरणें). 'दिली चाट ठेवून.' [ध्व; सं. चाटु; तूळ॰ इं. चॅट] ॰देणें-हातावर तुरी देऊन निसटणें; एखादें काम पतकरून न करणें; फसविणें.

दाते शब्दकोश

स्त्री. इच्छा. -शर [हिं.]

दाते शब्दकोश

स्त्री० जखम. २ रतीब. ३ तोटा, बूड.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

चात

चात cāta m f n The whirler of a spinning wheel: also the iron spike infixed, on which the thread is formed: also a separate pin or spindle. चात as Whirler is larger than चाती, and is attached to the राहट or Wheel; whereas चाती may be a Circular plate separate and for the hand. 2 The iron सळई or pin of goldsmiths, to pierce holes. 3 A shell in general spindle-like, long, and spiral.

मोल्सवर्थ शब्दकोश

चात mfn The whirler of a spinning wheel. The iron pin of goldsmiths.

वझे शब्दकोश

पुस्त्रीन. १ सुत काढण्याचा चाकाचा जो गरगर फिरणारा अवयव, भाग असतो तो; ज्यावर सुत गुंडाळले जातें ती सळई, सुई. चात चातीपेक्षां मोठा असून तो रहाटाला जोड- लेला असतो. परंतु चाती ही स्वतंत्रहि फिरकीसारखी वाटोळी व हातानें सूत काढण्यास उपयोगी अशी चकती असते. २ सोना- राची भोकें पडण्याची लोखंडी सळई, सामता; भोक पाड्याचें साधन. ३ चातीच्या आकाराचा लांबट मलसूत्रासारखें करवें असलेला शिंपला, शंख. [प्रा. दे. चत = सूत काढण्याचें साधन; तुल॰ सं. तुर्कू; सं. कृत् = सुत कांतणें]

दाते शब्दकोश

चाट पडणें,बनणें

फजीती होणें. 'जर्मन वैमा- निक क्रीट बेटावर येतांच त्यांच्यावर चाट बनण्याचा प्रसंग आलाच?' -किर्लो आक्टो. १९४१.

दाते शब्दकोश

चात      

स्त्री. न.       १. सूत कातण्याच्या चरख्याला लावलेला एक भाग, त्यावर सूत गुंडाळले जाते. हाताने गरगर फिरवून सूत काढण्याचे साधन. २. सोनाराची भोके पाडण्याची लोखंडी सळई, सामता; भोके पाडण्याचे साधन. ३. चातीच्या आकाराचा लांबट मळसूत्रासारखे करवे असलेला शिंपला, शंख. [सं. कृत्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

अचाट

वि. चावट; फाजील; लुच्चा. 'केलीं मुलें हीं अवघीं अचाटें ।' -सारु १.६७. [सं. अ + चाट = लबाड]

दाते शब्दकोश

बदला

वि. कमी गोलवट; चपटें किंवा थोडें लांबट आकाराचें; हलक्या जातीचें, ढबदार (मोतीं). ॰गोळवा मोतीं-न. थोडें गोलवट पण वरील कवच साफ, मऊ नसून खडबडीत असलेलें मोतीं. ॰चाट मोतींन. साधारण पांढरें, अगदीं सफेत, अगदीं लाल पिवळें, खुलतें व गोलवट जातीचें मोतीं.

दाते शब्दकोश

बुक्का लावणें

(पंढरपुरी.) फसविणें; बनविणें; चाट लावणें

दाते शब्दकोश

चाडा

वि. (कों.) बडबड्या; लुबरा; तोंडाचा शिनळ; फटकळ; शिवराळ; ज्याच्या तोंडांत कांहीं रहात नाहीं असा; बाष्कळ. [चाट]

दाते शब्दकोश

चांच

वि. हुषार; चपळ; चलाख; दक्ष (मुल). चंच पहा. 'समय न कळे वेडगळ बुद्धि । विजाती ते शुद्ध चांच चाट ।' -तुगा ३७४१.

दाते शब्दकोश

चांच      

वि.       हुशार; चपळ; चलाख; दक्ष (मूल). पहा : चंच : ‘समय न कळे वेडगळ बुद्धी । विजाती ते शुद्धी चांच चाट ।’ - तुगा ३७४१. [सं. चंच]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चाटा

वि. स्वच्छंदी; स्वैराचारी. -शर [चाट]

दाते शब्दकोश

चाटाई

स्त्री. वात्रटपणा.' का करिसी चाटाई ।' -दावि २४१. [चाट]

दाते शब्दकोश

चाटारु

वि. बडबडया. -शर? [चाट]

दाते शब्दकोश

चातेंपोतें

न. (व्यापक) सोनार, शिंपी, जव्हेरी, इत्या- दींचीं लहानसहान किरकोळ ह्त्यारें, उपकरणें (समुच्चयार्थीं). [चात + पोतें]

दाते शब्दकोश

चातेंपोतें cātēmpōtēṃ n (चात & पोतें) A comprehensive term for the tools and implements of goldsmiths, shroffs, tailors, and others, whose tools are few and small.

मोल्सवर्थ शब्दकोश

चाटी

स्त्री. तबला अथवा पखवाज ह्यांचे दुहेरी कातड्यानें मढविलेल्या तोंडाच्या कडेचें, सुमार दोन बोटें रुंदीचे गोल कातडें. चाट पहा.

दाते शब्दकोश

वि. चावट; चाट पहा. 'निगुरीक चाटी जल्पती ते न्यायें ।' -दावि २७३.

दाते शब्दकोश

चाटी      

वि.       चावट : ‘निगुरीक चाटी जल्पती तें न्यायें’ –दावि २७६. पहा : चाट

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

स्त्री.       तबला अथवा पखवाज यांच्या तोंडाच्या कडेचे सुमार दोन बोटे रुंदीचे गोल कातडे. पहा : चाट [ध्व.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चाती

स्त्री. १ छाप मारून नाणें पाडण्यासाठीं (सोनें, रुपें, तांबे या धातूचा) केलेला वाटोळा व चपटा तुकडा; चकती. २ वजन म्हणून उपयोगांत येणारी (शिसें इ॰ ची) वाटोळी चकती. ३ लाटण्यासाठीं जी वाटोळी वर्तुळाकार दामटी; एखाद्या पदार्थाची थापटी, वडी, चकती, लाटी. ४ सूत काढण्याच्या रहाटाचें चाक; त्या चाकाचा लोखंडी दांडा; सुत काढण्यासाठी, पीळ देण्यासाठीं पैशाला किंवा धातूच्या चकतीला मधोमध भोक पाडून त्यांत दांडा घालून केलेले यंत्र; टकळी. ५ सूत भरलेली सुताची कांडी; बॉबीन. [प्रा. दे. चत्त; मं. चात पहा]

दाते शब्दकोश

चाटळ      

वि.       वात्रट; बडबड्या; कुटाळखोर; चाट. पहा : चहाटळ

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चाटळ

वि. वात्रट; बडबड्या; कुटाळखोर; चाट, चहा- टळ पहा.

दाते शब्दकोश

चातली

स्त्री. (व.) जानव्याच्या सुताला पीळ देण्या- साठीं केलेली भिंगरी. [चात]

दाते शब्दकोश

चाट्याभाट्या

वि. वाचाळ; बोलघेवडा; बहुभाषी; स्तुतिपाठकासारखें बोलणारा. [चाट + भाट]

दाते शब्दकोश

चेकोंडा      

पु.       चाट; भुलावण; हुलकावणी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चॅट पडणे      

तोशीस पोहोचणे; झळ लागणे; चाट करणे : ‘ते खरं ! पण तुमच्या खिशाला काय चॅट पडत नव्हती ना?’ − आपा ११३. चॅटमॅट      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चकचक

क्रिवि. १ चकचकीतपणानें; डोळे दिपून जाण्यासारखें; झककन्; लखलख. २ स्पष्टपणें; चक्क पहा. 'चक- चक चुकावेना । चाट चावट चळावेना ।' -दा १४.४.६. -वि. चकचकीत पहा. -पुन. चकचकीत पदार्थ गोष्ट; चकचकाट. 'तेथें कांहीं चकचक दिसतें.' [दृश्यावरून सं. चक् = प्रकाशणें; चाक- चक्य = तेज, प्रभा; म. चक्क, चकचकणें]

दाते शब्दकोश

चकचक      

क्रिवि.       १. चकचकीतपणाने; डोळे दिपून जाण्यासारखे; झककन्; लखलख : ‘चकचक चुकावेना । चाट चावट चळावेना ।’ - दास १४·४·६. २. स्पष्टपणे. पहा : चक्क

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चकमा      

पु.       १. चाट; झुकांडी; भुलावन. २. फसवणूक. (झाडी) [हिं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चोट

स्त्री० चाट, जखम, नुकसान.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

चट्टा      

पु.       १. चुरचुर करणारा, वेदना करणारा भाग; नायटा; खाज सुटणारा पुरळ; दुखापत; क्षत; खवंद. २. व्रण; डाग; क्षत; चिन्ह (क्रि. पडणे.) ३. (ल.) तोटा; दुर्दैवाचा आघात; कोणत्याही कृत्यात, धंद्यात आलेली, लागलेली तोहमत, ठेच; नुकसान; तूट; खोट; घस; चाट. (क्रि. येणे, बसणे.) [सं. चप्] (वा.) चट्टा बसणे – नुकसान पोचणे, कमी होणे : ‘मनुष्य जातीच्या सुखास चट्टा बसत आहे.’ - आलेसं १८७. चट्टा लावणे – खर्चात पाडणे; नुकसान करणे; खड्ड्यात घालणे : ‘... आम्हांला चांगला ५०-७५ रुपयांचा...चट्टा लावून त्या मूर्ति चालत्या झाल्या.’ - पलकोघे ४८८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चट्टा

पु. १ चुरचुर करणारा, वेदना करणारा भाग; नायटा; खाज सुटणारा पुरळ; दुखापत; क्षत; खवेद. २ वण; डाग; क्षत; चिन्ह. (क्रि॰ पडणें) ३ (ल.) तोटा; दुर्दैवाचा आघात; कोण त्याहि कृत्यांत, धंद्यांत आलेली, लागलेली तोहमत, ठेंच, खोट, नुकसान, तूंट, घस, चाट. (क्रि॰ येणें; बसणें). 'यंदा भाताचे व्यवहारांत पांचशें रुपये चट्टा बसला.' [हिं. म. चाटणें]

दाते शब्दकोश

दच्चा देणें

चाट मारणें; यःपलाय करणें.

दाते शब्दकोश

गोता

(पु.) हिंदी अर्थ : डुबकी, डूबना. मराठी अर्थ : डुबकी, चाट देणें.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

घाव

पु० वार, चाट, चाय, जखम.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

कानडें

कानडें kānaḍēṃ m A common term for the two (spanhigh) uprights which support the चात or whirler of a spinning wheel.

मोल्सवर्थ शब्दकोश

कुकडें

कुकडें kukaḍēṃ n The quantity of thread which is drawn from the चात or spindle. 2 A disease of cattle.

मोल्सवर्थ शब्दकोश

खे(खें)व

स्त्री. १ मिठी; आलिंगन; खेम. 'स्नेहें मीनल्या खेंवकवळी ।' -मुआदि ४५.११९. 'आपण निवोनि निववी पुष्कळ त्याही सुखेंव देत्यातें ।' -मोभीष्म ३.४३. २ खेट; घसडा; चाट; चाटून जाणें. [सं. क्षेम-खेंव]

दाते शब्दकोश

खिसा      

पु.       १. कप्पा; कसा; अंगरख्याला असलेला पिशवीसारखा भाग. २. (ल.) पडदा; कूड; खण; गौण, अंतर्भूत गोष्ट अथवा बाब. ३. (ल.) मनात किंवा पोटात ठेवलेली गोष्ट; दाबून किंवा दडवून ठेवलेला मुद्दा (सांगण्यातील). (क्रि. राखणे.) [फा. कीसा] (वा.) खिसा कातरणे, खिसा कापणे - भामटेगिरी करणे; लुबाडणे फसवणे. खिसा खाली असणे, खिसा खाली होणे - जवळ पैसे नसणे; जवळचे सगळे पैसे खर्च होणे. खिसा गरम असणे - भरपूर पैसे जवळ असणे. खिसा गरम करणे - १. खूप पैसे मिळवणे. २. लाच देणे. खिशात टाकणे - १. लांबवणे; चोरणे. २. आधीन करून घेणे. खिशातली गप्प - निव्वळ थाप. खिशाला चाट बसणे - नको असलेला जादा खर्च करावा लागणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खुराक

(फा) पु० रतीब, चाट, खाणें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

लचलच or चां

लचलच or चां lacalaca or cāṃ ad लचालचा ad Imit. of the sound in lapping or licking. v चाट, पी, खा, जेव.

मोल्सवर्थ शब्दकोश

माळ

माळ māḷa f (माला S) A garland, a wreath, a string of flowers. 2 A row of petals, a corol. Esp. in comp. with the numerals; as एकमाळ, दुमाळ, तिमाळ. 3 A string of gems or beads; a necklace; a rosary. 4 fig. A string, line, series; a regular succession or concatenation of things in general (as of waterpots around a waterwheel, of laborers to pass from hand to hand, of persons, legend-expounders, priests &c. to officiate by turns): also the rope of a waterwheel to which the pots are fastened. v लाव, लाग. 5 A day of the नवरात्र;--because a fresh string of flowers is used every day of this period. Ex. आजची कितवी माळ आहे. 6 The roll of सूत around the wheel passing on to the चात or whirler. In spinning or drawing threads.

मोल्सवर्थ शब्दकोश

मोकाट-टु-टू

वि. १ (माण.) उद्धट; द्वाड; दांडगा; स्वच्छंदी. २ (व.) मोकळा; अनर्गल. 'धीट सैराट मोकाट । चाट चावट वाजट ।' -दा २.२. [सं. मुक्त]

दाते शब्दकोश

नुकसान ( आर्थिक )

घस पडली , दिवाळे फुंकायची वेळ आली, आंतबट्ट्याचा व्यापार ठरला, आर्थिक तोशीस-अर्थिक फटका खाल्ला, ठोकर बसली, चाट बसली, धंदा नुकसानींत आला, गोत्यांत आला, अद्दल घडली, कुठ सांठवलेले २-५ रुपये यांत गेले, कमावलेलें सर्व गमवायची वेळ आली, दहा रुपयांना गोत्यांत आणलें, त्याने मला तीन आण्याला गंडा घातला, या पायीं मला पांचशें रुपयांची फोडणी बसली ! दोन पैसे मिळवले होते ते गेले, तीन हजारांवर म्हणजे शेपटीवरच गेलें, व्यापारांत घातलेले भांडवल अजून उभें राहिलेलें नाहीं, कित्येक हजारांना नागविलें, व्यवहारांत आपल्या पायांवर धोंडा घालून घेतला, गेलें तें सर्व म्हटलें कृष्णार्पणमस्तु.

शब्दकौमुदी

पाट

पु. १ चौकोनी लहान लांकडी फळीला खालीं आंखुड पाय जोडून बसण्यासाठीं केलेलें आसन; बैठक. 'तेव्हा धांवुनि बैसे पार्थ सुभद्रारथीं जसा पाटीं । सुचिर क्षुधित ब्राह्मण हां हां म्हण- तांहि वाढिल्या ताटीं ।' -मोकृष्ण ८६.२२. २ सिंहासन; गादी; पीठ. 'ते वेळीं विजयश्रियेच्या पाटीं । एकुचि बैसे ।' -ज्ञा ७.१२. 'योगसाम्राज्य शेष पाट । तुजचि साजे ।' -विपू ७.१०५. ३ श्रेष्ठपणाचा मुख्य मान, अधिकार. 'वरी क्षत्रियांमाजी श्रेष्ठु । जो जगजेठी जगीं सुभटु । तया दळवैपणाचा पाटु । भीष्मासि पै ।' -ज्ञा १.११५. 'एकाएकीं इच्छी पाट । नेणे चाट काउळें ।' -तुगा २८७०. ४ श्रेष्ठपणा; मोठेपणा. 'कां बाळका एकी माये-। वांचोनि जिणें काय आहे । म्हणौनि सेविजे कीं तो होये । पाटाचा धर्मु ।' -ज्ञा १८.९०८. ५ (खडीकामाचा धंदा). ठसे उठ- विण्यासाठीं खालीं धरावयाचें फळीसारखें साधन. ६ (विणकामाचा धंदा) सूत उकलण्यासाठीं ताणा घालण्यासाठीं फळीवर खुंट्यांच्या रांगा ठोकून केलेलें साधन. ७ खांबाची उंची वाढावी म्हणून त्याच्या माथ्यावर तुळईखालीं बसविलेली लांकडी बैठक. चौकोनी तुकडा. [सं. पीठ; पट्ट] ॰बांधणें-पट्टाभिषेक, सिंहासनाभिषेक, करणें. 'इया गुरुचरणसेवा । हों पात्र तया दैवा । जे सकळार्थ- मेळावा । पाटू बांधे ।' -ज्ञा १५.९. पाटीं बसणें-अक्रि. १ कोणत्याहि विधि अथवा संस्काराच्या वेळीं पत्नीनें पती शेजारीं उजवे बाजूस बसणें. २ (एखादी स्त्री) रजस्वला, विटाळशी होणें. ३ अधिकाराचें, मानाचें स्थान प्राप्त होणें, मिळविणें. 'कीं तयाही पाठीं । जे वेळीं लोह मांसातें घाटी । ते वेळीं विजयश्रियेच्या पाटीं । एकुचि बैसे ।' -ज्ञा ७.१२. पाटीं बसविणें-मान देणें; प्रतिष्ठेचें स्थानं देणें. 'सकळां ज्ञानाचां सेवटीं । करूनि आगमा ठी । निगमा बैसवी पाटीं । परज्ञानाचा ।' -ऋ ३. पाटाचा-वि. १ सर्वोत्कृष्ट; मुख्य. 'तें माझें निजधाम पाहीं । पाटाचें गा ।' -ज्ञा १५.३१६. २ ऐक्याचा. -मनको. ३ (महानु.) अधिकारपत्र मिळा- लेला; हक्काचा. 'वसंतां वाउगें बीकु । तें सुख चौ-गुणां अधिकु । भणॐनि ते पाटाचे अंकु । मन्मथाचें ।' -शिशु ६२२. सामाशब्द- ॰पाणी-न. १ (जेवावयास आलेल्या) पाहुण्यास, इष्टमित्रास बसण्यास पाट व पाय धुण्यास पाणी वगैरे देऊन करावयाची सर- बराई. (क्रि॰ देणें). २ भोजनास बसणाऱ्या मंडळीकरितां पाट मांडून, त्यांपुढें ताटें मांडून व पाण्यानें तांबे भरून ठेवून कराव- याची (भोजनाची) पूर्वतयारी. (क्रि॰ करणें). [पाट + पाणी] ॰पासोडा-पु. विवाह, मुंज इ॰ मंगल कार्यांत वधूवरें, बटु इ॰कांना बसण्याकरितां केलेली शालजोडी, सखलाद इ॰कानीं आच्छादित अशी दोनतीन पाट जोडून मांडलेली बैठक. या बैठकीवर धान्य इ॰कांचा चौक भरतात. [पाट + पासोडा] ॰पिढें-न. १ (व्यापक) खुर्ची, मेज, पाट इ॰ संसारोपयुक्त लांकडी सामान, जिन्नस. २ पाट वगैरे आसन. 'तूं देत जा पाटपिढें बसाया ।' -सारुह ७.१११. [पाट + सं. पीठ] ॰रस-पु. (राजा.) आंब्यांचा एकदां रस काढून झाल्यावर पुनः त्या साली व कोया यांच्यांत पाणी घालून (पाटावर दाबून) काढतात तो रस. [पाट + रस] ॰वडी-स्त्री. हरभऱ्याच्या पिठांत तिखट, मीठ, मसाला इ॰ घालून तें उकडून पाट इ॰कावर थापटून कलेली वडी. 'वड्या पाटवड्या शाखा बहुत ।' -नव ९.११८. [पाट + वडी] ॰वर्धन-वि. अधिकार, पदवी वाढविणारा. 'सकल- मुकुट-पाटवर्धन । वन-माला विराजमान ।' -दाव ३६१. [पाट + सं. वर्धन = वाढविणारा, वाडविणें] ॰शेवई-स्त्री. पाट, लांब फळी इ॰ कांच्या मदतीनें केलेला शेवयांचा एक प्रकार. याच्या उलट हातशेवई. ही केवळ हातांनींच करितात. [पाट + शेवई] ॰सरी-स्त्री. जेथें भिंत छपरास मिळते त्या ठिकाणची आंतील बाजूस राहिलेली जागा; जई.

दाते शब्दकोश

फन

न. १ नांगराच्या दांडयाचें, दांताचें टोंक (ज्याला फाळ बसविलेला असतो तें). २ चात; तर्कु. ३ (व.) जोंधळ्यांची कापणी झाल्यावर जमिनीत राहिलेला खुंट. फण पहा. ॰सावडी- स्त्री. (व.) फन सावडण्याचें एक आऊत.

दाते शब्दकोश

रेवडी

स्त्री. १ साखरेच्या किंवा गुळाच्या पाकांत तीळ घालून केलेली वडी. २ (ल.) फजिती; एखाद्याचा उडविलेला बोर्‍या; लाजिरवाणी स्थिति. [हिं.] ॰उडणें-होणें-फजिती होणें. 'धरली बेदरची चाट, रेवडी झाली ।' -ऐपो २३७. रेवडी वळविणेंहबेलंडी उडविणें; फजिती करणें. ॰दाणा- दाण-स्त्री. पूर्ण फजिती. रेवड्या वळणें-फजिती होणें.

दाते शब्दकोश

टाकणी      

स्त्री.       पखवाजाच्या शाईच्या पुडीबाहेरचा काठाजवळचा भाग; चाट.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तानवट

तानवट tānavaṭa n An arrangement of pegs or stakes around which the कुकडें (cotton thread from the चात or spindle) is wound, and from which the चिवट (or roll) is drawn.

मोल्सवर्थ शब्दकोश

टांकणी

स्त्री. १ पखवाजाच्या शाईच्या पुडीबाहेरचा कांठा- जवळचा भाग; चाट. २ (हेटकरी) लहान रोयली; उलटे पांच पाय असलेला लहान नांगर. [टाकणें]

दाते शब्दकोश

ठोंग

पु. १ अंगीं विद्वत्ता नसतां अनेक कचाटें करून गांवांत मोठेपणा पावलेला पुरुष; धटिंगण; दांडगा. ठोकतापीर पहा. २ (व.) चाट; गप्प; थाप. ॰मत-न. १ ठेंगमत पहा. २ तरकट; थोतांड; तोहमत; फसविण्यासाठीं किंवा त्रास देण्यासाठीं सांगितलेली खोटी गोष्ट. [ठोंग + मत]

दाते शब्दकोश

ठोंग      

पु.       १. अंगी पात्रता नसता अनेक उचापती करून गावात मोठेपणा पावलेला पुरुष; पहा : ठोकता पीर. २. चाट; गप्प; थाप. (व.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वाचा

स्त्री. १ वाक्; वाणी; वागिंद्रिय. २ भाषण; बोलणें; शब्द; वचन; बोल. 'वदलासि न तूं कधींहि अशी वाचा ।' -मोकर्ण ५.३७. ३ आकाशवाणी; अशरीरिणी वाक्. ४ अव- सरणी. [सं. वच् = बोलणें] वाचा उकठणें-पालटणें-परतणें- फिरणें-मुरडणें-बोलणें खुंटणें; बोलणें खोटें पडणें; मागें घेण्याची पाळी येणें; गप्प बसावें लागणें. वाचा नरकांत घालविणें-खोटें बोलणें; वचन मागें घेणें. वाचा फुटणें-बोल- ण्याची शक्ति येणें. वाचा बसणें-बोलण्याची शक्ति नाहींशीं होणें; वाणी खुंटणें; बोबडी वळणें. वाचा विटाळणें-१ खोटें बोलणें; वचन न पाळणें. २ व्यर्थ भीड घालणें; निरर्थक शब्द वेंचणें, खर्च करणें. ॰ट-ल-ळ-वि. बडबड्या; बोलका; बोल- घेवडा; वटवट करणारा. 'वाचाट हा चाट वदोन राहे ।' -सारुह ८.१५. (वाप्र.) ॰दत्त-वि. १ वाग्दत्त; वाणीनें दिलेलें; वाङ्- निश्चित. २ वचनानें दिलेलें; कबूल केलेलें. ॰बरळ-वि. बड- बड्या; बरळणारा. 'गुरूतें वाचाबरळ ।' -विपू २.६. ॰रंभण- न. परिस्फुटता; स्पष्टपणें वाचेनें निदर्शन; बोलण्यांत रूढी. 'राष्ट्रीय शिक्षणाच्या कल्पनेला वाचारंभण किंवा नामधेय अजून मिळालें नव्हतें ।' -टिळकचरित्र १. ॰विदळ-वि. (बो.) वाचाट; वात्रट; अद्वातद्वा बोलणारा. वाचांश-पु. १ (चुकीनें वाच्यांश). शब्द; चकार शब्द; उच्चार (क्रि॰ काढणें; करणें). २ उल्लेख; बोलणें; चर्चा. (क्रि॰ काढणें; निघणें). ३ परिस्फोट; लावालावी. (क्रि॰ करणें). ४ वचन; करार. (क्रि॰ करणें). वाचाशक्ति- स्त्री. १ वक्तृत्त्व; व्याख्यानसामर्थ्य; बोलण्याचें चातुर्य. २ (रूढ) वाचण्यांतील कौशल्य; स्पष्टपणा; वाचनशक्ति. ३ वाचाळपणा. 'तुम्ही अमळसें तोंड आपटून धरीत जा. भारी वाचाशक्ति करूं नका.' -शास्त्रीको. ॰सिद्धि-स्त्री. बोललेलें खरें होण्याचें सामर्थ्य; अमोघवाणी. वाचाळ-वाचाट पहा. 'तुका म्हणे वाचा वाचां- ळतें ।' -तुगा ७०. वाचाळता-स्त्री. बडबड. 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ।' -राम १६५. वाचाळ पंचविशी- स्त्री. बडबड. (क्रि॰ लावणें). 'तिची वाचाळ पंचविशी आतां सारखी चालू झाली ।' -गणपतराव. ॰पंचांग-न. चऱ्हाट; बड- बड; वटवट. ॰वाणा-णी-वि. बोलका; बडबड्या. -क्रिवि. चावटपणें; वाचाटपणें. वाचाळी-स्त्री. बडबड. 'एक म्हणती साडी वाचाळी ।' -दा ८.१०.१९; -ज्ञा १८.१७०९. वाचिक- न. वृत्त; बातमी; हकीकत; वर्तमान. -वि. वाणीसंबंधीं; बोलण्यानें, शब्दानें घडलेलें. ॰कर्म-१ वाणीनें केलेलें काम. (विशेषतः पातक, खोटें, कडू बोलणें वगैरे). ॰प्रतिकार-पु. तोंडानें केलेला विरोध; शाब्दिक विरोध. 'त्यांचा वाचिक प्रतिकारहि आम्हाला करवत नाहीं ।' -केले २.५०३.

दाते शब्दकोश

वाजट

न. १ प्रसिद्धि; डंका; गवगवा; बभ्रा; बोभाटा; वाच्यचा; परिस्फुटता. -केसरी २२.१२.३६. २ जाहीरी; प्रसिद्धि; प्रसार. (क्रि॰ करणें). -वि. १ प्रसिद्ध; बोभाटा झालेला. २ जाहीर झालेला. ३ वाचाट; व्यर्थ बडबड्या; वाद घालणारा. 'चाट चावट वाजट ।' -दा २.३.३०. 'उच्छृंखळ पापी धीट वाजट ।' -स्वानु ४.४. ४ वाजणारा; नाद करणारा; आवाज करणारा. 'सरत्न वर मेखळा लसित घंटिका बाजटा ।' -निमा चिद्वोधरामायण. सर्ग ३. श्लोक १८. 'त्या पादुका वाजटा ।' -आसीता १०. -क्रिवि. प्रसिद्धपणें; उघडपणें. [वाजणें]

दाते शब्दकोश

विलग

पुन. १ वैगुण्य; उणेपणा; व्यंग; विसंगति; वैपरीत्य; अंतर. 'विलग पडों नेदावें । कथेमध्यें ।' -दा १२.९.२०. २ उपद्रव; त्रास. 'कानक्रोधांचे विलग । उठावती अनेक ।' -ज्ञा १२.६२. -वि अलग; भिन्न; विसंगत; अयोग्य; असंबद्ध; न जुळणारें; तुटक; अलिप्त. 'हे लोक साऱ्या गांवापासून कांही काळ विलग राहिले होते.' [सं. वि + लग्] विलगट-वि. वेगळा; अलिप्त; भ्रष्ट. -स्त्री. फार लगट; विशेष लगट. 'विलगट हट नाहीं चाट मोकाट नाहीं ।' -दावि ७.२. 'ते देवत्रयांची खटपट । सूक्ष्मरुपें विलगट ।' -दा १२.८.९. विलगणें-अक्रि. दूर होणें; नाहींसा होणें; धुऊन निघणें. 'पदी श्रीरामाच्या दृढ- तर महादोष विलगे ।' -सारुह ६.१६३. विलगेस लावणें- दूर करणें; बंदोबस्त करणें; बाजूस काढणें. ' ही किरकिर विलगेस लावा ।' -पला ६.१३.

दाते शब्दकोश

वारा

पु. १ वात; चलित वायु; हवा; न दिसणारें परंतु स्पर्शास समजणारें पंचमहाभूतांतील एक तत्त्व. -ज्ञा १५.३७६. २ (ल.) वीरश्री; स्फुरण. 'शिंद्यांना भरला वारा ।' -संग्रामगीतें ७३. ३ संचार; अंगांत येणें. 'कंपु नोहे आंगी वारा । जगदंबेचा ।' -ऋ ६५. [सं. वा = वाहणें] (वाप्र.) ॰घालणें-पंखा, चवरी वगैरे साधनानीं हवेस चलन देऊन वारा लागेल असें करणें. ॰घेणें- खाणें-पिणें-१ (वासरें वगैरे) मोकाट सैरावैरा पळूं लागणें; उड्या मारूं लागणें. २ (ल.) निर्बंध झुगारून देऊन स्वैर वर्तन करणें; मोकाट सुटणें; अद्वातद्वा वागणें. 'स्वरूप तुमचें पाहून पापिणी जीव आमचा प्याला वारा ।' -होला १०२. 'तेणें करून रांगडे बहुत वारा प्याले ।' -पेद २१.१७७. ॰न घेणें किंवा न पडूं देणें-अगदीं अलिप्त, दूर राहणें; किंचितहि संबंध न येऊं देणें; संसर्ग टाळणें. ॰पडणें-वारा वहावयाचा बंद होणें. ॰पिणें-१ वारा घेणें पहा. २ दुःखी, उदासीन, उत्साहहीन, खिन्न, उद्विग्न होणें. ॰फिरणें-मत बदलणें; स्थिति पालटणें. ॰मोकळा करणें- सोडणें-अपानवायु सोडणें; पादणें. ॰मोकळा होणें, सरणें- अपानवायु सुटणें; पश्चिमद्वारें वायु बाहेर पडणें; पादणें. 'वारा सरतां मोठी फजीति ।' -दा १८.१०.२०. ॰वाजणें-वारा वाहणें; जोराचा गार वारा सुटणें. 'वारा वाजतां करपती ओलीं पिकें ।' -दा ९.८.२९. ॰वाजेल-वाहील तशी पाठ करावी- ओढवावी, द्यावी, वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें-पाठीवर घ्यावा-१ वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर जावें, वारा बाहील त्या दिशेनें जावें, वाऱ्याच्या अनुरोधानें जहाज हांकरावें. २ (ल.) वेळ पडेल तसें, प्रसंग ओळखून वागावें. ॰होणें-वाकाहक होणें. 'हळहळ बहु झाली होय संसार वारा ।' -सारुह ३.७३. वाजता वारा लागूं न देणें-किंचितहि त्रास न सोसणें; स्वतःस अणुमात्र तोशीस लागूं न देणें; अजीबात त्रास टाळणें. वाऱ्याचा उपद्रव-पु. १ हवेंतील फरकामुळें होणारी पीडा, बाधा. २ पटकीची साथ. वाऱ्याचा बुंद-पु. हवेचा अल्पांश; किंचित्हि वायुचें वाहणें; बारीकशी झुळूक (बहुधा नास्तिपक्षी ). वाऱ्याची मोट-स्त्री. (ज्याप्रमाणें वारा एका गाठोड्यांत बांधणें अशक्य त्याप्रमाणें) परस्परांपासून दूर व भिन्न अशा अनेक वस्तु अथवा व्यक्ति एकत्र आणण्याची व ठेवण्याची क्रिया; अनिर्बंध वस्तूंचें एकत्रीकरण. (हें अशक्यप्राय असतें) ॰बांधणें-क्रि. अशक्य गोष्ट करूं जाणें. वाऱ्याचें घोडें-न. (वाऱ्यानें चालणारें) जहाज; गलबत; नौका. वाऱ्याबरोबर- शीं भांडणें-अतिशय भांडखोरपणा करणें; लसते कलह उकरून काढणें. वाऱ्याला लाथा मारणें-निष्फळ काम करणें. वाऱ्या वर टाकणें-अजिबाद सोडून देणें; टाकून देणें; पूर्णपणें त्याग करणें; हयगय, दुर्लक्ष करणें. वाऱ्यावर भारे बांधणें-मनोराज्य करणें. वाऱ्यावर वरात भुसावर चिठी-भूसपर ठेंगा- बेजबेबदारीचें, निष्काळजीचें काम (वरात म्हणजे पैसा देण्या- विषयीं चिठ्ठी. ती वाऱ्यावर देणें म्हणजे कांहीं तरी करणें); ताळ- मेळ नसलेली गोष्ट करणें. वाऱ्यावर सरणें-१ कुठें तरी भट- कणें; वहावत जाणें; कांहीं तरी भरमसाट बोलत सुटणें. २ अवखळ होणें; आडदांडपणा करणें; स्वैर वागणें. वाऱ्यावशीं-वाऱ्या- सोई-वाऱ्याबाग-क्रिवि. वाऱ्याच्या गतीच्या अनुरोधानें; प्रवाहाबरोबर; प्रवाहाच्या दिशेनें. वाऱ्यास उभा न करणें-राहूं न देणें-न राहणें-स्वतःपासून दूर ठेवणें; संबंध न ठेवणें; संसर्ग टाळणें. वाऱ्यास देणें-उपणणें; वारवणें; वारसंडणें. सामाशब्द- वारापाणी-न. १ वारा व पाणी यांच्या सुलभतेमुळें क्षुल्लकत्व दर्शक दुर्लक्षित, उपेक्षित स्थिति; अवहेलना; उपेक्षा; हेटाळणी; किर- स्कार; हेळसांड. 'मी बोलतों याचें उगीच वारापाणी करून टाकूं नको.''झालें वारापाणी वज्र तव भयेंचि देव कां पावे ।' -मोअश्व १.१०६. २ -नस्त्री. निरवानिरव; वारासार; फेड; भागवा- भागवी (कर्ज-वाम वगैरेची). ३ निरास; निवारण; अनिष्ट निर- सन. ४ हवापाणी; मोकळी स्वच्छ हवा; एखाद्या ठिकाणचें हवा- मान; आबहवा. 'चार दिवस वारापाणी खा मग बरा होशील.' [वारा + पाणी] वारें-न. १ वारा; विशेषतः वाहणारा, हलणारा वारा. २ साथ; प्रसार; प्रादुर्भाव (रोग वगैरेचा). उदा॰ पटकीचें वारें; खोकल्याचें वारें. (क्रि॰ चालणें; वाहणें; वाजणें; सुटणें). 'वारीं रोग्याची वाजतीं ।' -दावि ३७७. ३ संचार; अंगांत येणें; पिशाच्चबाधा. (क्रि॰ येणें; भरणें.) 'अंगीं घेऊनियां वारें दया देती । तयां भकतांहातीं चाट आहे. ।' -तुगा २८४२. 'वारें निराळें बोलें । देहामध्यें भरोनि डोले ।' -दा ९.८.२२. ४ झांक; छटा; चर्या; सूरत; गुणसमुच्चय. (विशिष्ट गोष्टीकडे कल, आवड, विशिष्ट बौद्धिक सामर्थ्य, कौशल्यदर्शक). 'कारकुनीचें वारें.' ५ लहर; लाट; ऊर्मि; प्रवृत्ति; कल. उदा॰ प्रीतीचें-ममतेचें-रागाचें- शोकाचें-आनंदाचें-वारें. ६ जोम; उत्साह; सामर्थ्य; आनुवंशीक ओज, तेज, रग वगैरे. उदा॰ तारुण्याचें-बळाचें-शक्तीचें- वारें. 'हिंदुलोकांत स्वातंत्र्याचें वारें कसें तें माहित नाहीं.' -नि. 'अंगीं भरलें नूतन वारें ।' -विक ३. ७ सामान्यतः एखादी चम- त्कारिक कल्पना, वेड, खूळ वगैरे. 'सुधारणेचें वारें महाराजांच्या डोक्यांत शिरलें' -टिले ४.३३६. ८ स्पर्श; वास. 'एका राज्य- व्यवस्थापकानें राज्यास संपत्तीचें वारें लागूं नयें म्हणून कडक कायदे केले.' -नि ५४. ९ अंश; भाग. 'त्यातलें बिलकुल वारें ऐन साठीच्या अंमलातहि प्रस्तुत ग्रंथकाराचे ठिकाणीं आढळत नाहीं.' -नि. १० आविर्भाव; देखावा; आव; अवसान. 'चोरा- पुढें त्यानें पहिलवानगिरीचें वारें अंगीं आणण्याचा प्रयत्न केला.' ११ अर्धांगवायु; पक्षपात. 'वारीं अंगावरून जातीं ।' -दा ९.८. २९. ॰फिरणें-बदल होणें; पालटणें; वर्तणूक निराळीं होणें. 'गोविंदरावास नोकरी लागल्यापासून सखूबाईचें वारें फिरलें.' ॰लागणें-संसर्ग होणें; संगति लागणें; संबंध येणें. 'संपत्तीचें वारें आजपर्यंत कसें तें मुळींच लागलें नाहीं असे देश पृथ्वीवर पुष्कळ आहेत.' वारें सुटणें-परिस्थिति, वातावरण उत्पन्न होणें. 'कायदे- भंगाचें हिंदुस्थानांत वारें सुटलें.' -के १२.७.३०. ॰सूत्र-न. (गो.) पिशाच्चाचा फेरा. वारेघशीं-क्रिवि. उघड्यावर; वाऱ्या- वर; हवेवर. 'रसाची घागर तुळशीपाशीं उतरलीं व वारेघशीं ठेविली.' -खरादे ६९. वारेमाप-क्रिवि. १ प्रमाणाबाहेर; भलती- कडेच; बेअंदाज; बेछूट. २ बेताल; असंबद्ध; विसंगत; अद्वातद्वा (बोलणें, भाषण). वारेलग-क्रिवि. वाऱ्याच्या प्रवाहांत, झोतांत. 'कां वारेलगें पांखिरूं । गगनीं भरे ।' -ज्ञा १३.३१४. वारे- हळक-वि. वारा लागून वाळलेलें; वाऱ्यावर टाकून वाळलेलें.

दाते शब्दकोश

भाव

पु. १ भक्ति; श्रद्धा; निष्ठा; खात्रीची; भावना. 'माझें मज देती तैसें । परि आनानीं भावीं ।' -ज्ञा ९.३५३. 'असे हो जया अंतरीं भाव जैसा ।' -राम ३५. २ हेतु; अर्थ; मन; अंतःकरणप्रवृत्ति; उद्देश. 'न कळे तो तया सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरीं ।' -तुगा १०. ३ अभिप्राय; आशय; धोरण; वळण; झोंक; गर्भितार्थ. 'रूप तसें विविध तिहीं कां केलें स्पष्ट सांग भावातें ।' -मोसभा ७.६६. ४ मनोविकार; मनोवृत्ति; भावना. जसें-शत्रु-बंधु-क्रोध-दुष्ट-भक्ति-मित्र-भाव. ५ अस्तित्व; असणें. 'एवं कोणेहि परी । अज्ञानभावाची उजरी ।' -अमृ ७.७७. 'जेथें धनाचा भाव तेथें विद्येचा अभाव असें प्रायः असतें.' ६ प्रत्यय किंवा अनुबंध यामुळें होणार्‍या फेरफाराशिवाय असणारा शुद्ध धात्वर्थ; धातूचा मूळ अर्थ. उदा॰ चाल इ॰ धातूपुढें णें हा प्रत्यय चाल धातूचा मूळ दाखवितो. ७ भावकुंडलींतील बारा स्थानांपैकीं प्रत्येक; स्थान. कुंडली पहा. ८ नैसर्गिक स्थिति, धर्म, स्वभाव; प्रकृति. जसें-सत्वभाव; तमोभाव; रजोभाव. 'म्हणोनि सात्विक भावांची मांदी । कृष्णाआंगी अर्जुना आधीं ।' -ज्ञा ८.५६. ९ विकार, वृत्ति, राग, क्रिया, चित्तवृत्ति, हावभाव इ॰ चा वर्ग. ह्याचे पांच प्रकार आहेत. विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव, सात्त्विकभाव, स्वार्थीभाव. पैकीं विभाग, अनुभाव व स्थायीभाव हे अनुक्रमें रसाचीं कारणें, कायें व पूर्वरूपें आहेत. १० जीवाची स्थिति, दशा, अवस्था. जसें-उत्पत्ति, स्थिति, लय इ॰ 'ऐसें म्हणे त्यजुनि भाव अहो जिवाचे ।' -वामन भरतभाव ५८. १२ (शब्दाचा) धर्म, गुण, अस्तित्व, विषय, संबंध, अधिकार, अवस्था इ॰ ची स्थिति; संस्कृतांतील ता आणि त्व व प्राकृतांतील पण, पणा, की हे प्रत्यय लागून झालेला शब्दाचा अर्थ. जसें-ब्राह्मणाधिष्ठित भाव तो ब्राह्मणपणा; उग्र-क्रूर-दृढ-सौम्य-शत्रु-बंधु-भाव. 'जयाचेनि संगे ब्रह्मभावो । भ्रांतासहि ।' -ज्ञा ६.१०२. १२ जन्म; अस्ति- त्वांत येणें; उत्पत्ति. १३ (तर्क) पदार्थ. भाव किंवा भावरूप पदार्थ सहा आहेत-द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय. सातवा पदार्थ अभाव. १४ रति; प्रेम (काव्यातील वर्णनाचा किंवा नाट्य प्रयोगाचा विषय). १५ क्षमता; शक्ति; सामर्थ्य; पराक्रम (शारीरिक किंवा मानसिक). १६ माया; मिष; कपट; आव. 'ध्यान केल्याचा भाव करितो.' -कमं १. १७ लक्षण; प्रकार. 'द्वितीयाध्यायीं ब्रह्मोत्पत्ति । चारी युगांचे भाव कथिती ।' -गुच ५३.२०. १८ इच्छा. 'हाची भाव माझिया जीवा । पुरवी देवा मनोरथ ।' -तुगा ६९९. १९ आवड. 'दुर्योधनें विषान्नें वाढविलीं भीम जेवला भावें ।' -मोआदि १९.१३. २० (नृत्य) अभिनय पहा. [सं. भू-भाव] म्ह॰ जसा भाव तसें फळ. ॰पाहणें- (ना.) परीक्षा करणें; अनुभव घेणें. 'मी सार्‍यांचा भाव पाहिला. या जगांत कोणी कोणाचें नाहीं.' ॰भाजणें- १ दुष्ट हेतु तडीस नेणें.' २ एकाद्यानें केलेलें दुष्ट भाकित प्रत्ययास येणें. ॰सोडणें- १ (भुतानें) पछाडलेल्या माणसास सोडणें. २ मरणें; गतप्राण होणें. ३ नाशाच्या मार्गांत असणें. भावाचा भुकेला-भक्ति, श्रद्धा यांकरितां भुकेला. 'भावाचा भुकेला श्रीपति । आणिक चित्तीं नावडे त्या ।' सामाशब्द- ॰कर्तरि-वि. जेथें क्रियेचा केवल भाव तोच कर्ता असतो आणि क्रियापद नेहमीं नपुंसकलिंगी एक- वचनीं असतें असा (प्रयोग). उदा॰ मला कळमळतें. ॰कर्तृक- वि. (व्या.) भावकर्तरी प्रयोगाचें (क्रियापद). ॰कुंडली-स्त्री. (ज्यो.) तनु, धन इ॰चीं १२ स्थानें दाखविण्यासाठीं बारा राशींचीं घरें ज्यावर दाखविलीं आहेत असें वर्तुळ. कुंडली पहा. ॰गर्भ- पु. १ ग्रंथांतील सारांश. २ अंतस्थ हेतु. ॰गर्भ-गर्भित-वि. १ ध्वनित; गर्भित अर्थाचा. २ ध्वनित अर्थ ज्यांत आहे असें; दिसतो त्यापेक्षां अधिक अर्थ असलेलें (भाषण, लेख इ॰). ॰चलित- वि. (ज्यो.) तन्वादिस्थानीं असून अंशे करून चलित झाला तो (सूर्य किंवा इतर ग्रह). ॰भक्ति-भगत-स्त्री. १ मनः- पूर्वक, श्रद्धा-प्रेमयुक्त, निष्कामपणें केलेली भक्ति; याच्या उलट भयभक्ति. २ एखाद्याविषयीं वाटणारें अत्यंत प्रेम; मनाची ओढ. ॰वाचक नाम-न. (व्या.) प्राणी किंवा पदार्थ यांच्या गुण- धर्माचा बोध करून देणारें नाम. [सं.] ॰वाचकसंख्या-स्त्री. जात नसणारी संख्या; संख्या किंवा परिमाणें यांचा हिस्सा, पट. ॰शबल-न. भावनाविकारांचा गोंधळ; कालवाकालव; अनेक रसांचें मिश्रण. -वि. गोंधळलेल्या भावनांचा. [सं.] ॰शुद्धि-स्त्री. अतःकरणशुद्धि. 'तेणें भावशुद्धीचिया वाटे । विखुरलें विकल्पाचे कांटे ।' -ज्ञा ७.१७०. ॰संकर-पु. मिश्र, संकीर्ण भावना, मनो- विकार. [सं.] ॰संधि-पु. निरनिराळ्या, परस्परविरूद्ध भावना असलेल्या मनाची धरसोडपणाची अवस्था; अंतःकरणांतील मिश्र रसप्रकार. [सं.] ज्ञ-वि. आशय, अभिप्राय जाणणारा; गुणज्ञ. 'पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ।' -ज्ञा ६.२१. भावांतर-न. अर्थांतील फरक, विसंगतपणा. [सं. भाव + अंतर] भावाभाव-पु. अस्तित्वनास्तित्व; खरेंखोटें; चैतन्य आणि जड. 'भावाभावारूप स्फुरे । दृश्य जें हें ।' -ज्ञा १८.११८६. [सं. भाव + अभाव] भावाभास-पु. १ कृत्रिम प्रेम; कवि किंवा नाटककार यांनीं केलेलें प्रेमाचें खोटें वर्णन किंवा प्रदर्शन. २ चुकीचा समज, ग्रह, कल्पना. [भाव + आभास] भावार्थ-पु. १ तात्पर्यार्थ; सारांश. २ भक्तिसार. 'ग्रंथ वदावया निरूपणीं । भावार्थ- खाणी जयामाजी ।' -व्यं २. ३ श्रद्धा; विश्वास; भाव. 'जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा ।' -दा १.१.३८. ४ अंतःकर णाची निष्कपट वृत्ति; प्रामाणिकपणा. -क्रिवि. खरोखर; निःसंशय. 'तो भावार्थ गांवास गेला, मी आपल्यापाशीं का खोटें सांगेन' भावार्थी-वि. १ भाविक. २ साधा; भोळा; सरळ स्वभावाचा. भावि(वी)क-वि. १ श्रद्धावान्; निष्ठावंत. २ संतुष्ट होणारा. 'तिहीं यज्ञभाविकीं सुरीं । जे हे संपत्ति दिधली पुरी ।' -ज्ञा ३.१०४. ३ भक्तियुक्त अंतःकरणाचा. भावि(वी)कजन, भावीजन- पु. श्रद्धायुक्त, निष्ठावंत अंतःकरणाचा. मनुष्य. 'अद्यापि दीपाचे झळ्ळाळ । भावीकजन देखति ।' भावित-वि. १ कल्पिलेलें; चिंतिलेलें; कल्पित. २ ज्यावर भावना किंवा संस्कार केले आहेत असें (औषध). [सं.] भाविला-वि. संस्कार केलेला. -शर. भावी-वे प्रयोग-पु. (व्या.) जेथें कर्त्यावरून अथवा कर्मावरून क्रियापद बदलत नाहीं व सामान्यतः त्याचें रूप नपुसकलिंगी एक वचनी असतें असा प्रयोग. 'मी त्यास मारिलें.' भावुक-न. १ श्रृंगारिक बोलणें. २ कल्याण; हित; क्षेम. 'ऐसा भक्तमयूर चात- कहि जो नेणें दुजीं भावुकें ।' -मोकृष्ण ५५.५१. भावु(वू)क- वि. भक्तियुक्त; निष्ठावंत; भाविक. 'असोत तुज आमुचीं सकल भावुकायुर्बळें ।' -केका ६४. भावेभक्ति-स्त्री. भावभक्ति पहा. भावो-पु. भाव पहा. 'म्हणोनि मज आत्मयाचा भावो । जिहीं जियावया केला ठावो ।' -ज्ञा १०.१४१. भावो सरणें- वाटूं लागणें. -शर. 'तेथ आदिसा पासौनि पार्था । आइ- किजे ऐसीचि अवस्था । दुणावली हे यदुनाथा । भावों सरलें ।' -माज्ञा ६.४८७. (पाठ). भाव्य-वि. उपासना करण्यास योग्य. 'जो इया लटकिया भूतग्रामा । भाव्यु सदा ।' -ज्ञा ९.८४.

दाते शब्दकोश