आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
संबंधित शब्द
जा(जां)वई
पु. १ मुलीचा नवरा; जामात. २ (ल.) बोलाविल्या-कळविल्या शिवाय दुसर्याच्या घरीं जाऊन चैनींत राहणारा माणूस. [वैसं. जामेय; पूर्वीं बहिणीचा मुलगा (जामेय) जांवई करून घेत; तेव्हां शब्दहि तसाच (जामि = बहीण; जामेय = भाचा) बनला आहे. सं. जामातृ; प्रा. जामाऊ; हिं. जमाई; पं. जवाई; गो. जांवय; ग्री जामीतर; फेंजि. नमुत्रो; पँलेस्टाईन. जत्रो.] म्ह॰ १ जांवई न्हाला वाफा पाणी प्याला (शिंपला) = एका दगडानें दोन पक्षी मारण्याप्रमाणें. २ अशी लेक हवई, घरोघर जांवई. ३ सासवेचे दोंदावर जांवई उदार. ४ जांवयाचे पंक्तीचें जेवण व लेकाबरोबर अध्ययन (मिळण्यास दैव पाहिजे) सामाशब्द- ॰आग्रह-पु १ (जांवयाला करतात त्याप्रमाणें) जेवणाखाण्याचा अतिशय आग्रह २ वरवर केलेला, तोंडदेखला आग्रह. ॰जेवण-न. (लग्नांतील जावयाचें, जेवण) थोडथोडें, नाजूकपणाचें खाणें; अल्पाहार. ॰डौल-पु. (जावयासारखा) फाजील ऐट, दिमाख; यथास्थित दुसर्याच्या घरीं चैन करणें. जांवईण-स्त्री. जांवयाची बहीण; करवली ॰पोशा(षा)क (ख)-पु. अतिशय डाम डौलाचा, प्रसंगाला न साजणारा असा. भपकेदार पोशाख. ॰शोध-पु. मूळचें बरोबर असतां त्यांत ज्ञानाच्या घमेंडीनें अडाणी माणसानें चुकीचा घातलेला शोध; शुद्धाचें अशुद्ध करण्याचा खटाटोप; अनवश्यक दुरुस्ती. (हा शब्द एका मूर्ख जांवयाच्या गोष्टी वरून निघाला आहे). जांवयाचा बेटा-१ जांवयाचा मुलगा. हा बहुत करून आपल्या कामाला निरुपोगी असतो; कारण तो वेगळ्या कुळांतला म्हणून त्याचें लक्ष आपल्याकडे लागणार नाहीं. २ (ल.) निरुपयोगी व आपल्याच तोर्यांत असणारा आप्त. म्ह॰ १ जावयाचा बेटा कर्डयीचापेटा. २ जावयाचें पोर हरामखोर. जांवयाची कीड- स्त्री. नाजुकपणादर्शक थट्टेची संज्ञा. जावयाची पंगत-स्त्री. (जांवयाच्या पंगतीला सासू साखर तूप, पक्वानें इ॰ स्वतः भरपूर वाढते यावरून) (ल.) श्रीमंतपणाची राहणी, जेवण.
जावई
पु. १. मुलीचा नवरा; जामात. २. (ल.) बोलाविल्या-कळविल्याशिवाय दुसऱ्याच्या घरी जाऊन चैनीत राहणारा माणूस. (वैसं. जामेय; पूर्वी बहिणीचा मुलगा (जामेय) जावई करून घेत. (जामि = बहीण; जामेय = भाचा) [सं.जामातृ] (वा.) जावयाचा बेटा - १. जावयाचा मुलगा. हा बहुतकरून आपल्या कामाला निरुपयोगी असतो. कारण तो वेगळ्या कुळातला म्हणून त्याचे लक्ष आपल्याकडे लागणार नाही असा समज आहे. २. निरुपयोगी व आपल्याच तोऱ्यात असणारा आप्त. जावयाची कीड - नाजूकपणादर्शक थट्टेची संज्ञा. जावयाची पंगत - (जावयाच्या पंगतीला सासू साखर, तूप, पक्वान्ने इ. स्वतः भरपूर वाढते यावरून) (ल.) श्रीमंताची राहणी, जेवण.