मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

जाम      

क्रिवि.        पक्के; घट्ट; काही केले तरी (क्रि. बसणे.) : ‘…पण आई आणि बाबा जाम तयार होत नाहीत.’ - लव्हाळी १७७. [इं.जॅम] (वा.) जाम होणे - १. अडकून पडणे. २. खलास होणे : ‘त्यानं धडपडून तोंड बाहेर काढलं. मी काठी ज्यास्त ज्यास्त दाबली, आणि जरा वेळानें तो जाम झाला.’ - कोसला १७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वि.        दुर्बल; अशक्त.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.        एक प्रकारचे भांडे. पहा : जांब [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.        शहरातील रस्त्यांवर शोभेसाठी लावण्याचा वृक्ष. जांभळीच्या जातीतील एक झाड. त्याची फुले पांढरी व फळे पिवळसर असून मधुर व सुवासिक असतात.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जाम

जाम jāma m ( P) A sort of flagon or goblet. 2 Commonly जांब.

मोल्सवर्थ शब्दकोश

क्रिवि. पक्कें; घट्ट. (क्रि॰ बसणें). 'ती फिरकी जाम बसली.' [इं. जॅम = चिरडणें, दाबणें]

दाते शब्दकोश

पु. एक प्रकारचें भांडें; जांब पहा.

दाते शब्दकोश

(पु.) हिंदी अर्थ : कटोरा, मद्य पात्र. मराठी अर्थ : मद्य पिण्याचा प्याला, भांडें.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

गुलाबी जांब, गुलाबी जाम      

एक फळ; रायजांभूळ. [फा.] गुलाबी झोप      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

जांब

पु. जाम; एक प्रकारचें भांडें; पेला; खालीं पेंदी असलेलें फुलपात्र. 'जांबलोटी पाण्याशीं ।' स्त्रीगीत ९६. [फा. जाम]

दाते शब्दकोश

पु. १ जांभळीच्या जातींतील एक झाड. यांचे फळ भोंकराप्रमाणें असून लांकूड इमारतीच्या उपयोगी पडतें. फुलें पांढरीं व फळें पिवळसर असून मधुर व सुवासिक असतात. -कृषि ७१९. २ रायजांभूळ; फळ व झाड. ३ पेरु, झाड आणि फळ. ४ (कों.) काजू. ५ खरबुजाची एक जात याचा रंग तांबूस आणि आकार गोल असतो. -कृषि ५७२. जाम पहा. [सं. जंबु]

दाते शब्दकोश

सरंजाम

पु. १ सामानसुमान; साधनसामुग्री; हत्यारें- पात्यारें; उपकरणें. 'पोक्त सरंजाम माफिक ठेवावा.' -वाडशाछ २७१. २ सैन्य, किल्ल्याचा बंदोबस्त वगैरे राखण्याकरितां दिलेली इनामी जमीन; पालखी वगैरे मान मरातब दिला असल्यास त्याच्या खर्चाकरितां दिलेलें इनाम. याचे चौथसरंजाम, जातसरं- जाम व फौजसरंजाम असे तीन प्रकार असत. 'हनोज मुबादलि याचा सरंजाम जाल नाहीं.' -इमं ६५. 'सरंजामपट्टी सरकारा- तून जाहली.' -मात्रै ३. ३ जुळवाजुळव; तयारी; सिद्धता. 'सरं जाम करून डेरे राहुट्या बाहेर दिले. ।' -ऐपो ३९६. [फा.] ॰दार-पु. ज्याच्याकडे सरंजामी इनाम आहे असा असामी. ॰पट-पु. सरंजामासंबंधीं पत्रक. सरंजामी-वि. १ सरंजाम म्हणून दिलेलें. २ सरंजाम धारण करणारा. सरंजामी पद्धति- स्त्री. १ फौजेच्या अधिकार्‍यांस नक्त पगार वगैरे न देतां फौजेच्या खर्चाकरितां जहागीर देण्याची पद्धति. २ इंग्रज सरकारनें येथील देश्य राजांस कांहीं मुलूख अगर पैका घेऊन फौज पुरविण्याची पद्धति. सरंजामी फौज-स्त्री. इनाम जमीन, जहागीर वगैरे घेऊन सरकारकरितां लष्करी अधिकार्‍यानें ठेवलेलें सैन्य.

दाते शब्दकोश

ज़ाम; ज़ाम्ब

(पु.) [फा. जाम्] पेला. “फक्त एक रुप्याचा ज़ाम्ब पदराशीं बान्धून घेतला” (माप्र ११६).

फारसी-मराठी शब्दकोश

चामट      

वि.       १. कातड्यासारखे चिवट; वातड २. दृढ; पक्की; मजबूत बसलेली; न सुटणारी; जाम (पकड). ३. चेंगट (माणूस). [सं. चर्म]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चामट

वि. १ चिवट; वातड. २ दृढ; पक्की; मजबूत बस- लेली; न सुटणारी; जाम (उंटाची पकड; अस्वलाची मिठी). ३ चेंगट, चिकट (माणूस).

दाते शब्दकोश

गडगंच-ज

स्त्री. अतिशय वैपुल्य; भखळपणा; मोठी दाटी, गर्दी (वस्तूंची) -वि. १ गच्च; दाट लोकवस्तीचें; (धन- धान्यादिकांचा) भरपूर पुरवठा असलेलें; चांगलें पोसलें जाणारें; सुखवस्तु (गांव, घर, पात्र). २ पुष्कळ; रगड; भरपूर (मेज- वानींतील वस्तु, पदार्थ); ३ पूर्ण; समग्र; भरपूर; वाढता (सरं- जाम, स्वारी, आटाळा). ४ ऐवजदार; श्रीमंत; ऐपतदार (व्यापारी). ५ गंभीर; गाढ (झोंप). ६ (सामा.) अलोट; पुष्कळ; पुरून उरण्याजोगें. 'घरीं गडगंज आहे मग नोकरीची फिकीर कशाला !' [गड्डा + सं. गज = खाण]

दाते शब्दकोश

गुलाबी चंदन      

गुलाबासारख्या वासाचे चंदन; चंदनाची एक जात. गुलाबी जांब, गुलाबी जाम      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जाबता

पु. १ कायदा; नियम. २ अधिकारपत्र; मुखत्यार- पत्र; अधिकार; मान्यता; मंजुरी. ३ परवाना; पास. ४ पाहारा; राखण; सोबत. ५ मोजलेल्या जमिनीचा तुकडा. ६ कैद. ७ सरं- जाम किंवा इनाम यांच्या अधिकाराची कमलबंदी याद. ८ व्यापा- र्‍याला पाठविलेली मालाची याद; फर्द; फेरिस्त. 'जातेसमयीं कुललष्करचे लहान थोर लोकांचे बिशादीचे जाबते करावे.' -सभासद २२. [अर. झाबिता]

दाते शब्दकोश

जामदारी

स्त्री. संरक्षण; जिम्मेदारी; रक्षण. ‘जाम- दारीसहि स्वार घेतले होते. जामदारीचा पैका देऊन मुलुक लुटीत गेले.’ –पेद २८.२४३. [जिम्मा + दारी]

दाते शब्दकोश

जामजोड

पु. १ घोड्याच्या टाचेच्या खुरावर बांधाव- याचे चामड्याच्या पट्ट्यांचा जोड. २ दोन वस्तूंची जोडी; दुक्कल. [जाम + जोडी]

दाते शब्दकोश

जांब, जांभ      

पु.        १. जांभळीच्या जातीतील एक झाड. २. जायजांभूळ, फळ व झाड. ३. पेरु, झाड आणि फळ. ४. काजू. (को.) ५. खरबुजाची एक जात. हे तांबूस रंगाचे व गोलाकार असते. पहा : जाम [सं. जंबु]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       जाम; एक प्रकारचे भांडे; पेला; खाली पेंदी असलेले फुलपात्र : ‘जांबलोटी पाण्याशीं ।’ - स्त्रीगीत ९६. [फा.जाम]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जांभ      

पु.        एक प्रकारचे भांडे, पेला; खाली पेंदी असलेले फुलपात्र : ‘बाळ ग माझं खेलूं आलं बाई लांब । हातामध्ये जांभ दूध मागे’ - लोसाको. [फा. जाम]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

करपणे      

सक्रि.       चिडणे; भडकणे : ‘आम्ही पब्लिकला सतावतो म्हणून तो आमच्यावर जाम करपत असे.’ - वासू १६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

लहं(हां)बर, लाहंबर

न. १ लटंबर पहा. प्रवासाचा सरं- जाम; खटला; सामानसुमान आणि नोकरचाकर. २ (ल.) भिका- ऱ्याचा, मुलांचा, रिकामटेकड्या किंवा त्रासदायक लोकांचा समु- दाय. ३ अडगळ वाटणारा (कळप, खिल्लारें, गाड्या इ॰ कांचा) सरंजाम; कारखाना; गाड्या, गुरेंढोरें इ॰ चें लचांड. ४ अधाशी, सर्वरभक मनुष्य किंवा पशु.

दाते शब्दकोश

मोदी

पु. १ मोठ्या किंवा थोर इसमाच्या पदरचा दिवाणजी किंवा कारभारी; सरकारी खाणेंपिणें इ॰ चा सर्व सरं- जाम ज्याच्या स्वाधीन असतो तो. २ धान्याच्या दुकानदार; सर्वसंग्रह जवळ बाळगितो असा जो वाणी त्यास म्हणतात; धान्याच्या खरेदी-विक्रीचा धंदा करणारा. [हिं. मोदी; अर. मुदाई = निधिधारक, ट्रस्टी]

दाते शब्दकोश

निश्चयी

भीष्मप्रतिज्ञ, कृतनिश्चयी, महानिश्चयी, मनाचा खंबीर, आमचे ठरलें की ठरलें ! जाम बदलणार नाहीं; मग शेंडी तुटो वा पारंबी तुटो ! विचाराचा पक्का, त्याचा संकल्प म्हणजे दगडावरची रेघ, कांहींसा हट्टी, जिद्दखोर.

शब्दकौमुदी

पियाला

(पु.) हिंदी अर्थ : बेला, जाम. मराठी अर्थ : प्याला, भांडे.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

सरांजामी

स्त्री. व्यवस्था. आदिलशाही फर्मानें. [संर- जाम]

दाते शब्दकोश

तरटी

स्त्री. खरबुजाची एक जात. हिचा आंतील रंग हिरवा असतो. -कृषि ५७२. खानदेशांत हिला जाम असें म्हण- तात.

दाते शब्दकोश

तरटी      

स्त्री.       खरबुजाची एक जात; जाम (खा.); हिचा आतील रंग हिरवा असतो.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ठाण

ठाण ṭhāṇa n ( H स्थान S) A horse-stall. 2 A posture of archers in discharging the arrow,--kneeling on one knee &c. 3 A post or station (of a महाल &c.) 4 Place, spot, region. Ex. पावे जैसा चिंतिलें ठाण ॥. Also station, standing, stand, or seat (as taken, maintained, abandoned, lost). In this sense ठाण चळणें-ढळणें-हालणें-डगडगणें &c. g. of s. To lose firmness of seat, esp. upon horseback, and, thence, generally, to slip from, or totter or waver in, one's post or place. Ex. भूभुजावरि जाम- दग्न्य ॥ समरीं तेवी प्रळयाग्न ॥ ठाण न चळे रणींहून ॥ कुठारघायें भूरुह जैसा ॥. ठाण मांडणें To take up a fixed station, stand, or seat. ठाण सोडणें To quit or leave one's station or seat. 2 To decamp and abscond. 3 To (pull up his pegs and) run off from his stall--a horse.

मोल्सवर्थ शब्दकोश

दाखल

पु. १ (एखाद्या गोष्टीचा विशदीकरणासाठीं घेतलेलें त्या गोष्टीसारखेंच) उदाहरण; दृष्टांत; उपमा; नमुना. 'कावळा करकरला म्हणून झाड मोडत नाहीं हा कावळ्याचा दाखला त्यानें तुला दिला.' 'तुमचे दाखल्यांनीं लोकांनीं करावें तें दुसरे अगोदर करितात आणि तुमचें कांहींच नाहीं.' -ख ५. २४७७. २ (एखाद्याचा) प्रत्यक्ष अनुभव; पडताळा; प्रतीति. 'जी सहस्त्रशीर्षयाचें दाखले । कोडीवरी होताति एकिवेळे ।' -ज्ञा ११.२६९. 'तुम्ही शकुन सांगितला त्याचा दाखल आला, तो माझ्या दाखल्यास आला.' ३ पायंडा; उदाहरण; वहिवाट. 'आम्ही चाकरी करूं तेव्हां दाखल पडत जाईल.' -ऐस्फुले ६२. 'आलेले खलिते मागील दाखल्याप्रमाणें बरोबर आहेत किंवा कसें हें खानगी कारभारी यांनीं पहात जावें.' -(बडोदें) अहेरबहुमान पोषाखाचा नियम ४. ४ (एखाद्या विधानास पुष्टी देणारा) पुरावा; आधारभूत गोष्ट, प्रमाण. 'ह्या वाटेनें वाघ गेला याचा दाखल हीं येथें पाऊलें उमटलीं आहेत.' ५ (पुराव्यादाखल हजर करतां येईल असें) प्रमाणपत्र; पावती; नोंद. 'तसेंच जीं पत्रें बंद करण्याविषयीं हुकूम होईल त्याची खबर कापडी जाम- दारखान्याकडे देऊन माहितीचे यादीवर तसा दाखला ठेवावा.' -(बडोदें) राजमहाल कामगारी कारकुनाच्या कर्तव्यासंबंधीं नियम ३. ६ (एखाद्याच्या) लायकीबद्दल पत्र. भलामणपत्रक; शिफारसपत्र. ७ हक्क; अधिकार. [दाखल] (वाप्र.) ॰घेणें-(एखाद्या गोष्टीपासून, व्यक्तीपासून) धडा घेणें; बोध घेणें. ॰पटणें-(एखादें भविष्य इ॰काचा) प्रत्यय, अनुभव, पडताळा येणें. ॰येणें-(एखादी गोष्ट) पुराव्यानें, प्रमाणानें सिद्ध होणें. दाखल्यास उतरणें- (एखाद्याच्या) अनुभवास जुळणें. सामाशब्द- ॰दुखला-पु. दाखला; दृष्टांत इ॰ [दाखला द्वि.] ॰मुकाबला-पु. पुरावा; पुष्टि देणारी, समर्थन करणारी गोष्ट. [दाखला + अर. मुकाबला] दाखलेचिठी-पत्र-स्त्रीन. १ (एखाद्याची लायकी, शील, इ॰ बद्दलचें) शिफारसपत्र; भलामणपत्रक. २ (विशेषार्थानें) महार, रामोशी इ॰ कास दिलेलें शिफारसपत्र. [दाखला + चिठ्ठी, पत्र] -लेवाईक-वि. १ उदाहरणें देऊन, दृष्टांत सांगून स्पष्ट, विशद केलेलें. २ ज्याच्या खरेपणाविषयीं कांहीं तरी प्रत्यय आला आहे असा. 'हा ब्राह्मण दाखलेवाईक प्रश्न सांगतो.' -लेशीर-वि. विश्वसनीय; सप्रमाण; व्यवस्थित. 'आमचे दौलतींत हालीमाजी होत गेल्यामुळें कागदपत्र दाखलेशीर राहिला नाहीं.' -रा १.३१२.

दाते शब्दकोश

गैर

अ. निराळेपणा, भिन्नपणा दाखविणारा परंतु सामा- न्यतः अभाव किंवा अन्यथाभावदर्शक अरबी अव्ययशब्द किंवा प्रत्यय. याचा मनसोक्त (विशेषतः हिंदुस्थानी शब्दांबरोबर) उपयोग करितात. या शब्दाचें पुढील कांहीं अर्थ होतात- १ इतर; अन्य. 'गैर पथकें येऊन मोर्चेबंदी केली आहे.' -रा १२.१२५. २ अयोग्य; अन्यायाचा. 'हें तुम्हीं गैर केलें' -मदरु १.१०६. ३ (नामाच्या किंवा विशेषणाच्या प्रारंभीं जोडल्यास) अवास्त- विक, उलट; विपरीत. ४ विना; वांचून. 'गैर अन्याय मला गांजतो.' 'गैर अपराध दंड घेऊं नये.' [अर. घैर = निराळा, व्यतिरिक्त] (वाप्र.) ॰अदबी-स्त्री. असभ्यता; अपमान; अनादर. 'गैर अदबी बोलला सबब पातशाहा यास राग येऊन डोळे काढिले.' -मदरु २.७०. ॰अदा-वि. रद्द; न पटलेलें. 'शिंदे कडील वरात आली तर मग गैरअदाही व्हावयाची नाहीं.' -ख १०. ५२.७९. ॰अब्रू स्त्री. अप्रतिष्ठा. 'गैर-अब्रू फारशी न करणें.' -वाडबाबा २.७५. ॰अमली-वि. परस्वाधीन; दुसर्‍याचें. 'चार लक्षाचे भरतीस अमली महालांपैकीं बेरीज कमी आल्यास गैर- अमली महाल आहेत त्यांपैकीं भरतीस कमाल आकाराचे बेर- जेचा महाल लावून देणें.' -रा १०.३२१. ॰आबादी-वि. ओसाड; उजाड; बेचिराख. ॰आरामी-स्त्री. अवस्थता. 'हज्र- तांचे शरिरास दोन दिवस गैरआरामी] आहे.' -दिमरा २.३२. ॰इतबार-पु अविश्वास. 'तमाम फौजेस गैरइतबार जाहला.' -भाब ८०. ॰इमान-न. इमान नसणें; द्रोह; अनिष्ठा. 'आमचें गैरइमान असतें तरी आम्हीं आजपर्यंत येथें तुम्हापाशीं न ठरतों.' -भाब १११. ॰कबजी-वि. परस्वाधीन; गैरअमली पहा. 'सरं- जाम गैरकबजी, कांहीं सुटला त्यांत वस्ती नाहीं.' -ख २.९४२. ॰कायदा-वि. बेकायदेशीर; असनदशीरे. (इं.) इल्लीगल. ॰कायदा मंडळी-स्त्री. (कायदा) गुन्ह्याचें कृत्य करण्याच्या इराद्यानें पांच किंवा पांचाहून अधिक एकत्र जमलेले इसम. (इं.) अन्लॉफुल असेंब्ली. ॰किफायत-स्त्री. तोटा; नुकसान. 'किफायत, गैरकिफायत समयासमयास चित्तांत आणून किफा- यतीचीं कामें करीत आलां, पुढें त्याचप्रमाणें करावीं' -रा १. ३४६. ॰कौली-वि. परवाना किंवा अभयपत्र न दिलेलें; बिगर परवाना. -मराआ. ॰खर्च-पु. १ जादा, किरकोळ खर्चं. २ गैर- वाजवी, अयोग्य खर्च. ॰खुशी-षी-वि. नाकबूल; नाखूष; रुष्ट. 'खुषी किंवा गैरखुषी असा हा कौल बायकांशी ।' -पला १०४. ॰चलन-नी-वि. १ चालू नसलेलें (नाणें). २ (ल.) अव्यव- स्थित; बेशिस्त; अशिष्ट (वर्तन). ॰चलन-स्त्री. १ चलनाचा अभाव; चलन नसणें. २ (क्व.) गैर वर्तन; बदचाल. ॰चाकर- वि. बडतर्फ; माजूल. 'जखमी जाहले त्यांस गैरचाकर करून जागिरा तगीर करविल्या.' -जोरा ७५. ॰जप्त-वि. गैरअ- मल; गैरकबजी; परस्वाधीन. 'गैरजप्त देश साधावें.' -चित्रगुप्त ११०. ॰जबाब-पु. उद्धटपणाचें, अनादराचें उत्तर. ॰दस्त- स्ती-वि. सरकारसार्‍याची सूट असलेली (जमीन). ॰नफा- फायदा-पु. तोटा; नुकसान. 'येणेंकडून तुमचा गैरनफा जाहला.' -जोरा १४. 'अत्यंत वोढ केल्यास पाटीलबावांचा गैर फायदा आहे.' -जोरा ४७. ॰प्रकारचा-वि. १ इतर; भिन्न; दुसरा. २ चमत्कारिक; हास्यापद; तर्‍हेवाईक; विलक्षण. ॰बर्दार-वि. बहार नसलेला; फळहीन. 'पोकळी गैर-बर्दार, शेंडे वाळलेल्या आहेत.' -रा ११.७९. ॰मजुरा-क्रिवि. (हिशेब) मजुरा (वजा) टाकल्याशिवाय; वजावाट न करितां. [गैर + मजुरा-मुजरा] ॰मंजूर-वि. नामंजूर; रद्द. 'अप्टणांनीं जापले जागा वाजवी असतां गैरमंजूर करून एकपक्षी तह केला.' -रा १२.१२२. ॰मर्जी-स्त्री. अवकृपा; रुष्टता; इतराजी; नाराजी. ॰मसलत- मनसुबा-स्त्रीपु. मूर्खपणाचा, वेडगळपणाचा बेत, कट, योजना. ॰महसर्दार-वि. अप्रतिष्ठित. -रा ८.४३. [अर. मआसिर = थोरवी] ॰महसूल-पु. जुलमी करांपासून किंवा अन्याय्य मार्गानें काढलेला वसूल; योग्य सरकारसार्‍याविरहीत वसूल. 'विजा- पुराहून एक हवालदार गैरमहसूल पैदागिरी कबुल करून आला.' -इऐ ५.१००. ॰माकूल-मूर्ख; अडाणी; गैर; वाईट. 'कार्बारास खलेल करणें हें गैरमाकूल गोस्टी आहे.' -रा १८.३३. -क्रिवि. मूर्खपणें. 'लोक गैरमाकूल आम्हांस न कळत वर्तले तरी त्याची बद्लामी आपणावरी न ठेववी.' -रा ८.१०. ॰मान्य-वि. अमान्य; असमंत. ॰मार्ग-पु. गैरशिस्त आचार, रीत; दुराचरण. ॰माहीत-वि. १ अपरिचित; अनोळखी. २ अजाण; नेणता. 'साठे आहेत ते गैरमाहीत.' -ख ७.३५५१. ॰माहीतगार- वि. अज्ञानी; अडाणी. ॰मिराशी-वि. वंशपरंपरा मालकी नस- लेला. 'मातकदीम मिरासी खरी जाहली. काणव मजकूर गैर- मिरासी मुतालीक ऐसे जाहले.' -इऐ ५.१०२. ॰मेहनत- स्त्री. निरुद्योग. 'परंतु मेहनत, गैर-मेहनत सर्व एक ईश्वरी क्षोभानें वायां गेल्या.' -ऐ ५. ॰मेहेरबानी-स्त्री. अवकृपा; इतराजी. 'सांगितल्यावरून मनांत गैर मेहेरबानी न धरावी.' -रा ८. १०. ॰मोसम-हंगाम-पु. अवेळ. 'गैर मोसमांत (पौष वद्य १२ स) आंबे आले यावरून कौतुक वाटलें.' -रा २२.५. ॰रजावंद-वि. नाराज; नाकबूल. 'तो क्रियेस गैररजावंद जाहला.' -वाडशाछ १३२. [फा.] ॰रहा-रीत-स्त्री. बद- चाल; अयोग्य रीत; वाईट आचरण. -वि. बदचालीचा-सलु- काचा. 'भुजंगराव याची वर्तणूक गैररहा दिसते.' -ख ११. ५७७६. ॰राजी-वि. असंतुष्ट; नाराज. 'पाटसकर गैर-राजी जाले.' -रा ६.२६. ॰राबता-वि. १ बंदी; मनाई; खंड (मार्ग, मिळणें, येणें-जाणें, वहिवाट, चाल यांमध्यें). 'नाना फडणीस लष्करांतून आल्यापासून गैरराबता बहुत करूं लागले. कोणाचीच गांठ पडत नाहीं.' -ख ८.४१५१. २ वहिवाट, चाल यामध्यें अनभ्यास; अपरिचय; अवापर; वळण नसणें. ॰रास्त-वि. गैर- वाजवी; असत्य; खोटा. ॰रुजू-वि. १ गैरहजर. २ मंजूर किंवा दाखल किंवा मान्य न केलेले (हिशेब). ॰लायक वि. अयोग्य; नालायक; अनुचित. ॰वळण-न १ गैरराबता. 'त्या मार्गास सध्यां गैरवळण जाहे.' २ एकीकडे असणें; आडवळण; दळण- वळण नसणें. 'हा गांव गैरवळणांत पडला.' ३ गबाळ, वाईट लिखाण. ४ सरावांत नसणें; सवंय नसणें; निरुपयोग. ॰वाका- पु. खोटी किंवा बनावट गोष्ट; गैरसमजूत; लबाडी. 'ऐसा गैर- वाका सांगितला.' -रा ८.५२. -वि. वेडावांकडा -शर [फा. घैर्-वाकिअ] ॰वाजवी-वाजिवी-वि अयोग्य; अनुचित; फाजील; अन्याय्य. 'त्याचा अभिमान गैर-वाजवी याणीं नच- धरावा.' -रा १२.७९. [फा. घैर् + वाजिवी] ॰वाजवी दाब- पु. (कायदा) अयोग्य वजन. (इं.) अनड्यू इन्फ्लुअन्स. ॰वास्तविक-वि. खोटा; असत्य; वस्तुस्थितीस सोडून. ॰विलग-क्रिवि. आडबाजूस; आडवळणी. -वि. (विलगसाठीं चुकीनें योजलेला) न मिळणारा; न जुळणारा. ॰विल्हईस- विल्हेस-विल्हे- क्रिवि. आपल्या (योग्य) ठिकाणाच्या विरुद्ध जागी; भलतीकडे. ॰विल्हेस लागणें-पडणें-१ दुसरीकडे किंवा चुकीच्या ठिकाणी लागण; क्रमवार नसणें. २ योग्य ठिकाणाहून गहाळणें; गमावणें. ३ गोंधळ होणें, अव्यवस्थित असणें, ॰शर्ती- स्त्री. माफीजमीन म्हणून ठरविल्यानंतर जिला इतर दुसर्‍या कोणत्याही अटी पाळावयाच्या नसतात अशी जमीन. ॰शिस्त- वि. बेशिस्त; अव्यवस्थित; विना रीतभात; नियमबाह्य; असभ्य; फाजील (माणूस, वर्तन, भाषण). -स्त्री. बेशिस्तपणा; अव्यवस्थितपणा; अयोग्यपणा. अनियमितपणा. ॰शेरा- शरा-वि. धर्मशास्त्रविरहीत. 'काजीपासून गैरशेरा अमल होऊन आला.' -वाडसनदा १५- [अर.घैर् + शरअ = धर्मशास्त्र] ॰संधी- स्त्री. अवेळ; गैरमोसम; अवकाळ. ॰सनदी-वि. १ बेसनदशीर; बेकायदेशीर; सनदेनें अधिकृत नसलेलें. २ जादा मंजुरीशिवाय. 'गैर-सनदी खर्च करावयाची सरकारची आज्ञा नाहीं.' -ख ५. २३५३. ॰समजाविशी-स्त्री. (कायदा) गैरसमजूत; (इं.) मिस्रिप्रेझेंटेंशन. ॰समजूत-स्त्री. उलट, चुकीची समजूत; चूक. ॰सल्ला-सलाह-गैरमसलत पहा. 'हे कंपणी इंग्रजबहादूर यांचे सलाहानें अगर गैर सलाहानें ...' -रा २२.१२५. ॰साल-वि. अनिश्चित वेळेचा; वर्ष नमूद नसलेला. 'गुणनवरे यांनी कागद एक काढिला, तो बहुतां दिवसांचा, गैर-साल ।' -रा ६.८९. ॰सावध-वि. १ बेसावध; गाफील. २ बेशुद्ध; मूर्छित. ॰साळ- वि. १ खोटसाळ; सरकारी टांकसाळींतून न पाडलेलें. इतर ठिकाणाचें म्हणजे हिणकस, कमी किंमतीचें (नाणें). 'गैरसाळ तामगिरी । कोणी नवी मुद्रा करी ।' -दा १०.८.१४. (त्यावरून) खोटा; बनावट; लबाडीचा. २ (ल.) बेशिस्त; अनभ्यासी; गांवढळ; अडाणी; (माणूस); अयोग्य; अनुचित (वर्तन). ३ अशिष्ट; अडाणी; हलका; राकट; बेडौल; गावठी इ॰ ॰सोई-य-स्त्री. अडचण; त्रास; हाल; अप्रशस्तता. ॰सोईचा-वि. अडचणीचा; सोईचा, सुखकर नसलेला. ॰हंगाम-पु. गैरमोसम पहा. 'त्यास गैरहंगाम, हल्ली खरबुजीं तयार मिळालीं ते आठ सेवसी पाठ- विलि असेत.' -रा ३.३१२. ॰ह(हा)जीर-वि. मोजदादीच्या वेळीं समक्ष नसलेला; अविद्यमान; अनुपस्थित. [फा.] ॰हिसा (शे)बी-स्त्री. अन्याय; अव्यस्थितपणा. -क्रिवि. अन्यायानें. 'आपले जागिरींत नाहक गैरहिसाबी पादशाह खलल करवि- ताती ।' -इमं ६७. ॰हुकुमा-वि. अनधिकृत; संमति, आज्ञा नसलेले; नामंजूर. ॰हुर्मत-स्त्री. अप्रतिष्ठा; बेअब्रू.

दाते शब्दकोश