आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
जावळी
पु. १ भावंड. 'कृतांताचिया जावळी ।' -ज्ञा ११.३९६. २ सोबती, शेजार. -स्त्री. बरोबरी; सादृश्य. जावळीं- ळिं-वि. जुळीं; आवळींजावळीं. 'तयाचिये भार्येसि दोनि लेंकुरें जावळिं जाहालि ।' -पंच ५.२. ॰भावळी-वि. १ भावांच्या बायकासंबंधीं, अनेक भाऊ आपल्या बायकांसह एकत्र असतांना कोणा एकाचेंच स्वामित्व कुटुंबांवर चालत नाहीं अशी परिस्थिति, व्यवहार असल्यावेळीं वापरतात. 'जावळी भावळी संसार असला म्हणजे प्रपंच करितां कामास नये.' २ समाईक; सारखा; संयुक्त; समान (धंदा, प्रपंच इ॰ गोष्टी). (समासांत) जावळी भावळी-धंदा-विचार-संसार-खटलें. ॰हळद-स्त्री. पिवळी आणि मऊ जातीची, मोठ्या जातीची हळद.
पु. (जुन्नरी) बिन शिंगाचा मेंढा.
जावळी
पु. जोड; भावंड : ‘ब्रिदांताचे जावळी । जें एकेक विश्वातें गीळी ।’ - राज्ञा ११·३९१.
पु. बिनशिंगाचा मेंढा. (जुन्नरी)
संबंधित शब्द
बद-फैल
(पु.) [अ. फिअल् = कर्म] कुकर्म; स्वामिद्रोह. “नाहीतर बदफैल करून फन्द कराल तर जावली मारून तुम्हांस कैद करून ठेऊं” (ऐस्फुले १२४).
बिजा
वि. दुसरा. [सं. द्वितीय; प्रा. बिइज्ज; गु. बीजो] म्ह॰ इजा, बिजा, तिजा. बिजाईत-वि. दोन वेळां व्यालेली (गाय, म्हैस इ॰); दुजाईत. [गु.] बिजावळी-स्त्री. वेगळेपणा; भेद; भिन्नता; अंतर. 'तैं तर्हिं गा सुवर्मा । बि(वि)जावळी आत्मया कर्मा । अपाडें जैसी पश्चिमा । पूर्वेसि कां ।' -माज्ञा १८.२६९.
हिसार
(पु.) [अ. हिसार्] गड “बजानब कार्कुनानी हिसार जावली” (राजवाडे २०|१५९).
हिसार
पु. किल्ला; गड. 'बजानब कारकुनानी हिसार जावळी.' -रा २०.१५९. [अर. हिसार्]
जावळ
न. (क.) लुगड्याचा विशिष्ट कांठ. 'जावळी लुगडें.'
जावळिया
पु. १ शेजारी; शेजारी पाजारी. 'जावळिया सुख निपजे । ऐसें साधुत्व का देखिजे ।' -ज्ञा १७.२१७. २ जुळा भाऊ. 'कीं मदनाचा जावळिया ।' -शिशु २६४. -वि. जोडीचा; सोबती. 'जेथ गरुडाचिये जावळियेचें । कांतले चार्ही ।' -ज्ञा १.१३८. जावळी पहा.
रबिसानी
स्त्री. रबिउलआखर हा महिना; दुसरा रबी; अखेरचा रबी महिना. 'तुम्ही छ २७ माहे रबिसानीचें पत्र पाठविलें तें छ १३ जावली पावलें.' -रा २२.९२. [फा.]
बद
वि. वाईट; नीच (विशेषतः समासांत उपयोग). [सं. वध; फा. बद्; इं. बॅड] सामाशब्द- ॰मल-अम्म(म)ल-अमली- पुस्त्री. १ दुष्कर्म; व्यभिचार; अविवाहित स्त्रीशीं गमन. 'सन्तु जाधवीण, तिनें बद-अमल केला.' -ख ८.४२१३. २ हराम खोरी. 'बद-अमली करून बसल्यास रुपये श्रीमन्तांचे सुटतात असें नाहीं.' -ख ७.३७५५. ३ गैरवर्तणूक; जेबंदशाही. 'मुलकांत बद-अमली जाली आहे.' -दिमरा १.२२४. [फा.] ॰अहदी- कौली-स्त्री. १ वचनभंग; शब्दाप्रमाणें वर्तन न करणें. 'टिपू बहादूर यांनीं बद-अहदी केल्यास तिन्हीं सर्कारांनीं एक होऊन त्याची तम्बी करावी.' -रा ७.२. २ गैर-सलूक; अमैत्री. [फा.] ॰कर्म-ख्याली-नस्त्री. बद अम्मल; व्यभिचार [फा] ॰ख्याल- ली-वि. बदफैल; व्यभिचारी. ॰गोई-स्त्री. अपभाषण; निंदा. 'लाइणी-बद-गोई केली.' -रा २०.२२०. [फा.] ॰दिली- स्त्री. १ भ्याडपणा. २ वहीमखोरी. ॰दील-वि. १ भ्याड. २ संशयी; वहीमखोर. -हिंब २६१. [फा.] ॰दुवा-स्त्री. बेदुवा; शाप. 'बद-दुवा दिल्ही कीं या दोघांचा खाणा खराब.' -मदरु १.११८. [फा] ॰नकशा-क्षा-क्ष-नाम-नामी-पुनस्त्री. पाण- उतारा; मानखण्डना; दुर्लौंकिक; अप्रतिष्ठा; बेअब्रू. 'लोकांत बद- नक्ष होय तें न कीजे.' -रा ८.२१३. [फा.] ॰नजर-स्त्री. १ वाईट दृष्टि कुवासना. 'दर्यामध्यें टोपीकरांची बद-नजर.' -वाडमा १.३४०. २. वैर. -ख ७.३५६६. ३ बेभरंवसा; बेविश्वास. [फा.] ॰नाम-वि. बेअब्रू असलेली, झालेला; मान- खण्डित; कुप्रसिद्ध., 'पुढें ऐसी बद-रहा वर्तणूक करून बद-नाम न होणें.' -रा १५.३८१. [फा.] ॰नियत-नेत-नेक-स्त्रीपु. सवामिद्रोह; हरामखोरी. 'महाराजांचे पायाशीं सेनापतीनें बद- नेत धरिला.' -मराचिथोशा ४९. [फा.] ॰नियती-वि. स्वामि- -जोरा ९. ॰फैल-पु. १ कुकर्म; दुर्वर्तन; दुर्व्यसन. २ स्वामि- द्रोह. 'नाहींतर बदफैल करून फन्द कराल तर जावली मारून तुम्हांस कैद करून ठेऊं.' -ऐस्फुले १.२४. ३ -वि. कुकर्मी; रंडीबाज. [अर. फिअल् = कर्म] ॰फैलीस्त्री. १ बदफैलाचें कर्म; (मुख्यत्वें) रंडीबाजी; सोदेगिरी. २ गैरवर्तन. ३ -वि. कुकर्मी; व्यभिचारी; पापाचरण करणारा. ॰बोई-बोय-स्त्री. १ घाण; दुर्गंध. २ (ल.) बेअब्रू; अपमान; दुर्लौकिक. [फा. बदबू] ॰मस्त- वि. १ गर्वानें मत्त झालेला; धुंद; उन्मत्त. २ बंडखोर. 'गलीम बहुत बदमस्त जोरावर जाहला.' -पाब १२. [फा.] ॰मस्ती- स्त्री. १ उद्धटपणा; ताठा; अभिमान; मगरूरी; अरेरावी. २ बंड- खोरी; बंड. [फा.] ॰मामला-ली-पुस्त्री. १ कहराचें व दंडेलीचें वर्तन; दांडगाई (मुख्यत्वें पैशाच्या मागणीचा प्रतिकार करणारांचें). २ अन्याय. 'साष्टीचें ठाणें इंग्रजानें बदमामली करून घेतलें.' -वाडसमा २.१९. ३ हरामखोरी; बेइमानी. ४ गोंधळ; अव्य- वस्था. ५ भित्रेपणा. -वि. १ लुच्चा; हरामखोर. 'इंग्रज फार बद-मामली आहेत.' -रा १२.६. [फा.] ॰मास-श-ष-वि. १ वाईट रीतीनें उपजीविका करणारा. २ (ल.) दुराचरणी; गुंड; पुंड. [फा. मआष = उपजीविका] ॰माशगिरी-स्त्री. गुंडगिरी; पुंडपणा. ॰रंग-पु. १ नष्ट, भग्न झालेला मान, ऐश्वर्य, थाटमाट. २ ऐश्वर्य इ॰ च्या भंगानें झालेला अपमान; मानखंडना; उपहास. ३ बेरंग. ॰रस्ता-रहा-राह-पु. वाईट किंवा गैर चाल, वर्तन; अन्याय. 'हे बदरहाची कैफियत.' -ख ७.३५७०. [फा.] बदराई-राह-हा-ही-वि. १ बदकर्मानें वागणारा; कुमार्गी. 'बदराईच्या पाडी दाढा । लागे तुकयाचा हुंदाडा ।' -तुगा २८२४. २ -क्रिवि. कुमार्गानें. 'कोणी बद-राह वर्ततील तर तुम्हां लोकांनीं बुद्धिवाद सांगावा.' -रा ८.१२६. [फा.] ॰लाभ-नाम- नामी, बदलौकिक-वकर-वकरी-वक्र-वक्री-नपुस्त्री. १ दुर्लौकिक; बेअब्रू; अपकींर्ति; बदनामी. २ अयोग्य आरोप; दोष; ठपका; दुर्निमित्त. (क्रि॰ घालणें; ठेवणें; आणणें; येणें). -वि. कलंकित; दुर्लौकिक झालेला. 'आम्हास बदलाम करूं नये. ' -ख १०.५६२९. 'नबाब बुद्धिवन्त होत्साता हे बुद्धि वृद्धापकाळीं करून बद-वक्र करून घेतला.' -ब्रप ४५. [फा.] ॰वख्त-वि. दुर्दैवी. [फा.] ॰सलूक-पुस्त्री. गैर वर्तणूक; अन्याय. [फा.] ॰सल्ला- स्त्री. वाईट मसलत. ॰सल्लागार-पु. वाईट मसलत देणारा. [फा.] ॰सुरत-वि. अवलक्षणी मुद्रेचा; कुरूप. [फा.] ॰सूर- वि. वाईट स्वराचा, आवाजाचा; बेसूर (गाणें, वाद्य). [फा.] ॰हवई-स्त्री. १ खोटी बातमी; हवेंतील गप्प. -वि. विशेष खोटी; अगदींच वार्यावरची. 'अशा बदहवई आवया उठवितील त्यांत जीव नाहीं.' -ख १.१९३. [फा.] ॰हवा-स्त्री. दुर्दिन; वाईट हवा. [फा.]